गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-१

(विकीवरून साभार)

खालील माहिती 'भारतीय पुरालेखोंका अध्ययन' या डॉ. शिवस्वरूप सहाय यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून -

शिलालेख : बेसनगर गरुडध्वज अभिलेख
स्थान : बेसनगर (प्राचीन आकर) जिल्हा - भिलसा (विदिशा) , मध्यप्रदेश
भाषा : प्राकृत
लिपी : ब्राह्मी
काळ : राजा भागभद्राच्या शासनकाळाचे १४ वे वर्ष (~ इ.स.पू. २००)
विषय : यवन दूत हेलिओडोरसने तक्षशिलेहून विदिशेला यऊन केलेली गरूडध्वजाची स्थापना
संदर्भ : Archaeological Survey of India, Annual Report (1908-1909) पृष्ठ १२६,
भांडारकर जे.व्ही.आर. ए.एस. ,२३ , पृष्ठ १०४

मूळ पाठ

भाग १

१. [दे]वदेवस वा[सुदेव]स गरुडध्वजो अयं
२. कारितो इ[अ] हेलिओदोरेण भाग -
३. वतेन दियस पुत्रेण तख्खसिलाकेन
४. योन-दू़तेन [आ] गतेन महाराजस
५. अंतलिकितस उपन्ता सकासं रञो
६. कासी -पु[त्र]स [भा]गद्रस त्रातारस
७. वसेन च[तु]दसेन राजेन वधमानस (||)

भाग२

१. त्रिनि अमुत-पदानि [इअ] [सु] - अनुठितानि
२. नेयति [स्वगं] दम-चाग अप्रमाद (||)

संस्कृत भाषांतर -
भाग १.
देवदेवस्य वासुदेवस्य गरुड-ध्वज अयं कारितः इह हेलियोदोरेण भागवतेन दियस्य पुत्रेण तक्षशिलाकेन यवन दूतेन आगतेन महाराज अंतलिकितस्य उपान्तात् सकाशं राज्ञः काशीपुत्रस्य भागभद्रस्य त्रातु: वर्षेण चतुर्दशेन राज्येन वर्धमानस्य |
भाग २.
त्रीणि अमृत पदानि इह सुअनुष्ठितानि नयन्ति स्वर्गं - दामः त्यागः अप्रमादः |

मराठी भाषांतर -

भाग १.

१. देवांची देवता वासुदेव याचा हा गरुडध्वज
२. स्थापित केला गेला हेलिओडॉरस द्वारा
३. दियस चा पुत्र (,) भागवत धर्मानुयायी (,)तक्षशिलेचा
४. यवन दूत याने येऊन(-) महाराज
५. अंतलिकितस (Antialkaidas) याच्या जवळचा राजा
५. काशीपुत्राच्या भागभद्राच्या तारक
६. वर्धमान याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी

भाग २.

१. ही तीन अमृतपदे सुअनुष्ठानाने
२. स्वर्गात घेऊन जातात - दम , त्याग आणि अप्रमाद.

साधे मराठी -
१. महाराज अंतलिकितस (अँटिअल्काईडस) याच्या दियसपुत्र हेलिओडोरस नावाच्या भवगद्भक्त यवनदूताने, अंतलिकितसचा त्राता कासीपुत्र भगभद्र याच्या राज्याच्या चौदाव्या वर्षी तक्षशिलेहून येऊन इथे हा देवांचा देव वासुदेव याचा गरुडध्वज उभारला.
२. संयम, त्याग आणि निर्दोष वर्तन यांमुळे स्वर्ग प्राप्त होतो.

***
क्रमशः

Comments

दुरुस्ती

मूळ लेखाची सहावी ओळ -

६. कासी -पु[त्र]स [भा]गद्रस त्रातारस

अशी वाचावी.

ह्या धाग्यातुन नक्की काय घ्यावे?

नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे? इ.स. २०० पुर्वी आपल्याकडे फॉरेनर यायचे? का आपला धर्म कायमच संयम, त्याग आणि निर्दोष वर्तन यांमुळे स्वर्ग प्राप्त होतो असे शिकवत आला आहे?

एकदा का नक्की ह्या लेखमालेचे स्वरुप कळले तर वाचताना सोपे जाईल म्हणुन विचारतोय हो विसुनाना :-) शीर्षकावरून फारसे कळले नाही.

पण हा लेख जर मराठी विकीवर अजुन टाकला नसल्यास जरुर टाकावा की ह्या विषयाच्या तसेच भावी अभ्यासकांना उपयोग होईल.

आयात

मला तर आता कृष्ण हा यवनांकडून आयात झालेला देव आहे असे वाटायला लागले आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

यवन् कृष्ण

मागच्या आठवड्यात मी एक विलक्षण साम्य म्हणून लेख उपक्रमवर टाकला होता. इराणचा राजा Cyrus याच्या नावाचा उच्चार मी कौरुश असा दिला होता. हा उच्चार माझ्या वाचनाप्रमाणे 'कुरुश' या शब्दासारखा जास्त आहे असे मला वाटते. आधीच जन्मकथांच्यात साम्य आणि नावे सुद्धा 'कुरुश' आणि कृष्ण. मी कृष्णाला इराणचा राजा बनवू इच्छितो आहे असे कोणाला वाटू नये म्हणून शेवटी मी कुरुश हे नाव कौरुश असे केले होते. आता विसूनाना तर त्याला यवनच बनवू बघत आहेत. हा!हा!हा!

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

यावरून

यावरून मला पुना ओकांचे ऐकलेले आठवले: कृष्णनिती वरून ख्रिश्चॅनिटी शब्द आला वगैरे. ;)

उद्देश

वरील लेखाचा उद्देश फारसा समजला नाही. लेखमालेला सुरुवात करताना प्रस्तावना असेल तर वाचकांना लेखाचा हेतू ध्यानात येईल.

परंतु, या लेखाने बरीच नवी माहिती मिळाली.

 
^ वर