"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"
आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले. न पटणार्या आणि कधी कधी त्यात हिणकस देखील असू /वाटू शकणार्या विचारांना विरोध कसा करावा याचे या संदर्भात दोन धृव दिसले...
वॉलस्ट्रीट जर्नल मध्ये आलेल्या पुस्तकपरीचयाप्रमाणे, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक जोसेफ लेलीवेल्ड हा काही काळ न्यूयॉर्क टाईम्सचा संपादक होता आणि इथे अतिशय सन्माननीय असलेला पुलीट्झर पुरस्कार देखील त्याला आधी मिळून गेला आहे. थोडक्यात लेखक म्हणून अमेरिकन चष्म्यातून त्याची योग्यता ही नक्कीच वरच्या दर्जाची वाटते. या पुस्तकासंदर्भात देखील वॉलस्ट्रीटने "वेल रीसर्च्ड" असेच म्हणलेले आहे. पण जर आपण वाचू लागलो तर एकीकडे संतमहात्मा म्हणत असताना, प्रत्येक गोष्टच खटकणारी वाटते. येथे काही त्यांचा संदर्भ देतो, पण ज्यांना वाचायचे असेल त्यांनी वॉलस्ट्रीटच्या पानावर जाऊन सविस्तर वाचावे (अथवा पुस्तक वाचावेत):
हिटलर विरोधात एक जरी ज्यू हा खंबीरपणे उभा राहीला तर हिटलरचे हृदयपरीवर्तन होऊ शकेल.
त्याच हिटलरला पत्र लिहीत असताना त्याला "माझ्या मित्रा" असे संबोधत "अहिंसेच्या पुजार्याचे ऐक" अशा अर्थाचे लिहीले.
दक्षिण अफ्रिकेत असताना कृष्णवर्णीयांना त्यांनी कमी लेखले होते....
वगैरे वगैरे म्हणत नंतर लेखक हा त्यांच्या व्यक्तीगत चारीत्र्यावर घसरतो आणि तारेवरची कसरत करत बरेच काही लिहून जातो, ज्यावरून आता भारतात आरडाओरड चालू झाली आहे. देशात, कधीकाळी विचारांना विचाराने उत्तर देणारा महाराष्ट्र, पुस्तकावर बंदी घालणारे पहीले राज्य ठरणार आहे.
मला हे पुस्तक खचीतच पटले नाही. किंबहूना पुस्तक परीचय वाचताना अस्वस्थता आली. त्याहूनही न्यूयॉर्क टाईम्सचे पुस्तक परीचय देतानाचे, "Appreciating Gandhi Through His Human Side" शिर्षक अधिकच कुजकटपणाचे वाटले. पण त्याच बरोबर हे देखील लक्षात आले, की असे गांधीजी काही पहीले नेते नाहीत ज्यांचे स्वत:च्या पाश्चिमात्य चष्म्यातून विश्लेषण केले जात आहे...सावरकरांवर तर अनेकांनी अगदी भारतीयांनी देखील वाटले ते विश्लेषण केले आहे. तेच रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांच्या संदर्भात आणि हिंदू देवतांच्या संदर्भात झालेले आहे. बर्याचदा असे लिहीणार्यांना स्कॉलर म्हणत ते बरोबरच असणार असे म्हणले गेले. आत्ता देखील गांधीजींच्या संदर्भात तेच होऊ शकेल असे वाटते.
पण म्हणून अशा पुस्तकांवर बंदी घालावी हा उपाय आहे का? मला नाही वाटत. कुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते. तोडफोड करण्यास त्याहूनही विरोध आहे. गांधीजींच्या संदर्भात तर अशी तोडफोड म्हणजे गांधीवादाला अजून एकदा तिलांजलीच ठरेल... पण अशा विचारांच्या विरोधात त्यांचा अभ्यास करून ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे महत्वाचे आहे असे वाटते. आणि मग त्या लेखकास नंतरच्या आवृत्तीत तसे चुकीचे ठरलेले विचार मागे घेण्यास भाग पाडायला लावणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते...
आता याच संदर्भात सुरवातीस म्हणलेला दुसरा पूर्ण अमेरिकेतील प्रसंग. त्यासाठी अगदी थोडक्यातः "मॉर्मन हा एक ख्रिस्तीपंथ आहे. त्यामधील ख्रिश्चन धर्मीय हे खूपच धार्मिक असतात. त्यांचे संघटनात्मक कौशल्य देखील खूप चांगले असते. 'The Church of Jesus Christ of Latter-day Saints' नामक त्यांचे चर्च सर्वत्र असते. त्यांच्या धर्मग्रंथाला 'बुक ऑफ मॉर्मन' असे म्हणले जाते. धर्मांतराला ते उद्युक्त करतात ह्यात नवल नाहीच... "
तर या 'बुक ऑफ मॉर्मन' वरून न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ब्रॉडवे थिएटरमध्ये "दि बुक ऑफ मॉर्मन" म्हणून एक संगितीका आत्ताच चालू झाली आहे. त्यात मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची कुठल्याही नॉर्मल भारतीय मनाला विकृत वाटेल अशा पद्धतीने थट्टा केली आहे. ती केली ते केली त्या शिवाय अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत. हे जर भारतात झाले असते तर आत्ता पर्यंत काय काय झाले असते याचा विचार करावा लागत आहे. मात्र मॉर्मन्सच्या The Church of Jesus Christ of Latter-day Saints संस्थेने काय करावे? "The production may attempt to entertain audiences for an evening, "but the Book of Mormon as a volume of scripture will change people's lives forever by bringing them closer to Christ." असे म्हणत त्या शो मधील हवा देखील काढून टाकली आणि हकनाक मिळू शकणारी त्या नाटकाची प्रसिद्धीपण अधिक न बोलता, बंद करून टाकली!
आता प्रश्न पडतो यातील कुठली प्रतिक्रीया योग्य आहे? स्वातंत्र्यावर बंदी आणणारी का समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यातल्या हिणकसपणामधील हवा काढून टाकणारी? तसेच
Comments
सहमत
मॉर्मॉनांचे धोरणच योग्य आहे.
--
शिवाय, तपशीलाचा विचार केल्यास, उभयलैंगिकतेच्या आरोपाविरुद्धमुळेच निषेध, बंदीची मागणी, इ. सर्वाधिक आहे. हे अधिकच वाईट आहे. या बंदीचा निषेध केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठीच नव्हे तर उभयलैंगिकतेला हीन लेखण्याबद्दलही आवश्यक आहे.
--
म्हणजे मी ऍबनॉर्मल भारतीय आहे. (अर्थात, मला साऊथपार्कचे अनेक भाग आवडले आहेत तेव्हा त्यांनीच बनविलेली संगितीका आक्षेपार्ह न वाटणे अपेक्षितच होते.)
नॉर्मल - खुलासा
म्हणजे मी ऍबनॉर्मल भारतीय आहे. (अर्थात, मला साऊथपार्कचे अनेक भाग आवडले आहेत तेव्हा त्यांनीच बनविलेली संगितीका आक्षेपार्ह न वाटणे अपेक्षितच होते.)
साऊथपार्क अथवा तत्सम मला देखील आवडतात आणि एन्जॉय करतो. पण एड्स, कॅन्सर, चाईल्डरेप, जेफरी डामर (माहीत नसेल तर वेगळा विषय आहे) अशा अनेकांना विनोदात आणणे हे पटले नाही. आणि त्यामुळे मी "नॉर्मल" हा शब्द वापरला. तो केवळ भारतीयांसाठीच असे नाही फक्त येथे भारतीय/वंशाचेच असल्याने तसे लिहीले होते. ते स्पष्ट न केल्याने काहीच आवडत नाही असे वाटले.
खुलासा
डामर माहिती नव्हता, माहिती शोधली. विनोद ही हिंसाच असते, त्यामुळे विनोदात वाईट वस्तू आवश्यकच वाटते. परंतु तो माझा मुद्दा नाही.
नॉर्मल भारतीयांच्या वर्णनाला "अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत." या विधानापासून "ती केली ते केली त्या शिवाय" या शब्दांनी तुम्ही अलग दाखविले होते. त्यामुळे, "मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची थट्टा" या विधानात जेफ्री डामरचा समावेश नाही असे वाटते.
उद्देश
त्या शिवाय" या शब्दांनी तुम्ही अलग दाखविले होते
खरे आहे. पण आपल्याला वाटले तसा उद्देश नव्हता, वाक्यरचना चुकली इतकेच म्हणू शकतो. गैरसमज नसावा. असे लिहीत असताना मधेच "सॅटरडे नाईट लाईव्ह" आठवले. त्यातील ह्युमर तर आवडतो. पण कधी कधी गचाळ वाटतो. तसेच काहीसे पण जरा अतिरेकाकडे झुकणारे झाले आणि तसे करताना समाजातील एका घटकाच्या धर्मश्रद्धेवर विनोद करत नकळत जोडले गेलेत असे कुठेतरी वाटले. वास्तवीक ती संगितिका बघायला आवडेल म्हणजेच त्यातील खाचाखोचा समजतील... असो.
+१
+१
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
सहमत
सहमत आहे. किंबहुना बंदी घातल्यास त्या कलाकृतींना नको इतके महत्व येते.
पुस्तकाची परिक्षणे कशी सापेक्ष असू शकतात याचे एक उदाहरण. ह्याच पुस्तकाचे न्यू यॉर्क टाइम्समधील आणखी एक परिक्षण वॉल स्ट्रीटच्या मानाने बरेच संयमित आहे.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
पुस्तकात खरेच असे लिहिले असले तर?
पुस्तक अर्थातच वाचलेले नाही.
जे काही वर्तमानपत्रांतून छापून आलेले आहे (कॅलनबाख यांच्याशी असलेले संबंध वगळता) त्यापैकी बहुतेक गोष्टी (इंद्रियांवर संयम न राहणे वगैरे) गांधींनी स्वतःच सांगितलेल्या आहेत. त्यात वेल रिसर्च्ड काय आहे हे माहिती नाही.
तसेही बहुधा पुस्तकात यावर ४-५ पानांहून जास्त खर्ची पडली नसावीत. त्या ४-५ पानांमुळे सगळे पुस्तक टाकाऊ किंवा बंदीयोग्य ठरू नये.
काल वर्तमानपत्रात वाचलेल्या बातमीनुसार पुस्तकात बायसेक्शुअल हा शब्द एकदाही आलेला नाही. आणि रेसिस्ट हा शब्द एकदाच आहे असे लेखकाचे म्हणणे दिसते. परीक्षणात लिहिले आहे ते पुस्तकात मुळीच नाही असे वाटते.
पुस्तकात खरेच असे लिहिले असले तरी पुस्तकावर बंदी घालूच नये.
(गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत किंवा अहिंसेबाबत बोलताना त्यांचे सेक्शुअल ओरिएण्टेशन मध्ये आणले तर आम्ही प्रतिवाद करूच).
नितिन थत्ते
?
पुस्तकामध्ये ते तसे आणले गेल्याचा आरोप तरी झाला आहे काय?
नाही
नाही. म्हणूनच मी आणखी काही भाष्यही केले नाही/प्रतिवाद केला नाही.
मी रिव्ह्यू देखील वाचला नाही कारण पुस्तकात तसे काही नाही असे आणखी काही बातम्यांत वाचले.
नितिन थत्ते
बंदी वगैरे
पुस्तकावर बंदी घालू नये - ठीक. वरील भावनांशी सहमत आहे. प्रत्यक्षात पुस्तक वाचायला जाणारे, त्याचा अर्थ लावून घेणारे, त्यावर मनन करणारे थोडेच असतात. औट ऑफ कन्टेक्स्ट वाक्ये वापरून परीक्षणही होत असते वगैरे तेव्हा उठसूट बंदी वगैरे अयोग्य वाटते. उगा फुकाचे महत्त्व दिल्यासारखे वाटते. परंतु याच पुस्तकावर जर उद्या चित्रपट आला तर? दृकश्राव्य माध्यमातून होणारा परिणाम हा अधिक असतो आणि २५०-३०० पानांचे पुस्तक वाचण्याएवढा पेशन्स अडीच-तीन तासांचा सिनेमा पाहण्यास लागत नसल्याने कदाचित होणारा परिणाम अधिक व्यापक असू शकतो. त्यावर बंदी घालावी का?
उपक्रमावर (किंवा इतर संकेतस्थळांवरही) विशिष्टप्रकारचे लेख नकोत त्यामुळे स्थळाची पत घसरते असे म्हणणारे, उपद्रवमूल्य वाढल्याने सदस्यांवर बंदी आणावी असे म्हणणारे आणि एखाद्या पुस्तकावर बंदी आणावी असे म्हणणार्यांत विशेष फरक कोणता असावा?
माझ्यामते हल्ली एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीस उभयलिंगी, समलिंगी वगैरे म्हणण्याची फॅशन आली आहे; त्यानुसार गांधी त्यातून सुटणे थोडे कठीणच होते. त्यांची वर्णीही लागली हे वाचून संतोष वाटला.
असो.
मूळ विषयाबाबत - उठसूठ बंदी हे धोरण नसावे परंतु बंदी घालणे हा परिस्थितीनुसार घेतलेला एक उपाय असू शकतो.
फरक
देश ही खासगी मालमत्ता नाही.
सहमत
देश ही खासगी मालमत्ता नाही.
सहमत.
या संदर्भात कायमच वादग्रस्तेच्या भोवर्यात अडकलेल्या एम एफ हुसैनचे उदाहरण द्यावेसे वाटते:
हुसैन यांनी अनवाणी येण्याचा प्रयत्न केला म्हणून "आमच्या नियमात बसत नाही" असे म्हणत एका खाजगी क्लबने जर त्यांना प्रवेश दिला नाही तर तो हुसैन यांच्यावर अन्याय ठरत नाही. मात्र याच हुसैन यांच्या चित्रांवर सरकारने बंदी घालणे हे पटत नाही. त्याच बरोबर त्या चित्रांवर जर कोणी कायद्याच्या मर्यादा (अर्थात हिंसा न करता) टिका केली तर ते देखील मान्य आहे. पण त्यात कलाकाराचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात नाही.
बाकी माझ्या दृष्टीने गांधीजींना अप्रत्यक्षरीत्या समलिंगी म्हणले म्हणजे अपमान झाला हा अथवा समलिंगी/भिन्नलिंगी हा मुद्दाच नाही. ते वैयक्तिक प्रश्न आहेत. मात्र, त्यांच्या खाजगी आयुष्याचा पाश्चात्यांच्या नजरेतून अर्थ लावत त्याचे विश्लेषण करणे हा नक्की मुद्दा आहे. गांधीजींची त्यातील काही पत्रे मी या संदर्भात नजरेखालून घातली. त्यातील वाक्य रचना वाचताना मला केवळ आम्ही कॉलेजात असताना ज्या पद्धतीने मित्र मित्र गळ्यातगळे घालून जायचो आणि अमेरिकेत आल्यावर, "अबे ऐसा मत कर यार, लोग और कुछ समजते है.." असे ऐकायला लागलो त्याची आठवण झाली. हाच (परकीय नजरेतून विश्लेषण) मुद्दा केवळ गांधीजींच्याच संदर्भात नाही तर तो रामकृष्णांच्या संदर्भात, हिंदू धर्माचा लावला जाणार्या अर्थाच्या संदर्भात आणि जाता जाता शिवाजीबद्दल काहीतरी लिहीण्याच्या संदर्भात आहे असे वाटते.
बंदी नको ह्यास सहमत. तरीदेखील.
विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे असे जे तुम्ही किंवा रिकामटेकडा म्हणतात त्यावर - विचार व्यक्त करून भावना दुखावल्या काय आणि तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान झाले काय, नुकसानाबद्दल दावा लावा हवे तर, नुकसान करणाऱ्यांकडून भरून घ्या. प्रक्षोभक विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्यास प्रक्षोभक कृती करण्याचे स्वातंत्र्य पण पाहिजेच. जीवित हानी कदाचित भरून काढता येणार नाही, त्यामुळे त्यास घेतलेला आक्षेप समजू शकतो.
आणि बंदी बद्दल म्हणाल तर - तसे करू नये, कारण निदान भारतात लोकांची स्मरणशक्ती अतिशय वीक आहे, महम्मदचे कार्टून काढल्यामुळे झाला तेवढा गदारोळ इथे शक्य नाही असे मला वाटते, लोक काळाप्रमाणे गोष्टी विसरून जातात, लेन प्रकरणात देखील थोडी फार तोडफोड आणि बराचसा राजकीय धुराळा ह्याशिवाय काही झाले नाही, दादोजींच्या वेळेस तर काहीच झाले नाही. उगाच बंदी घालण्याचे कष्ट कशाला?
बाकी साउथ पार्क झकास :)
सापेक्षता?
'नजरेतून' बघण्याचा आरोप होणार असेल तर संशोधनच अशक्य होईल.
उपलब्ध माहितीवरून अंदाज केल्यास, तो अंदाज योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहे. उदा., 'वॅसलिनमुळे गांधीजींना कॅलनबाखचे स्मरण होई' अशी 'उपलब्ध माहिती' असेल तर त्याविषयी त्यांना नेमका काय अर्थ अभिप्रेत असावा याविषयी वेगवेगळे अंदाज शक्य असतील. परंतु, नजरेनुसार तथ्येच वेगळी दिसू शकतील काय?
शिवाजीविषयीच्या प्रकरणात तथ्यांविषयीच ऐतिहासिक पुरावा नव्हता. उलट, रामकृष्ण, हिंदू शिकवणी/श्रद्धा किंवा गांधीजींच्या बाबतीत, केवळ अन्वयार्थाविषयी आक्षेप आहेत, तथ्ये निर्विवाद आहेत.
--
धाडसाने खीखीखी करण्याऐवजी, मोदींनी "केंद्राने बंदी घालावी" अशी शहाजोग मागणी केली हे वाचून आश्चर्य वाटले.
असे नाही
'नजरेतून' बघण्याचा आरोप होणार असेल तर संशोधनच अशक्य होईल.
असा उद्देश नाही... पण सामाजीक अन्वयार्थ लावणे हे y=mx+c इतके सरळ नसते.
उपलब्ध माहितीवरून अंदाज केल्यास, तो अंदाज योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहे.
इथेच सामाजीक अन्वयार्थ महत्वाचा ठरतो. थोडे वेगळे, अभारतीय/अहिंदू आणि तसे सामान्य पण दुर्दैवी उदाहरण सांगतो, जे मी काही वर्षांपुर्वी इथल्या एबीसी वरील २०/२० कार्यक्रमात पाहीले होते. रशियातून फुटलेल्या संघराज्यातील एक कुटूंब हे अमेरिकेत, मला वाटते, टेक्सासमध्ये स्थायिक झाले होते. ते धर्माने मुस्लीम होते. (त्याचा संबंध येईल). एक लहानसा उद्योग काढून सुखाने रहात होते. त्यांना एक लहान (मला वाटते दोनएक वर्षांची असावी) मुलगी होती. आई-वडीलांचे मुलीवर खूप प्रेम होते. वडील जवळच्या बागेत तिला नेमाने खेळायला घेऊन जात. तेंव्हा घरातल्याप्रमाणेच तीला मांडीवर बसवून खेळवणे वगैरे चालायचे. मांडीवर उभे करून दोन्ही हाताने वर उडवणे चालायचे. मुलीला पण गंमत येयची आणि वडीलांना पण आनंद होयचा. मात्र इतके जवळ घेणे. लगट करणे हे अनेकांसाठी नवल होते. कोणीतरी डिपार्टमेंट ऑफ सोशल सर्विसमध्ये तक्रार केली. ते महाभाग आले आणि या मुलीस लैंगिक छळ होत आहे म्हणून जप्त करून गेले. इथली पद्धती माहीत नसल्याने त्या कुटूंबाला कसे झगडावे हे समजले नाही. तो इंटरनेटच्या आधीचा काळ होता... शेवटी त्यामुलीला एका अमेरिकन कपलने दत्तक घेयचे ठरवले. या डिपार्टमेंटने घेऊ दिले आणि तीला तात्काळ ख्रिश्चन करून टाकले. त्या सर्व वेळेत त्यामुलीवर नक्की काय मानसीक परीणाम घडत असेल, कुटूंबाला कुठल्या तणावातून जावे लागत असेल, ते नक्की काय करत होते, त्यांच्या समाजातील नक्की कल्चर कसे आहे आणि त्यातील निर्विवाद काय वादग्रस्त असू शकते आणि केवळ आपल्या (स्थानिक) कायद्याच्या दृष्टीतून काय चुकीचे ठरू शकते, यातील कशाचाच विचार नाही. बार्बरा वॉल्टर्सने ह्याला प्रसिद्धी दिली खरी, पण पुढे काय झाले ते माहीत नाही.
थोडक्यात "नजरेतून" बघणे हे मी अशा वृत्तीस धरून म्हणतो. जर तुम्हाला (म्हणजे संशोधकाला) खरेच सामाजिक विश्लेषण करायचे असेल तर त्या समाजाच्या रितीरिवाजाच्या चष्म्यातून बघावे लागते. बर्याचदा तसे ते होत नाही. बर्याचदा तुम्ही ज्याला "उपलब्ध" माहिती म्हणत आहात ती फक्त, या संदर्भात, "गांधीजींचे कुठलेतरी पत्र" असू शकते. अगदी त्या पत्रातील काही ओळी या आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट न घेता, पूर्ण घेतल्या तरी नक्की भारतीय व्यक्ती समोरच्याबद्दल लिहीताना कसे लिहीते, त्यातही ती जर शंभरएक वर्षांपुर्वीची घटना असली तर तेंव्हा बोलायच्या काय पद्धती होत्या, भारतीय कसे बोलतात वगैरेचा विचार लेखकाने केला होता का? बरं इतके करूनही जर लेखक स्पष्टपणे लिहीत नाही, आवाज केल्यावर म्हणतो की मी तसे म्हणलेलेच नाही, तर मग असे लूज एंड असलेले संशोधन तरी का म्हणायचे? तेच इतर वेळेसही कमी अधिक फरकाने होते असे म्हणायचे आहे....
अतिअवांतरः संशोधनाच्या संदर्भात जेंव्हा समाजाचा सहभाग होतो तेंव्हा केवळ विज्ञान कसे पुरत नाही याचे कालच एक उदाहरण चर्चिण्याचा अनुभव आला. येथिल एका विद्यापिठातील प्राध्यापक आणि त्याची टिम ही पर्यावरण बदलाचा ऍडाप्टेशन कसे करावे लागेल यासंदर्भात संशोधन करत आहे ज्याला मी अगदी थोडी मदत करत आहे. बॉस्टनमध्ये समुद्रपातळी वाढत आहे. तपमान पण बदलत आहे. काही ठिकाणी भरतीच्या वेळेस पंप लावून पाणी परत समुद्रात ढकलणे अनिवार्य झाले आहे. दरवर्षी पाऊस वाढतच चालला आहे. गेल्या वर्षी तर एका तासात ऑलमोस्ट चार इंच पडला आणि पूरसदृश्य परीस्थिती झाली. तर अशा वेळेस सांडपाणी आणि पावसाचे पाणि (स्टॉर्मवॉटर) यांचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे असावे या संबंधातला इंजिनियरींग प्रॉब्लेम डिस्कस करणे चालू होते. पण नंतर लक्षात काय आले की हा प्रॉब्लेम केवळ इंजिनियरींग डिझाईनने सुटणार नाही आहे तर त्यात लोकांना, सरकारला, राजकारण्यांना सामिल करून घ्यावे लागणार आहे. धोरणे बदलावी लागतील, नियम तयार करावे लागतील. आणि तरी देखील संबंधीत निर्णय हे अर्थव्यवस्था आणि उपलब्ध निधी यावरून टप्प्याटप्प्यानेच घेता येतील... थोडक्यात, शास्त्र आणि तंत्र (अभियांत्रिकी) विचारात घेतले नाही का? तर घेतले. पण तेव्हढेच घेऊन योग्य विश्लेषण होऊ शकते का? तर नाही. असेच किंबहूना याहूनही अधिक इतिहासासंबधातील सामाजीक संशोधनात असणे महत्वाचे आहे. केवळ मागे न्यूयॉर्क टाईम्स अथवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो आहे म्हणजे सगळे काही योग्य आहे असे होऊ शकत नाही.
सुधारणा सुचवते..
>>खरेच सामाजिक विश्लेषण करायचे असेल तर त्या समाजाच्या रितीरिवाजाच्या चष्म्यातूनही बघावे लागते. असे म्हणावे.
लूज एंड ग्राह्य
ठाम मते विज्ञानात बहुतेकदा नसतातच.
हा विचार करून त्यांनी रितीरिवाजांसाठी कायदे रद्दच केले तर ठीक आहे. परंतु, कायदे असतील तर ते सर्व समाजांना समानच लागू करण्यात यावेत.
केला नसेल तर त्यांची मते नाकारली जातीलच.
त्यांनी गॅलिलिओचा आदर्श ठेवला असावा.
नक्की
धाडसाने खीखीखी करण्याऐवजी, मोदींनी "केंद्राने बंदी घालावी" अशी शहाजोग मागणी केली हे वाचून आश्चर्य वाटले.
नक्की कुठल्या संशोधनाच्या आधारे आपण गृहीत धरत आहात की मोदींना "खी खी खी" म्हणायचे असावे म्हणून?
निराधार
कोणतेही संशोधन नाही. मोदींनी स्वतःही बंदी घातल्याची बातमी सापडली. त्याअर्थी, मोदींचा तसा सुप्त उद्देशही नसावा.
बंदी तर नकोच. न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही
न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही.
मात्र न्यू यॉर्क टाइम्समधील परिचय आणि वॉल स्ट्रीट जर्नलमधील परिचय एकाच पुस्तकाबद्दल आहेत की वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल आहेत अशी शंका यावी इतके वेगवेगळे आहेत.
अर्थातच पुस्तकावर बंदी नको. सहमत.
मॉर्मनांची प्रतिक्रिया या ठिकाणी सुयोग्य. (नेहमीच अशी स्वातंत्र्यसन्मान करणारी असते असे नाही. यूटाह राज्यात एखादा चित्रपट बंद करण्यात सिनेमा थियेटरांच्या मालकावर दबाव आणला जातो. दबाव कधीकधी यशस्वी होतो. या संगीतनाटकाच्या संदर्भात प्रसंगी दबाब यशस्वी होणार नाही, असा सूज्ञ विचार काही मॉर्मन पुढार्यांनी केला असावा. अथवा मॉर्मनां-मॉर्मनांतही स्वातंत्र्याचा कमी आणि अधिक आदर करणारे वेगवेगळे लोक असावेत.)
न्यूयॉर्क टाईम्स
न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही.
मी लेखाबद्दल बोललो नव्हतो. शिर्षक अधिकच कुजकट वाटते असे म्हणालो होतो.
या संगीतनाटकाच्या संदर्भात प्रसंगी दबाब यशस्वी होणार नाही, असा सूज्ञ विचार काही मॉर्मन पुढार्यांनी केला असावा.
सहमत.
अथवा मॉर्मनां-मॉर्मनांतही स्वातंत्र्याचा कमी आणि अधिक आदर करणारे वेगवेगळे लोक असावेत.
अर्थातच! त्यासंदर्भात इतर ख्रिस्तीपंथियांकडूनच ऐकले की कळते.
बाकी आपल्याकडे (भारतात) हा मुद्दा केवळ जनतेपुरता / घटकापुरता मर्यादीत नसून सरकारी अधिकाराचा आहे. एखाद्या संस्थेने/घटकाने/गटाने एखाद्या अशा घटनेविरुद्ध, भावना दुखावत आहेत असे म्हणत, आवाज केला तर समजू शकते. पण सरकारने सरसकट बंदी घालावी ह्याला काही अर्थ नाही असे वाटते. असे सरकारी *राजकीय) अधिकार रेस्ट्रीक्ट केले पाहीजेत असे वाटते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे GandhiServe Foundation कुठकलीही कागदपत्रे न लपवता जाहीर ठेवत आहेत. आणि ते स्पृहणीय आहे. मग सरकारने कशासाठी बंदी घालावी?
बंदी नको
अशा पुस्तकावर बंदी नको. पुस्तकात सत्याच्या बिपरीत असल्यास बदनामीचा खटला मात्र चालवावा.
बंदी आणि बदनामीचा खटला यात मला बदनामीचा खटला हा जास्त जाचक वाटतो. बंदी सार्वत्रिक असूच शकत नाही. त्यामुळे ते पुस्तक घेण्याची जिज्ञासा वाढते. याउल्ट बदनामीचा खटला यशस्वी झाला तर संबंधितांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. खटल्यात तथ्यांवर जास्त विचार होतो.
अर्थात भारतात्तील न्यायव्यवस्था पाहिल्यावर कुठलाही खटला कालमर्यादेत संपणे हे कठीण आहे. अशा परिस्थितीत बंदी सारखे कामचलाऊ मार्ग निघतात.
पुस्तक प्रथितयश अमेरिकन माणसाने लिहिले म्हणून बंदीच्या उड्या चालू आहेत. नाहीतर यापेक्षा गंभीर आरोप गांधींवर बरेचदा होत असतात. परिक्षणाचा लेख वाचला नाही. केवळ लैंगिक प्रश्नावरून पुस्तकाबद्दल वाचण्यात रस नाही.
याच सोबत गांधींचे (आणि इतर सर्वांचे) मूल्यमापन होण्याची क्रिया जड गेली तरी असावी.
प्रमोद
खटल्यासंदर्भात
मला वाटते आपण म्हणता तसा खटला भरायचे ठरवले तर तो ते पुस्तक जिथे प्रसिद्ध झाले त्या देशात, अर्थात अमेरिकेत भरवावा लागेल. त्यासंदर्भात, सेम्युअर हर्ष यांचे, "The Price of Power: Kissinger in the Nixon White House" पुस्तक आठवते. त्यामध्ये मोराराजी देसाईंना त्यांनी सीआयएचे पगारी हस्तक म्हणले होते. मोरारजींनी त्यांच्यावर खटला भरला आणि तो काही काळ चालल्याचे आठवते. मात्र शेवटी त्याचा निर्णय दुर्दैवाने मोरारजींच्या बाजूने लागला नाही. म्हणून मला व्यक्तीगत ते कधीच सीआयएचे हस्तक वाटणार नाहीत, जरी त्यांचे अनेक राजकीय निर्णय खटकले असले तरी. बरं, खटला हरायचे कारण काय तर, "To win a libel suit, a public figure must show not only that the offending statement is false, but also that the writer either knew it to be false or did not care whether it was true or not." (अवांतरः या खटल्याची बातमीचा मथळा वाचला तर ८०च्या दशकात भारताबद्दल किती दुरून पाहीले जात असावे, हे समजते).
पुस्तक प्रथितयश अमेरिकन माणसाने लिहिले म्हणून बंदीच्या उड्या चालू आहेत.
खरे आहे. पण ह्याच प्रथितयश प्रतिमेमुळेच अशा लेखकांकडून गांधीजी आणि इतर अनेकांबद्दल जे काही बोलले जाते ते आपण सरसकट संदर्भ म्हणून घेऊ नये असे वाटते. मात्र अनेकदा आपल्याला न आवडणार्या अथवा आपल्या न आवडणार्याला 'आवडणार्या व्यक्ती' म्हणून अशांचे चारीत्र्य हनन करायला अशा पुस्तकांचा वापर केला जातो, चघळली जातात. अशाच प्रथितयश लेखकांनी, भारताच्या संदर्भात गणपती या अनेकांच्या देवतेबद्दल अत्यंत विकृत लिहीले होते, कधी काळी रामकृष्ण होते, सावरकर होते आता त्यात गांधीजी पण आले.
लिव विथ इट
न आवडणार्या अभिव्यक्तीविषयीच, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा दावा करणार्या समाजाची परीक्षा शक्य आहे.
हा आरोप असिद्ध करण्याची जवाबदारी आरोपीवरच लादणे योग्य वाटते.
अनेक धार्मिक कथा विकृत आहेत, त्या चालवून घेणार्यांनी फॅनफिक्शनविषयी गळे काढावे काय?
भावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे.
शिवाय, रामकृष्ण, सावरकर आणि गांधीजींच्या बाबतीत केवळ, 'उपलब्ध माहितीचा' अर्थ लावण्यावरून वाद आहेत, अर्थ योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहेच. अर्थ पटला तर मात्र त्या विधानांमध्ये विकृतीच उरणार नाही.
(गणपतीच्या बाबतीत कोणी लिहिले होते?) जीजस अँड मो या कॉमिक स्ट्रिपमध्ये गणेश कधीकधी पाहुणा असतो.
फरक
मला वाटतयं या संदर्भतील आपल्यामधला फरक हा मर्यादीत असावा...
न आवडणार्या अभिव्यक्तीविषयीच, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा दावा करणार्या समाजाची परीक्षा शक्य आहे.
सहमत.
हा आरोप असिद्ध करण्याची जवाबदारी आरोपीवरच लादणे योग्य वाटते.
मी काही उलट म्हणलेले नाही...सहमतच आहे. "खटला हरायचे कारण काय तर," असे म्हणायचे कारण इतकेच होते की असे सिद्ध करणे हे कायम "अपहील बॅटल" असते. त्यातून काही सिद्ध होऊ शकत नाही. मोरारजी कोर्टात हरले याचा अर्थ ते सिआयएचे हस्तक होते असे सिद्ध झाले का तर नाही.. पण ते डिटेल्स कधी प्रकाशात येत नाहीत आणि मग जर कुणाला त्याचा (गैर)वापर करायचा असेल तर ते सहज शक्य होऊ शकते...
अनेक धार्मिक कथा विकृत आहेत, त्या चालवून घेणार्यांनी फॅनफिक्शनविषयी गळे काढावे काय?
मी अजिबात तसे म्हणत नाही. अथवा विकृत कथांचेच काय पण परंपरांचेपण समर्थन करत नाही. मात्र जे स्पष्ट नाही त्याचे विश्लेषण करताना कसे करावे ह्यासंदर्भात मी स्थानिक परंपरा, त्यांचे अर्थ, त्या कुठल्या संदर्भात निर्माण झाल्या वगैरेला महत्व देईन. केवळ उ.दा. जर जुम्मे के जुम्मे म्हणत मुस्लीम धर्मात दर शुक्रवारीच अंघोळ करतात असे कोणी म्हणत त्यांचे हसे करू लागले तर, तो धर्म/पद्धती कुठल्या काळात आणि कुठल्या भागात (वाळवंटात) तयार झाला आहे याचा विचार करेन आणि मगच हायजीनबद्दल अथवा त्याचे इतरत्र पालन करणार्यांबद्दल टिपण्णी करेन.
भावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे.
हे स्वातंत्र्य दुहेरी शस्त्र असते आणि ते जे मान्य करतात त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांचे स्वातंत्र्य पण मान्यच आहे. पण आपल्याकडे तसे होते का? परत एक उ.दा.: गोळवलकरांना हिटलरसमर्थक म्हणत नावे ठेवणार्यांसमोर जर कोणी गांधीजी त्याच हिटलरला "माझ्या मित्रा" असे संबोधून पत्र लिहीतात हे दाखवले तर तशा दाखवणार्या व्यक्तीस हेच लोकं फॅनॅटीक, गांधीद्वेषी, रॅडीकल म्हणतील.
शिवाय, रामकृष्ण, सावरकर आणि गांधीजींच्या बाबतीत केवळ, 'उपलब्ध माहितीचा' अर्थ लावण्यावरून वाद आहेत, अर्थ योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहेच. अर्थ पटला तर मात्र त्या विधानांमध्ये विकृतीच उरणार नाही.
सहमत. पण गंमत अशी असते की हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर "गिल्ट बाय असोसिएशन" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे.
(गणपतीच्या बाबतीत कोणी लिहिले होते?)
जेफरी क्रिपालने त्या संदर्भात लिहीले होते (ज्याने रामकृष्णांबद्दलजही लिहीले आहे). कधीकाळी ते वाचले होते. आत्ता तात्काळ मला त्यांचा दुवा मिळाला नाही. त्याला उत्तरे देणारे अनेक दुवे मिळाले. शोधा म्हणजे सापडेल ;) अथवा नंतर मिळाल्यास देईन.
ठीक
स्थानिक परंपरांचा अर्थ लावण्याची भविष्यात कोणी तसदी घेतल्यास त्यांना पटेल की ते सीआयएचे हस्तक असल्याचे सिद्ध झाले नाही तर केवळ, त्यांनी केलेला, खोडसाळपणाचा (मॅलिशिअस इंटेन्शन) आरोप कोर्टाने अमान्य केला.
तत्कालीन परिस्थिती जगाच्या अंतापर्यंत टिकणार असल्याचा खात्रीने आदेश देण्यात आले असतील तर आदेश देणार्यांना नक्कीच हसावे. परिस्थितीसापेक्ष वागणूक बदलण्याची मुभा देणार्या धर्मग्रंथातील जुन्याच वागणुकींचे अनुकरण करणार्या अनुयायांना हसावे. शेवटी, एखादी हास्यास्पद वर्तणूक दिसत असेल तर तिच्यासाठी कोणाचीतरी टिंगल करता येईलच.
त्यांना गोळवलकरद्वेषी, रॅडिकल,फॅनॅटीक संबोधिता येईलच की ;)
गंभीर उत्तर असे की गांधीजींची मते दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीची असल्यामुळे क्षम्य मानता येतील, गोळवलकरांच्या काळापर्यंत जर्मनीतील क्रौर्याच्या बातम्या बाहेर आल्या असतील तर त्यांची मते क्षम्य मानता येणार नाहीत.
रामकृष्णांबद्दल इंटरप्रिटेशनविषयीचे वाद शक्य आहेत परंतु तथ्ये उपलब्ध आहेत; गणपतीविषयी कोणीही वाट्टेल ते फॅनफिक्शन लिहू शकतो, तथ्ये प्रतिपादित करू शकतो.
काही मुद्दे
स्थानिक परंपरांचा अर्थ लावण्याची भविष्यात कोणी तसदी घेतल्यास त्यांना पटेल
असाच स्थानिक परंपरांचा अर्थ इतरत्रही लावला जावा. जेंव्हा लावला जात नाही आणि स्वतःच्या परंपरेप्रमाणे विश्लेषण होते, तेंव्हा अशा लोकांचे स्कॉलर्ली का धरावे? अर्थात जर त्यांच्याकडे सबळ सरळ पुरावे असले तर गोष्ट वेगळी. आपण इंटरप्रिटेशनबद्दल बोलत आहोत.
तत्कालीन परिस्थिती जगाच्या अंतापर्यंत टिकणार असल्याचा खात्रीने आदेश देण्यात आले असतील तर आदेश देणार्यांना नक्कीच हसावे.
असा मुळात आदेश देणार्यांना मी हसणार नाही कारण तो स्थलकालसापेक्ष होता. त्यांच्या दृष्टीने जग आणि त्याचा अंत या कल्पना मर्यादीत होत्या. मात्र आज जर कोणी तसा हट्ट करत असेल तर ते नक्कीच वादग्रस्त आहे. म्हणूनच माझ्या मूळ प्रतिसादात, 'त्यावर टिपण्णी करेन,' असे म्हणले...
त्यांना गोळवलकरद्वेषी, रॅडिकल,फॅनॅटीक संबोधिता येईलच की ;)
अहो नुसते संबोधायचे काय घेऊन बसलात? असतातच ते तसे! ;)
गंभीर उत्तर असे की गांधीजींची मते दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीची असल्यामुळे क्षम्य मानता येतील, गोळवलकरांच्या काळापर्यंत जर्मनीतील क्रौर्याच्या बातम्या बाहेर आल्या असतील तर त्यांची मते क्षम्य मानता येणार नाहीत.
वास्तवीक हा भाग मी केवळ उदाहरण (उ.दा. :) ) म्हणून दिला होता. तरी देखील तुम्ही पुढे उल्लेख केलेला असल्याने अवांतर होत असले तरी, थोडे स्पष्टीकरण - गोळवलकरांची आक्षेपार्ह विधाने "वुई" या पुस्तकातील आहेत जे मार्च १९३९ चे आहे. गांधीजींचे पत्र हे जुलै १९३९ चे आहे. गांधीजींनी "a single Jew standing up and refusing to bow to Hitler's decrees" might be enough "to melt Hitler's heart." हे कधी म्हणले आहे ते माहीत नाही, पण हिटलरचे अत्याचार समजल्यावरच म्हणलेले असणार हे उघड आहे. गांधीजींनी पुढे, 'अरबांचे हृदयपरीवर्तन होईस्तोवर ज्यूंनी इस्त्रायल साठी धीर धरावा,' अशा अर्थाचे म्हणलेले आहे. तर १९६६ साली प्रथम पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेल्या गोळवळकरांच्या "बंच ऑफ थॉट्स" मध्ये त्यांनी, "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians."असे म्हणले आहे. गांधीजी स्वतःबाबत म्हणाले होते तसेच, 'कुठल्याही व्यक्तीच्या आधीच्या मतापेक्षा नंतरचे मत जर भिन्न असले तर नंतरचे (पक्षी: लेटेस्ट) मत हे अधिक ग्राह्य धरले जावे" असे म्हणावेसे वाटते.
रामकृष्णांबद्दल इंटरप्रिटेशनविषयीचे वाद शक्य आहेत परंतु तथ्ये उपलब्ध आहेत;
मुद्दा त्याही पुढचा होता: हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर "गिल्ट बाय असोसिएशन" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे.
ठीक
सहस्रबुद्धे यांनी म्हटल्याप्रमाणे, बदनामीचा खटला हे अशा वादांसाठी सर्वात योग्य व्यासपीठ आहे.
स्कॉलर्ली धरावेच असा आग्रह नाही. मात्र, प्रत्येक वाचक मनात न्यायाधीशाच्या भूमिकेत असतोच. रामकृष्ण यांच्याविषयीचा अर्थ मला चुकीचा वाटत नाही. गांधीजींविषयी प्लेटॉनिक अर्थ लावला असल्यास तेही साधार वाटते. (पुस्तके वाचलेली नाहीत, परीक्षणांवरून बनलेली मते आहेत.)
लेटेस्ट मत अधिक ग्राह्य धरले जावे हे तर मान्यच आहे. परंतु, गांधीजींचे १९३९ सालीचे मतही असेच होते की हिटलर कितीही आक्रमक असला तरीही त्याचे मतपरिवर्तन होऊ शकेल. म्हणजे, तेव्हाही त्यांना त्याची मते पटलेली नव्हतीच. मात्र, १९३९ साली गोळवलकरांनी हिटलरचा आदर्श योग्य ठरविला होता. लेटेस्ट माहितीवरून हिटलरची वाईट बाजू ठळक झाली तेव्हाही कदाचित गांधींचा आशावाद टिकून राहिला असेल, त्यांना रिकँट करण्याची निकड नव्हती (पराकोटीच्या घृणास्पद गुन्हेगाराला माफ करण्यासही ख्रिस्त तयार असतो तसे ;)). उलट, मत बदलले असल्याचे गोळवलकरांनी जाहीर करणे अत्यावश्यक होते. (शिवाय, १९४८ पेक्षा १९७३ पर्यंत अधिकच पुरावे बाहेर आले असतील.)
स्वतःला मासिक पाळी जाते असे मानणार्या व्यक्तीला गुरू मानणार्याच्या विचारशक्तीवर बौद्धिक शृंखला असल्याचे सिद्ध होत नाही काय? मुळात, व्हॅलिडिटी असे काही कोणालातरी दिले जावे काय? कोणाचेही युक्तिवाद नमूद करताना, नावाचा उल्लेख केवळ श्रेय देण्यासाठीच असावा ना?
अजून पुढे...
सहस्रबुद्धे यांनी म्हटल्याप्रमाणे, बदनामीचा खटला हे अशा वादांसाठी सर्वात योग्य व्यासपीठ आहे.
मी ते अयोग्य आहे असे म्हणलेच नाही. फक्त त्याचा उपयोग होऊ शकेल असे वाटत नाही असे म्हणले आहे आणि ते आजही माझे मत आहे.
स्कॉलर्ली धरावेच असा आग्रह नाही.
तुम्ही आग्रह नाही अथवा आहे, ह्या संदर्भात सिलेक्टीव्ह आहात का हे कशाच्याही संदर्भात आहे?
गांधी-गोळवळकर हे सुरवातीस, जसे मुसलमान, एम एफ हुसैन वगैरे उदाहरणे दिली होती तसेच दिले होते. पण असे दिसते आहे की तुम्हाला तो विषय ओपन ठेवायचा आहे. म्हणून अधिक प्रतिसाद.
परंतु, गांधीजींचे १९३९ सालीचे मतही असेच होते की हिटलर कितीही आक्रमक असला तरीही त्याचे मतपरिवर्तन होऊ शकेल. म्हणजे, तेव्हाही त्यांना त्याची मते पटलेली नव्हतीच.
आपल्या या विधानासंदर्भात गांधीजींची काही विधाने खाली चिकटवत आहे:
हिटलरला जिनियस, ब्रेव्ह, मॅचलेस ऑर्गनाइझर म्हणणे आणि त्याच्या विरुद्धचे हत्याकांड थांबवण्याची मागणी ब्रिटीशांकडे करणे ह्याला जर तुमच्या लेखी "आशावाद" म्हणायचे असले तर अवश्य म्हणा.
उलट, मत बदलले असल्याचे गोळवलकरांनी जाहीर करणे अत्यावश्यक होते. शिवाय, १९४८ पेक्षा १९७३ पर्यंत अधिकच पुरावे बाहेर आले असतील
हे पुस्तक १९७३ सालचे नसून १९६६ चे आहे. पण मुद्दा तो नाही... सर्वप्रथम त्यांच्या विधान हे ज्यूंच्या हत्याकांडासंदर्भात नव्हते. कारण १९३९ सालापर्यंत तसे झाले नव्हते. १९४० साली मला वाटते पहीली छळछावणी अस्तित्त्वात आली. बंच ऑफ थॉट्स त्यांच्या विविध वेळच्या ३३ वर्षे केलेल्या लेखनाचे संकलन आहे. ते नक्की कधी म्हणाले हे मला आत्ता माहीत नाही. माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे. मात्र त्यांना जाहीर करणे आवश्यक वाटले देखील नसावे. कारण अगदी १९४२ साली देखील सुभाषचंद्र बोस हे हिटलरला जाऊन भेटले आणि मिळाले होते. अगदी आपल्या शालेय (आणि इतर) इतिहासात देखील त्यासंदर्भात कधी कमीपणा न आणता, ते (सुभाषबाबू) हिटलरला कसे मिळाले हे सांगितले जातेच. मात्र त्यांना (गोळवळकरांना आणि पर्यायाने संघाला) हिटलर-नाझी समर्थक वगैरे म्हणायचा फाजीलपणा चालू राहीला. असो.
स्वतःला मासिक पाळी जाते असे मानणार्या व्यक्तीला गुरू मानणार्याच्या विचारशक्तीवर बौद्धिक शृंखला असल्याचे सिद्ध होत नाही काय?
हे कुठले पुस्तक न वाचता, आपण परीक्षणावरून मत बनवले आहेत? आणि कुणाबद्दल? कारण मला कल्पना नाही. मात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का?
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
:)
कोणीही काहीही लिहिले तर ते स्कॉलर्ली असतेच, असे नाही. निरीक्षणांच्या परंपरासापेक्षतेची तपासणी व्हावीच.
हिटलरला कुशल नव्हता?
मला तर अहिंसा हाच बिनडोकपणाच वाटतो. परंतु, त्यांना खरेच वाटत असेल की हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल, हे मला शक्य वाटते.
आक्रमक राष्ट्रवादासाठी हिटलरची सोबत करणे वेगळे आणि वांशिक विद्वेष योग्य ठरविणे वेगळे! 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ साली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले, १९६६ साली त्यांना ज्यूंची बाजू योग्य वाटली तरी त्यांनी हिंदुत्ववाद सोडला नाही. हे दुटप्पी नाही?
तुम्ही रामकृष्णांबद्दल उलेख केला होतात त्याविषयीचे मत आहे.
१, २
त्यात सिद्ध करण्यासारखे काय? ;)
पुढे
मला तर अहिंसा हाच बिनडोकपणाच वाटतो. परंतु, त्यांना खरेच वाटत असेल की हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल, हे मला शक्य वाटते.
गांधींजींचे, "Hitler is not a bad man" हे वाक्य तुम्हाला काय सांगते? मला वाटते की यासंदर्भात आपले म्हणणे वेगळे नसावे असल्यास (पक्षी: गांधीजी कसे योग्य होते) ते अवश्य सांगा.
आक्रमक राष्ट्रवादासाठी हिटलरची सोबत करणे वेगळे आणि वांशिक विद्वेष योग्य ठरविणे वेगळे! 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ साली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले, १९६६ साली त्यांना ज्यूंची बाजू योग्य वाटली तरी त्यांनी हिंदुत्ववाद सोडला नाही. हे दुटप्पी नाही?
गोळवळकर १९३९च्या पुस्तकात वंश आणि संस्कृतीवरून म्हणालेत. ते योग्य आहे असे आजचा रा.स्व. संघ देखील म्हणत् नाही. म्हणूनच तर त्यांचे ते पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीवर्षातच संघाने त्यांच्या समग्र साहीत्यातून दूर सारले. गांधीवदी असे गांधीजींच्या बाबतीत करायला तयार आहेत का? पण हा सर्व मुद्दा आपल्या, "भावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे." या वाक्याशी आहे. आणि माझे म्हणणे आहे की हे स्वातंत्र्य नुसतेच सिलेक्टिव्हली नाही तर दिशाभूल करत वापरले जाते. आणि तेच जर अगदी योग्य संदर्भाने (सिलेक्टीव्हली नाही) इतरत्र वापरले (येथे गांधीजींच्या संदर्भात) तर चालत नाही... मग त्याला गांधीद्वेष म्हणणार.
तुम्ही रामकृष्णांबद्दल उलेख केला होतात त्याविषयीचे मत आहे.
ह्यातील मुद्दे मी खरे धरत नाही, पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का? हे म्हणजे गांधीजी हे स्वतःच्या पुतणनातीशी कसे वागले, त्या संदर्भात काय लिहीले हे पाहून त्यांच्या मागे नेहरू आणि सगळी काँग्रेस गेली, गांधीवादी गेले असे म्हणण्यासारखे आहे.
त्यात सिद्ध करण्यासारखे काय? ;)
यात आपल्याला असे म्हणायचे असेल की वर उल्लेखलेल्या गोष्टींवरून तुम्ही गांधीवाद्यांची बुद्धी काढणार असाल तर ते मला अमान्य आहे. जितके रामकृष्णांच्या संदर्भात इतरांची बुद्धी काढणे हे मान्य नाही.
धन्यवाद
"हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल (आणि ते करण्याच्या आशेने वेळ/जीव जाऊ द्यावेत)" असे सरकारी धोरण हा बिनडोकपणा ठरला असता असे वाटते.
नवी माहिती, धन्यवाद.
सिलेक्टिव असते तर संघाने समग्र साहित्यातून वगळले नसते.
मी नाही म्हणणार. (अर्थात, वंशविद्वेषापेक्षा बिनडोकपणा थोडा क्षम्य मानण्याची पद्धत आहे.)
संदर्भ क्रिपालचे नाही आहेत, पहिला दुवा 'वेदांत प्रेस' च्या पुस्तकाचा आहे तर दुसरा दुवा Swami Ramakrishna Order of India च्या Vidyatmananda उर्फ John Yale यांच्या संकेतस्थळाचा आहे.
नाही.
मला वाटले की तुम्ही डील ऑफर केलेत ;)
?
"हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल (आणि ते करण्याच्या आशेने वेळ/जीव जाऊ द्यावेत)" असे सरकारी धोरण हा बिनडोकपणा ठरला असता असे वाटते.
गांधीजी प्रत्यक्षपणे आणि गोळवलकर अप्रत्यक्षपणेदेखील सरकारचे भाग नव्हते. त्यामुळे त्याचा येथे काहीच संबंध नाही. मात्र "Hitler is not a bad man" मध्ये हिटलरच्या हृदयपरीवर्तनापेक्षा त्याच्या कृतीचे समर्थन दिसते. हिटलरने पोग्राम् केला? असेल पण तरी देखील, Hitler is not a bad man असा अर्थ होतो... अर्थात तुम्हाला त्याकडे कानाडोळा करायचा असेल तर अवश्य करा.
नवी माहिती, धन्यवाद.
अशा माहितीला विशेष प्रसिद्धी मिळत नाही कारण त्यामुळे टिकाकारांची अडचण होते. म्हणून अनेकदा ती अनेकांना माहीत नसते. ;)
सिलेक्टिव असते तर संघाने समग्र साहित्यातून वगळले नसते.
केवळ त्यावर टिका करणे यावर सिलेक्टीव्ह आहेत का नाही हे ठरत नाही. तर तेंव्हाच्या इतरांची मते कशी धरली जातात (गांधीजी-सुभाषबाबू) आणि तसेच इतरत्र त्या मतांव्यतिरीक्त काय म्हणले गेले आहे ते जेंव्हा सांगितले जात नाही तेंव्हा. थोडक्यात स्वतःची मते जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी कल्पनेची भुते नाचवत डाव्या विचारवंतांनी जी दिशाभूल केली आणि काँग्रेसने त्याचा सत्तेसाठी वापर केला, त्याला मी सिलेक्टीव्ह म्हणतो.
मी नाही म्हणणार. (अर्थात, वंशविद्वेषापेक्षा बिनडोकपणा थोडा क्षम्य मानण्याची पद्धत आहे.)
मी या संदर्भात वंशद्वेष आणि बिनडोकपणा हे दोन्ही शब्द मानत नाही..
संदर्भ क्रिपालचे नाही आहेत, पहिला दुवा 'वेदांत प्रेस' च्या पुस्तकाचा आहे तर दुसरा दुवा Swami Ramakrishna Order of India च्या Vidyatmananda उर्फ John Yale यांच्या संकेतस्थळाचा आहे.
मी क्रिपाल हा शब्द वापरला देखील नाही. :-) संदर्भ कुठले आहेत, ते अर्थातच पाहीले होते. दोन्ही पुस्तकातील माहिती मी जशीच्या तशी ग्राह्य धरत नाही इतकेच म्हणले होते आणि म्हणत आहे.
नाही.
सहमतीबद्दल धन्यवाद. हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भातचः
मला वाटले की तुम्ही डील ऑफर केलेत ;)
काय ऑफर केले? आणि मी आधीच्या माझ्या लिहीण्यापेक्षा म्हणजे, पण गंमत अशी असते की हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर, "गिल्ट बाय असोसिएशन" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे. या वाक्यापेक्षा नक्की काय वेगळे लिहीले आहे असे आपल्याला वाटते?
खुलासा
मृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.
गांधीजींनी चुकीच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून (सारे आत्मे शेवटी चांगलेच असतात किंवा, गटेच्या फॉस्टमध्ये विश्वास व्यक्त केला आहे तसे "नदी शेवटी सागरालाच मिळेल") हिटलरकडून आशा बाळगली. सुभाषचंद्रांनी राष्ट्रवादासाठी मदत घेतली. गोळवलकरांनी मुस्लिमद्वेष केला नाही?
कारण समजले नाही, ती दोन्ही लेखने ही रामकृष्णांची स्तुती करणारी मेनस्ट्रीम लेखने वाटली.
तुम्ही विचारलेत की "मात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का?" त्यावर माझे उत्तर आहे की मी विवेकानंदांची बौद्धिक शृंखला प्रतिपादित करतो (व्हॅलिडिटी नाकारतो), तुम्ही गांधीवाद्यांची बौद्धिक शृंखला प्रतिपादित करा (व्हॅलिडिटी नाकारा), एकमेकांचे दावे मान्य करू!
पुढे
मृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.
ह्याचा काय संबंध? आक्रमक हिटलरशी युद्ध करू नका असे दोस्तराष्ट्रांना सांगणे म्हणजे त्याच्या आक्रमकतेकडे दुर्लक्ष करा असेच म्हणण्यासारखे आहे. अर्थात हिटलर जो काही ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्याकडे फारतर उदार दृष्टीकोन या वाक्यातून गांधीजींनी ठेवला आहे असे म्हणता येईल.
गांधीजींनी चुकीच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून...हिटलरकडून आशा बाळगली.
वर मुद्दा मांडला आहेच.
सुभाषचंद्रांनी राष्ट्रवादासाठी मदत घेतली.
एकदा का एखादी व्यक्ती अमानूष म्हणून ठरली तर त्या व्यक्तीचा कोणीही स्वार्थासाठी अगदी राष्ट्राच्या स्वार्थाशी देखील वापर केला तर त्याचा अर्थ असा वापर करणारी व्यक्ती ही या अमानुष व्यक्तीचे गुन्हे धरत नाही, मानवतेला मान्य करत नाही असा अर्थ होतो. त्यामुळे जर गोळवळकरांच्या एका वाक्याने ते हिटलरसमर्थक धरले जात असले तर त्याच टिकाकारांनी सुभाषबाबूंना पण त्याच्या वाक्याने नाही तर कृतीने हिटलर समर्थकच म्हणले पाहीजे का नाही? का तिकडे अशा टिकाकारांच्या दृष्टीकोनातून मानवता चुलीत गेलेली चालते?
गोळवलकरांनी मुस्लिमद्वेष केला नाही?
नाही केला. तुम्हाला त्यांची तशी म्हणजे मुस्लीम द्वेषाची वाक्ये माहीत असली तर अवश्य सांगा. मग बोलू. मात्र तशी वाक्ये मिळत नसली तर ते देखील येथे सांगा.
कारण समजले नाही, ती दोन्ही लेखने ही रामकृष्णांची स्तुती करणारी मेनस्ट्रीम लेखने वाटली.
मला भगवद्गीता तत्वज्ञान म्हणून खूप आवडते. माझी त्यावर जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान म्हणून श्रद्धा आहे. पण म्हणून भगवद्गीतेची स्तुती करणारे सर्वच मेनस्ट्रीम लेखन जेंव्हा कृष्णार्जून संवाद हा आपण जसा वाचतो तसाच युद्धभूमीवर गप्पा मारत झाला असे म्हणते तर ते मला मान्य असते अशातला भाग नाही. तेच या पुस्तकांच्या बाबतीत.
त्यावर माझे उत्तर आहे की मी विवेकानंदांची बौद्धिक शृंखला प्रतिपादित करतो (व्हॅलिडिटी नाकारतो),
आपणः पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का? या प्रश्नाचे "नाही." असे उत्तर देताना विवेकानंदांची व्हॅलीडीटी नाकारलेली दिसलेली नाही.
खुलासा
होय, ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.
फरक असा आहे की सुभाषबाबूंनी निव्वळ साधनशुचिताच पाळली नाही तर गोळवलकरांनी दुष्कर्माचेच समर्थन केले.
निर्विवाद वाटेल असे एक उदाहरण देतो (चर्चा अधिक लांबल्यास 'गोळवलकरांची मुस्लिमांविषयीची मते' असा धागा सुरू करता येईल):
ते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना?
या पुस्तकांमधील फॅक्च्युअल प्रतिपादनांना (अन्वयार्थांना नव्हे) अमान्य करण्यासाठी तुमच्याकडे काही कारण आहे काय? पुस्तकांची विश्वासार्हता संशयास्पद वाटणे, लेखकांना रामकृष्णांबद्दल आकस असल्याचा संशय येणे, इ. काही कारणे असू शकतील असे मला वाटले होते.
मी व्हॅलिडिटी नाकारतोच. "फॉलोअर्स आले" याचा अर्थ अनुयायांनी व्हॅलिडिटी नाकारली नाही इतकाच आहे.
अच्छा!
होय, ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.
अच्छा! म्हणजे सनातनी हिंदू गांधीजी आता तुमच्या दृष्टीने ख्रिश्चन झाले तर!
फरक असा आहे की सुभाषबाबूंनी निव्वळ साधनशुचिताच पाळली नाही तर गोळवलकरांनी दुष्कर्माचेच समर्थन केले.
गांधीजी जेंव्हा म्हणतात, "हिटलर वाईट नव्हता," तेंव्हा त्यांनी दुष्कर्माचे समर्थन केले नाहीतर काय केले? गोळवळकरांनी नक्की १९३८ साली दुष्कर्माचे समर्थन कसे केले ते कळेल का?
चर्चा अधिक लांबल्यास 'गोळवलकरांची मुस्लिमांविषयीची मते' असा धागा सुरू करता येईल
हीच अपेक्षा होती! आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार? तुमच्याकडे उत्तर नाही असे दिसतयं. तेंव्हा "मुसलमानांच्या" विरोधातील गोळवलकरांचे विधान दाखवा.
निर्विवाद वाटेल असे एक उदाहरण देतो
अच्छा म्हणजे मुसलमान हा वंश (रेस) आहे तर! नवीनच माहिती कळाली! (शिवाय त्या वाक्यात मुसलमान हा शब्द नसताना देखील मुसलमान कसे काय वाटले, अजून कसे काही का नाही? हा प्रश्न आहेच)
ते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना?
खाली श्री. सहस्रबुद्धे यांना दिलेले उत्तर वाचावेत.
मी व्हॅलिडिटी नाकारतोच. "फॉलोअर्स आले" याचा अर्थ अनुयायांनी व्हॅलिडिटी नाकारली नाही इतकाच आहे.
आपण आपले आधीचे मत बदलत आहात.
खुलासा
ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.
हिटलरने दुष्कर्मे केल्याचे गांधीजींना मान्य होते, परंतु दुष्कर्मे केली तरीही पूर्ण व्यक्ती (म्हणजे आत्मा वगैरे) होपलेस नसते, (अंगुलिमाल, वाल्या कोळी, इ. कथांच्या अर्थाने) रिडेम्प्शन होऊ शकते असे त्यांचे मत असावे.
ज्यूंना हाकलण्याच्या प्रयत्नांचे त्यांना कौतुक होते.
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her (sic) purging the country of the Semitic Races — the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by.
आधी दिलेले विधान मुस्लिमांच्या विरोधी आहे.
हिंदू हाही एक वंश असल्याचे गृहीतक त्याच अवतरणात आहे. त्या एका वंशाव्यतिरिक्त सर्वच वंशांचा ते द्वेष करीत होते असे दिसते. हिंदू नेशन (राष्ट्र), हिंदू रिलिजन (धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो ना?), हिंदू वंश, हे सारे शब्दप्रयोग त्यांनी एकाच अर्थाने केलेले आहेत.
तेथे तुम्ही 'माहिती नाही' असे पालुपद लावले आहे. मात्र त्याआधी, "गोळवळकर १९३९च्या पुस्तकात वंश आणि संस्कृतीवरून म्हणालेत. ते योग्य आहे असे आजचा रा.स्व. संघ देखील म्हणत् नाही. म्हणूनच तर त्यांचे ते पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीवर्षातच संघाने त्यांच्या समग्र साहीत्यातून दूर सारले." असे उत्तर तुम्ही मला दिले होतेत. म्हणजे, त्यांच्या जुन्या मतांमध्ये वंश आणि संस्कृतीविषयी 'अयोग्य' मते होती ना?
तुम्ही मला एक प्रश्न विचारलातः "असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का?"
त्यावर माझे उत्तरः होय, असलेच लिहायचे आहे. त्याच्या मोबदल्यात मी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवतो, तमाम गांधीवाद्यांची बौद्धिक शृंखला मान्य करतो. शिवाय, (नवा मुद्दा असा की) गांधीजींच्या राजकारणाशी त्यांचे वैयक्तिक वर्तन निगडित नव्हते, मधुराभक्ती (राधा बनणे, इ.) मात्र रामकृष्णांच्या एकूणच तत्त्वज्ञानाचा भाग आहे.
वुई
गोळवलकरांचे वुई हे पुस्तकाबद्दल उल्लेख आल्याने त्याबद्दल थोडेसे.
हे पुस्तक बाबाराव सावरकरांच्या 'राष्ट्रमिमांसा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वा आधारित असे आहे. गंमत म्हणजे या पुस्तकात तसे म्हटले नाही.
हल्लीच्या काळी लोक या पुस्तकातून अडचणीचे उतारे दाखवायला लागले. तसतसे ते संघाला अडचणीचे ठरू लागले. (हे माझे इंटर्प्रिटेशन आहे.) मग अचानक त्यांना राष्ट्रमिमांसाची आठवण आली. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांचे साहित्य संघाने विक्रीस ठेवले होते. तिथे हे पुस्तक सोडून इतर पुस्तके होती. मी त्याची मागणी केल्यावर मला राष्ट्रमिमांसा पुस्तकाबद्दल सांगण्यात आले. आणि ते गोळवलकरांचे पुस्तक नाही तर तो इंग्रजी अनुवाद आहे असे तेथील व्यवस्थापक म्हणाले. संघाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार या पुस्तकाचा असा जाहिर खुलासा वाचला नाही. तसाच विकास यांनी हल्ली ते काढून टाकले आहे असाही खुलासा वाचला नाही. म्हणजे वेळ पडली तर त्यांचे नाही तर काढून टाकले असा दोन्ही डगरीवरचा प्रवास असावा असे वाटते.
संघाचा याबाबतचे अधिकृत माहितीपत्र कुठे मिळाले तर बरे होईल. (माझी माहिती चुकीची ठरेल.)
प्रमोद
टाईम्स
हे पुस्तक बाबाराव सावरकरांच्या 'राष्ट्रमिमांसा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वा आधारित असे आहे. गंमत म्हणजे या पुस्तकात तसे म्हटले नाही.
ते बाबाराव सावरकरांच्या राष्ट्रमिमांसेचे, गोळवलकरांनी, ३२ व्या वर्षी, सरसंघचालक होण्याआधी केलेले भाषांतर आहे ह्याची कल्पना आहे. त्यांनी त्या पुस्तकात तसे म्हणले आहे आहे का नाही हे मला माहीत नाही कारण ते मी प्रत्यक्ष वाचलेले नाही. जे काही या संदर्भात वाचले आहे त्याप्रमाणे, त्याची शेवटची आवृत्ती ही १९४७ ला निघाली होती आणि गांधीहत्येनंतरच्या बंदीत ते पुस्तक जप्त् झाले. तात्पर्यः गोळवलकारंच्या हयातीत आणि नंतरही हे पुस्तक १९४८ सालानंतर प्रकाशनात आले नाही. (जरी त्याचे टिकाकार त्याला संघाचे बायबल म्हणत असले तरी).
ते गोळवलकरांचे पुस्तक नाही तर तो इंग्रजी अनुवाद आहे असे तेथील व्यवस्थापक म्हणाले.
ते गोळवलकरांचे आणि संघाचे टिकाकार देखील मान्य करतात. फक्त मग म्हणतात की गोळवलकर म्हणत ते (मूळ) पुस्तक त्यांच्या प्रेरणा देणार्या पुस्तकांतील एक होते/आहे.
संघाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार या पुस्तकाचा असा जाहिर खुलासा वाचला नाही.
"नेहमीच्या पद्धतीनुसार" - इन जनरल सहमत. :-) या विशिष्ठ संदर्भातील मला माहीत नाही पण अनेकांकडून त्या वेळेस ऐकलेले नक्की होते.
संघाचा याबाबतचे अधिकृत माहितीपत्र कुठे मिळाले तर बरे होईल.
अधिकृत माहितीपत्रकाच्या बाबतीत मला माहीत नाही. पण टाईम्स ऑफ इंडीयात ही बातमी आली होती. गोळवलकरांच्या अधिकृत संस्थळावर देखील याची माहीती, किमान, आत्ता पटकन शोधायचा प्रयत्न केला तेंव्हा मिळाली नाही.
म्हणजे वेळ पडली तर त्यांचे नाही तर काढून टाकले असा दोन्ही डगरीवरचा प्रवास असावा असे वाटते.
"वुई" हे पुस्तक मी कायम गोळवलकर टिकाकार आणि संघविरोधकांकडूनच ऐकले आहे. त्यात देखील एकच वाक्यासंदर्भात... आपल्याला जर या पुस्तकासंदर्भात अधिक माहीती असेल तर अवश्य सांगावीत ही विनंती.
वॉशिंग्टनपोस्टमध्ये मार्टिन लूथर किंग ज्यूनियरबाबत
४/४/२०११ रोजी वॉशिंग्टनपोस्टमध्ये मार्टिन लूथर किंग ज्यूनियरबाबत एक मतप्रदर्शक लेख (ओपिनियन पीस) आलेला आहे :
"संत म्हणून नव्हे, तर मानव म्हणून मार्टिन ल्यूथर किंगचे स्मरण" (कदाचित लेख वाचायला संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागेल.)
त्यातील एक परिच्छेद :
लेखात असा उल्लेख आहे, की त्याच्या लफड्यांमुळे त्याच्या विवाहात तणाव निर्माण झाला होता, आणि त्याची हत्या झाली त्याच्या आदल्या रात्री तो एका परस्त्रीबरोबर होता...
#FFFFFF;">क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.
हे सर्व असून लेखाचा सारांश मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअरच्या समर्थकच आहे, असे मला वाटले. त्यातील शेवटची वाक्ये अशी आहेत :
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.
(लेखक : हॅम्प्टन साइड्स्)
उत्तम विचार
उत्तम विचार. अतिमानवी महत्व दिल्यामुळे अशा लोकांच्या चुका फार मोठ्या वाटतात, त्या अगदी मान्य सुद्धा केल्या जात नाहीत. पण त्यातील त्याच्या माणूसपणाचे "वर्णन" टाळले असते तरी चालले असते असे वाटते.
+
उत्तम विचार. अतिमानवी महत्व दिल्यामुळे अशा लोकांच्या चुका फार मोठ्या वाटतात, त्या अगदी मान्य सुद्धा केल्या जात नाहीत.
अगदी खरे आहे. पण त्याहीपेक्षा अशा संदर्भातील महत्वाचा मुद्दा हा "selective demonization" चा आहे. एखादी व्यक्ती आवडत नाही, एखादी विचार पद्धती आवडत नाही मग त्यातील वाटेल तसे खोटे-नाटे संबंध लावून त्याना दुष्ट ठरवा!
पण त्यातील त्याच्या माणूसपणाचे "वर्णन" टाळले असते तरी चालले असते असे वाटते.
असहमत. जर अशा व्यक्ती देखील माणसच होत्या आणि तरी देखील जगावेगळे करू शकल्या, हे जगाला कळले तर त्यांचा आदर्श आत्मसात करणे शक्य होईल. नाहीतर सारा समाज, अशा व्यक्तीमत्वाला उत्तुंग म्हणत, अपने बस की बात नही, असे म्हणत, हिमालयाच्या सावलीतली खुरटी रोपे होतो.
प्रति:
सहमत. ते तर राजकारणाचे महत्वाचे अंग आहे.
तरीदेखील "वर्णन" कितपत आणि कसे असावे ह्याबद्दल माझा विरोध असेल, तसे केल्यास त्याचे आदर्श आत्मसात करताना "त्या" गुणांना देखील समर्थन आहे असे समजले जाऊ शकते. अन्यथा सिलेक्टीव्ह आदर्श ठेवा हे सांगणे कठीण होईल, मग आदर्श आत्मसात करणाऱ्यांकडून विवेकाची अपेक्षा केली जाईल, असा आदर्श थोडा कमजोर वाटतो.
प्रतिसाद
हा प्रतिसाद रिटे यांच्या वरील प्रतिसादाशी संबंधीत आहे.
ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.
