उपक्रम लेखकांसाठी सूचना-पुस्तिका : एक उत्क्रांतीचा प्रयोग

नुकतंच उपक्रमाच्या वाचकवर्गाविषयी प्राथमिक आकलन झालं. त्यातून वाचकवर्ग वाढवणे व वाचकांचा उपक्रमातला सहभाग वाढवण्याविषयी काय करावं असा प्रश्न उपस्थित झाला. एक सूचना अशी होती की लेखकांसाठी एक गाइड तयार करावं. ते कसं करावं व कोणी करावं, त्यात सर्व उपक्रमींना सहभागी कसं करावं याबाबत विचार करताना मला उत्क्रांतीच्या तत्त्वाचा वापर करून बघावा हे सुचलं. त्याप्रमाणे मी हा चर्चेचा प्रस्ताव मांडतो आहे. हा एक प्रयोग आहे - छोटे बदल करत वेगवेगळ्या प्रती निर्माण कशा होतात व 'योग्य' बदल कसे टिकून रहातात हे बघण्याचा. तेव्हा त्याचे विशिष्ट नियम मी मांडतो आहे. हे नियम सर्व चर्चांना असावेत असे सुचवत नाही. या प्रयोगात सर्वांनी सहभागी व्हावं असं वाटतं.

या चर्चेचे नियम
- काही विधानं मी प्रथम मांडेन. ही या गाइडची पहिली आवृत्ती . बदल होतील तसतशा नवीन आवृत्ती, शाखा तयार होतील.
- प्रत्येक विधान हे रंगसूत्र (chromosome), त्यातल्या शब्दरचना/वाक्यं ही गुणकं (genes), व संपूर्ण संच म्हणजे DNA
- प्रत्येक प्रतिसाद देणाऱ्याला एका वेळी एक विधान हवे तसे बदलता येईल. संपूर्ण खोडून नवे लिहायला परवानगी आहे. या बदलाने नवीन आवृत्ती तयार होईल.
- विधान बदलण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली कुठचीही आवृत्ती निवडता येऊ शकते.
- नवीन विधान घालायला बंदी आहे.
- प्रत्येक विधानाला शब्दमर्यादा आहे. ते एका ओळीपेक्षा लांब असू नये. (फाँट न बदलता) तेव्हा कोटांवर कोट वापरू नयेत.
- प्रत्येक विधान हे अर्थपूर्ण व वाचनीय असलं पाहिजे. रेझ्युमे प्रमाणे कळशब्दांची जंत्री नको. अनेक वाक्ये चालतील - पण शब्दमर्यादा पाळावी.
- या चर्चेच्या प्रत्येक प्रतिसादात फक्त नवीन आवृत्ती असेल. काय बदल केला हे रंग, ठळकपणा अगर अधोरेखनाने दाखवू नये..
- या चर्चेच्या प्रतिसादात कारण परंपरा, आपले विचार मांडणे, आधीचे खोडून काढणे, एकदम गांधीहत्येवर बोलायला लागणे वगैरे नको. इतर विचार व्यनीने कळवावे, खवत लिहावे, अगर नवीन चर्चा सुरू करावी.
- प्रत्येकाने एकापेक्षा अधिक वेळा बदल केलेले चालतील, पण बदल वारंवार करू नयेत. नाहीतर संपूर्ण DNA एका वेळी बदलला जाईल. अंतिम उत्तरासाठी याने फरक पडणार नाही, केवळ प्रक्रिया लांबेल.

(मी काही विधानं मुद्दाम अपुरी, अर्धकच्ची ठेवलेली आहेत, काही वादग्रस्त आहेत, काही वाक्यं अर्थ तोच ठेवून अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता येतील...)

काय होतंय पाहू....

विधाने

१. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या फेसबुकवरील मित्रांना सादर करावा.
२. छायाचित्रे व चित्रे यांना प्रतिसाद चांगला मिळतो. आपल्या लेखनात खिळवून ठेवणारे, वाचकाशी दुवा जोडणारे छायाचित्र वापरण्याचा प्रयत्न करावा.
३. लेखनात रोचकता निर्माण करण्यासाठी मुद्देसूद व थोडक्यात लेखन करावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणांनी वाचकाला अधिक आत्मीयता वाटते.
४. संदर्भ द्यावेत. वाचकाला विश्वास वाटावा याची काळजी घ्यावी.
५. वैचारिक लेखनात तांत्रिक शब्द व्याख्येचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय वापरू नयेत. त्याने निर्माण होणाऱ्या गोंधळातून प्रतिसाद/चर्चा भलत्याच ठिकाणी वाहावतात.
६. चर्चेचा प्रस्ताव मांडणाऱ्याने चर्चा योग्य मार्गावर आणण्याच्या नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना आपला प्रतिसाद लेखाच्या मूळ मुद्द्याला कितपत लागू पडतो हे पाहावे. जर तो इतर प्रतिसादांवरील, प्रतिसादांवर प्रतिसाद असेल, तर वाचकासाठी परिणाम कमी होतो.
८. प्रतिसाद मर्यादित ठेवावा - लेखाच्या सुमारे १/३ वा कमी. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, संदर्भ) विचार करावा.

Comments

१. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना सादर करावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

४. संदर्भ द्यावेत. सोप्या मराठी भाषेचा वापर करावा. वाचकाला विश्वास वाटावा याची काळजी घ्यावी.

प्रतिसाद-३

८. प्रतिसाद मर्यादित ठेवावा - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा.

प्रतिसाद-४

२. छायाचित्रे व चित्रे यांना प्रतिसाद चांगला मिळतो. आपल्या लेखनात खिळवून ठेवणारे, वाचकाशी दुवा जोडणारे छायाचित्र वापरण्याचा प्रयत्न करावा. चित्रे संदर्भ म्हणूनही परिणामकारक ठरतात.
३. लेखनात रोचकता निर्माण करण्यासाठी मुद्देसूद व थोडक्यात लेखन करावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणांनी वाचकाला अधिक आत्मीयता वाटते.
४. संदर्भ द्यावेत. सोप्या मराठी भाषेचा वापर करावा. वाचकाला विश्वास वाटावा याची काळजी घ्यावी.
५. वैचारिक लेखनात तांत्रिक शब्द व्याख्येचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय वापरू नयेत. त्याने निर्माण होणाऱ्या गोंधळातून प्रतिसाद/चर्चा भलत्याच ठिकाणी वाहावतात.
६. चर्चेचा प्रस्ताव मांडणाऱ्याने चर्चा योग्य मार्गावर आणण्याच्या नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना आपला प्रतिसाद लेखाच्या मूळ मुद्द्याला कितपत लागू पडतो हे पाहावे. जर तो इतर प्रतिसादांवरील, प्रतिसादांवर प्रतिसाद असेल, तर वाचकासाठी परिणाम कमी होतो.
८. प्रतिसाद मर्यादित ठेवावा - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, संदर्भ) विचार करावा.

नियमात बदल (सगळंच बदलत असतं...)

या चर्चेत विधानांमध्ये नक्की काय बदल झाले आहेत हे कळायला कठीण जात होतं असं माझ्या लक्षात आलं. नक्की कुठची आवत्ती निवडायची हे समजणं सोपं जावं यासाठी मी आत्तापर्यंतचे बदल ठळक केले आहेत. पुढचे बदलही ठळक करावे अशी विनंती आहे.

दुसरं एक सांगावंसं वाटतं की हा प्रयोग आहे. आपण भारतीय राज्यघटना पुन्हा लिहीत नाही आहोत. इतकंच काय प्रत्यक्ष अशी पुस्तिका असावी की नाही, तीत काय सूचना असाव्यात हे ठरवणं हे संपादकांचं काम आहे. आपला प्रयत्न फारतर पहिला चांगला मसूदा म्हणून वापरता येईल.

तेव्हा दणादण बदल करा.

राजेश.

प्रतिसाद-५

१. नवीन वाचक उपक्रमाकडे आणण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग सायटांचा वापर करावा. आपला वा आपल्याला आवडलेला लेख आपल्या अशा संकेतस्थळांवरील मित्रांना उपक्रमाच्या दुव्यासकट सादर करावा.
२. छायाचित्रे व चित्रे यांना प्रतिसाद चांगला मिळतो. आपल्या लेखनात खिळवून ठेवणारे, वाचकाशी दुवा जोडणारे छायाचित्र वापरण्याचा प्रयत्न करावा. चित्रे संदर्भ म्हणूनही परिणामकारक ठरतात. आकृत्या असल्यास त्यातील नावे शक्यतो मराठीत द्यावीत.
३. लेखनात रोचकता निर्माण करण्यासाठी मुद्देसूद व थोडक्यात लेखन करावे. विषयाचा आवाका मोठा असल्यास, लेखाला एकापेक्षा अधिक तर्कशुद्ध भागात विभागावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणांनी वाचकाला अधिक आत्मीयता वाटते.
४. शक्य असल्यास संदर्भ द्यावेत. शक्य नसल्यास संदर्भ नाहित असे स्पष्ट करावे. सोप्या मराठी भाषेचा वापर करावा. वाचकाला विश्वास वाटावा याची काळजी घ्यावी.
५. वैचारिक लेखनात तांत्रिक शब्द व्याख्येचं स्पष्टीकरण दिल्याशिवाय वापरू नयेत. त्याने निर्माण होणाऱ्या गोंधळातून प्रतिसाद/चर्चा भलत्याच ठिकाणी वाहावतात. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मुळ परभाषिक शब्द द्यावा.
६. चर्चेचा प्रस्ताव मांडणाऱ्याने चर्चा योग्य मार्गावर आणण्याच्या नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना आपला प्रतिसाद लेखाच्या मूळ मुद्द्याला कितपत लागू पडतो हे पाहावे. जर तो इतर प्रतिसादांवरील, प्रतिसादांवर प्रतिसाद असेल, तर वाचकासाठी परिणाम कमी होतो.
८. प्रतिसाद मर्यादित ठेवावा - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. फार मोठा प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो. नवीनच लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, संदर्भ) विचार करावा. अनुमोदन, खंडन, पुरवण्या, संदर्भ, सुचवण्या वगैरे देऊन लेखनास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

प्रतिसाद ६

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रतिसाद-६
१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. चित्रांना प्रतिसाद चांगला लाभतो. लेखनात चित्रे अवश्य वापरावी. ती परिणामकारक ठरतात. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा.विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. भाषा सोपी असावी. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. स्पष्ट व्याख्या दिल्याविना वैचारिक लेखनात तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होऊन चर्चा भलत्या दिशेला वाहावण्याचा संभव असतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. प्रतिसादावरील प्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, संदर्भ) विचार करावा. अनुमोदन, खंडन, पुरवण्या, संदर्भ, सुचवण्या वगैरे देऊन लेखनास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

उपक्रम आणि छायाचित्रे

२. छायाचित्रे व चित्रे यांना प्रतिसाद चांगला मिळतो. आपल्या लेखनात खिळवून ठेवणारे, वाचकाशी दुवा जोडणारे छायाचित्र वापरण्याचा प्रयत्न करावा.
उपक्रमवरील लेखात चित्र घालायचे असले तर ते फक्त जालावरून आयात करता येते. लेखकाच्या संगणकावरून चित्रे अपलोड करता येत नाहीत. माझ्या एका मित्रांनी याचे कारण उपक्रम जुना ड्रूपल प्लाटफॉर्म वापरते असे दिले. मला त्यातले काही कळत नसल्याने मी हे बरोवर की चूक ते सांगू शकत नाही. जर चित्रे अपलोड करणे शक्यच नसली तर हा मुद्दा काढूनच टाकणे आवश्यक ठरेल.
चन्द्रशेखर

प्रतिसाद ७

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेखनात परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे.
(३अ) सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी. ती वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा.

६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या व प्रतिसादातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा.

८.१

६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या व प्रतिसादातील चर्चाविषयाशी संबंधित आणि/किंवा चर्चेत सकारात्मक भर घालणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
६अ. प्रतिसाद देताना प्रस्तुत विषयाशी संबंधित नसलेले प्रश्न, अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ (उदा. "तुम्ही अमुक ठिकाणी अमुक चर्चेत अमुक म्हणाला होतात" किंवा "अमुक संकेतस्थळावर अमुक चर्चेत तुम्ही काहीच मतप्रदर्शन कसे केले नाही (!?!)" इ. :) ) इत्यादी टाळावे.
६ ब. प्रतिसादातील ६अ मध्ये लिहिल्याप्रमाणे असलेल्या गोष्टींना चर्चेच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून नम्र/विनयपूर्वक बगल द्यावी.

८.१.१

६अ. प्रतिसाद देताना प्रस्तुत विषयाशी संबंधित नसलेले प्रश्न, अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ इत्यादी टाळावे.
६ ब. प्रतिसादातील ६अ मध्ये लिहिल्याप्रमाणे असलेल्या गोष्टींना चर्चेच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून नम्र/विनयपूर्वक बगल द्यावी.
६क. लेखातील एखादाच आक्षेपार्ह शब्द पकडून चर्चा हायजॅक करू नये.

८ -२ (७ मध्ये बदल)

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेखनात परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी. ती वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा सुरू करताना उद्देश व मर्यादा आधी मांडाव्या. चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा.

९?

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे. मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये उपक्रमावरील लेखांचे संदर्भ असतील तेथे उपक्रमावरील लेखनाचा दुवा द्यावा. (विकिपीडियावर उपक्रमाविषयीची माहिती अद्ययावत करावी. (?))
२. लेखनात परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे.
(३अ) सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी. ती वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
८.१ लेखातील/चर्चाप्रस्तावातील त्रुटी/दोष इ. सौम्य शब्दांत दाखवून द्याव्यात जेणेकरून सकारात्मक बदल करण्यासाठी लेखकांना (विशेषतः नव्या सदस्यांना) प्रोत्साहन मिळेल.
८.२ चर्चेदरम्यान मतभेद सौम्य/शिष्टसंमत भाषेत मांडावेत (मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)

९. चर्चा सुरू करताना मर्यादा आधीच मांडाव्या.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा.

अवांतर - मस्त उपक्रम! :)

१० (अक्षय व नवीन यांचे बदल - दहा विधानांत बसवण्याचा प्रयत्न)

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा व इतर संस्थळांवर (उदा. मराठी विकिपीडिया) उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेखनात परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी. ती वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा सुरू करताना उद्देश व मर्यादा आधी मांडाव्या. चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.संबंधित आणि/किंवा सकारात्मक भर घालणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ टाळावे. सम्यक विचार करून एकाच शब्दाचा अगर मुद्द्यावरून चर्चा हायजॅक करू नये.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)

अजूनही काही ठिकाणी रिडंडंसी आहे. काही विधाने एका ओळीपेक्षा मोठी झाली आहेत. ती तूर्तास असू दे, पण शक्यतो शब्दसंख्येचं बंधन पाळावं. कोणी जर ही विधाने योग्य क्रमाने लावली (आकडे तेच ठेवून) तरीही ती जास्त परिणामकारक ठरू शकतील...

प्रतिसाद-११

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा व इतर संस्थळांवर (उदा. मराठी विकिपीडिया) उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेखनात परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी. आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळण्यासाठी प्रस्तावनेचा किंवा निवेदनाचा वापर करावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. संदर्भांनी लेखनाची विश्वासार्हता वाढते. डिस्क्लेमरची आवश्यकता भासल्यास त्याचा वापर करावा.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा सुरू करताना उद्देश व मर्यादा आधी मांडाव्या. चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.संबंधित आणि/किंवा सकारात्मक भर घालणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ टाळावे. सम्यक विचार करून एकाच शब्दाचा अगर मुद्द्यावरून चर्चा हायजॅक करू नये.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी नवीन लेख लिहावा.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)

हे काय चाललेय ?

हे प्रतिसाद निरनिराळे काय सांगत आहेत ? कृपया माझ्यासारख्या बाळबोध नवख्याला कोणी मार्गदर्शन करेल काय ? जा ठिकाणी एखादा शब्द बदलावयाचा असेल तर तेवढा बदल करावयाच्या ऐवजी सर्व लेखच पुनरावृत का केला जातो आहे ?
एखाद्या माहित नसलेल्या महानगरातील गर्दीच्या चौकात हरवलेला,
शरद

प्रयोग

या उपक्रमाचे दोन हेतू आहेत.
१. जमल्यास नवे लेखन स्टाईल गाईड करावे - व शक्यतो यात सर्वांचा सहभाग असावा
२. उत्क्रातीची प्रक्रिया कशी चालते हे समजावून घेण्यासाठी प्रत्येक प्रत म्हणजे डी.एन.ए., प्रत्येक विधान म्हणजे रंगसूत्र, व प्रत्येक वाक्य/महत्त्वाची शब्दसंगती म्हणजे गुणक (जीन) असे समजून छोट्या बदलांतून नवीन 'जीव' निर्माण होतो का, किंवा असलेला सुधारतो का हे पाहाणे. यासाठी मी मुद्दाम काही नियम घातलेले आहेत.

आत्तापर्यंत आलेल्या प्रतिसादांतून मूळात मी केलेल्या विधानांमध्ये खूपच सुधारणा झालेली दिसते आहे. न ते सर्वांनी मिळून केले आहे. तेव्हा संपादकांसाठी ते खात्रीने महत्त्वाचे ठरेल असे वाटते.
उत्क्रांतीविषयक ज्ञानाबाबतीत नक्की काय उद्भवले याचे मी विश्लेषण केलेले नाही.

अधिक माहितीसाठी या चर्चेचा प्रस्ताव पहावा.

राजेश

१०

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा इतर संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेख माहितिशीर / उपयुक्त असावा, जेणेकरुन अधीक आलेले वाचक टीकुन राहतील आणि उपक्रमाचा भाग बनतील. लेखनांत परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी किंवा पिकासा / फ्लिकर यांसारख्या संस्थळांचा दुवा द्यावा. दिलेल्या आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी. ती वाचकांना अधिक भावतात.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. वाचकांना विश्वास वाटेल याची दक्षता घ्यावी.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा सुरू करताना उद्देश व मर्यादा आधी मांडाव्या. चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.संबंधित आणि/किंवा सकारात्मक भर घालणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ टाळावे. सम्यक विचार करून एकाच शब्दाचा अगर मुद्द्यावरून चर्चा हायजॅक करू नये.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. कोणाचा मुद्दा योग्य ह्यापेक्षा कोणता मुद्दा योग्य ह्याकडे लक्ष केन्द्रीत करावे.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा कधी कधी लेखनाच्या रसग्रहणासाठी मारक ठरू शकतो.आशावेळी शक्यतो नवीन लेख लिहावा.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक सम्रुद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे).

१३

१. उपक्रमाकडे अधिक वाचक येण्यासाठी फेसबुकसदृश सुविधा वापराव्या. आवडलेले लेख अशा इतर संस्थळांवर उपक्रमाच्या दुव्यासह सादर करावे.
२. लेख माहितिशीर / उपयुक्त असावा, जेणेकरुन वाचकवर्गाला उपक्रमात रस निर्माण होईल आणि टिकेल. लेखनांत परिणामकारक चित्रे अवश्य वापरावी किंवा पिकासा / फ्लिकर/विकीमीडिया यांसारख्या संस्थळांचा दुवा द्यावा. दिलेल्या आकृत्यांत शक्यतो मराठी नावे असावी.
३. रोचकतेसाठी लेखन बिंदुगामी असावे. पाल्हाळ टाळण्यासाठी प्रस्तावनेचा किंवा निवेदनाचा वापर करावा. विषयाची व्याप्ती मोठी असल्यास, लेखाचे योग्य भाग पाडावे. सद्यस्थितीला अनुरूप उदाहरणे द्यावी.
४. शक्यतो संदर्भ द्यावे. शक्य नसल्यास तसे स्पष्ट करावे. संदर्भांनी लेखनाची विश्वासार्हता वाढते. डिस्क्लेमरची आवश्यकता भासल्यास त्याचा वापर करावा.
५. भाषा सोपी असावी. स्पष्ट व्याख्या दिल्याविना तांत्रिक शब्द वापरू नयेत. अन्यथा गोंधळ निर्माण होतो. नवा प्रतिशब्द असल्यास पहिल्या वापरावेळी कंसात मूळ शब्द द्यावा.
६. चर्चा प्रस्तावकाने चर्चा सुरू करताना उद्देश व मर्यादा आधी मांडाव्या. चर्चा योग्य मार्गावर आणण्याकरिता नम्र सूचना कराव्या.संबंधित आणि/किंवा सकारात्मक भर घालणार्‍या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अवांतर, व्यक्तिगत टिप्पणी किंवा सद्य विषयाला लागू नसलेले प्रस्तावकाविषयीचे संदर्भ टाळावे. सम्यक विचार करून एकाच शब्दाचा अगर मुद्द्यावरून चर्चा हायजॅक करू नये.
७. प्रतिसाद देताना तो लेखातील आशयाला कितपत लागू पडतो हे पाहावे. फक्त एखाद्या प्रतिसादालाच लागू असलेला उपप्रतिसाद कमी परिणामकारक ठरतो.
८. प्रतिसादलेखन मर्यादित असावे - अवांतर टाळावे किंवा मूळ मुद्द्यापासून वेगळे लिहावे. प्रदीर्घ प्रतिसाद हा लेखनाच्या रसग्रहणासाठी कधी कधी मारक ठरू शकतो. अशावेळी नवीन लेख लिहावा आणि अशा लेखात मूळ चर्चेचा किंवा लेखाचा दुवा द्यावा आणि नवीन चर्चा सुरू करण्याचे कारण द्यावे.
९. उपक्रम हे निव्वळ लेखनाचे नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. हे ध्यानात ठेवून वाचकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. प्रतिसाद व त्यांना दिलल्या उत्तरातून अनुभव अधिक समद्ध होतो.
१०. प्रतिसाद देताना लेखनाचा सर्वांगीण (शैली, मुद्दे मांडण्याची पद्धत, अनुमोदन-खंडन-ऊहापोह) विचार करावा. त्रुटी सौम्य शब्दांत दाखवाव्या. बदल सकारात्मक सुचवावे जेणेकरून लेखकांना प्रोत्साहन मिळेल.(मतभेद वैचारिक आहेत, व्यक्तिगत नाहीत हे लक्षात ठेवावे.)

फलित

प्रथम या उपक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. मी घातलेल्या विचित्र नियमांची कदर करून व काहीशा किचकट प्रकल्पात भाग घेऊन, सहज मागोवा न घेता येणाऱ्या बदलांत भर टाकलीत. यातून सर्वांची उपक्रमाचे लेखन सुधारावे यामागची कळकळ दिसते.

या चर्चेचं फलित म्हणजे नवीन तयार झालेला मसूदा. सहज नजर टाकली तरी सुरूवातीच्या प्रतीत व शेवटच्या काही आवत्त्यात खूप मोठा फरक आहे (शब्दसंख्या फक्त दीडपटच होऊन). उत्क्रांत झालेला डीएने हा निश्चितच अधिक प्रगत व सुधारलेला आहे. हा उपक्रम वरच्या लेखनाचा डीएने झाला तर एकंदरीत लेखनाचा जीव सकस व आकर्षक होईल अशी आशा वाटते. यात खूप लोकांचा हातभार लागलेला असल्याने त्याला बहुमताचे अधिष्ठान आहे असं वाटतं. तेव्हा संपादकांनी हा मसूदा योग्य प्रकारे सुधारून उपक्रमवर येणाऱ्या सदस्यांसाठी उपलब्ध करावा अशी विनंती आहे.

