एका नोबेलविजेत्या शास्त्रज्ञाची 'लुडबूड': ज्योतिषशास्त्र हे थोतांड, होमिओपॅथी श्रद्धेवर आधारित

आजच्या 'मटा'त खालील बातमी वाचली:

ज्योतिषशास्त्र हे थोतांड असल्याचे परखड मत नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. प्राचीन अरब जगतातील किमयागारीलाही त्यांनी थोतांड असे म्हटले आहे. त्याचबरोबर होमिओपॅथी ही उपचारपद्धती शास्त्रावर नव्हे तर श्रद्धेवर आधारित असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

'पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी या संकल्पना पूर्णपणे निराधार असून, त्याला कोणताही शास्त्रीय आधार आणि अर्थ नाही. उर्जा शब्दाची योग्य व्याख्या फक्त विज्ञानानेच केली आहे,' अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एस. व्ही. नरसिंहन यांच्या स्मरणार्थ भारतीय विद्या भवनने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.

ज्योतिषाला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही भारतात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना ज्योतिषशास्त्राचाच आधार घेतला जातो, अशी खंत डॉ. रामकृष्णन यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'ज्याची सत्यता तपासली जात नाही किंवा टीकेला विज्ञानाधारे उत्तर देत नाही, अशा कोणत्याही गोष्टीला शास्त्र म्हणून आपण मान्यता देऊ शकत नाही.'

सरकारी कायदे जसे मनुष्याला वाईट कृत्य करण्यापासून रोखतात किंवा परावृत्त करतात, तसेच विज्ञानाचे आहे. वाईट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्यापासून विज्ञान आपल्याला रोखते, असे त्यांनी स्पष्ट केले.

होमिओपॅथीबाबत डॉ. रामकृष्णन हणाले, 'एड्स आणि कॅन्सरसारख्या रोगांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार होतात, असा दावा करण्यात येतो. त्यामुळे लोक योग्य उपचारांपासून दूर जातात. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचार पद्धती ही विज्ञानावर आधारित उपचारांपेक्षा कमी उपयुक्त असते किंवा निरूपयोगीच असते. योग्य उपचार काय आहेत, हे डॉक्टरच निश्चित करून औषधांचा गुण वाढवू शकतात.'

ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे आणि होमिओपॅथीलाही वैद्यक आधार नाही असे ठाम मत मांडून नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन ह्यांनी एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का? असे वाटत असल्यास ही 'लुडबूड' कितपत योग्य किंवा अयोग्य आहे? वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या अशाप्रकारच्या लुडबुडींमुळे भावनेच्या आहारी गेलेल्या सामान्य माणसाच्या कटकटी, अडचणी, त्रास, दुःखे वाढणार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

चर्चा व्हावी. धन्यवाद.

Comments

नाही वाटत

वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या अशाप्रकारच्या लुडबुडींमुळे भावनेच्या आहारी गेलेल्या सामान्य माणसाच्या कटकटी, अडचणी, त्रास, दुःखे वाढणार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

असे अजिबात वाटत नाही. सामान्य माणुस कटकटी त्रास दु:खे यासाठी श्रद्धेचा आधार घेणारच. एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितले म्हणुन त्याच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडत नाही. जेव्हा या कारणासाठी सामान्य माणसाला व्यवहार्य व सक्षम असे वैज्ञानिक पर्याय उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार.
याच बातमीच्या शेजारी आजचा विचार या चौकटीत लिहिले आहे " आकाशस्थ तेजोगोल आणि पृथ्वीवरील मानवी मानवेतर जीवन यांच्या मधे एक प्रकारची संगती आहे, याचा मला पडताळा आला. म्हणून मला अनिच्छेने फलज्योतिषावर श्रद्धा ठेवणे भाग पडले."- सर आयझॅक न्यूटन
या पुर्वी उपक्रमावरील
५१) हे शास्त्र विज्ञानावर आधारित नाही तर वैज्ञानिकांनी त्याविरूद्ध ठोस भूमिका का घेतली नाही? हे ही वाचावे.

प्रकाश घाटपांडे

प्रो. जयंत नारळीकर यांचे मत

प्रो. जयंत नारळीकर यांचे फलजोतिषासंबंधीचे मत जाणून घेण्यासाठी....

वैज्ञानिक पर्याय?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

सामान्य माणुस कटकटी त्रास दु:खे यासाठी श्रद्धेचा आधार घेणारच. एखाद्या शास्त्रज्ञाने सांगितले म्हणुन त्याच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडत नाही. जेव्हा या कारणासाठी सामान्य माणसाला व्यवहार्य व सक्षम असे वैज्ञानिक पर्याय उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार.

असा विचार श्री.प्रकाश घाटपांडे यांनी मांडला आहे.इथे प्रकाश यांना काय अपेक्षित आहे?फलज्योतिषाच्या जागी वैज्ञानिकांनी कोणता सक्षम पर्याय द्यायचा? फलज्योतिष निरर्थक आहे,थोतांड आहे आकाशस्थ ग्रह-तारे पृथ्वीवरील माणसांचे जीवन नियंत्रित करू शकत नाहीत. असे वैज्ञानिकांनी अनेकदा जाहीर केले आहे.माणसांनी या संदर्भात आलेल्या अनुभवाचा विचार करावा.कॉमनसेन्स वापरावा.ज्योतिषाकडे जाऊन आपल्या समस्यांची सोडवणूक झाली आहे का? दु:खाचा परिहार झाला आहे का याचा विचार करावा.गतानुगतिक न होता स्वबुद्धी वापरावी.विज्ञान एवढेच सांगते. "त्या ज्योतिषांना काही कळत नाही.आमच्याकडे या.आम्ही तुम्हाला खरे भविष्य सांगू."असे वैज्ञानिकांनी म्हणायचे का?

पर्याय बहुविध

"त्या ज्योतिषांना काही कळत नाही.आमच्याकडे या.आम्ही तुम्हाला खरे भविष्य सांगू."असे वैज्ञानिकांनी म्हणायचे का?

त्या ऐवजी तुम्ही ज्या कारणासाठी ज्योतिषांकडे जाता ती कारणे आम्हाला सांगा आम्ही समुपदेशन वा मानसोपचाराद्वारे तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु एवढा दिलासा देण्याइतपत यंत्रणेची उपलब्धता असल्यास काही अंशी ज्योतिषाकडे जाण्याची मानसिकता कमी होण्यास मदत होईल. अंनिस त अशा प्रकारचे सेंटर कायम स्वरुपी असावे अशी सुचना आम्ही केली होती. परंतु ते कायम स्वरुपी राबवणे अत्यंत अवघड असल्याने ती अमलात येउ शकली नाही.

