सोन्याचा पिंजरा
आफ्रिकन आणि भारतीय लोकांना स्वतःचे भले कळत नाही, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांच्यावर शासन करणे अपरिहार्य आहे, वास्तविक त्यांच्यावर राज्य करण्यात आम्हाला क्लेषच होतात तरीही आम्ही दुनियादारी करतो आहो, असे मत मांडणारी व्हाईट मॅन्स बर्डन ही कविता रुडयार्ड किपलिंगने १८९९ साली लिहिली. (ते त्याचे स्वतःचे प्रामाणिक मत होते की औपरोधिक, याविषयी इतिहासकारांमध्ये वाद आहेत.) लोकांच्या भल्यासाठीही त्यांच्यावर सक्ती करू नये हे मत आपण आता मान्य करतो.
शारिरीक बलाचा वापर न करताही सक्ती केली जाऊ शकते. लोकांना अज्ञानात ठेवूनही त्यांच्या आयुष्याला दिशा देता येते. रुग्णाला अज्ञानात ठेवून त्याच्यावर सर्वोत्तम उपचार करणे डॉक्टरांना सहज शक्य असते परंतु त्यास न्यायवैद्यकीय अनुमति नाही. सर्व माहिती रुग्णाला उपलब्ध करून निर्णयस्वातंत्र देणे अपेक्षित असते.
डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन ऍन्ड रीसर्च इन कम्युनिटी हेल्थ या संस्थेने केलेले कार्य महान आहेच. परंतु, त्यांच्या केवळ एका धोरणाविषयी मला चर्चा अपेक्षित आहे.
शोधग्राम येथे 'मां दंतेश्वरी दवाखाना' आहे. त्याच्या आवारातील दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून "स्वच्छता राखा", "लसीकरण करा", असे संदेश पसरविले जातात. रुग्णांची फसवणूक करून त्यांचे तात्पुरते भले होईलही. परंतु ते नैतिक आहे काय?
दंतेश्वरी देवीचे आदेश पाळल्यामुळे खरोखरीच आरोग्यविषयक फायदे होत असल्याचे अनुभवून आदिवासींची श्रद्धा अधिकच दृढ (ती केवळ श्रद्धा उरणार नाही तर विवेकी विश्वास बनेल) होईल ना? या श्रद्धेचा वापर करून शोषण करणेही मांत्रिकांना सोपे जाईल ना?
अजून एक मुद्दा असा की उजव्या गटांनी 'मां दंतेश्वरी स्वाभिमान मंच' ही नक्षलवादाला 'विरोध करणारी' संघटना बनविलेली आहे. डाव्या गटांनी बिरसा मुंडा या स्वातंत्र्यसैनिक/प्रेषिताच्या नावाचा असाच वापर केलेला आहे. अशा परिस्थितीत, श्रद्धेला खतपाणी घालणे योग्य आहे काय?
"It has been my observation that one of the prices of giving people freedom of choice... is that sometimes, they make the wrong choice." -- Odo (Star Trek)
Comments
हाहाहा!
एक दिवस तरी ती अंधश्रद्धा/ श्रद्धा या शब्दांना रजा द्या यना.
माणसाने नेहमी प्रयत्नशील राहावे (प्रयत्नांती परमेश्वर असेही म्हणूया नको; त्यालाही रजा देऊ.) म्हणून तरी अनेक बायका कचरा टाकून पाहतील.
मला सतत प्रयत्न करणारी माणसे आवडतात. त्या बायकांना पाणी चाखायची किंवा आंगठी घालायची संधी मिळत असल्यास त्यांनी ती सोडू नये असे मला मनापासून वाटते.
हाहाहा
अभय बंग यांच्या भाषणाच्या पीडीएफ फाईलचा दुवा वर दिला आहे. त्यातही असाच उल्लेख आहे.
मस्त!
कचरा वाढेल. अंधश्रद्धा एवढी सर्वव्यापी आहे की या भित्तिलेखनावर विश्वासून अनेकजणी तिथे कचरा टाकतील.
मस्त! :-)))
माझे मत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितात:
१..."लोकांच्या भल्यासाठीही त्यांच्यावर सक्ती करू नये हे मत आपण आता मान्य करतो.
यांत आपण म्हणजे नेमके कोण?"
.... व्यक्तिस्वातंत्याचे तत्त्व बहुमान्य आहे असे मानले जाते.
२..तर विविध मार्ग चोखाळण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही.
..कोणीही नाही.इथेही व्यक्तिस्वातंत्र्य आहेच.
३..ज्या सुशिक्षितांना घरातले मोठे सांगत की बाप्पाला नमस्कार कर त्यापैकी नेमके कितीजण मोठे झाल्यावर बाप्पा तारणहार आहे असे समजून चालतात?
.. नव्वद टक्के +.बहुशः अंधश्रद्धेचे मूळ बालपणी होणार्या संस्कारात असते. त्या संस्कारांचे दृढीकरण होते. मानवी मेंदूत याचे हार्डवायरिंग(?) असते असे म्हणतात.
पटत नाही
लहान मुलांनी अभ्यास न करणे, जंकफूड खाणे, लसीकरणाच्या लसी टोचताना कांकू करणे, शाळेत जाण्यास नाराजी दाखवणे, मोठ्यांनी ड्रग्ज घेणे, जुगार खेळणे, दारू पिणे या पासून रोखण्यावर कोण कोणाचे व्यक्तिस्वातंत्र्य चालवून घेते? लोकांच्या भल्यासाठी अनेकदा आपण सक्ती करतो. व्यक्तिस्वातंत्र्याची ऐशी की तैशी.
चूक. संस्काराने दृढीकरण होते - ठीक पण माणसाचा अनुभव/ शिक्षण/ वाचन याचा काही उपयोग होत नाही असे आपल्याला का वाटत असावे? आपण ९०% हे उत्तर कसे निश्चित केले? लहानपणी कपाटात बागुलबुवा आहे असे सांगितल्यावर घाबरणारी माणसे मोठेपणी कपाट उघडायचे थांबवत नाहीत. आपल्या माहितीत दोष वाटतो. कृपया सुधारून घ्यावा.
९०%
यनावालांनी ९०% असे निश्चित केले आहे का? नीट पाहा त्यांनी ९०%+ असे लिहिले आहे. देव नावाची संकल्पना कशी मनात रुजवली गेली ह्याचे उत्तर विचारल्यास दहातले नवाहून जास्त लोक बालपणी होणारे संस्कार असे उत्तर देतील.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
चूक मान्य
नाही त्यांनी ९०%+ असे लिहिले आहे. ९०% + म्हणजे १००% होऊ शकते हे मी पुढील प्रतिसादात म्हटले आहे. येथे + राहून गेल्याची चूक मान्य आहे. :-)
हा प्रश्नही नाही आणि हे उत्तरही नाही त्यामुळे यावर काही प्रतिक्रिया नाही. जो प्रश्न यनांना विचारला त्याचे उत्तर यनांकडूनच अपेक्षित आहे. असो.
९०%??
९०% हून अधिक?? याला काही पुरावा, प्रमाण?
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम
व्याख्या
अंधश्रद्धा म्हणजे काय? "गणपतीची पूजा करणे" यात काहीतरी ऐहिक प्राप्तीची वांछना असतेच ना? (श्रद्धेच्या व्याख्येत केवळ शुद्ध पारमार्थिक मतांचा/कृतींचा समावेश करावा असे मला वाटते.)
टक्के
"ज्या सुशिक्षितांना घरातले मोठे सांगत की बाप्पाला नमस्कार कर त्यापैकी नेमके कितीजण मोठे झाल्यावर बाप्पा तारणहार आहे असे समजून चालतात?"
जे लोक देवाला तारणहार समजतात ते सगळेच अंधश्रद्ध नाहीत काय? हिंदूची व्याख्या काय? प्रौढपणी स्वतःला हिंदू म्हणविणारे किती लोक बाप्पाला नमस्कार करीत नाहीत?
मान्यता
कोडी घालण्याऐवजी का अवलंबून आहे ते सांगा.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम
माफ करा
एक सर्वेक्षण उपलब्ध आहे, त्यानुसार, "हे जग देवाने निर्माण केले, आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो, देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो" या तीन विधानांवर विश्वास ठेवणार्यांची संख्या ~७०% होती.
जय जय बाबा समर्थ
काही बाबा असेच घड्याळे, अंगठ्या कुठून तरी काढतात असे ऐकले आहे..
चर्चा माझा भक्त टाकणार | समर्थ यनाबाबा मूळ आधार |
मी अंधश्रद्धानिर्मूलक साचार |गोंधळ घालणार निश्चित ||
ह. घ्या. सर्वांनी. ;-)
अनावश्यक धोशा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आनागॉर्न लिहितात :"मी ९० हा म्याजिक नंबर यनावाला यांनी कुठून काढला ते विचारतो आहे.
९० का? ६५ किंवा ४७ का नाही?"
..
आपण समाजात वावरतो,आजूबाजूला बघतो.प्रसार माध्यमांतून बातम्या वाचतो, ऐकतो,
पाहातो. "पंढरपुरात आषाढी एकादशीला पंधरा लाख वारकरी" ,"श्रावण सोमवारा निमित्त शिवमंदिरांत अलोट गर्दी." "सोमवती के शुभ अवसर पर लाखो श्रद्धालुओंने गंगा स्नान किया."," आज अंगारकी.सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा."अशा बातम्या असतात. कोणत्याही देवाच्या/देवीच्या जत्रेला लक्षावधी लोक लोटतात. यावरून आपल्याला समजते की लोकसंख्येत भाविकांचे प्रमाण खूप आहे.
संपूर्ण जगाच्या लोकसंख्येत देव न मानणार्या नास्तिकांचे प्रमाण १६% हून अधिक नाही. आपल्याकडे ते आणखी कमी आहे. ते इथे १०/१२ % हून अधिक नसावे हे कॉमनसेन्सने समजते. म्हणून "देव हा आपला तारणहार आहे" असे मानणार्याम्चे प्रमाण ९०% + आहे असे म्हणतो.ते वास्तविक आहे. कदाचित ८७% असेल पण ९३% असण्याचीच संभवनीयता अधिक. ते जर ४७% ,किंवा अगदी ६५% असते तर आपली खूपच प्रगती झाली असती.
९०% का?,९०% का? असे प्रियाली यांनी सुद्धा म्हणावे याचे आश्चर्य वाटते. त्यांचा स्वतःचा काय अंदाज आहे? आस्तिकांचे प्रमाण ५०% हून खूप अधिक आहे याविषयी तर वाद नाही ना? कोणाही सुबुद्ध, समंजस आणि विचारी व्यक्तीला ते ९०% हून अधिकच आहे असेच वाटेल.
ओहोहोहोहोहो!
.
आता संस्कारांवरून घसरून आपण समाजात वावरू लागलो का? आणि अनुभवही घेऊ लागलो. त्यावरून अंदाजही बांधू लागलो. अरेच्चा! हे अघटित आहे.
