संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास
नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती.
सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली. मात्र या सगळ्या गदारोळात प्रगल्भता मोजण्याच्या निकषांकडे दुर्लक्षच झाले. या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच लक्ष पुनर्केंद्रित व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.
लेखनहेतू
प्रगल्भतेचे निकष कसे ठरवावे हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण प्रगल्भता ही काही भौतिक राशी नाही जी एखाद्या उपकरणाने मोजता यावी. तसेच ती जनसामान्यांच्या कौलावरूनही ठरू नये असे वाटणे साहजिक आहे. नाहीतर जे लोकप्रिय ते प्रगल्भ असे मानले जाण्याचा धोका उद्भवतो. म्हणजे केवळ आमीर खानचा चेहेरा फिल्मफेअरच्या सर्वसामान्य वाचकांना गोड वाटला म्हणून त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनण्याचा मान मिळतोच, पण त्या जखमेवर मीठ चोळणे म्हणून की काय 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही.
परंतु मग प्रगल्भता ठरवावी कशी, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. त्यासाठी तुलनात्मक अभ्यास हा एकच पर्याय शिल्लक रहातो. सुदैवाने संस्थळांवर होणाऱ्या लेखनात अनेक सामायिक दुवे असतात, जेणेकरून हा अभ्यास शक्य होतो. एकच लेखक, एकच लेख दोन संस्थळांवर प्रसिद्ध करतो. अशा सामायिक लेखांना विशिष्ट संस्थळावर काय प्रकारचे प्रतिसाद मिळतात, किती खोलवर चर्चा होते, चर्चा भरकटते की फुलते, अवांतरात जाते की मूळ विषयांच्या अनेकविध पैलूंना स्पर्श करते, वाचक चर्चाविषयाबाबत उदासीन आहेत की तावातावाने तावताव लिहितात यावरून काही निष्कर्ष काढता येतात. या लेखात अशाच दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.
तुलनेच्या पद्धती व निकष
मिसळपाव व उपक्रम या दोन संस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या गेल्या महिन्याभराच्या काळातल्या लेखनाचा या तुलनेत अंतर्भाव आहे. या काळात जे जे सामायिक लेख दोन्ही संस्थळांवर प्रसिद्ध झाले तेवढेच या तुलनेसाठी विचारात घेतले आहेत. तुलना करताना मूळ लेखाचा अगर चर्चाप्रस्तावाचा दर्जा विचारात घेतला नाही, कारण अर्थातच तो दोन्ही संस्थळांसाठी समान आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. या मूल्यमापनासाठी खालील गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत.
१. प्रतिसादसंख्या - अर्थातच संख्येवरून दर्जा ठरत नाही हे उघडच आहे, पण तरीही प्रतिसादसंख्येवरून एकंदरीत वाचकवर्गाच्या चर्चाप्रस्तावाबद्दलच्या उत्साहाचं मोजमाप होऊ शकते. अवांतर प्रतिसादांमुळे हा आकडा फुगलेला नाही याचाही विचार करण्यात आला.
२. वाचकांचा सहभाग/समरसता - निव्वळ 'लेख आवडला' इतपतच प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादांना 'हा लेख आवडला याचे कारण म्हणजे...' या स्वरूपाच्या प्रतिसादापेक्षा कमी महत्त्व दिलेले आहे. एखाद्या चर्चेत किती लोकांनी किती समरसून भाग घेतला हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो.
३. माहिती/पैलू - एखाद्या विषयाची नवीन माहिती चर्चेतून उपस्थित झाली का? चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का? यावरून निश्चितच दोन चर्चांची तुलना करता येते.
४. वाचनीयता - ही चर्चा पुन्हा वाचावीशी वाटेल का? या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का? आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का? या प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा किती यशस्वी झाली याबद्दल अटकळ बांधता येते.
या चारही निकषांचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक लेखा/चर्चेसाठी मिसळपाव व उपक्रम या संस्थळांवरील चर्चांना सामान्य, चांगली, व उत्तम अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.
तुलनात्मक सारणी
Sheet1
A | B | C | D | E | F | G | H | I | J | K | L | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ||||||||||||
2 | ||||||||||||
3 | ||||||||||||
4 | ||||||||||||
5 | ||||||||||||
6 | चर्चा/लेखाचे नाव |
लेखक | उपक्रम | मिसळपाव | ||||||||
7 | हॉम रॉंग | निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती सामान्य, वाचनीयता सामान्य |
||||||||
8 | ऍबल कॉन एला |
निनाद | १४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
१४ प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू व वाचनीयतेला मर्यादा |
||||||||
9 | तोक्यो गोमी ओन्ना |
निनाद | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | 6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य | ||||||||
10 | पानिपताची मराठी भाषेला देणगी |
चिंतातूरजंतू | 14 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग मध्यम, माहिती व पैलू मध्यम, वाचनीयता मध्यम |
52 प्रतिसाद, वाचक सहभाग उत्तम, माहिती व पैलू उत्तम, वाचनीयता उत्तम |
||||||||
11 | वॉल्व्हर | निनाद | 9 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता सामान्य |
31 प्रतिसाद, वाचक सहभाग चांगला, पैलू व माहिती चांगली, वाचनीयता चांगली |
||||||||
12 | सायलेंटियम | निनाद | 5 प्रतिसाद, वाचक सहभाग सामान्य, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
13 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू सामान्य, वाचनीयता मध्यम |
||||||||
13 | घरकाम/बालसंगोपन आणि जीडीपी |
राजेश घासकडवी | 13 प्रतिसाद, यथातथा सहभाग, मर्यादित पैलू, मर्यादित वाचनीयता |
80 प्रतिसाद, समरसून सहभाग, अनेकविध पैलूंना स्पर्श, वाचनीयता उत्तम |
||||||||
14 | ||||||||||||
15 | ||||||||||||
16 | ||||||||||||
17 | ||||||||||||
18 | उत्तम | मध्यम | सामान्य | |||||||||
19 | उपक्रम | 0 | 2 | 5 | ||||||||
20 | मिसळपाव | 2 | 1 | 4 | ||||||||
21 |
एकंदरीत या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सात लेखांसाठी सारांश असा येतो
संस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य
उपक्रम ------0----2-----5
मिसळपाव----2----1-----4
उत्तम चर्चांच्या संख्येमध्ये मिसळपाव पुढे असले तरी मध्यम व सामान्य दर्जाच्या चर्चांमध्ये उपक्रमने बाजी मारलेली आहे.
निष्कर्ष व पुढील चर्चा
संस्थळांची प्रगल्भता कशी मोजावी यासाठी एक तुलनात्मक अभ्यास आम्ही सादर केला. यातून अर्थातच कुठचे संस्थळ प्रगल्भ आहे याबाबतीत निष्कर्ष काढायचा नसून धम्मकलाडूंनी मांडलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रगल्भतेचे निकष निश्चित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा आहे. ही पद्धती प्रस्थापित झाली तर यापुढे दर महिन्याला संस्थळांचे रॅंकिंगही ठरवता येईल. अर्थातच या पुढच्या गोष्टी झाल्या.
Comments
जमवू की
हाहा. गूगलची दुर्बीण/दुर्बिण हो.
बाकी तुमचा तो प्रतिसादही कोलॅटरल ड्यामेजात गेला असावा.
>> पण तुम्ही ह्यावर पीएचडीचा प्रबंध लिहू शकता. चालू द्या. <<
तुम्ही पुरेसं फंडींग देणार असाल तर एक का सतरा प्रबंध लिहिता येतील. असो.
हरकत नाही. फंडिंग जमवू की. कृपया डिटेलवार प्रस्ताव पाठवावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नाही समजलं.
>> हाहा. गूगलची दुर्बीण/दुर्बिण हो. <<
गूगलची दुर्बीण/दुर्बिण वापरून उपक्रमाचा धांडोळा घ्यायचा?
>> बाकी तुमचा तो प्रतिसादही कोलॅटरल ड्यामेजात गेला असावा. <<
मला वाटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी. बरं झालं सांगितलंत ते.
>> हरकत नाही. फंडिंग जमवू की. कृपया डिटेलवार प्रस्ताव पाठवावा. <<
नको. कोल्याटरल ड्यामेजची फार भीती वाटते आता.
हो का?
हो का? . पण इथे तसले प्रकार होत नाहीत. पुढचे तुमच्या खरडवहीत.
माझ्यामते तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला सांगावं लागू नये.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मला वाटते
मला वाटते एकमेकांच्या भेटीचे, वाढदिवसांचे इतरांना माहीत नसलेले संदर्भ, त्या अनुषंगाने धाग्यावरच देण्यात येणाऱ्या शुभेच्छा, संध्याकाळी 'कवी' किंवा 'पूनम' मध्ये कोण 'बसणार' आहे, काय 'घेणार' आहेत, बिल कोण भरणार आहे, ही बैठक कोणत्या कारणास्तव आहे, कोणाचा १ बीएचके फ्लॅट उपलब्ध आहे व तिथे प्यार्टी होणार आहे या सर्वांचे त्रयस्थ सदस्याच्या दृष्टीने स्वारस्य नसणारे उल्लेख वारंवार होत असल्यास धाग्याचा खरडवहीसारखा वापर सुरु होत आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
अधिक माहितीसाठी 'सुसंबद्ध आणि सार्वजनिक स्वरूपाचे लेखन' या लेखाचा लाभ घ्यावा
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लिंकबद्दल धन्यवाद. पण ...
... सदर लेख सव्वाचार वर्ष जुना आहे. 'मनोगत' आणि 'उपक्रम' ही दोन वेगवेगळी संस्थळं आहेत. तेव्हा स्थल-कालानुसार काही बदल (उत्क्रांती?) घडले आहेत का असा नवा प्रश्न मला पडला आहे.
लेख
लेख जुना असला आणि मनोगतावर प्रकाशित झाला असला तरी त्यातील मुद्दे बरेचचे स्थलकालनिरपेक्ष आहेत. कोणत्याही संकेतस्थळावरील प्रगल्भ लेखन कसे असावे याबाबतची अशी मार्गदर्शक तत्त्वे इतरत्र पाहण्यात आली नाहीत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद
शोधून दुवा दिल्याबद्दल धन्यवाद श्री. आजानुकर्ण. कालातीत किंवा टाइमलेस लेख आहे ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
संपादित प्रतिसाद
'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणे' यामध्ये उपक्रम मिसळपावाच्या पुढे जाऊ पहाते आहे असे म्हणण्याचा मार्ग खुला आहे काय?
होय. सोयीचे तितके प्रतिसाद ठेवले जात आहेत आणि बाकी प्रतिसाद संपादित होत असल्यामुळे 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी' होत काय यावर 'उपक्रमवर' बोलण्यसारखं काही नाही.
-दिलीप बिरुटे
मिपाची उपक्रमबरोबर तुलना !!!
मिपाची उपक्रमबरोबर तुलना !!!
मिपाचे भाग्य चांगले आहे.
१. मिपावरचे आणि उपक्रमावर किती धागे उडाले?
२. संपादक मंडळ टिकाकारांना किती सहज पणे टिका करुन देते?
३. टिकाकारांचे आय डी किती वेळाने उडवले जातात? परत यायचे असेल तर माफी मागावी लागते का?
४. मिपावर किंवा उपक्रमावर पैशाची अफरातफर होते का?
५. संपादक होण्यासाठी काय अर्हता लागते?
कोलॅटरल डॅमेज
'कोलॅटरल डॅमेज' अंमळ फारच झालेले दिसत आहे. त्याचा पर्दाफाश करायला मराठी आंतरजालावर एका 'विकिलीक्स'ची आवश्यकता आहे की काय, असा प्रश्न तूर्तास पडला आहे. या धाग्यावरचे नक्की किती प्रतिसाद उडाले याविषयीची आमच्या वरच्या प्रतिसादातली माहिती चुकीची समजावी आणि रिटे यांची माहिती अधिक विश्वासार्ह मानावी, अशी विनंती.
असो. मराठी संकेतस्थळांवरचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाहीकरणाचे प्रमाण आणि त्याद्वारे दिसून येणारी अ/प्रगल्भता यांचा परस्परसंबंध याविषयी काही माहितीपूर्ण विवेचन लवकरच वाचायला मिळेल अशी आशा करतो.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
'विकिलीक्स'
हं. मराठी आंतरजालावर किरकोळ एखादे किरकोळ 'विकिलीक्स' झालेही असेल. ते प्रकरण बहुधा नंतर दफनही करण्यात आले असेल. असो. सर्वांचे भले होवो. तर मूळ प्रतिसाद संपादित झाला की त्यावर आलेले सगळेच भलेबुरे उपप्रतिसादही बहुधा संपादित करण्यात येतात असा अनुभव आहे. असो. पुन्हा एकदा सर्वांचे भले होवो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
यादी
१) संस्थळाची ध्येय धोरणे
२) संस्थळाची आंतरजालावर असलेली प्रतिमा
३)संस्थळावरील संपादन
४) संस्थळावर वावर असणारी डोकी/नग/संख्या
५)धागाकर्त्याचे शारिरिक/ मानसिक /भावनिक /बौद्धिक/संस्थळीय वय
६)धागाकर्त्याचा धागा लिहिण्यामागील हेतू
७) धागाकर्त्याने धागा नेमक्या कुठल्या वेळी प्रकाशित केला? त्यावेळी इतर धागे काय चालू होते?
८) प्रतिसादकर्त्याचे शारिरिक/ मानसिक /भावनिक /बौद्धिक/संस्थळीय वय
९)प्रतिसादकर्त्याचा प्रतिसाद लिहिण्यामागील हेतू
१०) प्रतिसादकर्त्याने प्रतिसाद नेमक्या कुठल्या वेळी प्रकाशित केला? त्यावेळी इतर धागे / प्रतिसाद काय चालू होते?
११) एकाच वेळी एकाच व्यकिने भिन्न संस्थळांवर टाकलेला धाग्याचे / प्रतिसादाचे वेळी त्या संस्थळाची समूहगति/स्थितिशिलता
१२)जालीय सहजीवनातील प्रतिसाद/धागा कर्त्यांचे परस्परांशी असलेले हित/अहित संबंध ( अर्थात हिशोब चुकते करणे)
.
.
.
यादी अजुन लांबवता येईल. अशा अनेके घटकांचा/नांचा परिपाक प्रगल्भतेत करावा लागेल. मूळात प्रगल्भ असणे म्हणजे नेमके काय असणे यावर प्रगल्भ सभासदांचे एकमत होणे अवघड.
तुर्तास (वाचूनही) प्रतिसाद न देणारे मला प्रगल्भ वाटतात.
प्रकाश घाटपांडे
सहमत :)
तुर्तास (वाचूनही) प्रतिसाद न देणारे मला प्रगल्भ वाटतात.
सहमत! पण मग तुम्ही का दिला बरे प्रतिसाद ?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हॅह्लॅहॅ
आम्ही स्वतःला प्रगल्भ समजत नाही.
प्रकाश घाटपांडे
प्रगल्भ
उपक्रमावर कुणी डिपेंडंट विसावर अमेरिकेला चालले आहे म्हणून त्यावर चाललेली चर्चा पाहिली नाही.
'कुठल्याश्या बारच्या मागे भंगारात टाकलेल्या दारूच्या बाटल्यांमधे लोळणारे उपक्रमी' हे चित्र अजून तरी उपक्रमावर पाहिलेले नाही.
कल्पना
'कुठल्याश्या बारच्या मागे भंगारात टाकलेल्या दारूच्या बाटल्यांमधे लोळणारे उपक्रमी' हे चित्र अजून तरी उपक्रमावर पाहिलेले नाही.
>> जबरदस्त कल्पना आहे !!!!
:)
कल्पना नव्हे वास्तव! असे चित्र मिसळपाववर आलेले आहे.
दुसरा भाग सुरू करावा.
कृपया चर्चेचा दुसरा भाग सुरु करावा अशी चर्चाप्रस्तावकांना विनंती. 'ड्रुपल अपग्रेडेशनबाबत' उपक्रम अद्याप अनुत्सुक असल्याने ५० प्रतिसादांनंतर चर्चा दुसर्या पानावर जाते आणि नवे प्रतिसाद वाचणे कठिण होते. इतकी उत्कंठावर्धक चर्चा उपक्रमावर अभावानेच येत असल्याने ती दोन-चार भागांत होऊ द्या.
असो. पॉपकॉर्नची दोन तीन पाकीटे सकाळपासून संपली. दुकानातून घेऊन येते तोवर दुसरा भाग वाचायला मिळेल अशी आशा करते.
खाजगीवाले
मिपाला उपक्रमापेक्षा उजवे दाखवण्यासाठी केलेले हे बायस्ड ऍनालिसीस मिपावरही झोडले गेले ह्यातच सगळे आले.
प्रगल्भ
प्रगल्भ विश्लेषण झालेले दिसते. तुलनात्मक अभ्यास येऊ द्या आता. उपक्रमाच्या आशयघनतेतही भर पडेल.
मी इथे असतो.
थोडे वेगळे
मला एकदम ललीताजी आठवल्या.
डिसक्लेमरः मला दोन संस्थळांची तुलना मान्यच नाही. त्यामुळे ह्या जाहीरातीतून कुठल्याच संस्थळाला त्यातील अमूक-तमूक प्रॉडक्ट म्हणून ठरवत नाही अथवा फक्त एकाच ठिकाणी "धुलाई" छान होऊ शकते असे सुचवत नाही. ;)
माझी जाहिहिहिहिरातबाजी!!!!
सभ्य आणि असभ्य लोक्स,
अरारारारारा! काय भांडताय, काय कट्टीफू करताय. वॅलेंटाइन डे आहे. भांडणं विसरा. आनंदी व्हा!
उपक्रमाच्या नियमांनुसार आमचे कोणाही संकेतस्थळाशी वैर नाही. खालील जाहिरात मोठ्या मनाने स्वीकारावी आणि सोडून द्यावी.
विकासभौ या चर्चेत न बोलते तर आमचे तोंड न उघडते पण ते बोलले आणि आमच्या मस्तकात किडा वळवळला. सर्फची जाहिरात आम्ही उपक्रमाची जाहिरात म्हणून टाकतो आहोत.
प्रक: ललिताजी ये पुरानी चर्चा और चलेगी?
ललिताजी: एकदम सहीसलामत| आखीर उपक्रमपे चल रही है ना|
प्रक: क्या उपक्रम कहीं कम नहीं पडता?
ललिताजी: बिल्कुल नहीं|
ललिताजी: ये देखिए उपक्रम की १० प्रतिक्रियाएँ सस्ते खाद्यपदार्थनामधारी वेबसाइट पर दी जानेवाली १०० प्रतिक्रियाओं के बराबर होती हैं|
प्रक: और धुलाई?
ललिताजी: सबसे सफेद, इतने साल बादभी इतनी सफेद|
प्रक: लेकिन अंजाम?
ललिताजी: भाईसहाब, सस्ती चीजमें और अच्छी चीजमें फरक होता है| उपक्रमके फायदे भी तो देखिये| सबसे सफेद धुलाई और हाथपांवभी सलामत| इसलिये उपक्रमकी तरफदारीमेंही समझदारी है|
प्रक: जी हां| उपक्रमकी तरफदारीमेंही समझदारी है|
प्रक - प्रश्नकर्ता
ललिताजी - या संकेतस्थळाच्या ललिता पवार.
किंचित चूक
सबसे सफेद धुलाई और आयडीभी सलामत| असे जास्त बरे दिसेल.
हं!हं! ह्याप्पी वॅलेंटाइन डे!