एक प्रयत्न --माहिती तंत्रज्ञान प्रतिशब्दांसाठि
जालावर फिरता फिरता मला काही वापरता येण्याजोगे प्रतिशब्द सुचले....आधी वापरले गेले आहेत् का मला माहिती नाहि आणि वापरता येण्याजोगे आहेत् का ते तुम्हीच् ठरवा!!!
Internet- संकेत गुंता/ वीण ..........जालावर फिरताना आपण हाताच्या चिन्हाखाली असलेल्या संकेतांवर अवलंबून असतो. गुंता या शब्दापेक्षा मला वीण हा शब्द बरा वाटतोय्...कारण् या
संकेतांची एक् सुंदर् वीण गुंफलेली असते..
blog- संकेतकट्टा
web page-संकेतपान
web address-संकेतपत्ता
browsing-संकेतस्वार होणे
website-सांकेतिका & pornographic site-बिभत्सिका
hacking- संकेतहरण.................अपहरणासारखेच्!!!
hang- असंवेदनिक् .............त्यानंतर् संगणकाला काहिही संवेदना नसते.
mouse-दर्शवाटाड्या .................दर्शक +वाटाड्या..............दर्शाड्या????
keyboard-टंकक
touch screen- स्पर्शसंवेदनिका (touch pen? --स्पर्शलेखणी )
CPU-माहिती संचलन केंद्र
hardware-बहिर्धाने...............साधने या शब्दवरून्
software- अंतर्धाने.................बहिर्धाने बाहेरुन् दिसतात अंतर्धानांचे अंतर्गत कार्य चालु असते....!!?#@***???
मराठिची एवढी जाणकार नसल्याने बर्याच् बाबतीत हा प्रयत्न हास्यास्पद झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुधारणा जरूर करा.
Comments
हे
हे लाल अक्षरात कशासाठी?
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
ये लाल रंग...
कारण धोका...........त्या वाटेला जाऊ नये. दोन हाडं आणि एक कवटीसुध्धा देता आली असती तर् बर होत..किंवा नो एन्ट्रि ...माफ करा, प्रवेश निषिद्ध
कळ्ळं का??
यावर
यावर बरीच चर्चा होऊ शकते पण धागा भरकटेल म्हणून नको.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
ठीक आहे
प्रयत्न म्हणून ठीक आहे. आंतरजाल, संकेतस्थल वगैरे शब्द आता बर्यापैकी रूढ झालेले आहेत त्यांना पर्याय कशासाठी? अनेक शब्द ओढूनताणून आणल्यासारखे आहेत बघूया लोक वापरतात का? प्रयत्नाबद्दल अभिनंदन
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
आभार
प्रतिक्रियेबद्दल पुन्हा आभार!!
>> आंतरजाल, संकेतस्थल वगैरे शब्द आता बर्यापैकी रूढ झालेले आहेत त्यांना पर्याय कशासाठी?
एकाच अर्थाचे अनेक शब्द असण्यास कहिही हरकत नसावी. मराठीत असे अनेक शब्द आहेत.
संवाद
>>एकाच अर्थाचे अनेक शब्द असण्यास कहिही हरकत नसावी. मराठीत असे अनेक शब्द आहेत.
कुठेतरी वाचलेला संवाद :-)
प्र- भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द का असतात?
उ- कारण मूर्ख लोक भाषेचा वापर करतात. ते वेगवेगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजतात.
प्र- भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ का असतात?
उ- कारण चतुर लोक भाषेचा वापर करतात. ते एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत असे भासवतात.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
आहे मजा....
हिच् तर जगण्यातिल गंमत् आहे!! ---एकतेत विविधता, आणि अनेकतेत एकता!! (कपूर नव्हे.)
>>कुठेतरी वाचलेला संवाद :-)
कुठेतरि म्हणजे नेमका कुठे ते समजेल् का?? मी पण् वाचेन ते पुस्तक ..रोचक दिसतय्!!
एकाच अर्थाचे अनेक शब्द
कुठल्याही भाषेत तंतोतंत एकाच अर्थाचे दोन शब्द सहसा नसतात, असे रोजेच्या थेसोरसच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, असे आठवते. या विषयावर उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली आहे.
प्रस्थापित झालेले शब्द उचकटून त्या जागी नवे शब्द, कितीही यथार्थ असले तरी, चिकटवण्यात काही खास फायदा आहे असे वाटत नाही.--वाचक्नवी
क्षमेचि याचना
प्रस्थापितांना धक्का दिल्याबद्दल् क्षमस्व!! चांगल्या गोष्टी उचकटायची माझी मुळीच् ईच्छा नाही..