या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत, असे मत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी येथे आज व्यक्त केले. सकाळ वर्तमान पत्र .
मी संघ समर्थक नाही हे आधीच सांगतो. पण राहुलने संघा बद्दल जे अक्कलेचे तारे तोडले ते मात्र १०१% चुकीचे आहे. संघाच्या विचारसरणीला विरोध असू शकतो पण त्यांच्या देशभक्ती बदल संशय घेणे म्हणजे वारांगना ने पतिव्रता स्त्री च्या चारित्र्या ची, शीला ची उठाठेव करण्या सारखे आहे.असे माझे ठाम मत आहे. नजीकच्या काळात बिहार पासून बंगाल पर्यंतच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून मतांच्या लाचारी साठी हे विधान त्याने केले हे निश्चित .
आज कॉंग्रेस पासून ते भारतीय नोकरशहा पर्यंत संघाची पाळेमुळे रुजली आहेत. हे सत्य आहे. नेहरू हे सुद्धा संघ विरोधी होते. पण देशा वरील नैसर्गिक संकट असो,परकीय आक्रमण असो शासनाच्या देशाच्या मदतीला सर्व प्रथम धावून मदत करण्यास संघ अग्रेसर असतो. आणि महत्वाचे म्हणजे या मदत कार्याचा संघाने स्वतः च्या फायद्या साठी कधी ही दुरुपयोग करून घेतला नाही. जसा कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या लढ्याचा आज ही गैरफायदा घेत सत्ता राबवत आहे, आणि याच वेळी सावरकर,पासून ते सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है । म्हणत भगत सिंघ सारख्या हसत हसत फासावर जाणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य वीरांच्या महान त्यागा कडे दुर्लक्ष करत जणू आमच्या पक्षानेच भारता ला स्वातंत्र्य मिळवून दिले असा प्रचार गोबेल्स ला ही लाज वाटेल या पद्धतीने करत आहे.
आज ६५ वर्षात ६० वर्षे कॉंग्रेस पर्यायाने नेहरू खानदाना ने आणि त्यांच्या प्रादेशिक सरंमजामशाही ने भारतावर राज्य केले . या ६५ वर्षात देश्याच्या अधोगतीस कांही संघ किंवा विरोधी पक्ष जबाबदार नाहीत. राहुल ने खालील गोष्टी वर कधी मत व्यक्त का केले नाही काश्मीर मधील हिंदूंच्या वाताहातीस कोण कारणीभूत आहे? बांगलादेश, पाकीस्थान मधील नागरिकांची भारतात होत असलेली अवैध घुसखोरी , भारतातील सात बहिणी राज्ये (सात बहिणी- ईशान्येकडील सात राज्ये - आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय ) यांच्या शोकांतीकास कोण जबाबदार आहे . या प्रदेशांना भारताशी जोडून ठेवण्याचे कार्य संघ जो करतो ते शासकीय अनुदान हडप करण्यासाठी आश्रम शाळा काढणाऱ्याना आणि त्यांच्या नेत्यांना काय कळणार. वाढती महागाई काबूत आणण्या साठी याने आपल्या सत्ताबाह्य अधिकाराचा वापर का केला नाही. भ्रष्ट्राचारा मुळे देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी होत असताना यांचा पक्ष आणि हे झोप काढतात का ? की नजराणे मिळाले की त्या कडे मुगल सल्तनत सारखे दुर्लक्ष करतात. अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी विरुद्ध निकाल दिला तेंव्हा त्याचा मान राखण्या ऐवजी आणीबाणी पुकारल्या गेली शहाबानो प्रकरणात याच्या वडिलांनी काय उजेड पडला ते साऱ्या भारताला माहित आहे. आणि हे आज न्यायालयाचा मान राख म्हणत आहेत. हा काळाने उगवलेला सूड आहे असेच म्हणावे लागेल.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
Comments
यावर माझी पतिक्रिया
thanthanpal यांच्याशी सहमत.
यावर माझी पतिक्रिया
thanthanpal, राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत, तेव्हा जरा जपून.
सल्ल्यानुसार सगळ्याच गोश्टी करता येत नाहीत.
राहुलजी हे लवकरच पंतप्रधानपदावर आरूढ होणार आहेत,
'प्रणयाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय पंतप्रधानपदावर आरूढ होणं शक्य झाल्यास' मला आश्चार्य वाटेल.
वाजपेयी
प्रणयाचा ऊंबरठा ओलांडल्याशीवाय वाजपेयि यांना ते षक्य झाले होतेच कि
चूक!
चूक! वाजपेयी स्वत: म्हणत मी अविवाहित आहे . पण ब्रम्हचारी नाही.
संघाची देशभक्ती
कोण वारांगना आहे ते माहीत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. ६ डिसेंबर ९२ ला संघवाल्यांनी मशीद पाडली. त्यानंतरच दहशतवाद फोफावला. देश असुरक्षित झाला. हे सारे संघाच्या देशभक्तीमुळेच शक्य झाले. संघाच्या ह्या देशभक्तीला काही जण मात्रागमनीपणाही म्हणतात.
असो. ही चर्चा टाकल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या शेवटच्या दोन परिच्छेदातल्या सन्नी-देवल-छाप भाषणबाजीकडे दुर्लक्ष केलेले आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मात्रागमनी की मातृगमनी?
योग्य शब्द कळवावा
मात्रागमनी सुरापानीं
ह्याबाबतीत आदरणीय धनंजय अधिक योग्य मार्गदर्शन करू शकतील. माझ्यामते मात्रागमनी हा शब्द योग्य आहे.
जे अविवेकी पातकी दुर्जन । असत्यवादी कुटिल मलीन । जारकर्मी हिंसक पूर्ण । तयासी पतन ते ठायीं ॥३६॥
मात्रागमनी सुरापानीं । भक्षाभक्ष भोजनीं । नाना हत्यारीं दूषणीं । पडे पतनीं ते ठायीं ॥३७॥
श्री दत्तप्रबोध - अध्याय सहावा
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शक्य आहे
मातृगमनी हा शब्द गूगलवर शोधल्यावर मिसळपाववरील दुवे प्राधान्याने येतात. त्यामुळे मातृगमनी हा शब्द चुकीचा असण्याचीच शक्यता जास्त आहे.
शब्दकोशात दोन्ही रूपे दिसतात
मोल्सवर्थच्या शब्दकोशात दोन्ही रूपे दिसतात.
संस्कृतात "मातृ-" रूप अधिक नियमित आहे. मराठीत "मात्रा-" रूप अधिक प्रचलित असावे. पारंपरिक उदाहरण श्री. धम्मकलाडू यांनी दिलेलेच आहे.
नपुंसक वृत्ती
या आधी दहशतवाद नव्हता या बद्दल काही आकडेवारी आहे का? कि उगाच आपलं उठायचं आणि विरोधात मुद्दा मांडायला लिहायचं?
सगळे सपष्ट आहे
सिम्मी आणि संघ ह्यावर चर्चा चालू आहे. आता दहशतवाद कुठला वाढला हे तुम्हाला सांगायला हवे का? सगळे सपष्ट आहे. १९९२ नंतर झालेल्या दहशतवादी घटना बघा, मोजा. उगाच नपुंसक वृत्ती कशाला?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
विदा
विदा देता येत असेल तर द्या. उगाच तिरसटपणा कशाला? उद्या म्हणाल नक्षलवाद पण १९९२ नंतर वाढला. नक्की म्हणायचे काय आहे? भारतात दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे हे आता भारतातलं शेंबडं पोरगं सुद्धा सांगते. त्याला १९९२ चा संदर्भ द्यावा लागत नाही. काँग्रेस ६० वर्षे सरकार चालवते आहे. समस्या आहेत त्याच आहेत. किंबहुना वाढत आहेत. दहशतवाद्यांना कठोर भाषा कळते आणि ती वापरण्याची गरज आहे. नको तिथे अमेरिकेचे अंधानुकरण करण्यापेक्षा येथे करा ना? अमेरिकन लोकं नाही म्हणतं की ९/११ नंतर दहशतवादाच्या घटना वाढल्या बघा अमेरिकेत. सर्वधर्म समभावाचे आणि नपुंसक लोकशाहीचे गोडवे गा आणि म्हणा आमची लोकशाही महान आहे आणि होती. जे काही बिघडलंय ना ते १९९२ नंतर.
चालविते आहे म्हणजे?
ही वाक्य ज्या अर्थाने अपेक्षित आहे ते चुकीचे आहे. काँग्रेस आपणहून सरकार चालवत नाही तर तुम्ही आम्ही निवडून देत आहोत. म्हणजे दोष-गुण जे काहि आहेत ते एकट्या काँग्रेसचे नसून आपल्या सगळ्यांचे आहेत. तेव्हा हे वाक्य "गेली कित्येक वर्षे जनता कॉग्रेसला निवडून देते व काँग्रेसचे सरकार बनविते आहे" असे ठिक वाटते.
बाकी चालु द्या! :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अगदी नगण्य फरकामुळे हो/नाहि होते. ते कितपत योग्य ?
आपल्या महान लोकशाहीत एक गोची आहे.
उदा.
एक मतदार संघ आहे , त्यात १००० मतदार राहतात.
एक उमेदवार १०० मते गेतो आणि एक उमेदवार १०१ , तिसरा ९९ मते घेतो.
निवडणूक आयोग , ज्याने १०१ मते घेतली आहे त्यालाच निवडून आल असे घोषित करते, तुलनेने तिघांना समान मते पडून देखील एकाच निवडून येतो. तसेच इतर दोघांना तुलनेने समान मते पडून इतर मतदान न झालेल्या लोकांची मते विचारण्याचा हक्क नसतो. जर एक उमेदवाराला एकूण मतदार संख्येच्या ७०% टक्क्यापेक्षा जस्त मते पडली असतील तर तो तिथे निर्विवाद निवडून आलेला असे मी मान्य करीन. पण वरील माझ्या उदाहरणांत अगदी नगण्य फरकामुळे YES/NO होते. ते कितपत योग्य ?
जे मतदानाला जात नाहीत त्यांचे हात धरलेले असतात का?
.
का धरावेत?
का धरावेत?
जे मतदान करत नाहीत ते आपले मत व्यक्त करू इच्छित नाहीत. मग त्यांचे हात का आणि कसे धरावेत?
आपल्या सिस्टीममधे मत व्यक्त करायला एक पद्धत आहे तिचा वापर करायचा नाही आणि मग ओरडायचे असे का?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
दान
मतदान या शब्दातच दान आहे. दान ऐच्छिक असते. सक्ती करा म्हटलं की लगेच लोकशाहीच्या नावाने गळा काढायचा. बाय द वे... भारतात निवडणुकांमध्ये होणारे गैरप्रकार सर्वज्ञात आणि सर्वमान्य आहेत. उगाच कशाला गोंजारता सिस्टिमला?
थोड्याश्या फरकाने काहीतरी योग्य निर्णय घ्यायला हवा.
अहो,टाईमपास भाऊ, तुम्हचे म्हणणे बरोबर आहे, पण माझा मुद्दा थोडा वेगळा आहे.
माझ्या मुळ उदाहरणात जरी एकाला ३३४, दुसर्याला ३३३, आणि तिसर्याला सुद्धा ३३३ अशी मते पडली (म्हणजे सर्व १००० लोकांनी मतदान केले असे गृहीत धरूया) तरी एकच निवडून येतो. ३३४ मते घेऊन जो निवडून येतो, त्याच्या बाजूने जरी ३३४ लोके असतील तरी उरलेली (१०००-३३४) ६६६ मते त्याच्या विरोधात आहेत हे निवडणूक आयोग सरळ सरळ विसरते.
मग काय करायला पहिजे ? निवडून तर एकालाच द्यावे लागते.
काहीतरी योग्य मधला तोडगा काढायला पाहिजे. असे वाटते
जसे कि (हे एक निव्वळ उदाहरण म्हणून घ्या) ज्याला जितकी मते पडली आहेत त्याला त्या प्रमाणातच अधिकारांचा वाटप, वगेरे वगेरे. खूप उहापोह करता येईल ह्यावर,
पण एकालाच सर्व हक्क देणे (निवडून आला असे घोषित करणे) पटत नाही.
जर एखाद्याला नक्कीच ७०% पेक्षा जास्त मते पडली असतील तर ठीक आहे. पण थोड्याश्या फरकाने काहीतरी योग्य निर्णय घ्यायला हवा.
ते जगाच्या नजरेतून उतरतात.
दहशतवाद कधी वाढला ह्या बाबतीत कदाचित दुमत असेल. पण जर का दहशतवाद 1992 च्या एका क्रियेमुळेच वाढला असे असेल तर उलट ते त्यांच्या धर्मांध भूमिकेवर अजून गडद शिक्का मारल्या सारखे होईल. आपले एखादे धर्मस्थळ पाडले कि करा कत्तली. 'हि शिकवण त्यांन कोणी दिली ?' हा प्रश्न उरतोच.
१९९२ च्या तुलनेने पाकिस्तानात शेकडो हिंदूंची मंदिरे पाडली गेली, तिथे किती हिंदूंनी जाऊन पाकड्यांच्या कत्तली केल्या? जिवंत व्यक्तींपेक्षा त्यांना एखादे धर्म स्थळ जास्त महत्वाचे वाटते. इथेच ते जगाच्या नजरेतून उतरतात.
ते जगाच्या नजरेतून उतरतात याचे आम्हाला सोयरसुतक नाही
आमच्यातील काहींमुळे आम्ही बदनाम होतो याचे जास्त वाईट वाटते.
आम्हाला पण..
>>ते जगाच्या नजरेतून उतरतात याचे आम्हाला सोयरसुतक नाही
इतर वेळी काट्यांचे सोयरसुतक आम्हाला हि नसते, पन काटे टोचायाला लागली कि मग................
आणि हो, ज्यांचे हकनाक बळी गेले, सोयरसुतक त्यांनाच, इतरांना काय ?
आनि सोयरसुतक लागू होण्यासाठी आपले कोणीतरी बळी जावे लागतात, किंवा जे बळी गेले आहेत ते आपले मानावे लागतात.
(कृपया हे वाक्य व्यक्तिगत घेऊ नका.)
>>आमच्यातील काहींमुळे आम्ही बदनाम होतो याचे जास्त वाईट वाटते.
आम्हाला पण.
पाक निर्मित काश्मीर दहशद वादा समोर गुडघे टेकवणारे शासन .........
६ डिसेंबर ९२ ला संघवाल्यांनी मशीद पाडली. त्यानंतरच दहशतवाद फोफावला. अशी किरायाने लावलेल्या तृतीयपंथी लोकां सारखी अशी छाती बडवून घेवू नका . महमद गजनी पासून हिंदुस्थाना मध्ये किती मंदिर पडल्या गेली याचा हिशोब आधी काढून वाचा अभ्यास करा , आणि मग संघा बद्दल बोला. तुमच्या घरात बेकायदेशीर घुसून बसणाऱ्याला हाकलले तर भारताच्या कोणत्या कायद्याने असे करणे गुन्हा ठरते हे सांगाल का? २००० वर्ष मार खाणाऱ्या हिंदुनी प्रति हल्ला केला की त्यांना धर्म आतंकवादी म्हणायचे ? स्वत;ला महात्मा म्हणाविण्याच्या नादात गांधी, भंपक नेहरूच्या अतिरिक्त मुस्लीम अनुयायां मुळे आणि हिंदू तिरस्कार या मुळे या देशात दहशदवाद निर्माण झाला. आणि यांच्या चुकीच्या विकास धोरणा मुळे नक्षल वाद उदयास आला. पाक निर्मित काश्मीर दहशद वादा समोर गुडघे टेकवणारे शासन आपल्या मूर्ख धोरणा मुळे उदयास आलेल्या नक्षलवाद्या बरोबर बंदुकीची भाषा वापरते हे कोणत्या कायद्यात बसते.
thanthanpal.blogspot.com
हे मतांच्या राजकारणात बसते.
>>कोणत्या कायद्यात बसते.
हे मतांच्या राजकारणात बसते.
व्याख्या
देशप्रेमी आणि दहशतवादी ही दोन विशेषणे म्युचुअली एक्सक्लुजिव नाहीत. दोन्ही विशेषणे एकाच व्यक्तीला एकाच वेळी लागू असू शकतात. हिदुस्तानी (इंडियन) या चित्रपटात कमलहसन या नटाने अभिनय केलेले एक पात्र देशभक्त आणि दहशतवादी असे दोन्ही असते.
पण मुळात, राहुल गांधी यांनी संघाला (धर्म)वेडे आणि मूलतत्ववादी म्हटले आहे. "त्यांच्यावर बंदी घालावी" असे त्यांनी म्हटलेलेच नाही (=दहशतवादी म्हटले नाही). किंबहुना, "संघावर बंदी नाही (आणि नको) आणि सिमीवर बंदी आहे (आणि रहावी) पण तो वेगळा मुद्दा आहे, अन्यथा त्यांच्या मनोवृत्तीत फरक नाही" इतकेच ते मत आहे. "भगतसिंगला दोन डोळे होते आणि कसाबलाही दोन डोळे आहेत" हे वाक्य 'चूक' नाही.
मूळ शब्दप्रयोग are fanatical and hold fundamentalist views असा होता.
फॅनॅटिसिजम=वेड म्हणजे विक्षिप्तपणाच्या थराला गेलेला उत्साह. अशी टीका अनेक 'स्पेशल इंटरेस्ट ग्रूप' (एक उदाहरण) वर शक्य आहे. "काटकुळे पाय दाखवणार्या खाकी चड्ड्या" असे संघाचे वर्णन केले जाऊ शकते.
फंडामेंटलिजम=मूलतत्ववाद म्हणजे 'धर्माला सर्वोच्च महत्व देणे'. ("संघ अस्पृश्यता पाळत नाही याचा अर्थ असा की संघ धर्माला सर्वोच्च मत देत नाही" असा युक्तिवाद करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर आधीच सांगतो की "हिंदू धर्मात अस्पृश्यता नव्हती म्हणून अस्पृश्यता न पाळणे चांगले आहे" असे संघाचे मत आहे. हे लोक हिंदू धर्माची व्याख्याच करत नाहीत. त्यामुळे विरोधकांना गप्प बसविण्यासाठी मुखवटा पांघरणे आणि त्रिशूळ वाटताना चेहरा दाखविणे त्यांना शक्य होते. परंतु "आमचे वागणे हिंदुत्वाला धरून आहे" असे विधान ते दोन्ही वेळी करू शकतात.)
सिमी आणि संघ या दोन्ही गटांना वेडे आणि मूलतत्ववादी ठरविता येईल असे मला वाटते.
संघात त्रिशूळ वाटत नाहीत
संघाच्या शाखेत त्रिशूळ वाटत नाही. संघाने ते काम बजरंगदलाकडे औटसोर्स केले आहे.
देशभक्तीची व्याख्या काय?
ठणठणपाळ तुमची देशभक्तीची व्याख्या सांगा. अनेक देशभक्त संघवाल्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली असतात. तिथे तुमच्या तथाकथित देशभक्तीचा संबंध येत नाही का? फक्त मुसलमानांचा संबंध आला की गळा काढायचा याला देशभक्ती म्हणतात का? देशाची भक्ती करायची मात्र तिथे राहायचे नाही याला काय म्हणणार?
मार्मिक प्रश्न!
मार्मिक प्रश्न!
+१ सहमत
कायदेशीर , बेकायदेशीर सत्ता गाजवण्याचा अधिकार
परदेशी स्थाईक होण्याचा किंवा परदेशी स्त्री बरोबर लग्न करून भारतात कायदेशीर , बेकायदेशीर सत्ता गाजवण्याचा अधिकार काय फक्त कॉंग्रेस पक्षाच्या सभासदांनाच आहे काय?
thanthanpal.blogspot.com
एका अर्थी, होय
होय, परदेशविरोध हे तत्त्वच नसेल तर त्यांचे वागणे किमान सुसंगततरी ठरते, पण ज्यांना परदेशविरोध हे तत्त्व आवडते त्यांनी त्या तत्त्वाशी प्रामाणिक वागणूक केली पाहिजे अशी अपेक्षा ठेवता येते.
देशप्रेमी
देशप्रेमी असल्याचा डांगोरा काँग्रेस पक्षाचे सभासद पिटताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घ्यायचे कारण नाही. उठता बसता देशप्रेमाचे पाल्हाळ लावणारे लोक परदेशात का स्थायिक होतात ह्या माझ्या प्रश्नाला बगल देऊ नका.
हॅ हॅ हॅ,
>>देशप्रेमी असल्याचा डांगोरा काँग्रेस पक्षाचे सभासद पिटताना दिसत नाहीत.
हॅ हॅ हॅ, आता काय बोलावे, शब्दच खुंटले,
>>त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घ्यायचे कारण नाही.
ठीक आहे.
>>उठता बसता देशप्रेमाचे पाल्हाळ लावणारे लोक परदेशात का स्थायिक होतात ह्या माझ्या प्रश्नाला बगल देऊ नका.
देशप्रेम म्हणजे स्वदेशातच राहणे असे जर आपले किव्वा इतर कोणाचे मत असेल तर जरा अवघड आहे. परेशात राहून सुद्धा देशसेवा करता येते. हे मान्य, पण परदेशात राहून (कोणीही, हे, ते, आम्ही, तुम्ही, कोणीही) जर नुसतेच देशप्रेमाचे ढोल बडवीत अस्तेल आणि कर्माच्या नावाने शंख असेल तर मात्र आक्षेप.
मुळातच भारतीयांना परदेशात का जावेसे वाटते हे माझ्या सारख्या अडाण्याला कळेल काय ? गेली ६५ वर्षे इथे रामराज्य चालू आहे आणि परत "मेरा भारत महान" वगेरे आहेच, मग हि लोक परदेशात जातातच का, हे जर समजले तर बरे होईल माया बापड्याला.
परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि तरी देशप्रेमापोटी गेले नाही असा एक तरी दाखवा आजच्या जमान्यात.
क्लेम + थोडे अंकगणित
इथे रामराज्य चालू आहे असा क्लेम कोणी केल्याचे आठवत नाही.
शिवाय् इथे जे ६५ वर्षे ६५ वर्षे असा जप चालला आहे त्यापैकी ३+२+२+६ अशी १३ वर्षे तरी काँग्रेसने राज्य केलेले नाही. आणि गेली ६ वर्षे जे राज्य चालू आहे तेही आघाडीचे आहे, काँग्रेसचे नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
सहमत
"सनाका किंवा कलम ३७० विरुद्ध वाजपेयी सरकारने काहीच का केले नाही?" असा प्रश्न विचारला की "अगं अगं आघाडी मला कुठं नेशी" असेच उत्तर मिळते.
दुर्गा
आणि उरलेल्या काळापैकी इंदिरा गांधींचा काळ हा 'दुर्गा'देवीचा काळ म्हणून संघाला मान्य होता. संघिष्ठांचा लालबहादूर शास्त्रींविषयी काही आकस नसतो. त्यांचा आक्षेप फक्त उरलेले गांधी आणि नेहरु यांच्याविषयीच आहे.
एक राहिलं
कलम 44 हा तर इलेक्शन पाइंट होता कि.
जोवरी पैसा तोवरी बैसा
अगदी खरे. त्यामुळेच देशप्रेम, मंदिर, मशीद, हिंदू , मुसलमान वगैरे बाता मारून लोकांना च्युत्त्या बनवू नका. ह्या भरल्या पोटी करायच्या गोष्टी आहेत.
माझा केवळ एक आणि एकंच साधा प्रश्न आहे.
अहो टाईमपास भाऊ, जरा आवरते घ्या. कोणीही कोणाला वेड्यात काय आणि कशात काय काढत नाहीये,
माझा केवळ एक आणि एकंच साधा प्रश्न आहे.
भारतीयांना परदेशी जावेसेच का वाटते ? का लोक जातात, त्या 'तिथे' सात समुद्रा पलीकडे. त्यांना इथे का रहावेसे वाटत नाही ? आपला भारत महान आहे ना ?
चीटिंग
आसं का? मग भेंडीबाजारात राहणार्यांनी फटाके फोडले तर तुमच्या पोटात दुखते की नाही? तोही हिरवा माज आणि हाही!
आपली एक चर्चा सोडून तुम्ही पळाला होतात. आता पुन्हा तोच विषय काढू नका.
येथे खायचे आणि निष्ठा पाक शी ठेवायच्या हे चालणार नाही.
भेंडीबाजारात राहणार्यांनी फटाके फोडले तर तुमच्या पोटात दुखते की नाही? माझ्याच काय कोणाही सच्या भारतीयांच्या पोटात दुखेल. भारतीय हे परदेशात गेल्यावर ते ज्या देशात राहतात त्या देशा विरुद्ध फटाके फोडत नाही हे लक्षात घ्या. खाण्याच्या ताटात माती कालवण्याची भारतीयांची हलकट वागणूक नसते हे लक्षात घ्या. ज्या देशात रहाल त्याच्याशी निष्ठा राख हे सरळ सांगणे आहे. येथे खायचे आणि निष्ठा पाक शी ठेवायच्या हे चालणार नाही.
thanthanpal.blogspot.com
देशाविरुद्ध कशे काय?
भेंडीबाजारात राहणार्यांनी बीसीसीआय विरुद्ध पाकिस्तान अशा सामन्यात पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडले तर ते भारतदेशाविरुद्ध फटाके कशे काय होतात हे सिद्ध करा.
मतांच्या लाचारी करता तुमचे सरकार प्रत्यक्षात पाक बरोबर युद्ध ...
उगीचच शब्दाच्या कसरती करू नका . बीसीसीआय विरुद्ध पाकिस्तान हा सामना भारत विरुद्ध पाक असाच असतो . आता tax चुकवण्या साठी शरद पवार सारखे लोक बीसीसीआय कधी स्वायत तर कधी भारतीय संघ आहे असे म्हणतात. पण आम जनता भारत विरुद्ध पाक अशीच लढाई समजतात. कारण अहिंसेने नसबंदी झालेले आणि मतांच्या लाचारी करता तुमचे सरकार प्रत्यक्षात पाक बरोबर युद्ध करण्यास घाबरते. तो मुशरफ पहा कसा बढाया मारतो आणि तुम्ही अमेरिके समोर पुरावे मांडत बसता.
thanthanpal.blogspot.com
पवार?
यात पवारांचा कुठे संबंध आला. पवार अध्यक्ष व्हायच्या आधीपासूनच बीसीसीआय आणि भारत सरकार यांचा काही संबंध नाही. भेडिबाजारातील आम जनता पाकिस्तानी संघाला आपले मानते त्याला तुमचा आक्षेप का? बीसीसीआय सारख्या टॅक्स चोरांना कशाला आपले मानायचे?
हॅहॅहॅ
'अमेरिकेत राहून भारताची सेवा करता येते' असे गांधीवादी म्हणतात (मूळ वाक्य: "देशप्रेम म्हणजे स्वदेशातच राहणे असे जर आपले किव्वा इतर कोणाचे मत असेल तर जरा अवघड आहे. परेशात राहून सुद्धा देशसेवा करता येते."). तर मग भेंडीबाजारात राहून पाकिस्तानवर प्रेम केले तर काय वाईट?
-१
>>भारतीय हे परदेशात गेल्यावर ते ज्या देशात राहतात त्या देशा विरुद्ध फटाके फोडत नाही हे लक्षात घ्या.
अमान्य.
इंग्लंडात म्याच असताना भारत जिंकला की तिथले भारतीय (तिथले नागरिकत्व घेतलेले सुद्धा) इंग्लंडविरोधात फटाके वाजवतात*.
*येथे आनंद दर्शवणारी कृती असे समजावे
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
दुतोंडी भूमिका
कोणी परदेशात जाण्याविरुद्ध किंवा राहण्याविरुद्ध बोलण्याइतक्या प्रतिगामी विचारसरणीचा मी नाही. रिकामटेकडा यांनी तुमच्या दुतोंडी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता द्या उत्तर.
उत्तर वर दिले आहे. दुहेरी निष्टा मी ठेवत नाही.
उत्तर वर दिले आहे. दुहेरी निष्टा मी ठेवत नाही. आणि दुसऱ्याच्या जीवावर पोट वाढवण्याच्या मी विरुद्ध आहे, तसेंच दुसऱ्याच्या नाकाच्या नथी मधून तीर मारणे हे मर्द पणाचे लक्षण नाही.
thanthanpal.blogspot.com
दुहेरी निष्ठांचा प्रश्नच कुठे आला
दुहेरी निष्ठांचा प्रश्नच कुठे आला
होय हा दुहेरी निष्टा चा प्रश्न च आहे.
होय हा दुहेरी निष्टा चा प्रश्न च आहे. जेथे रहाल त्या देशावर निष्ठा ठेवा. किंवा पाक मध्ये "मुहाजिर' (निर्वासित) म्हणून लाजिरवाणे जीवन जगा. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्यांना "मुहाजिर' (निर्वासित) म्हटले जाते. स्थानिक लोक त्यांच्या मुलींचे विवाह निर्वासितांबरोबर होऊ देत नाहीत. त्यामुळे हे मुलगे हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशाच्या अन्य जिल्ह्यांत जाऊन विवाह करतात, अशी माहिती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ वकील अब्दुल वहाब यांनी दिली.
thanthanpal.blogspot.com
व्वा. चांगली दिशा मिळत आहे चर्चेला.
कोण कोणा विरुद्ध बोलत आहे ?
कोण पळून गेले आहे ?
कोण दुतोंडी आहे ?
कोणी समाचार घेतला आहे ?
कोणी उत्तर देणार आहे ?
व्वा. चांगली दिशा मिळत आहे चर्चेला.
असो,
अहो रिकामटेकडा ,टाईमपास काका/मामा/दादा, इतका आतातायी पणा का दाखवीत आहात, खुशाल कोणीही कुठेही राहून कोणत्याही देशाचे गोडवे गावेत हो, काय हरकत नाही, पण ते जर का स्थानिक लोकांच्या जीवावर बेतत असेल तर तिथले स्थानिक आक्षेप घेणारच ना ?
कोणालाही आपला देश सोडून दुसरीकडे का जावूशी वाटते, हे मला अजून कळले नाही. ते कोण भेंडी बाजारातल्या लोकांना जर का पाकिस्तान विषयी प्रेम वाटत असेल तर वाईट काय ? पण त्यांना हे तरी विचारा कि बापड्यांनो, तुम्हाला पाकिस्तानात जाऊन राहायला काय हरकत आहे. तसाच हा प्रश्न परदेशी स्थित भारतीयांना देखील लागू पडतो. आपल्याला देश प्रेम हि वाटते, आणि त्या देशात रहावेसे देखील वाटत नाही ह्याला काय म्हणावे ? घोडे कुठे अडते ?
फटाके
भेंडीबाजारात वाजलेले फटाके स्थानिकांच्या जीवावर कसे बेतले हे कृपया समजावून सांगावे.