सत्यसाई भक्तमंडळींची श्रद्धा

कलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जोकरच्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली आणि सर्वबाजुंकडून भरपूर मुद्दे आले, पण माझ्या मनातला मूळ प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. कलामांची सत्यसाईवरील श्रद्धा निषेधार्ह आहे का?

१. सत्यसाई हे फ्रॉड होते ह्यावर निदान उपक्रमावर तरी दुमत नसावे
२. अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते? की त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे म्हणून त्यावर मत नोंदवू नये असे वाटते?
३. वैयक्तिक श्रद्धा म्हणून दुर्लक्ष करायचे असल्यास, सत्यसाईवर टिका करण्याचा तरी काय अधिकार? लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे त्यांना बाबा देव आहेत, पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करावे.

वरील मुद्दे बाकिच्या चर्चांमधे न आल्याने हा नविन धाग सुरु करत आहे.

Comments

श्रद्धा

कलामांची सत्यसाईवरील श्रद्धा निषेधार्ह आहे का?

कलामांची सत्यसाईंवर श्रद्धा होती हे दाखवणारे काही पुरावे आहेत का?

माझ्यासमोर प. वि. वर्तक आले तर मीही त्यांच्याशी हात मिळवेन. त्यात माझी त्यांच्याबद्दलची श्रद्धा नाही पण त्यांचे वास्तव रामायण, स्वयंभू ही पुस्तके मी वाचलेली आहेत आणि त्यातला काही भाग आवडलेलाही आहे म्हणून*. यानंतर पौराणिक किंवा ऐतिहासिक गोष्टींवर त्यांचे पुस्तक आले तर तेही मी वाचेन पण यावरून मला कुणी वर्तकांचे भक्त म्हणू नये. किंबहुना, फॅनही म्हणू नये.

* पुढे चर्चाच झाली तर ती बहुधा आनंदी मार्गाने जाणार नाही पण तसा संभव नसेल तर हातमिळवणी करण्यात गैर वाटणार नाही.

अवांतरः मी आताच सच्चूला सत्यसाईंना श्रद्धांजली वाहताना पाहिले. नुसती श्रद्धांजली वाहण्याने एखादा भक्त ठरतो असे वाटत नाही पण सच्चूच्या डोळ्यातील अश्रू बघता तो बहुधा साईंचा भक्त असावा असे वाटते.

दखल ?

माझ्यासमोर प. वि. वर्तक आले तर मीही त्यांच्याशी हात मिळवेन.

वरील क्रिया कलामांच्या हात मिळवण्याच्या परीणाम क्षमतेची / ईतरानी दखल घेण्या जोगी आहे का ?

हात मिळवणे का?

हात मिळवणे हा शब्दप्रयोग प्रतिसाददात्यांना का वापरावासा वाटला असावा, याविषयी कुतुहल आहे. 'हस्तांदोलन करीन' हे अधिक योग्य नाही काय?

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

हातमिळवणी / हस्तांदोलन

हातमिळवणी / हस्तांदोलन

हातमिळवणी आणि हस्तांदोलन ह्या दोहोंत सूक्ष्म अंतर असावे असे वाटते. प्रतिसादकर्तीने फार विचार करून 'मीही त्यांच्याशी हात मिळवेन' असे म्हटले आहे (असे वाटते). त्या वाक्यास भिन्नार्थच्छटा आहेत. असो. एखाद्या व्यक्तीसह निव्वळ हस्तांदोलन करण्यात, त्या व्यक्तीच्या विचारांशी सहमती आहे अथवा नाही ह्यातील काही स्पष्ट होत नाही. येथे प्रतिसादकर्तींची श्री. वर्तकांच्या काही विचारांशी बहुधा सहमती असावी, येणेकरून ही स्पष्टता दर्शविणेसाठी 'हातमिळवणी' असा चपखल बसणारा शब्दप्रयोग त्यांनी केला असावा. अधिक खुलासा स्वतः त्याच करू शकतील.

धन्यवाद.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

प्रश्न तो नाही

हातमिळवणी आणि हस्तांदोलन यांच्यातील अर्थांमध्ये काय फरक आहे, हा मुद्दा नाही. 'मी अमक्याशी हात मिळवेन/ मिळवीन' असे मराठीत म्हणता येते का, हा माझा प्रश्न.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

हात मिळवणे

माझे मराठी फार फार ग्रेट आहे असा दावा मी कधी केल्याचे आठवत नाही. मी शब्दकोश समोर ठेवूनही बसत नाही तेव्हा हातमिळवणी/ हात मिळवणे हे शब्द मराठीत आहेत का नाहीत याची काळजी मी केली नसावी. असे शब्द नसतील तर योग्य शब्द वापरण्यास मला प्रत्यवाय नाही.

बाकी गोष्ट राहिली हस्तांदोलनाची तर मला हस्तांदोलन अभिप्रेत नाही. जो कलाम आणि सत्यसाईंचा मूळ फोटो आहे त्यात त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतलेले दिसतात. त्या अनुषंगाने मी वर्तकांचा हात हातात घेईन असे लिहिणे मला खटकले (का ते माहित नाही) म्हणून हात मिळवणे हा शब्द वापरला. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा हात अशाप्रकारे हातात घेतला जातो तेव्हा त्या व्यक्तीशी ओळख/ काही प्रमाणात आस्था/ सहमती असे अपेक्षित असते असे मला वाटते. हस्तांदोलन अनोळखी व्यक्तीशीही करता येते. चू. भू. दे. घे.

जर या खुलाश्याने समाधान झाले नसेल तर ही अवांतर चर्चा पुढे रेटण्यासाठी माझी खरडवही आहे.

हात मिळवणे

हातमिळवणी/ हात मिळवणे हे शब्द मराठीत आहेत का नाहीत याची काळजी मी केली नसावी.
असे शब्द / शब्दप्रयोग मराठीत असतील तर आय स्टॅन्ड करेक्टेड असे मी माझ्या प्रतिसादात लिहायला विसरलो.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

प्रियाली यांच्याशी सहमत

कलामांची सत्यसाईवरील श्रद्धा निषेधार्ह आहे का?

'कलामांची सत्यसाईवर श्रद्धा आहे' हे सत्य आहे अशा थाटात हा प्रश्न येतो... मला वाटतं पुरावा न देता (असलं) विधान करणं हे सगळ्यात निषेधार्ह आहे. मुळात ही चर्चा सुरू झाली ती कलामांना जोकर म्हणण्यावरून. त्या विधानाबाबतीतही मुख्य नाराजीचा भाग हाच होता. उचलली जीभ लावली टाळ्याला स्टाईलचं, काहीसं भडक, भंपक विधान करणं निश्चितच निषेधार्ह आहे. स्वतःला विज्ञानवादी म्हणवणाऱ्यांकडून वैज्ञानिक दृष्टिकोनाला, त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीला किमान लिप सर्व्हिस मिळावी अशी माझी अपेक्षा आहे.

ससाबा फ्रॉड होता हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. फ्रॉड लोकांवर काही सज्जन लोकं विश्वास ठेवतात. काही लोक त्याच्या फ्रॉडगिरीशी आपली फ्रॉडगिरी जुळवून दोघांचाही फायदा होतो का बघतात. निषेध नक्की कसला करायचा? तुम्हाला दाखवलेल्या जादूने तुम्ही फसलात याबद्दल? किंवा तुम्ही लहान असताना तुमच्या आईवडिलांनी तुमच्या मनावर एखादी गोष्ट बिंबवली याबद्दल? काही वेळा निषेधाच्या भाषेऐवजी सामंजस्याची, सहानुभूतीची भाषा करणं योग्य ठरतं.

या लोकशाही विश्वात मत नोंदवण्याचा हक्क अबाधित आहे. त्याचबरोबर त्या मतामागे किमान चिकित्सा करण्याची जबाबदारी आहे. एखादी टाकलेली पिंक, आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेला विचार यात फरक असावा. कोणाच्यातरी एखाद्या पिंकेला जस्टिफाय करण्यासाठी त्याचे अनुयायी प्रयत्न करताना दिसतात ते बाबागिरी, अंधश्रद्धा यापेक्षा वेगळं कसं काय?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वर्मावर बोट!

कोणाच्यातरी एखाद्या पिंकेला जस्टिफाय करण्यासाठी त्याचे अनुयायी प्रयत्न करताना दिसतात ते बाबागिरी, अंधश्रद्धा यापेक्षा वेगळं कसं काय?

+१

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

किती निरागस

कोणाच्यातरी एखाद्या पिंकेला जस्टिफाय करण्यासाठी त्याचे अनुयायी प्रयत्न करताना दिसतात ते बाबागिरी, अंधश्रद्धा यापेक्षा वेगळं कसं काय?

हे किंवा असले निरागस वक्तव्य मी आधी कोणाकडून तरी ऐकले आहे. चालू द्या. पण सचिनच्या रडण्याबद्दल तुमचे काय मत आहे? ह्या रडण्यामुळे सचिनला लगेच भारतरत्न द्यायला हवे ना.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

श्री श्री १०८ रिटेबाबा प्रसन्न

हे किंवा असले निरागस वक्तव्य मी आधी कोणाकडून तरी ऐकले आहे. चालू द्या.

माझ्याकडूनच ऐकले असणार. अनेक उपक्रमींना या प्रकरणातला भंपकपणा दिसला ते बरे झाले आणि सोडा हो मुद्द्यावरून गुद्द्यावर येणे. त्यातून तुमच्या बाबांचे चमत्कार खरे नाही होणार. ;-)

निषेध

अँग्री यंग म्यान रिकामटेकडा ह्यांच्यासाठी बाबा आणि प्रसन्न हे दोन्ही शब्द शोभत नाहीत. त्यामुळे निषेध!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आमचाही निषेध

रिटेना बेधडक वाह्यात विधाने करताना पाहिले आहे पण त्यांना अँग्री झालेले पाहिलेले नाही. ते बर्‍याचशा गोष्टी थंड डोक्याने करतात. त्यांना मागे मी तसे निरोपातून म्हटलेही होते. ते पुष्टी देतील अशी आशा आहे. त्यामुळे त्यांना अँग्री (जगावर रागावलेला या अर्थाने) म्हणण्याचा निषेध!!!

बाकी चालू द्या (ही विनंती)

असहाय्यता असते तेव्हा राग येतो, ससाबाच्या लोकप्रियतेवर मला राग/दु:ख आहे. चर्चेत मला राग येत नाही हे मात्र सत्य आहे.

तुम्ही कारणमीमांसा देणे अपेक्षित आहे

तुमच्यासारख्या सदस्याकडून होणाऱ्या टिप्पणीची कारणमीमांसा मागणी केल्यावर तरी देणे अपेक्षित आहे.

वेळ नाही

वेळ नाही

"वेळ नाही" लिहायला वेळ होता ना ...

"वेळ नाही" लिहायला वेळ होता ना ... मग तितक्यात स्पष्टीकरण दिलं असत तरी छान झाल असत.

रिटेंच्या स्पष्टीकरणाच्या अपेक्षेत ...
---------------------
-धनंजय कुलकर्णी

जस्टिफाय कसे काय?

मुळात रिकामटेकडा यांनी मांडलेले मत हे जर आणखी काहींना केवळ मत म्हणूनच मान्य असेल. (भले ते रिकामटेकडा ऐवजी राजेशघासकडवी या आयडीनेही टाकले असते तरी). तर त्या मताचे हिरीरीने जस्टिफिकेशन करण्यासाठी कोणीही पुढे सरसावणारच. इथे रिकामटेकडा यांचे काही चाहते आणि अनुयायी आहेत आणि ते केवळ रिकामटेकडा यांचेच मत (योग्य-अयोग्य कसेही असले तरी) असल्याने जस्टिफाय करण्यासाठी पुढे पुढे करत आहेत असे तुम्हाला का वाटले?

गोंधळ

ससाबा फ्रॉड होता हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. फ्रॉड लोकांवर काही सज्जन लोकं विश्वास ठेवतात. काही लोक त्याच्या फ्रॉडगिरीशी आपली फ्रॉडगिरी जुळवून दोघांचाही फायदा होतो का बघतात. निषेध नक्की कसला करायचा?

किती छान साखपाकात बुडवुन काढले आहे सगळे. फ्रॉड लोकांवर विश्वास ठेवणार्‍यांच्या बुद्धीवर शंका घेऊ नये काय? (ते सज्जन असले तरी.) निषेध ह्यासाठीच की सार्वजनिक व्यक्तिमत्वांनी आपल्या प्रभावाचा विचार न करता कुणा फ्रॉड बाबाच्या पायावर लोटांगण घालणे. समाज ह्या लोकांकडे आयकॉन म्हणून पाहत असतो, काहींनी तर मनातुन ह्यांना भारतरत्नही दिलेले असते अशा लोकांनी कॅमेर्‍यासमोर ह्या बाबाच्या श्रद्धांजलीत ढसा ढसा रडावे ह्याचा निषेध नाही का करावासा वाटत? ह्या त्यांच्या निर्बुद्ध कृतीला जस्टिफाय करण्यासाठी त्यांचे अनुयायी प्रयत्न करताना दिसतात ते बाबागिरी, अंधश्रद्धा यापेक्षा वेगळं कसं काय?

वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी

फ्रॉड लोकांवर विश्वास ठेवणार्‍यांच्या बुद्धीवर शंका घेऊ नये काय?

अहो बुद्धी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे शंका नक्की कशाची घ्यायची? प्रत्येकालाच तुमच्यासारखी उच्च लॉजिकल-मॅथेमॅटिकल बुद्धी असतेच असं नाही. त्यामुळे सगळ्यांनाच तार्किक युक्तीवाद करून आपल्या श्रद्धेमागचं फोलपण शोधून काढता येतंच असं नाही. सचिनच्या स्वार्थीपणाबद्दलच्या काही अंधश्रद्धा नुकत्याच खोडल्या गेल्या की नाही? त्या श्रद्धा बाळगणाऱ्यांना कुठे त्या खोट्या आहेत हे कळलं? सचिन तेंडुलकरची बुद्धीमत्ता ही कायनेस्थेटिक प्रकारची आहे. त्या बुद्धीमत्तेबाबत शंका घेण्याची कोणाची लायकी नाही असं माझं स्पष्ट मत आहे.

मी काय म्हणतो, ज्याच्याकडे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करावं. उगाच त्रुटींकडे का पहात रहावं म्हणतो मी? अर्थात हे जमण्यासाठी एक विशिष्ट पातळीचा इमोशनल किंवा इंटरपर्सनल इंटेलिजेन्स लागतो. तो प्रत्येकाकडे असतोच असंही नाही. तेव्हा तुम्हाला जर ते जमलं नाही तर वाईट वाटून घेऊ नका. लक्षात ठेवा एव्हरीबडी इज स्पेशल इन देअर ओन वे. यू आर अ व्हेरी स्पेशल इंडिव्हिज्यूअल. युनिक.

पण एक सल्ला देतो, बघा पटला तर. सतत कसला तरी निषेध करण्याऐवजी जरा कौतुक करून बघा एखाद्या चांगल्या गोष्टीचं. तुम्हालाच बरं वाटेल. एवढंच माझं म्हणणं. रागावू नका.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

काही पर्म्युटेशन्स् काँबिनेशन्स्

सतत निषेध करणार्‍यांचं कौतुक करावं का ?
सतत कौतुक करणार्‍यांचा निषेध करावा का ?
स. कौ. क. कौ. क. का. ?
स. नि. क. नि. क. का. ?

प्रति

सचिनच्या स्वार्थीपणाबद्दलच्या काही अंधश्रद्धा नुकत्याच खोडल्या गेल्या की नाही? त्या श्रद्धा बाळगणाऱ्यांना कुठे त्या खोट्या आहेत हे कळलं?

सचिनच्या स्वार्थीपणाबद्दल अंधश्रद्धा होत्या (विधान मला उद्देशुन असल्यास) आणि त्या खोडल्या गेल्या हे दोन्ही अमान्य आहे. सुधीर काळ्यांच्या लेखात दिलेली आकडेवारी सचिनला क्लीन चीट् देण्यास पुरेशी नाही हा माझा स्टँड होता. तुम्ही आणखी आकडेवारी दिलीत जी सचिनच्या बाजुने जाणारी आहे (हे तिथेही अमान्य केले नव्हतेच), तरीही पूर्ण सिद्ध करणारी नाही. इथे श्रद्धा/अंधश्रद्धा ह्यांचा प्रश्न कुठे आला कळत नाही.

मी काय म्हणतो, ज्याच्याकडे जे चांगलं आहे त्याचं कौतुक करावं. उगाच त्रुटींकडे का पहात रहावं म्हणतो मी?

वावावा! खरा तो एकंची धर्म..जगाला प्रेम अर्पावे. बाबा राजेश महाराजांचे हे बोल ऐकुन भरुन् पावलो. ;)

अर्थात हे जमण्यासाठी एक विशिष्ट पातळीचा इमोशनल किंवा इंटरपर्सनल इंटेलिजेन्स लागतो.

असले काँडेसेंडींग ज्ञान तुमच्या कंफर्टझोनमधे वाटा. इथे खपणार नाही.

पण एक सल्ला देतो, बघा पटला तर. सतत कसला तरी निषेध करण्याऐवजी जरा कौतुक करून बघा एखाद्या चांगल्या गोष्टीचं. तुम्हालाच बरं वाटेल. एवढंच माझं म्हणणं. रागावू नका.

इथल्या चर्चांनी मी कधीच रागावत नाही. कल्जी करु नका. कौतुकाच्या जागी कौतुक निषेधाच्या जागी निषेध. तुमच्या सारखे पाकातुन काढून साखरेत घोळवलेले गोग्गोड गुलाबजाम मला कधीकधीच आवडतात. :)

कल्जी

सचिनच्या स्वार्थीपणाबद्दल अंधश्रद्धा होत्या (विधान मला उद्देशुन असल्यास) आणि त्या खोडल्या गेल्या हे दोन्ही अमान्य आहे.

बरं, तुम्ही म्हणता तर तसं म्हणू. मी काही हे डिनायल आहे वगैरे म्हणणार नाही. तुमचंच खरं. झालं समाधान?

कल्जी करु नका. कौतुकाच्या जागी कौतुक निषेधाच्या जागी निषेध.

असं कसं, वाटते काळजी आपल्या माणसाची. तुम्ही मुक्तकंठाने एखाद्या गोष्टीचं कौतुक केल्याचं दाखवा, मग मिटेल माझी काळजी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शोध घ्या..

बरं, तुम्ही म्हणता तर तसं म्हणू. मी काही हे डिनायल आहे वगैरे म्हणणार नाही. तुमचंच खरं. झालं समाधान?

डिनायलचा प्रश्नच नाही. उलट तुमचीच सक्ती चालू आहे. सचिनबाबत माझ्या अंधश्रद्धा होत्या हे सप्रमाण दाखवुन द्या.

असं कसं, वाटते काळजी आपल्या माणसाची. तुम्ही मुक्तकंठाने एखाद्या गोष्टीचं कौतुक केल्याचं दाखवा, मग मिटेल माझी काळजी.

शोधा म्हणजे सापडेल. बाकी अवास्तव काळजी करु नये त्याने मानसिक आजार बळावतात ह्यावर बाबा राजेश ह्यांच्या प्रवचनात काही नाही का? (ह.घ्या )

+१

+१
---------------------
-धनंजय कुलकर्णी

काही प्रश्न काही उत्तरे

प्रश्न : अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते का?

होय.

प्रश्न : कलामांना जोकर म्हणणे उचित वाटते का ?

नाही.

प्रश्न : सत्यसाई फ्रॉड् होते असे वाटते का ?

होय

प्रश्न : सत्यसाईंच्या भक्तमंडळात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असणे - ( विशेषकरून कलाक्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातल्यासुद्धा !) - बुचकळ्यात टाकणारे वाटते का ?

होय.

प्रश्न : सार्वजनिक आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती स्क्रूटीनी होण्यास लायक आहे असे वाटते का ?
होय.

प्रश्न : स्क्रूटिनी करणे आणि असभ्य भाषेत निंदा करणे यात फरक आहे असे वाटते का ?
होय.

प्रश्न : एखाद्या व्यक्तीचा एका संदर्भातला अवगुण त्या व्यक्तीच्या सर्वच्या सर्व कर्तृत्वावर काट मारणारा आहे असे वाटते का ?
नाही.

वस्ताद

वस्तांद हों जावईबापू. कोर्टांत साक्षीदांर म्हणून नांव काढाल....
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

वस्तांद ?

वस्तांद हा कोणता नवीन शब्द आहे ? वस्ताद शब्द आणि त्याचा अर्थ माहित आहे.
'हो' वरही अनुस्वार ! अनुस्वारावरुन निर्माण होणार्‍या नवीन शब्दांवर अभ्यास चालू आहे की काय !

असो, चालू द्या....!

-दिलीप बिरुटे

दिलीपराव..

हे संवाद कोंकणी माणसाच्या तोंडचे आहेत...त्यामुळे ते अनुनासिक आहेत.
पुलंच्या 'अंतू बर्वा' ह्या व्यक्तीचित्रणात हे संवाद वाचायला मिळतील तुम्हाला.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हा हा हा

चला , हाही एक अनुभवच !

सर्व संबंधितांनी हलके घ्यावे.
- मुक्त बरवा. ;-)

आभार.

हे संवाद कोंकणी माणसाच्या तोंडचे आहेत...त्यामुळे ते अनुनासिक आहेत.
माहितीबद्दल आभारी आहे. मला वाटलं की पूजापाठ वगैरे करण्याचा एखादा नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी काही प्राचीन धार्मिक ग्रंथाचे पाठांतर चालले असल्यामुळे असे शब्द प्रतिसादात आले आहेत की काय ;)

[देवसाहेब, 'अंतू च्या तोंडी "वस्ताद हो जावयबापू'' असे वाक्य आहे. वस्तांद नव्हे.]

-दिलीप बिरुटे

पोएटिक लायसेन्स

देवकाका, कुठे कुणाच्या नादाला लागता? हे पोएटिक लायसेन्स घेण्यासाठी ना मला कुणाच्या परवानगीची गरज, ना हे कळण्यासाठी तुम्हाला कुठल्या ज्ञानकोषाची गरज. ज्यांना कळायचे त्यांना कळाले. कुंभार मडकी घेऊन गेला, बाकीचे फुंकोत उकीरडे! (पुन्हा संदर्भ अंतू बर्वाच!)
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

+१

प्रश्न : अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते का?

होय.

प्रश्न : कलामांना जोकर म्हणणे उचित वाटते का ?

नाही.

प्रश्न : सत्यसाई फ्रॉड् होते असे वाटते का ?

होय

प्रश्न : सत्यसाईंच्या भक्तमंडळात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असणे - ( विशेषकरून कलाक्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातल्यासुद्धा !) - बुचकळ्यात टाकणारे वाटते का ?

होय.

प्रश्न : सार्वजनिक आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती स्क्रूटीनी होण्यास लायक आहे असे वाटते का ?
होय.

प्रश्न : स्क्रूटिनी करणे आणि असभ्य भाषेत निंदा करणे यात फरक आहे असे वाटते का ?
होय.

प्रश्न : एखाद्या व्यक्तीचा एका संदर्भातला अवगुण त्या व्यक्तीच्या सर्वच्या सर्व कर्तृत्वावर काट मारणारा आहे असे वाटते का ?
नाही.

पुन्हा दोन पैसे । अपडेट

कलाम राष्ट्रपती असतांना ससाबाची विशेष भेट घेऊन त्याची प्रशंसा केली असल्यास ते निषेधार्ह आहे*. ससाबा मेल्याबद्दल आंप्र सरकारने चार दिवसांचा दुखवटा पाळायचे ठरवेले आहे. ममो-सोनिया अंत्यदर्शनासाठी जाणार असल्याचेही वाचले. यापुर्वी वाजपेयी, माजी न्यायाधिश भगवती लोकांनीही या बाबाच्या समर्थनार्थ पत्र लिहीले होते. हे सर्वच निषेधार्ह आहे. लोकांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून पद भूषवतांना वैयक्तिक श्रद्धेच्या नावाखाली असे प्रकार खपवले जाऊ नयेत.

*अपडेट: कलाम यांनी ससाबाची विशेष भेट घेतल्याचे या चर्चेदरम्यान ध्यानी आल्याने त्यांच्या त्या कृतीचा मी निषेध नोंदवतो. कलाम यांची माध्यमांतून वाचलेली बाळबोध मते पाहता त्यांनी ससाबाची पार्श्वभुमी विचारात घेतली नसल्याची शक्यता अधिक आहे. पण बाळबोधपणा हे ससाबाला भेटणे, त्याच्या सामाजिक कामाची स्तुती करणे यांचे सबळ कारण होऊ शकत नाही. त्यांची कृती निंदनीय आहे. इतर कोणीतरी जनमानसाचे नेतृत्त्व करतांना काही तडजोडी कराव्या लागतात असे एक समर्थन दिले आहे. ते सर्वथा अमान्य आहे. कलाम हे इतरांसारखे व्यावसायिक राजकारणी नाहीत हे त्यांच्याविषयी आदर असण्याचे एक कारण आहे. ससाबासारख्या ढोंगी परंतु लोकप्रिय इसमास त्यांनी विशेष भेट देण्याचे कारण नव्हते. भोंदुपणाचे उदात्तीकरण करण्यात त्यांनी ते इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे नाहीत हे दाखवून दिले आहे.

अवांतर: खाली डकवलेल्या चित्रांमुळे बरेच आडवे स्क्रोल केल्यावर मजकुर वाचता येतो. कोणीतरी त्या चित्रांचा आकार बदलला तर बरे होईल.

श्रद्धा आणि जनमानस

श्रद्धा ही वैयक्तिक गोष्ट आहे, ती असते किंवा नसते एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या प्रमाणात असू शकते. मनात श्रद्धा नसली तरी अनेक वेळा काही गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ अलीकडे प्रत्येक सेमिनार, कॉन्फरन्सचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने होते. त्यावर माझी श्रद्धा नाही, किंबहुना तो खाद्य तेलाचा अपव्यय आहे आणि त्यामुळे प्रदूषण होते असे म्हणून मी त्यावर बहिष्कार टाकू शकत नाही आणि मी त्याला हजर राहिलो न्हणून लगेच अंधश्रद्धाळू ठरत नाही.

राजकीय पुढार्‍यांना जनतेसमोर जावे लागत असल्यामुळे जनतेचा रोख पाहून ते आपले आचरण करत असतात. त्यावरून कोणताही टोकाचा निष्कर्ष काढण्याची घाई करता येत नाही. सत्यसाईबाबांवर श्रद्धा असो वा नसो, असंख्य लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे, त्यांनी चालवलेल्या धर्मादाय संस्थांचा अनेक लोकांना लाभ झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. एकाद्या धनवान माणसाने आपली संपत्ती कशा रीतीने कमावली असेल याचा विचार त्याच्या नावाने काढलेल्या हॉस्पिटलात जाणारा रुग्ण करत नाही.

यामुळे हे टोक किंवा ते टोक गाठणे या बाबतीत शक्य नाही असे माझे मत आहे.

मत

प्रश्न : अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते का?
मला निषेधार्ह वाटत नाही, मात्र आश्चर्यकारक आणि दु:खद वाटते.

प्रश्न : कलामांना जोकर म्हणणे उचित वाटते का ?
मुळात जोकरसारख्या बहुगुणी कलावंताची आणि कलामांसारख्या शास्त्रज्ञ-लेखक-वक्त्याशी तुलना का करावी?

प्रश्न : सत्यसाई फ्रॉड् होते असे वाटते का ?
होय

प्रश्न : सत्यसाईंच्या भक्तमंडळात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे असणे - ( विशेषकरून कलाक्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातल्यासुद्धा !) - बुचकळ्यात टाकणारे वाटते का ?
होय.

प्रश्न : सार्वजनिक आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती स्क्रूटीनी होण्यास लायक आहे असे वाटते का ?
सार्वजनिक आयुष्यातली म्हणजे. प्रत्येकाचे सार्वजनिकत्त्वाची व्याप्ती वेगळी असेल मात्र (अरण्यात (किंवा कुठेही) एकेकटे रहाणार्‍या व्यक्ती सोडल्यास) प्रत्येकजण हा कमी अधिक सार्वजनिकच असतो.
तेव्हा प्रत्येक व्यक्ती स्क्रूटीनी होण्यास लायक आहे का? याचे उत्तर देता येणार नाही. मात्र पात्र आहे का? तर होय म्हणावे लागेल

प्रश्न : स्क्रूटिनी करणे आणि असभ्य भाषेत निंदा करणे यात फरक आहे असे वाटते का ?
होय.

प्रश्न : एखाद्या व्यक्तीचा एका संदर्भातला अवगुण त्या व्यक्तीच्या सर्वच्या सर्व कर्तृत्वावर काट मारणारा आहे असे वाटते का ?
तो अवगूण किती जणांना व कोणत्या प्रकारे त्रासदायक आहे यावर ते अवलंबून आहे. हिटलरसारख्यांचा अवगुण हा त्या व्यक्तीच्या सर्वच्या सर्व कर्तृत्वावर काट मारणारा आहे असे वाटते. मात्र सचिनचे/कलामांचे सत्यसाईंमागे असणं बर्‍याच जणांना भुलवणारं असलं तरी नृशंस नसल्याने त्यांच्या सर्वच्या सर्व कर्तृत्वावर काट मारणारे वाटत नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

रीझल्ट

एखाद्या माणसाची श्रद्धा कोणावर किती आहे, किंवा तो मनुष्य अंधश्रद्ध आहे की नाही, ह्यापेक्षा त्या माणसाने आयुष्यात काय रीझल्ट दिले हे जास्त महत्वाचे मानतो.

तसेच एखाद्याला आरोपीच्या पिंज-यात बसवुन "अदालत" इश्टाइल प्रश्न विचारले की, तसेच प्रश्न स्वतःला विचारले गेले की काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी ह्याचेही भान ठेवणे आवश्यक वाटते.

वैयक्तिक टीका

सार्वजनिक जीवनातील कोणत्याही व्यक्तीवर केलेली वैयक्तिक टीका उपक्रमावर चालते. मग इतर संकेतस्थळे व त्यांचे बालबुद्धी सदस्य यांचेवर केलेली टीका मात्र चालत नाही हे अनाकलनीय आहे.

हाच फरक

इतर संकेतस्थळे आणि सद्स्य जाऊद्या, येथीलच काही सदस्य त्यांच्या धाग्याला स्पष्ट प्रश्न आणि प्रतिक्रिया दिल्या की, हमरीतुमरी येतात, यथेच्छ शिव्या देतात. नास्तिकांमधे (तथाकथित विचारवंत) आणि इतरांमधे हाच फरक आहे. सचिनला किंवा अब्दुल कलाम ह्यांना इतरांवर आगपाखड केलेली ऐकली / वाचली नाही.

फरक

सचिनला किंवा अब्दुल कलाम ह्यांना इतरांवर आगपाखड केलेली ऐकली / वाचली नाही.

तुम्ही हे वाचले किंवा ऐकले नाही याचा अर्थ ते आगपाखड करत नाहीत असा होत नाही. द्वारकानाथ संझगिरी यांनी सचिनच्या तापटपणाचे काही किस्से लिहिले आहेत. द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संघाचे ९ खेळाडू २९ धावात बाद झाल्यानंतर काही खेळाडू शॉवर घेण्यासाठी जात असताना सचिनने 'मैदानावर काही केलेच नाहीत तर शॉवर घेण्याची काय गरज आहे" अशी आगपाखड केली होती. कलाम यांचेही तसे किस्से असतीलच.

शिव्या नाहीत

--'मैदानावर काही केलेच नाहीत तर शॉवर घेण्याची काय गरज आहे" --

ह्यात शिव्या नाहीत.

तुमची शिवीची व्याख्या सांगा

तुमची शिवीची व्याख्या सांगा म्हणजे ही उपचर्चा पुढे नेता येईल.

@सदस्य,

काहीही फेकू नका. सचिनने आगपाखड वगैरे केली हे साफ खोटे आहे. तो एक टाईमपास एसेमेस होता.
वर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचनंतर असे काही डोकेबाज एसेमेस फिरत होते.

@ज्ञानेश...

सचिनने आगपाखड केली नाही हे तुम्हाला सचिनने सांगितले की अंजलीने?

सोर्स

आगपाखड केल्याचा सोर्स सांगा आधी.
दावा करणार्‍यावर तो सिद्ध करण्याची जबाबदारी असते, ठाऊक नै काय? ;)

हे घ्या

http://metroslive.com/tv9-sachin-loses-his-cool-before-a-shower/

आता तुम्हाला सचिन किंवा अंजलीने 'सचिन असे म्हटलाच नाही' असा एसेमेस किंवा मेल आला असल्यास तो आम्हाला दाखवा. .

मिपा वर बाबाच्या फ्रौड ची उत्तम चर्चा

|१. सत्यसाई हे फ्रॉड होते ह्यावर निदान उपक्रमावर तरी दुमत नसावे
नसावे
मिपा वर बाबाच्या फ्रौड ची उत्तम चर्चा झाली होती
आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग १ व २ - जयंत कुलकर्णी
(बरेच शोधूनही दुवा मिळाला नाही)
साई एक्सपोजानन्द यांचा एक ब्लॉग ही ह्या एकाच बाजू वर प्रकाश टाकतो.

|२. अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध |लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते? की त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे म्हणून त्यावर मत |नोंदवू नये असे वाटते?

काहीसे निषेधार्ह
काहीसे अन इंफोर्म्ड
(हे फ्रॉड माहीत असून 'मला घड्याळ काढून दिले, अमके दिले, तमके दिले, यश दिले, म्हणून जय साई बाबा' करणारे निषेधार्ह, काहीही फ्रॉड माहीत नसणारे आणि केवळ चमत्काराला नमस्कार करणारे अनइंफोर्म्ड सिली. बऱ्याच वेळा सत्यसाई फसवत असले तरी घड्याळ, तेल , विभूती इ. हवेतून काढणे असले चमत्कार हे खरोखरीच घडू शकतात वगेरे गोष्टींवर श्री सतीश (ईश) आपटे सावकाश प्रकाश टाकतीलच अशी आशा आहे )

ते मिसळ पाव वाचत असते किंवा दूरचित्र वाहीन्या 'या फ्रॉड' बाजू वर प्रकाश टाकत असत्या तर कदाचित त्यांचे मत निराळे ही असू शकले असते

|३. वैयक्तिक श्रद्धा म्हणून दुर्लक्ष करायचे असल्यास, सत्यसाईवर टिका करण्याचा तरी काय अधिकार? |लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे त्यांना बाबा देव आहेत, पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करावे.
|कलामांची सत्यसाईवरील श्रद्धा निषेधार्ह आहे का?

उ. कलामांना मिपा / बाबांच्या फ्रॉडवरील तत्सम माहिती सांगून मग आपले मत पुन्हा तपासावे वाटते का असे विचारावे. ह्याच्या उत्तरावर उत्तर अवलंबून.

हे फ्रॉड पाहिल्यावर बाबांच्या इतर कार्याची दाखल काय घ्यावी?

ते तर बेछूट झाले होते असे दिसते.

कधी कधी एक अवगुण / काही अवगुण इतर गुणांना झाकोळून टाकतो.
(मिपा वरील लेखाचे दुवे कसे शोधावेत, वरील लेखाचा दुवा मिळेल का? - मदत )

आत्ता दूरचित्र वाहीन्या या गोष्टीला सपशेल विसरल्या हे कसे ते न कळे. एकावरही तसा ओझरता उल्लेख ही नसावा हे आश्चर्य. दाबून टाकलेल्या पोलिस केसेस् किंवा संशयास्पद मृत्यूंची संख्या, आश्रमातील स्त्रियांच्या शवांवरील अत्याचारांच्या खुणा ह्या सर्व गोष्टींकडे डोळेझाक कशाला?

दुर्दैवाने He is (or was) not the ONLY fraud who is followed by the millions.

वारसदार

ही भक्त मंडळी आता कुठल्या वारसदारावर श्रद्धा ठेवताहेत ते बघायचय!
प्रकाश घाटपांडे

कलामांची श्रद्धा

कलामांची सत्यसाईंवर श्रद्धा होती हे दाखवणारे काही पुरावे आहेत का? असा प्रश्न वर उपस्थित झालेला आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार असताना कलाम यांनी अनेक श्रद्धाळूंना पवित्र वाटणार्‍या काही स्थानांना भेटी दिल्या होत्या; तेव्हा त्यांनी फारसा गाजावाजा न करता पुट्टपार्थीलाही भेट दिली होती असे सांगणार्‍या जुलै २००२ मधील बातमीचा हा दुवा आहे. सत्यसाईबाबांच्या वाढदिवशी त्यांना जाऊन भेटणे वगैरे प्रकारच्या सार्वजनिक भेटी कलामांनी राष्ट्रपतिपद भूषवताना दिल्या आहेत आणि त्याची छायाचित्रे, तिथे त्यांनी केलेली भाषणे वगैरे गोष्टी उपलब्ध आहेतच. उदा: हे पहा; परंतु २००२ मधील या भेटीचे खाजगी स्वरूप आणि त्याची संदर्भचौकट पहाता कलामांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत यश मिळण्यासाठी सत्यसाईबाबांचे आशीर्वाद घेतले असावे, असा यामागे फक्त अंदाज आहे. यावरून त्यांची श्रद्धा सिद्ध होते अथवा नाही हे वाचकांनी ठरवावे.

२२ एप्रिल २०११ रोजी (म्हणजे सत्यसाई मरणपंथावर असताना) कलाम यांनी 'अ डिव्हाईन लेजंड' या शीर्षकाचा एक लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित केलेला दिसतो. त्यात प्रामुख्याने सत्यसाईंच्या सामाजिक कार्याविषयी उल्लेख आहेत, पण सत्यसाई विश्वस्त असलेल्या शैक्षणिक संस्थेत ते स्वतः मुलांबरोबर वेळ घालवून त्यांचे व्यक्तिमत्व घडवतात आणि त्यांना आदर्श नागरिक बनवतात, असा एका ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यास उपयोगी पडणारे काही गुण सत्यसाईंमध्ये आहेत असे कलामांना वाटते, असे खात्रीशीरपणे म्हणता यावे. याला श्रद्धा म्हणावे अथवा इतर काही हे वाचकांनी ठरवावे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर