सत्यसाई भक्तमंडळींची श्रद्धा

कलाम आणि सत्यसाई ह्यांचा एकत्र फोटो आणि त्यावरील टिप्पणी ह्यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कलाम ह्यांना 'जोकर' असे संबोधल्याने बरेच उपक्रमी दुखावले गेले आणि त्यानी सौम्य/कडक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जोकरच्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली आणि सर्वबाजुंकडून भरपूर मुद्दे आले, पण माझ्या मनातला मूळ प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. कलामांची सत्यसाईवरील श्रद्धा निषेधार्ह आहे का?

१. सत्यसाई हे फ्रॉड होते ह्यावर निदान उपक्रमावर तरी दुमत नसावे
२. अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते? की त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे म्हणून त्यावर मत नोंदवू नये असे वाटते?
३. वैयक्तिक श्रद्धा म्हणून दुर्लक्ष करायचे असल्यास, सत्यसाईवर टिका करण्याचा तरी काय अधिकार? लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे त्यांना बाबा देव आहेत, पटत नाही त्यांनी दुर्लक्ष करावे.

वरील मुद्दे बाकिच्या चर्चांमधे न आल्याने हा नविन धाग सुरु करत आहे.

Comments

पटत नाही...

कोणी एक मोठ्या निवडणूकीसाठी उभा असताना, झाडून सगळ्या देवस्थानांना भेट देऊन येतो यात श्रद्धेचा काय संबंध? जनमानसावर पगडा असणाऱ्यांना (धार्मिक पीठं, विशेष पॉप्युलर बाबा वगैरे) भेट देणं हे निवडून येण्यासाठी करण्याच्या गोष्टीत येतंच. राजकारणात पडलेल्या लोकांच्या वर्तनावरून त्यांची श्रद्धा, धार्मिकता वगैरे दिसून येते म्हणणं म्हणजे सत्यसाईबाबांच्या जादूच्या ट्रिकांवर विश्वास ठेवण्यासारखंच झालं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

निवडणूक

राष्ट्रपतीची निवडणूक ही जनमानसांतर्फे होत नाही. जनमानसांवर प्रभाव पाडण्याचा आणि राष्ट्रपती निवडणुकीचा काही संबंध नाही. कलामांच्या विरोधात असलेल्या शेषन यांचा तुलनेने जनमानसांवर अधिक आणि थेट प्रभाव होता असे वाटते. प्रतिभा पाटील यांचा जनमानसांवर किती प्रभाव आहे?

कलाम हे राजकारणी असल्याचे एकदा मनमोकळेपणे मान्य झाले की जिथे तिथे त्यांच्या निस्पृहपणाची, ज्ञानाची आणि विनम्रतेची टिमकी वाजवणे बंद होईल. हेही नसे थोडके.

ओढून ताणून जस्टिफाय

कलामांचे गैरवर्तन किती ते जस्टीफाय करणं. एकवेळ कलामांना 'मतांसाठी तत्व वाकवणारा धूर्त राजकारणी' म्हणा पण सत्यसाईंविषयी त्यांना जिव्हाळा आहे हे काय तुम्ही मान्य करणार नाही.

सहमत आहे

जनमानसावर पगडा असणाऱ्यांना (धार्मिक पीठं, विशेष पॉप्युलर बाबा वगैरे) भेट देणं हे निवडून येण्यासाठी करण्याच्या गोष्टीत येतंच. राजकारणात पडलेल्या लोकांच्या वर्तनावरून त्यांची श्रद्धा, धार्मिकता वगैरे दिसून येते म्हणणं म्हणजे सत्यसाईबाबांच्या जादूच्या ट्रिकांवर विश्वास ठेवण्यासारखंच झालं.

सहमत आहे. चाणक्य निती मधे राजाने कसे वागावे? जनमानसात प्रतिमा उंचावण्यासाठी बाबा महाराज संत महंत यांचे दर्शन घ्यावे असे उल्लेख आढळतात.
अध्यात्मावर विश्वास ठेवणारी माणस त्यांच्या भोंदुगिरीवर विश्वास ठेवतातच असे नाही. एका श्रद्धाळू माणसाला मी सत्यसाईबाबाच्या चमत्कारांविषयी विचारले असता तो म्हणाला, " हे हवेतुन अंगठी वगैरे बोगस प्रकार आहे. त्या सत्यसाईबाबाला म्हणाव जर एवढी 'सिद्धी' प्राप्त आहे तर हवेतुन काढुन मला दिलेली अंगठी मी मुठीत धरतो ती परत हवेत गायब करुन् दाखव बरं! पण त्यामुळे अध्यात्म खोटे ठरत नाही"
सार्वजनिक जीवनात जगताना अनेक लोकांची अडचण होत असते. त्यांची प्रत्येक कृती त्यांना स्वतःला मान्यच असते असे आजिबात नाही. केवळ जनमानस राखण्याकरता ते ती करत असतात.
प्रकाश घाटपांडे

ट्रस्ट

म्हणजे लहान मुलांचे व्यक्तिमत्व( तसेच ट्रस्ट) घडवण्यास उपयोगी पडणारे काही गुण सत्यसाईंमध्ये आहेत असे कलामांना वाटते, असे खात्रीशीरपणे म्हणता यावे. याला श्रद्धा म्हणावे अथवा इतर काही हे वाचकांनी ठरवावे.
व्यक्तीला लोकप्रियते साठी ससाबांची भेट/आधार घ्यावाच लागतो म्हणजे त्याला जनमान्यता मिळते. विन् विन् सिच्युएशन
प्रकाश घाटपांडे

काही छायाचित्रे

अजून काही श्रद्धावंतांचे फोटो. यातील कोणाचेही तसेच माजी राष्ट्रपती कलाम यांचे वर्तन मला निषेधार्ह वाटत नाही, त्यातील कोणीही जोकर वाटत नाहीत की भंपक वाटत नाहीत. ( मी साईबाबांना भेटलो नाही अथवा त्यांचा भक्त नाही).

उस्ताद अमजद् अली खान त्यांच्या मुलाबरोबर

रफी आणि मनोज कुमार

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पंतप्रधान मनमोहनसिंग

सोनीयांचा फोटो उद्या येईल. त्या आत्ता पंतप्रधानांसमवेत अंत्यदर्शनासाठी गेल्या आहेत. (Prime Minister Manmohan Singh and Congress president Sonia Gandhi will arrive at Puttaparthi at 4.45 p.m. on Tuesday to pay their last respects to the departed soul and return to New Delhi an hour later. ) त्यांचा शोकसंदेश वाचला असेलच.

असो.

३६५ डेज ऑफ भंपकगिरी

अजून काही फोटो असतील तरी द्यावे. उपक्रमावर वरल्या सर्वांच्या भंपकपणाची ३६५ दिवस चर्चा करू. ;-)

भंपक

वरती फोटो आलेल्या सर्वांचाच निषेध आहे.पण त्यांना भंपक पदवी देण्यासाठी एवढे कारण पुरेसे नाही. कलामांचा सत्यसाईंबरोबर फोटो आला ह्या एकमेव कारणामुळे त्यांना कुणीही भंपक म्हंटलेले नाही,

नीट वाचावे

गिर्‍हाइके मिळाली आहेत. त्यांच्या भंपकपणाची चर्चा करू. १०० नसेल तर ५० ला विकू. इथल्या विचारवंतांना असे करता येणार नाही असे तुम्ही ठामपणे सांगताय का?

नीट वाचले

यातील कोणाचेही तसेच माजी राष्ट्रपती कलाम यांचे वर्तन मला निषेधार्ह वाटत नाही, त्यातील कोणीही जोकर वाटत नाहीत की भंपक वाटत नाहीत. (मूळ प्रतिसाद)

अजून काही फोटो असतील तरी द्यावे. उपक्रमावर वरल्या सर्वांच्या भंपकपणाची ३६५ दिवस चर्चा करू. ;-)

ह्याचा अर्थ काय?

१०० नसेल तर ५० ला विकू.

सिरीयसली? हा मुद्दा खरंच खोडण्यालायकीचा आहे? इथे १०० वरुन ५० वर कोण आले ते स्पष्ट करा..

ठीक

तुम्हाला अर्थ कळत नसल्यास तुमचा बुद्धीदोष समजून मी दुर्लक्ष करते.

इथे १०० वरुन ५० वर कोण आले ते स्पष्ट करा..

अद्याप आले नाही पण येतील की उपक्रमी. मला नाही शंका वाटत.

बाकी, आपल्याशी हमरीतुमरीवर येण्यात इंटरेस्ट नाही.

सौ चुहे खा के..

तुम्हाला अर्थ कळत नसल्यास तुमचा बुद्धीदोष समजून मी दुर्लक्ष करते.

हाहाहा..हमरी तुमरीवर कोण आलंय पाहा.

अद्याप आले नाही पण येतील की उपक्रमी. मला नाही शंका वाटत.

पुढचे जाऊ द्या...कलामांच्या चर्चांवर तरी कोण १०० वरुन ५० वर आले आहे ते सांगा.

आहे का ह्याला तोड?

पण आहे का ह्याला तोड? बघा बघा संघिष्ट डॉक्टर मुरली मनोहर जोशी कसे पाय पकडताहेत सत्यसाईचे! ०.१७ पासून पुढे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अर्थातच

बघा बघा संघिष्ट डॉक्टर मुरली मनोहर जोशी कसे पाय पकडताहेत सत्यसाईचे!

काय तुम्ही! फक्त मुरली मनोहर जोशींचाच फोटो मिळाला! :-)

असं बघा, (तुमच्या भाषेतील) संघिष्टांचे उद्दीष्ट हे हिंदू संघटन आहे. त्यामुळे त्यात ते अशा स्वामींच्या पाया पडले तर त्यात आश्चर्यही नाही आणि ते त्यात लपवाछपवी देखील करत नाहीत! सगळेच जाहीर आहे. पण हा विषय मला वाटले "संघिष्ठ" नसलेल्यांविषयी चालू होता. अर्थात कलाम अथवा सचिन शाखेला जात असले तर माहीत नाही! :-)

ताजी चित्रफीत

अजून एक ताजी चित्रफीत

सोनीयाजी आपल्या शोकसंदेशात म्हणतातः "The news of the death of Sai Baba of Puttaparthi has greatly pained me. He was a spiritual person in whom lakhs of people had faith. In his lifetime, he inspired the people of this country and those abroad towards spiritualism and religion," she said in her condolence message. The Congress president hailed Sai Baba's contribution towards establishment of institutions for social welfare and said these would be remembered for a long time. "His death has caused a big vacuum. At this sad hour, I express my deep condolences to his followers," Gandhi said.

असो.

?

मुरली मनोहराचा आवेश आणि सोनिया गांधींची प्रतिक्रिया एकंच म्हणायचे आहे का तुम्हाला?

(संपादक मंडळास विनंती: मजकुरापेक्षा मोठी जाहिरात असणारी ही चित्रफित काढून टाकावी, दरवेळी ती आपोआप सुरु होते आणि जाहिरात ऐकायला भाग पाडते)

सरळ आहे

मुरली मनोहराचा आवेश

वर उत्तर दिले आहेच. पण थोडक्यातः जे आडात आहे ते पोहर्‍यात आलेले दिसते. ते त्यांची मते लपवत नाहीत. किंबहूना त्यांनी, "मी त्यातला नाही" असे दाखवले असते तरच त्यावर चर्चा योग्य ठरली असती...

सोनिया गांधींची प्रतिक्रिया

यातील सोनीयांचा शोकसंदेश ("He was a spiritual person in whom lakhs of people had faith.... His death has caused a big vacuum.) हा खोटा आहे, पक्षी त्या खोटे बोलत आहेत, असे म्हणायचे आहे का?

संपादक मंडळास विनंती: मजकुरापेक्षा मोठी जाहिरात असणारी ही चित्रफित काढून टाकावी,

सहमत. ती चित्रफित टाकली तेंव्हा अशी सारखी जाहीरात वाजेल याची कल्पना नव्हती. त्या जागी नुसता हा दुवा ठेवावात ही विनंती: PM, Sonia pay last respects to Sai Baba

शोकसंदेश

हा खोटा आहे, पक्षी त्या खोटे बोलत आहेत, असे म्हणायचे आहे का?

सोनिया गांधी ह्या धूर्त राजकारणी आहेत असे माझे मत आहे. सत्यसाईंचे ६० लाख भक्त आहेत. त्यामुळे तोलुन मापुन दिलेली प्रतिक्रिया आहे असे मला वाटते. मुरली मनोहरांचा आवेश वेगळा आहे, आडात आहे ते पोहर्‍यात आलेले दिसले हे तुमचे म्हणणे मान्य आहे.

थोडक्यात

सोनिया गांधी ह्या धूर्त राजकारणी आहेत असे माझे मत आहे. सत्यसाईंचे ६० लाख भक्त आहेत. त्यामुळे तोलुन मापुन दिलेली प्रतिक्रिया आहे असे मला वाटते.

थोडक्यात त्या खोटे बोलल्या असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसते... मग आपल्या चर्चेतील मुद्याप्रमाणे: "अश्या फ्रॉड बाबाला ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली (कलाम,सचिन इ. अनेक जुने नवे प्रसिद्ध लोक) अश्या व्यक्तींचे हे वागणे निषेधार्ह वाटते?" त्यांचे (म्हणजे सोनीयाजींचे) वागणे हे निषेधार्ह आहे असेच आपल्याला वाटत असणार असे गृहीत धरतो.

त्यामानाने विद्यमान राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचा भर देखील माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांप्रमाणेच त्यांच्या (सत्य श्री साईबाबांच्या) समाजकार्यावर आहे असे दिसते. (राष्ट्रपती प्रतिभाताईंचा २०१० चा अजून एक फोटो):

अर्थात

त्यांचे वागणे हे निषेधार्ह आहे असेच आपल्याला वाटत असणार असे गृहीत धरतो.

अर्थातच! तुम्ही दिलेल्या प्रत्येक फोटोमधील व्यक्तिंचे वागणे निषेधार्ह आहे असे मी मानतो असा प्रतिसाद आधीच दिलेला आहे.

निषेधार्हता

एकदा ससाबांना फ्रॉड मानले की फारसे पर्याय उरत नाही.

त्यानंतर त्यांच्या मागे जाणारे सगळे दोषी आहेत का? माझ्या मते नाही. त्यातील बरेचसे फसवले गेले आहेत वा संभ्रमित असे मानता येते. काही जण आपल्या व्यावसायिकतेतून जातात असेही म्हणता येईल. (राजकारणी, त्यांच्या इस्पितळात काम करणारे, वा इतर नोकरवर्ग, तसेच ट्रस्टचे अन्य लाभार्थी, त्यांच्या कडे येणार्‍या जलसातील गायक). या दोन्हींना आपण समजू शकतो.

पण समाजधुरिणांचे काय? त्यांचे जाणे असे समजू शकत नाही. म्हणजे एकतर त्यांना अज्ञ (याबाबतीत) म्हणावे लागेल वा अंतर्हेतू ठेवलेले. हे दोन्ही प्रकार निषेधार्ह असायला हवेत.
कॉन्ग्रेस बीजेपी चे राजकारणी वा सचिन यांच्या पेक्षा अशांचे वर्तन कितीतरी जास्त निषेधार्ह वाटते.

ससाबा फ्रॉड नाहीत असे म्हटले तर वेगळेच उत्तर मिळते. कोणी म्हटले की ससाबांनी कधी म्हटले की ही हातचलाखी नाही. दिलेल्या वस्तु कुठल्यातरी सिद्धीने मिळतात असा कधी दावा केला तर त्यावर माझ्या कडे उत्तर नाही.

प्रमोद

म्हणजे

पण समाजधुरिणांचे काय?...कॉन्ग्रेस बीजेपी चे राजकारणी वा सचिन यांच्या पेक्षा अशांचे वर्तन कितीतरी जास्त निषेधार्ह वाटते.

म्हणजे राजकारण्यांनी समाजधुरीण असण्याची गरज नसते/अपेक्षा नसते असे म्हणणे आहे का?

राहता राहीले कलामांचे... त्यांना सत्य श्री साईबाबांमधले नक्की काय भावले हे लिहीलेले आहे. आता त्यांना जे भावले आहे ते साईबाबांनी केले का नाही यावर चर्चा करायला हवी असे वाटते...

राजकारणी

मला वाटते राजकारणी समाजधुरीण असल्याची प्रतिमा मिटून बराच काळ लोटलाय.
त्यांचे तसे असणे श्रेयस्कर आहे हे मात्र खरे. वास्तवात ते दिसत नाहीत. (हा माझा अंदाज)

राहता राहीले कलामांचे... त्यांना सत्य श्री साईबाबांमधले नक्की काय भावले हे लिहीलेले आहे. आता त्यांना जे भावले आहे ते साईबाबांनी केले का नाही यावर चर्चा करायला हवी असे वाटते...

नक्की करा. सत्यसाईबाबांच्या समाजकार्याविषयी मला फारसे माहित नाही. ४०००० कॉटींची लौकिक मालमत्ता आहे म्हणे. त्याबरोबर किती समाज कार्यासाठी खर्चिले वगैरे हिशोब कळला तर बरे वाटेल.

प्रमोद

तेहलका

त्यांचे तसे असणे श्रेयस्कर आहे हे मात्र खरे. वास्तवात ते दिसत नाहीत. (हा माझा अंदाज)

माफ करा, पण, आपल्याला नक्की इतरांचे (ज्यांच्यावर टिका केली जाते त्यांचे) वास्तव माहीत आहे का त्यांच्याबाबतीतही केवळ अंदाज आहे? :-)

बुवाबाजी, अंधश्रद्धा वगैरेवर आळा घातलाच पाहीजे आणि त्याबद्दल आपल्याशी दुमत नाही. मात्र त्याच बरोबर एखादी व्यक्ती अथवा अनेक, एखाद्या खर्‍या अथवा तथाकथीत विभुतीमुळे प्रेरीत होत असल्यातर त्यांचा तो चॉईस आहे असे मला वाटते, जो पर्यंत ते तुम्हा-आम्हाला पण त्यांची भजने करा म्हणत नाहीत तो पर्यंत... मात्र (सर्वपक्षिय) राजकारणी हे देशाला खाली ओढायचे काम करत असताना, त्यांच्याकडून अपेक्षा न करता, ती गंभिर समस्या न वाटता, "ते असायला हवे, पण तसे नाही आहे," असे म्हणणे म्हणजे समाजातील अगतिकता आणि ऍक्सेप्टन्स दिसतो. हे आपल्याला व्यक्तीगत म्हणत नाही तर एक खर्‍या अर्थाने निरीक्षण आहे आणि याच संदर्भातील असल्याने येथे लिहीत आहे.

सत्यसाईबाबांच्या समाजकार्याविषयी मला फारसे माहित नाही. ४०००० कॉटींची लौकिक मालमत्ता आहे म्हणे. त्याबरोबर किती समाज कार्यासाठी खर्चिले वगैरे हिशोब कळला तर बरे वाटेल.

तो नक्कीच शोधला पाहीजे आणि त्यात जर गैरव्यवहार आढळले तर त्याचे वाभाडेपण काढले पाहीजेत. तो पर्यंत रिडीफ मधे आल्याप्रमाणे ज्यांनी ट्रस्टबद्दल (ट्रस्टच्या लेखी) चुकीच्या बातम्या पसरवल्या त्यांच्यावर खटले भरणार आहेत. आता ते खरेच करणार का उसने अवसान आहे याबद्दल उत्सुकता आहे आणि खात्रीलायक (कन्फरमेटरी) नसली तरी लिटमस टेस्ट नक्कीच ठरेल.

पण त्याहूनही इंटरेस्टींग वाटला तो म्हणजे (सेक्यूलर) तेहलकामधील हा लेख.

हे पहाच

यू टूब वरील या चित्रफिती पहाताना डाव्या बाजूला येणारी चित्रफितिंची यदिही नजरेखालून घाला.

 
^ वर