डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!

डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.
लातुर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षणही इथेच झाले.पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने त्यांना डॉक्टर कसे होता आले ते त्यांच्याच शब्दात ऐकणे जास्त योग्य होईल.
त्यानंतर त्यांची दोन्ही मुत्रपिंडे निकामी होणे,त्यांच्याच आईने त्यांना एक मुत्रपिंड दान करणे आणि आता त्याच जोरावर आणि पुण्याईवर आयुष्यभर रुग्णांची सेवा करण्याचे व्रत अंगी बाणवणे हे सगळे अतिशय मनाला भिडणारे आहे. आजवर तात्यांनी एक लाखावर नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या आहेत.
त्याबद्दल सविस्तर इथे वाचा भाग १;
भाग २आणि भाग ३.

Comments

मोठ्या माणसाचा छोट्या माणसांशी झालेला संघर्ष

डॉ. तात्याराव लहाने यांची ओळख करून देणारा लेख लिहावा म्हणून म. टा. चे संकेतस्थळ शोधत असतानाच अज्ञानानंद यांचा हा लेख प्रसिद्ध झालेला पाहिला. अज्ञानानंदांचे आभार.
डॉ. लहाने यांनी लिहिलेला खालील परिच्छेद भारतीय मानसिकतेचा वेध घेण्यास पुरेसा आहे.

हळूहळू माझ्या शिबिरांना व नेत्रविभागात रुग्णांची संख्या वाढत चालली होती. १९८७ला एप्रिल महिन्यात पोहनेर या गावी शिबिर घेतलं. पोहनेर गाव गोदावरी नदीच्या काठावर आहे. रात्री पाऊस पडला. गोदावरीला पाणी आलं. सात रुग्णांनी पुराच्या पाण्यात पवित्र पाणी म्हणून डोळ्यावरील पट्ट्यांसहित स्नानं केली. मी पट्ट्या बदलण्यासाठी पोहचलो तर सात रुग्णांच्या पट्ट्या भिजून गेल्या होत्या. गडबडीने त्यांच्या पट्ट्या काढल्या. डोळ्यांत घाण पाणी जाऊन जंतूसंसर्ग झाला होता. मी त्या रुग्णांना अंबेजोगाईला आणलं. रात्रभर स्वतः औषधी टाकत बसलो. सकाळी हळूहळू त्यांना दिसायला लागलं.

१) अशा लोकांना अंधश्रद्ध म्हणणे हा "अंधश्रद्धा" या शब्दाचा अपमान आहे. मूर्ख, प्रवाहपतित व लबाड लोकं धर्माचा आधार घेऊन स्वतःचे व इतरांचे जीवन नरकवत करण्याचा प्रयत्न सतत करत असतात.

२) एक लाख लोकांच्या जीवनात अक्षरशः प्रकाश आणणाऱ्या या माणसाला शासनाचा कोणताही पुरस्कार मिळालेला दिसत नाही. ही शिबिरं हा त्यांच्या शासकीय नोकरीचा भाग नव्हता. आणि नोकरीचा भाग असला तरी तो कशा तऱ्हेने पार पाडायचा हे शासनाच्या सेवेत असलेल्यांना नीट माहीत असते. अब्दुल कलाम यांनी शासनाच्या सेवेत राहूनच खूप मोठे काम करून दाखवले. अशा लोकांचा समाजाने सन्मान करून त्यांना प्रकाशझोतात आणणे महत्त्वाचे आहे.

मोठ्या माणसाचा छोट्या माणसांशी झालेला संघर्ष असे नाव या लेखाला द्यायला हवे होते.

शंतनूजी आपल्याशी मी सहमत आहे!

१) अशा लोकांना अंधश्रद्ध म्हणणे हा "अंधश्रद्धा" या शब्दाचा अपमान आहे. मूर्ख, प्रवाहपतित व लबाड लोकं धर्माचा आधार घेऊन स्वतःचे व इतरांचे जीवन नरकवत करण्याचा प्रयत्न सतत करत असतात.

२) एक लाख लोकांच्या जीवनात अक्षरशः प्रकाश आणणाऱ्या या माणसाला शासनाचा कोणताही पुरस्कार मिळालेला दिसत नाही. ही शिबिरं हा त्यांच्या शासकीय नोकरीचा भाग नव्हता. आणि नोकरीचा भाग असला तरी तो कशा तऱ्हेने पार पाडायचा हे शासनाच्या सेवेत असलेल्यांना नीट माहीत असते. अब्दुल कलाम यांनी शासनाच्या सेवेत राहूनच खूप मोठे काम करून दाखवले. अशा लोकांचा समाजाने सन्मान करून त्यांना प्रकाशझोतात आणणे महत्त्वाचे आहे.

