देवाची व्याख्या

आंतरजालावरील चर्चांमध्ये असे कधी कधी दिसते की चर्चेत सहभागी सदस्यांमध्ये चर्चाविषयातील मूलभूत संज्ञांच्या व्याख्यांविषयीच एकमत नसते. चर्चा फिसकटण्यामागे हे एक महत्वाचे आणि टाळता येण्याजोगे कारण असते असे मला वाटते. हेवेदावे, जुने हिशोब, इ. कारणे टाळता येणार नाहीत/टाळू नयेत असेही वाटते.
त्या धाग्यांमध्ये व्याख्येची चर्चा केल्यास मूळ विषय बाजूला पडतो आणि अनेकांना तिरपे तिरपे प्रतिसाद नकोसे वाटत असल्यामुळे किंवा प्रति-प्रतिसादांचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठीचा वेळ नसल्यामुळे चर्चा अर्धवट राहतात.

एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे. विष्णू, अल्ला, गॉड, ज्युपिटर, इ. विशेषनामेही चालतील. येथे अपेक्षित असे आहे की प्रत्येकाने

  1. वर्णन/व्याख्या सांगावी.
  2. ती व्याख्या समाजात अव्यक्तपणे वापरल्या जाणार्‍या अर्थांपैकी एखाद्या अर्थाशी सुसंगत आहे काय ते सांगावे.
  3. ती व्याख्यावस्तू तपासण्याजोगी आहे काय ते सांगावे.
    • जर संकल्पनेसाठी पुरावा सापडणे शक्य असेल तर किती सापडलेला आहे ते सांगावे.
  4. निष्कर्ष/टिपण्णी द्यावी. या संकल्पनेच्या इतर प्रचलित व्याख्यांविषयी काही महत्वाची टिपण्णी शक्य असल्यास करावी.

इतर काही संज्ञा महत्वाच्या वाटत असतील तर त्यांच्या व्याख्यांची चर्चा करण्यासाठीही हा धागा वापरता येईल.

मी सुरुवात करतो:

मी देत असलेली देवाची व्याख्या ही समाजात प्रचलित बहुतेक व्याख्यांतील समान भागाशी सुसंगत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.
देव या शब्दाची व्याख्या सांगण्याआधी मला विज्ञान, सजीवत्व आणि निर्णयस्वातंत्र्य/स्वेच्छा (फ्री विल) यांविषयी लिहावे लागेल.
परिस्थितीचे निरीक्षण करून 'क असेल तर ख असते' या प्रकारचे नियम शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान होय. त्यासाठी निरीक्षणे करून अभ्युपगम बनविले जातात. त्या अभ्युपगमाला खोटे ठरवू शकणारे प्रयोग जोवर फसतात तोवर त्याला सिद्धांत म्हटले जाते. हा सिद्धांत म्हणजे वस्तुस्थितीचे वर्णन करणारा नियम असतो. जेव्हा "'क'च्या सान्निध्यात कधीकधी 'ख' घडते आणि कधीकधी घडत नाही" असे निरीक्षण मिळते तेव्हा 'क'ला निर्णयस्वातंत्र्य असल्याचे म्हटले जाते. उलट, एखादी व्यक्ती रस्त्यात पडलेली प्रत्येक नोट उचलीत असेल तर तिचे वागणे नियत म्हणता येते. म्हणजे, सजीवत्व, स्वेच्छा, इ. गुणधर्म हे आभासी असून "विज्ञानाला अजून नियम सापडलेला नाही" असे सांगण्यासाठी वापरले जाणारे लघुरूप आहेत. हे गुणधर्म ही वर्णने नाहीत, तर वर्णननियमांच्या ज्ञानाचे अभाव आहेत. उदा., एका संख्येच्या चौपटीपेक्षा तिचा वर्ग 'चार'ने लहान असल्यास ती संख्या कोणती? या प्रश्नाचे उत्तर शोधताना सुरुवातीला आपण म्हणतो की ती संख्या 'ग' मानू आणि मग आपण लिहितो की ग-४ग+४=०. जेव्हा ती संख्या २ असल्याचे ज्ञान होते तेव्हा 'ग' नष्ट होतो. 'ग' हे त्या संख्येचे वर्णन नसते, २ हे त्या संख्येचे वर्णन असते.
परंतु, विज्ञानातील सारीच मते तात्पुरती असतात आणि नवी माहिती मिळाल्यावर यदृच्छेमागचे नियम सापडू शकतात. उदा., भाकित करण्याची विज्ञानाची कुवत वाढली की 'लहरी हवामान' सुद्धा नियत असल्याचे सिद्ध होते. विज्ञान ही एक अव्याहत प्रक्रिया असून, "या घटनांमागचा नियम आम्हाला सापडत नसल्यामुळे त्यामागे वास्तव प्रकारचे सजीवत्व असल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत" असे विधान कधीच केले जाणार नाही. गेलाबाजार, निरीक्षणांची यादी ही नेहमीच सांत असते. त्यामुळे, 'च', 'छ', 'ज', आणि 'झ' या निरीक्षणांमागील नियम सापडला नाही तरीही "'च' घडते, 'छ' घडते, 'ज' घडते', आणि 'झ' घडते" असे चार ऍड-हॉक 'नियम' जाहीर करणे शक्य असतेच. त्यामुळे, सजीवत्वाला विज्ञानात कधीही स्थान मिळणार नाही.
'देव' या संकल्पनेची व्याख्या मी पुढीलप्रमाणे करतो. 'देव' विश्वाच्या निर्मितीस कारण आहे. येथे 'कारण' हा शब्द "'क' असेल तर 'ख' असते" असा 'कोरिलेशन' या अर्थाने नसून 'निर्णय' या अर्थाने वापरणे आवश्यक आहे. 'निर्णय घेणे' हे अपरिहार्यतेपेक्षा वेगळे असते. "देव अस्तित्वात होता आणि विश्व निर्माण करण्याशिवाय त्याला पर्यायच नव्हता" असे देव या संकल्पनेत मान्य नाही. या विश्वाचे 'नियम' बदलण्याची कुवत देवाकडे आहे. परंतु, "नियम बदलण्यासाठी प्रार्थना केली की ती ऐकलीच पाहिजे" या नियमाने देव बद्ध नाही, कुवत कधी वापरावी आणि कधी नाही याचे निर्णय घेण्यास देव सक्षम आहे. "देवालाही उचलता येणार नाही इतका जड दगड बनविणे", "चार बाजूवाला त्रिकोण आखणे", इ. कामे देव करू शकत नाही (परंतु तसा इतरांचा आभास तो करून देऊ शकतो).
ही व्याख्या तपासण्याजोगी नाही याची दोन वेगवेगळी कारणे आहेत.

  1. "निर्णयक्षमता ही आभासी नसल्याचा निष्कर्ष मर्यादित निरीक्षणांमधून शक्य नसतो" या आधी केलेल्या विवेचनानुसार देव ही संकल्पना व्याख्येनुसारच अशक्य आहे. 'व्याख्येनुसारच अशक्य' संकल्पनांचे अस्तित्व कोणत्याही नव्या माहितीने, प्रायोगिक निष्कर्षांनी सिद्ध करता येत नाही.
  2. प्रार्थनेवर कृती करण्याची देवावर सक्ती नाही. त्यामुळे, या व्याख्येनुसार "देव अस्तित्वात आहे" असा अभ्युपगम लिहिला तर त्याला खोटा ठरवू शकणारा प्रयोगच शक्य होणार नाही. "प्रार्थनेला फल मिळाले नाही" असा निष्कर्ष सापडेल तेव्हा "देवाने प्रार्थनेला दाद न देण्याचे ठरविले होते" असा बचाव शक्य आहे.

निष्कर्षः (डोंगर पोखरून उंदीर?)
व्याख्या तपासण्याजोगी नसल्यामुळे देव ही संकल्पना अवैज्ञानिक आहे. "प्रार्थनेनुसार कृती करणारे यंत्र" ही व्याख्या तपासण्याजोगी आहे आणि परंतु तिच्या समर्थनार्थ काहीही पुरावा सापडलेला नसल्यामुळे ऑकॅमच्या नियमानुसार ती तात्पुरती नाकारावी लागते. "ज्यांची प्रार्थना करू नये, प्रार्थनेवर कृती करण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही, असे विश्वाचे नियंते 'सजीव' 'नियम'" ही स्पिनोझाचा देव नावाची संकल्पना मला निरर्थक आणि निरुपयोगी वाटते, पँथेईजमला डॉकिन्सने sexed-up atheism असेच संबोधिले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

देवाची व्याख्या

माझी देवाची व्याख्या - देव म्हणजे आम्ही, तुम्ही, हे, ते...पृथ्वीवरील माणूस (पीरीयड)

पण मग..

असली सर्वसमावेशक व्याख्या असली काय अन नसली काय? काय फरक पडतो?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

फरक?

फरक? मलाही नाही पडत

कशाला वापरता?

मग कशाला ही व्याख्या वापरता?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

केली

वापरली? केली!
ज्यांना हवी ते वापरतील. तुम्हाला नको आहे असे दिसतेय. नका घेऊ.

प्रयोजन काय मग?

अशी यूसलेस (वापरण्यास अयोग्य) व्याख्या करण्याचे प्रयोजन काय मग?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कशी युसलेस

अशी युसलेस जर चालत नसेल तर, तुम्हाला कशी युसलेस व्याख्या चालते, ते कृपया कळवावे.

युसलेस

म्हणजे व्याख्या युसलेस ना? :)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

डोळे!

" तुम्हाला कशी युसलेस व्याख्या चालते," असे लिहीले होते. (डोळे!)

उत्तर

कोणतीच नाही.

पकड्या

पकड्या! शंका खरी ठरली.

:)

दोन किंवा अधिक आयडी एकाच व्यक्तीचे असल्याचे आरोप होतच असतात. कधी ते खरे ठरतात तर कधी आवई. तुम्हाला जे काही समजायचे असेल ते समजा, मला फारसा फरक पडणार नाही पण व्याख्या निरुपयोगी नसावी हे मात्र कृपया मान्य करा.

युसलेस व्याख्या

वसुली म्हणाले, "अशी यूसलेस (वापरण्यास अयोग्य) व्याख्या करण्याचे प्रयोजन काय मग?" त्यांनी जजमेंट दिले की, वरील व्याख्या युसलेस आहे. आणि त्यातुन असे दिसतेय की, त्यांना "अशी युसलेस" नको आहे, म्हणजेच वेगळ्या प्रकारची युसलेस हवी आहे. म्हणून विचारले कशी. व्याख्या युसलेस नसावी हा सिद्धांतच आहे. वसुलिंसाठी त्यांना हवी तशी युसलेस व्याख्या जर कोणाला बनवता आली तर बरे.

खुलासा

तुम्ही हा उपधागा खोडसाळपणे सुरू केला आहे की तुमचा खरेच गैरसमज आहे ते माहिती नाही परंतु, "अशी यूसलेस" याऐवजी "अशी, यूसलेस" असा अर्थ घेणे वसुलि यांना अपेक्षित असावे.

असाच अर्थ अपेक्षीत होता..

प्रतिसाद संपादित. व्यक्तिगत स्वरूपाची टीका टिप्पणी करू नये.

अनभिज्ञ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अहो वसंतराव, ज्यांना बुद्धिबळ खेळाचे नियमच माहीत नाहीत त्यांच्याशी बुद्धिबळ खेळणे कधी शक्य होईल काय? अशा अनभिज्ञांनी पटावर काही खेळी केली तर तिकडे दुर्लक्ष करणेच इष्ट.

बौद्धिक डावपेच संपल्यामुळे हमारी-तुमरीवर

अहो यनावाला ज्यांना तुम्ही हे सांगताय, ते त्यांचे बौद्धिक डावपेच संपल्यामुळे हमारी-तुमरीवर येऊन असे काही लिहून गेले की, जे संपादित करावे लागले.

आदर वाटतो

बाय द वे, जजमेंट देऊ शकणा-या लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो- हे चूक, ते बरोबर असे कसे ठरवता येते बुवा तुम्हा लोकांना.

देव म्हणजे तात्या अभ्यंकर

देव म्हणजे तात्या अभ्यंकर

दुवा

नक्की?

देवांना विरजणाचा पुरवठा दुर्लभ असतो असे ऐकिवात आहे.

जबरी मार्मिक

श्री. तात्या हे कोण आहेत मला माहीती नाही, पण तुमची कॉमेंट जबरी मार्मिक आहे.

सहमत्

सहमत.
सैतानाला कुठुन् एक्स्पोर्ट होतो??

इंद्र?

ते फक्त इंद्राला ना हो?

-Nile

एक शक्य व्याख्या

देव : एक स्टोकॅस्टिक प्रोसेस् . :-)

स्टोकॅस्टिक प्रोसेस्

बरं. ही देवाची एक प्रॉपर्टी झाली, पण ही देवाची व्याख्या कशी काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

देव

देव म्हणजे कश्यप आणि अदितीची मुले.

हीहीहीहाहाहाहा!!!! आमचे पूर्वज महान होते. ;-)

कल्पना

देवाला काहीतरी लालूच दाखवल्यावर (नवस) किंवा त्याची चमचेगिरी केल्यावर (देवस्तुतीपर स्तोत्रे म्हटल्याने, पूजा केल्याने) देव आपली कामे करतो (नैसर्गिक नियमाला अपवाद निर्माण करतो) ही देवाची संकल्पना भारतातच असावी.

बाकी इतर देशांमध्ये बहुधा आपले ऐहिक जीवनातले काम करवून घेण्यासाठी देवाची प्रार्थना करण्याची पद्धत नाही.
(हे बरोबर आहे का? कारण फेथ हीलिंगचे प्रस्थ बर्‍यापैकी दिसते. पण ते त्या विशिष्ट संताच्या पॉवरने होत असते असे वाटते).

नितिन थत्ते

सार्वत्रिक

चमत्कारासाठी प्रार्थना करायची प्रथा सार्वत्रिक आहे.

सहमत.

सहमत.

-Nile

फरक

प्रार्थना आणि नवस यात फरक आहे.

नितिन थत्ते

चमत्कारासाठी नवस करायची प्रथा सार्वत्रिक असावी

चमत्कारासाठी नवस करायची प्रथा सार्वत्रिक असावी.
यासाठी इंग्रजी शब्द "व्होटिव्ह ऑफरिंग" असा आहे.

देवाणघेवाणीच्या व्यवहाराचे सामान्यीकरण ईश्वराशी झालेल्या व्यवहारांशी करण्यासाठी फार कल्पकता लागत नाही. आपल्यापेक्षा अधिक बळ असलेल्या मनुष्यांकडून मदत मागताना भीक मागता येते ("अर्थना" किंवा "प्रार्थना" शब्दांचा संस्कृत अर्थ), किंवा कर्ज घेता येते, किंवा आपल्या कारागिरीची वस्तू ऐवजमोबदला म्हणून देता येते. भिकेने मिळत नाही अशी मदत कित्येकदा ऐवजमोबदल्यातून मिळते, हे अर्थकारण सर्वांच्याच अनुभवाचे आहे. ते अर्थकारण ईशाकडून मिळणार्‍या मदतीला लागू करायची युक्ती फक्त भारतीयांना सुचेल अशी कल्पना सोपी वाटत नाही. उलट व्यवसायांचे विशेषीकरण असलेल्या सर्व समाजांतील मानवांना हे सुचेल, असे मानणे अधिक सोपे.

प्रत्यक्ष व्यवहारात "ईश्वर" संकल्पना ही "गाव-प्रमुख, सावकार, जमीनदार किंवा राजासारखे पण त्याहून वैश्विक एकक" अशी राबवली जाते. ईश्वरासाठी इंग्रजीत "लॉर्ड", हिंदी-उर्दूमध्ये "मालिक", चिनी भाषेत "शांग-दी=सम्राटाच्या वरचा" ही बिरुदे असेच ध्वनित करतात. इस्लामच्या कडक नियमांप्रमाणे ईश-संकल्पनेसाठी "अल्ला"वेगळे नाव वापरता येत नाही.* तरी "मालक" अर्थाचा अरबी "रब" शब्द वापरला जातो. (इस्लामच्या अत्यधिक शुचिर्भूत "वह्हाबी" पंथात नवस-"शिर्क्" म्हणजे पाप आहे. परंतु अन्य पंथांत असे नाही. बाकीच्या धर्मांतही असे शुचिर्भूत पंथ सापडतील. हिंदूमध्ये सुद्धा काही पंथ, किंवा धर्मगुरु-उपदेश नवस न-करण्याबाबत असतील. माझ्या ओळखीचे काही हिंदू** लोक नवस-न-करणारे पण पूजा-अर्चा करणारे आहेत.)

- - -
* या ठिकाणी मला इस्लामच्या धर्मशास्त्रात फार जायचे नाही. त्याबद्दल माझा अभ्यास नाही. कृतिशील ज्ञान तर काहीच नाही. पण तरी. खुद्द कुर्'आनात ९९ विशेषणे वापरलेली आहेत त्यांना "नावे" सुद्धा म्हणता येईल. म्हणजे "अर्-रहमान=दयाळू, अर्-रहीम=कृपाळू" वगैरे. मात्र कलिम्यात "अल्ल्यावेगळा अल्ला नाही" असे जे पढतात, त्यावरून त्याला "अल्ला"वेगळे नाव नाही, असा काही "शुद्ध" अर्थ काही लोक काढतात.
**हिंदू - या प्रतिसादात मला व्याख्या करायच्या भानगडीत पडायचे नाही. माझ्या ओळखीचे हे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेतात, तितकी व्याख्या या प्रतिसादापुरती पुरे आहे.

भारतातच असावी.

मुर्तिपूजा, पॉलीथेइजम वगैरे मागास प्रथा अजूनही भारतातच मुख्यत्वे आहेत. म्हणून हा फरक दिसत असावा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मागास?

मूर्तिपूजा मागास आणि निर्गुणभक्ती ऍडव्हान्स हे मान्य नाही.

नितिन थत्ते

+१

सहमत!

असे का बरे?

असे का बरे? शेंदूर फासलेला दगड आणि निर्गुण निराकार परमेश्वर ह्यातली कुठली संकल्पना तुम्हाला अधिक ऍडव्हान्स्ड वाटते?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

शेंदूर फासलेला दगड ;-)

मला शेंदूर फासलेला दगड आवडतो कारण त्या दगडा भोवती चार भींती उभ्या कराव्या असा नियम नाही. ;-) त्या निर्गुण निराकारासाठी मात्र चार भींती, मिनार, कळस, लाउड स्पीकर वगैरे वगैरे.

ह. घ्या.

तूर्तास, उपक्रमावरील स्पॅम बॉट्स जो घालवून देईल त्याला मी देव मानायला तयार आहे. ;-) वैताग येतो त्यांच्याकडे बघून. (स्पॅम बॉट्सची क्षमा मागून)

चावी.

आत्ताच खाली एका असाच प्रतिसाद दिला. - कधीकधी एखाद्याला शेंदूर फासावाच लागतो. मग चावी.

नियम

निर्गुण निराकारासाठीही चार भिंती मिनार इ.इ. उभे केलेच पाहिजे असा नियम नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

स्प्याम

मला स्प्याम बॉटचा विशेष त्रास वाटत नाही. भाषेच्या अडचणीमुळे उनके हाथ बंधे हुए हय :)
त्यापेक्षा दशावतारांना कुणी घालवले तर मजा येईल.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

:)

दशावतारांचा त्रास काय आहे? त्याऐवजी, देवनागरीत स्पॅम करून ते मराठी असल्याचा दावा करणार्‍यांचा त्रास होतो.

काहीच नाही.

दशावतारांचा त्रास काय आहे?

काहीच नाही.

काही मजकूर संपादित. कृपया आपले लेखन उपक्रम च्या लेखनविषयक धोरणाशी सुसंगत असेल याची काळजी घ्यावी.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

का?

मूर्तीमध्ये काही खास असल्याची, नवसाला ती पावत असल्याची व्याख्या तपासण्याजोगी असून तिच्या समर्थनार्थ पुरावा शोधण्याचे सर्व प्रयत्न आजवर विफल ठरलेले असताना मूर्तीपूजा ही तुच्छच म्हटली पाहिजे.
निर्गुण, इ. ची नेमकी व्याख्या काय आहे?

व्याख्या करत नाही

अशा प्रकारची संकल्पना मी स्वतःहून वापरत नाही, म्हणून व्याख्या करत नाही.

संवादात मात्र जर अन्य व्यक्ती कुठली व्याख्या करत असेल, तर ती संवादापुरती मानून संवाद चालू ठेवतो. (संवाद चालू ठेवण्यात रस असेल तर असे करतो.)

कधीकधी संकल्पनेचे विश्लेषण न करता "कुठलातरी ध्वनी" असे मानतो. उदाहरणार्थ कोंकणीत आभार मानण्यासाठी "देवबॉरॅकरूं" म्हणतात. त्याला एक ध्वनी मानतो, त्याचा संदर्भ "आभार व्यक्त करणे" असे मानतो, आणि हे वक्तव्य सुखदायक आहे असे मानतो. अशा रीतीने वागतो. (व्युत्पत्ती "देव+बरे+करो" अशी आहे, हे माहीत आहे. मात्र घटक शब्दांचा कुठल्या संकल्पनांशी अन्वय लागला नाही, तरी चालतो.)

पौराणिक किंवा सणासुदीच्या विषयाला अनुसरून "देव" शब्द वापरतो, तो वरील लेखाच्या संदर्भाशी सुसंगत आहे की नाही? उदाहरणार्थ : "कथांमध्ये स्वर्गलोकात राहाणार्‍या देवांचा प्रमुख इंद्र". "गोव्यामध्ये पौराणिक देवांपैकी गणपतीचे महत्त्व सर्वाधिक आहे". येथे "कथांमधील एका प्रकारचे लोक" किंवा "सणामध्ये पूजनीय" असे संदर्भ आहेत. त्या संकल्पना संदर्भाबाहेर काढून एकच मानता येत नाहीत. म्हणून संदर्भाबाहेर त्यांना व्याख्याही नाही.

ठीक

परंतु, समाजात प्रचलित अर्थाच्या देव या संकल्पनेची 'बेस्ट पॉसिबल' व्याख्या केल्याशिवाय "मी निरीश्वरवादी आहे" या वाक्याचा योग्य अर्थ लोकांना समजणार नाही. स्वतःची नेमकी कशावर श्रद्धा आहे ते समजण्याचीही लोकांच्यात कुवत नसते असे दिसते. त्यामुळे, त्यांना "तुम्हीच व्याख्या सांगा" असे म्हटले तर संवादच तुटू शकेल. त्यापेक्षा, एक पायाभूत व्याख्या देऊन "यालाच देव म्हणता काय?" असे विचारता येऊ शकेल. या व्याख्येत थोडेसेच बदल करावे लागले तर त्यांना मनातील व्याख्या व्यक्त करणे सोपे जाऊ शकेल.

मुळ मुद्दा योग्यच आहे

तुमचा मुळ मुद्दा योग्यच आहे, एखाद्या शब्द निवडीवर अडकुन पडणे, संज्ञेचा अर्थ जो-तो आपापल्याप्रमाणे लावत प्रतिसाद देणे, जर संज्ञेच्या अर्थाबाबत शंका असेल तर प्रश्न न विचारणे अशा स्वरुपाचे वर्तन दिसते. लेखकानेच ह्या वर्तनाचा अभ्यास करुन लेख अशा पद्धतीने लिहिला पाहीजे की, असे प्रसंग कमी करता यावेत.

म्हणूनच

अशा व्याख्या वारंवार देण्यापेक्षा या चर्चेचा दुवा तेथे देता येईल.

यत्न तो देव जाणावा

मंदिरात अंतरात तोच नांदत आहे
नाना देही, नाना रूपी, तुझा देव आहे.

यत्न तो देव

+१ सहमत. यत्न तो देव जाणावा.

म्हंजे काय?

या अलंकारात यत्नाला देवाचा दर्जा आहे, परंतु देवाचीच व्याख्या नसेल तर दर्जा समजणारच नाही.

:)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर