घटनेतील कर्तव्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत.
* जगातील सर्व धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले आहे. त्यांचा अनादर केला आहे.
* जगात कधीही आणि कुठेही धर्ममार्तंड पीडितांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत.त्यांनी नेहमी राजसत्तेला(मग ती जुलमी असली तरी) पाठिंबा दिला आहे.
* फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रवर्तक मुक्तविचारवंत(फ्री थिंकर्स) बुद्धिप्रामाण्यवादी होते.
*स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुभाव या तत्त्वांची पायाभरणी बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांनी केली. धर्मगुरूंचा त्याच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही.
*हिएतनाम युद्धात अमेरिकेने रासायनिक युद्धसाहित्य (केमिकल वॉरफेयर) वापरू नये यासाठी बर्टरँड रसेल आणि त्यांचे अनुयायी यांनी निदर्शने केली. तेव्हा पोप, बिशप, कार्डिनल असे सर्व झगेवाले जे रविवारी चर्च मधे दया आणि करुणा यावर प्रवचने (सर्मने) देतात ते मूग गिळून गप्प होते.

श्रद्धा आणि चिकित्सा या चर्चेतील विषयांतरावर वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकेल असे वाटल्याने हे प्रतिसाद चर्चारूपाने येथे प्रकाशित केले आहेत. - संपादक मंडळ

Comments

विनंती

घटना, धर्म इ. वर चर्चा करायची असल्यास नवीन धागा उघडल्यास बरे होईल.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

धर्ममार्तंड आणि राजसत्ता

सर्वप्रथम ऑरागॉर्न यांच्याशी सहमत. या संदर्भात श्री. यनावाला यांनी वेगळा धागा उघडण्याची विनंती. अशी चर्चा करायला आवडेल. मला खात्री आहे त्यातून नवीन माहीतीचे आदानप्रदान होऊ शकेल.

आता केवळ आपण लिहीलेल्या उदाहरणांसदर्भातः

जगात कधीही आणि कुठेही धर्ममार्तंड पीडितांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत.त्यांनी नेहमी राजसत्तेला(मग ती जुलमी असली तरी) पाठिंबा दिला आहे.
पहीले वाक्य अर्धसत्य आहे. धर्ममार्तंडांनी राजसत्तेला कुठे पाठींबा दिला तर जेथे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे साटेलोटे होते. नुसती राजसत्ता ही रशियापासून ते आजच्या चीन पर्यंतच्या कम्युनिस्ट राष्ट्रांमधे होती. सामान्यांसाठी देखील जुलमी होती. त्याला पाठींबा देणारे हे धर्ममार्तंड नव्हते तर निधर्मीमार्तंड होते, केवळ त्यांच्याच देशातील नाही तर जगातील इतरत्र असलेले, अगदी भारतातील देखील.

फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रवर्तक मुक्तविचारवंत(फ्री थिंकर्स) बुद्धिप्रामाण्यवादी होते. स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुभाव या तत्त्वांची पायाभरणी बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांनी केली. धर्मगुरूंचा त्याच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही.

नक्कीच मुक्तविचारवंत(फ्री थिंकर्स) बुद्धिप्रामाण्यवादी होते आणि त्यांच्याकडून जगाने बरेच काही शिकले आजही आपल्याला शिकता येण्यासारखे त्यांच्या चळवळीच्या तत्वज्ञानात दिसेल. त्यांचे कॅथलीक चर्चबरोबर भांडण झाले. कॅथलीक चर्चसंस्था ही राजसत्तेस समांतर धर्मसंस्था होती. ती देखील रोम मधील पोपच्या अधिकाराने चालणारी. त्यांना अनेक सवलती होत्या, कर भरावा लागत नसे. थोडक्यात राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकांचा फायद करत सत्ताकेंद्रे झाल्या होत्या आणि त्याचा संबंध हा समाज-अर्थकारणाशी आला होता, धर्माशी नाही. त्यावर क्रांती नंतरच्या फ्रेंच सरकारने बंदी आणली. आपल्याकडे अशी बंदी आली तर उत्तम. पण माहीत आहे? आज हिंदूंच्या धर्मसंस्थांवर सरकारी नियंत्रण आहे. पण इतर धर्मियांना ते नियम लागू नाहीत. आजही कॅथलीक चर्चवरील नियंत्रण हे रोम मधील पोप बघू शकतो. प्रगत राष्ट्रांनी न दिलेली राजमान्यता आपण आजही पोपला देतो आणि राष्ट्रप्रमुख मानतो... करणार आहोत का आपण फ्रेंचांसारखी राज्यक्रांती?

हिएतनाम युद्धात अमेरिकेने रासायनिक युद्धसाहित्य (केमिकल वॉरफेयर) वापरू नये यासाठी बर्टरँड रसेल आणि त्यांचे अनुयायी यांनी निदर्शने केली. तेव्हा पोप, बिशप, कार्डिनल असे सर्व झगेवाले जे रविवारी चर्च मधे दया आणि करुणा यावर प्रवचने (सर्मने) देतात ते मूग गिळून गप्प होते.

मला हे देखील पुरेसे पटत नाही. जसे रसेल यांनी निदर्शने केली तशीच रेव्हरंड मार्टीन ल्यूथर किंग यांनी देखील आवाज उठवला होता. त्यांचे खालील वाक्य ज्या भाषणातील आहे, जेथे ते केले गेले आहे त्यावरून आपण म्हणता ते (अर्थात आपल्याला माहीत नसेल पण) खरे नाही हे समजते:

Meanwhile we in the churches and synagogues have a continuing task while we urge our government to disengage itself from a disgraceful commitment. We must continue to raise our voices if our nation persists in its perverse ways in Vietnam. We must be prepared to match actions with words by seeking out every creative means of protest possible. -
- Speech delivered by Dr. Martin Luther King, Jr., on April 4, 1967, at a meeting of Clergy and Laity Concerned at Riverside Church in New York City

कदाचीत आपण म्हणता ते कॅथलीक चर्च अर्थात रोमन चर्च आणि पोपच्या संदर्भात खरे असेल कारण तेथे परत पोप आणि कॅथलीक चर्चचे असे युद्ध होण्यात हितसंबंध होते. हवे असल्यास वेगळ्या चर्चेत यावर बोलूया... बाकी व्हिएटनाम आणि इतर ठिकाणी परत कम्युनिस्ट रशिया देखील होता त्याच्या विरुद्ध नक्की किती निधर्मी बुद्धिवाद्यांनी आवाज उठवला हा पण एक मुद्दाच आहे.

अजून उत्तर नाही!

नवा विषय मिळाल्यामुळे जुना सोडण्यासाठी पडत्या फळाची आज्ञाच झाली! या प्रतिसादाला अजून उत्तर नाही.
रसेलने स्टॅलिनवरही टीका केली हे विसरू नका. 'सारे बुद्धिवादी' रशियाधार्जिणे, कमुनिस्ट अत्याचारांकडे नास्तिकांचे दुर्लक्ष, हे कॅनार्ड नको.

करणार आहोत का आपण फ्रेंचांसारखी राज्यक्रांती?

चला.

मला वाटते

नवा विषय मिळाल्यामुळे जुना सोडण्यासाठी पडत्या फळाची आज्ञाच झाली!

हे वाक्य येथे (फार दी रेकॉर्ड) असंदर्भ असलेले आहे कारण हा चर्चा विषय वेगळा चालू आहे, नवीनच आहे. जुन्या ठिकाणी जुनी चर्चा चालू ठेवू शकतो. आपली कॉमेंट येथे स्थलांतरीत झाल्याने येथे आले आहे...

या प्रतिसादाला अजून उत्तर नाही.

हा दुवा हा आधीच्या चर्चेच्या मूळ पानावरच जात असल्याने नक्की कळत नाही आहे. मला वाटते आहे की ह्या दुव्यातील आपला प्रतिसाद देखील स्थलांतरीत झाला आहे आणि खाली आला आहे. कारण दोघांचा कॉमेंट नंबर सारखाच आहे. तसे नसले तर कृपया स्पष्टीकरण करावे. मात्र त्याच प्रतिसादा संदर्भात आपण बोलत असाल तर त्याला "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज् " हा प्रतिसाद दिला आहे. आपले मत समजून घेयला आवडेल.

रसेलने स्टॅलिनवरही टीका केली हे विसरू नका. 'सारे बुद्धिवादी' रशियाधार्जिणे, कमुनिस्ट अत्याचारांकडे नास्तिकांचे दुर्लक्ष, हे कॅनार्ड नको.

मी असे म्हणलेले नाही. रसेलचे बोल्शेविजम् वरील विचार पण माहीत आहेत. मात्र चर्चेच्या सुरवातीसच जेंव्हा, "घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत." म्हणत "सारे धर्मवादी एकाच मापाने मोजले जातात", त्याला देखील आपण आक्षेप घेत आहात का, हे कळले तर बरे होईल.

ठीक

हे वाक्य येथे (फार दी रेकॉर्ड) असंदर्भ असलेले आहे कारण हा चर्चा विषय वेगळा चालू आहे, नवीनच आहे.

तो प्रतिसादही मी त्या मूळ धाग्यातच दिला होता, असो.

मात्र त्याच प्रतिसादा संदर्भात आपण बोलत असाल तर त्याला "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज् " हा प्रतिसाद दिला आहे. आपले मत समजून घेयला आवडेल.

अवश्य.

मी असे म्हणलेले नाही. रसेलचे बोल्शेविजम् वरील विचार पण माहीत आहेत.

"व्हिएटनाम आणि इतर ठिकाणी परत कम्युनिस्ट रशिया देखील होता त्याच्या विरुद्ध नक्की किती निधर्मी बुद्धिवाद्यांनी आवाज उठवला" याला तो प्रतिसाद होता.

चर्चेच्या सुरवातीसच जेंव्हा, "घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत." म्हणत "सारे धर्मवादी एकाच मापाने मोजले जातात", त्याला देखील आपण आक्षेप घेत आहात का, हे कळले तर बरे होईल.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्म यांच्या व्याख्यांमध्येच विरोध आहे.

मुद्दा

बाकी व्हिएटनाम आणि इतर ठिकाणी परत कम्युनिस्ट रशिया देखील होता त्याच्या विरुद्ध नक्की किती निधर्मी बुद्धिवाद्यांनी आवाज उठवला हा पण एक मुद्दाच आहे.

रसेलने केलेली स्टॅलीनची टिका माहित होती तर हा मुद्दा आलाच नसता. रिचर्ड डॉकिन्सनेही स्टॅलीनला 'स्पेक्ट्याक्युलरली इविल' असे संबोधले आहे. तेव्हा हा मुद्दा सपशेल बाद.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

घटनेतील कर्तव्ये

"बुडती हे जन, न देखवे डोळां..."संत तुकाराम

सर्व प्रथम, वरील संदर्भ देताना, "कवी" अथवा "कवीश्रेष्ठ" वगैरे म्हणण्याऐवजी, "संत" हा अध्यात्मिक आणि प्रचलीत शब्दच तुकोबाच्या बाबतीत वापरला त्याबद्दल धन्यवाद.

मी भारतीय आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत...."वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे." म्हणजे प्रत्येक विवेकवादी व्यक्तीचा हा घटनादत्त अधिकार आहे.

भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे. त्यात पिक अँड चूज असा प्रकार करण्याचे स्वातंत्र्य नाही. घटनेने, आठवे कर्तव्य हे, "to develop the scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform;" असे सांगितले आहे. मात्र ते पाळायच्या आधी, पाचवे कर्तव्य हे, "to promote harmony and the spirit of common brotherhood amongst all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities; to renounce practices derogatory to the dignity of women;" असे सांगितले आहे.

अर्थात जसे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्विकार आणि प्रसार करणे हे कर्तव्य आहे, तसेच धर्म, भाषा, प्रांत आणि इतर वैविध्यांना बंधूभाव आणि एकमेकातील सुसंवाद (harmony) यामधे गुंफून ठेवण्याचे पण कर्तव्य सांगितले आहे. थोडक्यात कुणाच्याही धार्मिक भावनांचा अनादर करू नये, तर आदर ठेवत, सुसंवाद साधावा आणि मग वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करायला सांगितले आहे. धर्माची आणि पर्यायाने धर्म पाळणार्‍यांची थट्टा, कुचेष्टा करत धर्माचा नायनाट करत वैज्ञानिक दृष्टीकोन पसरवयाला सांगितलेले नाही. तसे करणे म्हणजे घटनेतील कर्तव्ये ही न पाळता केवळ स्वतःला सोयिस्कर अधिकार वापरणे असा अर्थ होतो.

मात्र प्रसार कार्यात क्रोध आणि उपहास या गोष्टी टाळाव्या. या गोष्टींमुळे क्षणिक मानसिक समाधान लाभू शकेल. पण अन्य काही उपयुक्त साध्य होणार नाही.

सहमत! देरसे आये! दुरूस्त आये!!

छे!

भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे. त्यात पिक अँड चूज असा प्रकार करण्याचे स्वातंत्र्य नाही.

However, like the Directive Principles, these are non-justiciable, without any legal sanction in case of their violation or non-compliance.
मला वाटते की आपल्या मतांना समर्थन देतो तोवरच कागदाला भाव द्यावा. (अन्यथा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गोहत्याबंदीसुद्धा सुचविली आहेच.)

त्या हार्मनी, ब्रदरहूड वगैरेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क सुपरसीड करतो बरे!

मुळात, व्याकरणाच्या दृष्टीने, त्या कलमाचा "all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities=(धार्मिक इत्यादि) फरकांच्या पलिकडे पोहोचलेले सर्व लोक" असा अर्थ घेता येतो का ते पहावे लागेल ;) असा अर्थ घेतला तर केवळ त्यांच्यातच सुसंवाद, बंधुत्व बनणे , इ. अपेक्षून इतर लोकांना सरळसरळ 'दुय्यम नागरिक' ठरविता येईल. क्ष्

हक्क, स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍या

मला वाटते की आपल्या मतांना समर्थन देतो तोवरच कागदाला भाव द्यावा. (अन्यथा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गोहत्याबंदीसुद्धा सुचविली आहेच.)

मूळ प्रतिसादात श्री. यनावाला यांनी घटनेची, कर्तव्यांची आणि हक्कांची जाणीव करून दिली होती, ज्याला माझा प्रतिसाद होता. त्याहूनही तुम्हाला काय वाटते ते तुमच्यापाशी. त्याला "ईट द केक ऍड हॅव इट" असे म्हणता येऊ शकेल. तसेच प्रत्येकाचे त्यासंदर्भात वेगळ्या मतांमुळे वेगवेगळे समर्थन/भाव वगैरे होऊ शकते. थोडक्यात हे दुधारी शस्त्र आहे. तुम्ही तुम्हाला हवे तिथे तितकीच घटना मानणार, इतरजण त्यांना हवी तितकी... देश असा चालत नसतो/चालू नये.

असा अर्थ घेतला तर केवळ त्यांच्यातच सुसंवाद, बंधुत्व बनणे , इ. अपेक्षून इतर लोकांना सरळसरळ 'दुय्यम नागरिक' ठरविता येईल.
परत तेच. यात पिक अँड चूज चालू आहे. घटनेने तुम्ही म्हणता जशी non-justiciable कर्तव्ये सांगितली अहेत तसेच प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य पण सांगितले आहे. ज्यामधे freedom of religion येते, ज्यावर आधारीत कायदे आहेत आणि ते सर्वांवर बंधनकारक आहेत. थोडक्यात घटनेतील हक्क, स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍या या एकत्रीतपणे बघायला लागतात. जर अभिव्यक्तीस्वातंतत्र्याचा उपभोग घेयचा असेल, तर इतरांना त्यांच्या श्रद्धेचे अर्थात धर्माचे स्वातंत्र्य देणे पण बंधनकारक आहे हे मान्य करावे लागेल. जर धर्माचे स्वातंत्र्य मान्य केलेत तर ते वैविध्य असताना टिकवण्यासाठी हर्मनी, ब्रदरहूड वगैरे कर्तव्ये पाळणे पण आवश्यक ठरते. पण आता तुम्हाला घटनाच मान्य नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. एक तर घटना बदलायला संसदेत जा अथवा घटना मोडायला अतिरेकी व्हा.

नक्की बंधनकारक का?

घटनेने तुम्ही म्हणता जशी non-justiciable कर्तव्ये सांगितली अहेत तसेच प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य पण सांगितले आहे. ज्यामधे freedom of religion येते, ज्यावर आधारीत कायदे आहेत आणि ते सर्वांवर बंधनकारक आहेत. थोडक्यात घटनेतील हक्क, स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍या या एकत्रीतपणे बघायला लागतात. जर अभिव्यक्तीस्वातंतत्र्याचा उपभोग घेयचा असेल, तर इतरांना त्यांच्या श्रद्धेचे अर्थात धर्माचे स्वातंत्र्य देणे पण बंधनकारक आहे हे मान्य करावे लागेल. जर धर्माचे स्वातंत्र्य मान्य केलेत तर ते वैविध्य असताना टिकवण्यासाठी हर्मनी, ब्रदरहूड वगैरे कर्तव्ये पाळणे पण आवश्यक ठरते. पण आता तुम्हाला घटनाच मान्य नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. एक तर घटना बदलायला संसदेत जा अथवा घटना मोडायला अतिरेकी व्हा.
ठीक.

भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे.
पुन्हा एकदा विचारतो. विचार करून आणि अभ्यास करून उत्तर द्या. नक्की बंधनकारक का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अधिकार - बंधनकारक

पुन्हा एकदा विचारतो. विचार करून आणि अभ्यास करून उत्तर द्या. नक्की बंधनकारक का?
ज्या संबंधात यनावाला अधिकार आहे असे म्हणले त्या संबंधात मी बंधनकारक आहे असे म्हणले होते आणि म्हणत आहे.

बाकी तुम्ही अजून घटनेतील कर्तव्ये पाळायला तयार आहात का हे सांगितलेले नाहीत. ते देखील सांगितले तर बरे होईल.

नाही

परत तेच. यात पिक अँड चूज चालू आहे. घटनेने तुम्ही म्हणता जशी non-justiciable कर्तव्ये सांगितली अहेत तसेच प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य पण सांगितले आहे.

non-justiciable कर्तव्ये म्हणजेच पिक अँड चूज कर्तव्ये, बरे!
प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य मात्र justiciable आहेत.

जर अभिव्यक्तीस्वातंतत्र्याचा उपभोग घेयचा असेल, तर इतरांना त्यांच्या श्रद्धेचे अर्थात धर्माचे स्वातंत्र्य देणे पण बंधनकारक आहे हे मान्य करावे लागेल.

जर तर ची भाषा वापरण्याचे प्रयोजन समजले नाही पण हे दोन्ही हक्क मला मान्य आहेत.

जर धर्माचे स्वातंत्र्य मान्य केलेत तर ते वैविध्य असताना टिकवण्यासाठी हर्मनी, ब्रदरहूड वगैरे कर्तव्ये पाळणे पण आवश्यक ठरते.

नाही! मूलभूत कर्तव्ये पिक अँड चूज अशीच आहेत. म्हणूनच, हार्मनी-ब्रदरहूड (मूलभूत कर्तव्य)/गोहत्याबंदी (मार्गदर्शक तत्त्व) इ. चे पालन न करणे घटनेशी विसंगत नाही. मूलभूत हक्क मात्र पिक अँड चूज नाहीत.

डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल ड्युटीज्

मूलभूत कर्तव्ये पिक अँड चूज अशीच आहेत. म्हणूनच, हार्मनी-ब्रदरहूड (मूलभूत कर्तव्य)/गोहत्याबंदी (मार्गदर्शक तत्त्व) इ. चे पालन न करणे घटनेशी विसंगत नाही.

एकतर तुम्ही न समजून दोन गोष्टींमध्ये गल्लत करत आहात अथवा जाणूनबुजून दिशाभूल करत आहात.

non-justiciable कर्तव्ये म्हणजेच पिक अँड चूज कर्तव्ये, बरे! प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य मात्र justiciable आहेत.

तुम्ही विकीपिडीयामधे वापरलेले शब्द वापरत पिक अँड चूज आहे असे म्हणत आहात. भारतीय घटनेमध्ये non-justiciable/justiciable हे शब्द देखील घटनाकारांनी काळजीपूर्वक वापरलेले नाहीत. हवी असल्यास विकीपिडीयापेक्षा मूळ घटना वाचा.

घटनाकारांनी घटनेत "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स" (मार्गदर्शक तत्त्व) ही "फंडामेंटल ड्यूटीज्" (मूलभूत कर्तव्ये) पेक्षा वेगळी घातली आहेत ज्या मध्ये गोहत्या बंदी आहे. मार्गदर्शक तत्वे ही कायदेमंडळाला (केंद्र/राज्यसरकार. लोकप्रतिनिधी) नवीन कायदा करताना त्या त्या संदर्भात विचारात घेऊन पुढचे पाऊल टाकण्यासाठी सांगितलेली आहेत.

या उलट "फंडामेंटल ड्यूटीज्" (मूलभूत कर्तव्ये) ही नागरीकांना "फंडामेंटल राईट्स" (मूलभूत हक्क) यांच्या बरोबर "नैतिक जबाबदारी" म्हणून सांगितले गेले आहेत.

आता मी कुठेतरी "बंधनकारक" आहे असे म्हणले म्हणून जर तुमचा आक्षेप असेल तर त्याचे कारण इतकेच की "नैतिक जबाबदारी" (मॉरल ऑब्लीगेशन्स) ही काही पिक अँड चूज नसतात. नाहीतर, तिसर्‍याच जबाबदारीत सांगितलेले, "to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;" वाक्य पण non-justiciable म्हणत दुर्लक्षित कराल. थोडक्यात तुम्ही केवळ एकाच नैतिक जबाबदारीचा वापर करत दुसर्‍या नैतिक जबाबदार्‍या वापरायच्या नाहीत असे आपले जे म्हणणे आहे ते मान्य नाही. शिवाय घटनेत "नैतिक जबाबदारी" म्हणले आहे. "नैतिक" हा शब्द कुठल्याही व्यक्तीस "बंधनकारक"च असतो. शिवाय इथे तर कुठल्या धर्मग्रंथातील नसून सेक्यूलर घटनेतील ज्यावर देशाचा कारभार चालतोय, त्यातील आहे. अर्थात तुम्हाला काय स्वतःच्या मताविरोधातील लोकांना "दुय्यम नागरीक" म्हणून ठेवणे देखील मान्य आहे. थोडक्यात आपल्याला हिटलरशाही मान्य आहे आणि मला भारतीय अथवा कुठलीही लोकशाही घटना. असो.

नाही

तुम्ही विकीपिडीयामधे वापरलेले शब्द वापरत पिक अँड चूज आहे असे म्हणत आहात. भारतीय घटनेमध्ये non-justiciable/justiciable हे शब्द देखील घटनाकारांनी काळजीपूर्वक वापरलेले नाहीत. हवी असल्यास विकीपिडीयापेक्षा मूळ घटना वाचा.

१) भाग ४ चे शेपूट म्हणून भाग ४अ आहे. कलम ५१ चे शेपूट म्हणून कलम ५१अ आहे. अन्यथा, भाग ४अ चे पालन न करण्याविषयीच्या (भा.दं.वि. किंवा इतर पुस्तकांमध्ये) शिक्षाही ठरविल्या गेल्या असत्या.
२) कलम ५१अ लिहिताना इंदिरा गांधींच्या लेखनिकांनी लिहिले "It is, therefore, proposed to amend the Constitution to spell out expressly the high ideals of socialism, secularism and the integrity of the nation, to make the directive principles more comprehensive and give them precedence over those fundamental rights which have been allowed to be relied upon to frustrate socio-economic reforms for implementing the directive principles. It is also proposed to specify the fundamental duties of the citizens and make special provisions for dealing with anti-national activities, whether by individuals or associations."
मुळात, नंतर केलेले बदल हे मूळ घटनेपेक्षा दुय्यम पवित्रतेचे नाहीत काय? ;)
शिवाय, ते आणिबाणीत लिहिले गेले. त्यामुळेही, पिक अँड चूज योग्य ठरत नाही काय? ;)
त्यांचा भर धर्मनिरपेक्षता, सार्वभौमता, इ. आहे. धर्मांचा आदर वगैरे सारा केवळ फुलोरा आहे.

घटनाकारांनी घटनेत "डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स" (मार्गदर्शक तत्त्व) ही "फंडामेंटल ड्यूटीज्" (मूलभूत कर्तव्ये) पेक्षा वेगळी घातली आहेत ज्या मध्ये गोहत्या बंदी आहे. मार्गदर्शक तत्वे ही कायदेमंडळाला (केंद्र/राज्यसरकार. लोकप्रतिनिधी) नवीन कायदा करताना त्या त्या संदर्भात विचारात घेऊन पुढचे पाऊल टाकण्यासाठी सांगितलेली आहेत.

या उलट "फंडामेंटल ड्यूटीज्" (मूलभूत कर्तव्ये) ही नागरीकांना "फंडामेंटल राईट्स" (मूलभूत हक्क) यांच्या बरोबर "नैतिक जबाबदारी" म्हणून सांगितले गेले आहेत.

मान्य. पण गोहत्याबंदीवरून सिद्ध होते की घटना सॅक्रोसंट (पवित्र) नाही. न्या. दिनकरन यांनीही भारतीय लोकशाहीवर खूप मोठे उपकार केले आहेत ;)

आता मी कुठेतरी "बंधनकारक" आहे असे म्हणले म्हणून जर तुमचा आक्षेप असेल तर त्याचे कारण इतकेच की "नैतिक जबाबदारी" (मॉरल ऑब्लीगेशन्स) ही काही पिक अँड चूज नसतात.

असे मी म्हणणार नाही. नैतिक जवाबदारीही पिक अँड चूजच असते.

तिसर्‍याच जबाबदारीत सांगितलेले, "to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;" वाक्य पण non-justiciable म्हणत दुर्लक्षित कराल. थोडक्यात तुम्ही केवळ एकाच नैतिक जबाबदारीचा वापर करत दुसर्‍या नैतिक जबाबदार्‍या वापरायच्या नाहीत असे आपले जे म्हणणे आहे ते मान्य नाही. शिवाय घटनेत "नैतिक जबाबदारी" म्हणले आहे. "नैतिक" हा शब्द कुठल्याही व्यक्तीस "बंधनकारक"च असतो.

त्याकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.

तुम्हाला काय स्वतःच्या मताविरोधातील लोकांना "दुय्यम नागरीक" म्हणून ठेवणे देखील मान्य आहे. थोडक्यात आपल्याला हिटलरशाही मान्य आहे आणि मला भारतीय अथवा कुठलीही लोकशाही घटना. असो.

कागदापेक्षा मला माझी अक्कल मोठी वाटते, अन्यथा एका पुस्तकाऐवजी दुसरे पुस्तक आले असेच व्हायचे! बाकी, 'दुय्यम नागरिक' वाल्या वाक्यात एक ;) अशी खूण पाहिलीत काय? त्या वाक्याचा तसा अर्थ अपेक्षित नाही असे मलाही वाटते.

घटना

आपण वर लिहीलेले इंग्रजी वाक्य, मला वाटते इंदीरा गांधींच्या लेखनीकाचे नव्हते तर तत्कालीन कायदेमंत्री हरीभाऊ गोखल्यांचे होते. आणि तसे देखील लेखनीक हे नुसते लिहायचेच काम करतात. अर्थात इंदिरा गांधी हाताखालच्या कुणाचाही लेखनीक म्हणून वापर करायच्या असे म्हणायचे असेल तर पूर्ण सहमत. :-)

मुळात, नंतर केलेले बदल हे मूळ घटनेपेक्षा दुय्यम पवित्रतेचे नाहीत काय? ;) शिवाय, ते आणिबाणीत लिहिले गेले. त्यामुळेही, पिक अँड चूज योग्य ठरत नाही काय? ;) त्यांचा भर धर्मनिरपेक्षता, सार्वभौमता, इ. आहे. धर्मांचा आदर वगैरे सारा केवळ फुलोरा आहे.

येथे पावित्र्याचा प्रश्न नसून लोकशाही राष्ट्रात प्रस्थापित घटनेस (जो पर्यंत बदल केले गेलेले नाहीत तो पर्यंत) अंतिम समजण्याचा आहे, मग त्यातील व्यक्तीगत एखादी गोष्ट आवडो अथवा न आवडो. मी खाली दिलेल्या प्रतिसादात म्हणले आहेच ते परत एकदा लिहीतो: घटना आणिबाणीत जरी बदलली असली तरी त्यासंदर्भात परत घटना दुरूस्ती कुठल्याच पक्षाच्या अथवा विचारांच्या सरकारने आत्तापर्यंत केलेली नाही. थोडक्यात तो घटनेचा अविभाज्य भाग आहे, जो पर्यंत बदलला जात नाही तो पर्यंत

पण गोहत्याबंदीवरून सिद्ध होते की घटना सॅक्रोसंट (पवित्र) नाही. न्या. दिनकरन यांनीही भारतीय लोकशाहीवर खूप मोठे उपकार केले आहेत ;)

परत थोड्या वेगळ्या शब्दात म्हणतो, माझ्या लेखी घटना पवित्र असूच शकत नाही. त्यामधे कालानुरूप योग्य बदल केले तर आश्चर्य नाहीच, गरजेचे असू शकते. अर्थात त्यामुळे मुळ्च्या लोकशाही संकल्पनेस धक्का लागता कामा नये, हे महत्वाचे. त्याचबरोबर, प्रस्थापित घटना (म्हणजे घटना समितीने तयार केलेली, नंतरच्या काळात मंत्रीमंडळ, लोक/राज्यसभेने बदललेली आणि राष्ट्रपतींनी शिक्का मोर्तब केलेली) आणि त्यावर आधारीत कायदे हे सर्वांनाच समान आहेत. मला गोहत्याबंदीविषयीच्या न्या. दिनकरन् यांच्या निर्णयाविषयी माहीती नाही. आपल्याला असल्यास येथे अथवा खरडीने अथवा दुसर्‍या चर्चेने अवश्य कळवा. समजून घेयला आवडेल.

कागदापेक्षा मला माझी अक्कल मोठी वाटते,

मला वाटते बाळासाहेब ठाकर्‍यांना देखील असेच वाटत असावे. अर्थात नाव "बाळ" असले तरी या वयातही तसे ते कामात व्यस्त असतात हा फरक असावा.;)

'दुय्यम नागरिक' वाल्या वाक्यात एक ;) अशी खूण पाहिलीत काय? त्या वाक्याचा तसा अर्थ अपेक्षित नाही असे मलाही वाटते.

आपले वाक्य येथे उर्धृत करत आहे:

मुळात, व्याकरणाच्या दृष्टीने, त्या कलमाचा "all the people of India transcending religious, linguistic and regional or sectional diversities=(धार्मिक इत्यादि) फरकांच्या पलिकडे पोहोचलेले सर्व लोक" असा अर्थ घेता येतो का ते पहावे लागेल ;) असा अर्थ घेतला तर केवळ त्यांच्यातच सुसंवाद, बंधुत्व बनणे , इ. अपेक्षून इतर लोकांना सरळसरळ 'दुय्यम नागरिक' ठरविता येईल.

हे वाचताना, ";)" ही खूण नक्की कशा संदर्भात वाटते? घटनाकारांनी, जशी का होईना घटना लिहीली, त्यावर आधारीत काही आवडेल काही नावडेल पण राज्यकर्त्यांनी आणि अगदी आपल्या बाबूगिरीनी देखील आजपर्यंत राज्य केले, काही बिघडवले पण विकास देखील घडवला. तुम्ही-आम्ही त्याच घटनेचा आणि पद्धतीचा (चांगल्या अर्थाने) फायदा घेतला. मात्र आता त्याला केवळ कागद मानत, आपण म्हणणार की, "कागदापेक्षा मला माझी अक्कल मोठी वाटते" . स्वतःच्या अकलेचा अहंकार झालेलेच तर "तशी अक्कल" नाही म्हणून इतरांना देखील कस्पटासमान मानत घटना गुंडाळतात आणि सामान्यांना अथवा त्यांच्या मर्जीत न बसणार्‍यांना दुय्यम नागरीक बनवतात. हाच तर हिटलरचा काळा इतिहास आहे. मला आशा आहे, की आपल्या डोक्यात तसे लिहीताना नसेल ही कदाचीत, पण जे डोक्यात नाही ते विचारातून अथवा लेखणीतून पण बाहेर येऊ नये इतकेच वाटते. नाहीतर आडात होते म्हणून पोहर्‍यात आले असे काहीसे म्हणावे लागते... असो.

सर्वप्रथम हे वाक्य इंदिरा गांधींच्या लेखनीकाचे नसून तत्कालीन कायदा आणि न्याय खात्याचे मंत्री हरीभाऊ गोखले यांचे होते. आता इंदीरा गांधी हाता खालच्या कुणाचाही लेखनीक म्हणून उपयोग करायच्या या अर्थाने म्हणला असलात तर तो वेगळा भाग आहे. :-) या वाक्यात जरी

रेसचा अहंकार

स्वतःच्या अकलेचा अहंकार झालेलेच तर "तशी अक्कल" नाही म्हणून इतरांना देखील कस्पटासमान मानत घटना गुंडाळतात आणि सामान्यांना अथवा त्यांच्या मर्जीत न बसणार्‍यांना दुय्यम नागरीक बनवतात. हाच तर हिटलरचा काळा इतिहास आहे.
हिटलरला त्याच्या रेसचा नक्कीच अहंकार होता. तो फारसा हुशार नव्हता.

हिटलरवरून: आमच्या वर्गात एक कुलकर्णी होता. संघाचा आणि विहिंपचा कट्टर कार्यकर्ता. तो घनःश्याम होता. पण त्यालाही आर्य असण्याचा अभिमान होता. तो हिटलरचा अर्थातच कट्टर समर्थक होता. तो काळा असला तरी हिटलरएवढाच सुमार होता.

दुय्यम नागरिक + हिटलर: हिंदुत्ववादी मोदींनी गुजरातेत मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवले आहे असे म्हणतात.

नवे संकटनिवारण स्तोत्र:
गोलगप्पा गोल है
गोल लड्डू गोल है
इसलिए हे मास्टरजी
ये धरा भी गोल है

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अहंकार

हिटलरला त्याच्या रेसचा नक्कीच अहंकार होता. तो फारसा हुशार नव्हता.

कशाचाही अवाजवी अहंकार ठेवणारे हुशार असतात का हा एक मोठ्ठा प्रश्न आहे. पण एकदा का असा अहंकार बळावला की इतरजणांना दुय्यम ठरवणे हे किस झाड की पत्ती! आणि विचार करा, तुम्ही म्हणता तसे हिटलर हुशार नसला तरी सार्‍या जगाला इतका नडला तर स्वतःला हुशार समजणारे जगाचे किती वाटोळे करतील?

आमच्या वर्गात एक कुलकर्णी होता. संघाचा आणि विहिंपचा कट्टर कार्यकर्ता. तो घनःश्याम होता. पण त्यालाही आर्य असण्याचा अभिमान होता. तो हिटलरचा अर्थातच कट्टर समर्थक होता. तो काळा असला तरी हिटलरएवढाच सुमार होता.

दुर्दैवी आहे. त्याला संघ कळलाच नाही! बाकी तो काळा आहे, घनश्याम आहे असे म्हणत सारखे त्याचा वर्ण आणणे आणि मग सुमार म्हणणे हे नक्की वंशवादी नाही ना?

दुय्यम नागरिक + हिटलर: हिंदुत्ववादी मोदींनी गुजरातेत मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवले आहे असे म्हणतात.
"असे म्हणतात" ना? तसे "सोनीया गांधी अजून इटालीयनच" आहेत असेही म्हणतात. असल्या सांगोवांगी गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले उत्तम.

अरेरे!

दुर्दैवी आहे. त्याला संघ कळलाच नाही!
अरेरे! संघ कळलाच नाही.

बाकी तो काळा आहे, घनश्याम आहे असे म्हणत सारखे त्याचा वर्ण आणणे आणि मग सुमार म्हणणे हे नक्की वंशवादी नाही ना?
नाही. रंगांचा आणि सुमारपणाचा काहीही संबंध नाही हेच ह्यातून स्पष्ट होते आहे. कारण हिटलर गोरा. कुलकर्णी काळा. मात्र दोघे सुमार. आणि माझ्यामते काळा हा सुरेख वर्ण आहे. माझ्या प्रतिसादाला तुम्हीच खोडसाळपणे वंशवादी रंग दिला आहे.

दुय्यम नागरिक + हिटलर: हिंदुत्ववादी मोदींनी गुजरातेत मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवले आहे असे म्हणतात.
"असे म्हणतात" ना? तसे "सोनीया गांधी अजून इटालीयनच" आहेत असेही म्हणतात. असल्या सांगोवांगी गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले उत्तम.

अहो भारताच्या सुप्रीम कोर्टालाही तुम्ही मानत नाही का? सर्वाच्च न्यायालयाने मोदींवर ताशेरे ओढले होते ना. कितीतरी खटले गुजरातबाहेर नेले होते. असो. बाकी आम्ही काही सोनियावादी नाही. चुकीच्या दारावर थाप. चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नाही

इंदिरा गांधी हाताखालच्या कुणाचाही लेखनीक म्हणून वापर करायच्या असे म्हणायचे असेल तर पूर्ण सहमत. :-)

;)

येथे पावित्र्याचा प्रश्न नसून लोकशाही राष्ट्रात प्रस्थापित घटनेस (जो पर्यंत बदल केले गेलेले नाहीत तो पर्यंत) अंतिम समजण्याचा आहे, मग त्यातील व्यक्तीगत एखादी गोष्ट आवडो अथवा न आवडो. मी खाली दिलेल्या प्रतिसादात म्हणले आहेच ते परत एकदा लिहीतो: घटना आणिबाणीत जरी बदलली असली तरी त्यासंदर्भात परत घटना दुरूस्ती कुठल्याच पक्षाच्या अथवा विचारांच्या सरकारने आत्तापर्यंत केलेली नाही. थोडक्यात तो घटनेचा अविभाज्य भाग आहे, जो पर्यंत बदलला जात नाही तो पर्यंत

तो पिक अँड चूज आहे असे माझे प्रतिपादन आहे ना!

मला गोहत्याबंदीविषयीच्या न्या. दिनकरन् यांच्या निर्णयाविषयी माहीती नाही.

तसे नाही, न्या. दिनकरन यांच्यामुळे न्यायसंस्थेचे पावित्र्य संपले. त्याचप्रमाणे, घटना ही पौरुषेय असल्याचे गोहत्याबंदीमुळे सिद्ध होते.

स्वतःच्या अकलेचा अहंकार झालेलेच तर "तशी अक्कल" नाही म्हणून इतरांना देखील कस्पटासमान मानत घटना गुंडाळतात आणि सामान्यांना अथवा त्यांच्या मर्जीत न बसणार्‍यांना दुय्यम नागरीक बनवतात. हाच तर हिटलरचा काळा इतिहास आहे. मला आशा आहे, की आपल्या डोक्यात तसे लिहीताना नसेल ही कदाचीत, पण जे डोक्यात नाही ते विचारातून अथवा लेखणीतून पण बाहेर येऊ नये इतकेच वाटते. नाहीतर आडात होते म्हणून पोहर्‍यात आले असे काहीसे म्हणावे लागते... असो.

ती विधाने केवळ पिक अँड चूज भागांविषयी आहेत. दुसरा पर्याय "आय वॉज जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स" असा ग्रंथाधिष्टित आहे. पिक अँड चूज भागांविषयी स्वत:ची अक्कलच वापरावी लागणार ना?

फ्यू गुड मेन

तो पिक अँड चूज आहे असे माझे प्रतिपादन आहे ना!

या संदर्भात केवळ आपल्याशी "ऍग्री टू डिसऍग्री" इतकेच म्हणेन...

दुसरा पर्याय "आय वॉज जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स" असा ग्रंथाधिष्टित आहे.

या संदर्भात मला "फ्यू गुड मेन" आठवला. आठवणीतून सांगतो, च्.भू.द्या.घ्या. :

त्यात शेवटी दोन सैनिकांवर एका कमकुवत सैनिकाला ट्रेनिंगच्या ठिकाणी मारतात म्हणून खटला चाललेला असतो. चौकशीअंती हे सिद्ध होते की ते "जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स" म्हणून त्यांच्यावर हत्येसंदर्भात शिक्षा न होता सोडण्यात येते पण त्याच बरोबर त्यांना सैन्यातूनही सन्मानावीना (तरूणपणीच) काढण्याचा आदेश दिला जातो. त्यातील एक सैनीक दुसर्‍यास विचारतो, "असे का? आपण जर हत्या केली नाही हे मान्य आहे तर मग आपल्याला ही हाकालपट्टीची शिक्षा का?" त्यावर त्याला हा उत्तर देतो की, "कारण आपण हत्या करताना जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स, पण घटनेने दिलेली कमकुवत माणसाला वाचवण्याची जबाबदारी आपण पाळत नव्हतो".

थोडक्यात "जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स" आणि "राज्यघटना मानणे" या दोन गोष्टी माझ्या लेखी वेगळ्या आहेत.

असो.

?

या संदर्भात केवळ आपल्याशी "ऍग्री टू डिसऍग्री" इतकेच म्हणेन...

हे वर्णन केवळ इनकमेंसुरेबल पॅराडाईमसाठी असते. मी पिक अँड चूज च्या समर्थनार्थ युक्तिवाद केले आहेत, ते तुम्ही खोडलेले नाहीत.

थोडक्यात "जस्ट फॉलोइंग ऑर्डर्स" आणि "राज्यघटना मानणे" या दोन गोष्टी माझ्या लेखी वेगळ्या आहेत.

घटनेने दिलेल्या ऑर्डर्सपेक्षाही सद्सद्विवेकबुद्धी मोठी ना?

नाही

हे वर्णन केवळ इनकमेंसुरेबल पॅराडाईमसाठी असते. मी पिक अँड चूज च्या समर्थनार्थ युक्तिवाद केले आहेत, ते तुम्ही खोडलेले नाहीत.

तुम्ही केवळ युक्तीवादच करत आहात. तसे करताना पुढे जाणे शक्य नाही, म्हणून ऍग्री टू डिसऍग्री म्हणले आहे.

घटनेने दिलेल्या ऑर्डर्सपेक्षाही सद्सद्विवेकबुद्धी मोठी ना?

प्रत्येकाची सद्सदविवेकबुद्धीची व्याख्या वेगळी असू शकते. म्हणूनच लोकशाहीत घटना ही सगळ्यांनी पाळायची असते. नाहीतर सद्सदविवेकबुद्धीच्या नावाखाली झुंडशाही देखील येऊ शकते.

?

चर्चेची प्रगती युक्तिवादांनीच होते!

घटना

आपला युक्तीवाद हा माझ्या दृष्टीने खोडला गेला आहे. कारण आपण भारतीय घटनाच मान्य करायला तयार नसून, त्याला कागदाचा तुकडा म्हणत केवळ (आपल्याच भाषेत) आपली अक्कल आणि त्याविषयीचा आपल्याला वाटणारा अहंकार हा मोठा मानत लोकशाहीमध्ये आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांना दुय्यम नागरीक म्हणत आहात. आणि आपल्याला सदसदविवेकबुद्धी म्हणत तसे वागणे योग्य वाटत आहे. यात अजून काही बोलण्यासारखे राहीलेले नाही.

नाही

'दुय्यम नागरिक' या विषयावर मी खुलासा दिलेला आहे.

आपला युक्तीवाद हा माझ्या दृष्टीने खोडला गेला आहे.

  1. नाही, मूलभूत कर्तव्ये बंधनकारक असल्याचे तुम्ही सिद्ध केलेले नाही. नैतिक बंधन हे मानीव आहे.
  2. घटनेचे पिक अँड चूज नसलेले भाग मला मान्यच आहेत. नसते तर मी वैधानिक किंवा अवैधानिक रेमेडी शोधल्या असत्याच.
  3. "तुम्ही केवळ युक्तीवादच करत आहात. तसे करताना पुढे जाणे शक्य नाही, म्हणून ऍग्री टू डिसऍग्री म्हणले आहे." या वाक्याचा अर्थ होतो की केवळ युक्तिवादच केल्यास चर्चा पुढे जात नाही. त्याऐवजी "तुमचे युक्तिवाद चूक आहेत कारण ..." असे म्हणून मूलभूत कर्तव्ये बंधनकारक असल्याचे सिद्ध करणारे प्रतियुक्तिवाद द्या.

पांढर्‍यावर काळे

'दुय्यम नागरिक' या विषयावर मी खुलासा दिलेला आहे.

आधी कुठे तरी "डोळे मिचकावणारी खूण" दाखवून नंतर जे काही लिहीले आहेत आहेत, तसे नव्हतेच असे नंतरच्या खुलाशात म्हणणे ही नुसती चूकच नाही तर धादांत खोटेपणा आहे. शिवाय तुमच्या दृष्टीने तो खुलासा हा जेंव्हा तुमची तुलना हिटलरच्या वृत्तीशी झाली तेंव्हा दिलात, तो पर्यंत सगळे आलबेल होते. तुमच्या घटनेला निव्वळ कागद म्हणणार्‍या, "कागदापेक्षा मला माझी अक्कल मोठी वाटते, अन्यथा एका पुस्तकाऐवजी दुसरे पुस्तक आले असेच व्हायचे!" या वाक्यतूनही बरेच काही स्पष्ट झाले आहे,. उगाच सारवासारव करण्यापेक्षा सरळ मान्य करा. ज्यांना स्वतःच्या स्वतःलाच वाटत असलेल्या अकलेच्या अहंकारापुढे दुसरे दुय्यम दिसतात आणि घटना कागदाचा तुकडा त्यांना अजून काय चूक म्हणून सांगणार?

मूलभूत कर्तव्ये बंधनकारक असल्याचे तुम्ही सिद्ध केलेले नाही. नैतिक बंधन हे मानीव आहे.

त्या संदर्भात मी येथे माझे मत स्पष्ट केले आहे: आता मी कुठेतरी "बंधनकारक" आहे असे म्हणले म्हणून जर तुमचा आक्षेप असेल तर त्याचे कारण इतकेच की "नैतिक जबाबदारी" (मॉरल ऑब्लीगेशन्स) ही काही पिक अँड चूज नसतात. नाहीतर, तिसर्‍याच जबाबदारीत सांगितलेले, "to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;" वाक्य पण non-justiciable म्हणत दुर्लक्षित कराल. थोडक्यात तुम्ही केवळ एकाच नैतिक जबाबदारीचा वापर करत दुसर्‍या नैतिक जबाबदार्‍या वापरायच्या नाहीत असे आपले जे म्हणणे आहे ते मान्य नाही.

घटनेचे पिक अँड चूज नसलेले भाग मला मान्यच आहेत....

घटना ही पिक अँड चूज हेच मला मान्य नाही. सत्ता आणि संख्याबळाच्या द्वारे ती बदलण्याचा हक्क मात्र लोकशाहीत असतो, आणि त्यातील मर्यादा लक्षात घेऊनही तो मी मान्य करतो. मात्र जो पर्यंत घटना पांढर्‍यावर काळी आहे तो पर्यंत ती सगळीच घटना लक्षात घ्यावी लागते. त्याशिवाय तुमच्या त्या दुय्यम नागरीकवाल्या प्रतिसादात तुम्ही, "त्या हार्मनी, ब्रदरहूड वगैरेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क सुपरसीड करतो बरे!" असे म्हणत त्याच घटनेतील इतर स्वातंत्र्ये ज्यात धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्य आहे, ते मान्य करतात का हे देखील सांगा. का त्यावेळेस घटना ही कागदाचा तुकडा?

...नसते तर मी वैधानिक किंवा अवैधानिक रेमेडी शोधल्या असत्याच.

जी व्यक्ती स्वतःचे म्हणणे खरे करायला अवैधानिक रेमेडी शोधणे पण कमी ठरवत नाही, अशा व्यक्तीने "नैतिक बंधने" पिक अँड चूज करत इतरांना दुय्यम नागरीक केले तरी आश्चर्य नाही, किंबहूना तसेच होते हा इतिहास आहे, मग तो हिटलरचा असोत, कम्युनिस्टांचा असोत अथवा आणिबाणीकालीन भारताचा असोत. अर्थात नंतर हे देखील नाकारले तरी आश्चर्य नाही कारण एकदा का अवैधानिक रेमिडीज मान्य आहेत असे म्हणले की, सगळेच बरोबर!

तात्पर्य: तुम्हाला घटनाच मान्य नाही तेथे तुमचे युक्तीवाद बरोबर का चूक याबद्दल काय बोलणार? ते निव्वळ स्वतःच्या घटना बायपास करण्याच्या युक्त्या बरोबर आहेत हे दाखवण्यासाठीचे वाद आहेत.

ये बंधन तो ... प्यार का बंधन है!

आधी कुठे तरी "डोळे मिचकावणारी खूण" दाखवून नंतर जे काही लिहीले आहेत आहेत, तसे नव्हतेच असे नंतरच्या खुलाशात म्हणणे ही नुसती चूकच नाही तर धादांत खोटेपणा आहे.

विनोदाचीही व्याख्या शिकवू का?

शिवाय तुमच्या दृष्टीने तो खुलासा हा जेंव्हा तुमची तुलना हिटलरच्या वृत्तीशी झाली तेंव्हा दिलात, तो पर्यंत सगळे आलबेल होते.

तोपर्यंत मला असे वाटत होते की मी केलेला विनोद तुम्हाला समजला होता.

तुमच्या घटनेला निव्वळ कागद म्हणणार्‍या, "कागदापेक्षा मला माझी अक्कल मोठी वाटते, अन्यथा एका पुस्तकाऐवजी दुसरे पुस्तक आले असेच व्हायचे!" या वाक्यतूनही बरेच काही स्पष्ट झाले आहे,. उगाच सारवासारव करण्यापेक्षा सरळ मान्य करा. ज्यांना स्वतःच्या स्वतःलाच वाटत असलेल्या अकलेच्या अहंकारापुढे दुसरे दुय्यम दिसतात आणि घटना कागदाचा तुकडा त्यांना अजून काय चूक म्हणून सांगणार?

जोवर माझे युक्तिवाद तुम्ही खोडत नाही तोवर मला अकलेचा अभिमान वाटणारच!
गीता आणि घटना यांमध्ये काही फरक करता की नाही? अकलेला महत्व नसेल तर ग्रंथप्रामाण्यच येईल ना?

थोडक्यात तुम्ही केवळ एकाच नैतिक जबाबदारीचा वापर करत दुसर्‍या नैतिक जबाबदार्‍या वापरायच्या नाहीत असे आपले जे म्हणणे आहे ते मान्य नाही.

नैतिक जवाबदारी ही संकल्पनाच मुळी नॉन जस्टिशिएअबल आहे. शिक्षा होण्याची भीती हाच आज्ञापालनाचा ड्रायविंग फोर्स असतो. असे प्रेरक बल आवश्यक नसते तर तुमच्या धर्मानेही पाप-पुण्याच्या कल्पना रचल्या नसत्या. तद्वतच, हार्मनी/ब्रदरहूडच्या संरक्षणासाठी काहीही रेमेडी घटनेत किंवा इत॑रत्र नोंदली गेलेली नसल्यामुळे, हार्मनी/ब्रदरहूड या संकल्पनांचे पालन बंधनकारक नसल्याचा निष्कर्ष निघतो. कॉपीराईट कायद्यातही लेखकाचे नैतिक हक्क अशी संकल्पना असते. तीही जस्टिशिएबलच म्हणता का?

घटना ही पिक अँड चूज हेच मला मान्य नाही.

कोठावळ्याचे पोट का दुखावे?

त्याच घटनेतील इतर स्वातंत्र्ये ज्यात धर्माच्या आचरणाचे स्वातंत्र्य आहे, ते मान्य करतात का हे देखील सांगा. का त्यावेळेस घटना ही कागदाचा तुकडा?

चिंता नसावी. मी याआधीच स्पष्ट केले आहे की तो हक्क मला मान्य आहे.

जी व्यक्ती स्वतःचे म्हणणे खरे करायला अवैधानिक रेमेडी शोधणे पण कमी ठरवत नाही

आपला तो स्वातंत्र्यसैनिक दुसर्‍याचा तो दहशतवादी!

तुम्हाला घटनाच मान्य नाही तेथे तुमचे युक्तीवाद बरोबर का चूक याबद्दल काय बोलणार? ते निव्वळ स्वतःच्या घटना बायपास करण्याच्या युक्त्या बरोबर आहेत हे दाखवण्यासाठीचे वाद आहेत.

घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत या गृहितकावर माझे ते मत अवलंबून आहे. "नैतिक हक्क बंधनकारक असतात" या वाक्याचा अर्थ सांगितलात की पुनर्विचार करेन.

"The claim, 'I was only following orders' has been used to justify too many tragedies in our history. Starfleet does not want officers who will blindly follow orders without analyzing the situation. Your actions were appropriate for the circumstances, and I have noted that in your record."
-
Captain Picard, to Data

विनोद

विनोदाचीही व्याख्या शिकवू का?

त्यावर वेगळा लेखच टाका. इथे अजून कशाला विषयांतर?

तोपर्यंत मला असे वाटत होते की मी केलेला विनोद तुम्हाला समजला होता.
तो विनोद नव्हता तर आपले वास्तव मत होते असेच मला वाटते कारण, ";)" ही खूण त्या संदर्भाच्या आधीची होती. ती देखील मी घटनेच्या केलेल्या वाक्याचा अर्थ आपल्याला व्याकरणाचा उपयोग करत चूक करत आपलाच (त्यानंतर ";)" खुणेच्या आधी केलेला) अर्थ कसा बरोबर हे सांगण्यासाठी होता. त्यामुळे ते विनोद म्हणून केलेत का थट्टा म्हणून तो तुमचा प्रश्न. मात्र, कितीही काही म्हणालात तरी त्यानंतर इतरांना दुय्यम नागरीक म्हणणे हे केवळ हिटलरसारखेच म्हणणे असते आणि आपले म्हणणे तसेच होते हे आपल्या इतर वाक्यांवरून अधिकच स्पष्ट होत राहते.

जोवर माझे युक्तिवाद तुम्ही खोडत नाही तोवर मला अकलेचा अभिमान वाटणारच!

तुमचा युक्तीवाद हा केवळ तुमच्या अकलेसंदर्भात आणि त्याअनुषंगाने इतरांना दुय्यम ठरवण्यासाठी आणि म्हणूनच घटना न मानण्यासाठी आहे. त्यामुळे चूक काय ठरवायचे. सगळेच स्क्यू आहे. मी घटना पूर्णपणे मानतो आणि तुम्ही तुम्हाला हवी तशी सोयिस्करपणे...

गीता आणि घटना यांमध्ये काही फरक करता की नाही? अकलेला महत्व नसेल तर ग्रंथप्रामाण्यच येईल ना?
मी कुठे म्हणले समान आहे. मी तर सुरवातीपासूनच म्हणत आहे की लोकशाही राष्ट्रात घटना सर्वोच्च आहे म्हणून. पण जी घटना कायदे करताना तसेच न्यायालयात वापरात आहे, ती आज एकाला वाटले की अमूक बरोबर नाही म्हणून ते वापरायचे नाही, दुसर्‍याला अमूक मान्य पण तमूक नाही तर ते वापरायचे नाही, याला काही ग्रंथप्रामाण्याविरुद्धची अक्कल म्हणत नाहीत.

आपला तो स्वातंत्र्यसैनिक दुसर्‍याचा तो दहशतवादी!

ठीक आहे तुम्ही स्वत:ला स्वयंघोषीत (स्वतंत्र भारताचे नागरीक असूनही) स्वातंत्र्यसैनिक म्हणत का होईना पण घटनेविरुद्ध अवैधानिक रेमेडीज् चा पुरस्कार करत आहात. यातच सगळे आले.

घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत या गृहितकावर माझे ते मत अवलंबून आहे.

हे आपले गृहीतक आहे.

"नैतिक हक्क बंधनकारक असतात" या वाक्याचा अर्थ सांगितलात की पुनर्विचार करेन.

त्यासंदर्भात मी परत माझ्या आधीच्या प्रतिसादातील भाग पुर्नर्र्धृत करतो:

आता मी कुठेतरी "बंधनकारक" आहे असे म्हणले म्हणून जर तुमचा आक्षेप असेल तर त्याचे कारण इतकेच की "नैतिक जबाबदारी" (मॉरल ऑब्लीगेशन्स) ही काही पिक अँड चूज नसतात. नाहीतर, तिसर्‍याच जबाबदारीत सांगितलेले, "to uphold and protect the sovereignty, unity and integrity of India;" वाक्य पण non-justiciable म्हणत दुर्लक्षित कराल. थोडक्यात तुम्ही केवळ एकाच नैतिक जबाबदारीचा वापर करत दुसर्‍या नैतिक जबाबदार्‍या वापरायच्या नाहीत असे आपले जे म्हणणे आहे ते मान्य नाही. शिवाय घटनेत "नैतिक जबाबदारी" म्हणले आहे. "नैतिक" हा शब्द कुठल्याही व्यक्तीस "बंधनकारक"च असतो. शिवाय इथे तर कुठल्या धर्मग्रंथातील नसून सेक्यूलर घटनेतील ज्यावर देशाचा कारभार चालतोय, त्यातील आहे. अर्थात तुम्हाला काय स्वतःच्या मताविरोधातील लोकांना "दुय्यम नागरीक" म्हणून ठेवणे देखील मान्य आहे. थोडक्यात आपल्याला हिटलरशाही मान्य आहे आणि मला भारतीय अथवा कुठलीही लोकशाही घटना. असो.

उत्तरे

त्यावर वेगळा लेखच टाका. इथे अजून कशाला विषयांतर?

मी का नवा धागा काढू? मी येथेच स्पष्टीकरण देणार. तुम्हाला विनोदाविषयीचे स्पष्टीकरणच जर पटले नाही तर चर्चा कशी पुढे सरकेल?

तो विनोद नव्हता तर आपले वास्तव मत होते असेच मला वाटते कारण, ";)" ही खूण त्या संदर्भाच्या आधीची होती. ती देखील मी घटनेच्या केलेल्या वाक्याचा अर्थ आपल्याला व्याकरणाचा उपयोग करत चूक करत आपलाच (त्यानंतर ";)" खुणेच्या आधी केलेला) अर्थ कसा बरोबर हे सांगण्यासाठी होता. त्यामुळे ते विनोद म्हणून केलेत का थट्टा म्हणून तो तुमचा प्रश्न. मात्र, कितीही काही म्हणालात तरी त्यानंतर इतरांना दुय्यम नागरीक म्हणणे हे केवळ हिटलरसारखेच म्हणणे असते आणि आपले म्हणणे तसेच होते हे आपल्या इतर वाक्यांवरून अधिकच स्पष्ट होत राहते.

नीट वाचा. खुणेआधीचा अर्थ बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुढील वाक्य प्रयोजिलेले नाही. विनोदी वाक्यावर आधारित निष्कर्ष म्हणून पुढील वाक्य आहे. विनोदावर आधारित वाक्य स्वतःही विनोदीच असते.

तुमचा युक्तीवाद हा केवळ तुमच्या अकलेसंदर्भात आणि त्याअनुषंगाने इतरांना दुय्यम ठरवण्यासाठी आणि म्हणूनच घटना न मानण्यासाठी आहे. त्यामुळे चूक काय ठरवायचे. सगळेच स्क्यू आहे.

तसे नाही. परिस्थिती अशी आहे की घटनीतील एक तत्त्व मला चूक वाटते. तसा निष्कर्ष काढणारे माझे युक्तिवाद सदोष असल्याचे तुम्ही सिद्ध करेपर्यंत मी माझे युक्तिवाद का सोडावेत? ते सोडावे लागत नाहीत तोवर माझी अक्कल कमी असल्याचे मी का मानावे?

मी घटना पूर्णपणे मानतो आणि तुम्ही तुम्हाला हवी तशी सोयिस्करपणे...

तुमचे मत माहिती आहे. पण भाग ४ पूर्णपणे मानणे बंधनकारक नाही असे घटनेत दिलेले आहे. भाग ४अ लाही तोच नियम आहे, अन्यथा, "वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवणार्‍यांचे डोळे फोडा" असा काही कायदा/केस लॉ दाखवा.

मी कुठे म्हणले समान आहे. मी तर सुरवातीपासूनच म्हणत आहे की लोकशाही राष्ट्रात घटना सर्वोच्च आहे म्हणून.

गीतासुद्धा धर्मात सर्वोच्चच समजली जाते ना? असे हे समानत्व सुचविलेले आहे. मी सद्सद्विवेकाला सर्वोच्च मानतो.

जी घटना कायदे करताना तसेच न्यायालयात वापरात आहे, ती आज एकाला वाटले की अमूक बरोबर नाही म्हणून ते वापरायचे नाही, दुसर्‍याला अमूक मान्य पण तमूक नाही तर ते वापरायचे नाही, याला काही ग्रंथप्रामाण्याविरुद्धची अक्कल म्हणत नाहीत.

मग, कशाला म्हणतात?

हे आपले गृहीतक आहे.

समजा, मी सिद्ध केले की घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत. तर मग ते भाग बायपास करणे योग्यच ठरेल ना? त्याला गृहीतक म्हणत नाहीत, जर-तर निष्कर्ष म्हणतात.

त्यासंदर्भात मी परत माझ्या आधीच्या प्रतिसादातील भाग पुर्नर्र्धृत करतो:

त्यासंदर्भात मी परत माझ्या आधीच्या प्रतिसादातील भाग पुर्नर्र्धृत न करता विचारतो: बंधनाचीही व्याख्या तुम्हाला चर्चायची आहे काय? बंधन तोडले तर काय शिक्षा आहेत?

उत्तर

मी का नवा धागा काढू? मी येथेच स्पष्टीकरण देणार. तुम्हाला विनोदाविषयीचे स्पष्टीकरणच जर पटले नाही तर चर्चा कशी पुढे सरकेल?
तसेच घटनेसंदर्भात होत आहे. आपले स्पष्टीकरण पटणे लांब राहीले अधिकच घटनेच्या विरोधात बोलणारे होत आहे.

नीट वाचा. खुणेआधीचा अर्थ बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुढील वाक्य प्रयोजिलेले नाही. विनोदी वाक्यावर आधारित निष्कर्ष म्हणून पुढील वाक्य आहे.
केवळ ";)" एक खूण गंभीर प्रतिसादात टाकली जाते, नंतर त्या/तत्सम प्रतिसादांना उत्तरे येयला वेळ लागला तरी लगेच मागे लागले जाते, अशा वेळीस त्यात विनोद कसला राहीला? बरं या पुढे जाऊन दुसर्‍याला तुच्छ लेखण्याचे रिकामटेकडा या आयडींचे विचार तरी नवीन आहेत का असे "मनोरंजनात्मक विनोदी" लेखन ते कायम करत असतात? उदाहरणेच देयची झाली तर ही बघा: (हे केव॑ळ माहीत असलेले, अजून शोधल्यास, जे आडात आहे तेच पोहर्‍यात लागेल):

() "चर्चा करणार नसतील त्यांनाच आम्ही हाणतो हो! त्यांनी संबंध तोडले तरी हरकत नाही. त्यांच्याशी शांततामय सहजीवन करून पृथ्वी शेअर करण्यात आम्हाला मुळीच उत्सुकता नाही." -

तात्पर्यः माय वे ऑर नो वे, गेट लॉस, आम्ही तुमच्याबरोबर देशच काय पृथ्वी देखील शेअर करणार नाही. हे काय विनोदी वाक्य आहे?

() जातीपातींमधील दरी बुजवणे (जे देखील घटनेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग म्हणू शकतो) हा जेंव्हा चर्चा विषय आला तेंव्हा आपले उत्तर काय?: "बिनडोकपणाचा आदर का करावा? दरी सांधून आत्मिक समाधान होणार आहे का? स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते त्याचे काय?" तात्पर्यः माझी बुद्धी आणि बौद्धीक भूक महत्वाची बाकी समाजाचे वाटोळे होवोत अथवा देशाचे अजून काही मला त्याच्याशी कर्तव्य नाही. अर्थात अशा समाजाची/व्यक्तींची बुद्धीवंतांना गरज नाही ते दुय्यमच आहेत.

() आरक्षणाबाबत संशोधनाचा निव्वळ मुलामा असलेला लेख लिहीत आपण जे सिद्ध करत होता त्यात देखील काय दिसले? तर विज्ञानाच्या नावाखाली जनुकांचा वापर करत तुम्हाला कमी वाटणार्‍यांना त्याच वर्गात ठेवत एक प्रकारची दुय्यम समाजव्यवस्था करता येऊ शकेल का आणि त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रीया असू शकतील याची चाचपणी!

थोडक्यात वरील प्रत्येक उदाहरणात केवळ आपल्यामधील हिटलरच्या वृत्तीचेच दर्शन सात्यत्याने घडले. का हे देखील विनोद होते? हे सगळे एकत्रित वाचल्यावर जर तुम्ही प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी "...इतर लोकांना सरळसरळ 'दुय्यम नागरिक' ठरविता येईल" या वाक्यात कोणी विनोद कसा बघावा आणि तुम्ही म्हणालात तरी का मानावा? ते अमान्यच आहे! आक्षेपार्ह आहे.

तसे नाही. परिस्थिती अशी आहे की घटनीतील एक तत्त्व मला चूक वाटते.
प्रश्न चूक अथवा बरोबरचा नाही तर घटना मानण्याचा अथवा घटनेच्या मार्गानेच बदलण्याचा आहे. त्याबाबत पण जेंव्हा आपण "अवैधानिक मार्ग" चोखाळायला तयार आहात तेंव्हा आपले विचार हे स्क्यूच ठरतात. बोलण्यासारखे काहीच उरत नाही.

पण भाग ४ पूर्णपणे मानणे बंधनकारक नाही असे घटनेत दिलेले आहे. भाग ४अ लाही तोच नियम आहे, अन्यथा, "वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवणार्‍यांचे डोळे फोडा" असा काही कायदा/केस लॉ दाखवा.
हा वाद वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणार्‍याच्या विरोधातील नाही, नाहीतर तुमच्या घटनेप्रमाणे/केसलॉप्रमाणे माझे देखील डोळे फुटले असते. मात्र त्याच बरोबर कोणी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे (बंधनकारक) नाही म्हणत त्याच्या विरोधात वागले तरी आश्चर्य वाटायला नको. म्हणून घटनेतील ही कलमे (डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स) एन्फोर्सेबल नाहीत असे जरी म्हणले आहे तरी त्या कलमांचा उपयोग हा कायदे करताना तसेच मूलभूत तत्वे म्हणून राज्यशकट चालवताना वापरावेत असे देखील सांगितले आहे.

ह्या सर्वाचे चर्विचर्वण हे समाजात काम करताना कसे करावे यासंदर्भात चालले आहे, असेच मी गृहीत धरत आलो आहे. त्याचे कारण या चर्चेची सुरवात ही मी श्री. यनावालांच्या प्रतिसादातील, "आम्हा सर्वांच्या प्रगतीसाठी माझ्या मते योग्य अयोग्य काय तें माझ्या बांधवांना सांगण्याचा मला हक्क आहे. किंबहुना प्रत्येक विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) व्यक्तीचे ते कर्तव्य आहे" वाक्याला दिलेल्या प्रतिसादातून झाली आहे. त्यांचा तो प्रतिसाद अजूनही मूळ चर्चेतच आहे मात्र माझ्या आत्ताच हे उत्तर देताना लक्षात आले की माझा मूळचा प्रतिसाद ज्यात मी श्री. यनावालांचे तुकारामाला संतच म्हणल्याबद्दल धन्यवाद म्हणत लिहीले होते तो दिसत नाही. म्हणून हे स्पष्टीकरण.

गीतासुद्धा धर्मात सर्वोच्चच समजली जाते ना? असे हे समानत्व सुचविलेले आहे. मी सद्सद्विवेकाला सर्वोच्च मानतो.

असे कुठे लिहीले आहे? गीता काहीजण एक महत्वाचा धर्मग्रंथ मानत असतील तर काहीजण सर्वोच्च धर्मग्रंथ मानत असतील तर अजून काही निव्वळ तत्वज्ञान म्हणून मानत असतील. हिंदू धर्मात एक देव एक पुस्तक ही संकल्पना नाही आहे आणि कोणी कशाला काय मानावे यासंदर्भात आज्ञा करणारा एकछत्री धार्मिक अंमलही नाही आहे.


जी घटना कायदे करताना तसेच न्यायालयात वापरात आहे, ती आज एकाला वाटले की अमूक बरोबर नाही ... याला काही ग्रंथप्रामाण्याविरुद्धची अक्कल म्हणत नाहीत.

मग, कशाला म्हणतात?

तर त्याच घटनेचा वापर करत लोकांमध्ये जागृती करत कायद्यानेच तीत बदल घडवून आणणे याला अक्कल म्हणतात. लोकांना दुय्यम नागरीक म्हणत, अवैधानिक काही करायची तयारी ठेवत करणे याला स्वतंत्र राष्ट्रात अहंकारी (किमान) वैचारीक अतिरेकी म्हणत असावेत. .

समजा, मी सिद्ध केले की घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत. तर मग ते भाग बायपास करणे योग्यच ठरेल ना? त्याला गृहीतक म्हणत नाहीत, जर-तर निष्कर्ष म्हणतात.

नक्की काय म्हणायचे आहे? मान्य-अमान्य, गृहीतक - जर/तर? सारखे कशाला बदलायचे?

त्यासंदर्भात मी परत माझ्या आधीच्या प्रतिसादातील भाग पुर्नर्र्धृत न करता विचारतो: बंधनाचीही व्याख्या तुम्हाला चर्चायची आहे काय? बंधन तोडले तर काय शिक्षा आहेत?
बंधनाची व्याख्या ही मी घटना मानणे ह्या बंधनाशी ठेवलीआहे, ठेवत आहे. घटना मान्य नसल्यास त्यात लोकशाही मार्गाने बदल करणे हे ते बंधन मोडण्याचे मी साधन समजतो. बंधन तोडले तर घटनाअधारीत कायद्याने शिक्षा होऊ शकते. ही चर्चा वर श्री. यनावालांच्या दिलेल्या प्रतिसादा संदर्भात आहे आणि त्यातील एका वाक्यावर केलेल्या प्रतिसादामुळे चालू झाली. म्हणूनच ती समाजात काम करताना घटनेची बंधने पाळणे याविषयीची आहे. उद्या कोणी घरात कानावर जानवे लावणे सायंटीफिक म्हणत असल्यास त्यासंदर्भात घटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याचे बंधन आहे का नाही यावर आधारीत नाही.

प्रत्युत्तर

आपले स्पष्टीकरण पटणे लांब राहीले अधिकच घटनेच्या विरोधात बोलणारे होत आहे.

वी शॅल सी.

केवळ ";)" एक खूण गंभीर प्रतिसादात टाकली जाते, नंतर त्या/तत्सम प्रतिसादांना उत्तरे येयला वेळ लागला तरी लगेच मागे लागले जाते, अशा वेळीस त्यात विनोद कसला राहीला?

१ २ ३ दुसर्‍याला तुच्छ लेखण्याचा हिटलरपणा

'त्या' प्रतिसादात स्मायली नाही. तत्सम म्हणजे काय? त्या विनोदाविषयी मी 'मागे लागलो' असे का म्हणता?
बाकी, तुमच्या १, २, ३ इ मुद्यांवर 'धाग्याशी सुसंगत नसल्याचा' आरोप टाळायचा असेल तर कृपया त्यात्या धाग्यात तेते युक्तिवाद करा.

प्रश्न चूक अथवा बरोबरचा नाही तर घटना मानण्याचा अथवा घटनेच्या मार्गानेच बदलण्याचा आहे. त्याबाबत पण जेंव्हा आपण "अवैधानिक मार्ग" चोखाळायला तयार आहात तेंव्हा आपले विचार हे स्क्यूच ठरतात. बोलण्यासारखे काहीच उरत नाही.

नाही! तो भाग अनचूज करण्याचे स्वातंत्र्य घटनेनेच मला दिलेले आहे. त्यामुळे मला काहीही 'रेमेडी' शोधण्याची 'निकड' नाही.

नाहीतर तुमच्या घटनेप्रमाणे/केसलॉप्रमाणे माझे देखील डोळे फुटले असते.

कर्तव्ये तुमच्या मते बंधनकारक आहेत, माझ्या मते नाहीत. डोळे फोडणारे कायदे तुम्हीच शोधणे आवश्यक आहे.

मात्र त्याच बरोबर कोणी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे (बंधनकारक) नाही म्हणत त्याच्या विरोधात वागले तरी आश्चर्य वाटायला नको.

सहमत. पण जे लोक त्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी वागतात त्यांची 'चोथा चघळणे, इ.' निर्भत्सना करू नये तर मोअर इक्वल सन्मानाने वागवावे इतकाच यनावाला यांचा मूळ मुद्दा आहे.

म्हणून घटनेतील ही कलमे (डायरेक्टीव्ह प्रिन्सिपल्स) एन्फोर्सेबल नाहीत असे जरी म्हणले आहे तरी त्या कलमांचा उपयोग हा कायदे करताना तसेच मूलभूत तत्वे म्हणून राज्यशकट चालवताना वापरावेत असे देखील सांगितले आहे.

जरी-तरी भाषेचे प्रयोजन काय? ती एन्फोर्सेबल नाहीत हाच सारांश आहे ना?

असे कुठे लिहीले आहे? गीता काहीजण एक महत्वाचा धर्मग्रंथ मानत असतील तर काहीजण सर्वोच्च धर्मग्रंथ मानत असतील तर अजून काही निव्वळ तत्वज्ञान म्हणून मानत असतील. हिंदू धर्मात एक देव एक पुस्तक ही संकल्पना नाही आहे आणि कोणी कशाला काय मानावे यासंदर्भात आज्ञा करणारा एकछत्री धार्मिक अंमलही नाही आहे.

शपथ घेण्यासाठी हिंदूंचे इतर कोणते पुस्तक वापरले जात नाही त्याअर्थी गीता सर्वोच्च मानली जाते. गीतेविषयी वाद घालण्यात मला रस नाही, कृपया कुराण किंवा नवा/जुना करार असे वाचावे.

तर त्याच घटनेचा वापर करत लोकांमध्ये जागृती करत कायद्यानेच तीत बदल घडवून आणणे याला अक्कल म्हणतात. लोकांना दुय्यम नागरीक म्हणत, अवैधानिक काही करायची तयारी ठेवत करणे याला स्वतंत्र राष्ट्रात अहंकारी (किमान) वैचारीक अतिरेकी म्हणत असावेत. .

कायदा वापरून कायद्यात बदल असे बूटस्ट्रॅपिंग नेहमीच शक्य असते असे नाही. शक्य असेल तेव्हा लोकजागृती करतोच. ५१अह कलम त्याविषयीच आहे.

घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत या गृहितकावर माझे ते मत अवलंबून आहे.

हे आपले गृहीतक आहे.

समजा, मी सिद्ध केले की घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत. तर मग ते भाग बायपास करणे योग्यच ठरेल ना? त्याला गृहीतक म्हणत नाहीत, जर-तर निष्कर्ष म्हणतात.

नक्की काय म्हणायचे आहे? मान्य-अमान्य, गृहीतक - जर/तर? सारखे कशाला बदलायचे?

"घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत" हे माझे गृहीतक आहे पण "घटनेमध्ये काही पिक अँड चूज भाग आहेत या गृहितकावर माझे ते मत अवलंबून आहे." या पूर्ण वाक्यालाच तुम्ही 'रिकामटेकडा यांचे गृहीतक' ठरविलेत म्हणून मी खुलासा केला.

बंधनाची व्याख्या ही मी घटना मानणे ह्या बंधनाशी ठेवलीआहे, ठेवत आहे. घटना मान्य नसल्यास त्यात लोकशाही मार्गाने बदल करणे हे ते बंधन मोडण्याचे मी साधन समजतो. बंधन तोडले तर घटनाअधारीत कायद्याने शिक्षा होऊ शकते. ही चर्चा वर श्री. यनावालांच्या दिलेल्या प्रतिसादा संदर्भात आहे आणि त्यातील एका वाक्यावर केलेल्या प्रतिसादामुळे चालू झाली. म्हणूनच ती समाजात काम करताना घटनेची बंधने पाळणे याविषयीची आहे. उद्या कोणी घरात कानावर जानवे लावणे सायंटीफिक म्हणत असल्यास त्यासंदर्भात घटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याचे बंधन आहे का नाही यावर आधारीत नाही.

"भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे. त्यात पिक अँड चूज असा प्रकार करण्याचे स्वातंत्र्य नाही." हे काय होते? येथे बंधन म्हणजे काय? 'ग' ने वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कर्तव्य पाळण्याचे बंधन तोडले (जानवे वापरले) किंवा 'घ' ने हार्मनी/ब्रदरहूड करण्याचे कर्तव्य पाळण्याचे बंधन तोडले (श्रद्धेवर टीका केली) तर अनुक्रमे काय शिक्षा होतात? अन्यथा कर्तव्ये बंधनकारक नाहीत असे सिद्ध होते.

पांघरूण

बाकी, तुमच्या १, २, ३ इ मुद्यांवर 'धाग्याशी सुसंगत नसल्याचा' आरोप टाळायचा असेल तर कृपया त्यात्या धाग्यात तेते युक्तिवाद करा.

१,२,३ हे सर्व मुद्दे तुमच्या लिहीण्यात विनोद नसून (गंभीर) सुसंगती दाखवण्यासाठी आणि सप्रमाण सिद्ध करण्यासाठी दाखवले आहेत. त्यामुळे अर्थातच ते सुसंगत आहे. येथे पण पिक अँड चूज करत उगाच स्वतःच्या विचारांवर पांघरूण घालू नका. विनोद वगैरे निव्वळ दाखवायचे दात आहेत, मागे आहे ती वास्तवात समाजाला दुय्यम आणि वरीष्ठ असे दुभागण्याची हिटलरी वृत्ती.

कर्तव्ये तुमच्या मते बंधनकारक आहेत, माझ्या मते नाहीत. डोळे फोडणारे कायदे तुम्हीच शोधणे आवश्यक आहे.
घटनेवर आधारीत कायदे केले जातात आणि कायद्याने शिक्षा होते. जर घटनाच मान्य केली नाहीत तर त्यावर आधारीत कायदे देखील मोडणारच. घटना न मानणे ही केवळ एक पायरी आहे.

पण जे लोक त्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी वागतात त्यांची 'चोथा चघळणे, इ.' निर्भत्सना करू नये तर मोअर इक्वल सन्मानाने वागवावे इतकाच यनावाला यांचा मूळ मुद्दा आहे.

"मोअर इक्वल सन्मानाने वागवणे" हे दोन्ही बाजूंनी व्हावे असे वाटते का? का धर्माचारी असणार्‍यांची वाटेल ती निर्भत्सना करत त्यांना दुय्यम नागरीक म्हणलेले चालते? हे स्पष्ट करा. तुम्ही जे धार्मिक आहेत त्यांना सन्मानाने वागवता का? का त्यावेळेस तुमच्यात भाषेत, "स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते", म्हणून तुम्ही "हू केअर्स" म्हणत त्यांना तुच्छ लेखत वाट्टेल ते लिहीणे हा अधिकार समजता? या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.

"वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे." म्हणजे प्रत्येक विवेकवादी व्यक्तीचा हा घटनादत्त अधिकार आहे." असे देखील श्री. यनावाला म्हणाले होते. आणि त्या संदर्भात वाद त्यांच्याशी नाहीच कारण त्यांनी देखील, "घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच." असे म्हणलेले आहेच.

येथे बंधन म्हणजे काय? 'ग' ने वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कर्तव्य पाळण्याचे बंधन तोडले (जानवे वापरले) किंवा 'घ' ने हार्मनी/ब्रदरहूड करण्याचे कर्तव्य पाळण्याचे बंधन तोडले (श्रद्धेवर टीका केली) तर अनुक्रमे काय शिक्षा होतात?

शिक्षा या घटनेच्या त्या त्या कलमांचा वापर करून केलेल्या कायद्याने होतात. तुम्हाला घटनाच मान्य नसल्यास त्यातील कायदे कसे मान्य करणार?

प्रति: पांघरूण

१,२,३ हे सर्व मुद्दे तुमच्या लिहीण्यात विनोद नसून (गंभीर) सुसंगती दाखवण्यासाठी आणि सप्रमाण सिद्ध करण्यासाठी दाखवले आहेत. त्यामुळे अर्थातच ते सुसंगत आहे. येथे पण पिक अँड चूज करत उगाच स्वतःच्या विचारांवर पांघरूण घालू नका. विनोद वगैरे निव्वळ दाखवायचे दात आहेत, मागे आहे ती वास्तवात समाजाला दुय्यम आणि वरीष्ठ असे दुभागण्याची हिटलरी वृत्ती.

१, २, ३ या मुद्यांना मी विनोद ठरविलेच नाही. ते गांभीर्यानेच लिहिलेले आहेत. ते चूक(पक्षी: हिटलरी) असल्याचे त्यात्या धाग्यांत सिद्ध करा.
मी केलेला विनोदही नीट वाचा. तुम्हाला हौस असल्यास मी त्याचाही गांभीर्याने बचाव करू शकतो. निअँडरथल, निरनिराळी मतिमंदत्वे, चिंपांझी, यांच्या कुवती मोजून एखादी उतरंड ठरविता येईलच ना? त्यांचे सामान्य मानवांपेक्षाचे वेगळेपण मोठे आहे. त्यामुळेच त्यांना इतरांपेक्षा स्पष्टपणे कमी हक्क असतात (म्हणजे जर निअँडरथल प्रयोगशाळेत बनविला गेला तर). श्रद्धावान आणि विवेकवाद्यांमधील फरक सूक्ष्मच आहे. परंतु, श्रद्धावानांना सूक्ष्म दुय्यमत्व द्यावे हा विनोद तुम्हाला का झोंबतो? वैज्ञानिक दृष्टिकोन ही स्टेट स्पॉन्सर्ड जीवनशैली आहे. तिच्या आकडेमोडीचे 'जिझिया'च्या रूपात वर्णन करणे शक्य आहेच. (उदा, विवेकवादी लोक सायन्स सेंटरे, तारांगणे यांचा पुरस्कार करतील, मंदिरांवर आयकर/करमणुक कर लावण्याची मागणी करतील. त्यात दुय्यमत्वच अध्याहृत आहे.)

घटनेवर आधारीत कायदे केले जातात आणि कायद्याने शिक्षा होते. जर घटनाच मान्य केली नाहीत तर त्यावर आधारीत कायदे देखील मोडणारच. घटना न मानणे ही केवळ एक पायरी आहे.

शिक्षा या घटनेच्या त्या त्या कलमांचा वापर करून केलेल्या कायद्याने होतात. तुम्हाला घटनाच मान्य नसल्यास त्यातील कायदे कसे मान्य करणार?

शिक्षा असेल तर ती कर्तव्ये पिक अँड चूज नसल्याचे सिद्ध होईल.

"मोअर इक्वल सन्मानाने वागवणे" हे दोन्ही बाजूंनी व्हावे असे वाटते का? का धर्माचारी असणार्‍यांची वाटेल ती निर्भत्सना करत त्यांना दुय्यम नागरीक म्हणलेले चालते? हे स्पष्ट करा. तुम्ही जे धार्मिक आहेत त्यांना सन्मानाने वागवता का? का त्यावेळेस तुमच्यात भाषेत, "स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते", म्हणून तुम्ही "हू केअर्स" म्हणत त्यांना तुच्छ लेखत वाट्टेल ते लिहीणे हा अधिकार समजता? या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.

दुय्यम नागरिकत्व ही अतिशयोक्ति वगळता हे आरोप मान्य आहेत.

सारवासारव

श्रद्धावान आणि विवेकवाद्यांमधील फरक सूक्ष्मच आहे. परंतु, श्रद्धावानांना सूक्ष्म दुय्यमत्व द्यावे हा विनोद तुम्हाला का झोंबतो? वैज्ञानिक दृष्टिकोन ही स्टेट स्पॉन्सर्ड जीवनशैली आहे. तिच्या आकडेमोडीचे 'जिझिया'च्या रूपात वर्णन करणे शक्य आहेच. (उदा, विवेकवादी लोक सायन्स सेंटरे, तारांगणे यांचा पुरस्कार करतील, मंदिरांवर आयकर/करमणुक कर लावण्याची मागणी करतील. त्यात दुय्यमत्वच अध्याहृत आहे.)


"मोअर इक्वल सन्मानाने वागवणे" हे दोन्ही बाजूंनी व्हावे असे वाटते का? का धर्माचारी असणार्‍यांची वाटेल ती निर्भत्सना करत त्यांना दुय्यम नागरीक म्हणलेले चालते? हे स्पष्ट करा. तुम्ही जे धार्मिक आहेत त्यांना सन्मानाने वागवता का? का त्यावेळेस तुमच्यात भाषेत, "स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनादर होऊन चिडचीड होते", म्हणून तुम्ही "हू केअर्स" म्हणत त्यांना तुच्छ लेखत वाट्टेल ते लिहीणे हा अधिकार समजता? या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल.

हे आरोप मान्य आहेत.

आपल्या वरील माझ्या प्रश्नाला "हो" असे प्रत्यक्ष म्हणण्याऐवजी "आरोप मानण्यात" कुठले दुय्यमत्व अध्याहृत आहे (दुय्यम नागरीकत्व, तुच्छ लेखत श्रद्धावान म्हणून त्यांच्याविरुद्ध वाट्टेल ते लिहीणे) हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उगाच परत पांघरूण घालू नका. जे मान्य केलेत ते खुल्या दिलाने पूर्ण मान्य करण्याचे धैर्य दाखवा.

थोडक्यात येथे आपण दुय्यम नागरीक म्हणायला तयार आहात, हे मान्य केलेत. त्यामुळे आपले मूळ हिटलरी विधान हे विनोद नसून गांभिर्याने केलेले विधान आहे हे आपणच मान्य केले आहेत असाच अर्थ होतो. याचाच अर्थ आपल्याला घटनाच काय, कायदेच काय, अगदी लोकशाही देखील मान्य नाही. हम करेसो कायदा आणि आम्हाला वाटेल त्यालाच सगळे अधिकार बाकीचे आमची धुणीभांडी करण्यापुरते अथवा संशोधनातील सँपल असलेले दुय्यम नागरीक असाच अर्थ स्पष्ट होत आहे. थोडक्यात तुम्हाला समाजसुधारणा करायची नसून केवळ मिळालेच तर स्वतःचे अधिकार गाजवायचे आहेत आणि वर त्याला बुद्धीवादी म्हणायचे आहे. घटना, कायदा, लोकशाही वगैरे आपल्यासाठी किस झाड की पत्ती आहेत असेच वाटते. म्हणूनच आपल्या अवैधानीक विचाराला स्क्यू म्हणत आहे...

?

हक्कांची 'सूक्ष्म' उतरंड, अतिशयोक्ति, हे शब्द का दुर्लक्षिता?

धुणीभांडी या शब्दामुळे मला आता असे वाटते आहे की डॉ. माशेलकर यांच्या एका विधानावरील मी केलेल्या टिपण्णीमुळे तुम्ही रागावलेले आहात.

व्यर्थ गोलगप्पा

मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये ह्यांत मूलभूत अधिकार श्रेष्ठ नाहीत काय? ( प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी मूलभूत अधिकारांवर चांगला प्रतिसाद टाकला आहे. ) दोघांत संघर्ष झाल्यास दोघांतून मूलभूत अधिकारच निवडायला हवे. त्या अर्थाने मूलभूत कर्तव्ये बंधनकारक नाहीतच. त्यामुळे ह्या गोलगप्पा व्यर्थ आहेत.

एक जुने स्तोत्र आठवले:

गोलगप्पा गोल है
गोल लड्डू गोल है
इसलिए हे मास्टरजी
ये धरा भी गोल है

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम

मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये ह्यांत मूलभूत अधिकार श्रेष्ठ नाहीत काय? ( प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी मूलभूत अधिकारांवर चांगला प्रतिसाद टाकला आहे. ) दोघांत संघर्ष झाल्यास दोघांतून मूलभूत अधिकारच निवडायला हवे. त्या अर्थाने मूलभूत कर्तव्ये बंधनकारक नाहीतच.

द्या टाळी! मग त्या संदर्भात सुरवात होण्याचे कारण होते: श्री. यनावालांनी लिहीले, "वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे." हे कर्तव्य म्हणजे मुलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. तर "धर्माचे (रीलीजन या अर्थाने) आचरण करणे" हे मुलभूत हक्कांमधील आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, "वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे..." हे बंधनकारक नसून "धर्माचे आचरण करणे" श्रेष्ठ आहे. मग काय? वादच मिटला! आता धार्मिकतेला विरोध करणे बंद करा, म्हणजे आपण ज्या अधिकाराला श्रेष्ठ म्हणले त्याला पाठींबा दिलात असे नक्की होईल.

तरीही समजावून सांगतो

म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, "वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे..." हे बंधनकारक नसून "धर्माचे आचरण करणे" श्रेष्ठ आहे.

तुम्ही नेहमीप्रमाणे सोयीस्कर अर्थ घेत आहात. चला तरीही समजावून सांगतो:

प्रत्येकाला हवा तो धर्म पाळण्याची मोकळीक/स्वांतंत्र्य आहे. (ह्यात राइट टु कॉनशन्सही आहे बरं का) आणि ही स्वातंत्र्ये, मग ते आचरण कितीही मूर्खपणाचे का असेना, कुणीही नाकारू शकत नाही असा अर्थ घ्यायला हवा. पण . अर्थातच ह्या स्वांतत्र्यांवरही काही बंधने आहेत. (जसे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याला बाधा पोचायला नको. हा माझ्यामते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार आहे.)

असो. धर्माच्या नावावर कुणीही नंगा नाच घालू शकत नाही. अन्यथा विहिंपच्या तुमच्या भाईबंदांनी सतीची प्रथाही कायदेशीररीत्या सुरू केली असती.

शिवाय घटनेच्या ह्या २५ व्या कलमाने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यावर व नव्या कायदे आणण्यावर कुठलीही बंधने घातलेली नाहीत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

करा करा

करा करा आता गोलगप्पा करा आणि वर इतरांना म्हणा! आता तुमचे ते प्रतिसादाखालील काव्य गूल झाले वाटते!

"दोघांत संघर्ष झाल्यास दोघांतून मूलभूत अधिकारच निवडायला हवे. त्या अर्थाने मूलभूत कर्तव्ये बंधनकारक नाहीतच. " ह्या आपल्या वाक्यात आपण सर्व काही बोलून गेला आहात!

धर्माच्या नावावर कुणीही नंगा नाच घालू शकत नाही. अन्यथा विहिंपच्या तुमच्या भाईबंदांनी सतीची प्रथाही कायदेशीररीत्या सुरू केली असती.

केली आहे का? नसल्यास जे नाही ते आहे वाटणे म्हणजे निव्वळ स्वतःला झालेला भ्रम तरी असतो अथवा इतरांना भ्रमात पाडणारी भोंदूगिरी...

दुर्दैव!त्याला संघ कळलाच नाही!

धर्माच्या नावावर कुणीही नंगा नाच घालू शकत नाही. अन्यथा विहिंपच्या तुमच्या भाईबंदांनी सतीची प्रथाही कायदेशीररीत्या सुरू केली असती.

केली आहे का? नसल्यास जे नाही ते आहे वाटणे म्हणजे निव्वळ स्वतःला झालेला भ्रम तरी असतो अथवा इतरांना भ्रमात पाडणारी भोंदूगिरी...

सतीची प्रथाही कायदेशीररीत्या सुरू केली नाही म्हणजे उपकारच केले आहेत. सतीप्रथेला भाजपाचा असलाच तर पाठिंबाच आहे. विजयाराजे शिंदे ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ भाजपा नेत्रीने रूपकुंवरच्या सती जाण्याचे समर्थनचे केले होते हेही तुम्ही विसरला आहात. ही संघिष्ट पिलावळ किती माथेफिरू आहे हे तुम्हाला माहीत नसावेच बहुधा.

ह्यांच्यात आणि तालिबान्यांत काही फरक नाही. तुमचे हे हिंदू तालिबानी सत्तेवर आले तर काहीच अशक्य नाही. असो. दुर्दैव! त्याला संघ कळलाच नाही!

तुमच्या आगामी गोलगप्पांना माझ्या शुभेच्छा. गोलफंड्यांना उत्तर देण्यासाठी रिकामटेकडे आहेतच. पण अमुचा रामराम घ्यावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तसे नाही

यनावाला यांनी 'हक्कांपेक्षा कर्तव्ये मोठी' असा दावा मुळात केलाच नव्हता. हक्कांच्या पलिकडे, उदात्त जीवनाच्या व्याख्येत घटनेने समावेश केलेल्या एका कृतीचा (=वैज्ञानिक दृष्टिकोन) त्यांनी उल्लेख केला, इतकेच. "ती कृती चूज करण्याचे प्रशंसनीय कृत्य करण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे, त्याची चोथा, इ. हेटाळणी करू नका" असा आशय आहे.

माहीत आहे.

यनावाला यांनी 'हक्कांपेक्षा कर्तव्ये मोठी' असा दावा मुळात केलाच नव्हता.

मी कधी म्हणले की यनावाला यांनी असे म्हणले म्हणून? ते तुमच्याबरोबर आलटूनपालटून प्रतिसाद देणारे म्हणाले: (काही भाग मी अधोरेखीत केला आहे)

मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये ह्यांत मूलभूत अधिकार श्रेष्ठ नाहीत काय? ( प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी मूलभूत अधिकारांवर चांगला प्रतिसाद टाकला आहे. ) दोघांत संघर्ष झाल्यास दोघांतून मूलभूत अधिकारच निवडायला हवे. त्या अर्थाने मूलभूत कर्तव्ये बंधनकारक नाहीतच. त्यामुळे ह्या गोलगप्पा व्यर्थ आहेत.

मी केवळ त्यावर इतकेच सुरवातीस म्हणले की: मग त्या* संदर्भात सुरवात होण्याचे कारण होते: श्री. यनावालांनी लिहीले, "वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे." *त्या संदर्भात म्हणजे घटनेच्या संदर्भात.

'बंधनकारक' गोलगप्पा

हं. तुमच्या 'बंधनकारक' गोलगप्पांनी तुम्ही चर्चा भरकटवली आहे. बाकी चालू द्या. टाका तिरपे प्रतिसाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

येथे

तुमच्या प्रतिसादास येथे प्रतिसाद दिला आहे.

असे कसे?

तुम्ही लिहिलेतः

आता धार्मिकतेला विरोध करणे बंद करा

यनावालांचाही धार्मिकतेला विरोधच आहे, "वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे आणि त्याचा प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे" या विधानाला विरोध करण्यासाठी तुम्ही कलम २५ चा वापर करीत आहात. म्हणजे, क च्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कापेक्षा, क चे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कर्तव्य दुय्यम आहे. ते मान्यच आहे. परंतु यनावाला, धम्मकलाडू, वसुलि आणि मी, हे चार आयडी असा युक्तिवाद करीत आहोत की क च्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कापेक्षा ख चे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचार/प्रसाराचे कर्तव्य (आणि अभिव्यक्तिस्वातंत्रही) अधिक चेरिश्ड आहे. जोवर क च्या वैयक्तिक स्पेसमध्ये ख अतिक्रमण करीत नाही, तोवर क जवळ काहीही रेमेडी नाही.

मुंह में राम बगल में छुरी

भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे.

नागरी कर्तव्ये पाळणे बंधनकारक आहे का? नक्की? हे माहीत नव्हते.

अर्थात जसे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्विकार आणि प्रसार करणे हे कर्तव्य आहे, तसेच धर्म, भाषा, प्रांत आणि इतर वैविध्यांना बंधूभाव आणि एकमेकातील सुसंवाद (harmony) यामधे गुंफून ठेवण्याचे पण

कर्तव्य सांगितले आहे.

हिंदुत्ववाद्यांना हे कर्तव्य मान्य आहे का? की फक्त वरवर काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे? मुंह में राम बगल में छुरी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हा!

मुंह में राम बगल में छुरी.

"बगलमे नथुराम" असाही पाठभेद अस्तो म्हणे ;)

मला

हिंदुत्ववाद्यांना हे कर्तव्य मान्य आहे का?

मला मान्य आहे. मी ते पाळतो. तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्ही पाळता का?

गैरलागू

धम्मकलाडू कधी स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेताना दिसले नाहीत. त्यामूळे प्रश्न तुम्हालाच लागू आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रश्न-अर्थ

धम्मकलाडू कधी स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेताना दिसले नाहीत. त्यामूळे प्रश्न तुम्हालाच लागू आहे.

मूळ मुद्यांसाठी काही राहीले नाही, म्हणून असले पोकळ प्रयत्न...आता मला बालवाडीत शिकवतो आहे असे वाटायला लागले आहे.

धम्मकलाडू यांचा प्रश्नः

हिंदुत्ववाद्यांना हे कर्तव्य मान्य आहे का? (कर्तव्य या शब्दास त्यांच्या मूळ प्रतिसादात प्रथम वापरास अधोरेखीत केले होते).

माझे उत्तरः

वाक्य १-२ मला मान्य आहे. मी ते पाळतो. याचा अर्थ, त्यांनी म्हणजे धम्मकलाडूंनी संबोधलेल्या हिंदूत्ववाद्यास, म्हणजे मला ते मान्य आहे.
(प्रश्नार्थी) वाक्य ३ : तुम्हाला मान्य आहे का आणि तुम्ही पाळता का? याचा अर्थ, तुम्हाला म्हणजे धम्मकलाडूला कर्तव्य मान्य आहे का आणि तुम्ही कर्तव्य पाळता का?

घटनेतील कर्तव्य पाळण्याची जबाबदारी काय फक्त हिंदूत्ववाद्यांचीच आहे आणि ते पाळतात का हे बघण्याची मक्तेदारी सुडोंची?

धड वाचता येत नाही, वाचले तर अर्थ लावता येत नाही. मला वाटते तुम्हाला वाचनाचा चांगलाच सराव केला पाहीजे. असे करा सुरवातीस एकदम सोपे म्हणून तुकारामाच्या गाथेपासून सुरवात करून बघा, काही जमतयं का ते.

 
^ वर