वसूली ह्यांचे पुणरागमण कधी होणार

उपक्रमावरिल आमचे लाडके डूआय आणी आमचे आदर्श वसंत सूधाकर लीमये ऊर्फ वसूली आजकाल इथं वावरताणा दिसत णाहीत. उपक्रमावर त्यांची कॉस्टिक उणिव भासते आहे. ह्यांचे पुणरागमण होण्याची शक्यता आहे काय? पुणरागमण होण्यासाठी काय करावे लागते? कसेही करुण त्यांणा पुण्हा उपक्रमावर आणता येईल काय? वसूली याण्णा प्रतिबंधीत करण्यात आले आहे का? प्रतीबंधीत केल्यामूळे प्रवृत्ती बदलते का? असा प्रतीबंध घालणे योग्य आहे काय? कुणी उत्तरं दील का?

लेखनविषय: दुवे:

Comments

निषेध

श्रद्धाप्रचारकांशी बॅड कॉप बॅड कॉप खेळण्यात मला साथ कोण देणार?
--------
धागा हलकाफुलका असला तरी विषय गंभीर आहे. "वसुलि", "वसंत सुधाकर लिमये" हे आयडी स्पॅमबॉट किंवा हिट अँड रन साईभक्तांच्या आयडी यांप्रमाणे यःकश्चित नक्कीच नव्हते. उपक्रमच्या ओळखीला आकार देणार्‍या आयडीवर कारवाई करणे हे पार्शल प्रीफ्रंटल लोबॉटोमीप्रमाणे गंभीर आहे.
कारवाईची योग्यायोग्यता ठरविण्याचा प्रशासनाचा अधिकार मान्य आहे परंतु त्यांच्या खुलाशामुळे इतर सदस्यांना 'स्वतःच्या वागणुकीबाबतचे निर्णय' घेण्यात मदत होईल असे वाटते.

जे झालेले आहे...

उपक्रमच्या ओळखीला आकार देणार्‍या आयडीवर कारवाई करणे हे पार्शल प्रीफ्रंटल लोबॉटोमीप्रमाणे गंभीर आहे.

जे झालेले आहे त्यावर उहापोह होईलच परंतु यासोबत अशाप्रकारे कार्यवाही झालेल्या आयडीने पुनरागमन करावे का? पुनरागमन केल्यावर त्यांनी वागणुकीत बदल होईल असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे का? किंवा तशी कबुली द्यावी का? त्यानुसार त्यांचे वागणे राहिल अशी प्रशासनाला खात्री वाटते का? असे अनेक गंभीर मुद्दे या चर्चेमुळे निर्माण झाले आहेत.

संकेतस्थळांवरून आयडी गेल्यावर (प्रशासनाने काढली किंवा स्वखुशीने रद्द केली) नव्या नावाने परत येणार्‍यांची संख्या बघता अशा कार्यवाहींचे प्रयोजन काय असते हा ही प्रश्न पडतो.

हलक्या फुलक्या चर्चेला गंभीर वळण देण्याचा प्रयत्न. ;-)

सहमत

होय, या मुद्याकडे बहुतेक संस्थळचालक दुर्लक्ष करतात असे दिसते. एखादा आयडी हा आधीच सक्तीने बंद केलेल्या आयडीमागील व्यक्तीचा असल्याचे सिद्ध झाले की त्या नव्या आयडीवरही बंदी यावी असे मला वाटते. खात्रीलायकरीत्या सिद्ध होणे म्हणजे काय ते प्रशासनालाच ठरवावे लागेल. नव्या आयडीचे भांडे फोडण्यासाठी स्वयंसेवक मिळतीलच ;)

पुनरागमन केल्यावर त्यांनी वागणुकीत बदल होईल असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे का? किंवा तशी कबुली द्यावी का?

होय, प्रशासनाने तशी अट घालणे योग्य वाटते.

जे झालेले आहे त्यावर उहापोह होईलच

कधी? कोण करणार आहे?

प्रश्नच आहे

जे झालेले आहे त्यावर उहापोह होईलच

कधी? कोण करणार आहे?

जेव्हा तो प्रतिसाद टाकला तेव्हा उहापोह होईल असे वाटले होते. आपण सदस्यच करणार असा प्राथमिक अंदाज आहे. संकेतस्थळ चालक अशा चर्चात सहभागी झाल्याचा इतिहास नाही पण लोकांनीही भाग घेतला नाही. हा वसुलिंचा महिमा असल्यास अंदाज नाही.

अपेक्षित फलित

गुंडोपंत यांनी केलेल्या आरोपांचा या बंदीशी संबंध आहे काय याविषयी मला कुतूहल आहे. तक्रारकर्त्याने किंवा तक्रारकर्त्याच्या वतीने चालकांनी खुलासा केला नाही तर वसुलि यांच्यावरील बंदीमागील भूमिका जाणून घेण्याची संधी इतरांना मिळणार नाही. ती बंदी न्याय्य असल्याचे सर्वांना पटवून देणे आवश्यक नाही, परंतु 'नीड टू नो' तत्त्वाची किमान माहिती मिळावी असे मला वाटते. इतर संस्थळे स्पष्टीकरण न देता बंदी घालतात हे माहिती होते. माहितीप्रधान संस्थळानेही अशी माहिती न देणे दु:खद आहे.

म्यूट?

पण सतत संपादन करायला तलवार उपसून तयार असणारे आता ह्या मुद्द्यावर मौनव्रत का धारण करून आहेत ? असे केल्यामुळे हि दडपशाही आहे असे वाटू शकेल. एक माफक प्रतिसाद देऊन नक्की काय झाले व काय टाळले असता हि बंदी टळली असती हे प्रशासन सांगू शकते, मग इतर जनही ह्यातून बोध घेऊ शकतात.

छाण!

असेच प्रश्ण आम्हीही विचारतो

अवांतर: आमचे एक जुने मित्र* "ण ची भाषा" त्यांच्या लेखनात भरपूर वापरतात. त्यांची आवर्जून आठवण झाली. त्यांना हल्ली (आणि पूर्वीही) सदस्यनामाच्या विडंबनाचे उमाळे येतात असे कळते. असो. त्यांनी मौनव्रताला सरणावर चढवल्याने मंडळ आभारी आहे. ;-)

हेहेहे!

अंदाज चुकला आहे.

यादी बनवायला हवी

त्यांची आवर्जून आठवण झाली.

अगदी आणि बाऊ नावाचा शब्दही. पुनरागमनानंतर त्यांचे पाणी कमी होऊ नये हीहीच इच्छा.

अनेक आयडी आजकाल दिसत नाहीत. यादी बनवायला हवी इथे. असो. ओरिजनल आयडीने डुप्लिकेट लिखाण करणाऱ्यांपेक्षा डुप्लिकेट आयडीने ओरिजिनल लेखन करणारे कधीही बेस्ट.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

अगदी आणि बाऊ नावाचा शब्दही. पुनरागमनानंतर त्यांचे पाणी कमी होऊ नये हीहीच इच्छा.

=)) =)) =)) =)) बोला .. कोणाकोणाला कितीकिती पाणी हवंय :) या रे हांडा - कळश्या घेऊन् ...

- शार्क हंटर

टीआरपी तारू

आमचे एक जुने मित्र* "ण ची भाषा" त्यांच्या लेखनात भरपूर वापरतात. त्यांची आवर्जून आठवण झाली.

म्हणजे टीआरपी तारू यांची आठवण झाली असे म्हणा णा...

ख्याव् ख्यव् ख्यव्

व्वा !! बरेच् प्रसिद्ध दिसतो की आम्ही !! अगदी ज्यांचे आयडी आम्हाला ठावे नाही त्यांचेही तोंडी आम्ही ? चलणे दो :) बाकी एका महाण उपक्रमीने आम्हाला "छाण" चुक् आहे , आणि तो "छान" असा लिहीतात म्हणुन महान विद्यादानाचे कार्य केले होते , त्यांचा मी अंमळ आभारी आहे.

आनंदी आनंद गडे ... इकडे तिकडे चोहिकडे

- फार्ट फार्टर ( फार्टेस्ट)

साधारणपणे.....

साधारणपणे श्री. यनावाला यांचा लेख येण्याचा तीन ते चार दिवस आधी श्री. वसूली यांचे लेख येतात. विश्वास नसेल तर उपक्रमचा इतिहास चाळून बघा. (आता यनावालांचे लेख कधी येणार ते विचारु नका.)

सध्या कोणताही मोठा हिंदू सण नाहिये त्यामुळे देव, धर्म यांसारखे विषय चर्चेत नाहित. साधारणपणे मकर संक्रांतीच्या आसपास लेख दिसायला हरकत नाही असे आमचे मन सांगत आहे.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

आँ?

साधारणपणे श्री. यनावाला यांचा लेख येण्याचा तीन ते चार दिवस आधी श्री. वसूली यांचे लेख येतात. विश्वास नसेल तर उपक्रमचा इतिहास चाळून बघा. (आता यनावालांचे लेख कधी येणार ते विचारु नका.)

यनावाला म्हणजेच वसुलि असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

__/\__ निरीक्षण आवडले.

ते आणि वसुली एकच

मी मात्र वरील प्रश्नाचे उत्तर नाही असे देइन. मी एकदा वसुली ह्यांना दुस-या एका प्रसिद्ध आयडीने माझ्याशी चर्चा करतांना सप्रमाण दाखवले होते की, ते आणि वसुली एकच आहेत.

अनेक आयडींनी मराठी संकेतस्थळावर वावरणा-या सदस्यांसाठी हा शब्द कसा वाटतो?- बहुड्युपी

नोप्स

मी याआधीही तुम्हाला खुलासा केला होता की वसुलि किंवा वसंत सुधाकर लिमये हे आयडी माझे नाहीत. परंतु, सहज यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही एकत्र असतो हे मान्य आहे.

दूरान्वय

माननीय उपक्रमसदस्य सहज यांच्या मते

बर्‍याचदा जे धागे / चर्चा तावातावानी चालतात, त्यात धम्मकलाडू, वसुलि, रिटे कायम एका बाजुने दिसतात.

त्यावरुन मला कोणत्याही हिंदी मसाला चित्रपट ज्यात अमरीशपुरी/धम्मक/कोण्या भुंजगभट नावाचा व त्याची मुले शक्तीकपूर/वसुलि/बैद्यनाथ व गुलशनग्रोवर/रिटे/जोरावरसिंग नावाने कोण्या आटपाटनगरात दहशत निर्माण करत असल्यासारखे वाटतात :-)

त्या न्यायाने अमली पदार्थ/शस्त्रास्त्रे विकणारे आंतरराष्ट्रीय स्मगलर (सहज यांनी सुचविलेले नाव सर चार्ल्स) यनावाला ठरू शकतात. ते चित्रपटात दोनतीन डीलपुरतेच दर्शन देतात पण पोलिसांची धाड पडते तो माल त्यांनीच पुरविलेला असतो (http://mr.upakram.org/node/2813#comment-45733 किंवा http://mr.upakram.org/node/2813?page=1#comment-45733) आणि बाकीचे निस्तरत बसतात ;)

हाहाहाहा!

ही खरड वाचली होती. लय भारी आणि विश्वास ठेवण्याजोगी. ;-)

बायदवे, यना सणासुदीला लेख घालतात त्यांच्यासाठी काही नावे बूक करेन म्हणते. हा खेळ कावळ्यांचा असे सध्या एकच सुचले बाकीची नंतर.

आँ?आँ?

राजकुमार ह्यांच्या अणुदिणीवर लिहीले आहे की

मित्रांनो,

कळविण्यास दु:ख वाटते की नियोजीत भयकथा दिवाळी विशेषांकासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध न झाल्याने हा अंक प्रकाशीत होऊ शकत नाही.

अंकासाठी साहित्य पाठविलेल्या मित्रांचे आभार !!

पुढील वर्षी पुन्हा प्रयत्न करीन म्हणतो. पाहूया यश येते का ते !

यणावाला आणी वसूली एकच तर मग प्रियाली आणि राजकूमार वेगळे णाही.

खाजवुण खरुज वाढवीणारा
बंडलबोर (खाजरुमाल)

केवळ अशक्य

कळविण्यास दु:ख वाटते की नियोजीत भयकथा दिवाळी विशेषांकासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध न झाल्याने हा अंक प्रकाशीत होऊ शकत नाही.

हाहाहा! मस्त!! मी भयकथा दिवाळी विशेषांक काढला तर भयकथा कमी पडतील असे वाटलेच कसे बॉ!! ;-)

णीशेढ!!

मी भयकथा विशेषांक काढला तर लेखक मी, कवयित्री* मी, संपादक मी, प्रकाशक मी, चित्रकर्ती* ही मीच. फक्त वाचक तुम्ही. ;-)

* भयानक चित्रच काढायची ना आणि भयंकर कविता हव्या ना! मुबलक तयार होतील.

वटपौर्णिमेसारख्या

प्रथा बंद व्हायला हव्यात का? असा लेख त्या सणाच्या मुहूर्तावर धम्मकलाडू यांनी लिहिला होता. म्हणजेच धम्मकलाडू = वसुलि=यनावाला असे म्हणावे काय?

विनायक

वसुली गेले?

आम्हाला वाटतं की आत्मा अमर आहे. व्यक्ती गेली तरी आत्मा इथेच घोटाळत असतो. आत्मा फक्त शरीर सोडतो आणि दुसरे धारण करतो. कोण म्हणाले अवतार...पुनर्जन्म नाही वगैरे...

कॉस्टिक उणिव भासते आहे.

कॉस्टिक उणीव म्हणजे काय? संदर्भासहित स्पष्ट करा. ;-)

कॉस्टिक उणीव

कॉस्टिक उणिव भासते आहे.

कॉस्टिक उणीव म्हणजे काय? संदर्भासहित स्पष्ट करा. ;-)

कॉस्टीक उणीव म्हणजे पाठ खाजवण्यासारख असावं. म्हणजे खाज नकोही असते आणि खाजवलं की बरं ही वाटतं.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

आँ

येथे आयडी उडत नाहीत. उडवायला सांगितले तरी उडत नाहीत असे आमच्या एका मित्रांनी काही काळापूर्वी सांगितले होते. त्यामुळे चर्चा वाचून आश्चर्य वाटले.

नितिन थत्ते

अपवाद

प्रत्येक नियमाला अपवाद असतात इतकी शिंपल गोष्ट माहित नाही का? ;-)

चुकीची माहिती

आयडी उडवायला योग्य व्यक्तीला सांगितले, तर उडतात.

- अल्बस्

--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||

आयडी उडणे

येथे आयडी उडत नाहीत.

आयडी उडवलेला नसावा. प्रतिसाद देण्यावर प्रतिबंध असावेत. असो. सहसा पुनरागमन म्हणजे कुणीतरी थुंकून परत चाटणे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

फालतू

कोणत्याही आयडीला मरेपर्यंत फाशी या शिक्षेच्या मी विरोधात होतो आणि आहे. चर्चा व्हावी विचार घडावेत बदलावेत - पण कोणतेही आकस नसावेत. अर्थात हे माझे मत झाले. पण सदैव आग लावू आणि फालतू प्रतिसाद देत राहिले तर एकुण चर्चेची मजा जाते हे ही तेव्हढेच खरे. तसे काहीसे हल्ली येथे होते होते काही प्रमाणात अजूनही आहे. या विरोधात मी माझ्या परीने आवाज उठवला होता.
आठवा माझी सही - ~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~
कारण काही मांडणे चर्चा करणे एका काळात शक्य होत नव्हते.

तसेच वसुलि यांनी मला इंटरनेटवर हॅरॅस करण्याचा प्रयत्न केला होता आणि एका सदस्याची बदनामी केली होती. हे ही माझ्या चांगले लक्षात आहे. त्या संदर्भात मी कायदेशीर सल्लाही घेतला होता/आहे. त्या प्रकरणाचे स्क्रीन शॉट्स अजूनही माझ्याकडे आहेत.

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

?

अर्थात हे माझे मत झाले. पण सदैव आग लावू आणि फालतू प्रतिसाद देत राहिले तर एकुण चर्चेची मजा जाते हे ही तेव्हढेच खरे.

आठवा माझी सही - ~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

  1. आगलावू प्रतिसाद म्हणजे काय? खळ्ळ आणि खट्ट करणारे निधर्मी किती? किंवा ओरिजिन ऑफ स्पीशीज हातात घेऊन कोणी निधर्मी आत्मघातकी बाँबर बनले काय? तशा कृतींसाठी चिथावणी दिल्याचा आरोप तुम्ही वसुलि यांच्यावर करीत आहात.
  2. ज्योतिषशास्त्राच्या समर्थनाच्या चर्चा फालतू आहेत, एकूण संस्थळाचीच मजा जाते असे 'माझे मत' झाले. पण तरीही, तुमचा आयडी उडवावा अशी विनंती मी केलेली नाही. मला कधीकधी तुमच्या तर्कहीनतेचा कंटाळा येतो पण तरीही मी पळून गेलो नाही!

तसेच वसुलि यांनी मला इंटरनेटवर हॅरॅस करण्याचा प्रयत्न केला होता

हॅरॅस म्हणजे नेमके काय? व्याख्या कुठाय?
म्हणजे वसुलि यांच्याविरुद्ध तुम्हीच प्रशासनाकडे तक्रार केली आहे काय?
तुम्हीही एकदा विविध वृत्तपत्रांतील मजकूर येथील प्रतिसादांमध्ये ग्राफिटी करीत बसला होतात त्यापेक्षा अधिक उपद्रव कशाचा होऊ शकेल?

एका सदस्याची बदनामी केली होती. हे ही माझ्या चांगले लक्षात आहे.

बदनामीची तक्रार केवळ व्यक्ती किंवा नातेवाईक करू शकतात.

सदस्य की सदस्यनाम

काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे

'सदस्यांच्या' नाही तर सदस्यनामांच्या.

एका सदस्याची बदनामी

सदस्याची नाही तर 'सदस्यनामाची'

असो. वसंत सुधाकर लिमये हे सदस्यनाम माझ्या दुसर्‍या सदस्यनामाचे चांगले मित्र होते. त्यांना प्रतिबंधित केले असल्यास त्याविषयी निषेध नोंदवतो.

_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल

काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे

पुणरागमण होण्याची शक्यता आहे काय?
माहीत नाही. प्रवृत्ती मरत नसल्यामुळे पुनरागमन झाले काय किंवा नाही झाले काय.

पुणरागमण होण्यासाठी काय करावे लागते?
उपक्रमावरचे माहीत नाही. पण इतरत्र कुणीही थुंकून पुन्हा चाटावे (संकेतस्थळचालक किंवा सदस्य किंवा दोघेही) लागते.

कसेही करुण त्यांणा पुण्हा उपक्रमावर आणता येईल काय?

कसेही करून कशाला. गाजावाजा न करता आल्यास बरे.

वसूली याण्णा प्रतिबंधीत करण्यात आले आहे का?
असे दिसते आहे.

प्रतीबंधीत केल्यामूळे प्रवृत्ती बदलते का?
नाही.

असा प्रतीबंध घालणे योग्य आहे काय?
कुणी शिव्याशाप-धमक्या देत नाही तोवर नकोच. उपक्रमावर तर नकोच.

कुणी उत्तरं दील का?
आम्ही आमच्यापरीने दिली आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर