या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत आज लोकमान्य टिळक यांनी स्वतः निवडून दिलेल्या लोकशाही सरकारची हजेरी घेतली असती. पण आजच्या बाजारू वर्तमान पत्राच्या संपादकाची असे लिहिण्याची हिम्मत नाही. गडद भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्येची वाट दर्शवण्यासाठी वापरला आहे. तर हिरवा रंग हरित झाडे व शेती दर्शवतो. याच शेतीवर कोट्यवधी हिंदुस्थानींंचे जीवन अवलंबून आहे. तसेच अशोकचक्र हे या ध्वजाखाली राहणार्‍या हिंदुस्थानींनी सत्येची कास धरावी यासाठी वापरले आहे.
पण आज दुर्देवाने भगवा रंग हिंदूचे आणि हिरवा रंग मुसलमान धर्माचे प्रतिक म्हणवल्या जात आहे. देशात जो आंतकवाद, दहशदवाद काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत पसरला आहे त्याला आळा घालण्यास केंद्र सरकार संपूर्णतः अपयशी ठरले हे अपयश लपवण्यासाठी खुद: भारताच्या गृहमंत्र्यांनी भगवा आंतकवाद,दहशदवाद भारतात पसरत आहे म्हणत हिंदुनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्या चा प्रयत्न केल्या मुळे चोर सोडून संन्यासाला बळी देण्याचा हा प्रकार आहे. प्रत्येक घटना मतांच्या हिशोबाने पाहीली जात असल्यामुळे भाजपने, शिवसेनेने जसे या वक्तव्याचे राजकारण सुरु केले तेंव्हा मतांचा धोका ओळखून कॉंग्रेस ने ही हे पक्षाचे मत नाही म्हणत पी.चिदंबरम यांना मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करत जावे म्हणत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला. मध्यंतरी जालावर ठणठणपाळ तुम्ही भगवा रंग ,हिरवा रंग मानता का नाही? हे आधी सांगा .म्हणत म्हणत माझ्या वर हल्ला केला. .पण मी मानवाच्या रक्ताचा लाल रंग फक्त मानतो इतर कोणताही रंग मानत नाही म्हणाल्या बरोबर ठणठणपाळ हे अमेरिकन एजंट असून भारतात फुट पडत आहे. असा अजब आरोप केला गेला. आता हा सगळा भगवा , हिरवा दहशदवाद पाहून माझे मत चूक की बरोबर हे तुम्हीच ठरावा.

Comments

ठणठणाट

ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट उर्फ पालथ्या घड्यावर पाणी.

ठऽणऽऽऽठऽणऽऽऽठऽणऽऽऽठऽणऽऽऽ

.

हॅ हॅ हॅ. सगळ्यांचेच मुखवटे लवकर गळून पडतात.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

दुसरी बाजू

नक्षलवाद्यांविषयी भुई धोपटूनही वेदांतच्या खाणींविषयीचे वाद संपत नाहीत असे बघून चिदंबरम यांनी मऊ माती खणायला घेतली आहे.

-आक्‌रसताळ

बाजू

श्री. ठणठणपाळ हे नेमके कुणाच्या बाजूने आहेत आणि कुणा(कुणा)च्या विरोधात आहेत हे कसे शोधावे बरे?

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

सोप्पे आहे पण....

सोप्पे आहे पण यादी न संपणारी आहे.

 1. हिंदू x मुसलमान - ठणठणपाळ हिंदू
 2. हिंदू x बौद्ध - ठणठणपाळ बौद्ध
 3. हिंदू x ख्रिश्चन - ठणठणपाळ हिंदू
 4. तथाकथित उच्चवर्णिय x तथाकथित मागास - ठणठणपाळ मागास
 5. भारत x पाकिस्तान - ठणठणपाळ भारत
 6. भारत x अमेरिका - ठणठणपाळ भारत (म्हणजे ते कुठले एजंट आहेत ते कळू नये म्हणून)
 7. भारत x इंडिया - ठणठणपाळ भारत
 8. शहरी x ग्रामीण - ठणठणपाळ ग्रामीण
 9. भाजपा x साम्यवादी - ठणठणपाळ साम्यवादी
 10. काँग्रेस x साम्यवादी - ठणठणपाळ साम्यवादी
 11. भाजपा x काँग्रेस - ठणठणपाळ भाजपा
 12. काँग्रेस x भाजपा - ठणठणपाळ काँग्रेस

यादी संपत नाही. थकले!!

विस्तृत

विस्तृत टंकनाबद्दल आभार.
इथे 'पानी रे पानी तेरा रंग कैसा' हे गाणे आठवले. :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

११ व १२

कृपया ११ व १२ मधील फरक स्पष्ट करावा :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सोप्पयकी

११. भाजप डाव्या बाजूला आहे.
१२. काँग्रेस डाव्या बाजूला आहे. :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

फरक

ते कधी कोणाची आणि का बाजू घेतात हा फरक मला कळला असता तर मीही अमेरिकेची एजंट झाले नसते का!

मला डावी बाजू उजवी बाजू असे करायचे होते पण पूर्ण लिश्ट लिहिल्यावर काही ठिकाणी ते तसे नाही हे कळले आणि पुन्हा टंकायचा कंटाळा आला.

क्वांटमपाळ

या निष्टुर जगात प्यार नाही!

हाच तो गहन प्रश्न

आय पी एल पहातांना माझे असेच होते.

शशी थरूर वि. ललित मोदी

सांगा; शशी थरूर वि. ललित मोदी - ठणठणपाळांची बाजू?

सुनन्दा

सुनन्दा

हॅहॅहॅ

परफेक्ट :)

हाहाहा

कितीदा x फुटलो- धम्मकलाडू यडावला

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हॅहॅहॅ

Elizabeth: Whose side is Jack on?
Will Turner: At the moment?
- द कर्स ऑफ द ब्लॅक पर्लक्ष्

ते

ते जॉनी डेप. मग आपण सगळे पायरेट की काय? :प्
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

यावरून स्मरले

मराठी वि. इंग्रजी वादात ते इंग्रजी
संस्कृत वि. मराठी वादात ते मराठी

आणि

इंग्रजी वि. संस्कृत? :)

कठीण निवड

तेव्हा बहुदा चीनचे उदाहरण देऊन ते गोंडी/माडिया भाषा सक्तीची करावी असे सांगतील.

जॉनी डेप अमेरिकन आणि "ते" ही

ते जॉनी डेप. मग आपण सगळे पायरेट की काय?

त्यांना आपण किडनॅप करून बंद करून ठेवू शकतो का? जेणेकरून बटबटीत लेखांचा रतीब कमी होईल? तर मी पाररेट पायरेट खेळायला तयार आहे.

जॉनी डेप अमेरिकन आणि "ते" ही

मैं ना कहती थी की अमेरिकासे लागे-बांधे हैच करके

मात्र

मात्र या लेखांचा एक चांगला परिणाम म्हणजे खरडफळा म्हणून ते वापरले जाऊ शकतात. :)
उपक्रम पंतांनीही खरडफळा सुरू करायला हरकत नसावी.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

जुनी मागणी

त्यांना आपण किडनॅप करून बंद करून ठेवू शकतो का? जेणेकरून बटबटीत लेखांचा रतीब कमी होईल? तर मी पाररेट पायरेट खेळायला तयार आहे.

तशी मागणी आधीही झाली होती.

मानवतावादी

तशी मागणी आधीही झाली होती.

धन्यवाद.

तिथे ते मानवतावादी होते हे ही कळले. ;-)

दुटप्पी

इतके दिवस हिरवा दहशतवाद ऐकताना गुदगुल्या होत होत्या आता भगवा दहशतवाद म्हणताच मिरच्या झोंबल्या का?

यशस्वी लेखक

ठण२पाळ हे सर्वात यशस्वी लेखक आहेत. त्यांच्या प्रत्येक लेखाला/चर्चेला खूप प्रतिसाद मिळतात.

त्याच्या लाल रक्ताच्या एका थेंबातून लाखो ठण२पाळ जन्म घेतील.

अनेक प्रतिक्रिया आल्या .पण नेहमी प्रमाणे ठण२पाळ याला झोडून काढण्या पलीकडे कांही विचारच झाला नाही. बरोबर आहे म्हणा ताकही फुंकून पिणारे आपण या पेक्षा दुसरा विचार काय करणार .अहिंसेच्या नसबंदी मुळे मने सुद्धा कमजोर झाली आहेत. ठण२पाळ याला किडन्याप काय त्याला मारून ही कांही उपयोग होणार नाही. त्याच्या लाल रक्ताच्या एका थेंबातून लाखो ठण२पाळ जन्म घेतील. इतका माझा आत्मविश्वास आहे.
महत्वाचा मुद्दा हा भगवा दहशतवाद का निर्माण झाला . याची कांही कारणे असतील का याचा अभ्यास करण्याची तसदी ना विरोधी पक्षाने केली ना सत्ताधारी . मुळातच हिंदू हा सहिष्णू आहे तलवारीच्या टोकावर धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदुनी कधीही केला नाही. मग हा भगवा दहशदवाद का निर्माण झाला. हा निर्माण होण्यास कॉंग्रेस राज्यकर्त्यांचे मुस्लीम दहशतवाद विरूद्धचे कमजोर धोरण कारणीभूत आहे. पाक दहशदवादी गेल्या ६० वर्षा पासून काश्मीर जाळत आहे , या दहशतवाद्यांनी भारतात मुंबई,पुणे येथे कित्येक वेळा हल्ले केले, कारगिल हल्ला केला एव्हढेच नव्हे तर भारतीय संसदेवर सुद्धा हल्ला केला.या सर्व प्रसंगी केंद्र दहाषदवाद्यांचा खातमा करण्यास पराभूत ठरले. किंबहुना मतांच्या घाणेरड्या राजकारणा मुळे केंद्राने कणखर भूमिका कधीच वठवली नाही. यातूनच केंद्र विरुद्ध च्या रागामुळे हिंदुनी सुद्धा दहशदवादी कृत्य करण्यास सुरुवात केली. यातूनच ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत घडलेल्या बाबरी मशिदीच्या ... बाबरी विध्वंसाची चोकशी धीम्या गतीने आज १८ वर्षा नंतरही चालतच आहे सर्व राजकारण्यांनी मिळून भारतात एक वाईट पायंडा स्वतः च्या फायद्या साठी पाडून ठेवला आहे. राजकारण्यावर कितीही मोठा गुन्हा नोंदवला गेला तरी त्यास निवडूक लढवण्यास बंदी नाही. याचाच गेरफायदा घेत .मधल्या काळात बाबरी विध्वंस करणारे सत्तेत येवून सुद्धा गेलेत. चारा घोटाळा करणारे लालू ,शिबू सोरेन, कोडा,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस चे अनेक गुन्हेगार नेते राष्ट्रीय नेते म्हणवतात आणि वर्षानुवर्ष जेल मध्ये राहून निवडून येतात. यांची खरी जागा जेल पण हे संसदेत बसून देशाचा कारभार करतात,धोरणे ठरवितात, पगार वाढवून घेतात.पण शासन करत नाही. या सर्वाचा दुष्परिणाम जनतेवर झाला आणि जनतेनेच स्वरक्षण करण्या साठी प्रति दहशवाद सुरु केला . यास अनेक पक्षांचा हातभार , पाठींबा आहे. पण स्वतः ला निधर्मी मानणारे जसे यांच्या पासून हात झटकतात तसेच हिंदुधर्मीय पक्ष सुद्धा विश्वामित्री पवित्रा घेतात. हीच हिंदूधर्माची शोकांतीका आहे.

काँग्रेस

---हा निर्माण होण्यास कॉंग्रेस राज्यकर्त्यांचे मुस्लीम दहशतवाद विरूद्धचे कमजोर धोरण कारणीभूत आहे.----
काँग्रेसमधे कोणत्या धर्माचे लोक आहेत?

येथे..

या धाग्या वर लोक मा. चिदंबरम् यांच्या उद् गारांबद्दल लिहितील असे वाटले होते. हा एक गंभीर विषय आहे असे उपक्रमींना वाटत नाही का? ठणठणपाळ जसे असतील तसे असोत, बाकी सदस्य तर त्यांच्या सारखे नाहीत ना? ठणठणपाळ यांच्या लेखन शैली/ विचार या बद्दल चर्चा करायला हवी की या उद् गारांबद्दल? मी उपक्रमवर काही चांगले वाचायला मिळेल म्हणून येतो. पण निराशा झाली.

-१

चिदंबरम यांचे मत आक्षेपार्ह नाही आणि येथे आक्रस्ताळी चर्चा करण्यासारखे तर मुळीच नाही असे उपक्रमींना वाटले असेल तर?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

तसे नाही

मुळात चिदू ही व्यक्तीच आक्षेपार्ह आहे ना!

का

चिदंबरांवर आक्षेप का?

एक आक्षेप

हे वक्तव्य करण्याचे काही प्रयोजन नसताना उगीचच नवा धुरळा उडवून राहुल गांधी आणि जयराम यांच्याशी राजकारण करण्याचा हा डाव वाटला.

राजकारण

आत्ताच Express मध्ये वाचलं कि वेदांताच काम थांबवण्यामागं अमेरीकन कंपण्यांचा दबाव त्यामुळेच राहुलची उठाठेव.आम्हाला नाय समजत राजकारण त्यामुळं तोंडाला कुलुप लावलेल बरं.

अवं दादा

अवं दादा,
ष्टोरी सारकीच म्हनून तुम्ही गॉडफादर बगनार की धर्मात्मा? ष्टोरी कशी सांगताय हे पन बगाया नको का?

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
--
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय
--

हित शायरी लेखणी पोचन हित वरण भाताची गोडी रं

प्रेषक शहाणे...उंटावरचे जावू द्या कश्याला चर्चा करायला हवी त्या हिरव्या भगव्या हिंसाचाराची उगीच डोक्याला ताप की , आज आमच बर चललं आमच्या घरात शांतता आहे, ही आग हिंसाचार आमच्या पर्यंत पोहनचली तर आम्ही तोंडावर पाढरे फडके गुंडाळून दंडावर काळ्या निषेधाच्या फिती लावून दहाषदवादा विरुद्ध निषेध मोर्चा काढू, अजून मृतात्याम्या च्या फोटो समोर मेणबत्या लावूत नर्काश्रू ढाळूत , TV समोर तावातावाने सरकारच्या नाकामी बद्दल बोंबलू , या शिवाय आम्ही जास्त काय करू शकतो . यामुळे आमच हे गाव कोरा कागद आहे. पिंजरयातल्या गाण्या सारख
अव हे गाव लय न्यार हीत थंड गार वार याला गरम शिणगार सोसना ,
याचा आधाशाचा तोरा , याचा कागद हाय कोरा
हित शायरी लेखणी पोचन
हित वरण भाताची गोडी रं , नको फुकट छेडाछेडी रं ,
अरं सोंग ढोंगाचा बाजार हिथला , साळसूद घालतो अळीमिळी ........

तसं न्हाई दादा...

अव हे गाव लय न्यार हीत थंड गार वार याला गरम शिणगार सोसना

आवं, गरम शिणगार आमालाबी आवडतो. पन येकाच दिसात धा 'शिणगारी' शिणुमे बघितले तर कोनी बी नरम पडेल, न्हाई का? आन् तुमच्या थेटरात दुसरं काय लावतच नाय तुमी. जरा थोडं कौटुंबिक, मारामारीवाले, कधी आध्यात्मिक वगैरे पन लावून बघा... मग बगा, कशी गर्दी जमते ते. काय?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

