किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे

नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे. आणि मतांच्या राजकारण्याच्या मिठास ,गोड वाणीने, षंढ वृतीने यात भर पडून गोड वागण्याचे विष वेगाने पसरत असल्या मुळे भारताचा हा काश्मीर भाग कधीही दुरुस्त होणार नाही अश्या बिमारीच्या शेवटच्या टोकाला पोहंचला आहे. अश्या अंतिम अवस्थेत दोनच उपाय राहतात . एक वेगाने शरीरात विष पसरवणारा रोग शरीरात पसरू देवून रोग्यास मृत्युच्या दाढेत ढकलणे, किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे. या मुळे रोगी मात्र वाचेल हे नक्की. आणि ही अवघड शस्त्रक्रिया करणार शल्यचिकित्सक मात्र तेव्हढी जोखीम पत्करणारा दयामाया न दाखवारा पाहिजे. मुन्ना भाई मधील डीन डॉक्टर अस्थाना सारखा मै बिमार पर कभी प्यार नाही करता म्हणणारा .
असा बिनधास्त जोखीम स्वीकारणारा शल्यचिकित्सक शासनकर्ता भारतात गेल्या ६० वर्षात झाला नाही असे नाही . अशी अवघड शस्त्रक्रिया करणारा एकमात्र शासन कर्ता संजय गांधी हा होवून गेला. ज्यांना १९७७ ची आणीबाणी आठवत असेल त्या वेळचे सामान्य नागरिक COMMON MAN हे मान्यच करतील. सर्व राजकारणी, नोकरशहा सुता सारखे सरळ झाले होते.आणि जनता सुद्धा शिस्तीत वागत होती. सामान्य माणसाला आणीबाणीचा त्रास झाला नाही. हे ही १००% सत्य आहे. ही आणीबाणी आज पर्यंत राहिली असती तर भारताचे काश्मीर, तेलंगणा, बेळगाव बाभळी सारखे ९९% प्रश्न निर्माण झालेच नसते. फक्त १% जे प्रश्न राहिले असते ते मूर्खपणाच्या स्वातंत्र्या च्या अवास्तव कल्पना , गुन्हेगारा बद्दल मानवतावादी विचार मांडून थ्री पेज वर चमकणारे तथाकथित मानवतावादी, साहित्यिक, विचारवंत स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार समजणारे भ्रष्ट्र राजकारणी यांचेच उरले असते. पण ९९%च्या हिता साठी यांच्या स्वार्थाचा विचार करण्याची गरज नाही. आजच्या आयाराम गयाराम करत मतांचा घोडेबाजार पहिला तर संजय आणीबाणी चांगली असे म्हणावे वाटते. पण देशाच्या दुर्देवाने संजय ला आणीबाणीला पद्धतशीर बदनाम करण्यात आले. आणि विमान अपघात घडवून आपल्या मार्गातील हा काटा आजच्या भ्रष्ट्र राजकारण्यांनी काढला. आणि स्वस्वातंत्र्याच्या( स्वार्थाच्या) नावा खाली देश विकायला मोकळे झाले.

हजारो करोडोचा खर्च करून, भारतीय जवानांचे रक्त सांडून, निरपराध काश्मिरी ब्राम्हणाची वाताहत करून सुद्धा काश्मिरी राजकारणी भारताविरुद्ध विष ओकत असतील तर सरळ काश्मीर ला वेगळे करा. ५ वर्षात जगाच्या नकाशावरून काश्मीर नष्ट होईल. अफगाण पेक्षा वाईट अवस्था होईल मग आपोआप नाक धरत भारतात विना अट समान राज्याच्या अटीवर सामील होतील. कारण काश्मीरची अर्थव्यवस्था संपूर्ण पणे भारतावर अवलंबून आहे. भारता तून पैसा पर्यटक जातात म्हणून त्यांची रोजी रोटी चालते. धर्माने सत्ताअंध झालेल्या पाक चे काय हाल झाले ते आपण पाहताच आहोत. राज्यात अशांतता पसरवून काश्मिरी नेते जास्तीतजास्त भारताला आर्थिक दृष्ट्या लुबाडत आहे. इतर राज्यांनी रास्त पैशाची मागणी केली तरी ती धुडकावून लावणारे केंद्र काश्मीरला मात्र वाटेल तेव्हढा पैसा का पुरवते हा एक प्रश्न च आहे.

किंवा लातोके भूत बातोंसे मानते नाही या प्रमाणे सरळ काश्मीर मध्ये आणीबाणीचा वरवंटा फिरवा, सरदार पटेल ने हैदराबाद मध्ये जसे सैन्य घुसवले होते आणि निजामाचा खातमा केला. ( नेहरून चे सरदार ऐकत बसले असते तर देश्याच्या मध्यवर्ती भागात अजून एक पाकिस्तान निर्माण झाले असते) तसे काश्मिरात सैन्य घुसवा अतिरेक झाला तरी जगाची हि पर्वा करू नका, विरोध करणाऱ्या सर्व राजकारण्याना, तथाकथित मानवतावाद्यांना सरळ गोळ्या घाला. पकडा जेल मध्ये टाका खटला भरा आणि मतांच्या लाचारी साठी त्यांना जनतेच्या पैश्या ने पोसा. असले फालतू मानवतावादी प्रकार करत बसू नका. मतांच्या लाचारी साठी किती दिवस रक्तपात होवू देणार. किती किमत मोजणार याचा आता तरी विचार करा.

Thanks,
Thanthanpal,
Alwaysvisit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

लेखनविषय: दुवे:

Comments

थत्तेंना च्याल्येंज!

बाय द वे, हे आता ब्राह्मणधार्जिणे झाले बरं का!
=))

- छनछनचाळ

च्यालेंज

नाय बॉ.

इथे केलेल्या चर्चेत त्यांनी काही भाग घेतला नाही. मग आपण आपली ऊर्जा कशाला वाया घालवावी?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बापरे

श्री. ठणठणपाळ हे कधीकधी मानवतावादी असल्याचा मला भास होतो (- म्हणजे मुंबई बलदंडपणे स्वतःकडे वीज ओढून घेते, तर श्री. ठणठणपाळ गरीब बिचार्‍या ग्रामीण महाराष्ट्राचा कैवार घेतात.)
आता या लेखाचे म्हणणे ऐकून मानवतावादी श्री. ठणठणपाळ यांना कैद करून आर्थर रोडवरील आलिशान कोठड्यांमध्ये जनतेच्या पैशाने पोसावे लागेल. धडकी भरते.

आता या लेखाचे म्हणणे ऐकून मानवतावादी श्री. ठणठणपाळ यांना कैद करू

तिथे इंटरनेट मात्र देऊ नका.

- वणवणचाल

हहाहाहाहाहा!

हाहाहाहा! काय लेख आहे. धन्य आहात ठणठणपाळ.

अवांतर: चीट

रिकामटेकडे, तुमच्याकडे उपक्रमावरील शीर्षकाला चीट करण्यासारखे काही आहे का? ठणठणपाळ यांनी शीर्षक टाकले की त्यातले फक्त १०% प्रकाशित व्हावे.

तोडगा

केवळ शीर्षकच का?

- भिकारखेकडा

अर्रर्र!

चुकलंच माझं!

अवांतराबद्दल क्षमस्व!

संजय गांधी झिंदाबाद...

किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे

ठणठणपाळांनी भारताचा जसा विचार केला आहे तसा मी उपक्रमाचा करता येईल का बघत होतो... हम्म्म्म...

मै बिमार पर कभी प्यार नाही करता म्हणणारा .

मूळ वाक्य 'मै बीमारी से कभी प्यार नही करता' आहे का? नाही तर असले जालीम उपाय करताना बीमार मेला तरी त्या डॉक्टरला पर्वा राहाणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हा हा

ठणठणपाळांनी भारताचा जसा विचार केला आहे तसा मी उपक्रमाचा करता येईल का बघत होतो... हम्म्म्म...

फुटलो.

(ढणढणजाळ) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पाक दहाषदवाद्या पेक्षा भारतातील वेगवेगळ्या स्वरूपाचा अंतर्गत दह

मी ब्राह्मण द्वेष्टा कधीच नव्हतो आणि नाही. फक्त ब्राम्हम्ण्याच्या नावा खाली सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या विरुद्ध बोलत असतो, सामान्य जनतेला लुबाडणारा कोणीही असो त्याला मी विरोध करणारच. त्याच बरोबर जेथे चूक असेल तेथे आवाज उठवणारच कोणी ब्राह्मण द्वेष्टा म्हणोत किंवा ब्राह्मणधार्जिणे म्हणोत. सामान्य माणूसच माझ्या विचारांचा मुख्य धागा असतो हे माझ्या लिखाणा वरून स्पष्ट होईल . आज मध्यम वर्गीय स्वत;च्या कोशात गुरफटून गेला आहे. त्यास समाजातील घडणाऱ्या कोणत्याच बऱ्या वाईट घटनांचे कांहीच वाटत नाही एव्हढा तो अलिप्त झाला आहे. म्हणून सतत आवाज उठवणे हेच महत्वाचे आहे. मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे । आणि आज हेच होत आहे. पाक दहाषदवाद्या पेक्षा भारतातील वेगवेगळ्या स्वरूपाचा अंतर्गत दहशदवाद ( त्यात राजकीय , शैक्षणिक, भाषिक, नेत्यांचा, डॉक्टर,वकील, व्यापारी, भ्रष्ट्र नोकरशहा उच्च वर्ग इतर बहुजन वर्ग) यांचा दहाषदवाद्यात समावेश होतो या मुळे COMMON MAN हा आज होरपळून निघत आहे. त्यात तुम्ही सुद्धा असू शकता.हे लक्षात घ्या.

तो मी नव्हेच...

'जज्जसाहेब,
या बाई काय बोलताहेत, हे बाकीचे लोक काय म्हणताहेत, यातले काही म्हणजे काही मला उमगत नाही.
पुन्हा एकदा सगळ्यांना निक्षून सांगतो, की मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे.
हे लोक जे म्हणताहेत ना
तो मी नव्हेच.... '

(अशासारख्या चित्रपट अथवा नाटकातील गाजलेल्या संवादांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्याची इच्छा आहे. उपक्रमी मित्रांनी त्यांना आवडलेले संवाद लिहावेत, असे नम्र आवाहन)

मास्तर

"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच."
"मारूती कांबळेचं काय झालं?"
-- मास्तर, सामना चित्रपटात.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

प्रश्न

You have many questions and though the process has altered your consciousness, you remain irrevocably human. Ergo, some of my answers you will understand, some you will not. Concordantly, though your first question may be the most pertinent, you may or may not realize, it is also the most irrelevant. - The Architect (The Matrix Reloaded)क्ष्

इंग्रजी

इंग्रजी पन चालतय व्हय? :)

"There's a difference between knowing the path and walking the path." - Matrix

"Get busy living? Or Get busy Dying?"
"Salvation lies within."
- Shawshank Redemption

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

ईस्टवूड

Deserve has got nothing to do with it -- William Munny.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

हे काय?

षिर्शकावरून "You've got to ask yourself one question: 'Do I feel lucky?' Well, do ya, punk?", "Go ahead, make my day" हे अपेक्षित होते.क्ष्

सॅल्वेशन

ह्यो ईस्टवूड येगळा. (म्हणजे त्योच आसूनबी)

आम्हाला नवा ईस्टवूड जास्त आवडतो.

I saw your last fight Shawrelle. You spent so much face time on the canvas, you thought the canvas had titties. - Maggie Fitzgerald (Million Dollar Baby)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

हम

"हम भी वो है जो कभी किसी लाइन में खडे नही होते. जहां हम खडे होते है, लाइन वहींसे शुरू होती है." -- आबिताबच्चण, बहुतेक लावारिस.

"नीचे तुम्हारी आंटी बहोत सारे अंकल्स को लेकर आई है. " -- आबिताबच्चण, डॉन.

"बोलने के लिए जिंदा रहना जरूरी होता है. " -- सत्या

"फिर तुमने समस्या बदल डाली." -- हेराफेरी

अंदाज अपना अपना आख्खा चित्रपट.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

योक रेक्टीफिकॅसन

"हम भी वो है जो कभी किसी लाइन में खडे नही होते. जहां हम खडे होते है, लाइन वहींसे शुरू होती है." -- मूळ कल्पना - गोरा गुंड - कालिया

ऐसा

ऐसा है का? ई बात हमार खोपडिया से निकल गई थी. रेक्टीफिकेसन के लिए बहुत आभारी है.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

धर्मेंद्र

कमीने कुत्त्त्त्त्त्त्त्त्ते......मैं तेरा खून पी जाउंगा!

||वाछितो विजयी होईबा||

बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना

"बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना"

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आँ

>>कमीने कुत्त्त्त्त्त्त्त्त्ते

मी एकदम कर्मण्येवाऽ धिकारस्ते वाचलं. :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

आयिलबीबॅक

"I'll be back."

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विक्रमादित्य

आजकाल उपक्रमावर आलो की बिक्रम और बेताल का आठवते कोण जाणे ;)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

दुरुस्ती

'चक्रम आणि बेताल' असे तुम्हाला सुचवायचे आहे काय? ('और' या हिंदी शब्दाची मुजोरी नको!)

- छिनालढोकळा

शिरियल

शिरियल हिंदीत बघितली होती म्हणून हिंदी.

--

मेरा अज्म इतना बुलंद है!

तो मी नव्हे असा पळपुटेपणा मी आयुष्यात करत नाही. होय जज्ज साहेब तो मीच आहे.अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा तो ठणठणपाळ मीच आहे. "मारूती कांबळेचं काय झालं?" मास्तर, सामना चित्रपटात. होय मी तोच मास्तर आहे, जो तुम्हाला , तुम्ही केलेल्या पापाचे प्रयाश्चित कधी करणार. असा प्रश्न सतत विचारणारा. आणि विक्रमादित्य सारखा .... आणि विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही आणि परत तो स्मशानात गेला आणि झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून निघाला ..... मला या विक्रमादित्याच्या सतत प्रयत्न करण्याच्या वृत्तीचे नेहमीच कोतूक वाटत आले आहे. प्रयत्न करावेत ते असे
म्हणून कितीही अडथळे आले तरी विक्रमा सारखा मी लिहित राहणार अन्यायाच्या विरोधात लढण्या साठी भ्रष्ट्राचाराच भूत गाडून टाकण्यास , समाजात समानता आणण्यासाठी सतत आवाज आवाज उठवणार कितीही टीका झाली तरी, आर्थर जेल मध्ये टाकले तरी. मेरा अज्म इतना बुलंद है! कमीने कुत्त्त्त्त्त्त्त्त्ते......मैं तेरा खून पी जाउंगा! वा वावाह !

थांथांपाल साहेब मनावर घेऊ नका,

थांथांपाल साहेब मनावर घेऊ नका,

ज्यांचं दोन वेळचा भागलं आहे त्यांना हे संकेत स्थळ म्हणजे timepass चे साधन आहे. दूर कुठेतरी AC रूम मध्ये बसून टंकायला त्यांना काय जातंय.

भारताची दलीन्द्री हीच आहे कि कोणी कधी समजूनच घेत नाही. हे असंच चालत राहणार.

I AM THE TRUTH.
हे म्हणण्यातच सगळी हयात जाणार आहे.

तुम्ही नाहीरे वर्गाची जी बाजू मांडताय ते खरच एक चांगलं काम आहे. पांढर पेशा लोकांना मिरच्या झोम्ब्तात त्यामुळे.
तुम्ही नका मनावर घेऊन.

आधी ज्यांना येडा येडा म्हणून हिणवला गेला आहे त्यांनीच जग बदललेले आहे.
(भगतसिंग येडाच होता, शहाणा असता तर मस्त पैकी सुंदर मुलीशी लग्न करून बायका मुले ह्या मध्ये रमला असता.
)

बाकी हे तथाकथित विचारवंत, भारत बुडायची वेळ आली तरी टंकत राहतील आणि एकमेकांची उणी दुनि काढत राहतील.

वणवा पेटल्याची कोणाला चिंता नाही, जो तो शब्दांचा कीस पाडण्यात स्वताला धन्य समजतो.

तुम्ही लिहा.
कोणी नाही घेतले तरी आम्ही घेतो मनावर.
आम्ही वाचतो तुमचा एकेक शब्द न शब्द.

एक नवा विचार म्हणून तरी....

ठणठणपाळ यांच्या लिखाणाला इथे कुणीही गांभीर्याने घेतलेले नाही. हरकत नाही. एकेका संस्थळाची प्रकृती असते.
इथले सदस्य विद्वान आहेत, असा एक सर्वसामान्य समज आहे. (मीसुद्धा याच्याशी सहमत आहेच!) जगातल्या यच्चयावत विषयांबद्दल इथे उहापोह होतो. मग अशा वेळी ठणठणपाळ यांनी मांडलेला एक नवा मुद्दा (काश्मिर भारतापासून वेगळे करावे..) दुर्लक्षीत राहू नये असे मला वाटते. हाच मुद्दा एखाद्या विद्वत्ताप्रचुर भाषाशैलीच्या लेखात आणि नेत्यांचे अवमानकारक उल्लेख वगळून कोणी मांडला असता, तर त्यावर नक्कीच चर्चा घडली असती. ठणठणपाळांची भाषाशैली, आक्रस्ताळेपणा, गांधी-नेहरू द्वेष, पूर्वग्रह वगैरे जरा वेळ बाजूला ठेऊन आपण त्यांच्या विचाराकडे पाहिले पाहिजे. त्यांची कळकळ खरी असावी, एवढे तरी मला खात्रीलायकरित्या वाटते.

"दूध मांगो, खीर देंगे..
कश्मिर मांगो, चीर देंगे"

आमच्या हायस्कूलच्या रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या भिंतीवर ही घोषणा कुणीतरी लिहिलेली होती. (मी एका लहानशा गावात वाढलो. तिथे अनेक राष्ट्रीय घटनांचे पडसाद रिकाम्या घरांच्या दर्शनी भिंतींवर उमटत असत. गॅट करार हाय हाय, चलो दिल्ली वगैरे काही आठवतात.) तर ते वयच अजाणते असल्याने त्यावेळी ती घोषणा 'लै भारी' वगैरे वाटायची. आपल्या नकाशाच्या टॉपला जो मुकुटासारखा भाग आहे, तो म्हणजे काश्मिर आणि तो पाकिस्तान आपल्याकडून हिसकावू पाहतंय एवढेच माझे त्याकाळी त्या समस्येचे आकलन होते. जसजसे वय आणि वाचन वाढत गेले, तसतशी ही भावनाही बदलत गेली. सर सिरील रॅडक्लिफ यांची लाईन, संस्थानांचे विलीनीकरण, राजा हरिसिंग, टोळीवाले, लाईन ऑफ कंट्रोल वगैरे इतिहास वाचतांना काही धक्के बसले. मध्यंतरी मी स्वतःच जम्मू- काश्मिरला जाऊन आलो. माझा एक बालमित्र तिथे पूंच-राजौरी भागात मिल्ट्रीमधे तैनात आहे. तो कधी गावाकडे आला तर त्याचे अनुभव सांगत असे. या सगळ्यातून हळूहळू माझे काश्मिर समस्येचे आकलन बदलत गेले. (नंतर काही जालीय चर्चाही वाचनात आल्या.. त्यातही अनेक गोष्टी समजल्या.)
हल्ली हल्ली मला असे वाटू लागले आहे की काश्मिर (नकाशात दिसते तसे आणि तेवढे) भारताला कधीच परत मिळणार नाही. "दूध मांगो खीर देंगे" ची घोषणा असलेली भिंत आता ढासळली आहे. त्याचबरोबर माझ्या असेही लक्षात आले आहे, की हळूहळू भारतीय जनमानसही काश्मिरबद्दल तितकेसे आग्रही राहिलेले नाही. मेंदू काहीही सांगत असला, तरी माझे अनेक भल्याबुर्‍या संस्कारांनी लिप्त झालेले भारतीय मन भारताचा शीर्षविहीन नकाशा कल्पून दःखी होते. मी संघवाला नाही, आणि काँग्रेसवालाही नाही. मी बहुसंख्य उपक्रमींच्याइतका विद्वानही नाही. तरीही (किंबहुना, त्यामुळेच) काश्मिरचे भारतापासून विलग होण्याची ही शोकात्म अपरिहार्यता अथवा अटळ शक्यता मला विलक्षण क्लेशदायक वाटते.

इतर उपक्रमींचे याबाबत काय विचार किंवा तर्क आहेत, हे जाणून घ्यायला आवडेल.

गंभीर आणि अवांतर

ठणठणपाळ यांच्या विधानाला कुणी गंभीरपणे घेत नाही असे तुम्हाला का वाटले ते कळत नाही. मी वरच्या एका प्रतिसादात काश्मीरबाबत दुसर्‍याधाग्याचा दुवा देऊन तेथे ठणठणपाळ यांनी काही योगदान दिले नाही असे म्हटले होते. बहुतेक धाग्यांवर आलेल्या प्रतिक्रियांना ते सहसा त्या धाग्यावर उत्तर देत नाहीत. प्रतिक्रियेचे उत्तर म्हणून बहुधा ते एक नवीन धागा काढतात.

जर मीनिंगफुल चर्चा होत नसेल/ करायची नसेल तर मग गंभीरपणे कसे घ्यायचे हे या धाग्यावर अवांतर प्रतिसाद देणार्‍या बहुतेक सदस्यांना कळत नसावे म्हणून हा दंगा झाला असावा.
-------------------------------------
मीदेखील पूर्वी नेहरूंमुळे काश्मीरचा प्रश्न चिघळला असेच समजत होतो. पुढे वाचनातून अनेक गोष्टी पुढे आल्या आणि आपण समजतो तसे घडले नव्हते असे लक्षात आले. माझे सध्याचे मत घटनांच्या क्रमानुसार त्या धाग्यावर मी मांडले होते. ते आपण वाचलेच असेल.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

खालील

खालील विधानांवर काय मत व्यक्त करावे हे माझ्या अल्पोत्तम मतीला कळले नाही म्हणून डायलॉक लिहीले.
१. संजय गांधी महान होते.
२. आणिबाणीचा त्रास कुणालाही झाला नाही.
३. आणीबाणी चालूच ठेवायला हवी होती*.
४. संजय गांधींना मुद्दाम बदनाम करण्यात आले. (म्हणजे बळजबरीने नसबंद्या झाल्याच नाहीत, कदाचित देशाला स्वप्न पडले असावे.)

*आता आणिबाणी चालू असती तर या लेखावर चर्चा करायची वेळ आली नसती हे खरे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

तसे नाही

>>म्हणजे बळजबरीने नसबंद्या झाल्याच नाहीत, कदाचित देशाला स्वप्न पडले असावे

नाही. अशा नसबंद्याच करणे योग्य होते असे त्यांचे म्हणणे आहे. ठणठणपाळ नावाने उपक्रमावर मग कोणी लिहिले असते कोणास ठाऊक.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

नसबंदीचा अतिरेक

त्या काळात नसबंदीचा इतका अतिरेक झाला होता, की बिहारमध्ये तर तरुण म्हणू नका, म्हातारा म्हणू नका, धर आणि नसबंदी कर असे प्रकार घडत होते. मी कुठल्याशा पुस्तकात वाचले होते, की इंदिरा गांधी बिहारच्या दौर्‍यावर गेल्या असताना तेथील खेडोपाडीच्या महिलांनी पुरुषांवरील सक्तीच्या नसबंदीची कैफियत त्यांच्यापुढे मांडली. इंदिरा गांधींनी विचारले, की एकीकडे अपत्यांची संख्या वाढली की त्याचा त्रास स्त्रियांनाच सहन करावा लागतो तर मग तुमचा नसबंदीला विरोध का? त्यावर त्या महिला स्पष्टपणे काही बोलल्या नाहीत, पण लाजून इंदिराजींना म्हणाल्या, 'आप भी औरत है. हमारा मन जानती होगी. जिस पानी में मछलियाँ ना हो, उसका क्या फायदा?' इंदिरा गांधी जनतेची मानसिकता जाणण्यात चतुर होत्या. त्यांनी ही मोहिम गुंडाळण्याचे आदेश दिले.
(हा प्रसंग खरा, की कल्पित हे माहीत नाही, पण नसबंदीच्या अतिरेकाच्या मुद्द्यावरुन आठवला.)

सर कटा....

अपनी आझादी को हम हरगिझ मिटा सकते नहीं|
सर कटा सकते है लेकिन नस कटा सकते नहीं||

अतिरेक

>>नसबंदीचा इतका अतिरेक झाला होता, की बिहारमध्ये तर तरुण म्हणू नका, म्हातारा म्हणू नका, धर आणि नसबंदी कर असे प्रकार घडत होते.

बर्‍याच प्रमाणात या प्रचाराचाही अतिरेक झाला होता असे वाटते.
तेव्हाच्या १९७७च्या निवडणुकीत हा मोठा इशू झाला होता. चौदा वर्षाच्या मुलाची नसबंदी केल्याचे सांगितले जाई. तशा केसेस् झाल्याही असतील पण धर माणूस की कर नसबंदी असे प्रकार झाले नसावेत असे नंतरच्या काळात होतच झालेल्या लोकसंख्यावाढीतून लक्षात येते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

कारण

लोकसंख्या वाढली याचे कारण नसबंद्या विशिष्ट भागांमध्ये काही काळ झाल्या हे असावे. सुदैवाने सर्व भारतात, बर्‍याच काळ झाल्या नाहीत.
यावर त्या काळात प्रकाशित झालेले अरूण शौरी यांचे काही लेख वाचले होते. वाचून अंगावर काटा येतो. किंबहुना हे भारतात घडले यावर बरेचदा विश्वास ठेवणे कठीण होते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

जेल मध्ये टाकून आणि तेथे नेट ची सुविधा नाही दिली तरी माझा आवाज त

इथे म्हणून नितिन थत्ते यांनी दुवा दिलेल्या चर्चे त मी माझे म्हणणे मांडले नाही हे म्हणणे साफ चूक आहेत .त्या दुव्या वरील माझी मते आहेत ती परत देत आहे.
सर्व प्रथम काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा नाहीसा कारा.

प्रेषक thanthanpal (शनि, 07/10/2010 - 17:16)
नेहरू हे हिमालया एव्हढे मोठे होते हे मान्य करतानाच नेहरूंनी हिमालया एव्हढ्या मोठ्या चुका केल्या त्या सुद्धा हिमालया एव्हढ्या मोठ्या होत्या आणि आज ६५ वर्षा नंतर ही आपण त्याची किमत चुकवत आहोत. आणि आत्ता तर मतांच्या राजकारणान मुळे हा प्रश्न आजचे राजकारणी सोडवू शकत नाही.
हा प्रश्न सावरकरांचे विचार राबवणारा नेताच करू शकतो हे आजच्या लोटांगण घालणाऱ्या राजकारण्यांचे काम नव्हे . सर्व प्रथम काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा नाहीसा कारा. भारतातील सर्व कायदे काश्मीरला लागू कारा. भारतीय नागरिकांना काश्मीर मध्ये जमीन खरेदी करण्याचा राहण्याचा अधिकार नाही तो अधिकार प्रदान कारा , मतांच्या राजकारणाची फिकीर न करता दहशद वाड्या विरुद्ध लढाई पुकारून एक घाव दोन तुकडे करा. सावरकरांनी सुचवल्या प्रमाणे निवृत्त सैनिकांच्या तेथे कायम स्वरूपी वसाहती निर्माण करा, त्यांना काश्मीरचे नागरिकत्व द्या. या काश्मीर ऑपरेशन च्या वेळी UNO वा अमेरिकेचे, चीनचे कितीही दडपण आले तर झुगारून देणे. कारण प्रत्येक देशाला आपले हित संबंध जपण्याचा अधिकार आहे. केवळ महाशक्तीची स्वप्ने पाहणे सोडून कणखर नेतृत्व स्वीकारा. आंतरराष्ट्रीय स्वप्नात रंगून जाण्या पेक्षा देशाच्या सर्वांगीण विकासा कडे लक्ष द्या .नक्षलवाद्या पासून ते काश्मीर चे सर्व प्रश्न सुटतील. अखेर महत्वाचे या सर्व प्रक्रीये मध्ये बाधा आणणाऱ्या मानवतावाद्यांना सरळ गोळ्या घाला.

शरण आलेल्या दहशतवाद्याला यंदा "पद्मश्री' जाहीर झाल्याने जम्मू-क
प्रेषक thanthanpal (शनि, 07/10/2010 - 20:24)
आज ६५ वर्षा नंतर ही आपण त्याची किमत चुकवत आहोत. कृपया ससंदर्भ सिद्ध करा. आज जो काश्मीर जळत आहे या पेक्षा अजून कोणता पुरावा पाहिजे. नेहरूंनी हा प्रश्न युनोत नेला नसता तर काश्मीर मध्ये हैदराबाद निजाम राज्यात सरदार पटेलांनी मिलिटरी घुसवली असती तर एकदाच काय तो रक्तपात आर्थिक नुकसान व्हायचे ते झाले असते. आणि ते आपण गेल्या ६५ वर्षात काश्मीरवर केलेल्या प्रचंड खर्चा पेक्षा अत्यंत मामुली असते. २) भारतीय नागरिक जगात कोठेही जमीन खरेदी करू शकतो पण काश्मीर मध्ये नाही हे हे आपणस माहीतच असेल.भारतातील बरेच कायदे काश्मीर ला लागू होत नाही.
क्या कश्मीर अलग देश है? जम्मू-कश्मीर : महिलाओं के हक पर कुठाराघात की तैयारी जम्मू कश्मीर की महिला अगर दूसरे राज्य में शादी करती है तो फिर उसकी राज्य की नागरिकता खत्म हो जाएगी
जावेद मात्झी
शरण आलेल्या दहशतवाद्याला यंदा "पद्मश्री' जाहीर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये नाराजी आहे. अनेक गुन्हे नावावर असलेल्या केन्नाला हा पुरस्कार कशासाठी, असा सवाल केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या "पद्म' पुरस्कारांमुळे निर्माण झालेला वाद जम्मू-काश्मीरमध्येही पोचला आहे. शरण आलेल्या एका दहशतवाद्याला "पद्मश्री' जाहीर झाल्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. या संदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून केंद्राने या दहशतवाद्याला पुरस्कार जाहीर केल्याचे कळते.
दूसरे राज्य में शादी करने पर छिनेगी कश्मीर की नागरिकता!
आईबीएन-7
TimeFri, Mar 12, 2010 at 09:27 , Updated at Fri, Mar 12, 2010 देश सेक्शन
Tagsटैग: jammu, citizenship, pdp | 1 कमेंट्स
Email Print
जम्मू बार एसोसिएशन ने भी इस बिल के विरोध में गुरुवार को दिन भर कामकाज ठप रखा।
जम्मू बार एसोसिएशन ने भी इस बिल के विरोध में गुरुवार को दिन भर कामकाज ठप रखा।
Watch Video
श्रीनगर। जम्मू कश्मीर में महिलाओं के हक को छीनने की तैयारी हो रही है। पी़डीपी के एक विधायक मुर्तजा खान ने विधान परिषद में एक बिल पेश किया है। अगर ये बिल पास हो गया तो फिर जम्मू कश्मीर की महिला अगर दूसरे राज्य में शादी करती है तो फिर उसकी राज्य की नागरिकता खत्म हो जाएगी। इस बिल का समर्थन कांग्रेस और नेशनल कॉन्फ्रेंस ने भी किया है।
हालांकि बीजेपी ने इस बिल का कड़ा विरोध करने का फैसला किया है। इसके अलावा जम्मू बार एसोसिएशन ने भी इस बिल के विरोध में गुरुवार को दिन भर कामकाज ठप रखा। भाजपा विधायक अशोक खजुरिया कहते हैं कि भाजपा ऐसे बिल को कभी भी नहीं लाने देगी। यह बिल हर तरह से डिफिट हो ऐसी व्यवस्था होगी।
जम्मू कश्मीर में धारा 370 के चलते ऐसा प्रावधान है कि यहां पर बाहरी राज्यों के किसी व्यक्ति को नौकरी और जमीन नही मिल सकती क्योंकि यहां पर स्थायी नागरिकता प्रमाण जरूरी है हालांकि महिलाओं की नागरिकता को खत्म करने का बिल पहले भी कई बार पेश किया जा चुका है लेकिन ये पास नहीं हो पाया। इस बार ये मामला इसलिए महत्वपूर्ण है क्योंकि सरकार ने भी इस बिल का समर्थन कर दिया है।
ज्या काश्मिरात भारतीयांना जमीन विकत घेण्याची परवानगी नाही त्या काश्मीर मध्ये आज पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांना गुंडांना भारतात काश्मिरात बसवण्याचे खुद्द मुख्यमंत्री उमर म्हणतात. पण मतांच्या लाचारी मुळे त्याला विरोध करण्याची एकही राजकारण्याची हिम्मत झाली नाही. आपल्या देशात मूळ समस्येला हात घालण्याची कॉंग्रेस भाजप होय भाजपासह एकही राजकीय पक्षाची हिम्मत नाही. भ्रष्ट्राचार हा एकमेव कार्यक्रम आहे यांचा आणि जनता माझा काय संबंध म्हणत वन रूम किचेनाच्या घरात दार बंद करून बसतात आणि नेता निवडण्याच्या वेळी रामायण महाभारत पाहत बसतात किवा शिर्डीला जातात जसे कांही हा बाबा यांचे सर्व संकट दूर करणार.
जेल मध्ये टाकून आणि तेथे नेट ची सुविधा नाही दिली तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. सावरकरांनी अंदमान च्या काळ्या कोठडीतून कसली ही सुविधा नसताना खंड काव्य प्रसिद्धी केलेच . आता तुम्हा करंट्या नेहरूवादी भारतीयांना त्याची कदर नाही हा दोष सावरकरांचा नाही तुमचा आहे.

मुद्दे

मी खालील मुद्दे मांडले होते-

काश्मीरविषयक घटनांचा कालक्रम.
पुरेसा काळ युद्ध केल्यावरच युद्धबंदी केली.
जेवढा काळ युद्ध झाले त्यात सैन्याला फार यश येत नव्हते.

म्हणजे युद्धबंदी करण्यामुळे काश्मीर जिंकता आले नाही असे नव्हे.

या मुद्द्यांचा कसलाच प्रतिवाद ठणठणपाळ यांच्या उत्तरात दिसत नाही. पण नेहरूंची काश्मीरमध्ये चूक झाली हे पालुपदच फक्त दिसते.

दणदणमार
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

तुम्ही घाबरु नका...............

तुम्ही घाबरु नका. हे खालील मुद्दे जगाच्या अंतापर्यंत सुटणार नाहीत.

१) भारत पाकीस्तान वाद
२) भारत चीन वाद
३) नक्षलवाद
४) तालीबान / अल कायदा
५) दाऊदला भारतात फरफटत आणणे.
६) वीज आणी पाणी याबाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणे.
७) अमेरीकेने दुसर्‍या देशांच्या प्रश्नात हस्तक्षेप करणे.
८) भ्रष्टाचारमुक्त भारत

आणी बरेच काही बाही. ही यादी हवी तेवढी लांबविता येईल.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

आणखीन् एक

>>> आणी बरेच काही बाही. ही यादी हवी तेवढी लांबविता येईल. <<<

यात "बेळगाव-निपाणी-बिदर्-भालकी-कारवार" सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हेहे घेऊया.

सैन्याला फार यश येत नव्हते

हे सैन्याचे अपयश नव्हे तर नेतृत्वाचे अपयश आहे. यावेळी देशा चा जो नेता होता त्याचे अपयश आहे हे १०१% . कारण नेताच जर कच खावू असला तर सैन्या कुठून लढणार आणि हेच चीन च्या वेळीही घडले
चूक एकदा माफ असते नेहमी नेहमी नाही.

शिवाजीमहाराज

मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचं युद्ध हरले होते. ते शिवाजीमहाराजांच्या नेतृत्वाने कच खाल्ली म्हणून असं तुम्ही सुचवता आहात का? यावर तुम्ही म्हणाल की नाही, शिवाजीमहाराज थोरच होते, ते युद्ध हरण्याला तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती.

मुद्दा असा आहे, की थोर कोण व कचखाऊ कोण हे आधीच ठरवलं असलं की अशा घटनांचा वेगवेगळा अर्थ सोयीस्करपणे लावता येतो. मग त्या घटनांची उदाहरणं पुरावे म्हणून देण्यात काय अर्थ आहे? तो केवळ वर्तुळाकार युक्तीवाद होतो. थत्तेंनी व इतरांनी दाखवून दिलेल्या घटनांची तर्कशुद्ध संगती लावण्याऐवजी नेहरू मऊ होते व त्याऐवजी संजय गांधी हवे होते वगैरे म्हणण्याला काय अर्थ आहे?

तुमचे 'नाहीरे' ची बाजू घेण्याचे प्रयत्न स्तुत्य आहेत. पण थोडी तरी तर्कसंगती दाखवा की! भावना 'आहेरे' पण तर्क 'नाहीरे' ही स्थिती चर्चेसाठी पोषक नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर