सत्यसाई, संघ आणि लष्कर
सत्यसाईबाबा नावाचे चमत्कारी बाबा नुकतेच ह्या पृथ्वीतलावर होऊन गेले. काहींच्या मते हे बाबा फ्रॉड आहेत. तर काहींच्या ह्या बाबांनी आणि ह्या बाबांच्या ट्रस्टने आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांत भरीवसे समाजोपयोगी कार्य केल्याने त्यांचे 'सौ खून माफ' करायला हरकत नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची राष्ट्रवादी हिंदूंची संघटना भारतात १९२५ पासून कार्यरत आहे. ह्या संघटनेच्या परिवारात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघटना आहेत. महात्मा गांधींची हत्या आणि त्यानंतर झालेल्या अनेक दंगलींत, हिंसक घटनांत संघाचा आणि संघपरिवाराचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे अनेक आरोप आजवर होत आले आहेत. ह्यात तथ्य असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र असे असले तरी अनेकांना ही 'राष्ट्रवादी' संघटना भूकंप, युद्ध आणि इतर कठीण समयी सगळ्यात आधी धावून येते असे वाटते. आणि तसे ते निक्षून सांगतातही. त्यामुळे तिलाही 'सौ खून माफ' करायला हरकत नाही असेही त्यांना वाटते.
लष्करे तैयब्बा ही पाकिस्तान ह्या भारताच्या शेजारी देशातली संघटना आहे. भारताविरुद्ध आणि भारताच्या जमिनीवर झालेल्या असंख्य हिंसक दहशतवादी घटनांमागे लष्करे तैय्यबाचा हाथ असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानातही भूकंप आणि महापूर होतात तेव्हा ही इस्लामी संघटना हिंदुत्ववादी संघासारखीच लोकांना मदत करण्यात आघाडीवर असते. ह्या संघटनेच्या समर्थकांनीही लष्करे तैयब्बाचे 'सौ खून माफ' केलेले आहेत.
असो. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. पण विरुद्ध बाजूच्या उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि धार्मिक बाबांच्या ह्या 'चांगुलपणा'बद्दल तुम्हाला काय वाटते?
Comments
सीपीआय, सीपीआयएम, आणि सीपीआयएमेल (नक्षलवादी)
या अहिंसक पक्षांना वरील खूनखराबा करणार्या संघटनांच्या यादीतून वगळलेत हे योग्यच झाले.
धार्मिकता आणि धार्मिक कट्टरता
धार्मिकता आणि धार्मिक कट्टरता ह्यासाठी वरील संघटना नावाजलेल्या नाहीत. ह्या संघटनांचे, पक्षांचे इतर अनेक दोष असतील, किंबहुना आहेतच. पण ह्या संघटनांनी धर्मावरून आणि जातीवरून मुडदे पाडण्याचे काम केलेले नाही. किंबहुना धार्मिक कट्टरतेचा आणि जातीयवादाचा प्रखर विरोधच केला आहे.
सीपीआय, सीपीआयएम, आणि सीपीआयएमेल (नक्षलवादी) ह्या संघटनाबद्दल चर्चा करण्यासाठी वेगळा धागा काढावा, ही विनंती. तिथे तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला आवडेल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गैरसमज नकोत
माझा प्रतिसाद आपल्याला उपरोधिक वाटला हे बघून वाईट वाटले. तसा उद्देश नव्हता.
धार्मिकता आणि धार्मिक कट्टरता ह्यासाठी वरील संघटना नावाजलेल्या नाहीत.
अगदी अगदी!
ह्या संघटनांचे, पक्षांचे इतर अनेक दोष असतील, किंबहुना आहेतच.
टोकाची असहमती ! या संघटनांमध्ये दोष औषधालाही नाही. सावरकरांच्या भाषेत "जे जे उत्तम, उदात्त, मंगल, महन्मधुर ते ते" या संघटनांमध्ये भरलेले आहे.
पण ह्या संघटनांनी धर्मावरून आणि जातीवरून मुडदे पाडण्याचे काम केलेले नाही. किंबहुना धार्मिक कट्टरतेचा आणि जातीयवादाचा प्रखर विरोधच केला आहे.
धर्मा/जातीवरूनच काय कुठल्याही कारणावरून मुडदे पाडण्याचे काम त्यांनी केलेले नाही याबद्दल मला खात्री आहे. उगीच काही नतद्रष्ट मंडळी वावड्या पसरवून या महात्म्यांचे चारित्र्यहनन करतात. धार्मिक कट्टरता आणि जातीयवाद हे एकूण मानवतावादाला हानीकारक असल्याने त्यांनी प्रखर विरोध केला हे योग्यच झाले.
म्हणूनच सत्यसाई, संघ, लष्कर (ए तैय्यबा, भारताचे सैन्य नाही) ह्या यादीत वरील पक्षांची नावे घातली नाहीत हे योग्यच केलेत असे आधी लिहिले होते, त्याबदल (थोड्या उशीरानेच) अभिनंदन!
सीपीआय, सीपीआयएम, आणि सीपीआयएमेल (नक्षलवादी) ह्या संघटनाबद्दल चर्चा करण्यासाठी वेगळा धागा काढावा, ही विनंती. तिथे तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला आवडेल.
आपण आणि यनावाला एकापेक्षा एक अश्या लेखांची आतषबाजी करत असताना आम्ही मध्येच कशाला कडमडायचे? आणि असाही तुमच्यासारख्या सूर्यांसमोर आम्हा काजव्यांचा प्रकाश पडणार का?
असो. असेच लेख येऊ द्यात.
तुमचा गैरसमज
छे. मला तुमचा प्रतिसाद उपरोधिक वाटला नाही. तुमच्या प्रतिसादातून डाव्या संघटनांबद्दल बहुधा तुमचाच गैरसमज झाल्याचे मला वाटते आहे. तो दूर करण्याचा आणि डाव्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न केला. मला तुमचा प्रतिसाद उपरोधिक वाटल्याचे तुम्हाला वाटल्याचे बघून वाईट वाटले. तसे वाटून घेण्याचा माझा खरेच उद्देश नव्हता.
असे मला वाटत नाही. त्या डाव्यांच्या प्रॉपगॅन्ड्याला तुम्ही बळी पडलेले दिसता. अर्थातच गांधीहत्येत डाव्यांचा हात असल्यास माहीत नाही. बाबरी मशीद पाडण्याचे काम आणि गुजरातच्या दंगली डाव्यांनीच घडवल्याचे अद्याप तरी कुणी उघडकीस आणलेले नाही. २६/११ हे डाव्यांचे कारस्थान असल्याचेही कुणी सिद्ध केलेले नाही. हाफ़िज़ सईद आणि नरेंद्र मोदी हे मार्क्सिस्ट असल्याचाही कुणी पुरावा आजपावेतो दिलेला नाही.
तुम्हीच स्वतःच स्वतःला काजवे म्हणवून घेत आहात. हे योग्य आहे का? ते इतरांवर सोडा. तुम्ही फक्त अभ्यासपूर्ण विवेचन लिहावे, ही नम्र विनंती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धार्मिक कट्टरतेचा
पण ह्या संघटनांनी धर्मावरून आणि जातीवरून मुडदे पाडण्याचे काम केलेले नाही. किंबहुना धार्मिक कट्टरतेचा आणि जातीयवादाचा प्रखर विरोधच केला आहे.
केरळमध्ये कम्युनिस्ट् संघटना आणि संघ् यांच्यात् विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे असे ऐकून् आहे. आणि या दोघांनी परस्परांचे मुडदे पाडण्यात् कोणतीच् कसर् सोडलेली नाही असे ऐकले आहे. गावाबाहेर् विळ्याची खूण् असलेला झेंडा किंवा त्रिशूळ् असलेला झेंडा पाहून् मगच् दोन्ही बाजूचे कायकर्ते गावात् शिरण्याचे धाडस् करतात् असेही ऐकले आहे.
धार्मिक् कट्टरता डोक्यात् न ठेवता जर हत्या केली तर ती नक्कीच् पुरोगामी वॄत्ती झाली. तरी कम्युनिस्टांना धाग्यात् वगळले हे चांगलेच् झाले नाही का ?
