श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य

कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला.

डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला. त्यांच्या विषयी आधीक येथे.

हा माहीतीपट त्यांनी का काढला हे त्यांच्याच शब्दात.

३४ मिनिटे २५ सेकंदाचा हा माहीतीपट

Krishna: History or Myth from Saraswati Films on Vimeo.

उपक्रमावरच्या जाणकारांचे यावर काय म्हणणे आहे ऐकण्यास उत्सुक!

Comments

सध्या

सध्या असा विषय पथ्य म्हणुन बाळगतो. पण लहानपणी हा प्रश्न मला फार पडे!
एकतर अगोदर विंग्रजी त्यातुन चलतचित्र कनेक्शन ६४कबपस कसे काय दिसणार आणि समजनार?
प्रकाश घाटपांडे

आमचेही

आमचेही कनेक्शन अर्धा तास चित्रफित बघण्याइतके सशक्त नाही. सबब प्रश्न पास. :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

राम

हाच प्रश्न रामाबद्दल विचारता येईल. नेहमी भाष्य केले जाते कि राम वा कृष्ण होते कि नव्हते या पेक्षा तशी कोट्यावधी भारतीयांची श्रद्धा आहे हे मानुन चालू या.
प्रकाश घाटपांडे

:-)

भारतीय समाज, आपल्या चालीरीती समजुती, हिंदू धर्म, ग्रंथ तसेच पुरातत्वशास्त्र, ग्रहतार्‍यांची स्थिती व त्याचे महाभारतातील वर्णन इ इ सगळ्याचा उहापोह केला आहे. मला हे लिहायला अवघड आहे त्यामुळे नंतर वेळ होइल तसा हा माहीतीपट बघणेच योग्य होइल.

>हे मानुन चालू या.
त्याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. हॉस्टेलवर एका मित्राच्या खोलीत एक मस्त वाक्य लिहले होते. आलात आनंद, बसलात अत्यानंद, गेलात परमानंद!

आलाच नाहीत तर ब्रह्मानंद

आलात आनंद, बसलात अत्यानंद, गेलात परमानंद!

आमच्या रुममध्येही असे वाक्य होते. पुढे 'आलाच नाहीत तर ब्रह्मानंद' अशी पुस्ती जोडली होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आनंदीआनंद गडे

आनंद, परमानंद, ब्रह्मानंद आणि अत्यानंदासोबत नित्यानंदाचेही नाव घ्यायला/यायला हवे. नित्यानंद कुठे गेले?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

देजावू

पंडित यांच्यावर कोठेतरी चर्चा वाचल्याचे आठवते आहे. पंडित हे इस्कॉनचे आहेत म्हणून त्यांना चर्चेशिवायच डिसमिस केले पाहिजे.

इस्कॉनचे जेवण चांगले असते

आमच्या हॉस्टेलवर इस्कॉनची एक शाखा होती. तिथे गुरुवारी चांगले जेवण (फुकट) मिळत असे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आमच्याही

त्या जेवणाच्या लोभानेच माझे काही मित्र रोज सक्काळी मंत्र म्हणायला जात.

गुरुवार हा दत्ताचा वार

गुरुवार हा दत्ताचा वार असूनही त्या दिवशी कृष्णाच्या प्रेमाने जेवण देणे यामागचा संबंध समजला नाही. आमच्याकडे मंत्र म्हणायची सक्ती नव्हती त्यामुळे केवळ जेवण केले तरी चालायचे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काथ्याकुटाला अजुन एक विषय

काथ्याकुटाला विषय. महाभारतकाल हा इसवीसनाच्या तीन हजार वर्षे ते अजुन जुना अशी माहीती विविध अभ्यासकांकडून कळते. कोणास काय ठावूक इतक्या जुन्या काळात काय होते पासुन, ते पार नाही नाही असे होते म्हणजे असे होतेच असा दृढ विश्वास असलेली आजची जनता. माझ्या अल्पमतीनुसार संत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज हे सगळे अजुनही होउन गेलेले महापुरुष म्हणुन गणले जात आहेत. समजा अजुन ५०० वर्षाने जर कोणी कोणास ठावूक इतके वर्षांपुर्वी हे संत होते की नाही? असेच लोकगीत, अभंग , लोकसाहीत्यातुन भर घालत घालत कोणीतरी हे ग्रंथ लिहले एकच असा कोणी हे ग्रंथ लिहले नसावे जसे आज महाभारत इ ग्रंथाविषयी म्हणले जाते, तसे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याविषयी कोणाचे अजुन भविष्यकालात अविश्वास होउ नये इतका की ते होते की नव्हते यापासुन चर्चा व्हावी. तर हे असे होउ नये म्हणुन केस कशी भक्कम करता येईल?

कोण म्हणते

तसे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्याविषयी कोणाचे अजुन भविष्यकालात अविश्वास होउ नये इतका की ते होते की नव्हते यापासुन चर्चा व्हावी.

कोण म्हणतं तुकाराम आणि ज्ञानेश्वर खरे आहेत म्हणून? काही पुरावा आहे का? असल्यास काय?