राहु द्या

नका हो ऐकू राजेशरावांचं.. राहु द्या आहे तसं .. नाहीतर उपक्रमावर खफ कसा मिळेल?
शेवटी प्रत्येक थेटराची प्रतिमा वेगळी आणि आड्यन्स येगळा.. हे खरं की तुमच्या नेहमीच्या गरम शिणगाराचे आड्यन्स उपक्रमसारख्या गावात कमीच आहेत..पण म्हून थांबु नका.. जर इतर गावांमदेबी लागु द्या तुमचा शिणुमा.. थितं लय फेटे उडतील

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

श्शी! काय बाई वरण भात

हित शायरी लेखणी पोचन
हित वरण भाताची गोडी रं , नको फुकट छेडाछेडी रं ,

हुडुत! कसला काय वरणभात? पिंजर्‍याच्या मास्तरचं काय झालं माहित आहे ना! आम्ही कधीच शाहणे झालो.

आम्ही चिकन-मटण हादडणारी, पंचतारांकित हॉटेलात खाणारी, पाण्याच्या ऐवजी कोल्ड ड्रिंक पिणारी आणि संध्याकाळी मद्य-मदिरेचे चषक हिंदकळवणारी माणसे. आम्हाला काय पर्वा आहे राजकारण्यांची, शिक्षण संस्थांची, गुंडगिरीची वगैरे. आमच्याकडनंच पेट्या पोहोचतात ना त्यांना. म्हणूनतर श्री श्री ठणठणपाळ येथे येऊन आमची कानउघडणी करत असतात. त्यांना काही प्रश्न विचारले की त्यांचा अपमान होतो कारण त्यांना शहरी, इंडियन, सुशिक्षित लोकांवर राग आहे. आमच्या दुर्दैवाने आम्ही तेच आहोत.

काका काकू

काका काकू लोक बंद करा तुमच्यातले वाद माझ्यासारख्या नव्या पिढिला काहितरि कामांच सांगा

ठणठणपाळ कोणावर रागावला का?

श्री ठणठणपाळ त्यांना काही प्रश्न विचारले की त्यांचा अपमान होतो.चर्चा करताना ठणठणपाळ कधीच रागवत नाही. विचारांचा मुकाबला विचाराने करा. ठणठणपाळ ला जेल मध्ये टाका,त्याला नेट सवलत देवू नका असले उपाय केले तरी कांही फरक पडणार नाही. कधीतरी ठणठणपाळ कोणावर रागावला का? दाखवून द्या.

काहिसं खरं.

हे बरीक खरं.. ठणठणपाळ कोणत्याही उपक्रमींवर थेट चिडलेले.. रागावलेले आठवत नाहित.. लोकांनी त्यांच्या लेखनशैलीवर कधी विचारांवर थेट टिप्पणी केली तरी त्यातील वैयक्तीक भागाला टाळून ते फक्त प्रवृत्तीवर बोलतात
मात्र ते पूर्ण रागवत नाहीत हे ही पूर्ण खरे नाही.. ठणठणपाळ रागवतात की प्रत्येक लेखांतून ते कोणत्याना कोणत्या विषयांवर रागावलेले असतात :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

जाऊ द्या

Thanthanpal मस्त पाऊस पडतोय बाहेर जा Coffee घेऊन या मस्त वाटेल आणि राजकारण सोडून दुसरा विषय घ्या आम्हाला समजेल असा

वदतोव्याघात...

मला तरी हा "भगवा दहशतवाद " हा शब्द वदतोव्याघात ( ऑक्सीमोरॉन ) वाटतो (अन तो वापरणारे निव्वळ मोरॉन :) )

का?

असे का वाटते?

द्विरुक्ती

>>मला तरी हा "भगवा दहशतवाद " हा शब्द वदतोव्याघात ( ऑक्सीमोरॉन ) वाटतो (अन तो वापरणारे निव्वळ मोरॉन :) )

असेल. पण हल्ली तो द्विरुक्तीसारखा वाटू लागला आहे (पिवळा पीतांबर).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर