देशाची समृद्धी आणि नास्तिकांचे प्रमाण

"भारताच्या भरभराटीला ओहोटी.समृद्धिनिर्देशांकानुसार भारताचा क्रमांक 88 वा." हे वृत्त दि.1नोव्हेंबर 2010 च्या दै.सकाळ मधे वाचले. संदर्भ(द लिगॅटम प्रोस्पेरिटी इंडेक्स)पाहिला.क्रमानुसार पहिले पंधरा समृद्ध देश असे:(संदर्भ१)
1.नॉर्वे 2.डेन्मार्क 3.फिनलंड
4.ऑस्ट्रेलिया 5.न्यूझीलंड 6.स्वीडन
7. कॅनडा 8.स्वित्झर्लंड 9.नेदरलॅंड
10.अमेरिका 11.आयर्लंड 12. आईसलॅंड
13.इंग्लंड 14. ऑस्ट्रिया 15.जर्मनी.
तसेच इतर काही:
.......58.चीन59.श्रीलंका 88.भारत 91. नेपाळ 96. बांगलादेश 109.पाक. शेवटी 110.झिबाब्वे
******************************************
नंतर जागतिक नास्तिकता या विषयाचा शोध घेतला.त्यात देशातील लोकसंख्येत नास्तिकांच्या प्रमाणानुसार पन्नास देशांची सूची आहे.संदर्भ२ (वर्ल्ड् वाईड इथीझम ट्रेन्ड &पॅटर्न). त्यांतील पहिले दहा देश आणि प्रत्येक देशातील नास्तिकांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण असे:
1.स्विडन...85% 2.डेन्मार्क...80% ३. नॉर्वे...72% 4. फिनलंड....60% 5.जर्मनी...49%
6.इंग्लंड....44% 7.नेदरलंड...44% 8. कॅनडा...30% 9.स्वित्झरलंड....27% 10.ऑस्ट्रिया..25%
शेवटी 50.क्रोएशिया...7%
या सूचीत भारताचे नाव नाही. कारण नास्तिकांचे प्रमाण नगण्य असावे.(<७%)
******************************
विश्लेषण:
* ही सर्वेक्षणे विश्वासार्ह असावी. कारण संबंधित संस्था अनेक वर्षे हे काम करीत आहेत.
* समृद्धी निर्देशांकाचे सर्वेक्षण या वर्षीचे (२०१०) आहे. नास्तिकांविषयीचे २००५ चे आहे.
*नास्तिकांच्या प्रमाणानुसार क्रमांक असलेले पहिले दहा देश हे सर्वच्या सर्व पहिल्या पंधरा समृद्ध देशांत आहेत.
*अमेरिकेचा एकमेव अपवाद वगळता पहिल्या पंधरांतील प्रत्येक समृद्ध देशांत नास्तिकांचे प्रमाण 25% हून अधिक आहे.
*या सर्वेक्षणांवरून सर्वसाधारणपणे पुढील पैकी एक निष्कर्ष निघतो असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
१.देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढले तर त्या देशाची समृद्धी वाढते.
२.देशाची समृद्धी वाढली की त्या देशातील नास्तिकांचे प्रमाण वाढते.
*कार्यकारण भावाच्या दृष्टीने विचार केला तर वरील निष्कर्ष क्र.१ अधिक पटतो. कारण नास्तिक विचारसरणी वास्तववादी आणि व्यवहारी असते.ती ऐहिक प्रगतीस पोषक ठरते.देव धर्माच्या कर्मकांडांत लोकांचा वेळ,श्रम आणि पैसा यांचा अपव्यय कमी होतो.भ्रामक कल्पनांवर आधारित असलेल्या अनुत्पादक व्यवसायांना आळा बसतो.
*देशाच्या समृद्धीवर परिणाम करणारे अन्य अनेक घटक आहेत.जसे नैसर्गिक साधन संपत्ती, भौगोलिक स्थान, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक तसेच मनुष्यनिर्मित उत्पात, विध्वंस इ.अनेक..तरी सुद्धा वरील निष्कर्षामागे निरीक्षणांचे पुरेसे पाठबळ आहे असे वाटते.
* निरीक्षणांवरून जे दिसते ते लिहिले. त्यात त्रुटी आणि दोष असणे शक्य आहे.
* विश्लेषणात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसावा. आढळल्यास निदर्शनाला आणावा.
* पूर्वी अशा प्रकारचे काही कोणीतरी लिहिले होते ते वाचलेले आठवते.आलेख काढला होता. संदर्भ सापडत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

वेळेचा अपव्यय

नास्तिक लोकांच्या वेळेचा अपव्यय आस्तिक लोकांबद्दल चर्चा करण्यामुळे होत असावा असा माझा तर्क आहे. :)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

देश छोटे आहेत

वरच्या क्रमांकाचे देश सर्व छोटे आहेत (सिंगापोर सारखे) तेवढे त्यांना ताळ्यावर ठेवायला सोपे जाते. भारतात बेसुमार लोकशाही आहे - अरुंधती रॉय, अतिरेकी कारवाया, माओईस्ट कारवाया सगळ्यांना भयंकर स्वतंत्र्य आहे काहीही करायला. मग अराजकता माजल्यावर असल्या सुची व त्यांचे विश्लेषण चालते.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

प्रभावी प्रतिसाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या चर्चा प्रस्तावावर श्री.प्रभाकर नानावटी यांचा "नास्तिकतेतून समृद्धी निर्मिती"हा प्रतिसाद अवश्य वाचावा. तो मधेच असल्याने कदाचित आपल्या वाचनात आला नसेल म्हणून येथे संदर्भ दिला आहे. तसेच त्यांच्या प्रतिसादात निर्देश केलेला माहितीपूर्ण संदर्भही वाचनीय आहे.

कर्तव्यपालन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आरागॉर्न म्हणतात,:"नास्तिक लोकांच्या वेळेचा अपव्यय आस्तिक लोकांबद्दल चर्चा करण्यामुळे होत असावा असा माझा तर्क आहे. :)''

--
हा वेळेचा अपव्यय नव्हे! सारे भारतीय माझे बांधव आहेत.या बांधवगणात सर्व आस्तिक, नास्तिक व्यक्ती आल्या.माझ्या मते जे देशहिताचे ते त्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे.म्हणून मी सांगतो:
" देवापुढील दानपेटीतील पैसे,देवाचा मुकुट,अंगावरील दागिने यांची चोरी होते ना? तुम्हीच सांगा."
"हो.कधी कधी बातमी येते."
"चोरीच्या वेळी देव काहीच कसे करीत नाही?"
"काय करणार?"
"देव काहीच करीत नाही त्याअर्थी त्या मूर्तीत काही सामर्थ्य नाही असेच ना? म्हणजे ती निर्जीव बाहुली ठरते ना?"
"बाहुली कसे म्हणता येईल?"
" म्हणू नका.पण विचार करा. मूर्तीला हात जोडून 'कल्याण कर. रक्षण कर.'असे म्हणावे का?"
.....
एखाद्याच्या डोक्यात ,"अरे ! असे हात जोडणे आणि प्रार्थना करणे असमंजसपणाचे तर नव्हे?"असा संशय आला तर विचारप्रक्रिया सुरू झाली.बुद्धी असतेच. पुढचे सारे आपोआप.
ज्यांच्या डोक्यात कधी शंका येतच नाही त्यांची समजच शंकास्पद आहे असे म्हणायचे.

सिद्ध!

अशाप्रकारे यनावाला ह्यांना नास्तिकतेबद्दल बोलायचे आहे हे सिद्ध झाले आहे, सूची/निर्देशांक वगैरे सर्व कारणे आहेत.

सुसंगतता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"अशाप्रकारे यनावाला ह्यांना नास्तिकतेबद्दल बोलायचे आहे हे सिद्ध झाले आहे, सूची/निर्देशांक वगैरे सर्व कारणे आहेत."


चर्चाप्रस्तावाच्या प्रारंभापासून मी नास्तिकतेविषयींच सांगत आहे. शीर्षकातसुद्धा नास्तिक हा शब्द आहे.सर्वत्र सुसंगतता आहे. त्यात सिद्ध करायचे ते काय?

शंभरावा प्रतिसाद्

इथे काही रोचक् correlation सापडले.

(कुजका)

अवांतरः पाणी वहाते व्हायला मदत् व्हावी ही असमंजस प्रार्थना

देशाची समृद्धी

देशाची समृद्धी आणि नास्तिकता हे दोन्ही विषय वेगवेगळे चर्चिले असते तर अधिक उपयुक्त ठरले असते.
उदा: देश समृद्ध कशाने होतो आणि नास्तिकता योग्य/अयोग्य.
मुळात नास्तिक म्हणजे काय ही प्रचंड व्यक्तिसापेक्ष संकल्पना असल्याने तो विषय वेगळाच हाताळला असता तर निदान देशाच्या समृद्धीबद्दल दोन शब्द अजून बोलता आले असते.

थोडक्यात ह्या दुव्यावरून मिळालेल्या खालील गोष्टी देशाच्या समृद्धीला आवश्यक आहेत असेच माझंही मत आहे..
1. Ethics
2. Integrity.
3. Responsibility.
4. Respect to the laws & rules.
5. Respect to the rights of other citizens.
6. Work loving.
7. Strive for saving & investment.
8. Will of super action. (हे म्हणजे काय कळालं नाही.)
9. Punctuality.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

 
^ वर