फोटो

काही फोटो आहेत का? असल्यास सत्यता पडताळण्यासाठी काय करावे? जर रामदास हे शिवरायांचे अध्यात्मिक गुरु नव्हते तर रामदास तरी होते का? कि ते सुद्धा काल्पनिक असावेत?


न रहेगा बास

जर रामदास हे शिवरायांचे अध्यात्मिक गुरु नव्हते तर रामदास तरी होते का? कि ते सुद्धा काल्पनिक असावेत?

पण शिवाजी खरा हे कसे ठरले?

(डिएनए सँपल मिळवण्यासाठी अंत्यसंस्कार म्हणून पुरले असते तर कळले असते. कदाचीत त्यावरूनच "पुरावा" हा शब्द आला असावा का?)

ज्या

पण शिवाजी खरा हे कसे ठरले?

ज्या अर्थी शिवसेना आहे त्या अर्थी शिवाजी असला पाहिजे अशी उलटी सिद्धता केली तर? :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

खरे आहे

शिवाजी खरा की खोटा बोलयची भिती आहे. असा प्रश्न काढला तर मला नक्की पुरतील. परवाच आबीएन लोकमत वाहीनीवर याच विषयावर एक न्यायाधीश हात पाय तोडेन, जीभ हासडेन, डोकं फोडेन अशी भाषा करत होते. जर न्यायाधीशच धमक्या देत असतील, तर शिवाजी खरा हे अमान्य करणे सोपे आहे का? दुसरा मुद्दा म्हणजे शिवाजीच्याच काळात नकली शिवाजी वापरला गेला होता अशा कहाण्या आहेत. मग आता त्याची सत्यता कशी पडताळणार?


पास

प्रश्न प्रियालींकडे पास केला जात आहे.

या चित्रफीतीत महाभारत युद्ध इ पू ३००० च्या आधी झाल्याचे 'ज्योतिषीय पुराव्यांवरून' खात्रीपूर्वक दाखवले आहे. माझ्या वडिलांकडे वि रा (?) करंदीकर यांचे एक पुस्तक होते. त्यात 'ज्योतिषीय पुराव्यांवरून' ते इ पू १९३१ मध्ये झाल्याचे असेच खात्रीपूर्वक दाखवले होते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

नापास

प्रियालींकडे पास केला जात आहे.

प्रियाली नापास. ;-) पहिल्या फटक्यात निकाल!! सध्या अर्धा तास चित्रफीतीवर धालवण्यास वेळ नाही.

माझ्या वडिलांकडे वि रा (?) करंदीकर यांचे एक पुस्तक होते. त्यात 'ज्योतिषीय पुराव्यांवरून' ते इ पू १९३१ मध्ये झाल्याचे असेच खात्रीपूर्वक दाखवले होते.

ग्रहच ते फिरून फिरून एका जागी येणारच. कदाचित इ.स. पूर्व ६००० सालीही अशीच ग्रहस्थिती असावी.

असो.

श्रीकृष्ण सत्य असण्यास माझी हरकत नाही. महाभारत आणि इतर साहित्य कृतीत त्याचे चमत्कार दाखवण्यास माझी हरकत नाही परंतु श्रीकृष्णासारखा मर्त्य मनुष्य साडीवाला नसूनही हातातून साड्या काढून द्रौपदीस पुरवत होता हे मानण्यास माझी हरकत आहे.

महाभारताचा काळ इ.स.पूर्व ३००० साली कधीतरी होता असे मानण्यास माझी हरकत नाही. महाभारतातील ग्रहस्थिती ही रचित असूच शकत नाही हे मानण्यास माझी हरकत आहे. हा व्यासांसारख्या अद्वितिय प्रतिभाशाली कवीवर अन्याय आहे. ;-) (आम्ही टपडे लेखकही स्वरचित कथा लिहिताना चर्चगेट-विरारमधील अंतरे आणि लँडमार्क्स यांचे व्यवस्थित वर्णन करू शकतो.)

चित्रफीत थोडीशी पळवत पाहिली. जुहू इस्कॉनला पूर्वी तुपात तळलेले सामोसे मिळत. मला ते आवडत. आता मिळतात का माहित नाही. इस्कॉनची महती माझ्यामते इतकीच आहे. श्रीकृष्ण म्हणजे हर्क्युलिस असे ग्रीक सांगत. जीजस फार नंतर जन्मला.

असो. ऑन ए सिरिअस नोट,

महाभारत युद्ध झाले नव्हते असे म्हणण्यास माझ्याकडे ठोस पुरावे नाहीत. महाभारत युद्ध महाकाव्यात वर्णन केल्याप्रमाणे झाले होते का नाही अशी शंका घेण्याची माझी वृत्ती आहे. (एवढे प्रचंड सैन्य, शस्त्रांचे चमत्कार इ.इ.). वैशंपायनांनी जनमेजयासमोर भाटगिरी करून व्यासरचित महाभारताची विल्हेवाट लावली असेही विधान मी करते.

बाकी चालू द्या. ;-)

इस्कॉन

>>जुहू इस्कॉनला पूर्वी तुपात तळलेले सामोसे मिळत
तुपात/लोण्यात (पक्षी= ऍनिमल फॅटमध्ये) तळलेले पदार्थ नेहमीच चांगले लागतात. (दुसरे उदाहरणः खारी बिस्किटे मुसलमान बेकरीमधलीच चांगली लागतात). :)

>>सध्या अर्धा तास चित्रफीतीवर धालवण्यास वेळ नाही.
पहिला अर्धा भाग फॉरिनर लोक कसे कृष्णाचे भक्त झाले आहेत वगैरे टीपी आहे.

बाकी सगळे मान्य आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

पहिली फीत (पूर्ण) + दुसरी फीत (६ मिनिटे) बघितली

पहिली फीत (पूर्ण) + दुसरी फीत (६ मिनिटे) बघितली.

पास.

सॉरी

माहीतीपटातील पहीली दहा मिनिटे इतर काम चालू असताना पहा हे सांगायला हवे होते :-) पण तरी कृपया बाकीची फीत वेळ मिळेल तेव्हा जरुर पहा. खरे सांगु तर फार वेगळी माहीती नाही. कदाचित इतरत्र वाचलेली असेल. तरी लोकमानस, ग्रंथ, खगोलशास्त्रीय तसेच पुरातत्वविषयक माहीती दिली आहे फक्त आमचा धर्म व आमची श्रद्धा असा घोष लावला नाही आहे.

दुसरा महत्वाचा प्रश्न मला असा यातुन विचारायचा आहे की श्रीकृष्ण होता, नव्हता. महाभारत झाले नाही झाले. वर प्रियाली म्हणाल्या तसे तपशीलातले फरक/चमत्कार सोडले तर असे झाले असेलही म्हणायला वाव आहे. बर ते जाउ द्या.

किमान आजच्या घडीला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. शिवाजी महाराज खरेखुरे मनुष्य होते हे अश्रद्ध व सश्रद्ध दोन्ही बाजुंना मान्य असावे. तर आजपासुन पुढे ५०० वर्षानी ते होते व त्यांचे ग्रंथ हे असेच भाटगिरी, लोकगीत, श्लोक, अभंग संग्रह बनवला गेला नाही असा युक्तीवाद होउ नये म्हणुन नेमके काय पुरावे गोळा केले पाहीजेत ?

काय फरक पडणार?

चर्चाप्रस्तावकाला नेमका श्रीकृष्ण (किंवा शिवाजी) झाला न झाल्याने काय फरक पडणार?

श्रीकृष्ण ३-४ हजार वर्षांपूर्वी झाला. शिवाजी ३-४ शे वर्षांपूर्वी झाला. श्रीकृष्णाच्या काळात इतिहासाच्या नोंदी करण्याची ठोस सोय नव्हती त्यामुळे साहित्यातील नोंदी खर्‍या मानून पुढे सरकावे लागते. शिवाजीच्या काळात तशा नोंदी आहेत. ऐतिहासिक वास्तुंमुळे, शिक्के, कागदपत्रे वगैरेंमुळे पुढे करण्याइतपत ठोस पुरावे आहेत.

श्रीकृष्णाबाबत चमत्कार प्रसिद्ध आहेत. शिवाजीबद्दल चमत्कार प्रसिद्ध आहेत (भवानी तलवार, आग्र्याहून सुटका इ.). दोघांबद्दल आख्यायिका प्रसिद्ध आहेत. (शिवाजीबद्दल कल्याणच्या सुभेदाराची सून. ही आख्यायिका आहे हे प्रसिद्ध असतानाही त्याचा हवाला देऊन महाराजांच्या स्त्रियांविषयक धोरणांची चर्चा आजही केली जाते. [नितिन थत्ते याला पुष्टी देतील.] त्यावेळेस महाराजांच्या बाई-बटकीविषयी ऐतिहासिक नोंदीकडे लक्ष दिले जात नाही.)

समाजाला चमत्कार हवे असतात. बाबा-बुवा हवे असतात. ऐतिहासिक दस्तऐवज तपासण्यात लोकांना स्वारस्य नसते. श्रीकृष्ण नव्हताच असे सिद्ध झाले (आणि जीजस नव्हताच असेही) तरीही या सिद्धतेला न मानणार्‍यांची संख्याच जास्त असेल. कारण अशा सिद्धता न मानणे त्यांच्या पथ्यावर आहे. हे जास्त संख्येतील लोक श्रीकृष्ण आणि शिवाजीला जिवंत ठेवतील आणि ते नव्हतेच अशी सिद्धता मांडणार्‍यांना "सोयिस्कर"रित्या विसरून जातील.

हं

>चर्चाप्रस्तावकाला नेमका श्रीकृष्ण (किंवा शिवाजी) झाला न झाल्याने काय फरक पडणार
तसा काही विशेष फरक पडणार नाही.

त्या माहीतीपटात भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाशी मिळती जुळती मुद्रा का शिक्का (??) मिळाल्याचा उल्लेख आहे. ग्रंथातुन काही माहीती आहे. पण् जुन्या नोंदी, त्यांची विश्वासार्हता याविषयी शंका घेणारे आहेत. ते सोडा वर इस्कॉनमधे डॉ पंडीत गेले म्हणुन चर्चा पास करणारे अश्रद्ध रिकामटेकडा. उद्या शिवाजीमहाराजांच्या कालखंडाविषयी, पुराव्यांविषयी शंका पुढच्या पिढीतील अश्रद्ध घेतील.

उद्या कालौघात, भयानक नैसर्गिक दुर्घटनेत हे जे काही पुरावे आहेत ते नष्ट झाले तर मग काय? यावरुन् वाटते की काही कालावधी गेल्यावर इतिहासातील अनेक प्रमुख व्यक्ती मिथक होणार का? तर मग असा 'इर्रिफ्युटेबल' पुरावा काय बरे असावा?

समाजाला चमत्कार हवे असतात. बाबा-बुवा हवे असतात. असे आजवर पहाता वाटते खरे पण यापुढची पिढी कमी भाबडी व जास्त चिकित्सक असेल असेही अनुभवावरुन वाटते.

शंका घेऊ द्या

त्या माहीतीपटात भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाशी मिळती जुळती मुद्रा का शिक्का (??) मिळाल्याचा उल्लेख आहे. ग्रंथातुन काही माहीती आहे. पण् जुन्या नोंदी, त्यांची विश्वासार्हता याविषयी शंका घेणारे आहेत.

मला वाटते जितके अधिक लोक शंका घेतील तितकी अधिक धार पुरावे शोधणार्‍यांना मिळेल. शेवटी, मानणे आणि न मानणे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. भांडारकरांच्या अनेक वर्षांच्या अभासानंतर प्रकाशित केलेल्या महाभारताच्या प्रतीतही शंका घेण्यास्पद अनेक जागा आहेत.

असो. मी माहितीपट पूर्ण आणि लक्षपूर्वक न पाहिल्याने श्रीकृष्णाच्या शिक्क्याबद्दल मला आताच लिहिता येणार नाही परंतु शिक्क्यावर अक्षरलिपी असेल तर मीही इतर कोणत्या भानगडीत न पडता शंका घेईन.

ते सोडा वर इस्कॉनमधे डॉ पंडीत गेले म्हणुन चर्चा पास करणारे अश्रद्ध रिकामटेकडा. उद्या शिवाजीमहाराजांच्या कालखंडाविषयी, पुराव्यांविषयी शंका घेतील.

पंडित श्रीकृष्णावर अभ्यास करण्यासाठी सर्व सोडून सर्वात आधी पळत इस्कॉनला गेले असतील तर मीही त्यांच्यावर शंका घेईन. :-( कारण इस्कॉन ही माझ्यामते श्रीकृष्णाला इतिहास किंवा मिथक ठरवणारी योग्य संस्था नाही.

बाकी, रिटेंबद्दल म्हणाल तर शिवाजीमहाराजांच्या पुराव्यांविषयी ते शंका घेतील याच्याशी मी सहमत आहे. ;-) पण त्यांनी शंका का घेऊ नये? किंबहुना त्यांनी शंका घ्यावीच. त्यांनी शंका घेतली किंवा न घेतली म्हणून लोक शिवाजीमहाराजांना मानणे/ न मानणे सोडतील असे तात्काळ होणार नाही.

उद्या कालौघात, भयानक नैसर्गिक दुर्घटनेत हे जे काही पुरावे आहेत ते नष्ट झाले तर मग काय?

ते होतीलच.

यावरुन् वाटते की काही कालावधी गेल्यावर इतिहासातील अनेक प्रमुख व्यक्ती मिथक होणार का? तर मग असा 'इर्रिफ्युटेबल' पुरावा काय बरे असावा?

ज्यावेळी ते मिथक होतील त्याहीवेळी अशा चर्चा रंगतील. हे मिथक नसून इतिहास होता हे सांगणारे पुरावे आणि खोडून काढणारे पुरावे पुढे येतील. मानणे आणि न मानणे हे प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे ते तुम्ही, मी किंवा रिटे हिरावून घेवू शकत नाही.

यापुढची पिढी कमी भाबडी व जास्त चिकित्सक असेल असेही अनुभवावरुन वाटते.

किंवा समाजातील बाबा-बुवांचे स्वरूप बदलेल. डॉकिन्सबाबा इथे खूपच प्रसिद्ध आहेत. ;-)

+१

किंवा समाजातील बाबा-बुवांचे स्वरूप बदलेल.

प्रचंड सहमत.

थोडक्यात ह्या चर्चा व वादविवाद कायम चालत आलेत व रहातील. खरे काय खोटे काय सगळेच सापेक्ष!

कालौघ कशाला हवा?

उद्या कालौघात, भयानक नैसर्गिक दुर्घटनेत हे जे काही पुरावे आहेत ते नष्ट झाले तर मग काय? यावरुन् वाटते की काही कालावधी गेल्यावर इतिहासातील अनेक प्रमुख व्यक्ती मिथक होणार का? तर मग असा 'इर्रिफ्युटेबल' पुरावा काय बरे असावा?

कालौघच कशाला हवा? आपले शेजारी बास आहेत तेवढ्यासाठी. त्यांच्या अणवस्त्रांच्या कक्षेत संपूर्ण भारत आहे. काय काय म्हणून पुरावे जपून ठेवणार?


द्वारका

त्या माहीतीपटात भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनाशी मिळती जुळती मुद्रा का शिक्का (??) मिळाल्याचा उल्लेख आहे.

द्वारका शहर अस्तित्वात होते याचे पुरातत्व पुरावे उपलब्ध आहेत.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

श्रीकृष्णाची द्वारका

द्वारका शहर अस्तित्वात होते याचे पुरातत्व पुरावे उपलब्ध आहेत.

नक्कीच आहेत परंतु ती श्रीकृष्णाचीच द्वारका आहे हे अद्याप सिद्ध होत नाही. किंवा दुसर्‍या शब्दांत त्या बुडलेल्या द्वारकेत श्रीकृष्ण ही खरी व्यक्ती होती हे सिद्ध होत नाही. उद्या २००५ च्या २६ जुलैला प्रचंड पाऊस पडला हे नोंदींवरून सिद्ध करता येईल परंतु त्या पावसात प्रियाली अडकलीच होती हे सिद्ध करणे त्यामानाने कठिण आहे कारण त्यासाठी अधिक ठोस पुरावे हवेत.

द्वारका बुडतानाची महाभारतातील वर्णने रोचक आहेत आणि ती खरी असावीत असे मानण्यास जागा आहे पण त्यावरून घटना खरी होती. त्या शहरातील श्रीकृष्ण ही व्यक्ति रचित होती असे मानण्यास जागा उरतेच. :-)

समुद्राची पातळी वाढल्याने किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे समुद्रात गाडली गेलेली इतर शहरेही भारताच्या किनार्‍यांवर आहेतच.

द्वारका आणि श्रीकृष्ण

द्वारकेची नगररचना खुप सुंदर होती म्हणे [ऐकीव कथा] कृष्णाला जेव्हा रुक्मिणी आवडली तेव्हा तो द्वारकेत होता [संदर्भ काहीच नाही] रुक्मिणीकडून प्रेम पत्र मिळताच श्रीकृष्ण थेट द्वारकेतून रुक्मिणीचं गाव कंचं तिकडे रवाना झाला आणि युक्तीने तिला पळवून द्वारकेस आणले होते अशा कथा सांगितल्या जातात तेव्हा ऐकीव कथेवरुन द्वारकेत राहणारा तो कृष्णच असावा असे वाटते.

-दिलीप बिरुटे
[श्रीकृष्णकथांची आवड असलेला]

नागपूरकडली

द्वारकेतून रुक्मिणीचं गाव कंचं

रुक्मिणीचं गाव विदर्भ. नागपूरकडली ती. तिथून तिला पळवून द्वारकेपर्यंत जायला किती वेळ लागला असावा? असो.


ऐकीव कथेवरुन द्वारकेत राहणारा तो कृष्णच असावा असे वाटते.

ऐकीव या शब्दात बरेच काही आले. तसे तर बाबुराव अर्नाळकरांचे झुंजार आणि काळा पहाडही भारतात कुठेतरी राहत होते. ;-)

हं पण रामा पेक्षा श्रीकृष्ण हा मला नेहमीच मोहवत आला आहे.

श्रीकृष्ण सत्य की मिथ्य या वादात मला रस नाही. हं पण रामा पेक्षा श्रीकृष्ण हा मला नेहमीच मोहवत आला आहे. राम हा भारतीय संस्कृती मधील अत्यंत उच्च प्रतीच्या आदर्शाचे मूर्तिमंत रूप आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श राजा, अश्या अनेक आदर्शांचा राम पुतळा होता.तरी पण हा राम आजिबात आदर्शवत वाटत नाही. कोणत्या तरी अफवेवर विश्वास ठेवून त्याने आपल्या धर्म पत्नीला त्यागले. याच क्षणी हा राम स्वतः:ला आदर्श रुपात सादर करण्यासाठी कांहीही करू शकतो सत्य-असत्य याची त्याला परवा नाही. फक्त स्वतः चा स्वार्थ पाहणारा अशी प्रतिमा माझ्या मानत तय्यार झाली.
या उलट श्रीकृष्ण यशोदेला सतावणारा, लोणी चोरून खाणारा, गवळणी बरोबर रंग खेळणारा, दंगामस्ती करत असतानाच यशोमयाला तोंड उघडून ब्रम्हांड दाखवणारा , कालिया मर्दन लीलया करणारा, गोवर्धन पर्वत करंगळीवर तोलून धरणारा, असे खोडकर जीवन जगत राजवाड्यात गेल्यावर ही सुदाम्याचे पोहे प्रेमाने खाणारा असा श्रीकृष्ण . द्रोपदीचा सखा, बंधू,तीला अखंड साडी पुरवून तीचे लज्जारक्षण करणारा. रुक्मिणीचा तसाच सत्यभामेचा तेव्हडाच मीरेचा प्रिय कृष्ण . सोळा हजार स्त्रियांचा पती असून ही कोणाचाच नसणारा तरी ही प्रत्येकीचा , सोन्या चांदीने तूला न होणारा वजनदार पण तुळशीचे पान टाकतच वजनकाटा बरोबर करणारा. महा युद्धात हातात शस्त्र न घेताही पांडवांना युद्ध जिंकून देणारा . प्रिय सखा अर्जुनाला युद्ध स्थळावर गीता सांगून युद्धास प्रोहास्थान देणारा , आणि महत्वाचे म्हणजे सामान्य मानवी प्रवृत्ती नुसार वागणारा. युद्धात वेळ प्रसंगी खोटे बोलून, करामती करून हा सूर्य हा जयद्रथ म्हणत जयद्रथ ला मारणारा. तेंव्हा कोठे गेला होता राधासुत म्हणत कर्णाला खडसावणारा. युद्धा पूर्वी तहासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा, त्याच बरोबर युद्धाची रणनीती ठरविणारा .असा हा. या सम हाच .
असा हा कृष्ण मला मना पासून आवडतो. जन्माला आला होता का नाही या वादात मला रस नाही .
तो आवडतो हेच सत्य आहे. आज ही भारतीय आईला असा मुलगा व्हावा असे वाटणारा.तिच्या घरी बाळकृष्ण प्रतिमा असणारा.
thanthanpal.blogspot.com

राम वि. कृष्ण

सर्वांनी नोट करा.

राम वि. कृष्ण - ठणठणपाळ कृष्णाची बाजू घेणार.

+१ सहमत!

--तो आवडतो हेच सत्य आहे. आज ही भारतीय आईला असा मुलगा व्हावा असे वाटणारा.तिच्या घरी बाळकृष्ण प्रतिमा असणारा.---
+१ सहमत!

लिहू की नको?

जाऊ दे! मान्यच करतो:
प्रतिसाद आवडला.

लिहा

>>>लिहू की नको ?
नक्की लिहा. कृष्ण कसा लबाड होता किंवा राम कसा आदर्श ठरतो वगैरे लिहिण्याची मोठी संधी आहे आणि ती आपण सोडू नये असे वाटते. कृष्ण कसा मधूर बासरी वाजवत होता त्या आवाजाने पशुपक्षी,स्त्री-पुरुष कसे वेडे होत होते. कृष्णाला गुरे राखतांना कुस्त्यांचा नाद लागला होता तेव्हा त्याच वयात राम काय करत होता, वगैरे सुंदर चर्चा होईल असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे

मलाही आवडतो...!

श्रीकृष्ण सत्य की मिथ्य या वादात मला रस नाही. हं पण रामा पेक्षा श्रीकृष्ण हा मला नेहमीच मोहवत आला आहे.

सेम बोल्तो. कृष्ण चतुर,राजकारणी,नेता, अशी किती त्याची रुपे आहेत आणि ती रुपे हवीशी वाटतात.

-दिलीप बिरुटे

सहमत

सहमत आहे. प्रतिसाद आवडला.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

कृष्ण होताच, "कृष्णा" होता की नाही माहीती नाही.

चित्रफीत संपूर्ण पाहीली व खूप आवडली. प्रथेप्रमाणे गोऱ्या लोकांनी आपल्या संस्कृतीचे महत्व आपल्याला सांगितल्यानंतर पटते तसेच माझे झाले.

ग्रहा, भारता, पुराणा, अर्जुना, कृष्णा, असे सगळे "आ" वसुन बसलेले शब्द ऐकुन डोके ऊठते. गीता हा शब्द पण गीत असावा असे वाटते पण आपल्या लोकांनी गोऱ्या लोकांना ते नाव गीता असे सांगितले असावे असा माझा समज आहे.

बाकी असा विषय आला की त्याला विरोध केला की आपले विचार कसे इतरांपेक्षा वेगळे आहेत ते दाखवता येते.

हाहाहा

पण केवळ गोरेच असे करतात असे नाही, अनेक दाक्षिणात्यसुद्धा (इंग्रजीच्या प्रभावात नसलेलेही) आकारान्तच उच्चार करतात असे निरीक्षण आहे.

क्रिष्णा होता, किस्नासुद्धा होता.

असा विषय आला की त्याला विरोध केला की आपले विचार कसे इतरांपेक्षा वेगळे आहेत ते दाखवता येते.

बिंगो!

पंडितांची मुलाखत

डॉ. पंडितांची मुलाखत www.gita-society.com/did-krishna-exist.pdf वाचनात आली. त्यावरून सदर व्यक्ती निष्कर्षापर्यंत पोहोचायची घाई करते आहे असे लक्षात येते.

एकंदरीत, सनातन.ऑर्गवर वरील व्हिडिओ चढवावा असे वाटते.

हा जय नावाचा इतिहास आहे अशी महाभारताची ओळख सांगितली जाते. तेथे डॉ. पंडित या फक्त कपोलकल्पित गोष्टी असाव्यात यानेच सुरुवात का बरे करतात? :-) माझ्यामते भारतातील "कोट्यावधी लोकांची श्रद्धा" महाभारत हा इतिहास आहे अशीच आहे आणि पंडित फक्त त्याला पुष्टी देण्याचा प्रयत्न करतात.

आतापर्यंत झालेल्या अभ्यासाहून पंडित काहीच नवे सांगत नाहीत.

श्रीकृष्ण आयोग सत्य

श्रीकृष्ण आयोग सत्य.
श्रीकृष्ण आयोगाचा अहवालही सत्य.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नकाशा

हा अहवाल स्वत:च्या संकेतस्थळावर ठेवणार्‍या सबरंगचा जम्मू-काश्मीर आणि पाकीस्तानात दाखवणारा हा नकाशा मात्र खोटा आहे. :-)

गमतीदार दुवा

हे देश-देश मैत्री करणारे लोक नेहमी त्रांगडेच करतात. हे घ्या आणखी एक चित्र :

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे बोधचिह्न

(दुवा) भारताचा आकार काय, अमेरिका भूखंडाचा आकार काय... श्रीलंका तर फ्लोरिडापेक्षा मोठी!!!

खरेच की!

तसे असले तर हे ही मिथच!

पण काय हो जसे गुजरात-जम्मू-काश्मीर पाकीस्तानात दाखवले आहे तसे यात पण फ्लोरीडा हा श्रीलंकेचा भाग म्हणून दाखवला आहे का? तसे वर्तुळाकारात (तेही spherical ) दाखवलेला नकाशा आणि सपाट आयतातील नकाशा यात काहीच फरक नसतो का? त्या अर्थाने म्हणजे स्केलच्या संदर्भात आपण दाखवलेला नकाशा आणि खालील (आधी दुवा दिलेला) नकाशा यात काही फरक नाही असे म्हणायचे आहे का?

आणि जर हा नकाशा मैत्री म्हणून दाखवला होता तर एरवी तत्वाला जागणार्‍यांना हा काढून टाकायची काय गरज होती? कर नाही त्याला डर कशाला? का त्यांचा पण तसा नकाशा काही त्रांगडे घालतो असा गैरसमज झाला अथवा अशा गैरसमजाला ते बळी पडले?

खरेच की!

सबरंगवाले लोक इतका निष्काळजीपणा करतील असे मला वाटले नव्हते. पण या दुव्यावर त्यांच्या संस्थळाची जुनी आवृत्ती बघून खात्री पटली.

तत्त्वाला जागणे

येथे मला तुमच्याकडून शिकवण हवी आहे.

मागे एकदा मी उपक्रमावर "गांधीवध" हा शब्द वापरला होता. शब्द वापरताना "गांधीवध" आणि "गांधीहत्या" शब्दांनी लोकांमध्ये वेगवेगळे भाव उद्भवतात हे मला माहीत नव्हते. अधिक वाचून-लोकांशी सल्लामसलत करून समजले.

माझ्या हातून "वध"चा तसा अर्थ नव्हता. हे सत्य आहे. सत्याबद्दल आदर असण्याचे माझे तत्त्व आहे. तरी मी संपादक मंडळाला शब्द बदलायची विनंती केली. विनंती केली म्हणजे हे सिद्ध होते का की मुळात माझा हेतू वाईट होता? की हे सिद्ध होते की सत्याबद्दल मला आदर नाही.

मला असे ठामपणे वाटते, की "लोकांना काय वाटते" या कारणासाठी कधीकधी बदल करणे ठीक असते. तुम्ही वेगळे शिकवून पटवले, तर हा विचार बदलेनही.

- - -

त्या अर्थाने म्हणजे स्केलच्या संदर्भात आपण दाखवलेला नकाशा आणि खालील (आधी दुवा दिलेला) नकाशा यात काही फरक नाही असे म्हणायचे आहे का?

होय. लक्षणीय फरक नाही.

आणि असेसुद्धा वाटते, की हा स्केलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला कारण तुमच्या मते श्रीकृष्ण आयोगाचा संबंध भारतविरोधी-पाकिस्तानसमर्थनाचा आहे. नाहीतर तुम्ही हा मुद्दा का उपस्थित केला ते कळले नाही.

उद्या मी कुठल्या "क्ष" विषयाच्या अनुषंगाने न्यूयॉर्क टाइम्स मधील बातमीचा दुवा देईन, तर तुम्ही न्यूयॉर्क टाइम्समधील कश्मीरचा नकाशा दाखवाल काय? (बहुधा नव्हे.) "क्ष" विषयात=कश्मीरचा प्रश्न असला, तर न्यूयॉर्क टाइम्स मधील कश्मीरचा नकाशा सुसंदर्भ राहील.

श्रीकृष्ण आयोगाच्या बाबतीत तुम्हाला हा नकाशाचा विषय सुसंदर्भ का वाटला? (तुम्हाला सुसंदर्भ वाटतो, नाहीतर तुम्ही उपस्थित केला नसता, असे मानण्यासारखा मला आदर आहे.) माझे बिंदू-जोडणे चुकले असेल, तर तुम्ही संदर्भ-बिंदू सुयोग्य जोडून दाखवा.

संदर्भ

तरी मी संपादक मंडळाला शब्द बदलायची विनंती केली. विनंती केली म्हणजे हे सिद्ध होते का की मुळात माझा हेतू वाईट होता? की हे सिद्ध होते की सत्याबद्दल मला आदर नाही.

टिस्टा सेटलवाड यांनी विनंती केली नव्हती कांगावा केला होता. आत्ता (संदर्भ दुवा आहे पण) मला पटकन योग्य संदर्भ मिळालेला नाही जो आधी त्यावेळीस वाचलेला होता. पण आठवणीप्रमाणे त्यांनी "या लहान मुलांच्या कलेकडे वाईट नजरेने पहाता" असे म्हणत "तथाकथीत" (म्हणजे त्यांच्या दृष्टीने) धर्मांधांनाच नावे ठेवली होती. स्वतःची चूक झाली वगैरे काही म्हणलेले नव्हते. केवळ कटकट नको म्हणत नकाशा मागे घेतला होता.

होय. लक्षणीय फरक नाही.
जेंव्हा एका देशासाठी एक आणि दुसर्‍या देशासाठी एक (भारत शेंदरी तर पाकीस्तान हिरवा) असे ठरवून वेगळे रंग दाखवले जातात आणि तरी देखील लक्षणीय फरक वाटत नसेल तर आपली मते वेगळी आहेत इतकेच म्हणू शकेन...

श्रीकृष्ण आयोगाचा संबंध भारतविरोधी-पाकिस्तानसमर्थनाचा आहे.
अरे देवा! असे काही डोक्यातदेखील नव्हते! मी श्रीकृष्ण आयोगाच्या बाजूने अथवा विरोधात काहीच लिहीले नव्हते....

नाहीतर तुम्ही हा मुद्दा का उपस्थित केला ते कळले नाही.
"श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य" या महाभारतातील श्रीकृष्णावर चालू असलेल्या चर्चेत अचानक श्रीकृष्ण अहवाल दुव्यासकट का आला ते देखील मला कळले नाही. ते समजून सांगू शकाल का अथवा तसा प्रश्न आपल्याला पडला का? मला पडला. म्हणून तो अहवाल ज्या संकेतस्थळावर एका संस्थेने (सबरंगने) प्रकाशीत केला आणि ज्या संकेतस्थळाचा दुवा दिला गेला होता, त्यांनी देश दाखवतना अलगदपणे कसे प्रांत वेगळे केले होते ते दाखवत, जरी अहवाल खरा असला तरी तो नकाशा मिथ आहे इतकेच म्हणले... त्यात श्रीकृष्ण अहवालासंदर्भात काहीच म्हणण्याचा उद्देश नव्हता. केवळ मी स्वतःला हिंदूत्ववादी म्हणतो, म्हणून मी लिहीले म्हणताच, किमान मला उद्देश न विचारता असे अनुमान काढणे आणि त्यावर आधारीत प्रतिसाद देणे हे नक्की कुठले संतुलीत संशोधन झाले?

श्रीकृष्ण आयोगाच्या बाबतीत तुम्हाला हा नकाशाचा विषय सुसंदर्भ का वाटला?

वर स्पष्टीकरण केल्याप्रमाणे जितका "श्रीकृष्ण सत्य की मिथ्य", या चर्चेत श्रीकृष्ण आयोगाचा विषय आणि दुवा सुसंदर्भ असलेला ठरेल तितकाच हा नकाशाचा विषय आणि दुवा देखील सुसंदर्भ ठरेल...

असो.

पुन्हा पुन्हा वाचतो आहे

श्रीकृष्ण आयोगाचा संबंध भारतविरोधी-पाकिस्तानसमर्थनाचा आहे.

अरे देवा! असे काही डोक्यातदेखील नव्हते! मी श्रीकृष्ण आयोगाच्या बाजूने अथवा विरोधात काहीच लिहीले नव्हते....

त्यात श्रीकृष्ण अहवालासंदर्भात काहीच म्हणण्याचा उद्देश नव्हता. केवळ मी स्वतःला हिंदूत्ववादी म्हणतो, म्हणून मी लिहीले

पुन्हा पुन्हा वाचतो आहे. निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अवश्य

निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो आहे.

अवश्य प्रयत्न करा. कुठलेही ज्ञान मिळवायची ती पहीली पायरी आहे. जेंव्हा डोक्यात कुठलेही विचार काँक्रीटसारखे बसलेले असतात तेंव्हा जग केवळ कृष्णधवल रंगातच दिसते. म्हणूनच वर संपूर्ण परीच्छेदातील काही वाक्ये तर काही अर्धवटच वाक्ये (आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट) एकत्र करून निष्कर्ष काढायची पद्धत तयार झालेली दिसते. हे जसे अंधश्रद्धाळूंचे होते तसे स्वतःला बुद्धीवादी समजणार्‍यांचे पण होऊ शकते. मला त्याचे आश्चर्य वाटले नाही कारण अपेक्षितच होते आणि ते दाखवूनही द्यायचे होते. तेंव्हा आय रेस्ट माय केस.

बोले तैसा चाले

वर संपूर्ण परीच्छेदातील काही वाक्ये तर काही अर्धवटच वाक्ये (आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट) एकत्र करून

ह्याला म्हणतात बोले तैसा चाले. दुसरीकडे स्वतःच अर्धवट वाक्ये जोडून हारलेल्या चर्चेत मीच कसा जिंकलो होतो दाखवणारा प्रतिसाद टाकून, त्याची शाई वाळायच्या आत इकडे हे लिहून मोकळे.

जेंव्हा डोक्यात कुठलेही विचार काँक्रीटसारखे बसलेले असतात तेंव्हा जग केवळ कृष्णधवल रंगातच दिसते.

स्वतःला 'हिंदुत्ववादी' गटात मोजणारे असे काही म्हणू लागले की एकच विचार मनात येतो. "लूक हूज टॉकिंग!"

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

 
^ वर