धर्म देवाने निर्माण केला काय?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?

आशा आहे कोणीना कोणी समाधानकारक माहिती देईल.

Comments

कोणी कोठे?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला.
कृपया या वाक्याला ला सायटेशन म्हणजे संदर्भ द्याल का?
(फार मोठ्या आवाक्याचे वाक्य वाटते आहे.)

शिवाय हा विषय चर्चेला घेण्या आधी मुळात 'धर्म म्हणजे नक्की कोणती व्याख्या' येथे अपेक्षित आहे हे स्प्ष्ट केलेत तर बरे.
कारण देव या संकल्पनेच्या अस्तित्वापासूनच चर्चा होऊ शकेल असे वाटते.

शिवाय बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात.
याला संदर्भ हवा. हिंदु तर ३३ कोटी मानतात.

काही आदिवासी जमाती तर प्रत्येक गोष्ट देवच आहे असेही मानतात, मग?

आपला
गुंड्या

फार मोठ्या आवाक्याचे वाक्य वाटते आहे.

नमस्कार गुंडोपंत,
मला जे वाटते ते मी आवश्य सांगु शकतो. क्रमाने घेऊ या.
धर्म म्हणजे काय? हा प्रश्न पडलेले आपण एकमेव नाही. कित्येक वर्षापुर्वी लोकाना हा प्रश्न पडला होता. तेंव्हा ते व्यास मुनींच्या कडे गेले. व्यासानी दोन वाक्यात खुलासा केला

परोपकाराय पुण्याय| पापाय परपीडनम्|

या वाक्यामध्ये धर्माचे मूलतत्व सांगितले आहे. हे मूळ तत्व म्हणजे समाजातील बंधुभाव. यातुन आणखी प्रश्न उभःभवतात. त्यांची उत्तरे शोधा.

वि़ज्ञान धर्म?

विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?

विज्ञान हे चिकित्सेला सतत खुले असते. निरिक्षण, अनुमान,प्रयोग आणि निष्कर्ष या प्रमुख टप्प्यात त्याची सतत प्रक्रिया असते. एखादा सिद्धांत हा जेव्हा काही निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला असमर्थ ठरतो त्यावेळी त्याची चिकित्सा होत असते, विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते व्यक्तिनिष्ठ नसते. अपौरुषेय, अपरिवर्तनिय , बाबावाक्यं प्रमाणं , अशी भानगड विज्ञानात नसते. धर्म या शब्दाला व्याख्येत पकडायला गेलात कि शब्दोच्छल व पांडित्य चालू होते, वर्षानुवषे तेगुर्‍हाळ चालूच आहे. शेजारधर्म, पितृधर्म,मातृधर्म,राष्ट्र्धर्म ,आपदधर्म या अर्थाच्या धर्म या शब्दात वेगळी छटा आहे. हिंदु धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म इ. या धर्माच्या अर्थात रिलिजन या अर्थाची छटा आहे.गुणधर्म यातील छटा, अधर्म यातील छटा या वेगवेगळ्या आहे.धारये त् या शब्दाशी त्याची व्युत्पत्ती सांगितली जाते.( गुंडोपंत सायटेशन मागु नका मला देता येणार नाही) जगणे हा पण धर्मच आहे. पण व्यावहारिक पातळिवर रिलिजन या अर्थानेच तो वापरला जातो, धर्माची चिकित्सा करणे म्हणजे धर्माशी प्रतारणा करणे असे समीकरण रुजल्याने रुढी,परंपरेच्या माध्यमातून जोपासला गेलेल्या अंधानुकरणाची चिकित्सा कुणी केल्यास त्याला धर्मबुडव्या, पाखंडी अशी विषेशणे लावली जातात. जन्म ज्या धर्मात झाला तो धर्म त्याला आपोआप चिकटतो (धर्मांतर करण्याची सोय आहे पण ती नंतर) बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे गॅलिलिओ ला ती गोल आहे हे मांडल्याबद्दल झालेला छळ हा ज्ञात आहेच.(खर तर त्याच्याही अगोदर अनेकांनी ते मांडले होतेच, आपल्याकडे आर्यभट्ट्, भास्कराचार्य यांनी) प्रत्येक धर्मात विश्वाच्या व्युत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत. त्याला वैज्ञानिक उदयामुळे छेद जाउ लागले. पण त्याचे तंत्रज्ञानात रुपांतर झाल्याने माणसाच्या ऐहिक जीवनात निर्माण झालेली उपयुक्तता लक्षात आल्याने औद्योगिकरणाची क्रांती युरोपात झाली. विज्ञानाची घोडदौड ही आता धर्म कालबाह्य करणार हे लक्षात आल्याने विज्ञान व धर्म (अध्यात्म) हे एकमेकांचे शत्रू नसून परस्पर पूरक आहेत अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो ही मांडणी आता कमी होत चालली आहे.
प्रकाश घाटपांडे

मस्त

घाटपांडेसाहेब बरोबर लिहीले आहे. आवडले.

माझा एक प्रश्न अजुन की ह्या (१ ते ५ ) प्रश्र्नाची उत्तरे नाही मिळाली तर जगणे काही आहे त्यापेक्षा वाईट होईल का? सुर्य उगवायचा, फुले फुलायची, मैत्री/नाते व्हायची, ब्लाह.... ब्लाह....काही थांबेल का? आपल्या सामान्य दैनंदीन आयुष्यात काही (जगण्या-मरण्याचा) फरक पडेल का?

निसर्ग धर्म

जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचे तत्व हा निसर्गधर्म.
प्रकाश घाटपांडे

धर्म आणि देव

धर्म देवाने निर्माण केला असे समजणार्‍यांना मी एकच सांगू इच्छितो की देवाला मानवाने निर्माण केले.

आधी

आधी कोंबडी की आधी अंड?
असाच आहे हा काहीसा भाग.

आणी शेवटी काय सगळे मानण्यावर, नाही का?

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

प्रश्र्नाची उत्तरे नाही मिळाली तर जगणे काही आहे त्यापेक्षा वाईट

सहजराव तुम्ही हे प्रश्न सहज घेत आहात.
सध्या जे जगात चालले आहे ते धर्मावरील श्रद्धेमुळे. सर्व अतिरेर्की बाँम्ब स्फोट करतात ते धर्मावरील श्रद्धेमुळेच. सुर्य उगवेल परंतु फुले उमलणार नाहीत.
तेंव्हा उत्तरे शोधा, शोधण्याला मदत करा.

धर्मावरील श्रद्धेमुळे

सध्या जे जगात चालले आहे ते धर्मावरील श्रद्धेमुळे. सर्व अतिरेर्की बाँम्ब स्फोट करतात ते धर्मावरील श्रद्धेमुळेच.

चर्चेच्या मूळ प्रश्नांपेक्षा आपण वर केलेल्या विधानात योग्य प्रश्न आहे आणि तो म्हणजे "लोकं जे काही बरे वाईट वागतात ते धर्मावरील श्रद्धेमुळे की अंधश्रद्धेमुळे की पापभिरू वृत्तीमुळे." अशा पद्धतीचे काही ओळी ऐकल्याचे आठवते: देवळा समोरून जाताना थांबलो घटका दोन (नमस्कार करण्यास), कारण पुढे जर खरेच गाठ पडली तर तुम्ही (देवाने) प्रश्न विचारू नये की , 'आपण कोण?' :)

धर्मावरील श्रद्धा

सध्या जे जगात चालले आहे ते धर्मावरील श्रद्धेमुळे. सर्व अतिरेर्की बाँम्ब स्फोट करतात ते धर्मावरील श्रद्धेमुळेच.

दिवसातून ५ वेळा वाचलेले वाक्य आणि अशा वांझोट्या चर्चाही अनेक वाचल्या आहेत. आपल्याला धर्म कळतो असे सांगणारे किंवा धर्माची व्याख्या कशी करावी हे सांगणारे अनेक विद्वान येथे पुढे येतील, परंतु त्यातील एक तरी अतिरेकी आहे का? मला नाही वाटत तसे, तर मग असे वांझोटे चर्चाविषय त्यांच्यासमोर मांडण्याची गरज ती कोणती?

ज्या अतिरेक्यांना हे समजावून सांगण्याची गरज आहे त्यांच्याकडे यातील एकतरी विद्वान जाऊन बोलणी करण्यास तयार आहे काय? नसल्यास आपणच आपल्याला उपदेशामृत का पाजून घेतो आहोत?

-राजीव.

धर्म देवाने निर्माण केला असे समजणार्‍यांना मी एकच सांगू इच्छितो

शरदराव १००% सत्य बोललात.

देव धर्म

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
देव आणि धर्म या दोन्ही गोष्टी माणसानेच निर्माण केल्या हे नि:संदेह. आर्यावर्तातील विचारवंतांनी (ऋषिमुनींनी ) माणसाच्या आचरणासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली त्यांना साकल्याने 'धर्म' असे म्हटले. 'हिंदुधर्म' असे नाव नव्हतेच. याला साधारणतः चार सहस्र वर्षे झाली असे मानता येईल. इतर बौद्ध, जैन्, ख्रिश्चन, इस्लाम इ. धर्म कधी कोणी स्थापन केले हा इतिहास आहे.

अपौरुषेय, अपरिवर्तनिय , बाबावाक्यं प्रमाणं , अशी भानगड विज्ञानात

घाटपांडेसाहेब, मी आपल्या विचाराशी सहमत आहे, परंतु पूर्णपणे नाही. थोड्या वेळाने सविस्तर लिहीन.

धर्म

धर्म म्हणजे काय याची व्याख्या अगोदर करायला पाहिजे. 'धारयति इति धर्म: ' ही धर्माची हिंदु व्याख्या आहे . भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार हिंदुइझम हा धर्म आहे, रिलिजन नाही. जो धर्म कुणी स्थापिला नाही आणि जो एका पुस्तकात बंद करता येत नाही त्यालाच धर्म म्हणावे अशा अर्थाचा तो निकाल आहे. बाकीचे उपासनापंथ.जैनधर्मदेखील हिंदु धर्मातल्या सांख्य तत्‍त्वज्ञानावर आधारित असल्याने भारतीय घटनेनुसार तो हिंदु धर्माचा एक पंथ समजला जातो. तो बहुतेक पार्श्वनाथाने स्थापन केला असावा. त्या धर्माप्रमाणे परमात्मा अनेक आत्म्यांचा समुदाय आहे. म्हणजे हा धर्म देव एकच आहे असे मानत नाही. त्यांच्या देवळात २८ तीर्थंकरांच्या मूर्ती असतात.
शीख पंथ हिंदू आणि इस्लामी तत्त्वांच्या मिश्रणातून तयार केला गेला. ह्या पंथाची माणसे अकालपुरुष नावाच्या एकाच देवाला मानतात, पण पूजामात्र ग्रंथसाहेबाची करतात.
ज्यू आपला धर्म देवाने स्थापला असे मानतात. पण तो अब्राहामने स्थापला आणि नंतर मोझेसने(१३०० इ.स.पू) तो जनमानसात रूढ केला हे सत्य. ज्यूंनी देवाच्या शोधार्थ बाबिलॉनहून परतल्यानंतर(इ.स.पू.५३८) धर्माची खर्‍या अर्थाने स्थापना केली.म्हणजे या अर्थाने अब्राहाम, मोझेस, आयशाया, जेरमाया वगैरे अनेक संस्थापकांकडून धर्माची स्थापना झाली. . अर्थात हा धर्म देवाने निर्माण केला नाही हे नक्की. ज्यू धर्मातूनच नंतर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म निर्माण झाले.
देवाची पण व्याख्या करायला पाहिजे. अमरकोशात देव या अर्थाचे अनेक शब्द आहेत. त्यातले काही या ओळीत...

अमरा निर्जरा देवास्त्रिदशा विबुधा: सुरा: ।(अमरकोश १.१.१३)

म्हणजे ज्याला मरण नाही, म्हातारपण नाही असे. या अर्थाने राम, कृष्ण, बुद्ध देव होत नाहीत. सुशिक्षित माणसे नाहीतरी त्यांना परमेश्वर म्हणतच नाहीत. हिंदु धर्मात ३३ कोटी देव. त्यांत नित्यश: भर पडतच असते. जीमेल मधल्या खात्याचे आकारमान जसे क्षणोक्षणी वाढत असते तसा हा प्रकार. शिवाजी, संभाजी, आंबेडकर, साईबाबा, अमिताभ बच्चन, खुशबू या सगळ्यांची देवळे आहेत.
हिंदूंप्रमाणेच रोमन, इराणी आणि ग्रीक अनेक देव मानत. बौद्ध देवळात तर गौतम बुद्धाखेरीज अनेकांच्या मूर्ती असतात.
शिंतो धर्मानुयायी अनेक देव मानतात. जमेकातील रास ताफारी उपासनापंथाचे लोक त्यांच्या आद्य राजाला, हेले सिलासीला देव मानतात. याशिवाय अनेक देव मानणारे बरेच धार्मिक गट जगात आहेत.
बौद्ध, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मसुद्धा माणसांनी स्थापन केले आणि हे कोणीही आपला धर्म देवाने स्थापला असा दावा करीत नाहीत.
आपला धर्म देवांनी स्थापन केला असे फक्त हिंदूच म्हणू शकतात. त्यांनी अगोदर ऋषिमुनीरूपी देव तयार केले आणि त्या देवांकडून धर्माची स्थापना करवून घेतली. बाकीच्यांचा धर्म आधी निर्माण झाला आणि त्यानंतर शेकडो वर्षांनी त्या संस्थापकाला त्यांनी देवस्वरूप मानायला सुरुवात केली. --वाचक्‍नवी

गृहीतक आणि गीता

वाचक्‍नवींचा वरील (पटलेला) प्रतिसाद वाचताना अजून एक गोष्ट ध्यानात आली की, ह्या चर्चेचे मूळ गृहीतक असे मानते की "देव" आहे. जे निरीश्वरवादी अथवा निधर्मी असतात ते जरी देवाचे अस्तित्व मान्य करत नसले तरी (मान्य नसलेल्याही) "रिलीजन" या अर्थाने धर्माचे करतात. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे (येथे हिंदू धर्म शब्द मुद्दाम वापरायचे टाळत आहे, पण ते हिंदू धर्माचे मूळ आहे) - इश्वर हा निर्गूण निराकार असतो .

धर्म हा शब्द (ज्याला एक वाक्प्रचार आहे "चावून चावून चोथा झालेला") पंथ/रिलीजन या अर्थाने वापरू नये तर "वागणे" या अर्थाने वापरावा. म्हणून धर्म या शब्दाच्या अनेक छटा आहेत - धर्म, स्वधर्म, परधर्म आणि अधर्म. धर्म म्हणजे चांगले वागणे आणि अधर्म म्हणजे वाईट (पूण्य ते उपकार पाप ते परपीडा), स्वधर्म म्हणजे स्वतःचे "नेचर" अथवा "स्वभावधर्म" आणि परधर्म म्हणजे "इतराचा स्वभावधर्म".

वरील अर्थ लक्षात घेतले आणि आपल्या प्रश्नासंदर्भात गीता/गीताईत श्रीकृष्ण काय म्हणतो ते पहा:

माझे अनेक ह्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू नं जाणसी |

असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत् - प्रभु
माझी प्रकृती वेढूनि मायेने जन्मतो जणू

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना
अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे

राखावया जगी संता दुष्टां दूर करावया
स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी || गीताई अध्याय ४, ५-८||

सहमत..

धर्म हा शब्द (ज्याला एक वाक्प्रचार आहे "चावून चावून चोथा झालेला") पंथ/रिलीजन या अर्थाने वापरू नये तर "वागणे" या अर्थाने वापरावा. म्हणून धर्म या शब्दाच्या अनेक छटा आहेत - धर्म, स्वधर्म, परधर्म आणि अधर्म. धर्म म्हणजे चांगले वागणे आणि अधर्म म्हणजे वाईट (पूण्य ते उपकार पाप ते परपीडा), स्वधर्म म्हणजे स्वतःचे "नेचर" अथवा "स्वभावधर्म" आणि परधर्म म्हणजे "इतराचा स्वभावधर्म".

मला वरील संपूर्ण चर्चेतून विकासरावांचे वरील म्हणणेच तेवढे पटले! बाकी आमच्या काकाजींच्या भाषेत सांगायचं तर धर्म, गीता वगैरे आम्हाला न पेलणार्‍याच गोळ्या! :)

आपला,
(अधर्मी, दुराचारी, पापी) तात्या.

--
कुत्र्याच्या शेपटीसारखे झालेले पिंड आमचे, ते भगवतगीतेच्या नळकांड्यात घातले तरी सरळ थोडेच होणार आहेत?:) - { इति. वासुअण्णा, नाटक - तुझे आहे तुजपाशी }

काहीजण...

कुत्र्याच्या शेपटीसारखे झालेले पिंड आमचे, ते भगवतगीतेच्या नळकांड्यात घातले तरी सरळ थोडेच होणार आहेत?:) - { इति. वासुअण्णा, नाटक - तुझे आहे तुजपाशी }

काहीजण गीता हा धर्मग्रंथ न करता "तुझं आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी", म्हणत त्याचा संदर्भ करतात तर काही "तुझं आहे तुझ पाशी"च धर्मग्रंथ करत लक्षात ठेवतात! शेवटी हा प्रत्येकाच्या आवडीनिवडिचा भाग आहे! अणि मोकळ्या मनाने पाहीले तर तत्वज्ञान हे कशातही दिसू शकते. जो पर्यंत ते "also" असते तो पर्यंत त्यातली मोकळीक जाणवते पण जेंव्हा इतरांवर टिका/थट्टा करत ते "only" होते तेंव्हा ते "मूलतत्ववादी" अर्थात "फंडामेटालीस्ट" होते. (तसे माझे आवडते अजून एक तत्वज्ञान दाखवणारे पुस्तक जॉर्ज ऍसिमोव्हची "फांउंडेशन" ही मालीका, विशेषतः तीचा शेवट आहे.. आणि ते बर्‍याचदा आठवतेही...)

(कृपया ह.घ्या. आणी ही टिका, टोमणे म्हणून नक्कीच घेऊ नका, पण असे "observation" म्हणून, या बाबतीत "तुझं आहे तुझ पाशी" तर इतर ठिकाणि इतरबाबतीत वाटते).

आम्ही त्यापैकीच!

तर काही "तुझं आहे तुझ पाशी"च धर्मग्रंथ करत लक्षात ठेवतात!

आम्ही त्यापैकीच! तोच आमचा धर्मग्रंथ! :)

तात्या.

माहीती आहे!

आम्ही त्यापैकीच! तोच आमचा धर्मग्रंथ! :)

अर्थातच त्याची कल्पना आहे. फक्त तो "also" मधे गणत असवात असे वाटते "only" मधे नाही :-)

अनंत

इश्वर हा निर्गूण निराकार असतो .

याच्या पुढे तो सगुण आणि साकार झाला, तरी देखिल भावनिक गरज भागेना मग त्यानंतर तो भक्तवत्सल आणि करुणाघन झाला. हे सर्व मानवाच्याच भावनिक गरजातून. आपल्याकडे देव हा सखा आहे. त्यावर प्रेम करता येत, त्याच हक्काने त्याला शिव्या पण घालता येतात. विठ्ठलाला विठ्या म्हणता येत तस विठू म्हणता येत. तू मालिक मी बंदा अशी भानगड नाही. विठू माझा लेकुरवाळा हे गीत ऐकायला किती गोड वाटतं! universe is fascinating असे अचंबित होऊन म्हणणारे वैज्ञानिक आणि परमेश्वराला अनंत म्हणणारे श्रद्धाळु मला एकाच भावनिक पातळीचे वाटतात.

प्रकाश घाटपांडे

रघुराज थक्कीत होवूनी पाहे ।

universe is fascinating असे अचंबित होऊन म्हणणारे वैज्ञानिक आणि परमेश्वराला अनंत म्हणणारे श्रद्धाळु मला एकाच भावनिक पातळीचे वाटतात.

वाहवा ! घाटपांडे साहेब, काय सुंदर बोललात !
अहो, समर्थ रामदास सुद्धा याबाबत मनाला काय सांगतात पाहा,
रघुराज थक्कीत होवूनी पाहे ।
मना सजन्ना राघवी वस्ती किजे ॥
--लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

अपौरुषेय, अपरिवर्तनिय , बाबावाक्यं प्रमाणं , अशी भानगड विज्ञानात

घाटपांडेसाहेब, विचार करा तुम्हाला किंवा कोणाही मनुष्याला फक्त एक इच्छापुर्तीचा योग आला तर काय मागाल? तुम्ही अगर इतर कोणीही 'मृत्यु नको' असेच मागाल ना? प्रत्येक प्राण्याला जगावेसे वाटते. आता जगायचे म्हणजे संकटाशी दोन हात केलेच् पाहिजेत. त्याकरता शक्ती पाहिजे. पुरातन काळी शक्ती म्हणजे शरिरीक शक्ती असेच समजले जायचे. हे खरे आहे ना? आता पहा कोणाच्याही शरिरीक शक्तीला मर्यादा आहेत. मग यावर ऊपाय? बोटे एकत्रित केली तर मुठीची शक्ती कोठल्याही बोटापेक्षा जास्त असते हे जाणत्याना माहित होते. तेंव्हा एकीचे दोन्, दोनाचे चार, चारचे हजारो- लाखो- कोट्यावधि- अब्जावधि झाले तर शक्ती किती वाढेल याचा विचार करा. जाणत्यानी या करताच समाज निर्माण करण्याचे योजले असावे असे आपल्याला वाटते ना? मला तरी वाटते.

समाजात जितके लोक अधिक तेवढे प्रश्नही अधिक. मोठा समाज एकत्रित ठेवणे हे सामान्य काम नाही. प्रत्येकाच्या इच्छा पुर्ण तरी झाल्या पाहिजेत किंवा प्रत्येकाला पुढे होणार्‍या लाभाचे प्रलोभन दाखवुवन गप्प केले पाहिजे. या करता नियम व प्रलोभने यांचा योग्य समन्वय साधुन आचार संहिता केली पाहिजे. जाणत्यानी हेच केले व त्याला धर्म असे नांव दिले. पुढे नुसते नियम करुन उपयोग नाही ते पाळले तरच त्यांचा उपयोग. मग त्याला पोलीस व न्यायाधीश पाहिजेतच. हे आणणार कोठुन? ज्ञानी मनुष्यानी यावर अप्रतिम ऊपाय शोधला. या शोधाला नोबेल पारितोषिक दिले तर तो त्या पारितोषकाचा बहुमान होईल. तो उपाय म्हणजे ईश्वर. ईश्वराला त्यानी प्रत्येकाच्या मनात-हृदयात बसवले. ईश्वराबद्दल श्रद्धा व भीती निर्माण केली. नियम पाळलेस तर येथे अथवा स्वर्गात सुखाने राहशील नाहीतर त्याची फळे येथे किंवा नरकात भोगशील. माणूस इतराना फसवु शकतो परंतु, स्वतःला नाही. हेच हेरुन धर्म, ईश्वर, स्वर्ग, नरक इत्यादी संकल्पनांचा उदय झाला व त्यना मान्यता मिळबुन देण्यात ज्ञानी लोकाना यश आले.

असे असताना लोकांची श्रद्धा, धर्म मानव निर्मित नसुन ईश्वर् निर्मित आहे असे का? याला संयुक्तिक कारण काय? मला वाटते केवळ लोकानी धर्म पाळावा या सद् हेतुने केलेली ही तडजोड असावी.

गुंडोपंतांचे मत आहे की, हिंदुधर्मात ३३ कोटी देव आहेत. मला हिंदुधर्म म्हणजे काय? हाच मोठा प्रश्न पडतो. अरबी लोकानी सिंधुनदीला त्यांच्या उच्चाराप्रमाणे हिंदु म्हटले व त्या नदीच्या काठी रहणारानाही हिंदु ठरवले. म्हणजे अरब म्हणतात म्हणुन मी हिंदु. मला माझ्या धर्माला नाव दुसर्‍याकडुन घ्यावे लागले. माझ्या शब्द्कोषात मला माझ्या धर्माचे नांव सापडत नाही. माझा शब्द्कोष इतका गरीब आहे काय? अर्थातच नाही. माझा शब्द्कोष समृद्ध आहे. माझ्या धर्माला कोठलेही नांव नाही याचा उलट मला अभिमान वाटतो. ज्या ज्ञानी लोकानी धर्माला प्रचलित अर्थाने नांव दिले नाही त्याना शतशः प्रणाम. त्याना धर्माचा अर्थ योग्य प्रकारे समजल्यामुळे त्यानी ही चूक केली नाही. श्री घाटपांडे यानी उद् धॄत केल्या प्रमाणे शेजारधर्म, पितृधर्म,मातृधर्म,राष्ट्र्धर्म , आपदधर्म वगैरेच खरे धर्म आहेत. धर्माच्या व्याख्येत ते चपलख बसतात. ज्या करता नियम तो त्याचा धर्म. म्हणूनच 'हिंदुधर्मात ३३ कोटी देव आहेत' हे मला मान्य नाही. त्या ऐवजी असे म्हणा 'भारतात बहुसंख्य लोक ३३ कोटी देव आहेत असे मानतात.'

आता प्रश्न पडतो भारतात ३३ कोटी देव व इतरत्र फक्त एकच देव असे का? खरे म्हणजे भारतातही बहुसंख्य एकच देव मानतात. 'सर्व देव नमस्कारः केशवम् प्रतिगच्छति' याचा अर्थ काय? 'आत्मे अनेक परंतु पर्मात्मा एक' हे कोण मानतात? असे असताना ३३ कोटी देव कसे आले? त्या करता ज्ञानी लोकानी ज्या माणसांच्या जाती अगर वर्ग पाडले ते पहा.

  1. पहिला वर्ग जो स्वतः नुकसान सोसुन सुद्धा दुसर्‍याच्या उपयोगी पडतो तो माणूस देव या जातीत मोडतो. म्हणूनच राम कृष्ण हे देव झाले
  2. दुसरा वर्ग माणसाचा. दुसर्‍याला आवश्य मदत करील परंतु, स्वतःला नुकसान होत नसेल तरच
  3. तिसर्‍या वर्गातील माणसे दुसर्‍याला मदत करण्याचे सोडा, दुसर्‍याला कसा त्रास देता येईल या करताच प्रयत्नशील असतात. हे करताना स्वतःचे नुकसान मात्र करुन घेत नाहीत. याना त्यानी दानव म्हटले
  4. शेवटचा वर्ग राक्षसांचा. त्याची व्याख्या लक्षात आलीच असेल. स्वतःचे नुकसान झाले तरी हरकत नाही परंतु, दुसर्‍याला त्रास झालाच पाहिजे.

या व्याख्येनुसार गाय, पशु, पाणी, वायु, सुर्य, आई, वडिल, गुरू, राम, कृष्ण वगैरे सर्व देवच की हो. ज्ञानी लोकांच्या काळात ३३ कोटी देव असतील आता आपण ३३००० परार्ध का म्हणु नये?

सर्व धर्म ईश्वर सर्वव्यापी, सर्वशक्तिमान वगैरे मानतात. आपणाला आणु मध्ये अपार शक्ती आहे हे चांगल्या प्रकारे समजुन चुकले आहे (नसले तर नागासाकीचा इतिहास वाचा). आपल्याला हे ही माहिती आहे की विश्व हे अणुनी बनले आहे. मग विश्वातील सर्व अणु म्हणजेच ईश्वर मानले तर कोठे चुकले? विज्ञानात आपण हेही शिकलो की विश्वात जे घडते त्या मागे निश्चित नियम आहेत. काही आपल्याला माहित असलेले, समजलेले तर काही बाबत आपण अज्ञानी आहोत. परंतु, अज्ञानी आहोत म्हणुन नियम नाहीत असे समजणे खुळ्याचे लक्षण नाही काय? हे नियम कोठल्या माणसाने बनवले? मग हे नियम अपौरुषेय नाहीत काय? मग जे अतिशाहणे माझ्या धर्माचे नियम अपौरुषेय आहेत असे मानतात त्याना हे समजाऊन सांगावे का नाही? म्हणुनच माझ्यामते विज्ञान हा एकमेव धर्म आहे की ज्याचे नियम अपौरुषेय आहेत.

अतिरेक्याना समजाऊन सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. परंतु, जे अतिरेकी नाहीत परंतु, धर्मावरील श्रद्धेमुळे, अनअवधानाने अतिरेक्याना मदत करतात त्याना समजाऊन सांगणे कठीण असले तरी अशक्य नाही. मला वाटते श्री सहज याना आता तरी माझा उद्देश पटला असावा.

आता तुम्ही बोला मी ऐकतो.

वा वा क्या बात है!

आपल्या बहुतेक मुद्यांशी सहमत, पण
माझ्या धर्माला कोठलेही नांव नाही याचा उलट मला अभिमान वाटतो.
आता या सर्वसाधारणपणे सारख्या संकल्पनांना मानणार्‍या एका विस्कळीतशा नि एका भौगोलीक विभागात (काही काळापर्यंत) राहणार्‍या समुहाला काहीतरी नाव देणे आवश्यक आहे की नाही?
मग अरबांनी त्या समुहाला हिंदु म्हंटले (कुणी व कालसंदर्भ?) तर एक प्रकारे त्यांचे विचार, संकल्पनांचे एक्त्रीत पणे मान्य केले ना?

मग या समुहाला हे कळलेच नव्हते की आता आपले नामकरण व्हायला हवे आहे. कारण त्यांनी त्यांच्या भुभागा व्यतिरिक्त जग आहे हे "फारसे मान्यच" केले नव्हते! मग 'इतर समाज अस्तित्वात आहेत' हे मान्यच नसेल तर प्रश्न उरतच नाही ना?
(आता मी हा समाज असहिष्णु होता असा वादग्रस्त मुद्दा मांडतो आहे का? ;) )

आपला
सिंधुपंत

~गुंडोपंतांचे जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

समुहाला काहीतरी नाव देणे आवश्यक आहे की नाही?

अधिक माहिती येथे पहा

माझ्या धर्माला नांव नाही. नांव नसताना ज्याची ओळख असते तो श्रेष्ठ असेच मानातात ना? भारतात धर्म एका शब्दाने प्रचलित नव्हता. डॉ बिरुटे यानी म्हटल्या प्रमाणे त्याला मातृधर्म वगैरे नांवे होती.

३३ कोटी देव=१ केशव

अनिरुद्ध दातार
एक संस्कृत सुभाषित असे म्हणते की:
आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छंति सागरम्।
सर्व देव् नमस्कारान् केशवं प्रतिगच्छति॥

अर्थः ज्याप्रमाणे आकाशातून जमिनीवर पडलेले पाणी (पाऊस) समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे कुठल्याही देवाला केलेला नमस्कार शेवटी केशवालाच (विष्णूला) पोहोचतो.
(गुंडोपंत, सायटेशन मागू नका.)

बाकी चालूद्यात
आपला,
(अल्पज्ञानी) अभियंता

अतिरेक्याना सांगणार कोण? इति जेसन बोर्न

प्रश्न योग्य आहे. उत्तर मला माहित नाही. माझे मत अतिरेक्याना सांगणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतुन घडा भरण्याची अपेक्षा बाळगण्यासाखी आहे. परंतु, धर्मावरील अपार श्रध्येने अतिरेक्याना मदत करणाराना पटवुन देऊ शकतो. असे लोक येथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. निदान इतराना माहिती असेल तर संधी आली तर ही चर्चा नक्कीच साहय्यभूत होईल. निदान मला तरी असे वाटते.

धर्म

वाचक्‍नवी, विकास व् तात्या पतोडी याना एक विनंती. धर्मांची तुलना कृपया करु नका. या चर्चेचा तो उद्देश नाही. धर्माच्या व्याख्येचा उहापोह आवश्य करा.

म्हणजे?

>>>धर्मांची तुलना कृपया करु नका. या चर्चेचा तो उद्देश नाही. धर्माच्या व्याख्येचा उहापोह आवश्य करा.

धर्मांची तुलना याचा अथ आपल्याला रिलिजन्सची तुलना म्हणायची आहे का? कारण त्या अर्थाने मी धर्मांची तुलना केली नाही तर व्याख्येचाच उहापोह करत होतो.

माफ करा

मी चुकुन आपले नांव लिहले

धर्मांची तुलना

मीसुद्धा धर्मांची तुलना केलेली नाही. मी एवढेच म्हटले की आपला धर्म देवाने स्थापन केला असे कुणीही मानत नाही. दुसरे असे की, एकच देव मानणारे फार थोडे धर्म आहेत; पण ते सुद्धा पैगंबर, खलीफा, मौलवी, देवदूत, ईश्वराचा पुत्र, संत, पीर आणि धर्मगुरू यांसारखे अनेक देव मानतात. एवंच, बहुसंख्य धर्म अनेकदेवतावादी आहेत.
हिंदुधर्मीयांनी आपल्या धर्माला नाव ठेवले नाही यात काहीच आश्चर्य नाही. मूल जन्मल्यानंतर ते स्वत:ला नाव ठेवत नाही, नाव दुसर्‍याने ठेवायचे असते. आपल्या देशाचे आद्य नाव इंडिया हे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून अस्तित्वात आहे, ते आपण आपल्याला ठेवून घेतलेले नाही.
जात ईश्वराने निर्माण केली हे मात्र सत्य आहे. कुत्री, घोडे, साप अशा प्रत्येक प्राण्याच्या आणि वनस्पतींच्या अगणित जाती आहेत, या सर्व ईश्वरानेच निर्माण केल्या. या जातींमध्ये रोटीबेटी व्यवहार सहसा होत नाहीत. माणसाला मात्र अफाट बुद्धिमत्ता, आणि संवेदनाशील व सुसंस्कृत मन मिळाल्यामुळे जन्मत: मिळालेल्या जातीत राहूनसुद्धा तो कर्माने अधिकाधिक प्रगत होतो. त्याला रोटीबेटी व्यवहार पाळायचे बंधन नसते. जे असे बंधन घालतात ते धर्म नाहीत, केवळ कूपमंडूक वृत्तीचे उपासनापंथ आहेत. --वाचक्‍नवी

नरहर कुरुंदकर

नरहर कुरुंदकरांचे 'जागर' पुस्तक म्हणजे बौद्धिक खजिनाच आहे. त्याकाळातही मुस्लीमांच्या समोर जाहीरपणे इस्लाम धर्माची चिकित्सा करणारे धैर्यवान विचारवंत. व्यक्तिगत ते म्हणतात कि माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही परंतु माझ्या सभोवती माझे लाखो बांधव जे देव व धर्म मानतात त्यांच्या पासून तुटून जाण्यावरही माझा विश्वास नाही.

प्रकाश घाटपांडे

मदर तेरेसा

टाईम मॅग्झीन च्या गेल्या अंकात मदर तेरेसांवर लेख आला आहे ज्यात लेखकाने शोधलेल्या माहीतीप्रमाणे मदर तेरेसांना इश्वराच्या अस्तित्वावर शंका होती. अर्थात तरी त्यांनी ख्रिस्तीधर्मोपदेशकाच्या भुमिकेतूनच सेवा केली आणि त्यांना आता त्याच "सिस्टीम"मधून "संतत्व" मिळत आहे..

देवकीनंदन गोपाला..

अर्थात तरी त्यांनी ख्रिस्तीधर्मोपदेशकाच्या भुमिकेतूनच सेवा केली आणि त्यांना आता त्याच "सिस्टीम"मधून "संतत्व" मिळत आहे..

माझ्या माहितीप्रमाणे मदर तेरेसा या संतबिंत कुणी नसून ख्रिस्ती धर्माच्या केवळ एक जबरदस्त प्रचारक होत्या!

माझ्या मते खर्‍या अर्थाने 'संत' म्हणावे अशी व्यक्ति फक्त एकच, ती म्हणजे संत गाडगेबाबा! त्यांनी नुसत्या ओव्या अन् श्लोक लिहीत न बसता आणि 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' या चालीवर लोकांना फुकटचे सल्ले न देता, स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाईची कामे केली आहेत. गावोगावचे रस्ते झाडले आहेत. (किंवा रस्ते झाडण्याचे कष्ट केले आहेत!) काय मिळेल ते खाल्लं आहे अन् ज्या गावात मुक्काम असे त्या गावातल्या एखाद्या देवळात रात्री लोकांना साधेसोपे दृष्टांत देऊन अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य केले आहे! खर्‍या अर्थाने संत म्हणावे असे केवळ ते एकच संत होते! लोकोपयोगी कामाच्या नुसत्या ओव्या न रचता त्यांनी प्रत्यक्षात तसे झडझडून कामही केले आहे हे विशेष!

बाकी महाराष्ट्रात अन्य संतांची अगदी रेलचेल आहे! पायलीला पसाभर मिळतील! :)

असो, त्या सगळ्या संतांना आणि त्यांच्या कवित्वाला माझे विनम्र अभिवादन! त्यातूनही खूप शिकण्यासारखं आहे हे नाकारता येणार नाही!

तात्या.

अगदी माझ्या मनातले बोलला

खर्‍या अर्थाने 'संत' म्हणावे अशी व्यक्ति फक्त एकच, ती म्हणजे संत गाडगेबाबा! असे गाडगेबुवा प्रत्येक तालुक्यात निर्माण झाले तर आपला देश सर्वोत्तम होईल.

मदर भंपकपणा

मदर तेरेसांना संतपद देणे वगैरे
भंपकपणा आहे. किंवा ख्रिस्ती धर्माला 'भारतात जरा जोरात खपवण्याची'
चाल आहे.
लक्षात घ्या संतपद मिळण्यासाठी चमत्कार व्हावा लागतो! हा झाला म्हणे चमत्कार असे व्हॅटिकन ने मान्य केले.
याच मुद्यावरून अनेक ख्र्स्ति मंडळी इतर देव कसे भंपक आहेत असे बोंबलत फिरत असतात, आता बोला!

एक वेगळा मुद्दा:
आता या मुद्यावर चमत्कार वगैरे सब झुट अशी जाहीर भुमीका अनिस ने घेतल्याचे मी पाहिले नाही. नात्यांनी त्यावर काही चळवळ राबवली!
बहुदा व्हॅटिकन मधुन आलेल्या ख्रिस्ती धर्मातील श्रद्धा त्यांना अंध वाटत नसाव्यात. का तेथे सामाजिक जबाबदारी नसते त्यांची?

आपला
गुंडो

~गुंडोपंत मानतात की जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

कळीचा प्रश्न

आता या मुद्यावर चमत्कार वगैरे सब झुट अशी जाहीर भुमीका अनिस ने घेतल्याचे मी पाहिले नाही....का तेथे सामाजिक जबाबदारी नसते त्यांची?

हा कळीचा प्रश्न आहे. केवळ हिंदूची अंधश्रद्धा ती पण बर्‍याचदा गोर गरिबांची (उंदराच्या कानात बोलणार्‍या अमिताभची नाही) बघून त्यावर बोलायचे पण तेच स्वर्गसुखासाठी आत्मघातकी पथके काढणार्‍यांवर बोलायचे नाही की मिशनर्‍यांच्या बाबतीत बोलायचे नाही. माझा आक्षेप केवळ या अप्रामाणिकपणावर आहे.

बाकी अंधसश्रद्धा निर्मूलन नक्कीच व्हावयास हवे पण त्यात एकाच समाजाचे मानसीक खच्चीकरण होऊन (की आपल्यात जे काही आहे ते वाईटच...) आणि इतरांनी त्याचा राजकीय/सामाजीक गैरफायदा घेऊ नये असे वाटते...

एक कुतुहलापोटी प्रश्नः अनिसचे कार्यकर्ते धर्म मानतात का?

मुस्लीम

बाकी अंधसश्रद्धा निर्मूलन नक्कीच व्हावयास हवे पण त्यात एकाच समाजाचे मानसीक खच्चीकरण होऊन (की आपल्यात जे काही आहे ते वाईटच...) आणि इतरांनी त्याचा राजकीय/सामाजीक गैरफायदा घेऊ नये असे वाटते...
वोईच बोल्ता मै! मै तो कबीच ये लोगा को देखेला नईये महारे म्हुल्ले मे!
ना कबी मालेगावकु आते ना भिवंडी मे आते. हमारे दर्ग्यामे तो आके दिखाव ना येकबारी! वो तो छोडोच प तुम हमारे चौकमे तो एक् भाषन देके दिकाव ना!
क्या भाईजान क्या बोल्ते?

आपला
भईजान

~भाईजान मानरेले के जो बी लिखेला हौर बोलेला 'समझता' वो शुद्धच ह्रैत्या है, तो आगे हे शुद्धपन की बात इदरकु करनेकीच नै भला क्या!~

अगदी बरोबर

भईजान म्हणतात ते अगदी बरोबर. इस्लामवर किंवा ख्रिस्ती धर्मावर टीका करायची कुणाची हिम्मत आहे? पूर्वी ज्यांनी टीका केले त्यांना एकतर मारून टाकले गेले किंवा ते देशोधडीला लागले. जो धर्म चमत्काराशिवाय संतपद नाही या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल काय बोलावे? एकाच पुस्तकात आख्खा धर्म कैद केला की त्याचे डबके झालेच म्हणून समजा..--वाचक्‍नवी

'गटेनबर्ग'

म्हणूनच 'गटेनबर्ग' ने पुस्तकस्वरूपात माहिती आणून सर्व धर्मांची वाट लावली
असे म्हणतात!
मौखिक माहिती एकदा लिखित झाल्यावर बदल करणे अवघड होवून बसले.
तोवर धर्माचे नियम त्या त्या समाजाला व स्थितीपरत्वे वाकवून योग्य तसे वापरले जात असावेत असे वाटते.

आपला
गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

कुरुंदकर

ही पोस्ट वाचलीत का?
प्रकाश घाटपांडे

मुस्लिम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"अंनिस हिंदूंच्या अंधश्रद्धां विषयी बोलते.त्यांनी प्रथम अन्यधर्मींयांच्या अंधश्रद्धां विरुद्ध बोलावे."असे काही सदस्यांचे मत दिसते.
हा आरोप अपूर्ण माहिती, चुकीचा विचार आणि तर्कदुष्टता यांवर आधारित आहे.
(|) अपूर्ण माहिती:" अंनिस अन्य धर्मीय अंधश्रद्धांविरुद्ध बोलत नाहीत "हे म्हणणे अपुर्‍या महितीचे निदर्शक आहे. मीरावली दर्ग्यातील भूत ,करमअली लंगरचमत्कार,कणगूत दर्ग्यातील सर्पविषबाधेवरील दुवाँ अशा अनेक प्रकरणांत लक्ष घालून, प्रसंगी पोलीसांची मदत घेऊन,धर्माच्यानावे चाललेली फसवणूक अंनिसने बंद पाडली आहे.[डॉ. दाभोळकर यांच्या"अंधश्रद्धा विनाशाय " या पुस्तकात सविस्तर माहिती आहे.]
(||) चुकीचा विचार : समजा मी गुंडोपंतांकडे पेइंगगेस्ट म्हणून राहातो. समजा मी त्यांच्या जातीचा नाही.समजा त्यांची एक कुलप्रथा मला अनिष्ट वाटली."तुम्ही ही प्रथा बंद करावी." असे मी त्यांना सांगितले तर प्रतिक्रिया काय असेल? ते म्हणतील "बोलू नका. तुमचा काय संबंध? आमच्या कुलधर्म कुलाचारांविषयी तुम्हाला काय माहिती आहे? गप्प बसा."अगदी कितीही परजातसहिष्णू व्यक्ती असली तरी अशीच प्रतिक्रिया संभवते. किंबहुना हॅ स्वभाविक आहे असेही म्हणता येईल.
आता समजा गुंडोपंतांच्या कुलगोत्रातील एका विचारी व्यक्तीने सांगितले" आपल्या पूर्वजांनी ही प्रथा पाडली ती त्याकाळी योग्य असेल.आता ती कालबाह्य आहे.आपण तिचा त्याग करणे इष्ट." तर यावर चर्च संभवते.
"कोण हा डॉ. दभोळकर? त्याने कुराण वाचले आहे का? नमाज पढतो का? आमच्या धर्मावर बोलण्याचा त्याल काय अधिकार?'" अशी प्रतिक्रिया संभवते.तेव्हा वेळ आणि शक्ती यांचा अपव्यय टाळणे इष्ट नव्हे काय?
(|||)तर्कदुष्टता "अंनिसचे लोक त्यांना सांगत नाहीत. आम्हालाच का सांगतात?" हा तर्कदुष्टपणा आहे.ते सांगतात ते योग्य आहे की अयोग्य? समाजहिताचे आहे की अहिताचे?" यावर विचार हवा.इष्ट वाटले तर स्वीकारावे. जमेल तेवढा प्रचार करावा. किमान पक्षी विरोधू नये.अनिष्ट वाटले तर तसे का ते साधार मांडावे.ते न करता "आधी त्यांना सांगा.आधी त्यांनासांगा." असे म्हणणे म्हणजे कांगावखोरपणा आहे असे म्हटले तर वावगे ठरेल काय?

काही स्पष्टीकरण

अनिसवर टिका करण्यात मी ही होतो त्यावर प्रकाशरावांनी मांडलेल्या बर्‍याच मुद्यांशी सहमत असल्याचे पण लिहीले आहे. परंतू आपली प्रतिक्रीया वाचताना काही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली:

"अंनिस हिंदूंच्या अंधश्रद्धां विषयी बोलते.त्यांनी प्रथम अन्यधर्मींयांच्या अंधश्रद्धां विरुद्ध बोलावे."असे काही सदस्यांचे मत दिसते.

प्रथम अन्यधर्मीयांच्या अंधश्रद्धांविरुद्ध बोलावे असे म्हणणे नाही तर जिथे अंधश्रद्धा दिसेल तेथे बोलावे असे आहे. एकदा स्वतःस निधर्मी म्हणल्यावर धर्म पाळणार्‍यांमधे आपपर भाव योग्य नाही असे वाटते.

बर्‍याचदा अनिसवर टिका करणारे हे स्वतः अंधश्रद्धाळू अथवा त्याचे समर्थन करणारे पण असतील का याची शंका आहे. मी अंधश्रद्धाळू नाही आणि स्वतःला अश्रद्धही समजत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायम होत राहायला हवे अशा मुद्याचा मी आहे (कारण अंधश्रद्धा प्रत्येक काळात वेगवेगळ्या पद्धतीने येतच राहाणार). पण प्रतिक्रीयात्मक असते कारण वर म्हणलेला आपपर भाव वर सांगत की आम्ही काही स्वतःला हिंदू समजत नाही. म्हणून मुद्दा हा कार्यपद्धतीचा आहे. तो येथे अनिसच्या संदर्भात आला. उद्या हाच मुद्दा इतर (अगदी अनिसच्या विरुद्ध असलेल्या) संघटनांसंदर्भात पण येईल.

अंधसश्रद्ध

हा कळीचा प्रश्न आहे. केवळ हिंदूची अंधश्रद्धा ती पण बर्‍याचदा गोर गरिबांची (उंदराच्या कानात बोलणार्‍या अमिताभची नाही) बघून त्यावर बोलायचे पण तेच स्वर्गसुखासाठी आत्मघातकी पथके काढणार्‍यांवर बोलायचे नाही की मिशनर्‍यांच्या बाबतीत बोलायचे नाही. माझा आक्षेप केवळ या अप्रामाणिकपणावर आहे.

अंनिसवर हा आक्षेप नेहमी घेतला जातो. भारतात ८० टक्के लोक हिंदुच आहेत. अंनिसतील बहुसंख्य लोक हिंदुच आहेत ( ते जरी स्वतःला निधर्मी समजत असले तरी जग त्यांना हिंदुच म्हणतात)त्यामुळे साहजिकच आपण आपल्या घरातील घाण पहिल्यांदा साफ करायचा प्रयत्न करणार. इतर धर्मात लुडबुड करायला गेलो कि ते म्हणतात अगोदर स्वतःच्या घरातील बघा.{दाभोलकर हे साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत. त्यावेळी वाचकांनी इथे तुमचे अंधश्रद्धा भानगड नको असे ठणकाउन सांगितले होते. गेली आठ वर्षे साधनात अंधश्रद्धा हा विषय येत नाही. साधनाचे संपादक अखेर ब्राह्मणच का? असे देखील सवाल झाले. {"अंनिस वार्तापत्र हे वेगळे मासिक आहे दाभोलकर तिथे संपादक मंडळावर नाहीत} अंनिसचे काम इतर धर्मात तुलनात्मकदृष्ट्या यामुळेच कमी असणं स्वाभाविक आहे.
हिंदु धर्मात चार्वाकाला हि स्थान आहे. अंनिस नवीन काहीच सांगत नाही. अनेक संतांनी जे अगोदर सांगितले आहे तेच सांगतीये. ज्ञानेश्वर,तुकाराम, कबीर, गाडगेबाबा यांनी अंनिसच काम हलक केले आहे. हिंदु धर्म सहिष्णु आहे. निरिश्वरवादालाही तिथे मानाच स्थान आहे. कोणी एक संस्थापक नाही. व्हेटो काढल्यासारखा एक प्रमाण धर्मग्रंथ नाही. त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धांवर अधिक बोलले जाते. सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले तर अंनिस मवाळ वाटेल.
अंनिस ही खूप छोटी चळवळ आहे.आपण समजता तेव्हढी मोठी नाही. माध्यमांमुळे ती मोठी वाटते.
अवांतर- त्यात परत दाभोलकरांचा गट (महाराष्ट्र अंनिस) आणि शाम मानवांचा गट ( अखिल भारतिय अंनिस) अशी फाटाफूट आहे. का? विचारु नका

प्रकाश घाटपांडे

पटले

अंनिस ही खूप छोटी चळवळ आहे.आपण समजता तेव्हढी मोठी नाही. माध्यमांमुळे ती मोठी वाटते.

आपले हे विधान आणि बाकी सर्व प्रतिसाद पटण्याजोगाच आहे. माझा अंधश्रध्दानिर्मूलनाला किंवा अनिस सारख्या चळवळीला विरोध नाही, ते असण्याचे महत्व आहे. पण एकदा का स्वतःस निधर्मी म्हणल्यावर, इतर सर्वच (हिंदूसकट) परधर्मी होतात असे वाटते.बरं आपल्याच देशबांधवात आप्तस्वकीय आणि परकीय अशा चष्म्यातून बघणे अयोग्य वाटते. एकदा का प्रवाहाविरुद्ध पोहायचे ठरवले की त्यात अजून वेगवेगळे प्रवाह ठरवून एकाच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे हे बरोबर नाही असे वाटते इतकेच...

अवांतर- त्यात परत दाभोलकरांचा गट (महाराष्ट्र अंनिस) आणि शाम मानवांचा गट ( अखिल भारतिय अंनिस) अशी फाटाफूट आहे. का? विचारु नका

अशाफाटाफूटीचे कारण साधे आहे, ते स्वतःस निधर्मी समजत असले तरी ते हिंदूच आहेत!

आमचे मत !

मानवाने देवाची जशी निर्मिती केली तशी त्याने धर्माचीही निर्मिती केली असावी.देवाने धर्माची निर्मिती केली हे वाचलेले नाही मात्र त्याने वर्णव्यवस्थेची निर्मिती केल्याचे आमचे वाचनात आहे.आणि प्रत्येक काळात प्रबळ एका समुहाने श्रेष्ठांच्या एका धर्माची (जगण्याच्या एका रितीची)निर्मिती केली असावी आणि राहिलेल्यांनी आणखी कोणत्या तरी एका धर्माची आणि त्यातूनच पृथ्वीवर हजारो धर्म जन्माला आले असावेत बहुतेक धर्मात देव एक असेल परंतू अंश रुपाने अनेक अवतार घेतल्याचे आपणास दिसून येतात.देवाने धर्म निर्माण केला नसल्याने मानवाने त्याच्या सोयीच्या धर्माची निर्मिती केली त्याचबरोबर प्राणीमात्रांसाठी वेगळ्या धर्माची गरज नव्हती कारण तोही देवाचाच अंश होता. 'ममैवांशे जीवलोके जीवभुते सनातनः' (असा काहीतरी श्लोक आहे) विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता मिळणार नाही त्याचे विवेचन घाटपांडे साहेबांनी केलेच आहे.तेव्हा विश्वमान्यधर्म होऊ शकेल असा एखादा विचार होऊ शकतो का ? असा विचार कदाचित भविष्यकाळात होऊ शकतो असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्म

बरोबर्,
महाभारतात एक वचन आहे ....धर्मो रक्षति रक्षित :

धर्म नियम शाश्वत असुच शकत नाहीत

सर्वमान्य, चिरातन टिकणारा धर्म असुच शकणार नाही. धर्म ही कल्पना सापेक्ष आहे. त्याचे अक्ष बरेच आहेत. त्यापैकी महत्वाचे तीन

  1. समाज-समूह-राष्ट्र वगैरे
  2. काळ
  3. स्थळ-वातावरण वगैरे

या मधील एक जरी बदलला तर नियम बदलावे लागतात. उदाहरणार्थ सतीची प्रथा पूर्वी भारतात होती. त्या काळी स्त्री रक्षणाकरता योग्य होती. कालांतराने रक्षणाचे नवीन उपाय उपलब्ध झाले व ती प्रथा कालबाह्य झाली. अरबस्तानात रक्षणाकरता पुरुषाला ४ बायका करण्याची धर्माने परवानगी दिली. कारण युद्धात पुरुष मरत असत व स्त्रीयांचे प्रमाण पुरुषापेक्षा चौपट असावे. याचा अर्थ ही प्रथा जगभर सुरु करावी किंवा जगभराकरता योग्य आहे असे होऊच शकत नाही. फार झाले तर प्रत्येक राष्ट्राकरत एक धर्म होऊ शकतो. आणी असे अस्तित्त्वात आहे. देशाची घटना कायदे हाच त्या देशाचा धर्म. तरी पण तो शाश्वत होऊ शकत नाही. बंधुत्त्व हे धर्माचे मूळ तत्त्व आहे. ते शाश्वत आहे परंतु नियम कधीच शाश्वत नसतात. ते बदलावेच लागतात.

धर्म नियम

धर्म नियम हे त्रिकालाबाधित तत्त्वांवर आधारलेले असतात. ते सनातन म्हणजे शाश्वतच असतात. ते देशातीत, कालातीत आणि समाजातीत असतात.--वाचक्‍नवी

धर्म नियम हे त्रिकालाबाधित तत्त्वांवर आधारलेले असतात.

जर धर्म नियम हे त्रिकालाबाधित तत्त्वांवर आधारलेले असतील तर एखदा नियम घेऊन तो सर्व काळात, सर्व ठिकाणी व निदान पृथ्वीवरील सर्व समाजाना कसा लागु होतो ते पटवुन द्याल का? उदाहरण सतिप्रथा, शकाआहार, दिवसातुन तिन तीनदा स्नान, ओल्या वस्त्राने मंदिरात जाणे किंवा कोठलेही घ्या

धर्म आणि रूढी

सतिप्रथा, शकाआहार, दिवसातुन तिन तीनदा स्नान, ओल्या वस्त्राने मंदिरात जाणे यांचा धर्मनियमांशी काही संबंध नाही. धर्म म्हणजे उत्तम प्रकारे आयुष्य जगून मुक्तिप्रत जाणार्‍या मार्गावर पाळायची पथ्ये. एखाद्या मार्गात तीनदा स्‍नानच काय पण गरज पडल्यास दिवसभर पाण्यात बसून ध्यान करावे लागेल. --वाचक्‍नवी

 
^ वर