सृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम

मागील भागांत म्हंटल्याप्रमाणे स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा हे एडवर्ड् बोनो यांनी आपल्या "सीरियस् क्रिएटिव्हिटी" या पुस्तकांत दिले आहे. हा एक मेंदूसाठी व्यायाम आहे. त्याचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत :

१) 'मी आता चाकोरीबाहेरचा विचार करणार आहे' असे ठरवून चालू असलेला चाकोरीबद्ध विचारप्रवाह थांबवणे. याला बोनो यांनी 'क्रिएटिव्ह् पॉज्' असे म्हंटले आहे. हे काहीसे परेडच्या अगोदर 'दक्ष' स्थितींत येण्यासारखे आहे.
२) सृजनशील विचारांसाठी एखादा विषय घेणे. यासाठी अक्षरश: कुठलाही विषय उचलणे. उदा. बॉलपेनचे टोपण, रीफिल्, यांसारख्या क्षुल्लक गोष्टींपासून ते जागतिक शांततेपर्यंत. एखादा विषय चांगला म्हणून निवडू नये. कारण आपल्याला चांगल्या वाटणार्‍या विषयांत बर्‍याच कल्पना चाकोरीबद्ध असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सुरवातीला सराव करतांना आपली तातडीची समस्या घेऊ नये. कारण तिच्यांतून लवकरांत लवकर बाहेर पडायला अधीर असल्यामुळे आपण नवीन नवीन कल्पना शोधण्यांत 'वेळ दवडायला' तयार होणार नाही. अर्थात् आपला अंतिम उद्देश आपली सृजनशीलता खर्‍या आयुष्यांतील समस्या सोडवण्यासाठी वापरणे हाच आहे. पण आपल्यांत पुरेशी क्षमता आल्यावर.
३) घेतलेल्या विषयाबद्दल 'हे असेच का असायला हवे?' किंवा 'हे असेच का करायचे?' असा आव्हानात्मक विचार करणे. अगदी सुरळीत चाललेल्या गोष्टींबद्दलही असा विचार करता यायला पाहिजे.
४) विचारार्थ घेतलेली गोष्ट वेगळी कशी असू शकेल, कशी असावी किंवा वेगळ्या तर्‍हेने कशी करता येईल याबद्दल पर्याय शोधणे. साधारणपणे कुठल्याही गोष्टीसाठी पर्याय पाहण्याची आपल्याला संवय नसते. बहुतेक गोष्टी आहे तशाच स्वीकारण्याकडे किंवा चालू ठेवण्याकडे आपली प्रवृत्ति असते. कुठलाही नवीन पर्याय चुकून डोक्यांत आला किंवा दुसर्‍या कोणी सुचवला की डाव्या मेंदूकडून तो विनाविलंब अव्यावहारिक म्हणून बाजूला सारला जातो. त्यासाठी व्यवहार्यतेबरोबरच 'लोक काय म्हणतील', 'असलेल्या पर्यायापेक्षा अधिक चांगला पर्याय असता तर तो अगोदरच व्यवहारांत आला नसता का' असाही विचार केला जातो. असे वारंवार होऊ लागले की त्याची परिणती नवीन पर्याय न सुचण्यांत म्हणजेच उजव्या मेंदूचे कार्य बंद पडण्यांत होते. ही सवय बदलली पाहिजे. त्यासाठी नवीन कल्पना/पर्याय निर्माण करतांना आपल्याला डाव्या मेंदूचे कार्य तात्पुरते बंद करण्याचा सराव करावा लागेल. म्हणजेच सुचलेल्या पर्यायाच्या व्यवहार्यतेबद्दल ताबडतोब विचार करण्याचा मोह टाळावा लागेल. (आणि त्यांत कठीण काही नाही. कारण जोपर्यंत आपण तो अमलांत आणीत नाही तोपर्यंत त्याच्या परिणामांची काळजी करण्याचे कारण नाही). म्हणजे मग एकामागून एक पर्याय सुचत जातील. पर्याय नुसते मनांत ठेवण्यापेक्षा ते कागदावर लिहून काढावेत. नुसते तोंडी सांगतांना किंवा मनांत नोंद ठेवल्याने जेवढे पर्याय सुचतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पर्याय लिहितांना सुचतात असा अनुभव आहे. पर्याय तीन प्रकारचे असतात. एक, सहज सुचणारे, दुसरे डोक्याला थोडा ताण देऊन सुचणारे व तिसरे चमत्कारिक वाटणारे. उदा. चोवीस तास पाणी पुरवठा असलेल्या ठिकाणी दिवसांतून ठराविक वेळी दोन तास पाणी पुरवठा होऊ लागला तर निर्माण होणार्‍या समस्येवर तोडगा म्हणून पाण्याच्या वेळेंत सर्व कामे उरकून घेणे, पाणी साठवून ठेवणे, हे पर्याय पहिल्या प्रकारांत मोडतात. प्यायचे पाणी विकत घेणे हा पर्याय दुसर्‍या प्रकारांत मोडतो तर पाण्याऐवजी शीतपेये वापरणे, पाण्याशिवाय राहण्याचा सराव करणे, हॉटेलमध्ये गेल्यावर तेथे मिळणारे पाणी आपल्या बाटलींत भरून आणणे हे पर्याय तिसर्‍या प्रकारांत मोडतात. पर्याय लिहिण्यासाठी ठराविक अवधीच ठरवावा (समजा दहा मिनिटे). ज्यास्त अवधी असला म्हणजे ज्यास्त पर्याय सुचतात असे नाही. ठरवलेल्या अवधींत ज्यास्तींत ज्यास्त पर्याय लिहिण्याचा निश्चय करावा. त्यामुळे व्यावहारिक विचार आपोआपच कमी होईल. पर्याय जितके अधिक तितकी चाकोरीबाहेरचे विचार सुचण्याची क्षमता अधिक. आपला उजवा मेंदू किती कार्यरत झाला याचे ते निदर्शक आहे.

पर्याय शोधल्यानंतर त्यांच्या व्यावहारिकतेबद्दल विचार करण्यासाठी व त्यांना व्यवहार्य स्वरूप देण्यासाठी (आत्तापर्यंत बंद ठेवलेला) डावा मेंदू कसा वापरावा ते पुढील भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

फारच उपयुक्त

वा! वा!
आतापर्यंतचे सर्वच भाग वाचले. उत्कृष्ट विषय आणि सहजसोपी मांडणी.
आपले हे लेखन खूपच उपयुक्त आहे.
शिवाय लेखनाचे सातत्यही वाखाणण्याजोगे आहे.
याच सातत्याने या पुढीलही लेख यावेत ही विनंती.

वि.सु. : लेखाच्या सुरुवातीला यापूर्वीच्या लेखांचे दुवे दिल्यास पुनर्वाचनास सोपे जाईल.

पाण्याचा तुटवडा >>

झाल्यास
अ) खरे धिरूभाई
खालील व्यावसायीक संधींचा सदुपयोग "करलो पाणी मुटठी "मे म्हणत नवे इशुज आणतील.
१. ट्यांकर सर्व्हीस.
२.टिश्यु पेपर च्या फ्याक्ट्रीज.
३.बिसलेरी बनवणारे महाकाय काऱखाने.

ब्)दिव्य फुसफुसे अर्धनग्न अध्यात्मीक अंबानी
१.जागोजागी पाणपोया उघडून राष्ट्र्प्रेमाची साक्ष देतील.
२.गोमुत्रच्या एजंसीज देश भरात वाटण्यात येतील.
३.ज्यांना गोमुत्रसुद्धा परवडणार नाही अश्या कंगाल जनतेला शिवांबु प्राशना करीता प्रव्रुत्त् करण्यात येईल.

क) च्यानल्स वर > वहां क्या चल रहा है इस वक्त बतायेंगे अभीलाष..
.. तिकडून द्र्श्य व कौमेंटरी >>जी , विनोद ..बोअर के खड्डे में बच्चा गिर गया है उसके मा बाप और् गां वाले लोग उपरसे मिटटी डाल रहे है..तथा बोअर वाले को दुसरी जगह "बोअरा" करने हेतू ले जा रहे है !!

ड्)आपण आपली वीस ही बोटे तोंडात घालून "उपक्रम" वर या घटनांचे रवंथ करीत बसू !!

नम्र विनंती क्रुपया सांगावे >
१.अश्या विचारांन्ना स्रुजनता म्हणता येते काय ?
२. विचार् नक्की उजव्या मेंदू का डावा मेंदूत झाला हे कसे ओळखायचे ?
३. मेंदू चे राईट्- लेफ्ट् इंडीकेटर् कुठे खरच उपलब्ध आहेत का ? गंमत नाही सिरीयली विचारत आहे. असल्यास मी एजंसी घेण्याचा विचार नक्कीच करीन.

ता.क. > "कोरड्यांनी " पाण्याचा तुटवडा हेच उदाहरण द्यावे यात कितीमोट्ठी गंमत आहे !! जस्ट गंमत हं शरद राव ! लगेरहो .
डावा ,उजवा दोन्ही मेंदू म्हणतोय.. चांगले खाद्य सॉरी.. पेय देताय !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

अहो

परमाणूराव,
चांगल्या चर्चेत कैच्याकै खरडून इतरांचा कशाला विरस करताय? का लोक सज्जन आहेत, काही बोलत नाहीत म्हणून लगेच कोपराने खणायचं का?
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चाकोरी सोडलीरे सोडली की ..

असे होते !

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

बरोबर

आहे. चाकोरी सोडल्याबद्दल क्षमस्व! तसेही दुसर्‍या महायुद्धानंतर विकसित आणि विकसनशील देश यांच्यातील दरी वाढतच गेली आहे. तिसर्‍या जगाच्या बदलत्या अर्थशास्त्रापुढे आता विकसित देशांना आपल्या नीतीचा फेरविचार करावा लागेल असे नुकत्याच दावोस इथे झालेल्या परिषदेवरून स्पष्ट होते आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानापुढे माणसाचे काय चालणार म्हणा? कालाय तस्मै नमः असे म्हणायचे आणि चाकोरी शोधायची!

>जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.
आपले विचार थोर आहेत. इथे परत अंदाज अपना अपना आठवला, "गोगोजी, आप दानी है, ग्यानी है, अंतर्यामी है, बहोत बडे स्वामी है.. :-)

----
"मै तेजा हूं, मार्क इधर है."

उत्तम

लेखमाला. मुक्तसुनित यांनी विचारलेल्या प्रश्नाला हा लेख एक उदाहरण होऊ शकते. उपक्रमावर येत नसतो तर ही रोचक माहिती मला कशी मिळाली असती?

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

+१ आणि चाकोरी बाहेरील विचार

लेखमाला. मुक्तसुनित यांनी विचारलेल्या प्रश्नाला हा लेख एक उदाहरण होऊ शकते. उपक्रमावर येत नसतो तर ही रोचक माहिती मला कशी मिळाली असती?

एकदम चांगली लेखमाला चालली आहे.

चाकोरी बाहेरील विचारावरून एक कोडे आठवले जे इथे अनेकांना माहीत असेल : बाहेर वादळी हवा, घराच्या खिडक्या सताड उघड्या, खिडकी जवळील टेबलापाशी काचांचा सडा, जमिनीवर सर्वत्र पाणी आणि त्याच भागात रोमिओ आणि जुलिएट मरून पडलेले. तर नक्की काय घडले ज्यामुळे ते दोघे बिचारे मेले? या चांगल्या चर्चेत हे अवांतर होईल म्हणून कृपया या संदर्भात येथे चर्चा न करता माहीत नसल्यास आणि उत्सुकता असल्यास व्य. नि. कळवा / खरडीतून कळवा. नाहीतर मी उद्या/परवाकडे येथे उत्तर देईनच.

चाकोरी मोडणे

हा महत्त्वाचा संदेश मिळाला. वाचताना मजा येते आहे. दुसर्‍यांची सृजनशीलता समजून घेताना, दाद देताना आपला उजवा मेंदूच कार्य करत असतो ना?

>> घेतलेल्या विषयाबद्दल 'हे असेच का असायला हवे?' किंवा 'हे असेच का करायचे?' असा आव्हानात्मक विचार करणे.

अरे वा! आमचा उजवा मेंदू आवश्यकतेपेक्षा जास्त तल्लख आहे असे वाटते ;) ह. घ्यालच. पण माझ्यामते असे प्रश्न पडणे ही पहिली पायरी आणि त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे हे खरे सृजनशीलतेचे काम होईल. असो.

>> 'लोक काय म्हणतील'

हा प्रश्न सोडवणे (किंवा टाळणे) जमायला हवे!

अवांतर - ही लेखमालिका उजवा मेंदू तल्लख करण्याविषयी आहे पण जर उजवा मेंदू स्वस्थ (हेल्दी;) असताना, डावा मेंदू फारसा तल्लख नसणे व्यावहारिकतेकडे, आकडेमोडीकडे दुर्लक्ष होणे इ. विषयीही (कदाचित पुढील लेखमालिकेत) काहीतरी लिहावे अशी विनंती.

 
^ वर