५७) मग ज्योतिषाकडे जाणाऱ्या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?
फलज्योतिषाकडे येणारे लोक विविध प्रकारचे असतात. कुणी हताश होवून येतो. कुणी मार्गदर्शनासाठी येतो. कुणी उत्सुकतेपोटी येतो. भविष्यात काय होण्याची शक्यता आहे या एकाच प्रश्नाचे उत्तराभोवती सर्व जण येवून ठेपतात. नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे. अपयश ही यशाची पायरी आहे.
सद्यस्थितीत विवाह जुळवण्याची पद्धत ही सदोष आहे. एकमेकाचे व्यक्तिमत्वाचा अंदाज न घेता केवळ पत्रिकेचा आधार घेणे हे तर्कशुद्ध नाही. विवाहाचे बाबतीत कुंडल्यांवरून निर्णय घेण्याच्या ऐवजी जर परिचयोत्तर विवाह ही संकल्पना स्विकारली तर एकमेकाला पूरक असे व्यक्तिमत्व जुळून विवाह यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढेल. सध्या काही सामाजिक संस्था असे वधूवर सूचक केंद्रे चालवतात. मेळावे आयोजित करतात. पुण्यात 'मिळून साऱ्या जणीं` ची साथ साथ ही एक अशीच संस्था आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी तडजोड ही बाब अत्यंत आवश्यक आहे. भविष्याविषयी उत्सुकता असणे स्वाभाविक असले तरी त्यासाठी फलज्योतिषाचा आधार घेवून त्यावर निर्णय घेणे हे संयुक्तिक नाही. फलज्योतिषाकडे वळण्याचे मूळ कारण तपासून पाहिले तर आपल्याला अदृष्टाची भीती व अज्ञाताविषयी वाटणारे गूढ हेच आहे. त्याला व्यवहारोपयोगी असे पर्याय दिले तर नक्कीच हा ओढा कमी होईल.
लहानपणापासून मनावर झालेल्या संस्कारांचे जोखड फेकून देणे अवघड असते. ज्योतिषांची भाकिते खरी ठरल्याच्या गोष्टी नेहमी कानावर पडत असतात. दोन-अडीच हजार वर्षांच्या या पुराण्या शास्त्राला एकदम बोगस कसे म्हणावे अशी धास्ती वाटते. पण जुना धोपटमार्ग सोडून नव्या वाटेने जायला जे धैर्य लागते ते सुशिक्षित लोकांनी दाखवावे, कारण त्यात समाजाचे हित आहे असे आम्हाला वाटते.

उधृत: ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद
प्रकाश घाटपांडे

उपयुक्त आणि व्यवहार्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे यांनी केलेला खुलासा अत्यांत समाधानकारक, उपयुक्त आणि व्यवहार्य आहे.अशी पुरेशी व्यवस्था झाली तर फलज्योतिषाच्या मागे लागणार्‍यांचे प्रमाण कमी होऊ शकेल. मात्र असा पर्याय उभा करण्याची जबाबदारी विज्ञानिकांची नाही.समाजसेवकांची,स्वयंसेवी संस्थांची आहे.

सहमत आहे

सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

अदृष्टाची भीती व अज्ञाताविषयी वाटणारे गूढ

उत्तम विश्लेषण.

आणखी एकः जिथे तर्क सम्पतो तिथे अशा गोष्टी सुरु होतात. तर्क शुद्ध विचार पाया प्रथमपासून लहानपणापासून भक्कम केल्यास या गोष्टी कमी होतील्, सम्पणे कठीण वाटते

लुडबूड

लुडबूड करणार्‍यांचा हेतू चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारांचा असू शकतो असे समजू. बर्‍याचदा एखाद्याला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात केलेली ढवळाढवळ नकोशी होते; त्रासदायक वाटते. अशी ढवळाढवळ वाईट हेतूने केलेली असेल तर एखाद्याच्या आयुष्याचे, संपत्तीचे, नात्यांत नुकसान होते परंतु चांगल्या हेतूने केलेली असेल तर बहुधा कायद्यानेही त्याला संरक्षण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे श्रद्धा-अंधश्रद्धा हेच एक उदाहरण घेतलेले नाही. जनरल स्टेटमेंट आहे.

वरील उदाहरणात जर कोणाचे नुकसान होत असेल तर ते होमिओपॅथ डॉक्टर, फार्मसी आणि संबंधित उद्योग, तसेच फलज्योतिषी वगैरे यांचे. ते "लुडबूड" असे म्हणण्याची शक्यता आहे.

व्यक्तिशः ज्योतिष किंवा होमिओपॅथीबद्दल आपले मत जाहीर प्रकट करणे किंवा लोकांना त्या विरोधात वळवणे ही मला लुडबूड वाटलेली नाही. डॉ. वेंकट रामकृष्णन यांना आपले मत मांडण्याची मुभा आहे. त्यांनी विज्ञानाची कास धरल्याने समाजात चालणारे थोतांड पाहून त्यांच्या भावना दुखावत असतील किंवा त्यांना त्रास होत असेल असेही मला वाटते.

माझे मत

'एड्स आणि कॅन्सरसारख्या रोगांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार होतात, असा दावा करण्यात येतो. त्यामुळे लोक योग्य उपचारांपासून दूर जातात.

एड्स आणि कॅन्सरचे माहित नाही पण माझ्या स्वतःच्या वडिलांना होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग किडनीच्या आजारात झालेला होता (आणि अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी त्यापुढे हात टेकले होते) हे मी स्वतः बघितलेले आहे. त्यामुळे होमिओपॅथी ही टाकाऊ आहे हे मत मी तरी मान्य करणार नाही.

श्रद्धा किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचार पद्धती ही विज्ञानावर आधारित उपचारांपेक्षा कमी उपयुक्त असते किंवा निरूपयोगीच असते.

यात subconscious mind या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटते. कोणतेही औषध कितपत उपयोगी आहे यासंबंधीचे प्रयोग करताना नेहमी दोन गटांवर प्रयोग केले जातात. एका गटातील लोकांना खरोखरचे औषध देतात तर दुसऱ्या गटातील लोकांना placebo देतात.आणि ज्यांना placebo देतात त्यांनाही अर्थातच "औषध" देत आहोत असेच सांगतात.आणि मग दोन गटांमधील लोक उपचारांना कसा प्रतिसाद देतात यावरून औषध कितपत उपयुक्त आहे यासंबंधीचे निष्कर्ष काढतात. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती.

आता placebo का देतात? कारण आपण औषध घेत आहोत या भावनेतून मनाला उभारी येते (subconscious mind) आणि त्यातून माणसाची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणावर तरी नक्कीच वाढते. तेव्हा औषधाची उपयुक्तता तपासताना दोन गटांवर प्रयोग करून हा placebo effect बाजूला केला जातो.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

यापुर्वी

या पुर्वी उपक्रमावर होमिओपॅथी वर अनेकदा चर्चा झालेली आहे. वानगी दाखल काही
http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड हा प्रमोद सहस्त्रबुद्धे यांचा लेख

http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो हे रिकामटेकडा यांचा लेख

http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी एक वैयक्तिक अनुभव हा आरागॊर्न यांचा लेख
प्रकाश घाटपांडे

भावना

श्री.धम्मकलाडू यानी या विषयांतर्गत मटाच्या बातमीआधारे डॉ.वेंकटरमण रामकृष्णन यांच्या त्या लेक्चरला "लुडबूड" चा जो टॅग दिला आहे [म.टा.ने नव्हे] तोच मुळी चुकीचा आहे असे मला वाटते. मान्य की बातमीत अनुवादकर्त्याने 'थोतांड' चे प्रयोजन केले आहे, पण मूळ इंग्रजीतील भाषणात त्यानी (डॉक्टरांनी) फलज्योतिष आणि किमयागिरी याना "fake disciplines" म्हटले आहे. 'फेक' चा अर्थ थोतांड होईल की बनवेगिरी होईल यावर खल होऊ शकतो. शिवाय जर त्यानी स्वतःहून एखाद्या वाहिनीला अशा संदर्भात स्वतंत्रपणे मुलाखात दिली असती तर ती एकवेळ "लुडबूड" मानली गेली असती, पण इथे तर एस. व्ही. नरसिंहन यांच्या स्मरणार्थ भारतीय विद्या भवनने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत डॉ.वेंकटरमण बोलत होते. अशा शास्त्रीय व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केलेल्या त्या त्या क्षेत्रातील नामवंतांनी आपण सादर करणार असलेल्या पेपरची प्रत आगावू संयोजकांना देणे बंधनकारक असते. संयोजन समिती त्यात प्रदर्शित झालेली मते ही संस्थेच्या मार्गदर्शक तत्वात बसू शकत नसल्यात तो पेपर 'रीजेक्ट' ही करू शकते. सबब डॉ.वेंकट यांचा पेपर जर वाचनासाठी मान्य झाला असेल (समितीवर त्यांच्या दर्जाचेच विद्वान असतात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही) तर मग त्यांच्या मताला 'लुडबूड' म्हणू नये. शेवटी ती मते एका नोबेल प्राईझ विनर व्यक्तीची आहे; अभ्यासू आहेत. त्यानी व्यक्त केलेल्या मताला विरोध करण्याचाही सर्वांना अधिकार आहे, आणि मला खात्री आहे की विद्या भवन व्याख्यानमालेच्या शेवटच्या सत्रात यावर निश्चितच उहापोह झाला असणार.

डॉक्टरांनी फलज्योतिषावर केलेल्या टीकेपेक्षा होमिओपथीवर टीका करताना जे मत मांडले आहे ~ "त्यामुळे लोक योग्य उपचारांपासून दूर जातात" याला माझी असहमती असेल. ज्याच्या घरातील प्रिय व्यक्तीला कॅन्सरने पिडले आहे त्या घरातील कर्ता माणूस ती व्यक्ती त्या जीवघेण्या व्याधीपासून वाचण्यासाठी काय काय करेल ते मी अनुभवले आहे. ज्यावेळी ऍलोपथी निष्प्रभ होते त्यावेळी कुणीतरी सुचवतेच की, "पाटील, मी काही उदाहरणे पाहिली आहेत जिथे होमिओपथीचा उपयोग पॉझिटिव्ह दिसला आहे. तुम्ही जरूर ट्राय करा." अशावेळी वेडापिसा झालेला 'पाटील' होमिओपथीच्या गल्लीत जाणारच. उद्या एका कुडमुड्या ज्योतिषाने "शिर्डीला जाऊन उपाशीपोटी एक दिवस बाबांची आराधना करा आणि तेथील प्रसाद पेशंटच्या तोंडात द्या" असे सांगितले तरी पाटील अशा गोष्टीवर विश्वास नसला तरी 'चला, उद्या कुणी असे म्हणायला नको की शिर्डीला न गेल्याने पेशंट दगावला' या भीतिपोटीही स्टॅण्डवर जाऊन त्या गावाची एस्.टी.पकडेलच. सांगायचा मुद्दा असा की, काही गोष्टी 'भावने'च्या भरातही केल्या जातात. पेशंटचे "जाणे" अटळ आहे हे माहीत असूनही लोक समोर येईल ते उपचार करत राहतात याचा अर्थ ते "वेडे" झालेत असे नव्हे तर कुणाच्याही दुव्याने का होईना, व्यक्ती राहावी असेच मनोमनी वाटत असते.

डॉ.वेंकट 'होमिओपथी' ने कॅन्सर बरा होऊ शकत नाही असे ठामपणे म्हणतात आणि मग असे असेल तर स्टीव्ह जॉबसारखी सार्‍या जगाला हवाहवीशी वाटणारी व्यक्ती ज्या कॅन्सरमुळे पडद्याआड होते तिच्यावर होमिओपथीचे नव्हे तर ऍलोपथीचेच उपचार होत होते.

शेवटी "आनंद" म्हणतो तेच खरे, "हम सब कठपुतलीयाँ है और हम सबकी दोरी वो उपरवालेकी हाथमे है |" ~ मग ज्योतिषशास्त्रावर/होमिओपथीवर विश्वास असला की नसला, इट् मेक्स् नो डिफरन्स्.

अशोक पाटील

औपरोधिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"वैज्ञानिकाने भावनेच्या क्षेत्रात लुडबुड केली असे तुम्हाला वाटते का?" असा प्रश्न श्री.धम्मकलाडू यांनी केला आहे तो उपरोधाने.ही लुडबूड नव्हेच याची त्यांना कल्पना आहे.इथे लुडबुड शब्दाचा संदर्भ श्री.आ.रा.यांच्या एका प्रतिसादाशी आहे. ध.ला.यांच्या लेखात लुडबुड शब्द गडद निळ्या रंगात आहे तिथून संदर्भाशी पोचता येते.तो संदर्भ वाचल्यावर गैरसमज दूर व्हावा.

लुडबुड

उपरोध माझ्या ध्यानी आला नाही. पण असो, माझ्या प्रतिसादातील त्या संदर्भातील वाक्ये वजा केली तरीही बाकीचे प्रतिपादन इथे जसेच्यातसे स्वीकारण्याला काही जड जाऊ नये.

अशोक पाटील

असहमत

पथी कुठलीही असो त्यातल्या उपायांच्या उपयुक्तते विषयी किती पुरावा उपलब्ध आहे ह्यावर त्या उपायांचे महत्व ठरावे. होमिओपथी हा प्रकार कैक वर्षे अस्तित्वात आहे तरी अजून एकही समाधानकारक शास्त्रीय पुरावा दिलेला नाही. ह्याउलट त्याचे दावे मात्र कैच्याकै आहेत. कॅन्सर बरा करणार्‍या किंवा रोग्याचा मृत्यू एका दिवसानेही टाळणार्‍या कुठल्याही पर्यायाची उपयुक्तता योग्य चिकित्सेद्वारे करणे शक्य आहे. होमिओपथीने खरंच कॅन्सर बरा होत असल्यास इतक्या महत्वाच्या उपयुक्ततेवर अजून एकही सायंटिफिक पेपर का बरे पब्लिश नाही झाला? असा प्रश्न प्रत्येकाने विचारुन पाहावा. अर्थात केवळ मनाला बरे वाटते म्हणून किंवा अमक्याने गुण आला सांगितले म्हणून साखरेचे पाणी पिण्यास काही हरकत नाही पण असे करताना ह्या महत्वाच्या मुद्याचे भान राहावे.

कोलित?

नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन ह्यांनी एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?

एकप्रकारे हो.

असे वाटत असल्यास ही 'लुडबूड' कितपत योग्य किंवा अयोग्य आहे?

व्हू केअर्स?

वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या अशाप्रकारच्या लुडबुडींमुळे भावनेच्या आहारी गेलेल्या सामान्य माणसाच्या कटकटी, अडचणी, त्रास, दुःखे वाढणार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

*रिबोसम दिले आहेस तेच दे, भाषणे कसली देतोस.

*त्यांच्या रिबोसम च्या शोधामुळे काही कटकटी, अडचणी, त्रास, दुःखे कमी होउ शकतिल.

नाही.

नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन ह्यांनी एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?

नाही.

असे वाटत असल्यास ही 'लुडबूड' कितपत योग्य किंवा अयोग्य आहे?

गैरलागू

वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांच्या अशाप्रकारच्या लुडबुडींमुळे भावनेच्या आहारी गेलेल्या सामान्य माणसाच्या कटकटी, अडचणी, त्रास, दुःखे वाढणार आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

गैरलाडू

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

लुडबूड आणि भावना

निळ्या रंगामध्ये दुसर्‍या एका लेखावरील ज्या प्रतिसादाचा दुवा दिलेला आहे, तिथे "तर्काची भावनेच्या क्षेत्रात लुडबूड" अशी शब्दरचना आहे. प्रस्तुत चर्चाप्रस्तावात एका "व्यक्ती"च्या, "भावनेच्या" क्षेत्रातील "लुडबुडी" विषयी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे वरती यनावाला म्हणतात त्याप्रमाणे हे उपरोधाने घेतलेले असेल, तर हा उपरोध अस्थानी आहे. शास्त्रज्ञ महाशयांनी ज्योतिष आणि होमिओपथी या विषयांवर भाष्य केलेले दिसते, कुणाच्या भावनांवर नाही. ज्या चर्चेचा दुवा चर्चाप्रस्तावक देताहेत, तिथे एका व्यक्तीच्या भावनांवर टिप्पणी होती.

उपरोध ही भावना असेल, तर भावनेच्या आहारी गेल्यामुळे हा शब्दप्रयोग झालेला असण्याची शक्यता आहे. उपरोध ही भावना नसेल, तर लुडबूड हा शब्दप्रयोग चर्चाप्रस्तावकांचा आहे असे म्हणावे लागते, आणि निळ्या रंगातील दुव्याचे प्रयोजन रहात नाही.

बाकी आपापली मते आहेत. या प्रसिद्ध शास्त्रज्ञमजकुरांनी आपले मत मांडले आहे झालं. (जसे वरती घाटपांडेंनी न्यूटन यांचेही यासंदर्भातील "मत" उद्धृत केलेले आहे.) या त्यांच्या मताला लुडबूड म्हणावे की कसे असा प्रश्न चर्चाप्रस्तावकांना का बरे पडला असावा?

नानावटीसाहेबांनी वरती जयंत नारळीकरांचे मत व्यक्त करणारा एक व्हिडीओ दिला आहे. सहज आठवण झाली, नारळीकरांच्याच एका वैज्ञानिक पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेवर त्यांनी "हे ईश्वरा, तुझीच वस्तू तुलाच समर्पित करतो" अशा आशयाचा श्लोक मांडलेला आठवतो. (त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये ... बहुदा, चूभूद्याघ्या).

अस्थानी नाही

त्या 'दुसर्‍या' लेखात यनावाला या व्यक्तीने साठे यांच्या भावनेच्या क्षेत्रात लुडबूड केली होती. यनावालांचे मते तार्किक असल्याचे प्रतिपादन यनावालांचे होते तद्वतच वेंकींचे मत तार्किक असल्याचे प्रतिपादनही वेंकी यांनी केले आहे (असेलच). त्यामुळे, उपरोध अस्थानी नाही.

उपरोध ही भावना असेल, तर भावनेच्या आहारी गेल्यामुळे हा शब्दप्रयोग झालेला असण्याची शक्यता आहे.

'तार्किकदृष्ट्या तोट्याची असणारी कृती करणे' हे भावनेच्या आहारी जाण्याचे लक्षण असते. उपरोध या कृतीने चर्चाप्रस्तावकांना आनंद ही भावना झाली असावी आणि 'आनंददायक आणि विनातोट्याची कृती' करण्यास भावनेच्या आहारी जाणे ठरविणे अयोग्य वाटते.
न्यूटन यांच्या मताला लुडबूडच म्हणावे लागेल.
नारळीकरांच्या भावनांनीही अनेकदा विज्ञानाच्या क्षेत्रात लुडबूड केलेली आहे.

शास्त्रज्ञ महाशयांनी ज्योतिष आणि होमिओपथी या विषयांवर भाष्य केलेले दिसते, कुणाच्या भावनांवर नाही.

होमिओपॅथीचे वापरकर्ते भोळसट असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे, होमिओपॅथीवर बंदी घालण्याची मागणी वरील बातमीत अध्याहृत आहे. भोळसट संबोधिले जाणे निश्चितच दु:खकारक असते. 'होमिओपॅथी उपयुक्त नाही' हे मत चूक असल्याचे क्लिंटन यांचे निरीक्षण आहे. तशी बंदी आल्यास क्लिंटन यांच्या (शिवाय, चंद्रशेखर, आरागॉर्न, इ. सदस्यांच्याही) भावना दुखावू शकतील.

बाल की खाल

त्या 'दुसर्‍या' लेखात यनावाला या व्यक्तीने साठे यांच्या भावनेच्या क्षेत्रात लुडबूड केली होती.

हे तुम्ही म्हणताय, मी नाही. मी पुन्हा सांगतो, "तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." अशी शब्दरचना आहे.

बाकी चर्चाप्रस्तावकांना आनंद ही भावना झाली असावी की कसे ते त्यांनाच माहीत, पण तुम्हाला आनंद झाल्याचे दिसते. मी त्याला कारण ठरलो असेन तर मलाही आनंद आहे.

तुमचे बाकीचे तर्कशास्त्र गैरलागू आहे.

?

हे तुम्ही म्हणताय, मी नाही. मी पुन्हा सांगतो, "तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." अशी शब्दरचना आहे.

'तर्काने' या शब्दात 'तर्क' हा कर्ता नसून (रामाने) करण (बाणाने) आहे.
स्वतःचे विधान तर्कसंगत असल्याचे प्रतिपादन यनावालांनीही केले आहे आणि वेंकट रामकृष्णन यांनीही. जर यनावालांच्या प्रतिपादनामुळे "यनावाला या व्यक्तीने भावनेच्या क्षेत्रात..." या वाक्याचा अर्थ तुम्ही "(यनावालांनी) तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा लावला तर वेंकट रामकृष्णन यांच्या प्रतिपादनामुळे धम्मकलाडूंनीही "वेंकट रामकृष्णन या व्यक्तीने भावनेच्या क्षेत्रात..." या वाक्याचा अर्थ "(वेंकट रामकृष्णन या व्यक्तीने) तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा लावला.

तुमचे बाकीचे तर्कशास्त्र गैरलागू आहे.

गैरलागू का? वेंकट रामकृष्णन यांनी कुणाच्या भावनांवर भाष्य केलेले नाही असे तुमचे प्रतिपादन आहे. त्यावर माझा प्रतिवाद असा की होमिओपॅथी उपयुक्त असल्याची अनेकांची भावना आहे, त्यांना भोळसट ठरविण्यात आलेले आहे.

सर्वज्ञानी

जर यनावालांच्या प्रतिपादनामुळे "यनावाला या व्यक्तीने भावनेच्या क्षेत्रात..." या वाक्याचा अर्थ तुम्ही "(यनावालांनी) तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा लावला तर वेंकट रामकृष्णन यांच्या प्रतिपादनामुळे धम्मकलाडूंनीही "वेंकट रामकृष्णन या व्यक्तीने भावनेच्या क्षेत्रात..." या वाक्याचा अर्थ "(वेंकट रामकृष्णन या व्यक्तीने) तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा लावला.

माझ्या तोंडात आपले शब्द घुसडून स्वतःचे तेच खरे म्हणण्याच्या भावनेच्या आहारी आपण गेलेले आहात. "यनावाला या व्यक्तीने भावनेच्या क्षेत्रात..." अशा कोणत्याही वाक्याचा (असे कोणते वाक्य कुठे असलेच, तरीही) मी कसलाही अर्थ लावलेला नाही. ते जे कंसातील पहिला कर्ता वगैरे प्रकरण आहे ती तुमची निर्मीती आहे. तुमच्या मनातील आहे. जे जसे आहे तसे न पाहता स्वतःच्या भावनांचे आरोपण आपण करत आहात. धम्मकलाडूंनी कशाचा अर्थ काय लावला ते त्यांनाच माहीत. तुम्ही अगदी निश्चितीने त्यांनी लावलेले अर्थ, त्यांना झालेल्या भावना वगैरे सांगताय, एवढेच नाही तर मी कशाचा काय अर्थ लावला, आणि मला काय वाटते हेही मला सांगताय! हे तर्काच्या आधारे, की भावनेच्या आधारे?

मुद्दा उपरोधाचा आहे. उपरोध अस्थानी असल्याचे माझे प्रतिपादन आहे. त्यामुळे तुमचे बाकीचे तर्कटी इमले गैरलागू होतात.

मूर्तिमंत तर्क?

तर्क हे भाववाचक नाम आहे, ते कसे लुडबूड करेल? यनावालांच्या लेखावर "तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा प्रतिसाद देताना "यनावाला साक्षात पर्सनीफाईड तर्क आहेत" असे तुम्ही गृहीत धरले आहे काय? (अन्यथा त्या लेखावरील प्रतिसादात ते विधान अस्थानी ठरेल.) त्यामुळे, उपरोध अस्थानी कसा ते अजूनही स्पष्ट नाही.
"नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन ह्यांनी एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?" या प्रश्नाऐवजी "तर्काने एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?" असा प्रश्न धम्मकलाडू यांनी विचारला तर तो उपरोध सयुक्तिक ठरेल काय?

उपरोध

तर्क हे भाववाचक नाम आहे, ते कसे लुडबूड करेल? यनावालांच्या लेखावर "तर्काने भावनेच्या क्षेत्रात..." असा प्रतिसाद देताना "यनावाला साक्षात पर्सनीफाईड तर्क आहेत" असे तुम्ही गृहीत धरले आहे काय? (अन्यथा त्या लेखावरील प्रतिसादात ते विधान अस्थानी ठरेल.) त्यामुळे, उपरोध अस्थानी कसा ते अजूनही स्पष्ट नाही.

व्याकरणाची चर्चा आपण खरडवहीत करुयात.

"नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. वेंकट रामकृष्णन ह्यांनी एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?" या प्रश्नाऐवजी "तर्काने एकाप्रकारे भावनेच्या क्षेत्रात 'लुडबूड' केली आहे असे तुम्हाला वाटते का?" असा प्रश्न धम्मकलाडू यांनी विचारला तर तो उपरोध सयुक्तिक ठरेल काय?

होय.

धन्यवाद

होय

ओ धम्मक, विचारा हो तसे!

पुन्हा लुडबुड

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मोरयाकृपा लेखातील संवादामुळे "तर्काने भावनेच्या क्षेत्रात लुडबुड केली असे कांहीजणांना वाटले.व्यावहारिक तारतम्य पाळून अपघातग्रस्त साठेनां शाब्दिक धीर दिला.मोरया कृपेची चर्चा शरीराने आणि मनाने सुस्थितीत असलेल्या दोन व्यक्तींत झाली.ती कांहींना भावनेच्या क्षेत्रात तर्काने केलेली लुडबुड वाटली.
सुधारककार गो.ग. आगरकर लिहितात,:"आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहाण्याचे धैर्य ज्याप्रमाणे एखाद्या दिवाळखोर कर्जबाजार्‍याला होत नाही त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकांस आपल्या समजुती बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.तसे केले तर त्या समजुतींची धडगत नाही अशी भीती त्यांना वाटते. " म्हणून आपले चालले आहे ते बरे आहे,त्यात कुणाची लुडबुड नको असा त्यांचा विचार असतो..

राहू द्या अंधारात

शास्त्रज्ञ महाशयांनी ज्योतिष आणि होमिओपथी या विषयांवर भाष्य केलेले दिसते, कुणाच्या भावनांवर नाही.

ज्योतिष आणि होमीपदी ही दोन्ही शास्त्रे आहेत अशी अनेकांची भावना आहे. चेन्नईसारख्या राहूकालावर अवलंबून असल्याल शहरात केलेल्या भाषणातून शास्त्रज्ञ महाशयांनी ज्योतिषावर विश्वास ठेवू नये आणि होमीपदी ह्या अवैज्ञानिक उपचारपद्धतीचा अवलंब करू नये असे त्यांनी सुचवले आहे. शास्त्रज्ञ महाशयांचा विषय रसायनशास्त्र आहे. त्यांनी त्यांचा विषय सोडून ह्या दोन्ही सुडोशास्त्रांवर भाष्य करणे ही तर लुडबूड आहे. असो. राहू द्या ना लोकांना अंधारात. त्यात परमसुख आहे. एवढ्या कटकटी, अडचणी असताना कशाला उगाच हा अखेरचा आसराही हिरावून घेत आहात? विज्ञानाने आणि तर्काने श्रद्धेच्या, भावनेच्या क्षेत्रात असे ट्रेसपास करणे चुकीचेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एक प्रश्न

शास्त्रज्ञ महाशयांची पदवी आणि नोबल पुरस्कार रसायनशास्त्राच्या एका छोट्या सबसेटमधे आहे. पण म्हणून त्यांनी फलज्योतिष आणि होमेपदी/होमीपदी/होमिओपथी यांचा अभ्यास केलेलाच नाही अशी काही माहिती चर्चाप्रस्तावक धम्मकलाडू यांना कुठून मिळाली?
रेडीओ ऍस्ट्र्ऑनॉमित पी.एचडी. पदवी मिळवलेली असली तरीही रेडीओ टेलिस्कोपबद्दल सामान्य भौतिकशास्त्र-विद्यार्थ्यांना असते त्यापेक्षा जास्त माहिती नसणारे काही लोकं माझ्या ओळखीचे आहेत. ते ज्या विषयांत काम करतात, नाव मिळवलेलं आहे त्या विषयात त्यांची पदवी नाही.

बरे

पण म्हणून त्यांनी फलज्योतिष आणि होमेपदी/होमीपदी/होमिओपथी यांचा अभ्यास केलेलाच नाही अशी काही माहिती चर्चाप्रस्तावक धम्मकलाडू यांना कुठून मिळाली?

त्यांनी फलज्योतिष आणि होमीपदीचा अभ्यास केलेला नाही असे धम्मकलाडू ह्यांनी प्रस्तावात किंवा प्रतिसादात कुठे म्हटले असल्यास सांगावे. पण त्यांचा अभ्यास असता तर मग त्यांनी ज्योतिषाला आणि होमीपदीला थोतांड का म्हटले असते असा प्रश्न पडू शकतो.

शास्त्रज्ञ महाशयांची पदवी आणि नोबल पुरस्कार रसायनशास्त्राच्या एका छोट्या सबसेटमधे आहे... ...रेडीओ ऍस्ट्र्ऑनॉमित पी.एचडी. पदवी मिळवलेली असली तरीही रेडीओ टेलिस्कोपबद्दल सामान्य भौतिकशास्त्र-विद्यार्थ्यांना असते त्यापेक्षा जास्त माहिती नसणारे काही लोकं माझ्या ओळखीचे आहेत. ते ज्या विषयांत काम करतात, नाव मिळवलेलं आहे त्या विषयात त्यांची पदवी नाही.

ह्या नव्या माहितीबद्दल आभारी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तार्किक विसंगती वाटते.

त्यांनी फलज्योतिष आणि होमीपदीचा अभ्यास केलेला नाही असे धम्मकलाडू ह्यांनी प्रस्तावात किंवा प्रतिसादात कुठे म्हटले असल्यास सांगावे. पण त्यांचा अभ्यास असता तर मग त्यांनी ज्योतिषाला आणि होमीपदीला थोतांड का म्हटले असते असा प्रश्न पडू शकतो.

"त्यांनी त्यांचा विषय सोडून ह्या दोन्ही सुडोशास्त्रांवर भाष्य करणे ही तर लुडबूड आहे." हे वाक्य तुमचंच नाही का?
एखाद्या गोष्टीला, विषयाला थोतांड म्हणण्यासाठी त्या विषयाचा निदान काही अभ्यास करणं अपेक्षित असतं; तसा अभ्यास नसल्यास विधान करणार्‍याची आणि/किंवा विधानाची विश्वासार्हता धोक्यात येते. एखाद्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय त्यासंदर्भात माहिती कशी मिळणार? चूक (शुद्धलेखनाची, व्याकरणाची, तार्किक, सैद्धांतिक, इ.) दाखवण्यासाठी मुळात योग्य काय हे माहित असणं अपेक्षित आहे आणि मूळ विधान, विषय काय हे सुद्धा!

उपक्रमावरच तेव्हाचे रिटे आणि आत्ताचे निखिल जोशी यांनी होमेपदी थोतांड असण्यासंदर्भात लेख लिहीला आहे; तो लेख लिहीण्यासाठी त्यांनी अभ्यास केलेला नाही असं तुम्ही सूचित करत आहात का?

पदवी म्हणजेच अभ्यास आणि अभ्यास म्हणजेच पदवी असं विधान छातीठोकपणे मलातरी करता येत नाही.

धन्यवाद

"त्यांनी त्यांचा विषय सोडून ह्या दोन्ही सुडोशास्त्रांवर भाष्य करणे ही तर लुडबूड आहे." हे वाक्य तुमचंच नाही का?
एखाद्या गोष्टीला, विषयाला थोतांड म्हणण्यासाठी त्या विषयाचा निदान काही अभ्यास करणं अपेक्षित असतं; तसा अभ्यास नसल्यास विधान करणार्‍याची आणि/किंवा विधानाची विश्वासार्हता धोक्यात येते.

हो का! नव्याने कळाले.

एखाद्या विषयाचा अभ्यास केल्याशिवाय त्यासंदर्भात माहिती कशी मिळणार? चूक (शुद्धलेखनाची, व्याकरणाची, तार्किक, सैद्धांतिक, इ.) दाखवण्यासाठी मुळात योग्य काय हे माहित असणं अपेक्षित आहे आणि मूळ विधान, विषय काय हे सुद्धा!

अच्छा. ठीक. बरे. हेही नव्यानेच कळाले. पुन्हा धन्यवाद.

पदवी म्हणजेच अभ्यास आणि अभ्यास म्हणजेच पदवी असं विधान छातीठोकपणे मलातरी करता येत नाही.

भले शाब्बास.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मराठीत माहितीचे आदानप्रदान

उपक्रमावर मराठीत माहितीचे आदानप्रदान होते हे तुम्हाला माहित असेलच. मी फक्त त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहे.

छ्या!

छ्या! लेखकाला स्वतःच काय लिहिले आहे ते इतरांनी सांगितल्यावर (नव्याने) कळते वाटते ;)

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

अपूर्ण कार्य

शास्त्रज्ञ महोदय होमीपदी आणि फलज्योतिषावरच थांबले याचे सखेद आश्चर्य वाटते. अल्केमी थोतांड आहे हे बोलले, त्यासोबतच त्यांनी न्यूटन, पास्कल यासारख्या गोंधळलेल्या व्यक्तीमत्वांचे बुरखे फाडले असते तर विज्ञानाचा अभ्यास करणे आणि वैज्ञानिक विचारसरणी असणे हे एकच की वेगळे वेगळे यावर थोडा प्रकाश पडला असता. ही मंडळी जुन्या काळातली, जाऊ दे म्हणून त्यांनी सोडले असेल. पण त्यांनी आपली पुस्तके देव नावाच्या भ्रामक संकल्पनेला अर्पण करणार्‍या आधुनिक काळातील कन्फ्यूज्ड् वैज्ञानिकांना सोडले म्हणजे नवल आहे. कदाचित त्यांच्या कानावर गेले नसेल. पण गावोगाव उभी राहिलेली, उभी रहात असणारी देवळे, वाढत चाललेली बुवाबाजी, धर्म नावाच्या मुळातूनच भ्रामक आणि घातक कल्पनेच्या/ संस्थेच्या आधाराने केले जाणारे राजकारण, उभ्या राहणार्‍या विविध क्षेत्रांतील संस्था, या सर्वांमधून जोपासली जाणारी अंधश्रद्धा यावर मौन राखून थेट होमीपदी आणि ज्योतिषावरच हल्लाबोल चढवला याचे नाही म्हटले तरी आश्चर्य वाटते. देवळांसारख्या निरुपद्रवी वाटणार्‍या बाबीमधूनच चिघळलेल्या जखमेसारखे हे होमीपदी, फलज्योतिष, वास्तुशास्त्र इत्यादि भंपक प्रकार पुढे येतात. तेंव्हा मूळ कारण जे देव आणि धर्म, यांना त्यांनी कसे काय सोडले असावे बरे?

बापरे!!

१.एखाद्या विसंगतीवर बोट ठेवताना जगातील प्रत्येक विसंगतीवर टिप्पणी करणे आवश्यक आहे का?
२. होमिओपथी, फलजोतिष्य, वास्तुशास्त्र वगैरेचा देवाशी काय संबंध? देवावर श्रद्धा असणारा प्रत्येकजण ह्या गोष्टींना मानणाराच असतो का?
३. देव/धर्म ह्यातुन आलेली एखादी अंधश्रद्धा किंवा अनिष्ठ प्रथा ह्यावर प्रबोधनात्मक काही लिहिल्यास, ह्याचे मूळ कारण जे देव आणि धर्म, यांना त्यांनी कसे काय सोडले? असेच तुम्ही म्हणता का?
--

होमिओपथी/फलजोतिष्य वगैरे वरवरच्या गोष्टी आहेत 'देवावर टिका करणे' किंवा 'श्रद्धाळूंना दुखावणे' हा सूप्त हेतू ठेवुन रामकृष्ण ह्यांनी लिखाण केले आहे तुमचे म्हणणे आहे का?

आश्चर्य

१. विश्वासाचा जिथे प्रश्न येतो तिथे सिलेक्टिव्हली विसंगती दाखवायला हरकत नाही असे तुम्ही म्हणताय का? जगातील प्रत्येक विसंगती सोडा, श्रद्धा, अंधविश्वासाशी संबंधित गोष्टी त्यांच्या बोलण्याच्या ओघात यायला हव्या होत्या असे तुम्हाला वाटत नाही का?

२. देवावर श्रद्धा असणे, अर्थात देवाच्या अस्तित्वावर विश्वास असणे, आणि होमिओपथी, फलज्योतिष, वास्तुशास्त्र इत्यादि गोष्टी मानणे या भिन्न गोष्टी आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

--

३. देव/धर्म ह्यातुन आलेली एखादी अंधश्रद्धा किंवा अनिष्ठ प्रथा ह्यावर प्रबोधनात्मक काही लिहिल्यास, ह्याचे मूळ कारण जे देव आणि धर्म, यांना त्यांनी कसे काय सोडले? असेच तुम्ही म्हणता का?

देव/ धर्म ह्यातून आलेली एखादी अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा ह्यावर प्रबोधनात्मक काही लिहीताना, त्यांनी ज्याअर्थी देव आणि धर्म यांना सोडले, त्याअर्थी देव/ धर्म हे या अंधश्रद्धांचे मूळ कारण नव्हेत, आणि देव/ धर्म मानण्याचा व अंधश्रद्ध असण्याचा संबंध नाही असे रामकृष्ण यांना वाटत असावे, असे तुम्हाला सुचवायचे आहे काय?

--

होमिओपथी/फलजोतिष्य वगैरे वरवरच्या गोष्टी आहेत 'देवावर टिका करणे' किंवा 'श्रद्धाळूंना दुखावणे' हा सूप्त हेतू ठेवुन रामकृष्ण ह्यांनी लिखाण केले आहे तुमचे म्हणणे आहे का?

एका प्रकारच्या अंधविश्वासावर टीका करताना रामकृष्ण यांनी त्या अंधविश्वासाची नेमकी कारणे (त्यांच्या मते जी काही असतील ती) काय असावीत याचा उहापोह केला नसावा, आणि संबंधित व व्यापक अंधश्रद्धांबाबत त्यांनी मौन बाळगले असावे याबाबत मला वाटलेले नवल मी व्यक्त केले आहे. (त्यांनी असा उहापोह वगैरे करायला हवाच इत्यादि मी म्हणत नाही.) 

» 

होय भिन्न आहेत

देवावर श्रद्धा असणे, अर्थात देवाच्या अस्तित्वावर विश्वास असणे, आणि होमिओपथी, फलज्योतिष, वास्तुशास्त्र इत्यादि गोष्टी मानणे या भिन्न गोष्टी आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

हो पूर्णपणे भिन्न आहेत. देव ही संकल्पन अतिशय ऍबस्ट्रॅक्ट आणि फिलॉसॉफीकल आहे. देव म्हणजेच निसर्गातील नियम अश्या व्यापक विचारांपासून ते शेंदूर फासलेला दगड ह्यापैकी काहीही मानलेले पाहिले आहे. होमिओपथी, फलज्योतिष, वास्तुशास्त्र ह्यांचे असे नाही. त्यात कसलाहे ऍब्स्ट्रॅक्ट प्रकार नाही. जे आहे ते ठोस आहे. ह्याउलट अतिशय फ्लुइड अशा व्याख्येमुळे देव मानणारा चुकिचा हे दाखवणे अवघड किंबहुना अशक्य आहे पण होमिओपथी,फलज्योतिष, वास्तुशास्त्र इ. प्रमाण मानणारे चुकिचे आहेत हे दाखवता येणे शक्य आहे.

धन्यवाद

स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.

...ह्याउलट अतिशय फ्लुइड अशा व्याख्येमुळे देव मानणारा चुकिचा हे दाखवणे अवघड किंबहुना अशक्य आहे...

याचा आपल्याशी कधी पुढे चर्चेचा योग आला तर संदर्भ घेता येईल अशी आशा करतो.

हृदयविकाराला होमिओपथीची "बायपास"!

इच्छुकांनी या लेखावर अवश्य नजर फिरवावी.

डिस्क्लेमरः मी होमिओपॅथीवर श्रद्धा किंवा अश्रद्धा ठेवत नाही. मी होमिओपॅथीची वापरकर्ती किंवा गिर्‍हाईक नाही. फक्त दुवा देण्याचे काम केले आहे. :-) दुसर्‍या शब्दांत, लेख वाचून कोणाला धोपटाधोपटी करण्याची इच्छा झाल्यास मला लांब ठेवावे.

विनोदी

लेख विनोदी आहे. डॉ.उमाळकर ह्यांना संशोधन करायचे आहे ही चांगली गोष्ट आहे, ('डाटाबेस संशोधन' म्हणजे काय कळले नाही) पण संशोधनाआधीच होमिओपथीने हृदयरोग मूळापासून बरा होतो असा भक्कम दावा मांडून झाला आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कसोट्यांनुसार त्यांना खरंच संशोधन करायचे असल्यास डबलब्लाइंड रॅंडमाइज्ड प्लसिबो कंट्रोल्ड क्लिनिकल ट्रायल घ्यावी लागेल. ज्याचा निकाल येईपर्यंत लेखात लिहिलेले सगळे दावे मागे घ्यायची तयारी हवी. पण गंमत अशी आहे की हा लेख, 'होमिओपथीने हृदयरोगासारखा जुनाट बरा होतो' ह्या आवेशात लिहून झालेला आहे, शेवटी उगाच संशोधन वगैरे पुस्ती जोडुन सारवासारवी केली आहे.

आधी संशोधन- निरिक्षणे - शास्त्रिय नियतकालिकांमधे तज्ञांच्या चाचणीद्वारे प्रकाशन - निकाल सर्व-संमत- मासिकात सामान्यांसाठी लेख- असा योग्य क्रम हवा. इथे उलटे दिसत आहे.

खरे संशोधन कधी होईल असे मला वाटत नाही पण ह्या लेखाने उमाळकरांनी प्रॅक्टिस मात्र किमान तिप्पट होणार असे वाटत आहे.

प्रॅक्टिस?

त्यांनी गेल्या २० वर्षांत तब्बल ५००० हृद्रोग्यांवर हृद्यरुग्णांवर उपचार केले आहेत, म्हणजे, दिवसाला ... अं ... एक!
तिप्पट म्हणजे, दिवसाला तीन रुग्ण तपासणे आणि कापणे, त्यांना झेपेल काय?
बाकी, या दराने उपजीविका करण्यासाठी त्यांचा दर काय असावा बरे?

झेपेल

नुसत्या साबुदाण्याच्या गोळ्या द्यायला दिवसाला ३ काय १० पेशंटही पाहू/कापू शकतील.

का नाही?

>>तिप्पट म्हणजे, दिवसाला तीन रुग्ण तपासणे आणि कापणे, त्यांना झेपेल काय?

झेपेल कि, झेपत नाही असे वाटल्यास त्यांना त्यांचे औषध घेता येइल, लेखातिल त्यांच्या म्हणण्यानुसार औषधाने काही मिनिटात त्यांना आराम मिळेल व ते काम करु शकतिल.

जाहिरात

तो लेख डॉ. उमाळकरांची जाहिरातच वाटू शकते. ( लोकप्रभाचा खप किती आहे हेही बघायला हवे. ) पण मॉलिक्यूलर लेवलवर जाऊन उपचार करणाऱ्या उमाळकरांना खरे तर नोबेल पारितोषिकच मिळायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हेही

वेंकी यांचे हेही मत या चर्चेसंदर्भात महत्त्वाचे वाटले.
त्याशिवाय, आजच वेंकी यांची एक बातमी पुण्यात (बिबवेवाडी भागात) 'सकाळ'मध्ये वाचली. भोंदू विज्ञानाबाबत लोकांनी सावध राहिले पाहिजे, असा सूर त्यांनी एका भाषणात मांडला आहे. त्यासाठी, लार्ज हैड्रॉन कोलायडरच्या प्रयोगातून जे पुढे आले त्याचा दाखला देत, ते पाहता विज्ञान म्हणून सांगितले जाते त्याविषयीही सावध राहिले पाहिजे, असे (शब्दशः नव्हे) ते म्हणाल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. ही बातमी मात्र जालावर मिळू शकली नाही. 'सकाळ'च्या इ आवृत्तीतही ती दिसली नाही.

देव मानणे ही अंधश्रद्धा!

अनेक शास्त्रज्ञांची देव आणि धार्मिक व्यक्तींवर विश्वास (की श्रद्धा?) असते आणि तरीही ते विज्ञानालाही सत्य मानतात असे निदर्शनास आणून दिल्यावर डॉ रामकृष्णन म्हणाले की "आफ्रिकेतील टोळ्यांतील लोक पावसासाठी विधी करून नाचतात. नाचल्यामुळे पाऊस पडत नाही, ती एक अंधश्रद्धा आहे हे सर्वज्ञात आहे.".

अच्छा

अच्छा! हे अनेक शास्त्रज्ञ त्या टोळीतल्यासारखेच असतात तर. बहुदा वेंकी यांना तेच सांगायचे असावे. असो! :)
अर्थात, मुद्दा तो नाहीच. वेंकी यांचे विचारच मननीय आहेत, इतकाच मुद्दा आहे (कारण विज्ञानाविषयी आपले काही मतभेद नाहीतच. विज्ञानवादाविषयी माझी मते वेगळी आहेत, ती अर्थातच इथं लागू नाहीत).

लूडबूड

चांगला विषय निवडलात. मला यात लुडबुड वाटत नाही.

माझ्या फार्माकोलोजीच्या प्राध्यापकांनी एक सुंदर स्लाईड दाखविली होती. मध्ये पेशंट व एक बाजूला मॉडर्न मेडिसीन व दुसरीकडे होमेइओपथीचा डॉक्टर. 'मला वेगळे सोडा' कारण मला तुमचे कोणाचेच औषध नको. तो पेशंट मॉडर्न मेडिसीनवाल्याला म्हणतो: तुमच्या औषधाच्या साईड इफ्फेकट्स मुळे माझा घात होईल तर होमेइओपथीमध्ये औषध नसल्याने. अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी थोडे तथ्य आहेच. मॉडर्न मेडिसीनच्या औषधांच्या साईड इफ्फेकट्स वर उतारे शोधले गेले, शोधले जात् आहेत. संशोधानाचे सातत्य हा त्याचा मूलभूत गुण आहेच.

मॉडर्न मेडिसीनमध्ये प्लेसिबोचेही महत्व आहेच. प्लेसिबो म्हणजेच I please you. जेव्हा एखाद्या रुग्णाला औषधाची गरज नाही असे डॉक्टर म्हणतो तेव्हा तो रुग्ण औषध देणाऱ्या डॉक्टरच्या शोधात फिरत राहतो कारण त्याला स्वत:ला आजारपण आहे व औषध हवेच असे वाटत असते. होमेइओपथी प्लेसिबोच्या जवळ आहे असे मानणारे अनेक आहेत. त्यात औषध मात्रा कमी असल्यामुळे (negligible) हा दावा बरोबर वाटतो.

मागे एकदा या विषयावर सुंदर भाष्य वाचण्यात आले होते. होमेइओपथीचे कमी औषधी द्रव्य करत गेल्यास मात्रा वाढते हे फार्माकोलोजीच्या concept च्या विरुद्ध आहे. (जसे ज्या प्रमाणात साखरेचे प्रमाण कमी केल्यास गोडवा वाढत नाही वा रंगाचे मिश्रण विरळ केल्यास भिंती वरील रंग दात होणार नाही. तर मात्रा कमी केल्यावर गुण ज्यास्त कसा होऊ शकेल?). Acute आजारात होमिओपाथी वापरू नये हे नक्कीच.

महोदय,

प्लासिबोचे महत्व किती आहे, व आजकाल रोज दिल्या जाणार्‍या किति टक्के प्रिस्क्रिप्शन्स् मधे प्लासिबो लिहिली जातात, याचा काही डेटा आहे काय?

महोदय: प्लासिबोचे महत्व किती

सर्वच रोगान्च्या बाबतीत सारखाच परिणाम मिळत नाही. ३० ते ३३% पर्यन्त धरला जातो पण काही प्रकारात कमीही पाह्ण्यात आला आहे. रोज दिल्या जाणार्‍या औषधात किति टक्के प्रिस्क्रिप्शन्स् मधे प्लासिबो लिहिली जातात हे समजणे तसे कठीण वाटते कारण अशी माहिती सहसा प्रसिद्ध होत नाही. ट्रायल मध्ये मिळालेला डेटा हाच आधारभूत धरणे ठीक वाटते: http://medjournalwatch.blogspot.com/2007/07/placebo-effect-power-of-mind...

यावर एक वाक्य असे गमतीने सांगतात: मानसिक रुग्ण बऱ्याचादा हवेत किल्ले बांधतात व त्यांना औषध देणारे त्या किल्ल्यांचे (जणू) भाडे वसूल करतात. हे अर्थातच खरे नव्हे पण As Lighter moments of a difficult topic म्हणून धरावे.

३० ते ३३% परिणाम?

३० ते ३३% परिणाम?
म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे आपल्याला? मायोकार्डिअल् इन्फार्क्ट च्या पेशंटला प्लासेबो म्हणून काहि दिल्याचे ऐकिवात आहे काय आपल्याला? किंवा मलेरियासाठी म्हणुन? यांत तितका परिणाम दिसतो काय?

यावर एक वाक्य असे गमतीने सांगतात: मानसिक रुग्ण बऱ्याचादा हवेत किल्ले बांधतात व त्यांना औषध देणारे त्या किल्ल्यांचे (जणू) भाडे वसूल करतात. हे अर्थातच खरे नव्हे पण As Lighter moments of a difficult topic म्हणून धरावे.

मनोरुग्णांना उपचार म्हणून प्लासेबो देतात काय?
किंवा फक्त् मनोरुग्णांनाच प्लासेबोचा उपयोग होतो का?

ता.क.
आपण दिलेल्या लिंकचा आपण अभ्यास केला आहात का? व तिथे दिलेल्या पबमेडच्या लिंक्स मधे प्लासिबो हे प्लसिबो कंट्रोल्ड् ट्रायलसाठी वापरलए होते हे आपण पाहिलेत काय? याचा रोज दिल्या जाणार्‍या प्रिस्क्रिप्शन्स शी कसा संबंध जोडला जाऊ शकतो?

 
^ वर