म्हणजे आधी हृदयपरीवर्तन म्हणायचे, मग "मृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात." असे म्हणायचे. वास्तवीक त्यात मृत्युदंड कुठून आला? बरं मग विचारले, "ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का" तर उत्तर मिळणार, "ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते." मग विचारले की गांधीजी कधीपासून ख्रिश्चन झाले तर म्हणणार, "ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती." नक्की कुठली तत्वे? "ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देण्याची?" असली उत्तरे जर रिटेंना कोणी दिली असती तर त्यांची बुद्धी काढून त्या व्यक्तींना निर्बुद्ध म्हणले गेले असते अथवा बौद्धीक शृंखलेबद्दल बोलले गेले असते.
आधी दिलेले विधान मुस्लिमांच्या विरोधी आहे.
कसे बरं? असे कुठे लिहीले आहे? ते ब्रिटीशांच्या विरोधातपण असू शकेल कारण त्यावेळेस ब्रिटीशराज होते, जालीयनवाला बागे सहीत अनेक अत्याचार होऊन गेले होते आणि फोडा/झोडा तंत्रामुळे राष्ट्राची फाळणी होण्याची दुश्चिन्हे पण स्पष्ट होऊ लागली होती... म्हणूनच गोळवलकरांनी तुम्ही संदर्भ दिलेल्या वाक्यात, "मुस्लीम" असे कुठे लिहीलेले आहे ते दाखवा मग बोलूयात. हे केवळ कम्युनिस्ट विचारवंतांनी वापरलेले गोबेल्सचे तंत्र आहे आणि त्या जाळ्यात तुमच्यासारखे अनेक विचारवंत/बुद्धीवादी अडकले. कोणी कुठल्यातरी बाबा-बुवाच्या जाळ्यात अडकतो तर कोणी कुठल्यातरी बुद्धिभेदात.
हिंदू हाही एक वंश असल्याचे गृहीतक त्याच अवतरणात आहे.
सुप्रिम कोर्टाने "it is a way of life, rather than a religion" असे म्हणले आहे. मग तुम्ही ते मान्य करणार, का हिंदू म्हणजे धर्म असे म्हणणार? बरं तेच सुप्रिम कोर्ट जेंव्हा "हिंदू अविभक्त कुटूंब कायदा" वापरते तेंव्हा त्यात हिंदू धर्म/प्रथा वगैरेंचा विचार करत ते पाळणार्यांना, पक्षी: वेगळाच अर्थ मानते. तात्पर्य, प्रत्येकजण हिंदू शब्दाचा वेगळा अर्थ काढत आला आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या संदर्भात वेगळा अर्थ वापरतही आला आहे. त्यातच हिंदू वंश आला, तो देखील तत्कालीन माहीतीवर आधारीत.
त्या एका वंशाव्यतिरिक्त सर्वच वंशांचा ते द्वेष करीत होते असे दिसते.
मला तसे अजिबात वाटत नाही. पण वादासाठी तसे गृहीत धरूया, मग आधी मुस्लीमद्वेष का म्हणत बसलात? आणि आता त्याचे उत्तर नाही म्हणल्यावर एकदम सर्वसमावेशक झालात ते?
हिंदू नेशन (राष्ट्र), हिंदू रिलिजन (धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो ना?), हिंदू वंश, हे सारे शब्दप्रयोग त्यांनी एकाच अर्थाने केलेले आहेत.
चला, "धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो" हे तुम्ही मान्य केलेले दिसतयं! याचा अर्थ हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लीम रिलीजन विरुद्ध बोलणे नसते अथवा कुठल्याच रिलीजन बद्दल बोलणे नसते हे समजणे कठीण जाउ नये. आणि गोळवलकरांची मुसलमान धर्म/धर्मियांबाबत वाक्ये वाचलीत तर ते समजेलही... अर्थात तुम्ही ती वाचली असतील पण येथे दिली तर स्वत:च्याच विरोधात जाणार म्हणून गप्प असाल असे दिसते... असो.
त्यांच्या जुन्या मतांमध्ये वंश आणि संस्कृतीविषयी 'अयोग्य' मते होती ना?
आता "ते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना?" असे आधीचे म्हणणे, हळूच दूर सारून, तुम्ही "वंश आणि संस्कृतीबद्दल" बोलत आहात. नक्की तुमचे म्हणणे काय आहे कारण फारच टोप्या बदलणे चालू आहे. म्हणूनच अजूनही गोळवलकर मुस्लीमद्वेषी होते याच्या समर्थनार्थ सारखे विचारलेले असताना देखील एक वाक्य देऊ शकला नाही आहात हे वास्तव आहे.
तुम्ही मला एक प्रश्न विचारलातः "असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का?"
परत टोपी फिरवत आहात... मी प्रश्न रामकृष्णांच्या संदर्भातच स्पष्टपणे विचारला होता, "पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का?" त्यावर तुमचे उत्तर होते, "नाही."
तेंव्हा सर्वप्रथम गोळवलकरांसंदर्भात आपण आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावेत अथवा नसल्यास तसे स्पष्ट सांगायचा प्रामाणिकपणा/धाडस दाखवावेत ही विनंती.
-------------
खुलासा
कोणाच्या हृदयपरिवर्तनाच्या आशेविषयी मी उल्लेख केला? - हिटलरच्या. तर मग, उदार दृष्टिकोनाचा उल्लेख असलेले विधानही हिटलरविषयीच आहे! उगीचच "ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का" हे फिलिबस्टर आहे. दोस्त राष्ट्रांनी हिटलरविरुद्ध पुकारलेले युद्ध हा गांधीजींच्या दृष्टीने हिटलरला ठोठाविण्यात आलेला मृत्युदंड (पक्षी, तो सुधारण्याची काहीही आशा नसल्याचा निर्वाळा) नव्हता? हिटलरने दुष्कृत्ये केली असली तरी त्याचासुद्धा आत्मा पवित्र असल्याचा समज गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत नव्हता?
होय, तसे केले असतेच. मी मात्र, त्या प्रकारची उत्तरे दिलेली नाहीत.
'फॉरेन रेसेस' असे अनेकवचन गोळवलकरांनी वापरले आहे.
त्यांचा द्वेष मुस्लिम आणि ब्रिटिश या दोन्हींच्या विरोधात होता:
"Invidiously the Hindu Religion and Culture are calumniated, Hindus taught to discard as oldfashioned and out of date their noble heritage, and what is worst, their history is distorted and tints they are educated to believe that they never were a Nation, they were no children of the soil, but mere upstarts, having no better right than the Moslems or the British to live in the country, they never were masters of the country but were always, either of the Moghuls or of the British - meek drawers of water and hewers of wood."
"The great patriot, the late Vithal Bhai Patel, expressed his dying wish that his ramains be brought to Hindusthan, his beloved motherland. There is another picture of a so-called "Patriot" Maulana Mohammad Ali, (who also died abroad,) who directed his remains to be taken, not to the land which had fostered him and his forefathers before him, but to the foreign land of Mecca. These two personalities may be taken to represent the Hindu and the Moslem mentality in our country. Love for the country being the first essential of Nationality, it scarcely need be told who is a nationalist and who a foreigner to the National life in Hindusthan. This example strongly substantiates our proposition that in this country the Hindus alone are the Nation and the Moslems and others, if not actually antinational are at least outside the body of the Nation."
धर्म, रिलिजन, वे ऑफ लाईफ हे सारखेच आहेत.
तो माझा प्रॉब्लेम नाही, गोळवलकरांनी हिंदू रेस असा शब्दप्रयोग ज्या अर्थाने वापरला (पक्षी: धर्म, रिलिजन, वे ऑफ लाईफ, ब्ला ब्ला ब्ला) त्याच अर्थाने वंश हा शब्द "The foreign races in Hindusthan ...not even citizen’s rights" या विधानात आहे आणि म्हणूनच तो मुस्लिमांसाठीही लागू आहे.
गोळवलकरांनी आख्ख्या आयुष्यात कोणाकोणाचा द्वेष केला ते शोधणे हा या उपधाग्याचा हेतू नाही, नव्हता. हिटलरच्या ज्यूद्वेषाला त्यांचे समर्थन असल्याचे कारण त्यांचा मुस्लिमद्वेष असल्याचे माझे प्रतिपादन आहे आणि त्यांचा मुस्लिमद्वेष दाखविणारी अवतरणे मी दिली आहेत. त्या अवतरणांतून इतर कितीही द्वेष सिद्ध होवोत.
मुळीच नाही! मात्र, तुम्हाला ते तसे वाटते अशा अंदाजाने कंसात पृच्छा केली.
"हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लिम धर्माविरुद्ध बोलणे असतेच असे नाही" हे मान्य आहे.
"धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो" हे मान्य मला नसल्यामुळे तुमचा त्यापुढील युक्तिवाद गैरलागू आहे.
वंश आणि संस्कृतीबद्दलची त्यांची नेमकी कोणकोणती मते तुम्ही दूर सारत आहात? "'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ साली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले" असे माझे प्रतिपादन होते. त्यावर, ते पुस्तक दूर सारण्यात आलेले असल्यामुळे दुटप्पीपणा उरला नाही असा तुमचा खुलासा होता. त्यामुळे, 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' आणि 'मुस्लिम हिंदुस्थानचे शत्रू आहेत' हीच ती "वंश आणि संस्कृतीबद्दल" मते जी तुम्ही डिसओन केलीत असे मला वाटले.
मुस्लिम हा शब्द असलेली वाक्ये आता दिली आहेत. आधीच्या वाक्यातील विखार मुस्लिमांसाठी नसल्याचे तुमचे प्रतिपादन या नव्या वाक्यांनी असिद्ध होते.
संदर्भ
वरील "खुलासा" स प्रतिसाद देईनच. फक्त तो पर्यंत जी काही इंग्रजी वाक्ये आपण उर्धृत केली आहेत त्याचा कृपया संदर्भ दुवा द्यावात ही विनंती.
धन्यवाद
आगाऊ माहितीबद्दल आभारी आहे.
We or Our Nationhood Defined
दुवा
फक्त तो पर्यंत जी काही इंग्रजी वाक्ये आपण उर्धृत केली आहेत त्याचा कृपया संदर्भ दुवा द्यावात ही विनंती.
दुवा : आंतर्जालावरील लिंक. (मला मिळू शकत नसल्याने विचारत आहे)
लिंक
वी ऑर अवर नेशनहुड डिफाईंड