अच्छा अच्छा
केरळात चड्डीवाल्यांचे काही विशेष अस्तित्व नाही. ते तिथे मारच खात असतात. पण तो मुद्दा नाही. तुम्ही चड्डीवाले आणि विळा कोयत्यावाल्यांतले गँगवार आणि धार्मिक कट्टरतेमुळे होणाऱ्या हिरव्या-भगव्या दंगली ह्यात सोयीनुसार गल्लत करत आहात. असो.
अच्छा अच्छा. कम्युनिष्टांच्या खुनशीपणावर काढा की वेगळा धागा. तुम्हाला कुणी मनाई केली आहे? आणि हुसैन ह्यांचा निधनांतर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी पुरोगामीपणाबाबत टीकाटिप्पणी करणे म्हणजे वारांगंनांनी पातिव्रत्याबाबत आणि मंगळागौरीच्या व्रताबाबत बोलण्यासारखे आहे. असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
त्रिवार निषेध.
असे लिहुन धम्मकलाडू ह्यांनी वारांगना भगिनींचा अपमान केला आहे. धम्मकलाडुंनी वारांगणा भगिनींची माफी मागायला हवी. निषेध. निषेध. त्रिवार निषेध.
(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)
पुरोगामीपणा
+१
अतिशय पटले,
हे वाचून मागे त्या धाग्यावरील प्रतिसादातील पाली-झुरळे यांची आठवण झाली.
सन्जोप राव = हुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत.
विसंगती
केरळात चड्डीवाल्यांचे काही विशेष अस्तित्व नाही. ते तिथे मारच खात असतात.
त्यांना मार् देणारे कम्युनिस्ट् तिथे अस्तित्वात् आहेत् म्हणून् ते मार् खातात्. ती हिंसा तुम्हाला मान्य आहे हे कसे ?
कम्युनिष्टांच्या खुनशीपणावर काढा की वेगळा धागा. तुम्हाला कुणी मनाई केली आहे?
एवडा राग कशाला यायला पायजेल्? मूळ् मुद्याला कशाला बगल् देता ? विसंगती मान्य् करा णा सरळ् सरळ्.
हुसैन ह्यांचा निधनानंतर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी पुरोगामीपणाबाबत टीकाटिप्पणी करणे म्हणजे वारांगंनांनी पातिव्रत्याबाबत आणि मंगळागौरीच्या व्रताबाबत बोलण्यासारखे आहे
एखाद्याच्या निधनानंतर् आनंद व्यक्त् केल्याने कोणी प्रतिगामी कसा काय् ठरतो ? तुम्हाला लादेनच्या निधनानंतर् आनंद् झाला की तुम्ही त्याला श्रद्धांजली वाहिली याबद्दल् विशेष् कुतूहल् आहे.
आणि वारांगनांबद्दल् तुम्ही जे लिहिले ते वाचून् एकंदरच् स्त्री जातीबद्दल् आपणास् फारसा आदर् नाही असे वाट्ले. असे करणे पुरोगामीत्वाच्या व्याख्येत् बसते काय् ? शिवाय् वारांगना पतिव्रता असू शकत् नाही आणि तिला मंगळागौरीचे व्रत् करण्याचा अधिकार् नाही हेही नव्यानेच् कळले. हे मोरल पोलिसिंग तुम्हाला कसे काय् चालते?
हंहं
आम्ही फक्त तथ्ये पुढे ठेवली आहेत. हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही.
हेहेहे. तुम्ही धागा काढा की नवा. तिथे वेगळी चर्चा करूया विसंगतीवर. तुम्हीच बगल देताहात.
हुसैनच्या निधनाने आनंदी होणाऱ्यांबाबत तीव्र भावना असल्या तरी वारागंनांची त्यांच्याशी तुलना करणे चुकीचे होते. वारांगनांचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नव्हता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मुटका
मुटका नावाची पोहताना मारायची एक उडी असते. फारशी आकर्षक नसते, पण ती मारल्यावर आजूबाजूला पाणी खूप उडते. प्रस्तुत चर्चाविषय तशा मुटक्यासारखा वाटतो. आशय तर उघड उघड परपुष्ट आहे.
सन्जोप राव
ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन रवाजों की दुनिया
ये दौलत के भूखे समाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है
खाद्यप्रकार
परपुष्टपासून आठवले की मुटका नावाचा खाद्यप्रकारही असतो. मुटके गव्हाच्या पिठापासून बनवतात आणि फार पौष्टिक असतात. ते जाऊ द्या. महत्त्वाचा विषय आहे. पौष्टिक चर्चा व्हायला हवी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सोयीचा चांगुलपणा
उजव्या विचारसरणीच्या संघटनांना लोककल्याणाची काही कामे करावी लागतात. त्यामुळे लोकांमध्ये या संघटनांविषयी आत्मीयताही निर्माण करता येते तसेच बेकार कार्यकर्त्यांच्या फौजेला काहीएक नैतिक समाधानही मिळते. या तथाकथित चांगुलपणाची किंमत दहशतवादी हल्ल्यांत किंवा गुजरातसारख्या दंगलींच्या रूपात समाजाला मोजावी लागते.
संबंधित अवांतर*: कॅथलिक धर्मगुरूंप्रमाणे अशा संघटनांच्या काही प्रचारकांकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असण्याची शक्यता आहे काय? (अशा संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांना मी ओळखतो आणि त्यांच्याशी मी अनेकदा असहमत असलो तरी त्यांच्या प्रामाणिकपणा/चारित्र्याविषयी संशय नाही. परंतु नुकत्याच एका शाळेतील मित्राशी झालेल्या संभाषणातून अशा प्रकारच्या शोषणाविषयी एक प्रसंग ऐकण्यात आला. हा प्रसंग अपवाद असल्यास मला वैयक्तिकरित्या आनंद होईल. इतरत्रही असा अनुभव किंवा घटना घडल्याचे कोणा उपक्रमीला माहीत असल्यास मात्र खरोखर वाईट वाटेल.)
अवांतर: चविष्ट मुटका
*भावना दुखावल्या जाऊ नयेत व चर्चा फक्त एकाच संघटनेबाबत होऊ नये म्हणून सदर प्रतिसाद संपादीत केला आहे.
संबंधित अवांतराशी संबंधित
संबंधित अवांतराशी संबंधित अवांतर: कॅथलिक प्रचारकांप्रमाणेच मदरशांतले मौलवींकडूनही असे लैंगिक शोषण घडत असते. दुवा १. दुवा २. अफगाणिस्तानांत आणि पठाणांत बच्चाबाजीचे चलन आहे. सत्यसाईबाबांवर अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धक्कादायक
या समस्येची व्यापकता पाहून धक्का बसला. पौर्वात्य देशांमध्ये असे काही घडल्यास त्याला वाचा फोडणेही कठीण होऊन बसते. त्यामुळे प्रत्यक्षपणे अशा किती घटना घडत असाव्यात याची कल्पनाच करता येत नाही.
बच्चाबाजी भारतातही मुघलकाळात प्रचलित असावी असे वाटते. कुठेतरी तमाशातील नाच्याचे पात्र यातूनच आले असे वाचल्याचे पूसटसे आठवते. अधिक माहिती.
संबंधित अवांतरः संघाला कमी लेखू नका
मजकूर संपादित केला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
?
आपण थेट नाव घेतले आहे आणि मग ऐकिवात आहे असे म्हटले आहे. काय समजावे?
नितिन थत्ते
?
"ऐकिवात आहे" असा शब्दप्रयोग करताना नावाचा उल्लेख टाळण्याचा प्रघात आहे काय?
समजलं नाही
अडचण समजली नाही. पेंडसे शाळेत कार्यरत असताना त्या शाळेत शिकणारे काहीजण परिचयाचे आहेत. त्यांच्याकडून ही वदंता समजली. म्हणजे ही ऐकीव माहिती आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
अडचण
कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. अर्थात त्या आरोपावरून खटला चालून सिद्ध वगैरे झालेले असेल तर हरकत नाही.
नितिन थत्ते
असेच काहीसे
असेच काहीसे. अर्थात अमेरिकेच्या भाषेत कुणी रजिस्टर्ड सेक्शुअल ऑफेंडर असल्यास हरकत नसावी.
अमेरिकेत आणि युरोपात अशी घटना घडून गेल्यावर अनेक वर्षांनी पीडित पुढे आले आहेत. आणि त्यांना न्यायही मिळाला आहे. भारतातही असे व्हायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शंका
'महाराष्ट्रातील/ पुण्यातील एका मान्यवर शाळेच्या संस्थापकांविषयी असेच ऐकिवात आहे' असा उल्लेख केल्यास कायदेशीर अडचण निर्माण होईल का?
होणार नाही असे वाटते
होणार नाही असे वाटते. पण सायबर नियम पुन्हा एकदा नीट वाचायला हवे. उपक्रमाचा सर्वर अमेरिकेत आहे. ज्यांच्या नावावर हे डोमेन आहे ते भारतात. दोन्ही गोष्टी अमेरिकन झाल्यास उत्तम :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धन्यवाद
ज्यांच्या नावावर हे डॉमेन आहे ते अमेरिकेत येण्याची शक्यता असल्यास उत्तम होईल.
हाहाहा
तुम्हीच घ्या की डोमेन नावावर करून :) आणि आम्हाला वाटले होते तुम्ही त्यांना अमेरिकेत बोलवाल. काय तुम्ही हळूच सलटले :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नक्कीच
देण्याची तयारी असल्यास ती जबाबदारी आनंदाने उचलण्यास तयार आहे.
दुसर्या एका नामवंत मराठी संकेतस्थळाच्या डॉमेनमालकांना तेथिल काही सदस्य वारंवार अमेरिकेत येण्याचे आमंत्रण देत असत, ते आठवले. ;)
आता आणखी पिडा
तेही सहर्ष तयार झाल्यास नवल नाही. आपण सगळे मिळून विचारू त्यांना.
आता आणखी पिडा बिचाऱ्यांना. असो. पण बोलणार नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरेरे
मी ऐकलेला प्रसंगही संघाशी संबंधित आहे.
चांगुलपणा हे 'चलन'
जो पर्यंत एखाद्या 'आपल्याला' गरज असताना मदत करतो व त्याचे आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तोटा झालेला समजेल असे वर्तन नसते तेव्हा त्याचे अस्विकारणीय वर्तन समोर आल्यावरही त्यांचे 'सौ खून माफ' करायला हरकत नाही अशी भावना उमटणे हा मानवी स्वभावच आहे.
हेच तत्त्व धार्मिक (रास्वसं, लष्कर,व्हॅटिकन वगैरे), निधर्मी (कम्युनिस्ट, माओवादी वगैरे), राजकीय(भाजपा, काँग्रेस वगैरे), सामाजिक (अंनिस वगैरे), व्यावसायिक (खाजगी कंपन्या, सहकारी संस्था, नाडी परिक्षा वाल्यांपासून बाबा बुवांपर्यंत), आंतरराष्ट्रीय (अमेरिका, इराण-इराक वगैरे) असे कोणालाही लावता यावे.
तुम्ही म्हणता तसे
प्रश्न नीटसा कळला नाहि पण इथेच असे नाहि तर आपल्या वैयक्तीक जीवनातही चांगुलपणा हे 'चलन' असते असे वाटते. आपण (पक्षी सामान्य म्हणवून घेणारे) त्याचा वापर फुटकळ फायद्यासाठी करून घेतो तर 'ते' (ज्यांना सामान्य लोक असामान्य समजतात त्या व्यक्ती, संस्था) या चलनाचा उपयोग अधिक जाणिवपूर्वक व प्रसंगी धोकादायक पद्धतीने करतात
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
द्वेष आणि चांगुलपणाचा ट्विल धागा
उजवीकडच्या संघटनांची विचारसरणी ही द्वेषाची असते. वर्णावरून, जातीवरून, धर्मावरून आपला हेतू साधणारा द्वेष पसरविणे हा त्यांचा मुख्य अजेंडा असतो. पण एकीकडे कमालीची द्वेष आणि धार्मिक उन्माद पसरवत असताना ही मंडळी दुसरीकडे असा 'चांगुलपणा' कसा करू शकतात किंवा असा 'चांगुलपणा' करत असताना जातीधर्मावरून कोथळे कसे काढू शकतात, हे मला न सुटलेले कोडे आहे. द्वेष आणि चांगुलपणाचा ट्विल धागा हा इथे अभ्यासाचा विषय आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विषय कळला मात्र..
हे तुमचे मत असेल तर ठिक मात्र फक्त उजवीकडच्या संघटनांची विचारसरणी ही द्वेषाची असते.असे असेल तर आक्षेप!
वर दिलेल्या प्रतिसादातील संस्थांची विचारसरणी ही एका अर्थी द्वेषाची आहेच., स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी दुसर्याबद्दल द्वेष पसरवणे हे त्या सार्या (आनि इतरही) संस्था करतात. चर्चा प्रस्ताव केवळ उजव्या विचारसरणीच्या संस्थांवर का हे कळले नाही
शिवाय असा चर्चा विषय असला तर चर्चाप्रस्तावाता उल्लेखलेले सत्यसाईबाबा कोणाचा द्वेष करत असत असे तुम्हाला वाटते?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
समजावून सांगा बरे
कशी काय? धार्मिक द्वेष असे लिहायला हवे होते की काय. असो. कुठल्याही अर्थी समजावून सांगा बरे.
ह्या चर्चेत तसे साइडकिक आहेत साईबाबा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
तर्क
माझे म्हणणे समजावण्याचा प्रयत्न करतो.
यांची विचारसरणी द्वेषावर आहे हे तुम्ही मानता तेव्हा ते सिद्ध करत बसत नाही.
यांची विचारसरणी कॅपिलिस्ट लोकांचा विरोध करते. मात्र् त्याच बरोबर प्रस्थापितांविरुद्ध द्वेष पसरवण्याचे कामही करते. जसे माओवादी आदीवासींच्या मनात इतर अ-आदीवासींबद्दल पद्धतशीरपणे द्वेष पसरवत आहेत. आदीवासींसाठी चांगली कामे करण्याचा आव आणताहेत . चांगुलपणा हे चलन वापरून सरकार, प्रस्थापितांविरूद्ध द्वेष पसरवल्याशिवाय त्यांचे उद्देश साध्य होतीलसे वाटत नाही.
किती राजकीय पक्ष निव्वळ स्वतःच्या विचारसरणीसाठी मते मागताना दिसतात? यांचा प्रचार म्हणजे दुसर्या पक्षाच्या विचारसरणीबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात येथे द्वेष पसरवणे कमी तीव्रतेने चालते याच्याशी सहमत.
हा तर्क इतर उदा.साठी वाढवता यावा..
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
द्वेष आणि विरोध
द्वेष आणि विरोध ह्यात फरक आहे. द्वेष म्हटले की जातीवर, धर्मावर आधारित द्वेष आठवतो. वर्णद्वेषी आठवतात. असो.
कृपया अधिक माहिती द्यावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मर्यादा
ही मर्यादा समजण्याची/आठवण्यात आहे :)
सध्या खरोखर जालावर शोधाशोध करायला वेळ नाही आहे शिवाय ऑफीसात बर्याच साईट्स ब्लॉक्ड आहेत पण थोडेसे शोधल्यास या मताशी सहमत असणारे अनेक लेख मिळावेत. वरवर शोधताच भारताने नेपाळमधील माओवाद्यांडे भारताबद्दल द्वेष पसरवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
कावीळीचे औषध...
१.कावीळी वर काय औषध लागू पडते?
२.ते कुठे मिळते?
३.ठोक मधे खरीदले तर सवलत मिळते का?
कुणाला ठाउक असल्यास प्रतिसादात जरूर लिहावे ही विनंती.
?
>>मात्र असे असले तरी अनेकांना ही 'राष्ट्रवादी' संघटना भूकंप, युद्ध आणि इतर कठीण समयी सगळ्यात आधी धावून येते असे वाटते. आणि तसे ते निक्षून सांगतातही.
याचे उदाहरण म्हणून गेली कित्येक वर्षे ८०च्या दशकातल्या आंध्रमधील वादळाची कहाणी सांगितली जाते. नवी कहाणी बहुधा नाही.
नितिन थत्ते
आपण लेह मध्ये झालेल्या महा पावसाचे ..
लेह मध्ये गेल्या वर्षी झालेल्या क्लाऊड बर्स्ट ने आलेल्या विपदे नंतर आर एस एस ने काम केलेच. पण ती संघटना प्रसिद्धी करत नाही फारशी.
http://rashtravrat.blogspot.com
कलका मेल् ची दुर्घट्ना झाल्यवर्
संघ स्वयंसेवक सर्वात आधी पोहचले होते ..आता असे म्हणू नका कि दुर्घटना पण त्यांनीच घडवली