मोठ्या माणसाचा छोट्या माणसांशी झालेला संघर्ष असे नाव या लेखाला द्यायला हवे होते.

ही माणसे कुणी काही द्यावे म्हणून काम करत नाहीत आणि कुणी काही दिले/दिले नाही ह्याचीही क्षिती बाळगत नाहीत. एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होऊन ही माणसे झपाटल्यासारखी कामं करत असतात. ह्यांना पुरस्कार देणे म्हणजे ह्यांचा सन्मान नसून तो त्या पुरस्कारांचा सन्मान ठरतो. तेव्हा डॉ.तात्यासाहेबांच्या भाषेत सांगायचे तर 'रुग्णांची कृतज्ञता हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे'! भविष्यात डॉ.ना बरेच सन्मान मिळतीलही. मात्र त्यांच्या लेखी त्या सर्वांहून उच्च अशा 'कृतज्ञतेच्या'पुरस्काराने ते आजही सन्मानित आहेत हे केव्हांही जास्त महत्वाचे ठरते.

इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून

अशा लोकांचा समाजाने सन्मान करून त्यांना प्रकाशझोतात आणणे महत्त्वाचे आहे, ते इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून. असे मला म्हणायचे होते.

सहमत!

इतक्या मोठ्या व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
बाकी इतर मुद्यांशी सहमत आहेच. लेख वाचून खुपच काही आशादायक वाटून गेले...
इथे दुवा दिल्या बद्दल धन्यवाद!
आपला
गुंडोपंत

लाख सलाम..

तात्यासाहेबांना लाख सलाम!

तात्या.

तिन्ही लेख वाचले...

... आणि वाचायला इतके दिवस का लावले याची हळहळ वाटली.

"दिसायला लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमीच होत नव्हतं" या डॉ तात्यारावांच्या एका वाक्यात सारे सारे काही साठविले आहे असे वाटले.

अगदी अस्संच!

"...ही २७ वर्षांची विवाहित मुलगी तीन वर्षांपासून अंध व जन्मत: संपूर्ण बहिरी व हृदयरोगी होती. मी भूलतज्ञांना भूल देण्याची विनंती केली. पण हृदयरोगी असल्याचं कारण सांगून त्यांनी नकार दिला. अंध व बहिरी असल्याने तिला सांगायचं कसं असा प्रश्ान् मला पडला. तिला तिच्या सभोवतालाची कल्पना येणं शक्यच नव्हतं. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला व डोळ्यात भुलेचे थेंब टाकून फेको पद्धतीने तिचा मोतीबिंदू काढला. तिला सकाळी दिसायला लागलं. दिसायला लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमीच होत नव्हतं. "

-डोळ्यात पाणी आलं. हेच खरे आजचे पांडुरंग ! डॉ. लहानेंना कोटी - कोटी प्रणाम! (आणि म.टा. व अज्ञानानंद यांचे आभार)

डॉ.लहाने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री.अज्ञानानंद यांचा लेख आणि त्यात निर्देश केलेली तीन भागांतील मुलाखत वाचली. त्यातून डॉ.लहाने या महान व्यक्तीचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय झाला.उपक्रमावरील सर्व सदस्य आणि पाहुणे यांनी हा लेख आवर्जून वाचावा असाच आहे.समाजकार्यात सतत मग्न असलेल्या डॉ.लहाने यांच्या सारख्या व्यक्ती प्रसिद्धी पासून दूर राहातात.."डॉक्टर,
तुमच्यामुळे मला माझा पांडुरंग या जन्मात पुन्हा दिसला." असे त्या वारकर्‍याचे उद्गार डॊ.ना खरे समाधान देतात. पण श्री.शंतनु लिहितात त्याप्रमाणे अशा व्यक्तींचे सत्कार समाजाने घडवून आणले पाहिजेत.त्यामुळे इतरांना समाजसेवेची प्रेरणा मिळू शकते.हे खरेच आहे.(काही घडले की कॅमेरे घेऊन धावणारे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची ओळख सर्व जनतेला का करून देत नाहीत? )
म.टा. मधील डॉ.लहाने यांची मुलाखत सहजसुंदर अकृत्रिम भाषेत आहे. एवढे कार्य करूनही शेतीविषयीची त्यांची आंतरिक ओढ कायम आहे. हॉस्पिटच्या आवारातील जागेत ते सूर्य फुलांची शेती करतात हे वाचून मी भारावून गेलो.
श्री.अज्ञानानंद यांचे मनःपूर्वक आभार.

लेख

हा लेख आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिसादात लिहीलेली लेखातली वाक्ये डोळे पाणावून गेली.

 
^ वर