देशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण
"भारताच्या भरभराटीला ओहोटी.समृद्धिनिर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 88 वा." हे वृत्त दि.1नोव्हेंबर 2010 च्या दै.सकाळ मधे वाचले. संदर्भ(द लिगॅटम प्रोस्पेरिटी इंडेक्स)पाहिला.क्रमानुसार पहिले पंधरा समृद्ध देश असे:(संदर्भ१)
1.नॉर्वे 2.डेन्मार्क 3.फिनलंड
4.ऑस्ट्रेलिया 5.न्यूझीलंड 6.स्वीडन
7. कॅनडा 8.स्वित्झर्लंड 9.नेदरलॅंड
10.अमेरिका 11.आयर्लंड 12. आईसलॅंड
13.इंग्लंड 14. ऑस्ट्रिया 15.जर्मनी.
तसेच इतर काही:
.......58.चीन59.श्रीलंका 88.भारत 91. नेपाळ 96. बांगलादेश 109.पाक. शेवटी 110.झिबाब्वे
******************************************
नंतर जागतिक नास्तिकता या विषयाचा शोध घेतला.त्यात देशातील लोकसंख्येत नास्तिकांच्या प्रमाणानुसार पन्नास देशांची सूची आहे.संदर्भ२ (वर्ल्ड् वाईड इथीझम ट्रेन्ड &पॅटर्न). त्यांतील पहिले दहा देश आणि प्रत्येक देशातील नास्तिकांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण असे:
1.स्विडन...85% 2.डेन्मार्क...80% ३. नॉर्वे...72% 4. फिनलंड....60% 5.जर्मनी...49%
6.इंग्लंड....44% 7.नेदरलंड...44% 8. कॅनडा...30% 9.स्वित्झरलंड....27% 10.ऑस्ट्रिया..25%
शेवटी 50.क्रोएशिया...7%
या सूचीत भारताचे नाव नाही. कारण नास्तिकांचे प्रमाण नगण्य असावे.(<७%)
******************************
विश्लेषण:
* ही सर्वेक्षणे विश्वासार्ह असावी. कारण संबंधित संस्था अनेक वर्षे हे काम करीत आहेत.
* समृद्धी निर्देशांकाचे सर्वेक्षण या वर्षीचे (२०१०) आहे. नास्तिकांविषयीचे २००५ चे आहे.
*नास्तिकांच्या प्रमाणानुसार क्रमांक असलेले पहिले दहा देश हे सर्वच्या सर्व पहिल्या पंधरा समृद्ध देशांत आहेत.
*अमेरिकेचा एकमेव अपवाद वगळता पहिल्या पंधरांतील प्रत्येक समृद्ध देशांत नास्तिकांचे प्रमाण 25% हून अधिक आहे.
*या सर्वेक्षणांवरून सर्वसाधारणपणे पुढील पैकी एक निष्कर्ष निघतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
१.देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढले तर त्या देशाची समृद्धी वाढते.
२.देशाची समृद्धी वाढली की त्या देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढते.
*कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार केला तर वरील निष्कर्ष क्र.१ अधिक पटतो. कारण नास्तिक विचारसरणी वास्तववादी आणि व्यवहारी असते.ती ऐहिक प्रगतीस पोषक ठरते.देव धर्माच्या कर्मकांडांत लोकांचा वेळ,श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कमी होतो.भ्रामक कल्पनांवर आधारित असलेल्या अनुत्पादक व्यवसायांना आळा बसतो.
*देशाच्या समृद्धीवर परिणाम करणारे अन्य अनेक घटक आहेत.जसे नैसर्गिक साधन संपत्ती, भौगोलिक स्थान, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक तसेच मनुष्यनिर्मित उत्पात, विध्वंस इ.अनेक..तरी सुद्धा वरील निष्कर्षामागे निरीक्षणांचे पुरेसे पाठबळ आहे असे वाटते.
* निरीक्षणांवरून जे दिसते ते लिहिले. त्यात त्रुटी आणि दोष असणे शक्य आहे.
* विश्लेषणात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसावा. आढळल्यास निदर्शनाला आणावा.
* पूर्वी अशा प्रकारचे काही कोणीतरी लिहिले होते ते वाचलेले आठवते.आलेख काढला होता. संदर्भ सापडत नाही.
Comments
:)
हा खूपच आवडीचा विषय आहे एकूणच बहुतेक .अस्तिकतेविषयी आस्तिक जेवढे बोलत नसतील तेवढे इथे नास्तिक बोलत असतात :)
१.आपण २ सूच्या एकत्र मांडल्या आहेत, आणि त्यांच्यातला संदर्भ मात्र स्वतः प्रस्थापित केला आहे, अशा अनेक सूच्या एकत्र मांडून त्यावर पाहिजे ते निष्कर्ष काढता येऊ शकतात, जसे आयुष्याबद्दल समाधान ह्या सूचित सौदी अरेबिया हा देश युनायटेड किंग्डम, फ्रांस ह्यांच्या आधी येतो, तसेच सुखी ग्रह सूचीमध्ये भारत युनायटेड किंग्डम, फ्रांस, क्यानडा ह्यांच्या आधी येतो.
२. तसेच मास्लो च्या गरज मांडणी अनुसार असलेल्या गरजा आपल्या सूचीतील वरच्या आणि खालच्या देशात किती प्रमाणात पूर्ण होतात ह्याचा विचार केल्यास असे निष्कर्ष कितपत योग्य हे ध्यानात येईल.
३. आकड्यांचे संदर्भ बदलले तर अर्थ बदलू शकतो हा संख्या शास्त्राचा नियम आहे.
४. ह्याच अति - समृद्ध युरोपातून धार्मिक कृसडेस चालवल्या होत्या, त्या धार्मिक म्हणायला होत्या कि सत्ता लोलूपतेसाठी होत्या हा मुद्दा निराळा पण एक सूची म्हणून बघितल्यास त्यातून समृद्धतेचे वेगेळे निष्कर्ष निघतील.
अवांतर - हा विषय उपक्रम ची टीआरपी वाढविणारा आहे असे वाटते :प
१ले व शेवटचे वाक्य
पहिल्या व शेवटच्या वाक्याशी १००% सहमत.
शिवाय, युरोपात नास्तकतेचे प्रमान इतके जास्त असेल असे वाटत नाही.
||वाछितो विजयी होईबा||
:)
असे दिसते आहे खरे. :)
विकीलीक्स?
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
एक
एक विनोद आठवला. कृ. ह. घ्या. :)
गंभीर उत्तर इथे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
:)
अवांतर आहे खरे पण ...झकास...बेस्ट :) .
स्कर्टची लांबी आणि शेअर बाजाराची दिशा
यावरून आठवले या सदरात
स्कर्ट लेंग्थ थिअरीनुसार जर समकालीन फॅशनमध्ये स्कर्टची लांबी कमी असेल तर शेअर बाजाराची दिशा उर्ध्वगामी असते याउलट स्कर्टची लांबी कमी असेल तर शेअर बाजाराची दिशा अधोगामी असते.
स्कर्ट लेंग्थ थिअरी
रोचक
रोचक थिअरी आहे. याचा अर्थ भारतातील मार्केट कधीच उर्ध्वगामी नव्हते थॅक्स टू तथाकथित मॉरल पुलिस. (बिपाशा/करीना अपवाद म्हणून सोडून दिले.)
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
स्कर्टची लांबी
खरेच रोचक थिअरी आहे. स्कर्टची लांबी कमी झाली की काही गोष्टी वरच्या दिशेने वाटचाल करु लागतात हे ठाऊक होते. त्यात हेही आहे, याची कल्पना नव्हती.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
क्या बात है!!!
बादरायण संबंध.... की येनकेनप्रकारेण.... कळत नाही.
अशा प्रकारच्या लेखांना / विधानांना हसावं की रडावं तेच कळत नाही. तथाकथित विवेकवाद्यांनी असे करावे?
बिपिन कार्यकर्ते
किंकर्तव्यविमूढ!
सोप्पंय.
नास्तिक असाल तर हळहळावे.
आस्तिक असाल तर शरम वाटून घ्यावी!
(बेशरम आस्तिक!)
खूप आनंद झाला
स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, डेन्मार्क वगैरे देशांची नावे वरल्या यादीत उच्च क्रमांकांवर बघून फार आनंद झाला. विशेषतः भयंकर हवामान, नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता वगैरे असून देखील या लोकांचे यादीतले वरले स्थान बघून संतोष वाटला. वरील संख्याशास्त्राप्रमाणे इतर अनेक याद्यांतही त्यांचे नाव वर असेल. याचे मुख्य कारण तिथल्या आगगाड्या मध्यरात्री शिट्टी वाजवत नाहीत की थंडीमुळे ब्लँकेटात हालचाल करावीशी वाटत नाही हे असावे का? पण छे! छे! असले बादरायण संबंध यनांनी लावायचे. आम्ही बापडे ते उपक्रमावर सहन करणार. :-(
विशेषतः समृद्धीच्या यादीत आईसलँड बारावे आहे म्हणज अहाहाहा! आमच्या अमेरिकन थंडीतही हे वाचूनच उब आली. शक्य असल्यास आपल्या भारतीयांनी तेथे राहायला जावे. कोणजाणे भारताची लोकसंख्या कमी झाली तर समृद्धी वाढेल बापडी!
एकंदरीत युरोपची समृद्धी आणि नास्तिकता बघून डोळे पाणावले. समाधानाबाबत सौदीचा पहिला क्रमांक पाहता तिथल्या समाधानी स्त्रीजीवनाविषयी आसूया वाटली. (प्रत्यक्षात सौदी स्त्रियांच्या जन्माची नोंदणीही होत नाही असे ऐकून आहोत पण आमचे निरीक्षण ते निरीक्षण कसले आणि आमची माहिती ती माहिती कसली.)
सर्वात अधिक इंग्रजी बोलणार्यांच्या यादीत भारताचा नंबर दुसरा आहे. हे वाचून खेडोपाड्यातले खाशाबा आणि कामण्णा एकमेकांशी फाडफाड विंग्रजी बोलतात हे कळल्यानेही मनाला सुखद धक्का बसला.
अब होगा दूध का दूध और पाणी का पाणी. एका प्रसिद्ध निष्कर्षाप्रमाणे यनांच्या लेखानंतर वसुलिंचा लेख येतो का बघायचे! किंबहुना, यानंतर लग्गेच ज्याचा लेख येईल ते वसुलि.
:)
नेहमी प्रमाणे यनावाला लेख!
बादरायण संबंध कसेही जोडता येतात. त्यात काय ते विशेष?
पेंग्वीन ऍटलास ऑफ सेक्षुअल बिहेवियर म्हणतो की, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि स्विडन या देशात बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे समृद्धी वाढली की लोक बलात्कारी बनतात म्हणायचे का?
किंवा त्याच धर्तीवर जगात जेथे जेथे लिंग विच्छेदन केले जाते तेथे तेथे खनिज तेलाचे साठे सापडतात असाही निष्कर्ष काढता येईलच. :)
आपला
गुंडोपंत
हहपुवा
>>किंवा त्याच धर्तीवर जगात जेथे जेथे लिंग विच्छेदन केले जाते तेथे तेथे खनिज तेलाचे साठे सापडतात असाही निष्कर्ष काढता येईलच. :)
हहपुवा :D :D माझेपण लै दिवसांपासून असेच कैतरी मत होऊ पहाते आहे ;)
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||
समृद्धी व नास्तिकता
श्री. यनावाला यांनी एक मोठा रोचक योगायोग आपल्या निदर्शनाला आणला आहे.
परंतु या दोन निर्देशांकांचे एकमेकाशी काही नाते असावे हा त्यांचा निष्कर्ष मला पटला नाही. कोणत्याही देशाची समृद्धी ही त्या देशातील लोकांचा कष्टाळूपणा, साधनसंपत्ती व भौगोलिक परिस्थिती यावर मुख्यत्वे अवलंबून अस्ते. या शिवाय त्या देशाचे शासन काय धोरण स्वीकारते त्यावरही हे अवलंबून राहते. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली 43 वर्षे जी धोरणे स्वीकारली गेली त्याचा परिणाम या देशाची गरिबी वाढत जात राहिली एवढाच झाला. सिंगापूर किंवा जर्मनी सारखे देश कोणतीही साधन संपत्ती नसताना केवळ कष्टाळूपणा व योग्य धोरणे यामुळे सधन बनले आहेत.
एखादा देश नास्तिक आहे की नाही हे सांगणे फार कठिण आहे. कॅथोलिक किंवा मुस्लिम धर्मीय आस्तिक आहेत किंवा नाही हे लगेच सांगता येते. परंतु हिंदू, बौद्ध, प्रॉटेस्ट न्ट्स किंवा कंन्फ्युशियस च्या धर्माचे पालन करणारे लोक आस्तिक आहेत किंवा नाही हे सांगणे फार कठिण आहे कारण या धर्मियांपैकी अनेक आस्तिक कोणत्याही कर्मकांडाचे पालन करताना दिसत नाहीत. यनावाला यांनी सांगितलेला नास्तिकतेचा निर्देशांक सत्य परिस्थिती दर्शविणारा असेल असे पटत नाही.
या दोन निर्देशांकात दिसणारे वरवरचे नाते हे केवळ एक योगायोग आहे असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
सहमत
यनावालांशी पूर्णपणे सहमत आहे.
अमेरिकेच्या अपवादाचे फारसे आश्चर्य वाटत नाही. भारतामधून आस्तिक लोक अमेरिकेत यायचे प्रमाण वाढल्यापासून अमेरिकेतली आस्तिकांची संख्या वाढली आणि समृद्धीला ओहोटी लागली. लवकरच ही समृद्धी कमी होऊन समृद्ध देशांच्या यादीमध्येही अमेरिका ४४ च्या स्थानावर पोचून दोन्ही याद्या सुसंगत होतील. याचा एक आणखी परिणाम म्हणजे भारतातून आस्तिकांची संख्या कमी होऊन नास्तिकांचे प्रमाण वाढेल, अर्थातच समृद्धीही वाढेल हे वेगळे सांगणे नलगे. या सर्वामध्ये मोठा अडथळा म्हणजे भारतामधून अमेरिकेत आलेले नास्तिक लोक. हे लोक भारतात परत गेल्यास आणि तितक्याच किंवा जास्त आस्तिकांना अमेरिकेत पाठवल्यास भारत लवकरच सुपरपॉवर होईल यात मला अजिबात शंका नाही.
विनायक
हाहाहा
जिंकणारे कितीही जिंकत असले तरी हरणारे आपापल्या परीने त्यांच्यात घुसून त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना हरवत असतातच. - नेमाडे.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
संबंध
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
* इथे दिलेल्या दोन याद्यांचाच विचार अपेक्षित आहे. अजून अनेक विविध विषयांवरील याद्या असतील. त्यांचा इथे संबंध नाही.
* हा बादरायण संबंध मुळीच नाही. तसेच तो मी प्रस्थापित केलेला नाही. तो त्या दोन याद्यांत दिसतोच. मी केवळ त्याकडे लक्ष वेधले.
* पहिल्या पंधरा समृद्ध देशांतील दहा देशांत नास्तिकांचे प्रमाण २५%+ असावे हा योगायोग असू शकत नाही. असे केवळ ३/४ देश असते तर योगायोग म्हणता आला असता.
*लेखातील निष्कर्षाचे तर्कशुद्ध युक्तिवादी खण्डन कुणीही केलेले दिसत नाही.
*समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण यांत गणिती काटेकोर संबंध नसेल. पण अधिक समृद्ध देशांत नास्तिकांचे प्रमाण अधिक असते असे सर्व साधारणपणे दिसते. ते नाकारणे हा हटवाद म्हणता येईल.
*वरवर कितीही नाकारले आणि विनोद केले तरी सुबुद्ध व्यक्तींनी डोळे आणि मन उघडे ठेवून पाहिल्यावर त्यांना हा संबंध दिसणार आणि निष्कर्ष विचारार्ह वाटणार हे नि:संशय.
सुबुद्ध??
अहो कोण सुबुद्ध वगैरे? वर चर्चेत भाग घेणार्यांपैकी आपण सोडून कुणीच सुबुद्ध दिसले नाहीत मला. इथे काही सुबुद्धांची नावे आहेत त्यांचे प्रतिसाद वाचायला आम्हीही उत्सुक आहोत.
सुबुद्धांच्या यादीत भर
धनंजय, अक्षय पूर्णपात्रे, चित्तरंजन, नितिन थत्ते, प्रा. डॉ. बिरुटे, प्रमोद सहस्रबुद्धे,
यांचे विचार वाचायला उत्सुक.
सुबुद्ध
माझ्यावर सुबुद्ध असल्याचा आरोप केल्याबद्दल विनायक यांच्यावर अब्रूलुस्कानीचा दावा लावावा म्हणतो. ;-)
असो. मूळ प्रस्तावावर माझे मत.
१. कोरिलेशन असावे पण काहीच प्रमाणात. निदान भारतात तरी समृद्ध/श्रीमंत असणारे लोक सहसा नास्तिक नसतात.
२. नास्तिक अधिक प्रमाणात असल्याने समाजाची समृद्धी वाढते असे काही कॉजेशन इतिहासात दिसत नाही.
नितिन थत्ते
विचार
सर्वेक्षणामधील नास्तिक/ आस्तिक प्रश्नाबाबत काही लोकांच्या मनात घोळ असू शकतो. सँपल सिलेक्शन बायस हा कोणते लोक उत्तरे देण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे निर्माण होऊ शकतो. उदा. नास्तिक लोक उत्तरे देण्याची शक्यता अधिक आहे कारण त्यांनी काही एका विचारांती त्यांची मते ठरवलेली असतात आणि माहितीच्या उपयुक्ततेबद्दल ते अधिक सजग असतात. आस्तिकांनीही विचार केलेला असू शकतो पण एकूणातच यावर चर्चा वगैरे न करण्याकडे कल असल्याने ते अशा सर्वेक्षणाला गांभिर्याने न घेता उडवून लावतील. हा सिलेक्शन बायस घालवायचा असल्यास काहीतरी इन्स्ट्रुमेंटल वेरिएबल वापरावे असे माझे मत आहे. उदा. दरडोई प्रार्थनास्थळांची संख्या हे एक उपयुक्त वेरिएबल ठरू शकते.
अवांतर: भारतातील प्रत्येक प्रार्थनास्थळच्या जागी (पुरातन मूल्य असलेली स्थळे सोडून) सार्वजनिक स्वछतागृहे बांधल्यास भारताच्या समृद्धीत वाढ होईल असे माझे मत आहे.
:)
"सगळे प्रतिसाद बहुतेक नास्तिकांचे असावेत, किवा विचार करून दिलेले प्रतिसाद नास्तिकांचे असावेत जरी ते ह्या लेखाला विरोध करत असतील तरी" असे काहीसा निष्कर्ष निघतो आपल्या वाक्याचा, आपण कल वगैरे कसा काय ओळखता? प्रतिसाद वाचून देखील असे विधान हे विशेष आहे! :)
:) अजून एक संबंध!!! स्वच्छता गृहाचा समृद्धीशी. नास्तिक लोकांना केवळ आकडे दिसतात कि काय अशी शंका येत आहे मला, ते आकडे ज्या गोष्टींचे आहेत त्यांचा अर्थ देखील कधीतरी लक्षात घ्यावा हि विनंती.
खुलासा
तुम्ही उद्धृत केलेले वाक्य सर्वेक्षणात बायस कसा निर्माण होतो याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून दिलेले आहे. अर्थातच ते वाक्य पूर्णत: स्पेक्युलेटिव आहे. आस्तिक चर्चा करतांना नेहमीच दिसतात -आपापसात तसेच नास्तिकांशीही.
होय. माझ्या मतात असा संबंध आहे.
प्रार्थनास्थळांचे आकडे व स्वच्छतागृहांचे आकडे यांची तुलना होऊ नये असे आपणांस वाटते का? मी तर पुढे जाऊन या स्वच्छतागृहांच्या देखरेखीची जबाबदारी प्रार्थनास्थळांच्या पुजार्यांकडे दिली जावी असे म्हणणार होतो. नाहीतर पुजारी बेरोजगार झाल्याने कल्याणात (वेल्फेयर) घट होईल असे काही लोक म्हणतील.
कुठे फेडाल?
तुम्ही चक्क भटाला सफाई कामगार व्हायला सांगणार आहात. तुमच्या सात पिढ्या कायश्या नावाच्या नरकात खितपत पडतील. ;-)
नितिन थत्ते
सफाई
नास्तिक(काही) लोक बहुदा फक्त घाण करायचे काम करतात वाटते. :) अस्तिकांना सफाई करावी लागेलच.
एकुणच मूळ चर्चा प्रस्तावापेक्षा आपला मुद्दा वेगळा आहे,स्वछातागृहाबद्दल आणि त्याच्या आत्त बिंदू बद्दल धागा काढा तिथे आपण बोलू. इथे अवांतर नको.
अवांतर रिडंडंट
वरील वाक्य माझ्या प्रतिसादातून.
तुमची रिडंडंट तक्रार.
________
वा. तुम्ही लईच साळसूद आहात बुवा.
मान्य
मान्य.
आपल्याच मुद्द्याला मी पाठींबा दिला असे समजा.
सुबुद्ध
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"अहो कोण सुबुद्ध वगैरे?"" प्रियाली यांचा प्रश्न.
उत्तर: तुम्ही,म्हणजे उपक्रमावरील सर्व सदस्य सुबुद्ध आहेतच. म्हणून प्रस्तावातील सर्वसाधारण निष्कर्ष इथल्या सर्वांनाच विचारार्ह वाटणार असे माझे मत आहे.
छे!छे!!
मला गणू नका. सैतानावर माझी नितांत श्रद्धा असल्याने पारंपरिक आस्तिक आणि नास्तिकांच्या यादीत मी कधीच नव्हते. ;-) पण मागे आपण निष्कर्ष काढला होता ना की बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.तेव्हा जे विचार करणारे सुबुद्ध आहेत ते मी ज्यावेळी प्रतिसाद दिला त्यावेळी चर्चेत नव्हते. :-)
संदर्भः http://mr.upakram.org/node/2883 मुद्दा ३.
दुवा
वर दुवा दिला होता, तो पाहिला किंवा नाही माहीत नाही. म्हणून दुव्यातील काही भाग इथे देत आहे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......
हं
यनावाला यांनी पहिल्या दोन पर्यायांचा उल्लेख केला आहेच.
ऑकॅमच्या वस्तर्याने तिसरा पर्याय नाकारला जातो.
चौथा पर्याय हा पहिल्या दोन पर्यायांचेच मिश्रण आहे.
'पुरेसे व्यापक निरीक्षण' करून पाचवा पर्याय नाकारता येतो.
म्हणजे
म्हणजे समृद्धी आणि नास्तिकता हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत आणि दुसरा कुठलाही पॅरामीटर नाही??
भ्रष्टाचार, गुन्हेगारी, साक्षरता, राहणीमान, भौगोलिक वातावरण, तंत्रज्ञानाची उपलब्धता या सर्वांचे काय?
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
नाही
कोरिलेशन कोइफिशंट १ नाही हे निश्चित. त्या यादीवरून त्याचे गणन करावे लागेल.
मग
मग पर्याय ३ निकालात कसा काढला?
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
:)
अनलेस अदरवाइज.
कार्य-कारण
कार्य-कारण भाव स्पष्ट नसताना कोरिलेशन इज कॉझेशन असे मानणे याला अंधश्रद्धा का म्हणू नये? :)
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
खुलासा
"शुद्ध विज्ञानात कारण असे काही नसतेच मुळी" हे धनंजय यांचे मत मला पूर्ण पटते. त्यामुळेच, कार्यकारणभाव म्हणजे वास्तविक अप्रत्यक्ष कोरिलेशन असते.
उदा., "क आणि ख एकत्र घडतात" असे कोरिलेशन सापडले की दोन पर्याय उपलब्ध असतातः
ऑकॅमचा वस्तरा इतकेच सांगतो की अधिक माहिती मिळत नाही तोवर पहिला पर्याय निवडावा.
मूल्य
नास्तिकतेकडे क आणि ख असेच बघणार असाल तर कदाचित संबंध प्रस्थापित केला जाऊ शकतो केवळ शक्यता म्हणून, पण कार्य कारण भावाच्या अनुपस्थितीत त्या संबंधाचे मूल्य हे शून्यच आहे.
अधिक माहिती
अधिक माहिती उपलब्ध नाही असे कोण म्हणते? भ्रष्टाचार, गुन्हेगारी, साक्षरता, राहणीमान, भौगोलिक वातावरण, तंत्रज्ञानाची उपलब्धता या सर्वांचा विचार करा, हवे तितके पॅरामीटर मिळतील. यनावालांचा अजेंडा ठरलेला आहे त्यामुळे ते या सर्वांकडे सोइस्कर दुर्लक्ष करतात. असे करून फक्त एकाच पॅरामीटरवर समृद्धी अवलंबून आहे असे कार्यकारण भाव माहीत नसताना म्हणणे म्हणजे अंधश्रद्धा आहे.
तुम्हाला नास्तिकतेला पाठींबा द्यायचा असेल तर जरूर द्या, बट डोंट ट्राय टू डिफेंड द अनडिफेंडेबल.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
:)
:) कार्यकारणभाव नाही कसा, अस्तीकांना हिणवणे हा एक असू शकतोच कि. अन्यथा ह्याच २ सूच्या निवडण्याचे कारण काय! :) किवा आपण म्हणता तसे हि नास्तिकांची अंधश्रद्धेची पद्धत :)
?
एकाच असे कोणी म्हटले?
मत
तसे यनावालांचे मत दिसते (नाहीतर त्यांनी इतर घटकांचा विचार केला असता.)
आणि तुम्ही त्यांचा अगम्य हायपोथेसिस डिफेंड करत आहात.
मग पर्याय ३ ओकॅमच्या वस्तर्याने निकालात काढता येत नाही. आणि पर्याय ५ लागू होतो. तुमच्या दोन विधानांमध्ये विसंगती आहे.
अवांतर : हे म्हणजे पाउस पडेल की नाही हे तपमान या एका घटकावरून सांगण्यासारखे आहे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
नाही
नाही. निधर्मीपणामुळे समृद्धीमध्ये किंचित वाढ होईल पण निधर्मीपणा समतेमुळे वाढेल असे माझे मत आहे.
या धाग्यात उपलब्ध असलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढला आहे. "भ्रष्टाचार, गुन्हेगारी, साक्षरता, राहणीमान, भौगोलिक वातावरण, तंत्रज्ञानाची उपलब्धता" यांच्या सूचि मिळाल्या की विधान बदलता येईल.
उपलब्ध
उपलब्ध असलेली माहिती पुरेशी आहे किंवा नाही हे बघणे सर्वात पहिले काम असते. हा निष्कर्ष आज उकडते आहे म्हणजे आज चक्रीवादळ येणार यासारखा आहे.
आणि
इथे विसंगती आहे कारण पाचवा पर्याय "5. the "relationship" is a coincidence or so complex or indirect that it is more effectively called a coincidence" असा आहे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
खुलासा
सुलभ संबंध नसला तरी योगायोग हा शब्द मान्य नाही. माझ्या मते चौथा पर्याय योग्य आहे परंतु या धाग्यात त्यासाठी आवश्यक माहिती नाही.
क्ष्
अधोरेखित
परत अधोरेखित करतो.
हे तुमचेच मत आहे. असे असल्यास तुम्ही 'पुरेसे व्यापक निरीक्षण' करून पाचवा पर्याय नाकारता येतो असे म्हणू शकत नाही.
हे तुमचे मत आहे. त्याला काहीही पुरावा नाही.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
नाही
नाही, अप्रत्यक्ष संबंधाला योगायोग म्हणावे हेच मला मान्य नाही. व्यामिश्र का होईना, कोरिलेशन कोइफिशंट शून्य नसून संबंध दाखविता येईल इतका धन असतो तेव्हा त्याला योगायोग म्हणणेही मला मान्य नाही. म्हणजे पाचव्या पर्यायातील शब्दच मला मान्य नाहीत. पाचवा पर्याय "व्यामिश्र किंवा अप्रत्यक्ष संबंधही नाहीत, छोट्या निरीक्षणातील योगायोगामुळे संबंध असल्याचा भास होतो आहे" असाच वाचावा असे मला वाटते. मी दिलेली शब्दरचना वापरून मी पाचवा पर्याय नाकारतो आहे (हा खुलासा आधीच आवश्यक होता). निरीक्षण पुरेसे व्यापक आहे असे मला वाटते.
या धाग्यातील सूचींमध्ये त्याला काहीही पुरावा नाही.
शब्द
पाचव्या पर्यायातील शब्द असे आहेत. "5. the "relationship" is a coincidence or so complex or indirect that it is more
इथे ऑर या शब्दाकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात. योगायोग किंवा संबंध सुलभ नाहीत. पर्याय सामान्यीकरण असल्याने सर्व शक्यता विचारात घेतल्या आहेत. फक्त योगायोग असे म्हटलेले नाही.
शक्यता १ : योगायोग
शक्यता २ : व्यामिश्र संबंध
शक्यता ३ : अप्रत्यक्ष संबंध
पैकी क्रमांक दोन तुम्हाला मान्यच आहे.
शब्दरचना मान्य नसती तर तुम्ही "पुरेसे व्यापक निरीक्षण' करून पाचवा पर्याय नाकारता येतो." असे म्हटले नसते.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
होय
संबंध आहेत या दाव्याचे सर्व प्रकार बाकीच्या पर्यायांत आहेतच, त्यामुळे संबंध सुलभ नाहीत हा भाग पाचव्या पर्यायात ठेवूच नये.
पाचवा पर्याय म्हणजे योगायोग असे ठरवून मी 'पुरेसे व्यापक निरीक्षण करून पाचवा पर्याय नाकारावा' असे म्हणतो आहे. "पुरेसे व्यापक निरीक्षण केले की योगायोगामुळे होणारी फसवणूक टाळता येते (="पर्याय ५ सत्य नाही" असे म्हणता येते)" हे विधान तुम्हाला मान्य असेल अशी आशा आहे.
पर्याय
पाचवा पर्याय सामान्यीकरण आहे. पण पाचवा पर्याय = योगायोग हे मला पटत नाही. तुम्ही असे का ठरवले ते ही कळले नाही. तसेच काही बाबतीत योगायोग असू शकतो. हे प्रत्येक केससाठी वेगवेगळे असेल.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/