होमिओवेद

येथील चर्चा थंडावल्यावर, झोपण्यापूर्वी एकदा मिसळपाव बघितले तर तेथे गोमूत्राविषयी पोस्ट वाचली.
गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता. कोणाला काथ्याकूट करायचा आहे का?
चर्चेचे विषय:
औषधाचे प्रमाण वाढविले की परिणाम कमी होतो हे तत्त्व 'आयुर्वेदिक' कधीपासून झाले?
म्हैस, उंट, हरिण, यांच्या लघवीतूनही असलाच औषधी गुण मिळण्याचा स्वतःचा दावा दुर्लक्षून केवळ गोमूत्राला प्राधान्य देण्यातून पेटंट अर्जदारांचा रंग दिसतो का?
गोमूत्राच्या डिस्टिलेटमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा दावा केला गेला आहे. परंतु औषधी पदार्थाचा विलयबिंदू ४०० सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. डिस्टिलेटमध्ये असा पदार्थ कसा शिरला? मोठमोठ्या नावाच्या भंपक चाचण्या करणार्‍या लोकांकडे ४०० सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान मोजणारा तापमापक नाही का? इस्कॉनधार्जिण्या एका दुव्यावर ते डिस्टिलेट नसून रेसिड्यू असल्याचा दावा आहे. डिस्टिलेट आणि रेसिड्यू यांतील फरक न कळणार्‍याला वैज्ञानिक म्हणावे का?
पेटंट मिळाले म्हणजे उपयुक्तता सिद्ध होते का?
माशेलकर, भटकर भाजपचे पित्तू आहेत असे कोणाला वाटते का?

Comments

हो मला काथ्याकूट करायचा आहे.

गो-विज्ञान अनुसंधान केंद्र आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या [नागपूर] गोमूत्र अर्काला अमेरिकेचे पेटंट अशी बातमी नुकतीच वाचनात आली. गोमूत्रातील 'अ‍ॅन्टी ऑक्सिडन्ट' घटक डिएनए गुणसूत्रांचे रक्षण करतात. त्यामुळे पोटाचे आजार, काविळ, यकृताचे आजार, मधुमेह, रक्तदाब आंदिवर गोमुंत्राचा अर्क अतिशय परिणामकारक आहे असे त्यांचे म्हणने होते.

बाकी औषधाचा विलयबिंदू , डेस्टिलेट काय असते, रेसिड्यू काय असते, तेच माहिती नसल्यामुळे त्याची उपयोगिता वगैरे काही माहित नाही.

गोमूत्र अर्क शरीरासाठी उपयुक्त असेल तर ते उपयुक्त कसे आणि नसेल तर ते उपयोगाचे का नाही, इतकी माहिती चर्चेच्या निमित्ताने मिळाली तरी पुरे झाले !

-दिलीप बिरुटे

जरूर

द्रवाचे ऊर्ध्वपातन-सांद्रीभवन केल्यावर मिळणारे पदार्थ म्हणजे डिस्टेलेट होत, उदा. आंबविलेल्या साखरेतून अल्कोहोल वेगळे निघते.
रेसिड्यू म्हणजे कोणत्याही प्रक्रियेत शेवटी उरणारा पदार्थ होय. द्रवाचे बरेचसे ऊर्ध्वपातन/बाष्पीभवन केल्यावर बाकी राहणार्‍या पदार्थाला रेसिड्यू म्हणता येईल.
विलयबिंदू म्हणजे मेल्टिंग पॉईंट. लघवीचा उत्कलनबिंदू ११० सेल्सिअस (संपृक्त मिठाच्या द्रावणाचा उत्कलनबिंदू) पेक्षा कमीच असेल. ऍक्टिव इन्ग्रेडियंटचा विलयबिंदू ४०० सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचा त्यांचा दावा आहे. असा पदार्थ रेसिड्यूमध्ये जाईल, डिस्टिलेटमध्ये नाही.
गोमूत्र अर्क शरिरासाठी उपयुक्त नाही कारण तशा चाचण्या झालेल्या नाहीत. माझा मुद्दा असा आहे की सरकारने माझ्या पैशातून अशा चाचण्याच करू नये.

आभार ....!

प्रिय रिकामटेकडे, माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार....! पण सदरील संस्थेने काही वर्ष संशोधन करुन निष्कर्ष काढले आहेत असे वाचले आहे. त्यामुळे गोमूत्र अर्क शरिरासाठी उपयुक्त नाही असे म्हणायला शास्त्रीय अधिकार आपल्या प्रतिसादात दिसत नाही. सदरील संस्थेचे निष्कर्ष चूक असतील तर त्यांचे निष्कर्ष चूक कसे ?

आपल्या पैशातून भविष्यासाठी काही चांगले संशोधन होत असेल तर सरकारने त्यांना काही पैसे दिले तर आपल्याला त्या बद्दल का आक्षेप आहे ?

-दिलीप बिरुटे

औषध

जीवित वस्तुंपासून बनणार्‍या (झाडे ते प्राणी) वस्तु बहुतकरून अनेक वेगवेगळ्या रसायनांपासून बनल्या असतात.
यातील एखादी वस्तु औषधी असेल तर त्यातील नेमक्या कुठल्या घटक रसायनाने ती औषधी झाली याचा शोध घेतला जातो. या घटक रसायनाचा केमिकल फॉर्म्युला काय आहे हे पण शोधले जाते.
त्या घटक रसायनाची योग्य ती चाचणी होते (औषधी असण्याची आणि धोकादायक नसण्याची). ही चाचणी यशस्वी झाली तर त्या घटक रसायनास औषध म्हणून मान्यता मिळते.

जेव्हा गोमुत्रासारखी अनेक रसायनांनी बनलेली वस्तु असेल तेव्हा संशोधकांकडून ही अपेक्षा असते की त्यातील कुठला घटक औषधी आहे हे त्यांनी हुडकून काढावे. त्याचा नेमका फॉर्म्युला काय हे मिळवावे.
नाहीतर गाईने काल काय काय खाल्ले/प्याले याप्रमाणे घटक बदलत राहतील.

बातमीचा शोध घेताना या प्रकारचा शोध घेतल्याचे वर्णन नाही. तसे असते तर गोमुत्रातील अमुक तत्व औषधी निघाले अशी बातमी आली असती. जो डिस्टिलेट का रेसेड्युचा घोळ चालू आहे त्यावरून असे वाटते कुठलेच रासायनिक पृथ:करण न करता असा शोध लावल्याचे सांगत आहेत.

आपल्या पैशातून भविष्यासाठी काही चांगले संशोधन होत असेल तर सरकारने त्यांना काही पैसे दिले तर आपल्याला त्या बद्दल का आक्षेप आहे ?

माझा आक्षेप नाही. पण अशा पयत्नांचे टेक्निकल ऑडिट, पीअर रिव्ह्यु व्हायला हवेत. आणि संशोधन निम्नस्तरीय असल्यास पैशाचा ओघ थांबवला पाहिजे.

प्रमोद

घटक

१ डिस्टिलेट की रेसिड्यू हा वाद नसावा. पेटंटच्या माहितीत तरी डिस्टिलेटच म्हटले आहे.
२. पेटंटच्या अर्जात/माहितीत "सदर संशोधकांच्या कठोर देखरेखीखाली वाढवल्या जाणार्‍या/खाऊपिऊ घातल्या जाणार्‍या गोविज्ञान अनुसंधान केंद्रातील गायींपासून मिळणार्‍या गोमूत्रापासून बनवलेल्या कामधेनू अर्क या औषधाचे पुनरूर्ध्वपातनकरून मिळवलेले डिस्टिलेट" इतके सदर द्रव्याचे वर्णन आहे.
३. तसेच हे पुनरूर्ध्वपातन करताना गोमूत्रातील अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑर्थोफॉस्फोरिक आम्ल मिसळले गेले होते. ऑर्थोफॉस्फोरिक आम्ल न मिसळलेल्या द्रव्याचा काय परिणाम होतो हे दिसले नाही.
४. क्लेममध्ये 'बेन्झोइक ऍसिड हेक्झोईक, ऍसिड आदि द्रव्ये असलेले आणि ऑप्शनली एखादे ऍण्टी-ऑक्सिडंट असलेले- रीडिस्टिल्ड काऊ युरीन डिस्टिलेट' असा उल्लेख आहे. हे ऑप्शनल ऍण्टी-ऑक्सिडंट प्रयोगातील द्रव्यात होते की नाही आणि ते नसलेल्या द्रव्याचा काय परिणाम दिसला हेही कुठे लिहिलेले दिसले नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बुद्धिप्रामाण्य

सदरील संस्थेने काही वर्ष संशोधन करुन निष्कर्ष काढले आहेत असे वाचले आहे. त्यामुळे गोमूत्र अर्क शरिरासाठी उपयुक्त नाही असे म्हणायला शास्त्रीय अधिकार आपल्या प्रतिसादात दिसत नाही.

त्यांच्या लिखाणावरून दिसते की त्यांची पद्धत बिनडोक आहे.
उदा. 7235262 हे पेटंट पाहू.
>४०० सेल्सिअस म्हणजे नक्की किती?
औषधातील मूलद्रव्यांचे प्रमाण का मोजले नाही? औषधाच्या स्फटिकाचे (क्रिस्टल) क्ष किरण फोटो का नाहीत? किमान स्फटिकाचा आकार तरी?
7718360:
डिस्टिलेट्मध्ये बेंझॉईक आम्ल(विलयबिंदू १२२ सेल्सिअस, उत्कलन २५० से.) (हे शीतपेयांत असते म्हणून ते बोंब मारणार), हेक्झॅनॉईक आम्ल (वि. ० से., उ. २०० से.) (विष्ठेच्या गंधाचे कारण), अमोनिआ (मूत्रकूपाच्या गंधाचे कारण) आणि वैकल्पिक (कधी वैकल्पिक म्हणतात तर कधी हवेच म्हणतात) ऍन्टिऑक्सिडंट यांचे अस्तित्व असते. आता ऍन्टिऑक्सिडंट असल्यावर डीएनए चे ऑक्सिडेशन थांबले तर नवल काय? शिवाय बेंझॉईक आम्ल सार्‍याच सस्तन प्राण्यांच्या लघवीत असते. हेच सारे पदार्थ कृत्रिमरीत्या एकत्र करून त्यांचा परिणाम पाहिला असता तर कदाचित एखादा नवा ऍन्टिऑक्सिडंट रेणू आहे की नाही ते कळले असते.
"This invention is the result of a search of antioxidants of natural origin with a property to protect DNA damage in cells exposed to DNA damaging chemicals." असा दावा आहे पण नवे काही ऍन्टिऑक्सिडंट दिलेलेच नाही.

सदरील संस्थेचे निष्कर्ष चूक असतील तर त्यांचे निष्कर्ष चूक कसे ?

ye baat kuch hazam nahi huvi
ये बात कुछ हजम नही हुवी

आपल्या पैशातून भविष्यासाठी काही चांगले संशोधन होत असेल तर सरकारने त्यांना काही पैसे दिले तर आपल्याला त्या बद्दल का आक्षेप आहे ?

खुले मन बाळगण्याच्या मर्यादा उल्लंघिल्या जात आहेत. सी एस आय आर ने नीम, हळद, बासमती, टीकेडीएल, या स्टंटमधून किती अर्थप्राप्ती/नवी औषधनिर्मिती केली?

मी प्रतिसाद लिहीत असताना असे दिसले की सहस्रबुद्धे आणि थत्ते यांच्या प्रतिसादांशी थोडी द्विरूक्ती झाली आहे. आता बदल करण्याचा कंटाळा आला. क्षमस्व.

प्रोटेक्टिव्ह पेटंट - त्यात काय वाईट आहे?

नीम, हळद, बासमती वा तत्सम पदार्थांचा युगानुयुगे वापर भारतीय करत आहेत. त्यांच्यातील औषधी/सुगंधी तत्त्वे कोणती हे माहित नसले तरी योग्य वापर हेच ज्ञान आहे. केवळ ही तत्त्वे शोधून काढून त्यावर पेटंट मिळवण्याचे प्रकार होत आहेत. असे पेटंट मिळवून त्याच्या अंतर्गत येणार्‍या वस्तूवर परवाना शुल्क आकारण्याचे कारस्थानी उद्योग काही लोक करत असतात. (एक सहज खोडता येण्याजोगे उदाहरण - हवेत ऑक्सिजन असतो हे माहित नसल्यापासून मानव श्वसनासाठी तिचा वापर करतच आहे. ऑक्सिजनचा शोध लावणार्‍या प्रीस्टलीला हवेचे पेटंट द्यावे काय? - हे उदाहरण प्रतिवाद्यांकडून खोडले जावे म्हणूनच दिले आहे...;))
गोमुत्राचे (वैद्यकीय) फायदे काय? त्यावर वेगळी चर्चा व्हावी. पण उद्या त्यातील अँटीऑक्सिडंट रेणू शोधला जाऊन त्याचे पेटंट कोणाच्या आर्थिक फायद्यासाठी होऊ नये म्हणून 'सीएसायार'ने हे प्रोटेक्टीव्ह पेटंट घेतले आहे. जोवर कोणी आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी पेटंट घेत नाही तोवर हातावर हात धरून गप्प बसायचे आणि ते घेतल्यावर 'बघा, आमच्याकडे कसे पुरातन ज्ञान आहे आणि परके कसा फायदा उठवत आहेत' असे म्हणून हातावर हात चोळायचे यापेक्षा भारत सरकारने खर्च करून पेटंट घणे सामान्य भारतीयाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
आता पेटंट घेतल्यावर ' अँटीऑक्सिडंट ' रेणू शोधून काढण्यास रान मोकळे आहे. त्यात टीकेडीएल/सीएसायारला यश येवो ही सदिच्छा. आणि तसा रेणू त्यात नसेल तर तेही कालांतराने सिद्ध(!) होईलच.
जगातील प्रत्येक पेटंटचा काहीना काही (आर्थिक/वैज्ञानिक)उपयोग असतोच असे कोण म्हणते? पण तसा उपयोग आहे हे नक्की झाल्यावरच पेटंट घ्यावे असे कोणी सांगितले आहे? आणि जर ते आधीच घेतले नाही तर उपयोग कळाल्यावर इतरांनी घेतले तर नुकसान कुणाचे?
मग राग नक्की कुणावर आहे? भाजपावर? समस्त हिंदूंवर? समस्त धर्मांवर? माशेलकरांवर? भाटकरांवर? ते ज्या जन्मजातींमधून येतात त्या जातींवर? आयुर्वेदावर? भारतीय तत्त्वज्ञानावर?गोमुत्रावर? (एकंदर सर्वप्राणीमात्रांच्या) मुत्रावर? शिवांबूवर? भगव्या रंगावर? भारतावर? जे अज्ञात शक्तीला मानतात त्यांच्यावर? तावडीत सापडतील त्या सर्वांवर? प्रतिवाद्यांवर? जे विज्ञानालाही मानतात आणि अस्तिकही असतात त्यांच्यावर? - असे सर्व एकत्र केले तर जगातील ९२% लोकांवर राग धरावा लागेल.इतका रागराग करणे प्रकृतीला चांगले नाही. पण रागावरच्या उपचार पद्धतीही प्युअर सायंटिफिक वाटत नाहीत. हा एक प्रश्नच आहे...

नस्ती उठाठेव

पेटंट एन्फोर्स करण्यासाठी कोणी खटला केल्यावर मग ते उडविण्याचा प्रयत्न करावा. एन्फोर्स करणे परवडणार नाही अशा पेटंटविरोधात प्रोटेक्टिव पेटंट घेण्याची गरज नाही.

जगातील प्रत्येक पेटंटचा काहीना काही (आर्थिक/वैज्ञानिक)उपयोग असतोच असे कोण म्हणते? पण तसा उपयोग आहे हे नक्की झाल्यावरच पेटंट घ्यावे असे कोणी सांगितले आहे? आणि जर ते आधीच घेतले नाही तर उपयोग कळाल्यावर इतरांनी घेतले तर नुकसान कुणाचे?

पेटंट घेणे ही कृती आर्थिक फायद्याने प्रेरित असलीच पाहिजे. 'इतक्या पेटंटमधून होणारे खटले आम्ही वाचविले' हा पोकळ दावा आहे. बाँबस्फोटात किती लोक मेले ते मोजता येते. कितींचा जीव वाचला ते कसे सांगणार? सरकारकडे अजून एक ब्रम्हास्त्र आहे. अत्यंत महत्वाच्या औषधावरील पेटंटवर ते सरळ बंदी घालू शकते. घायकुतीला येण्याचे प्रयोजन नाही.
म्हणूनच मुद्दा पुन्हा 'खुले मन की बुद्धिप्रामाण्य' असाच येतो. माझ्या पैशाने जुगार खेळू नका अशी मागणी आहे. टेक्निकल ऑडिट हवे. कोणत्या कल्पनेवर संशोधना करावे आणि कोणत्या संशोधनानंतर पेटंटचा खर्च करावा याचे तारतम्य हवे. या लोकांकडे संशोधनाचीच कुवत दिसत नाही, त्यामुळे पुढचा प्रश्नच उद्भवत नाही.

मग राग नक्की कुणावर आहे? भाजपावर? समस्त हिंदूंवर? समस्त धर्मांवर? माशेलकरांवर? भाटकरांवर? ते ज्या जन्मजातींमधून येतात त्या जातींवर? आयुर्वेदावर? भारतीय तत्त्वज्ञानावर?गोमुत्रावर? (एकंदर सर्वप्राणीमात्रांच्या) मुत्रावर? शिवांबूवर? भगव्या रंगावर? भारतावर? जे अज्ञात शक्तीला मानतात त्यांच्यावर? तावडीत सापडतील त्या सर्वांवर? प्रतिवाद्यांवर? जे विज्ञानालाही मानतात आणि अस्तिकही असतात त्यांच्यावर?

भाजपावर, समस्त हिंदूंवर, समस्त धर्मांवर, माशेलकरांवर, भाटकरांवर, आयुर्वेदावर, गोमूत्र(उपचारां)वर, मूत्र(उपचारां)वर, शिवांबूवर, भगव्या, हिरव्या, निळ्या, लाल रंगावर, जे अज्ञात शक्तीला मानतात त्यांच्यावर, जे विज्ञानालाही मानतात आणि अस्तिकही असतात त्यांच्यावर -> होय.
तावडीत सापडत नाहीत म्हणून तर येथे रडतो आहे.
ते ज्या जन्मजातींमधून येतात त्या जातींवर(स्वतःवर), (संपूर्ण) भारतीय तत्त्वज्ञानावर, भारतावर -> नाही.

असे सर्व एकत्र केले तर जगातील ९२% लोकांवर राग धरावा लागेल.इतका रागराग करणे प्रकृतीला चांगले नाही. पण रागावरच्या उपचार पद्धतीही प्युअर सायंटिफिक वाटत नाहीत. हा एक प्रश्नच आहे...

;)

सहानुभूती

पेटंट घेणे ही कृती आर्थिक फायद्याने प्रेरित असलीच पाहिजे.

-अनेक पेटंटचा कोणताही आर्थिक फायदा नसतो. (अनेक पेटंट हास्यास्पदही असतात - ते निराळे). काही पेटंट खोडसाळपणे घेतलेली असतात. त्या पेटंटना रद्दबातल ठरवणे ही डोकेदुखी असते. शिवाय त्या प्रक्रियेत अनावश्यक वेळ आणि पैसाही खर्च होतो.

सरकारकडे अजून एक ब्रम्हास्त्र आहे. अत्यंत महत्वाच्या औषधावरील पेटंटवर ते सरळ बंदी घालू शकते. घायकुतीला येण्याचे प्रयोजन नाही.

- पण जे मुळातच खोटे पेटंट आहे त्याचा वापर केलेल्या औषधाच्या पेटंटवर बंदी घालणे चोराच्या घरी चोरी करण्यासारखे आहे. हे सव्यापसव्य (किंवा उलटा घास) कशाला?

म्हणूनच मुद्दा पुन्हा 'खुले मन की बुद्धिप्रामाण्य' असाच येतो. माझ्या पैशाने जुगार खेळू नका अशी मागणी आहे. टेक्निकल ऑडिट हवे. कोणत्या कल्पनेवर संशोधना करावे आणि कोणत्या संशोधनानंतर पेटंटचा खर्च करावा याचे तारतम्य हवे. या लोकांकडे संशोधनाचीच कुवत दिसत नाही, त्यामुळे पुढचा प्रश्नच उद्भवत नाही.

- सिएसायारने कोणता निकष वापरावा - किंवा- वापरला असेल? 'खुले मन की बुद्धिप्रामाण्य'? - त्यांच्याकडे संशोधनाची कुवत आहे की नाही? - हे इथे उपक्रमावर आपण कोण ठरवणार? जावे त्यांच्या जागी तेव्हा कळे...

(ते) तावडीत सापडत नाहीत म्हणून तर येथे रडतो आहे.

-सहानुभूती वाटते. ;) पण Another example of widespread deflection of anger from its actual cause toward scapegoating,(विकिवरून साभार) हे 'बळीचे बकरे' करू नका म्हणजे झाले...

धन्यवाद

-अनेक पेटंटचा कोणताही आर्थिक फायदा नसतो. (अनेक पेटंट हास्यास्पदही असतात - ते निराळे).

हे समर्थन आहे का?

काही पेटंट खोडसाळपणे घेतलेली असतात. त्या पेटंटना रद्दबातल ठरवणे ही डोकेदुखी असते. शिवाय त्या प्रक्रियेत अनावश्यक वेळ आणि पैसाही खर्च होतो.

म्हणूनच मी म्हणतो की केवळ खटला झाल्यावर विहीर खणावी. खटला होईल अशी पेटंट हा एकूण आक्षेपार्ह पेटंटचा एक उपसंच असतात.

- सिएसायारने कोणता निकष वापरावा - किंवा- वापरला असेल? 'खुले मन की बुद्धिप्रामाण्य'? - त्यांच्याकडे संशोधनाची कुवत आहे की नाही? - हे इथे उपक्रमावर आपण कोण ठरवणार? जावे त्यांच्या जागी तेव्हा कळे...

हा युक्तिवाद सार्‍याच आंतरजालीय चर्चांविरुद्ध वापरता येतो. इथे बसून जे मूल्यमापन शक्य होते तेवढ्याविषयीच बोलूया.

हे 'बळीचे बकरे' करू नका म्हणजे झाले...

सीएसआयआरची बाजू घेणारेसुद्धा असतात. बळीच्या बकर्‍यांचा बचाव करणारे तर पुष्कळ उभे राहतील. काळजीचे कारण नाही.

मदत

सीएसायारची बाजू घेत नाही. आपल्या प्रयत्नांना मदत म्हणून संपर्काचे पत्ते ,
प्रयत्नांस सदिच्छा.
आपल्या प्रयत्नांचे फलितही आम्हास कळवावे ही नम्र विनंती.

???????

.....समस्त हिंदूंवर, .....-> होय.

???????


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संबंध नाही

हिंदू लोक आयुर्वेदाच्या नावाला (धन्वंतरीकडून आले आहे ना! धन्वंतरी मानत नाही ते हिंदू कसे? ३३ करोड हिशोब नको भरायला का?) भुलतात एवढाच काय तो संबंध.

सनातनी रॅशनलिस्ट

पूर्वीच्या काळी सनातनी ब्राम्हण जसे कुठेही खुट्ट झाले की लगेच धर्म बुडाला अशी आवई उठवत, किंवा सद्यकाळात सर्वधर्मीयांतील अतिरेकी लोक त्याप्रमाणे वागतात तसेच हे 'बाबा वाक्यं प्रमाणम्' मानणारे सनातनी रॅशनलिस्ट प्रकारचे विचार आहेत असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बुद्धिप्रामाण्य खतरे मे!

सद्यकाळात सर्वधर्मीयांतील अतिरेकी लोक त्याप्रमाणे वागतात तसेच हे 'बाबा वाक्यं प्रमाणम्' मानणारे सनातनी रॅशनलिस्ट प्रकारचे विचार आहेत असे वाटते.

'बाबा वाक्यं प्रमाणम्' कधी म्हटले?

"Something you will never see: an atheist boarding a plane with a bomb strapped to him, waving a copy of On The Origin Of Species, before he blows himself up." डेविड निकॉल्स

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

बाबा = रिकामटेकडा

'बाबा वाक्यं प्रमाणम्' कधी म्हटले?

असे म्हटला नसलात तरी मानता असे दिसते. त्याची अनेक उदाहरणे तुमच्या प्रतिसादात सापडतील. शिवाय यातील बाबा म्हणजे 'शिवोहम ब्रम्हास्मि' साक्षात श्री. रिकामटेकडा हेच. तुम्ही एका वाक्यावरुन लोकांना मठ्ठ ठरवता. हिंदू लोकांची मते न पटणे इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही ते 'तावडीत सापडत नाहीत' यामुळे व्यथित होऊन त्याचा राग इथे काढता.

उदाहरणार्थ माझा जन्म हिंदू आईबापांपोटी झाल्याने मी आपसूकच हिंदू ठरतो व त्यामुळे तुमच्या तावडीत सापडण्यातून वाचण्याकरिता मी काळजी घेणे आवश्यक आहे. याउलट माझा जन्म मुसलमान किंवा ख्रिस्ती कुटुंबात झाला असता आणि त्यांनी बाप्तिस्मा किंवा सुंता न करता मला तसेच ठेवले असते तर मी तुमच्या निकषांस खरा उतरलो असतो. पण जी गोष्ट माझ्या हाती नाही त्याचा उपयोग तुम्ही माझ्याविषयी पूर्वग्रह बाळगण्याकरता करता हे वागणे सनातनी नव्हे तर कसे आहे? यामागे बाबा श्री. रिकामटेकडा यांचेच वाक्य प्रमाण नाही काय?

सामान्य माणूस जगण्याच्या लढाईत चाचपडत मार्ग शोधत असतो. त्याला अल्पबुद्धील जमेल तसा अनाकलनीय घटनांचा कार्यकारणभाव लावण्याचा प्रयत्न करत तग धरुन राहतो. या लढाईत मानसिक आधार देण्यासाठी त्याला नशीब, देव या शब्दांचा प्लासिबोसारखा उपयोग होत असतो. मात्र अशा माणसांविषयी किंचितही ओलावा तुमच्या प्रतिसादांमध्ये दिसत नाही. तुम्ही सरळ त्यांची अक्कल काढता हे वागणे सनातनी नव्हे का?

माझा १२ वी नंतर शास्त्र विषयाशी फारसा संबंध आला नाही. (फक्त भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र. जीवशास्त्र मी ११वी पर्यंतच शिकलो आणि १२वीला सोडून दिले) इंजिनियरिंगमध्ये अप्लाईड सायन्स दुसऱ्या प्रयत्नात ४० - मार्कावर पास झालो. त्यामुळे मला ट्रॅडिशनल सायन्स या विषयात फारशी गती नाही.

मात्र मी सेल्फिश जीन हे एका वैज्ञानिकाचे, व्हाय ब्यूटिफूल पीपल हॅव मोअर डॉटर्स हे (ज्यांना सुडोवैज्ञानिक मानले जाते त्यांचे) आणि प्रो. कृष्णमूर्ती यांचे फलज्योतिष विषयाची प्राथमिक ओळख करुन देणारे पुस्तक वाचले आहे. या तिघांनीही त्यांना सत्य वाटले ते पुस्तकात लिहिले आहे. माझ्याकडे या तिघांची भूमिका वेगवेगळ्या कसोटींवर पडताळून पाहण्यासाठी तपासण्याची साधने व सामग्री नाही. सेल्फिश जीनमध्ये अमुकतमुक सिद्धांत मांडला असला तरी मायक्रोस्कोप घेऊन मी जीन-डीएनए अशी रचना तपासू शकत नाही, किंवा कृष्णमूर्ती यांनी मृत्यूषडाष्टक योग सांगितला असला तर १०० माणसांवर प्रयोग करुन तो तपासू शकत नाही.

त्यामुळे ही तिन्ही पुस्तके - किंवा त्यामागची सत्ये - मला जशी अनुभवाला येतील तशीच आणि तेवढीच मान्य करणार. या बाबतीत माझी भूमिका 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशीच राहणार. आयुर्वेदिक डॉक्टरला नाडी पाहून कफदोष कसा समजतो हा प्रश्न माझ्या मनात उभा राहणार, तसाच स्टेथोस्कोपच्या सहाय्याने रिपोर्ट पाहून केलेले दोन डॉक्टरांचे निदान वेगवेगळे का येते हा प्रश्नही माझ्या मनात उभा राहणार.

ही माझ्या मते वैज्ञानिक दृष्टी आहे. आणि मला अप्रिय असलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर त्या सत्य मानण्याची तयारी म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. याउप्पर कोणी पुस्तकात काही सांगितले व मला ते अनुभवास आले नाही किंवा पटले नाही तरी ते खरे मानण्याचा आग्रह म्हणजे 'बाबा वाक्यं प्रमाणम्'.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वैज्ञानिक दृष्टी

असे म्हटला नसलात तरी मानता असे दिसते. त्याची अनेक उदाहरणे तुमच्या प्रतिसादात सापडतील. शिवाय यातील बाबा म्हणजे 'शिवोहम ब्रम्हास्मि' साक्षात श्री. रिकामटेकडा हेच.

असहमत.

तुम्ही एका वाक्यावरुन लोकांना मठ्ठ ठरवता.

तुमच्या मित्राचे ते वाक्य चुकीचे असल्याचे तुम्ही मान्य केले होते.

पण तुम्ही ते 'तावडीत सापडत नाहीत' यामुळे व्यथित होऊन त्याचा राग इथे काढता.

म्हणजे असे की माझ्या आयुष्यावर त्यांच्या मूर्खपणाच्या होणार्‍या परिणामाचा मी पुरेसा प्रतिकार करू शकत नाही. इथे राग 'काढीत' नाही, व्यक्त करतो.

उदाहरणार्थ माझा जन्म हिंदू आईबापांपोटी झाल्याने मी आपसूकच हिंदू ठरतो

ही एक प्रचलित अफवा आहे.

त्याला अल्पबुद्धील जमेल तसा अनाकलनीय घटनांचा कार्यकारणभाव लावण्याचा प्रयत्न करत तग धरुन राहतो.

ते पुरेशी मेहेनत घेत नाहीत, अक्कल असूनही!

या लढाईत मानसिक आधार देण्यासाठी त्याला नशीब, देव या शब्दांचा प्लासिबोसारखा उपयोग होत असतो.

उपयोग नाही होत.

मात्र अशा माणसांविषयी किंचितही ओलावा तुमच्या प्रतिसादांमध्ये दिसत नाही. तुम्ही सरळ त्यांची अक्कल काढता हे वागणे सनातनी नव्हे का?

असलेली अक्कल पूर्ण वापरत नाहीत.

आयुर्वेदिक डॉक्टरला नाडी पाहून कफदोष कसा समजतो हा प्रश्न माझ्या मनात उभा राहणार, तसाच स्टेथोस्कोपच्या सहाय्याने रिपोर्ट पाहून केलेले दोन डॉक्टरांचे निदान वेगवेगळे का येते हा प्रश्नही माझ्या मनात उभा राहणार...याउप्पर कोणी पुस्तकात काही सांगितले व मला ते अनुभवास आले नाही किंवा पटले नाही तरी ते खरे मानण्याचा आग्रह म्हणजे 'बाबा वाक्यं प्रमाणम्'.

'मम वाक्यं प्रमाणं' असे स्वतःपुरते मानणे हे सनातनी आहे. वैयक्तिक अनुभव फसवे असू शकतात. टक्केवारी पहावी.

डॉकिन्सने पहिल्याच पानावर दिले आहे की आधीच ज्ञात माहितीकडे बघण्याचा चांगला मार्ग मी देत आहे. त्याने दिलेल्या माहितीचा प्रतिवाद तर कोणीच केलेला नाही. माहितीवरून निष्कर्ष काढण्याची त्याची पद्धत पटली नाही तर ते आर्मचेअर चर्चेतूनही सिद्ध करता येईल.
सातोशी कानाझावा याला सुडोवैज्ञानिक का म्हटले ते कळले नाही.
कृष्णमूर्तींनी काही प्रयोग केल्याचे दावे आहेत का? फलज्योतिषाच्या दाव्यांचा प्रतिवाद पुष्कळ आहे. शिवाय त्यांना देऊ केलेली मिलियन डॉलरची आव्हानेही ते नाकारतात. "उत्क्रांती सिद्ध करण्यासाठीच्या ५०००० डॉलरच्या आव्हानाला मी प्रतिसाद देईन" असे डॉकिन्सने म्हटले आहे.

पेटंट

पेटंटचा कालावधी हा वीस वर्षेच असतो असे माझ्या माहितीत आहे. त्यानंतर कुणालाही त्याचा वापर करता येतो. हे पेटंट घेऊन आता ८ वर्षे झालीत.
पुढील १२ वर्षात हा रेणू सापडो.

मध्यंतरी नेचर मधे लेख भारतीय संशोधनावर वृत्त/लेख आला होता. 'पेटंट घ्या नाहीतर (शिक्षा) भोगा' अशी घोषणा (माशेलकरांनी?) त्यात नमूद होती. गोमुत्रावरचे पेटंट यातील वाटते. यापुढील घोषणा 'पेटंट विका नाही तर भोगा' असे झाल्यास बरे होईल.

कुठलेही संशोधन व्हावे, त्यासाठी वेळप्रसंगी पैसा फुकट गेला तरी चालेल या मताचा मी आहे. मात्र त्यात काही निष्पत्ती होत नसेल तर तसे मोकळे पणे कबूल केले पाहिजे. भारतीय संशोधनात (सी-डॅकचा परम, सैन्यात सामील न होऊ शकलेल्या मिसाईल्स, थोरियमचा फास्ट ब्रीडर, टी.आय्.एफ्.आर चे कोल्ड फ्युजन, डी.आर्.डी.ओचा रणगाडा) अशा मोकळेपणाचा अभाव दिसतो.

गोमुत्रातून काही निघणार नाही असा एक कयास रिकामटेकडा यांचा आहे . (माझाही तो आहे.) पेटंट मिळाले म्हणजे आम्ही काही साधले असे काहीसे प्रतिपादन दिसते.

ते काय आहे हे शोध घेताना मी ते पेटंट वाचले. हे औषध (?) पेटंटधार्‍यांच्या मते अँटीबॉयॉटिक बरोबरे घेतले तर अँटीबायोटिकचा प्रभाव नीट पडतो असा त्यात दावा आहे. अशा प्रकारच्या औषधाचे काय फायदे हे काही मला कळले नाही. इथे व्यवसायाने डॉक्टर असणार्‍यांनी याचा खुलासा करावा. डिस्टीलेट (५० डिग्री सेल्सियसवर केलेले) पासून ४०० डिग्री वर द्रवमान होणारा पदार्थ हे मधल्या प्रक्रियेत घडलेला रासायनीक बदल दाखवतो असे माझे मत झाले.

या औषधाला आयुर्वेदिक म्हणणे चुकीचे ठरेल असेही मला वाटले. (आयुर्वेदातील अर्क काढायची रीत त्यांनी वापरली नाही. )

प्रमोद

दृष्टिकोन

माझी भूमिका अशी आहे की 'गोमूत्रातून काही औषध (जे इतर मूत्रांत नसते) निघेल' किंवा 'काही औषध निघणार नाही' यांपैकी एक मत चूक ठरेल आणि एक बरोबर ठरेल. त्यामुळे खरा प्रश्न आहे: विच साईड टु अर ऑन? आता नुसता तर्क केला तर गायीच्या मूत्रात काही खास असण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत संशोधन केवळ अशांनीच करावे ज्यांना गायीचे महत्व सिद्ध करण्यात इतर कारणांनी रस आहे. इतरांना संशोधन करण्यासाठी हजारो सस्तन प्राणी उपलब्ध आहेत.

भारतीय संशोधनात (सी-डॅकचा परम, सैन्यात सामील न होऊ शकलेल्या मिसाईल्स, थोरियमचा फास्ट ब्रीडर, टी.आय्.एफ्.आर चे कोल्ड फ्युजन, डी.आर्.डी.ओचा रणगाडा) अशा मोकळेपणाचा अभाव दिसतो.

झकास. कोल्ड फ्यूजन टी.आय्.एफ्.आर ने सुद्धा प्रतिपादिले हे माहिती नव्हते.

अँटीबॉयॉटिक बरोबरे घेतले तर अँटीबायोटिकचा प्रभाव नीट पडतो असा त्यात दावा आहे. अशा प्रकारच्या औषधाचे काय फायदे हे काही मला कळले नाही. इथे व्यवसायाने डॉक्टर असणार्‍यांनी याचा खुलासा करावा.

असा प्रभाव पाडणारी औषधी निश्चितच वांछित आहेत. पण 'गायीच्या मूत्रमार्गाचे रोग (इतर सस्तन प्राण्यांपेक्षा) कमी अँटीबायोटिक देऊन बरे होतात' असे काही प्रिसिडंट नसताना या विषयावर संशोधन होऊच नये.

डिस्टीलेट (५० डिग्री सेल्सियसवर केलेले) पासून ४०० डिग्री वर द्रवमान होणारा पदार्थ हे मधल्या प्रक्रियेत घडलेला रासायनीक बदल दाखवतो असे माझे मत झाले.

हो ना! पण मग मूळ गोमूत्राचे औषधी परिणाम तसेच कसे? चूक ठरण्याचा धोका पत्करून माझा आरोप आहे की ते सारे दावे बोगस आहेत.

कुणाचा?

>>म्हैस, उंट, हरिण, यांच्या लघवीतूनही असलाच औषधी गुण मिळण्याचा स्वतःचा दावा दुर्लक्षून....

स्वतःचा दावा म्हणजे आयुर्वेदाचा का?

(अवांतर : पेटंट विषयक वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांमध्ये तीन पेशंटवर ट्रायल घेतल्याची रोचक माहिती आली आहे. आणि बहुधा ते तीन पेशंट वेगवेगळ्या रोगांचे होते.)

पेटंट देण्याच्या प्रक्रियेत दावा तपासण्याची काही पद्धत नसते का? पूर्वी मी एका मशीनचे भारतात पेटंट घेतले होते त्यावेळी पेटंट ऑफिसरने त्याचे डेमॉन्स्ट्रेशन पाहिले होते. मशीनच्या बाबतीत एक डेमो पुरेसा आहे हे मान्य. औषधाच्याबाबतीत कसे करणार?
[कदाचित पेटंटच्या मागचे लॉजिक पुढीलप्रमाणे असावे : उत्पादन उपयुक्त असेल तर शोधकाला संरक्षण मिळावे. उपयुक्त नसेल तर त्याकडे कोणी ढूंकून पाहणार नाहीच.]

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

दावा

स्वतःचा दावा म्हणजे आयुर्वेदाचा का?

7235262 या पेटंटमध्ये तसा दावा आहे.

पेटंट देण्याच्या प्रक्रियेत दावा तपासण्याची काही पद्धत नसते का?

पेटंट म्हणजे उत्पादन विकण्याची अनुमती नसते. पेटंट म्हणजे इतरांना उत्पादन विकण्याची बंदी एवढेच. त्यामुळे तपासण्याची गरज नाही. तपासण्याचा हक्क राखीव असतो.

उत्पादन उपयुक्त असेल तर शोधकाला संरक्षण मिळावे. उपयुक्त नसेल तर त्याकडे कोणी ढूंकून पाहणार नाहीच.

+१. पण सरकार त्यावर खर्च करते ते वाईट आहे.

नैसर्गिक नियमांविरुद्ध असणारा शोध एकस्वयोग्य नसतो

पेटंट देण्याच्या प्रक्रियेत दावा तपासण्याची काही पद्धत नसते का?
नक्कीच असते. नैसर्गिक नियमांविरुद्ध (नॅचरल लोज़) असणारा 'शोध' पेटंट देण्यासारखा, एकस्वयोग्य नसतो. एखाद्या शोधाचे उत्पादन घेता येण्यासारखे आहे की नाही ह्याबाबतीत (इंडस्ट्रियल ऍप्लिकेबिलिटी ) परीक्षकाचे समाधान झाल्यास डेमॉन्स्ट्रेशनचही गरज नाही असे वाटते.

उत्पादन उपयुक्त असेल तर शोधकाला संरक्षण मिळावे..

  1. शोध नवीन (नॉवल) असायला हवा
  2. शोध अ-उघड (नॉन-ऑबवियस) असायला हवा
  3. शोधाचे उत्पादन घेता यायला हवे

हे तीन प्रमुख निकष आहेत, असे वाटते. शोध उपयुक्त असायला हवा असा कुठलाही निकष नाही. चूभूद्याघ्या.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

संदर्भ

शोध उपयुक्त असायला हवा असा कुठलाही निकष नाही.

वरील दुव्यात दोन वाक्ये सापडली:

Definition and interpretation
"invention" means any new and useful - art, process, method or manner of manufacture; machine, apparatus or other article; substance produced by manufacture.

तसेच

64. Revocation of Patents:
(1) g: that the invention, so far as claimed in any claim of the complete specification, is not useful;

मी वर्षभर पेटंट आउटसोर्सिंगच्या नोकरीत होतो. तेथे थोडा अभ्यास केला होता. अमेरिकन कायद्यात यूजफुल, नॉवल आणि नॉन ऑब्विअस हे तीन निकष दिले आहेत.

संपादकांना विनंती: "प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत." हा संदेश दाखविला जातो तेव्हा त्या प्रतिसादातील अक्षरांची टक्केवारी दाखविली तर बदल करणे/कचरा देवनागरी ओळी चिकटविणे सोपे होईल.
संपादकांना विनंती: "प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत." हा संदेश दाखविला जातो तेव्हा त्या प्रतिसादातील अक्षरांची टक्केवारी दाखविली तर बदल करणे/कचरा देवनागरी ओळी चिकटविणे सोपे होईल.
संपादकांना विनंती: "प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत." हा संदेश दाखविला जातो तेव्हा त्या प्रतिसादातील अक्षरांची टक्केवारी दाखविली तर बदल करणे/कचरा देवनागरी ओळी चिकटविणे सोपे होईल.

'उपयुक्त'चा अर्थ

मी उपयुक्तचा अर्थ उपयोगी किंवा फायद्याचा असा घेतला. यू़ज़फुल असा घेतला नाही. यूजफुलचा अर्थ इंडस्ट्रियली अप्लिकेबल (दॅट कॅन बी मेड अँड यूज़्ड इन द इंडस्ट्री) असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याचा उपयोग करता येईल असे. पण प्रत्येक उपयोग करता येण्यासारखा 'शोध' हा उपयुक्त किंवा उपयोगी किंवा फायद्याचा असेलच असे नाही. उदा. हा शोध बघा :

पेटंट अर्ज.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

पेटंट आहे एफडीए ऍप्रुवल नाही

पेटंट मिळाले म्हणजे उपयुक्तता सिद्ध होते का?

अजिबात नाही.

उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी एफडीएने कामधेनु अर्क हे औषध म्हणून मान्य करायला हवे.

या बातमीला भारतीय प्रसारमाध्यमातून अवास्तव महत्त्व दिले गेल्याचे दिसते आहे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

मान्यतेचा दावा आहे

नागपूरच्या गोविज्ञानानुसंधान केंद्राच्या संस्थळावर दिले आहे की महाराष्ट्र एफडीएची त्यांना मान्यता आहे. ते पारा, शिसे, आर्सेनिक, इ. घातलेल्या औषधांनाही मान्यता देतात. रोफेकॉक्स किंवा ('वैयक्तिक अनुभवांमुळे' प्रिय) फिनाईलप्रोपॅनॉलामिनला मान्यता कायम ठेवली की मात्र त्यांच्या नावे हे बोंब मारणार!

आयुर्वेद

एकदा औषधाला 'आयुर्वेद' हा शिक्का मारला की त्याची चाचणी घेण्याची गरज नसते असे मी वाचले होते.
त्यामुळे अगदी बहुराष्ट्रीय कंपन्या सुद्धा 'आयुर्वेदिक' फॉर्म्युलेशन म्हणून औषधे बाजारात आणू शकतात. आयुर्वेदात नसलेली नावे देऊन ती मार्केट केली जातात. औषधांचे नाव बदलायचे नाही आणि ती जुन्या आयुर्वेदिक ग्रंथातील फॉर्म्युलेशन प्रमाणे असली पाहिजेत असा काहिसा कायदा वा अमलबजवाणी केली जाते. मात्र हे पूर्णपणे केले जात नाही असे मला वाटते.

याशिवाय कित्येक आयुर्वेदिक औषधे ही वैद्यकीय दृष्ट्या औषधे नसतात. उदा. हळद, तुळस, आवळा, च्यवनप्राश इ. ही आपण औषध नसूनही खाऊ शकतो. अशा गोष्टीना 'डायेटरी सप्लिमेंट' म्हणून मान्यता आहे. यालाच पुरस्कर्ते मान्यता मिळाली असा दावा करतात. (येथे अनेक तज्ञ असल्यामुळे त्यांनी दुजोरा दिला नाही तर माझ्या आकलनात गफलत झाली असे मानीन.)

प्रमोद

पेटंट म्हणजे सिद्धता नव्हे

पेटंट हे कॉपीराईट चे समांतर समजले तर मुद्दा लक्षात येईल.
एखादे पुस्तक छापताक्षणीच त्याला कॉपीराईट मिळतो. कॉपीराईट मिळाला म्हणजे पुस्तक चांगले/दर्जेदार/उपयुक्त आहे असे सर्टिफिकेट नाही. तसेच पेटंट चे आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+१

+१
कॉपीराईटची उपमा सुयोग्य आहे.

यू.एस.पॅटंट ऑफिसाने दिलेले काही भन्नाट पॅटंट येथे सापडतील.

- - -

"पश्चिमेपेक्षा आधी भारतात सगळे-सगळे होते (या संदर्भात गोमूत्राला मान होता)" या भावनेमागे प्रगतिशील समाजाची सध्याच्या खालच्या आर्थिक स्थितीबाबत चीड असावी. हल्लीच्या प्रगतीमुळे दिसते की भारतीय प्रज्ञा मूलतः कमकुवत नाही. इतिहासातही प्रज्ञा कुठल्या-ना-कुठल्या बाबतीत कमकुवत नव्हती, हे नुसते समजून समाधान होत नाही. या क्षणी समोरचे अमेरिका/युरोपातले बोइंग/एअरबस विमान दिसते, त्याबद्दल चिडचीड होते आहे. म्हणून पूर्वी विमान होते, आमच्या पूर्वजांनी मुद्दामून/विस्मरणाने ते नष्ट केले असे काही समजल्यास दुखावलेल्या अभिमानावर मलम लागते.

त्याच भावनेची परिणती म्हणजे या असल्या पॅटंटांचा, युरोप-अमेरिकेतल्या बारीकसारीक भारतविषयक प्रशंसेचा वगैरे नि:संदर्भ उदो-उदो. "बघा, त्या मुजोर पाश्चिमात्त्यांनीही मान्य केले..." वास्तविक पाश्चिमात्त्यांनी काहीही मान्य केलेले नसते. कुठे भारताची, कुठे चीनची, कुठे आफ्रिकेची प्रशंसा करून "आमचा किती राष्ट्रांशी सलोखा" असे अधूनमधून दाखवण्यात त्यांची-त्यांचीच टिमकी वाजवत असतात.

माझ्या मते या असल्या बातम्यांकडे थोडेसे दुर्लक्ष करावे.

- - -

मूत्र हे जखमा स्वच्छ करायला थोडेसे उपयोगी असावे, असे फार पूर्वीपासून माहीत असावे. "करंगळी कापली तर त्यावर मुतणार सुद्धा नाही" अशी दुष्ट-कंजूष माणसाची नालस्ती आपण ऐकलेलीच आहे. जखम धुवायला मनुष्याचे ताजे मूत्र वापरता येते, अशी कल्पना ही म्हण बनताना/वापरताना होती, असे दिसते.

मानवमूत्राचा आरोग्यासाठी वापर भारतात दिसतो, परंतु ते वापरणार्‍या (मोरारजी देसाई वगैरे) लोकांबद्दल हसेच फार ऐकू येते. त्या मानाने गोमूत्राच्या वापराबद्दल हसे ऐकू येत नाही.

(डिस्टिलेशन/रेसिड्यू सुद्धा : जनावरांच्या मूत्रातून आरोग्यास उपयोगी पदार्थ बरीच दशके लोक काढत आहेत. उदाहरणार्थ, घोड्याच्या मूत्रातून एस्ट्रोजने. हे सर्व "प्रायर आर्ट" असावे असे मला वाटते. पॅटंट अर्ज लिहिताना बरीच हुशारी लागली असेल.)

नक्की?

हल्लीच्या प्रगतीमुळे दिसते की भारतीय प्रज्ञा मूलतः कमकुवत नाही.

थोडासा कंटेक्स्ट द्या. कारण, प्रगतीस सायबरहमाल कारणीभूत आहोत (टॅलीव्यतिरिक्त पाच अतियशस्वी भारतीय सॉफ्टवेअर सांगा). परदेशीचे उच्च शिक्षण अफर्मेटिव ऍक्शनखाली घडते (चूभूद्याघ्या). नोबेल?

पुढे चला...

पेटंटच्या पुढे जाऊन 'गोमूत्रात' असे कोणते घटक आहेत की, जे शरीराला उपयोगाचे आहेत किंवा नाही त्याच्यावर चर्चा करा राव...!

- दिलीप बिरुटे

आऊट ऑफ् स्कोप

पाणी, मीठ तर नक्कीच! :D
कृपया हे आणि हेही पहा.

धन्यवाद...

विषयासंबंधी असले तरी मूळ विषयावरुन दुवे दूर चालले आहेत असे वाटले या दुव्यात गोमूत्रात असलेले रासायनिक घटक आणि त्याचे फायदे वाचायला मिळतात. अर्थात अशा घटकांचे होणारे फायदे कोणी जाणकाराने सांगितले तर बरेच होईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

हो

विषयासंबंधी असले तरी मूळ विषयावरुन दुवे दूर चालले आहेत असे वाटले

:( पण त्यास मीही कारणीभूत आहे.

या दुव्यात गोमूत्रात असलेले रासायनिक घटक आणि त्याचे फायदे वाचायला मिळतात.

दुव्यावरील प्रतिक्रिया:घंटा!
म्हणूनच सोम्यागोम्यांच्या दाव्यांना संशोधन म्हणायचे नसते. त्यापेक्षा आमच्यावर पुरोहितशाहीचे आरोप परवडले.

अरेरे....!

>>>म्हणूनच सोम्यागोम्यांच्या दाव्यांना संशोधन म्हणायचे नसते. त्यापेक्षा आमच्यावर पुरोहितशाहीचे आरोप परवडले.

अरेरे...! म्हणूनच मला 'सोम्यागोम्यापेक्षा' कोणी जाणकारांनी 'रासायनिक घटकांबद्दल' काही माहिती सांगितली असती तर ती वाचायला आवडली असती.

-दिलीप बिरुटे

कसची माहिती?

अहो रासायनिक घटक नव्हे, मूलद्रव्यांची यादी आहे तेथे.
सगळे निराधार/खोटे दावे.

रासायनिक घटकः

"Urea CO(NH2)2 Affects urine formation and removal. Germicidal."
खोटे आहे.
"Uric Acid C5H4N4O3 Removes heart swelling or inflammation. It is diuretic therefore destroys toxins."
हे विधान तर धादांत खोटारडेपणा आहे. गाऊट या संधिवाताच्या प्रकारात युरिक आम्ल हेच विष शरिरात जमते.
"Carbolic acid HCOOH Germicidal, stops growth of germs and decay due to gangrene"
फिनेल म्हणतात याला. फॉर्म्युला तर फॉर्मिक ऍसिडचा आहे.
त्याचे जे प्रमाण जंतुनाशक ठरते त्या प्रमाणात प्यायल्यास माणूसच मरेल.
"Salt NaCl Decreases acidic contents of blood, germicidal"
पहिले वाक्य खोटे आहे. शिवाय मिठाचे जे प्रमाण जंतुनाशक ठरेल त्या प्रमाणात माणूसच मरेल. उलट गुळण्या करण्यासाठी खूप संपृक्त द्रावण लागते.
"Vitamins A,B,C,D,E Vitamin B is active ingredient for energetic life and saves from nervousness and thirst, strengthens bones and reproductive ingredient for energetic life and saves from nervousness and thirst, strengthens bones and reproductive power."
घंटा. ब जीवनसत्व गरम केल्यावर नष्ट होते वगैरे शाळेत शिकवितात.
"Lactose C6H12O6 Gives satisfaction., strengths heart, removes thirst and nervousness."
दुधात लॅक्टोज असते ठीक आहे पण मूत्रात? गायीला डायबिटिस झाला असेल!
"Enzymes Make healthy digestive juices, increase immunity"
निराधार.
"Water (H2O) . It is life giver. Maintains fluidity of blood, maintains body temperature"
ट्रिवियल.
"Hipuric acid CgNgNox . Removes toxins through urine"
खोटे.
"Creatinin C4HgN2O2 Germicide"
खोटे.
"Aurum Hydroxide AuOH It is germicidal and increases immunity power. AuOH is highly antibiotic and anti-toxic"
घंटा.

बास का?

तुम्हाला तज्ञांचे मत कशाला हवे? स्वतः बुद्धिप्रामाण्य वापरा की! त्यासाठी आवश्यक ज्ञान सार्‍यांकडे आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रासायनिक घटकांबद्दलच्या टिप्पण्यांबाबत सहमत

रासायनिक घटकांबद्दलच्या टिप्पण्यांबाबत सहमत.

(आणि हिप्प्युरिक ऍसिड आधी घोड्याच्या मूत्रात मोठ्या प्रमाणात सापडले होते, हे त्याच्या नावातच सांगितलेले आहे.)

(अबब! मूत्रात परिणाम साधेल इतके सुवर्णभस्म मिळते!!! धन्य आहे. प्रत्येक जेवण, प्रत्येक पेयपान सोन्याच्या ताटा-पेल्यांमधून केले, तरी फारसे सोने मूत्रात उतरणार नाही. सुवर्ण-भस्म खाल्ले तर मूत्रात सुवर्णभस्म सापडेल हे खरे आहे. कदाचित कोलार-खाणीतल्या मजुरांच्या मूत्रात सुवर्णभस्म सापडत असेल. तसेच काही गावातच्या पाण्यात आर्सेनिक असते, त्यांच्या मूत्रात आर्सेनिकचे भस्म सापडते. आणि आर्सेनिकचे भस्म बर्‍यापैकी विषारी असते, हे सांगणे नलगे. दुभत्या गाईच्या मूत्रांत सापडणार्‍या वेगवेगळ्या धातूंबद्दल सर्वेक्षणाचा अहवाल येथे मिळेल.)

पुन्हा एकदा धन्यु....!

आम्हाला जर या गोमुत्रातील घटकांचे फायदे तोटे कळले असते तर तुमच्या काथ्याकूटाच्या हाकेला 'ओ' दिली नसती. उदा. 'मॅग्नीज एम एन' शरिराला उपकारक असेल तर तर ते कसे उपयोगाचे आहे याचे ज्ञान आम्हाला नाही. पण ते घटक गोमूत्रात असून ते मानवास होणार्‍या 'क्षय रोगापासून' मानवाचे रक्षण करते असे कोणी म्हणत असेल तर कोणी तज्ञांनी त्यातला फरक समजून सांगितल्याशिवाय आम्ही त्यावर विश्वास कसा ठेवायचा. इथे माझे बुद्धीप्रामाण्य काय कामाचे ?

'खोटे खोटे' म्हणून एखाद्या गोष्टीला बळेच 'खोटे' ठरवता येणार नाही.चाचणी आणि वैज्ञानिक निष्कर्षेच काही तरी आश्वासक अशा ज्ञानाकडे घेऊन जातील यावर माझा विश्वास आहे.

-दिलीप बिरुटे

हेच म्हणतो

ते घटक गोमूत्रात असून ते मानवास होणार्‍या 'क्षय रोगापासून' मानवाचे रक्षण करते असे कोणी म्हणत असेल तर कोणी तज्ञांनी त्यातला फरक समजून सांगितल्याशिवाय आम्ही त्यावर विश्वास कसा ठेवायचा.

नाही ठेवायचा ना! त्यालाच मी बुद्धिप्रामाण्य म्हणालो.

बरं बाबा तुमचं खरं....!

>>>नाही ठेवायचा ना! त्यालाच मी बुद्धिप्रामाण्य म्हणालो.
बरं बाबा ! तुमचं खरं...!

-दिलीप बिरुटे

मजकूर संपादित.

असं नका करू

तुमचं खरं

अशाने बाबा वाक्यं प्रमाणं चा आरोप होतो आमच्यावर ;)

मँगनीज

मॅंगनीज हे क्षय रोगावर प्रतिबंधक असते की नाही याची मला कल्पना नाही. त्याची माहिती येथे मिळेल असे मी धरतो.

तुमचा मुद्दा मात्र योग्य आहे. तो असा की केवळ रिकामटेकडा यांनी दिलेल्या माहितीवर आणि धनंजय यांनी दुजोरा दिल्यावर विश्वास का ठेवावा? या ऐवजी मी तज्ञ म्हणून माहित असलेल्या एक संकेतस्थळ चालवत असलेल्या माणसावर का ठेऊ नये?

माझी अशाप्रकारे विश्वास ठेवायची एक पद्धत आहे. तुम्हाला पटली तर बघा. एखादी व्यक्ति त्या विषयात माझ्यापेक्षा जास्त शिकली असेल आणि त्याचे विधान माझ्या जीवनात फार परिणाम करणारे नसेल तर त्यावर निरपवाद विश्वास ठेवावा. माझ्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी असेल तर तशाच दुसर्‍या स्वतंत्र व्यक्तिचे मत जाणून घ्यावे. मतमतांतर नसेल तर विश्वास ठेवण्यास हरकत नाही. हे तत्व मी वैद्यक, सी.ए., वकील इत्यादी मंडळींबरोबर वापरतो आणि वैयक्तिक निर्णय घेतो. आता ज्यावेळी नुसत्याच ज्ञानाचा मुद्धा आहे आणि कुठला निर्णय घ्यायचा नाही आहे. तेंव्हा माझी निव्वळ संशयवादी भूमिका असते. खूप जाणकार लोकांचे मत जाणून घेणे त्यांच्यातील मतप्रवाह ओळखणे व क्वचित प्रसंगी मत बनवणे हा यातला एक भाग आहे.

या प्रमाणे जर मला गोमुत्रावर विश्वास ठेऊन तसा उपचार घ्यायचा असेल तर मी वैद्यक विषयातील मला माहित असलेल्या एका किंवा जास्त तज्ञ माणसाची मदत घेईन. याऐवजी जर मला नुसतेच गोमुत्राबद्दल जाणून घ्यायचे असेल तर मी माझ्या कुवतीप्रमाणे मतमतांतराचा मागोवा घेत राहीन. सद्यस्थितीत माझा कल गोमुत्राविरुद्ध आहे.

प्रमोद

करेक्ट...!

रिकामटेकडा यांनी दिलेल्या माहितीवर आणि धनंजय यांनी दुजोरा दिल्यावर विश्वास का ठेवावा ? या ऐवजी मी तज्ञ म्हणून माहित असलेल्या एक संकेतस्थळ चालवत असलेल्या माणसावर का ठेऊ नये?

करेक्ट...! खरे तर दोघांच्या मतांमुळेच मी गोमुत्र घेऊ नये या मतावर आलो आहे. नाही तर गोमूत्राचा घाणेरडा वास मला अडवू शकत नव्हता. मी त्यापूढचा प्रश्न विचारणार होतो की, गोमूत्राचा घाणेरडा वास जाण्यासाठी 'पेप्सी' किंवा 'थम्सअप' मधे गोमूत्र घेतल्याने गोमूत्रामधील कंटेंट्स कमी होतात काय ? पण मूळात चर्चेवरील माहितीपूर्ण प्रतिसादामुळे गोमूत्रात 'औषधी' म्हणून काही दम दिसत नाही. त्यामुळे यापुढे गोमूत्राचे 'गोझरण अर्क' वगैरे सारख्या औषधी तत्त्व असलेल्या जाहिराती, गोमूत्राचे तत्त्सम संस्थळावर कोणी सांगत असलेले महत्त्व, कोणी कितीही पटवून देत असेल तरी गोमूत्र घेऊ नये या मतावर मी आलो आहे. कारण मी दिलेल्या दुव्यांवरील माहितीपेक्षा त्यावर मत व्यक्त करणार्‍या दोघांपैकी मी एकाला बरा ओळखतो आणि त्यांच्या मतावर माझा विश्वास आहे. :)

धन्यवाद....!

-दिलीप बिरुटे

गोशाला

तुम्ही दिलेल्या दुव्यातील दावे अतिरंजित आहेत असे दिसते.
सर्व दोषांवर एक इलाज इतकेच नव्हे तर चिरतारुण्याचा एक उपाय गोमुत्र प्या.
असे असते तर इतर आयुर्वेदाचा पसारा निष्कारण म्हणायचा.

एखादा माणूस मला दोन दिवसात/महिन्यात/वर्षात पैसे दुप्पट करून देतो असे म्हणाला तर मी त्याच्या अर्थकारणाच्या खोलात न जाता काढता पाय घेतो. तसेच हे.

गोमुत्रातील सोडीयम (कुठल्या रुपात माहित नाही) रक्त शुद्ध करतो आणि अँटॅसिड म्हणून काम करतो असे तुमच्या दुव्यात लिहिले आहे. हेही तसेच.

प्रमोद

उत्तम

उत्तम आणि माहितीपूर्ण चर्चा (अजूनतरी :ड )... पण धाग्याचे नाव होमिओवेद असे का आहे हे कळले नाही.

बिपिन कार्यकर्ते

कारण

औषधाचे प्रमाण वाढविले की परिणाम कमी/उलटा होतो असाही एक दावा आहे.

धन्यवाद.

खुलाश्याबद्दल धन्यवाद. पण नीटसा कळला नाही त्यामुळे पटला नाही. असो. हे अवांतर ठरेल त्यामुळे इथेच थांबतो.

बिपिन कार्यकर्ते

अवांतर नाही

पेटंटमध्ये असा उल्लेख आहे की डिस्टिलेटचे प्रमाण कमी केल्यास औषधी परिणाम दिसतो/वाढतो. ते वाढविल्यास ऍन्टिबायोटीकना डिस्टिलेटची जी मदत होत होती ती कमी/नाहिशी/ऋण होते.
"औषधाचे प्रमाण वाढविले की परिणाम कमी होतो हे तत्त्व 'आयुर्वेदिक' कधीपासून झाले?" हे तत्त्व धन्वंतरीने हॅनेमानला सांगितले का? हा चर्चेचा एक विषय आहे.

माठ्या

हे घ्या काही हाय इम्पॅक्ट माणसांचे सर्टिफिकीट! आधीच फ्रान्सिस कॉलिन्स येऊन बसलाय, आता ह्यांचीच कमतरता होती.

घरचा आहेर :)

चांगला दुवा. रविवारची सकाळ मजेत गेली. साजूक तूप लावून एखादी चपातीही जास्त खाईन म्हणतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर