धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मांतरण म्हणजे काय ?

धर्मातरण म्हणजे धर्म बदलणे.
धर्म हा नैसर्गिक आहे, शाश्वत आहे, धर्मांतरण अनैसर्गिक व अशाश्वत असून ते स्वीकारणे योग्य नाही.

धर्मातरणाची प्रवृत्ती का निर्माण होते व कोणामध्ये निर्माण होते ते पाहूया -

जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले धर्मातरण केले आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही. परंतु
काही हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बौध्द ख्रिस्ती व इस्लाम या पंथांनी तलवारीच्या बळावर,
कपटाने, अमिषाने, आक्रमणाने लाखो हिंदूंना धमे बदलायला लावला. संपूर्ण जगावर राज्य करण्याची
सुक्त व तीका इच्छाशक्ती तसेच आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे याची अज्ञानावर आधारलेली संकुचित
विचारसरणी त्यांना इतरांचे धर्मातरण करण्यास प्रवृत्त करते.

याबाबत त्यांच्या धर्मग्रंथात दिलेली शिकवण, ती न पाळल्यास देवाकडून होणारी प्रचंड शिक्षा व
पाळल्यास स्वर्गाचे मिळणारे प्रचंड लाभ त्यांना सातत्याने व कोणत्याही मार्गाने स्वर्गाचे करण्यास
प्रवत्त करतात यामुळेच आजच्या जगाच्या स्थितीचा विचार केला तर इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांमध्ये
जग पादाक्रांत करण्यासाठी प्रचंड चढाओढ असल्याचे दिसते. त्यासाठी सर्व नैतिक व अनैतिक मार्गांचा
सर्रास व राजरोसपणे वापर केला जातो.

भारताचा विचार कएएेल्यास पूर्वेकडील सात राज्ये जवळजवळ िख्र्तासी झाल्याचे दिसून येते. िख्र्त्यासंनी ही
राज्ये गिळकृंत केल्यातच जमा आहे. तेथील आदिवासी सुध्दा त्यांची भाषा सोडून इंग्रजी बोलतात व
पेहरावही ख्रिस्ती लोकांप्रमाणेच घालतात.

आज भारतातील २४० जिल्ह्यांची स्थिती अशी आहे की तेथे मुसलमानांनी पध्दतशीरपणे त्यांची
लोकसंख्या वाढवली आहे. या जिल्ह्यांमध्ये काही काळातच मुसलमान आपले लोकप्रतिनीधी
निश्चीतपणे ठरवू शकतील अशी स्थिती निर्माण होणार आहे. असे निडून आलेले प्रतिनीधी ज्या ज्या
ठिकाणी त्या त्या ठिकाणी जबरदस्तीने धर्मातरण करवून घेता येईल, तसेच लोकशाही अंतर्गत मुस्लिम
राजवटीखाली हिंदूंचा अनन्वित छळ करण्यात येईल जेणेकरुन ते धर्मातरीत होतील किंवा तो प्रदेश
सोडून जातील.

धर्मातरण करण्याच्या मुसलमांनाच्या पध्दती -

१. हिंदु मुलींना फूस लावून मुस्लिम मुलांशी लग> करायला लावणे.
२. मागासवर्गीय हिंदूंना आमिष दाखवून धर्मातरीत करणे.
३. मुस्लिमबहुल विभागातील हिंदूंना दहशतीने धर्मातरीत करणे.
४. विवीध मार्गांनी हिंदूंशी संघर्ष करुन त्यांची हत्या करणे.

भारताचे इस्लामीकरण करण्याचे नियोजन व धोरणे -

१. भारत सरकारचा कुटुंबनियोजन कार्यक्रम धुडकावून लोकसंख्या वाढविणे.
२. मशिदी, मदरसे यांची भक्कम व व्यापक साखळी तयार करणे.
३. भारतातील प्रत्येक मुस्लिमबहुल विभागातील अशिक्षीत मुस्लिम तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी
उत्तेजित करणे.
४. पाकपुरस्कृत अतिरेकी कारवायांना मदत करणे.
५. त्यासाठी परदेशातून पैसा गोळा करणे.
६. शरियत व मुस्लिम कायद्यात ढवळाढवळ न करण्याबाबत सरकारवर दबाव आणणे.
७. धार्मिक दंगली घडवून आणणे.
८. राज्यकर्ते प्रसारमाध्यमे, विद्वान, लेखक यांना विकत घेऊन पध्दतशीरपणे हिंदु संस्कृती, नेते व
संघटना यांची बदनामी करणे.
९. बांग्लादेशी मुसलमानांना आसरा देऊन लोकसंख्या वाढविणे.

फाळणीच्या वेळी एकूण २४ ज्ञ् मुसलमान भारतातच राहिले. याचा अर्थ असा की मुसलमानांना त्यांनी
मागितलेल्यापेक्षा दुप्पट जागा मिळाली.
त्यावेळी भारतातील मुसलमानांची लोकसंख्या ३.५ कोटी होती. १९९१ मध्ये ती १४ कोटी झाली तर
आता ती १६ कोटीपेक्षाही जास्त आहे. यामध्ये २ कोटी बांग्लादेशी मुसलमानांचा समावेश केला पाहिजे.

हिंदु व मुसलमान यांच्या लोकसंख्येचे प्रमाण ४ : १ असे होते. १९९१ मध्ये ते ३ : १ असे झाले. आता
ते याहीपेक्षा कमी असणार आहे.

इस्लामच्या दृष्टीने विभाजन -

१. इतिहासाचे - इस्लामपूर्व इस्लामनंतर
२. मानवी समाजाचे - अल्ला, प्रेषित महंमद यांना मानणारा व काफिर - अल्लाला न मानणारा
३. पृथ्वीचे - दारुल इस्लाम - इस्लामबहुल व दारुल हरब - इस्ला अल्पसंख्य

अल कायदा - महंमद पैगंबरांची शिकवण मान्य केलीत तरच जग शांततेने नांदेल. जे कोणी हे मान्य
करणार नाही त्यांना जगण्याचा अधिकार नाही

मुसलमानांच्या तत्वानुसार त्यांचा धर्म एका जागी मर्यादीत नसून तो संपूर्ण जगात कायमस्वरुपी
पसरवायचा आहे.

हिंदूंची देवावरील श्रध्दा नष्ट करण्यासाठी व विश्वास मोडण्यासाठी देवळे तोडली जातात.

देवळे नुसतीच तोडली जात नाहीत तर मंदिरे तोडण्याच्या प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन अलंकारीत भाषेत
नोंद करुन ठेवले जाते. त्यामुळे नवीन पिढीला मूर्तीभंजनाची प्रेरणा मिळते. धोंड, जिल्हा पुणे येथे
मशिदीच्या भिंतीवर लिहले आहे की ही इमारत ३३ मंदिरे तोडून बांधलेली आहे. मूर्तीभंजन व अल्लाला
मानणे हेच कुराणचे सार आहे.

श्रध्दाळू मुसलमान मूर्ती व देवळांचा तीका तिरस्कार करतात. ताचाच अर्थ या तिरस्काराचे रुपांतर
विध्वंसामध्ये होणार हे निश्चित ! प्रेषित महंमदाने स्वत: मूर्ती व मंदिरे तडून मुसलमानांसमोर उदाहरण
(?) ठेवले आहे.

शहाबुद्दीन घोरीने पृथ्वीराज चौहानला पराजीत केल्यावर अजमेरला भेट दिली. तेथील सूफी संत ख्वाजा
मोईबुद्दीन यांनी पृथ्वीराजला हरविण्यात मदत केली होती. तेथे एक मंदिर अडीच दिवसात तोडले व
त्याला अढाई दिनका व झोपडा असे नाव दिले.

ख्रिस्ती मिशनऱ्यांची आक्रमणे
ख्रिस्ती मिशनऱ्यांचा इतिहास दर्शवितो की ते एका हातात बायबल व एका हातात तलवार घेऊन आले.
सेंट थॉमस, वास्को द गामा, सेंट झेवियर, रॉबर्ट दी नोबल इत्यादी सर्वांनीच गरीब, अज्ञानी व भोळया
हिंदूंना दाकाने, फसवून जवळीक साधून धर्मांतरीत केले आणि हजारो परातन मंदिरे तोडली.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्या कार्यपध्दतीची तंत्रे, धोरणे व मार्ग बदललेस. अत्यंत धूर्तपणे
व नळकत अप्रत्यक्षपणे, कावेबाजपणे त्यांनी मुसलमांनापेक्षाही प्रचंड परिणम साध्य केला आहे.

ख्रिस्ती मिशनऱ्यांची धोरणे :

१. कोणत्याही मार्गाने आदिवासी, गरीब भोळयाहिंदूंचे धर्मांतरण करणे.
२. पुरेसे अनुयायी मिळल्यावर त्या भागासाठी स्वतंत्र राजाच्या दर्जाची मागणी करणे.
३. स्वतंत्र मागणीसाठी चळवळ सुरु करणे.

राष्टी्रय व अंतराष्टी्रय राजकारण, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबाव इत्यादी मार्गाने ख्रिस्ती संस्था सरकारच्या
धोरणात ढवळाढवळ करत आहेत. हे साध्य करण्यासाठी ते कायदे, व्यवस्थापन, शिष्यचार, चळवळ इ.
अश्या अनेक मार्गांचा वापर करतात.

चर्चकडे या प्रत्येक विषयातील तज्ञ आहेत.

या सर्वांचा परिपाक म्हणजे घटनेतील धार्मिक स्वातंत्र. अल्पसंख्यांकांना शिक्षण, निधर्मी राज्यव्यवस्था
यांच्या नावाखाली सर्रासपणे व राजरोस होणारी हिंदूंवी मानहामी व धर्मांतरण

धर्मातरणाचा आवाक व प्रभाव वाढविण्यासाऱ्ठी मिशनरी हिंदू नावे धारण करत आहेत. तसेच आश्रम
बांधून त्यांनाही हिंदू नावे देत आहेत. तेथे जीझस व मेरी यांचे पुतळे ठेवून धुप, जप, उदबत्ती इत्यादी
हिंदु पूजाविधीतील रितीरीवाज पाळत आहेत.हिंदु धर्मातील सत् चित् आनंद म्हणजे ख्रिस्ती पंथातील
पवित्र त्रिकूटच आहे.असेही ते सांगतात.

चर्चच्या कार्यपद्धतीत चर्चचा उद्देश सफल होत असेल तर कोणताही मार्ग अयोग्य मानला जात
नाही.आंध्र कर्नाटक सीमेवरील जॉन अब्राहम मेमोरीयल होमच्या माध्यमातून अनेक हिंदू बालके
कोट्याबधी रुपयांना बळी पडली परदेशी ख्रिस्तीना विकली जात असल्याचे उघडकीस आले.या
संस्थेव्या संचालीका सावित्री रॉबर्ट महीला कॉग्रसच्या सदया होत्या.१९९९ मध्ये त्यांच्या बँकेत ५ कोटी
रुपरे होते व २००० साली त्यांनी ४५ लाख रुपये करला.

ख्रिस्ती झाल्यावर जातीव्यचस्था नष्ट होते हा भ्रम आहे

अखिल भारतीय मागासवर्गीय मुस्लिम मोर्चा चे अध्यक्ष डॉ इजाझ - दलीत मुसलमानांचे सामाजीक
स्थान दलीत हिंदूंसारखे आहे.धर्मातरणामुळे त्यांना त्यांच्या सामाजीक दर्जात बदल घडवणे शक्य झाले
नाही.

धर्म व अध्यात्माच्या स्तरावर चर्चचा अपेक्षाभंग झाल्याने आता त्यांनी सामाजीक व आर्थीक मुद्यांच्या
आधारावर समाजातील कमकुवत घटनांचा लाभ उठवन्यास सुरवात केली आहे.दलीत आणी स्त्रीयांच्या
मुक्तीच्या नावाखाली अनेक चळवळी सुरु केल्या आहेत.

भारताचे सार्वभौमत्व जागतीक बँक नाणेनीधी डब्लू.टी.ओ. इ. आंतररष्ट्रीय संस्थामुळे धोक्यात आले
आहे् या संस्था अप्रत्यक्षपणे िख्रस्ति संस्थांनकडुन निंयत्रित नेल्या जाताय.

डब्लू.टी.ओ.मुळे भारतात बहुराष्ट्र कंपन्यांना मुक्त संचारास मुभा मिळाली आहे.परिणामस्वरुप प्रत्येक
भारतामध्ये आपल्याकडे सर्व अत्याधुनिक यंत्रे,उपकरणे,सुख,सुविधाअसाव्यात अशी प्रबळ ईच्छा
निर्माण झाली आहे.त्यासाठी तो आपली संस्कृती,धर्म,परंपरा यांचाही त्याग करायला तयार आहे.तसेच
स्थानिक लघु्यद्योगही नेस्तनाबूत होत आहेत

ख्रिस्ती संस्थाची धोरणे

१)गरीबांना आमीष दाखवून धर्मातरण
२)मध्यम वर्गीयांना चैनिच्या वस्तू मिळवण्यामध्ये गुंतवून स्वत:ता धर्म व संस्कृती या पासून अलिप्त
करायचे

पाश्र्चिमात्य देशात ख्रिस्ती पंथ लयास जात आहेत.पाद्री व नन च्या भूमिकेसाठी फारच थोडे जण तयार
होत आहेत.या जागा काही प्रमाणात भरुन काढण्यासाठी चर्चने आपला मोर्चा आशिया खंडाकडे-
भारताकडे वळवला आहे.कारण हिंदू भाविक असून धर्मोपदेशकाची भूमिका सहजतेने पार पाडू
शकतील असे आहेत. याच दरम्यान ख्रिस्शन हे अमेरीकेतील हिंदु धर्मावर आधारीत प्रसंगाला प्रत्युतर
म्हणून भारताला निशाण बनवत आहेत.अमेरीकेतील प्रसार त्यांना अत्यंत धोकादायक वाटतो त्यामुळे ते
हिंदुत्वाला व हिंदु गुरूंना नावे ठेवतात व सैतानाचा धर्म म्हणतात.

Comments

काही प्रश्न

लेख विस्तृत आहे आणि इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माच्या जुलूमाने बाटवतात हे ही मला मान्य आहेत हे आधीच स्पष्ट करते. मला स्वतःला बाटवण्याचे प्रकारही घडले आहेत. म्हणजे ब्रेन वॉशिंग. या धर्मांची स्थिती जन्माला आल्यापासूनच "खतरेमें" आहे आणि हेच कारण धर्मांतरण करायला लावण्यास कारणी असावे. असो, मूळ लेखावर नंतर प्रतिसाद देईन पण तरीही काही प्रश्न पडले.

काही हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बौध्द ख्रिस्ती व इस्लाम या पंथांनी तलवारीच्या बळावर, कपटाने, अमिषाने, आक्रमणाने लाखो हिंदूंना धमे बदलायला लावला.

बौद्ध धर्माने तलवारीच्या जोरावर धर्म बदलण्यास लावला याचे उदाहरण देता येईल का?

भारताचा विचार केल्यास पूर्वेकडील सात राज्ये जवळजवळ ख्रिस्ती झाल्याचे दिसून येते

असे का झाले असावे? जबरदस्ती आणि अमिष हेच कारण असावे का?

आंध्र कर्नाटक सीमेवरील जॉन अब्राहम मेमोरीयल होमच्या माध्यमातून अनेक हिंदू बालके कोट्याबधी रुपयांना बळी पडली परदेशी ख्रिस्तीना विकली जात असल्याचे उघडकीस आले.

कशासाठी विकली जातात. त्यांना गैर-उद्योगांना लावले जाते का?

इतिहासात जुलूमाने बाटवलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याच्या नोंदी किती? शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे पाहिले तर २ आठवतात. अधिकही असतील पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असाव्यात. असे का?

संपूर्ण भारतात किती जिल्हे असावेत?

थोडेसे ऐकीव

वर प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे लेख सविस्तर आहे. अधिक प्रतिक्रीया नंतर देइन. फक्त मला देखील आपण बौद्ध धर्मास त्यात का गोवले ते समजले नाही. एक फक्त वाचले होते ते म्हणजे अशोकाने धर्मांतर केल्यानंतर त्याने व त्याच्या नंतरच्या काळात काही राजांनी बौद्धधर्माचा अथवा त्यातील अहींसेचा अतिरेक केला. अर्थात त्या संदर्भात पण त्यांनी काही ख्रिस्ती-इस्लाम सारखे प्रकार केल्याचे ऐकीवात नाहीत. आंबेडकरांचे कारण वेगळेच होते आणि त्यांचा निर्णय बुद्धीवादी आणि सामाजीक होता असे म्हणावेसे वाटते.

भारताचा विचार केल्यास पूर्वेकडील सात राज्ये जवळजवळ ख्रिस्ती झाल्याचे दिसून येते. असे का झाले असावे? जबरदस्ती आणि अमिष हेच कारण असावे का?

या संदर्भात जे ऐकले त्या प्रमाणे ब्रिटीशांच्या काळात तेथे त्या भागातील लोकांव्यतिरीक्त बाहेरून फक्त मिशनर्‍यांना जायलाच पर्वानगी होती, स्वातंत्र्यानंतर पण बराच काळ तेच राहीले (जसे १९३५ चे कायदे आजही काही बाबतीत लागू करतात - अर्थात घटनेत सामील करून तसे). त्याचा त्यांना अयोग्य पद्धतीने बस्तान बसवायला फायदा झाला. पण ही माहीती ऐकीव आहे, जर कोणाला अधिक माहीती असल्यास सांगावे.

एक ऐकलेली मजेदार गोष्टः डॉ. आनंदी जोशींचा नवरा म्हणजे गोपाळ राव जोशी हा नाटकात दाखवल्याप्रमाणेच तर्कट असामी होता. त्याला पाद्र्यांना धडा शिकवायचा होता म्हणून आपणहून धर्मांतर करायला गेला. चर्चनेपण खूष होवून तसे केले. पाद्र्याबदोबर बाहेर आला आणि जे काही कॅथेलीकखूण (जानव्यासारखी) दिली होती ती भिरकावून म्हणाला की असले सोपस्कार करून माझ्या मनातला धर्म बदलता येइल का? आणि मग कसे फसवले या भावमुद्रेने निघून गेला!

शिवाजीने पण गोव्यातील अत्याचार पाहून ३ पाद्र्यांना पळवून आणून सक्तिने बाटवल्याचे ऐकले आहे. परीणामी नंतर पोर्तुगिजांनी जरा (काळ) नमते घेतले...

मसुराश्रम

आमच्या घरी लहानपणी येणार्‍या "सज्जनगड" मासिकात दर महिन्याला "मसुराश्रमातील शुद्धिकरण आणि विवाह समारंभ" अशा काही नावाचे सदर येत असे.

त्यात दर महिन्यात कोणातरी (साधारणपणे नावानुसार मुसलमान वाटणार्‍या) व्यक्तींचे शुद्धीकरण, हिंदू पद्धतीने विवाह झाल्याच्या बातम्या छायाचित्रासकट येत.

जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले धर्मातरण केले आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही.

मी छापील फोटोसकट नोंद बघितली आहे, दर महिन्याला.

१. हिंदु मुलींना फूस लावून मुस्लिम मुलांशी लग्न करायला लावणे.

याला फूस म्हणा की प्रेम म्हणा, उलट्या दिशेने लग्ने आणि धर्मांतरणे झाल्याची मी छापील, फोटोसकट नोंद दर महिन्याला बघितली आहे.

(विषय : ख्रिस्ती) २. पुरेसे अनुयायी मिळल्यावर त्या भागासाठी स्वतंत्र राजाच्या दर्जाची मागणी करणे.

याचा काय ऐतिहासिक मागोवा? गोवा केंद्रशासित प्रदेशाचे राज्य झाला त्यावेळी मी गोव्यात येऊन जाऊन स्थायिक होतो. राज्य होण्यासाठी ख्रिश्चन लोकांनीच मागणी केली नाही, आणि ख्रिश्चन धर्म हा वेगळे राहाण्याचे कारण नव्हता. कोकणी भाषा होती. राज्यभाषा म्हणून मध्य गोव्यातली हिंदूंची बोली देवनागरी लिपीत वापरली जाते. (ख्रिश्चनांची रोमन लिपीत लिहिलेली बोली नव्हे.) त्यानंतरची तीन नवी राज्ये छत्तिसगड उत्तराखंड आणि झारखंड. यांचा ख्रिस्ती धर्माशी संबंध काय? उत्तराखंडात हिंदूंची टक्केवारी बहुतेक राज्यांपेक्षा अधिक आहे. मग हे वाक्य तुम्ही कुठल्या जोरावर लिहिले?

तूर्तास लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत नाही. लेखात दिलेले बाकीचे तपशील पडताळून बघायचे कष्ट मी का घ्यावे, हा प्रश्न माझ्या मनात येतो. इतके भरमसाठ तपशील लेखात बिनासंदर्भ दिलेले आहेत. ते अभ्यास करून पडताळण्यास वाक्यागणिक ५-१० मिनिटे तरी लागतील. म्हणजे पूर्ण दिवस खलास, कदाचित पूर्ण आठवडा. त्यामुळे माझ्याकडून इत्यलम् .

तुमच्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार का व्हावा हे कळत नाही. योग्य आकडेवारी जमवून, सत्यासत्याची पडताळणी करून, हीच माहिती दिली असती तर अधिक लक्ष देऊन वाचण्यास मला चालना मिळाली असती.

मसुराश्रम वगैरे

मसुराश्रमाबद्दल मी पण असेच (कदाचीत सज्जनगड मासीकच असावे) वाचल्याचे आठवते. पण त्यांनी अत्याचार करून धर्मांतरे केल्याचे ऐकलेले तरी नाही. त्यांची चळवळ ज्यांना बाटवले गेले आहे त्यांना स्वग्रूही आणण्याची होती असे आठवते.

पुरेसे अनुयायी मिळल्यावर त्या भागासाठी स्वतंत्र राजाच्या दर्जाची मागणी करणे.

यात त्यांना स्वतंत्र राज्य म्हणजे स्वतंत्र देश म्हणावयाचे असेल. कारण नॉर्थईस्टचा तो प्रश्न आहे असे म्हणले जाते. यावर अजून लिहू शकेन पण गरज पडल्यास नंतर...

इस्ट तिमोर

इस्ट तिमोर चे ढळढळीत उदाहरण
डोळ्यासमोर नाही येत का तुमच्या?

इस्ट् तिमोर चे बहुसंख्य लोक ख्रिश्चन नाहीत का?

आपला
गुंडोपंत

मुसलमान इंडोनेशियापासून ???

मुसलमान इंडोनेशियापासून ???

इंडोनेशिया हा 'मुस्लीम बहुल देश' आहे मुस्लीम नाही; जसे पकिस्तान हे 'इस्लामीक' रिपब्लीक आहे तसे इंडोनेशिया नाही.
ही बाब येथे महत्वाची आहे.

मात्र येथे मुस्लीम हा देश धर्म निरपेक्ष न राहता मुस्लीम व्हावा याठी मोठे दडपण आणत आहेत यात वाद नाही.

आपला
गुंडोपंत

+१

माहितीपूर्ण (चांगल्या अर्थाने*) प्रतिसाद आवडला!
-----------------------------------------------------------
*हल्ली माहितीपूर्ण म्हंटले की लोक चांगल्या अर्थाने घेतातच असे नाही! ;)

धडधडीत उदाहरणे

ईस्ट तिमोर हे एक उदाहरण आहे खरे. पण ते लेखाच्या या मुद्द्याला विशेष सामर्थ देत नाही.

जरा भारतकेंद्रित आशियाई दृष्टीने यादी (ब्रिटिश काळ आणि नंतर) अशी दिसते :
१. ब्रह्मदेश (बहुतेक बौद्ध) हिंदूबहुल ब्रिटिश इंडियापासून वेगळा झाला. मुद्दा शासकीय सोय.
२. पाकिस्तान (मुसलमान बहुल) हिंदूबहुल भारतापासून वेगळा झाला
३. बांगलादेश (मुसलमान बहुल) मुसलमानबहुल पाकिस्तानपासून वेगळा झाला. मुद्दा बंगाली अस्मिता.
४. तमिळनाडु (हिंदूबहुल) हिंदूबहुल भारताबाहेर जायची थोडीफार चळवळ. मुद्दा द्रविड अस्मिता.
५. खलिस्तान (शिखबहुल) हिंदूबहुल भारताबाहेर जायची तीव्र चळवळ
६. कश्मीर
७. ईलम (हिंदूबहुल) बौद्धबहुल श्रीलंकेबाहेर जायची तीव्र चळवळ. मुद्दा तमिळ अस्मिता
भारताच्या ईशान्येकडे :
८. असम (हिंदूबहुल, उल्फा) मध्यम-तीव्र चळवळ. मुद्दा : अहोमिया अस्मिता, बंगाली विरोध
९. नागालँड (ख्रिस्ती) मध्यमपेक्षा-तीव्र चळवळ
१०. मणिपूर (पी एल ए, हिंदू) मध्यम-तीव्र चळवळ
११. त्रिपुरा (बहुतेक ख्रिस्ती) आदिवासी चळवळ, मुख्य मुद्दा बंगाली-विरोध
१२ बोडो (हिंदूबहुल) मध्यम-तीव्र चळवळ
१३. मिझोराम (ख्रिस्ती) मध्यम-तीव्र चळवळ, भारतात सामिल होण्याची कायमस्वरूपी शांती प्रस्थापित

आता वरील यादीतील विदागार उपलब्ध असताना, ईस्ट तिमोरचे उदाहरण या लेखाच्या संदर्भात "धडधडीत" किंवा समर्पक का व्हावे, हे मला कळत नाही. शिवाय ईस्ट तिमोर हे कॅथोलिक आहे, आणि भारतातील ईशान्येकडील ख्रिस्ती प्रोटेस्टंटातले वेगवेगळे पंथ आहेत, त्या पंथांच्या आंतरराष्ट्रीय ढवळाढवळीबाबत कार्यवाह्या वेगळ्या आहेत, याचा साधारण अभ्यास तरी अशा लेखात अपेक्षित असावा.

पुन्हा सांगणे आले, की हा विषय असा आहे, की काही प्रवक्ते अप्रमाण वक्तव्ये करू शकतात, आणि बाकीच्यांना सुसूत्र बोलावे लागते. अशा संवादात सत्य आणि सारासार विचार होण्याची क्षमता कलुषित होते. कळकळ असलेल्या उपक्रमींनी लिहिलेल्या मतास एक उत्तर द्यावेसे वाटले, पण नाहीतर मी उपक्रमासाठी दुसरा एखादा लेख लिहिण्यात वेळ खर्चावा, हेच उत्तम.

बरोबर आहे

मसुराश्रमाबद्दल मी पण असेच (कदाचीत सज्जनगड मासीकच असावे) वाचल्याचे आठवते. पण त्यांनी अत्याचार करून धर्मांतरे केल्याचे ऐकलेले तरी नाही. त्यांची चळवळ ज्यांना बाटवले गेले आहे त्यांना स्वग्रूही आणण्याची होती असे आठवते.

अगदी बरोबर आहे

काहीही

तूर्तास लेख माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटत नाही. लेखात दिलेले बाकीचे तपशील पडताळून बघायचे कष्ट मी का घ्यावे, हा प्रश्न माझ्या मनात येतो. इतके भरमसाठ तपशील लेखात बिनासंदर्भ दिलेले आहेत. ते अभ्यास करून पडताळण्यास वाक्यागणिक ५-१० मिनिटे तरी लागतील. म्हणजे पूर्ण दिवस खलास, कदाचित पूर्ण आठवडा. त्यामुळे माझ्याकडून इत्यलम् .

तुमच्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार का व्हावा हे कळत नाही. योग्य आकडेवारी जमवून, सत्यासत्याची पडताळणी करून, हीच माहिती दिली असती तर अधिक लक्ष देऊन वाचण्यास मला चालना मिळाली असती.

१००% सहमत.

तरीही न रहावुन अजुन थोडेसे तुमच्या लेखाला मदत आचार्य महोदय. एक राहीलेला किंवा मुद्दाम वगळलेला मुद्दा

हिंदुंकडून हिंदुंना अन्याय्य वागणूक, जुलूम, छळ म्हणून पिडीत हिंदुंचे धर्मांतर -

केवळ दलीत म्हणून दुष्काळात देखील सार्वजनीक विहीरी वरून पाणी प्यायला बंदी, देवळात प्रवेश करायला बंदी, जातीवरून विशीष्ट कामे करवणे, सवर्णातील मुलीशी/मुलाशी विवाह केल्याबद्दल खालच्या जातीतील लोकांना जाळणे, त्यांची वस्ती उधळवुन टाकणे. त्यांचे खच्चीकरण करणे. आजही भारताल्या बर्‍याच ठीकाणी हे चालू आहे.

अश्या हिंदु धर्मातील लोकांनी पाळलेल्या जाचक रुढी, परंपरा या कारणामुळे हिंदु धर्म सोडलेल्या लोकांची माहीती, टक्केवारी कुठे मिळु शकेल का हो? का तुमचे म्हणणे आहे की जबरदस्ती धर्मांतर केवळ अन्यधर्मीय करवुन आणतात? आपण होऊन वैतागुन हिंदु धर्म आजतगायत कोणीच सोडला नाही?

हे सगळे शतकानुशतके चालत असुन अजुनही हिंदु चांगलेच बहुसंख्य (दुवा १ , दुवा २)आहेत की नाही? का १००% झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही? का हा प्रतिसाद लिहुन होइस्तवर आत्ताच तुमच्या हातात आलेल्या ताज्या बातमीत भारतात हिंदु अल्पसंख्य झाले आहेत? झाले तर बरे होईल म्हणा जरा सवलती मागता येतील ;-)

प्रतिसाद आवडला

वरची प्रतिक्रीया खूप चांगली आणि १००% पटण्यासारखी आहे.

त्यामुळे ही 'लाज' म्हणजे काहीसे "मी स्वतःला हिंदू समजतो, पण हे लोक जर स्वतःला हिंदू समजणार असतील आणि 'हिंदू' ही ओळख यांच्याशी निगडित होणार असेल, तर मला दुसर्‍यांदा विचार करावा लागेल" अशासारखे.

या वाक्यावरून जो या प्रतिक्रीयेचा गाभा वाटला, अजून एक सांगावेसे वाटते (वादाचा मुद्दा म्हणून नाही) की आपण मग भारतीय म्हणवून घेण्याची लाज वाटून घ्यावी का? जे काही वास्तव आहे पण जे भडक करून पाश्चात्य दूरचित्रवाणींवर दाखवले जाते, अथवा माध्यमात छापले जाते, कधी कधी एखाद्या भारतीयाने परदेशात केलेला गुन्हा, या सर्व बाबी आपल्याला लाज आणतात. पण जो पर्यंत आपण दुसर्‍यादेशाचे नागरीकत्व घेत नाही तो पर्यंत भारतीयच असतो आणि नंतरही भारतीय वंशाचे म्हणूनच ओळखले जातो अगदी आपली मुलेबाळे पण (अपवाद - अर्थातच आर्तंवंशीय विवाह) .

तीच गोष्ट हिंदू धर्माबाबत अथवा जो कुठला आपला धर्म असेल त्याबद्दल असावी. विचार करा, (तुर्त भारताच्या संदर्भातच जरी तीच गोष्ट इतरत्र असली तरी) बर्‍याचदा धर्माधारीत सर्वात जास्त नावे ठेवली कुणाला जातात? - मुसलमानांना? आता सगळे मुसलमान वाईट असतात का? अगदी त्यांचा द्वेष करणारे त्यांचे शत्रू देखील तसे म्हणणार नाहीत. मग असे काय घडते? तर जेंव्हा कुठल्याही धर्मातील मवाळ लोकं आणि बुद्धीवादी हे त्यांच्या धर्मात राहूनच त्याच्यातील वाईट गोष्टींबद्दल, कृत्यांबद्दल आवाज उठवत नाहीत तेंव्हा आधी ते सर्वमत मानले जाते आणि नंतर संपूर्ण नियंत्रणच अतिरेकी शक्तींच्या हातात जाऊ शकते.

म्हणून जे आपण आहोत ते म्हणून आवाज उठवणे आणि वेळीच विचारस्वातंत्र्यास जागृत करणे हे महत्वाचे असते. ते जेंव्हा होत नाही तेंव्हा तालीबानी अथव बूश तयार होतात - दोन्ही त्यांच्या जनतेस चांगले ठरत नाहीत (अर्थात बूश जिथे आहे तिथे लोकशाही असल्याने त्यामानाने त्याला कमी नियंत्रण ठेवायला मिळतयं तरीही!)

म्हणून स्वत:स हिंदू आणि हिंदूत्ववादी सातत्याने म्हणून त्यावरील अन्याय सांगणे जरूरीचे वाटते आणि त्यातील चांगल्या आणि वाईट ही गोष्टींवर बोलणे / टिका करणे ही महत्वाचे वाटते. त्यात जसा गर्व ठेवण्याची काही गरज नाही तशीच लाज वाटायचे पण कारण नाही .

धर्मभास्कर

असाच मजकूर धर्मभास्कर नावाच्या मासिकात पूर्वी येत असे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

कोणती जात?

मसुराश्रमात शुद्धीकरण म्हणजे धर्मांतरणच ना? म्हणजे ज्यांना बाटवले गेले त्यांचे शुद्धीकरण हेच असावे. मग शुद्धीकरणानंतर त्यांना कोणती जात लावण्यात येत असावी?

इतके भरमसाठ तपशील लेखात बिनासंदर्भ दिलेले आहेत. ते अभ्यास करून पडताळण्यास वाक्यागणिक ५-१० मिनिटे तरी लागतील. म्हणजे पूर्ण दिवस खलास, कदाचित पूर्ण आठवडा. त्यामुळे माझ्याकडून इत्यलम् .

हे बाकी भयंकर आवडलं.

मला वाटते की हा

विषय चांगला आहे.
यात खुप काही बोलण्यासारखे आहे. करण्यासारखेही आहे.
शेवटी ज्यु हे जगातल्या सगळ्या मोठ्या युद्धांना जबाबदार आहेत असे म्हणून मी आता थांबतो.

पण मला वाटते की हा विषय इथे आता खुपच चघळला गेला आहे.
शिवाय माझ्या इंपल्सीव्ह प्रतिसादांमुळे आत्महत्याही घडल्या त्यामुळे मी यात सामील होत नाही आता...
आपला
गुंडोपंत

गोव्यातील धर्मांतर

गोव्यात विहिरित पावाची लादी टाकून, तेथील वस्ती धर्मांतरीत झाली अशी आवई उठवून पुढील वस्तीत मार्गक्रमणा होत राहिली. पावानेही हिंदू बाटत असे. एकदा दुसर्‍या धर्मात जबरदस्तीने / नाईलाजाने/ आमिषापोटी गेला तर परतीचे दरवाजे बंद.म्हणजे बलात्कारित स्त्री च्या वाट्याला आलेल्या जीवनासारखे;त्यात तिची चुक काहीही नसू देत. शिवाजी महाराजांनी मात्र जबरदस्तीने धर्मांतरीत झालेल्यांना परत येण्यासाठी धर्मसत्तेवर दबाव आणला होता. (बजाजी निंबाळकर चे उदाहरण वाचल्याचे आठवते पण अशी उदाहरणे फार कमी)
नगर भागातील ख्रिस्ती धर्मांतर ही दलीत समाजातील आहेत. स्वधर्मीयांनी गावाकुसाबाहेर अपमानित जिण जगायला लावल्यावर त्यांनी हा मार्ग स्विकारला. आजारी लोकांची सेवा करुन मिशनर्‍यांनी मन जिंकली. त्याबदल्यात धर्मांतर सुसह्यच . आपल्याच लोकांनी हाकलल्यावर आणि परधर्मियांनी जवळ केल्यावर दुसरे काय होणार?
मिरजेच्या हॉस्पीटल मधे होणारी ख्रिस्ती धर्मांतरे ही सोयी साठी होतात. रुग्णालयाचा खर्च माफ होउन मोफत इलाज होतो, पोराला नोकरी लागते अजुन् काय हवय?

प्रकाश घाटपांडे

एक लहानशी घटना-दुरुस्ती हवी

घटनेने धर्माच्या बाबतींत जे स्वातंत्र्य दिले आहे त्यांत धर्माचा प्रसार करण्याचे (to propagate) स्वातंत्र्यही दिले आहे तेवढे काढून टाकावे. कारण प्रसारासाठी संबंधितांकडून ज्या मार्गांचा अवलंब केला जातो तो दखलपात्र गुन्हा आहे की नाही यावर वादंग माजवता येतो. मात्र आपणहून एखादा धर्म स्वीकारायचे स्वातंत्र्य कायम ठेवावे.

ताडती जीर्ण या लाटा..

सावधान् !

येऊ घातलेली त्सुनामी चीनी आहे !

हिंदु- मुस्लीम्- ख्रिस्चन्. ..सगळे एकाच् टापां खाली चिरड्ल्या जाणार् आहेत !

चिनि राष्ट्रीयता हा सुप्त् त्सुनामी जाग्रुत होत आहे.

चिन मधील सर्वात् प्राचीन् बौध्द् मठाला सदिच्चा भेट दिली तेंव्हा मी अर्पण केलेल्या उदबत्त्यांच्या पुड्याला हात देखील न लावता १५ वर्षांचा चिनि बौध्द् भिकशू मला म्हणतो >

"डु यू स्पीक् चायनीज् ? "
मी" नो.. धीस ईज माय फर्स्ट चायना व्ही.."
माझे वाक्य पुर्ण व्हायच्या आत >
"सौरी !!आय् कान्ट् आक्सेप्ट् युअर् गिफ्ट .. वी डोण्ट आक्सेप्ट गिफ्ट्स फ्रोम पिपल हू डोंट स्पिक चायनीज !! "
खड्ड्यात गेले तुमच्या सदिच्च्चा आणि प्रेम ! उडत गेला गौतमांचा देश व संदेश !

ताय्नानामेन चौकात आपल्याच हजारो तरूणांना कंठ स्नान घालून तो आमचा अंतर्ग्त प्रश्न आहे हे अमेरीके सह सर्व जगाला खडसाऊन सांगणारा देश ..
.. चीन मधील मानव अधिकारांबद्द्ल अमेरीकी नागरीकांनी आपसात देखील बोलण्याचा अधिकार नाही हे ठ्णकाऊन सांगण्याची ताकद असलेला देश !
अमेरीकेची मुजोरी क्षण भर देखील सहन न करणारा..
नेपाळ् ची हालत याच चपट्यांनी दुर्धर करून ठेवली आहे.
जगातील सर्व अर्थ व्यवस्थांना खिळखीळे करण्यारा चपट्या नाकाच्या सर्व धर्मभक्षक माओ वाद्यांच्या स्वागता साठी आपण तयार आहोत ! आपण चिनचे सर्वात मोठे व सर्वात सहज असे सावज आहोत.
खाटकांचे स्वागत गाईंनी नाही तर कुणी करायचे ?
सुर्य सुद्धा आता चिनि साम्राज्या वर कधीही न मावळण्याचे स्वप्न पहात आहे असा चीन चा
सतार्कीक विश्वास आहे .
पण आपले बरोबर आहे .. बाह्य आक्रमणा इतकेच जीर्ण अंतर्गत संक्रमण देखील धोक्याचे आहेच !
मग ? आता काय ?
चिंता करू नये .. सुस्त रहावे ! मस्त रहावे !!

काय आठवताय ?

तदान्मानं .. ????

वाट बघुया की.. येईलच तो .. माझ्या खाटेवरच मला जेवण देईलच तो!

व्यास मुनी ऒरडत आहेत : अरे माकडांनो .. तुम्ही मानव कधी बनाल ? तो येतो तो दुबळ्या माणसांसाठी.. पराक्रमी माणसां मधुन...पण... तुम्ही अजुनही हुप ..हुप.??. !!!

प्रतिशब्द

इर्रेलेव्हंट = असंबद्ध

हा केवळ टग्यारावांनी विचारलेल्या शब्दाला प्रतिशब्द समजावा.. एकुण चर्चा विषय अथवा चाललेल्या चर्चेला प्रतिसाद नव्हे :)

-(असंबद्ध)ऋषिकेश

गैरलागू

इर्रेलेव्हंट = गैरलागू, (असंबद्ध = इन्-कोहेरन्ट)

नीळकंठशास्त्री गोर्‍हे, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक

यांच्यासारख्या बुद्धिमान व विद्वान तसेच हिंदू धर्म नीट जाणणार्‍यांनी धर्म का बदलला असेल याचाही विचार करावा. हे तरी निरक्षर, अडाणी, भूलथापांना फसलेले किंवा पोटासाठी धर्मांतर केलेले नव्हते ना ?
अर्थात् धूर्त मिशनर्‍यांनी मोर्चे बांधून पूर्ण प्रयत्न केला हे मी अजिबात नाकारत नाही.
पण या सर्व धर्मज्ञांना हिंदू धर्मात कशाची तरी उणीव जाणवली आणि ते ख्रिश्चन् धर्मात मिळाले हे निश्चित.

- दिगम्भा

करार/अवांतर

मनोगतावरील एक सदस्य जी एस यांनी लिहीलेली सत्यघटनेवर आधारीत कथा 'करार' यासंदर्भात सहज आठवली.
करार
जर्मनीत असताना हे असे काही धर्मांतराचे त्रांगडे माहित नसताना एक फक्त जर्मन बोलणारी महिला लहान मुलीसह घरी आली होती. ही नक्की कोण आहे/काय विकायला आली आहे हे न कळूनही बावळटपणाने तिला आत घेतले. मग मोडक्यातोडक्या जर्मन भाषेत मी भारतीय आहे हे सांगितल्यावर तिने हिंदी भाषेतले 'येशू हाच तुमचा आधार' अशा काहीश्या अर्थाचे पुस्तक काढले आणि ते वाच असे सांगून गेली तेव्हा डोक्यात प्रकाश पडला. माझ्या सहकार्‍याच्या डोक्यात प्रकाश थोडा आधी पडल्यामुळे त्याने मला फक्त तुळू भाषा वाचता येते असे सांगून तिला तुळू भाषेतले पुस्तक शोधायला सांगून कटवले.

तुळू भाषा

माझ्या सहकार्‍याच्या डोक्यात प्रकाश थोडा आधी पडल्यामुळे त्याने मला फक्त तुळू भाषा वाचता येते असे सांगून तिला तुळू भाषेतले पुस्तक शोधायला सांगून कटवले.

तुमचा सहकारी अगदी हुशार म्हणायला हवा कारण तुळू भाषेला लिपीच नाही. ;-)

तुळू भाषा - विचारले पाहीजे

तुमचा सहकारी अगदी हुशार म्हणायला हवा कारण तुळू भाषेला लिपीच नाही. ;-)

ऐश्वर्याला विचारले पाहीजे :-)

तीला जेंव्हा तुला कुठल्या भाषा येतात असे डेव्हीड लेटरमनने विचारले तेंव्हा तीने मराठीच्या खालोखाल तुळू (तिची मायबोली) चे नाव घेतले होते ते आठवले. लेट नाईट शो मधे मराठीचे नाव ते ही ऐश्वर्याच्या तोंडून डेव्हीड लेटरमनची (तीने ) खेचताना ऐकून आनंद झाला होता.

प्रकाटाआ

...

ऐश्वर्या

ऐश्वर्याने त्या कार्यक्रमात इंग्लिशचे नाव घेतले नाही याचे आश्चर्य वाटून डेव्हिड लेटरमननेच नंतर तिची खेचली होती असे वाटते.

-- आजानुकर्ण

मुलाखत

मुलाखतीत 'हिंदी, तुळू (जी माझी मातृभाषा आहे), मराठी, व थोडिफार तामिळ' अशा उत्तरावर डेव्हिडने 'कमाल आहे, आम्ही इथे फक्त इंग्रजीच बोलतो' अशा अर्थाची टिप्पणी केली होती असे आठवते. यात त्याने तिची नव्हे तर त्याने नाव न ऐकलेल्या या भाषांची खिल्ली (या कुठल्या भाषा? या आल्या काय किंवा न आल्या काय.. अशा अर्थी) उडवली होती असे वाटले होते.

खिल्ली

सदर मुलाखतीत 'आम्ही 'हिंदी, तुळू (जी माझी मातृभाषा आहे), मराठी, व थोडिफार तामिळ' बोलतो असे वाक्य म्हटल्यावर डेव्हिडने आम्ही इथे इंग्लिश बोलतो हे ऐश्वर्याची खिल्ली उडवण्यासारखे होते कारण मुलाखत इंग्लिशमधून चालू होती. व ऐश्वर्याला येणार्‍या भाषांमध्ये तिने इंग्लिशचा उल्लेख केला नाही ह्या मुद्द्यावर हशा वसूल करण्यात आला होता असे वाटते. ;)

नवीनच ऐकलेल्या भाषांची खिल्ली उडवण्याचा तो प्रकार नसावा.

-- आजानुकर्ण

तसे नसावे

(धर्मांतराऐवजी) विषयांतराबद्दल क्षमस्व! :)
ऐश्वर्याला येणार्‍या भाषांमध्ये तिने इंग्लिशचा उल्लेख केला नाही ह्या मुद्द्यावर हशा वसूल करण्यात आला होता असे वाटते. ;) नवीनच ऐकलेल्या भाषांची खिल्ली उडवण्याचा तो प्रकार नसावा.

डेव्हीड लेटरमन स्वतःच्या पाँपस स्टाईलमधे जी काही खिल्ली उडवायचा प्रयत्न करतो तो त्याने केला, पण भाषसंदर्भात वाटला नाही, त्याला ऐश्वर्याला "ट्रॅप" करायचे होते/गोत्यात आणायचे होते.

त्याचा प्रश्न हा बॉलीवूड मधे कुठल्या भाषेत चित्रपटनिर्मिती होते ह्या प्रश्नाचा पुढचा आणि त्याच्याशी संलग्न वाटला. तीने चार भाषा येतात म्हणल्यावर तो जरूर म्हणाला की अमेरिकेत इंग्रजी बोलतात पण पाठोपाठ तो हे ही म्हणाला की याचा अर्थ तुला अर्धा डझनच्या आसपास भाषा येतात वगैरे...

त्याने तीने जे काही नंतर हावभाव केले त्याची जरा थट्टा केली आणि त्यात काही चूक वाटले नाही! पण नंतर जेंव्हा आई-वडीलांबरोबर राहण्यावरून प्रश्न विचारला तेंव्हा तीने उत्तर दिले की हो आम्ही राहतो पण आम्हाला (तुमच्या) सारख्या त्यांना भेटण्यासाठी अपाँइंटमेंट्स घ्याव्या लागत नाहीत इत्यादी. (आता ती आई-वडीलांच्या ऐवजी सासू आणि त्याहीपेक्षा सासर्‍याबरोबर म्हणू शकेल... इतका बच्चनजी मागे मागे असतो - निदान माध्यमांत!)

तुळू लिपी

ही पहा तुळू लिपी. ;)

-- आजानुकर्ण

मलयाळम?

ही तर बहुतेक मलयाळमची लिपी वाटते.

मलयाळम

तुळू ही विशेषतः द. कर्नाटकात बोलली जात असल्याने बरेचसे तुळू भाषक केरळी रीतींशी मिळते घेतात असे ऐकून आहे. ;-) कदाचीत त्याचाच परिणाम असावा

बाकी, काला अक्षर भैंस बराबर!

........तर अधिक चांगले झाले असते.

पण या सर्व धर्मज्ञांना हिंदू धर्मात कशाची तरी उणीव जाणवली आणि ते ख्रिश्चन् धर्मात मिळाले हे निश्चित.

प्रत्येक धर्मांत काही ना काही उणीवा असतातच. हिंदू धर्मांत हळूहळू का होईना पण सुधारणा होत आल्या आहेत. जुन्या रूढी शिथिल होत आहेत. हे लक्षांत घेऊन उपरोल्लेखित धर्मज्ञांनी ख्रिश्चन धर्मांत जाण्यापेक्षा हिंदू धर्मांतील उणीवा दूर करण्याचे प्रयत्न करायला हवे होते.

हिंदूंनी अत्याचार ....

जगाच्या इतिहासात हिंदूंनी अत्याचार केले धर्मातरण केले आक्रमणे केली याची कोठेही नोंद नाही.

पुष्यमित्र शुंग वा मिहिरकुल यांचे नाव बौध्द भिक्षुंच्या हत्येसंदर्भात, धार्मिक स्थळांच्या नाशासंदर्भात घेतले जाते.

बहुआयामी - प्रचंड प्रतिसाद ;-)

वेगळा लेख म्हणून टाकाल का? केवळ प्रतिसाद म्हणून वाचणे प्रचंड त्रासाचे आहे.

धर्मांतर

"मुसलमानांबद्दलसुद्धा असेच झाले असावे. बाहेरच्या मूठभर आक्रमक मुसलमानांनी बळजबरी करून हिंदूंना बाटवले असेल. पण अशा बाटवलेल्या मुसलमानांच्या धर्मांतराची दखल न घेता, यांचे धर्मांतर कधी झालेच नाही अशा थाटात उर्वरित हिंदूंनी पहिल्याच दिवसापासून त्यांच्याशी व्यवहार सुरळीतपणे चालू ठेवले असते ('त्यांना आपलेच लोक मानून' असे लिहिणार होतो, पण ते आपलेच लोक होते, त्यांना तसे 'मानण्या'चा प्रश्नच नव्हता.), तर त्यांनाही आपली 'मुसलमान' अशी ओळख सांगण्यात काही स्वारस्य नसते."

हा मुद्दा काहि मला पटला नाहि. मुळात् इस्लाम् स्विकारणे हि जीवनदान देणयासाठिचि अटच् होति. शिवाय् हे आक्रमक काहिंचे धर्मांतर् करुन उरलेल्या काहिंना (त्यांना बहिष्कृत् करायला किंवा आपल्यातलेच् एक् समजायला) तसेच् सोडुन् देतिल् अस काहि शक्य आहे अस् आपल्याला का वाटतय्? इस्लाम् मध्ये आणि एकुणच् मध्य युगात् धर्मांतरे हि त्यांचि झालि ज्यांना त्याला विरोध् करण्याचि ताकत् नव्हति. नक्कि संदर्भ आठवत् नाहि पण् मध्यंतरि लोकसत्ता मधिल् एका लेखात् असे वाचण्यात् आले होते कि पोर्तुगिजांच्या अत्याचारांना घाबरुन् ज्यांनि सुरुवातिला धर्मांतर् केले त्यांचि अशि कल्पना होति कि आपल्या घरात् आपण् आपल्या (हिंदु) पधधतिने उपासना पुर्विप्रमाणे चालु ठेवु शकु पण् पोर्तुगिज् धर्मप्रसारकांनि राज्यसत्तेचशि हातमिळवणि करुन् ह्या लोकांना त्यांच्या धर्मापासुन्च् नाहि तर् संस्क्रुतिपासुनहि तोडण्याचा घाट् घातला. त्यानुसार् अश्या नवधर्मांतरित् लोकांना (स्वत:च्या घरात देखिल) टेबल वर आणि काटे चमचे असल्याशिवाय् जेवायचि देखिल परवानगि नव्हति. त्यांनि काय् खायचे काय् घालायचे याचे स्वातंत्र्य त्यांच्याकडुन काढुन घेण्यात् आले होते! एक लक्षात घेण्यासारखि गोष्ट अशि कि याहि परिस्थितित् जातिचा पगडा काहि कमि होवु शकला नाहि. (तथाकथित उच्च धर्मान्तरित नायकाचि आई त्याच्या लग्ननाला विरोध् करते कारण त्याचि प्रेयसि खालच्या जातिचि (हिंदु) असते अस एका गोवा मुक्ति संग्रामावर् आधारित् कादंबरित् वाचल्याच आठवत).

राणा प्रतापाने राजपुत धर्मांतरित् राज्यांविरोधात रोटि बेटि व्यवहार् बंद केले ते धर्मांतराच्या नावाखालि स्वतःचा राजकिय स्वार्थ साधुन् घेण्याच्या वृत्तिचा निषेध म्हणुन. एकंदर ह्या असहिष्णु वृत्तिमुळे काहि प्रमाणात् हिंदु धर्माचे रक्षण झाले अस म्हणायला हरकत नाहि. पण अर्थातच् ह्याचे दुष्परिणाम हि झालेत ते म्हणजे सामान्य जनांनमध्येहि अश्या प्रकारचा रोटि बेटि व्यवहार बंद झाला. ज्यांच धर्मांतर बळजबरिने झाल आहे त्यांना परतिच्या वाटा बंद झाल्या. शिवाजि महाराजांनि बजाजि निंबाळकर आणि नेताजि पालकर ह्यांचे जे धर्मांतर जाहिरपणे करवुन घेतले त्यामागे अश्या अनेकांना परतिचा मार्ग खुला व्हावा असा विचार् होता. खरोखर भारतिय इतिहासात असा द्रष्टेपणा फार क्वचित बघायला मिळाला आहे.

"तुझे धर्मांतर झाले होते, तू मुसलमान झाला होतास, हेच मुळात आम्ही मानत नाही. आमच्या लेखी तू नेहमीच हिंदू होतास आणि आहेस, त्यामुळे तू कायम हिंदूच असताना तुला हिंदुधर्मात 'परत' घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही" अशी [काहीशी क्यूबन किंवा चिनी नागरिकत्वासारखी*] भूमिका घेता आली असती. शुद्धीकरण हे निव्वळ स्तोम होते.
क्षमा करा पण हा विचार् म्हणजे मला काहिसे स्वप्नरंजन वाटते. मुळात त्या काळाच्या स्पृष्यास्पृष्यतेच्या कल्पनांमध्ये असे काहि बसणे अशक्यकोटितिल गोष्ट होति. ज्या काळासंबंधि आपण बोलतेय् त्याचिच परिमाण ह्या चर्चेला लावातयला हवि. पण समजा तुम्हि म्हणताय तसा प्रयत्न कुणि केला असता तर साधारणपणे काय् होवु शकल असत ह्याच उदाहरण तुम्हिच् दिलय. ("की कश्मीरच्या एका जुन्या राजाने म्हणे काशीच्या पंडितांना कळवले की माझी समस्त मुस्लिम प्रजा माझ्या आदेशास मान देऊन हिंदू बनण्यास तयार आहे, तेव्हा कृपया शुद्धी करून त्यांना हिंदुधर्मात सामावून घेणेचे करावे. काशीच्या पंडितांनी साफ नकार दिला. परिणाम आपण पाहतोच.")

म्हणजे हिंदु ते मुस्लिम् असे धर्मांतरण सातत्याने होत असताना दुसर्या बाजुने मुस्लिम ते हिंदु अस धर्मांतरण मात्र होणे नाहि (कारण कट्टरपणा किंवा उदारमतवाद अस काहिहि असु शकत) म्हणजे आज साधारणपणे महाराष्ट्राचि परिस्थिति हि काश्मिर सारखि असति.

 
^ वर