जपणूक् आपल्या ठेव्याची
भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत.
त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा"
या ग्रन्थान्मधे अनेक विषयान्वर विपुल ज्ञान आहे - उदा. गणित, ग्रह - तारे यान्च्या गति, स्थापत्य शास्त्र, दुखण्या-खुपण्यावर ईलाज, धातुशास्त्र, शस्त्रविद्या, (टिळकान्नी म्हणे वेदिक ज्ञानवर आधारित विमान बनविणारा शिवराम बापुजी तळपदे आणि त्याचे विमान (उडताना बरे का, जमिनीवर नाही) पाहिले होते. ब्रिटीशन्च्या काळात भारत सर्वोच्च पोलाद निमिर्ती करत होता, textiles मधे दादा होता वगेरे. कुठे गेले ते ज्ञान? विना ज्ञानच ते काही हे सारे करत नव्हते. वेलस्ली हा फ्रेन्च मनुष्य टीपू चे अग्निबाण घेवुन गेला आणि जतन करून ठेवले म्हणून आज ही ते फ्रेन्च् सन्ग्रहालयात दिसू शकतात. नासाच्या स्वागतिकेच्या मागे भिन्तीवर तसे चित्र ही आहे म्हणे. ह्या सर्व गोष्टी अगदी आत्ता आत्ताच्या. आणि आपण आपलाच इतिहास ह्युएन् त्सन्गादि इतरेजन्नाच्या लिखणातुन वाचावा का?)
व्यासान्नी सारे जग उष्टे केले म्हणतात. कसे? सारे ज्ञान त्यान्नी जतन करण्याच्या हेतूने document करून् ठेवले.
(हाय्! ही कलियुगी स्मृती! पूर्वी सारे मौखिक रूपातच 'स्टोअर्ड्' होते).
आजमितीला आपल्या देशात लाखो ग्रन्थ धूळ खात पडून आहेत.
त्यान्ना जतन करून ठेवण्यासाठी म्हणून सरकार प्रयत्न करत आहे.
(वाचा: चतुरन्ग पूरवणी, लोकसत्ता ४ एप्रिल २००९. किन्वा गूगल मधे शोधा NMM)
सारा खटाटोप कशासाठी?
१. ज्ञानाची चोरी थाबवण्यासाठी
२. आपल्याच सम्स्कृती बद्दल आपल्याला अधिक महिती सान्गण्यासाठी
हळद, कडुनिम्ब, बासमती, आणि अशातच योग क्रियान्चे इतरान्नी घेतलेले पेटन्ट पाहिले की या प्रकाराची जरूरी भासते.
त्यावेळी डा. रघुनाथ माशेळकरान्नी जे काम केले त्याला सलाम. (पहा: TKDL )
आपल्या देशावर राज्य करणे हा तोन्डचा खेळ नाही हे लक्षात आल्यावर, मेकौलेने जी आपल्या सम्स्कृतीची धुळधाण लावली, त्यामधुन सावरण्याचा हा एक प्रयत्न.
(काळ मोठा कठिण येणार आहे, जय्यत तयार रहा)
(फार कशाला, माझ्या नव्या वहिन्नीना, काकु-मावशीन्ना येतात ते पदार्थ बनवता येत नाहीत. ज्ञान जतन करणे आपल्या पोटापाण्यासाठीही अगदी आवश्यक आहे)
project guttenberg काय प्रकार आहे, पहावे म्हणतो.
Comments
कौतुकास्पद
हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. लोकसत्तेतील लेखाचा हा दुवा आहे.
मॅसेच्युसेट्स मधे युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स डार्टमथ मधे डॉ. बलरामसिंग यांनी असेच एक इंडीक सेंटर चालू केले आहे. त्यांचा पण भारतातील अशा जुन्या माहीतीचा अर्थ लावणे आणि तो जगासमोर आणणे असा हेतू आहे.
सहमत आहे
लोकसत्तेतील लेख वाचनीय आहे आणि अमिताचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.
काही प्रश्न
काही गोष्टींबद्दल कुतूहल वाटले. प्रश्नांची उत्तरे कोणीही द्यावीत.
याबद्दल काही नोंदी आहेत काय? विमान कसे होते? त्याची क्षमता, वेग, आकार, इंधन, नियंत्रण (कंट्रोल्स) वगैरेंबद्दल काही नमूद केलेले आहे का?
असे कोठे आणि कोणी म्हटलेले आहे आणि कशा संदर्भात?
उपक्रमींपैकी कोणी नासा-वारी करून आले आहे काय? हे कशाप्रकारचे चित्र आहे?
अधिक् महती
http://www.loksatta.com/daily/20060611/lm10.htm इथे थोडी महिती आहे.
केसरी कि मराठा मधे वृत्त ही आले होते.
कात्रण असल्यास जरूर शेअर् करावे.
व्यासोच्छिठम् जगत् सर्वम् हा तो श्लोक (चतुर्थ पन्क्ति तेवढी लक्षात आहे. )
नासामधले चित्र हे लढाईचे दृश्य आहे.
त्यातील एका बाजुचे सैनिक भारतीय दिसतात. अधिक चौकशीअन्ती कळाले वेलस्ली पुराण. वसन्त गोवरिकरान्चा दाखलाही मिळेल हवातर.
(एक धक्का आणखी घ्या. त्या लोकान्ना तेन्व्हा कळाले म्हणुन कळाले. त्याहुन खुप आधी देवगिरीच्या रामदेवराव यादवाकडे ४०००० अग्निबाण सतत तयार असत असे त्याचा कवी म्हणतो. )
आपण नीट document करून ठेवत नाहीत म्हनून हे असे होते.
अग्निबाण
म्हणजे बाणाला पेटलेले फडके बांधलेले अस्त्र ना? हे बर्यापैकी घातक असते खरे.
पण याचे तंत्रज्ञान खरोखर हरवले आहे का? (तपशिलांत हरवले आहेच - कारण तोल नीट ठेवून बोळा जळायला पाहिजे. पण तसे मूलभूतपणे हरवले नाहीच.)
बाण/अस्त्र उडवण्यासाठी प्रत्यंचेचा (ताणलेल्या दोरीचा - धनुष्याच्या वगैरे) वापर, हे पुरातन तंत्रज्ञान अजून काही आदिवासी वापरतात. (ऑलिंपिकमध्ये ही स्पर्धाही असते, पण त्याच्या प्रत्यंचांच्या तंत्रात थोडा बदल झाला आहे.) भारतात फ्रेमवर बसवलेले आडवे धनुष्य बहुधा कधीच वापरात नव्हते.
पण दारू जाळून नळकांडीतून वस्तू इतक्या जोरात, इतक्या दूर फेकल्या जाऊ शकतात, की ताणलेल्या दोरीचा उपयोग आजकाल युद्धात कालबाह्य झाला आहे.
टीपू सुल्तानाच्या वापरातले अग्निबाण "रॉकेट" म्हणजे शेपटाशी बारूद जाळणारे होते. हे खरे आहे. पण त्याच्या वर्णनावरून तंत्रज्ञान त्या काळाला साजेसे, आणि नेम धरायचे तंत्रही त्या काळाला साजेसेच वाटते.
हे ते चित्र का?
वरील चित्रात टिपूचे सैन्य दिसत नाही परंतु हे श्रीरंगपट्टणम् च्या लढाईचे चित्र आहे.
मला वाटते टिपूचे अग्निबाण इतकेही प्रिलीमिनरी नसावेत. लोखंडी नळीत दारू भरून ती उडवली की दूरवर जाते हे टिपूने माहित करून घेतले होते. अभियांत्रिकी सुधारणा आणि करामतींमध्ये टिपू बरीच रूची बाळगत होता असे टिपूविषयी वाचल्यास कळते.
अशाच प्रकारे त्याने ब्रिटिश सोल्जराचा खुर्दा करणार्या यांत्रिकी वाघाचे खेळणे आपल्या दरबारात ठेवले होते. तेही आता बहुधा ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. चू.भू.दे.घे.
हा वाघ चावी फिरवली असता, डरकाळ्या फोडून हालचाल करत असे म्हणतात.
होय
टिपूची रॉकेटे होती (म्हणजे शेपटातून बारूद पेटवलेली).
देवगिरीच्या यादवांचे अग्निबाण असले तर कसले होते? (हे टिपूपेक्षा शेकडो वर्षे पूर्वीचे). त्यावेळी तोफा भारतात येऊनच तीन-चारच शतके झाली होती. पण रॉकेटे असतील म्हणा. चिन्यांनी तोफा बनवायच्या आधीच (शोभेच्या दारूची) रॉकेटे बनवली होती. तेही तंत्रज्ञान तोफांबरोबरच पोचले असू शकेल.
टिपूचे अग्निबाण त्या काळातल्या ब्रिटिश रॉकेटांपेक्षा तंत्राने पुढारलेले होते. (पण ब्रिटिशांकडेही रॉकेटे होती.) म्हणजे बारूद जळण्यासाठीची नळी लोखंडाने बळकट केलेली होती. पण हे तंत्रज्ञान आधुनिक काळासाठी कालबाह्य आहे, असे मला वाटते.
ऐतिहासिक माहिती म्हणून जपणूक करावी, याबाबत मी सहमत आहे.
कालबाह्य!!
असे मलाही वाटतेच हो! :-)
मीही. ;-)
टिपूच्या यांत्रिक वाघापेक्षा, रिचार्जेबल निंटेंडो डिएस खेळायला अधिक गंमत येईल. निदान निंटेंडो कालबाह्य होईपर्यंत.
कालबाह्य की काळ घडविणारे
लढाई फ्रेन्चान्सोबत झाली होती. ब्रिटीशान्सोबत नाही.
त्यावेळी प्रथमच त्यान्ना या शस्त्राविषयी माहिती मिळाली. ब्रिटीशान्कडे असली असती तर कदाचित फ्रेन्चान्ना माहित असली असती.
(आधार: कथा इस्रोची - वसन्त गोवारीकर)
आधुनिक काळासाठी कालबाह्य आहे, ऍग्री.
ऐतिहासिक माहिती म्हणून जपणूक करावी : ऍग्री.
पण मी आपले लक्ष नम्र पणे इकडे वळवू इच्छितो की आज् वर् जगात या क्षेत्रात जी काय प्रगती झाली तिचा आधार म्हन्जे वेलस्ली चे reverse engineering.
जर ते आपणच जतन करून ठेवले असते तर, आजवर अधिक प्रगती नसती क करता आली?
हे सार्याच क्षेत्रात लागु होईल.
त्यावेळेस तरी ते जगातील सर्वात प्रगत नाही तर निदान प्रगत तन्त्रज्ञान होते ना?
त्याचाच पुढे विकास झाला. (आज् ही इस्रो अत्युकृष्ट आहे म्हणा, शिवाय सर्वात स्वस्त ही)
सांगता येत नाही.
गोष्टी जतन केल्याने प्रगती होईलच असे सांगता येत नाही. त्यासाठी अन्य गोष्टीही विचारात घ्याव्या लागतील. जसे, टिपूचा लढाईत विजय आणि त्या घराण्याची अबाधित सत्ता. (ही कितींना रूचली असती हा वेगळा मुद्दा) टिपूने अग्निबाणांचे आपले ज्ञान आपल्या सैन्यापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार करणे. :-) ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगिजांची भारतावर सत्ता प्रस्थापित न होणे, भारतीयांच्या हाती सत्ता राहिल्याने कला, तंत्रज्ञान वगैरेंचा विकास होणे, प्रस्थापित सत्तेला या ज्ञानात आस्था असणे* वगैरे.
* अन्यथा, धूळ खात पडलेल्या पोथ्या नदीत सोडून देणारेही आहेतच. (संदर्भ: लोकसत्तेतील वरील लेख.)
ही माहिती चुकीची आहे. आर्थर वेलस्ले हा ब्रिटिश सैन्याधिकारी होता. श्रीरंगपट्टणम् चे युद्ध ब्रिटिश फौजांशी लढले गेले. फ्रेंचांना टिपूशी युद्ध करायचे किंवा कुरापत काढायचे फारसे कारण नाही. टिपू हा नेपोलियन बोनापार्टशी संधान साधून होता. शत्रूचा शत्रू मित्र असतो ही साधी नीती त्याला कळत होती. फ्रेंच टिपूच्या सैन्यासह लढत. (मराठ्यांशी झालेल्या युद्धातही फ्रेंच सैन्य टिपूच्या वतीने लढले होते.) याच कारणामुळे ब्रिटिश टिपूला नेस्तनाबूत करण्यासाठी टपलेले होते. त्यांना टिपूबरोबर नेपोलियनचीही भीती होती.
माझी माहीती
टिळकान्नी म्हणे वेदिक ज्ञानवर आधारित विमान बनविणारा शिवराम बापुजी तळपदे आणि त्याचे विमान (उडताना बरे का, जमिनीवर नाही) पाहिले होते.
तळपदे शास्त्रींचे नाव टिळकांच्या नाही पण वर्तकांच्या संदर्भात ऐकलेले आहे. माझ्या वरील प्रतिसादात उल्लेखलेले डॉ. बलरामसिंग यांच्याशी शनीवारीच ओझरती गाठ पडली होती. त्यांच्या बोलण्यात १९२३सालचे विमान शास्त्रावरील एक संस्कृतमधील पुस्तकाचा संदर्भ आला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते अर्थातच राईट बंधूंच्या नंतरचे होते. तरी देखील त्यात बरीच माहीती आहे आणि ज्यांना विमान करायचे सुचते त्यांना जमिनीवरील वहाने पण माहीत असायला हवीत असा त्यांचा तर्क होता. हे पुस्तक भांडारकर प्राच्य विद्यासंस्थेत उपल्ब्ध आहे असे ते म्हणाले...आत्ता हा प्रतिसाद प्रकाशीत केल्यावर परत जालावर शोध घेतला तर असे काहीसे झालेले आहे असे दिसते... त्यात आय आय एस सी बंगलोरने पण याचा (अर्थात बराच नंतर) संदर्भ दिला आहे. विकीवरील हा दुवा पहा.
