उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल
सदस्य
September 29, 2010 - 4:27 am
सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल. निकालापूर्वी व निकालानंतर करावयाच्या चर्चेसाठी हा धागा सुरु करत आहे.
दुवे:
Comments
माझ्या मते
निकालाचा रिलेव्हन्स ६ डिसेंबर १९९२ रोजी संपला. आता फक्त ऍकॅडमिक इंटरेस्ट.
(त्यानंतर ती भूमी सरकारने संपादित केल्याने आता जमिनीच्या किंमतीची नुकसानभरपाई कोणाला मिळणार एवढाच प्रश्न उरला असावा).
त्याहीपूर्वी चालू असलेल्या गदारोळातही या मालकी हक्काच्या दाव्यास काही महत्त्व होते असे वाटत नाही. मालकी हक्क मुसलमानांचा (म्हणजे कोणाचा हे माहिती नाही) आहे असे जाहीर/सिद्ध झाले असते तरी "हा श्रद्धेचा प्रश्न आहे" हा मुद्दा होताच. मालकी हक्क हिंदूंचा (म्हणजे कोणा महंताचा) आहे असे सिद्ध झाले असते तरी मशीद पाडून मंदिर बांधायला परवानगी मिळणे शक्य नव्हते.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
मुळात
रामजन्मभूमी न्यास व सुन्नी वक्फ़ बोर्ड यांना परस्परसहमतीने काही निर्णय घेणे अशक्य का झाले असावे हे समजत नाही. या खटल्यातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या निर्मोही आखाड्याने आता निकाल जाहीर न करता कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्यासाठी काही कालावधी द्यावा अशी 'बैल गेला आणि झोपा केला' पद्धतीची विनंती केली आहे.
उत्सुकता
निकालाबाबत उत्सुकता आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रश्न
"वन्स अ मॉस्क ऑल्वेज अ मॉस्क (=१९४७ सालीचा स्टेटस्को ठेवावा)" हे तत्त्व किंवा "१२ वर्षे विनावाद ताबा=मालकी" हे तत्त्व योग्य आहे काय?: होय.
'निकाल' उद्या संध्याकाळी चार नंतर!
निकाल काहीही लागो. मी बुवा, आजच उद्यासाठी ऑफिसमधून सुट्टी मागून घेतली. बर्याच कपड्यांना देखील इस्त्री करायची आहे, ते काम उरकता येईल.
-
एक भित्रा नागरीक
कपडे म्हणजे केवळ वस्त्रचिन्ह
कपडे म्हणजे केवळ वस्त्रचिन्ह असते. ते चुरगाळलेले असले तरी अंग झाकले गेले ना एवढेच महत्त्वाचे. उगाच इस्त्री बिस्त्री विनोदी कशाला वागता?
सुन्नी वक्फ़ बोर्डाचा दावा २-१ ने फेटाळला
नुकतेच टीवीवर पाहिले
रामजन्मभूमी
सध्या मूर्ती आहेत ती जागा रामजन्मभूमी मानण्यात यावी. वादग्रस्त जागेचे ३ भागांत विभाजन करुन, श्रीरामचंद्र-सीता, निर्मोही आखाडा व वक्फ़ बोर्ड यांना जागेचा प्रत्येकी १ हिस्सा मिळाला आहे. मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला
खुळचट
"रामाच्या मूर्ती चमत्काराने अवतीर्ण झाल्या" या गृहितकाला दुजोरा दिला आहे असा निष्कर्ष निघतो.
बाकी चालू द्या.
नाही
नाही.
आयडॉल्स वेअर प्लेस्ड इन् डिस्प्युटेड स्ट्रक्चर इन् डिसेम्बर १९४९. असे म्हटले आहे.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
वेगळा संदर्भ
हे सारे निकालात आहे.क्ष्
पुढची साठ वर्षे काळजी नाही
सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रीम कोर्टात जाणार आहे. म्हणजे पुढची साठ वर्षे तरी काळजी नाही. ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मूर्ख मटा
जय श्रीराम... हायकोर्टाचा निकाल
अशी हेडलाईन.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मटा
मटाने बातम्या द्यायचे बंद करून सरळ एक सॉफ्ट पॉर्न साइट चालू करावी. किंवा बातम्या देणे बंद करावे, तशी साइट चालू आहेच.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
काहीही
अर्धवट काहितरी ऐकून घाईघाईत बातमी लिहिल्यासारखं वाटतंय.
बालिशपणा
आधीच मान्य करते की निर्णयाचा पूर्ण अर्थ मला कळला असे नाहीये. पुढील मत माझ्या अल्पमतीप्रमाणे आहे.
अयोध्येमधील भूमीचे ३ भाग करणे हा निर्णयच अतिशय बालिशपणाचा वाटला. तीन लहान मुलांचे भांडण सोडवता येत नाही म्हणून खाऊचे ३ भाग करण्यासाठी उच्च न्यायालयाची गरज असेल असे वाटत नाही. साठ वर्षांची गरज तर नक्कीच नाही. असो.
हा निर्णय ऐकून कोठे दंगे पर्यायाने हिंसा होईल असे वाटत नाही कारण सगळेच फक्त गोंधळात पडले आहेत. त्यामुळे शांतता राखण्यात तरी या निर्णयाला यश मिळाले असे म्हणता येईल. त्यामुळे त्याचे स्वागतच आहे. (तसे पाहता निर्णयातले मुद्दे मोठ्या हुशारीने काही हिंदुंच्या बाजूने तर काही मुसलमानांच्या बाजूने दिले आहेत. पण त्याला निर्णय न म्हणता 'कॉम्प्रोमाईझ' म्हणावे असे वाटते.)
जर खरंच सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर आजच्या 'रामायणाला' काय म्हणायचे? म्हणजे पुन्हा तेच 'महाभारत' चालणार :-|
मला कळलेली कायदेशीर गम्मत
मला एक गंमतीदार शोध लागला आहे.
एका जमिनीच्या तुकड्यावर एका ठिकाणी नितिन थत्तेला बसवला आहे. त्यावर ती जमीन स्वतःची असल्याचे अनेकांचे दावे आहेत. दाव्याच्या सुनावणीत कोणीच काहीच पुरावे (जमिनीच्या मालकीचे) दाखवू शकले नाहीत.
निर्णय :
१. सगळे दावेदार जॉईंट ओनर समजून तेवढ्या भागात वाटणी करा.
२. पुरावे नसल्याने वहिवाटीनुसार नितिन थत्तेला जिथे बसवला आहे तेथून त्याला हटवायचे नाही. त्यामुळे भाग करताना 'ती' जागा नितिन थत्तेलाच मिळेल.
३. दोन हिंदू दावेदार आणि एक मुस्लिम दावेदार होते म्हणून तीन भाग केले. आठ हिंदू दावेदार आणि आणि दोन मुस्लिम दावेदार असते तर वाटणी दहा भागात होऊन चार पंचमांश हिंदूंना आणि एक पंचमांश मुसलमानांना मिळाला असता. उलट असते तर उलट झाले असते.
ज्याने 'रामलल्ला विराजमान' ला एक दावेदार केले तो देशातला सगळ्यात हुशार माणूस आहे. :)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
निकाल
आताच निकालाची २४ पानी समरी वाचली. काही मुद्दे नव्याने समजले ते असे.
ही मशीद बाबराने बांधली नसून मीर बाकीने बांधली. (बाबर शिया का सुनी मला माहीत नाही.)
मीर बाकी शिया होता. सुनी वक्फ बोर्ड हे शियांच्या मशीदीचे हक्कदार असू शकत नाही.
राममूर्ती ही एक दावेदार होती. कायद्या नुसार असे देव हे नेहमीसाठी अल्पवयीन असतात. (हे साहजिक आहे. पण गमतीदार वाटले.)
सुनी वक्फ बोर्डाचे बहुतेक सर्व दावे फेटाळले गेले.
जमीनीच्या वाटपाचा भाग यात मला दिसला नाही.
ही जमीन लॅन्डलॉक्ड होती. म्हणजे तेथे जाण्यासाठी हमरस्ता नव्हता. तर विविध मंदिरांमधून (?) तिकडे जावे लागत असे. (या कारणाने ती इस्लामनुसार मशीद नव्हती.)
आर्किऑलॉजिकल सर्वे नुसार मशीदीच्या जागी पुरातन धर्मस्थळ होते. (हा रिपोर्ट काहीच दिवसांपूर्वी मी जालावर पाहिला होता.)
प्रमोद
कोर्टाने काय विशेष केले?
१. रामलल्लाच्या मूर्ती बाबरी मशिदीत १९४९ साली ठेवल्या, हे कोर्टाने सिद्ध केले. १९४९ म्हणजे फार जुनी गोष्ट नाही, त्यावेळची वर्तमानपत्रे वाचून हे कोणालाही सिद्ध करता आले असते.
२. बाबरी मशीद ही बाबराने किंवा त्याच्या आज्ञेवरून बांधली गेली. हे इतिहासाच्या पुस्तकांमुळे सर्वांना माहीत होते.
३. ही मशीद देऊळ पाडून किंवा पडलेल्या देवळावर त्याच जागी बांधली. हेही इतिहासात नमूद केलेले होते. शिवाय, सर्व्हे ऑफ़ इंडियाने केलेल्या उत्खननातून हे आधीच माहीत झाले होते.
४. ही जागा रामाचे जन्मस्थान आहे हे कोर्टाने मान्य केले. म्हणजे पर्यायाने राम हा ऐतिहासिक पुरुष होता हेही.
कोर्टाने पहिल्या तीन गोष्टी मान्य करायला साठ वर्षे का घेतली? आणि शेवटी डोंगर पोखरून ३ उंदीर काढले. (चौथा नाही!) जमिनीचे तीन हिस्से करून ते सर्व दावेदारांना वाटावे असा चोंबडेपणाचा सल्ला कोर्टाने का द्यावा? त्यांचे काम फक्त रामाच्या जन्मासंबंधात निर्णय देण्याचे होते. बाकीच्या गोष्टी सर्वज्ञात होत्या.--वाचक्नवी
हायकोर्टाचा निकाल
रामजन्मभूमी-बाबरी मशीदीचा निकाल लागला आहे. अनेक अर्थाने हा निकाल वेगळा निकाल आहे. निकाल अतिशय गुंतागुंतीचा असला तरी मला समजलेला निकाल इथे मांडतो आहे जो सारांश असून अधिकृत दस्ताएवज नाही आणि पूर्ण सत्य असेलच असे नाही. उपक्रमींनी यातील चुका सुधाराव्यात अथवा पुरवणी जोडावी.
१. सध्या बाळ रामाची (रामलल्ला)ची मुर्ती जिथे आहे तीच रामाचे जन्मस्थळ आहे अशी बहुतांश हिंदुची भावना आहे आणि ते सत्य आहे.
२. या स्थळावर असणारी इमारत इस्लामच्या नियमांत बसत नसल्याने ती मशीद नाहि.
३. रामाची मुर्ती १९४९ मधे स्थापन करण्यात आली. त्याआधी ती मुर्ती तिथे नव्हती.
४. सध्याच्या इमारतीच्या जागी उत्तर भारतीय विशाल हिंदु मंदीराचे पुरावे ग्राह्य धरून असे मंदीर अस्तित्त्वात होते हे सिद्ध झाले आहे.
५. निर्मोही आखाडा व सुनी वक्फ बोर्ड दोघांचाही दावा (टायटल सुट) तांत्रिक कारणाने नामंजूर झाला आहे.
६. जागेचे तीन भाग करून एक निर्मोही आखाड्याला, एक बाळ रामाला आणि एक सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावा. जिथे रामाची मुर्ती आहे तो व आसपासचा परिसर बाळ रामाचा आहे तो अबाधित राखावा. संपूर्ण निकाल अलाहबाद कोर्टाच्या संस्थळावर उपलब्ध आहे.
मला वैयक्तीकरित्या काढलेला तोडगा योग्य वाटतो आहे व त्याची अंमलबजावणी व्हावी असे वाटते. मात्र टायटल सुट वर निकाल न देता न्यायालयाने असा मध्यममार्गी तोडगा काढण्याचे काम केलेले बघुन थोडे आश्चर्यही वाटते आहे.
या निकालामुळे मला काही प्रश्न पडले आहेत, त्यावर चर्चा अपेक्षित आहे.
१) बाळ राम (रामलल्ला) यास कोर्टाने १/३ जागा दिली आहे. राम प्रत्यक्षात अस्तित्त्वात होता इतकेच नव्हे तर त्यास अजूनही भारतीय जमिनीवर मालमत्ता करण्याचा अधिकार कोर्टाने मान्य केला आहे. हे तुम्हाला योग्य वाटते का?
२) निर्मोही आखाडा व सुनी वक्फ बोर्ड दोघांचाही दावा (टायटल सुट) तांत्रिक कारणाने नामंजूर झाला. मात्र कोर्ट तिथेच न थांबता कोर्टाने चक्क एक तोडगा सुचवला ज्याची मागणी कोणीच केली नव्हती. हे तुम्हाला योग्य वाटते का?
३) एखाया जागी एखादी समाजासाठी पूजनीय मूर्ती ठेवली गेल्यावर किंवा एखादी व्यक्ती बसल्यावर ती केवळ तिथे आहे म्हणून त्या जमिनीचा अधिकार त्या व्यक्तीस देणे आपणास योग्य आटते का?
टिपः उपक्रम प्रशासनास विनंती की जर हा प्रस्ताव जर कायद्याच्या दृष्टीने हानिकारक वाटला तर कोणत्याही सुचनेशिवाय उडवल्यास अजिबात हरकत नाही. सर्व सदस्यांनी माननीय न्यायालयाचा अपमान होणार नाही हे लक्षात घेऊन मते नोंदवावीत
उत्तरे
मुळात, मशीद म्हणणे इस्लामच्या नियमांत बसते की नाही हा मुद्दाच होऊ शकत नाही. भारतात कोर्टे ही धर्मांची राखणदार नाहीत. हिंदू धर्मात बसते तरीही अस्पृश्यतेवर बंदी आहे; तीच बाब वारसाहक्क, सती, स्त्रीशिक्षण, समुद्रोल्लंघन, इ. ची आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी 'वास्तू' आणि जमिनीचे वेगवेगळे भाग ज्यांच्या-ज्यांच्या ताब्यात होते त्यांना न्याय देणे इतकीच न्यायालयाची कार्याची सीमा हवी होती. (ब्रिटिशांनी पाकिस्तान निर्माण केला तेही समजा न्यायालयाला पटले नाही तरी काय फरक पडतो? तद्वतच, ब्रिटिशांनी तेथे जी परिस्थिती बनविली होती तिला आधार धरूनच न्यायदान केले पाहिजे.)
एकदम कबूल.
एखादी मशीद इस्लामच्या नियमांत बसते की नाही हा मुद्दाच होऊ शकत नाही. एकदम कबूल. हिंदूंचे एखादे मंदिर वास्तूशास्त्राला धरून बांधलेले नाही, असा कोणा तथाकथित वास्तूशास्त्र्याला साक्षात्कार झाला, तर कोर्टाने काय करावे? मंदिर बेकायदेशीर ठरवावे, की दंड वसूल करून नियमित करावे? --वाचक्नवी
अरेच्या
या साठी आधीच एक धागा आहे. पुन्हा तोच विषय चर्चेसाठी घेतल्याबद्द्ल क्षमस्व. योग्य ती कारवाई करावी
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
योग्य आणि अयोग्य
राम प्रत्यक्षात अस्तित्त्वात होता इतकेच नव्हे तर त्यास अजूनही भारतीय जमिनीवर मालमत्ता करण्याचा अधिकार कोर्टाने मान्य केला आहे. हे तुम्हाला योग्य वाटते का? कोर्टाच्या मते राम अस्तित्वात असला पाहिजे. निदान भूतकाळात. त्यामुळे जमीन त्याच्या वारसदारांना मिळाली असेल.
तिथेच न थांबता कोर्टाने चक्क एक तोडगा सुचवला ज्याची मागणी कोणीच केली नव्हती. हे तुम्हाला योग्य वाटते का? नाही, कोर्टाने असले फालतू सल्ले द्यायचे कारण नव्हते. समाजात शांतता राखणे हे कोर्टाचे काम नाही. कोर्टाचे निकाल परखड असले पाहिजेत, गुळमुळीत नकोत.
एखाद्या जागी एखादी समाजासाठी पूजनीय मूर्ती ठेवली गेल्यावर किंवा एखादी व्यक्ती बसल्यावर ती केवळ तिथे आहे म्हणून त्या जमिनीचा अधिकार त्या व्यक्तीस देणे आपणास योग्य वाटते का? नाही, त्यासाठी ती जागा त्या व्यक्तीची आहे हे सिद्ध केलेले असले पाहिजे.--वाचक्नवी
हम्म..
१. यासाठी कोणते पुरावे लक्षात घेतले हे बघायला आवडेल.
२. कोर्टाने दंगल/जाळपोळ टाळण्यासाठी तडजोड केली आहे असे वाटते. असे करायला नको होते असे वाटते पण रोखठोक निकाल शांतपणे, जिवित आणि मालमत्ता हानी न करता स्वीकारण्याइतका आपला समाज प्रगल्भ नाही हा पूर्वानुभव लक्षात घेतला असावा असे वाटते.
३. नाही. यासाठीही कोणता आधार घेतला हे जाणून घ्यायला आवडेल.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
रामलल्ला
बाळरामाला व्यक्ति म्हणून मान्यता देणे सयुक्तिक आहे असे मला वाटते.
भारतातील कित्येक देवळांच्या मालकीचा कायेदेशीर इतिहास नाही (नसावा हे जास्त सयुक्तिक आहे). (उदा. पंढरपूर, बुद्धगया, काळाराम). त्याच्या मालकीविषयी वाद होऊ शकतात. शिवाय सध्याचे मालक पूर्ण मालकी आहे या थाटात वाटेल ती मनमानी करू शकते. अशी उदाहरणे कमी नाहीत. उदा. पंढरपूरचे देवस्थान काही जणांना वारसाहक्काने पूजण्यास मिळाले. (हा मालकी हक्क नाही.) या वारसाहक्काचा वापर करून, कोणी किती दक्षिणा द्यायची, कोणी दर्शन घ्यायचे (अस्पृश्यविषयक) अशा पद्धतीची मनमानी चालू होती (आहे?).
हिंदू समाजात चर्च/मशीद/गुरुद्वारा सारखी एक संस्था नाही की जी मंदीराची मालक आहे. कित्येक ठिकाणी स्थानिकांच्या पुढाकाराने ट्र्स्ट मंदिराचा मालक असल्यागत व्यवहार करतो. अशा ट्रस्टचे कोण ट्रस्टी होणार यासंदर्भात लोकशाही (भक्तांची) नियंत्रणात्मक परिस्थिती नसते. (उदा. शिरडीचा ट्रस्टी ही मोठी असामी असते.) अशा परिस्थितीत भक्तांच्या कायदेशीर हक्का (पूजण्याच्या) बद्दल कसे बोलता येईल? हा प्रश्न ध्यानात घेतला तर देवाचा हक्क असे रुपक देता येते. (देव आहे म्हणून भक्त आहे.)
या उलट चर्च/मशीदीचे मालक असल्याने ते मालक त्याजागेचा व्यवहार करून कुठल्या बिल्डरला विकू शकतात. (अमेरिकेत चर्चच्या वास्तुत आज गुत्ता चालतो असे काहीसे वाचले होते.) असा व्यवहार करणे कायदेशीररित्या वा धार्मिकरित्या करणे तिकडे शक्य आहे.
कोर्टाने रामलल्लाला व्यक्ति म्हणून मान्यता देणे हे म्हणून सयुक्तिक आहे. असा देव नेहमीच कायदेशीर रित्या अल्पवयीन असतो (कारण तो काहीच व्यक्त करू शकत नाही). ही थोडीशी पी.आय.एल. सारखी भानगड झाली. (देव अल्पवयीन आहे. माझ्या भक्तिआड कोणी येऊ नये. तेव्हा कोणी आले तर मला फिर्याद करता येईल.)
यावरचा दुसरा उपाय म्हणजे मंदिरांचे सरकारीकरण करणे. जे आंध्रप्रदेश सरकारने पूर्वीच केले. (बालाजी मंदीरातील येणार्या पैशाच्या आशेने.) पण असे करणे सरकारच्या निधर्मीपणास बाधा आणते. (त्याची काळजी कुणालाही नसते ही गोष्ट वेगळी.) किंवा हिंदूंची एक सामायिक संस्था करून तिला हे हक्क देणे. विश्वहिंदू परिषदेचे हे एक उद्दीष्ट असावे. अर्थात त्यासही फारसे यश नाही.
प्रमोद
पटले नाही
अजिंठा वेरूळ येथेही देवांच्या, विभूतींच्या मूर्ती/चित्रे आहेत. त्यांना वंदन करण्यासही बंदी नाही. (दमटपणा जमून चित्रांवर परिणाम होऊ नये, इ कारणांनी) गर्दीचे नियंत्रण करणे, स्वच्छता राखणे, इतकी काळजी घेतल्यास सरकारचा निधर्मीपणा टिकवूनही सरकारीकरण करता येते.
अयोध्येची वास्तू जर आधीपासूनच सरकारी मालकीची असेल तर तिचा वापर एका धर्मासाठी करणे हा पक्षपात (असमभाव) आहे. तेथे प्रसाद सेवनास अनुमति असेल पण हॉटडॉग खाण्यास बंदी येईल, कपडे कोणते घालावे त्याचे निराधार नियम येतील (प्रयोगशाळा, रुग्णालये येथे खास कपडे घालण्याचे नियम करण्यामागे उपयोगितावादी कारणे द्यावी लागतात). शिवाय, ताबा एका इन्स्टिट्यूशनकडे (उदा. बडवे) सोपविणे हा तर धार्मिक पुरोगाम्यांच्या दृष्टीनेही नैतिक अधःपात आहे.
समजा सरकारी मालकीची एखादी वास्तू भूकंपाने पडली असती तर मग ती पुन्हा बांधावी की त्या जागेचा इतर काही उपयोग करावा हा 'पॉलिसी निर्णय' असतो. त्याचप्रमाणे, मशीदसदृश सरकारी इमारत लोकांनी पाडली आणि तेथे मूर्ती ठेवल्या तर त्या लोकांना शिक्षा देणे इतकीच न्यायालयाची जवाबदारी उरते. त्या मूर्तींचे आणि जमिनीचे पुढे काय करावे ते सरकारनेच ठरवावे. इमारतीचे संरक्षण करण्यात सरकारने पुरेशी काळजी घेतली नसल्याचे जर सिद्ध झाले तर ती इमारत पुन्हा बांधून देण्याचे न्यायालयीन आदेश कदाचित योग्य ठरू शकतील. इमारत बांधण्याची कृती ही मुस्लिमांप्रति नुकसानभरपाई नसून कायदा आणि सुव्यवस्था पालनाच्या स्वतःच्या कटिबध्दतेची ग्वाही म्हणून घेतलेले ते प्रायश्चित्त असेल.
काय पटले नाही हे कळले नाही.
मुळात अजिंठा (वेरुळ नसावे) हे निधर्मी स्थान आहे. त्यावर सरकारची मालकी आहे.
अयोध्येतील जमीन सरकारची कधीच नव्हती (निदान १९९३ पर्यंत). तिचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी हा दावा होता.
शिवाय, ताबा एका इन्स्टिट्यूशनकडे (उदा. बडवे) सोपविणे हा तर धार्मिक पुरोगाम्यांच्या दृष्टीनेही नैतिक अधःपात आहे.
हे मान्य. जेव्हा परंपरागत तो बडव्यांकडे (वा तत्सम लोकांकडे असतो.) तेव्हा भाविकाचा काही अधिकार असतो. जो मूर्तीला कायदेशीर मानून कोर्ट देते.
तुम्हाला नेमके काय पटले नाही हे कळले नाही.
प्रमोद
ठीक
माझा समज होता की कोणत्याही पक्षाचा मालकी हक्क नसल्यामुळे सरकारी जमिनीचे त्रिभाजन झाले. जर १९९२ पर्यंत ती सुन्नी वक्फ कडे असती तर ती जमीन बोर्डालाच द्यावी लागली असती असे मला वाटते.
जर मालकी खासगी असेल तर अस्पृश्यतेलाही बंदी घालता येत नाही असे मला वाटते, मालकी सरकारी असेल तर निधर्मी सरकारीकरण (अजिंठ्यासारखे) योग्य वाटते.
'पूजा करण्याचा हक्क' ही कल्पना (आणि अनुषंगाने देव ही एंटिटी) पटली नाही. अतिक्रमणे करण्यासाठी हा युक्तिवाद वापरला जातो पण त्याला मान्यता नाही.
असे असावे
जमीन कोणाचीच नाही (म्हणजे कागदोपत्री कोणाच्याच नावावर नाही) म्हणजे ती आपोआप सरकारी होत नसावी.
'ती' जागा चा फैसला बहुधा वहिवाटीनुसार झाला आहे. अन्यथा त्याचा काही पुरावा ए एस् आय ही देऊ शकेल असे मला वाटत नाही.
दुसरे म्हणजे सरकारी जमीन जरी असती तरी ३० वर्षे ती एखाद्याच्या कब्जात (ऍडव्हर्स पझेशन) असेल तर ती त्याची होऊ शकते.
(हा नियम लागू व्हायला निकाल ३० वर्षांत लागायला हवा असे वाटते. अन्यथा न्यायालयीन दिरंगाईने वहिवाट निर्माण होईल. जशी इथे झाली आहे).
'त्या' जागेवर वहिवाट निर्माण होण्यास कारण १९४९ मध्ये 'स्टेटस् को अन्टे' आणण्यातले तत्कालीन उप्र सरकारचे अपयश हे आहे.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
वहिवाट
दुसरे म्हणजे सरकारी जमीन जरी असती तरी ३० वर्षे ती एखाद्याच्या कब्जात (ऍडव्हर्स पझेशन) असेल तर ती त्याची होऊ शकते.
(हा नियम लागू व्हायला निकाल ३० वर्षांत लागायला हवा असे वाटते. अन्यथा न्यायालयीन दिरंगाईने वहिवाट निर्माण होईल. जशी इथे झाली आहे).
मला वाटते हा नीयम नसावा. तर अन्य काही मार्गाने तोडगा निघत नसल्यावर हा नियम वापरात येत असावा. अन्यथा भाऊबंदकींचे झगडे वर्षानुवर्षे चालले नसते.
कदाचित मी एक जमीन विकत घेतली. मात्र स्वतःच्या नावावर करून घेतली नाही. त्यानंतर ३० वर्षांनी विकणार्या व्यक्तिने त्यावर दावा केला आणि सांगितले की ३० वर्षापूर्वी ही जमीन माझ्या कडून बळजबरीने घेतली होती. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत हा नियम लागू असावा.
'त्या' जागेवर वहिवाट निर्माण होण्यास कारण १९४९ मध्ये 'स्टेटस् को अन्टे' आणण्यातले तत्कालीन उप्र सरकारचे अपयश हे आहे.
१९४९ पासून वहीवाट झालीच नाही. त्यावेळी वादग्रस्त जागेवर कुलुप लावण्यात लावलेले होते. जी वहिवाट होती ती १८५५ पूर्वीपासून होती असे कोर्ट म्हणते आहे.
प्रमोद
निकालपत्र
हे निकालपत्र यावर चांगले भाष्य करते.
एकाच वेळी (निदान १८५५ सालापूर्वीपासून) दोनही धर्मांचे लोक पूजा अर्चा करत होते. यातील एक भाग निर्मोही आखाड्याच्या ताब्यात होता. या ताब्याव्यतिरिक्त मालकीहक्काचा पुरावा आढळला नाही. (कोणीही सिद्ध करू शकले नाही.)
मला समजलेला इतिहास असा. १५२८ मशीद बांधली. (ऐतिहासिक पुरावा) त्याजागेवर भग्नावशेषात वा पूजावस्थेतील देऊळ होते. (ए.एस्.आय चा पुरावा.)
१८५५ साली तिथेच रामचबुतरा आणि सीताकी रसोई अस्तित्वात होती. मालकीचा वाद होत असे. (ही माझी माहिती आहे.)
१९४९ साली लोकांनी बळजबरीने राममूर्ती प्रस्थापित केली. वाद सुरु झाला. वक्फ बोर्ड कोर्टात गेले.
१९८७ पर्यंत वादामुळे वास्तु बंद करून ठेवली होती.
१९८७ मधे (साल +-१) पुढे कोर्टाच्या आदेशानुसार रामचबुतर्यावर लोकांना पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली.
जर मालकी खासगी असेल तर अस्पृश्यतेलाही बंदी घालता येत नाही असे मला वाटते, मालकी सरकारी असेल तर निधर्मी सरकारीकरण (अजिंठ्यासारखे) योग्य वाटते.
कित्येक मंदिरांवर कोणाचीच मालकी प्रस्थापित होत नाही. (बांधले त्याच्या पैशाने, जमीन त्याच्या मालकीची वगैरे) बडव्यांना फक्त पुरोहितपण वंशपरंपरागत मिळते. आता अशा देवळांवर मालकी कोणाची? तर ती सामान्य भाविकांची. जो कधीही येऊन तेथे पूजा करतच होता. (हा वहिवाटीचा हक्क झाला.)
'पूजा करण्याचा हक्क' ही कल्पना (आणि अनुषंगाने देव ही एंटिटी) पटली नाही. अतिक्रमणे करण्यासाठी हा युक्तिवाद वापरला जातो पण त्याला मान्यता नाही.
पूजा करण्याचा हक्क हा वहिवाटीचा आहे. नवीन मंदीर करून तेथे पूजा करण्याचा हक्क प्रस्थापित होत नाही. (अतिक्रमणे कायदेशीर नसतात.)
मात्र वहिवाटीचा हक्क हा कायद्याला मान्य आहे. त्याचे रूपक देवाला व्यक्तित्व देण्यात आहे.
प्रमोद
एक सुधारणा
१९४९ मधे वक्फ बोर्ड कोर्टात गेले नाही. इतकेच काय वक्फ बोर्ड कोर्टात यानंतर सहा वर्षाच्या आत गेले नाही. म्हणूनच त्याचा सुट रिजेक्ट केला गेला आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मॅटर्स ऑफ फॅक्ट मान्यच
सहमत
सहमत आहे.
१९४९ आणि १९९२ च्या दोन्ही कृती मान्य केल्या गेल्यासारखे आहे.
प्रिसिडंट पडतो आहे हे मान्य नाही.
अयोध्या वगळता इतर प्रार्थनास्थळे १९४७च्या स्टेटस को मध्ये राहतील असा कायदा पास झालेला आहे. त्याचा उल्लेख संघातर्फेही करण्यात आला आहे.
अर्थात हा कायदा घटनाबाह्य आहे का कसे हे माहिती नाही.
जुन्या मंदिराचे अवशेष खाली आहेत असे असले तरी सोळाव्या शतकात अस्तित्वात असलेले मंदिर पाडून मशीद बांधली होती का हे कुठे स्पष्ट झाले आहे असे वाटत नाही. पण संबंधित पार्ट्यांच्या दृष्टीने हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसावा.
बाकी ४००-५०० वर्षापूर्वी घडलेल्या घटना विसरून आम्ही "मूव्ह ऑन" करू शकलो नाही तर १८ वर्षांपूर्वीची घटना विसरून "मूव्ह ऑन" कसे व्हायचे हे कळत नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
फरक
एका धर्माचे स्थळ 'श्रद्धेचा आधार घेऊन' दुसर्या धर्मात बदलण्यावर प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्यामुळे बंदी आली आहे. परंतु निधर्मी स्थळांवर (उदा वक्फ बोर्डाने गमावलेली जमीन) कब्जा करण्याविरुद्ध त्यात काहीच 'रेमेडी' नाही. न्यायालयाने रामलल्लाचे अस्तित्व मानण्यासाठी काही जुन्या प्रिसिडंटचा वापर केला आहे. ते सारेच निर्णय सेक्युलॅरिजमचे शत्रू विरोधात आहेत.
पॉइंट! शिया आणि सुन्नी असे फरक न्यायालयाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत पण आजचे हिंदुत्ववादी मात्र ४००-५०० वर्षांपूर्वीच्या हिंदूंचे डायरेक्ट वारस आहेत!
वहिवाट
एखाद्या शेतातून लोक जा ये करत असतील. आणि शेतकर्याला त्या जाण्यायेण्याबद्दल आक्षेप नसतील. तर कालांतराने हा खाजगी मालकीतील रस्ता वहिवाटीचा रस्ता बनू शकतो. अशाच गोष्टी खाजगी जागेतील मंदीरासाठी असू शकतो. हा हक्क कोणा कुटुंबाचा वा कंपनीचा नसतो. तर सर्वांचा असतो.
1.वहिवाटीचा हक्क हा परमिसिव असतो, पूजा करण्याचा हक्क हा एक्सक्लुजिव लागतो (नमाज नको, सोवळे हवे).
पूजा करण्याचा वहिवाटीचा हक्क एक्सक्लुजिव नसावा. मात्र पूजा कशी करावी यात जी वहिवाट असेल तीच कायम ठेवावी हे म्हणणे साहजिक आहे.
'ती जमीन सरकारजमा व्हायला हवी होती. आणि तसे न झाल्याने निधर्मी लोकांवर अन्याय झाला आहे.' (असे तुमचे म्हणणे.)
कोर्टाने असे म्हटले आहे. की तीन दावेदार होते. तिघेही आपला वापर सिद्ध करू शकले पण आपला मालकीहक्क सिद्ध करू शकले नाहीत.
अशा वेळी निधर्मी लोक (किंवा अजून काही जण) दावेदार बनू शकत नाही असे मला वाटते.
प्रत्येक न्यायमूर्तींनी वेगवेगळा निकाल दिला आहे. त्यामुळे १९४९ ची कृती कायदेशीर ठरते असा अर्थ निघतो (मला वाटते की एकाच न्यायमूर्तीचे तसे म्हणणे आहे.)
१९९२ ची कृती न्यायालयाने जस्टीफाय केली नाही.
प्रमोद
ठीक
"रस्ता पूर्वी वापरत होतो म्हणून आजही वापर करू द्या" ही मागणी एखादी व्यक्ती करू शकते, तो रस्ता' सार्वजनिक' होतो की नाही ते मला माहिती नाही.
रस्त्याची वहिवाट, सूर्यप्रकाश/हवा/पाणी मिळविण्याची वहिवाट, इ. प्रकार विकिपीडियावर दिले आहेत. वहिवाटीच्या जागेवर जाऊन केवळ विशिष्ट कृती करण्याचीच अनुमती असते काय?
पण "तीनच दावेदार होते" हे विधानच मला पटले नाही. जर कोणाचाही दावा सिद्ध झाला नाही तर सरकार हे बाय डीफॉल्ट दावेदार नको का? "घुमटाखालील जागेवर, 'रामलल्लाविषयीची श्रद्धा' आणि 'सरकारची मालकी (अश्रद्ध लोकांचे मत)' हे दोन दावे होते" असे वर्णन अधिक योग्य ठरेल. असा दावा करण्यासाठी सरकारला ६ वर्षांच्या मुदतीचे बंधनही पडणार नाही असे मला वाटते.
तोडगा
न्यायमूर्ती सिबघत उल्लाह खान यांचे निकालपत्र वाचल्यावर १/३ तोडगा योग्य वाटतो.
त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीही जागेवरचा हक्क शाबित करू शकले नाही. त्यामुळे कायद्यानुसार जमीनीचे सामायिक मालक होतात.
मुख्य निकालपत्रात वाटणीची गोष्ट केली आहे. कोर्टाचे म्हणणे (पूर्वीचे मंदीर नंतरची मशीद) मान्य केले तर अमुकजागा अमुक मालकाला द्या हा निकाल देखील योग्य आहे.
प्रमोद
शंका
१२ वर्षे (विनावाद) ताबा नसेल तर हक्क सरकारजमा होतो ना?
असा कायदा आहे का?
बिनावाद ताबा मालकी बनणे यासाठी कुठला कायदा आहे हे माहित नाही.
बहुदा नसावा. वहिवाटीचा हक्क (मालकी हक्क नव्हे) जो ती गोष्ट वापरतो त्यासाठी असतो असे काहीसे वाचले आहे.
या केसमधे बिनावाद कधीच नव्हता त्यामुळे हा कायदा (असल्यासही) गैरलागू ठरेल.
प्रमोद
उल्लेख
असे मुस्लिम बोर्डाच्या १९६१ सालीच्या अर्जावरील निकालात दिले आहे.
ताबा आधीच सोडला होता असा न्यायालयाचा निष्कर्ष आहे असे वाटते.
जर १९४९ च्या आधीच ताबा गमावला असेल तर १९६१ सालीचा अर्ज टाईमबार होतो, १९६१ च्या आधी केवळ पूजा करण्याविषयीचे हिंदू पक्षांचे अर्ज आले होते, मालकीचा पहिला अर्ज बोर्डाने १९६१ साली केला आणि तो आता नाकारला गेला आहे.क्ष्
आपणही वाटा मागावा
अर्ज जर मुदतबाह्य झाले असतील तर जमिनीचा तुकडा वक्फ़ बोर्डाला किंवा अन्य कोणालाही कसा देऊ केला? जमिनीची मागणी जर दहा जणांनी केली असती, तर दहा वाटण्या केल्या असत्या का? असे वाचले होते की, नवबौद्धांच्या मते तिथे बुद्धमंदिर होते आणि ते पाडून रामाचे देऊळ बांधले. त्यांनी जर (मुदत संपल्यानंतर) आता मागणी केली तर त्यांना वाटा मिळेल का? मिळणार असेल तर आपणही वाटा मागून पहावा. --वाचक्नवी
मुस्लिमांच्या प्रतिक्रिया
मुस्लिमांच्या प्रतिक्रियाही जरुर वाचाव्यात- मला त्या आवडल्या- बहुतेकांनी शांती ठेवण्याचे आवाहन केले आहे. पहील्या पानावरील फोटो तर अप्रतिम आहेत
कुठला फोटो
कुठला फोटो .
दुवे
हा दुवा
आणि हा दुवा
मुसलमानांच्या प्रतिक्रिया
कोर्टाने हिंदूंना जमीन देऊ केल्याचे कुणालाच आवडलेले दिसले नाही. ती मशीद मुळात मशीद नव्हती हेही कुणाला पटलेले नसावे. -वाचक्नवी
हे दु:खद आहे.
निकालाबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. कारण हा अंतिम निकाल नव्हे याची जाणिव आहे.
पण निकाल सविस्तरपणे वाचताना असे लक्षात आले की इतका महत्त्वाचा खटला अनेकांनी गंभीरपणे घेतलेला दिसत नाही.
निकालपत्रात अक्षम्य मुद्रणदोष आहेत.
१८५७ च्या जागी १९५७ असे छापलेले आहे.(Awadh was annexed by the Britishers or immediately
after 1957 war of independence (called mutiny by Britishers.))
ए एस आय च्या रिपोर्टावर भाष्य करणारे 'तज्ञ' तो नीट वाचत नाहीत. (कर्सरी - वरवरचे
वाचन). अशा वाचनातून दिलेली मते ते न्यायालयापुढे ठेवतात. अमुक घटना झाली तेव्हा कोण राज्यावर होते त्याचीही त्यांना
धड माहिती नाही.
जसे वाचावे तितके दोष सापडत जातील.
अरेरे! भारतीयांचा ढिसाळपणा कुठेकुठे दिसणार आहे? (राष्ट्रकुल स्पर्धा किंवा हा खटला)
अगदी खरे
अलाहाबाद हायकोर्टाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या या निकालपत्रात नुसते मुद्रणदोषच नाहीत, तर त्यातले इंग्रजी काही ठिकाणी अत्यंत गचाळ आहे.
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून ही अपेक्षा नव्हती.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा मूळ अहवाल कुठे वाचायला मिळाला? तो आधीच प्रकाशित झाला होता की आत्तापर्यंत ’गुप्त’ होता?
कोर्टाच्या निकालात १२९ व्या पृष्ठापासून १३१व्या पृष्ठापर्यंत पुरातत्त्वखात्याच्या अहवालाचा सारांश आलेला आहे. पण वर्तमानपत्रात छापून आलेले काही तपशील त्यात समाविष्ट नाहीत.---वाचक्नवी
अहवाल
भारतीय पुरातत्व खात्याच्या संक्षिप्त अहवालाचा हा एक दुवा.
प्रमोद