जपणूक् आपल्या ठेव्याची

भारतात अति प्राचीन सन्स्कृती असल्याने तिचे 'ठेवे' ही अनेक आहेत.
त्यातील एक महत्वाचा म्हणजे "ग्रन्थसम्पदा"
या ग्रन्थान्मधे अनेक विषयान्वर विपुल ज्ञान आहे - उदा. गणित, ग्रह - तारे यान्च्या गति, स्थापत्य शास्त्र, दुखण्या-खुपण्यावर ईलाज, धातुशास्त्र, शस्त्रविद्या, (टिळकान्नी म्हणे वेदिक ज्ञानवर आधारित विमान बनविणारा शिवराम बापुजी तळपदे आणि त्याचे विमान (उडताना बरे का, जमिनीवर नाही) पाहिले होते. ब्रिटीशन्च्या काळात भारत सर्वोच्च पोलाद निमिर्ती करत होता, textiles मधे दादा होता वगेरे. कुठे गेले ते ज्ञान? विना ज्ञानच ते काही हे सारे करत नव्हते. वेलस्ली हा फ्रेन्च मनुष्य टीपू चे अग्निबाण घेवुन गेला आणि जतन करून ठेवले म्हणून आज ही ते फ्रेन्च् सन्ग्रहालयात दिसू शकतात. नासाच्या स्वागतिकेच्या मागे भिन्तीवर तसे चित्र ही आहे म्हणे. ह्या सर्व गोष्टी अगदी आत्ता आत्ताच्या. आणि आपण आपलाच इतिहास ह्युएन् त्सन्गादि इतरेजन्नाच्या लिखणातुन वाचावा का?)

व्यासान्नी सारे जग उष्टे केले म्हणतात. कसे? सारे ज्ञान त्यान्नी जतन करण्याच्या हेतूने document करून् ठेवले.
(हाय्! ही कलियुगी स्मृती! पूर्वी सारे मौखिक रूपातच 'स्टोअर्ड्' होते).

आजमितीला आपल्या देशात लाखो ग्रन्थ धूळ खात पडून आहेत.
त्यान्ना जतन करून ठेवण्यासाठी म्हणून सरकार प्रयत्न करत आहे.
(वाचा: चतुरन्ग पूरवणी, लोकसत्ता ४ एप्रिल २००९. किन्वा गूगल मधे शोधा NMM)

सारा खटाटोप कशासाठी?
१. ज्ञानाची चोरी थाबवण्यासाठी
२. आपल्याच सम्स्कृती बद्दल आपल्याला अधिक महिती सान्गण्यासाठी

हळद, कडुनिम्ब, बासमती, आणि अशातच योग क्रियान्चे इतरान्नी घेतलेले पेटन्ट पाहिले की या प्रकाराची जरूरी भासते.
त्यावेळी डा. रघुनाथ माशेळकरान्नी जे काम केले त्याला सलाम. (पहा: TKDL )

आपल्या देशावर राज्य करणे हा तोन्डचा खेळ नाही हे लक्षात आल्यावर, मेकौलेने जी आपल्या सम्स्कृतीची धुळधाण लावली, त्यामधुन सावरण्याचा हा एक प्रयत्न.

(काळ मोठा कठिण येणार आहे, जय्यत तयार रहा)
(फार कशाला, माझ्या नव्या वहिन्नीना, काकु-मावशीन्ना येतात ते पदार्थ बनवता येत नाहीत. ज्ञान जतन करणे आपल्या पोटापाण्यासाठीही अगदी आवश्यक आहे)
project guttenberg काय प्रकार आहे, पहावे म्हणतो.

Comments

अजून एक पुस्तक...

निरंजन घाटे यांचे 'आपल्या पूर्वजांचे विज्ञान' नामक पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. त्याचे परीक्षण इथे
इच्छुकांनी मिळवून जरुर वाचावे. :-)

-सौरभ.

==================

फारच उशीरा प्रतिसाद

दोन गोष्टींबाबत थोडे क्लॅरिफिकेशन करीत आहे. (स्वगतः मिसळपाव वर् शेवटच्या अक्षराला ए लावावा लागत् नाही - स्पेस् मारल्यावर् बहुधा ए आपोआप् ऍड् होतो. इथे लक्षात् ठेवून् ए लावायला पाहिजे.)

एखादे वर्णन जुन्या लिखाणात जुळत असले तरी त्याचा अर्थ जुन्या काळी तसे ते ज्ञान होते असा होत नाही.
उदा. न्यूटनने प्रकाश कणस्वरूप मानला होता. त्यानंतर प्रकाश तरंगस्वरूप आहे ही विचारसरणी रुळली. पुन्हा पुंजयांत्रिकीच्या शोधानंतर प्रकाश कणस्वरूप (नॉट एक्झॅक्टली) असल्याचे मानले जाऊ लागले. परंतु याचा अर्थ न्यूटनला प्रकाशाचे खरे स्वरूप कळले होते असे म्हणता येणार नाही.

दुसरा मुद्दा: मंदिरांचे तंत्रज्ञान आयात झाले याचा अर्थ कुणीतरी तशी मंदिरे त्या मूळ उगमस्थानी दिसली पाहिजेत असा लावला आहे. हे मला पटत नाही. तंत्रज्ञान आयात झाले तरी त्याचा उपयोग वेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. जो उपयोग मूलस्थानाच्या संस्कृतीत अपेक्षित नाही. प्लॅस्टर ऑफ् पॅरिसचे तंत्रज्ञान आयात झालेले. पण त्याचे गणपती बनवणे हे भारतातीलच. तेव्हा अशा गणपतीच्या मूर्ती बाहेर दिसत नाहीत तरी प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे तंत्रज्ञान मात्र आयातच झालेले आहे. (उदाहरण अगदी चपखल नाही तरी कल्पना लक्षात यायला हरकत नाही.)

 
^ वर