व्यासान्नी सारे जग उष्टे केले म्हणतात. >>असे कोठे आणि कोणी म्हटलेले आहे आणि कशा संदर्भात? त्याच दुव्यात "टिळकांच्या" केसरी मधील (म्हणजे टिळकांनी का इतर कोणी उ.दा. न.चि.केळकर वगैरेंनी ते माहीत नाही) हे विमान तळपदेशास्त्रींनी चौपाटीवर मजाराजा सयाजीराव गायकवाड आणि इतर अनेकांच्या समोर उडवून दाखवले असल्याचा उल्लेख आहे.
"जे महाभारतात नाही ते जगात कोठेही नाही". अर्थात "व्यासोच्छिष्टम् जगद् सर्वम्" याचा अर्थ असा की: व्यासांनी लिहीलेल्या या अतिशय गुंतागुंतीच्या ग्रंथात मानवी स्वभावांच्या (नुसतेच मूळ स्वभाव नाही तर,) शक्य असलेल्या सर्व छटा येतात. परीणामी (हे मी म्हणत नाही पण) शेक्सपिअर असो अथवा अजून कोणी, त्यांच्या वाड्मयात आलेल्या भुमिकांना साजेशी व्यक्तीचित्रणे महाभारतात मिळू शकतात.
नासाच्या स्वागतिकेच्या मागे भिन्तीवर तसे चित्र ही आहे म्हणे. >>उपक्रमींपैकी कोणी नासा-वारी करून आले आहे काय? हे कशाप्रकारचे चित्र आहे?
मी नासाला गेलेलो नाही आहे. पण हे मी कलामांच्या संदर्भात ऐकले होते का विंग्ज ऑफ फायर मधे आहे. खालील विकी संदर्भ मिळाला. त्यात खाली लिहीले नसले तरी त्या चित्रामुळे त्यांना भारताने पण क्षेपणास्त्रे करावी अशी महत्वाकांक्षा आली असे काहीसे आठवते.
At a NASA facility, he remembers to have seen a painting, prominently displayed in the lobby. The painting depicted a battle scene with [rocket]flying in the background. On closer examination, he found that the painting depicted Tipu Sultan’s army fighting the British. Kalam felt happy to see an Indian glorified in NASA as a hero of rocketry warfare.
हा लेख वाचावा
टिपूच्या अग्निबाणांवर हा लेख वाचनीय ठरावा.
केशवसृष्टी
येथे एका ताईंनी (दुर्दैवाने त्यांचे नाव आता आठवत नाही आहे), ज्यांनी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले आहे त्यांनी तिथल्या वनौषधी विभागातून १०००+ वेगवेगळ्या दुर्मिळ औषधी वनस्पतींचे नमुने गोळा केले होते. ते नमुने विविध रसायनांमध्ये बुडवून कागदांमध्ये घालून सुकवले. ८- १० दिवस रोज ते कागद त्या बदलायच्या. (ही सर्व किचकट प्रक्रिया झाल्यावर तो प्रत्येक नमूना अनंत काळपर्यंत टिकतो.) मग ते सर्व नमूने त्यांनी व्यवस्थित एका वही मध्ये नीट लावले. मग प्रत्येक नमूना आणि त्यापुढे त्याचे मराठी, संस्कृत, लॅटिन नाव, गुणवैशिष्ट्ये जातीविहाय सुसंगत लिहिली होती. खरोखरच हे सर्व काम स्तिमित करणारे होते आणि त्याही पुढची थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी हे सर्व काम विनामूल्य, निरपेक्ष वृत्तीने केले. त्यांचा निरपेक्ष सेवाकाल झाल्यावर त्यांनी ते सर्व काम केशवसृष्टी प्रकल्पाला दिले.
जर कोणालाही ते काम पाहायचे असेल तर श्री. काशिनाथ रेडकर ह्यांच्याशी ६५२८९९५६ किंवा २८४५०७२० वर संपर्क करावा.
जाता जाता : स्वत: श्री. काशिनाथ रेडकर ह्यांनी हजारो दुर्मिळ वनौषधी लावलेल्या / वाढवलेल्या आहेत. ज्याचा फायदा आज मुंबईतील व जवळपासच्या अनेक आयुर्वेद महाविद्यालयांतील विद्यार्थी नि:शुल्क घेत आहेत.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
दुर्दैव
दुर्दैवाने त्यांचे नाव आता आठवत नाही आहे. एका शास्त्रज्ञाने भारतातील (ओरिसातील) १८००० भाताच्या जातिन्ची तपशिल्वार माहिती गोळा केली. आणि दुर्दैवाने दुसर्या एका शास्त्रज्ञाने (त्यांचे नाव आता आठवत आहे पण उगाच प्रस्थापित शास्त्रज्ञाच्या विरोधात लिखाण नको) ती माहिती विक्ली, परदेशी कम्पनीला. पुन्हा पहिल्या शास्त्रज्ञाने मध्य प्रदेश सरकार च्या विनन्ती वरुन तिथे ही हाच उद्योग केला. हाय् रे दैवा! परत त्याचा तो विकला गेलेला बॉस तिथे आला आणि त्याने तोच डेटा त्याच परदेशी कम्पनीला विकला. ज्याने काम केले होते त्याला सज्जड दम मिळाला कि उगाच् दुसर्यान्च्या कॉपीराईट् मधे पडयचे नाही, आणि त्यान्नी सन्शोधन केलेले परत शोधायचे नाही. काळ १९८५-८८.
पेपर पाहीलेत तर नाव ही कळेल बॉसचे (सदर व्यक्ति आजही 'कार्यरत' आहे, मोक्याच्या ठिकाणी) .
पेपर
पेपर म्हणजे वर्तमान पत्रे? १९८५-८८ ची का?
कौतुकास्पद
डीएलआय वगैरे भारतीय संस्था जुने ग्रंथ तरी जतन करायचा प्रयत्न करत आहेत, ते काम कौतुकास्पद आहे.
या ठेव्याची जपणूक केली पाहिजे - सहमत आहे.
ह्म..
जयंत नारळीकरांचे याला जीवन ऐसे नाव हे पुस्तक मी आता वाचत आहे या योगायोगच म्हणायला हवा. :-) ही पाने स्कॅन करुन टाकत आहे.
हेच मत माझे आहे असे समजावे. :-)
कृपया चर्चा पुढे चालू ठेवावी. प्रतिसादांना उत्तर लगेच देता येईल असे नाही.
-सौरभ.
==================
आभार
पाने इथे दिल्याबद्दल अनेक आभार. याहून स्पष्ट, सुलभ आणि मुद्देसूद प्रतिसाद देता येणे कठीण दिसते.
अवांतर : शास्त्राविषयी लेख लिहीताना कुठले इंग्रजी शब्द तसेच ठेवावेत आणि कुठल्या शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द वापरवेत याचे सुंदर उदाहरण या लेखामध्ये दिसते. उदा. रेडिओ किंवा न्यूट्रीनो यांचे मारूनमुटकून मराठीकरण केलेले नाही. त्यामुळेच लेख समजायला कुठेही अडचण येत नाही.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
धन्यवाद
धन्यवाद सौरभदा
बर्याच दिवसांनी हे वाचायचा योग आला. अन्यथा ग्रंथालयात जाउन पुस्तके आणुन ते परत वाचणे झाले नसते. उपक्रमावर समग्र चर्चा झालेल्या फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी चा प्रयोगावर जयंत नारळीकरांचा लेख मार्च २००९ करंट सायन्स या विज्ञान विषयक नियतकालीकात आलेला आहे हे यानिमित्त सांगण्याची संधी घेण्याचा मोह आवरत नाही.
प्रकाश घाटपांडे
धन्यवाद!
वा! सुंदर विवेचन.
पाने स्कॅन करुन इथे हे लेख उपलब्ध केल्याबद्दल सौरभदांचे अनेक आभार.
आभार
स्पष्ट आणि वाचावयास सोपे विवेचन.
सहमत आहे
यापेक्षा चांगला प्रतिवाद कोणालाही जमला नसता.
स्कॅन करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल आभारी आहे.
अवांतरः एक अवांतर प्रश्न आहे. उत्तर कोणीही खरडवहीत डकवल्यास आभारी असेन. एखाद्या पुस्तकाची पाने स्कॅन करून लावायची झाली (जशी सौरभ यांनी लावली आहेत) तर कॉपीराईटचा वगैरे प्रश्न येऊ शकतो का? हा उद्योग कधी मलाही करता यावा म्हणून शंका. ;-)
जरुर
समांतर- कॉपीराईट ऍक्ट चा प्रश्न येउ शकतो. पण अडचण येउ शकत नाही. किमान मायभुमीत तरी. पुर्वी उपक्रमावर याची चर्चा झाली आहेच.
प्रकाश घाटपांडे
आभार
ही पाने इथे स्कॅन करून डकवल्याबद्दल अनेक आभार. इतर प्रतिसादींनी म्हटल्याप्रमाणे नारळीकरांनी केलेला खुलासा बिनतोड आहे. लेबर मॅनेजमेंटबद्दल त्यांनी लिहिलेला ताजा कलमही उद्बोधक. पुष्पक विमान हे त्यांचे याबाबतीतले आवडते उदाहरण. बहुतेक 'प्रेषित'मध्ये त्यांनी या बादरायण संबंध जोडण्याच्या वृत्तीला 'पुष्पक विमान इफेक्ट' म्हटले आहे.
अवांतर - आणखी काही वर्षांनी कदाचित अंतू बर्व्यातील 'अहो दीडशे वर्षं तुमची, ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय!', हे वाक्य भारतात पुरातन काळापासून मनगटी घड्याळे प्रचलित होती आणि सापेक्षतावादाचा शोध लागला होता, याचा पुरावा म्हणून सादर करण्यात येण्याची दाट शक्यता वाटते. :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हा हा!
अवांतर आवडले. हातातले मनगटी घड्याळ बघत सूर्यास्तापर्यंत महाभारत चालले आहे, स्टॉपवॉच घेऊन द्रोणाचार्य, कौरव पांडव प्रभृतींची सर्वोत्तम वेळ नोंदवत आहेत वगैरे वगैरे चित्रं डोळ्यांपुढं आली......
-सौरभ.
==================
न पटलेला मुद्दा...
सर्वप्रथम "आमच्याकडे सर्व काही होते..." असे म्हणणार्यांच्या बाजूने अथवा तसे प्रत्येक क्षेत्रात होते असे म्हणण्याचा माझा देखील उद्देश नाही हे आधी मनापासून स्पष्ट करतो. मात्र, नारळीकरांच्या वरील लेखासंदर्भात आलेल्या इतर प्रतिक्रीयांपेक्षा मी जरी वेगळे लिहीत असलो तरी त्यातील मुद्दा नीट समजून त्याला कोणाकडून उत्तर मिळू शकेल तर ते नक्की आवडेल.
नारळीकरांचे वरील दोन्ही लेख हे कोणे एके काळी रविवारच्या महाराष्ट्र टाईम्स मधे आले होते. त्यातील पहील्या लेखावर (अर्थातच) वर्तकांचे पुढील आठवड्याच्या पुरवणीत उत्तर आले होते. जर स्वतःचे काही वाचन नाही, अभ्यास नाही तर त्यावर टिका करताना नक्की कुठल्या शास्त्रीय पद्धतीने करता आहात याचे उत्तर नारळीकर तितकेसे चांगले देऊ शकले नव्हते. नंतर ती चर्चा इतरांनी "वांगी" का "वानगी" यावरच घसरवली :) अर्थात वर्तकांचे तर्कशास्त्र जसे न पटणारे आहे तसेच नारळीकरांचे पण या संदर्भात थोडेफार अतर्क्य वाटते.
या (पहील्या) लेखात त्यांनी त्या संदर्भात जे काही सिद्ध करायचे आहे (पुराणातील वांगी) त्याला पाया म्हणजे बेसीस काय असावे याबद्दल काही ठोस गोष्टी सांगीतल्या आहेत. त्यात एक प्रामुख्याने काय जाणवते की संशोधन हे आजच्या पद्धतीने म्हणजे अर्थातच पाश्चिमात्य पद्धतीने केलेले असले तरच ते खरे. जर ते पाश्चिमात्य पद्धतीच्या चष्म्यातून पहाता आले नाही तर त्यात काही तथ्य असू शकतच नाही...माझा केवळ या मुद्याला आक्षेप आहे. संशोधनाची पाश्चिमात्य पद्धत ही मला देखील आवडते आणि भावते. किंबहूना त्याचमुळे मी कायम संदर्भ लिहा म्हणून माहीतीपूर्ण लेखांच्या संदर्भात विनंती देखील करत असतो. पण तीच एक पद्धत समजून तसेच असेल तर बरोबर नाहीतर काही अर्थ नाही असे म्हणणे अति वाटते.
त्यांचे विमानाबद्दल म्हणणे अर्थातच पटते पण एस आर एन मुर्तीनी लावलेली कालगणना केवळ योगयोग मानणे काही पटले नाही. विशेष करून जर कालगणनेत दिसणारे साम्य "प्रथमदर्शनी" म्हणत त्याविरुद्धचा कुठलाही पुरावा न देता त्यात तथ्य नाही असे म्हणणे काही पटत नाही.
आता अजून एक उदाहरण (यात आहे का माहीत नाही कारण लेख उडत उडत वाचला आहे) ज्याच्याबद्दल मला कायम उत्सुकता आहे. ते अगस्तीऋषींसंदर्भात: आपल्याहून लहान असलेल्या हिमालयाची उंची वाढताना पाहून विंध्य त्याच्याशी उंची वाढवण्यात स्पर्धा करू लागतो. त्यामुळे मधला भाग हा सर्व अडचणीत सापडतो. देव (का राजे/माणसे आठवत नाही) अगस्तींना यातून मार्ग काढायची विनंती करतात. अगस्ती विंध्याला भेटायला जातात. विंध्य अगस्तींना पाहून नमस्कार करायला म्हणून वाकतो. अगस्ती आशिर्वाद देत उठ असे म्हणतच नाहीत. पर्यायाने विंध्याची उंची तितकीच राहीली आणि हिमालय मात्र वाढत गेला...हे भौगोलीक / जिऑलॉजिकल सत्य आहे हे वेगळे सांगायला नको. जर त्यावेळेस आपल्याकडे काहीच यंत्रसामुग्री नव्हती तर हिमालय काय आणि विंध्य काय एक थंडी सोडल्यास त्यांच्यातला उंचीचा फरक हा "सामान्य अवैज्ञानीक डोळ्यांना" समजणे तरी शक्य होते का? मग आता त्याला "प्रथमदर्शनी" साजेशी इतकेच म्हणत याला निव्वळ पुराणातील गोष्ट म्हणून सोडून देयचे का काहीतरी शास्त्रीय विचार, अधुनिका नाही पण त्यांच्या त्यावेळच्या पद्धतीने केला असेल असे म्हणायचे?
