नास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे?

खरे पाहता नास्तिकांच्या टीकाकारांना नास्तिकांची श्रद्धा तरी कशावर आहे असा प्रश्न विचारायचा असतो. मुळात या टीकाकारांच्या मते नास्तिकांचा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते पाखंडी, संवेदनाविहीन, नैतिकमूल्यांची चाड नसणारे, कायमचे वाकड्यात शिरणारे, भावना दुखविणारे.... असतात. परमेश्वर व धर्म यावर श्रद्धा नसणारेसुद्धा नैतिक असू शकतात, त्यांच्याही भावना असतात, यावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. अशाच प्रकारचा खोचक प्रश्न मायकेल शेर्मर या चिकित्सकाला विचारल्यावर त्यानी दिलेले उत्तर 'उपक्रमीं'ना (अशा लेखांचा कंटाळा आलेल्या रिटे, घाटपांडे व इतरांची क्षमा मागून) विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल म्हणून हा लेखनप्रपंच.

 • माझा स्वातंत्र्य या तत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाला विचार करण्याचे, इतरावर भरवसा ठेवण्याचे व त्याप्रमाणे कृती करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही वा स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही या मर्यादेतच त्यांनी स्वातंत्र्य भोगायला हवे.
 • आपल्या देशाच्या घटनेत नमूद केलेले मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्य (ज्यात भाषण व लेखन स्वातंत्र्य, संघटित होण्याचे स्वातंत्र्य, शांत रीतीने अडचणी इतरांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य, ईश्वराची पूजा करण्याचे ( वा न करण्याचे) स्वातंत्र्य इत्यादी आहेत) यांच्यावर माझा विश्वास आहे.
 • खाजगी मालमत्ता, कायद्याचे राज्य व समता यांच्यावर माझा विश्वास आहे.
 • मी मुक्त स्वातंत्र्य, मुक्त निवड, नैतिक अधिष्ठान व वैयक्तिक जवाबदारी यावर विश्वास ठेवतो.
 • मी नेहमीच सत्याच्या शोधात असतो व खरे बोलण्यावर माझा विश्वास आहे.
 • एखाद्यावरील भरवसा व विश्वासार्हता या मला मान्य आहेत.
 • माझा न्याय वर्तणुकीवर व न्याय वर्तणुकीच्या परतफेडीवर विश्वास आहे.
 • माझे प्रेम, विवाह, पती-पत्नीमधील एकमेकाशी निष्ठा यांच्यावर विश्वास आहे.
 • इतरांशी गौरवयुक्त वर्तन, कुटुंबियाबद्दल आस्था - जिव्हाळा, मित्र व समाजातील इतरांबरोबर सलोख्याचे संबंध - वर्तन यावर मी विश्वास ठेवतो.
 • मनापासून विचारलेल्या प्रामाणिक क्षमायाचनेवर माझा विश्वास आहे.
 • दया, करुणा, अडलेल्यांना मदतीचा हात, समाजोपयोगी कार्यासाठी देणगी यावर माझा विश्वास आहे.
 • निसर्ग नियम व सृष्टीत घडत असलेल्या घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी विज्ञानाची फार मोठी देणगी आहे, यावर माझा विश्वास आहे.
 • समस्यांची उत्तरं शोधणारे, आयुष्यातील गुंतागुंतीचे उकल करू शकणारे, संदिग्ध परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करणारे तर्क, विवेक व विचारशक्ती या मानवी जाणीवांच्या साधनांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
 • मी तंत्रज्ञान, संस्कृती, व नैतिकता यांच्या प्रगतीचा पुरस्कर्ता आहे.
 • माझा मानवाच्या अमर्याद क्षमतेवर, त्याच्या सर्जनशीलेवर, कल्पकतेवर, नाविन्यतेवर व मानवासकट इतर सर्व जाती-प्रजाती या पृथ्वीवर सुख व समाधानाने नांदण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नावर विश्वास आहे.

ही यादी परिपूर्ण आहे वा यात बदल होणार नाही असा दावाही नाही. या यादीवर ओझरती नजर टाकल्यास परमेश्वर, धर्म, यांच्याविनासुद्धा आपण नैतिक व माणूस म्हणून जगू शकतो हे लक्षात येईल.
सूज्ञास जास्त सांगणे न लगे!
(मराठीकरण करताना काही चुका असण्याची शक्यता आहे. चू.भू.दे.घे.)

संदर्भ

Comments

उदाहरणे

"गीता ही अहिंसेची शिकवण देत होती". माझे असे मत नाही, पण हिंसा सर्वदृष्ट्या "अनैतिक आहे" असे आपले मत आहे काय?

नाही.
मोघम प्रतिसाद, जे वाचले ते सांगा, मनुस्मृतीतील तत्वे सांगा, उदाहरणे व्यनितून कळवली तरी चालतील, पण तोपर्यंत सिद्धता होत नाही.

मोघम प्रतिसाद : मान्य
तुमच्या प्रिमायसेस मधे मनुस्मृती धर्माचा भाग होते की नाही ते कळवा. त्यानंतर नेमकी उदाहरणे द्यायची तसदी घेईन.
यात तुम्हाला दोन वाटा आहेत. मी वाचलेल्या मनुस्मृतीचा अनुवाद तुम्ही मान्य करणार नाहीत. किंवा जी नीतिला धरून नाही ती मनुस्मृती मान्य करणार नाहीत.
तुमच्या प्रिमायसेस नुसार धार्मिक आणि नैतिक एकच होतो. पण तुमचा धर्म लौकिक धर्म नाही असे स्पष्ट दिसते.

प्रमोद

लौकिक

"गीता ही अहिंसेची शिकवण देत होती". माझे असे मत नाही, पण हिंसा सर्वदृष्ट्या "अनैतिक आहे" असे आपले मत आहे काय?

नाही.

मग गीतेत हिंसा सांगितल्यास ती नैतिकतेला धरून आहे हि शक्यता आहेच. गांधीजी खरे बोलले कि खोटे हा मुद्दा इथे अवांतर. आणि मी सोयीस्कर अर्थ काढतो हे हि अजून ठरले नाही.

तुमच्या प्रिमायसेस मधे मनुस्मृती धर्माचा भाग होते की नाही ते कळवा. त्यानंतर नेमकी उदाहरणे द्यायची तसदी घेईन.
यात तुम्हाला दोन वाटा आहेत. मी वाचलेल्या मनुस्मृतीचा अनुवाद तुम्ही मान्य करणार नाहीत. किंवा जी नीतिला धरून नाही ती मनुस्मृती मान्य करणार नाहीत.

मनुस्मृती नक्कीच धर्माचा भाग आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा अनुवाद सांगत नाही तोपर्यंत मी मान्य तरी कसे करू? मी फक्त विरोधासाठी विरोध करत नाही, पण माझा असा विश्वास आहे कि जे सांगितले आहे आणि जो अर्थ समाजात काढला गेला आहे किंवा राबवला गेला आहे त्यात फरक आहे. जे समाजात धर्म म्हणून दिसते तो तसाच धर्म आहे असे समजल्यास आपल्या मताशी मी सहमत होईनही. पण हे मूळ धर्माचे काही अंशी भ्रंश/भ्रष्ट रूप आहे असे माझे मत आहे. तरीही तुम्ही अनुवाद सांगावा हि विनंती.

तुमच्या प्रिमायसेस नुसार धार्मिक आणि नैतिक एकच होतो. पण तुमचा धर्म लौकिक धर्म नाही असे स्पष्ट दिसते.

कुठलाच लोकमान्य/तत्वज्ञ पण धार्मिक माणूस धर्म=नैतिकता हेच सांगतो, मी लोकमान्य/तत्वज्ञ नाही पण काही प्रमाणात धार्मिक असू शकेन. त्यामुळे आपण जो लौकिक धर्म म्हणत आहात तो अनैतिक शिकवण देत असेल तर तो धर्म नाही असेच मी म्हणेन.

मनुस्मृती

मनुस्मृती नक्कीच धर्माचा भाग आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा अनुवाद सांगत नाही तोपर्यंत मी मान्य तरी कसे करू? मी फक्त विरोधासाठी विरोध करत नाही, पण माझा असा विश्वास आहे कि जे सांगितले आहे आणि जो अर्थ समाजात काढला गेला आहे किंवा राबवला गेला आहे त्यात फरक आहे. जे समाजात धर्म म्हणून दिसते तो तसाच धर्म आहे असे समजल्यास आपल्या मताशी मी सहमत होईनही. पण हे मूळ धर्माचे काही अंशी भ्रंश/भ्रष्ट रूप आहे असे माझे मत आहे. तरीही तुम्ही अनुवाद सांगावा हि विनंती.

वेद शास्त्र संपन्न बापट गुरुजी यांनी मनुस्मृतीचा १९४० पूर्वी अनुवाद केला आहे. (हल्लीचे प्रकाशक गजानन बुक डेपो. मराठी पुस्तके वर हे पुस्तक येऊ देण्याचा आमचा मानस आहे.) हे पुस्तक वाचून ठरवा की ते नैतिकता दर्शवते की अनैतिकता, लावलेला अनुवाद योग्य की अयोग्य आणि शेवटचे ते तुमच्या धर्मात घ्यायचे की नाही.
पुस्तक मोठे असल्याने अनुवाद येथे देणे अयोग्य ठरेल. केवळ मला माहित असलेली उदाहरणे वानगी दाखल दिल्यावर त्यातील श्लोक-अर्थावर वाद घालता येतो. हा वाद संपल्यावर ते धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणता आहातच. म्हणून तुम्हाला ही विनंती की हे पुस्तक वाचून त्यातील सर्व भाग तुमच्या ध्रर्मात बसतो की नाही हे सांगा. जर का सर्व भाग बसणार नसेल तर उदाहरणे देण्यात काहीच मतलब नाही.

या दुव्यावर बायबलासंबंधी काही लोकांनी केलेली टिपणी आहे. त्याच बरोबर रसेलने लिहिलेला 'व्ह्याय आय ऍम नॉट ख्रिश्चन' यातही बायबल वर थोड्याप्रमाणात टिपणी आहे.

लौकिक अर्थाने जी पुस्तके धर्मसंस्थेचा भाग आहेत (वा होते) ती पुस्तके धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणू शकता. पण लौकिक धर्म आणि तुम्ही म्हणत असलेला धर्म यात फारकत आहे असे म्हणावे लागेल.

प्रमोद

ईंटरप्रिटेशन

वेद शास्त्र संपन्न बापट गुरुजी यांनी मनुस्मृतीचा १९४० पूर्वी अनुवाद केला आहे. (हल्लीचे प्रकाशक गजानन बुक डेपो. मराठी पुस्तके वर हे पुस्तक येऊ देण्याचा आमचा मानस आहे.) हे पुस्तक वाचून ठरवा की ते नैतिकता दर्शवते की अनैतिकता, लावलेला अनुवाद योग्य की अयोग्य आणि शेवटचे ते तुमच्या धर्मात घ्यायचे की नाही.
पुस्तक मोठे असल्याने अनुवाद येथे देणे अयोग्य ठरेल. केवळ मला माहित असलेली उदाहरणे वानगी दाखल दिल्यावर त्यातील श्लोक-अर्थावर वाद घालता येतो. हा वाद संपल्यावर ते धर्माचे भ्रष्ट रूप आहे असे तुम्ही म्हणता आहातच. म्हणून तुम्हाला ही विनंती की हे पुस्तक वाचून त्यातील सर्व भाग तुमच्या ध्रर्मात बसतो की नाही हे सांगा. जर का सर्व भाग बसणार नसेल तर उदाहरणे देण्यात काहीच मतलब नाही.

मुद्दा ईंटरप्रिटेशनचाच आहे, तरीदेखील अज्ञानामुळे अनुमान-प्रमाण किंवा काही लोकांचे शब्द-प्रमाण मानावे लागते. तरी मी जरूर हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करीन. आपणास काही त्यातील जे मुद्दे अनैतिक वाटतात ते ह्या चर्चेच्या बाहेर कळवावेत, त्यावर मी माझे मत आपणास नक्कीच कळवीन. ती चर्चा खरडीतून अथवा व्यनितून करूयात.

बाकीच्या दुव्यांबद्दल कळवा

बाकीच्या दुव्यांबद्दल आपले मत कळवा. ते तर पूर्णपणे उपलब्द्ध आहेत.

प्रमोद

माझा ख्रिश्चन धर्माबद्दल अभ्यास नाही.

बाकीच्या दुव्यांवर ख्रिश्चन' धर्माबद्दल टिप्पणी आहे, तो माझा धर्म नाही व त्याचा अभ्यास देखील नाही तेव्हा मी त्याबद्दल काही विधान करणे चुकीचे असू शकते.

तरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.

प्रेमिस

"अनीति सांगणारा तो धर्म नाहीच हे प्रेमीस आहे त्यामुळे असे आढळल्यास ती नास्तीकताच मानावी."
हे तुमचे पहिल्या काही प्रतिसादातील वाक्य.
ख्रिश्चन हा एक लौकिक धर्म आहे. आणि तुम्ही आता म्हणता की
तरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.
तो तुमच्या दृष्टीने धर्म आहे की नाही तुम्हाला सांगता येत नाही. असेच मनुस्मृतीबद्दल तुमचे मत असेल तर आपला वादच मिटतो. (तुम्ही ती वाचली नाही. वाचल्याशिवाय तिच्या नैतिकतेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार नाही असे मी मानतो.)

तुमचा धर्म आणि लौकिक अर्थाने धर्म शब्द वापरला जातो यात खूप फरक आहे. तुम्ही नास्तिकतेची व्याख्या ही लौकिकार्थापेक्षा वेगळी करता. तुम्ही असे करण्यास माझी काहीच हरकत नाही. पण त्यावेळी तुमची व्याख्या आधीच समजावून सांगितली असती तर बरे झाले असते.

प्रमोद

नाही.

मला ख्रिस्चन धर्माबद्दल बोलणे टाळायचे होते. पण आता तुम्ही मुद्दा काढलाच आहे तर उत्तर देतो -

ख्रिश्चन हा एक लौकिक धर्म आहे. आणि तुम्ही आता म्हणता की
तरी रसेलच्या ख्रिश्चन ची व्याख्या देव/येशू/नरक ह्याशी जास्त जवळ जाणारी आहे, ह्या गोष्टी म्हणजे ख्रिश्चन' धर्म असेल तर त्या धर्माबद्दल मला नक्कीच शंका आहे.
तो तुमच्या दृष्टीने धर्म आहे की नाही तुम्हाला सांगता येत नाही. असेच मनुस्मृतीबद्दल तुमचे मत असेल तर आपला वादच मिटतो. (तुम्ही ती वाचली नाही. वाचल्याशिवाय तिच्या नैतिकतेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार नाही असे मी मानतो.)

आपल्याला खात्रीशीर रित्या असे वाटते का, की रसेल एका परिच्छेदात ख्रिस्चन धर्माची जी व्याख्या करतो ती म्हणजेच तो धर्म होय? मला त्यार्थी विरोध नोंदवायचा होता कि इतिहास बघता धर्म म्हणून मान्यता मिळालेला हा पंथ नक्कीच एवढा उथळ नाही, पण त्याची तत्वे मला माहित नाही व माझ्या धर्मानुसार तो धर्मच नाही त्यामुळे त्याबद्दल बोलणे मला रुचत नाही.

मनुस्मृती ज्ञात नसून तिचा अनुवाद ज्ञात आहे, तुम्हास आणि मला देखील, आपण जो संदर्भ दिला तो संदर्भ देण्यासारखा आहे असे आपणास तरी वाटते का? मी ते पुस्तक आजच बघितले, त्यामध्ये विचार करून अनुवाद न लिहिता केवळ संस्कृत शब्दांचे भाषांतर लिहिले आहे असे दिसते पण मनुस्मृतीचा इतर अनुवाद जो संदर्भ देण्यासारखा आहे तो मी शोधात असल्याने त्यावर भाष्य करण्याचे टाळले. श्री बापट ह्यांचा अनुवाद वाचल्यास विचार करणारे आस्तिक देखील नास्तिक होतील ह्यात शंका नाही. मला जे अनुवाद माहित आहेत त्यामध्ये लेखकाने स्वतःच्या बुद्धीने अनुवाद केला आहे त्यामुळे तो मनुस्मृतीचा सोयीस्कर अनुवाद असू शकतो, पण मान्यवर लोकांनी सामान्य लोकांना समजेल तसेच फक्त भाषांतर नसेल असे काही उपलब्ध आहे का हे मी बघतो आहे . तसे सापडल्यास आपणास नक्की कळवेन. आपल्याला जो अनुवाद ज्ञात आहे त्यानुसार धर्म अनैतिक आहे असे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे मी मानतो.

ह्याउपर आपणास काही आक्षेप असेल तर जरूर सांगा मी माझ्या कुवतीनुसार शंका-निवारणाचे प्रयत्न करेन.

धन्यवाद

या वादात काही प्रश्नांचा निकाल लागला असे वाटले. त्यात तुमचे म्हणणे मला समजले.
योग्य अनुवादित मनुस्मृतीचे अवलकोन करून एक चांगला ससंदर्भ लेख (शिवाय बापटशास्त्र्यांचे कुठे चुकले असा तौलोनिक विचार देखील) वाचायला मिळेल अशी आशा करतो.

प्रमोद

;-)

>

' अनीति सांगणारा तो धर्म नाहीच.' हे फार उत्तम. म्हणजे अनीतिमान काही दिसले तर ते धर्मातून काढून टाकायचे.

असे केले तर बहार येईल. दुर्दैवाने(धर्म-प्रगती दृष्टीने), असे झालेले बर्‍याच धर्मात दिसत नाही.

बहुतेक,मुळात अनीती सांगणारं काही आहे हे मान्यच न करण्याच्या भुमिकेमुळे असेल. बाकी अनीती सांगणार धर्मच जर् बाद केला तर कसे? ;-)

-Nile

व्याख्या

अनीती सांगणार धर्म

धर्माची अनैतिक व्याख्या करणाऱ्यांना बाद करायला हवे, अगदीच शेजारचा धर्म उदाहरण म्हणून घेतल्यास पैगाम्बारालादेखील हे अपेक्षित असेल असे वाटत नाही पण काही बुडव्यानी नको तो अर्थ धर्म म्हणून मांडला असावा. मग धर्म वाईट असे न मानता त्याचा लावला गेलेला अर्थ वाईट असे होऊ शकते ना?

मुद्दा

अहो, मुद्दा वेगळा आहे. धर्म कशाकरता सुरु केला हा मुद्दाच् नाहीए इथे.

सद्ध्या क्ष धर्म अस्तित्वात् आहे, त्या धर्मात अबकड तत्वे आहेत जी आजचे लोक् पाळतात. त्याचा प्रचार करणारे लोक देवावर, कर्मावर इ. विश्वास् ठेवतात, ते आस्तिक आहेत. श्री. प्रमोद आणि श्री. रिकामटेकडा यांच्या युक्तिवादात् अश्याच लोकांच्या नितीमत्तेवर भाष्य आहे.

-Nile

तत्व

मग ह्या तत्वाने सद्य परिस्थिती बघता राजकारण वाईट असे देखील म्हणता येईल. सद्य राजकारणातून चांगले काही घडताना तर दिसतच नाहीये, हे मान्य आहे काय?

चुकीची तुलना

राजकारणाशी तुलना करुन काय् सिद्ध करायचे आहे?

धर्मग्रंथासारख्या ग्रंथाचे आचरण राजकारणात होते का? धार्मिक तीर्थस्थानांप्रमाणे राजकारणी लोक कुठल्या राजकीय तीर्थस्थानांना मानतात का? राजकारणात कुठला सत्यनारायण घातला जातो का? मुंज, सुंता, बाप्तीजम असले काही केल्याशिवाय राजकारणात् प्रवेश नाही असे काही असते का? वगैरे.

राजकारणात काही वाईट् गोष्टी आहेत, काही चांगल्याही आहेत (तसेच धर्माबाबतही) पण् त्याचा इथे काय् संबंध? चर्चेच्या अनुशंगाने मुद्दे मांडलेत तर बरे होईल.

-Nile

असहमतीस सहमती

तत्व लक्षात घेतले असते तर पुढे समजावून सांगणे सोपे पडले असते, पण मुदलात काही नाही तेंव्हा असहमतीस सहमती असणेच योग्य ठरेल.

सहमतीस असहमती

तत्वाचा या चर्चेसंबंधात् काही उपयोग असता तर समजावुन घेण्याचे प्रयत्न केले असते, पण संबंध नाही हे वर लिहले असतानाही त्यावर काही स्पष्टीकरण नाही तेव्हा काही न लिहणेच योग्य ठरेल.

-Nile

वरील सर्व मुद्दे

वरील सर्व मुद्दे आस्तिकही ठामपणे मांडू शकतो त्यामुळे एखाद्या नास्तिकाचे मनोगत/विचार/ विश्वास त्यातून प्रकट होतात असे वाटत नाही.

आपल्या देशाच्या घटनेत नमूद केलेले मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्य (ज्यात भाषण व लेखन स्वातंत्र्य, संघटित होण्याचे स्वातंत्र्य, शांत रीतीने अडचणी इतरांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य, ईश्वराची पूजा करण्याचे ( वा न करण्याचे) स्वातंत्र्य इत्यादी आहेत) यांच्यावर माझा विश्वास आहे.

हे जर खरे असेल आणि सर्व स्वातंत्र्ये मान्य असतील तर ईश्वराची पूजा करण्याच्या विरोधात लेख का बरे लिहिले जातात? पण ओह! हे नानावटींचे विधान नाही मायकेल शेर्मरची विधाने आहेत.

स्वातंत्र्यांची उतरंड

 1. शारिरीक बंधने घातली जाणार नाहीत इतकेच स्वातंत्र्य आहे. त्यासोबत टीका, टिंगल सहन करण्याचे कर्तव्य स्वीकारावे लागते कारण इतरांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे.
 2. सर्व धर्मांना "समान वागणूक" द्यावी अशी अपेक्षा आहे पण "आदराचीच वागणूक द्यावी" असे स्पष्ट नाही असे मला वाटते. सर्वच धर्मांवर समान जिझिया लादला तरी त्या तत्त्वाचा भंग होत नाही. त्या पैशांतून सरकारने शालेय मुलांसाठी विज्ञान केंद्रे, तारांगणे उभारली तरी त्या तत्त्वाचा भंग होत नाही.

छानच आहे ही यादी

छानच आहे ही यादी.

यादी करावी

हे ठीक.

श्रद्धा असणे गरजेचे?

सदर (किंवा अशा प्रकारच्या आधी झालेल्या अनेक) चर्चांमध्ये प्रत्येकाची - आस्तिक किंवा नास्तिक- कशावर ना कशावर श्रद्धा असणे आवश्यक आहे / प्रत्येकाची कशावर ना कशावर श्रद्धा असते हे गृहितक म्हणून धरले आहे. या गृहितकाची वैधता - व्हॅलिडिटी काय? कशावरही श्रद्धा नसताना जगणे शक्य नाही काय?
श्रद्धा हा जरासा गंभीर शब्द आहे. विश्वास हा त्या मानाने खेळकर शब्द आहे. समज हा त्याखालचा शब्द, पण त्याविषयी बोलणे नको.
उपक्रमावर इतर सर्व संकेतस्थळांप्रमाणेच कंपूबाजी चालते, असा माझा समज आहे. पण असे असले तरी मुळात इथले लोक वाईट प्रवृत्तीचे नाहीत, अस माझा विश्वास आहे.एकूणात माणूस हा सद्प्रवृत्तीचाच असतो, अशी माझी श्रद्धा आहे - ही चढती भाजणी बरोबर आहे का? आणि यातली शेवटची पायरी आवश्यक आहे का?
वरील उदाहरण हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले आहे, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नाही- असा माझा समज आहे. की विश्वास?

सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

खात्री

वरील उदाहरण हे फक्त उदाहरण म्हणून घेतलेले आहे, त्याचा वस्तुस्थितीशी संबंध नाही- असा माझा समज आहे. की विश्वास?

खर तर अशी आपली खात्री आहे असा माझा समज आहे
प्रकाश घाटपांडे

नेम चुकला

उपक्रमावर इतर सर्व संकेतस्थळांप्रमाणेच कंपूबाजी चालते, असा माझा समज आहे. पण असे असले तरी मुळात इथले लोक वाईट प्रवृत्तीचे नाहीत, अस माझा विश्वास आहे.एकूणात माणूस हा सद्प्रवृत्तीचाच असतो, अशी माझी श्रद्धा आहे

हा प्रतिसाद राजेश घासकडवींच्या चर्चेत यायला हवा होता. नेहमीपेक्षा विरुद्ध विचारांचे प्रतिसाद लिहिण्याची विनंती राजेशने केली आहे.

तेच आणि तेच चर्‍हाट - तुमचेही नि माझेही!

तेच आणि तेच चर्‍हाट - तुमचेही नि माझेही!
नास्तिकांचा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते पाखंडी, संवेदनाविहीन, नैतिकमूल्यांची चाड नसणारे, कायमचे वाकड्यात शिरणारे, भावना दुखविणारे.... असतात. परमेश्वर व धर्म यावर श्रद्धा नसणारेसुद्धा नैतिक असू शकतात, त्यांच्याही भावना असतात, यावर उपक्रमावरील विविध तर्कट चर्चांनंतर माझाही अजिबात विश्वास उरला नाही.*

मला त्यापेक्षा विनोबा बरे वाटतात. ते म्हणतात, 'तर्काला छाटून श्रद्धा व प्रयोग या दोन पंखांवरच मी गीतेच्या भरार्‍या मारत असतो'.

मनोविकारातून सुटका मिळवण्यासाठी मलाही हेच बरे वाटते. पण सगळ्यांना ते पटेल असेही नाही. आयुष्याचा आपापला मार्ग!

आपला
गुंडोपंत
माझी जुनी(च) सही हे सांगतेच!
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

*(हे उपक्रमाचे यशापयश वगैरे नव्हे! तो वेगळा विषय आहे.)

हेल्ड होस्टेजः

नास्तिकांच्या उपक्रमावरील वावरावर इतकेच म्हणावेसे वाटते-

हेल्ड होस्टेजः व्हेन नास्तिक्स् कंट्रोल संकेतस्थळ्स्
(ह्याचा संदर्भ शुचि ह्यांच्या ह्या लेखनात आलेला आहे)

गंमत

नास्तिकांचा कंट्रोल असता तर आस्तिकांच्या नास्तिकांबद्दलच्या व्याखेनुसार त्यांनी स्वतःच्या (नास्तिकांच्या) क्रूर वगैरे विशेषणांना खरे करत आस्तिकांच्या पार्श्वभागावर वळ उमटुन त्यांना हाकलले असते, बरोबर?

तसे इथे(किंवा अजुन् कुठल्याच स्थळावर) झालेले दिसत् नाही, म्हणजे जर तुमचे म्हणणे खरे असेल् तर इथले कंट्रोल असलेले नास्तिक नैतिकच म्हणायला हवेत! :-)

-Nile

अन्टॉनिम्स्

नास्तिकता आणि नैतिकता अन्टॉनिम्स् असल्यासारखे तुम्ही म्हणताय हे!

आँ?

मी चर्चेत उद्धृत केलेले गृहीतक जर खरे असेल तर असे स्पष्ट लिहलं आहे!

-Nile

राग येत नसतो

होय, खरंय. नास्तिकांना राग येत नसतो, म्हणून बरे आहे, नाहीतर खैर नाही.

आकलन

मानव या प्राण्यात इश्वर नावाची संकल्पना मानली जाते. ही संकल्पना नेमकी काय आहे? याबाबत मतभिन्नता आहे. निर्गुण निराकार , सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन वगैरे वगैरे प्रारुपे मानवण्यावरुन् देखील तुंबळ वाग् युद्धे होतात. ती फार फार पुर्वी पासुन चालत आली आहेत ती अशीच चालत रहाणार आहेत असे भाकीत् आम्ही वर्तवतो.
अवांतर- गुंडोपंतांना याचा कंटाळा आला तरी त्यांच्यावर इश्वराचा वरद हस्त आहे.अन्यथा कठोर नास्तिकांनी त्यांना आपल्या बाजुला खेचल असत.
प्रकाश घाटपांडे

नास्तिक = विचारवंत

प्रत्येक नास्तिक विचारवंत असतो; प्रत्येक विचारवंत?

विचारवंथ!

प्रत्येक नास्तिक विचारवंत असतो; प्रत्येक विचारवंत?

>> तो कोणते विचार करतो यावर ते अवलंबून आहे... ;)

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

विवेकी की विचारवंत?

माझ्या मते येथे विचारवंत ऐवजी विवेकी हवे:
प्रत्येक विवेकी नास्तिक असतो, परंतु प्रत्येक नास्तिक विवेकी असेलच असे नाही.

चूक

प्रत्येक नास्तिक विवेकी असतो, पण प्रत्येक विवेकी आस्तिक असेलच् असे नाही.
:)
______________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

+१

माझ्या मते येथे विचारवंत ऐवजी विवेकी हवे:
प्रत्येक विवेकी नास्तिक असतो, परंतु प्रत्येक नास्तिक विवेकी असेलच असे नाही.

सहमत.

चूकच्

प्रत्येक नास्तिक विवेकीच् असतो.
इतर सांगतात म्हणुन तो देवावर अजिबात विश्वास ठेवत नाही.
पण प्रत्येक विवेकी नस्तिक असतो असे काही नाही. तुम्हाला विवेकानंद हे 'विवेकी' नव्हते असं म्हणयचय का? का?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

होय

पण प्रत्येक विवेकी नस्तिक असतो असे काही नाही. तुम्हाला विवेकानंद हे 'विवेकी' नव्हते असं म्हणयचय का? का?

होय.
ते अधिभौतिक अस्तित्व मानत म्हणून ते विवेकी नव्हते.

अस्तित्त्व?

होय.
ते अधिभौतिक अस्तित्व मानत म्हणून ते विवेकी नव्हते.
>> अधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय? त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

खुलासा

अधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय? त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध?

अधिभौतिक म्हणजे मेटॅफिजिकल.

एक्सक्यूज मी.........

का टाळताय??
माझा खालील प्रश्न मि. रिटॆ सातत्याने का टाळतायत ते समजत नाही....!

अधिभौतिक अस्तित्व म्हणजे काय? त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध?
>>अधिभौतिक म्हणजे मेटॅफिजिकल.

अधिभौतिक किंवा मेटॅफिजीकल म्हणजे काय?? त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध?

_________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

अधिभौतिक्

नुकत्याच् हाती आलेल्या माहितीनुसार,
जगात जे एकूण तीन ताप(त्रिविध/त्रिताप) आहेत...त्यातीलच् एक ताप म्हणजे अधिभौतिक हा ताप होय
ते तीन ताप-- १.अधिभौतिक
------------२.अधिदैविक
------------३.अध्यात्मिक
दॅट्स् ऑल फॉर नाऊ. आगेका इन्व्हेस्टिगेशन चल रहा है|
अगर आपको कोई खबर हो तो इसी सूत्र पर बताना....

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

खुलासा

अधिभौतिक किंवा मेटॅफिजीकल म्हणजे काय?? त्याचा विवेक/अविवेकाशी काय संबंध?

मेटॅफिजिकल म्हणजे विज्ञानाच्या पलिकडचे विषय, किंवा, वैज्ञानिक तपास करता येणार नाहीत असे विषय होत. विज्ञानात विवेकाने जगाचा अभ्यास केला जातो. म्हणूनच, अधिभौतिक अस्तित्व मानणे* अविवेकी असल्याचे मी म्हटले आहे.
* 'अस्तित्व मानणे' हे 'जगाविषयी काहीएक मत बनविणे' असल्यामुळे 'विवेकाने अस्तित्व मानणे' ही कृती विज्ञानाच्या पर्व्यूमध्ये येते.

'जो विचार रवंथ करत बसतो' तो विचारवंत?

>> तो कोणते विचार करतो यावर ते अवलंबून आहे..
तुम्हाल असे म्हणायचे आहे का? 'विचारवंत तो असतो जो कोणते विचार रवंथ करत असतो त्यावर ते अवलंबून असते....'
कारण प्रतिसादाचा विशय तुम्ही 'विचारवंथ' असा दिला आहे.

;)

कारण प्रतिसादाचा विशय तुम्ही 'विचारवंथ' असा दिला आहे.

बहुतेकदा ष ऐवजी श समजून घेता येतो तसेच त ऐवजी थ समजून घेता येऊ शकेल असे वाटते.

थ त

बहुतेकदा ष ऐवजी श समजून घेता येतो तसेच त ऐवजी थ समजून घेता येऊ शकेल असे वाटते.

साउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक. कारण कामत च स्पेल्लिन्ग ते कामथ आसे करतात.
आणि क्रांतीसिंह रावलेमहाराज (भाषिक क्रांतीजनक) आपण फारच् हुषार असल्याने बरोब्बार ओळखलेत मला तेच म्हणायचे होते. :)

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

चुक

साउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक.

नाही, तुमची माहिती चुक आहे. तुम्ही लिहण्याआधी माहिती तपासुन पाहता का?

-Nile

बहुतेक चूक असेलही किंवा नसेलही...........

साउथ इंडीयन पण त आणि थ एकच मानतात बहुतेक.

नाही, तुमची माहिती चुक आहे. तुम्ही लिहण्याआधी माहिती तपासुन पाहता का?

इथे मुळ मुद्दा म्हणजे मी माहिती दिली नव्हती, शक्यता वर्तवली होती. बहुतेक या शब्दाचा अर्थ माझ्या 'माहितीप्रमाणे' असावे असावा कदाचित् इ इ या अर्थी मराठीत वापरला जातो.
ती ऐकीव गोष्ट होती. आणि 'इथे' ऐकीव गोष्टी बद्दल काही सांगण्यास मनाई असेल तर तसे सांगावे. आणि अशा ऐकीव गोष्टी कुठे तपासून पहाता येतात तेही समजावावे.

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

उत्तर

शक्यता वर्तवताना त्याबद्दल काही माहिती आहे याची खात्री तुम्ही करता का? (नुतसे त चे स्पेलिंग पाहुन शक्यता वर्तवणे म्हणजे माहिती असणे नव्हे!)
ऐकिव गोष्टी सांगाव्यात पण त्यावर् थोडा सारासार् विचार (जमत असेल् तर) करावा अथवा कुणा जाणकाराशी बोलावे असा संकेत समाजात दिसतो( असे केल्याने समाजात आपण् पुर्ण मुर्ख आहोत अशी प्रतिमा न बनण्यास मदत होते).

-Nile

ओह..! हाऊ रूड! :(

शक्यता वर्तवताना त्याबद्दल काही माहिती आहे याची खात्री तुम्ही करता का?
>> शक्यतोवर करते अन्यथा शक्य नसेल तर नाही.

(नुतसे त चे स्पेलिंग पाहुन शक्यता वर्तवणे म्हणजे माहिती असणे नव्हे!)
>>अं हं...! नाही पूर्ण सहमत..! +!

ऐकिव गोष्टी सांगाव्यात पण त्यावर् थोडा सारासार् विचार (जमत असेल् तर) करावा
>> बरोबर आहे.. जमेल जमेल!

अथवा कुणा जाणकाराशी बोलावे असा संकेत समाजात दिसतो
>> कोण आहे तो इकडे??

( असे केल्याने समाजात आपण् पुर्ण मुर्ख आहोत अशी प्रतिमा न बनण्यास मदत होते).
>> इथे कोणाला बदलायचीय्... शहाणे होऊन खुळ्या जगात राहण्यापेक्षा मुर्ख राहिलेल जास्त् परवडतं!

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

कळेल कळेल..

इथे कोणाला बदलायचीय्

बदलण्याबद्दल् कुणाला विचारलं नाहीए.

शहाणे होऊन खुळ्या जगात राहण्यापेक्षा मुर्ख राहिलेल जास्त् परवडतं!

आपण जे नसु ते होणं अवघडच नाही तर खार्चिकही होउ शकतं हे मान्य आहे.

पण मुद्दा तो नव्हता. असो.

-Nile

 
^ वर