मी येडा हाय का ? मग मला लाथा घाला ! भाग १/२

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
प्रेषक: गांधीवादी मंगळ, 24/08/2010 - 19:25

* संस्कृती
* धर्म
* इतिहास
* समाज
* तंत्र
* भूगोल
* विज्ञान
* राजकारण
* विचार

मी देशी घेत नाही.
काल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, हेच चालले होते, मग कंटाळून गच्चीवर गेलो, तर मला खालील शोध लागले, मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, मग मी निमुटपणे खाली आलो, आणि झोपलो. आणि सकाळी उठून हे टंकत आहे. तरी सुद्धा आपण सगळे शोध नीट वाचावेत हि विनंती,

तर मला काही शोध लागले आहेत, ते मी इथे देत आहे, ते विचार करून आपणा मला एखादे मोबेल पारितोषिक वगेरे द्यावे नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात, माझा पत्ता मी देईनच, पण अगोदर माझे शोध वाचा, मी आपल्या सगळ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण करणार आहेच, पण ते पुढच्या लेखात, ह्या लेखात फक्त माझे शोध.
१) पृथ्वी सपाट आहे.,
मी मागे एकदा आपल्या पुण्याच्या नेहरू खेळाच मैदान बघायला गेलो होतो, काय मस्त गुळगुळीत मैदान आहे ते, बघून मला एक शोध लागला होता, तेव्हा कोणाला सांगितला नाही, काल सांगितला आणि मार खाल्ला.
२) सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे आहेत, (म्हणजे त्यांचा व्यास सारखा आहे )
नाही नाही माफ करा , चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा निम्मा आहे. हा एकदम बरोबर.
नक्की लक्षात येत नाहीये, पण असंच काहीतरी.
३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे (सुप्त आहे , तो कोणाला दिसणार नाही), तेथे खूप जड मुलद्रव्य सापडतात, त्यामुळे मला असे वाटते कि शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.
३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, त्या चंद्राच्या आणि माझ्या मधून एक जर रेषा काढली तर ती कदाचित लंडन ला छेदून जाईल. असा मी एक निष्कर्ष काढला (मी कधी लंडन गेलो नाही कि चंद्रावर जाण्याची लायकी नाही. खरतर लंडन ला देखील जाण्याची लायकी नाहीये, जाऊ द्या सोडा. माझे रडगाणे काय चालूच राहील. )
४) दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.
५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.

तर मग कसे काय वाटले माझे शोध ?

ह्या सगळ्यांची थेअरी मांडताच आहे एक दोन दिवसांत. मात्र मला दाट शंका आहे कि काही जणांनी माझा शोध निबंध अगोदरच ढापला आहे, पण हरकत नाही, मोबेल पारितोषिक मलाच मिळेल ह्याची मला खात्री आहे. आपण सगळे पांढरपेशी, काळपेशी, आहेरे, नाहीरे गटातले A to Z माझ्या बरोबर जे आहात.

चला तो पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

सुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)

Comments

ग्लोबल वार्मिंग

---मी येडा हाय का ? मग मला लाथा घाला ----

असं म्हणू नये. (उन्हात फिरल्याचे असे दुष्परीणाम दिसतात पण चंद्रप्रकाशाततही असे होऊ लागले आहे...म्हणजे खरोखरच ग्लोबल वार्मिंग जोरात सुरु आहे)

म्हंजे

म्हंजे काय?

--

वाघाचे पंजे

म्हंजे काय?

नाकात दोन पाय.

दोन पाय

दोन पाय = ६.२८

चिमटा

---नाकात दोन पाय.---

त्यापेक्षा कपडे वाळत घालण्याचा चिमटा नाकपुडीला लावा.

दोन आणि पाय

'दोन' ही एकच अशी नैसर्गिक पूर्ण संख्या आहे की जिची स्वत:शी बेरीज, स्वतःशी गुणाकार आणि स्वत:चा स्वतःइतकाच घात एकच आहे. (४.)
'पाय' ही एक अशी अविचारी, अपूर्ण संख्या आहे की जिच्या अपूर्णांकात एकच संख्याक्रम कधीच पुनरावर्त होत नाही आणि तो संपतदेखील नाही.

त्यामुळे 'नाकात दोन पाय' या वाक्प्रचाराला काही गूढ, सखोल अर्थ असावा असा शोध मला लागलेला आहे. तो अर्थ काय हे शोधत आहे.
या विचाराचा कॉपीराईट इतरांनी कुणीतरी घेतला असण्याची दाट शक्यता आहे.
यात नक्कीच काहीतरी कट कारस्थान आहे असेही मला वाटते. :);)

लोहा लोहे को

लोहा लोहे को काटता हय क्या?
अर्थात यदृच्छ लेखाला यदृच्छ प्रतिसाद...

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करुन पाण्याची उच्चदाबा वर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. अश्या प्रकारे वीजनिर्मिती करता येते. औष्णिक वीजनिर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्व थर्मोडायनामिक्समधील रँन्काईन चे चक्र (Rankine cycle) आहे. या चक्रानुसार वाफ उच्च दाबावरुन कमी दाबावर आणल्यास वाफेतील उर्जेचे परिवर्तन उपयुक्त कार्यात होते. इथे वाफेचा उपयोग जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. कमी दाबावरची वाफ उष्ण असली तरी तीची उर्जा कमी झालेली असते. ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावयाची झाल्यास तिला पहिले थंड करुन त्याचे पाणी करावे लागते व ह्या पाण्याला पुन्हा उष्णता देउन उच्च दाबाची करावी लागते. हे रॅन्काईनच्या चक्राचे तत्व आहे. रँकाईन च्या चक्रावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता साधारणपणे ३० ते ५० टक्यांपर्यंत असते. म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेल्या झालेली उर्जा इंधन जाळून तयार होणार्‍या उर्जेच्या ३० ते ५० टक्के असते. ही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनिक विज्ञानाला असलेले चँले़ज आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

माहिती हवी आहे

ओघवत्या मराठीमध्ये कार्नॉट चक्र आणि रॅन्काईन चक्र यांच्यातील फरक कोणी विषद करून सांगेल काय?
प्रस्तुत धाग्याची अव्यवस्था (एन्ट्रॉपी) किती असेल?

ही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनिक विज्ञानाला असलेले चँले़ज आहे.

विज्ञानाच्या मर्यादा या विषयावर कोणी जाणकार भाष्य करतील काय?

लोह आणि औष्णिक उर्जा यांच्या मदतीने चीन सुपरपॉवर होते आहे म्हणे.

बाष्कळ चर्चा करण्याऐवजी लेह येथील आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक होणे चांगले काय? उपक्रमच्या प्रतिसादलेखकांना 'मोठे कधी होणार?' असा प्रश्न विचारावा काय?

लेख

आपल्याला सोसेल् तेवढीच घ्यावी. आणि घेतल्यावर लेख अजिबात लिहू नये.
चन्द्रशेखर

सुद्न्य वाचक!

सुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)

अरे वा! चंद्रशेखर यांनी(च) वास लगेच ओळखला.

वास आणि सुवास

वास न घेणार्‍याना येतात व सुवास घेणार्‍यांना
चन्द्रशेखर

हा धागा

हा धागा अजून (का?) आहे याचे आश्चर्य वाटले.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

बरेचसे निष्कर्ष ठीक वाटतात

१. ठीक
२. ? असेल ठीक (बहुधा "सूर्यबिंब" आणि "चंद्रबिंब" असे म्हणायचे आहे.)
३. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुमच्यापेक्षा वेगळा व्यक्ती काय सांगू शकणार?
३. ठीक.
४. पेटंटचा करा विचार. यात निष्कर्ष काय आहे ते समजले नाही.
५. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुमच्यापेक्षा वेगळा व्यक्ती काय सांगू शकणार?

३अ

शनिवारवाड्याच्या खाली एक सुप्त ज्वालामुखी आहे आणि शनिवारवाड्याच्या खाली पृथ्वीचा गुरुत्वमध्य आहे या विषयीसुद्धा दुमत नाही.

शनिवार वाडाच आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.

>>शनिवारवाड्याच्या खाली पृथ्वीचा गुरुत्वमध्य आहे
खाली नाही कि वर नाही,शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.

पुढचा भाग

पुढचा भाग लवकर येऊ द्यात, वाट पहात आहे.

 
^ वर