उत्क्रांतीच्या तत्वांचं प्रात्यक्षिक देण्याच्या उद्दीष्टाला मर्यादितच यश आलं असं म्हणावं लागेल. छोट्या फरकांनी मोठा बदल कसा होतो हे दाखवण्याची माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली. नवीन जीव हा नवीन प्रजातीतला नसून त्याच प्रजातीतला अधिक सक्षम प्राणी आहे. पण माझ्या डोळ्यापुढे जरा जास्तच महत्त्वाकांक्षी चित्र होतं. समांतर आवत्त्या, त्यांच्यात एकमेकांचे शब्द अथवा वाक्य घेऊन होणारं लैंगिक पुनरुत्पादन, नष्ट होणारी जनुकं यातून दाखवता येतील अशी आशा होती. ते होण्यासाठी हा प्रयोग मी योग्य रीतीने डिझाइन केला नाही असंच वाटतं. असो. काही तुटक चित्रं मी पुढच्या लेखांत दाखवीन. या संकल्पना सांगण्यासाठी काही बैठक तयार झाली, हेही नसे थोडके.

गाजराची पुंगी मोडूनच टाकायची झाली तर ज्यांनी प्रत्यक्ष लेखन केलं नाही त्यांनीही ही मार्गदर्शक तत्त्वं अनेक वेळा डोळ्याखालून घातली हाही एक फायदा आहेच.

पुन्हा एकदा धन्यवाद
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

गमतीदार

पण जैव (डीएनए) उत्क्रांतीसाठी हे मॉडेल तितकेसे ठीक नाही.

मूळ सूत्रांत येथे सहेतुक बदल झालेत, इथेच गडबड झाली. रंगसूत्रांत बदल निर्हेतुक असतात, आणि बदलांपैकी जे टिकतात, त्यांत सहेतुकतेचा आभास होतो.

"निर्हेतुक बदलांपैकी उपयोगी बदल तेच टिकणे" हे दाखवण्यासाठी प्रयोगात दोन गोष्टी हव्यात :
१. निर्हेतुक बदल मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणे
२. उपक्रम वाचकांनी अनुमोदन देऊन म्हणा, दुसर्‍या कुठल्या पद्धतीने म्हणा, दुष्ट बदल खोडून निघणे, आणि सुष्ट बदल टिकणे.

लेखातील नियमांमधून "रिकाँबिनेशन" वगैरे दिसण्याची अपेक्षा व्यवहार्य वाटत नाही.

बरोबर...

पण उद्देश कल्पना समजावून सांगण्याइतपत साधर्म्य निर्माण करणं इतकाच होता.

मूळ सूत्रांत येथे सहेतुक बदल झालेत, इथेच गडबड झाली. रंगसूत्रांत बदल निर्हेतुक असतात, आणि बदलांपैकी जे टिकतात, त्यांत सहेतुकतेचा आभास होतो.

- मान्य. कल्पना अशी होती की बदलांतून काय होतं ते दाखवायचं, व निर्हेतुक बदल सहेतुक बदलांना रिप्लेस कसे करू शकतात हे दाखवायचं

"निर्हेतुक बदलांपैकी उपयोगी बदल तेच टिकणे" हे दाखवण्यासाठी प्रयोगात दोन गोष्टी हव्यात :
१. निर्हेतुक बदल मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणे

- हेही मान्य. निदान हजाराच्या आसपास तरी (सहेतुक का होईना) बदल असायला हवे. त्याचं विश्लेषण म्हणजे महिन्याभराचा प्रोजेक्ट होईल...

२. उपक्रम वाचकांनी अनुमोदन देऊन म्हणा, दुसर्‍या कुठल्या पद्धतीने म्हणा, दुष्ट बदल खोडून निघणे, आणि सुष्ट बदल टिकणे.

शब्दसंख्येच्या अटीत हे गृहित होतं. प्रतिसाद संख्येमुळे गोची झालीच. पण शिवाय शब्दासारख्या विशविशीत माध्यमामुळेही प्रश्न निर्माण झाले. त्याऐवजी चहाची रेसिपी घेतली असती व आकडे बदलण्याची मुभा दिली असती तर ती जास्त सुटसुटीत व आकडेप्रधान झाली असती. ही मला वाटतं या प्रयोगातली सगळ्यात मोठी त्रुटी होती.

लेखातील नियमांमधून "रिकाँबिनेशन" वगैरे दिसण्याची अपेक्षा व्यवहार्य वाटत नाही.

नियमांत परवानगी होती, व मूळ प्रतीमध्ये त्यासाठी जागाही ठेवली होती. दोन विधानं चर्चा प्रस्तावकाविषयी बोलतात. एका पायरीत द्विरुक्ती व दुसऱ्या पायरीत एका विधानाचं पुनर्लेखन यातून ते झालं असतं. हे दोन जिवांमधलं नाही, तर याच जीवांतर्गत. दोन तीन आवृत्त्या झाल्यावर निश्चितच एकातले चांगले शब्द, वाक्प्रचार दुसऱ्यात आलेले दिसले असते. कदाचित इथे ते अगदी थोड्या प्रमाणात झालंही असेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

योग्य सुरुवात

हा प्रयोग म्हणजे योग्य दिशेने सुरुवात म्हणता येईल. अजून आवाका वाढवून, स्पष्टता, सुटसुटीतपणा, योग्य क्रम-वर्ग-वारी इ.भर घालावी लागेल. सध्याची ही एकच, काहीशी विस्कळीत, काहीशी मर्यादित यादी कच्चा माल म्हणून योग्य आहे. त्यावर आणखी काम होऊन समावेशक, बहुतेक सर्व साधारण प्रसंगात उपयोगी पडेल (उदा. प्रतिसाद लिहिताना, लेख लिहिताना, चर्चाप्रस्ताव लिहिताना इ. इ.) असे मार्गदर्शक काही बनवावे लागेल.

खूप लोकांचा हातभार लागलेला असल्याने त्याला बहुमताचे अधिष्ठान आहे असं वाटतं. तेव्हा संपादकांनी हा मसूदा योग्य प्रकारे सुधारून उपक्रमवर येणाऱ्या सदस्यांसाठी उपलब्ध करावा अशी विनंती आहे.

सहमत आहे. अंतिम मसुदा 'मार्गदर्शक तत्त्वे' वगैरे म्हणून कायमस्वरूपी दिसेल असा (लिंक स्वरूपात) उपलब्ध व्हावा.

याचे सदस्यांचे, सदस्यांसाठी, सदस्यांनी बनवलेले स्वरूप पाहून याची अंमलबजावणी केवळ संपादकीय/प्रशासकीय (उपक्रमावर 'व्यवस्थापकीय' ;)) जबाबदारी राहू नये असे वाटते. संपादकीय/प्रशासकीय जर काही असेल तर मुद्दामून ते न पाळण्याची ऊर्मी अनेकांना असते ;) अनेक चर्चास्थळांवर (प्रामुख्याने इंग्रजी संकेतस्थळांवर) सदस्य आपण होऊन मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातील यासाठी प्रयत्न करत असतात. स्वाक्षरीमधून याचा प्रसार करण्याची अक्षय यांची कल्पना याचे 'प्रॅक्टिकल' उदाहरण आहे. अश्या कल्पनांवर ब्रेन स्टॉर्मिंग झाले पाहिजे.

इतर संकेतस्थळांवरील मार्गदर्शक तत्त्वे, 'नेटिकेट्स' यांचाही आधार घेता येईल.

^ वर