घटनेतील कर्तव्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
घटनेतील काही कर्तव्ये श्री. विकास यांनी निदर्शनाला आणून दिली आहेत.ती सर्व विवेकवादात अंतर्भूत आहेतच. धर्मवाद्यांनाच ती मान्य नाहीत.
* जगातील सर्व धर्मांनी स्त्रियांना हीन लेखले आहे. त्यांचा अनादर केला आहे.
* जगात कधीही आणि कुठेही धर्ममार्तंड पीडितांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत.त्यांनी नेहमी राजसत्तेला(मग ती जुलमी असली तरी) पाठिंबा दिला आहे.
* फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रवर्तक मुक्तविचारवंत(फ्री थिंकर्स) बुद्धिप्रामाण्यवादी होते.
*स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुभाव या तत्त्वांची पायाभरणी बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांनी केली. धर्मगुरूंचा त्याच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही.
*हिएतनाम युद्धात अमेरिकेने रासायनिक युद्धसाहित्य (केमिकल वॉरफेयर) वापरू नये यासाठी बर्टरँड रसेल आणि त्यांचे अनुयायी यांनी निदर्शने केली. तेव्हा पोप, बिशप, कार्डिनल असे सर्व झगेवाले जे रविवारी चर्च मधे दया आणि करुणा यावर प्रवचने (सर्मने) देतात ते मूग गिळून गप्प होते.

श्रद्धा आणि चिकित्सा या चर्चेतील विषयांतरावर वेगळी स्वतंत्र चर्चा होऊ शकेल असे वाटल्याने हे प्रतिसाद चर्चारूपाने येथे प्रकाशित केले आहेत. - संपादक मंडळ

Comments

जवाबदारी

घटनेतील कर्तव्य पाळण्याची जबाबदारी काय फक्त हिंदूत्ववाद्यांचीच आहे आणि ते पाळतात का हे बघण्याची मक्तेदारी सुडोंची?

जवाबदारी सर्वांची असली तरी त्याविषयी शंका तुमच्याबाबतीच येणार. हिंदुत्ववादी, इस्लामवादी, ख्रिश्चनवादी असली लेबले अभिमानाने मिरवणार्‍या प्रत्येकाकडे आम्ही संशयानेच पाहणार.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

शुभेच्छा

जो हिंदुत्ववादी नाही तो ती कर्तव्ये मानतो असे गृहीत धरा आणि मी हिंदुत्ववादी नाही.

हिंदुत्ववाद्यांनी वरील कर्तव्ये पाळताना कधी बघितलेले नाही. अनेक उदाहरणे देता येतील. अगदी श्रीकृष्ण आयोगाचे नावही काढले तरी त्यांचे पित्त खवळते. ते मग नकाशा काढतात. असो. जाऊ द्या. तुम्ही निश्चित करा. विचार करून आणि अभ्यास करून ठरवा तुम्ही नक्की कोण आहात ते. शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

जो हिंदुत्ववादी नाही तो ती कर्तव्ये मानतो असे गृहीत धरा आणि मी हिंदुत्ववादी नाही.

गृहीत धरा वगैरे श्रद्धावंत म्हणतात. तुम्ही श्रद्धावंत आहात का? नसल्यास फक्त स्पष्टपणे "मी घटनेतील कर्तव्ये" मानतो म्हणावे इतकीच अपेक्षा आहे. पण तेव्हढे नुसते टंकायला देखील जड जात आहे, यातच सर्व आले.

गोलगप्पां

इतका त्रास करून घेऊ नका. तुम्ही हिंदुत्ववादी आहात असे तुम्ही स्वतःच म्हणता ना. हिंदुत्ववादाला आणि हिंदुत्ववाद्यांना इतर धर्मीयांबद्दल, इतकेच काय खालच्या जातींबद्दल काय वाटते हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे शब्दांमध्ये (गृहीत वगैरे वगैरे) अडकू नका वा अडकवू नका.

तुम्ही बहुधा स्वतःची तरी फसवणूक करीत आहात किंवा इतरांची तरी. किंवा तुम्हालाच तुम्ही नक्की कोण आहात हे माहीत नसावे. किंबहुना हीच हिंदुत्ववाद्यांची खरी ओळख आहे.

तुम्हाला तुमची ओळख पटल्यावर तुमच्याशी बोलायचे धारिष्ट करता येईल. कदाचित वेळही काढता येईल. तोवर चालू द्या. मला असल्या गोलगप्पांत इंटरेस नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

मला असल्या गोलगप्पांत इंटरेस नाही.

अगदी योग्य बोललात. असल्या गोल गप्पांमधे मलाही रस नाही. पूर्वी लांब रुंद कंटाळ्याने मारुन टाकेल प्रतिसाद टंकून जे चालायचे ते आता शेंळीच्या लेंड्यांसारखे छोटे छोटे असंबद्ध प्रतिसाद पाडून चालू आहे.
असल्या लोकांशी काय चर्चा काय करणार.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

अरे वा!

