संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास
नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती.
सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली. मात्र या सगळ्या गदारोळात प्रगल्भता मोजण्याच्या निकषांकडे दुर्लक्षच झाले. या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच लक्ष पुनर्केंद्रित व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.
लेखनहेतू
प्रगल्भतेचे निकष कसे ठरवावे हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण प्रगल्भता ही काही भौतिक राशी नाही जी एखाद्या उपकरणाने मोजता यावी. तसेच ती जनसामान्यांच्या कौलावरूनही ठरू नये असे वाटणे साहजिक आहे. नाहीतर जे लोकप्रिय ते प्रगल्भ असे मानले जाण्याचा धोका उद्भवतो. म्हणजे केवळ आमीर खानचा चेहेरा फिल्मफेअरच्या सर्वसामान्य वाचकांना गोड वाटला म्हणून त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनण्याचा मान मिळतोच, पण त्या जखमेवर मीठ चोळणे म्हणून की काय 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही.
परंतु मग प्रगल्भता ठरवावी कशी, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. त्यासाठी तुलनात्मक अभ्यास हा एकच पर्याय शिल्लक रहातो. सुदैवाने संस्थळांवर होणाऱ्या लेखनात अनेक सामायिक दुवे असतात, जेणेकरून हा अभ्यास शक्य होतो. एकच लेखक, एकच लेख दोन संस्थळांवर प्रसिद्ध करतो. अशा सामायिक लेखांना विशिष्ट संस्थळावर काय प्रकारचे प्रतिसाद मिळतात, किती खोलवर चर्चा होते, चर्चा भरकटते की फुलते, अवांतरात जाते की मूळ विषयांच्या अनेकविध पैलूंना स्पर्श करते, वाचक चर्चाविषयाबाबत उदासीन आहेत की तावातावाने तावताव लिहितात यावरून काही निष्कर्ष काढता येतात. या लेखात अशाच दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.
तुलनेच्या पद्धती व निकष
मिसळपाव व उपक्रम या दोन संस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या गेल्या महिन्याभराच्या काळातल्या लेखनाचा या तुलनेत अंतर्भाव आहे. या काळात जे जे सामायिक लेख दोन्ही संस्थळांवर प्रसिद्ध झाले तेवढेच या तुलनेसाठी विचारात घेतले आहेत. तुलना करताना मूळ लेखाचा अगर चर्चाप्रस्तावाचा दर्जा विचारात घेतला नाही, कारण अर्थातच तो दोन्ही संस्थळांसाठी समान आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. या मूल्यमापनासाठी खालील गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत.
१. प्रतिसादसंख्या - अर्थातच संख्येवरून दर्जा ठरत नाही हे उघडच आहे, पण तरीही प्रतिसादसंख्येवरून एकंदरीत वाचकवर्गाच्या चर्चाप्रस्तावाबद्दलच्या उत्साहाचं मोजमाप होऊ शकते. अवांतर प्रतिसादांमुळे हा आकडा फुगलेला नाही याचाही विचार करण्यात आला.
२. वाचकांचा सहभाग/समरसता - निव्वळ 'लेख आवडला' इतपतच प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादांना 'हा लेख आवडला याचे कारण म्हणजे...' या स्वरूपाच्या प्रतिसादापेक्षा कमी महत्त्व दिलेले आहे. एखाद्या चर्चेत किती लोकांनी किती समरसून भाग घेतला हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो.
३. माहिती/पैलू - एखाद्या विषयाची नवीन माहिती चर्चेतून उपस्थित झाली का? चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का? यावरून निश्चितच दोन चर्चांची तुलना करता येते.
४. वाचनीयता - ही चर्चा पुन्हा वाचावीशी वाटेल का? या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का? आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का? या प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा किती यशस्वी झाली याबद्दल अटकळ बांधता येते.
या चारही निकषांचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक लेखा/चर्चेसाठी मिसळपाव व उपक्रम या संस्थळांवरील चर्चांना सामान्य, चांगली, व उत्तम अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.
तुलनात्मक सारणी
Sheet1
A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ||||||||||||
2 | ||||||||||||
3 | ||||||||||||
4 | ||||||||||||
5 | ||||||||||||
6 | चर्चा/लेखाचे नाव |
लेखक | उपक्रम | मिसळपाव | ||||||||
7 | हॉम रॉंग | निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
||||||||
8 | ऍबल कॉन एला |
निनाद | १४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
१४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
||||||||
9 | तोक्यो गोमी ओन्ना |
निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | ||||||||
10 | पानिपताची मराठी भाषेला देणगी |
चिंतातूरजंतू | 14 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग मध्यम, माहिती व पैलू मध्यम, वाचनीयता मध्यम |
52 प्रतिसाद, वाचक सहभाग उत्तम, माहिती व पैलू उत्तम, वाचनीयता उत्तम |
||||||||
11 | वॉल्व्हर | निनाद | 9 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता सामान्य |
31 प्रतिसाद, वाचक सहभाग चांगला, पैलू व माहिती चांगली, वाचनीयता चांगली |
||||||||
12 | सायलेंटियम | निनाद | 5 प्रतिसाद, वाचक सहभाग सामान्य, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
13 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
||||||||
13 | घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी |
राजेश घासकडवी | 13 प्रतिसाद, यथातथा सहभाग, मर्यादित पैलू, मर्यादित वाचनीयता |
80 प्रतिसाद, समरसून सहभाग, अनेकविध पैलूंना स्पर्श, वाचनीयता उत्तम |
||||||||
14 | ||||||||||||
15 | ||||||||||||
16 | ||||||||||||
17 | ||||||||||||
18 | उत्तम | मध्यम | सामान्य | |||||||||
19 | उपक्रम | 0 | 2 | 5 | ||||||||
20 | मिसळपाव | 2 | 1 | 4 | ||||||||
21 |
एकंदरीत या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सात लेखांसाठी सारांश असा येतो
संस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य
उपक्रम ------0----2-----5
मिसळपाव----2----1-----4
उत्तम चर्चांच्या संख्येमध्ये मिसळपाव पुढे असले तरी मध्यम व सामान्य दर्जाच्या चर्चांमध्ये उपक्रमने बाजी मारलेली आहे.
निष्कर्ष व पुढील चर्चा
संस्थळांची प्रगल्भता कशी मोजावी यासाठी एक तुलनात्मक अभ्यास आम्ही सादर केला. यातून अर्थातच कुठचे संस्थळ प्रगल्भ आहे याबाबतीत निष्कर्ष काढायचा नसून धम्मकलाडूंनी मांडलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रगल्भतेचे निकष निश्चित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा आहे. ही पद्धती प्रस्थापित झाली तर यापुढे दर महिन्याला संस्थळांचे रॅंकिंगही ठरवता येईल. अर्थातच या पुढच्या गोष्टी झाल्या.
Comments
देव करो
देव करो (किंवा आणि कोणीही करो) आणि पुढच्या वेळी निनाद यांचे कुटुंब सुट्टीत त्यांना सोबत घेऊन जावो. - सर्वांनी ह. घ्यावे. निनाद यांनी सुद्धा. त्यांचे परकीय चित्रपटांवरचे बरेचसे लेख मी वाचले होते. प्रतिसादही दिले होते. दिले नसते तर अतिसुमार/ अतिसामान्य असे वर्गीकरण करावे लागले असते का?
मिसळपावावरही हा लेख टाका. त्यांनाही कळू द्या की ते विचारजंती ;-) होऊ लागले आहेत हे.
