मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच. हा ६० वर्षाचा नास्तिक माणूस भविष्याची,भविष्यकारची थट्टा उडविणारा त्यांना थोतांड म्हणणारा आज अचानक छातीठोकपणे मी अजून ५० वर्ष जगणार आहे असे भविष्य सांगतो . जगणार असेल बुवा आपल्याला काय घेणेदेणे त्याच्याशी. जेथे सेकंद नंतर आपले काय होणार याची या व्यवस्थेत खात्री नाही, पुढच्या क्षणी बॉम्बस्फोट होवून मरणार का पाक दहाषदवादी अतिरेक्यांच्या गोळीला बळी पडणार याची धास्ती असणाऱ्या आम्हा मुंबईकरना या छातीठोकपणाचे कोतूक वाटते.अखेर त्याला विचारले तुम्ही भविष्य मानत नाही, नास्तिक आहात तर अजून ६० वर्ष जगणार या भविष्यावर कसा विश्वास ठेवण्यास तुम्ही तय्यार झालात. आहो मीच नाही अजून अनेक उद्योजक, तसेच सेलिब्रेटीं, भक्त ज्यांनी लाखो रुपये मोजून आंध्र प्रदेशात तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या विशेष सेवेसाठी 2060 पर्यंत आगाऊ नोंदणी केली आहे. ते सर्व भक्त तोपर्यंत जिवंत राहणारच आहे.आम्ही पूजा केल्या शिवाय मरणारच नाही हा गाढा विश्वास असल्याशिवाय का भक्तांनी एव्हढे ५० वर्षा पुढचे दर्शनाची आगावू नोंदणी केली का? आज वर्तमान पत्रातील बातम्या तुम्ही वाचल्या नाही का असे विचारात त्यांनी पेपर्स चा गठ्ठा आमच्या पुढे टाकला. ज्यात देवाच्या दर्शनाचे पुढील ५० वर्षाचे अगाऊ नोंदणीची बातमी होती. हैदराबाद - आंध्र प्रदेशात तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या सेवा तिकिटांची कोट्यवधी रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. अनेक उद्योजक, तसेच सेलिब्रेटींनी लाखो रुपये मोजून व्यंकटेश्‍वराच्या विशेष सेवेसाठी 2060 पर्यंत आगाऊ नोंदणी केली आहे. यातून देवस्थानच्या काही सदस्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत. भाविकांसाठीच्या तिकीट विक्रीतील गैरव्यवहार आणि भगवान वेंकटेश्वराला वाहिलेले प्राचीन दागिने गायब झाल्यामुळे तिरुमलाचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जगातील श्रीमंत देवस्थानांमध्ये गणना होणाऱ्या तिरुपती मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टकडे आहे. मंदिरातील तिकीट विक्रीत झालेल्या गैरव्यवहारानंतरही आंध्र प्रदेश सरकारने याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. देवस्थानच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या प्राचीन दागिन्यांचे सेट काही दिवसांपासून बेपत्ता आहेत.
मी ठणठणपाळ यांना छेडले आहो ही तर देव आणि भक्ता मधील दलालांच्या भ्रष्ट्राचाराची बातमी आहे. आणि तुम्ही तंर एकदिवस आड भ्रष्ट्राचारा विरुद्ध लिहून जाल वरील ब्लोगेर्स हा परेशान करत असतात. मग ह्या भ्रष्ट व्यवहारात आपण कसे सामील झालात असे विचारले. असता ठणठणपाळ आपल्या भल्या मोठ्या मिशी आड जोरात हसत म्हणाले, ही किमया माझ्या जाल वरील मित्रांनी केली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेत खासदारांनी व्यक्तिगतस्वैराचार करणे हा फार कांही गुन्हा नाही . याच हिशोबाने घोडेबाजार न करणे, आयाराम-गयारामला परवानगी नाकारणे हा लोकशाहीचा खुन आहे, तीचा गळा दाबणे असा प्रकार आहे ,वगेरे वगेरे .इति लोकशाही पुरण संपवून ठणठणपाळ पुढे बोलू लागणार तोच त्यांना मध्येच अडवून मी म्हणालो आहो त्या दलालांनी देवाला भक्तांनी दान दिलेले दागिने विकून भक्तांच्या भावनेला ठेस पोहंचविली आहे. तिकिटाचा काळाबाजार केला. आहो तो देवाचा दलाल आहे. जो तळे राखील तो पाणी पियीलच या न्यायाने मी या भ्रष्ट्राचारा कडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. असे दुर्लक्ष केले की आपणास मानसिक त्रास होत नाही. आणि हो आपल्या लाडक्याला इंग्रजी शाळेत घालण्या साठी आपण DONATION देतोच की , ती देणगी आपण आणि शाळा सरकारला दाखवतो का? इथूनच आपण आपल्या मुलाला भ्रष्ट्राचाराचे बाळकडू पाजवत असतो, यामुळे पुढच्या पिढीला आमच्या सारखा मानसिक त्रास होणार नाही. तुम्ही ही खा! आम्हाला ही खावू द्या !! असे ठणठणपाळ यांनी आपल्या मिश्या आड हसत सांगितले.
ठणठणपाळ असे हसत बोलत असले तरी ह्या माणसाने कांही तिरुमल्ला तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्‍वराच्या सेवा तिकिटांची खरेदी केली नसल्याची माझी पक्की खात्री नव्हे विश्वास आहे. तुम्ही
तिकीट खरेदी खरेदी करून २०६० पर्यंत जिवंत राहण्याची तरतूद केली का?

Comments

भंपकगिरि

अशी देवस्थाने व 2060 पर्यंत जगण्याचे पासेस त्यानांच लखलाभ ज्यांना त्याची गरज वाटते

आवडले

यावेळी रंगसंगती सोडली तर लेखन आवडले.
वेगळा विषय (आधीपेक्षा) बराच चांगला मांडला आहे.

बाकी ठणठणपाळ यांना जाड मोठ्या मिशा आहेत हे वाचल्यावर ते 'बापु'सारखे दिसत असतील का ह विचार करू लागलो ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बाकी ठणठणपाळ यांना जाड मोठ्या मिशा आहेत

आपल्या निरोपा बद्दल धन्यवाद !!
माझा जो फोटो मी माझ्या ब्लोग वर टाकला आहे तो ९९% माझ्याशी मिळता जुळता आहे. वय वर्ष ६० हे सुद्धा सत्य आहे. संगणक साक्षर वयाच्या ५८ वर्षा नंतर झालो.
http://www.thanthanpal.blogspot.com

चोरांचे धन

देवाला दान द्यायचे हे फक्त मनातून स्वतःला अपराधी वाटू लागल्यावरच सुचते. हा अपराधीपणा बऱ्याच पातळ्यांवरचा असतो. लाचखोरी, लुबाडणूकीपासून तर कुणाचे आपल्या हातून वाईट घडले ह्या भावनेपर्यंत. पण बहूतांशी या दानकर्त्यांना जनतेला आपण लुबाडले पण देवापासून हे चोरून राहणार नाही ही भीती खात असते. खरे तर देवही आपले काही वाकडे करु शकत नाही याचीही प्रचिती ते वारंवार घेत असतातच. मग निदान स्वतःच्या मनातील अपराधीपणा, भीडभाड दूर करण्यासाठी हे दानधर्म करतात. गंगेत स्नान करून आलेला पापी जुनी पाप धूवून निघाल्याने पून्हा नव्या जोमाने पापे करण्यास सज्ज होतो अशातला हा प्रकार आहे.

तिरुपती, शिर्डी, तुळजाभवानी किंवा तत्सम मंदीरातील दानांच्या वस्तूत किंवा रकमेत भ्रष्टाचार होत असेल तर चोरांचे धन चोरांनी पळवले असेच म्हणावे लागेल. अशा घटनांमधून स्वतःच्या कष्टाची कमाई देवाच्या भरीस घालणाऱ्या भोळ्या जनतेने बोध घेतला पाहीजे.

संगणक साक्षर वयाच्या ५८ वर्षा नंतर झालो.
आमच्या सरकारी सहकाऱ्यांना संगणक साक्षरता आवश्यकतेचा कायदा येऊन तीन वर्षे झाली, आता वेतनवाढींवर गदा येऊ लागल्याने काहीजणांनी चरफडत कोर्स लावला आहे. पून्हा कोर्सवाल्या संस्थेच्या मालकीत एका मोठ्या मंत्र्याच्या मुलाचे शेअर्स आहेत म्हणून हा सगळा ताप अशी चर्चा करत. असो. तुम्ही निवृत्तीच्या वयानंतर संगणक वापरात इतके प्रवीण झालात याचा आदर वाटला.

विशिष्ट सेवा

तसेच सेलिब्रेटींनी लाखो रुपये मोजून व्यंकटेश्‍वराच्या विशेष सेवेसाठी 2060 पर्यंत आगाऊ नोंदणी केली आहे.

विशिष्ट सेवा म्हणजे नक्की काय? जालावर हा शब्दप्रयोग इतर अर्थांनी वापरलेला ऐकला आहे म्हणून विचारतो.

तसंच जर आज या बुकींगच्या तिकिटाची किंमत लाखो रुपये असेल, तर कदाचित वीस वर्षांनी ती करोडो रुपये असेल. विकत घेणाऱ्यांनी कदाचित गुंतवणुक म्हणून घेतली असेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर