गुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .

गुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .
पूर्वीच्या काळी शिक्षणाचा आजच्या सारखा बाजार झाला नव्हता. शिक्षण देणे हे पवित्र सामाजिक बांधिलकीचे कार्य समजून केले जात होते. त्याकाळी गुरुजना प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक दीवस त्यांची आदराने पूजा केली जात असे. पण आज काळ बदलला आहे. शाळे पासून ते विविध कला संगीत नृत्य गाणे खेळ हे शिक्षण बाजार झाला आहे. पैसा फेक तमाशा देख असे याही क्षेत्रा चे झाले आहे. पैसा नसेल तर शिक्षणाची कवाडे बंद होतात. शिक्षक ही पूर्वी सारखे सेवाभावी वृतीने काम करत नाही . पुरातन काळी ही हेच चालत होते. आपल्या श्रीमंत शिष्या साठी गरीब मुलाचा चा त्याला कांही न शिकवता स्वतः:च्या अक्कल हुशारीने शिकलेल्याचा गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापणारे गुरु होतेच. पण सामाजिक व्यवस्थे मुळे अज्ञाना मुळे गुरुचे हे पाप झाकल्या गेले
पैश्या वर आधारीत शैक्षणिक डोलारा उभारल्या मुळे पालक, विद्यार्थ्याचा शिक्षका प्रति आदरभाव सुद्धा कमी झाला आहे. आंणी आध्यात्मिक गुरु बद्दल तर बोलणे म्हणजे घाणीत दगड टाकणे आणि आपल्याच अंगावर घाण उडवून घेणे असा प्रकार झाला आहे.गुरुपोर्णिमेच्या नावाखाली करोडो रुपये लाटले जात आहे. याचा कांही हिशोब नाही. सर्व काळा पैसा यामुळे INCOME TAX ,SALES TAX ही नाही. आणि भावनेचा प्रश्न असल्या मुळे मतांच्या राजकारणा करता सरकारही या उत्पना वर पाणी सोडते या मुळे या गुरु पौर्णिमेला किती महत्व द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज नेमाडे म्हणतात तसे हा उत्सव म्हणजे हिंदू समाजातील एक अडगळ ठरणारा आहे .
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

पाठशाला

पाठशाला नावाचा नाना पाटेकरचा एक हलकाफुलका चित्रपट हल्लीच अर्धवट पाहिला. त्यात वरील प्रमाणे शाळेची उन्नती (की अधोगती?) दाखवली आहे. चित्रपटाचा शेवट पाहिलेला नाही पण जिथपर्यंत चित्रपट पाहिला तेथपर्यंत तो आवडला.

व्यवस्था आणि आपण

आपण स्वतः शिक्षक आहात का? की चांगले काही बघायचेच नाही असे ठरवून ठेवले आहे?

आपण कोणच्या गावात/शहरात राहता ह्याबद्दल मला फारशी माहिती नाही, पण पुण्यामध्ये आज कितीतरी शाळा आणि शिक्षक इतके अभिनव आणि सुंदर शैक्षणिक प्रयोग करीत आहेत, कि मला वाटते आमची शाळा अशी का नव्हती.

अक्षरनंदन, ज्ञानप्रबोधिनी, रविशंकर ह्यासारख्या शाळा खूपच चांगले काम करत आहेत, पुस्तकी शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याकडे लक्ष दिले जाते. आणि शाळा हि शिक्षकाशिवाय कशी चालणार?

आणि प्रत्येक व्यवस्थेचे चांगले आणि वाईट असे दोन पैलू असतात, आपला लेख म्हणजे पुण्यातील मध्यमवर्गीय माणूस ज्याप्रमाणे वजा बाजू बघून शेरे मारत राहतो पण चांगल्या बाजूबद्दल त्याला माहितच नसता किवा बोलायचं नसता तसा आहे. शिक्षणातून पैसा कमावला जातोय हे खरा आहे, पण ते शिक्षण नाहीये तो व्यवसाय आहे, सुजाण पालक आपल्या मुलांना अशा शाळेत घालत नाहीत जिथे परिस्थिती एवढी वाईट आहे.

लिहिताना दोन्हीबाजूंचा विचार करावा असे मला वाटते, केवळ जे दिसते तेवढेच जग आहे असे मानणे चुकीचे आहे.

पूर्वी व आजकाल

पूर्वीच्या काळी शिक्षणाचा आजच्या सारखा बाजार झाला नव्हता.