बाकी लेख मस्तच. :-) मांडलाही मस्त आहे. इतरांचे प्रतिसाद वाचायला मजा येईल. पॉपकॉर्न शेकवून आलेच हं!!
आपली,
(ओ.आयडी) प्रियाली
ओ फॉर ओरिजिनल ;-)
:)
हा हा हा ... काय स्कोर्स सेटल करण्यात गुंतलंय पब्लिक ;) नक्की द्वेष दुसर्या संस्थळाचा आहे की त्या संस्थळावरच्या लोकांचा ?
आणि हा द्वेष जर कमी करायचा असेल तर एक जुणा पर्याय सुचतोय .. साट्यालोट्याचा :) उपक्रमावरची एखादी पोरगी सुण म्हणुन मिपावर जाऊ द्या .. आणि तिकडची एखादी पोरगी इकडे सुण म्हणुन येऊ द्या :) हॅहॅहॅ :)
- टारझन
वाचकांची प्रगल्भता
दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे पहिलाच असल्याने त्रुटी वगैरे राहिल्या असतील तरी स्वागतार्ह आहे.
या दोन संस्थळांपैकी एकाशीच मी परिचित आहे. त्यामुळे मी तुलनात्मक प्रगल्भतेबाबत माझे मत देऊ शकत नाही. मात्र असा अभ्यास अधिक चांगला कसा होऊ शकतो याबद्दल काही वाटले ते लिहितो.
अवांतरः स्तंभाची रुंदी वाढवली असती तर तक्ता जास्त वाचनीय झाला असता.
या प्रयोगातले अभ्यासक तुम्हीच आहात आणि गुण देणारे पण तुम्हीच आहात (असे वाटले). हे बदलता आले तर बघा. (म्हणजे दोन्हीकडे वाचक असलेल्यांची मते घ्यावी लागतील.)
काही लेखक दोन्ही कडे लिहितात. तुम्ही लिहिलेल्या उदाहरणात एकच लेख दोन्ही कडे आला आहे. मात्र काही लेखक हा लेख इकडे आणि हा लेख तिकडे असे ठरवतात (असावेत.). यात संस्थळाचे नियमानुसार दोन्हीकडे प्रसिद्ध होऊ शकतो अशा लेखांचे महत्व जास्त आहे. अशा लेखांची तुलना करता येऊ शकते. (त्यासाठी परत दोन्ही कडच्या वाचकांची मते घ्यावी लागतील. आणि लेखकांची मते पण घ्यावी लागतील.) आधी-नंतर (म्हणजे आधी कुठे प्रसिद्ध झाला.) का एकाच वेळी या घटकाचाही तुलनात्मक अभ्यासात विचार पाहिजे.
एकंदर वाचक/सभासद संख्या त्यातील नियमीत भेट देणारे (ही माहिती संस्थळव्यवस्थापकांकडे) यांची तुलना होणे आवश्यक आहे. म्हणजे प्रतिसाद संख्येची तुलना प्रगल्भता दाखवू शकते.
हे एवढे होऊनही प्रगल्भता हाती येणार नाही असे वाटते. (प्रगल्भता मोजताच येणार नाही या विचाराचा मी नाही.) या वरून कदाचित वाचकांच्या प्रगल्भतेचा अभ्यास करता येईल. पण लेखांच्या (आणि लेखकांच्या) प्रगल्भतेचे काय? (दोन्ही कडचे लेख-लेखक निराळे असल्याने). संस्थळाची प्रगल्भता माझ्या मते चर्चेसहित लेख लेखकांच्या प्रगल्भतेने मोजायला हवी. कदाचित त्यास मी जास्त अग्रक्रम देईन.
प्रगल्भतेची तुलना नुसतीच शेजारच्यांशी (असा उल्लेख मी वाचल्याचे आठवते) करणे यापेक्षा दूरच्यांशीही करणे (मराठी नसलेल्यांची) यासही अग्रक्रम दिला पाहिजे.
प्रमोद
बरोबर
या प्रयोगातले अभ्यासक तुम्हीच आहात आणि गुण देणारे पण तुम्हीच आहात (असे वाटले). हे बदलता आले तर बघा.
हे मी लिहावे की लिहू नये ह्या विचारात होतो.
आधी-नंतर (म्हणजे आधी कुठे प्रसिद्ध झाला.)
इतरत्र आधी प्रसिद्ध झालेल्या लेखांवर इतरत्र आलेल्या प्रतिसादांत बरेच काही लिहून झालेले असते.
प्रगल्भतेची तुलना नुसतीच शेजारच्यांशी (असा उल्लेख मी वाचल्याचे आठवते) करणे यापेक्षा दूरच्यांशीही करणे (मराठी नसलेल्यांची) यासही अग्रक्रम दिला पाहिजे.
चांगला मुद्दा ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
माझ्यामते
सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.
लेख मांडण्याची पद्धत फार चांगली आहे. पण माझ्यामते तुलना करण्यासाठी सामायिक लेख निवडण्याची तुम्ही अवलंबिलेली पद्धत अथवा निकष तितकेसे योग्य नसावेत. जे विषय सामायिक नाहीत तेदेखील बघायला हवेत. विशिष्ट प्रकारचे लेखन (ह्यात प्रतिसादलेखनही आले) फक्त एखाद्या संकेतस्थळावरच होते किंवा होऊ शकते. अशा लेखनाचा दर्जा बघायला हवा. अशा लेखनाचे दाखले द्यायला हवे. तसेच एखाद्या संकेतस्थळावर कुठल्या प्रकारची मते मांडली जात नाहीत, ह्यावरूनही प्रगल्भता ठरवण्यात खरी मदत व्हावी. ह्याचीही उदाहरणे द्यायला हवी. ह्याशिवाय कशाप्रकारे मते मांडली जातात हेही बघणे महत्त्वाचे.
शिवाय सदस्यसंख्याही बघायला हवी. सदस्यसंख्याच कमी असली की प्रतिसादही कमी येतात. बाय द वे, घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी ही चर्चा येऊन गेल्याचे तुमच्यामुळेच रजिष्टर झाले. उपक्रमावर अनेक सदस्य मोठ्या काळासाठी पूर्णपणे सक्रिय नसतात. आणि जिव्हाळ्याचे विषय निवडून त्यासाठी आपला वेळ देतात. पण कधीकधी तेही राहून जाते. उदा. चिंतातुर जंतू ह्यांच्या पानीपताची मराठी भाषेची देणगी ह्या चर्चेत बरेच काही लिहिण्यासारखे होते. हे खरेच. तेव्हा बरेच काही लिहिता आले असते. (पण चांगले प्रतिसाद म्हणजे कटकॉपीपेस्ट का? अर्थात "माझे वाचन किती हे बघ" असे सांगणारे किंवा आणि नावांच्या लेंड्या टाकणारे प्रतिसादही कधी-कधी चांगले वाटू शकतात म्हणा.)
तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
केवळ इतकेच नाही
उपक्रम आणि मिसळपाव या दोन्ही संकेतस्थळांची धाटणी वेगळी आहे. तिथे हाताळले जाणारे विषय वेगळे आहेत पण उपक्रमाचे बहुतांश सदस्य मिपावर आहेत. त्यांना जेथे चालना मिळते तेथे प्रतिसाद देण्यास आवडत असावे. मिसळपाववर सदस्य अधिक असल्याने समान लेखांना तेथे चालना मिळणे शक्य आहे.
संकेतस्थळांची प्रगल्भता तपासण्यासाठी संवेदनशील विषय, चौकशी-माहिती, इतिहास, राजकारण वगैरेंसारख्या विषयांकडे संकेतस्थळाचे सदस्य कशा तर्हेने पाहतात, नवे विचार स्वीकारू शकतात का? आपल्या विरुद्ध विचार मांडणार्यांविषयी संयम राखू शकतात का? अशा अनेक बाबींचा विचार करायला हवा.
बाकी चालू द्या! ;-)
+१
दात घासणार्या महंमदाचे चित्र, जेम्स लेन प्रकरणाची चर्चा, इ. उदाहरणांमध्ये 'जनक्षोभाचा बाऊ करून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची सोयिस्कर गळचेपी करणे' हे अप्रगल्भतेचे लक्षण दिसले.
विजय असो
रिकामटेकडा यांच्या 'अभिव्यक्ती'चा विजय असो.
जनक्षोभाचा बाऊ करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची सोयिस्कर गळचेपी करणे, म्हणजे काय याविषयी त्यांनी अधिक लिहावे ही विनंती. :)
मी इथे असतो.
खुलासा
सोयीच्या विचारसरणीला अडचणीत आणल्यासः प्रतिसादांचे संपादन करणे, धागे उडविणे (याचा हास्यास्पद वेरियंट म्हणजे मूळ लेख उडवून प्रतिसादांतील टीका तशीच ठेवणे), सदस्यत्वे उडविणे, इ. पक्षपात करून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची सोयिस्कर गळचेपी करण्यात येते.
+१
सहमत. हे इथे देखील थोड्या प्रमाणात घडतेच/घडले. जात्यात गहू पण गेलेच.
चांगली कल्पना
श्री. खाजगीवाले यांची तुलनात्मक अभ्यासाची कल्पना चांगली असली तरी अशा तुलनात्मक अभ्यासासाठी ही दोन संकेतस्थळे योग्य नाहीत असे वाटते. या दोन्ही संस्थळांचा पिंड निराळा आहे. लेखन निराळ्या पद्धतीचे असते. उपक्रमवर पाककृती, कविता, गोष्टी यांना अजिबात स्थान नाही. उपक्रम वैचारिक लेखांना प्राधान्य देते. मराठी भाषेचे शुद्धलेखन, ज्योतिषा सारख्या ग्रे (किंवा माझ्या मताने ब्लॅक) एरियात असणार्या विषयांवर उपक्रमी आग्रही असतात व अशा लेखांच्यावर कडाडून टीका करतात.
माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी दुसर्या संस्थळावर मधे काही काल रमण्याचा प्रयत्न केला. एक उदाहरण देतो. त्या संस्थळावर बराच काल असणार्या कोणा एकाला अपत्य झाले म्हणून त्यावर धागा सुरू केला गेला व त्याला 100 हून जास्त प्रतिसाद मिळाले. कोणा एका सभासदाला अमेरिकेचा व्हिसा मिळाला म्हणून धागा सुरू केला गेला व त्यालाही असेच प्रतिसाद मिळाले. मला हे धागा प्रवर्तक व प्रतिसाद देणारे याबाबत काहीच म्हणायचे नाही. ते त्यांना आवडेल ते करू शकतात. परंतु या संस्थळाचे स्वरूप सोशल क्लब सारखे आहे हे माझ्या लक्षात आले व आपला जीव येथे रमणार नाही हेही समजले. त्यामुळे मी या संस्थळावर क्वचितच जातो.
या तुलनात्मक अभ्यासात सर्वात मोठी तृटी मला ही जाणवली की यात दोन्हीकडे जे धागे सुरू केले गेले त्यांचाच उल्लेख आहे. प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे की दुसर्या संस्थळावर धागे टाकणारे उपक्रमवर ते सहसा टाकत नाहीत व प्रतिसाद क्वचितच देतात. अशा परिस्थितीत तोलनिक अभ्यास फारसा उपयुक्त ठरणार नाही अशी भिती वाटते. (श्री. सुधीर काळे(जकार्तावाले) यांनी नुकतेच दोन्हीकडे धागे टाकले आहेत. त्यांचा या अभ्यासात अंतर्भाव नाही.)
अगदी नाव घेऊन सांगण्यासारखे एक लेखन आहे. शुचि या उपक्रमी दोन्ही कडे लेखन करतात/ उपक्रमवरचे त्यांचे लेखन मला आवडते व त्यांचे प्रतिसादही विचार करण्यासारखे नक्कीच असतात. याच व्यक्तीने दुसरीकडे केलेले लेखन मला अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे वाटले व आवडले नाही. अशा प्रकारच्या लेखनाचा या तौलनिक अभ्यासात अंतर्भावच केला गेलेला नाही.
अशा मूलभूत तृटींमुळे हा अभ्यास पेरू व कापूस यांचा तौलनिक अभ्यास(दोन्ही शेती उत्पादने आहेत या साम्यामुळे) केल्यासारखा झाला आहे असे वाटते
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
काळ हे सुद्धा व्हेरीएबल
पण माझ्या बाबतीत बोलायचं तर केवळ संस्थळ हे व्हेरीएबल नसून काळ हेदेखील आहे. काळानुरूप माझ्यात लक्षणीय बदल झालेला आहे. माझा मोटोच हा आहे की "एव्हरी डे इन् एव्हरी वे आय ऍम गेटींग बेटर अँड बेटर" आणि त्यानुसार मिपावरील झालेल्या कडाडून टीकेमुळे माझ्यात खूप सुधारणा झाली. चार लोकांच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे विचार तपासायची संधी मिळाली. आता परत अंधश्रद्धेचे लेख मी देखील मिपावर टाकणार नाही.
अगदी ताजच उदाहरण द्यायचं झालं तर परवाच सासूबाई म्हणत होत्या की अमक्यांना "अँटीक शॉप मधून" आणलेल्या वस्तू आवडत नाहीत कारण त्या आधी कोणाच्या तरी मालकीच्या असतात आनि त्यात त्या व्यक्तीचा जीव अडकलेला असतो. पूर्वीची मी असते तर ते बोलणे मला ताबडतोब मान्य झाले असते पण यावेळी मी ठणकाऊन सांगीतले की ही अंधश्रद्धा आहे, असे काही नसते.
मिपा ने मला खूप सुधरवले. उपक्रमाचा मला मूळातच धाक वाटतो. उपक्रमाच्या दर्ज्याशी सुसंगत लेखन करायचे म्हणजे मला "हर्क्युलीअन प्रयत्न" वाटतात.
अभिनंदन !
तुम्ही प्रामाणिक आहात हे तुमच्या लिखाणातून वारंवार दिसले आहे.
पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
विषयाबद्दल- सन्जोपरावांशी सहमत्.
अभिनंदन
तुम्हाला नक्की जमेल. अद्याप तुम्ही उपक्रमाचा अंदाज घेता आहात असे वाटते.(प्रतिक्रिया काय मिळेल या अंदाजाने चर्चा टाकता.) पुढल्यावेळेस एखादा विषय घेऊन त्यावर समग्र लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगले लिहिता येईल हे यापूर्वीही कळवले आहे.
अभिनंदन! उपक्रमावरले एक एक उपक्रमीही मला अँटिक शॉपमधून आल्यासारखेच वाटतात. एकच पीस असतो अवेलेबल. ;-) (हे कौतुकाने म्हणते आहे.)
कमिशण करुण लिहुण घेत्ल्यासारखा
हॅहॅहॅ. आदरणिय चंद्रशेखर तुम्ही णेमकं वर्मावर बोट ठेवल्ये. वरिल कौल 'सहज' कुण्या 'कौलघे'कराने कमिशण करुण लिहुण घेत्ल्यासारखा वाटतो आहे.
बंडलबोर
असहमत
'तरी' हा शब्दप्रयोग चूक आहे.
डिग्री ऑफ फ्रीडम दोन नसून एकच (उत्तम विरुद्ध मध्यम/सामान्य) आहे.
--
निष्कर्षासाठी महत्वाच्या अशा तीनच चर्चा आहेत.
पानिपताची मराठी भाषेला देणगी:
अवांतर/गोग्गोड/शून्य-माहिती-देणारे प्रतिसाद पाहिले तर मिपा=३९, उपक्रम=३. म्हणून योग्य तुलना: १३ विरुद्ध ११.
वॉल्वर:
अनवांतर प्रतिसादः मिपा=४!
घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी:
येथे मिपावर नक्कीच अधिक चांगली चर्चा झाली.
--
गूगलवर या तीन शीर्षकांचा शोध घेतल्यावर मला उपक्रमचे दुवे अग्रक्रमाने सापडले.
--
तुम्ही निवडलेला कालखंड उपक्रमवर थोडा शांततेचाच होता हे मात्र मान्य.
--
कशाला नाटके?
गॉच्च्या!
तुलना अयोग्य
वरील प्रतिसादांत मिसळपाव व उपक्रम या संकेतस्थळांची तुलना करणे योग्य नसल्याचे अधोरेखित झाले आहेच. उपक्रमावर येताना साधरणतः कोटटोपी घालून यावे आणि मिसळपाववरबर्म्युडा चड्ड्या घालून (किंवा त्याही न घालता) यावे अशी येणार्यांची मानसिकता आता नव्याने सांगायला नको. (स्त्री सदस्यांनी यात योग्य तो बदल करावा!) एरवी उपक्रमावर गंभीर वैचारिक प्रतिसाद देणारे मिसळपाववर अधिक खेळकर, कोपरखळ्या मारणारे, किंचित चिमटे काढणारे प्रतिसाद देतात, असे माझे सामान्य निरीक्षण आहे. (याला पुष्टी देणारा विदा माझ्याकडे नाही). हे झाले दोन्हीकडे एकाच आयडीने वावरण्यार्या लोकांबद्दल. काही लोक इकडे एक आणि तिकडे एक अशा आयडीने वावरतात, तर काही इकडे अनेक आणि तिकडे अनेक अशा आयडीने. मग तर प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो. हेही आधीच्या चर्चेत बोलून झाले आहे.
मूळ मुद्दा की अशा प्रतिसादांनी संकेतस्थळांचे प्रगल्भ असणे किंवा नसणे ठरवता येते का? तर माझ्या मते नाही. माझे स्वतःचे काही लेखन 'मनोगत' या संकेतस्थळावर आहे आणि त्यातले अगदी थोडे मी मिसळपाववर टाकले आहे. त्याच्या उलटेही आहे. उपक्रमावरचे माझे (वाचकांच्या सुदैवाने माफक ) लिखाण मी बहुदा इतरत्र कुठेही टाकलेले नाही. हा त्या त्या संकेतस्थळांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे.
या चर्चेत उल्लेख केलेल्या दुव्यावरील चर्चेत रावले यांनी 'विधायक आऊटपुट' असा शब्दप्रयोग वापरला आहे. अर्थात विधायक म्हणजे काय हेही व्यक्तिसापेक्षच आहे. 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही. हे असेच एक उदाहरण. उपक्रमावरील काही प्रगल्भ लोकांना विचारुन बघा. तेही असाच निर्वाळा देतील.
माझ्या मते संकेतस्थळ प्रगल्भ किंवा अप्रगल्भ होत नाही. प्रगल्भ होतात ते लोक. आणि प्रगल्भ होत नाहीत तेही लोकच. संकेतस्थळांवर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' किंवा 'प्रपोज कसे कराल?' अशा चर्चा होत असतानाच एखादे प्रगल्भ लिखाणही येऊन जाते. आणि खरोखर माहितीपूर्ण लिखाण होत असतानाच (मग भले ते विकीपिडीयाच्या बुरुजांवर लावलेले निशाण का असेना!) 'डुप्लिकेट आयडीचे काय करायचे?' असाही लेख येऊन जातो. अशातून एखादे संकेतस्थळ प्रगल्भ होते आहे, आणि एखादे होत नाही असे निष्कर्ष काढता येणार नाहीत. नेमाड्यांच्या भाषेत (नेमाडे वगैरे कोट केले की प्रतिसाद 'प्रगल्भ' या क्याट्यागरीत जातो!) 'जिंकणारे कितीही जिंकत चालले असले तरी हरणारे त्यांच्यात घुसून त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना आपापल्या परीने हरवत असतातच!
सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.
+१
विवेचनाशी सहमत आहे.
आमची एक आवडती थिअरी इथे सुचते : सामान्य वाचक/श्रोता/प्रेक्षक हा डिपार्टमेंटल स्टोअर मधे येणार्या ग्राहकासारखा असतो. एकाच श्वासात तो आपल्या शॉपिंग कार्ट मधे दस्त्येव्हस्की आणि ना सी फडके, दोन्ही टाकू शकतो - नव्हे नव्हे , अशा प्रकारचं "शॉपिंग्" करतोच. सामान्य ग्राहक बारा महिने , तीनशे पासष्ट दिवस पौष्टिक आहार करत नाही; बर्गर-पिज्झा-तळकट-तुपटही खातोच.
मुद्दा चांगल्या प्रोडक्ट्स ना बाजारपेठेत स्थान मिळू देण्याइतपतची व्यवस्था आहे की नाही ? असा आहे. ज्या व्यवस्थेमधे अशा चांगल्या प्रोडक्ट्सना वाव मिळणे हळुहळू बंद होते तिथे मग ग्राहकाला पोषणाकरता वाईट प्रतीच्या प्रोडक्ट्स कडे अधिकाधिक वळावे लागते आणि एखाद्या दिवशी विशिष्ट प्रकारचा उत्तम दर्जाचा , पौष्टीक प्रोडक्ट मार्केट मधून नाहीसा झाला आहे असे लक्षांत येते.
वेरिस्टुपिडपीपलिनलार्जग्रूप्स डॉट कॉम
मूळ मुद्दा की अशा प्रतिसादांनी संकेतस्थळांचे प्रगल्भ असणे किंवा नसणे ठरवता येते का?
आणि ठरवायलाच हवे का असाही मुद्दा आहे. अगदी माठपणा सेलिब्रेट/साजरा करणारी संकेतस्थळेही असतात ना. ( बघा: वेरिस्टुपिडपीपलिनलार्जग्रूप्स डॉट कॉम 1 ). एकदम एन्जॉय मुखर्जी बरं का!
एकंदर प्रतिसादातील भावनांशी सहमत.
'पापा कहते है' हे गाणे कुठल्या सिनेमासाठी लिहिले होते, ब्याकग्राउंड काय होते, सिनेमाचा ऑडियन्स कुठला होता हे बघायला हवे.
सर पर हवाए जुल्म चले सौ जतन के साथ
अपनी कुलाह 2 कज 3है उसी बांकपन के साथ
ह्यासारखे शेर लिहिणारा मजरूह फार मोठा कवी आहे. गुलज़ार आहे रेशमी, किनखापी काव्य विणणारा. ( रेशमो-अतलसो-किमखाब में बुनवाए हुए ही फ़ैज़ची ओळ अगदी वेगळ्या संदर्भात आठवली. ;) )
1. "नेवर अंडरएस्टिमेट द पावरॉफ़ वेरी स्टुपिड पीपल इन लार्ज ग्रूप्स"-- गॅलब्रेथ
2. टोपी 3. तिरपी
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सहमत
प्रतिसादाशी सहमत आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वरील
वरील सगळ्यांनी चुका निदर्शनास आणल्या आहेतच त्यापेक्षा अधिक काय लिहिणार?
इसकाळ आणि इबे इंडिया
हि तुलना इसकाळ आणि इबे इंडिया अशी केल्यासारखी वाटते. उपक्रमच भारी अथवा दुसरे भंकस असे अजिबात म्हणायचे नाही. मी फक्त उपक्रमावरच सदस्य आहे. मला ते चांगले वाटते. मुळात या दोन्ही संकेतस्थळांचा उद्देशच वेगळा आहे. त्यामुळे हि तुलना मला योग्य वाटत नाही. हां, तुलना करायची तर मनोगत आणि मिसळपाव करा. त्यांचा उद्देश जवळपास एकसारखा आहे. पण परत त्यांची सदस्य नियमावली वेगळी असेल. तुलना करताना एक सारख्या गोष्टींची करा. फक्त मराठी संकेतस्थळ म्हणून करु नका.
माझ्या दृष्टीने उपक्रम जास्त प्रगल्भ वाटते. का? चंद्रशेखर यांनी योग्य कारणमीमांसा केली आहेच. तेच तेच परत लिहिण्यास काही अर्थ नाही.
बाकी लेख उत्तम मांडला आहे. अगदी उपक्रमाला साजेलसा :)
संख्या
अशामुळे उपक्रमाची प्रगल्भता कमी होत नाही ना? वरील लेखक "सहमत आहे" असा प्रतिसाद संख्येत गृहीत धरतो की नाही हे विचारु. म्हणजे पुढच्या वेळी नुसतं सहमत असं लिहीण्याऐवजी कमीत कमी चार-पाच लायनी उपक्रम के नाम प्रत्येक लेख-चर्चेत खरडतोच पहा.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
स्तुत्य प्रयत्न आणि प्रतिसाद
उपक्रम आणि मिसळपाव संकेतस्थळांची (किंवा कुठल्याही 'अ' आणि 'ब' वस्तूंची) तुलना होते आहे, असे जाणवले, की अशा प्रकारचा विचार विधायक असतो.
तुलनेची परिमाणे काय आहेत? तुलनेच्या क्रियाशील फलिताशी त्या परिमाणांचा संबंध कितपत घट्ट आहे? वगैरे दिशेने विश्लेषण जावे.
"सफरचंदे आणि संत्री यांची तुलना करू नये" हे परमार्थाने योग्य तत्त्व नव्हे. "अमुक एका क्रियाशील फलिताच्या संदर्भात तुलना नि:संदर्भ आहे", "तमुक एक क्रियाशील फलिताच्या संदर्भात तुलना सुसंदर्भ आहे" अशा प्रकारची मीमांसा मला जास्त उपयोगी वाटते.
ज्या बागायतदाराला उपलब्ध प्लॉटवर सफरचंदाची बागायत किंवा संत्र्यांची बागायत करायची असेल, त्याला "या फळांच्या झाडांची निगा तुलनात्मक किती कठिण आहे?", "या दोन फळांचा तुलनात्मक बाजारभाव काय आहे?", "मला घरा-गोदामात संत्र्याचा वास अधिक आवडेल की सफरचंदाचा?" वगैरे तुलना करणे ठीकच आहे. सुसंदर्भ आहे. पण सुसंदर्भता समजण्यासाठी क्रियाशील पार्श्वभूमी द्यावी लागते.
मात्र अन्य ठिकाणी तुलना नि:संदर्भ आहे. तेथेसुद्धा नि:संदर्भतेसाठी क्रियाशील पार्श्वभूमी द्यावी लागते.
मराठी भाषेतील वेगवेगळ्या संकेतस्थळांची तुलना होते, हे तर आपले साक्षात् निरीक्षण आहे. मला असे वाटते, की "संकेतस्थळ-व्यवहारासाठी आपल्या रोजच्या कार्यक्रमात मर्यादित वेळ उपलब्ध असतो, तिथे अमुक संकेतस्थळावर वेळ खर्च करावा, की तमुक" वगैरे क्रियाशील पार्श्वभूमी आहे.
कुठल्या क्रियाशील पार्श्वभूमीत असे विश्लेषण नि:संदर्भ आहे, हे श्री. चंद्रशेखर वगैरे यांनी सांगितले आहेच.
प्रगल्भ समाज की प्रगल्भ सदस्य? अशी वेगळीच आणि वेगळ्या ठिकाणी उपयुक्त क्रियाशील पार्श्वभूमी श्री. सन्जोप राव यानी समजावून सांगितलेली आहे.
पण कोणी कुठल्या कारणाने तुलना करून काही क्रिया-निर्णय घेऊ बघत असेल, म्हणा. मग त्यासाठी कोण काय निकष वापरते (प्रगल्भता, मनोरंजन, लोकसंग्रह) आणि त्यासाठी काय परिमाणे वापरते (वरील हिशोबतक्त्यातले तपशील, रंजनाबाबत असाच कुठला तक्ता, सदस्यसंख्या-प्रतिसादसंख्या) त्यांचे विश्लेषण व्हावेच.
- - -
पुढील निकष जोडता येतील काय?
१. ज्या लेखांबद्दल वरील विश्लेषण करण्यालायक आहे असे चर्चाप्रस्तावकाला वाटते, ते एकूण लेखांपैकी किती टक्के आहेत? किती सहज सापडण्यासारखे आहेत? (हे अनेकांनी सांगितलेच आहे).
२. अनेक समविचारी परीक्षकांची परीक्षणे संकलित करावी (हे अनेकांनी सांगितलेच आहे).
- - -
प्रयत्न स्तुत्य असला - आहेच - तरी माझा याबाबतीत फार डोके खर्च करण्याइतपत रस नाही. क्षमस्व.
काही खुलासे
प्रतिसादांबद्दला सर्वांनाच धन्यवाद. बहुतेकांनी स्तुत्य प्रयत्न असे म्हटल्यामुळे माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. मात्र माझी काहीशी निराशा झाली हे कबुल केल्यावाचून राहावत नाही. संस्थळांच्या प्रगल्भतेच्या एका अंगाचा केवळ एका महिन्यापुरता अभ्यास करून मी माझी पद्धती मांडली. मला अपेक्षा होती की ही पद्धती सुधारता कशी येईल, अधिक प्रभावी कशी करता येईल, प्रमाणभूत कशी करता येईल यावर किमान काही उत्साही सूचना येतील. परंतु बहुतेक प्रतिसादांचा स्वर - ही तुलना करणे योग्यच नव्हे किंवा अशी तुलना करताच येऊ शकणार नाही - या स्वरूपाचा नकारात्मक वाटला.अनेकांनी निव्वळ 'इतरांनी म्हटले आहेच' हे जणू काहीतरी सिद्ध करणारे विधान असल्यासारखे भिरकावले आहे. किंवा आपले पूर्वग्रह पुन्हा ठासून सांगितले आहेत.
असो.
नाही म्हणायला अनेक समविचारी परीक्षकांची परीक्षणे संकलित करावी अशा सूचना आल्या. त्यांचे स्वागतच आहे. या संकलनातले एक
प्रत्येकाच्या प्रतिसादाला स्वतंत्र उत्तरे देण्याऐवजी एकच प्रतिसाद सर्वांना उद्देशून देतो. जेणेकरून माझे विचारदेखील एकत्रित स्वरूपात दिसू शकतील, व ज्यांना पुढे चर्चा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक सामायिक आरंभबिंदू मिळेल.
सहस्रबुद्धे - अभ्यासक व गुण देणारे एकच असणे ही वरवरची त्रुटी आहे. आपण व इतर प्रतिसादकांनी हे गुणमूल्यन पटले नसल्यास विशिष्ट बाबतीत सुधारणा सुचवाव्यात, जेणेकरून ही त्रुटी दूर होईल. खरे म्हणजे ही अभ्यासपद्धती वाचकांसमोर सादर करून वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादांवरून तीत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रगल्भतेबाबत आधी म्हटल्याप्रमाणे हा एका अंगाचा विचार आहे. आणि शेजाऱ्याशी तुलना करणे अधिक स्वाभाविक आहे. सोपे, कमी व्याप्तीचे उपक्रम आधी संपवून त्यातून मिळणाऱ्या ज्ञानातून अधिक कठीण कार्याला हात घालणे अधिक नैसर्गिक नव्हे काय? (माझ्या पटलावर ती सारणी बरोबर दिसते आहे)
धम्मकलाडू - सामायिक विषयांचा अभ्यास करणे हे ज्यास इंग्लिशमध्ये लो हॅंगिंग फ्रूट म्हणतात तसे आहे. सफरचंदांची सफरचंदांशी तुलना करता येते. त्यात एका बागेत जर अनेक फळझाडे उगवत असतील आणि दुसऱ्या बागेत मुख्यत्वे सफरचंदे असतील तर या बागेतली सफरचंदे व दुसऱ्या बागेतली त्याच जातींची सफरचंदे यांची तुलना करणे अतिशय साहजिक आहे. नव्हे नव्हे गरजेचे आहे.
रिकामटेकडा - आपले डिग्री ऑफ फ्रीडमचे विधान समजले नाही. ३९, ३ व त्यावरून १३, ११ हे कसे काय आले तेही कळले नाही. कृपया समजावून सांगा. मी इतका गहन विचार न करता संपूर्ण सारणीचे संक्षेपीकरण करत होतो. म्हणजे 'क्ष देशाला अधिक सुवर्णपदके मिळाली असली तरी य देशाला मात्र रौप्य व ब्रॉंझ पदके अधिक मिळालेली आहेत' अशा स्वरूपाचे ते विधान होते. यात डिग्री व फ्रीडम कसे येतात?
धनंजय - सफरचंदांची तुलना सफरचंदांशी करण्याविषयी तुम्ही दिलेला दृष्टांत तितकासा योग्य नाही. किंवा खरे तर इथे तो कितपत लागू होतो हे विवाद्य आहे. असे समजा एका मठाची तुलना एका गावाशी करायची आहे. तर ती कोणत्या निकषांवर करता येते? मग गावातले देऊळ या विशिष्ट मठापेक्षा अधिक पवित्र/धार्मिक आहे का असा प्रश्न विचारता येतो. जर देवळातल्या प्रवचनाला अनेक भक्तगण रंगून, भक्तिभावाने न्हाऊन जाऊन तल्लीन होत असतील, व मठातल्या त्याच प्रवचकाच्या प्रवचनाला लोक तितका समरसून प्रतिसाद देत नसतील - तर त्यावरून काही निष्कर्ष काढता यावेत. तुलनेला मर्यादा असल्यामुळे तुलनाच होऊ शकत नाही हे तुलना करण्यास नकार देण्याचे निव्वळ कारण वाटते.
खुलासा
तुम्ही केलेली तुलना ५२ विरुद्ध १४ अशी आहे. ३९ आणि ३ हे मी स्वतः मोजले. ५२-३९=१३, १४-३=११. शिंपल!
प्रत्येक देशाला ७ पदके मिळणारच आहेत. त्यामुळे, "मिपा: २ सुवर्ण + ५ कचरा, उपक्रमः ० सुवर्ण + ७ कचरा" इतकाच तुमचा निष्कर्ष आहे. म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम १. 'तरी' हा शब्दप्रयोग त्यामुळे चूक आहे.
ट्याली -
>> म्हणजे 'क्ष देशाला अधिक सुवर्णपदके मिळाली असली तरी य देशाला मात्र रौप्य व ब्रॉंझ पदके अधिक मिळालेली आहेत' अशा स्वरूपाचे ते विधान होते. यात डिग्री व फ्रीडम कसे येतात
तुकडी अ आणि ब (वर्ग १०वी) :
अ - ८०% च्या वर २५ मुले , ६०-८०% मधे २० मुले , ४०-६०% - १० मुले
ब - ८०% च्या वर ५ मुले , ६०-८०% मधे ३५ मुले , ४०-६०% - १५ मुले
खरे पाहता अ तुकडी ब पेक्षा सर्वच तुलनेत भारी आहे..
तुम्ही हा मुद्दा लक्षात नाही घेतला की अ तुकडी मधे ६०% च्या वर २०+२५ = ४५ मुले आहेत.
तुमच्या म्हणन्या प्रमाणे तुकडी ब मधे फर्स्ट क्लास वाले जास्त आहेत (३५), परंतू खरे पाहता अ मधे फर्स्ट क्लास वाले ४५ आहेत.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
गैरसमज
तुलनेची क्रियाशील पार्श्वभूमी सांगितल्यास कोणत्याही गोष्टींमध्ये तुलना होऊ शकते असे माझे मत वर सांगितले होते. त्यातून अतिशय उलटा असा "धनंजयचे मत असे की तुलना होऊ शकत नाही" हा अर्थ कसा काय निघू शकतो, याबद्दल कोड्यात पडलो आहे.
बाग आणि सफरचंदाची झाडे
माझ्यामते चर्चा आहेत सफरचंदाची झाडे. सफरचंद नव्हे. तर प्रतिसाद हे सफरचंद.
'अ' बागेत अनेक सफरचंदांचीही झाडे आहेत. त्या सफरचंदांच्या झाडांना या बारी/मोसमात फळे लागली नाही, किंवा कमी लागली असे फारतर म्हणता येईल. आहेत. पण त्या बागेत एकूण फळझाडांत किडकी, रोगट, ब्लाइटेड झाडे नाहीतच. आणि किडक्या वांग्यांसाठी इथे स्ट्रॉबेरीची रोपे उखडून टाकत नाहीत. उखडून टाकण्याची फारशी पाळीच येत नाही. कारण बहुधा तसली रोगट, किडकी झाडे 'अ' बागेत टिकत-तगत नाहीत. (कंटाळून कोमेजून जातात.)
एकूणच 'अ' सफरचंदाला सोबतही चांगली आहे. तिथली जमीनही फार सुपीक आहे. तण अजिबात नाही. आणि स्वच्छ पाणीही (नाल्याचे 'दूषित' पाणी नव्हे) भरपूर आहे. हवाही स्वच्छ, मोकळी आणि खुली आहे.
आता 'ब' बागेत किती सफरचंदाची झाडे आहेत, त्याला किती सफरचंदे लागली आहेत ह्याचे काय करायचे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सूचना
सहस्रबुद्धे - अभ्यासक व गुण देणारे एकच असणे ही वरवरची त्रुटी आहे. आपण व इतर प्रतिसादकांनी हे गुणमूल्यन पटले नसल्यास विशिष्ट बाबतीत सुधारणा सुचवाव्यात, जेणेकरून ही त्रुटी दूर होईल. खरे म्हणजे ही अभ्यासपद्धती वाचकांसमोर सादर करून वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादांवरून तीत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रगल्भतेबाबत आधी म्हटल्याप्रमाणे हा एका अंगाचा विचार आहे. आणि शेजाऱ्याशी तुलना करणे अधिक स्वाभाविक आहे. सोपे, कमी व्याप्तीचे उपक्रम आधी संपवून त्यातून मिळणाऱ्या ज्ञानातून अधिक कठीण कार्याला हात घालणे अधिक नैसर्गिक नव्हे काय? (माझ्या पटलावर ती सारणी बरोबर दिसते आहे)
मी लिहिलेला प्रतिसाद या निमित्ताने परत वाचला. त्यात दिलेले दोष कसे काढायचे याच्या सूचना दिल्या आहेत. कदाचित नजरे आड झाले असेल म्हणून खाली तोच परिच्छेद परत देतो.
या प्रयोगातले अभ्यासक तुम्हीच आहात आणि गुण देणारे पण तुम्हीच आहात (असे वाटले). हे बदलता आले तर बघा. (म्हणजे दोन्हीकडे वाचक असलेल्यांची मते घ्यावी लागतील.)
काही लेखक दोन्ही कडे लिहितात. तुम्ही लिहिलेल्या उदाहरणात एकच लेख दोन्ही कडे आला आहे. मात्र काही लेखक हा लेख इकडे आणि हा लेख तिकडे असे ठरवतात (असावेत.). यात संस्थळाचे नियमानुसार दोन्हीकडे प्रसिद्ध होऊ शकतो अशा लेखांचे महत्व जास्त आहे. अशा लेखांची तुलना करता येऊ शकते. (त्यासाठी परत दोन्ही कडच्या वाचकांची मते घ्यावी लागतील. आणि लेखकांची मते पण घ्यावी लागतील.) आधी-नंतर (म्हणजे आधी कुठे प्रसिद्ध झाला.) का एकाच वेळी या घटकाचाही तुलनात्मक अभ्यासात विचार पाहिजे.
एकंदर वाचक/सभासद संख्या त्यातील नियमीत भेट देणारे (ही माहिती संस्थळव्यवस्थापकांकडे) यांची तुलना होणे आवश्यक आहे. म्हणजे प्रतिसाद संख्येची तुलना प्रगल्भता दाखवू शकते.
हे एवढे होऊनही प्रगल्भता हाती येणार नाही असे वाटते. (प्रगल्भता मोजताच येणार नाही या विचाराचा मी नाही.) या वरून कदाचित वाचकांच्या प्रगल्भतेचा अभ्यास करता येईल. पण लेखांच्या (आणि लेखकांच्या) प्रगल्भतेचे काय? (दोन्ही कडचे लेख-लेखक निराळे असल्याने). संस्थळाची प्रगल्भता माझ्या मते चर्चेसहित लेख लेखकांच्या प्रगल्भतेने मोजायला हवी. कदाचित त्यास मी जास्त अग्रक्रम देईन.
तुमचे प्रतिपादन आणि उत्तर वाचून वाटले की प्रगल्भतेऐवजी तुम्ही लोकप्रियता मोजत आहात.
बाकी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची तुम्ही केलेल्या गुणवारीशी तुलना मी विनोदाचा भाग समजतो. (तसे नसल्यास प्रतिसाद थांबवायला हरकत नाही.)
प्रमोद
तेरे मस्त मस्त....
संस्थळाच्या तुलनेचा विदा अपूरा वाटत असल्यामुळे एक हौशी वाचक म्हणून वर उल्लेख आलाच आहे तेच पुन्हा म्हणतो की संस्थळावरील प्रगल्भपणा हा त्या संस्थळावर वावरणा-या सदस्यांवर अवलंबून असतो.
संपादित.
-दिलीप बिरुटे
भान
संस्थळांची प्रगल्भता शोधणक्ष् हा जर हेतू असेल तर तुमची पद्धती ठीक वाटते. अर्थातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे चर्चांची जातकुळी, त्यांमध्ये वाचकांचा समरसून सहभाग हे एक अंग झालं.
माझा आक्षेप या हेतूच्या कोतेपणाबद्दल आहे. धम्मकलाडूंच्या मूळ लेखाला दिलेल्या प्रतिक्रियेत मी म्हटलं होतं
तेव्हा तुमच्या अभ्यासपद्धतीत हे भान ठेवलेलं असेल तर उत्तम.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
विनंती
तर तुमची पद्धती ठीक वाटते.
पद्धती कशी ठीक ते शक्य असल्यास समजावून सांगावे ही विनंती.
माझ्यामते एखाद्या संकेतस्थळावर कुठली गोष्ट होत नाहीत ह्यावरून त्या संकेतस्थळाची प्रगल्भता किती हे कळते, ठरते.
उदारणार्थ:.
खुन्यांचा (नथूरामचा) उदोउदो न करणे
संकुचित धर्मवादी किंवा जातीयवादी विचारांना प्रोत्साहन न देणे
कमरेखालच्या किंवा द्वयार्थी विनोदांना प्रोत्साहन न देणे
अंधश्रद्धेला प्रोत्साहन न देणे
स्त्रियांना कमी न लेखणे
ह्याशिवाय टिंगल, टवाळी, टीका सहन करण्याच्या कुवतीबाबतीत मूळ चर्चेतही मी लिहिले आहेच.
न्यूटनने म्हटलं होतं की ज्ञान वाढण्याचं एक लक्षण म्हणजे आपलं किती अज्ञान बाकी आहे याची कल्पना येणं. झुरळाला कदाचित आपण मुंगीपेक्षा मोठे आहोत यात समाधान मिळेल. ज्ञानी माणूस भोवतालचा सागर किती विशाल आहे याने थक्क होऊन जाईल. याला मी प्रगल्भता म्हणतो.
तुमचे विचार उदात्त आहेत. आणि मी त्यांच्याशी सहमत आहेच. मूळ चर्चेत सहमत व्हायचे विसरून गेलो होतो ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नीरस चर्चा
कृपया फार मनावर घेऊ नये. मुळात माझ्या प्रतिसादाचा मतितार्थ 'मार्ग ठीक आहे (असेलही) पण तुमच्या ध्येयामध्ये मला फारसा रस नाही' असा होता. त्यामुळे ठीक हा शब्दप्रयोग तितक्याच महत्त्वाने घ्यावा.
पुन्हा, फार मनाला लावून घेऊ नका. त्याच प्रतिसादातल्या 'तुम्ही मानसिक वय कसं काढता ते सांगा' या विनंतीला उत्तर द्यायलाही विसरला होतातच.
असो. या चर्चेत मला फार रस नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
नाही हो
नाही हो. आम्ही कसले मनावर घेतोय. मथितार्थ लक्षात आला. तुम्ही खाजगीवाले नाही आहात हेही कळले.
नाही हो. पुन्हा, आम्ही कसले मनावर घेतोय. तुमचे विचार उदात्त आहेत हे खरेच आम्ही प्रामाणिकपणे म्हटले होते ;) तर आम्ही त्या विनंतीला उत्तर द्यायला विसरलो होतो खरे. पण आम्हाला मानसिक वय काढता आले असते असे वाटत नाही. विनंतीला उत्तर द्यायला हवे होते.पण खरेच विसरून गेलो. असो.
बाय द वे, हे 'मनावर घेणे आणि पुन्हा मनावर घेणे' हे आमच्या 'शांत व्हा. टाळ्या, पुन्हा टाळ्या' शैलीच्या धरतीवर दिसते. हाहाहा. ( अभ्यासकांसाठी: शैलीची वानगी आमच्या खरडवहीच्या प्रस्तावनेत सापडेल.)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
निषेध
हा विश्लेषणात्मक अभ्यास(किंवा खेळ) आहे असे मत मी काल नोंदविले होते. खाजगीवाल्यांचे ज्ञात उपक्रमी *आयुष्य हे २ दिवसांचे आहे, त्या **अनुभवावर त्यांनी हा लेख लिहिला हे विधान लक्षात घेतल्यास केवळ आत्त-विश्लेषण म्हणून कदाचित हा लेख योग्य असेल पण प्रगल्भता आहे कि नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याचे मूल्य कमीच आहे, किंवा समीक्षण ज्या गोष्टीचे करतो ती स्वतःला येणे गरजेचे नाही हे धोरण असणार, असे असल्यास त्यास समीक्षण म्हणणार कि नुसतीच प्रतिक्रिया हे नीटसे कळू शकते.
*उपक्रमवरचे आयुष्य ह्यामध्ये लेख/चर्चा/प्रतिसाद ह्याचा अंतर्भाव आहे.
**अनुभवात नमुना जो घेतला आहे तो निष्कर्षाची पातळी ठरवतो.
ह्या आशयाचा माझा प्रतिसाद पूर्णपणे संपादित केला गेला (कारण समजले नाही), त्याचा निषेध आहे.
बाकी विंगेत किती लोक आहेत हे अजून कळले नाही.
या धाग्यावरच्या प्रतिक्रियांचे संपादन
मिसळपावावर या धाग्यावर आतापर्यंत आलेले प्रतिसाद - ३३
त्यांपैकी संपादित झालेले प्रतिसाद - १ (अवलिया - 'अपशब्द संपादित' अशा स्पष्टीकरणासहित)
उपक्रमावर या धाग्यावर आतापर्यंत आलेले प्रतिसाद - ३२
त्यांपैकी संपादित झालेले प्रतिसाद - २ (आजूनकोणमी आणि प्रा. डॉ. बिरुटे - कोणतेही स्पष्टीकरण नाही)
या माहितीवरून 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे' यामध्ये उपक्रम मिसळपावाच्या पुढे जाऊ पहाते आहे असे म्हणण्याचा मार्ग खुला आहे काय?
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
स्वाभाविक
तेथे टीकाकारांना प्रवेशच मर्यादित आहे ना!
--
दोनच नव्हे, किमान २० तरी प्रतिसाद येथून उडालेले असावेत;)
सहमत
पूर्वीच्या तुलनेत मिपावर टीकाकारांची संख्या फारच मर्यादित दिसते. किंबहुना मागे एका सन्माननीय सदस्यांनी उपक्रमावरचे सदस्य दंगा करणाऱ्यांना जसा स्वतःहून चाप लावतात तसे मिपावर होत नाही, तिथे संपादकांचा हस्तक्षेप आवश्यक ठरतो असे म्हटल्याचे आठवते. (दुवा सापडला की देतो).
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ऑं?
काय सांगताय? अरेरे, असे व्हायला नको होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशाने. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी आपले वर्तन असे होऊ देऊ नये. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. "You agree not to post any abusive, obscene, vulgar, slanderous, hateful, threatening, sexually-oriented or any other material that may violate any applicable laws" याच्याशी मी बांधील असेन.
मी इथे असतो.
मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही. मी यापुढे संपादित करावे लागतील असे प्रतिसाद देणार नाही.
नेसेसरी बट इन्सफिशंट
अवांतर, वैयक्तिक, किंवा हिशोब चुकते करण्यासाठी असलेले प्रतिसादही त्याज्यच!
क्ष्
अगदी
अगदी. हेच आणि असेच. सहमत.
याला म्हणतात प्रगल्भता.
मी इथे असतो.
+१
>>दोनच नव्हे, किमान २० तरी प्रतिसाद येथून उडालेले असावेत
सहमत आहे. श्रावण मोडक +धम्मकलाडू यांचे काल रात्रीचे प्रतिसाद संपादित झाले आहेत.
नितिन थत्ते
धाग्याचा खरडवहीसारखा उपयोग
हा प्रश्न असाही विचारता येईल: धाग्याचा खरडवहीसारखा उपयोग करण्याच्या बाबतीत उपक्रमाचे धोरण लवचिक करून उपक्रमाला त्याबाबतीत पुढे नेण्याचा मार्ग खुला करता येईल काय?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अभ्यासपूर्ण लेख?
उपक्रम आणि/किंवा धम्मकलाडू यांच्या मताप्रमाणे अवांतर पण माहितीपूर्ण प्रतिसाद कुठे संपतात आणि धाग्याचा खरडवहीसारखा वापर नक्की कधी सुरू होतो यावर एक अभ्यासपूर्ण लेख मिळण्याची शक्यता किती?
सहमत
असा लेख इथल्या प्रगल्भतेत भर टाकणाराच असेल हे नक्की.
मी इथे असतो.
अनावश्यक आहे
असा लेख अनावश्यक आहे असे वाटते. मनोगतावर हे सर्व मुद्दे 'कवर' करणारा लेख आधीच उपलब्ध आहे. त्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा.
दुवाः http://www.manogat.com/node/8350
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चालू द्या.
अवांतर पण माहितीपूर्ण प्रतिसादाबाबत उपक्रमावर वेळोवेळी चर्चा झाली आहे. दुर्बीण लावून शोधा.
आणि धाग्याचा खरडवहीसारखा वापर नक्की कधी सुरू होतो यावर एक अभ्यासपूर्ण लेख मिळण्याची शक्यता किती?
माझ्याकडून शक्यता नाही. पण तुम्ही ह्यावर पीएचडीचा प्रबंध लिहू शकता. चालू द्या.
बास झालं. चला घरी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वरचा प्रतिसाद अवांतर नसेल तर हा ही नसावा
प्रकाटाआ.
वरचा प्रतिसाद अवांतर नसेल तर हा ही नसावा
आंजावरचे संदर्भ शोधायला गुगल वापरावे का दुर्बिण?
असो. मी सदर प्रश्न विचारला कारण "फक्त गूगल करण्याचे सल्ले देण्यापेक्षा आपण स्वतः माहिती गोळा करून ती उपक्रमावर सादर करा, त्यावर चांगली चर्चा करता येईल" अशा अर्थाचा माझा एक प्रतिसाद याच धाग्यावरून गायब झालेला दिसत आहे.
>> माझ्याकडून शक्यता नाही. <<
ओक्के.
>> पण तुम्ही ह्यावर पीएचडीचा प्रबंध लिहू शकता. चालू द्या. <<
तुम्ही पुरेसं फंडींग देणार असाल तर एक का सतरा प्रबंध लिहिता येतील. असो.