वेळ झाली!

मित्र हो, उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच येथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो येथे दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते. प्रियाली मात्र मी कोण हे शोधण्यात दंग झाली होती.

तरी नवीन सदस्यांना लेखनाचे प्रोत्साहन देणे त्यांच्यावर कुणी शुद्धलेखन विषयक चिखलफेक केली तर त्याचे परस्पर प्रत्युत्तर देणे वगैरे कामे मी आपलीच मानू लागलो. मला वाटते की, नवीन सदस्याला स्थळाचा अंदाज नसतो कंपू बाजी माहिती नसते. मराठीच्या आवडी पोटी हे स्थळ सापडलेले असते. अशा वेळी सदस्याला स्थिरस्थावर व्हायला काही काळ द्यायला हवा. असो,

दरम्यान या स्वभावाची नेमकी रचना कशी असावी या बद्दल चिंतन सातत्याने सुरू होते. त्यासाठी चक्क कागदावर माझे व्यक्तीचित्र लिहूनच काढण्यात आले. माझे वय, टक्कल, माझी 'ही', माझी व्यायामशाळा, माझे विचार, हिंदू कडवटपणा, स्पष्टवक्तेपणा, दिलदारी, माणुसकीवर, भविष्याच्या अभ्यासावर असलेली नितांत श्रद्धा, देवभोळेपणा, ख्रिस्तीकरणाप्रति असलेली भीतीची भावना आदी बाबींना स्थान दिले गेले. त्यांचा तिरसटपणा, एककल्ली विचार करण्याची प्रवृत्ती हे सगळे त्यात गोवण्याचे पक्के केले. त्या प्रकारचे वाचन सुरू केले. त्यासाठी अशा प्रकारच्या निरनिराळ्या लोकांना भेटायचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा सपाटाच लावला. वेगवेगळ्या नोटस काढल्या गेल्या. गुंडोपंत कसे दिसतात यासाठी त्यांचे एक रेखाचित्रही तयार केले गेले. यातून हे व्यक्तीमत्व उभे केले गेले. 'मी एक अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम आहे' ही पंचलाईन ठरली. हे सर्व बर्‍यापैकी 'बापाच्या विचारांच्या, अनुभवांच्या आणि वाचनाच्या पलीकडचे' होते.

एकदा स्वभाव निश्चिती झाल्यावर चर्चा आणि लेखांवर तशा वादग्रस्त प्रतिक्रिया येणे हे साहजिकच झाले. त्यातून अनेकदा वादंग उभे राहू लागले. संपादनाची कात्री पार तलवारीत परावर्तीत व्हायची वेळ आली. शिवाय काहीही झाले तरी अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामन्य इसम आहे या भूमिकेमुळे अनेकांना वाद कसा करावा हेच समजेनासे होत असे. वादविवादात अनेक सदस्यांना आंतरजालीय आत्महत्यांतून त्यांनी वाचवले. तरीही त्यातल्या वादामुळे लेखच अप्रकाशित व्हायला लागल्यावर मग गुंडोपंतांची अनुदिनी उभी राहिली. त्याला तसेच नाव दिले - पुष्कळसे वादग्रस्त नि थोडेसे बिघडलेले डोके. मग तात्याने मिपा काढण्याची टूम काढली. त्यात त्याने निरनिराळे आयडी घेऊन धूम उडवली. त्यातल्या पोष्टमन प्रकरणाच्या वेळी मी आवाहन केले - झाले ते पुरे! आता मराठीला हवे तसे स्थळ मिळाले आहे आता सुरुच होऊन जा देत जलसा! पण तात्याच तो! तो काय ऐकणार माझे? त्याचे उद्देश निराळेच होते. असो. त्यामुळे मिपावरून परत उपक्रमवर येऊन वस्ती केली.

येथे मला पिडता येतील असे माझे मित्र प्रकाशराव, यनावाला आदी महापुरुष आहेत. त्यांच्याशी चर्चा करून की बोर्ड झिजले पण गुंडोपंत आणि ते ही आपापल्या जागेवर ठाम राहिले. पण एकुण मजा आली. दिलीप बिरुटे सर, सहजराव आदी मित्रमंडळी मिळत गेली. एकुण व्यक्तीमत्व खुलत गेले. मात्र योग्य वेळी गुंडोपंत म्हणजे कोण याचा खुलासा काही सदस्यांना करून देण्यात आला. कारण त्यात लपवण्यासारखे काही नव्हते. रिकामटेकडे सारख्या सदस्यांनीही याचा अंदाज घेतला आणि त्याची मजा लुटली! काही काळा नंतर असेही लक्षात आले की अनेक सदस्य गुंडोपंतांचे विचार आवडतात असे म्हणत आहेत. आता मात्र लोच्या झाला. कारण तोवर हे व्यक्तीमत्व आपल्या ताब्यात आहे असे वाटणार्‍या बापावर या व्यक्तीमत्त्वानेच अंमल गाजवू लागले. ज्योतिषाच्या विरोधात असलेला बाप आता त्यावरच्या वाचनानंतर त्याला 'तसा' विरोध करेनासा झाला. या व्यक्तीरेखेचे परिणाम बापावरच होऊ लागले!

असो, काळ मोठा मजेत गेला.
नीलकांतच्या आगमना नंतर मिपावर येणे सुरू केले. त्यासाठी मला सहजरावांनी उद्युक्त केले हे नमूद केलेच पाहिजे. मिपावर वावरण्यात एक मस्त मोकळेपण आहे मजा आहे, हे निश्चित!

गेल्या काही वर्षात मराठी आंतरजालाचे स्वरूप फार बदलले आहे. नवनवीन सदस्य येथे येत आहेत. त्यांचे सशक्त लेखन पाहिले की मराठी लेखनाला उर्जीतावस्था येते आहे असेही कधीकधी वाटते.

पण प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला शेवट असतोच. सारे प्रवासी घडीचे हे खरेच. आता असे वाटू लागले की 'पुरे आता'! जे रंगवले आणि रंगले तेव्हढे चित्र पुरे झाले. एक दिवस 'संपवण्याच्या' उद्देशाने अनुदिनी ही उडवून टाकली.
पण सहजरावांनी आग्रह केला की, 'पंत अखेरचा निरोप घ्यायला नक्की या' म्हणून आज आलो.

जाता जाता दोन गोष्टी - पहिली म्हणजे, आपले विचार आपल्याला लाख प्यारे असतात. पण फक्त तेच सत्य असतात असे मात्र मानू नका! दुसरी गोष्ट - आपल्या घरीही निवृत्तीला आलेली मंडळी असतील. त्यांच्याशी दोन घटका बसून बोला. त्यांचे चार शब्द ऐका. ही मंडळी तुमच्यापासून कधी दूर जातील हे सांगता येत नाही. त्यांना वेळ द्या. महत्त्वाचे निर्णय शक्य असल्यास त्यांना सांगा.

या माझ्या वास्तव्यात मी जे काही कुणाला लागट बोललो असेन हलकट छद्मीपणाने वागलो असेन, त्याबद्दल मला माफ करावे. माझ्या व्यक्तीमत्वावर, बिन्धास्त लेखनावर आणि प्रतिक्रियांवरही मनापासून प्रेम करणार्‍या सदस्यांचे कसे आभार मानावेत हे कळत नाही! मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. तुम्हा सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनाने येथेवर आलो. हे यश तुम्हा मायबाप वाचकांचेच आहे!
तरी आजवर जे झाले ते पुरे करावे आणि आंतरजालीय समाधी घ्यावी हीच इच्छा!

सर्वांना माझा नमस्कार, आता आ़ज्ञा द्यावी ही नम्र विनंती!

आपला
अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम
गुंडोपंत

Comments

:-)

डु आयडी सगळेच पाताळयंत्री नसतात हे सिद्ध करणारे म्हणजे गुंडोपंत!!

गुंडोपंतांनी उपक्रम जागता, हलता, बोलता, ठेवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

सलाम गुंडोपंत!

या निमित्ताने डु आयडीबद्दल साधक बाधक चर्चा झाली तर उत्तम!

लुक हू इज टोकिन्ग नाउ

डु आयडी सगळेच पाताळयंत्री नसतात हे सिद्ध करणारे म्हणजे गुंडोपंत!!

लुक हू इज टोकिन्ग नाउ.

