उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
भातुकली निघाली अमेरिकेला !
सृष्टीलावण्या
June 23, 2009 - 11:09 am
आमच्या १४ विद्या आणि ६४ कला ह्या संस्थेतर्फे, संस्थापक श्री. संजय पेठे ह्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे श्री. करंदीकर ह्यांचा दुर्मिळ १५००+ भातुकलीचा संसार अमेरिकेला चालला आहे. प्रत्येक अनिभा ने पाहिलेच पाहिजे असे हे प्रदर्शन आहे. त्यासाठी अमेरिकेतील प्रत्येक अनिम माणसाने एका तरी गैर- महाराष्ट्रीय व्यक्तीला घेऊन हे प्रदर्शन पाहायला जायलाच हवे. कारण भातुकली हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे.
दुवे:
Comments
भातुकलीमधील खेळण्यांसंबंधी
अधिक येथे वाचा.
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।
भातुकली
छान. मला वाटले शेवटी हादडायला काही तरी ठेवले असेल !
(दाण्याचा लाडूही आवडीने खाणारा)
शरद
लहान मुलांना आवडतील
अशी खास काही भातुकलीची खेळणी त्या प्रदर्शनात हाताळायला देतात आणि थोडा खाऊ पण :)
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।
अभिनंदन!
"भातुकली " हे नुसते खेळणे नसून एका अख्ख्या काळाचे छायाचित्र आहे असे म्हणावेसे वाटते
मधे या उपक्रमाबद्दल कुठल्याशा मासिकात वाचले होते.. असे प्रदर्शन शालेय विद्यार्थांना दाखवावे म्हणून पालकांनी शाळांच्या मागे लागले पाहिजे / स्वतः मुलांना दाखवले पाहिजे (शाळांबरोबर अशासाठी की चार पोरांच्या नादाने प्रत्येकाचा इंटरेस्ट वाढतो)
भातुकलीचा उपक्रम राबविणार्यांचे अभिनंदन!
ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्याच्या त्या प्राथमिक चुका
खरे आहे,
त्या विषयावरची आपली लेखमाला पण वाचनीय आहे.
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।
नव्या पिढीतली भातुलकी
आज शहरात राहणार्या लहानग्यांच्या भातुकलीत गॅस, मिक्सर, ओव्हन वगैरे गोष्टी असतात. चूल, शेगड्या, उखळ, मुसळ वगैरेंच्या सोबतीला या प्रतिकृती ठेवल्या तर पहाणार्या मुलांना त्या जुन्या काळातल्या वस्तूंचा उपयोग समजायला कदाचितसोपे जाईल.
सुंदर
अजुन फोटो दाखवा ना!
आम्ही इथे भारतातच असतो, पण 'हे' कानावर नव्हते आले.
संसार परत भारतात येणार आहे का?
कुठे पाहावा हे जरा या इथेच लिहा ना कृपा करुन.
फोटो
बरेच आहेत. पण ते उर्ध्वभारित करणे आणि त्याचे इथे दुवे देणे कंटाळवाणे काम आहे. :(
असो. जे ऑर्कुटवर माझ्याशी जोडलेले आहेत त्यांनी ते तिथे फोटो सेक्शन मध्ये पाहावेत. :)
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।
छान चित्रे
त्यातही पितळ्याचे जाते बघून गंमत वाटली. बाहेरून लखलख पितळ आणि आतमध्ये दळण्यासाठी दगडाची चक्रे, अशा प्रकारची मोठी जाती सुद्धा कधी काळी उपलब्ध होती का?
नाही.
पूर्वी भातुकलीचा पितळेचा, लाकडाचा स्वतंत्र संच असे ज्यात सर्वच भांडी / खेळणी त्याच मालाची बनविण्यात येत असत. काही श्रीमंतांकडे चांदीची पण भातुकलीची भांडी होती.
--------------------------X--X-------------------------------
आला पह्यला पाऊस,
शिपडली भूई सारी,
धरत्रीचा परमय,
माझं मन गेलं भरी ।।
सुरेख
लहानपनी खेळलेल्या "भातुकली"ची आठवण झाली.
अजून एक
शेवटच्या फोटोत जसा भातुकलीतील पितळेचा "कावळा" आहे अगदी तस्साच कावळा आमच्या स्वयंपाकघरात आहे पण स्टीलचा आणि अर्थातच आकाराने मोठा. :) त्यात आम्ही चहा ठेवतो.
--------------------------X--X-------------------------------
पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे ||