ह्या मनूचा हा लोच्या कुणी समजावून सांगेल काय?

मनूने स्त्रियांना गुलाम करा असे म्हटले आहे, हा मनुस्मृती कधीही न वाचताच ऐकीव हिंदुविरोधी कम्युनिस्ट प्रचाराला बळी पडलेल्यांचा समज आहे. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' असे मनुस्मृतीत म्हटले आहे. काही पुरोगामी स्त्रिया, तर मनुस्मृती न वाचता पाच हजार वर्षांपूर्वी आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते असा आक्रोश करत असतात. प्रत्यक्षात मनू हा अतिशय समतावादी होता असे म्हणतात. उदाहरणार्थ मनूने म्हटले आहे :

  • अनुरूप वर मिळत नसल्यास मुलीचे लग्नच करू नये.
  • ज्या घरात स्त्री सुखी असते ते घरही सुखी असते.
  • स्त्री आणि लक्ष्मीत भेद नाही.

वरील वाक्ये वाचल्यावर मनू हा कम्युनिस्ट असावा की काय अशी शंका येते. तुमचे काय मत आहे? मनू हा पहिला कम्युनिस्ट होता काय? कारण दुसरीकडे मनूविरोधी

  • विधवेने जोगिणीचे आयुष्य कंठावे.
  • स्त्री परावलंबी असते. तिला बापावर, भावावर, नवऱ्यावर, मुलावर अवलंबून राहावे लागते. (थोडक्यात स्त्री अबला आहे)

असे मनूने म्हटले असल्याचे सांगतात.

ह्या मनूचा हा लोच्या कुणी समजावून सांगेल का?


१. मनूला विरोध करणारा तो कम्युनिस्ट अशी कम्युनिस्ट ह्या शब्दाची नवी सोपी व्याख्या दिसते.
२. एका संघिष्टाच्या शब्दांत, "केवळ 'फॉरिनचा' नवरा मिळाला म्हणून साधे शिक्षणाचे, नोकरीचे स्वातंत्र्य गमावून वर्षानुवर्षे एच फोर बांडगुळाचे आयुष्य जगणार्‍या मुली पाच हजार वर्षांपूर्वी आम्हाला व्यक्तीस्वातंत्र्य नव्हते असे या ओळीवरून वाटते असा नेहेमीप्रमाणेच एक पुस्तकही वाचायचे कष्ट न घेता आक्रोश करतात तेंव्हा तो हास्यास्पद वाटतो..."
३. विधुराने कसे जगावे हे बहुधा मनूने सांगितलेले नाही.
४. हा शब्द लवासाप्रेमी पत्रकार निळू दामले ह्यांच्याकडून साभार
लेखनविषय: दुवे:

Comments

व्यापक विषय

चांगला चर्चा प्रस्ताव! तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या जवळ नसली तरी ह्या प्रस्तावाच्या निमीत्ताने आणखी १-२ प्रश्नांची भर तुमच्या यादीत घालतो आहे.

'मनूस्मृती' 'वसिष्ठस्मृती' वगैरे स्मृती म्हणजे इस्लाम धर्मातील 'शरिया' प्रकाराशी साधर्म्य दाखवणार्‍या आहेत का? इस्लाममधे जीवन कसे जगावे ह्याची उत्तरे प्रथम कुराणात नंतर शरीयामधे आणि शेवटी स्वतःच्या बुद्धीला धरुन शोधावीत असे म्हणतात. तसेच हिंदू धर्मात प्रथम शृती (वेद) मग स्मृती आणि नंतर स्वतःच्या बुद्धीला धरुन शोधावित असे म्हणतात.

म्हणजेच मनुस्मृती हा हिंदूधर्माचा शरीया समजावा का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अकबर बादशहा

अकबर बादशहाच्याला आपल्या मुलींना अनुरूप नवरे मिळणे शक्यच नव्हते असे वाटत असे. त्यामुळे त्याने "अनुरूप वर मिळत नसल्यास मुलीचे लग्नच करू नये. " ही विचारसरणी अंगिकारली होती. ;-) त्यालाही मनुवादी म्हणून टाका एकदाचे.

चालू द्या.

औरंगझेबही मनुवादी

औरंगझेबही मनुवादी होता. झेबुन्निसानेही कुठे लग्न केले. एकंदर मोघल मनुवादीच होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुघल राजकन्यांना मुभा नव्हती

अकबराने आपल्या कारकिर्दित मुघल राजकन्यांना लग्न करण्यास मुभा नाही असा कायदा केला होता. अकबराच्या मुलींची नावे मला माहित नाहीत परंतु शहाजहानच्या मुली जहांआरा आणि रोशनआरा यांचे लग्न झाले नव्हते. झेबुन्निसा, झीनतुन्निसा आणि इतर औरंगझेब कन्यांचे लग्नही झाले नव्हते.

दारा शिकोहने जहांआराला वचन दिले होते की तो सम्राट झाला तर हा कायदा रद्द करेल पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

सर्वच मुघल राजे मनुवादी म्हणा. फक्त एक संस्कृत आणि हिंदु धर्म जाणता प्रकांड पंडित दारा वगळता. ;-)

असो. अकबराचे असा कायदा करण्यालायक नेमके काय झाले होते ते कोणाला माहित आहे का? मी विसरले आहे. काही म्हणता आठवत नाही.

फक्त अकबर बिरबलाच्या प्रसिद्ध कथांत बादशहा जावयांसाठी सूळ बनवण्याचा आणि सर्व जावयांना सुळी देण्याचा निश्चय केला होता आणि जोधा-अकबरमध्ये त्याचे आपल्या मेव्हण्याशी बरे नव्हते असे दाखवल्याचे आठवते.

जीवन कसे जगावे?

काही हजार वर्षापूर्वी कोणीतरी माणसाने, त्या कालातील जीवनपद्धती काय होती हे सांगितले म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे आज मी तीच जीवनपद्धती (जीवनाचे तत्वज्ञान नव्हे) स्वीकारणे ( माझा धर्म कोणताही असो) हा वैयक्तिक दुबळेपणा आणि गुलामगिरीच आहे. माणसाने स्वतंत्रपणे विचार करून स्वतःची जीवनपद्धती अंगिकारावी. असली जुनी बांडगुळे त्याज्य समजावी
चन्द्रशेखर

मनुस्मृती जशीच्या तशी वाचायला मिळेल?

माणसाने स्वतंत्रपणे विचार करून स्वतःची जीवनपद्धती अंगिकारावी. असली जुनी बांडगुळे त्याज्य समजावी

या विचाराशी सहमत.
मनुस्मती न वाचता त्यावर चर्चा घडत असेल तर ते धोक्याचेच आहे. धम्मकलाडू सुध्दा मनुस्मृतीची लेखनाला समर्थक ठरतील अशी दोनतीन वाक्ये देऊनच चर्चेची अपेक्षा करीत आहेत. मनुस्मृती कॉपीराईट च्या जोखडात नसेल तर उपक्रमवर किंवा धम्मकलाडू किंवा चर्चेत सहभागी अजून इतर कोणीतरी ती जशीच्या तशी (आमच्या विश्वासासाची कदर करुन) ब्लॉगवर टाकावी. धम्मकलाडूंच्या ओळींवर चर्चा करतांना मला पामराला त्यांच्या
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

या प्रश्नांचा भला धाक वाटतो. वाचनाचं सोडा हो पण हा माणुस आमचा पगार काढतो म्हणजे काय?

धाक

धाक कशाला?

मनुस्मती न वाचता त्यावर चर्चा घडत असेल तर ते धोक्याचेच आहे.

धम्मकलाडू सुध्दा मनुस्मृतीची लेखनाला समर्थक ठरतील अशी दोनतीन वाक्ये देऊनच चर्चेची अपेक्षा करीत आहेत.

वरील दोन वाक्यात विसंगती वाटते. मनुस्मृती वाचल्यानंतर समर्थन , विरोध, असहमती, अंशत: सहमती वगैरे बाबी उदभवणार आहेत.
धम्मकलाडुच्या सहीतील वाक्ये ही स्वगतार्थी आहेत. त्याचा धाक नको.

प्रकाश घाटपांडे

या पुर्वीची चर्चा

या पुर्वी उपक्रमावर मनुस्मृतीवर चर्चा झाली होती. मला तर मनुस्मृती हा विषय शहरात आल्यावर समजला. तोही आंबेडकरी चळवळी मुळे. स्मृती श्रुती पुराणोक्त फलप्राप्तर्थ्यम | असे काही श्राद्ध पक्ष श्रावणी ऋषीपंचमी अशा वेळी वारंवार उच्चारले जाणारे शब्द कानात घुमतात.
प्रकाश घाटपांडे

कोणत्या मनूबद्दल चर्चा चालू आहे

मानव जातीचा मूळ पुरुष म्हणजे मनु, स्वायंभुवम मनु, प्राचेतस मनु. बह्मदेवाचा शिष्य मनु.
वरील पैकी कोणी वरीजनल मनुस्मृती लिहिली आहे ? माहिती मिळेल का ?

-दिलीप बिरुटे
[अंदाजपंचे]

सुपरस्क्रिप्ट

सुपरस्क्रिप्टमधील चार हा आकडा कुठे आहे?

(या चर्चेतले इतकेच कळलेला)
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

हॅहॅहॅ!!!

मी पण तुमच्याच बोटीत आहे साहेब.

मी खूप बारकाईने शोधले तेव्हा असे लक्षात आले की २ हा आकडा रिपिट झालाय. म्हणून ४ चा ३ झालाय

बिपिन कार्यकर्ते

वाचून- न वाचता

लेखात मांडलेली मतेसुद्धा बहुतेक मनुस्मृती (किंवा त्यासंबंधी पुस्तके*) न वाचताच लिहिलेली आहेत असे दिसते.

क्ष हजार वर्षांपूर्वी स्त्री स्वातंत्र्य नव्हते याबद्दल कोणी शोक करणार नाही. आक्षेप या लेखाप्रमाणेच 'मनु समतावादी होता' असे म्हणणार्‍यांविषयी आहे.

*माझे मनुस्मृती विषयक ज्ञान नरहर कुरुंदकर यांचे मनुस्मृतीवरील पुस्तक व आ ह साळुंके यांचे मनुस्मृती समर्थकांची संस्कृती या दोन पुस्तकांपुरतेच मर्यादित आहे.

सविस्तर प्रतिसाद नंतर देईन.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बेलाशक

लेखात मांडलेली मतेसुद्धा बहुतेक मनुस्मृती (किंवा त्यासंबंधी पुस्तके*) न वाचताच लिहिलेली आहेत असे दिसते.
बेलाशक. माझी ही मते अतिशय 'ओरिजिनल' आहेत. सविस्तर आतुरतेने प्रतिसादाची वाट पाहतो आहे.

प्रत्येक शोषणवादी व्यवस्था आपली पकड राखण्यासाठी काळानुसार स्ट्रॅटेजिक लवचिकता धारण करत असते. हा प्रकार वेगळा नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मनुस्म्र्तीचा अनुवाद

वे.शा.सं. बापटगुरुजींनी भाषांतरीत केलेली मनुस्मृती गजानन बुक डेपोने छापली आहे आणि उपलब्ध आहे.
हा अनुवाद जवळपास ८० वर्ष जुना आहे. हा वाचल्यास बराच उलगडा होऊ शकतो.
आमच्या मराठी पुस्तके प्रकल्पासाठी या पुस्त्काच ई-प्रकाशन करायचा बेत आहे. त्यानंतर बराच प्रकाश पाडता येईल.

या पुस्तकावद्दल मी काही वर्षांपूर्वी लिहीले होते. पण ते सध्या ई-स्वरुपात नाही. माझे मत काही फारसे चांगले नाही. आसपासचे श्लोक वाचले की कळते 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या शेजारीच त्याविरुद्ध लिहिलेले आढळते.

प्रमोद् सहस्रबुद्धे

केलात की येथे कळवा

आमच्या मराठी पुस्तके प्रकल्पासाठी या पुस्त्काच ई-प्रकाशन करायचा बेत आहे. त्यानंतर बराच प्रकाश पाडता येईल.

वाचण्याचा मानस आहे.

हा घ्या लोच्या

धम्मकलाडू यांना माझ्याप्रतिसादाची सविस्तर प्रतीक्षा आहे हे वाचून आनंद झाला.

आद्य कम्यूनिस्ट मनूचे जे समतावादी आणि स्त्रीस्वातंत्र्यवादी विचार आहेत त्यापैकी काही खाली देत आहे.
(टीपः आत्ता माझ्याकडे कुरुंदकरांचे पुस्तक नाही पण डॉ आ ह साळुंखे यांचे आहे. त्यातून हे श्लोक घेतले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे साळुंख्यांनी हे मूळ संस्कृत श्लोक पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत. माझ्या संस्कृतच्या तुटपुंज्या आकलनानुसार त्या श्लोकांचा अर्थ खाली दिल्याप्रमाणेच साधारन आहे हे मी व्हेरिफाय केले आहे)

कन्येच्या जाणत्यापित्याने अणुभरही द्रव्य घेऊ नये, लोभाने शुल्क घेणारा अपत्याची विक्री करणारा ठरतो (३. ५१) कन्यादान मात्र 'सालंकृत' करायचे आहे.
मनुस्मृतीत स्त्रियांची पूजा करण्याविषयी जो श्लोक धम्मकलाडू यांनी वर दिला आहे त्यातील "पूजा" या शब्दाचा अर्थ मानसन्मान देणे असा नसून वस्त्रालंकार देणे असा आहे. म्हणजे आपण आचार्य / गुरू इत्यादींची पूजा करतो तेव्हा त्यांना मान देतो त्यांच्या सल्ल्यानुसार आचरण करतो. तसे काही अभिप्रेत नाही.
जर स्त्रीला आकर्षक बनवले नसेल तर ती स्त्री पुरुषाला आनंदित करू शकत नाही आणि पुरुष आनंदी नसेल तर तो प्रजननास उद्युक्त होत नाही (३.६१-६२)

एका पुरुषाची साक्ष चालेल पण चारित्र्यसंपन्न असलेल्या अनेक स्त्रियाम्ची साक्ष चालणार नाही (८.७७)
स्त्रीधनापैकी एक पैसाही पतीच्या परवानगीशिवाय खर्च करू नये (९.१९९)
स्त्रीच्या विवाहाखेरीज दुसर्‍याकोनत्याही संस्काराच्या वेळी वैदिक मंत्र म्हणायचा नाही (३.१२१)
ज्या यज्ञात स्त्रीने आहुती दिली असेल त्या यज्ञात ब्राह्मणांनी भोजन करू नये (४.२०५)
असा यज्ञ सज्जनांच्या वैभवाचा नाश करनारा आणि देवांना प्रतिकूल असतो (४.२०६)
ज्या स्त्रिया आहुती देतात त्या नरकात पडतात आणि ज्याच्या वतीने देतात तोही नरकात पडतो (११.३७)
अग्निहोत्रामध्य कन्येने वा युवतीने आहुती देऊ नये (११.३६)

पती कामतृप्तीसाठी दुसर्‍यास्त्रीकडे गेला असता स्त्रीने तीन वर्षे वाट पाहून मग त्याच्याकडे जावे (९.७६)
पत्नी अप्रिय बोलली तरी पतीने लगेच दुसरे लग्न करावे (९.८१)
पती चारित्र्यहीन असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी (५.१५४)
पत्नी आधी मरण पावली तर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला अग्नी देऊन पुन्हा लग्न करावे (५.१६८)
पतीचा मृत्यू झाल्यावर पत्नीने शरीर सुकवून आयुष्य घालवावे पन दुसर्‍या पुरुषाचे नावही घेऊ नये (५.१५७)
पत्नीला विकले किंवा टाकून दिले तरी ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही (९.४६)
विवाहविधीमध्ये शास्त्रात विधवेचा पुनर्विवाह कोठेही सांगितलेला नाही (९.६५)
पाणिग्रहणाचे मंत्र कन्यांसाठीच आहेत अकन्यांसाठी (एकदा लग्न होऊन गेलेल्याम्साठी) नाहीत (८.२२६)
कन्या एकदाच दिली जाते (९.४७)

स्त्री ही रत्नासारखी असते असे एक वचन आहे. त्याचा खरा अर्थ 'रत्नांचा संग्रह कुठूनही करावा' हे वाचले की लक्षात येतो.

सध्या बहुधा एवढे पुरेसे व्हावे.
धम्मकलाडू आणि तत्सम सर्व मनुस्मृतीसमर्थकांना मी उल्लेखिलेली दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनाहूत सल्ला.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कन्या एकदाच दिली जाते - कोणाला?

माझ्या संस्कृतच्या तुटपुंज्या आकलनानुसार त्या श्लोकांचा अर्थ खाली दिल्याप्रमाणेच साधारन आहे हे मी व्हेरिफाय केले आहे

धन्यवाद. अन्यथा, दुय्यम स्रोताचा कायदा तुम्हालाही लागू होता. ह. घ्या.

कन्या एकदाच दिली जाते (९.४७)

म्हणजे बहुधा कन्या एकदाच दिली जाते - लग्नात, असे असावे. लग्नाशिवाय कन्या अनेकांना देता येते असाही त्याचा अर्थ होऊ शकेल. किंबहुना, तसा अर्थ आपल्या पूर्वजांनी आधीच काढला असावा.

संदर्भ -

१. कुंतीभोजाने तरुण कुंतीला दुर्वासांच्या सेवेला धाडणे आणि दुर्वासांनी तिला पाच देवांच्या वशीकरणाचा मंत्र देणे.
२. महाभारतातील माधवीची कथा
३. द्रौपदीची कथा (द्रुपदाने तिचे कन्यादान होलसेलमध्ये केले का ते माहित नाही.)
४. सत्यवतीची कथा
५. अप्सरांबद्दल न बोलणे योग्य. त्यांना मानवी (म्हणजेच मनुचे) कायदे लागू नाहीत. ;-)

शोधले तर आणखीही संदर्भ मिळावेत. असो.

पत्नीला विकले किंवा टाकून दिले तरी ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही

हरिश्चंद्र आणि युधिष्ठीर दोघेही मनुस्मृती कोळून प्यालेले असावेत.

विवाहविधीमध्ये शास्त्रात विधवेचा पुनर्विवाह कोठेही सांगितलेला नाही

पण विधवेला पुत्रप्राप्ती झाली तर चालत असावी. अंबिका अंबालिकांप्रमाणे.

कायद्यातून पळवाटा कशा शोधाव्यात त्याचीही अनेक उदाहरणे मिळतील.

मनुस्मृतीचा काळ नेमका कोणता असावा असा एक प्रश्न पडला. बहुधा, मनुच्या नावावर मध्ययुगात किंवा तत्पूर्वीच्या काळात कोणीतरी भरभक्कम बिल फाडले असावे असे वाटते आहे.

कन्या'दान'

हा हा हा. दुय्यम स्रोताचा कायदा माहिती असल्यानेच ती टीप दिली होती. (आता तपासायची गोष्ट म्हणजे साळुंख्यांनी मनुस्मृतीत नसलेलेच श्लोक किंवा बदललेले श्लोक तर दिले नाहीत? ते काम इतरांवर सोपवावे हे बरे).

कन्या एकदाच दिली जाते हे विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भात म्हटले आहे. त्याचा संदर्भ कन्यादान या विधीशी असावा. कन्यादान एकदाच होते म्हणजे विवाह (स्त्रीचा) एकदाच होऊ शकतो असे म्हणायचे असावे.

लग्नाशिवाय तर देता येतच होत्या. कारण कन्या ही एक मालमत्ताच समजण्याची पद्धत होती.

द्रुपदाने होलसेल कन्यादान केले नसावे कारण लग्न करून घरी येऊन कुंतीने 'वाटून घ्या' सांगेपर्यंत अर्जुन आणि द्रौपदीचे लग्न झाले आहे अशी द्रुपद, द्रौपदी, अर्जुन यांच्याबरोबरच धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांचीही समजूत होती. त्यानंतरही 'वाटून घ्या' या विषयात द्रौपदीचे मत घेतले असावे असे वाटत नाही. (द्रौपदीखेरीज बाकीच्यांचेही मत घेतले नसावेच).

@मनुस्मृतीचा काळ- मौर्य साम्राज्यातील ब्रुहद्रथ (?) या राजाला मारून पुष्यमित्र शुंग हा त्याचा ब्रह्मण मंत्री राज्यावर बसला त्यानंतरच्या काळात इ. पू. २०० ते इ. स. २०० या काळात मनुस्मृती लिहिली गेली असावी. मनुस्मृती ही जवळजवळ आजच्या स्वरूपात इ. स. ६०० पासून आहे असे मत पां वा काणे यांनी व्यक्त केल्याचे साळुंखे म्हणतात. कुरुंदकरांनीही असेच म्हटल्याचे स्मरते.
(साळुंख्यांनी दाखविलेली अजून एक गोष्ट म्हणजे याच काळाच्या थोड्याच पूर्वी लिहिला गेलेला कौटिल्याचा ग्रंथ मात्र इतका दुष्ट नाही).

गंमतीची गोष्ट म्हणजे असले काही वेदांमध्ये लिहिलेले नसावे; तरी आमचा धर्म "वेदांवर आधारित" असल्याचे हिंदू मानत असतातच.नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

होलसेल कन्यादान

द्रुपदाने होलसेल कन्यादान केले नसावे कारण लग्न करून घरी येऊन कुंतीने 'वाटून घ्या' सांगेपर्यंत अर्जुन आणि द्रौपदीचे लग्न झाले आहे अशी द्रुपद, द्रौपदी, अर्जुन यांच्याबरोबरच धर्म, भीम, नकुल आणि सहदेव यांचीही समजूत होती. त्यानंतरही 'वाटून घ्या' या विषयात द्रौपदीचे मत घेतले असावे असे वाटत नाही. (द्रौपदीखेरीज बाकीच्यांचेही मत घेतले नसावेच).

तसे नाही. द्रौपदी विवाह आणि तत्कालीन राजकारण हा लेख वाचा. पाचांशी लग्न स्वतः द्रुपदाने लावून दिले. माझा वरील प्रतिसाद टवाळखोर आहे पण हा लेख टवाळखोर नाही हे.वे.सां.न.ल. :-)

तूर्तास

धम्मकलाडू आणि तत्सम सर्व मनुस्मृतीसमर्थकांना मी उल्लेखिलेली दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनाहूत सल्ला.
तूर्तास तुमचा अनाहूत सल्ला स्वीकारतो आणि मला तत्सम मनुस्मृतिसमर्थकांच्या रांगेत बसविल्याबद्दल मी तुमचा निषेध करतो. वेळ मिळेल तसा सविस्तर प्रतिसाद देईनच. पण एकंदरच मनू हा स्त्रीमुक्तिवादी नव्हता, आद्य कम्युनिस्ट नव्हता, समतावादी नव्हता हे स्पष्ट होत असल्यामुळे मी थोडासा निराशच झालो आहे. माझ्या संघिष्ट मित्राला तुमची यादी पाठवायला हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्त्री स्वातंत्र्य..

स्त्री स्वातंत्र्याची भारतातली दारूण अवस्था लक्षात येण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वीचा मनु कशाला वाचायला हवा? जयवंत दळवींच्या "आत्मचरित्राऐवजी" मध्ये त्यांच्या एकत्र (सधन) कुटुंबातल्या बायकांच्या हलाखीचं वर्णन केलेलं आहे. विसाव्या शतकातली परिस्थिती डोळे उघडणारी आहे.
माझ्याकडे कुठे तरी पुस्तकांच्या पसार्‍यात मनुस्मृतीचं भाषांतर - मनुला वंदनीय मानणार्‍याने केलेलं - आहे. ते वाचून काही वर्षं झाली. त्यात कुरूंदकरांनी आक्षेपार्ह म्हणून दिलेले बहुतेक श्लोक सोयीस्करपणे गाळलेले आहेत... तरी जे शिल्लक आहे ते शहारे आणणारं आहे.
एकविसाव्या शतकात जग किती सुंदर आहे याची कधी कधी आपल्याला कल्पना येत नाही...
miles to go...

गरज

>>स्त्री स्वातंत्र्याची भारतातली दारूण अवस्था लक्षात येण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वीचा मनु कशाला वाचायला हवा?

तो न वाचल्यामुळे मनु समतावादी होता (आणि परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांवर बंधने लादावी लागली) असे 'समज' जाणीवपूर्वक निर्माण केले जाऊ शकतात.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आसपास बघितले तरी दिसेल

खरे तर दळवींचे आत्मचरित्रही वाचायची गरज नाही. डोळे उघडे ठेवून आसपास बघितले तरी ही हलाखी दिसेल. मुद्दा तो नाहीच. असे असले तरीही काही बाबतीत विसाव्या शतकाच्या शेवटच्या काही दशकांतले जग सुंदर होते व एकविसाव्या शतकातले जग अतिशय सुंदर आहे ह्याबाबत वादच नाही. कारण एवढी समानता, एवढ्या शक्यता, एवढी संधी माणसाच्या इतिहासात कधी उपलब्ध नसावी. (ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी मानवनिर्मित समस्या बघितल्या तर सध्याचे हे जग कुरूपही आहे. येणाऱ्या पिढ्या कदाचित म्हणतीलही, "इट वॉज द बेस्ट ऑफ़ टाइम्ज़. इट वॉज़ द वस्ट ऑफ टाइम्ज़..." पण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.)

चर्चाप्रस्तावात मला म्हणायचे होते की, अजूनही काही नव-पुराणमतवादी "आपली भारतीय संस्कृती किती थोर" ह्या रम्य देखाव्याच्या निर्मितीसाठी प्राचीन ग्रंथांतल्या सोयीच्या ओळींची मदत घेत असतात. पण थत्त्यांनी दिलेल्या ओळींसारख्या ओळी मात्र ही मंडळी सोयीस्करपणे विसरत असतात. कारण कसेही करून त्यांना, स्वतःच्या समाजापुरती तरी, जुनी व्यवस्था टिकवायची आहे.ही मंडळी नोस्टॅल्जिक आहेत.

थोडक्यात हे नवमनुवादी, मनुस्मृतिसमर्थक मनूसारखेच आहेत. दुतोंडी किंवा काँडिसेंडिंग. मला जे म्हणायचे आहे ते प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांनी नेमके लिहिले आहे. की "'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' च्या शेजारीच त्याविरुद्ध लिहिलेले आढळते."

जाता-जाता मनुस्मृतीतली स्त्रियांना कमी लेखणारी आणखी काही वाक्ये बघा:

५.१४७
बालया वा युवत्या वा वृद्धया वा-अपि योषिता | न स्वातन्त्र्येण कर्तव्यं किं चिद् कार्यं गृहेष्व् अपि ||
[लहान मुलगी असो, तरुण स्त्री किंवा वृद्धा, कुठल्याही स्त्रीला, अगदी स्वतःच्या घरातही, स्वतंत्रपणे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य नाही.]

५.१४८
बाल्ये पितुर् वशे तिष्ठेत् पाणिग्राहस्य यौवन | पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत् स्त्री स्वतन्त्रताम ||
[स्त्रीने लहानपणी (लग्नापूर्वी) पिता, लग्नानंतर पती, पतीच्या मृत्यूनंतर पुत्र अवलंबून असायला हवी. स्त्रीने कधीच स्वतंत्र असू नये.] **

**भाषांतर इंग्रजीवरून केले आहे. दोष आढळल्यास जाणकारांनी ते दूर करावेत, ही नम्र् विनंती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

१००%मान्य!

थत्ते व धम्मकलाडूंनी दिलेलं कारण पूर्णपणे पटलं. स्त्रियांची परिस्थिती वाईट आहे हे सिद्ध करायचे नसून तिचे मूळ आपल्या धर्मग्रंथातच आहेत हे सिद्ध करायचं आहे.

नव-पुराणमतवादी "आपली भारतीय संस्कृती किती थोर" ह्या रम्य देखाव्याच्या निर्मितीसाठी प्राचीन ग्रंथांतल्या सोयीच्या ओळींची मदत घेत असतात.

हा आटापिटा सोडून "पूर्वजांनी काही (किंवा बर्‍याच) वाईट गोष्टी केल्या. आम्ही त्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत." अशी भूमिका घेतली तर दवडली जाणारी बरीच वाफ सत्कारणी लावता येईल.

राजेश

विधवा आणि विधुर्

मनुस्मृतीचा विधवांना उपदेश

स्त्रीने पातीनिधानानान्तारही त्याला अप्रिय कृत्य करू नये

खामाशील असावे ,नियाम्शील ,ब्रह्मचारी रहावे
पुत्र प्रप्तीसाठीही परपुरुषाची अपेक्षा करू नये

अध्याय ५ श्लोक १५६ ते १६० ( महाभारत काळात बहुधा मनुस्मृती मानत नसावे )

मनुस्मृतीचा विधुरांना उपदेश

पत्नी गेल्यावर पुरुषांनी तिचे यथाविधी दहन करून गृहस्थास्राम चालवण्यासाठी पुन्हा विवाह करावा

अध्याय ५ व श्लोक १६८

 
^ वर