या ही पुढे जाऊन पुराणाऐवजी आयुर्वेदाचा विचार करूया. आता त्यात ज्या काही वनस्पतींचा औषधी उपयोग केला त्याचे आजच्या फार्मास्युटीकल कंपन्यांच्या संशोधनाच्या पद्धतीने संशोधन झाले होते का? नसले तर मग ते योग्य का मानावे? मग हळदीतले गूण कसे शोधले? तेच इतर अनंत वनस्पतींसंदर्भात. तेच योगशास्त्रासंदर्भातः अमुक एका आसनाचा उपयोग अमुक एका अवयवासाठी होतो हे का मानावे? त्याची काँप्युटरबेस्ड मॉडेल्स केली आहेत का? जशी जिममधील कुठल्याही अधुनीक उपकरणांची केली जातात तशी? "हम् स्:" "सोहम्" अर्थात श्वासोच्छोस्वास हा ज्या पद्धतीने होतोत्याला जर शिस्त लावली अर्थात प्राणायम केले तर अनेक व्याधी सुटू शकतात, ह्याचे रिसर्च पेपर्स आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले होते का म्हणून त्यावर विश्वास ठेवावा?
न गंजणारा अशोकस्तंभ तर काय एक थोतांडच आहे कारण त्याचे सैद्धांतिक विवेचन नाही की कसे बनवावे याची माहीती नाही. परत नाधड सिद्धांत ना धड कसे करायचे (त्यात हवामान शास्त्राचा पण अभ्यास आहेच) काहीच सांगितले नाही.
आता विचार करा अजंठाच्या रंगांचा जे इतके वर्षे टिकले आणि तसाच विचार करा वेरूळच्या कैलास लेण्याचा. ज्यातील मंदीर आणि सर्वपरीसर हा कळसापासून पायापर्यंत उलटा खणत आणला आहे. त्याचे बॅलन्सिंगचे गणित केल्याशिवाय आजतरी ते शक्य आहे का? पण मग म्हणता येईल की त्याची कॅड ड्रॉइंग्ज नाहीत...आणि हो काहीशे टन दगड या वेरूळच्या लेण्यांमधून काढल्याशिवाय ती कोरताच आली नसती असे म्हणतात पण तो कुठे गूल झाला ते कोणालाच माहीत नाही... पण याला शास्त्रीय ज्ञानाचा पुरावा नाही याचा अर्थ आपण चुकून बरोबर करत गेलो असे म्हणायचे का?
आता हे तुम्हाला वाटेल की मी भारताच्या अभिमानाने म्हणत आहे... तर तसे नाही. अगदी इजिप्तची पिरॅमीड्स पहा. मायन कल्चरमधील देवळे, केवळ विमानाच्या उंचीवरून दिसणारे/समजणारे (नाझ्का लाईन्स)प्रचंड आकार बघा, चीनमधेपण असेच मिळेल...
हे काही सर्व विज्ञान माहीत असल्याशिवाय झाले असे म्हणायचे का? मला तसे वाटत नाही. केवळ पाश्चिमात्य आणि आता अधुनिक पद्धतीचे विज्ञानाचे निष्कर्ष लावता येत नाहीत म्हणून त्यावेळेस संशोधन झालेच नाही, शास्त्र अर्थात कशाचेच सायन्स नव्हते असे म्हणणे हे बरोबर वाटत नाही. नारळीकरांबद्दल मला आदर आहे पण म्हणून त्यांचे वरील लेख मला केवळ याच एका मुद्यासाठी पटत नाहीत.
वरिल अनेक मुद्दे
अर्थात नारळीकरांचे उत्तर नारळीकरांनीच द्यावे.
पण वरील काही मुद्दे ठीक नाहीत (त्यामुळे ते शक्यतोवर नारळीकरांना वेगळ्या तर्हेने विचारावेत.)
नारळीकरांच्या वरील लेखात आयुर्वेदाची तांत्रिक मॅन्युअले आजही उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांना मानले पाहिजे -त्यांचे वाक्य असे :
येथे वैद्यकशास्त्राचे उदाहरण नारळीकर पटण्यासारखे म्हणून देतात. ठळक ठशाच्या वाक्यावरून असे दिसते, की ते शास्त्र पाश्चिमात्त्य आराखड्याचे असले पाहिजे हा निकष नाही.
बाकी चालू द्या.
विंध्य पर्वत हा हिमालयापेक्षा उंचीने लहान आहे, यापेक्षा त्या पुराणकथेतून नेमके काय कळते, मला माहीत नाही. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने विंध्य हा पुरातन पर्वत वाढत होता तेव्हा हिमालय अस्तित्वातही नव्हता. (इंडियन प्लेटने आशियाला एक-दिड करोड वर्षांपूर्वी धडक दिली. त्यातून हिमालय पर्वत घड्या पाडत उठला. दक्खनेचे डोंगर ५-७ करोड वर्षांपूर्वी तयार झालेले.) त्यामुळे हिमालय आणि विंध्य दोन्ही अहमहमिकेने उंचावत होते अशी कधी वेळच नव्हती. म्हणजे त्या रम्य आणि मला आवडणार्या कथेतला कुठला तपशील कुठल्या शास्त्रातल्या तपशिलाशी जुळवायचा हे ठरवणे कठिण जाते. पश्चात्बुद्धीने "विंध्य वाढत नाही" असा तपशील निवडला आहे, आणि "एके काळी ते दोन्ही स्पर्धा करत वाढत होते" हा तपशील गाळला आहे.
माझी आणखी एक आवडती कथा - शोणभद्र राजाचे नर्मदेशी लग्न मोडले, म्हणून ते वेगवेगळ्या दिशांना चालते झाले. शोणभद्र उत्तरेला वाहातो, आणि नर्मदा पश्चिमेकडे वाहाते, हे तर भौगोलिक सत्य आहे. या रम्य कथेतून "ते दोन प्रवाह दोन दिशांना वाहातात" हे पुराण सांगणार्याला माहीत होते स्पष्ट कळते. पण कारणमीमांसा काही दिसत नाही.
लोखंडाचा स्तंभ, शिल्पे ही आहेत, त्याविषयी नारळीकरांचा वाद आहे, असे मला तरी जाणवत नाही. कैलास लेण्यांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान त्या काळात विकसित होते, याबद्दल कोणाला काही शंका आहे असे वाटत नाही. ते कौतुकास्पद तंत्रज्ञान होते, यात काही शंका नाही - पण ते हरवले आहे काय? (कोरून काढलेली गिट्टी सापडत नाही, याबद्दल तुमचा मुद्दा कळला नाही. जुन्या काळच्या बाकी शिल्पांजवळ अशी गिट्टी दिसते का? उलट गिट्टी विखरेल अशी माझी कल्पना आहे, असा गिट्टीचा डोंगर शेकडो वर्षे टिकावा म्हटले तर खास बांधावा लागेल.)
एखादी मानवनिर्मित वस्तू सापडली, तर त्याचे तंत्रज्ञान असल्याचा तो पुरावाच आहे. मडके सापडले, तर भट्टीचे तंत्रज्ञान होते; हराप्पा मध्ये वीटकामाच्या कमानी सापडल्या म्हणजे कमानी बांधता येत होत्या, याबद्दल कोणीही शंका उत्पन्न करणार नाही.
प्रश्न येथे अशा वस्तूंबद्दल आहे, ज्यांची उदाहरणे दिसत नाहीत. आणि तांत्रिक मॅन्युअलेही नाहीत.
मेक्सिकोतील माया लोकांचे युग ~इ.स.२०३२ला संपणार आहे. ख्रिस्ती लोकांपैकी काही लोकांच्या मते ~इ.स.२०००ला संपणार आहे (होते? थोडक्यात हिशोब चुकला?) - तेव्हा जगबुडी आहे. आकडे खूपच जवळ आहेत. पण बहुधा विश्व पुढच्या १०-२० वर्षांचेच आपले सोबती आहे, अशा रीतीने मी तरी योजना करत नाही आहे. ते दोन्ही आकडे कमालीचे जवळ असले, तरी तो आकडा मिळवण्यासाठी केलेल्या गणितांत आणि तर्कांत मला काहीच साम्य दिसत नाही. म्हणून तो योगायोग मानणे मला प्रशस्त वाटते. तुम्ही याला पाश्चिमात्य विचारसरणी म्हणा. पण म्हणून काय पौर्वात्य लोक हा योगायोग न मानता जगबुडीची तयारी करणार आहेत? तर नव्हे. माझ्या मते पाश्चिमात्य/पौर्वात्य विचारसरणी काही कमालीची वेगळी नाही.
(विकास यांनी मेक्सिकोतील मायन लोकांच्या उत्तुंग इमारती बांधण्याच्या तंत्रज्ञानाची योग्य अशीच प्रशंसा केली आहे. त्यांच्यापाशी स्थापत्यशास्त्र विकसित होते याबाबत मी सहमत आहे. तरी त्या शास्त्राच्या प्रगतीचा आधार घेऊन वेगळ्याच शास्त्रातले त्यांचे युगाच्या अंताचे गणित मला पटत नाही. त्या गणिताचे शास्त्र आणि मॅन्युएल बघून तपासल्याशिवाय विकास यांनाही ते पटणार नाही, असे मला वाटते.)
जगाचा शेवट...
ख्रिस्ती लोकांपैकी काही लोकांच्या मते ~इ.स.२०००ला संपणार आहे (होते?)
विल्यम बटलर यीटस् महाशय यापैकी एक होते वाटते. त्यांची सेकंड कमिंग कविता येथे वाचण्यासारखी आहे. २००० ला ख्रिस्ताचा, ख्रिस्ती धर्माचा अस्त कारण त्याची २००० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मग काहीतरी भयंकर, अमानवी, इजिप्तच्या स्फिंक्स सारखे जगाचा ताबा घेईल वगैरे वगैरे......
विकीच्या पानावर भविष्यातल्या सगळ्या अचूक तारखाच दिल्या आहेत. त्या त्या तारखेला काळजी घ्या बुवा! :-)
-सौरभ.
==================
छान पाने दिलित. धन्यवाद.
चांगला उहापोह आहे.
धन्यवाद.
http://mr.upakram.org/node/948
बाप दाखवला. ही घ्या पाय ची किंमत.
प्रमेये पण आहेत.
त्यांना माहित नसतील, पण आहेत. हवी असतील तर तीही देतो.
आमच्याकडे जे होते ते नीट महिती नसल्याने काय होते आणि काय नव्हते याची गल्लत होते. उगाच सारे होते म्हटले तर दाखवताही आले पहिजे ना? (बिनपुराव्याचे बोलणार्यांचा निषेध असो.)
गणित, स्थापत्य, मेडिसिन, ऍस्ट्रोनॉमी (म्हणजे ग्रह-तार्यांच्या गती विषयक, याला ज्योतिष म्हणतात. हे फलज्योतिष नाही. फलज्योतिष हा माझा विषय नाही, सबब मी फलज्योतिष्यावर भाष्य करू इच्छित नाही. आता भोंदू फलज्योतिष्यांनी फलज्योतिषचे नाव खराब केले आहे. तसे तर मला एक दोन सोडले तर ईतर कोणत्याही रोगावर औषध माहित नाही, पण आयुर्वेदचे बर्यापैकी स्टँडर्डायझेशन् झाले असल्याने, छातीठोकपणे मी 'हो, ते विज्ञान आहे आणि ते जुने आहे असे म्हणू शकतो. फलज्योतिषाचे असे झाल्यशिवाय तसे म्हणन्यास मन धजावत नाही.),
नारळीकरांची बाजू म्हणजे 'मी वैज्ञानिक, आणि मी म्हणतो तशीच सिद्धता असायला तरच मग ते विज्ञान.' (हे त्यांचे वैकक्तिक मत असो, नसो, पण हे ते ज्या प्रकारचे विज्ञान मांडताहेत, त्या प्रकारच्या विज्ञानाची बाजू आहे.)
इथे हे लक्षात घेण्याजोगे आहे, की नारळीकर ज्या प्रकारातल्या वैज्ञानिकांत मोडतात, ते विज्ञान जरा वेगळ्या पद्धतीचे आहे.
ते विज्ञान स्क्रॅच पासुन सुरू होते आणि मग सिद्धतेपर्यन्त येते.
त्यात हिस्ट्री आणि डेवलपमेंट दिसणार.
सुरवातीला एखाद्या गोष्टीचे 'अर्धे हळकुंड' नंतर जरा जास्त माहिती, मग जरा प्रयोग आणि नवीन थेअरी, नवीन मते वगेरे प्रकार.
त्यात त्या विज्ञानाचा झालेला विकास दिसून येतो.
(मी या क्षेत्रात पारंगत नाही, पण लाईट् बद्दल शिकवले होते ते असे होते : प्रथम न्यूटन नि एक शास्त्रज्ञ प्रकाश हा कणांचा बनला आहे, तरंगांचा बनला आहे, नंतर ड्यूअल नेचर् ऑफ लाईट्. किंवा पहिले अणु हा टरबुजासारखा आहे (कदाचित जे जे थॉमसन् किंवा आधीचे शास्त्रज्ञ) मग रुदरफोर्ड गोल्ड् फॉईल् प्रयोग, मग ऑर्बिट्स् संबंधी ज्ञान मग एस्, पी, डी, एफ्, वेगेरे, मग कदाचित पुंजभौतिकी वगेरे. क्रम चुकला असेल, किंवा नावे वेगेरे. मुद्दा मात्र क्लीअर् झाला असावा.)
मी ज्या प्रकारच्या ज्ञानाबद्दल बोलतो आहे, त्याचे हिस्ट्री आणि डेवलपमेंट अस्तित्वात नाही.
(हे ज्ञान अभाळातून पडले का? जिज्ञासूंनी तपास करावा.)
पण 'फलेन परिचयते'|
फळ मिळते का पहावे. त्याने खर्या खोट्याचा शहानिशा होऊ शकतो.
(उदा. गणित (पहा: वर दिलेला दुवा)
आयुर्वेद (जा एखाद्या निष्णात (पिढीजात असतील असतील अधिक प्रभावी असतात) वैद्याकडे)
स्थापत्य (पहा जुनी बांधकामे. (मला स्थापत्याचेही ज्ञान नाही, पण इतके कळते की साधारण स्थापत्य ज्ञान अवगत असल्याशिवाय अशी कामे होत नाहीत. मंदिर बांधणे ही एक कला/विज्ञान होते. उदा. अमुक ह्या ह्या दिवशी सुर्य किरणे देवाच्या पायी पडावीत. वगेरे. ह्यात किती सुक्ष्म(हा शब्द नीट दिसत नाही, कसा लिहायचा?) ज्ञानाचा समावेश होतो ते ह्याची टवाळी करणार्यांना माहित नसणार. )
ऍस्ट्रोनोमी : पहा विविध कालमान पद्धती, आणि तुलना करुन पहा, कोणते चांगले वगेरे.
असे बरेच विषय असतील.
व्याकरण : ह्यात आपण जी मर्दुमकी गाजवली आहे, तीच्या पासंगाला ही पुरत नाहीत ईतर लोक.
पण हे सारे ज्ञान जे आहे ते कसे डेव्हलप झाले, त्याची हिस्टरी काय याच्या नोंदी मिळणार नाहीत.
जे निष्कर्ष आहेत ते मिळतील.
पटत नसतील तर नका घेवू.
पुष्पक विमान आणि आधुनिक विमाने, ब्रम्हास्त्र आणि अण्वस्त्रे यांची तुलना हास्यास्पद आहे.
दोन्ही जोड्यांमधे वर्णने जुळत नाहीते.
नीर-क्षीर विवेक असावा हे मान्य
पान ३६, मुर्ती यांचे 'योगयोगाने' का? अचुकतेने का नाही? ज्याप्रमाणे अचुकतेने आले असे म्हणणे संयुक्तिक ठरत नाही त्याचप्रकारे योगायोगाने आले हे म्हणणे ही संयुक्तिक ठरत नाही.
पुंजवादहा बर्यापैकी सू क्ष्म (सट्ल) आहे. त्यात प्रयोग करणार्या व्यक्तीवर प्रयोगफळ अवलंबून असू शकते तर सिद्धी वर का नसू शकते?
असायला पाहिजे किंवा नको वगेरे मी म्हणत नाहीये. पण 'हे असे आहे बुवा'असे सांगितले तर स्वीकारणे न स्वीकारणे आपल्या हाती आहे.
पण हे असे असुच शकत नाही, हा हट्ट सोडावा.
रादर, आम्ही ह्या असल्या गोष्टी करत नाहीत, आमचे कसे, बिना सिद्धीचेच होते बाबा! असे म्हणा. (अरे, ह्या डीग्र्या, अन् हा अभ्यास, त्यातील नैपुण्य हे काय साधना-सिद्धी शिवाय वेगळे आहे का? उगाच संस्कृत नावे आहेत म्हणुन अर्थाकडे दुर्लक्ष नको. सिद्ध म्हणजे तयार. सिद्धी म्हणजे तयारी. ही वेगळ्या प्रकारची असू शकते. कशी करावी दिली असेल ही. आपण न करताच 'असे कुठे असते का? कैच्या कैच्' म्हणने कितपत बरोबर याचा सामान्यबुद्धीने विचार करता (मला सामान्यबुद्धीच दिली आहे हो देवाने. :( काय करू? ) मला वैयक्तिक रित्या असे वाटले की, टीका करणे फारसे योग्य होणार नाही. उद्या ईलेक्ट्रॉन दाखवा म्हटले तर हे मला पार्टीकल ऍक्सेलेरेटर् मधे नेवून तिथेही फक्त फोटो दखवणार नाही तर ईथेच पहायचे असेल तर पुस्तकातील छापील फोटो दाखवणार. मी विश्वास ठेवतो त्याच्यावर. समजा सारे पार्टीकल ऍक्सेलेरेटर्स् नष्ट झाले, किंवा ते व्यक्तिसापेक्ष आहेत आणि माणुस मेला की त्यासोबत ते ही जातात असे क्षणभर मानले तर ईलेक्ट्रॉन परत पाहण्यासाठी नविन उभारणी नको? (सेम् ट्रू फॉर् सिद्ध पुरुष. मेला कि तो जे काय दाखवू शकतो ते गेले बुडीत खत्यात. मग रिकामटेकडे लोक असतील काही तर त्यांना माझे नम्र निवेदन आहे की, जा जरा, करा बरे पाहुन, काय साधना वगेरे (म्हणजे प्रॅक्टिस्) करावी लागते ते पहा बरे.
सिद्ध (म्हणजे निष्णात) व्हा. आणि मग जरा आम्हाला ही कळूदेत हे काय म्हटले आहे ते खरे कि खोटे दावे आहेत. (हा प्रकार जास्ती 'साईंटीफिक्' वाटतो नाही का?) (मला वेळ नाही, सबब, मला जमणार नाही हे करायला. कुणी पुढे आले तर मी पाठींबा देईन. 'तुम लडो, हम कपडे संभालते'. असो. बरेच विषयांतर झाले.)
उद्या ईलेक्ट्रॉन दाखवा म्हटले तर हे मला पार्टीकल ऍक्सेलेरेटर् मधे नेवून तिथेही फक्त फोटो दखवणार नाही तर ईथेच पहायचे असेल तर पुस्तकातील छापील फोटो दाखवणार. मी विश्वास ठेवतो त्याच्यावर. समजा सारे पार्टीकल ऍक्सेलेरेटर्स् नष्ट झाले, किंवा ते व्यक्तिसापेक्ष आहेत आणि माणुस मेला की त्यासोबत ते ही जातात असे क्षणभर मानले तर ईलेक्ट्रॉन परत पाहण्यासाठी नविन उभारणी नको?
मग त्यासाठी अमुक एक करावे लागेल, वगेरे माहिती मिळाली तर ते न करताच, छे हो, सारे बंडल आहे, काल कोणीतरी एकेक ईलेक्ट्रॉनला एकेक बायकोही असते असे म्हणत होता, परवा मुलेही असतात वगेरे निष्कर्ष निघाले तर 'हो हो तेही आहेत ना पुस्तकात' असे म्हणेल तर?
जर आहे ते ज्ञान नीट जपुन ठेवले तर हा प्रसंग येणार नाही. सेम् ट्रू फॉर् 'जे होते ते ज्ञान'. ज्ञान आणि थोतांड यांची झालेली गल्लत ही
)
आधुनिक विज्ञानाने काही शोधुन काढले की 'हे मला आधीच माहित होते', अशी लोकांची जी खोड आहे ती निश्चितच चुकीची आहे (बाबा, आधी का नाही बोललात मग, माहित होते म्हणता तर )
नारळीकर आणि ईतरांचे मुद्दे मान्य.
जे ज्ञान आहे, त्याची जपणुक केली तर, काय आहे आणि काय नाही, याचा छडा लावता येणे सोपी गोष्ट आहे. पण हे असे कसे इव्हॉल्व्ह झाले, हे सांगता येणार नाही.
एक छान उदाहरण म्हणजे,
शिवसूत्र.
हे मिनिमल आहे असा दावा पाणिनी करत नाही (बहुतेक ), पण सूत्रे हीच का, ती का नाही ह्यावर काही चर्चा नाही. जे आहे ते असे आहे. हवे तर घ्या असा त्याचा 'अंदाज' नाही. विनम्र पणे 'हे शिवाच्या डमरूमधुन निघालेले ध्वनि' असा उल्लेख आढळतो.
आज जेंव्हा wiebke peterson 'हो, मिनिमलच आहे, मी सिद्ध करते ना', म्हणते तेंव्हा आपण मानतो. (किंवा तेव्हा कळते म्हणा हवे तर)
बरे, हे फक्त मिनिमलॅटी वर. याची अनेक बाजुंनी आणखीन रूपसौंदर्ये आहेत, त्याला सिद्ध करणे हे महाकठीण काम आहे. स्पर्श करावा तरी सुरु कुठुन करावे असे प्रश्न आहेत. सिद्ध करणे दूर राहिले. पण जे होते ते जतन करून ठेवले होते आजवर, म्हणून त्या बायडीला काही बोलता आले त्यावर.
मी फक्त जतन करून ठेवुत एव्हढेच म्हणालो. त्याला कदाचित कुणाचा विरोध नसावा (कदाचित चर्चा म्हणुन हा विषयच चुकीचा असावा. (बापरे, डीलीट् तर नाही ना होत असे टॉपिक्?)
तदनुशंगाने चर्चा पुढे चांगले बाळसे धरू लागली आहे.
चालू देत.
वैयक्तिक रोखाची काही अनावश्यक वाक्ये संपादित केली आहेत.
शिवसूत्रे
याबद्दल ती जास्तीतजास्त अल्पाक्षर आहेत की नाही, ती बदलली तर काय फायदे तोटे होतील याबद्दल ऊहापोह पाणिनीय परंपरेत झालेला आहे.
अइउण् । ऋलृक् ।
पैकी लृ काढून टाकण्या-न-टाकण्याचे फायदे तोटे, काही इत्-संज्ञक वर्ण कमी-जास्त केलेत तर काय फरक पडतो, याविषयी पतंजलींच्या महाभाष्यातील दुसरे आह्निक आहे. (पाणिनीय परंपरेतले व्याकरण हे "त्रिमुनि"-पुरस्कृत आहे. पाणिनीची सूत्रे, कात्यायनाची वार्तिके, पतंजलीचे भाष्य, तीन्ही उत्तरोत्तर प्रमाण आहेत.)
शिवसूत्रे शिवाच्या डमरूतून निघालीत ही रम्य कल्पना नन्दिकेश्वरकृत काशिकेतली आहे -
नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम् ।
उद्धर्तुकाम: सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ॥
पाणिनीची नाही, कात्यायनाची नाही, पतंजलीची नाही.
(मला वाटते, येथे "मिरच्या झोंबणे" वगैरे, अन्नशास्त्रातले संदर्भ मला येथे फारसे समजत नाहीत. हे ओळखून या चर्चेतून मी आताच निघून जावे.)
साधने
वरील चर्चा सुरू झाली तेव्हा 'शिळ्या कढीला ऊत' या दृष्टीने पहात होतो.परंतु चर्चेत प्रतिसादकांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे माझेही मत देण्यास उद्युक्त होत आहे.या विषयावर प्रा. जयंत नारळीकरांनी कितीतरी वर्षांपूर्वी मांडलेले लेखरूपी मत कोणाही तर्कशुद्ध व्यक्तीला सहमत होण्यास भाग पाडेल असेच आहे.
तरीही माझी काही आवडती मते येथे घुसडतो -
१. उपलब्ध पुराव्यांनुसार वैदिक आणि पौराणिक भारतीय 'शास्त्रज्ञांकडे' संशोधनाची भौतिक साधने अगदीच प्राथमिक (रूडीमेंट्री)
अवस्थेतील होती. त्यांच्याकडे एखाद्या विषयावर प्रगाढ चिंतन करण्यास भरपूर वेळ होता.इतर मानव समाजाच्या तुलनेत 'तत्त्वशास्त्रीय' पद्धतीने 'विचार' करण्याची पद्धत खूप पुढारलेली होती. समकालीन तुलना केवळ ग्रीक समाजाशी होऊ शकेल.एखाद्या विषयात प्रभुत्त्व मिळवण्यासाठी पूर्वसुरींनी मांडलेले वेगेवेगळे मुद्दे (सूत्रे) पूर्णपणे माहित असणे आणि
त्याचे खंडन/मंडन करण्याची पात्रता आत्मसात करणे हे आवश्यक होते.भारतीय तत्त्वचिंतकांचा बुद्ध्यांक किंवा 'आयक्यू' खूपच वरचा होता. त्यामुळे उपलब्ध संसाधनात जेजे शक्य असेल तेते सर्व त्यांनी उच्च पातळीपर्यंत पोचवले होते.
यात तत्त्वज्ञान, गणित,वैद्यकी आणि औषधशास्त्र, मानस आणि परमानसशास्त्र, लोहधातू शुद्धीकरण आणि वापर (लोहयुग), अर्थ/राज्यशास्त्र , ज्योतिष -म्हणजे खगोलशास्त्र इ. विषयांचा समावेश करता येईल.
२. ज्या वैज्ञानिक 'पाक'कृती उपलब्ध होत्या त्या मौखिक स्वरूपात किंवा गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित होत असत.
(पेटंटिंगची ही सर्वात जुनी आणि विज्ञानप्रसारासाठी सर्वात घातक पद्धत असावी.) या कृती इतरांना मिळू नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न केले जात. एक उदाहरण देतो -येथील एका पुराणवस्तु संग्रहालयात इ.स. १२०० मध्ये तयार केलेली तलवार आहे.या तलवारीला गंज तर चढलेला नाहीच पण तिची धार अजूनही तेवढीच तेज आहे.सदर तलवारीचे आधुनिक तंत्राद्वारे (इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप) संशोधन झाले असता तिचे पोलादी स्फटिक (ग्रेन्स) एका विशिष्ट पद्धतीने एकदिशानुगामी आहेत असे दिसते. शिवाय तिच्यातील धातूमिश्रणाचे घटक आणि प्रमाण आधुनिक पोलादापेक्षा उत्कृष्ट आहे इ.इ.
परंतु हे ज्ञान अस्तित्वात असूनही सर्व तलवारी / बहुतांश तलवारी इतक्याच उत्कृष्ट दिसत नाहीत. याचाच अर्थ हे ज्ञान मर्यादित ठेवले जात असावे आणि प्रक्रियेचे उत्पादनासाठी प्रमाणीकरण करण्यात धोका वाटत असावा.
३. विकास यांनी स्थापत्यशास्त्र/कलेतील उदाहरण दिले आहे. परंतु मी प्रत्यक्ष अजिंठा वेरूळ येथे गेलो असता तेथील अधिकृत माहितीच्या आधारे आणि स्वतः पाहिल्याप्रमाणे या 'पुराणकालीन संशोधकांना' भूगर्भशास्त्राविषयी खूप माहिती होती असे दिसत नाही. किंवा त्यांच्याकडे अल्ट्रासाऊंड सोनार सारखी जमिनीवरूनच आतील खडकाचा एकसंधपणा खणण्यापूर्वीच जोखणारी साधने होती असेही नाही. कारण काही गूहा खणल्यावर खडकात मोठी भेग आढळल्याने पूर्ण न करताच अर्धवट सोडून दिलेल्या आढळतात. (हिट अँड ट्रायल) अर्थात या कारागिरांकडे भरपूर वेळ आणि त्यांना आश्रय देणार्यांकडे भरपूर पैसा असल्याने ते पुनःपुन्हा प्रयत्न करत.
(हेच पिरॅमिडबाबत. काही पिरॅमिड चक्क फसले आहेत. इतक्या चढावकोनाचा पिरॅमिड टिकणार नाही असे लक्षात आल्यावर त्यांच्या कोनात टोकाकडे बदल केल्याचे दिसते. तर काही अर्धवट सोडून दिलेले आहेत, काही कोसळले आहेत. पण हे भारताच्या पौराणिक विज्ञानाबाबत नाही.)
४. ज्या उत्कृष्ट गोष्टी आपल्यापर्यंत अधिकृतरित्या लिखित स्वरूपात पोचल्या आहेत आणि आजही त्या वापरता येतात त्यांचा अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही. (उदा. शून्य, दशांश, आयुर्वेद,योगासने,खगोलशास्त्र, राज्यशास्त्र इ.)त्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना बळकट व्हायला मदत होते. परंतु ज्या गोष्टी केवळ सांगोवांगीच्या आहेत (उदा. गांधारीच्या एकशे-एक टेस्ट ट्यूब बेबीज, ब्रह्मास्त्र, लेव्हिटेशन) त्यावर 'हे आम्ही दहा हजार वर्षांपूर्वीच केले आहे' अशी वृथा फुशारकी मारण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे आपण भारतीय हास्यास्पद मात्र ठरतो.
याच नीरक्षीर विवेकाबद्दल प्रा. जयंत नारळीकर बोलत आहेत हे स्पष्ट आहे.
सहमत
शिळ्या कढीला उत येतो आहे. - सहमत.
हास्यास्पद ठरतो- सहमत.
साधे पेटंटस् साठी जुने-पाने सारे ढुंढाळून लोक 'डॉक्यूमेंट्' करून ठेवतायत असे दिसले. छान वाटले. टी के डी एल् पाहीले, अजुन छान वाटले.
म्हणून बोललो.
पुढे जे झाले ते हे असे. (या साईट् वर अनॉनिमस् लिहायची सोय दिसत नाही कुठे).
पुन्हा एकदा -
ज्या उत्कृष्ट गोष्टी आपल्यापर्यंत अधिकृतरित्या लिखित स्वरूपात पोचल्या आहेत आणि आजही त्या वापरता येतात त्यांचा अभिमान बाळगायला काहीच हरकत नाही. (उदा. शून्य, दशांश, आयुर्वेद,योगासने,खगोलशास्त्र, राज्यशास्त्र इ.)त्यामुळे राष्ट्रीयत्वाची भावना बळकट व्हायला मदत होते. यात जे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्याचे डॉक्युमेंटेशन करावे आणि ज्याचा ज्याचा वापर होऊ शकतो त्याचे आधुनिक इंटरनॅशनल पेटंटही घ्यायला हवे हेही आहेच. कारण अन्यथा दुसरेच कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी ते लांबवण्याचा धोका आहे. आपण उल्लेखलेले उपक्रम स्तुत्यच आहेत. तसे उपक्रम होणे गरजेचे आहे. भारत सरकारने त्यात लक्ष घालावे आणि संसाधने उपलब्ध करून द्यावीत. (दिलेली नसतील तर.) त्याबद्दल दुमत नाही.
तुमच्या मतांची पायमल्ली माझ्या प्रतिसादात झालेली मला दिसत नाही. उलट चर्चेने जे वळण घेतले त्यानुसार मी प्रतिसाद दिलेला आहे हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. 'परंतु चर्चेत प्रतिसादकांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे माझेही मत देण्यास उद्युक्त होत आहे.' या वाक्याकडे जरूर लक्ष द्यावे.
आपले पूर्वज महान होते
सर्वप्रथम आपले पूर्वज महान होते याविषयी माझ्या मनात अजिबात किंतु नाही परंतु त्यांचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी चुकीच्या कुबड्यांची गरज नाही असे वाटते.
वर्तक आणि नारळीकर या दोन्ही व्यक्ती भिन्न मतप्रवाहाच्या आहेत. एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे वर्तकांनी प्रतिवाद केला आहे तोच प्रतिवाद त्यांच्यावरही उलटवता येऊ शकेल. वर्तकांचा महाकाव्ये आणि पुराणे यांचा अभ्यास प्रचंड आहे, त्यांचे खंडण ते रोचक पद्धतीने करतात पण पुढे काय? सिद्ध करण्यासारखे पुरावे, प्रयोग, आराखडे इ. गोष्टी आल्या की ते वहावत जातात. नारळीकर जसे वैज्ञानिक दृष्टीकोनावर हटवादी दिसतात त्याचप्रमाणे वर्तक त्यांच्या दृष्टीकोनावर परंतु खोलात विचार करता वैज्ञानिक दृष्टीकोन प्रतिवादाने मोडून काढता येतो तसा अध्यात्मिक दृष्टीकोन मोडता येत नाही कारण साधना, अध्यात्म, योग इ. इ. ना काहीही बंदिस्तपणा नाही. "तुमची साधना कमी पडली." किंवा "अधिक साधनेची गरज आहे, ती करता तुम्हालाही मंगळाचे दर्शन होईल." असे म्हटले की प्रतिवाद होऊ शकतो आणि समोरचा गप्प राहतो.
नारळीकरांच्या वरील लेखात त्यांनी ज्या गोष्टींचा उहापोह केला आहे त्या विकास यांच्या प्रतिसादाशी जुळणार्या नाहीत. नारळीकरांनाही योगशास्त्र, आयुर्वेद वगैरेंबद्दल किंतु असावा असे त्या स्कॅन्ड पानांत दिसले नाही.
तळपद्यांच्या विमानाबद्दल हेच. महाराजा गायकवाड आणि टिळकांच्या समोर हा प्रयोग करण्यात आला, पण पुढे काय? याची विस्तृत माहिती अद्यापही पुढे आलेली नाही. विमानाला धावपट्टीची गरज होती का? ती कोणी आणि कशी उपलब्ध करून दिली? विमानाला चौपाटीवर उडवले तर ते हेलीकॉफ्टर सदृश होते काय? त्यात किती माणसे बसू शकत होती? विमानातील सुविधा, सोयी, यंत्रणा नेमक्या कशा होत्या? याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. ही झाली गेल्या शतकातील गोष्ट. टिळकांना बाजूला ठेवू पण महाराजा गायकवाडांनी या प्रयोगाचा पाठपुरावा न करणे म्हणजे प्रयोग पुढील टप्प्यांत अयशस्वी झाला होता काय? हे कळत नाही. याचप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी केवळ महाकाव्यात लिहिले म्हणून पुष्पक विमान होते आणि वाल्मिकींनी लिहिले म्हणून ते खरेच आहे असे म्हणणे थोडे आततायी वाटते.
हिमालय आणि विंध्य पर्वतांबद्दल धनंजय यांनी लिहिले आहेच. अशाप्रकारच्या भौगोलिक कथा पुराणांतून मुबलक सापडतात परंतु हे होत असता श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर तोलून धरला, इंद्राने पर्वतांचे पंख कापून त्यांना पृथ्वीवर स्थायिक केले, भगिरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली याचा अर्थ हे सर्व तत्कालिन सिविल इंजिनिअरींगमध्ये गुरू होते असे निष्कर्ष काढणे गंमतीशीर वाटते.
नाझ्का लाईन्स, पिरॅमिड्स, भारतीय देवळे इ. मध्ये आकार, प्रमाण, स्थापत्य हे सर्व निश्चितच वाखाणण्याजोगे आहे परंतु त्याला जाणीवपूर्वक वैज्ञानिक अधिष्ठान असल्याचे सिद्ध होत नाही. भरपूर वेळ, ट्रायल अँड एरर पद्धत, काम करणारे अनेक हात, साधन सामग्री आणि धनसंपदा असल्याने चूक सुधारली जाईपर्यंत प्रयत्न होत. ज्याप्रमाणे विसुनाना पिरॅमिड्स बद्दल सांगतात त्याप्रमाणेच आपल्याकडेही अनेक भग्नावशेष अपूर्णावस्थेत आढळतातच. त्यामागची कारणे अनेक असू शकतील. हीच ट्रायल अँड एरर पद्धत आयुर्वेद आणि योगसाधनेकरताही वापरली गेली असावी.
ग्रह, तारे, नक्षत्रे, फलज्योतिष हे सर्व आपल्याकडे ग्रीकांकडून आले. त्याचप्रमाणे मंदिरांची रचनाही मूळ ग्रीकांकडूनच. भव्य आकारातील मंदिरे बांधण्यास सुरूवात झाली गुप्त काळात. म्हणजेच हे झाले आयात केलेले ज्ञान. यापुढे जाऊन पाहिले तर न गंजणारा अशोकस्तंभ (?) हा वैज्ञानिक चमत्कार मानता यावाच याबद्दल दुमत नाही परंतु मग त्या न गंजणार्या धातूत इतर बांधकामे का केली गेली नाहीत? म्हणजे हे ज्ञान२ भारतात विकसित झाले असे म्हणण्याइतपत ठोस पुरावे देता येत नाही. (स्टॅच्यू ऑफ लिबर्टीप्रमाणे कोणी तो भेट१ दिलेला नसला म्हणजे मिळवली. ह. घ्या.) न गंजणारा स्तंभ अशोकानंतर अनेक शे वर्षांनी गुप्त काळात बांधला गेला. तो अशोकस्तंभांशी साधर्म्य साधतो पण मूळ अशोकस्तंभ धातूचे नाहीत तरी याला अशोकस्तंभ का म्हटले जावे हे कळले नाही. (चू. भू. दे. घे.)
ज्ञान "केवळ" जतन केल्याने वाढत नाही हे दाखवणारे पुरावे भारतात जितके सापडतील तितके अन्यत्रही सापडतीलच. ज्ञान हे प्रसार केल्याने वाढते आणि ज्ञानप्रसारासाठी अनेक पोषक मुद्द्यांची गरज असते. जसे, रूची, धन, शासनकर्त्यांचा पाठिंबा, सुबत्ता, गरज वगैरे.
अवांतरः गंमतीशीर गोष्ट म्हणजे हा लोहस्तंभ नेमका कोणत्या राजाच्या काळात किंवा कोणत्या राजाच्या स्मरणार्थ* बांधला गेला होता याबद्दल ठोस माहिती त्यावरील "लवचिक" शिलालेखामुळे स्पष्ट होत नाही. याची कारणे, राजाचे सरळसोट नाव न वदणे, काव्यात्मक वर्णनाला अवास्तव महत्त्व देणे या तत्कालीन पद्धती असाव्यात. लोहस्तंभावरील शिलालेखामुळे हे जतन झालेले
ज्ञान**कोडे आहे.* कोडे सोडवून गुप्तांचा चंद्रगुप्त राजाच्या संदर्भात शिलालेख असल्याने समोर येते.
* *ज्ञान असल्याबद्दल शंका नाही परंतु अशा काव्यात्मक कोड्यांनी अनेकदा वाहवत जाणारेच अधिक असतात.
१ असे काही झालेले नसावे. स्तंभ भारतातच बनवला गेला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध आहे असे वाटते पण नेमका कोणी बनवला याबद्दल नसावी.
२ येथे ढोबळपणे मेटॅलर्जी असे म्हणायचे नसून केवळ न गंजणारे लोखंड म्हणायचे आहे.
व्यास आनि शेक्सपियर
व्यासांनी भगवदगीता लिहिली. त्यातील प्रत्येक अक्षराला १-२६ असा कुठलातरी अंक जोडला, तर शेक्सपीयरचे हॅम्लेट तयार होते, असे नुकतेच आमच्या इन्फोसिसमधील हमाल बंधूने सांगितले. शेक्स्पियरने शेवटी व्यासाची कापी मारली, हेच बरोबर्.
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है
धन्यवाद....
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.
विकास, आपण अनेक उदाहरणे दिली आहेतच मात्र इतर सदस्यांप्रमाणेच ट्रायल अँड एरर (प्रयत्न आणि प्रमाद :-) पद्धतीने अशा बाबींची निर्मिती भारतात झाली असावी असेच मला वाटते. शिवाय धनंजय यांनी सांगितल्याप्रमाणेप येथे अशा वस्तूंबद्दल वाद आहे, ज्यांची उदाहरणे दिसत नाहीत. आणि तांत्रिक मॅन्युअलेही नाहीत. असो.
पाने देण्यामागे चर्चेत थोडी भर घालावी अशीच इच्छा होती. बर्याचदा प्रत्येकाजवळच सांगण्यासारखे बरेच असते मात्र त्याचा पुरावा देणे, संदर्भ देणे इतपत खोलात जाऊन कुणी अभ्यास बर्याचदा केलेला नसतो. नारळीकरांनी मात्र वस्तुनिष्ठ विवेचन केले आहे. मला तरी ते पटण्याजोगे वाटते.
नारळीकरांनी लेखात दिल्याप्रमाणे जिज्ञासा-प्रयोग-निरीक्षण-कारण-मीमांसा-भाकीत या संशोधनाच्या पायर्याही योग्यच आहेत. याहून चांगली पद्धत कोणती असू शकेल? शेवटी पुरावा असणे अतिशय महत्त्वाचे आहे. संस्कृतच्या लवचिकपणाच्या या दोषाबद्दलही या लेखात चर्चा व्हावी अशी विनंती.
लेखाच्या सुरुवातीलाच आपले पूर्वज अतिप्रगत होते का? या बाबतची समाधानकारक उत्तर द्यायला आवश्यक माहिती माझ्याकडे नाही असे नारळीकरांनी अगोदरच कबूल केले आहे. मात्र हे प्रश्न विज्ञानाच्या चौकटीत बसत असल्यानेच त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुराव्याला वैज्ञानिक निकषच लावले पाहिजेत असे ते म्हणतात. म्हणूनच त्यांनी हा लेख लिहला आहे. विज्ञानाचा संबंध नसलेल्या इतर गोष्टींसाठी त्यांनी आपला वेळ खर्च केला नसता. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे अशा अपेक्षा पुरे करणारे अनेक तज्ज्ञ उपलब्ध असतात.
जाताजाता: नारळीकरांची आपले पूर्वज, त्यांचे विज्ञान याबाबतीत नकारात्मक भूमिका घेतल्याचे संपूर्ण लेखात कुठेही दिसत नाही. पूर्वज अतिप्रगत होते का या प्रश्नाचे सध्या त्यांना वाटत असलेले नकारात्मक उत्तर, होकारार्थी करण्यासाठी आवश्यक असलेला पुरावा गोळा करण्याचे आव्हान थोड्यातरी संशोधकांनी हाती घ्यावे हाच त्यांच्या लेखाचा उद्देश असल्याने त्यांनी शेवटी नमूद केले आहे.
-सौरभ.
==================
ट्रायल एरर
ट्रायल अँड एरर (प्रयत्न आणि प्रमाद :-) पद्धतीने अशा बाबींची निर्मिती भारतात झाली असावी असेच मला वाटते. शिवाय धनंजय यांनी सांगितल्याप्रमाणेप येथे अशा वस्तूंबद्दल वाद आहे, ज्यांची उदाहरणे दिसत नाहीत.
मला वाटत नाही. निदान ज्यांचे लिखाण आहे, ते लोक तरी स्वतः क्रेडीट घेताना दिसत नाही.
कुठेही मी तरी 'अमुक एक शोधाचे श्रेय यांना जाते' असा उल्लेख पाहिलेला नाही. (मी जास्त संशोधन केले नाही पण जिथे कुठे 'हे कुणाचे' असा प्रश्न विचारावा, तिथे असे उत्तर मिळाले. जाणकारांनी प्रकाश टाकावा)
पण 'ज्ञानी लोकांचे असे म्हणने आहे (जगुर् बुधा)', किंवा शिवसुत्रातला 'डमरू' प्रकार (धनंजयराव, हा पाणिनी म्हणतो काहो, कि मी शोध लावला म्हणुन? आम्हाला शाळेत शिकवले ते वर लिहिले होते, पण तुम्ही म्हणता तसे 'डमरु' कुनी आयज्याबाईच्या जीवावर बायज्याबाई उदार असा प्रकार आहे किंवा काय, याचा खुलासा होऊ शकतो का हो? नाही, म्हणजे तुम्ही दिलेला पुराव्याबद्दल शंका नाही. तो कवीच असे म्हणतो. पण पाणिनी काय म्हणतो? (मूळ संस्कृतात?)) किंवा सुर्यसिद्धांत 'हा सुर्याने अरुणाला सांगितला' असे, किंवा कुठलेतरी गणितीय लिखाण 'हे जे मी विद्वानांपासुन शिकलो ते' . (आर्यभट्टीय बहुतेक. (कुणी सांगू शकेल का, आर्यभट्टीय मधे 'हे माझे' असा उल्लेख नसेल पण 'हे मी शिकलो' वगेरे बद्दल काही)
म्हणजे तयार माल मिळतो. पण हिस्टरी आणि डेव्हलपमेंट मिळत नाही, असा अनुभव आला आहे.
नारळीकरांची नकारात्मक भुमिका नाही, पण त्यांना जसे अपेक्षित तसे स्वरूप ह्या ज्ञानाचे असणार नाही.
(मेडिकल बद्दल प्रश्नः यात केवळ रोग कसा येतो (माझ्यामते हे लोक कफ-वात-पित्त या त्रिदोषांवर सारा डोलारा बांधतात.), आणि त्यावर औषध काय, कोणत्या प्रकृतीला काय मानवेल काय नाही वगेरे गोष्टी देतात. पण हे धन्वंतरी आणि आयुर्वेदाचा काय हो संबंध? ईथेही हे ज्ञान त्यांनी दिले वगेरे असा उल्लेख आहे काय? किंवा अश्विनीकुमार? शिवाय आयुर्वेदिक औषधे घेताना 'विष्णुचे स्मरण करावे' असे सांगितले आहे ते यासाठी की, रोग विष्णु बरा करणार, हे त्यांचे म्हणणे(हे मी जुन्या पिढीजात वैद्यांकडुन ऐकले. हे सद् गृहस्थ अत्यंत धार्मिक (शिवाय वैष्णव) असल्याकारणाने यांचे मत प्रमाण मानणे म्हणजे पुर्वग्रहदुषित माणसाचे ऐकणे असे होते किंवा काय यावर आपली मते खरडवहीत खरडावीत अशी विनंती. आताच्या आयुर्वेदिक कॉलेजेस् मधे हे शिकविले जात नसावे, 'वैज्ञानिक दृष्टीकोनात' बसत नाही असे वाटल्याने))
होकारार्थी करण्यासाठी आवश्यक असलेला पुरावा गोळा करण्याचे आव्हान थोड्यातरी संशोधकांनी हाती घ्यावे हाच त्यांच्या लेखाचा उद्देश असल्याने त्यांनी शेवटी नमूद केले आहे.
सध्या बेकार आहे. सबब, असे करायला आवडेल.
पण झाले तितके असेच दिसले की, हे ज्ञान 'आभाळातून पडले' असे म्हणण्याकडे कल आहे.
ऑफकोर्स्, टीकाकार (भाष्य लिहिणारे, जुन्या ग्रंथावर कॉमेंट्री करणारे काहीसे अर्वाचीन लेखक) जे विवेचन लिहितात ते त्यांचे आहे असे मानायला हरकत नाही. पण मूळात ते ज्यावर भाष्य करत आहेत ते कुठली पैदाईश आहे याचा ठिकाणा लागत नाही.
असो.
संस्कृतच्या लवचिकपणा मान्य (आणि आवडलाही, कुबुल है, कुबुल है, कुबुल है).
अल्केमी हा एक प्रकार आहे. जुन्या-जाणत्यांनी लिहुन ठेवलेला. हा कसा होतो ते लिहिलेले नाही, पण कसा करायचा ते आहे. म्हणजे नारळीकरांनी जसे म्हटले आहे तसे बिना एरोडायनामिक्स् चेच विमान उडवले आहे इथे पन्. करून पहावे म्हणतो. एरोडायनामिक्स् नसेल पण उडते विमान (येथे अर्थ: बावन्नकशी सोने) मिळाले तरी चालेल. पुंगी मोडली तरी चालेल. खाल्ली तर पचेल की नाही कुणास ठाऊक.
नागार्जुन संहिता श्रीसुक्ताला वेगळ्याप्रकारे डीसायफर् करते. ते डीकोडींग सोने कसे बनवावे असे सांगते.
पण त्यातही सोन्यात अमुक इतके प्रोटोन्, पार्यात अमुक इतके प्रोटोन् वगेरे कहिही उल्लेख नाही. हे काम करते असा 'गोपाळ भारती' नावाच्या (सध्या जिवंत असलेल्या. ) मनुष्याचे म्हणने आहे. पाहतो एकदा गाठून. पण हे 'फलेन परिचयते' झाले. (जर खरेच सोने बनले तरी) 'हे कसे काय विज्ञान?' असे म्हणता येईल, कारण ह्यात 'हे करा, ते करा, असे ठेवा , तसे ठेवा', वगेरे लिहिले आहे. मॅन्युअल् आहे. पण सोन्यात अमुक इतके प्रोटोन्, पार्यात अमुक इतके प्रोटोन्, आणि हे इकडून तिकडे कसे गेले ते सांगितलेले नाही.
अवांतरः बावन्नकशी हा शब्द कसा प्रचारात आला? कसाच्या दगडाचा आणि बावन्नचा काय संबंध होता.कसोटीच्या दगडावर घासुन पहाणे ह्या प्रकारात काही ५२ चा संबंध आहे काय?)
आपला नम्र
Dilettante
हम्म...
इंटरेस्टींग विषय आहे.
जालावर हे आणि हे वाचले.
म्हणून तर भारताला 'सोने की चिडीया' म्हणत नसावेत?
कदाचित 'कोल्ड फ्युजन'चाही शोध लागायला हरकत नाही.सिरियसली.
अल्केमी म्हणजे काय?
अल्केमी म्हणजे किमयाशास्त्र की रसायनशास्त्र? विकीवर हा लेख मिळाला.
मग त्याचा अर्थ केवळ शुद्ध सोने निर्मिती असा कसा होतो? यांत आणखी कोणत्या किमया मोडतात?
संपूर्ण चर्चेत वैदिक काळ (महाकाव्ये, कांस्य/ लोहयुग) आणि ऐतिहासिक काळ यांचा प्रचंड घोळ दिसतो आहे.
धन्यवाद आणि उत्तर
माझ्या प्रतिसादावर आलेल्या सर्व उत्तरांना धन्यवाद. मी त्या संदर्भात माझे उत्तर पुढच्या २४ तासात देतो. तो पर्यंत ही जागा राखून ठेवली आहे. मी उप्चर्चा चालू केली आणि तेथे नाही असे वाटू नये म्हणून हा लेखन प्रपंच.
बाकी आधी म्हणल्याप्रमाणे माझी मूळ प्रतिक्रीया नारळीकरांवर टिका म्हणूण् टिका करणारी नव्हती तसेच "सांगे वडीलांची किर्ती" असे करण्याचा हेतू देखील त्यात नव्हता. बाकी सविस्तर लिहीन्.
धन्यवाद!
राहीलेले उत्तर
माझा हा प्रतिसाद हा वरातीमागून घोड्यासारखाच प्रकार आहे. मधे अनेक गोष्टीत एकाच वेळेस व्यस्त होतो. तरी देखील हौस (अथवा त्याच अर्थाचा जरा वेगळा शब्द) असल्याने चर्चेत उडी मारली पण नंतर लक्षात आले की उत्तरे देण्यासाठी वेळ नाही आणि मग ते राहतच गेले. तरी क्षमस्व... आता थोडक्यात होणार नाही, पण तरी देखील माझे काय म्हणणे आहे हे लिहीतो.
सर्वप्रथम मी जेंव्हा नारळीकरांच्या काही म्हणण्यावर आक्षेप घेतला तेंव्हा मला पुराणात जे काही सांगितले आहे त्याचा संबंध आपण विज्ञानात पुढे आहोत हे सिद्ध करायचे होते असा अजिबात नव्हता आणि नाही आहे. वर्तकांचे उदाहरण देण्याचे कारण हे फक्त या लेखासंदर्भातील मूळ इतिहास सांगणे हे होते. बाकी वर्तकांच्या अनेक कल्पना मला माहीत आहेत ह्या येथे कदाचीत विरंगुळा या सदरात जास्त शोभतील असे वाटते. (उ.दा. गॉटेमला म्हणजे पुर्वीचे गौतमालय) तरी देखील त्यांच्या काही म्हणण्यात मला लॉजिक दिसलेले आहे, पण ते या संदर्भात नसल्याने वर्तक हा विषय येथेच थांबवतो.
माझा मूळ मुद्दा होता तो केवळ अधुनीक पद्धतीत जर "ज्ञान" असेल तर नव्हे तर "माहीती" असेल तरच त्यात तथ्य मानणे हे मला पटले नाही. उद्या कुठल्यातरी विषयावर गुगलवर शोध घेतल्यास त्यावरील माहीती मिळाली नाही, तर तो विषय, त्यावरील ज्ञान अस्तित्वातच नाही असे म्हणणे हे जसे चुकीचे ठरेल तसेच काहीसे हे वाटते. आता माझ्या प्रतिसादासंदर्भात काही आलेल्या प्रतिसादांना स्पष्टीकरण देतो:
"येथे वैद्यकशास्त्राचे उदाहरण नारळीकर पटण्यासारखे म्हणून देतात. ठळक ठशाच्या वाक्यावरून असे दिसते, की ते शास्त्र पाश्चिमात्त्य आराखड्याचे असले पाहिजे हा निकष नाही." - धनंजय
मान्य आहे. पण तीच अवस्था इतर ज्ञानासंदर्भात आहे.
"विंध्य पर्वत हा हिमालयापेक्षा उंचीने लहान आहे, यापेक्षा त्या पुराणकथेतून नेमके काय कळते, मला माहीत नाही...त्यामुळे हिमालय आणि विंध्य दोन्ही अहमहमिकेने उंचावत होते अशी कधी वेळच नव्हती." - धनंजय
मला विंध्य वाढायचा कधी थांबला ह्या भूगर्भिय सत्याबाबत माहीती नाही, मात्र हिमालय वाढतच राहीला हे तरी सत्य नक्कीच आहे. या पुराणकथेत असे त्याच दोन पर्वतां संबंधात वाटणे हे देखील बरेच सांगून जाते असे मला वाटते.
"लोखंडाचा स्तंभ, शिल्पे ही आहेत, त्याविषयी नारळीकरांचा वाद आहे, असे मला तरी जाणवत नाही. कैलास लेण्यांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान त्या काळात विकसित होते, याबद्दल कोणाला काही शंका आहे असे वाटत नाही. ते कौतुकास्पद तंत्रज्ञान होते, यात काही शंका नाही..." - धनंजय
नारळीकरांचा वाद या संदर्भात आहे असे माझे म्हणणे नाही पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे शास्त्रीय होते हे सिद्ध करता येत नाही म्हणून आपल्याला शास्त्रच माहीत नव्हते असे म्हणणे होऊ शकते. तुम्हाला वाटले की, "कैलास लेण्यांमध्ये वापरलेले तंत्रज्ञान त्या काळात विकसित होते, याबद्दल कोणाला काही शंका आहे असे वाटत नाही." पण तुमच्या नंतरच्या प्रतिसादात याला केवळ ट्रायला/एरर आहे असे म्हणून शंका घेतली जात आहेच.
"मेक्सिकोतील माया लोकांचे युग ~इ.स.२०३२ला संपणार आहे. ख्रिस्ती लोकांपैकी काही लोकांच्या मते ~इ.स.२०००ला संपणार आहे (होते? थोडक्यात हिशोब चुकला?) - तेव्हा जगबुडी आहे." - धनंजय
२०३२? अहो २०१२लाच संपणार आहे. बॉर्डर्स अथवा बार्न्स अँड नोबल मधे जाउन पहा यावर किती पुस्तके आहेत ते. काही शहाणे लेखक / प्रकाशक २०१२च्या आधीच त्यांचा फायदा करून मोकळे होत आहेत. :)
"तरी त्या शास्त्राच्या प्रगतीचा आधार घेऊन वेगळ्याच शास्त्रातले त्यांचे युगाच्या अंताचे गणित मला पटत नाही. त्या गणिताचे शास्त्र आणि मॅन्युएल बघून तपासल्याशिवाय विकास यांनाही ते पटणार नाही, असे मला वाटते." - धनंजय
अगदी बरोबर. किंबहूना मी अगदी आपल्याकडील पुर्वीचे ज्ञान हे आंधळेपणाने घ्यावे असे म्हणत नाही. तसे असते तर आयुर्वेदातील औषधात पारा पण कसा योग्य हे मी दाखवायचा प्रयत्न करेन. पण मी स्वतः पारा असलेले औषध घेऊ शकेन असे वाटत नाही. (अर्थात तसा घेतला तर "पारा चढला" म्हणजे काय ते कदाचीत कळू शकेल ;) ).
"याचाच अर्थ हे ज्ञान मर्यादित ठेवले जात असावे आणि प्रक्रियेचे उत्पादनासाठी प्रमाणीकरण करण्यात धोका वाटत असावा." - विसूनाना
अगदी बरोबर. मला असेच वाटते आणि या असल्याच सवयीने आपण मार खाल्ला असे वाटते. तसे पहाल तर महाभारतात तर द्रोणाचार्य सर्वांना समान ज्ञान देत नसत. इतकेच काय ब्रम्हास्त्र हे जसे सोडायचे ज्ञान होते तसेच ते मागे घेण्याचे पण ज्ञान होते. मात्र तसे पूर्ण ज्ञान त्यांनी अश्वत्थाम्यास दिले नव्हेत. तेच कृष्णाने अभिमन्यूच्या बाबतीत केले. तेच शुक्राचार्यांनी संजीवनीविद्येसंदर्भात वगैरे वगैरे...
"विकास यांनी स्थापत्यशास्त्र/कलेतील उदाहरण दिले आहे. परंतु मी प्रत्यक्ष अजिंठा वेरूळ येथे गेलो असता तेथील अधिकृत माहितीच्या आधारे आणि स्वतः पाहिल्याप्रमाणे या 'पुराणकालीन संशोधकांना' भूगर्भशास्त्राविषयी खूप माहिती होती असे दिसत नाही. किंवा त्यांच्याकडे अल्ट्रासाऊंड सोनार सारखी जमिनीवरूनच आतील खडकाचा एकसंधपणा खणण्यापूर्वीच जोखणारी साधने होती असेही नाही. कारण काही गूहा खणल्यावर खडकात मोठी भेग आढळल्याने पूर्ण न करताच अर्धवट सोडून दिलेल्या आढळतात. (हिट अँड ट्रायल) अर्थात या कारागिरांकडे भरपूर वेळ आणि त्यांना आश्रय देणार्यांकडे भरपूर पैसा असल्याने ते पुनःपुन्हा प्रयत्न करत." - विसूनाना तसेच
नाझ्का लाईन्स, पिरॅमिड्स, भारतीय देवळे इ. मध्ये आकार, प्रमाण, स्थापत्य हे सर्व निश्चितच वाखाणण्याजोगे आहे परंतु त्याला जाणीवपूर्वक वैज्ञानिक अधिष्ठान असल्याचे सिद्ध होत नाही. भरपूर वेळ, ट्रायल अँड एरर पद्धत, काम करणारे अनेक हात, साधन सामग्री आणि धनसंपदा असल्याने चूक सुधारली जाईपर्यंत प्रयत्न होत.- प्रियाली आणि "विकास, आपण अनेक उदाहरणे दिली आहेतच मात्र इतर सदस्यांप्रमाणेच ट्रायल अँड एरर (प्रयत्न आणि प्रमाद :-) पद्धतीने अशा बाबींची निर्मिती भारतात झाली असावी असेच मला वाटते." - सौरभदा
स्थापत्यशास्त्र हे "ट्रायल अँड एरर"ने जमू शकणारे शास्त्र नाही. मी पण सिव्हील इंजिनियर असल्याने हे त्यामाहीती/अनुभवाधारावर पण असे म्हणत आहे. जगातील कुठलेही नवे-जुने-पुराणे स्ट्रक्चर हे अंदाजपंचे कोणी बांधलेले नाही. त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया, सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी आणि अशीच अजून काही किमान माहीती कुठल्यान कुठल्या रुपात वापरावी लागतेच. पुर्वी ती वेगळ्या पद्धतीने/नावाने वापरली असेल आणि आता ती वेगळ्या पद्धतीने/नावाने. पण पुर्वी कसे केले होते हे माहीत नसल्याने आपल्याला अथवा तशीच जगात इतरत्र माहीतीच नव्हते असे म्हणणे हे पटत नाही. दुर्दैवाने आपल्याकडे बिल्डींग काय कोणीही बांधू शकतो असा गोड गैरसमज बिल्डींग काँन्ट्रॅक्टर्सनी करून दिला. पर्यायाने पत्त्याच्या बंगल्यासारख्या इमारती कोसळतात अथवा काँक्रीट्च्या असूनही टिकावू होत नाहीत....
बाकी चुकलेले खड्डे अथवा फसलेले पिरॅमिड्स म्हणाल तर दोन उदाहरणे अगदी बॉस्टनजवळची देतो, जिथल्या एम आय टीचा अधुनिक स्थापत्यशास्त्रात मोलाचा सहभाग आहे: ऍम्हर्स्ट येथील विश्वविद्यालयाच्या एका ग्रंथालयाचे डिझाइन करताना लाइव्ह लोड घेण्याचेच विसरले होते पर्यायाने पुस्तके,उपकरणे आणि माणसे यांचे लोड न सांभाळता आल्याने ती इमारत खचत होती. कॉपलीस्क्वेअर मधे एक सुंदर इमारत आहे. बाहेरून संपूर्ण काचेची वाटेल अशी (हँकॉक टॉवर). ती जेंव्हा बांधली तेंव्हा विंडलोड घेण्याचे विसरले पर्यायाने वरील काचा पडून खाली फुटू लागल्या... अशी अजून अनेक उदाहरणे आहेत. याचा अर्थ असा नाही की जरी एरर झाला तरी ते ट्रायल-एररने बांधत होते.
"ग्रह, तारे, नक्षत्रे, फलज्योतिष हे सर्व आपल्याकडे ग्रीकांकडून आले." - प्रियाली
मला तसे वाटत नाही. विकीसंदर्भात पण असे दिसलेले नाही. (ग्रिक - 7th century BCE आणि भारतीय - Vedānga Jyotiṣa—dates back to around 1200 BC,). अजून काही संदर्भ असल्यास अवश्य सांगावेत.
"भव्य आकारातील मंदिरे बांधण्यास सुरूवात झाली गुप्त काळात. म्हणजेच हे झाले आयात केलेले ज्ञान. यापुढे जाऊन पाहिले तर न गंजणारा अशोकस्तंभ (?) हा वैज्ञानिक चमत्कार मानता यावाच याबद्दल दुमत नाही परंतु मग त्या न गंजणार्या धातूत इतर बांधकामे का केली गेली नाहीत? म्हणजे हे ज्ञान२ भारतात विकसित झाले असे म्हणण्याइतपत ठोस पुरावे देता येत नाही." - प्रियाली
हे "आयात ज्ञान आहे," याला तरी काही पुरावा आहे का? बरं आयातज्ञान म्हणावे तर अशी मंदीरे ज्या भागातून आयात केली तेथे आहेत का? भारतातील भारतात पण मंदीराच्या पद्धती या दक्षिणे कडे आणि उत्तरेकडे वेगळ्या आहेत म्हणजेच त्या स्थानीक आहेत बाहेरून आलेल्या वाटत नाहीत.
"ज्ञान "केवळ" जतन केल्याने वाढत नाही हे दाखवणारे पुरावे भारतात जितके सापडतील तितके अन्यत्रही सापडतीलच." - प्रियाली
अगदी बरोबर. म्हणूनच मी देखील इतरत्र असलेल्या ज्ञानाचे पुरावे जे नारळीकरांना हवे त्या तत्वात बसत नसूनही ज्ञानच आहे असे वाटते.
नारळीकरांची आपले पूर्वज, त्यांचे विज्ञान याबाबतीत नकारात्मक भूमिका घेतल्याचे संपूर्ण लेखात कुठेही दिसत नाही. - सौरभदा
माझे असे अजिबात म्हणणे नाही की नारळीकर नकारात्मक भुमिका घेत आहेत म्हणून. मात्र पुराणातील अथवा अधुनीक, "बाबा वाक्य प्रमाणम्" घेणे नको वाटते. इतकेच काय ते म्हणावेसे वाटते.
धन्यवाद
याबाबत
याबाबत थोडे येथे वाचता येईल. हे देखील वाचा. बाकी संदर्भ शोधून सहज मिळण्यासारखे आहेत.
जशीच्या तशी मंदिरे आयात करण्याची गरज नसावी. देवांसाठी भव्य मंदिरे बांधणे हीच मुळात परकीय कल्पना आहे. आपल्याकडे असे पूर्वी केले जात नव्हते. याचा अर्थ पार्थेनॉनसारखेच मंदिर भारतात असायला हवे असे नाही.
पटले नाही. ट्रायल एरर वापरून खाचाखोचा लक्षात येतात आणि त्यातून बांधणी होते असे मला वाटते. मग ती झोपडी असो की प्रासाद.
सध्या इतकेच. बाकी वेळ झाला की.
आपले पूर्वज महान होतेच पण ते चमत्कारिक होते असे मी म्हणणार नाही. ;-)
ट्रायल ऍड एरर
आत्तापर्यंत हे नुसते वाचतच होते. वरच्या इतर सर्व बाबतीत मला गम्य नसले तरी देवळे/लेणी याबद्दल करीत असलेल्या तुटक वाचनामुळे माझेही (!) मत द्यायला जरा मध्ये पडावेसे वाटले.
कुठच्याही नव्या गोष्टीत काही प्रमाणात ट्रायल अँड एरर ही असतेच. जोवर शास्त्र अतिप्रगत होत नाही, तोवर कमी-अधिक प्रमाणात तेही असणे स्वाभाविक आहे. शास्त्राची प्रगती वाढताना हळूहळू ट्रायल घेणे कमी होत जाते/जावे.
मला वाटते विकासचे म्हणणे आहे की भारतात बांधलेले मोठे स्तूप, स्तंभ किंवा देवळे केवळ अशा प्रकारे कसलाच विचार न करता बांधलेली नसावीत.
अजंठा येथील लेण्यांबाबतीत एक पुस्तक हाती लागले आहे. यातील पान २९१ वाचावे. यात म्हटल्याप्रमाणे असल्यास (२८ नक्षत्रे, २८ गुंफा, तीन गुंफांचे अक्ष एकाच बिंदूत मिळणे इत्यादी) स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला गेला असावा किंवा आराखडा (मास्टर प्लॅन) केला गेला असावा, असे समजण्यास जागा आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे अजून एका पुस्तकातील परिशिष्टात काही उल्लेख आढळतात ते पान ५१८ वर टीप १ मध्ये व्हरांड्याच्या मोजमापांवरून. ही मोजमापे साधारण अनेक द्राविडी देवळांत आढळतात असे काही सुचवणारा हा संदर्भ आहे.
The cave temples of India By James Burgess">इथे - हे पुस्तक मी वाचलेले नाही, सहज चाळताना आढळले ते नजरेला आणून देते आहे.
तसेच भाजे येथील लेण्यांमध्ये मला वाटते ज्या व्यापार्याने ते बांधले त्याने अशा अर्थाचे कोरून ठेवलेले शिलालेख सापडले आहेत की "मी बांधलेले हे स्थापत्य स्तूपांमध्ये उत्कृष्ट म्हणून समजले जाईल". अजूनही तेथील लाकडी तुळया सुस्थितीत आहेत असे वाचले आहे. (हे आठवणीतून लिहीत आहे, संदर्भ पाहून सुधारेन). नुसते ट्रायल आणि एररमधून असा आत्मविश्वास यायला नको.
काही बाबतीत पाश्चिमात्य आणि भारतीय कलेत फरकही असावे. येथील पान ५४ वर असे म्हटले आहे की पाश्चिमात्य स्थापत्यात स्तंभ हे एक महत्त्वाचे अंग आहे. त्याऐवजी भारतीय स्थापत्यात लहान गृहे ही बिल्डिंग ब्लॉक असल्याप्रमाणे वापरली गेली आहेत. याविषयी अधिक अभ्यास करून बोलावे लागेल तेव्हा इथे थांबवते. पण मला वाटले ते असे की याचा अर्थ पाश्चिमात्य आणि भारतीय स्थापत्यकलेत फरक आहे/असावा.
एक भारतातील स्थापत्याचा अभ्यास करणार्यांमध्ये जेम्स फर्ग्युसन हा अभ्यासक प्रसिद्ध आहे, पण त्याचीही काही मते ही भारतीयांना "नेटिव्ह" समजण्यामुळे काहीशी डागाळलेली असल्याने तपासून घ्यावीत असे दिसते आहे.
जेम्स फर्ग्युसन आणि राजेंद्रनाथ मित्रा यांतील यासंबंधीचा वाद यासंबंधी दोन्ही मतांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने वाचला पाहिजे असे वाटते.
तरीही अर्थात जगातील विविध ठिकाणच्या स्थापत्यामुळे तेव्हाही भारतात काही विशिष्ट प्रकार प्रचलित झाले असले तर काही आश्चर्य नाही. पण त्याचा उलट अर्थही काढला जाऊ नये, की भारतीय स्थापत्यकला ही केवळ आयात केली गेली होती किंवा अनुमानधपक्याने सुरू राहिली होती. माझ्या माहितीप्रमाणे स्तूपांच्या प्रत्येक जागेला काही विशिष्ट संज्ञा आहेत (देवळांच्याही असाव्यात), अशा पद्धतीच्या संज्ञा या जेव्हा कला प्रगत होत असते तेव्हा तयार होतात, वापरल्या जातात. ह्याचाही विचार व्हावा.
मला वाटते
मला वाटते असे विकासच का इतर कोणीही म्हणत नसावे. म्हणणे इतकेच आहे की ट्रायल अँड एरर पद्धतीनेच बांधणी निश्चित केली गेली. कोणत्याही वैज्ञानिक संकल्पना (या नकळत वापरल्या गेल्या असतील) वापरून पहिली बांधणी झाली नाही. बाकी, २८ नक्षत्रे, २८ गुंफा, तीन गुंफांचे अक्ष एकाच बिंदूत मिळणे इत्यादी (जसे अशाप्रकारची परिमाणे पिरॅमिड्सबाबतही आढळतात) हे अनेकवेळा बांधणी झाल्यावर त्यात विचारपूर्वक घातलेली भर आहे. त्यामागे खूप मोठी वैज्ञानिक प्रक्रिया असावी असे वाटत नाही.
मला वाटते असे कोणीही म्हणत किंवा सुचवत नसावे. :-)
ट्रायल-एररवर एक समांतर उदाहरण - नवशिकी गृहिणी मीठ, मसाल्याला सरावलेली नसते. केलेले अन्न किती लोकांसाठी असेल याचाही प्रथमतः तिला अंदाज नसतो. प्रथम ती अंदाजाने मीठ, हळद टाकते. पदार्थ बिघडला, कमी पडला तर पुढच्यावेळेस स्वतःत सुधारणा* करते. हळूहळू अंदाजाचे प्रमाण बनते. मग ती त्या प्रमाणात* मीठ, हळद, मसाले टाकते. कितीजणांना पुरेल हे ठरवते. पदार्थ जमला की तिला आत्मविश्वास येतो आणि त्यात ती वेरिएशन्स* करते. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग* करते. हे प्रयोग तिचे स्वतःचे असू शकतात. (indigenous) केलेला पदार्थ अधिक ऍपेटायझिंग व्हावा म्हणून सुशोभित करते. उदा. कोफ्त्यांवर मलईच्या वर्तुळे काढते. ही वर्तुळे काढताना तिने त्रिज्या, व्यास, परिघ वगैरे बाबी लक्षात घेतलेल्या असतातच असे नव्हे. तर ज्या भांड्यात कोफ्ते ठेवले आहेत. त्या भांड्यात मावेल अशा पद्धतीने मलईची रेखाटने* करते. परंतु, आपसूक सर्व भौमितिक परिमाणांची पूर्तता होते. यात त्या गृहिणीचे अतिशय कौतुक आहेच कारण ती कष्ट घेऊन एक पूर्ण प्रक्रिया* पार पाडते, त्यात अधिक कौशल्य*, सुधारणा आणते. कधी काळाने ही पाककृती तिची "पेश्शल" म्हणूनही प्रसिद्धी पावते. :-)
* येथे सुधारणा, प्रमाण, वेरिएशन, प्रयोग, रेखाटन, प्रक्रिया, कौशल्य हे शब्द वैज्ञानिक संकल्पनेला/ संशोधनांना/ प्रमाणांना पूरक असतीलच असे नाही.
एक खुलासा - मी फक्त भव्य आकारातील मंदिरांबद्दल टिप्पणी केली आहे. (जसे, पायर्या, खांब, ओसरी, गर्भगृह) इतर स्थापत्यकलेबद्दल नाही. भारतात सर्व आयात झाले असे म्हणण्याचाही हेतू नाही. तेव्हा हा विषय देखील वाहवत चालल्यासारखा वाटल्याने येथेच थांबते.
संदर्भ
हे अवांतर वाटत असल्यास अधिक अवांतर लिहीण्याची इच्छा नाही. पण जमल्यास एक स्पष्ट करून हवे आहे.
म्हणणे इतकेच आहे की ट्रायल अँड एरर पद्धतीनेच बांधणी निश्चित केली गेली. कोणत्याही वैज्ञानिक संकल्पना (या नकळत वापरल्या गेल्या असतील) वापरून पहिली बांधणी झाली नाही.
हे अधिक माहिती असल्याने ठामपणे लिहील्यासारखे वाटते आहे.
माझा याबाबतीत अभ्यास नाही, म्हणून मान्य करीनही कदाचित, पण यासंबंधी संदर्भ द्यावे ही विनंती.
आजच्याप्रमाणे जागेचा सर्व्हे करून कागद वापरून आराखडा केला असेल असे माझेही म्हणणे नाही. तरीही त्यामागे काही एक विचार असावा असे वाटते. विचार आजच्या पद्धतीचा नसेल, पण अगदीच रूडीमेंटरी देखील नसावा. स्वयंपाकघरातले उदाहरण ठीक आहे, दैनंदिन आहे. पण दुसरे उदाहरण द्यायचे झाले तर आजही सॉफ्टवेअर प्रोग्रॅममधले बग्ज काढणारे लोक आहेतच, प्रणाली आधी कशी असावी, तिने काय करावे हे सर्व ठरवून तिचा आराखडा करून नंतरही बग्ज निघतातच की. मग त्या प्रणाली मागे काही विचार नसतो असे कसे म्हणावे?
हे सर्व अवांतर असल्यास नवीन ठिकाणी हा प्रश्नात्मक धागा सुरू करायलाही माझी तयारी आहे.
भव्य मंदिरांबद्दल माझा अभ्यास नाही. चालुक्य राजांच्या काळात मंदिरांच्या भव्यतेचे प्रमाण वाढले आणि देवळांचे वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चर तयार झाले असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. चालुक्य घराणे हे बहुतांशी दक्षिणेतले असावे. संदर्भ मिळाला की देईन.
हम्म!
हे ठामपणे मुद्दाम लिहिले नव्हते पण सहज लिहिताना झाले. :-) कृपया, "असे वाटते" हे बिरुद लावून वाचावे. माझ्याकडे सध्या संदर्भ नाहीत, (चाणक्यांनी काही संदर्भ माझ्या खरडवहीत टाकले आहेत असे आणखीही शोधून देता येतील.) परंतु हे मान्य करेन की मला ठाम वाटते की आधी विचार मग प्रथम बांधणी झाली नाही. इजिप्तचे पिरॅमिड्स कसे बांधले गेले यावर काही कार्यक्रम (शृंखला) पाहिले होते त्यावरून तसे मत झालेले आहे. आपले पूर्वज महान होते ते असे काही करत नव्हते वैज्ञानिक प्रयोगांतून भौतिकशास्त्राचे नियम लावून, पाळून बांधकामे करत होते असे कोणी पटवून दिले तर माझे मत बदलेनच. (चित्रांनी असे म्हटल्याचा दावा नाही) आपले पूर्वज इतके महान होते हे कळण्यात आनंद आहेच.
विचार केल्याशिवाय कामे केली असे कोणीही म्हटलेले नाही. ट्रायल एरर पद्धतीतही माणूस विचार करूनच काम करतो किंवा एरर आली तर ती का आली यावर विचार करतो आणि त्यात सुधारणा करतो पण बांधकाम आधी करतो आणि नंतर विचार करतो इतकेच.
कोणतीही प्रणाली ही १००% बग-फ्री किंवा सिक्स सिग्मा कंप्लायंट नसते. घर बांधून झाल्यावरही वर्षभरात भेगा पडतात किंवा इतर अडचणी येतात. कोणत्याही प्रणालीत विचार नसतोच यांत स्वयंपाकघरातील गृहिणीचाही समावेश आहे असे म्हणण्याचा हेतू नाही.
असो.
खाली पक्षी यांनी लिहिल्याप्रमाणे -
"ट्रायल अँड एरर" ही एका पिढी किंवा शतकातच घडणारी प्रक्रिया नसून ती शतकानुशतके, पिढ्यांपिढ्या होत असलेली प्रक्रिया आहे. आजुबाजूला सर्वदूर ती घडतेच आहे.
मी चर्चेतून माघार घेत आहे कारण तेच तेच पुन्हा सांगण्यात स्वारस्य वाटत नाही.
हरकत नाही
चर्चा थांबवते मीही. फक्त एकदोन गोष्टी स्पष्ट करून. या चर्चेत आधी सहभागी होणार नव्हते, कारण काही विषय हे धुरळा उडवतातच तसाच हा वाटला. कारण लोक अशा विषयांवरून फार भावनाप्रधान होतात, किंवा सार्कॅस्टिक होतात हा अनुभव. तरीही नंतर या चर्चेत सहभागी होण्याचे कारण म्हणजे केली गेलेली काही सरसकट वाटलेली विधाने.
माझ्या अल्प माहितीप्रमाणे भारतीय स्थापत्यकलेचा (शिल्पकलेचा नव्हे) संदर्भ असलेली पुस्तके विरळा आहेत, जी आहेत ती अनेकदा आधीच्या ब्रिटिश संशोधकांनी काहीशी चष्म्यातून पाहून लिहील्याने त्यातील प्रत्येक विधान मी तसेच्या तसे खरे मानणार नाही. त्याप्रमाणेच भारतीय संशोधकांनी केलेले संशोधनही त्यांच्या भावनाप्रधान लिहीण्यामुळे खरे आहे असे समजत नाही. पण त्यांना एक डाव आपली बाजू मांडण्याइतकेही सौजन्य दाखवलेलेही अनेकदा दिसत नाही, सुरूवातीपासून दिसतो तो उपरोध आणि हेटाळणी. असो.
माझ्या मते महानता हा फार मोठा शब्द झाला. तशा काही व्यक्ती असाव्यात, पूर्ण समाज महान होता असे समजणे धार्ष्ट्याचे होईल. माझ्या मते भौतिकशास्त्राचे नियम ज्ञात असणे हे बुद्धिमत्तेचे एक लक्षण आहे, महानतेचे नव्हे.
आता चर्चाप्रस्तावकांच्या मूळ मुद्द्याबद्दल. ज्ञान/माहिती मग ती मण्यांचे दागिने असोत, स्थापत्य असो, पाककला असो, त्यांचे लिखित स्वरूपात जतन करण्याची गरज आहे हा तो मुद्दा आहे असे वाटले. भारतीय असल्याने कोणाला जवळिकीमुळे असे वाटले तर गैर नाही. आणि असे कोणतेही ज्ञान म्हणा किंवा माहिती जशी असेल तशी संकलित करणे याची गरज आहे. ते जे करत आहेत त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद.
असो. चर्चा माझेही सांगून झाले असल्याने थांबवते.
संदर्भ
याबाबत थोडे येथे वाचता येईल. हे देखील वाचा. बाकी संदर्भ शोधून सहज मिळण्यासारखे आहेत.
यातील पहीला संदर्भ हा आपण चालू केलेल्या चर्चेतील आहे आणि त्यात घाटपांड्यांनी दिलेल्या शं. बा. दिक्षीत यांनी १८९६ साली दिलेल्या पुस्तकातील "वार आणि राशी या खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक संस्कृती संस्कृती कडून आपल्याकडे आल्या असे त्यांचे मत आहे." याच्याशी संबंधीत आपण म्हणता आहात असे वाटले. अर्थात यासंदर्भात पण ग्रिकांकडून नक्की आले असे काही म्हणलेले नाही इजोप्शियन्स पण असू शकतात असे म्हणलेले आहे.
दुसरा संदर्भ हा विकीचा आहे. त्याच पानावर विकीच्याच संपादकांनी "The neutrality of this article is disputed. " असे म्हणलेले आहे. त्या संदर्भातील चर्चा वाचनीय आहे. त्याच्याही पुढे त्याच पानावर, "Astrology in the Middle East and Europe" ह्या भागासंबधात "This section needs additional citations for verification" .असे म्हणलेले आहे. असे चीन, भारत आणि अधुनीक अमेरिकेसंदर्भात लिहीलेले नाही.
त्याही व्यतिरीक्त तुर्तास अजून एका पुस्तकाचा संदर्भ देतो ज्यात ग्रीकांकडून भारतात खरेच खगोलशास्त्रीय ज्ञान आले का या संदर्भात लिहीलेले आहे आणि लेखकाला ते भारतातील वाटते असे दिसते: Ancient calendars and constellations, By Emmeline Mary Plunket Published by J. Murray, 1903. त्यात बरेच काही वाचनीय आहे, तरी देखील वेळे अभावी फक्त त्यातील फक्त एक जीन सिल्व्हीयन बेली या लेखकाचा एक उतारा खाली देत आहे. (पृ. २६):
Ancient calendars and constellations By Emmeline Mary Plunket
Ancient calendars and constellations By Emmeline Mary Plunket
बाकी स्थापत्यशास्त्रासंदर्भात कुठल्याही भव्य वास्तू, नगररचना या ट्रायल एरर ने आल्या असे वैज्ञानिक वृत्ती असलेले पाश्चात्य पण मानणार नाहीत. तसे ते अगदी मायन संस्कृती, इजिप्शियन संस्कृतीच्या संदर्भात पण समजत नाहीत. पण त्यावर अधिक परत कधी तरी...
होरा
मी विशेषतः फलज्योतिष - हॉरोस्कोप वगैरे वरून ग्रीक असे म्हटले. इजिप्शियन संस्कृती म्हणजे नेमकी कधी? टोलेमीच्या काळातील की तत्पूर्वीची? वगैरेवर सध्या अभ्यास केलेला नाही. त्यामुळे खाल्डीयन, इजिप्शियन असण्याला माझा काहीच प्रत्यवाय नाही. :-) आमचे पूर्वजच फक्त महान होते (म्हणजे ते होतेच) असे वाटू नये इतकेच सांगण्याचा प्रयत्न आहे.
असो. विषय फार वाहवत चालला आहे तेव्हा येथेच थांबते. बाकी, दिलेले उतारे वेळा काढून वाचेनच.
सहमत आहे
प्रियाली यांच्या "ट्रायल अँड एरर" मताशी सहमत आहे. खरेतर विकास आपण दिलेली दोन उदाहरणे तेच सिद्ध करतात. ट्रायलचा अर्थ असा नव्हे की बांधणार्या लोकानी जाणीवपूर्वक ट्रायल म्हणून इमारत बांधली. अहो इतिहासातही लोक इमारती आत्मविश्वासाने बांधत असणार. पण हँकॉक टॉवरप्रमाणे नंतर चुका लक्षात आल्यानंतर त्या दुरूस्त करून पुन्हा आत्मविश्वासाने प्रयत्न करत असणार. समकालीन स्थापत्यशास्त्रात चुकांची किंमत जास्त असल्याने आणि ज्ञानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या कमी होतात. "ट्रायल अँड एरर" ही एका पिढी किंवा शतकातच घडणारी प्रक्रिया नसून ती शतकानुशतके, पिढ्यांपिढ्या होत असलेली प्रक्रिया आहे. आजुबाजूला सर्वदूर ती घडतेच आहे.