रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल

सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल. निकालापूर्वी व निकालानंतर करावयाच्या चर्चेसाठी हा धागा सुरु करत आहे.

Comments

अहवाल

धन्यवाद. पुरातत्त्वखात्याच्या निरीक्षणांसंबंधी जे मी वर्तमानपत्रात वाचले होते ते बहुधा याच संक्षिप्त अहवालावर आधारित असावे. इथे बरेच तपशील आहेत. त्ते कोर्टाने निकालाच्या कागदपत्रांना जोडलेले नव्हते. --वाचक्नवी

सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण

सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण हा चर्चाप्रस्ताव या निमित्ताने मी सुरू केला आहे. त्यात भर घालावी.

दुवा

रथयात्रा आणि बाबरी-पतन

रथयात्रा आणि तदनंतरचे बाबरी-पतन ह्यामुळे निकालात काय फरक पडला? जर ते झाले नसते तर निकाल वेगळा लागला असता काय?

सदर दावा हा दिवाणी स्वरूपाचा होता तर बाबरी-पतनासंबंधीचा दावा हा फौजदारी स्वरूपाचा आहे. ह्या निकालानंतर तोही निकालात निघाला आहे किंवा कसे? जाणकारांनी खुलासा करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

खटला

अडवाणींचे नाव सीबीआय ने आरोपींच्या यादीतून वगळल्यावर खरेतर खटल्याला काही अर्थच राहिला नाही.

आजच चिदंबरम यांचे स्टेटमेण्ट वाचले, "निकालामुळे बाबरीपत्तन जस्टिफाय होत नाही".

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

काका, मराठीला वाचवा!

पत्तन म्हणजे गांव. तुम्हाला पतन म्हणायचे आहे का?

+

चुकलो. बाबरीपतन हवे. :(

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर