देवाची व्याख्या -२

एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे. विष्णू, अल्ला, गॉड, ज्युपिटर, इ. विशेषनामेही चालतील. येथे अपेक्षित असे आहे की प्रत्येकाने

वर्णन/व्याख्या सांगावी.
ती व्याख्या समाजात अव्यक्तपणे वापरल्या जाणार्‍या अर्थांपैकी एखाद्या अर्थाशी सुसंगत आहे काय ते सांगावे.
ती व्याख्यावस्तू तपासण्याजोगी आहे काय ते सांगावे.
जर संकल्पनेसाठी पुरावा सापडणे शक्य असेल तर किती सापडलेला आहे ते सांगावे.
निष्कर्ष/टिपण्णी द्यावी. या संकल्पनेच्या इतर प्रचलित व्याख्यांविषयी काही महत्वाची टिपण्णी शक्य असल्यास करावी.
इतर काही संज्ञा महत्वाच्या वाटत असतील तर त्यांच्या व्याख्यांची चर्चा करण्यासाठीही हा धागा वापरता येईल.

देवाची व्याख्या या चर्चेतील काही प्रतिसाद येथे हलवले आहेत. यापुढील चर्चा कृपया या धाग्यावर करावी.

लेखनविषय: दुवे:

Comments

देवाची व्याख्या - एक प्रयत्न :

ह्या धाग्याबद्दल धन्यवाद त्याच बरोबर तुम्ही प्रत्येक मुद्द्याला पडताळुन पाहतायेत आणि त्यावर योग्य ती टिपण्णी करतायेत हे वाचुन
अधीक छान वाटले.

लहानपणी आई-बाबा देवबप्पाच्या पाया पड म्हणायचे , मी त्यांच्या भितीने आणि बप्पाच्या पाया नाही पडलो तर मला पाप लागेल अशी घालुन दिलेल्या भितीने मी बप्पाच्या पाया पडायचो. तसेच बप्पा आपले रक्शण करतो आणि आप्ली ईच्छापुर्ती करतो वगैरे सांगुन दिल्यामुळे पाया पडण्यात माझाच फायदा आहे हे पाहुन मी पाया पडणे चालू ठेवले. त्यातच १०० दा (आंदाजे) पाया पडल्यानंतर मला कुठल्या का कारणाने किमान एकदा तरी फायदा व्ह्यायचा (जो की पाया नसतो पडलो तरीही झाला अस्ता, पण तेंव्हा ही विचार करण्याची शक्ती नव्हती कदाचीत) आणि शाळेतील आवारापेक्षा , शिक्षकाण्च्या मारापेक्शा, दररोजच्या ग्रहपाठापेक्षा मंदीरात जाण्याने जो वेगळेपणा वाटायचा तो मला जास्त बरा वाटायचा आणि ह्यांसारख्या काहि अधीक कारनांनी (ज्या प्रत्येकातुनच मला आनंद मिळत गेला) मला मंदीरात जाण्याची व बप्पाच्या पाया पडायची सवय लागुन गेली. जसा जसा मी थोडा मोठा होत गेलो मला माझ्या कामांसाठी (महत्वाच्या) आत्मविश्वासाची प्रबळ गरज भासत गेली. वर्गात स्टेजवर बोलायला, इंटरक्लास खो-खो स्पर्धेत जोमाने खेळायला , वर्गात परीक्षेत प्रथम यायला , मित्र-मैत्रीनींचा विश्वास जिंकायला आणि इतर गोष्टींसाठी मला त्या आत्मविश्वासाची फार फार गरज लागु लागली. तो विश्वास माझ्यामधेच होता पण तो जागा होत नव्हता आणि बप्पाच्या पाया पडल्याने तो स्टीमुलेट(जागा) व्हायचा. तो जागा होण्याची कारणे काहीही असोत म्हणजे --
१) बप्पा हा खूप शक्तीशाली आहे आणि तो चांगल्या भावनेला मदत करतो असा माझ्या आईने घालुन दिलेला विश्वास (लहान्पणी) , आणि आप्ल्याबरोबर महाशक्ती असेल तर कुणी मला कसा काय हारवु शकेल (हे म्हणजे अमेरीका आणि चीन तुम्च्या बरोबर असेल तर कोण कशाला फिर्केल तुमच्या बॉन्ड्रीवर नाही का ?.. असेच काहीतरी)
२) बप्पाने मला बर्‍याचदा मदत केली आहे आणि आत्तापण करेल अशी भावना (पॉसिटिव्ह थिण्किन्ग )
३) देवाला किंवा कुणालातरी प्रार्थना केल्याशिवाय आत्मविश्वास जागरूक व्ह्यायला कठीन जायचे (मोस्टली अशक्य), जरी माहित असायचे की
तो विश्वास माझ्यामधेच आहे तरीही..

तर "लहानपनीपासुनची सवय(ज्यामधे बरेच फायदे व्ह्यायचे)" आणि "आत्मविश्वास जागा करण्यासाठी होत असलेली मदत" ह्या दोन गोष्टींमुळे माझ्या मनात एका थर्ड पार्टीचे स्थान कायम राहिले त्याला मी देव म्हणत गेलो(घरचे व बाहेरचे लोक देवच म्हणायचे म्हणुन फक्त). आता ह्या थर्ड पार्टीला तपासून पहायला वेळ नाही मिळाला म्हणजे गरजच वाटली नाही. आणि मग हा पण प्रश्न वाटु लागला की का पडताळऊन पाहु ? मला त्याने कधीच त्रास दिला नाही आणि त्याच्या महाशक्तीशाली व तो सर्व पाहत अस्तो ह्यां (मानलेल्या) गुणांमुळे मी वाईट कृत्य करण्यापासुन आडवला जायचो , घरात एक शिस्त रहायची , स्वच्छता रहायची ; तर मग मी का पडताळु की तो आहे की नाही.
त्याच्या "असणे" ह्याच एका विश्वासाने मी जनावर ते माणुस हा प्रवास सहजपणे पार करु शकलो आणि अजुन चालुच आहे तर त्याची व्याख्या करायची गरजच वाटली नाही. तसेच तो नाही म्हणणे हे मला कसलाच फायदा देत नाही तर मग का मी त्याला न स्वीकारु ?

पण मी माणुस आहे, व्याख्या अजीबातच माहित नसताना विश्वास ठेवने म्हणजे अंधविश्वास वगैरे कारणांमुळे आपण इतके दिवस कुणाच्या पाया पडत होतोत हे पडताळुन पहायचा मी एक प्रयत्न करतो.

माझ्या मनात लहानपणापासुन घर केलेल्या देवाचे वर्णन असे :
१) तो ह्या जगात घडणार्‍या सर्व गोंष्टींचा मुळ (मुळ म्हणजे माझे द्न्यान वापरून मी ज्या रूटकॉज पर्यंत जाऊ शकतो त्या रूटकॉजचा स्त्रोत)
२) तो महाशक्तीशाली व महाद्न्यानी आहे व तो तसा आहे हे मी कुणा व्यक्तीला सिद्ध करु शकत नाही पण त्याच्या ह्या असलेल्या गुणांच्या श्रद्धेनेच माझ्यात शिस्त/माणुस्की/आत्मविश्वास इ. निर्माण होतो (वरील प्यारा वाचावा) व ते तो करु शकतो म्हणुनच मी त्याला महाशक्तीशाली व महाद्न्यानी असं पुन्हा म्हणतो (हीच माझी सिद्धता).
३)वरील दोन्हीमुद्दे माझ्यासमवेत माझ्यापेक्षा कमी द्न्यानी लोकांना समजाऊन सांगताना (माझ्या एकट्यातच ती शिस्त / माणुसकी वगैरे ..आणुन उपयोग नाही , बाकी लोकांमधेपण ती असली पहिजे) विविध गोष्टींचा (शंकर-पार्वती , राम-लक्ष्मण, कृष्ण इ.)वापर करणे गरजेचे आहे. त्यांना फोटो वगैरे दाखवावा लागतो. आणि त्यांना दाखवायचा म्हणजे मला पण तो वापरावा लागतो. म्हणुण मी गणेश व नरसिंह निवडले आहेत. फोटो वापरल्याने माझ्या मनात नकळत एक देवाची प्रतीमा तयार होते व ती मला शिस्त/माणुस्की/आत्मविश्वास इ. बनवन्यास मदत करते. पण माझा देव तसाच आहे असे सिद्ध करु शकत नाही पण तसे केल्याने माझा विश्वास आणखीन वाढतो म्हणुन मी असे म्हणु शकतो की माझा देव तसा दिसतो (ह्या फोटोंचा व गोष्टींचा उगम खुप आधी पासुन आला आहे आणि मला त्या फोटोंत व त्या गोष्टींत अधीक शक्ती जाणवते).

अजुन काही मुद्दे आहेत पण वेळे अभावी मला इथपर्यंतच पोस्ट करता येयील. बाकी मुद्दे प्रतीसादात ट्राय करेण.....

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

बूटस्ट्रॅप?

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डेविल्स ऍडवोकेट या धर्तीवर देवाची बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.

मला त्याने कधीच त्रास दिला नाही आणि त्याच्या महाशक्तीशाली व तो सर्व पाहत अस्तो ह्यां (मानलेल्या) गुणांमुळे मी वाईट कृत्य करण्यापासुन आडवला जायचो , घरात एक शिस्त रहायची , स्वच्छता रहायची ; तर मग मी का पडताळु की तो आहे की नाही.
त्याच्या "असणे" ह्याच एका विश्वासाने मी जनावर ते माणुस हा प्रवास सहजपणे पार करु शकलो आणि अजुन चालुच आहे तर त्याची व्याख्या करायची गरजच वाटली नाही. तसेच तो नाही म्हणणे हे मला कसलाच फायदा देत नाही तर मग का मी त्याला न स्वीकारु ?

२) तो महाशक्तीशाली व महाद्न्यानी आहे व तो तसा आहे हे मी कुणा व्यक्तीला सिद्ध करु शकत नाही पण त्याच्या ह्या असलेल्या गुणांच्या श्रद्धेनेच माझ्यात शिस्त/माणुस्की/आत्मविश्वास इ. निर्माण होतो (वरील प्यारा वाचावा) व ते तो करु शकतो म्हणुनच मी त्याला महाशक्तीशाली व महाद्न्यानी असं पुन्हा म्हणतो (हीच माझी सिद्धता).

 1. केक जपायचाही आहे आणि खायचाही आहे असा हा प्रयत्न आहे. "देव आहे" असे खरेच वाटत असणारी व्यक्ती नीतीनियमांनी वागण्याची सैद्धांतिक शक्यता मला मान्य आहे. पण स्वतःचीच फसवणूक करणे मात्र (प्रौढांना) शक्य नसते.
 2. "You've just said a very revealing thing. Are you telling me that the only reason you don't steal and rape and murder is that you're frightened of God?" - रिचर्ड डॉकिन्स (The Root of All Evil? Part 2, 00:13:55)
 3. हा डिटरंट कार्यक्षम असता तर जगात इतका अनाचार दिसलाच नसता. समाजापेक्षा तुरुंगात नास्तिकांचे प्रमाण अधिक दिसले असते (किंवा दुसरे स्पष्टीकरण असे की निरीश्वरवादी लोक पकडले न जाण्याइतके हुशार असतात :) ).

१) तो ह्या जगात घडणार्‍या सर्व गोंष्टींचा मुळ (मुळ म्हणजे माझे द्न्यान वापरून मी ज्या रूटकॉज पर्यंत जाऊ शकतो त्या रूटकॉजचा स्त्रोत)

'प्लेसहोल्डर' हे उत्तर/स्पष्टीकरण नसते (अधिक माहिती).

३)वरील दोन्हीमुद्दे माझ्यासमवेत माझ्यापेक्षा कमी द्न्यानी लोकांना समजाऊन सांगताना (माझ्या एकट्यातच ती शिस्त / माणुसकी वगैरे ..आणुन उपयोग नाही , बाकी लोकांमधेपण ती असली पहिजे) विविध गोष्टींचा (शंकर-पार्वती , राम-लक्ष्मण, कृष्ण इ.)वापर करणे गरजेचे आहे. त्यांना फोटो वगैरे दाखवावा लागतो. आणि त्यांना दाखवायचा म्हणजे मला पण तो वापरावा लागतो. म्हणुण मी गणेश व नरसिंह निवडले आहेत. फोटो वापरल्याने माझ्या मनात नकळत एक देवाची प्रतीमा तयार होते व ती मला शिस्त/माणुस्की/आत्मविश्वास इ. बनवन्यास मदत करते. पण माझा देव तसाच आहे असे सिद्ध करु शकत नाही पण तसे केल्याने माझा विश्वास आणखीन वाढतो म्हणुन मी असे म्हणु शकतो की माझा देव तसा दिसतो (ह्या फोटोंचा व गोष्टींचा उगम खुप आधी पासुन आला आहे आणि मला त्या फोटोंत व त्या गोष्टींत अधीक शक्ती जाणवते).

लोकांच्या भल्यासाठी केली तरी फसवणूक चूकच!

फसवणुक :

१. आपण फसवणुकीची व्याख्या कराल काय ? मग मी सांगतो की इथे फसवणुक होत आहे की नाही माझी(मी वापरलेल्या व्याख्यामुळे).

>>हा डिटरंट कार्यक्षम असता तर जगात इतका अनाचार दिसलाच नसता.
हा माझा देव आहे ,म्हणजेच माझी व्याख्या, बाकीच्यांच्या व्याख्येत तसे नसेल. त्यांच्या व्याख्येत तसे नसेल म्हणुन अनाचार दिसत असेल. तुम्ही इथुन पुढे देव न वापरता "कक" म्हणा म्हणजे गोंधळ होणार नाहे. माझ्यात जितका हा डिटरंट जास्त तितका मी मानव जातीला कमी घातक.

>>>... that you're frightened of God?"
इथे वापरला जाणारा देव माझ्या व्याख्येतला कक नाही.
आणि जरी अस्ता तरी त्याला भिने नको का ? टीम लीडर ला घाबरुन लोक चांगली काम करत असतील तर प्रॉब्लेम काय् आहे ?

>>>'प्लेसहोल्डर' हे उत्तर/स्पष्टीकरण नसते (अधिक माहिती).
माहित आहे. परंतु ह्या युनिवर्सचा निर्माता माझा "कक" असावा ही माझी श्रद्धा आहे. तसे मानल्याने माझ्या बाकीच्या गोष्टी तार्किक बनतात.

खुलासा

फसवणुकीची व्याख्या

असत्य माहिती देऊन व्यक्तीची कृती बदलणे म्हणजे फसवणूक होय. कृती बदलल्यामुळे त्या व्यक्तीचा फायदा होतो की शोषण ते उदाहरणानुसार बदलू शकते. फसवणुकीत शोषण असेल तर त्याला लुबाडणूक म्हणतात. ज्या अर्थांनी मी शब्द वापरले आहेत ते प्रचलित अर्थांशी सुसंगत नसतील तर कृपया निदर्शनास आणा. प्लॅसिबो हे फसवून केलेल्या फायद्याचे एक उदाहरण आहे. येथे अजून एक उदाहरण आहे. पॅट्रिक लुमुंबा यांनी काँगो देशात असे सांगितले की आपण पाश्चात्यांपासून स्वातंत्र्य मिळविले की आपल्या त्वचेचा रंग गोरा होईल.

हा माझा देव आहे ,म्हणजेच माझी व्याख्या, बाकीच्यांच्या व्याख्येत तसे नसेल. त्यांच्या व्याख्येत तसे नसेल म्हणुन अनाचार दिसत असेल. तुम्ही इथुन पुढे देव न वापरता "कक" म्हणा म्हणजे गोंधळ होणार नाहे. माझ्यात जितका हा डिटरंट जास्त तितका मी मानव जातीला कमी घातक.

इथे वापरला जाणारा देव माझ्या व्याख्येतला कक नाही.

आहे!
"मला पाप लागेल अशी घालुन दिलेल्या भितीने मी बप्पाच्या पाया पडायचो. तसेच बप्पा आपले रक्शण करतो आणि आप्ली ईच्छापुर्ती करतो वगैरे सांगुन दिल्यामुळे पाया पडण्यात माझाच फायदा आहे" ही "लहानपनीपासुनची सवय" तुम्ही प्रौढपणी "ह्या थर्ड पार्टीला तपासून पहायला वेळ नाही मिळाला म्हणजे गरजच वाटली नाही. आणि मग हा पण प्रश्न वाटु लागला की का पडताळऊन पाहु ? मला त्याने कधीच त्रास दिला नाही आणि त्याच्या महाशक्तीशाली व तो सर्व पाहत अस्तो ह्यां (मानलेल्या) गुणांमुळे मी वाईट कृत्य करण्यापासुन आडवला जायचो , घरात एक शिस्त रहायची , स्वच्छता रहायची" या कारणांसाठी "वरील प्यारा वाचावा" असे सांगून सुरू ठेवली आहे. "पाप करण्याची शिक्षा मिळते" याच संकल्पनेचा रिचर्ड डॉकिन्स यांच्या प्रश्नात उल्लेख आहे. म्हणजे 'कक' हीच प्रचलित व्याख्या आहे आणि 'कक' हा डिटरंट अनाचाराविरुद्ध कार्यक्षम नाही.

आणि जरी अस्ता तरी त्याला भिने नको का ? टीम लीडर ला घाबरुन लोक चांगली काम करत असतील तर प्रॉब्लेम काय् आहे ?

"the only reason you don't steal and rape and murder" यात ऑपरेटिंग शब्द 'ओन्ली' आहे. बडग्याखाली सदाचार करण्याव्यतिरिक्त, मानवांमध्ये सदाचार मेंदूत थोडातरी हार्डवायर्ड असतो, तसा मुळीच नसलेल्यांना अँटीसोशल/सायकोपाथ म्हणतात. असो, या मुद्यावर मला अधिक प्रतिवाद शक्य नाही.

परंतु ह्या युनिवर्सचा निर्माता माझा "कक" असावा ही माझी श्रद्धा आहे. तसे मानल्याने माझ्या बाकीच्या गोष्टी तार्किक बनतात.

नाही. तार्किक सिद्धतेचे एक उदाहरण देतो:
अणूच्या आतील कण गृहीत धरून मूलद्रव्यांचे गुणधर्म सिद्ध करता आले की "क्लोरिनचा रंग कोणता?" या प्रश्नाचे उत्तर लिहून ठेवावे लागत नाही. अणूच्या आतील कणांचे गुणधर्म आणि त्यांच्या एकमेकांशी वागण्याचे नियम वापरून, "हिरवा" हे तार्किक उत्तर 'बनविता' येते. देव मानल्याने अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. (उदा., क्वार्क मानल्यास प्रोटॉन, न्यूट्रॉन या संकल्पना टाकून देता येतात(="प्रोटॉनचे वस्तुमान किती?" या प्रश्नाचे उत्तर ऑन-द-फ्लाय 'बनविता' येते), तसे देव वापरून क्वार्कसिद्धांत टाकून देता येतो का?)

श्रद्धा-अंधश्रद्धा हा मुख्य मुद्दा!

प्रस्तुत विषय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज वाटते.

कारण:

» प्रत्येकाला (खासकरुन मानवाला) एखाद्या गोष्टीत अतिशय रस असतो वा ती गोष्ट त्याला अतिशय प्रिय असते. (येथे गोष्ट म्हणजे विश्वातील कुठलीही वस्तू वा भाव वा तुम्ही ज्याबद्दल विचार करण्यास समर्थ आहात असे काहीही, असा येथे अर्थ अभिप्रेत आहे. ही गोष्ट एखादा तत्ववेत्ता अधिक अर्थपूर्णरीत्या समजावून सांगू शकेल, त्यासाठी विनाकारण व अर्थहीन स्पष्टीकरणाचा उद्व्याप मी करण्याचे येथे टाळतोय.)

» आपल्या पृथ्वीतलावरील (खासकरुन मानवाच्या) इतिहासाचे विविध कालखंड पाहता विविध प्रांतांमध्ये, विविध संस्कृतींच्या काळात काही विद्वान, महाज्ञानी विभूती होऊन गेल्या आहेत. त्याबाबत—पुरावे, कथा, दंतकथा, वा इतर माध्यमांतून आपल्याला थोडीशी का असेना पण माहिती मिळते. इतिहासावरुन असे प्रत्ययास येते की लोकांची ज्या व्यक्तीवर वा प्राणीमात्रावर वा वास्तूवर (वरीलपैकी एक गोष्टच!) प्रचंड श्रद्धा (अर्थपूर्ण व्याख्या अपेक्षित.) होती, म्हणजेच लोक त्या गोष्टीला त्या काळी विशेष मान देत, मग त्यामागील कारण काहीही असो, जसे की तत्सम गोष्टीने लोकांसाठी काही चांगली कामे केली असतील किंवा लोकांमध्ये च्याबद्दल प्रचंड जरब असेल (आदरयुक्त वा भययुक्त)... उदाहरणच घ्यायचे ठरले तर अनेक दाखले आहेत: रामायणातील 'राम' या भारतवर्षातील एका राजाने प्रजेमध्ये असे काही श्रद्धापूर्ण स्थान त्या काळी निर्माण केले, ज्यामुळे आज रामाला लोक 'देव' म्हणून पुजतात. राजा सिद्धार्थ (गौतम बुद्ध), महावीर, येशू ख्रिस्त, मुहम्मद पैगंबर, मिस्र संस्कृतीतील फेरोज् इत्यादी विभूंती सुद्धा माणसेच असावीत, पण केवळ त्यांनी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जो आदर त्या काळच्या लोकांमध्ये निर्माण केला, त्यामुळेच त्यांना मानणारे लोक आजही त्यांना देव म्हणून पुजतात. ताजी उदाहरणे घ्यावयाची ठरल्यास—छत्रपती शिवाजी महाराज, शिर्डीचे साई बाबा, शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ इत्यादी थोर विभूती आपणास ज्ञात असाव्यात.

» एकूणच सांगण्याचा उद्देश्य एवढाच—लोकांचा समूह ज्या गोष्टींना मान देतात, ज्यांबद्दलचा आदर बाळगतात, त्यांच्या एकूणच श्रद्धेपोटी कालानुरुप तत्सम गोष्टी देव अथवा देवासमान लोकांसमोर येतात. वर नमूद केल्याप्रमाणे लोकांमध्ये असलेली प्रेमाची व च्याबाबतील रस असण्याची भावनाच हे सर्व घडवून आणत असते. (संदर्भ: आजवरचा मानवजातीचा सांस्कृतिक व सामाजिक इतिहास)

» माझ्यासाठी देव (वा देवासमान) कोण आहे व असेल—

 • पुष्कळ लोक व माझा धर्म ज्यांना 'देव' म्हणवतो, असे! पण माझी केवळ श्रद्धा आहे. मी आस्तिक-नास्तिक मुळात ५०-५०% आहे. राष्ट्रसंत गाडगेमहाराजांच्याप्रमाणे मीसुद्धा देव दगडात कधीच पुजला नाही, तरीही काहीवेळा मंदीरांत वा तत्सम प्रार्थनांस्थळी दर्शनाने निराळाच विलक्षण असा भावनिक आनंद मला लाभलाय, हे मी मान्य करतो.
 • निसर्ग व संपूर्ण युनिवर्स-मल्टिवर्स व त्यात घडणार्‍या सर्व विलक्षण अशा चमत्कारिक घटना
 • मी ज्या मुलीवर सर्वांत अधिक प्रेम करतो, जीच्याबाबत मी दिवास्वप्ने सजवतो, अशी सौंदर्यवती ललना
 • ज्न्मदाते आई-वडील, आवडते शिक्षक शिक्षक
 • माझे आदर्श—लेखक, कवी, विचारवंत, वैज्ञानिक, शास्त्रविषारद, नेते इत्यादी
 • माझ्या आवडीच्या वास्तू व माझे छंद इत्यादी
 • इत्यादी इत्यादी

» इतरांसाठी देव वा च्यासमान कोण किंवा काय असू शकते—

 • वरील सर्व गोष्टी किंवा त्यांतील एखादी गोष्ट
 • किंवा एखादी व्यक्ती
 • किंवा अॅडॉल्फ हिटलर किंवा मोहन गांधी
 • किंवा एखादा विषय
 • किंवा एखादा वृक्ष वा प्राणी इत्यादी...

» देवाची, श्रद्धेची व्याख्या करण्याचा माझा हा खोडसाळ पण प्रामाणिक प्रयत्न!

» अंधश्रद्धा म्हणजे ...? आता हे ... तुम्हालाही ठाऊक असणारच! प्रत्येक गोष्टीबाबत श्रद्धेबरोबरच अंधश्रद्धासुद्धा बिलगलेली असतेच, एखाद्या नाण्याप्रमाणे! चुकीच्या वा केवळ दिशाभूल करणार्‍या संकल्पना, समजुती, इत्यादी म्हणजेच अंधश्रद्धा असावी. अंधश्रद्धेची व्याख्या इथेच संपत नाही. विज्ञानातही अंधश्रद्धा बाळगणारे काहीजण असतातच... जुन्या प्रवृत्तींना सोडून द्यायला त्यांना जमतच नाही, एखाद्या बांडगूळाप्रमाणे ते त्याच जुन्या संकल्पनांचा आधार घेऊन नवीन गोष्टींबद्दल संशोधनाचे व्यर्थ कार्यप्रयोजन चालू ठेवतात. गॅलेलिओ-कोपर्निकस आदींना त्या काळी सुद्धा अशाच काहीजणांना सामोरे जावे लागले. असो...

ठीक

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रस्तुत विषय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज वाटते.

कारण:

» प्रत्येकाला (खासकरुन मानवाला) एखाद्या गोष्टीत अतिशय रस असतो वा ती गोष्ट त्याला अतिशय प्रिय असते.

हा युक्तिवाद येथे कोणत्याही विषयाविषयी करता येतो. येथे संस्कृतप्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत, ज्योतिषप्रेमी आहेत, होमिओपॅथीप्रेमी आहेत, शुद्धलेखनप्रेमी आहेत.

लोकांचा समूह ज्या गोष्टींना मान देतात, ज्यांबद्दलचा आदर बाळगतात, त्यांच्या एकूणच श्रद्धेपोटी कालानुरुप तत्सम गोष्टी देव अथवा देवासमान लोकांसमोर येतात. वर नमूद केल्याप्रमाणे लोकांमध्ये असलेली प्रेमाची व च्याबाबतील रस असण्याची भावनाच हे सर्व घडवून आणत असते.

प्रेम, रस, आदर, भय, या भावना व्यक्तींविषयीही असू शकतात. काही व्यक्तींना, कालांतराने देव बनविले जाते हे निरीक्षण मला मान्य आहे. परंतु, तो भावनिक निर्णय आहे, त्यात देव या संकल्पनेची वैज्ञानिक स्वीकृती नाही.

» माझ्यासाठी देव (वा देवासमान) कोण आहे व असेल—

» इतरांसाठी देव वा च्यासमान कोण किंवा काय असू शकते—

या उदहरणांतून व्याख्या मिळत नाही. "जिच्याप्रति अत्यंत प्रेम, रस, आदर, भय, या भावना आहेत अशी वस्तू/व्यक्ती/संकल्पना" इतकेच समजते.

प्रत्येक गोष्टीबाबत श्रद्धेबरोबरच अंधश्रद्धासुद्धा बिलगलेली असतेच, एखाद्या नाण्याप्रमाणे!

श्रद्धा ही काहीतरी वांछनीय संकल्पना आहे असे दिसते पण तुम्ही तिची काय व्याख्या करता?

आणखी काही बाबी-

प्रेम, रस, आदर, भय, या भावना व्यक्तींविषयीही असू शकतात. काही व्यक्तींना, कालांतराने देव बनविले जाते हे निरीक्षण मला मान्य आहे. परंतु, तो भावनिक निर्णय आहे, त्यात देव या संकल्पनेची वैज्ञानिक स्वीकृती नाही.

मान्य... मीसुद्धा वैज्ञानिक प्रवृत्ती बाळगाणारा व च्यावर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विश्वास ठेवणारा पृथ्वीवरील एक तुमच्यासारखाच मणुष्य-प्राणी आहे. (मुळात हे उदाहरण—माझी विज्ञानावर श्रद्धा आहे, असे दर्शवते.) कालांतराने काही लोकांना देव बनवले जाते असे आजवरच्या इतिहासातून स्पष्ट दिसते, हे मी आधीदेखील सांगीतले आहे. याचे कारण—समाजाच्या विशिष्ट वर्गाचे वा संपूर्ण समाजाचे त्या "देव" व्यक्तीबद्दल असलेले—प्रेम, आदर, भय, आपुलकी इत्यादी गोष्टी... आपण म्हणता, त्याप्रमाणे तो लोकांचा भावनिक निर्णय असतो. लोकांची ही भावनाच मुळी त्या विशिष्ट (देवतुल्य) व्यक्तीवरील (व्यक्तीपेक्षा गोष्ट म्हणणे येथे पूरक ठरेल) श्रद्धा असते. श्रद्धेबद्दल आणखी मुद्देसूद बोलावयाचे झाल्यास—

 • श्रद्धा म्हणजे विशिष्ट गोष्टीबद्दल मनातून (involuntary) वाटणारा विश्वास, प्रेम, जिव्हाळा इत्यादींची भावना
 • श्रद्धा कालसापेक्ष, धर्मसापेक्ष, जातिसापेक्ष, समाजसापेक्ष, स्थानसापेक्ष, कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते
 • - उदाहरणार्थ: एखाद्या विषयाचा मी खूप अभ्यास केलेला आहे. उद्या माझा त्याच विषयावरील पेपर आहे. माझी सोसायटीत असलेल्या मंदीरातील गणपतीवर माझा भावनिक विश्वास आहे. मी त्या गणपतीचे दर्शन घेऊन आलो. ही झाली माझी श्रद्धा! (व्यक्तिसापेक्ष!) तुम्ही माझ्या याच श्रद्धेला—अंधश्रद्धा म्हणाल!

✎ प्रसंगी वर विवंचलेल्या सापेक्षतांमुळे श्रद्धा ही अंधश्रद्धासुद्धा ठरू शकते.

पण येथे अंधश्रद्धा मी कशाला म्हणेन:
» पेपर बरा जाण्यासाठी गणपतीला नारळ फोडवे लागते
» विशिष्ट रंगाचे कपडे घातल्याने पेपर चांगला जातो
» गणपतीची रोज आरती व पुजा-पाठ केल्याने परिक्षेत अपेक्षित यश पदरी पडते

विज्ञान ज्या गोष्टींना मान्यता देत नाही, ती गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा वा भ्रम—हे मला तरी पटत नाही. जरी माझी विज्ञानावर श्रद्धा असली तरी मी हे वाक्य प्रतिपादले आहे. कारण—एक उदाहरणच घेऊया: एखाद्या कवितेत स्वर्ग, नरक, इत्यादी बाबींबाबत सखोल विवरण/वर्णन तपशीलवार दिले आहे. त्यात कवीच्या मनातील भाव दिसून येतात. समजा, त्या कवीची कविता अंधश्रद्धेवर आधारित आहे कि नाही, हे तपासण्यासाठी एक १० विचारवंतांची समिती नेमलेली आहे, जे वैज्ञानिकदेखील आहेत. त्या १० जणांतील २ लोकांनी स्वर्ग, नरक इत्यादी बाबींना काहीही वैज्ञानिक महत्व नसल्याने ती कविता अंधश्रद्धेवर आधारित असल्याचे जाहीर केले. येथे त्यांनी त्यांचा निर्णय नोंदवतांना काव्यशास्त्राचा व कवीच्या मनाचा कसलाही विचार केला नाही व त्याबाबत दूर्लक्ष केले. येथे त्यांची विज्ञानावरील अतूट श्रद्धा जरी प्रत्ययास आली असली तरी त्यांना विज्ञान सोडून इतर गोष्टींत फारसा रस नसल्याचे दिसते. म्हणजेच त्यांचा हा निर्णय व्यक्तिसापेक्ष, शास्त्रसापेक्ष आहे. इतर ८ लोक विज्ञानाला तर मानतातच पण त्यांना कवीच्या कवितेत विशेष रस निर्माण झाला. जरी स्वर्ग, नरक इत्यादींना विज्ञान मान्यता देत नसले तरी शेवटी माणसाच्या मनात एखाद्या गोष्टीबाबत कुतूहल निर्माण होणे, त्याबद्दल रस निर्माण होणे व अंततः विश्वास निर्माण होणे—इत्यादींंमुळेच तर भाषाशास्त्र, विज्ञान, गणित, काव्यशास्त्र इत्यादी जन्मास आले... सुमारे ४०० वर्षांपूर्वीअगोदरपर्यंत अॅस्ट्रोलॉजी हेच शास्त्र होते, पण नंतर याच शास्त्रापासून अॅस्ट्रोनॉमी शाखेची व्युत्पत्ती झाली, व ते अॅस्ट्रोलॉजी पेक्षा अगदी निराळ्या संकल्पनांवर (निश्चितच, वैज्ञानिक!) आधारित शास्त्र म्हणून आज नावारूपास आलेले आहे. त्या इतर ८ जणांनी त्या कवितेत काहीच असबंध वा अंधश्रद्धेवर आधारित नसल्याचे जाहीर केले. २ विरुद्ध ८ मते असा निकाल हाती आल्याने—ती कविता स्वर्ग, नरक इत्यादी बाबींनी युक्त असुनही अंधश्राद्धिक नाही!

» डार्विनने उत्क्रांतीवादाची संकल्पना कशाच्या आधारे मांडली, ते कळू शकेल काय? माणूस हा जर मर्कट-जातीय प्राणी आहे, तर त्याचीच वाढ व विकास पृथ्वीतलावर इतर कुठल्याही जीव-जातीपेक्षा सर्वांत जलद व झपाट्याने झाला, तथापि, त्याचे जात-निकटवर्ती मर्कट बंधू आजही जनावरेच आहेत, त्यांचा विकास का खुंटला? डार्विनने याबाबत काही सांगितले आहे काय? केवळ बरगड्याची वा नाकाची, हनुवटीची हाडे मिळाली म्हणजे डायनॉसॉरसदृश्य अवाढव्य जीव पूर्वी पृथ्वीतलावर वावरत होती, हे मानणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नाही काय? आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार विश्व हे स्थिर आहे, पण नुकतेच अशी निरिक्षणे आढळली आहेत की, विश्व प्रसरण पावत आहे—त्यामुळे आता विश्व स्थिर आहे व विश्व प्रसरण पावत आहे या गोष्टी एकमेकांना परस्पर विरोधी असल्याने आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद मानणे म्हणजे यापुढे अंधश्रद्धा म्हणवली जाणार काय? पायची (π) किंमत=[२२/७] एवढीच का, ती तेवढीच मानणे म्हणजे अंधश्रद्धा नाही काय? जर पाय (π) हा एक वैश्विक सिद्धांत आहे तर, त्याची किंमत १ पूर्णांक ३४ का असू नये व तीच यापुढे का वापरली जाऊ नये? सुर्यामध्ये हेलिअम व हायड्रोजन ही मुलद्रव्ये(वायू) असतात, याचे पुरावे काय, कारण कोणी सुर्याच्या आतमध्ये जाऊन आलेलं मी आजवर ऐकलेलंसुद्धा नाहीये? म्हणजे तो निव्वळ लोकांची दिशाभूल करण्याचा जाणूनबूजुन केलेला फसवणूकीचा प्रयत्न असायला हवा ना? डार्क मॅटरला मानणारे अंधश्रद्धाळू आहेत, हे मी सांगतो, कारण ताज्या संशोधनांतील निरिक्षणांनुसार विश्व प्रसरण पावत आहे, असे समोर आले आहे, डार्क मॅटर आहे काय, त्याचे पुरावे काय? अशा अनेक गोष्टी व प्रश्न आहेत.

» पूर्वी हिंदू धर्मामध्ये, एखाद्या विवाहीत स्त्रीचा पती वारला की तीला सती करुन तीचे मुंडन करण्याची प्रथा होती, हा त्याकाळी समाजाच्या बहुतेक-वर्गांत श्रद्धेचा विषय मानला जायचा. पण आता त्याच सतीप्रथेला अंधश्रद्धा म्हणवले जाते.

» देव म्हणजे परलोकवासी अथवा परग्रहवासी वा स्वर्गवासी इत्यादी गोष्टी आपल्या नेहमी कानांवर पडतात. मी व तुम्ही या गोष्टीला मान्य करणार नाहीत, म्हणजे आपण याला अंधश्रद्धा म्हणवतो आहोत. पण एरिक व्हॉन डॅनिकेन या माणसाने हे परग्रहवासी म्हणजे देव आहेत का, याबद्दल संशोधन करण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे, आपल्यापैकी कित्येकांना त्यांच्याबद्दल माहिती असेलच. त्यांचे 'कॅरिओट्स ऑफ गॉड्स?' (देवांची विमाने?) हे पुस्तक मी संपूर्णतः वाचलेले आहे. याबद्दल आपण तपशीलवार व सर्व संदर्भ न्याहाळून व अभ्यासून बघणे मला गरजेचे वाटते.

श्रद्धा ही काहीतरी वांछनीय संकल्पना आहे असे दिसते पण तुम्ही तिची काय व्याख्या करता?

नाही, श्रद्धा ही वांछनीय (desirable) मुळीच नाही. मी वर सांगीतल्याप्रमाणे श्रद्धा ही अनैच्छिक (involuntary) बाब आहे. ती जन्मजात सोबत येत नाही. ती एखाद्या व्यक्तिबाबत त्याच्या शारिरिक व मानसिक व बौद्धिक वाढीसोबत निर्माण होत असते. श्रद्धा ही एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे कललेली असते (वा असू शकते). एखाद्या गोष्टीबद्दल अनैच्छिकरीत्या उत्पन्न होणारा व कालानुरुप वृद्धिंगत होत जाणारा विश्वास, रस, आदर, इत्यादी भावना म्हणजे त्या गोष्टीवरील श्रद्धा होय.

—श्रद्धेची तसेच अंधश्रद्धेची भावपूर्ण व व्यावहारिक व्याख्या करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न!

एरिक व्हॅन डॅनिकेन

देव म्हणजे परलोकवासी अथवा परग्रहवासी वा स्वर्गवासी इत्यादी गोष्टी आपल्या नेहमी कानांवर पडतात. मी व तुम्ही या गोष्टीला मान्य करणार नाहीत, म्हणजे आपण याला अंधश्रद्धा म्हणवतो आहोत. पण एरिक व्हॉन डॅनिकेन या माणसाने हे परग्रहवासी म्हणजे देव आहेत का, याबद्दल संशोधन करण्यात आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे, आपल्यापैकी कित्येकांना त्यांच्याबद्दल माहिती असेलच. त्यांचे 'कॅरिओट्स ऑफ गॉड्स?' (देवांची विमाने?) हे पुस्तक मी संपूर्णतः वाचलेले आहे. याबद्दल आपण तपशीलवार व सर्व संदर्भ न्याहाळून व अभ्यासून बघणे मला गरजेचे वाटते.

अनेक तज्ज्ञांनी संदर्भ तपासून पाहिलेले आहेत. काही माहिती सहज मिळणारी येथे बघा.

माझ्यामते डॅनिकेन हे पु. ना. ओकांचे परकीय अवतार आहेत.

एरिक व्हॅन डॅनिकेन आणि त्यांचे प्रसिद्ध (बंडल) पुस्तक चॅरिएट्स ऑफ गॉड यांच्याविरुद्ध गेली ५ वर्षे मी दुवे देऊन थकले आहे. आता ते दुवे कुठे दिले हे शोधायचाही कंटाळा येतो पण एवढेच सांगते की निदान हिस्टरी चॅनेलवर तरी या माणसाला फ्रॉड म्हणून ओळखतात. मी त्यांच्या संशोधनाला तपासून कचर्‍याची टोपली दाखवणारे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. नेटावर शोधल्यास संदर्भ मिळतीलच.

बाकी चालू द्या.

विषयांतर, पण तत्क्षणी गरजेचे!

अनेक तज्ज्ञांनी संदर्भ तपासून पाहिलेले आहेत. काही माहिती सहज मिळणारी येथे बघा.

अतिमानवीय (extraterrestrial) जीवसृष्टीवर अथवा जीवांवर तुम्ही विश्वास ठेवता काय? माझे सोडा, मी शेरलॉक होम्सच्या साहसकथा खूपदा ऐकल्या आहेत, त्यांतून मला "ज्या गोष्टीबद्दल आपण टाळाटाळ करत असतो वा तीला क्षुद्र वा निकृष्ट म्हणून हिणावून तीच्याबद्दल कधीच विचार करीत नाही, मुळात कधी-कधी त्याच गोष्टीमध्ये आपल्या एकूणच प्रश्नाच्या उत्तराचे सार दडलेले असू शकते!" या संकल्पनेचा प्रत्यय नेहमी येतो. तुम्ही म्हणाल, शेरलॉक होम्स हे तर एक पुस्तकी पात्र, ज्याला कधीच अस्तित्व नव्हते. येथेच तर अडतेय ना! तुम्ही या आणि अशाच खूप संकुचित धारणा अंधश्राद्धिकरित्या बाळगता. मी वरील हिरव्या रंगाने दर्शवलेल्या संकल्पनेचा पुरस्कर्ता आहे, कारण मला स्वतः त्या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक जीवनात अनेकदा प्रत्यय आलाय, जसे की मला एक पुस्तक सापडत नाहीये, मी नेहमी ठेवत असतो वा मला अशी आशा आहे की जिथे-कुठे ते सापडेल, तेथेही मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही व्यर्थ! शेवटी, मी वरील संकल्पनेचा आसरा घेतला, व असे ठिकाण स्मरण केले—जेथे मला सर्व अशा फोल ठरतील—असे ठिकाण! आश्चर्य काय, मला त्याच ठिकाणी ते पुस्तक सापडते देखील! असा केवळ एक नाही तर आजवर बरेचदा मला ह्या गोष्टीची प्रचिती आलीय. योगायोग साधारणतः एकदा, दोनदा, तीनदा आणि फार तर फार चारदा घडून येईल, पण अनेकदा अगदी तसेच घडून येणे म्हणजे तुम्हाला न पटणारे असेल किंवा अशक्य वाटत असेल, म्हणजे ती संकल्पना खोटी वा बिनबुडाची आहे, असे तुम्ही वा विज्ञान म्हणू शकते काय? जर असे असते, तर शेरलॉक होम्स हे काल्पनिक पात्र एवढे जगविख्यात कधीच झाले नसते, नाही?

वरील विवेचनात मला एवढेच अभिप्रेत आहे की, जर तुम्ही सध्या—जरी विज्ञान त्या-त्या गोष्टीबद्दल काहीही बोलण्यास वा भाष्य करण्यास असमर्थ असेल किंवा ती-ती गोष्ट असमर्थनीय किंवा अग्राह्य ठरवत असेल—तरीदेखील त्या-त्या गोष्टीबद्दल विचार करु शकता वा तीला कसलाही शास्त्रीय आधार वा पुरावा नसतांना देखील मान्य करुन ती गोष्ट अंगिकारू शकता.

आत्ताशी कुठे आपल्या पृथ्वीतलावर मानवी संस्कृतीमध्ये विज्ञानाचे रोपटे वाढण्यास सुरुवात झाली आहे. कुठलेही रोप सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीत देखील वाढू शकते, हे तुमचे जर तत्सम बाबतीमध्ये निरिक्षण असेल, तर तुम्ही कबूल कराल. पण नंतरच्या काळात त्याला अनुकूल व योग्य प्रमाणातील भौतिक, रासायनिक गोष्टींची आवश्यकता असते, ज्यामुळेच त्या रोपट्याचे नंतर झुडूप, नंतर झाड, व नंतर प्रचंड वृक्षामध्ये रुपांतरण होते. हीच बाब पृथ्वीतलावरील आपल्या मानवी संस्कृतीमध्ये वाढत असलेल्या विज्ञानाच्या रोपट्याच्या बाबतील गृहीत धरली तर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? याबाबतीत खोलवर जावून विचारमंथन करण्यास भरपूर वाव आहे!

आजचे विज्ञान पृथ्वीबाहेरही अतिप्रगत वा अतिमानवीय संस्कृती आहे किंवा असू शकते की नाही, याबद्दल काहीही भाष्य करण्यास तरी असमर्थ असलेले प्रकर्षाने जाणवते. केवळ चंद्र, मंगळ वा शनीचा उपग्रह कसिनी एवढेच ग्रह वा उपग्रह आपल्या युनिवर्स वा मल्टिवर्स मध्ये नाहीयेत, हो की नाही, मग तत्सम ठिकाणी अगदीच तुच्छ समजले तरी हरकत नाही, एवढे तुटपुंजे संशोधन करुन विज्ञान काहीच युक्तिवाद करु शकणार नाही वा तसे करुन कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष काढणे अगदीच लज्जास्पद ठरेल!

आता, जरा वेगळ्या पद्धतीने व मुळात तुम्ही ज्या संकल्पना अंगी बाळगून चालला आहात, त्या थोड्या वेळ बाजूला ठेऊन विचार करा. अतिप्रगत किंवा अतिमानवीय प्रजाती युनिवर्स किंवा मल्टिवर्समध्ये कुठेतरी नांदत आहेत, असे धरून चला.वॉर्म होल किंवा आइनस्टाइन-रोजनचा पुल इत्यादींसारख्या सद्यस्थितीत आपल्याला आकलनीय वा अनाकलनीय संकल्पनांचा वापर करुन त्या प्रजातीचे जीव जर अंतराळात अगदी कमी काळात लांब पल्ल्याचा प्रवास करीत असतील, असेही धरुन चला. मग ते जीव पृथ्वीवर आले नसतील, हे कशावरुन? आता ते आले नसतील, हे तुम्ही पुराव्यानिशी कसे सिद्ध करुन दाखवाल? हिंदू धर्माच्या महाकाव्यांमध्ये सांगीतलेली देवांची हवेत उडणारी विमाने आपण ऐकून असाल. विमानाचा शोध राइट बंधूंनी केव्हा लावला हो??? :P समजा, ते अतिप्रगत जीव (एलिअन्स) पृथ्वीवर वास्तव्य करण्याच्या हेतूने पृथ्वीवर उतरले. काही चांगल्या उद्देशाने व काहींची मती व हेतू वाईट असतील. चांगल्या एलिअन्सनी पृथ्वीवर त्याकाळी फारसी प्रगती न झालेल्या माणसासाठी काही चांगली कामे केली असावीत. काही एलिअन्स अगदी तेजस्वी वर्णाचे असावेत तर काही विचित्र शरीरयष्टी व एकूणच राक्षसी जातीचे व पृथ्वीवरील माणसांचे वाईट करणारे असावेत. त्या काळी भारतवर्षात त्या-त्या एलिअन्सना अनुक्रमे तेजस्वी देव व असुरी व वाईट वृत्ती असणारे राक्षसी-दैत्य असे संबोधले जात असावे. आता असे का, तर याचे कारण मी वरील दोन मुख्य प्रतिसांदामध्ये स्पष्टीकरणासहित दिले आहे, कृपया ते प्रथम योग्यरीत्या वाचावे. यांची अतिप्रगत व त्या काळच्या माणसांच्या बौद्धिक जाणतेच्या कक्षेच्या बाहेरची (अनाकलनीय), अशी अंतराळयाने म्हणजेच महाकाव्यांतील विमाने असावीत. त्या देवांकडे व असुरांकडे असीम शक्ती होत्या, असे ऐकवले जाते. जर ते एलिअन्स अतिप्रगत होते, तर अणुऊर्जा व सध्या आपल्याला माहिती नसलेल्या इतर ऊर्जासंसाधनांचा ते वापर करीत असावेत. दोन्ही गटांमध्ये भांडणे झाली की त्याचा योग्य अर्थ न लावू शकल्यामुळे तरी त्यांच्याकडे दैवी व असुरी शक्तींना तेल-मीठ लावून महाकाव्यांत मांडलेले आढळते, आपल्याला त्याच्याशी काय घेणं-देणं म्हणा तसं, नाही? :P जगातल्या काही आश्चर्यकारक गोष्टी या एलिअन्सनी बनवून दिल्या, ज्याचे संदर्भ जगभरातील विविध प्रांतांतून व संस्कृतींतून पाहायला मिळते, उदा. इजिप्तमधील प्रचंड पिरॅमिड्स! हे तर केवळ एक उदाहरण आहे, अशी शेकडो उदाहरणे सध्या उपलब्ध आहेत, ज्यांची निर्मीती त्याकाळच्या मानवाकडून करणे शक्य तर नव्हतेच शिवाय जरी ते केले असते तरी ते अगदी असह्य, वेळखाऊ व एकूणच व्यर्थ ठरले असते. तुम्ही जर अशा काही गोष्टींबद्दल स्वतःहून अभ्यासपूर्वक व जिज्ञासू प्रवृत्तीने पाहण्याचा प्रयत्न कराल, तर निश्चितच हे त्याकाळी माणसाच्या हातचे नाहीच, असे तुम्ही लगेच म्हणाल, जरी याबाबतीत जागतिक स्तरावर वादंग असला तरी! प्राचिन संदर्भ असे मिळतात की या वास्तू अत्यंत दैवी जातीच्या माणसांनी वा देवांनीच तयार केल्या आहेत, आता हे देव एलिअन्स नसतील, हे कशावरून?

एरिक व्हॉन डॅनिकेनने हेच तर सांगितले आहे त्याच्या २० पेक्षा जास्त जागतिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या व सुमारे ६० दशलक्ष प्रतींची विश्वविक्रमी विक्री झालेल्या २६ पुस्तकांमध्ये! हा माणूस स्वतः एक आर्किओलॉजिस्ट असून त्याने आतापर्यंत हजारो मैलांचा कड्या-कपार्‍यांतून, नदी-खोर्‍यांतून, जंगल-वाळवंटांतून, पावसा-पाण्यातून पायी प्रवास करीत तत्सम गोष्टींबद्दल स्वतः प्रत्यक्षात त्या-त्या गोष्टीचे निरिक्षण करुन संशोधन केले आहे. त्यांची पुस्तके म्हणजे काय निव्वळ गोष्टी, स्वप्नकथा वा वेळ मारुन न्यावी वा टाइमपास म्हणून लिहिलेले काही-बाही मुळीच नाही. विश्चास वाटावा व प्रत्येक पैलूचा खोलवर विचार करायला लावतील, असे त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष आहेत. आपण जे काय त्यांच्याबद्दलच्या फ्रॉड वा कॉन्ट्रॉव्हर्सिअल बाबींचे संदर्भ दिले आहेत, त्याचा व त्यांच्या संशोधनाचा वा पुस्तकाचा काहीच संबंध दिसून येत नाही वा जुळवता देखील येत नाही. उलट त्यांच्या पुस्तकांची जगभर विश्वविक्रमी विक्री, प्रसिद्धी व त्यांच्या Archaeology, Astronautics and SETI Research Association (AAS RA) या संस्थेला मिळणारी देणगी म्हणजेच त्यांनी केलेला 'फ्रॉड' असे त्यांच्या विरोधकांनी बिनबुडाची कारणे देत पुढे केले असावे, असे मला वाटते. आपण याबाबतीत अधिक अभ्यास करण्याची मला नड भासते. माझे काही चुकले असेल, तर तसे उघड कळवावे, कारण मी सध्या विद्यार्थीदशेत आहे, अभियांत्रिकीचे तीसर्‍या वर्षात पदवी शिक्षण घेतो आहे—माझ्याकडून चूक होऊ शकते किंवा मी चुकीची संकल्पना बाळगतो आहे किंवा माझे मत-परिवर्तन झाले असावे वा माझा कल चुकीच्या गोष्टींकडे झुकलेला असावा, काहीही होऊ शकते. एरिक व्हॉन डॅनिकेन प्रमाणेच आयुकाचे डॉ. जयंत नारळीकर यांच्या "अभयारण्य" या कादंबरीत आपल्याला काय जाणवते?

माझी विज्ञानावर अतूट श्रद्धा आहे, हे सांगणेदेखील गरजेचे वाटते.

या प्रतिसादाची...

या प्रतिसादाची वेगळी चर्चा सुरु करावी. येथे अधिक विषयांतर करणे योग्य नाही.

हा माणूस स्वतः एक आर्किओलॉजिस्ट असून त्याने आतापर्यंत हजारो मैलांचा कड्या-कपार्‍यांतून,

कठिण आहे. सदर मनुष्याने आर्किऑलॉजीची पदवी घेतलेली मी तरी वाचलेले/ ऐकलेले नाही.

बाकी, रिटेच्या चर्चेत वरचा प्रतिसाद वाचून अंमळ आनंद झाला. ;-) मी केव्हापासून त्यांना सांगते आहे की आपले पूर्वज महान होते. विमाने वगैरे उडवत होते, ते मानतच नाहीत.

फॉक्स मिडीया समुहाचे हिस्टरी चॅनेल मीसुद्धा पाहतो. त्यांच्याकडील सुमारे ७०% डॉक्युमेंट्रीज् या बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कंपनी)ने बनवलेल्या असतात व च्यांकडून ते मागवून प्रदर्शित करतात, नाही? मागे तर, हिटलर होमो होता (इफा ब्राऊन कोण, काय व कशाला होती मग?), त्याचे "माइन काम्फ" पुस्तक त्याने काहीच्या-काही लिहिले आहे, असे एकदम "बकवास" व फालतू दावे या वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आले, त्यामुळे माझा या चॅनेलवरील विश्वासच उडालाय! यद्यपि, त्यांच्याकडे बर्‍याच दूर्मिळ व ऐतिहासिक ध्वनिफिती, चित्रफिती, छायाचित्रे असल्याने न राहावून मी त्यांच्या डॉक्युमेंट्रीज् मनाला जरी पटत नसल्या तरी पाहतो हल्ली!

माझी विज्ञानावर अतूट श्रद्धा आहे, हे सांगणेदेखील गरजेचे वाटते.

संपादकांना विनंती

विशाल.तेलंग्रे यांनी या धाग्याच्या या प्रतिसादात अनेक मुद्दे मांडले आहेत परंतु त्यांत देवाची व्याख्या नाही. त्या प्रतिसादाचा आकारही नव्या चर्चाप्रस्तावास पुरेसा (!) आहे. कृपया, त्या प्रतिसादातून विशाल.तेलंग्रे यांचा वेगळा धागा सुरू करा आणि त्याखालील सारे प्रतिसादही तेथे हलवा.

:)

माझे काही चुकले असेल, तर तसे उघड कळवावे, कारण मी सध्या विद्यार्थीदशेत आहे, अभियांत्रिकीचे तीसर्‍या वर्षात पदवी शिक्षण घेतो आहे—माझ्याकडून चूक होऊ शकते किंवा मी चुकीची संकल्पना बाळगतो आहे किंवा माझे मत-परिवर्तन झाले असावे वा माझा कल चुकीच्या गोष्टींकडे झुकलेला असावा, काहीही होऊ शकते.

विद्यार्थी नसलात तरी चुका कळवल्या जातात आणि जाव्या :)

मास्तर

हे हे हे. तसे सगळेच विद्यार्थी..पण इथे सगळेच मास्तर आहेत. :प
"आपण आपली बाजू सोडू नये, आपण विद्यार्थी असो वा महानगरपालिके मध्ये उंदीर मारण्याच्या विभागात काम करत असो, ठोकत राहावे"

अनाकलनीय गोष्टी

प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन याने पुंज सिद्धांतावरच्या आपल्या लेखनात एक पिस्तूल व त्याच्या समोर दोन असलेल्या फटी यासंबंधीच्या एका काल्पनिक प्रयोगाचे छान वर्णन केलेले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या पिस्तूलातून सतत गोळ्या झाडल्या असताना त्या गोळ्या कोणत्या तरी एका फटीतून जाऊन समोरच्या लक्षावर आदळल्या पाहिजेत. म्हणजेच पिस्तूलाची गोळीने कसा व कोठून प्रवास केला हे आपल्याला अचूकपणे सांगता येते. परंतू या पिस्तुलाच्या ऐवजी एक प्रकाशाचा स्त्रोत जर वापरला तर मात्र एक अनाकलनीय निरिक्षण करता येते. या स्त्रोतातून निघालेले प्रकाशबिंदू दोन्ही फटीतून एकदम प्रवास करत आहेत असे आपल्याला त्या फटींच्या समोर ठेवलेल्या पडद्यावरील चित्र बघितल्यावर लक्षात येते. सरळ विचार केला तर ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटत असल्याने आपले मूलभूत समज व सिद्धांत चुकीचे असले पाहिजेत या निर्णयाला शास्त्रज्ञ आले. यावरून पुढे प्रकाश बिंदूंचे लहरी स्वरूप व पुंज सिद्धांत हे तयार करण्यात आले.
हे उदाहरण अशा साठी दिले की आपल्या आजूबाजूला आपल्याला न समजणार्‍या अनेक प्रक्रिया निसर्गाकरवी घडवल्या जातात. याची अगदी सोपी उदाहरणे म्हणजे अनेक प्रकारचे आघात व अपघात हो ऊन सुद्धा पृथ्वीवरील पर्यावरणाचे सर्व महत्वाचे पॅरॅमीटर गेली कित्येक खर्व किंवा दशखर्व वर्षे आहे तसेच राहिलेले आहेत.दुसरे एक रोचक उदाहरण म्हणजे ए न्ट्रॉपी ही संकल्पना. थर्मोडायनॅमिक्स चा दुसरा सिद्धांत आपल्याला सांगतो की कोणतीही प्रणाली पुरेसा काल गेल्यावर स्थिर स्थितीकडेच जाते. पृथ्वीवरील प्रणाली तसे करताना दिसत नाहीत. महा स्फोट हो ऊन विश्वाची निर्मिती झाल्याला इतका काल झाल्यावर सुद्धा विश्व स्थिर स्थितीकडे जात असल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यावरून एवढेच म्हणता येते की आपण मान्य केलेला थर्मोडायनॅमिक्स दुसरा सिद्धांत हा फार तर एक स्पेशल केस म्हणूनच मान्य करता ये ईल.
अनाकलनीय घटना किंवा प्रक्रिया यांचे अस्तित्व हे प्रत्यक्षात आपले अज्ञान आहे हे लक्षात घेतले की देव ही संकल्पना मानवाने का उचलून धरली हे लगेच लक्षात येते. आपल्याला समजत नाहीना? मग ते नक्की देवाने केले असले पाहिजे! या विचारसरणीमुळे जगातील सर्व अतर्क्य व अशक्य गोष्टींचा खुलासा करणे सहज शक्य होते. मूर्तीपूजक समाजात तर देवाची संकल्पना समोरच्या एका मूर्तीत किंवा दगडात केंद्रित झाली आहे असे समोरचा पूजक मानू लागतो. असे झाले की त्या मूर्तीला कपडे चढवणे, दागिने घालणे हे सोपस्कार करण्यातच आपल्याला अनाकलनीय अशा नैसर्गिक प्रक्रियेशी तो पूजक त्या मूर्तीचा संबंध जोडू शकतो.
थोडक्यात सांगायचे तर देवाची व्याख्या करताच येणार नाही. कारण आपल्याला न समजणार्‍या गोष्टींचा तो कर्ता आहे अशी समजूत करून घेऊन आपण आपले अज्ञान झाकण्याचा हा एक सोपा मार्ग अवलंबला आहे.
मला वैयक्तिक रित्या रिचर्ड फेनमन चा अप्रोच जास्त आवडतो. तो म्हणतो की आपल्याला न समजणार्‍या गोष्टी कोण करते? किंवा कशा होतात? हे आपल्याला सापडणे अशक्यप्राय दिसते. तेंव्हा त्यांच्या संबंधी विचार न करता ज्या अनाकलनीय गोष्टींमुळे हे जग निर्माण झाले आहे त्या जगातील सर्व घटकांचे गुणधर्म अभ्यासून त्या घटकांच्या अस्तित्वाच्या अदभूतते मधला आनंद अनुभवण्यात जास्त मजा आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अंशतः सहमत

देवाविषयीचे वर्णन मान्य आहे.
हेही मान्य.
--------
पृथ्वीचे वातावरण अनेकदा बदलले आहे. सर्व प्राणवायू आदिम सजीवांनी बनविला (आणि तो सहन न झाल्याने ते मेले/उत्क्रांतले).
--------
श्रॉडिंजरच्या 'वॉट इज लाइफ' या पुस्तकात दिले आहे की पृथ्वीवर पडणार्‍या सूर्यकिरणांमुळे एंट्रॉपी धुतली जाते. पृथ्वीने उत्सर्जित केलेल्या अवरक्त किरणांद्वारे ती बाहेर टाकली जाते.
विश्वाची एंट्रॉपी वाढत नाही असे का म्हणता ते समजले नाही.
If someone points out to you that your pet theory of the universe is in disagreement with Maxwell's equations — then so much the worse for Maxwell's equations. If it is found to be contradicted by observation — well, these experimentalists do bungle things sometimes. But if your theory is found to be against the second law of thermodynamics I can give you no hope; there is nothing for it but to collapse in deepest humiliation. - सर आर्थर एडिंग्टनक्ष्

विश्वाची ए न्ट्रॉपी

विश्वाची ए न्ट्रॉपी वाढते आहे किंवा नाही हे आपल्याला माहितच नाही. ती आपल्या दृष्टीने अनाकलनीयच आहे. परंतु नवीन तारे किंवा कृष्ण विवरे निर्माण होणे, ती नष्ट होणे हे चालूच आहे. या सर्व प्रक्रिया ए न्ट्रॉपी वाढत नसल्याचे द्योतक आहेत असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

देवाची संकल्पना आणि नास्तिकता

रिटे

तुम्ही वर दिलेल्या दुव्यामधील नास्तिक लोकांच्या मताशी मी सहमत होऊ शकत नाही. जोपर्यंत मानवाला या विश्वात घडणार्‍या सर्व प्रक्रियांचे संपूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत या अनाकलनीय अदभुताबद्दल योग्य ते कौतुक व आदर दाखवणे क्रमप्राप्त ठरते. फेनमन याला निसर्ग म्हणतो, पंढरपूरला जाणारा वारकरी विठोबा तर नमाज पढणारा अल्लाह. ज्ञानेश्वर माऊलींनी या अदभुताला चैतन्य असे मोठे समर्पक नाव दिले आहे.
परंतु ज्यावेळी या चैतन्याविषयी वाटणारे कौतुक व आदर दाखवणे संपते व त्या अदभुताने आपल्याला काहीतरी द्यावे, आपले ऐहलौकिक सुख वाढवावे अशी माणूस इच्छा करू लागतो तेंव्हा त्याचा भक्तीभाव संपुष्टात येतो असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

का ब्वॉ?

आधीच्या धाग्यात मूळ चर्चाप्रस्ताव सविस्तर आहे, तेथील पँथेईजमच तुम्ही सांगत आहात असे वाटते. कौतुक व आदर यांचे प्रयोजन काय? त्यात वैज्ञानिक काय आहे?
विठोबा आणि अल्लाह हे वैयक्तिक देव आहेत, पसायदान मागणारे डेईस्ट/पँथेईस्ट कसे?

अवांतर

फेनमन याला निसर्ग म्हणतो... परंतु ज्यावेळी या चैतन्याविषयी वाटणारे कौतुक व आदर दाखवणे संपते

इथे जुरासिक पार्क आठवला.. "The complete lack of humility before nature that's being displayed here astounds me"- Ian Malcolm

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

:)

माझे काही आवडते प्रसंग जुरासिक पार्क २ मध्ये आहेत: इंजेन कंपनीची हेलिकॉप्टरे खूप गाड्या उचलून आणतात आणि मग बरेच शिकारी एका मैदानात पाठलाग करून वेगवेगळ्या डायनॉसॉरना पकडतात.
ह्युमिलिटी का दाखवावी?

सहमत!

सर्व बाबींशी सहमत!

अप्रोच आवडला.

पिस्तुलातून, पिस्तुलाची, महत्त्वाचे, परंतु, निरीक्षण, अशा काही शब्दांच्या किरकोळ चुका सोडल्या तर रिचर्ड फेनमन चा अप्रोच मलाही आवडला.

[हीन दर्जाच्या लेखकांच्या व त्यांच्या लेखनाच्या बरोबरीने लेखन करणार्‍यांच्या शब्दपीठात आपले
आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.
]

-दिलीप बिरुटे

शुद्धलेखनाच्या चुका

माझ्या प्रतिसादातील शुद्धलेखनाच्या चुका दाखवल्याबद्दल धन्यवाद. पुढचा प्रतिसाद लिहिताना काळजी घेईन.
चन्द्रशेखर

:)

पिस्तुलातून, पिस्तुलाची, महत्त्वाचे, परंतु, निरीक्षण, अशा काही शब्दांच्या किरकोळ चुका सोडल्या तर रिचर्ड फेनमन चा अप्रोच मलाही आवडला.

चालायचेच. तसेही रिचर्डचे मराठी पहिल्यापासून कच्चेच. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

बहुमान्य देवाची व्याख्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
देव संकल्पनेविषयी विविध समज प्रचलित असले तरी बहुसंख्य लोकांत याविषयी काही समान विचार, समान भावना आहेत.आपण वाचतो, ऐकतो, पाहातो,अनुभवतो त्यावरून हे अनुमान निघते.बहुसंख्य लोकांच्या मनातील देवधारणे वरून त्याची व्याख्या केली तरच ती उपयुक्त ठरू शकेल.
....समजा एक हजार व्यक्तींचा यादृच्छिक (रँडम)समूह आहे. त्या सर्वांना समजेल अशा भाषांत विचारले:
"पुढील गोष्टी तुम्ही सत्य मानता काय?:--
१)या विश्वाची निर्मिती देवाने केली.
२) संपूर्ण विश्वावर देवाची सत्ता चालते.
३)विशिष्ट पद्धतीने देवाची उपासना केली तर माणसाला अमरत्व मिळते.
४)मनोभावे केलेली प्रार्थना, पूजा-अर्चा, नवस या प्रकारांनी देव प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करतो.
तर किमान आठशे जणांची चारही उत्तरे हो, हो,हो, हो अशी येतील.
..यावरून देवाची व्याख्या अशी होऊ शकते:
..

"जगनिर्माता,जगन्नियंता,प्रार्थना, पूजा-अर्चा,नवसादीनी प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करणारा,सश्रद्ध उपासकाला अमरत्व देणारा असा जो कोणी अलौकिक अस्तित्वात आहे असे मानले जाते तो देव होय."

!

चर्चा वाचुन मेन्दु मधे अमायनो ऍसिड उत्पादित झाले. आणि मला जागीच देव दिसले. त्या देवाला सादर प्रणाम :)

- टारझन

देवाची व्याख्या

क्रिडाविजिगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु च्या व्याख्याचे स्पष्टीकरण देतांना रिटे म्हणतात (संदर्भ : खरडचर्चा)
"देव शब्द दिवु धातु से बना है, जिसके क्रीडा (खेलना), विजिगीषा (जीतने की इच्छा), व्यवहार (आदान प्रदान), द्युति (प्रकाश), स्तुति (प्रशंसा), मोद (आनन्द) मद (अहंकार), स्वप्न (निद्रा), कान्ति (शोभा) और गति (१. ज्ञान २. गमन ३. प्राप्‍ति) आदि बारह अर्थ हैं। ये सभी अर्थ देव शब्द में निहित रहते हैं।"त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. पण अशा गुणांनी युक्त असलेला तो देव मानावा असे माझे मत आहे.

'देवाची व्याख्या' असा कोणी गुगल सर्च मारला तर त्याला अशीही एक व्याख्या सापडावी म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.

-दिलीप बिरुटे

गूगल ला देवाची ती व्याख्या झेपली नाही :)

ती व्याख्या आणि तिची उकल येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
--------
ती उकल मी गूगलूनच काढली. आधी पूर्ण व्याख्या गूगलली तर गूगल म्हणाले

"क्रिडाविजिगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु"... is too long a word. Try using a shorter word.

=))
मग संधीचा विग्रह करून शोधावे लागले.

विश्वास

अनेक लोक देवाची व्याख्या न करताच जगत असतात. बहुतांशांचा विश्वास देवाच्या अस्तित्वावर असण्यापेक्षा देवावरील विश्वासावर असतो. म्हणजेच अनेक लोक देव आहे का असे विचारले असता माहीत नाही असे म्हणु शकतील, पण तेच लोक देवावरच्या विश्वासावर विश्वास आहे का असे विचारता हो असे म्हणु शकतील.

बीलीफ ईन बीलीफ. डॅनिअल डेनेट यांचे 'ब्रेकींग द स्पेल'

आज कार्तिकी

आज कार्तिकी एकादशी. चातुर्मासाची झोप संपवून आज देव जागे झाले आहेत.
आता व्याख्यादिक प्रश्नांवर थोडा प्रकाश पडेल अशी आशा.

प्रमोद

अरे हो कि.

आता "काही" लोक कांदा खायला मोकळे.

एवढा उशीर?

आता "काही" लोक कांदा खायला मोकळे.

आम्ही तर भाऊबिजेच्या दिवशीच कांदे, लिंबं आणि भाज्यांच्या सलादावर ताव मारला होता. मस्त (-)साहार झाला होता. कार्तिकी एकादशीची वाट पाहत बसण्याचा संयम आमच्या अंगी नसतोच, सगळं काही पोटाची तृप्ती झाल्यानंतरच जागृत होतं! :P

उशीर?

अहो उशीर तुमच्यासाठी, 'आम्ही' वेळेवरच सगळ करतो.
अवांतर - हे सगळे 'विषय' आहेत असे 'त्यांचे' 'एक' मत आहे.

वाचता वाचता...

वाचता-वाचता या पुस्तकात,
[...]Newton wrote, "This most beautiful system of the Sun, Planets and Comets could only proceed from the counsel and dominion of an intelligent and powerful being, a God." To Newton, laws of Nature seemed like laws of God. [...]
असे निदर्शनास आले.

बरोबर

न्यूटनने असे म्हटले असेल यात काही संशय नाही.
पण या वाक्यावरूनच देवाची एक व्याख्या करणे शक्य व्हावे.

या वाक्यात देव हा एक प्लेसहोल्डर म्हणून आला आहे. म्हणजे देवाच्या कृपेने ही सूर्यमाला चालते हे एक वाक्य आहे. त्याबरोबरच न्यूटनच्याच नियमातून अजून एक गोष्ट न्यूटनने सांगितली आहे ती म्हणजे

F= G*M1*M2/ D^2 या समीकरणात भक्तांनी केलेल्या प्रार्थनेनुसार किंवा आगळिकीनुसार डी^२ ऐवजी डी ^ २.१ असे करण्याचे सामर्थ्य देवाकडे नाही.

असा देव असला काय आणि नसला काय !!!! त्याची व्याख्या केली काय आणि न केली काय !!!!

नितिन थत्ते

श्रेद्धेचा बाजार

श्रद्धेचा जेव्हा बाजार मांडला जातो तेव्हा खर पाहता जगात दुःख आणि कलह निर्माण होतात. राममंदिर हा असाच श्रद्धे चा बाजार आहे. देव आहे का नाही माहित नाही , पुरंतु त्याच्या नावाखाली आज मानवाच अस्तित्व नाकारल जाते. आपला देव आपल्यापाशी ही वृति लोप पावत आहे . देव ही संकल्पना अतिशय व्यक्तिगत आहे . त्या संकल्पनेला बाजारी रूप आणने म्हणजे आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या श्रद्धेचा उपयोग करण्यासारखे आहे. कालबाह्य झालेले ग्रंथ आपण उगाच कुरवाळत बसलोय त्यामुळे नवीन निर्मितीची आपली कुवत आपण घालवतोय. परंतु मला खत्री आहे नवीन पिढी ह्या थोतांडी काव्याला बळी पडणार नाही. २० वर्षानंतर ह्या ग्रंथा बद्दल आणि देवा बद्दल कोणी विचार करणार नाही. आणि मला वाटत तेव्हा मानव हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. ( देव हि संकल्पना केवळ हिंदूसाठी वापरलेली नाही ) आणि तेव्हाच अशी कावेबाज माणस त्याचा वापर करू शकणार नाहीत. बाबा साहेबांनी जे लिखाण केले ते हिंदुविरोधी आहे असा जो कांगावा केला जातो . परंतु जर विचार केला तर बाबा साहेबांनी हिंदु धर्मावर ते लिखाण करून उपकारच केले आहेत. ज्यांना गतकाळातील वैभवात रमायचे असेल त्यांनी खुशाल रमावे परंतु ज्याची इच्छा पुढे जायची आहे त्यांना रोखण्याचा करंटेपणा करू नये .
जर कोणी श्रद्धास्थानांचा वापर करून दुही माजवून द्वेष पसरवत असेल तर श्रद्धास्थानावर आघात हा होणारच आणि त्यानेच परिणाम साधला जाईल , परंतु हा आघात पाहिजे तितक्या जोरात होत नाही.

देवाची व्याख्या

भट आणि ब्राम्हणांनी ( सर्व धर्मातील ) स्वतःच्या पोट पाण्याच्या व्यवस्थेचे नाव धर्म आणि हि व्यवस्था आबादीत रहावी ह्यासाठी लोकांना दाबून ठेवण्यासाठी , भीती दाखवण्यासाठी तयार केलेला बागुलबुवा म्हणजे देव.

भट आणि ब्राम्हणांनी ...

काय हो, भट ब्राह्मण व्यवस्था तयार झाल्यावर आले का हे देव ?

आधी नव्हते का हे देव म्हणे ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

देवाचे अस्तित्व

देवाचे अस्तित्व हे माणसा वर अवलंबून आहे . मी देव मानत नाही तर तो नाही , तुम्ही तो मानता तर तो आहे. ज्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही त्याचा सबंध आपण देवाशी जोडतो. अकल्पित घडल्यास ते देवाच्या नवाने खपवतो पण विचार करत नाही त्यामागाच्या कारनाचा. भट ब्राम्हण व्यवस्था तयार होण्याआधी देव ( देव ही संकल्पना ) होते. पण मानुस आणि देव हयात दलाल नव्हते मलीदा खान्यासाठी.

^ वर