माझे सर्व प्रतिसाद वाचता वाटतं! तसेच ते क्रिपालचे पुस्तकपण वाचलेत आणि चिकीत्सात्मक लिहीलेत तर बरे होईल. पुस्तकाची प्रत हवी असल्यास कळवा.

हाहा

माझे सर्व प्रतिसाद वाचता वाटतं!

वेड लागलंय काय? तुमचे सगळे प्रतिसाद वाचणार्‍याला आंतरजालावर काय म्हणतात माहित आहे का?

तसेच ते क्रिपालचे पुस्तकपण वाचलेत आणि चिकीत्सात्मक लिहीलेत तर बरे होईल. पुस्तकाची प्रत हवी असल्यास कळवा.

नक्की क्रिपालचेच पुस्तक ना? कॉलेज ऑफ् सोशियॉलॉजी मधे जाउन चौकशी केलीत वाटतं. ;-) क्रिपालच्या पुस्तकातील एकाही मुद्याचे निराकरण तुमच्याकडून झालेले नाही. तुम्ही काय चिकित्सा करणार? गोल गोल विधाने करुन चर्चा भरकटवणे म्हणजे चिकित्सा नव्हे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

तुम्ही वाचलेत का?

क्रिपालच्या पुस्तकातील एकाही मुद्याचे निराकरण तुमच्याकडून झालेले नाही.

संदर्भ तुम्ही दिला आहे, तुम्हालाच सांगावे लागेल.

वेड लागलंय काय?
आता हा काय प्रश्न आहे? त्याचा वाचनाशी संबंध नसून वाचण्याच्या अभावाशी आणि तरी देखील बरळण्याशी संबंध आहे. असो.

बाकी स्वतःच्या चर्चेत अवांतरे करून झाली, किमान येथे तरी इतरांवर व्यक्तीगत लिहीत बसण्याऐवजी एखादा माहीतीपूर्ण आणि चर्चेसंदर्भातील असलेला प्रतिसाद टाकावात. तसा नाही टाकलात आणि माझ्याविरुद्ध लिहीत बसलात तर प्रत्येक प्रतिसादाच्या खाली "वरील प्रतिसाद हा चर्चेशी सुसंगत नसून व्यक्तीगत आहे" इतकाच खाली प्रतिसाद पहायला मिळेल.

धन्यवाद.

तुम्ही वाचलेत का?

क्रिपालच्या पुस्तकातील एकाही मुद्याचे निराकरण तुमच्याकडून झालेले नाही.

संदर्भ तुम्ही दिला आहे, तुम्हालाच सांगावे लागेल.

वेड लागलंय काय?
आता हा काय प्रश्न आहे? त्याचा वाचनाशी संबंध नसून वाचण्याच्या अभावाशी आणि तरी देखील बरळण्याशी संबंध आहे. असो.

बाकी स्वतःच्या चर्चेत अवांतरे करून झाली, किमान येथे तरी इतरांवर व्यक्तीगत लिहीत बसण्याऐवजी एखादा माहीतीपूर्ण आणि चर्चेसंदर्भातील असलेला प्रतिसाद टाकावात. तसा नाही टाकलात आणि माझ्याविरुद्ध लिहीत बसलात तर प्रत्येक प्रतिसादाच्या खाली "वरील प्रतिसाद हा चर्चेशी सुसंगत नसून व्यक्तीगत आहे" इतकाच खाली प्रतिसाद पहायला मिळेल.

धन्यवाद.

सौ चुहे खाके...

बाकी स्वतःच्या चर्चेत अवांतरे करून झाली, किमान येथे तरी इतरांवर व्यक्तीगत लिहीत बसण्याऐवजी एखादा माहीतीपूर्ण आणि चर्चेसंदर्भातील असलेला प्रतिसाद टाकावात.

ह्याला म्हणतात सौ चुहे खाके....असो!

संदर्भ तुम्ही दिला आहे, तुम्हालाच सांगावे लागेल

.

मीच सांगतो आहे. क्रिपालचे मुद्दे खोडून काढायचा काय प्रयत्न केलात?

मूळात चर्चा ही चिकित्सा करावी की करु नये ह्यावर होती. त्यात मी ते पुस्तक वाचले आहे की नाही? हा इररिलेवंट प्रश्न तुम्ही अव्याहतपणे मला विचारायचे कारण कळले नाही. चित्रा ह्यांना त्याबाबत मी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ते वाचून पाहा. पुन्हा पुन्हा तेच टंकायला माझ्याकडे तुमच्या सारखा वेळ नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

[संपादित]

अजून उत्तर नाही!

माझी जातीधर्माबद्दलची मते येथे अनेकदा आली आहेत. त्यात कुठे काही गैर आढळले असल्यास दाखवून द्या. ही चर्चा एकंदतरीत हिंदूत्ववादावर नाही. तशी चालू करायची असल्यास चालू करा उत्तरे देईन. मात्र भारतीय घटना ही प्रत्येक भारतीयास समान आहे. मग तो हिंदूत्ववादी असोत अथवा कम्युनिस्ट अथवा नुसताच गोंधळलेला...

तुम्हाला तुमची ओळख पटल्यावर तुमच्याशी बोलायचे धारिष्ट करता येईल.

मला माझीच काय तुमची आणि तुमच्यासारख्या इतरांची चांगली ओळख आहे. तुमच्यात खरे बोलायचे धारिष्ट नाही ही तुमची मर्यादा जाणून आहे. म्हणूनच तर "भारतीय घटनेतील कर्तव्याबद्दल स्वतः मान्य करता का", या कुठल्याही भारतीय नागरीकास विचारता येणार्‍या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येत नाही आहे.

गोलफंड्यांशी काय बोलायचे

घटनेने तुम्ही म्हणता जशी non-justiciable कर्तव्ये सांगितली अहेत तसेच प्रत्येकाचे हक्क/स्वातंत्र्य पण सांगितले आहे. ज्यामधे freedom of religion येते, ज्यावर आधारीत कायदे आहेत आणि ते सर्वांवर बंधनकारक आहेत. थोडक्यात घटनेतील हक्क, स्वातंत्र्य आणि जबाबदार्‍या या एकत्रीतपणे बघायला लागतात. जर अभिव्यक्तीस्वातंतत्र्याचा उपभोग घेयचा असेल, तर इतरांना त्यांच्या श्रद्धेचे अर्थात धर्माचे स्वातंत्र्य देणे पण बंधनकारक आहे हे मान्य करावे लागेल. जर धर्माचे स्वातंत्र्य मान्य केलेत तर ते वैविध्य असताना टिकवण्यासाठी हर्मनी, ब्रदरहूड वगैरे कर्तव्ये पाळणे पण आवश्यक ठरते. पण आता तुम्हाला घटनाच मान्य नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. एक तर घटना बदलायला संसदेत जा अथवा घटना मोडायला अतिरेकी व्हा.
ठीक.

भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये ही सगळीच पाळण्याचे बंधन आहे.

पुन्हा एकदा विचारतो की भारतीय घटनेने सांगितलेली नागरी कर्तव्ये पाळणे बंधनकारक आहे का? [ह्याबाबत तुम्हाला रिकामटेकडा ह्यांनी योग्य मार्गदर्शनही (पिक आणि चूज़ आठवा) केले आहे.] पण तुमचे बेसिक फंडेच गोल आहेत तेव्हा तुमच्याशी ह्याबाबतीत बोलायचे? गोल गप्पा आणि वर गोल फंडे.

फक्त तुमच्या समाधानासाठी: मी आधीच एका प्रतिसादात नमूद केलेले आहे की मी हिंदुत्ववादी नसल्याने मी भारतीय घटनेतील कर्तव्ये पाळतो हे स्पष्टच आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

होय

ह्याबाबत तुम्हाला रिकामटेकडा ह्यांनी योग्य मार्गदर्शनही (पिक आणि चूज़ आठवा) केले आहे.

हा संवाद रिकामटेकडा यांच्याबरोबर चालू होता/आहे. त्यांना उत्तर दिले आहे. अवश्य वाचावे.

...मी भारतीय घटनेतील कर्तव्ये पाळतो हे स्पष्टच आहे.

धन्यवाद! किती सोपे होते बघा म्हणणे. उगाच आपले वेळ लावायचा ते! बाकी माझ्या समाधानाची काळजी घेतलीत म्हणून परत एकदा धन्यवाद!

कारण?

पण मूळात त्यांना हे विचारायचे कारणच काय ते अजून सांगीतले नाहीत. (त्यांनी मला विचारले म्हणून मी त्यांनाही विचारतो हा काही युक्तिवाद नाही. तुम्हाला विचारण्यामागे ठोस कारण होते धम्मकलाडूंचे तसे नाही.)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

कर्तव्ये

घटनेतील कर्तव्ये हा एक विनोद आहे.
मुळात ही कर्तव्ये आणीबाणीच्या वेळेस तत्कालीन सरकारने आणली. तोपर्यंत अशा गोष्टीस घटनेत वाव नव्हता. घटना शब्दबंबाळ करणे, आधी कर्तव्ये करा मग हक्क मागा असा (चुकीचा)
धोशा लावणे या व्यतिरिक्त या कलमांना फारसा अर्थ नाही. ही कर्तव्ये ना कुठले सरकार अमलात आणू शकते ना ती बंधनकारक आहेत. (आणि असे झाले तर लोकशाही संपून गेली असेल.)

घटना ही कशासाठी असते याचा नीट विचार केला तर ती राज्यसत्तेला बंधित करण्यासाठी असते. अनिर्बंध राज्यसत्ता (जी एकेकाळी राजांची असायची) नियमबद्ध करणे हे घटनेचे मुख्य उद्दीष्ट मानले पाहिजे. ही नियमबद्धता दोन कारणांसाठी; एक म्हणजे कुठल्याही नागरिकाच्या जान,माल,व्यवसाय आणि स्वातंत्र्यावर राज्यसत्तेने घाला घालता कामा नये आणि दुसरे म्हणजे सरकारचे काम सर्वसमावेशकतेने आणि न जमल्यास बहुमताने चालावे.

असे म्हटले जाते की हक्क हे घटनादत्त आहेत. (आपल्या घटनेत तसे असल्यासारखे भासते खरे.) खरे म्हणजे हक्क हे घटनेपूर्वीचेच लोकांचे आहेत. लोक एकत्र येऊन जेव्हा घटनेची निर्मीती करतात तेव्हा त्यांच्यापाशी ते असतातच. अमेरिकन घटनेतले वाक्य 'राज्यसत्ता हक्कांना डावलून कायदे करू शकत नाहीत' अशा पद्धतीचे आहे. (यातून असे ध्वनित होते की हक्कांचे बंधन राज्यसत्तेने पाळायचे आहे.)

प्रमोद

अंशत: सहमत

मुळात ही कर्तव्ये आणीबाणीच्या वेळेस तत्कालीन सरकारने आणली. तोपर्यंत अशा गोष्टीस घटनेत वाव नव्हता.

ही कर्तव्ये आणि जवळपास सात घटना दुरुस्त्या (त्यात अनेक उपदुरूस्त्या) आणीबाणीत आणली गेली हे खरे आहे. मात्र आजतागायत ती भारताची घटना आहे. अर्थात आणीबाणीनंतरही ३३-३४ वर्षे, ज्या काळात, काँग्रेस आणि कॉग्रेसेतर विविध विचारसरणींची सरकारे येऊन गेली, त्यात कम्युनिस्टांचा दबाव असलेले सरकारही येऊन गेले तरी देखील राहीलेले आहे. अर्थात जो पर्यंत बदलत नाही तो पर्यंत, पटो अथवा न पटो, हा घटनेचा अविभाज्य भाग आहे.

घटना शब्दबंबाळ करणे, आधी कर्तव्ये करा मग हक्क मागा असा (चुकीचा) धोशा लावणे या व्यतिरिक्त या कलमांना फारसा अर्थ नाही.

घटना शब्दबंबाळ करणे बरोबर का चूक हा अजून वेगळा मुद्दा वाटतो. तशी असते हे वास्तव नक्कीच मान्य आहे. मात्र घटनेत (अगदी आणीबाणीच्या वेळीस घुसडलेल्या गोष्टी लक्षात ठेवूनही), "आधी कर्तव्ये करा आणि मग हक्क मागा" असे सांगितले गेले असे वाटत नाही. आजही, माझ्या अंदाजाप्रमाणे एखाद्याने (येथील चर्चेसंदर्भात्) विवेकवादाचे कर्तव्य केले पण ते करत असताना, धर्म पाळण्याचे हक्क कुणाचे डावलले, तर त्याला हक्क हिरावून घेतले म्हणून शिक्षाच होईल. कारण घटनेतील त्या हक्क/जबाबदार्‍यांच्या पायावरच कायदे बनवले गेले आहेत.

असे म्हटले जाते की हक्क हे घटनादत्त आहेत. (आपल्या घटनेत तसे असल्यासारखे भासते खरे.) खरे म्हणजे हक्क हे घटनेपूर्वीचेच लोकांचे आहेत.
हक्क हे घटनेपूर्वींचेच लोकांचे आहेत हे कधी खरे ठरू शकेल तर जेंव्हा लोकशाही असेल तेंव्हा. आणि तेंव्हाच सगळ्यांना समान मूलभूत हक्क मिळू शकतात. सोव्हीएट रशियात असे हक्क होते का? चीन मधे आजही असे हक्क आहेत का? तेच धर्माधारीत राष्ट्रांसंदर्भात. थोडक्यात आपण व्यक्तीस्वातंत्र्य टेकन फॉर ग्रँटेड घेतो असे वाटते. म्हणूनच घटनेतील कर्तव्ये विनोद म्हणून बघू नये असे वाटते. एखाद्याला त्यातील काही पटेल तर काही नाही, पण जो पर्यंत देशाचे नागरीकत्व पाळत आहात तो पर्यंत राज्यघटना संपूर्ण मानणे हे बंधनकारकच असते.

अमेरिकन घटनेतले वाक्य 'राज्यसत्ता हक्कांना डावलून कायदे करू शकत नाहीत' अशा पद्धतीचे आहे. (यातून असे ध्वनित होते की हक्कांचे बंधन राज्यसत्तेने पाळायचे आहे.)
कुठल्याही लोकशाही राज्यात घटनेने सर्वच समान बांधलेले असतात. राज्यकर्ते/शासक आणि जनता. आपल्याकडील कायदे देखील घटनेवर आधारीतच असतात. नाहीतर दोनच पर्याय असतातः (१) घटना दुरूस्ती (२) सर्वोच्च न्यायालयात जाणे आणि तेथे जे काही निर्णय होईल तो केस लॉ समजणे....

घटना वा नागरिक

कर्तव्ये ही घटनेचा भाग आहेत (अविभाज्य म्हणजे नेमके काय?) याबद्दल सहमत. मात्र घटनेतील इतर अनेक कलमांप्रमाणे त्यांचा काही उपयोग नाही. आणि हे योग्यच आहे.
'आधी कर्तव्ये करा आणि मग हक्क मागा' या पद्धतीची मांडणी मी खूपदा अगदी शिक्षणाचा भाग असल्यासारखी ऐकली आहे. आणीबाणी सारख्या सरकारांनी याचा नक्कीच वापर केला असता.

एवढेच नाही तर कर्तव्ये ही नागरिकांना काही करायला सांगतात म्हणून ती लोकशाही विरोधी आहेत.

विवेकवादाचे कर्तव्य केले पण ते करत असताना, धर्म पाळण्याचे हक्क कुणाचे डावलले, तर त्याला हक्क हिरावून घेतले म्हणून शिक्षाच होईल. कारण घटनेतील त्या हक्क/जबाबदार्‍यांच्या पायावरच कायदे बनवले गेले आहेत.

धर्म पाळण्याचे हक्क हे मूलभूत नाहीत. कित्येक धार्मिक कृत्यांना कायद्याने मुरड घातली आहे. भारतात्तील ती यादी फार मोठी आहे. (अस्पृश्यता संपवणे, मंदिर प्रवेश, सार्वजनिक ठिकाणी हत्या करणे, बळी देणे, लग्नाच्या वयाचे कायदे). सरकारी ठिकाणी देवीदेवतांचे फोटो ठेवणे, सत्यनारायणाची पूजा ठेवणे, मंदिरे करणे या गोष्टी चालतात त्या कायद्याला धरून नाही. शिखांनी शस्त्र बाळगणे, मुसलमानांची ४ लग्ने, बुरखा घालणे याविरुद्ध कायदे कित्येक देशात आहेत. धर्म पाळण्याचा हक्क हा 'व्यक्तिस्वातंत्र्यात' (दुसर्‍यास त्रास न होता हवे तसे वागयचा हक्क) मधे समाविष्ट आहे. आपल्याकडे तो वेगळा लिहिला आहे हे खरे.

वरील विधानात विवेकवादाचे कुठलेतरी कर्तव्य दिले आहे की ज्याने धर्म पाळण्याचे हक्क डावलले जातात. हे कुठले कर्तव्य आणि कुठले हक्क याबद्दल उदाहरण मिळाले तर समजण्याला मदत होईल.

थोडक्यात आपण व्यक्तीस्वातंत्र्य टेकन फॉर ग्रँटेड घेतो असे वाटते. म्हणूनच घटनेतील कर्तव्ये विनोद म्हणून बघू नये असे वाटते. एखाद्याला त्यातील काही पटेल तर काही नाही, पण जो पर्यंत देशाचे नागरीकत्व पाळत आहात तो पर्यंत राज्यघटना संपूर्ण मानणे हे बंधनकारकच असते.

मुळात घटना ही राज्यकर्त्यांना बंधनकारक असते. त्यासाठीच ती लोकांनी केलेली असते. जोपर्यंत मी राज्यकर्ता नाही आणि लोक आहे तोपर्यंत घटनेतील कुठलेही कलम मला बंधनात अडकवत नाही. (कुठलेही कलम दाखवा की जे लोकांना बंधनकारक आहे.) याउलट घटनेचा फायदा घेऊन मी राज्यकर्त्यांना अडकवू शकतो. त्यामुळे राज्यघटनेचा फायदा मी घ्यायलाच पाहिजे. (पण बंधन नाही.)

कर्तव्ये हा घटनेतील एकमेव भाग आहे की ज्यात लोकांनी कसे वागावे यावर बंधने टाकली आहेत. राज्यघटनेत असे असणथे मुलतः नागरिकांच्या घटना करण्याच्या हक्कांविरुद्ध आहे आणि लोकशाही विरोधी आहे. आता ही कलमे कुठल्याही प्रकारे बंधन आणू शकत नाहीत ही त्यावरची मखलाशी मलातरी विनोदी वाटते.

राज्यघटना मी केलेली (लोकांचा भाग म्हणून) असल्याने ती मानणे न मानणे मला बंधनकारक असूच शकत नाही. मी राज्यकर्ता झालो तर मी न मानूनही मला तिचे पालन करावे लागेल ही गोष्ट वेगळी.

प्रमोद

लोकशाही

एवढेच नाही तर कर्तव्ये ही नागरिकांना काही करायला सांगतात म्हणून ती लोकशाही विरोधी आहेत.

लोकशाही म्हणजे "लोकांनी चालवलेले, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य" ही व्याख्या एकदा का मान्य केली की नागरीक आणि राज्यकर्ते या दोन्हींचा वाटा कर्तव्यात आणि हक्कात धरायला हवा, जरी त्यातील कुणाचा किती हिस्सा यात फरक असला तरी.

धर्म पाळण्याचे हक्क हे मूलभूत नाहीत.

असहमत. घटनेतील खालील वाक्य वाचावेतः

Fundamental Rights.—Arts. 25 (1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion.

कित्येक धार्मिक कृत्यांना कायद्याने मुरड घातली आहे. भारतात्तील ती यादी फार मोठी आहे...

सहमत. मात्र ते धर्मापेक्षा धार्मिक कृतींसदर्भात आहे असे वाटते. शिवाय आपण म्हणलेल्या संदर्भातील घटनेचे धार्मिक विधी/कृती/आचार जे काही असेल ते बदलण्याचे हक्क देखील घटनेच्या २५ व्या कलमातच घालून ठेवले आहे. त्या व्यतिरीक्त वरील वाक्यात म्हणल्याप्रमाणे, public order, morality and health या गोष्टींसंदर्भात कायद्याचा हस्तक्षेप करण्याची मुभा ठेवण्यात आली आहेच, पण म्हणून धर्म पाळण्याचे हक्क हे मुलभूत नाहीत असे नाही.

मुळात घटना ही राज्यकर्त्यांना बंधनकारक असते. त्यासाठीच ती लोकांनी केलेली असते. जोपर्यंत मी राज्यकर्ता नाही आणि लोक आहे तोपर्यंत घटनेतील कुठलेही कलम मला बंधनात अडकवत नाही. (कुठलेही कलम दाखवा की जे लोकांना बंधनकारक आहे.) याउलट घटनेचा फायदा घेऊन मी राज्यकर्त्यांना अडकवू शकतो. त्यामुळे राज्यघटनेचा फायदा मी घ्यायलाच पाहिजे. (पण बंधन नाही.)

येथे देखील पूर्ण सहमत नाही. राज्यकर्त्यांना घटना कायदा तयार करताना आणि आमलात आणताना बंधनकारक असते असे म्हणता येईल. जर कायद्यातील कलमे/भाषा/परीणाम वगैरे सर्वच जो पर्यंत घटनेच्या चौकटीत असेल तो पर्यंत उत्तम. जर नसेल तर त्या कायद्याविरुद्ध आणि पर्यायाने राज्यकर्त्यांविरुद्ध त्या संदर्भात खटला दाखल करून कायदा रद्द करण्याची मागणी करता येऊ शकते. त्यावर विचार होईपर्यंत त्यावर स्थगिती देखील आणता येऊ शकते. मात्र त्याशिवाय विशेष करून राज्यकर्त्यांना (कर्मचार्‍यांना नाही), संसदेमुळे (तेच राज्यपातळीवर) जास्तच संरक्षण असते, जे आपल्याला नसते. मात्र एकदा का घटनेच्या चौकटीत कायदा तयार झाला की तो जास्त करून तुम्हा-आम्हालाच अडकवतो.

...राज्यघटनेत असे असणथे मुलतः नागरिकांच्या घटना करण्याच्या हक्कांविरुद्ध आहे आणि लोकशाही विरोधी आहे.

घटना करण्याच्या हक्कांविरोधी आणि लोकशाहीच्या विरोधी कसे ते देखील समजले नाही. मात्र माझ्या लेखी जबाबदारीवीना हक्क आणि अर्थातच हक्कांविना जबाबदार्‍या या दोन्हीला लोकशाहीत अर्थ नाही. उदाहरणांदाखल (घटनेत आहे का नाही हा विषय नाही): प्रत्येक सज्ञान नागरीकाचा मतदान करण्याचा जसा हक्क असतो तसेच जबाबदारीपण असते. हक्क सहजपणे दिला गेला पण जबाबदारीविषयी न बोलल्याने निवडणूका ह्या केवळ मॅनिप्युलेशनचा खेळ झाला. आता जबाबदारी कशी बंधनकारक करावी हा वेगळा मुद्दा होऊ शकतो.मोठ्या चर्चेचा आणि डिटेल्सचा... त्यात देखील मतदानाला जाऊन कुणीच लायकीचे नाही असे मत देण्याचे स्वातंत्र्य पण देता येईल... पण मतदान करणे बंधनकारक नसावेच हे पटत नाही.

राज्यघटना मी केलेली (लोकांचा भाग म्हणून) असल्याने ती मानणे न मानणे मला बंधनकारक असूच शकत नाही.
राज्यघटना जर मान्य करायची नसेल तर तीवर आधारीत कायदे देखील बंधनकारक असूच शकत नाहीत असे म्हणणार का?

कायदे बंधनकारक

घटनेत 'फंडामेंटल' असा शब्द वापरला आहे (धर्माबाबतीत) त्या अर्थी तुमचे म्हणणे बरोबर आहे. मात्र येथे धर्म शब्दा ऐवजी कुठलेही नाव चालले असते. (कारण मुरड घालणे त्यातच अंतर्भूत आहे.) फक्त धर्म शब्दाने लोकांना आश्वस्त केले आहे एवढेच. या ऐवजी मला कसलेही आचार, विचार आणि प्रचारस्वातंत्र्य आहे असे म्हटले असते तर त्यात धर्म आपोआप आला असता. या अर्थाने मी धर्माचे स्वातंत्र्य मूलभूत मानत नाही.

राज्य हे मुळात जाचक असते. राज्यकर्ते लोकांवर राज्य करतात याचा अर्थ ते लोकांना विविध बंधनात टाकतात. ती बंधने कायद्याची असतात. कर चुकवण्याची असतात.
लोक ही बंधने स्वीकारतात याचे कारण त्याबदल्यात त्यांचे आयुष्य जास्त आश्वस्त आणि सुखावह होते.

ज्यावेळी राज्यकर्ते हे लोकशाहीतून आले नव्हते त्यावेळी राज्य करणार्‍याला मर्यादा नव्हत्या. तरी देखील कित्येकदा अशी राज्यव्यवस्था सुखावह होती (अव्यवस्थेपेक्षा). मात्र अमर्यादतेमुळे ती कधीही जुलमी होण्याची शक्यता नेहमीच असायची. पहिल्यांदा घटना (राज्यपद्धती) आणि नंतर लोकशाही (राज्यकर्ता निवडीचे स्वातंत्र्य) आणून लोकांनी राज्यकर्त्यांवर बंधने आणली.

हा प्रवास लक्षात आला तर तुम्हाला माझे म्हणणे समजेल. घटनेनुसारचे कायदे (जे घटनेपूर्वीही असत) हे नागरिकांना बंधनकारक असणे स्वाभाविक आहे. पण म्हणून घटना नागरिकांवर बंधने टाकते हे म्हणणे चुकीचे ठरते.

घटना करण्याच्या हक्कांविरोधी आणि लोकशाहीच्या विरोधी कसे ते देखील समजले नाही. मात्र माझ्या लेखी जबाबदारीवीना हक्क आणि अर्थातच हक्कांविना जबाबदार्‍या या दोन्हीला लोकशाहीत अर्थ नाही. उदाहरणांदाखल (घटनेत आहे का नाही हा विषय नाही): प्रत्येक सज्ञान नागरीकाचा मतदान करण्याचा जसा हक्क असतो तसेच जबाबदारीपण असते. हक्क सहजपणे दिला गेला पण जबाबदारीविषयी न बोलल्याने निवडणूका ह्या केवळ मॅनिप्युलेशनचा खेळ झाला. आता जबाबदारी कशी बंधनकारक करावी हा वेगळा मुद्दा होऊ शकतो.मोठ्या चर्चेचा आणि डिटेल्सचा... त्यात देखील मतदानाला जाऊन कुणीच लायकीचे नाही असे मत देण्याचे स्वातंत्र्य पण देता येईल... पण मतदान करणे बंधनकारक नसावेच हे पटत नाही.

तुम्हाला कर्तव्ये आणि जबाबदार्‍या मान्य आहेत त्याशिवाय हक्क नाहीत वा त्यांना अर्थ नाही असे मानू का?
असे असल्यास पूर्णतः असहमत.

बाकी पुनरावृत्ती होत असण्याची शक्यता असल्याने अधिक लिहिणे श्रेयस्कर समजत नाही.

प्रमोद

धर्म

चर्चा प्रस्तावकांच्या बर्‍याचशा मुद्यांना माझी असहमती आहे.

मुळात धर्मवादी हे उजवे (भांडवलशाही) अशी मार्क्सवादाची मांडणी मला अमान्य आहे. कित्येक धार्मिक पुढार्‍यांनी गरीबांची बाजू घेतली असावी असे वाटते. मोझेस (ज्यु स्वतंत्रतावाद), येशु (अनेक वचने सांगता येतील), मोहमद (गरीबांना संपत्तीचे वाटप करणे), कृष्ण (गोपालांची बाजू) इतकेच नाहीतर संत मंडळी (तुकाराम) या सर्वांना पीडीतांचे पुढारीपण म्हणता येईल. निधार्मिक लोक भांडवलशाही वृतीचे आणि राज्यसत्तेला पाठिंबा देणारे असू शकतात. (उदाहरणे पटकन आठवत नाहीत.)

धर्माने स्त्रियांना कसे लेखले आहे यावरही वाद होऊ शकतो. उदाहरणार्थ मोहमदाने केलेली लग्नकराराची योजना ही काळानुसार प्रागतिक ठरवता येऊ शकते.

निधार्मिकांनी केलेले काम मोठे आहे (फ्रेंच क्रांती). पण धार्मिकांचे कार्य देखील कमी नसावे. (गांधी, मार्टिन ल्युथर किंग). व्यवस्थेच्या बाजूने वा विरुद्ध उभे राहणार्‍यात लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर सहभागा सारखाच मिळेल.

निधार्मिकांनी केलेले रक्तपात कमी नाहीत. ( रशियन क्रांती, चिनी क्रांती, हल्लीचा नक्षलवाद, ) हल्ली धार्मिकांनी केलेल्या रक्तपातात दहशतवाद, खोमेनी इत्यादी नावे घेता येतील.

काही मुद्यांबरोबर मात्र सहमती आहे. (फ्रेंच राज्यक्रांती आणि त्यातील तत्वे, रसेल).

प्रमोद

+१

वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत.

शेवटी धार्मिक, निधर्मिय, इत्यादी जे काही असेल ते शेवटी मानवी स्वभावाशी निगडीत असले तरी स्वतः अमानवी असते. मात्र त्यांच्या त्या त्या (खर्‍या असल्यातरी) मुखवट्या/चेहर्‍या मागे असलेली वास्तव मानवी वृत्ती-प्रवृत्ती कशी आहे, यावर त्या त्या व्यक्ती आणि त्यांचे समर्थक हे सत्ता आणि/अथवा त्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव कसा करतात हे ठरते.

धर्म आणि विज्ञान

धर्म आणि विज्ञान हे एकमेकाच्या मार्गातील काटे आहेत.

नास्तिक विचारसरणीच्या प्रभावाखाली कुणी हिंसाचार केला असे कधीच दिसून येत नाही. पण धर्माच्या प्रभावाखाली मात्र रक्तपातच नव्हे तर समस्त मानवजातीची प्रगती खुंटवण्याची कृत्ये केली गेली आहेत (कोपर्निकस, गॅलेलीओ ते उत्क्रांती वाद). निधर्मकांनी केलेले रक्तपात हे त्यांच्यात मूलतः असलेल्या पशूमूळे केलेले आहेत. ह्या कृत्यांचा ते निधर्मी असण्याशी संबंध नाही. धार्मिक विचारसरणीच्या लोकांनी केलेल्या हिंसाचाराविषयी मात्र असे म्हणता येणार नाही.

स्टॅलीनने केलेल्या कृष्णकृत्यांचा संबंध तो नास्तिक असण्याशी लावणे म्हणजे तसाच संबंध त्याने मिशी ठेवण्याशी लावण्यासारखे आहे. नास्तिकवाद पसरवण्यासाठी स्टालिनने हत्या केलेल्या नाहीत. धर्माच्या बाबतीत असे म्हणता येइल का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

थोडाफार सहमत

धर्म आणि विज्ञान हे एकमेकाच्या मार्गातील काटे आहेत.

बरेचदा असे होते खरे. विज्ञान आपल्या सोयीने वापरणारे धार्मिक कमी नाहीत. सापेक्षतावाद, क्वांटम यांचा फुलासारखा (काट्यासारखा नाही.) वापर करणारे धार्मिक प्रवृत्तीचे लोक सापडतात. विज्ञानाच्या मार्गात धर्म हा काटा कधीतरी असतो. त्यामुळे अंशतः सहमत.

नास्तिक विचारसरणीच्या प्रभावाखाली कुणी हिंसाचार केला असे कधीच दिसून येत नाही.

अंशतः सहमत. नास्तिक विचारसरणीचे राज्यकर्ते कम्युनिस्ट अणि द्रमुक सोडल्यास आठवणीतले नाही यामुळे असेल.

प्रमोद

विज्ञान आपल्या सोयीने वापरणारे

विज्ञान आपल्या सोयीने वापरणारे धार्मिक कमी नाहीत. सापेक्षतावाद, क्वांटम यांचा फुलासारखा (काट्यासारखा नाही.) वापर करणारे धार्मिक प्रवृत्तीचे लोक सापडतात.

अगदी. दीपक चोप्रा सारखे ढोंगी लोक त्याच कॅटेगीरीतले. कॅलटेक मधे चाललेल्या वादविवादात एका क्वांटम फिजिसीस्टने विकेट काढल्यावर त्याची अवस्था इथे बहुप्रतिसाद देणार्‍या सदस्यासारखी झाली होती.

नास्तिक विचारसरणीचे राज्यकर्ते कम्युनिस्ट अणि द्रमुक सोडल्यास आठवणीतले नाही यामुळे असेल.

नास्तिक विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी हिंसाचार केल्याची उदाहरणे असली तरी त्यांचा हिंसाचार हा नास्तिकवाद पसरवण्यासाठी नव्हता हे नक्की.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

प्रतिसाद माहितीपूर्ण

प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

घटना आणि घटनेतील कर्तव्ये एकदा स्वीकारल्यावर ती इतर कोणी मान्य-अमान्य करण्याचा प्रश्न राहात नाही.

बाकी, चालू द्या...!

[शीर्षकासह प्रतिसाद संपादित.]

-दिलीप बिरुटे

 
^ वर