प्राचीन जोक :)

मी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही. हल्लि दोन मिन्त चल्लयाच म्हंटलं तरी पायात गोळे येतात. पण पुर्वी लोक चलायचे हे मात्र १०१% खरं आहे. कारण जुने लोक तसच म्हणतात. आता मात्र ते फ़क्त तसं म्हणतात चलत नाहीत. बोले तैसा चले त्याची वंदावी पाउले. हे पण तेच(जुने) म्हणतात.
जाउंदे. विषयांतर फ़ार झालं. उगाच ! तर गोष्ट अशी की , तीन भाउ प्रवासाला निघतात प्रवास लाम्बचा असतो त्यामुळे विश्रांती, वनभोजन हे ओघाओघाने आलंच. तसे ते एका तळ्याकाठी जेवायला बसले. जेउन वामकुक्षी (?) साठी झाडाखाली बसले. झाड होत जांभळाच , संस्कृत मधे त्याला जम्बुवृक्ष अस म्हणतात.
इतर कोणाही चांगल्या भवांप्रमाणेच तिनही भाउ आपापसात गोष्टी करायला लागले. त्यातले मोठे दोन भाउ फ़ार हुशार व रसिक होते. त्यांची आपापसात त्या झाडावर व त्याच्या फ़ळावर त्या सुंदर तळ्यावर चर्चा चालु झाली. ती रंगत रंगत जाउन त्या दोघांनी मिळुन त्या झाडावर जांभळांवर तळ्यावर काठावर संध्याकाळवर असे मिळुन सुंदर व अप्रतीम असे काव्य तयार केले. पण नेमके मला ते काव्यच आठवत नाही आहे. खुप ताण दिला पण छे! जाउदे विषय तो नाही आहे त्यामुळे मी जास्त ताण नाही दिला.
विषय याच्यानंतर सुरु होतो. हे काव्य तयार झल्यावर दोघांना फ़ार अभिमान वाटला. आणि ते स्वाभाविकच नाही का?
पण छोट्या भावाने या चर्चेत भागच घेतला नव्हता. तो घेउ पण शकत नव्हता. त्यांनी त्याला टोचून बोलायला सुरुवात केली , तुला अक्कलच नाहि आम्ही एवढ मोठ काव्य तयार केल बघ पण तु?? मठ्ठ तो मठ्ठ्च राहिलास. काडीची किंमत नाही तुला वगैरे वगैरे इ इ. छोटाच तो. पेटुनच उठला!! त्याने पन त्या दोन भावांना अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केली. आणि म्हाणाला बघा हा मला जास्त चिडवु नका. मी पण तुमच्या पेक्षा चांगल करू शकतो. दोन भाउ आणखिच चिडवु लागले. एक ओळ करशिल तर खरा म्हणुन त्यांनी चॅलेंज दिल. त्यानेही ते स्विकारलं व ऑन दि स्पॉट दोनच ओळि म्हटल्या>>>>>>

"जम्बुफ़लानि पक्वानि...... जम्बुफ़लानि पक्वानि।
जलमधे ..... जलमधे.... डुबुक्‌ डुबुक्‌॥ "

याच त्या दोन ऐतिहासिक ओळि. अहं ..आता ते काव्य महान कि या दोन ओळी महान यावर मला चर्चा नकोय याची कृपया सर्वांनी नॊंद घ्यावी. मुदलात ते काव्यच मला आठवत नाहीय ती गोष्ट वेगळी.
या दोन ओळी मला प्राचीन काळातला एक जबरदस्त जोक आहे अस वाटतं. डुबुक्‌ डुबुक्‌ या ध्वनीत हास्यरस ओतप्रोत भरलेला आहे. असला ध्वनी वापरण्याच साहस इतर कोणत्या प्रचीन कवीने केले असल्यास त्यावर चर्चा घडवावी. तसेच प्राचीन इतिहासात असलेल्या इतर कोणत्याही जोकची इथे उदाहरणे पुरवावित. कोणतीही भाषा संस्कृती चालेल. पण इतर भाषा असेल तर कृपया अनुवादसहित जोक सादर करावा. इसवी सन देता येत असल्यास द्यावे त्यावरून आपल्याला सर्वात पहिला किंवा सर्वांत अतिप्राचीन जोक कोणता ते ठरवता येइल. इसवी सन पुर्व असल्यास उत्तम!
याच्या आधि असा कुणि प्रयत्न केला असल्यास तिही माहिती कृपया पुरवावी.
_______________________________________________________________________
जुना जोक म्हट्ल म्हणुन लगेच एका जुन्या बहिष्कृत केलेल्या आयडी यांच्या कोणत्याही चर्चेचा दुवा देउ नये. त्याचप्रामाणे गलिच्छ, ओंगळवाणे, कुचेष्टा, दुसर्यावर द्वेषाने घाणेरडा आळ घेणारे, कुजबुज साठीच तयार झालेले जोक इथे अजिबात देउ नये हि कळकळीची विनंती. कितिही प्राचीन असले तरीही. एवढा सामाजिक शिष्टाचार पाळुन येथे चर्चेस भाग घ्यावा ही नम्र विनंती.

-सुवर्णा

Comments

कालिदास

मी कुठेतरी हा कालिदासाचा विनोद असल्याचे वाचले होते. नेटावर शोधले तेव्हाही असाच संदर्भ मिळाला परंतु खरे-खोटे माहित नाही. आख्यायिका असू शकेल. मूळ श्लोकात डुबुक डुबुक नसून गुलुगुगुलुगुग्गुलु असा शब्द आहे.

गुलुगुगुलुगुग्गुलु असा शब्द वापरून काव्य करावे असे च्यालेंज कालिदासाला देण्यात आले होते.

जम्बू फलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
कपिकम्पितशाखाभ्यः गुलुगुगुलुगुग्गुलु॥

डुबुक डुबुक हा शब्द नंतर आला असावा तरी तो कुणी टाकला हे कळले तर रोचक ठरेल.

धनंजय/दिगम्भा यांना हा श्लोक माहित असावा काय? मी मागे मराठी सायटींवरही हे वाचल्याचे आठवते पण कुठे/कुणी/का वगैरे आठवत नाही आणि आता मिळत नाही.

--

हे बघा इथेही सापडले. त्याच चर्चेत धनंजय यांनी दिलेले विनोदी सुभाषित वगैरेही आहे.

ध्वनी

४.
रामाभिषेके जलमाहरन्त्या हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या: |
सोपानमार्गेण करोति शब्दम् ठंठंठठंठंठठठठंठठंठ: ||

यातील ठंठंठठंठंठठठठंठठंठ: हा ध्वनी ठाठंठठंठंठाठंठठंठा: असा आसावा.

एकुणच धागा भारी होता! :)

याचा येक पाठभेद चावट आहे.

भोजस्य भार्या मदविव्हला या, हस्ते स्थितं चन्दनहेमपात्रम्|
सोपानमार्गे प्रकरोति शब्दं, ठंठंठठंठंठठठठंठठंठ:||

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

आम्हाला डुबूक् डुबूक् च शिकवले आहे ;-)

शाळेत पुस्तकात हा विनोद डुबूक् डुबूक् या आवृत्तीमध्ये होता
आम्हाला डुबूक् डुबूक् च शिकवले आहे ;-)


अवांतर आर्वाचीन विनोद
शाळा तपासणी करणारे मास्तर (इंस्पेक्टर) : पंकज कडे २ पेरू होते, त्यानी आणखीन ३ पेरू विकत घेतले. तर त्याच्याकडे एकूण पेरू किती?
मुले गप्प.
हेड मास्तर ही सोबत होतेच. ते कुणाला तरी म्हणाले: तू सांग रे बाळ!
ते कोणते तरी बाळ हळूच म्हणाले : सर आम्हाला आंब्याचं शिकवलं आहे

बरोब्बर!

२००१ सालच्या ८वीच्या संस्कृत(संपूर्ण १०० मार्क्स्)च्या पुस्तकात डुबूक् डुबूक् च होते, अगदी चित्रासकट! आता सिलॅबस बदलला असल्यास माहिती नाही.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

विस्मरण् दोष

यात माझा विस्मरण दोष कारणिभुत असावा. मला काही ते गुग्गुलु आठवत् नाहीय. मि पुस्तकात् डुबूक् डुबुक् च वाचल्याच् आठवतय्. आता कुठुनतरी १९९७-९८ सालचं ८वी च संपूर्ण संस्कृत् पाठ्यपुस्तक मिळवावं लागेल. मला तर् ही अशीच कथा आठवतेय.

मेघवेडा यांच्या ब्लॉगवर

मेघवेडा यांच्या ब्लॉगवर कथा अशी दिलेली आहे (आणि मीदेखील पूर्वी तशीच ऐकली होती) :

भोज राजा हा अतिशय रसिक होता. अनेक कविंना त्याच्या दरबारी त्यांच्या रचनांसाठी इनाम मिळत असे. असाच एक कवी बक्षिसाच्या इच्छेने भोजाच्या दरबारी आपली एक रचना घेऊन आला. ती अशी,
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या च खादन्ति, जलमध्ये डुबुक डुबुक॥

पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात आणि मासे ती फळे खातात, त्याने पाण्यात 'डुबुक डुबुक' असा आवाज होतो! असा सरळसोपा अर्थ. कवी आपल्या रचनेवर खूष होता. पण काही केल्या भोजास मात्र ती आवडेना. शेवट तो कवी कालिदासास शरण गेला. कालिदासाने त्या रचनेत थोडासा बदल केला.
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या खादन्ति, जालगोलकशंकया

पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात, परंतु मासे ती फळे खात नाहीत. कशाला? तर आपल्याला पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्याचे ते गोळे असावेत या शंकेने!

मला कथेचे हे रूप अधिक आवडते. "डुबुक् डुबुक्" ही रचना खरोखर इतकी रटाळ आहे, की ती संपादन करून सुधारणे शक्यच नाही, असे वाटते. पण मग दोनच शब्दांनी ती सुसह्य होते, त्याबद्दल मस्त आश्चर्य वाटते, गंमत वाटते.
("सुसह्य"च बरे का, "उत्कृष्ट" नव्हे :-) ...)

अर्थात या सर्व आख्यायिकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या कर्णोपकर्णी पसरलेल्या आहेत. आपण एखादा पाठभेद आवडत्या शिक्षकाकडून ऐकला असेल, तर त्यामुळे तोच आपल्याला भावतो, असेही असेल. (विनोदाची अमुक आवृत्ती बरोबर आणि तमुक चूक असे काही ठाम मत मला द्यायचे नाही, असे हे स्पष्टीकरण.)

काव्यशास्त्रविनोदेन् काले गच्छति.....

धनजयं यांनी पुरवलेल्या भक्कम धग्याबद्दल मी त्यांची शत:श ऋणी राहीन. त्यात उधृक्त केलेली सर्व सुभाषिते ही एकपेक्षा एक उत्तम विनोद आहेत याबाबत काही वादच नाही. पण त्यांचा मेव्यांनी दिलेला बहुतेक बोध मला अजिबात पटत नाही. तो अर्थ त्यांनी कशवरुन लावला त्याचे पुरेसे स्पष्टीकरण्च त्यानी दिलेले नाहीय. त्यामुळे तो अर्थ ओढुनताणुन केलेला वाटतो. सर्व सुभाषिते ही स्वयंस्पष्ट असुन त्यांचा अनर्थ करणे म्हणजे पुरातन काळि चाललेल्या अतिशय रटाळ ’काव्या’मधे काही क्रांतीकारी बदल करु इच्छिणाया गुणि कवी/कवयित्रींचा मी घोर अपमान मानते. तरीही मेव्यांच्या सर्वच गोष्टि मी अमान्य करते असही नाही. काही काही तंतोतंत पटतातही.

मला भावलेले काही सुभाषितांचे अर्थ :-

(+)

कंसंजघान कृष्णः, काशीतलवाहिनी गङ्गा।
केदारपोषणरता:, कम् बलवन्तं न बाधते शीतम्॥

या रचनेच्या चार खंडांमध्ये चार प्रश्न विचारलेले आहेत. - मेवे
पण मला तीनच दिसले.

कं सं जघान कृष्ण:? तो कृष्णाला का मारता झाला?
याचे उत्तर कंसं जग्‌ हान कृष्ण: असे आहे... कंसाचे जग कृष्णाने उद्ध्वस्त केले म्हणुन!

का शीतलवाहीनी गंगा केदारपोषणरत:? शीतल अशी गंगा शंकराचे का बरं पोषण करते ?
याचे उत्तर आहे काशीतल वाहीनी गंगा केदारपोषणरत: - ती काशी नगरीच्या ( शंकराच्या अधिपत्याखालिल) काठाने वाहते म्हणुन.

(+)

यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती ।
तथा नयति कैलासं, न गंगा न सरस्वती ॥
अर्थ- जशी कैलास नावाच्या नगावर गानसरस्वती (काव्य) नाहीय ,
तसेच कैलासवर ना गंगा आहे, ना सरस्वती (नद्या) !!
असाही अनर्थ- तथा, नयति कैलासं, न गंगा, न सरस्वती।
त्याचप्रमाणे न कैलास आहे न गंगा न सरस्वती. काढायचा तर कसाही अर्थ काढता येतो महाशय.

(+)

तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा ज्ञानदायकम्‌
तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा आज्ञा न दायकम्‌

राजेन्द्रा तु फ़क्त तम्बाखु खा जो ज्ञानदायक अजिबात नाहि.
अरे तु फ़क्त तम्बाखु खा राजेन्द्रा मला आज्ञा देउ नकोस.

(+)

कस्तुरी जायते, कस्मात्‌को हंती करीणां शतम्‌
कातर: करोती, किं मृगात सिंह: पलायते

क:+तु:+ई जायते म्हणजे तु कुठे चाललायास?
का आणि कोण शंभर हत्तींना मारेल? उत्तर- कातर: करोती :- म्हणजे भित्रा असे करेल.
काय? मृगापासुन सिंह पळतो??

(+)

अहं चं त्वं च राजेन्द्र लोकनाथावुभावापि
बहुवर इही: अहम राजन्‌, षष्ठि तत्‌ पुरुषो भवान्‌

लोकनाथाचे भाव अंगी असणारे असे आपण दोघे हि राजेन्द्रच आहोत.
बहु (जण) ज्याला वरतात असा मी राजा आहे. त्या बहु मधला तु फ़क्त सहावा पुरुष आहेस एवढ लक्षात ठेव!

-सुवर्णा

________________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

प्रशंसनीय साहस ! !

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कं संजघान कृष्णः? ...ते अहं च त्वं च राजेन्द्र... या पाच सुभाषितांतील पदांची फोड करणे आणि त्या सुभाषितांचे अर्थ लावणे ही कामे सुवर्णा यांनी बेधडकपणे केली आहेत. हे त्यांचे धाडस अवर्णनीय आहे!!
कुतूहल वाटते की हे अर्थ त्यांनी स्वतःच लावले की शाळेतील कोणी संस्कृतभाषा शिक्षक/शिक्षिकांनी सांगितले? असे अर्थ कुठे मुद्रित स्वरूपात असतील असे वाटत नाही.(पण काय सांगावे?)

साहस?

आधी जो अर्थ 'लावला' गेला आहे. ते साहस कुणी केले याबाबत का विचारणा होत नसावी बरं?
जो अर्थ मी दिला आहे.. तो मला स्वतःला अभिप्रेत 'झालेला' अर्थ आहे. त्यासाठि कोणतिहि मुद्रिते अथवा हस्तलिखिते धुंडाळावी लागली नाहित.

अधिक अवांतर माहिती-- शाळेत मला कोणतेही शिक्षक आवडत नव्हते.

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

कथा थोडी वेगळी आहे.

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।

असा पहिला चरण भोजराजाला ऐकवून त्या कवीने एक प्रश्न केला
ही पिकलेली जांभळं मासे खात नाहीत...का बरं असे?
ह्याचे उत्तर दुसर्‍या चरणात देऊन त्याला तो श्लोक पूर्ण करायला सांगितले. भोजराजा आणि त्याच्या दरबारातले अनेक विद्वान् ह्यांनाही काही विशेष सुचलं नाही...त्यात डूबूक डूबूक,गुलुगुलु गुलुगुलु वगैरे शब्द टाकून त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला. त्यातून फक्त विनोद निर्माण होत होता पण म्हणावा तसा मतितार्थ निघत नव्हता...म्हणून शेवटी कालिदासाला साकडं घातलं गेलं आणि त्याने तो दुसरा चरण पूर्ण केला
मत्स्या न तानि खादन्ति,जालगोलकशंकया
आणि ह्यातील गर्भितार्थ(धनंजय ह्यांनी वर दिलाच आहे)सगळ्यांनाच पटला.
अशा प्रकारचा एक धडा आम्हाला शालेय संस्कृतमध्ये होता.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विनोद???

डुबुक डुबुक.... गुलुगुलु.... याला काय विनोद म्हणायचा का राव?? आमच्या पुलं चे विनोद वाचा म्हणावं त्यांना!

-----------------------------------------------------------------------------------------------
शहाणे उवाच
आप्ल्याला झेपेल तेच करावे। चित्ती नसु द्यावे समाधान।

छान्!

वाचते.

_______________________________________________
गॉड् बोलणे हा यशाचा बेअरर् चेक् आहे
त्यामुळे मी कुणाशी क्रॉस होत नाही.

 
^ वर