पोराला घरी पाणक्या म्हणून ठेवून घेणे, त्याच्याकडून ढोरमेहेनत करून घेणे हे गुरूच्या कुठच्या सामाजिक बांधिलकीचं आणि सेवाभावी वृत्तीचं लक्षण आहे?

पैसा नसेल तर शिक्षणाची कवाडे बंद होतात.

आजच्याइतकं मुबलक प्रमाणात, स्वस्त शिक्षण कधी होतं? सरकारी शाळांमध्ये कवाडं उघडी आहेत. सुशिक्षितांचं प्रमाण वाढतं आहे. पूर्वी शिक्षणाची कवाडं वर्णव्यवस्थेमुळेसुद्धा बंद होती.

पुरातन काळी ही हेच चालत होते.

पहिल्या विधानाशी हे विसंगत नाही का?

आजूनकोणमी यांच्याशी सहमत - चांगल्याकडे दुर्लक्ष करून फक्त वाईटाविषयी तक्रार करत राहायचं ही आजकालची पद्धतच आहे. पूर्वीपासून चालू असलेली. :)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

सहमत आहे. लेख म्हणजे नेहमीचाच ठणठणाट!
(ठणठणपाळ ज्यावेगाने उपक्रमावर चर्चा प्रसवतात ते बघता किमान त्यांचे सदस्यनाम तरी देवनागरीत करुन घ्यावे ही विनंती)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

गुरु - शिष्य समन्वय शाळेबाहेर अनेक पटलांवर दिसतो.

गुरु - शिष्य समन्वय शाळेबाहेर अनेक पटलांवर दिसतो. उदा- प्रतिथयश डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टर जे त्या हॉस्पिटलमधे काम करुन शिकतात, अशीच उदाहरणे इतर अनेक प्रोफेशनल व्यवसाय करतांना घडतांना दिसतात- वकीली, आर्कीटेक्चर, ई. जेथे-जेथे ह्याठिकाणी गुरु - शिष्य समन्वय उत्तम घडतांना दिसतो, त्या-त्या ठिकाणी ते शिष्य त्या गुरुला वंदन करतांना दिसतात. माझ्या एका डॉक्टर मित्राच्या हॉस्पिटलमधे गेल्या २० वर्षात अनेक प्रशिक्षणार्थी डॉक्टर तयार झाले; आज संध्याकाळी त्याच्या घरी मेळावा असतो; हे सगळे प्रशिक्षित डॉक्टर त्याला आवर्जुन भेटायला येतात.

कमीत कमी...

कमीत कमी...

कमीत कमी एक व्यक्ती आपणास गुरुस्थानी मानेल असे काही करण्याचे ठरवा, तसे करा, आणि त्यानंतर ह्या विषयावर पुन्हा विचार करा. अडगळीची नव्याने ओळख होईल...!

ह.घ्या. ;-)

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

केवळ डावी बाजू पाहू नका !

एक दोन उदाहरणावरून समाजात सर्वत्र वाईटच चालते असे समजणे काविळीचे लक्षण आहे. ज्या एकलव्याचा अंगठा काढला गेला त्याचे उदाहरण `शिष्य` परंपरेचा आदर्श म्हणून मानावे असा धडा घेतल्यास आपण आजच्या विद्यार्थ्यास किमान काही चांगले शिकवू शकतो असे का मानू नये? तसे पाहिले तर गेल्या दहा हजार वर्षात "त्या" एकमेव उदाहरणानंतर त्याच रितीचे त्या परंपरेतील आणखीन् काही उदाहरणे घडली काय? एकलव्याचे पुढे काय झाले याचा अंदाज बांधता येत नाही, पण समजा पुढे तो देखील कुणाचा तरी 'गुरू' झाला असल्यास त्याने आपल्याच परंपरेतील शिष्य तयार केले असतील असे मानु या ना !

प्रवेश प्रक्रियेच्या समयी देणगीच्या रूपाने मेडिकल, इंजिनिअरिंग संस्थातून लाखो-करोडोच्या उलाढाली होत असतात; पण ही मुले ज्यावेळी "कमावती" होतात त्यावेळी शिक्षणावर झालेला खर्च सव्याज वसूल करतातच ना? त्यांनी तुकोबासारखा आतबट्ट्याचा व्यवसाय करावा असे कुणीही म्हणत नाही. हा एक शुद्ध 'गिव्ह् अँड् टेक" धर्तीचा करार आहे; पण त्यामुळे अशा संस्थातून "गुरु-शिष्य" नाते निर्माण होत नाही असे कुणी मानू नये. देणगी हा सर्वस्वी संस्थाचालकांच्या आणि पालक यांच्या अखत्यारीतील बाब आहे, तो सोपस्कार एकदा का पार पडला की या मोठ्या महाविद्याललात उरते ते फक्त संबंधित अध्यापक/प्राध्यापक आणि वर्गातील ती खरोखरी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असणारी मुले. मी हा अनुभव घेतला आहे की, एका नामवंत महाविद्यालयातील डीनचे आणि त्यांच्या गुणवान विद्यार्थ्यांचे किती आनंददायी आणि आदरयुक्त संबंध होते. कॉलेजच्या शेवटच्या दिनी डीनचा निरोप घेताना मुलीच काय पण मुलेदेखील अक्षरशः रडताना पाहिले आहे. अशी कैक उदाहरणे या राज्यात ठिकठिकाणी अनेकाना पाहायला मिळाली असतील. मी स्वतःदेखील "गुरुपौर्णिमे"च्या दिवशी (जर गावात असेन तर) माझ्या वर्गमित्रांसमवेत आमच्या कॉलनीमध्येच राहणारे हायस्कूलमधील इंग्रजी विषयाचे शिक्षकांकडे (जे आता सेवानिवृत्त झाले आहेत) जाऊन मनोभावे नमस्कार करून येतो व तिथे येणार्‍या अनेकांसमवेत किमान एक तास गप्पागोष्टीत काढतो. या दिवशी, सर कटाक्षाने कुणाकडून कसलीही भेट वस्तू स्वीकारीत नाहीत. केवळ चाफ्याचे वा गुलाबाचे एक फूल पुरेसे असते. गुरु पतीपत्नी आणि त्यांच्या अपत्यांनाही अशा गोष्टींचा आनंदच होत असेल ना?

दुसरी बाब म्हणजे, प्रत्येक वेळी उठसूट शासनाच्या शिक्षण धोरणाला वेठीस धरू नये. शासन सर्वदूर शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सातत्याने प्रत्यत्न करीत असतेच असते, किंबहुना ती त्यांची जबाबदारीच आहे. मधल्या सुट्टीत "शालेय पोषण आहार" ही योजना स्वागतार्ह नाही काय? आज तळागाळीतील हजारो मुलेमुली निव्वळ या आहारासाठी तरी शाळेत जाऊ लागली आहेत हे चित्र ठळकपणे समोर येत आहे. कुणी सांगावे, उद्या यातूनच काही चांगले "शिष्य" तयार होतील जी आपल्या "गुरु"ना याबाबत दुवा देतील.

द्रोणाचार्यांना दोष देणे चुकीचे...

द्रोणाचार्यांचे एकलव्याबाबतचे वागणे फारसे चुकीचे होते, असे वाटत नाही.
हस्तिनापूरला पगारी शिक्षक म्हणून चाकरी पत्करण्यापूर्वीचा द्रोणाचार्यांचा इतिहास लोक सोईस्करपणे विसरुन जातात. धनुर्विद्येचा निष्णात आचार्य म्हणून द्रोण पूर्वी मुक्त गुरुकुल चालवत असत. या मुक्त ज्ञानदानाचा परिणाम असा झाला की त्यांना स्वतःचा आणि कुटुंबाचाही उदरनिर्वाह चालवणे अशक्य झाले होते. लहानग्या अश्वत्थाम्याला पाजायला दूधही घरी नसे म्हणून द्रोणाचार्यांची पत्नी द्रोणी ही मुलाला पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून पाजत असे. द्रोणाचार्यांचा गुरुकुलातील मित्र राजा विराट हा त्या काळात उत्तम आणि विपुल गोधन बाळगून होता. द्रोणीने नवर्‍याला सुचवले, की मित्राकडून एखादी गाय मिळते का पाहा. दरिद्री द्रोणाने तीही भीक आपल्या मित्राकडे मागितली, पण विराटाने राजसत्तेच्या मस्तीत द्रोणाच्या गरीबीची थट्टा उडवली आणि त्यांचा अपमान करुन हाकलून दिले. संतापलेल्या द्रोणांनी तिथेच प्रतिज्ञा केली, की 'एक दिवस तुला माझ्या धनुर्विद्येचे आणि आचार्यपदाच्या ताकदीचे प्रत्यंतर आणून देईनच' गरीबी माणसाला कशी नाचवते, याचा दाहक अनुभव जगल्याने द्रोणाचार्यांनी कौरवांना धनुर्विद्येचे शिक्षण देण्याची जबाबदारी व्यावसायिक तत्त्वावर स्वीकारली. एकदा वेतनावर काम स्वीकारले, की मालकाचे हित पाहणे हे त्या कर्मचार्‍याचे कर्तव्य ठरते. द्रोणाचार्यांनी तेच केले. कौरव व पांडवांना शस्त्रास्त्र पारंगत करण्यात त्यांनी कसूर केली नाही. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचा पण केल्यावर त्यांनी त्या स्पर्धेत पैशांशी इमान राखले. एकलव्यासारखेच त्यांनी कर्णालाही पुढे येऊ दिले नाही. त्यांनी केलेले नैतिकदृष्ट्या चूक की बरोबर यापेक्षा आपण हा विचार केला पाहिजे, की तो माणूस भारतातील पहिला व्यावसायिक शिक्षक होता. तो कुणाला फुकट ज्ञान का देईल? एकलव्याचा अंगठा कापून घेतला, ही कथा मी वेगळ्या पद्धतीने ऐकली आहे. द्रोणाचार्यांची गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडून वचन घेतले, की बाण चालवताना तो अंगठ्याचा वापर करणार नाही. एकलव्याने ते वचन दिले, पण नंतर तो पहिले आणि मधले बोट वापरुन बाण सोडत राहिला. एकलव्य महायुद्धात पांडवांकडून आपल्या आदिवासी सैन्यासह लढल्याचेही वाचल्याचे स्मरते.
भीष्मासारख्या श्रेष्ठ महारथी योद्ध्याचे वाक्य प्रसिद्ध आहे 'अर्थस्य पुरुषः दासः' द्रोणाचार्य त्याला अपवाद का ठरावा?
(द्रोणाचार्यांची जात हा मुद्दा कुणाच्या मनात असेल त्यांनी आजची स्थिती बघावी. महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट कोणत्या जातीचे आहेत? ते देतात का आपल्या संस्थांमधून गोरगरीबांना मोफत शिक्षण?)
द्रोणाचार्य उदात्ततेचा पुतळा मानण्याचे कारण नाही, पण त्याची विचारसरणी परिस्थितीनुरुप होती, एवढेच ध्यानात ठेवावे. त्याचे उदाहरण शिक्षक जातीचे वाभाडे काढण्यासाठी दिले जाऊ नये, असे वाटते.

सहमत

>>> त्याचे उदाहरण शिक्षक जातीचे वाभाडे काढण्यासाठी दिले जाऊ नये, असे वाटते. <<<

१००% सहमत.

मह्या काय करू ?

थांथांपाल साहेबांनी डाव्या बाजूचे वाभाडे काढले आणि इतरांनी उजवी बाजू इमाने ऐताबरे उचलून धरली.
मह्या एक गरीब शेतरी हाय.मला दोन पोर ह्यात्यासी.
एक पॉर १२ वी ला हाय आणि एक १० वी ला हाय
मोठा पॉर डाक्तर व्हायचं म्हणतया.

माझ्या हातात सर्वे जाऊन महिन्याचे ४-५ हजार रुपडे येत्यात .
तुमचे ते डीन बिन काय तो (तिथे पोंरा रडली होती म्हण्यात्यात तुमी लोक, चांगला भला असाल नव तो डीन सायब) देईल का माह्या पोराला त्याच्या कालिजात परवेश ?
किंवा अजून एखादा कालीज असल तर सुचवणा राव, लायी उपकार होत्याल्सी आम्हा गरिबावर.

१५-२० हजार रुपये देऊ शकेल मह्या त्यास्नी वर्षाला.

आपल्या प्रतिसादाची जीव कंठाशी आणून वाट भागात आहे.

शुल्क

माझ्या वैद्यकीय अभ्यासक्रमात वर्षाला ६००० रु (शिक्षणाचे शुल्क) + ७५० रु (वसतिगृह - जिथे राहण्यापेक्षा मी दिवसाला पाच तास रेल्वेप्रवासात घालवले, दर वर्षीचा खर्च ६००० रु) इतकाच मूळ खर्च आला. दारिद्र्यरेषेखालील मुलांना शिक्षणशुल्कातून माफी मिळतेच पण वर सरकारी शिष्यवृतीही मिळू शकते. टाटा आणि इतरही अनेक संस्था कोणालाही (दारिद्र्यरेषेवरच्यांनासुद्धा) दरवर्षी दहा हजार तर सहज देतात, फक्त आदल्या वर्षी चांगले गुण मिळवावे लागतात. वह्यापुस्तकांची किंमत वर्षाला १०००० रु च्या वर जाऊ नये (खरे तर सर्व पुस्तके ग्रंथालयात मिळतातच; गरजू मुलांना पुस्तकेही विनाशुल्क दिली जातात). कपडे, अन्न, 'जिवाची मुंबई करणे' यांवर वेगळा खर्च (द.म. ~ ५००० रु.) होतो पण तो खास वैद्यकीय शिक्षणासाठी मोजू नये, तो कोणत्याही शिक्षणासाठी होऊ शकतो आणि त्यात गरज आणि चैन असा फरक करता येईल. बारावीसाठी शिकवणीचा खर्चही २०००० रु पेक्षा कमीच होता.

खुलासा

श्री.रिकामटेकडा यांच्या या रोखठोक हिशोबाला दाद देत असतानाच श्री.शेतकरी यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की, आपण देणगी संदर्भातील माझा प्रतिसाद नीट वाचला तर तुम्हास असे दिसून येईल की, मी 'डीन' हे प्रवेश प्रक्रियेत असतात असे कुठेही म्हटलेले नाही. "प्रवेश" ही बाब सर्वस्वी संस्थाचालक आणि पालक यांच्यातील सरळसोट व्यवहार आहे. एकदा का तो खेळ पूर्ण झाला की, त्यानंतर उरते ती डीन, त्यांचे अध्ययनातील सहकारी आणि त्या वर्षी प्रवेश घेतलेले ते विद्यार्थी यांची अभ्यसक्रमातील साखळी. या साखळीत पैशाला कोणतीही जागा नाही. सक्त ताकीद असते डीन यांची सर्वांना (शिक्षक+विद्यार्थी) की अधिकृत सिलॅबसव्यतिरिक्त शिक्षण प्रक्रियेतील कोणत्याही अन्य घटकांचा उहापोह करू नये.

चला, पुढे जाऊन मी आणखीन् जादाची माहिती पुरवितो. मी माझ्या मावसभावाच्या प्रवेशासाठी या प्रक्रियेतून गेलो आहे आणि तेही याच डीनच्या ओळखीच्या माध्यमातून. त्यांच्या ओळखीचा फायदा इतपतच झाला की, एका रकमेऐवजी आम्हास तीन हप्त्यांची सवलत मिळाली. अत्यंत कठोर आहेत या संस्था देणगीच्याबाबतीत ! देणगीतील पैसा कुठेकुठे जातो हे ऐकाल तर शेवटी पालक म्हणून म्हणाल, 'च्यामारी शेवटी या चेरमनला च्याला तरी पाचदहा रुपये उरतात की नाही?"

शेवटी ~~ आपल्या मुलास मेडिकल वा इंजिनीअरिंगला निव्वळ 'गुणवत्ते"च्या आधारेच कसा प्रवेश मिळेल याची काळजी घेतल्यास वर श्री.रिकामटेकडा यांनी दिलेल्या ताळेबंदातदेखील स्वप्न पुरे होते.

असो. आपल्या दोन्ही चिरंजीवांना पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

ह्योच तर खेळ खेल्ण्यास्नी माया लयी टेन्सन येतया.

>>"प्रवेश" ही बाब सर्वस्वी संस्थाचालक आणि पालक यांच्यातील सरळसोट व्यवहार आहे. एकदा का तो खेळ पूर्ण झाला की,
अहो मायबाप ,
ह्योच तर खेळ खेल्ण्यास्नी माया लयी टेन्सन येतया.
पर तुमच्या परतीसादानी म्ह्याया अंगात बळ आलाया.

आता बिगीबिगी पुण्यात जाऊन सगळी कालिज पालथी घालतो.
आणि लागलीच कळवितो बघा

राग नाही येणार तर एक इचारू का, तुमी जे शिक्षण घेतल्या ते कंच साल व्हतं हो ?
बर तुम्ह्चा ते कालिज चा नाव बी कळवा ना. तिथ बी जाऊन येतो.

वाईट वाटते.

श्री.शेतकरी जी, मला माफ करा.... पण मुलांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्या भविष्याविषयीच्या प्रश्नांना आपण जे चेष्टेचे रूप देत आहात ते पाहून मी खरोखरी व्यथीत झालो आहे. कोणताही सूज्ञ पालक संबंधित चौकशीसाठी अशा प्रकारची मस्करीची भाषा वापरत नाही.

पाल्य १२ वीला आल्यानंतर त्याने मेडिकल वा इंजिनिअरिंग केले पाहिजे अशी कोणत्याही पालकांची मनिषा असते पण म्हणून का ते झाले नाही म्हणजे आकाश कोसळते वा जगबुडी होते असे मानण्याचे कोणतेही सबल कारण नाही. "अंथरूण पाहुन पाय पसरावे" अशी एक म्हण आपल्या मायमराठीत आहे जी एक "शेतकरी" या नात्याने आपणास माहित असेल असे मी मानतो.

राग मानू नका, पण माझ्यापुरता हा विषय संपला. पुनश्च आपल्या दोन्ही मुलांच्या भावी प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

अंथरूण पाहून पाय पसरणे!

वयात आलेल्या मुलांना उंच उडायची हौस असते. मला ही होती. आपल्या कुवतीपेक्षा जास्त आपण मिळवण्याच्या लायकीचे असतो असे वाटत असते. मारामारीत आपण कोणालाही लोळवू शकतो, चलाखपणे कोणालाही मुर्ख बनवू शकतो, आपण जे ठरवू ते करू शकतो. असे वाटत असते. मला कॉलेज मध्ये असताना मी देशाचा पंतप्रधान वा राज्याचा मुख्यमंत्री होवू शकतो. असे वाटायचे. नोकरी लागल्यानंतर टिव्ही, फोटो यांच्या माध्यमातून एश्वर्या रायला पाहिल्यावर तिच्याशीच लग्न करायचे, ह्या स्वप्नात हरवलो होतो.

नेहमी प्रमाणे अनेक आपट्या खाल्यानंतर वास्तवाचे भान येत आहे. आणि म्हणूनच तुमची स्वतःची सध्या ऐपत नसताना तुमच्या मुलाची डॉक्टर होण्याची इच्छा पूर्ण करण्याची मनिषा कां बाळगता? आहे ती परिस्थिती हळूहळू सुधारण्यासाठीचे शेती व त्याच्याशी निगडित गोष्टींवर अवलंबून असणारे शिक्षण, प्रशिक्षण मुलाला देण्यावर भर का नाही देत?

पुढच्या दोन तीन पिढ्यांपैकी कोणाला तरी डॉक्टर करा की. घाई कुठे आहे?

स्वार्थ

आपल्या पाल्याला डॉक्टर / इंजिनियर / शेतकरी करणे अशी मानसिकता योग्य आहे का असा विचार मनात आला.
पाल्य ठरवेल की त्याला काय व्हायचंय ते..

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हॅहॅहॅ

पाल्याला इंजिन ड्रायवर किंवा वैमानिक किंवा गुप्तहेर असे काही हवे असेल तर?

पालक पैसे देतात म्हटल्यावर नैतिक आणि व्यावहारिक कारणांमुळे त्यांना थोडेतरी निर्णयहक्क मिळतात असे वाटते. अन्यथा कुटुंबव्यवस्थेचे प्रयोजन काय?

इन्व्हेस्टमेंट

पालक पैसे देतात म्हटल्यावर नैतिक आणि व्यावहारिक कारणांमुळे त्यांना थोडेतरी निर्णयहक्क मिळतात असे वाटते. अन्यथा कुटुंबव्यवस्थेचे प्रयोजन काय?

मग हे पालक-पाल्य नाते झाले का? पालकांनी आपल्या अपेक्षा, वेगवेगळे मार्ग, त्याचे फायदे तोटे समजावून सांगावेत. बाकी मुलांचा निर्णय. मुलांकडे फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणे हे कुटुंबसंस्थेचे प्रयोजन नसावे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

प्रतिसाद परिस्थितीनुरूप होता.

येथे व्यक्त केलेल्या पालकाची आर्थिक अडचण ध्यानात घेवून मी प्रतिसाद दिला होता.
गरिब कुटुंबातील पाल्यांना 'भविष्यात काय व्हायचे आहे?' अशा पद्धतीने विचार करण्याचे चोचले परिस्थिती पुरवत नाही. समस्या 'परिस्थिती' आहे मग 'आर्थिक परिस्थिती' सुधारण्यासाठी मी दिलेल्या प्रतिसादात 'प्रेम' व 'वास्तव' यापैकि 'वास्तव' या गोष्टीकडे पहायला पाहिजे, असे सुचवले होते.

मोठ्या मुलाच्या इच्छे खातर कर्जबाजारी होण्याआधी इतर भावंडांवर अन्याय तर होणार नाहि ना? हे ही पालकांनी पहायला हवेच ना?

काहि पर्याय

मोठ्या मुलाच्या इच्छे खातर कर्जबाजारी होण्याआधी इतर भावंडांवर अन्याय तर होणार नाहि ना? हे ही पालकांनी पहायला हवेच ना?

योग्य प्रश्न आहे..
१. फुकट शालेय शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे.
२. (जर घेण्याची इच्छा असल्यास) कॉलेजच्या शिक्षणासाठी मुलींना खर्च नाममात्र आहे. मुलगा असल्यास कदाचित कर्ज काढावे लागु शकते. मात्र तिथेही शासकीय कॉलेजांची फी नाममात्र. शिवाय बर्‍याच संस्था होतकरू मुलांचा खर्च उचलण्यास तयार असतात
३. उच्चशिक्षणाचे कर्ज पालकांनी काढूच नये. कित्येक ब्यांका पाल्याच्या नावाने कर्ज द्यायला तयार असतात जे पाल्याने शिक्षण संपवल्यानंतर काहि काळाने फेडायचे असते.

या शिवाय इतर क्षेत्रातही अनेक अधिकृत मार्ग उपलब्ध आहेत. फक्त एखादी गोष्ट शिकायची आच व इच्छा हवी.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

काळा पैसा / आध्यात्मिक गुरूच्या रस-लीला

'अर्थस्य पुरुषः दासः' असे असेल, या आपल्या एका वाक्यातच द्रोणाची लायकी समजते. पैशांशी इमान राखले. एकलव्यासारखेच त्यांनी कर्णालाही पुढे येऊ दिले नाही. मग अश्या गुरुचे उदात्तीकरण कश्या करता करायचे . भारतातील गुरूचा सर्वोच पुरस्कार का म्हणून याच्या नावे द्यायचा . आज तर शिक्षणाचा बाजार झाला आहे, आध्यात्मिक गुरूच्या रस-लीला रोज कानावर पाडतात. अश्या वेळी गुरुपोर्णिमेचे स्तोम माजवून काळा पैसा कश्याला जमा करावयाचा प्रोहस्तान द्यायचे. सुजन नागरिक म्हणून विरोध करायलाच पाहिजे. त्याने गरीबीचे चटके सोसले म्हणून त्याच्या एकलव्य, कर्णाच्या बाबत त्याने केलेल्या पापाचे परिमार्जन होवू शकत नाही. उद्या कसाब लहान होता अज्ञान होता तो 'अर्थस्य पुरुषः दासः' होता त्याने त्याच्या देशा साठी दहशवादी काम केले त्याला माफ करा असा युक्तिवाद केला जाईल. . काळा पैसा या आजच्या महत्वाच्या गोष्टी कडे मी लक्ष वेधले हे लक्षात घ्या.

या न्यायाने आपण सगळेच नालायक ठरतो...

अर्थस्य पुरुषः दासः वाक्यावरुन द्रोणाची लायकी समजत असेल तर त्याच न्यायाने आपणही नालायकच ठरतो कारण आपण पोटपाण्यासाठी कुठलीतरी व्यक्ती/संस्था यांची चाकरी करत असतो आणि व्यवसायात असू तर तोही नफा कमावण्यासाठीच करत असतो.

द्रोणाचार्य पुरस्कार कशाला अर्जुन पुरस्कार पण बंद करायला लावा की. सरकार नक्की ऐकेल तुमचे. खरे तर दादोजी कोंडदेव पुरस्काराच्या आधी द्रोणाचार्य पुरस्कारच बंद व्हायला हवा होता कारण द्रोण आधीच्या काळात होऊन गेला होता.

गुरुपौर्णिमेला लोक त्यांच्या गुरुच्या पायावर डोके ठेऊन पैसे वाहात असतील तर आपण कशाला ओरडत सुटायचे? पैसा त्यांचा. कुठंही उधळतील. आपल्याला पाहिजे असेल तर काढावा पंथ आणि व्हावे गुरू.

आधी वटपौर्णिमेला अंगात आलं होतं. आता गुरुपौर्णिमेला. पौर्णिमा लय वाईट तिथी दिसतीय.

त्या चर्चेत लिहा ना

आधी वटपौर्णिमेला अंगात आलं होतं. आता गुरुपौर्णिमेला. पौर्णिमा लय वाईट तिथी दिसतीय.
गुरुपौर्णिमेचा राग वटपौर्णिमेवर कशाला काढता आहात हो. त्या चर्चेत लिहा ना.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

राग कशाचा आणि कुणावर काढणार?

धम्मकलाडूजी,
मी काही माझ्या मनातला राग/द्वेष बाहेर काढायला इथे उपक्रमावर येत नाही. चार लोकं गप्पा मारताहेत. आपणही ऐकाव्यात. पटेल त्याला व्हय म्हणावं. जे नाही पटणार ते तिथेच सांगावे एवढ्या माफक हेतूने प्रतिसाद देतो.
काही चुकत असेल तर सांगा.

नाही हो.

मी काही माझ्या मनातला राग/द्वेष बाहेर काढायला इथे उपक्रमावर येत नाही.
नक्कीच. मलाही तसे वाटले नव्हते. मी सहजच विचारले. एवढे मनावर घेऊ नका.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असे असेल तर द्रोण अजून जास्त अपराधी ठरतात

दरिद्री द्रोणाने तीही भीक आपल्या मित्राकडे मागितली, पण विराटाने राजसत्तेच्या मस्तीत द्रोणाच्या गरीबीची थट्टा उडवली आणि त्यांचा अपमान करुन हाकलून दिले. एकलव्यासारखेच त्यांनी कर्णालाही पुढे येऊ दिले नाही.असे असेल तर द्रोण अजून जास्त अपराधी ठरतात. ज्यांनी गरिबी पाहीली, अवेहलाना सहन केली ते द्रोण पैसा आला की पैश्या च्या मस्तीत सर्व विसरून गेले. माणुसकी सुद्धा विसरून गेले. स्वतः च्या शिष्या च्या अंध प्रेमाने स्वः च्या अहंकार पायी त्यांनी गरीब भिल्ल एकलव्य चा प्रतिभेचा खून केला. हे मान्य करावेच लागेल. ही कुपरंपरा आजही चालू आहे. आजही हजारो विद्यार्थी या कुपरंपरेचे बळी पडत आहे . विशेषतः विद्यार्थिनी आपल्या गुरुजनान पासून आपल्या चारित्र्याच्या संरक्षणा साठी आत्महत्या करत आहेत. विद्यार्थ्याला जाणूनबुजून नापास करून त्यांचे आयुष्य उद्वस्त केले जात आहे. अश्या पापावर पांघरून घालण्या साठी मग गुरुपोर्णिमा सारखे उत्सव साजरे केले जातात. याला विरोध आहे

मित्रहो.. मी थांबतो या चर्चेत...

उपक्रमी मित्रांनो,
खरे तर चर्चेतील मुद्द्यांचा प्रतिवाद तिथेच करायचा असतो किंवा एखादा वेगळा मुद्दा मांडत असेल तर आधी त्याचे पूर्ण ऐकून घेऊन मगच त्यातील त्रुटी काढायच्या असतात. ही चर्चेची शिस्त आपल्या सगळ्यांना मान्य असेल, असे वाटते.

पण ही चर्चा सुरू करणारे ठणठणपाळ यांनी विचित्र, असंबद्ध आणि जातीय सूचक असा व्यक्तिगत निरोप मला पाठवला आहे. तो मी इथे देत नाही अथवा त्याबद्दल ठणठणपाळ यांनाही काही वाईट लिहिणार नाही. कारण वर धम्मकलाडू यांना म्हटल्याप्रमाणे मी उपक्रमावर माझ्या मनातील द्वेष प्रकट करायला किंवा विशिष्ट जात/समाज/विचारसरणीच्या लोकांबद्दल लेखनातून शेरे मारायला येत नाही.

या धाग्यातील लेखकाची अनेक मते मला पटली नाहीत, एवढेच नोंदवून मी थांबतो. त्यातून कुणाला राग आला असल्यास दिलगीर आहे.

दुर्लक्ष करा!

ठणठणपाळ यांनी विचित्र, असंबद्ध आणि जातीय सूचक असा व्यक्तिगत निरोप मला पाठवला आहे.

ठणठणपाळ यांनी मलाही काही दिवसापूर्वी त्याच पद्धतीचा व्यक्तिगत निरोप पाठवला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष करून 'डिलीट' करून टाकले.

मजकूर संपादित. उपक्रमावर लिहिताना प्रक्षोभक, चिथावणीखोर आणि व्यक्तिगत हल्ले करणारे लेखन करू नये याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. -संपादक मंडळ.

विचार खोडता येत नाही म्हणून कानाखाली ...

मी स्वत: हून कोणालाही वाईट मेल केले नाही उलट मी नाहीरे वर्गाची बाजू मांडतो म्हणून मलाच अनेक जण XX मेल करतात पण मी कधी याचा उल्लेख केला नाही. मी मांडलेले विचार खोडता येत नसल्याने माझ्या लिखाणावर लिखाणाशेली वर चिखलफेक केली जाते . मला आलेले मेल मी प्रसिद्ध केले तर ... सर्वजण उघडे पडतील. महत्वाचे म्हणजे विचार खोडता येत नाही म्हणून कानाखाली ... ची असभ्य भाषा केली जाते. माझे अजूनही आव्हान आहे माझे मांडलेले मुद्दे खोडुन काढा . पहिल्या पासूनचे नंतर बोला.

 
^ वर