भाविकांचे प्रमाण खूप आहे की नाही हा मुद्दा नाही. वरील कोणत्याही उदाहरणातून देव तारणहार आहे म्हणून गर्दी होते असे गृहितक आहे त्याची संख्यानिश्चिती आपण कशी केलीत हा माझा प्रश्न आहे. तीही ९० टक्के +. जेव्हा विज्ञाननिष्ठ गणितज्ज्ञ अशी ठोकंठोकी करतात तेव्हा इतरांना दोष का बरे द्यावा? तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघता तेव्हा तुम्हाला वरील उदाहरणे दिसतात. मी माझ्या आजूबाजूला किंवा उपक्रमावर बघते किंवा मी वाढले त्या इमारतीत, सोसायटीत बघते तेथे मला असे दिसत नाही. वारीला जाणारे, सिद्धीविनायकाला लाईन लावणारे यांची माझ्या ओळखीतील संख्या अशी -
१. वरळीला माझे ऑफिस होते तेव्हा ४०० जणांपैकी केवळ ७-८ लोक सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी पहाटेपासून उभे राहत. (नावांसकट माहिती देऊ शकते.) बाकीचे लोक ऑफिस आणि मिटिंगांच्या वेळा सांभाळत. पुढे सदर लोकांवर वेळेची गदा आली असता ही संख्याही घटली. म्हणजेच बाप्पा मॅनेजमेंटच्या तालापासून आपल्याला वाचवेल असे त्यांना वाटले नाही. फक्त दोनजण अनेक युक्ती करून, लोकांना शेंड्या लावून सिद्धीविनायक दर्शन करत. टक्केवारी ९० च्या आसपास फिरकत नाही.
२. माझ्या इमारतीतील ३० कुटुंबांपैकी १ कुटुंब साईबाबांच्या चरणी वेडे होते आणि दुसरे कुटुंब अनिरुद्ध बापूंच्या. इतर कोणत्याही कुटुंबाला वारीत सामिल झाल्याचे, देवळात लाईन लावून उभे राहिल्याचे मी पाहिलेले/ ऐकलेले नाही. इमारतीत आमची खूप जवळीक आहे त्यामुळे गोष्टी लपून राहण्यासारख्या नाहीत. पैकी एका कुटुंबाने बापू तारणहार समजून आपली वाताहत करून घेतली हे सत्य मी आधीही उपक्रमावर लिहिलेले आहे. टक्केवारी ९० च्या आसपास फिरकत नाही.
३. वारीला जाणारे = ०/ शून्य/ नाडा/ झिप्पो.
सॉरी! ९० टक्के + = १०० % असेल तर कठीण आहे यना तुमचे. प्लीज तुमच्या अंधश्रद्धा आधी सोडून द्या :-) मग इतरांबद्दल बोला.
प्रतिसाद परत
विज्ञानवादी आकड्यांच्या बाबतीत इतके निष्काळजी असलेले पाहून आश्चर्य वाटले. कॉमनसेन्स म्हणजे काय? त्याने टक्केवारी कशी निघते? ८७% ते ९३% म्हणजे एरर बार अधिक उणे ३% हा आकडा कसा काढला मुळात ९०% का आकडा कुठून आला? याचे मोजमाप कुणी केले आहे का? ६% एरर बार भारताच्या लोकसंख्येच्या मानाने बरीच मोठी संख्या होते.
याखेरीज रिकामटेकडा यांनी वर ७०% हा आकडा दिला आहे त्याचे काय?
आकडे देताना संदर्भासहित द्यावेत इतकेच म्हणणे आहे.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
मां दंतेश्वरी
मां दंतेश्वरीची या प्रकरणातली भूमिका काय हे तितकेसे स्पष्ट झाले नाही.
म्हणजे देवळात 'स्वच्छता राखा' असे लिहिले असेल तर एक गोष्ट पण 'स्चच्छता राखा नाहीतर कोप' असे असेल तर दुसरी गोष्ट. ही बाजू स्पष्ट होत नाही तोपर्यंत नीटसे मत व्यक्त करता येत नाही.
दुसरा मुद्दा मात्र महत्वाचा वाटला. चांगल्यासाठी खोटे बोलून योग्य उपचार करावा का? वैद्यकीय नीतिमत्तेत हे बसत नाही असे रिकामटेकडांनी लिहिले आहे. माझ्या मते हे अगदी योग्य आहे. नाहीतर एखाद्या असाध्य रोग्यास दिलासा देता देता अनेक साध्या रोग्यांच्या मागे संशयाचे सावट उभे राहील.
आता समोरचा माणूस अशिक्षित असेल तर काय? मला असे वाटते की अशिक्षितालाही अंधारात ठेवणे योग्य नाही. अगदी लसीकरणासारख्या विषयातही.
प्रमोद
वाचण्यालायक पीडीएफ लेख आणि चर्चा
डॉ. अभय बंग यांचा लेख वाचण्यालायक आहे.
प्रत्यक्ष कामात कराव्या लागणार्या तडजोडी, आणि त्यांच्याबद्दल अनुषंगाने थोडे नैतिक विश्लेषणही दिलेले आहे.
- - -
दंतेश्वरी देवीचे नाव देण्याबाबत परिच्छेदात नामकरणाची जबाबदारी समूहाची केलेली आहे - "डॉक्टर, आता हा दवाखाना तुमचा नाही, आमचा आहे."
त्याच पानावर मलेरिया-प्रतिबंधासाठी कोणाला हाती घ्यावे, याबद्दल निर्णय घेणारी समिती होती, असे दिसते : "त्यांना वेगवेगळे उपाय आम्ही सुचवले. लोकांनी त्यातून निवडले की... आमच्यात जे पुजारी आहेत, जे जडीबुटी वाटतात, मंत्र टाकतात, त्यांनाही तुम्ही ट्रेनिंग देऊन टाका..."
कार्य करताना निर्णय घेणे जर समूहाचे असेल, तर समूहनिर्णयतंत्र असे काहीतरी असते. (लोकशाहीत काय होते? विधिमंडळात पसार झालेला कायदा जमेल तितका पाळायचे बंधन आपण आधीपासून स्वतःला घालून घेतो. मग पसार होताना कायद्याला आपला विरोध किती का असेना.) वैयक्तिक पातळीवर नीतिशास्त्राचे देणेघेणे या निर्णयाशी असते - समूहाचे निर्णयतंत्र मानणे त्या संदर्भात नैतिक आहे काय?
- - -
सर्वात अंतर्गत विरोधी उदाहरणे (किंवा विरोधाभासी असतील, त्याचे विश्लेषण करायचे आहे) आहेत, त्यातील एक पक्ष श्री. रिकामटेकडा यांनी दिलेलाच आहे. डॉ. बंग लिहितात :
इथे विचार आदिवासी समितीने केलेला नाहीत. ते देवी मानणारे आदिवासी, आणि आम्ही विचार करणारे, असा फरक दिसतो.
याबाबत डॉ. बंग यांची भूमिका प्रसंगानुसार बदलणारी आहे. पीडीएफमधील पृष्ठ १२ वर एका बालकाच्या मृत्यूची कथा आहे. त्यात
या वाक्यांत "शहाण्याने" हे उलट अर्थाने आहे, हे स्पष्टच आहे. आणि सुसूत्र नसलेल्या मांत्रिक सल्ल्याने तोटा होतो, असा त्यांचा अनुभवही सांगितलेला आहे.
मात्र त्यांनी पुढे विश्लेषण दिले की
- मातेचे बाळ जन्मायच्या आधीपासून कुपोषण,
- बाळ अति वाढू नये म्हणून स्वतःहून गरोदर स्त्रीचे कमी जेवणे...,
...
- मांत्रिकाकडे उपचार
...
- नदीला पूर,
- भ्रष्टाचाराच्या कारभारात बांधलेला कमकुवत पूल पुरात वाहून जाणे
या सर्व गोष्टींनी बाळाच्या मृत्यूला कारणीभूत होत्या.
पुढे ते त्यांच्या तर्हेने कारणांची साखळी तोडण्याचे विश्लेषण देतात, की कुठलेही एक कारण नाहिसे केले तर बाळ वाचू शकते.
(पुढे ते कुठल्या ठिकाणी कार्यशक्तीचा भार द्यावा याबद्दल बोलतात. विषय न्युमोनियाकडे वळतो. मात्र असे दिसते, की न्युमोनियाबद्दल तत्काळ कार्य करणारी योजना उपयोगी आहे. स्त्री-साक्षरता, दारूबंदी वगैरे कार्ये दीर्घकाळात काम करणारी आहेत.)
अशी काहीतरी प्राथमिकता यादी करणे प्रत्यक्षात सर्वात कार्यक्षम असू शकेल. एखादे असत्य प्राथमिकता यादीत फार खाली असेल, तर त्याबद्दल काही केले नाही, तर चालत असावे. म्हणजे साक्षरता वगैरे झाल्यानंतर दीर्घकाळाने मांत्रिकाचा धंदा बंद पडला तर पडला.
- - -
आता विचार करूया, की "देवीने स्वच्छतेचा संदेश दिला" असे सांगण्यास वैद्यकीय नैतिकता टेकू देते काय? मला असे वाटते, की स्वतःहून खोटे बोलता येणार नाही. मात्र लोकांपर्यंत संदेश पोचण्यासाठी माझ्या एका सहकार्याने "चर्चमध्ये पत्रके वाटतो" असा प्रकल्प हाती घेतला होता. त्या प्रकल्पाच्या दरम्यान चर्चमधील प्रचारकाशी त्याच्या भेटीगाठी झाल्या. प्रचारकाने चर्चमध्ये प्रवचनात स्वास्थ्याबद्दल संदेश दिला. "क्लेनलिनेस इज् नेक्स्ट टु गॉडलिनेस" = "स्वच्छता ही ईश-पवित्रतेच्या जवळ" अशा प्रकारचे संदेशही एखाद्या प्रचारकाला प्रवचनात घालणे सुचले असेल. प्रचारक आणि भक्तांच्या मनात ईश-विचाराची आणि स्वास्थ्य-विचाराची उपस्थिती एका वेळी होईल, हे माझ्या सहकार्याला माहीत होते. परंतु हे काम करता आले. कायदेशीर बंधन आले नाही. यातील जो भाग "संशोधन" म्हणून होता, त्या बाबतीत विद्यापीठाच्या नैतिक विचारविनिमय संस्थेने अनुमती दिली.
- - -
"व्हाईट मॅन्स बर्डन" कवितेचा संदर्भ लागला नाही. किपलिंग "काळ्या माणसाला खोटे सांगून त्याचे भले करा" असे म्हणत नाही. आणि डॉ. बंग "आदिवासी हे नागर समाजाचे ओझे आहे" असे म्हणत नाहीत.
सहमत आहे.
-असेच म्हणताना काही अधिकही म्हणतो -
ते असे की उदाहरणार्थ, ('महर्षी ते गौरी'* हे पुस्तक वाचताना) धोंडो केशवांचे कार्य आणि रघुनाथ धोंडोंचे कार्य याबद्दलची तुलना होतेच.
दोघांचेही कार्य मोठेच! त्यात शंकाच नाही. पण वैचारीक भूमिका मात्र निरनिराळ्या आहेत.
धोंडो हे समाजाच्या कलाकलाने सुधारणा करावी या नेमस्त मताचे आणि कधीकधी तत्त्वांना मुरड घालणारे आहेत.
तर रधों समाजाला महामूर्ख समजतात आणि त्यावर कठोर प्रहार करत स्वतःच्याच तत्त्वांना घट्ट चिकटून रहातात.
त्यांच्यातील कोण समाजात बदल करण्यात यशस्वी झाला? या प्रश्नाचे उत्तर पाहता असे दिसते की धोंडोंचे कार्य लवकर समाजमान्य झाले,
एसेन्डीटी सारख्या स्त्रीशिक्षण विद्यापिठाची स्थापना करण्यात त्यांना यश आले. हळूहळू 'होम सायन्स' शिकणार्या स्त्रिया फक्त 'सायन्स'ही शिकू लागल्या.
धोंकेकर्व्यांना त्यांच्या जीवनमानातच सर्वमान्यता मिळू शकली.
याउलट रधोंनी मात्र 'संततीनियमन' या विषयापुरतेच मर्यादित न राहता उघडपणे विवाहसंस्थेवरच हल्ला चढवला आणि नग्नता व मुक्त लैगिक संबंधांचा उदोउदो
करण्यास सुरुवात केली. त्यांचे विचार प्रबुद्ध समाजात (जो आपणहून नीतीमत्ता पाळतो) योग्य ठरले असते. पण असा युटोपियन/आदर्श समाज अजूनही निर्माण होताना दिसत नाही.
अशा रधोंना मात्र लोकांनी वाळीत टाकले आणि त्यांच्या विचारांबद्दल समाजात त्यांच्या हयातीतच काय पण अजूनही मान्यता मिळणे कठीण आहे.
('संततीनियमन' होताना दिसते त्याचे कारण भारत सरकारने केलेले प्रयत्न आहेत.)
समाजाचा दगड त्याच्याखालची माती हळूहळू भुसभुशीत केल्यावरच हालतो. त्याच्यावर टक्कर मारली तर कपाळमोक्ष होतो आणि काहीच साध्य होत नाही.
समाजात प्रत्यक्ष काम करणार्याला या गोष्टीचे भान असावे लागते. तत्त्वे चर्चा करण्यासाठी योग्यच आहेत. तेव्हा तत्त्वतः डॉ. अभय बंग यांचे चुकले असे गृहित धरले तरी
त्यांच्याजागी अन्य कोणी असता तर आदिवासी समाजात चांगले बदल घडवण्यासाठी त्यालाही तत्त्वांना मुरड घालावी लागली असती असे वाटते.
*लेखिका - मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन.
अगदी
(र. धों. कर्वे यांच्याबद्दलचे मत अगदी माझ्या मनातले. कर्वे यांनी संततीनियमनाचा प्रचार सुरू केला हे त्यांचे दैदिप्यमान कार्य होते यात शंका नाही. पण भारतीय सरकारने जेव्हा धोरण म्हणून स्विकारले (इकॉनॉमिक डीवेलपमेंटला अडथळा येईल या भितीने), १९६० नंतर/च्या सुमाराला तेव्हा संततीनियमनाचा प्रचार अधिक झाला, अनेक लोकांनी धोरण स्वीकारले. )
समाजाचा दगड त्याच्याखालची माती हळूहळू भुसभुशीत केल्यावरच हालतो. त्याच्यावर टक्कर मारली तर कपाळमोक्ष होतो आणि काहीच साध्य होत नाही.
तसेच हेही मत माझ्या मनातले.
व्याख्या
जो इतरत्र देखील प्रश्न विचारलेला आहे तोच येथे देखील विचारत आहे: "नैतिक" शब्दाची व्याख्या काय?
...त्यांच्याबद्दल अनुषंगाने थोडे नैतिक विश्लेषणही दिलेले आहे...
...वैयक्तिक पातळीवर नीतिशास्त्राचे देणेघेणे या निर्णयाशी असते - समूहाचे निर्णयतंत्र मानणे त्या संदर्भात नैतिक आहे काय?...
...असे सांगण्यास वैद्यकीय नैतिकता टेकू देते काय?
...त्या बाबतीत विद्यापीठाच्या नैतिक विचारविनिमय संस्थेने अनुमती दिली...
वर चार संदर्भात "नैतिक" हा शब्द आला आहे. त्यामधे त्याचा अर्थ हा कुठल्या संदर्भात हा शब्द वापरला आहे त्याप्रमाणे बदलतो का? तसेच व्यक्तीने "नैतिक" असणे पेशामधे "नैतिकता" असणे ह्यात काही फरक आहे का? या बद्दल आपल्याला काय वाटते हे समजून घेयला आवडेल...
व्याख्या
सर्व वाक्यांवर पसरणारी व्याख्या ढोबळ पण नेहमीचीच मानलेली आहे. अशा सर्व संकल्पनांप्रमाणे व्याख्या नेमकी करायला गेले तर किचकट होऊ शकते. म्हणून ढोबळ व्याप्ती देतो :
कृती-कृतींमध्ये "योग्य" आणि "अयोग्य" असा भेद आपण करतो -- असा आपला अनुभव असतो. यात आपल्याला स्वतःच्या योग्य-अयोग्यच्या निर्णयांत ढोबळ सुसूत्रता जाणवते. आणि एकमेकांशी संवाद करताना कित्येक बाबतीत एकमेकांचे वर्गीकरण समसमान आहे, असे जाणवते. त्या वर्गीकरणामागे काही चौकट आहे काय? असा संवाद करता येतो, नियम शोधता येतात. ते नियम शोधले, की ज्या बाबतीत योग्य-की-अयोग्य असे मतभेद आहेत, त्या बाबतीत संवाद करता येतो. शोधलेल्या नियमांनुसार विचार केला तर संवादकांमधील मतभेद संवादाच्या नंतर नाहिसा होऊ शकतो. योग-अयोग्य बद्दल जी चौकट असते, त्याला ढोबळपणे "नैतिकता", "नीतिशास्त्र" वगैरे शब्द वर वापरलेले आहेत.
डॉ. बंग त्यांच्या कृतीचे अनुभव तर सांगतातच, पण कित्येक बाबतीत योग्य-अयोग्य काय याबद्दल चर्चा करतात. याला मी "नैतिक विश्लेषण देतात" असे म्हटले आहे.
योग्य-अयोग्य चर्चेमध्ये पुष्कळदा "जबाबदारी असली तरच चर्चेला अर्थ आहे" अशा प्रकारचे आपले मत असते. वैयक्तिक जबाबदारी विश्वातील प्रत्येक घटनेबद्दल नसते. समाजातील प्रत्येक घटनेबद्दल नसते. व्यक्ती त्या समाजाचा भाग असेनाका. उदाहरणार्थ जर्मन मतदारांनी निवडून दिलेल्या सरकारने १९३०-१९४० काळात अनेक लोकांना मारले. मात्र त्या हत्यांचा वैयक्तिक जबाब प्रत्येक जर्मन मतदाराला आपण मागत नाही. वगैरे. वैयक्तिक पातळीवरचे योग्य-अयोग्य ठरवण्यासाठी जर कुठले नियम अधिक सुसंदर्भ होत असले, तर त्याला "वैयक्तिक पातळीवरचे नीतिशास्त्र" असे म्हटले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात काही नैतिक प्रश्न पुन्हा-पुन्हा दिसून येतात. म्हणजे योग्य-अयोग्य बद्दल एकाच धाटणीचे संदेह प्रामाणिकपणे असतात, एकाच धाटणीच्या विश्लेषणानंतर ते सुटल्याचा अनुभव येतो. (प्रत्येक क्षेत्रात काहीकाही परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण असेल. उदाहरणात अर्थकारणात काही विशिष्ट धाटणीची परिस्थिती पुन्हा-पुन्हा उद्भवत असेल. त्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीसाठी विचार करायच्या काही "पायर्या" सोयीस्कर असतील.) त्या क्षेत्रातले वैशिष्ट्यपूर्ण सोडवताना काय विचार केला? हे जर अन्य वैद्यांनी चर्चिलेले असेल, तर तिथपासून चर्चा पुढे चालवता येते. पुन्हा अगदी-अगदी मूलतत्त्वांपासून विश्लेषण करावे लागत नाही. हे अर्थात केवळ वेळ वाचवायच्या सोयीसाठी असते. म्हणून "वैद्यकीय नैतिकता" असे म्हटलेले आहे. अधिक वेळ असला, किंवा संवादकांपैकी काही जणांना पूर्वीच्या वैद्यांचे अनुभव माहीत नसतील, तर या सोयीचा फायदा करून घेता येत नाही. अशा परिस्थितीत "वैद्यकीय नैतिकता" त्या संवादात वापरता येत नाही. म्हणजे एक बँक-अधिकारी इस्पितळासाठी कर्ज द्यायच्या बाबतीत योग्य-अयोग्य असा विचार करत असेल, आणि त्याच वेळेला इस्पितळातला वैद्य त्यांच्या जमा-खर्च धोरणाबद्दल योग्य-अयोग्य काय? असा विचार करत असतील. तर दोघांचा संवाद होऊ शकतो. मग कुठलाही तज्ज्ञ आपल्या ओळखीचे "शॉर्टकट" वापरू शकत नाही. ते दुसर्या तज्ज्ञाच्या ओळखीचे नसतात. दोघांना मान्य असलेली मूलतत्त्वे वापरावी लागतात.
नैतिक विश्लेषण चर्चिण्यासाठी समिती विद्यापीठाने बसवलेली आहे. अशी समिती असावी, असा कायदाच आहे. येथील "नैतिक" शब्दाचा अर्थ वरील अर्थांशी संलग्न आहे, हे आहेच. मात्र समितीचे कार्य कायद्यानुसार होते, वगैरे, या मर्यादा या संदर्भात जाणून घेतल्या पाहिजेत.
बचेंगे तो और भी लडेंगें
आदिवासी लोकांचे विशेषता महीला व बाल आरोग्य सुधारणे ही पहीली पायरी. त्यामुळे दंतेश्वरी देवीच्या मंदिरातून पसरवले जाणारे संदेश तूर्तास योग्य वाटते आहे.
एकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही. महाराष्ट्रातले आदिवासी किती किती नशीबवान आहेत की डॉ. बंग यांच्या कामातील उणीवा शोधुन त्यावर विचार करुन त्यावर उपाययोजनाही उपक्रमींनी बनवली आहे.
धन्य ते अदिवासी, धन्य ते उपक्रमी, धन्य ते मराठी जन!!
ऑल इज वेल!
-------------------------------------------------------------------------
निवासी व अनिवासी मराठी लोकांना स्वतःचे भले कळत नाही, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी त्यांच्यावर संपादन करणे अपरिहार्य आहे, वास्तविक त्यांच्यावर संपादन करण्यात आम्हाला क्लेषच होतात तरीही आम्ही दुनियादारी करतो आहो, असे मत मांडणारी एडिटर्स बर्डन ही कविता <आपला आवडता संपादक येथे> १९९४ साली लिहिली.
सहमत
एकदा का डॉ. बंग यांचे काम झाले की इथले नेहमीचे यशस्वी कलाकार लगेच गडचिरोलीत जाउन विवेकवादाचे इंजेक्शन देउन तमाम अदिवासींचे व त्यांच्या संस्कृतीचे चिरंतनकालापर्यंत आयुष्य भले करतील यात माझ्या मनात काहीही शंका नाही.
सहमत!
हाहहाहा!
;-) अगदी अगदी!
:)
त्यासाठी आदिवासींना उपक्रमी व्हावे लागेल का? :)
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम
त्यापेक्षा
त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे? ;)
बिपिन कार्यकर्ते
अगायाया
अगायाया... अभय बंग किंवा त्यांच्या सारख्यांपैकी कोणी अशा संस्थळांचे सदस्य नसावेत ही (आता मात्र परमेश्वराकडेच) प्रार्थना करतो.
सहजकाकांशी सहमत. त्यासाठी आदिवासींना उपक्रमी व्हावे लागेल का, असे आरागॉर्न (अर्थातच उलट्या अर्थाने) विचारतात. तसे झाले तर आगीतून फुफाट्यात या म्हणीचा त्यांच्यासंदर्भातील कितवा पुरावा त्यांनाच मिळेल हेही सांगता येणार नाही. त्यांच्यावरील संकट खरंच भयंकर भीषण आहे!
तसे
तसे झाले तर काही दिवसातच रोगांनी मरणे बरे पण हा विवेकवाद नको असे म्हणून आदिवासी पळ काढतील. :)
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम
खरंय
खरंय. काहीसा असाच प्रकार पाहिला आहे.
यापुढचा प्रतिसाद आरागॉर्न यांना उद्देशून नाही. तोल सुटेल अशी भाष्ये होत असलेल्या या चर्चेवरून निर्माण झालेला प्रतिसाद आहे तो.
ही सगळी पवित्रेबाज चर्चा वास्तवाचे भान विसरून तर होत नाहीये? ज्या अर्वाचीन शिक्षण, ज्ञान, विज्ञान वगैरेच्या आधारे आपली (म्हणजे इथं लिहिणाऱ्या लोकांची) आकलनं तयार झाली आहेत त्या ताकदीच्या अनुषंगाने आपण, या साऱ्या संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागे असणाऱ्या लोकांबाबत जाणते-अजाणतेपणी (दोन्हीचा पर्याय ठेवतोय, कारण कोण कोणत्या भूमिकेतून काय आणि कसे लिहितोय हे ठाऊक नाही) व्हॅल्यू जजमेंटल स्वरूपाचे मतप्रदर्शन करतोय असे (काहींचा अपवाद असावा) वाटत नाही? अभय बंग आणि तत्सम मंडळींनी त्यांच्या कामासाठी ज्या रीतींचा अवलंब केला त्यावर तीच मंडळी मांडत असलेल्या (कदाचित विपरित) भूमिकेच्यासंदर्भात टीका करत बंग आणि ती मंडळी भंपक आहेत, असे म्हणणे फक्त त्यांच्या संदर्भात मी एक वेळ समजू शकतो. पण ते ज्या समुदायात हे काम करत आहेत, त्यांच्यातील श्रद्धा-अंधश्रद्धाच मुळी इथं लिहिणाऱ्यांच्या तुलनेत काही पिढ्या मागच्या आहेत आणि तसे असेल तर त्यांच्यातून त्या श्रद्धा-अंधश्रद्धा एकाच पिढीत हद्दपार व्हाव्यात अशा रीतीने बंग आणि मंडळींनी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करणारे मतप्रदर्शन अती वाटत नाही? आणि अशी कामे यशस्वी होत नसल्याने हे समाजसमुदाय आहेत तेथून आणखी मागे रेटायचे? एकूण चर्चेचा सूर पाहता ते परवडेल अशी मांडणीही उद्या झाली तर नवल वाटणार नाही.
(सार्वत्रिक नव्हे, मी घेतलेल्या अनुभवांच्या संदर्भापुरते; पण किमान चार जिल्ह्यात पसरलेला आहे अशा ठिकाणी) शिकण्याच्या पहिल्या टप्प्यातच मुळी 'ग' 'गणपतीचा' यातील गणपती न कळल्याने ग कळण्याचा प्रश्न येत नव्हता हे ध्यानी घेत शिक्षणाची पायाभरणी करावी लागली होती, हे आपण विसरून कसे जातो? अशा व्यवस्थेतून शिकून आलेला महाविद्यालयीन अधिव्याख्याता आज गावाकडं जत्रेत कोंबडी कापतो हे वास्तव आहे. हा अधिव्याख्याता आदिवासीच आहे. मी अर्धपुढारलेल्या भागाविषयी लिहित नाही. या दोन्हीमध्ये मोजमाप करताना माप एकच लावले तरी त्यांच्यात भिन्नत्व आहे हे मान्य होण्यासारखे नसावे?
तर्कदुष्टताच ही. बाकी काही नाही.
या सगळ्या युक्तिवादांना विवेक म्हणायचे? म्हणा बाबाहो.
गावाकडची एक म्हण आहे, ती आठवली - तुमचा बाप एसपी, आमचा हवालदार!
पर्फेक्ट!!!
पर्फेक्ट!!!
बिपिन कार्यकर्ते
पर्याय आहेत
वि. गो. कुलकर्णी यांनी एक उदाहरण दिले होते ते असे स्मरते:
डेक्कन क्वीन क वेगाने प्रवास करत असेल तर मुंबई-पुणे ख अंतरासाठी तिला किती वेळ लागेल? डेक्कन क्वीन काय आहे तेच माहिती नसलेल्या मुलांना या प्रश्नाच्या उत्तराची आकडेमोड करताना त्रास होतो. अधिक चांगले शिक्षण देण्याची पद्धत विकसित करून, अशा प्रकारे मागे पडणार्या मुलांना त्यांनी पुढे आणले. पण त्यासाठी त्यांना देवाधर्माचे स्तोम वाढविणार्या गांधीवादाची मदत घ्यावी लागली नाही.
शिक्षणव्यवस्थेविषयी एक रोचक दुवा.
विश्वास संपादित करण्याच्या नावाखाली चाललेले खतपाणी घालणे टाळता येईल काय इतकाच माझा प्रश्न आहे.
शेम ऑन अस. "त्याला कोंबडीची चव आणि जत्रेचे वातावरण आवडत असेल म्हणून तो कोंबडी कापतो, नाहीतर तो अंधश्रद्ध मुळीही नाही बरे!" असे इथले काही लोक म्हणू शकतात असे वाटते.
क्या बात है!!!
अगदी - खरंय राव. हा युक्तिवाद मी आधीच ओळखायला हवा होता. विसरलो. शिरसाष्टांग नमस्कार तुम्हाला. माझ्याकडे या मुद्यावर तुमच्यासाठी उत्तर नाही. माघार (हे मंजूर केल्यानं सामाजिक कामांमध्ये जे भाग घेतात त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही. कारण त्यांच्याकडे यासाठीचा रिकामा वेळ नसतोच. तुमचे चालू द्या).
बादवे, तुम्ही एक्झॅक्टली काय करता हे समजून घ्यायला आवडेल. असे विगोंसारखे काही स्वानुभव असतील (म्हणजे प्रत्यक्ष काम वगैरे केल्याने मिळालेले) तर थोडे शेअर करा. अशा काही कामांशी माझा संबंध आहे. तिथे त्यापैकी काही करता येतं का हे पाहीन.
फ्रॅंकली, तुम्ही दिलेला दुवा मला शष्पदेखील कळला नाही. मी तुमच्यापेक्षा अशा शिक्षणासंबंधात किती पिढ्या मागे असेन याचा विचार करून माझ्या प्रतिसादांवर लिहित चला. म्हणजे, ज्ञानात थोडी भर पाडून घेता येईल.
अच्छा. असं होय. या एका प्रश्नासाठी इतका खल? या प्रश्नाचे उत्तर - नाही!!! मुळात इथं खतपाणी नसतं. तरीही त्या शब्दाला अवतरणात टाकून लिहितो. "खतपाणी" घातलं जातं, त्यातून माणसं जगवली जातात. या जगणाऱ्या माणसांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे खतपाणी घालण्याची गरज संपुष्टात येते. पण ही साली सामाजिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक नव्हे. 'अ'मध्ये 'ब' मिसळलं की झालं 'क' तयार वगैरे. तसं नसतं इथं, इतकंच.
विश्वास संपादित करावा लागतो, एरवी काम सुरूही होत नसतं हे तुम्हाला कदाचित मंजूर असेल!
सो? असं करा, चाळणीत पाणी घालून जीव द्या. जीव वाचेल, पण तुमचा कदाचित कॉन्शन्स सर्व्ह होईल.
वेल, मी असं काही म्हटलेलं नसल्यानं, पास!
नक्कीच
नक्कीच म्हणू शकतात. मी तर म्हणेनच. किंबहुना, इथे जी अतिरेकी गृहितके मांडलेली असतात त्यापेक्षा वरील गृहितक मला खचितच बरे वाटते.
विशेषतः इथे आपला म्हणणे खरे करण्याची वेळ आली की "छे! आम्ही नाही त्यातले पण जनरीत म्हणून करतो (यात पत्रिका जुळवणे, प्रसाद खाणे वगैरे सर्व आले)" असे म्हणणारे आढळत असतील तर वरील गृहितक मांडण्यात कोणाची ना नसावी.
कोण?
ते प्रसाद कसा खातात त्यावर त्यांचे ईमान आम्ही जोखू. पत्रिका जुळविणे मात्र निर्विवाद लांच्छनास्पद आहे.
नारळीकर
आता या नारळीकरांचे काय करावे?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6543881.cms
"या सामुदायिक पठणानंतर डॉ. जयंत नारळीकर यांनी सर्वांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याचा सल्ला .... समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले." (म. टा. मधून)
फुस्स
इंद्राय स्वाहा
ठीक!
आता इंद्र कोण, तक्षक कोण, अर्जुन कोण आणि कृष्ण कोण ? असो.
नारळीकरांनी जाऊन अथर्वशीर्ष म्हणूच नका, म्हणून व्याख्यानाला सुरूवात केली नाही, हे मला लक्षात घेण्यासारखे वाटले. मात्र वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले तेही बरे केले.
दुरुस्ती
अर्जुन/कृष्ण नै कै; जनमेजय/अगस्ती!
डॉ. बंग यांना तुम्ही डॉ. नारळीकरांच्या मागे दडविता आहात म्हणून हे रूपक मी वापरले.
नाही हो.
दडवत नाही. आचारपद्धतीत साम्य वाटले. ते दाखवले.
दोघांच्या कामांबद्दल आदर आहे.
योग्य
या संदेशाची ज्यांना गरज आहे तोच समुदाय समोर आयता मिळाला. ही संधी नारळीकरांनी घेतली. अन्यथा समविचारी लोकांच्या समोर तेच तेच उगाळण्यात काय अर्थ आहे. तुम्हाला जे पटेल तेच मी तुम्हाला सांगायच आन समोरच्याने मान डोलवायची.
अशा प्रसंगी गणेशोत्सव साजरा करणे हीच एक अंधश्रद्धा आहे अस सांगायच का? अंनिस त एका मिटिंग मधे एका विदुषीने ती अंधश्रद्धा आहे हे सांगितले ही होते. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यक्रम गणेशोत्सवात करणे, वैज्ञानिक दृष्टिकोण प्रतिबिंबित करणार्या देखाव्यांना प्रोत्साहन देणे या सुचना आम्ही केल्या. त्या अमलातही आल्या. अंनिसचा विसर्जित गणपती दान करा हा कार्यक्रम आता सर्वच लोकांनी आता उचलून धरला आहे.
ज्या समुहाच प्रबोधन करायच आहे त्या समुहाला तुम्ही त्यांच्यातले वाटले पाहिजे. त्यासाठी तडजोड म्हणजे तत्त्वच्युती मानता कामा नये हे आमचे मत आहे. आता यात जरा तारांबळ होते खरी पण चालायचच.
प्रकाश घाटपांडे
बंग
अभय बंग हेच करत आहेत आणि त्यामुळेच यशस्वी झाले आहेत.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
द बंग !!! :)
ट्रोजन् होर्स आठवला.........!!!
सहमत
सहमत!!!
:(
अरेच्या! विकांताला इथे नव्हतो तेव्हा ही मोठ्ठी चर्चा झालेली दिसते.. मात्र (इतक्या मतमतांतरानंतर) शेवटी हाती काहिच विषेश अथवा वेगळे लागलेले नाही याचे (आश्चर्य वाटले नाही मात्र) वाईट वाटले.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
नाही
काहितरी नक्कीच् लागले. निती अनिती कसोट्या पुन्हा घासुन् पुसुन् लख्ख झाल्या.
-----------------------------------------------------------------
पेला नेहमीच् कशा ना कशाने भरलेला असतो.