धर्म देवाने निर्माण केला काय?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?

आशा आहे कोणीना कोणी समाधानकारक माहिती देईल.

Comments

जनतेच्या मनावर धर्माचा अर्थ बिंबवा

विश्वातील सर्व कालीन धर्मांचे मूळ तत्त्व एकच आहे. म्हणूनच विश्वातील प्रत्त्येकाने मूलतत्त्ववादी असले पाहिजे. हे मूळ तत्त्व म्हणजे बंधुत्त्व. आपापसातील प्रेम एकी दुसर्‍याकरता काही चांगले करण्याची इच्छा.

व्यवहारात वापरण्याचे नियम सापेक्ष आहेत.

म्हणून एकाच नियमाचा सर्व ठिकाणी आग्रह धरु नका. मूलतत्त्ववादी व्हा परंतु, नियमाना धर्म मानुन अंधानुकरण करु नका.

हा अर्थ मला दिसतो. ज्याला दिसेल त्याने इतराना सांगावे पटवुन द्यावे.

धर्म देवाने निर्माण केला काय?

१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
धर्म म्हणजे सत् मार्गावर जाणे आणि दुस-यांना नेणे, श्रध्दा व भक्ति फ़क्त देवासमोर चार पैसे टाकुन गंध, फूले, अक्षता टाकण्यापुर्ति मर्यादित न ठेवता त्याचा काहीतरी कामात आपली विशिष्ठ अवगत कला/क्षमता वाहणे ह्याचे दुसरे नाव. आपले वेद, गीते मार्फत भगवंत हेच सांगतात. जगात धर्म बरेच असतील पण बहुतेक धर्म - चांगले वागा, ईतरांवर प्रेम करा, सगळ्यांना समान वागवा ईतपतच आणि स्वधर्मियांपर्यंतच मर्यादित ठेवतात, आपले पुर्वज हे सर्व आणि ईतरही बरेच गुणसम्पन्न होते. आपल्या संस्कृतितले सुवर्णकाळ, रामराज्य काय होते ते पहाण्यासाठी जसे शुध्द निर्मळ गंगाजळ पहाण्यासाठी हिमालयात जावे लागेल, तसे आपल्याला पुन्हा ईतिहासाची पाने खोलावी लागतिल. दैवी गुण म्हणायचे तर गीतेमधे भगवानांनी २६ दैवी गुण व सहा आसुरी/राक्षसी गुण सांगितले आहेत (१२ वा अध्याय).
२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
देव एकच आहे, सप्तर्षि, चौदा मनु, आदी देव यांत त्याचेच अंश आहेत, आपण सर्व त्यांचेच वंशज, तसेच सा-या सृष्टित त्याचाच विभूती दिसुन येतात (गीता- १२ वा अध्याय). आपल्याला धर्म काय ते खुद्द देवांनी गीतेतुन सांगितला आहे, ईतर धर्म त्यांचा प्रेशितांनी सांगितला असे मानतात. ऊदाहर्णार्थ- क्रिश्चन धर्म येशुने सांगितला असे मानतात, पण त्याला प्रसिध्दी सेंट निकोलासने आणली, मुस्लिम धर्मसुध्दा पैगंबराने सांगितला असे मानतात, पण प्रसिध्दी अनुयायांनी आणली.
३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
कारण मानवात सत् असत् विवेक बुध्दी क्षमता आहे, ईतर प्राणी आहार, निद्रा आणि मैथुन एवढेच जाणतात. जर आपण देवाने दिलेल्या बुध्दीचा फ़क्त या गोष्टिंकरता वापर केला, तर आपली गती त्याच मार्गावर राहील, उलट वर (१) मधे सांगितल्याप्रमाणे दैवी, सात्विक कार्याकरता वापरली व दैवी गुण आणण्यात प्रयत्नशिल राहिलो तर गती त्या (दैवी) मार्गावर राहील (गीता- १४ वा अध्याय). हा मार्ग सोपा नाही. असे म्हणतात तुकाराम महाराजांना संत पदाची प्राप्ति होइपर्यंत आठ जन्म लागले होते, अधोगती येण्यास एक जन्म पण पुरतो.
४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
आपण फक्त सजीवांचा विचार करुया. धर्म एकच आहे - जो सत् मार्गाला नेतो तो. आज धर्म शब्द इतका गढुळ झाला आहे की व्यापा-याचा, पुजा-यांचा, ईतकेच काय चोरांचा सुध्दा धर्म वेगळा वेगळा झाला आहे - तुम्ही म्हणाल काय चोरांचा सुध्दा धर्म असतो? हो - चोर सुध्दा दीन दुबळ्याची चोरी करणार नाही. तसेच, लोकांची व्यवसायाचा वेळेत आणि बाकी वेळेत धर्माची व्याख्या बदलते. उदाहरण - जो दुकानदार - बहेनजी ये साडी अच्छि नही लगी, ये देखो असे म्हणत १५ साडया काढुन दाखवतो, तोच एखाद्या बहेनजीला रस्त्यात लागली तर मदत करेलच असे नाही.
५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?
आजचे विज्ञान हे फ़क्त ज़ड़ विश्वापर्यंतच मर्यादित आहे, ईंग्रजित ज़ड़ला मँटर म्हणतात. जेव्हा ते एका - अत्ता जिवंत व पाच मिनीटात मरण पावलेल्या माणसात काय फ़रक आहे याचे पृथक्करण करू शकेल, तेव्हा ते प्रगत झाले म्हणता येईल, त्याचा मान्यते विषयी विचार करता येईल. आज आपल्याला माहित आहे ब्लडप्रेशर ईतके पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही, रक्तात ईतकिच साखर पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही. हे नियम बनवले कुणी? अशी काय शक्ती आहे, कि जी आपले शरीर चालवते, काहिही खाल्ले तरी लाल रक्त बनवते, त्या चेतना शक्तिलाच आपण आत्मा म्हणतो, जो पुन्हा देवाचाच अंश असतो.

धर्म देवाने निर्माण केला

देवबाप्पानं एवढी जगमाया ला जनम दिला त्याला धरम घडाया काय टैम लागीन भौ
मानसानं धरम बिघडीले भो काय सांगु तुम्हासनी महा है भो देवावर इस्वास.

१) तुम्ही जेला निसर्ग म्हणते ना तो महा देव हाये
२)ज्या दिशी तुम्च सायन्स रक्त बनायचा अन माणसाचा ज्यो जीव जातो त्या जीवाला अडीन त्या दिसापासून आपूनबी
इज्ञानेश्वराला हात जोडू .
३) सुर्य देव हाये ना त्याच्यामधी अन आपल्या धरतीमधी जे आंतर हायेना ते देवानं संबाळून हाये, त्यो जरशीक एक फुट बी मागं पुढं सरकला ना आपून खल्लास.
मी हाये देवभोळा माणूस मह्या मताला शिव्या घाला पण मह्या देवाले काय नका म्हणू बा !

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

मह्या मताला शिव्या घाला पण मह्या देवाले काय नका म्हणू बा !

अहो बाबूराव, तुमच्याच काय कोणाच्याही देवाला कोणी शिव्या देत नाही. संपूर्ण विश्वाच्या मालकाला शिव्या देण्याची हिम्मत कोणात आहे? जे आपणाला कोठलीही अपेक्षा न बाळगता मदत करतात ते सर्व देवच की हो.

शांत रहा काळजी करु नका.

फक्त पोराना शिकवा देवाच्या नांवावर कोणाला त्रास देऊ नका.

सती :-धर्मश्रद्धा ते अंधश्रद्धा

आज सतीच्या प्रथेचे धार्मिक समर्थन कुणि सूज्ञ करणार नाही. पण लॉर्ड बेंटिक्ट ने केलेला कायदा आणि राजा राममोहन रॉय व पं इश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम म्हणून ही प्रथा आटोक्यात आली. त्यावेळी काशीचे पंडीतांनी पिटीशन दाखल केले होते कि तुम्ही(इंग्रजांनी) राज्य करताना आमच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करणार नाही असे वचन दिले होते, त्यामुळे हा कायदा म्हणजे आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे. बेंटिक्ट ने त्याचा समर्थपणे प्रतिवाद केला होता. ही धार्मिक बाब नसून हत्या आहे.पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे धार्मिक शिक्षण घेतलेले पंडित होते. एकदा त्यांच्या आजीने (किंवा आईने) कुटुंबातल्या एका बालविधवेबाबत विचारले कि" अरे ईश्वर तू एवढा शिकला, या मुलीचा नवरा गेला यात तिचा काय दोष? जरा काही तुझ्या धर्मग्रंथात काही उपाय दिसतो का बघ." त्यानंतर त्यांची या गोष्टीकडे बघण्याची दृष्टीच बदलली. एकीकडे कायदा व प्रबोधन त्याला जोडीला अशा दुधारी हत्यारामुळे ही प्रथा आटोक्यात आली.
आपल्या आईच्या पुजेत बेंटीक्टचा शाळीग्राम होता. हे एका लेखकाने नमुद केले आहे(अधिक तपशिल आठवत नाही) श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते हे मात्र सर्वमान्य आहे.श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी हे इतक गुळगुळीत झालेले वाक्य आहे कि प्रत्येकजण ते वापरतो.पण प्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हनजे श्रद्धा.अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते. त्याचा आक्षेप हा निर्मुलन करण्याच्या पद्धतीवर असतो.खर तर श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? विधायक असणार्‍या श्रद्धेस आक्षेप अंनिस चा पण नाही. पण अशा श्रद्धेचा बुरखा पांघरुन त्या आड लपलेल्या विघातक श्रद्धांना सामोरे आणताना या श्रद्धाही दुखावल्या जातात. श्रद्धाळू लोकांपेक्षा लबाडलोकच त्याचे अधिक भांडवल करतात
प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन

अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते. त्याचा आक्षेप हा निर्मुलन करण्याच्या पद्धतीवर असतो.खर तर श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे? विधायक असणार्‍या श्रद्धेस आक्षेप अंनिस चा पण नाही. पण अशा श्रद्धेचा बुरखा पांघरुन त्या आड लपलेल्या विघातक श्रद्धांना सामोरे आणताना या श्रद्धाही दुखावल्या जातात. श्रद्धाळू लोकांपेक्षा लबाडलोकच त्याचे अधिक भांडवल करतात

आपला संपूर्ण प्रतिसाद पण त्यातही वरील परिच्छेदातील प्रत्येक वाक्य पटले.

आपल्या व्याखेप्रमाणे, (अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे हे सूज्ञास पटते.) मी स्वतःला सूज्ञ समजू शकेन अशी खात्री पटली! मला वाटते कुठलीही चळवळ ही समाजातील प्रस्थापितांच्या विरुद्ध असते, ती कालानुरूप (आणि बर्‍याच अर्थी त्या काळातील समाजाच्या गरजेप्रमाणे) होते. फक्त अशा चळवळीच्या नेतृत्वाने चळवळीचे ध्येय हे सर्वसमावेशक आणि देशाच्या हिताशी मिळतेजुळते असावे एव्हढेच वाटते. हा वेगळा विषय होऊ शकत असल्याने येथेच थांबतो.

धन्यवाद

वाचक्‍नवींचा आपल्या म्हणण्याला आक्षेप असु शकतो

वाचक्‍नवींच्या मते धर्मनियम त्रिकालाबाधित सत्य आहे. मला वाटते सत्य हेच सापेक्ष आहे. आज वाटलेले सत्य उद्या असत्यही होऊ शकते. म्हणून तर निरंतर संशोधन चालू आहे व चालत राहणार.

बेंटिंकाचार्य?

बेंटिक्ट ने त्याचा समर्थपणे प्रतिवाद केला होता. ही धार्मिक बाब नसून हत्या आहे.

हिंदू धार्मिक बाबींचे फतवे काढायचा अधिकार बेंटिकला का? "ही धार्मिक बाब हत्यासुद्धा असल्यामुळे तिच्यावर मी बंदी घालतो" असे तो म्हणाला असेल असे मला वाटले होते.

मिपावर मला प्रवेश नाही म्हणून 'झाकिर नाईक' आणि upakram हे शब्द गूगलवर शोधले आणि या धाग्यावर पोहोचलो. धिंगाणा घालण्याचा मक्ता पूर्वी प्रतिपक्षाकडे होता असे दिसते.

अनेक शब्दांचे अर्थ स्पष्ट नाहीत

वर खूप लोकांनी समजुतदारपणे आणि समजून उत्तरे दिलेली आहेत. त्या मानाने माझे उत्तर म्हणजे घोर अज्ञानाचे प्रदर्शन.

"देव" "धर्म" आणि "विज्ञान" या शब्दांच्या वेगवेगळे लोक वेगवेगळ्या व्याख्या देतात. प्रश्न विचारणार्‍याच्या आणि उत्तर देणार्‍याच्या व्याख्या एकसारख्या नसतील तर संवाद साधला जात नाही.

इथे गंमत म्हणून काही उदाहरणे देत आहे.

ग्रंथ-प्रामाण्य मानणारे ख्रिस्ती (बहुतेक आधुनिक ख्रिस्ती ग्रंथ-आणि-अनुभव प्रमाण मानतात, त्यांची उत्तरे फार वेगळी असतील) :
देव - आकाशातला बाप
धर्म - देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता
विज्ञान - "प्रत्यक्ष अनुभव" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली

१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
उत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.

२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
देवाने प्रेषितांकरवी संदेश धाडून एकच धर्म निर्माण केला. बाबेलच्या मनोर्‍याचे बांधकाम होत असताना, मानवांचे गर्वहरण करण्यासाठी देवाने अनेक भाषा निर्माण केल्या. अन्य भाषकांना मूळच्या धर्माचे विस्मरण झाले असणार, म्हणून ते कुठलातरी विपरीत धर्म सांगतात. शिवाय, देवाचे विस्मरण झाले की लोक मूर्तिपूजा करू लागतात हीच माणसाची नीच प्रवृत्ती आहे. काही धर्म असे निर्माण झाले असणार. शिवाय काही दुष्ट माणसे केवळ दुष्टपणाने, किंवा लोकांना गंडवण्यसाठी खोटा धर्म सांगतात. असे हे सगळे धर्म निर्माण झाले. देवाने मात्र एकच धर्म निर्माण केला.

३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
होय, फक्त मानवासाठी. मानवेतरांमध्ये आत्मतत्त्व (soul) नाही, त्यांना धर्माचे बंधन नाही, आणि धर्मामुळे मिळणारे फायदेही नाहीत.

४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
मानवेतरांमध्ये आत्मतत्त्व (soul) नाही, त्यांना धर्माचे बंधन नाही, आणि धर्मामुळे मिळणारे फायदेही नाहीत.

५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?
"धर्म" म्हणवून घेण्यासाठी देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत दोन्ही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. विज्ञान फक्त प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो, आणि त्यातून देवाबद्दल माहिती मिळत नाही. म्हणून तो धर्म नाही.

आता हीच उत्तरे एखाद्या सगुणभक्तिमार्गाच्या उपासकाला (बहुसंख्य भारतीयांपैकी एक) विचारू :
देव - उपासनेस योग्य अशी व्यक्ती - हिचा वेदांत, पुराणात, वडीलधार्‍यांच्या शिकवणीत "देव" किंवा "देवी" असा उल्लेख असावा
धर्म - देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता (बहुसंख्य लोक "धारयति इति धर्मः" वगैरे अर्थ लावता देवधर्म या मराठी शब्दातील "धर्म" मानतील असे मला वाटते.)
विज्ञान - व्याख्या १: "प्रत्यक्ष अनुभव" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली.
विज्ञान - व्याख्या २: तंत्रज्ञान

उत्तरे बघू :
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
उत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.

२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
नाही, "बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात" हे खरे नाही. धर्म सनातन आहे(त). देवांनी ते निर्माण केले म्हणजे काय? देव अनेक आहेत, त्यांची कारणे वेगवेगळी असतील (वगैरे).

३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
"देवाने" विषयी वरचे तिसरे उत्तर बघावे. धर्म सगळ्यांसाठी असतात. गजेंद्रालाही विष्णूच्या पायी धावावे लागले. बहुतेककरून मानवेतर प्राणी पौराणिक देवांनाच मानतात असे आमच्या घरी आणि पुराणांत सांगितलेल्या कथांवरून वाटते. सर्व पुनर्जन्मांत मानवजन्म श्रेष्ठ असतो, म्हणून मानवाकडून धर्माचे आचार पाळण्याची जबाबदारी अधिक असते.

४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
का असावा? देव अनेक आहेत, प्रत्येकाचे आराध्यदैवत वेगळे असू शकेल.

५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?
व्याख्या १: "धर्म" म्हणवून घेण्यासाठी देवाबद्दल माहिती आणि समाजात वर्तणुकीची रीत दोन्ही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. विज्ञान फक्त प्रत्यक्ष अनुभवातून शिकतो, आणि त्यातून देवाबद्दल माहिती मिळत नाही. म्हणून तो धर्म नाही.
व्याख्या २: (तंत्रज्ञान) याचा धर्माशी काय संबंध? असलाच तर आयुधपूजेच्या दिवशी लॅपटॉपचीही पूजा केली पाहिजे, इतपतच. काय वाटेल ते प्रश्न काय विचारता?

आता हीच उत्तरे एखाद्या निर्गुणभक्तिमार्गाच्या उपासकाला (वेदांती स्वामींपैकी बरेच लोक या विचारपंथातली प्रवचने देतात) विचारू :
देव - 'ब्रह्म' असा उपनिषदात उल्लेख असलेले एक सर्वव्यापी अनादी तत्त्व
धर्म - समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता ("धारयति इति धर्मः" वगैरे )
विज्ञान - व्याख्या १: "प्रत्यक्ष अनुभव" हेच एक प्रमाण मानणारी विचारप्रणाली.
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
उत्तर : असतील बरेच. कितीका असेनात.

२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति । एकच सत्य विचारवंत वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. / अद्वैत मानल्यास हे जे काय चराचर दिसते, ते बहुधा मायेच्या भ्रमामुळे दिसते - अनेक धर्म दिसतात तो अनुभवभ्रम आहे. एक धर्मही अनुभवभ्रम असायची शक्यता आहे.

३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
आचारधर्माचा आणि आत्मज्ञानाचा काहीतरी संबध असावा असे वाटते. असेलच असे नाही. जन्ममरणाच्या व्यूहात सापडलेल्या जिवाला धर्माचे बंधन असतेच.

४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
याचा काय अर्थ? कुत्रा कुत्र्याच्या धर्माने वागेल, मुंगी मुंगीच्या धर्माने वागेल.

५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?
प्रत्यक्ष-अनुमान-उपमान (आणि खरेतर गुरूचा शब्द ही) या अन्वीक्षकीच्या प्रमाणांनी आत्मज्ञान मिळणे संभव नाही. त्यामुळे त्याचे ब्रह्माशी काही देणेघेणे नाही. असलेच तर आमच्या अंतर्गत वादांत याचा थोडासा उपयोग करून घेऊ, पण अंतिम प्रमाण म्हणून नाही.
धर्म - "समाजात वर्तणुकीची रीत सांगणारी एकत्रित संहिता ("धारयति इति धर्मः" वगैरे )" या बाबतीत आधुनिक प्रत्यक्ष-प्रमाण-वादी लोक काही सांगत असतील तर सांगोत बापडे. पण ब्रह्माबद्दल चर्चा केलेल्या पुस्तकांत काही आचारसंहिता आणि कर्मकांडे असलेल्या ग्रंथांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. त्यांच्याबद्दल आम्हालाही नितांत आदर आहे. त्यामुळे आम्ही कुठली आचारसंहिता आणि कर्मकांडे पाळू (आणि सांगू) ते एक-एक करून बघावे लागेल.

असेच तक्ते वैदिक, बौद्ध (थेर), बौद्ध (महायान), जैन (सामान्य माणूस), जैन (मुनी), मुसलमान, असे विचारून करता येतील. प्रत्येकातील ग्रंथ-प्रामाण्यवादी आणि ग्रंथ/अनुभव-प्रामाण्यवादी पंथांना विचारली पाहिजे. "देव", "धर्म", आणि "विज्ञान" याचे बहुतेक वेगवेगळे अर्थ मानल्याने उत्तरे अफाट वेगळी आणि विसंगत (ऍपल्स अँड ऑरेन्जेस) निघतील.

म्हणून मला असे वाटते, की शब्दांचे अर्थ वेगळे असले तर उत्तरांनी प्रश्नकर्त्याचे समाधान होणार नाही.

माझे व्यक्तिगत मत काय? आम्ही काय "सर्वधर्मसन्मान" युगात वाढलो. त्या सगळ्यांचे (खूपशांचे) जिथे एकमत होईल, तीच व्याख्या मानून घेईन. आईवडलांना विशेष मान द्यायचा म्हटला तर सगुण आणि निर्गुण दोन्ही खरे असे माझे वडीलधारे म्हणतात. त्यामुळे सध्या या "देव" "धर्म" शब्दांचा अर्थ मला गूढ आहे.

वैज्ञानिक असल्यामुळे "विज्ञान" या शब्दाचा कामचलाऊ अर्थ तरी मला माहिती आहे. पण तेवढ्याने तुमच्या कुठल्याच प्रश्नाचे मला उत्तर देता येणार नाही.

टीप : इथे "ख्रिस्ती", "सगुणभक्तिमार्गी" आणि "वेदांती" यांची टोकाची आणि व्यंगचित्रासारखी ढोबळ वर्णने दिली आहेत. त्यात अनेक बारकावे आले नाहीत, काही चुका झाल्या असणार. खर्‍या व्यक्ती याहून खूपच गुंतागुंतीच्या, आणि सौम्यही असणार. इथे यांपैकी कोणाचीच टर उडवणे हे उद्दिष्ट नव्हे. स्वतःचे कार्टून बघून जसे आपण छायाचित्राची अपेक्षा करत नाही, त्याच प्रकारे वाचकांपैकी "ख्रिस्ती", "सगुणभक्तिमार्गी" आणि "वेदांती" लोकांनी ही वर्णने अर्धवट रेखाचित्रे मानावीत.

छानच!

धनंजया!
वा!छानच रंगवली आहेत ही चित्रे.
आवडले.
लेखनाची शैली भारीये बॉ तुझी!

-गुंडोपंत

~जे बोललेले व लिहिलेले 'कळते' तो भाषेचा प्रकार शुद्धच असतो.
त्यामुळे शुद्धीचा फाजील आग्रह येथे धरू नये.~

छान पृथ्थकरण

आपल्या पृथ्थकरणाचा मला उपयोग होईल. डॉ. बिरुटे यानी म्हणल्याप्रमाणे चर्चेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. मी लवकरच आढावा घेणार आहे. आपल्या विचारांची त्या मध्ये मला खूप मदत होईल

माफ करा ! पण...

जनहितवादी साहेब,
धर्म देवाने निर्माण केला काय? या विषयीची चर्चा मला तरी वाटते समारोपाकडे जात आहे, पण आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळताहेत का ? का आपल्याला उगाच चर्चा लांबवायची आहे,आणि वरील प्रश्नांच्या संदर्भात या संपूर्ण चर्चेतून आपली काही मते तयार झाली आहेत काय ? ते जरा कळाले तर बरे होईल !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या विषयीची चर्चा मला तरी वाटते समारोपाकडे जात आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण हे मारुतीचे शेपुट आहे. किती लांबेल ते सांगता येणार नाही. मी याची पार्श्वभूमी सांगतो.

१९९९ साली मुंबई मध्ये विश्वबंधुत्व (आलमी भाईचारा) या वर डॉ. झाकीर नाईक, अध्यक्ष इस्लामिक संशोधन फौंडेशन यांचे भाषण ए. आय. एस क्यू. या संघटने तर्फे आयोजित केले होते. त्याना मी त्यांचे सीडी वरील भाषण ऐकुन ईमेल पाठवली.हे सर्व पहाण्यासाठी येथे टिचकी मारा मराटीतुन पहण्यासाठी येथे टिचकी मारा

डॉक्टर साहेबानी इस्लाम धर्म विश्वबंधुत्वाकरता कसा श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. माझ्यामते विश्वामध्ये कोठलाही धर्म इतर कोठल्याही धर्मापेक्षा ना श्रेष्ठ आहे ना कनिष्ठ. सर्व धर्मामध्ये मूळ विचार समुहाच्या बंधुत्वाचा आहे. त्या करता ज्ञानी लोकानी समुहातील सदस्यानी एकमेकाशी वागण्याचे नियम बनवले व त्यालाच आपण धर्म समजू लागलो. हे नियम बनवले व ते पाळले जाण्याकरता अफलातून युक्ती योजली. ती म्हणजे देवाला सर्वांच्या मनात वसवले. देवाबद्दल सर्वांच्या मनात आदर व भिती निर्माण केली. या आदरयुक्त भिती मुळे नियम पाळले जाण्याची शक्यता वाढवली. गैरवर्तनाकरता शिक्षा व सद्वर्तनाकरता बक्षीस. हे नियम सापेक्ष आहेत. बदलत्या परिस्थितीत बदलावे लागतात. जो धर्म हे मानतो तोच टिकून राहतो. वर दिलेल्या साखळीवर टिचकी मारल्यावर सविस्तर माहिती मिळेल.

जगातील बहुतेक अतिरेकी इस्लाम अपरिवर्तनिय आहे असे मानतात. त्या मुळे त्याना इसवीसन आठव्या शतकातील अरबस्तानातील स्थिती जगभर अनंत काळापर्यंत राहवी असे वाटते. या मागे इस्लामी तथा कथित धर्मगुरुंचे (धर्मिक मूलतत्ववाद्यांचे नव्हे) कारस्थान आहे. सर्वच धर्माच्या तथाकथित गुरुनी स्वार्थापोटी बंधुत्वाविरोधी गोष्टी जनतेच्या गळी उतरवल्या आहेत. जनतेनेही स्वार्थापोटी त्या मान्य केल्या आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर धर्म हेच ह्त्यार म्हणून वापरले पाहिजे.

डॉ. कलाम याना भारताचा विकास व्हावा असे मनोमन वाटले. त्यानी ओळखले की प्रौढाना उपदेश करुन परिणाम शून्यच होणार. म्हणून त्यानी राजकारण्याना, उद्योजकाना, व्यापार्‍याना, शासनातील सेवकाना उपदेश न करता शालेय विद्यार्थाना लक्ष बनवले. मला त्यांची युक्ती पटली म्हणून मी अतिरेक्याना लक्ष बनवण्याऐवजी सर्वसामान्याना बनवले. अतिरेक्यांच्या कारवाईची माहिती कोणाला ना कोणाला असते. ज्याला माहिती असते ते गप्प बसतात. त्याना वाटते की, जे होते ते चांगले आहे. तेंव्हा ही माहिती पोलिसापासून लपवलेली चांगली. विचार करा जी काही माहिती असेल ती योग्य स्थानी पोहचली तर अतिरेक्यांचे स्वप्न कसे साकारेल? संजय दत्तने काही अघटीत होण्याची शक्यता आहे एवढे जरी सांगितले असते तर १९९९३ मध्ये बाँबस्फोट कदचित झाले नसते. इतर कित्येक असतील ज्याना थोडी बहुत कुणकुण लागली असणारच. त्यानी संशय जरी योग्य टिकाणी व्यक्त केला असता तर अनर्थ टळू शकण्याची शक्यता होती ना? म्हणून मी ५ प्रश्न विचारले. प्रत्येकाने ते दुसर्‍याना विचारावेत. इस्लाम धर्मियाना आवश्य विचारावेत.

माझ्या प्रश्नांची उत्तरे मला सापडली ती अशी:-
१. धर्माच्या व्याख्येनुसार सर्व विश्वात फक्त एकच धर्म आहे व तो म्हणजे कोठल्याही समाजातील सदस्यातील आपआपसातील बंधुभाव. नियम सापेक्ष आहेत म्हणूनच ते वेगेवेगळे असतात व बदलत राहतात.
२. धर्म देवाने निर्माण केला नसुन मानवनिर्मितच आहे. देव एक असो अगर अनेक त्याने (त्यानी) धर्म निर्माणच केला नाही तेव्हा एकच धर्म का निर्माण केला नाही, याचे उत्तर शोधण्याची आवश्यकता नाही.
३. ४. व ५. एखादा धर्म अपौरुषेय असेल तर् तो विज्ञान धर्म होय. त्या धर्माचे मूलतत्व मला माहित नाही, त्याचे सर्व नियम माहित नाहीत, अज्ञात नियम किती हेही मल माहीत नाही. त्या बद्दल मला एवढेच माहित् आहे के ते नियम कसोशीने पाळले जातात. त्या मध्ये ना कोणाला माफी ना बक्षीस मिळते. या धर्मावर विश्वास ठेवला तर गीतेतील खालील वचन अर्थपूर्ण वाटते.

कर्मण्ये वाधिकारस्य| ना फलेषु कदाचन्|

चर्चा संपली असे मी म्हणू शकत नाही. आतापर्यंतच्या चर्चेचा हा आढावा असे म्हणता येईल. हा आढवा घेण्यात श्री धनंजय यांच्या पृथ्थकरणाचा मला उपयोग झाला. त्या बद्दल आभारी. तेव्हा डॉक्टर बिरुटे साहेब् तुम्हीच् ठरवा येथे थांबायचे का पुढे जायचे.

कर्मणि एव

कर्मण्ये वाधिकारस्य| ना फलेषु कदाचन्|

हे वचन खरे तर असे आहे -
कर्मणि एव अधिकारः ते मा फलेषु कदाचन॥
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥

बाकी , ही चर्चा अजून संपली आहे असे वाटत नाही. झाकिर नाईक यांचे काय उत्तर आले?

या चर्चेतून काही निष्पन्न होईल किंवा नाही कुणास ठावे? चर्चा करत रहाणे आपल्या हातात किंवा बोटात आहे. :)
प्रत्यक्ष भगवान म्हणतात :
तुझा अधिकार फक्त तुझ्या कर्मांवर आहे, त्यांच्या फलावर कदापि नाही. (भविष्यात कधीही नाही.)
त्यामुळे कर्मफलाची अपेक्षा ठेवू नकोस की तू अकर्माचा संगही करू नकोस. (निवांत बसून राहू नकोस.)
चू.भू.दे.घे.

हे वचन खरे तर असे आहे -

विसुनाना, सुधारल्याबद्दल धन्यवाद.
हो चर्चा चालत राहवी असेच वाटते. थांबणे हा जीवनधर्म नाही. मधुन मधुन आढावा घेणे मात्र आवश्यक आहे. इतर मुद्यावरही लिहावे.

लॉर्ड विल्यम कॅव्हेन्डिश बेंटिंक

सन १८३३ मध्ये भारताचा गवर्नर जनरल बनलेल्या लॉर्ड विल्यम कॅव्हेन्डिश बेंटिंकने सती ही धार्मिक बाब नसून हत्या आहे असा समर्थपणे प्रतिवाद केला होता. तरी अजूनही लोक सतीची प्रथा, आंघोळ करणे, निरमिष खाणे इत्यादी गोष्टी धार्मिक समजतात याचे आश्चर्य वाटते.--वाचक्‍नवी

बेंटिंक आणि रूप कंवर

१९८७ साली राजस्थानातल्या देवराला गावात रूप कंवर नावाच्या १८ वर्षांच्या मुलीचे तिच्या नवर्‍याच्या चितेवर दहन झाले. (१८ वर्षे, म्हणजे बालविधवाच, जवळजवळ!) त्यावेळी काही लोक या प्रथेच्या बाजूने बोलले होते. आणि बरेच लोक न बोलता त्या बाजूने होते, कारण त्या कारणाने राजस्थानात थोड्याफार दंगली, पोलीस बंदोबस्त, "सती मंदिर" बांधणे, वगैरे प्रकार झाल्याचे आठवते. १८३३ चा बेंटिंक/राय यांचा युक्तिवाद अजून न पटलेले लोक आहेत.

एकीकडे प्रचंड प्रगती आणि दुसरीकडे चिवट गतानुगतिकता यांतला अंतर्गत विरोध भारतीय समाजाला लीलया पचतो. याबद्दल कधीकधी अभिमान वाटतो (जुने ते सोने असते तेव्हा), आणि कधीकधी लाज वाटते (जुने ते जुनाट होते तेव्हा).

स्वामी - रमाबाई आणि सती

>>एकीकडे प्रचंड प्रगती आणि दुसरीकडे चिवट गतानुगतिकता यांतला अंतर्गत विरोध भारतीय समाजाला लीलया पचतो.

खरं बोललात बघा! पण त्यासाठी राजस्थानातील रुपकंवर गाठायला नको. रणजीत देसाईंच्या स्वामी कादंबरीत रमाबाई सती जातात ते वर्णन अनेकांना अगदी आवडून गेल्याचे वाचले आहे आणि किती मोठी साध्वी अशा शब्दांतली वाहवा आजही ऐकू येईल.

अनिस व अंधश्रद्धा

मी म्हणतो, अनिस ने कोणाला सांगावे हे प्रश्न चे उत्तर कसे होऊ शकते? मनुष्य ने संकट सुद्धा संधीच मानावे. जर कोणी दोष दाखवत असेल तर दोषावर उपाय करावा. हो दोष आहे हे सत्य कबुल करावे. दोष दूर करुन दाखवणार ला धन्यवाद देऊन आभार मानावे. असे केले तर सुधारणा होईल च. वर इतराना धडा मिळेल.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवले आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

दोषावर?

दोषावर चूक. दोषवर हवे. त्याने मला सांगितले/मला त्याने सांगितले--तो मी सांगितले.--नक्की कुणी कुणाला? आचार्य अत्रे शेजारीण गेले नि म्हणाले"मी तूचा नवरा तू आणि मीची बायको सिनेमा जाणे."(मी, तुझा नवरा, तू आणि माझी बायको सिनेमाला जाऊ.. ).--वाचक्‍नवी‌

धर्म देवाने निर्माण केला काय?

१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
धर्म म्हणजे सत् मार्गावर जाणे आणि दुस-यांना नेणे, श्रध्दा व भक्ति फ़क्त देवासमोर चार पैसे टाकुन गंध, फूले, अक्षता टाकण्यापुर्ति मर्यादित न ठेवता त्याचा काहीतरी कामात आपली विशिष्ठ अवगत कला/क्षमता वाहणे ह्याचे दुसरे नाव. आपले वेद, गीते मार्फत भगवंत हेच सांगतात. जगात धर्म बरेच असतील पण बहुतेक धर्म - चांगले वागा, ईतरांवर प्रेम करा, सगळ्यांना समान वागवा ईतपतच आणि स्वधर्मियांपर्यंतच मर्यादित ठेवतात, आपले पुर्वज हे सर्व आणि ईतरही बरेच गुणसम्पन्न होते. आपल्या संस्कृतितले सुवर्णकाळ, रामराज्य काय होते ते पहाण्यासाठी जसे शुध्द निर्मळ गंगाजळ पहाण्यासाठी हिमालयात जावे लागेल, तसे आपल्याला पुन्हा ईतिहासाची पाने खोलावी लागतिल. दैवी गुण म्हणायचे तर गीतेमधे भगवानांनी २६ दैवी गुण व सहा आसुरी/राक्षसी गुण सांगितले आहेत (१२ वा अध्याय).
२. बहुतेक धर्म देव एकच आहे असे मानतात. मग देवाने इतके धर्म का निर्माण केले?
देव एकच आहे, सप्तर्षि, चौदा मनु, आदी देव यांत त्याचेच अंश आहेत, आपण सर्व त्यांचेच वंशज, तसेच सा-या सृष्टित त्याचाच विभूती दिसुन येतात (गीता- १२ वा अध्याय). आपल्याला धर्म काय ते खुद्द देवांनी गीतेतुन सांगितला आहे, ईतर धर्म त्यांचा प्रेशितांनी सांगितला असे मानतात. ऊदाहर्णार्थ- क्रिश्चन धर्म येशुने सांगितला असे मानतात, पण त्याला प्रसिध्दी सेंट निकोलासने आणली, मुस्लिम धर्मसुध्दा पैगंबराने सांगितला असे मानतात, पण प्रसिध्दी अनुयायांनी आणली.
३. देवाने धर्म फक्त मानवासाठीच निर्माण केले काय? इतरासाठी का नाही?
कारण मानवात सत् असत् विवेक बुध्दी क्षमता आहे, ईतर प्राणी आहार, निद्रा आणि मैथुन एवढेच जाणतात. जर आपण देवाने दिलेल्या बुध्दीचा फ़क्त या गोष्टिंकरता वापर केला, तर आपली गती त्याच मार्गावर राहील, उलट वर (१) मधे सांगितल्याप्रमाणे दैवी, सात्विक कार्याकरता वापरली व दैवी गुण आणण्यात प्रयत्नशिल राहिलो तर गती त्या (दैवी) मार्गावर राहील (गीता- १४ वा अध्याय). हा मार्ग सोपा नाही. असे म्हणतात तुकाराम महाराजांना संत पदाची प्राप्ति होइपर्यंत आठ जन्म लागले होते, अधोगती येण्यास एक जन्म पण पुरतो.
४. विश्वातील सजीव, निर्जीव, ना सजीव ना निर्जीव या सर्वासाठी एकच धर्म का नाही?
आपण फक्त सजीवांचा विचार करुया. धर्म एकच आहे - जो सत् मार्गाला नेतो तो. आज धर्म शब्द इतका गढुळ झाला आहे की व्यापा-याचा, पुजा-यांचा, ईतकेच काय चोरांचा सुध्दा धर्म वेगळा वेगळा झाला आहे - तुम्ही म्हणाल काय चोरांचा सुध्दा धर्म असतो? हो - चोर सुध्दा दीन दुबळ्याची चोरी करणार नाही. तसेच, लोकांची व्यवसायाचा वेळेत आणि बाकी वेळेत धर्माची व्याख्या बदलते. उदाहरण - जो दुकानदार - बहेनजी ये साडी अच्छि नही लगी, ये देखो असे म्हणत १५ साडया काढुन दाखवतो, तोच एखाद्या बहेनजीला रस्त्यात लागली तर मदत करेलच असे नाही.
५. विज्ञानाला धर्म म्हणून मान्यता का नाही?
आजचे विज्ञान हे फ़क्त ज़ड़ विश्वापर्यंतच मर्यादित आहे, ईंग्रजित ज़ड़ला मँटर म्हणतात. जेव्हा ते एका - अत्ता जिवंत व पाच मिनीटात मरण पावलेल्या माणसात काय फ़रक आहे याचे पृथक्करण करू शकेल, तेव्हा ते प्रगत झाले म्हणता येईल, त्याचा मान्यते विषयी विचार करता येईल. आज आपल्याला माहित आहे ब्लडप्रेशर ईतके पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही, रक्तात ईतकिच साखर पाहिजे - जास्त नाही नी कमी नाही. हे नियम बनवले कुणी? अशी काय शक्ती आहे, कि जी आपले शरीर चालवते, काहिही खाल्ले तरी लाल रक्त बनवते, त्या चेतना शक्तिलाच आपण आत्मा म्हणतो, जो पुन्हा देवाचाच अंश असतो.

सुहास जोशी विश्लेषण बद्दल धन्यवाद.

विश्व मध्ये एक च धर्म आहे. जी वेग वेगळी नांवे दिसतात ती उपासना एकच नाही म्हणून. विज्ञान हा धर्म च आहे. नियम पूर्ण पणे माहीत नाहीत. कारण हे नियम कोणा व्यक्ती ने बनवले नाहीत. राम, कृष्ण हे देव आहेत. जो जन हित चे निस्वार्थ कार्य करतो तो देव च. हा अर्थ घेतला तर ३३ कोटी देव आहेत हे सिद्ध करणे सोपे आहे.

आज ची आवश्यकता आहे राष्ट्रधर्म मानणे व स्वीकारणे ची. उगीच आम चा ग्रंथ अमुक सांगतो म्हणून 'विवाह नोंदणी' करणार नाही असे वागणे ची नाही. नियम नेहमी सापेक्ष असतात. हे समजुन धर्म ग्रंथ वर बोट न ठेवता राष्ट्र नियम पाळावेत.

पुढील चर्चा नवीन नांव देऊन चालू केली होती. आता दिसत नाही. काय झाले कोणास ठाऊक.

प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.

मी ची अधिक ओळख येथे आहे.

सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला

दुष्कृति लोकांचा पुढील प्रकारे म्हणजे "माययापह्रतज्ञाना:" होय. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तिच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्रायः अत्यंत विव्दान म्हणजे मोठेमोठे त्तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात; परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते स्वता:च्या ओळखी साठी स्वता: नविन गोष्टी म्हणजे देव आणि धर्म ह्याच्या नावे समाज्या समोर नवनवीन कल्पना आणतात आणि देव आणि धर्माच्या नावाने या मायाजालात समाज्याला व सामाण्य माणसाला ओढतात व स्वता:चा उध्दार करुण घेतात यालाच...................

जनहितवादी , .डॉ.दिलीप बिरुटे, प्रकाश घाटपांडे, अनिरुद्ध दातार, गुंडोपंत , श्रीमान आपण माझ्या उत्त्तराचे उत्त्तर ध्याल ही अपेक्षा.

आपला विद्यार्थि संजीव

देव

देव हे आकाशातुन किंवा आपोआप प्रगट झालेले नाहीत तर त्या त्या काळातील ज्या लोकांनी त्यावेळेच्या अनिश्ट् गोश्टींविरुध्द् वागुन
समाजाला नवीन वागण्याची प्रेरणा दिली व स्वता तसेच् वागले त्या लोकांना देवत्व बहाल केले गेले. उदा. राम, त्यावेळेस असलेली
बहुपत्नित्वाची प्रथा या राजाने मोडली. व सीतेच्या जाण्यानंतरही तो एकटाच राहिला.हेच त्याचे वागणे त्याला देवत्व देउन गेले.
आपली पुराणे नीट वाचलीत तर देव व धर्म कसे अस्तित्वात आले हे लक्शात येते. मी जास्त काही लिहित नाही .
म्या पामराने जे वाचले आहे त्यावरुन हे मला समजले. अजुन काही माहिती मिळाल्यास म्या पामराला बरे वाटेल.
धन्यवाद
सदैव एका डोळ्याने जग नीट पहाणारा कावळा .

^ वर