सोन्याचा पिंजरा

आफ्रिकन आणि भारतीय लोकांना स्वतःचे भले कळत नाही, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांच्यावर शासन करणे अपरिहार्य आहे, वास्तविक त्यांच्यावर राज्य करण्यात आम्हाला क्लेषच होतात तरीही आम्ही दुनियादारी करतो आहो, असे मत मांडणारी व्हाईट मॅन्स बर्डन ही कविता रुडयार्ड किपलिंगने १८९९ साली लिहिली. (ते त्याचे स्वतःचे प्रामाणिक मत होते की औपरोधिक, याविषयी इतिहासकारांमध्ये वाद आहेत.) लोकांच्या भल्यासाठीही त्यांच्यावर सक्ती करू नये हे मत आपण आता मान्य करतो.
शारिरीक बलाचा वापर न करताही सक्ती केली जाऊ शकते. लोकांना अज्ञानात ठेवूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देता येते. रुग्णाला अज्ञानात ठेवून त्याच्यावर सर्वोत्तम उपचार करणे डॉक्टरांना सहज शक्य असते परंतु त्यास न्यायवैद्यकीय अनुमति नाही. सर्व माहिती रुग्णाला उपलब्ध करून निर्णयस्वातंत्र देणे अपेक्षित असते.
डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन ऍन्ड रीसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेने केलेले कार्य महान आहेच. परंतु, त्यांच्या केवळ एका धोरणाविषयी मला चर्चा अपेक्षित आहे.
शोधग्राम येथे 'मां दंतेश्वरी दवाखाना' आहे. त्याच्या आवारातील दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून "स्वच्छता राखा", "लसीकरण करा", असे संदेश पसरविले जातात. रुग्णांची फसवणूक करून त्यांचे तात्पुरते भले होईलही. परंतु ते नैतिक आहे काय?
दंतेश्वरी देवीचे आदेश पाळल्यामुळे खरोखरीच आरोग्यविषयक फायदे होत असल्याचे अनुभवून आदिवासींची श्रद्धा अधिकच दृढ (ती केवळ श्रद्धा उरणार नाही तर विवेकी विश्वास बनेल) होईल ना? या श्रद्धेचा वापर करून शोषण करणेही मांत्रिकांना सोपे जाईल ना?
अजून एक मुद्दा असा की उजव्या गटांनी 'मां दंतेश्वरी स्वाभिमान मंच' ही नक्षलवादाला 'विरोध करणारी' संघटना बनविलेली आहे. डाव्या गटांनी बिरसा मुंडा या स्वातंत्र्यसैनिक/प्रेषिताच्या नावाचा असाच वापर केलेला आहे. अशा परिस्थितीत, श्रद्धेला खतपाणी घालणे योग्य आहे काय?

"It has been my observation that one of the prices of giving people freedom of choice... is that sometimes, they make the wrong choice." -- Odo (Star Trek)

लेखनविषय: दुवे:

Comments

सापेक्ष

रुग्णांची फसवणूक करून त्यांचे तात्पुरते भले होईलही. परंतु ते नैतिक आहे काय?

याचे उत्तर सापेक्ष आहे. ते तुमच्या विंग्रजीत काया म्हन आहे ना! बॅड थिंग्ज इफ डन वुईथ गुड मोटीव्हज् आर आलवेज गुड.
अभय बंगांनी घातलेली (अंध)श्रद्धेची सांगड ही मला व्यक्तिशः तेथील पार्श्व भुमीवर नैतिक वाटते.
कोयनेच्या वीज निर्मिती मधे सरकारने पाण्याची पावर काढुन घेतली. हे पाणी आता शेतीत काय उपयोगाचे नाही. या असल्या पाण्यामुळे पीक कमी येत अशी समजुत असलेल्या शेतकर्‍यांना पाट किंवा विहिरीवरच्या पाण्याला विजेची मोटर बसवल्यावर ती पावर पाण्यात परत येते असे सांगुन खुश केले होते
प्रकाश घाटपांडे

हाच मुद्दा

याच मुद्यावर चर्चा अपेक्षित आहे.
टिळकांना समाजसुधारणेपेक्षा स्वातंत्र्य अधिक महत्वाचे वाटले त्याचे दुष्परिणाम उद्यापासून दहा दिवस दिसतीलच.

त्यांच्या कार्य पद्धतीवर शितोडे उडवण्याने तुम्ही मोठे होणार नाही

रिकामटेकडा यांना कांही उद्योग नाही का? ८ वर्षा पूर्वीच मी तो लेख वाचला होता. आज परत पूर्ण वाचला होता. स्वतंत्र्या नंतर गेल्या ६५ वर्षात जे काम तुमच्या INDIA च्या सरकारने केले नाही आणि त्यांची करायची इच्छा नाही तेथे बंग यांनी आदिवासी लोकांचे खरे दुखणे आजार ओळखून त्यावर त्यांच्या श्रद्धेचा ( तुमच्या शब्दात अंधश्रद्धा) वापर करत त्यांना रोग मुक्त केले तर कांही बिघडले नाही. आपण कांही करायचे नाही आणि दुसऱ्याने केले की अंधश्रधेचा (दूर) उपयोग केला म्हणून गळा काढायचा त्याच्या आवारातील दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून "स्वच्छता राखा", "लसीकरण करा", असे संदेश पसरविले जातात. रुग्णांची फसवणूक करून त्यांचे तात्पुरते भले होईलही. परंतु ते नैतिक आहे काय? यात काय चूक आहे. PDF फाईल मधील ७,८,९, ही पाने काळजीपूर्वक वाचा म्हणजे आदिवासी यांच्या राहणीमानाची कल्पना येईल तुम्ही आता उंटा वरून शेळ्या हकायाचे बंद करा, आमटे बंग यांनी आदिवासी विभागात जे काम केले ते तुमचा INDIA का करू शकला नाही? याचा विचार करायचा सोडून याची लाज वाटायची सोडून देवुन, त्यांच्या कार्य पद्धतीवर शितोडे उडवण्याने तुम्ही मोठे होणार नाही. सविस्तर नंतर लिहीन
thanthanpal.blogspot.com

नीट वाचा

बंग यांचे कार्य मोठे आहे असे मी आधीच मान्य केले आहे. पण तरीही त्यांना देव का मानावे? जे पटले नाही ते विचारले त्यात काय बिघडले?

याचे उत्तर आपण दिले नाही

याचे उत्तर आपण दिले नाही

PDF फाईल मधील ७,८,९, ही पाने काळजीपूर्वक वाचा म्हणजे आदिवासी यांच्या राहणीमानाची कल्पना येईल तुम्ही आता उंटा वरून शेळ्या हकायाचे बंद करा, आमटे बंग यांनी आदिवासी विभागात जे काम केले ते तुमचा INDIA का करू शकला नाही? याचा विचार करायचा सोडून याची लाज वाटायची सोडून देवुन,
thanthanpal.blogspot.com

ठीक

माझ्याकडे उत्तर नाही. पण म्हणून मी प्रश्नच विचारू नये असेही नाही.

आमटे/बंग यांचे कार्य अनिवासी/शहरी भारतीयांच्या पैशांवरच चालते ना?

भारतीयांच्या पैशांवरच चालते ना?

आपले हे उत्तर मला अपेक्षितच होते. कारण मनोवृत्ती.शिवाजी महाराज हा थोर राजा झाला कारण ....त्याचे गुरु दादोजी कोंडदेव होते म्हणून..... नाही तर ........... ही वृत्ती बदला. आणि मी भारतीय जनते कधीच आक्षेप घेत नाही. मी INDIA च्या सरकार बद्दल मत मांडले होते. त्यांच्या निष्क्रीयते मुळे प्राथमिक सोयी सोयी सुविधा आदिवासी विभागात पोहंचल्या नाहीत, महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री हतबलतेने XXXXXXX पणे सांगतो की आदिवासी,दुर्गम एव्हढेच काय मराठवाडा,आणि इतर मागास भागात सरकारी अधिकारी काम करण्यास जाण्यास तय्यार नाहीत, आम्ही मजबूर आहोत. तुम्ही मजबूर आहात तर सत्ता सोडा, किंवा त्या अधिकार्याला घरी बसावा. अमुक एक ठिकाणीच काम करीन असा कायदा आहे का? अश्या अवस्थेत अश्या ठिकाणी जर आमटे, बंग सारखी देवमाणसे
( मी देव नाही म्हणत माणस म्हणतो लक्षात घ्या.) यांनी. कोणती साधने,मार्ग वापरले या पेक्ष्या त्यांनी या आदिवासींना ज्या आरोग्य सोयी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान सुधारले हे महत्वाचे आहे. आणि काहो तुमच्या त्या मेडिकल एथिक्स मध्ये कट प्रक्टिस , रुग्णांना गेरमार्गाने लुबाडणे मंजूर आहे का? नाही म्हंटल, त्याच काय आहे की एव्हढे मोठे मेडिकल एथिक्स आम्ही वाचले नाही म्हणून तुम्हाला विचारले.

thanthanpal.blogspot.com

उत्तर

कोणती साधने,मार्ग वापरले या पेक्ष्या त्यांनी या आदिवासींना ज्या आरोग्य सोयी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान सुधारले हे महत्वाचे आहे.

पण साधने, मार्ग, हेसुद्धा सुधारता येतील काय, याची (कोरडी) चर्चा करू ना!

XXXXXXX पणे हा नऊ अक्षरी शब्द ओळखता आला नाही.

काहो तुमच्या त्या मेडिकल एथिक्स मध्ये कट प्रक्टिस , रुग्णांना गेरमार्गाने लुबाडणे मंजूर आहे का?

नाही, कोणीही कोणालाही लुबाडणे गैरच!

तसेच मी मनोवृत्ती, अहम ची जी भाषा लिहिली ती सुद्धा ओळखू आली नाह

कोणीही कोणालाही लुबाडणे गैरच! आपण या विरुद्ध कधी आवाज उठवला. आणि आपण बाकी महत्वाच्या विषयावर बोलणे का टाळतात. गोलगोल बोलू नका. ६५ वर्षात काय केले, पण तरीही त्यांना देव का मानावे? त्यांना कोणीही देव मानत नाही , आणि त्यांनी इतर भोंदू महाराजा सारखा देवत्वाचा कधीही आव आणला नाही...... कारण मनोवृत्ती ही वृत्ती बदला. कोणी कोण मुळे मोठा वा लहान होत नसतो ....... पण हे आम्हीच करू शकतो, आम्हीच बंग यांना पैसा पुरवतो .... हा अहम सोडा. बंग काम करत असल्या मुळे त्यांना भारतीय अनिवासी/शहरी भारतीयांच्या पैशांवरच चालते ना? असा मी पणा केला जात आहे. जर जनता पैसा देत असेल तर आपण ही हे काम का करत नाही. दुसरे जनता तर देवाच्या मंदिरात सुद्धा पैसा देते तेथे ही सेवाभावी कार्ये का चालत नाही. तेथे तर देवाचे दागिने सुद्धा स्वतः च्या स्वार्था साठी विकले जातात, याला कधी विरोध केला नाही. गरीब बंग, आमटे यांनी तर असा जनतेचा पैसा स्वतः च्या वयक्तिक स्वार्था साठी वापरला नाही. तरीही मेडिकल एथिक्स च्या नावा खाली त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार आपणास कोणत्या एथिक्स खाली मिळाला हे समजले तर बरे. कोणी चांगले करत असेल तर त्याला सहाय्य करू नका पण त्याचा मार्गा बद्दल वाईट तर बोलू नका. आपण जर आदिवासी असता आणि आपणस सुद्धा बंग यांनी उपचार या प्रकारे केले असते तर आपण कोणत्या एथिक्स खाली नाकारले असते ? एथिक्स वगेरे हे सर्व भरल्या पोटी रीकामपणाच्या मारायच्या गप्पा आहेत. तुम्ही कसे वागावे हे बंग , आमटे यांनी आपणास सांगितले काय? नाही ना. मग त्यांच्या कामात आणि आदिवासी बांधवाच्या हिताच्या आड आपण का येतात. कोणाचे तुमच्यानी चांगले होत नसेल तर कमीत कमी त्यांनचे वाईट चिंतु नका एव्हढेच एथिक्स का काय ते म्हणतात आम्हाला माहित आहे.
XXXXXXX पणे हा नऊ अक्षरी शब्द ओळखता आला नाही. हा शब्द जसा तुम्हाला ओळखता आला नाही तसेच मी मनोवृत्ती, अहम ची जी भाषा लिहिली ती सुद्धा ओळखू आली नाही वाटत? की त्या विषयावर आपले कांहीच मत नाही वाटत

thanthanpal.blogspot.com

उत्तर

आपण या विरुद्ध कधी आवाज उठवला. आणि आपण बाकी महत्वाच्या विषयावर बोलणे का टाळतात.

तेथे तर देवाचे दागिने सुद्धा स्वतः च्या स्वार्था साठी विकले जातात, याला कधी विरोध केला नाही.

ज्या मुद्यांविषयी येथे सर्वांचे एकमत असते त्या विषयांवर 'आवाज' उठवून काय फायदा?

त्यांना कोणीही देव मानत नाही

"बंग, आमटे यांनी तर असा जनतेचा पैसा स्वतः च्या वयक्तिक स्वार्था साठी वापरला नाही. तरीही मेडिकल एथिक्स च्या नावा खाली त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार आपणास कोणत्या एथिक्स खाली मिळाला हे समजले तर बरे." असे म्हणून तुम्ही त्यांना देवत्वच देत आहात. तीही माणसे आहेत, चुकू शकतात, "त्यांचे एखादे धोरण चुकले" असा दावा केला तर काय बिघडले?

आपण जर आदिवासी असता आणि आपणस सुद्धा बंग यांनी उपचार या प्रकारे केले असते तर आपण कोणत्या एथिक्स खाली नाकारले असते ?

रँडला चाफेकर बंधूंनी का मारले?

एथिक्स वगेरे हे सर्व भरल्या पोटी रीकामपणाच्या मारायच्या गप्पा आहेत.

होय.

तुम्ही कसे वागावे हे बंग , आमटे यांनी आपणास सांगितले काय?

होय, त्यांच्या भाषणात "देणग्या द्या" असे सांगितले आहे.

मग त्यांच्या कामात आणि आदिवासी बांधवाच्या हिताच्या आड आपण का येतात.

येथे मारलेल्या रिकामपणाच्या गप्पांनी आदिवासी बांधवांना काहीही त्रास होणार नाही.

आपल्या मनात सुद्धा या बंग, आमटे या चांगल्या माणसाना मारून टाकण्

ज्या मुद्यांविषयी येथे सर्वांचे एकमत असते त्या विषयांवर 'आवाज' उठवून काय फायदा?
सर्वांचे एकमत होवून सुद्धा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या विरुद्ध आजू जोरात आवाज उठवून त्या गोष्टी बंद करणे हा मार्ग असताना त्या बद्दल शेपूट खाली करून गप्प बसायचे. भारतात ज्या थोड्या बहुत चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या विरुद्ध आवाज उठवणे ( याला कुजबुज गन्ग म्हणतात) यात काय पुरुषार्थ.
आदिवासींच्या नजरेत ती देव माणसे आहेत त्यांना देव म्हणत नाहीत आणि त्यांना सुद्धा देव म्हंटलेले आवडणार नाही.
तुम्ही म्हणता त्यांचे धोरण चूक आहे. ठीक आहे, तुम्ही अश्या वेळी काय धोरण आखले असते, ते स्वीकारले गेले असते काय? त्याचा आदिवासींवर काय परिणाम भला-बुरा झाला असता याचे विवेचन कराल काय.
रँडला चाफेकर बंधूंनी का मारले? हे माझ्या प्रश्नाचे कोणते उत्तर आहे. आपल्या मनात सुद्धा या बंग, आमटे या चांगल्या माणसाना मारून टाकण्याचे विचार येत आहेत असे दिसते. या मुळेच मध्येच आपण असे लिहिले आहे. मारून टाका. मग माझ्या मना बन दगड सारखे हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल
इतके यश तुला रगड माझ्या मना बन दगड इतके यश तुला रगड माझ्या मना बन दगड
होय, त्यांच्या भाषणात "देणग्या द्या" असे सांगितले आहे. आपण किती देणग्या दिल्यात , त्याची रीतसर पावती ची XROX आपण माझ्या कडे पाठवून द्या, त्या देणगीची बंग आमटे यांच्या कार्यालयाकडून सत्यतेची खात्री पटल्या वर( कारण त्यांचा हिशीब स्वच्छ चोख आहे) आपली देणगी आपणास जाहीररीत्या सत्कार करून व्याजा सह परत दिल्या जाईल.
येथे मारलेल्या रिकामपणाच्या गप्पांनी आदिवासी बांधवांना काहीही त्रास होणार नाही.
पण अश्या कुजबुज गन्ग च्या कुजबुजण्याने समाजातील वातावरण दुषित होवून भारतात जे कांही चांगले चाललले त्या कामांवर वाईट परिणाम होईल त्याचे काय. का आपणास भारतात कांही चांगले होवू नयेच असे वाटते का?

thanthanpal.blogspot.com

असहमत

त्या विरुद्ध आजू जोरात आवाज उठवून त्या गोष्टी बंद करणे हा मार्ग असताना त्या बद्दल शेपूट खाली करून गप्प बसायचे.

आवाज उठवून केवळ लोकशिक्षण होते. बंद होण्यासाठी चळवळ लागते, त्यासाठी उपक्रमचा थेट उपयोग कसा होईल? तुम्ही सांगितलेल्या गैरव्यवहारांची येथील लोकांना आधीच माहिती आहे.

भारतात ज्या थोड्या बहुत चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या विरुद्ध आवाज उठवणे ( याला कुजबुज गन्ग म्हणतात) यात काय पुरुषार्थ.

असहमत. येथे पुरुषार्थ हा शब्द अलंकारिक अर्थाने असून त्याचा अर्थ धैर्य असा आहे. तुम्ही भ्रष्टाचाराचा विरोध करता तेव्हा तुम्हाला किती लोक विरोध करतात? त्याउलट, मी अभय बंगांशी असहमती दाखविली तेव्हा बघा किती लोकांनी आक्षेप घेतले! माझ्या स्टान्समध्येच अधिक धैर्य लागते ;)

तुम्ही अश्या वेळी काय धोरण आखले असते, ते स्वीकारले गेले असते काय? त्याचा आदिवासींवर काय परिणाम भला-बुरा झाला असता याचे विवेचन कराल काय.

धार्मिक आदेश आहे असे सांगणे टाळूनही, आदिवासींना त्यांच्याच भल्यासाठी लसीकरण करण्याची विनंती करता आली असती.

आपल्या मनात सुद्धा या बंग, आमटे या चांगल्या माणसाना मारून टाकण्याचे विचार येत आहेत असे दिसते.

प्लेगसारख्या भयानक संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणणार्‍या रँडला अफवांवर विसंबून सनातनी टिळकांनी विरोध केला. धर्मांध चाफेकर बंधूंनी त्याची हत्या केली. येथे डॉ. बंग सामान्य रोगांसाठीसुद्धा आदिवासींना फसवून त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळतात असे मला वाटते. आदिवासींमध्ये कोणते पँडेमिक होते? सक्तीचे उपचार करण्यापेक्षा फसवून केलेले उपचार मला अधिक हीन वाटतात. रँडला मारणारे चाफेकर हे देशभक्त ठरतात तर मी बंग यांच्या धोरणाविषयी नापसंती व्यक्त केली (मारण्याची भाषा केली नाही) तर तुम्हाला राग का येतो?

आपण किती देणग्या दिल्यात , त्याची रीतसर पावती ची XROX आपण माझ्या कडे पाठवून द्या, त्या देणगीची बंग आमटे यांच्या कार्यालयाकडून सत्यतेची खात्री पटल्या वर( कारण त्यांचा हिशीब स्वच्छ चोख आहे) आपली देणगी आपणास जाहीररीत्या सत्कार करून व्याजा सह परत दिल्या जाईल.

"मी देणग्या दिल्या" असे मी म्हटलेच नाही! ते लोकांना सांगतात की "देणग्या द्या". मी म्हणतो की "धोरणाचा पुनर्विचार करा, मग देणगी देईन".

पण अश्या कुजबुज गन्ग च्या कुजबुजण्याने समाजातील वातावरण दुषित होवून भारतात जे कांही चांगले चाललले त्या कामांवर वाईट परिणाम होईल त्याचे काय.

पण देवीचे नाव वापरून फसविण्यात काही चांगले नाहीच! फसवणूक न करणे हे उपचारांपेक्षा महत्वाचे आहे, असे वैद्यकीय नीतीचे मत आहे.

आमटे बंग यांनी स्त्रियान वर अत्याचार केले हे आपण सिद्ध तर मी प्र

याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅडला भारतात पाचारण केले. रॅडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला.तपासणीच्या नावाखाली कोणत्याही स्त्रीला लाज वाटेल असे भयानक क्रुत्य रॅंड भर दिवसा करत होता. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.तो ब्रिटिश सत्तेचा काळ होता. आपला वर्तमान काळचाच नव्हे तर भूतकाळचा अभ्यास नसाल्या मुळे हा भूतकाळ सांगितला. आणि वर्तमान काळ बंग यांनी अत्त्याचार केले नाही.
या कारणांमुळे रॅड चा खून करण्यात आला. स्त्रियांच्या शीलांचे रक्षण करणे करणे हा धर्म आहे. आमटे बंग यांनी स्त्रियान वर अत्याचार केले हे आपण सिद्ध तर मी प्रथम त्यांचा खून करेन.तेव्हढी हिम्मत आहे. नुसत्या बाजारगप्पा मारत नाही. आणि परकीय रॅड च्या अत्त्याचाराची आणि स्वदेशी बंग, आमटे यांच्या चांगल्या कामाची तुलना फक्त मूर्ख माणूसच करेल.
आणि वैद्यकीय नीतीचे उदाहरण देवू नका. या नीती बरोबरच सर्व चांगल्या नित्तीमतेच्या आज भारतात बोऱ्या वाजला आहे. आणि उपक्रमा वरील सभासद भ्रष्ट्र कारभार विरुद्ध लिहिले तर प्रतिसाद देत नाही हे आपण कसे म्हणता. चांगल्या गोष्टीला आपण बदनाम करत आहात म्हणूनच सर्व सभासदांनी आपला विरोध केला. आणि बंग चांगले काम करत आहेत हे सांगितले आहे. मला राग येतो कारण अहिंसेच्या नसबंदीने, उपोभोगवादी संस्कृती ने माझी शस्त्रक्रिया झाली नाही.
माझ्या स्टान्समध्येच अधिक धैर्य लागते ;) याला धैर्य म्हणत नाही. XXXX म्हणतात.
thanthanpal.blogspot.com

असत्य

स्त्रियांवरील अत्याचारांचा दावा करणार्‍या ना. गोखलेंना माफी मागावी लागली.

असेच काही नाही

>>रँडला मारणारे चाफेकर हे देशभक्त ठरतात तर मी बंग यांच्या धोरणाविषयी नापसंती व्यक्त केली

नाही. चाफेकर धर्मभक्त होते आणि त्यांचे रॅण्डला मारण्याचे कृत्य चूक होते असे माझे तरी मत आहे. आणि ते मी व्यक्तही केले आहे. इथे अनेकाम्चे मत तसेच असेल असे मला वाटते.

रॅण्डच्या बाबतीतला आक्षेप बूट घालून स्वैपाकघरात येणे वगैरे क्षुल्लकच होता.

>>माझ्या स्टान्समध्येच अधिक धैर्य लागते ;)
हे विधान डोळा मारण्याची स्मायली टाकून लिहिले आहे म्हणून ठीक आहे.

वैद्यकीय नीतीदृष्ट्या फसवणूक होतही असेल. पण ती क्षम्य वाटते. दोन गोष्टींमुळे. एक तर कायद्याने फसवणुकीचा (फसवणुक केल्यामुळे फसवणार्‍याला वैयक्तिक लाभ होणार असल्याचा) मोटिव्ह दाखवायला हवा. दुसरे म्हणजे न्यायवैद्यक कायद्याचे पत्र पाहण्यापेक्षा मद्यार्क* पाहणे चांगले. :)

*धनंजय यांच्या सौजन्याने.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अत्यंत असभ्य वक्तव्य

>आमटे/बंग यांचे कार्य अनिवासी/शहरी भारतीयांच्या पैशांवरच चालते ना?

निषेध! मुद्दाम असे काही बोलता यावे म्हणुनच ज्याने देणगी दिली असेल केवळ तीच व्यक्ती असे वक्तव्य करेल. आमटे व बंग यांनी जबरदस्ती करुन पैसे उकळले नाही की असे वक्तव्य कोणी करावे. त्यांच्या कार्यात काही आर्थीक अफरातफर असेल व पुरावा असेल तरच पैशाबद्दल बोलावे अन्यथा तो प्रतिसाद अजुन राहीलाच कसा? उपक्रमाच्या संपादकांना काही कसे वाटले नाही?

अन्य उपक्रमींना हे वाक्य चुकीचे वाटत नाही का?

नाही

मी स्पष्ट करतो की मी काहीही देणगी दिलेली नाही.

आमटे व बंग यांनी जबरदस्ती करुन पैसे उकळले नाही की असे वक्तव्य कोणी करावे. त्यांच्या कार्यात काही आर्थीक अफरातफर असेल व पुरावा असेल तरच पैशाबद्दल बोलावे अन्यथा तो प्रतिसाद अजुन राहीलाच कसा? उपक्रमाच्या संपादकांना काही कसे वाटले नाही?

अन्य उपक्रमींना हे वाक्य चुकीचे वाटत नाही का?

ठणठणपाळ यांनी मला विचारले "आमटे बंग यांनी आदिवासी विभागात जे काम केले ते तुमचा INDIA का करू शकला नाही?". त्यावर, "आमटे, बंग यांना काम करणे शक्य झाले त्यामागे आर्थिक पाठबळ इंडियाचेच होते की नाही?" अशी चौकशी करण्यात काय चूक आहे? त्यात भ्रष्टाचाराचा आरोप नाही.

आमटे व बंग

आमटे व बंग दोघांनी जेव्हा आपले कार्य सुरु केले तेव्हा तुम्ही व ठणठणपाळ दोघांना अपेक्षीत 'इंडीया' हा प्रकार अस्तित्वात नव्हता. तसेच केवळ ह्या 'इंडीया'च्या भरोश्यावर (निवासी-अनिवासी यांच्या पैशावर) हे कार्य सुरु केले व सुरु राहील असे कोणी समजु नये. ज्या लोकांना हे काम पटले आहे म्हणूनच त्यांनी मदत केली असणार (मी सगळ्यांच्या वतीने बोलणे उचीत नाही म्हणून शब्द वापरला 'असणार')

फक्त शाब्दीक वाद घालायच्या नादात आपण खरच चांगले काम करणार्‍या मोठ्या लोकांबद्दल काय बोलून जातो आहे व आपल्या बोलण्याचा काय अर्थ होत आहे याचे भान विसरु देउ नका.

गैरसमज

इंडिया म्हणजे केवळ आयटी नव्हे.
ते सारे देणगीदार ठणठणपाळ यांच्या दृष्टीने इंडियाचेच रहिवासी आहेत असे मला वाटते.
देणगी देणे हे गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग असते.

नेभळंट न्या.गोखले यांची माफी मंजूर नाही

नेभळंट न्या.गोखले यांची माफी मंजूर नाही. लोकमान्य टिळकांनी या खुनाचे जाहीर समर्थन करून चाफेकर बंधूंचा अग्रलेखात जाहीर अभिनंदन केले होते.. माझ्या पहिल्या पासूनच्या मुद्यांचे तुम्ही स्पष्टीकरण न देता भलतेच पुरावे देत आहात.

प्रेषक सहज निषेध! मुद्दाम असे काही बोलता यावे म्हणुनच ज्याने देणगी दिली असेल केवळ तीच व्यक्ती असे वक्तव्य करेल. आमटे व बंग यांनी जबरदस्ती करुन पैसे उकळले नाही की असे वक्तव्य कोणी करावे. त्यांच्या कार्यात काही आर्थीक अफरातफर असेल व पुरावा असेल तरच पैशाबद्दल बोलावे अन्यथा तो प्रतिसाद अजुन राहीलाच कसा? उपक्रमाच्या संपादकांना काही कसे वाटले नाही? हे वाचले नाही का?

अजून किती चुकीचा वाद घालणार माफी मागा आता तुम्हाला शह बसला आहे. तुम्ही स्वत:निर्माण केलेल्या शब्दांच्या पिंजऱ्यात अडकला आहात.

--
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

thanthanpal.blogspot.com

नाही

लोकमान्य टिळकांनी या खुनाचे जाहीर समर्थन करून चाफेकर बंधूंचा अग्रलेखात जाहीर अभिनंदन केले होते.. माझ्या पहिल्या पासूनच्या मुद्यांचे तुम्ही स्पष्टीकरण न देता भलतेच पुरावे देत आहात.

कोण टिळक? ते नेमाड्यांसारख्या मिशा असणारे आणि सोवळे नेसणारे जातीयवादी ना?

हे वाचले नाही का?

सहज यांना उत्तर दिले आहे.

अजून किती चुकीचा वाद घालणार माफी मागा आता तुम्हाला शह बसला आहे. तुम्ही स्वत:निर्माण केलेल्या शब्दांच्या पिंजऱ्यात अडकला आहात.

डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है|

देणगीचे चांगले काम करणारे सुद्धा आपणास गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्स

देणगी देणे हे गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग असते. व्वा आपण कांही न करता आता बंग आमटे सोबत देणगीचे चांगले काम करणारे सुद्धा आपणास गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग वाटते. समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे , आपणास समाजसेवा करण्यास व्यवहारा मुळे वेळ नाही, त्या समाजाच्या ऋण मान्य करून माणूस हा देणगी देतो. एव्हढे सामान्य ज्ञान आपणास नाही. आणि भ्रष्ट्राचारी शासनास कर रूपाने आपल्या मेहनतीचा पैसा देण्या पेक्षा चांगल्या समाज कार्यास मदत करावी हा उद्देश ही यात असतो. हे तुम्हाला समजत नाही हा तुमचा दोष,का तुम्हा वर संस्कार करणाऱ्याचा दोष, की तुमच्या आजूबाजूच्या प्रदुर्षण युक्त समाजाचा दोष आहे . नाही की सर्व कांही असून आपण कांही करू शकत नाही या गिल्ट कॉन्शन्स मुळे आपण समाजाच्या चांगल्या गोष्टी वर शितोडे उडवत आहात, स्वतः:वरच या गिल्ट कॉन्शन्स चा राग काढत आहात असे वाटते. बाकी माझ्या जुन्या प्रतिसादाचे आपण उत्तर देणे टाळले ते पाहता आपला गिल्ट कॉन्शन्स चा चांगलंच कोंडमारा होत असावा असे वाटते.

thanthanpal.blogspot.com

व्याख्या

आपणास समाजसेवा करण्यास व्यवहारा मुळे वेळ नाही, त्या समाजाच्या ऋण मान्य करून माणूस हा देणगी देतो.

त्यालाच गिल्ट कॉन्शन्समुळे केलेले सेवेचे आऊटसोर्सिंग म्हणतात.

आपण समाजाच्या चांगल्या गोष्टी वर शितोडे उडवत आहात, स्वतः:वरच या गिल्ट कॉन्शन्स चा राग काढत आहात असे वाटते

मी कोणत्याही चांगल्या गोष्टीवर शिंतोडे उडविले नाहीत.

बाकी माझ्या जुन्या प्रतिसादाचे आपण उत्तर देणे टाळले

That doesn't sound like me.

बाकी माझ्या जुन्या प्रतिसादाचे आपण उत्तर देणे टाळले

मराठीत प्रतिसाद देणे अशक्य झाल्याने आणि गिल्ट कॉन्शन्समुळे आपणास आता मराठीत लिहिणे सुद्धा आपणास जमत नाही

thanthanpal.blogspot.com

हा

लुक हू इज टॉकिंग.
अरे बबडू, माझा कॉन्शन्स मुळीच गिल्टी नाही रे! मला कॉन्शन्सच नाही अशी शंकाही काही लोक घेतात.

बाप दाखव नाही तर श्राद्ध कर

लुक हू इज टॉकिंग.
अरे बबडू, माझा कॉन्शन्स मुळीच गिल्टी नाही रे! मला कॉन्शन्सच नाही अशी शंकाही काही लोक घेतात.
असा मुर्खा युक्तिवाद करून टु स्वतःची सुटका करून घेवू शकत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या म्हणी प्रमाणे टु तुझे एथिक्स , आदिवासींचे बंग यांनी केलेली वैद्यकीय फसवणूक, नुकसान सिद्ध करून दाखव, देणगी देणे हे गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग असते. हे सिद्ध कर . =)) =)) =)) =)) =))

thanthanpal.blogspot.com

खुलासा

अंधश्रद्धांचा वापर केला हे तर डॉ. बंग स्वत:च मान्य करतात. त्यांनी आदिवासींचे नुकसान केले असे मी मुळीच म्हटले नाही.

देणगी देणे हे गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग असते. हे सिद्ध कर .

ती व्याख्या आहे.

ती व्याख्या आहे.

ज्या वेळी माणूस अश्या ती व्याख्या आहे. असे म्हणतो तेंव्हा मेडीकल आणि इतर एथिक्स प्रमाणे तीचे पटेल असे विवरण करणे आवश्यक असते. आणि हो सामनातील मास्तर प्रमाणे मी पुन्हा विचारतो बाकी मुद्यांचे काय झाले.
thanthanpal.blogspot.com

विवरण

ज्यांना वाटते की ते समाजाला काहीएक देणे लागतात, स्वत:ला मिळायला हवे त्यापेक्षा समाजाकडून अतिरिक्त घेतले आहे (=अपराधी भावना), पण प्रत्यक्ष काम करण्याची कौशल्ये, वेळ, नाही, ते लोक देणगी देतात (समाजकार्य आऊटसोर्स करतात).

ज्या वेळी माणूस अश्या ती व्याख्या आहे. असे म्हणतो

तुम्ही मला माणूस समजता? रिकामटेकडा स्वत:ला Übermensch आणि ठणठणपाळ यांना बर्डन समजतो असे तुम्हाला वाटते असे मला वाटले.

मी पुन्हा विचारतो बाकी मुद्यांचे काय झाले.

कदाचित ते प्रतिसाद उडले असतील.

प्रतिसाद उडो अथवा राहो

प्रतिसाद उडो अथवा राहो उत्तर देण्याची तुमची जबाबदारी कमी होत नाही. आणि आजच्या बंग यांच्या सत्कार मुळे तर ती अधिक वाढली.
thanthanpal.blogspot.com

कोणते प्रश्न?

येथे तुमचे जितके प्रश्न शिल्लक आहेत त्यांना उत्तर दिले आहे असे वाटते. काही प्रश्नांचे उत्तर देणे राहिले असल्यास कृपया कळवावे.

देणगी

देणगी देणे हे गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग असते.

या बाबत विजय तेंडुलकरांचा एक लेख आजचा सुधारक मधे वाचला होता. त्यात त्यांनी देणगीदाराच्या मानसिकतेचा उहापोह केला होता. यातील फक्त आयकर सवलत काढुन घेतली तर किती लोक देणगी देतील? असा काहीसा सवाल त्यांच्या लेखात आहे. अधिक तपशील आठवत नाही.
प्रकाश घाटपांडे

आयकर-देणगी

आयकर सवलतीचा आणि देणगीचा काही संबंध असतो असे मला वाटत नाही.

३ लाख रु उत्पन्नावर समजा २५ हजार रुपये कर लागतो.
तर २ लाख ७५ हजार रुपये हातात मिळतात.
१०००० रु देणगी दिली तर २ लाख नव्वद हजार रु उत्पन्न धरले जाते आणि २४ हजार रु कर भरावा लागतो.
तर २ लाख ६६ हजार रु हातात मिळतात.
दहाहजार रु देणगी दिल्याने ९ हजार रुपये हातातून कमी होतात.

आयकरात सवलत म्हणून कोणी नोकरदार देणगी देत नसावा.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

प्रतिसाद

मुळात डॉ.बंग ह्यांचे विचार कसे आहेत असा विचार करण्यापेक्षा त्यांचा उद्देश हा योग्य आहे असा म्हणायला हरकत नाही.गीतेतही म्हटलेले आहे कि एखादी चांगली गोष्ट करण्यासाथी केलेली चुक सुद्धा क्षम्य असते,आणि आपण कोण त्यांच्या कार्यावर बोट उथवणारे!तुमचा विचार चुकिचा आहे असा नाही म्हणणार मी पण त्या कडे असहि बघा,एव्हधच माझ सांगण आहे.

डॉन को पकडना बहोत् आसान है......

या बाबतीत डॉ. बंग बरोबरच आहेत.

प्रश्न जर संपुर्ण समाजाच्या हिताचा असेल व दुसरा कोणताहि मार्ग नसेल तर असा मार्ग अवलंबला तरी तो श्रेष्ठच ठरतॊ. वैयक्तिक हितासाठी जर असा मार्ग कोणी अवलंबला तर पुर्ण शक्तिनिशी त्याचा जरुर विरोध करावा. यासाठि उदा द्यायच झाल तर राजस्थान मधील ईतिहासप्रसिद्ध "धाय मा" च देता येईल. तिने समाजाच हित लक्षात घेऊन राजा उदयसिंहाच्या (त्यावेळी ते एक अजाण बालक होते) रक्षणासाठी स्वत:च्या पोटच्या पोराचा बळि दिला (मारेक-यांनी मारण्यासाठी त्याला राजपुत्राचे कपडे घालुन सोडुन दिला). यावेळि तिने समाजाच हित कशात आहे ते पाहिलं. यासाठि तिला तुम्ही सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात गोवणार का?? जर तिने स्वत:चा आजार बरा होत नाहि म्हणुन त्याचा बळि दिला असता तर ति नक्कीच निंदेला पात्र होती.
याप्रमाणेच एक उदा. लाच देण्याचं. जर ति प्रवृत्ती नष्ट व्हावी या उद्देशाने; त्या लाच मागणा-या व ति मागुन सोकावलेल्या मनुष्याला पकडुन द्यायच्या उद्देशाने, कोणी त्या माणसाला लाच देउ केली तर तो गुन्हा होत नाही.
आणि रिकामटेकड्यांना जी भिती वाटतेय कि भोळेभाबडे आदिवासी भोंदुबुवांच्या मार्गी लागतील, तर त्याचीही काळजी बंग दांपत्य योग्य प्रकारे घेत असतिल याची मला खात्री आहे. कारण या लोकांसाठी मर्यादेपलिकडे जाउन स्वत:च आयुष्य वेचायची ज्यांची तयारी आहे त्याना ही गोष्टही फ़ारशी कठिण नाही. तुम्हाला जर त्याची खात्री वाटत नसेल तर आपण जाउन खात्री करुन येउ शकता. ते अनुभव उपक्रमवर लिहिण्यास विसरु नका !

आणि समाजाच्या उद्धारासाठी डॉ. बंग नी देणग्या मागितल्या तर त्याच्यात काहिही चुक नाही. बाकि काही करता येत नसेल तर इतर लोकांनी तेवढ तरी करावं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कानून के हात बहोत लंबे होते हैं.............

खुलासा

लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे रोगनिवारण करणे हे वैद्यकीय नीतीनियमांमध्ये बसत नाही; तो एक निसरडा उतार आहे. म्हणूनच मी चर्चाप्रस्तावास 'सोन्याचा पिंजरा' हे नाव दिले आहे.
देणग्या घेण्यात काहीच चूक नाही पण ज्यांच्या देणग्यांवर काम चालते त्यांना दोष देऊ नये असे मला वाटते. (डॉ. बंग दोष देत नाहीत पण त्यांच्या समर्थनार्थ या धाग्यात तशी विधाने केली गेली.)

इच्छेविरुद्ध??

डॉ. बंग करत् असलेले रोगनिवारण् आदिवासींच्या इच्छेविरुद्ध आहे, असे तुम्हाला म्हणायचय् का???

>>>>ज्यांच्या देणग्यांवर काम चालते त्यांना दोष देऊ नये असे मला वाटते.
देणग्या दिल्या म्हणजे त्या माणसाला विकत् घेतले असा अर्थ काढायचा का ?? देणग्या देणारि व्यक्ति चुकत् असेल् तर् , देणगी घेणा-या व्यक्तिने फक्त् पाहत् राहायचे का???

खुलासा

"देवीने आदेश दिला आहे म्हणून लस घ्या" असे सांगणे ही फसवणूक आहे. तसे सांगितले नाही तर आदिवासी लस घेणार नाहीत असे डॉ. बंग यांना वाटते. म्हणजे, "देवीचा आदेश नाही" या सत्याचे ज्ञान झालेल्या आदिवासींना लस न घेण्याची इच्छा होईल असे वाटते. अशा व्यक्तीवर केलेले उपचार हे त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्धचे उपचारच ठरतात.

देणग्या दिल्या म्हणजे त्या माणसाला विकत् घेतले असा अर्थ काढायचा का ?? देणग्या देणारि व्यक्ति चुकत् असेल् तर् , देणगी घेणा-या व्यक्तिने फक्त् पाहत् राहायचे का???

"आमटे बंग यांनी आदिवासी विभागात जे काम केले ते तुमचा INDIA का करू शकला नाही?" या प्रश्नाला माझे उत्तर असे की या INDIAला थेट काम करणे शक्य नाही म्हणून ते डॉ. बंग यांना देणगी देतात म्हणजे त्यांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा वेळ, बुद्धिमत्ता आणि सेवाभावी वृत्ती भाड्याने घेतात. (ताजमहालची एक फरशीसुद्धा शहाजहानने स्वतः बसविलेली नव्हती.)

भीक् नको ..पण्,......!!!

>>>>"देवीचा आदेश नाही" या सत्याचे ज्ञान झालेल्या आदिवासींना लस न घेण्याची इच्छा होईल असे वाटते.
रोगतुन बरे झाल्यावर, "देवीचा आदेश नसतानाही आपण बरे झालो" या सत्याचे इतर कोनत्याही प्रकारने झाले नसते असे दिव्य ज्ञान त्याना होइल. असे का नाही तुम्हाला वाटत????

>>>"आमटे बंग यांनी आदिवासी विभागात जे काम केले ते तुमचा INDIA का करू शकला नाही?"
हा प्रश्न मी कधी विचारला होता???

>>>>>देणगी देतात म्हणजे त्यांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचा वेळ, बुद्धिमत्ता आणि सेवाभावी वृत्ती भाड्याने घेतात
फ़ार बोल्ड विधान आहे हे. देणगी आणि भाड यात फ़ाऽऽऽऽर मोठा फ़रक आहे. मी म्हणेन ते देणगी देतात कारण त्याना आपण प्रत्यक्ष जाउन काही करु शकत नाही याच प्रायश्चित् घ्यायच असतं. अशा गिल्ट कॉशन्स मधुन आलेला पैसा घ्यायचा का?? जरुर घ्यायचा, मी म्हणेन अशा उदात्त कामासाठी "काळा" पैसा सुद्धा स्विकारावा, पण त्या माणसाची मक्तेदारी अजिबात मान्य केली जाणार नाही या मुख्य अटीवर ठाम राहुनच!!
देणगी आणि भीक अशी सांगड घालायचा विचार असेल तर सावधान,....दया येउन दिली जाते ती भीक आणि आदर वाटुन दिली जाते ती देणगी!! देणगी घेणा-याने देणगी देणा-याचे मिंधे मुळिच वाटुन घेउ नये!!

>>>(ताजमहालची एक फरशीसुद्धा शहाजहानने स्वतः बसविलेली नव्हती.)
मी शहाजहान हा गवंडी होता अस कधीच म्हटल नाही.

ठीक

रोगतुन बरे झाल्यावर, "देवीचा आदेश नसतानाही आपण बरे झालो" या सत्याचे इतर कोनत्याही प्रकारने झाले नसते असे दिव्य ज्ञान त्याना होइल. असे का नाही तुम्हाला वाटत????

उलट, "देवीचा आदेश ऐकला म्हणून आपण आजारी पडलो नाही" असेच त्यांना वाटत राहील.

हा प्रश्न मी कधी विचारला होता???

माझा देणगीविषयक युक्तिवाद त्या संदर्भातच पहाणे अपेक्षित आहे, हा धागा पूर्ण वाचल्यास तुम्हाला खात्री करून घेता येईल.

देणगी घेणा-याने देणगी देणा-याचे मिंधे मुळिच वाटुन घेउ नये!!

पण 'होलिअर दॅन दाऊ' आढ्यतासुद्धा दाखवू नये. (डॉ. बंग दाखवितात असे मी म्हणत नाही पण त्यांच्या समर्थकांकडून तसे युक्तिवाद येऊ नयेत अशी अपेक्षा आहे.)

सहमत्

>>>पण 'होलिअर दॅन दाऊ' आढ्यतासुद्धा दाखवू नये.
सेंट पर्सॆंट सहमत

>>>>उलट, "देवीचा आदेश ऐकला म्हणून आपण आजारी पडलो नाही" असेच त्यांना वाटत राहील.
बरे झाल्यावर त्याचे ब्रेन वॉशींग करता येइल आरामात. आधी त्याना वाचवणे महत्त्वाच आहे. तुम्हाला दंतेश्वरीचा आधार न घेता आदिवासीना बरं करण्याचा एखादा उपाय सुचतोय का??

मूळ मुद्दा

बरे झाल्यावर त्याचे ब्रेन वॉशींग करता येइल आरामात.

ब्रेन वॉशिंग करून त्यांच्या इच्छा आपण ठरविणे मला अनैतिक वाटते.

आधी त्याना वाचवणे महत्त्वाच आहे. तुम्हाला दंतेश्वरीचा आधार न घेता आदिवासीना बरं करण्याचा एखादा उपाय सुचतोय का??

त्यांच्या प्रबोधनाला प्राथमिकता (प्रायॉरिटी) आहे हेच तर मी सांगतो आहे, 'बरे करणे' हे त्यामानाने दुय्यम कृत्य आहे. त्यांना माहिती मिळाल्यावर उपचार स्वीकारण्याची इच्छा होईल अशी आशा करता येते. रुग्णाच्या इच्छेविरुद्ध/रुग्णाला अज्ञानात ठेवून उपचार करणे वैद्यकीय नीतिनियमांमध्ये बसत नाही.

दहाषदवाद

>>>>ब्रेन वॉशिंग करून त्यांच्या इच्छा आपण ठरविणे मला अनैतिक वाटते.

त्यांच्या इच्छा आपण ठरवणारे कोण??? त्याना पटलं तरच त्यानी हे विचार स्विकारावे. किंवा त्यांचे सुद्धा याबाबतीत आपल्यापेक्षा चांगले आणि सुसंस्कृत विचार असु शकतील ते स्विकारायचा पण आपण कमीपणा वाटुन घेउ नये....

>>>त्यांच्या प्रबोधनाला प्राथमिकता (प्रायॉरिटी) आहे हेच तर मी सांगतो आहे, 'बरे करणे' हे त्यामानाने दुय्यम कृत्य आहे. त्यांना माहिती मिळाल्यावर उपचार स्वीकारण्याची इच्छा होईल अशी आशा करता येते. रुग्णाच्या इच्छेविरुद्ध/रुग्णाला अज्ञानात ठेवून उपचार करणे वैद्यकीय नीतिनियमांमध्ये बसत नाही.

वैद्यकीय नीतिनियमांमध्ये बसत / बसत नाही याबाबत मला माहिती नाही. पण प्रायॉरिटी कशाला द्यायची कशाला नाही याबाबत तिथे जाउन तिथल्या आदिवासींमधे मिसळुन मग याबाबत बोलणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. प्रायोरिटी "तिथे" जाउन काम करण्याला असावी. बाकी सगळा बोलाचा भात आणि बोलाची कढी ............ कोणाला खाता आली????
आणि उच्च माणसांच्या चुका क्षुद्र माणसांनी काढुच नये का? का बरं का काढु नये? हा नवा दहाषदवाद (चांगला शब्द आहे पुढे चालवायला हरकत नाही) झाला!!
डॉ बंग पण हेच सांगतात मी हिरो नाहीय, समाज हिरो आहे.

आगरकर

यावरुन उगाचच् आगरकर्( आगरकरच् ना???) आठवतायत्!!! त्याना सुद्धा आधी सुराज्य हव होतं..............पण् सगळ्यांनी स्वराज्याचा घोषा लावला!!!! त्या स्वराज्याची किर्ती आज CWG रुपाने दिगंतात् पसरली आहे............. :)

दुवा द्या ..

"ताजमहालची एक फरशीसुद्धा शहाजहानने स्वतः बसविलेली नव्हती"

दुवा आहे का ?

:-)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

नल हायपोथेसिस

:ड्

आक्षेप

श्री. रिकामटेकडा यांचे श्री.बंग यांच्या कामाबद्दल काय आक्षेप आहेत तेच समजले नाही.
शोधग्राम येथे 'मां दंतेश्वरी दवाखाना' आहे. त्याच्या आवारातील दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून "स्वच्छता राखा", "लसीकरण करा", असे संदेश पसरविले जातात. मां दंतेश्वरी देवळाच्या आवारातून पसरवलेल्या या संदेशात अनैतिक काय आहे हे समजले नाही. संत गाडगेबाबा सुद्धा अशाच प्रकारे स्वच्छतेचे संदेश लोकांच्यात पसरवत असत. श्री. रिकामटेकडा पराचा कावळा करत आहेत असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कोठून संदेश - कोणता संदेश

सहमत आहे. जो पर्यंत दंतेश्वरीच्या कृपेने बरे झालात असा संदेश जात नाही तोपर्यंत कोणत्या इमारतीतून संदेश प्रसारित होत आहे हे महत्त्वाचे नाही.

वर प्रकाश घाटपांडे त्यालाही हरकत नाही असे म्हणत आहेत ते मात्र मान्य नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मूळ वाक्य

"या दंतेश्वरी देवीचा संदेश म्हणूनच आरोग्याचे संदेश आदिवासी गावात गेले पाहिजेत, असा आम्ही विचार केला. त्यांना जर आम्ही म्हटलं, की 'जंतूंमुळे रोग होतात', तर आदिवासी म्हणतो, 'जंतू कुणी पाहिलेत?' त्याऐवजी जर असं म्हटलं, की दंतेश्वरी देवीची अशी इच्छा आहे किंवा तिचा असा संदेश आहे, की तुम्ही स्वच्छ राहा, लस टोचून घ्या... 'दंतेश्वरीचा संदेश' आहे; मग स्वीकारू या."

"जंतू कुणी पाहिलेत?" यात विज्ञानाविषयी तुच्छतेचा भाव दिसतो. लहान मुलांनाही कोणी सूक्ष्मदर्शकातून जंतू दाखविले नसतात. तरीही शरिराच्या आणि दात घासण्याच्या साबणाच्या जाहिरातीतील 'कीटाणू' त्यांना कळतात.

"आदिवासी ४१ गावातील भुम्या पुजारी आले. पूजा झाली. आदिवासींचे नाच नाचले, देवीला नारळ वाहिले, मोठय़ा उत्साहात पालखी निघाली. पुजाऱ्याच्या अंगात देव येऊन जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांनी माँ दंतेश्वरी मातेला गावावर येणारे संकट टळू दे, अशी मागणी केली.
आदिवासींच्या विकासासाठी अविरतपणे काम करणारे त्यांच्या जगण्यात चेतना निर्माण करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी १९९८ पासून सुरू केलेली १३ वी आरोग्य संसद आज मोठय़ा आनंदात पार पडली." संदर्भ
गांधीवादी लोक पुरोगामीपणाला केवळ लिपजॉब देतात असे वाटते.

इश्यू

तो संदर्भ मि सुद्धा वाचला. पण मला त्याचा उत्तरार्ध जास्त् महत्वाचा वाटला. त्या कार्यक्रमात् कोणत्या कामांची मुहुर्तमेढ रोवली गेली हे जास्त् महत्त्वाच् होतं.
कशाचा इश्यू करावा व कशाचा करु नये हे प्रतेकाने सारासार् विचार् करुन् ठरवावे. प्रश्न दृष्टीकोनाचा आहे. आणि त्या नाचगाण्याच्या आवाजाने कोणाचा कान् फुटला किंवा डेसिबल् चि मर्यादा ओलांडली गेली असेल् तर् त्याचा सुद्धा संदर्भ रिकामटेकड्यांनी द्यावा.

 
^ वर