या निमित्ताने गुंडोपंत अंधश्रद्धांचा त्याग करतील हीच भाबडी आशा :)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असो

गुंडोपंत या सदस्य/आय.डी.चा या किंवा इतर मराठी संकेतस्थळांवरील वावर, त्यात त्यांनी वेळोवेळी केलेली मतप्रदर्शने आणि त्यांतून जालावर निर्माण केलेली प्रतिमा यांविषयीचा अभ्यास कमी पडल्यामुळे या धाग्यावरील मूळ लिखाण तितकेसे हेलावणारे वाटले नव्हते, पण त्या निमित्ताने पुन्हा एकदा धाग्याची खरडवही झाली आणि त्यामुळे त्याचे रंजनमूल्य वाढले, हे नमूद करावेसे वाटते. अर्थात, इतर काही सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या मतप्रदर्शनांनुसारचे धाग्यावर आलेले त्यांचे प्रतिसाद आणि त्यातून त्यांनी जालावर निर्माण केलेली आपली प्रतिमा अधिक दृढ होणे यांनाच त्या रंजनमूल्याचे श्रेय जाते हेही सांगायला हवे. खाजगीवाले यांनी 'संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास' याच्या पुढील भागात हाही धागा घ्यावा असे सुचवेन.

असो.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

?

१. ह्यातून उपक्रमची प्रगल्भता "वाढली" किंवा "कमी झाली" किंवा "जी आहे" तिचे प्रदर्शन "ठळकपणे" झाले असे काहीसे म्हणायचे आहे काय?

२. किंवा तुम्हाला ह्या धाग्यातून हेलावणे अपेक्षित होते किंवा/व प्रगल्भता अपेक्षित होती?

उसंत

गुंडोपंत पाहुण्याच्या वेषात येतील व आपल्याला कधी भेटुन जातील ते आपल्याला समजणारच नाही.
पुष्कळसं वादग्रस्त नि थोडंसं बिघडलेलं डोकं! जे ताळ्यावर येणार नाही पण तीच त्यांची जगण्याची उर्मी आहे.
http://gundopant.wordpress.com/ हा काढून टाकला हे चांगल नाही केल. तो आत्म संवाद असतो.
आपुलाची वाद आपणाशी म्हणुन वैतागुन काढलेला ब्लॉग पुनर्प्रस्थापित होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
सद्या ही गुंडोपंतांची क्षणभर विश्रांती समजु यात
प्रकाश घाटपांडे

हास्ता ला विस्ता, बेबी

काही काळा नंतर असेही लक्षात आले की अनेक सदस्य गुंडोपंतांचे विचार आवडतात असे म्हणत आहेत. आता मात्र लोच्या झाला. कारण तोवर हे व्यक्तीमत्व आपल्या ताब्यात आहे असे वाटणार्‍या बापावर या व्यक्तीमत्त्वानेच अंमल गाजवू लागले. ज्योतिषाच्या विरोधात असलेला बाप आता त्यावरच्या वाचनानंतर त्याला 'तसा' विरोध करेनासा झाला. या व्यक्तीरेखेचे परिणाम बापावरच होऊ लागले!

हाहाहा! श्रीयुत हाईड प्रभावी झाल्यानंतरच मी सदस्यत्व घेतले असावे. त्यामुळे माझी तुमच्या बापाविषयी (ज्योतिष्य, धर्मांतर, इ. अनेक विषयांमध्ये) बनलेली मतेही इतर सदस्यांच्या मतांपेक्षा वेगळी होती. आता बाप 'पार्टी लाईन'च्या आत असावा अशी आशा आहे. गुंडोपंतांनी बापाची मते बदलली नसती तर गुंडोपंत हा आयडी म्हणजे या लेखात केलेल्या आवाहनाला दिलेला सर्वात यशस्वी प्रतिसाद ठरला असता. जर बापाच्या मतांची आणि गुंडोपंतांची सरमिसळ टाळता आली तर नव्या सदस्यांच्या स्वागताला/इनिशिएशनला तुमची उपस्थिती उपयुक्त ठरू शकेल. तसे शक्य असेल तर हास्ता ला विस्ता. पुन्हा भेट होणार नसेल तर अड्जू (I commend you to God) ;)

इथे

पण गुंडोपंत इथे आणि तिथे भेटणार ना?

नितिन थत्ते

निनाद उमटत रहातील

गुंडोपंत, आपल्या प्रतिसादांचे आणि मतांचे निनाद मेलबर्न ते नाशिक उमटत रहातील.

अपेक्षित प्रतिसाद?

अहो, अहो, हे काय? असे कुठे चाललात? आणि कशासाठी? अशी डोक्यात राख घालू नका, शेवटी हे सगळे व्हर्च्युअल आहे. तुम्ही आम्हाला येथे हवे आहात वगैरे प्रतिसाद न आल्याने या लेखाचा मूळ हेतूच डावलला जातो की काय अशी शंका येते आहे. आणि वेळ होण्याबाबत म्हणाल तर 'राम-कृष्णही आले-गेले, जग का त्यांविण ओसची पडले' असे कायसे आहे बघा!

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

हम्म..

जाऊ नका असे म्हणणार नाही कारण ज्या घराच्या मालकाला घरात स्वारस्य नाही आणि जिथे भाडेकरूच घरमालक बनले आहेत तिथे रहा म्हणण्यात काही प्वाइंट दिसत नाही.

चूक झाली तर ती खुल्या दिलाने कबूल करणारे फार थोडे लोक आंतरजालावर सापडतात. पंत त्यापैकी एक.
यापुढील जालीय प्रवासासाठी शुभेच्छा.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

असहमत

जाऊ नका असे म्हणणार नाही कारण ज्या घराच्या मालकाला घरात स्वारस्य नाही आणि जिथे भाडेकरूच घरमालक बनले आहेत तिथे रहा म्हणण्यात काही प्वाइंट दिसत नाही.

कृपया या गोष्टीला वेगळा रंग देऊ नये. गुंडोपंतांनी हाच लेख मिपावर टाकला आहे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांनी आपली अनुदिनी या आधीच संपवली आहे याकडे लक्ष द्यावे.

रंग?

कृपया या गोष्टीला वेगळा रंग देऊ नये.

मी पंतांना उपक्रमावर रहा असा आग्रह करत नाही. तो का करत नाही याचे कारण सांगितले आहे आणि माझ्या मते ती सत्य परिस्थिती आहे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

भाडेकरूच मालक?

तात्या जाऊन नीलकांतने सूत्रे ताब्यात घेतली तेव्हा मिसळपावावरही भाडेकरूच मालक झाले आहे असे वाटले होते. नंतर कळले की मालकांच्या अनुपस्थितीत कुणीतरी चालक लागतोच आणि तो चालक त्या संकेतस्थळाची प्रथमपासून काळजी वाहणारा असू शकतो.

असो. मालक कोण- भाडेकरू कोण याबाबत चटकन निष्कर्षावर येणे अयोग्य वाटते.

सहमत

असो. मालक कोण- भाडेकरू कोण याबाबत चटकन निष्कर्षावर येणे अयोग्य वाटते.

सहमत आहे. मात्र व्यवस्थापनाकडून या बाबतीत पारदर्शकता नसेल तर लोकांना आजूबाजूची परिस्थिती पाहून निष्कर्ष काढावे लागतात.

ही उपचर्चा अवांतर आहे असे वाटते. काढल्यास हरकत नाही.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

पारदर्शकता

मात्र व्यवस्थापनाकडून या बाबतीत पारदर्शकता नसेल तर

उपक्रम ही पब्लिक कंपनी आहे का? तुम्ही त्याचे शेअर होल्डर् आहात का?संपूर्ण पारदर्शकता असणार नाही हे उपक्रमाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. तुम्हाला अचानक खटकू लागले आहे तो भाग निराळा.

उपक्रम

पारदर्शकता नसेल तर काय होते हे म्हटले आहे. पारदर्शकता असावीच याची सक्ती नाही कारण उपक्रम खाजगी आहे हे सर्वश्रुत आहे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

प्रयोजन

मग हे सांगायचे प्रयोजन काय कळले नाही. मी उपक्रमाचा मालक नाही त्यामूळे तुम्हाला राहा म्हणायचा मला हक्क नाही इतके म्हंटले तरी चालले असते. उगाच उपक्रम व्यवस्थापनावर ताशेरे ओढल्याच्या अविर्भावात प्रतिसाद द्यायची गरज नव्हती.

आविर्भाव नव्हे!

आविर्भाव नव्हे, ते ताशेरेच आहेत.

गरज

उगाच उपक्रम व्यवस्थापनावर ताशेरे ओढल्याच्या अविर्भावात प्रतिसाद द्यायची गरज नव्हती.

मला गरज वाटली म्हणून मी तसा प्रतिसाद दिला. यामागची कारणमीमांसा हवी तशी समजण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

+१

सहमत

असहमत

मला गरज वाटली म्हणून मी तसा प्रतिसाद दिला. यामागची कारणमीमांसा हवी तशी समजण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

ते स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. पण गुंडोपंतांच्या निरोप समारंभाचे निमित्त साधून तुम्ही उपक्रम व्यवस्थापनावर ताशेरे ओढायचा प्रयत्न केलात केलात हे माझे इंटरप्रिटेशन नसून फॅक्ट आहे.

मी

मी ते नाकारतही नाही.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

चक्र

गुंडोपंत...ह्या जगाचं चक्र क्रमेण चालू असतं..त्यात कधी लल पॉइंट येतो तर कधी सुवर्णकाळ येतो, अगदी तळ पण असतोच कधी कधी. हा अनुभव पण घ्याच कि, परत होईल हो ठीक. थोडा धीर धरा!!

इथे तुमच्या जाण्याने फरक पडणार नाही, असण्याने पडू शकेल. पडत नसेल तर पद्धत बदला. किंवा जाऊन दुसरी पगडी घालून परत या, पण तुमचा इथला अनुभव इथेपण उपयोगी आला पाहिजे.

:-)

गुंडोपंतांना तारायचं किंवा मारायचं याचा निर्णय साक्षात त्या पात्राच्या मालकाचा आहे. आता, सर चार्लसच्या गँगला उत्तर देणारा एखादा तर्कटी हिरो शोधायला हवा. ;-)

मालकांनी (गुंडोच्या) अशाचप्रकारे नवीन पात्र रंगवले आणि नवी भूमिका मांडली तर नक्की आवडेल. कोणजाणे त्या निमित्ताने बंद पडलेली उडिए सुरुही होईल.

प्रतिक्रिया

लेख वाचला. काही बाबतीत रोचक वाटला. काही सुचलेले मुद्दे :

१. एखाद्या सायटीवर अनेक लोक आपापल्या सोयीनुसार किंवा आपापल्या मतांनुसार येतात, राहातात किंवा निघून जातात. "आलो रे आलो" किंवा "चाललो रे चाललो" वगैरे स्वरूपाचे , वर्दी देणारे किंवा सायोनारा-वजा धागे या सगळ्याचे प्रयोजन काय ?

२. हा आयडी डुप्लिकेट् आहे हे लोकांना लक्षांत आलेलेच होते.शेवटी आपणहून त्याची कबुली द्यावीशी वाटली हे स्पृहणीय आहेच. परंतु "लास्ट् हुर्रा" ची उडी मारायच्या आधी चटकन् बोलून घेणे हे मात्र रोचक दिसते. आपला आयडी डुप्लिकेट् आहे हे मान्य केल्यावर वाचकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याकरता थांबणे ऑनरेबल ठरले असते. पण ते असो.

३. राहता राहिला मुद्दा गुंडोपंत या आयडीच्या येथील वावराबद्दलचा. डुप्लिकेट् आयडी काढण्याचा उद्देश विशिष्ट स्वरूपाचे मतप्रदर्शन चिलखत किंवा चिलखते घालून करणे हा उद्देश सफल झालेला दिसतो. मात्र असे करताना घातलेल्या चिलखताच्या संरक्षणाचा फायदा इतरांवर शरसंधान करून त्यांना घायाळ करणे किंवा हुसकावून लावणे याकरता घेण्याचा" प्रकार गुंडोपंत" या आयडीने - निदान माझ्याशी मतभिन्नता असूनही - केलेला नाही हे मी आवर्जून नमूद करेन. (अर्थात असे जरी असले म्हणून डुप्लिकेट् आय्डी धारण करणे ग्राह्य ठरते असे मी कधीही म्हणणार नाही. )

असो. गुंडोपंत हा आयडी थांबवणार म्हणून जो काही ओरिजिनल आयडी असेल तोही थांबवणार नाही अशी आशा आहे. कुठल्याही प्रकारची मते मांडायला ओरिजनल आयडीला नवा अवतार धारण करायची गरज नाही हे समजले तरी श्रेय पदरात पडले असे मी म्हणेन.

शरसंधान

मात्र असे करताना घातलेल्या चिलखताच्या संरक्षणाचा फायदा इतरांवर शरसंधान करून त्यांना घायाळ करणे किंवा हुसकावून लावणे याकरता घेण्याचा" प्रकार गुंडोपंत" या आयडीने - निदान माझ्याशी मतभिन्नता असूनही - केलेला नाही हे मी आवर्जून नमूद करेन.

तुम्ही अजूनही इथे आहात ह्याचा अर्थ गुंडोपंतच काय कुठलाच मानसपुत्र असे शरसंधान - निदान तुमच्याबाबतीत - करत नाही असे दिसते. :)

विनंती

हा तुमचा प्रतिसाद केवळ मलाच उद्देशून आहे पण मला तो नीटसा समजलेला नाही म्हणून बोलायची प्राज्ञा करतो. तो जरा उकलून दाखवावा.

उकल

जालावरील (गुंडोपंत सोडता इतर) मानसपुत्रांचा उद्देश सदस्यांना घायाळ करुन हुसकावुन लावणे असा असतो असे तुमचे मत दिसले. पण ज्या अर्थी तुम्ही अजूनही इथेच आहात म्हणजे -निदान तुमच्याबाबत- हे मानसपुत्र अयशस्वी ठरलेले दिसतात.

हम्म्

जालावरील (गुंडोपंत सोडता इतर) मानसपुत्रांचा उद्देश सदस्यांना घायाळ करुन हुसकावुन लावणे असा असतो असे तुमचे मत दिसले.

तुम्ही लावलेला अर्थ मला रोचक वाटतो इतकेच म्हणतो.

मूळ मुद्दा

घायाळ करून हुसकावून लावणे नेहमी वाईटच असते काय? उपक्रमवर परमहंस प्रकरणाला पायबंद घालण्यात यश मिळाले होते ते वाईट नव्हते.

पुन्हा एकदा ...

घायाळ करून हुसकावून लावणे नेहमी वाईटच असते काय?
असे मी म्हण्टल्याचे मला आठवत नाही. गुंडोपंतानी हे केलेले नाही एवढेच मला वाटले जे मी नमूद केले.

अपेक्षाच नसावी

गुंडोपंतानी हे केलेले नाही एवढेच मला वाटले जे मी नमूद केले.

तुमच्या अनुभवावरून काय सिद्ध होते? गुंडोपंतांच्या प्रिय विषयांमध्ये तुमचे कधी मतभेद झाले होते काय? झाले असल्यास तुम्ही ऍग्री टू डिसऍग्री म्हणून बाजूला झालात की त्यांना चूक ठरविलेत?

चूक ठरवणे.

तुमच्या अनुभवावरून काय सिद्ध होते?
माझ्या अनुभवातून काही सिद्ध होते असे मी कुठे म्हण्टले आहे ? मी म्हण्टल्यप्रमाणे मला अमुक अमुक अनुभव आलेला आहे. वर एका सदस्याने त्याना उपक्रमाचा फलक हलता ठेवण्याचे श्रेय दिलेले आहे. त्यातूनही काही सिद्ध होते असे त्याना म्हणायचे नसावे असे मला वाटते.

बाकी कुणाला चूक ठरवणे वगैरे केल्याचे आठवत नाही. मतभेद झाले होते इतके आठवते. "ऍग्री टू डिसऍग्री" असे म्हण्टले असल्याची शक्यता आहेच. चूक/बरोबर ठरवणे , न्यायनिवाडा करणे इत्यादि गोष्टी केल्याचे आठवत नाही.

म्हणूनच

वर एका सदस्याने त्याना उपक्रमाचा फलक हलता ठेवण्याचे श्रेय दिलेले आहे. त्यातूनही काही सिद्ध होते असे त्याना म्हणायचे नसावे असे मला वाटते.

ती(सुद्धा) स्तुतीच आहे.

चूक/बरोबर ठरवणे , न्यायनिवाडा करणे इत्यादि गोष्टी केल्याचे आठवत नाही.

केल्या नाही हेच तुमच्या अनुभवाचे कारण आहे!

रोचक

तुमचे असे निष्कर्षांवर येणे मनोरंजक आहे :)

मुक्तसुनीत यांच्याशी असहमत

गुंडोपंत ही आय डी असलेले लेखक उपक्रमवरून जातात की रहातात या वादात पडण्याची मला इच्छा नव्हती. परंतु श्री मुक्तसुनीत यांनी वर लिहिलेल्या या इतरांवर शरसंधान करून त्यांना घायाळ करणे किंवा हुसकावून लावणे याकरता घेण्याचा" प्रकार गुंडोपंत" या आयडीने - निदान माझ्याशी मतभिन्नता असूनही - केलेला नाही हे मी आवर्जून नमूद करेन या वाक्याशी माझा पूर्वानुभव अजिबात जुळत नाही हे मला नमूद करावेसे वाटते. हा दुवा जरूर बघावा. या दुव्यात कारण नसताना माझ्यावर भंपकपणाचा आरोप गुंडोपंत यांनी केलेला होता. तो मी विसरलेलो नाही. नंतर गुंडोपंतांनी व्यनि द्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. तरी मूळ घावाची जखम तशीच राहिली आहे.
दुसर्‍यांच्यावर वेडेवाकडे आरोप करण्यासाठी डुप्लिकेट आय डी घेणे ही प्रक्रियाच एका विकृतपणाचे लक्षण वाटते. जे बोलायचे ते स्वत:च्या नावावर न सांगता दुसर्‍या आय़ डी च्या मागे लपून बोलणे हे आत्यंतिक भ्याडपणाचे लक्षण आहे. व अशी वर्तणूक़ करणारा कोणताही आय़ डी चर्चास्थळावरून गेला तर 'सुटलो' एवढीच भावना माझ्या मनात ये ईल हे नक्की.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चंद्रशेखर यांच्याशी सहमत

चंद्रशेखर यांना आलेल्या अनुभवाबद्दल मला खेद वाटतो. मी मला आलेल्या अनुभवांबद्दल बोलत होतो हे नमूद केलेले आहेच. ते सोडता चंद्रशेखर यांनी वर मांडलेल्या इतर मतांशी मी सहमत आहे. त्यातली काही वाक्ये तर शेलकी आहेत असे म्हणता येईल. असो.

प्रति

सर्वप्रथम लेखाला आलेल्या पहिल्याच प्रतिसादातील हवा सप्रमाण काढून टाकल्या बद्दल अभिनंदन. 'गुंडोपंत हा आयडी डुप्लिकेट असला तरी न्यूसन्स करणारा नव्हता' असा नेहमी डु.आयडी विरुद्ध गळे काढणार्‍यांनी लावलेला सूर रोचक होता.

दुसर्‍यांच्यावर वेडेवाकडे आरोप करण्यासाठी डुप्लिकेट आय डी घेणे ही प्रक्रियाच एका विकृतपणाचे लक्षण वाटते. जे बोलायचे ते स्वत:च्या नावावर न सांगता दुसर्‍या आय़ डी च्या मागे लपून बोलणे हे आत्यंतिक भ्याडपणाचे लक्षण आहे.

हे विधान मात्र लोडेड आहे. गुंडोपंतांनी केलेली जखम थोडी जास्तच खोलवर गेली आहे आणि त्यातून असे सरसकट विधान आलेले दिसते. जालावर ओळख उघड न करणे हे काही नविन नाही. तुम्ही चंद्रशेखर आयडीतून लिहिता पण तुमचे खरे नाव काय? आडनाव काय? वय किती ? काम काय करता? ही माहिती उघड केलेली नाहीत. ह्याचे कारण तुम्ही भ्याड आहात किंवा विकृत आहात असे नाही. सार्वजनिक स्थळावर वावरताना अशी माहिती उघडी करू नयेच ह्या मताचा मी आहे. दुसरा मुद्दा एकाच सदस्याने एकापेक्षा जास्त आयडीज काढावेत का? ह्याचे उत्तर त्याचा उद्देश काय आहे ह्यावर ठरू शकते. ज्यानी कुणी आजपर्यंत एकाच सायटीवर एकापेक्षा जास्त आयडी काढले आहेत ते सगळे विकृत किंवा भ्याड ठरत नाहीत. उदा. महिलांशी चोरून लगट करण्यासाठी काढलेला डुआयडी विकृत असू शकतो. पण निव्वळ वेडेवाकडे आरोप केले म्हणून गुंडोपंतांसारखा आयडी मला विकृत वाटत नाही. कोणते आरोप वेडेवाकडे आहेत हे ठरवण्याचा हक्क संपादन मंडळाला आहे आणि वेळोवेळी त्यातून प्रतिसाद संपादित होत असतातच. उरलेल्या आरोपांचे खंडन करण्याचा पर्याय आपल्याला असतोच. नुकताच गुंडोपंतांनी यनावालांवर लेखन चौर्याचा आरोप केला होता. त्यावर लगेच यनावालांनी खुलासा देऊन त्याचे खंडन केले आणि गुंडोपंताना माफी मागण्यास भाग पाडले. तुम्ही असतात तर लगेच मी इथून निघून जातो माझे कुणाशी पटत नाही असा त्रागा केला असतात.

The lady doth protest too much, methinks. :)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

जालावरील ओळख

जालावर स्वतःचे खरे नाव घ्यावे किंवा दुसरे कोणतेही घ्यावे. त्याने काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ सहज हे काही खरे नाव नाही. परंतु सहज हा आय डी घेतलेली व्यक्ती त्यांची खरी खुरी मते निर्भिडपणे मांडते. ती दुसर्‍यांना पटो वा न पटोत. टीका करण्यासाठी एक नाव घ्यायचे व स्तुती करण्यासाठी दुसरे नाव घ्यायचे याला मी भ्याडपणा म्हणतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

नाव

टीका करण्यासाठी एक नाव घ्यायचे व स्तुती करण्यासाठी दुसरे नाव घ्यायचे याला मी भ्याडपणा म्हणतो.

सहज हा आय डी घेतलेली व्यक्ती त्यांची खरी खुरी मते निर्भिडपणे मांडते. ती दुसर्‍यांना पटो वा न पटोत. हेच विधान गुंडोपंत ह्या आयडीविषयीही केले जाऊ शकते. त्यांचा आणखी एखादा आयडी आहे की नाही ह्याने फरक पडत नाही.

+१

गुंडोपंत आणि त्यांचा बाप यांची मते वेगळी नाहीत असा माझा संशय आहे.
--
बाकी,

काही काळा नंतर असेही लक्षात आले की अनेक सदस्य गुंडोपंतांचे विचार आवडतात असे म्हणत आहेत.

हे कधी घडले त्याविषयी कुतूहल आहे. हे 'अनेक सदस्य' म्हणजे विश्वास कल्याणकर (यांना प्रगल्भ संस्थळ आवडेल अशी आशा करतो), शशिओक, हैयो हैयैयो, हे आहेत काय? अजून कोण?

संशय

गुंडोपंत आणि त्यांचा बाप यांची मते वेगळी नाहीत असा माझा संशय आहे.

संशय घेण्यास नक्कीच वाव आहे. गुंडोपंतांचे पुर्वीचे लेखन चाळले असता त्यांचा जोतिषाचा बराच अभ्यास आहे असे दिसून येते (त्याविषयावरील पुस्तके त्यांनी नक्कीच वाचली आहेत). धोंडोपंत नावाच्या आयडीला एका जोतिष्यविषयक पुस्तकातून उतारे देतानाही गुंडोपंतांनी पकडले होते. अशा पुस्तकांचे सखोल वाचन असल्या शिवाय हे शक्य नाही. तात्पर्य, गुंडोपंताच्या बापाचा भविष्यावर विश्वास नाही हे काही पटण्याजोगे नाही.

शिवाय काहीही झाले तरी अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामन्य इसम आहे या भूमिकेमुळे अनेकांना वाद कसा करावा हेच समजेनासे होत असे.

हे काही पटण्यासारखे नाही. गुंडोपंतांना अनेकदा उपक्रमावर निरुत्तर केले गेलेले आहे. त्यातूनच त्यांनी 'उपक्रमावरील तर्कटी लोक' अशी आदळाआपट करणे सुरु केले होते.

डुप्लिकेट आय डी

डार्क मॅटर हे वरिजनल असते का डुप्लिकेट?

चन्द्रशेखर

टाटा

गुंडोपंत तुमचा हा अंधश्रद्ध अवतार कधीच आवडला नव्हता. तुमच्या बापाची मते अशी एककल्ली नाहीत हे ऐकून बरे वाटले.

पारदर्शकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चन्द्रशेखर लिहितातः--"डुप्लिकेट आय डी घेणे ही प्रक्रियाच एका विकृतपणाचे लक्षण वाटते. जे बोलायचे ते स्वत:च्या नावावर न सांगता दुसर्‍या आय़ डी च्या मागे लपून बोलणे हे आत्यंतिक भ्याडपणाचे लक्षण आहे."
..
या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे.कोणत्याही कारणास्तव ड्युप्लिकेट आय् डी घेणे समर्थनीय नाही.पारदर्शकताच असावी.

+१

श्री. चन्द्रशेखर आणि श्री. यनावालांशी सहमत.

मस्त!

मस्त! चालू द्या! पण मी असहमत आहे.

गुंडोपंत ही ड्युप्लिकेट आयडी आमची आवडती होती. कालांतराने त्यांचे अश्रद्धानिर्मूलनाचे प्रकार मात्र अतिच होऊ लागले होते असे वाटायला लागले होते.

आसुरी आनंद

Organizing atheists has been compared to herding cats, because they tend to think independently and will not conform to authority. - Richard Dawkins
क्ष्

हीहीहीही!

Organizing atheists has been compared to herding cats, because they tend to think independently and will not conform to authority. - Richard Dawkins

अगदी! अगदी!! अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!! अगदी! अगदी!!अगदी! अगदी!! अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!! अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!!अगदी! अगदी!! अगदी! अगदी!! अगदी! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!!
अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!! अगदी!!
अगदी!!
अगदी!!
अगदी!!
अगदी!!

हे इतके अगदी लिहिण्याचे कारण आसुरी आनंद नसून प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत, हे आहे.

 
^ वर