गूढ,आश्चर्यकारक अनुभव

आमच्या कॉलेजात एक दत्तभक्त प्राध्यापक होते.त्यांनी टीक्लबमधे चहापानाच्या वेळी एकदा पुढील अनुभव सांगितला:--
"काल एक गूढ आणि आश्चर्यजनक प्रसंग घडला.परवापासून गुरुचरित्रपारायणसप्ताह आहे हे तुम्हाला ठाऊकच असेल.मी प्रतिवर्षी या ग्रंथाचे पारायण करतो.त्यासाठी काल सायंकाळी माझी प्रत शोधत होतो.कुठे सापडेना. कुणाला दिल्याचे आठवेना.विचार करता करता खिडकीजवळ आलो.बाहेर एक अनोळखी व्यक्ती दिसली.
"गणपुलेसर इथेच राहातात ना?" त्याने विचारले.
" हो. मीच"
"हे घ्या गुरुचरित्र" असे म्हणत त्याने खिडकीतूनच प्रत माझ्या हाती दिली.मी न्याहाळली. डोळे वर करतो तर तो जणू अंतर्धान पावला होता. दार उघडून पाहिले. दूरवर एक गाय चरत होती.बाकी कोणी नव्हते.ज्या गुरुचरित्राचा विचार करीत होतो.ते ध्यानी मनी नसता हाती आले. या मागे काय ईश्वरीसंकेत असेल कोण जाणे.पण मी धन्य झालो. तुमच्यातील काही जणांना(..माझ्याकडे पाहून..) खोटे वाटेल. पण सांगितले ते सर्व अक्षरश: खरे आहे."
हे पापभीरू सज्जन प्राध्यापक खोटे बोलतील हे मुळीच संभवत नव्हते. तसेच ते "गाय दिसली" एव्हढेच म्हणाले. तेव्हा सांगितलेले सगळे सत्य होते यात शंका नाही.मी एकच प्रश्न विचारला,
"पुस्तक सापडत नव्हते तेव्हा तुम्ही तुमच्या पत्‍नीला विचारले का ?"
"ती भिशी कार्यक्रमाला गेली होती.घरी आली तेव्हा हे सर्व तिला सांगितलेच."
असे चमत्कारिक गूढ प्रसंग; आश्चर्यकारक अनुभव, अतर्क्य घटना, अनेकजण सांगतात. ते खोटे बोलत नसतात.त्यांना अद्भुताचे आकर्षण असते.असे काही घडावे असे मनोमनी वाटत असते.त्याला अनुसरून थोडे तिखट मीठ लावून त्या अनुषंगाने सांगत असतील. श्रद्धाळू श्रोत्यांनाही अद्भुताची ओढ असते. त्यामुळे ते अशा अतर्क्य वाटणार्‍या अनुभवांवर विचार करत नाहीत. खरे तर अशा तथाकथित गूढ घटनांचे काही तर्कसंगत व्यावहारिक स्पष्टीकरण असतेच.
या घटनेसंबंधी अनेक शक्यतांचा विचार केला. दुसर्‍या दिवशी सकाळी दत्तभक्तांच्या घरी गेलो.त्यांच्या पत्‍नीने दार उघडले.
"हे क्लासला गेले आहेत. येतील अर्ध्या तासात."
"क्लास घेतात हे ठाऊक नव्हते"
" शिकवायला नाही, हार्मोनियम शिकायला जातात.मीच सुचवले. घरी असले म्हणजे सारखा दत्त दत्त जप चाललेला असतो."
ऐकून थोडावेळ स्तब्ध झालो.
"खरे तर गुरुचरित्राच्या प्रतीविषयी त्यांच्यापेक्षा तुम्हीच नेमके सांगू शकाल."
"कॉलेजमधे सगळ्यांना सांगून झाले वाटते! अहो, काही दिवसांपूर्वी माझा भाऊ अचानक आला. हे बाहेरगावी गेले होते.भावाला गुरुचरित्र वाचायला हवे होते."
(बहिण भाऊ संवाद)
"नाही रे बाबा! त्यांची पारायणाची प्रत आहे. आयत्या वेळी सापडली नाही तर घर डोक्यावर घेतील. मला रागावतील."
"पारायण सप्ताहाला अजून तीन महिने आहेत. तत्पूर्वी वाचून परत करीन."
" बघ हां. आठवणीने परत द्यायला हवी. नाहीतर मला बोलणी खावी लागतील."
"चिंता नको. माधवरावांचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे."
(बहिण भाऊ संवाद समाप्त)
"भाऊ गुरुचरित्र घेऊन गेला. ते त्याने आठवणीने काल कुणाच्यातरी हस्ते पाठविले."
" सरांना सांगितले की नाही सगळे? सांगणे आवश्यक आहे."
"कल्पना आहे मला. सद्ध्या ते त्या चमत्कारात गुंग आहेत. म्हटलं राहूं द्या दोन दिवस.मग सांगणारच."
प्रथम अतर्क्य वाटणार्‍या त्या घटनेचे गूढ उकलले.पण माझ्या दत्तभक्त सहकार्‍याविषयी चिंता वाटू लागली.जयवंत दळवी यांच्या बॅरिस्टर नाटकातील एक दृश्य डोळ्यांपुढे तरळले.बॅरिस्टरचा मनोरुग्ण भाऊ त्या विशिष्ट आरामखुर्चीवर बसून जप करीत असतो:
दत्त दत्त! दत्ताची गाय
गाईचे दूध दत्त दत्त!
दुधावरची साय
दत्त दत्त दत्ताची गाय
साईचे दही दत्त दत्त!
दह्याचे ताक. दत्त दत्त!
ताकावरचे लोणी दत्त दत्त
लोण्याचे तूप दत्त दत्त
दत्त दत्त दत्ताची गाय.
या प्राध्यापकाशी गेली कित्येक वर्षे संपर्क नाही.बाज्यापेटीच्या सुरांचा सुपरिणाम म्हणा किंवा आणखी काही म्हणा, माझी चिंता खरी ठरल्याचे ऐकिवात नाही. .

लेखनविषय: दुवे:

Comments

नवे नाटक :)

विलायतेहून शिकून आलेले 'बॅरीष्टर' रावसाहेब, भाऊरावांच्या सुंदर बायकोसाठी वेडे झाल्याचे आणि तेच आता ओट्यावर 'दत्त दत्त !दत्ताची गाय गाईचे दूध दत्त दत्त' असे म्हणत असल्याचे नवे नाटक आता तुमच्या प्राध्यापक मित्राने लिहिले आहे. खूप 'हुशारी' आणि 'तर्क' काही कामाचे नाहीत. त्याचबरोबर, 'बॅरीष्टरांची परंपरा' असूनही ती माणसे 'डोक्याने' का जातात ? त्या परंपराचा शोध तुमच्या प्राध्यापक मित्राने नव्या नाटकात घेतला आहे. :)

-दिलीप बिरुटे

गमतीदार अनुभव

चला - इथे प्राध्यापकांच्या पत्नीना तरी कोड्याचे बिगर-चमत्कारी उत्तर ठाऊक होते, हे उत्तम.
कथनाची शैली खुमासदार आहे.

भित्यामागे ब्रह्मराक्षस

भित्यामागे ब्रह्मराक्षस आणि भक्तापुढे बाप्पा हे चालतच राहायचे. तुमच्या प्राध्यापकांना खरी गोष्ट सांगितली तरी म्हणतील की

"मी पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी बरोब्बर आमच्या मेव्हण्यांना प्रत परत करायची आठवण झाली. अन्यथा, लोक भल्याभल्या महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. ज्याच्याबरोबर आठवणीने पाठवली त्यानेही मी प्रत शोधायला सुरुवात केल्याबरोब्बर परत आणून दिली. माझे पारायण चुकले नाही. सगळी श्रीदत्तगुरुंची कृपा." :-)

शेवटी काय खरे सांगितले म्हणून प्राध्यापकांमध्ये फरक पडेलच असे नाही. ते त्यांच्या दत्तनामजपात रमलेले राहतील.

+१

सहमत
बाकी अनुभव रंजक आहे :)
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

विश्वास ठेवायला आवडला असता

मला चमत्कारांवर विश्वास ठेवायला आवडला असता, पण काही प्रश्न पडतात आणि विश्वास गळून जातो. उदाहरण म्हणून हा ब्लॉग पाहा.

http://prabhakarkulkarni.blogspot.com/2010/05/blog-post.html

ही व्यक्ती कोणत्याही बाबा, बुवाच्या आशीर्वादाशिवाय १९८७ साली कतारमध्ये पोहोचली होती. आणि आता इतक्या वर्षांच्या अनुभवाने परत कतारमध्ये नोकरी मिळाली तर ती बाबांच्या आशीर्वादाने!

"मानसाने हिम्मत हरली नाही पाहिजे हो . च्यामारी अहो होते . तुमचे चांगले होते"
हा अगदी (बोलीभाषेतला) सुविचार म्हणावा असा. पण पुढे...

"फक्‍त साईबाबामुळे हा चमत्कार झाला . मी साईबाबा ला म्हणालो “साईबाबा माझे किती दिवस हाल करशील?” . मला छान नौकरी मिळु दे . लो . चमत्कार . प्रभाकर कतार मधे सर्व फ़ॅसीलिटीसहीत नौकरीवर बिनाखर्चाचा पोहोंचला . आता मी आणि बायको ने साईबाबाला हे मागितले आहे कि “देवा , दर वर्षी तुझे दर्शन घडु दे .” तेही तो पूर्ण करेलच हो . माझा पूर्ण विश्वास बसला आहे . मला हे कळत नाही की हे माझ्या आधी कसे डोक्यात आले नाही . आता ठरवून टाकले आहे की काहीही पाहिजे तर साईबाबा ला मागुन घ्यायचे ."

मला वाटते काही वेळा संकटाने माणूस् कमकुवत होतो. कसेही करून यातून बाहेर पडायचे, कोणाचाही आधार, मिळेल तो, मिळेल तसा घ्यायचा अशा मनस्थितीत तो येतो. माझी देवावर श्रद्धा आहे पण मी आयुष्यात कधीही (एक सोडून) नवस केला नव्हता. पण १९९३ साली आजारपण, बेरोजगारी, वैयक्तिक वादळे यांनी असा काही कॉर्नर झालो की देवाला मला स्थिर केल्यास एक नारळ देईन अशी लालुच दाखवली. पुढे प्रयत्नांतूनच नोकरी मिळवली. तो नवस हा एक मनाचा कमकुवतपणा होता व हे तेव्हाही जाणवत होते. सद्‌सद्विवेक व चौकसपणा (लहान मुलासारखे प्रश्न विचारत राहाणे) हे दोन विशेष आपल्याजवळ असायला पाहिजेत असे वाटते. आता या ब्लॉगकडे वळतो.

आणि शेवट तर लयै भारी...
" मला वाटते ४ लाखात भारत पहाणे होईल . आणि जग पहायला किती रुपये लागतील त्याची माहीती काढावी लागेल . बघु या . तेही साईबाबालाच मागुन घेतो ना . "

माहिती साईबाबांकडून मागून घेणार की पैसे ते स्पष्ट केलेले नाही. पण जर फक्त माहिती हवी असेल तर ती इंटनेटवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, त्यासाठी दैवी शक्ती खर्च होऊ नये.

वा

मला वाटते काही वेळा संकटाने माणूस् कमकुवत होतो. कसेही करून यातून बाहेर पडायचे, कोणाचाही आधार, मिळेल तो, मिळेल तसा घ्यायचा अशा मनस्थितीत तो येतो.
हाच भाग समजून घेतला जात नाही असे वाटते.
प्रामाणिकपणा भावला!

आपला
गुंडोपंत

आम्हीही ते समजून घेतले आहे

मला वाटते काही वेळा संकटाने माणूस् कमकुवत होतो. कसेही करून यातून बाहेर पडायचे, कोणाचाही आधार, मिळेल तो, मिळेल तसा घ्यायचा अशा मनस्थितीत तो येतो.
हाच भाग समजून घेतला जात नाही असे वाटते.

खरे आहे सहमत आहे. गुंडोपंतांनी 'तिकडे' विज्ञानवाद्यांना आव्हान दिलेले आहे. आम्हीही ते समजून घेतलेले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मजेदार!

मजेदार अनुभव आहे!
आपल्या सदैव जागृत असलेल्या वैज्ञानिक विवेकवादाचे कौतुक वाटले.
पुढे येऊन गूढ उलगडण्याचे प्रयत्न केले हे महत्त्वाचे!

याचवेळी,
१. आपल्या प्राध्यापकीय काळात आपण केलेल्या संशोधनावरही काही वाचायला आवडेल. एका विवेकवादी प्राध्यापकाच्या संशोधनाची माहिती महत्त्वाचीच असेल असे वाटते.
२. आपण वेळोवेळी प्रसिद्ध केलेले निबंध आणि त्या त्या प्रकाशनांविषयी वाचायलाही आवडेल.
३. आपले वैज्ञानिक निबंध प्रकाशित करतांना काय काय अनुभव आले, हे ही रोचक असेल.
४. या संशोधनासाठी निवडलेले संदर्भ आणि पुस्तके याचे निवडीचे निकष काय होते हे पण उद्बोधक असेल, ते ही दिलेत अजून आवडेल.

या सगळ्यामुळे किमान,
माझ्या सारख्या अतिसामान्य आणि अज्ञ वाचकांना,
विज्ञान संशोधनाला सदैव वाहून घेतलेले प्रयोग व
त्याची वेळोवेळी प्रकाशित उदाहरणे पाहून,
ज्ञानाची दिशा मिळेल.

तेंव्हा तुमच्या संशोधनावर एक लेख किंवा लेखमालाच लिहावी,
अशी विनयशील विनंती, मी आपल्याला करतो.

आशा आहे की माझ्या या विनंतीचा आपण अव्हेर करणार नाही.

आपला
कृपाभिलाषी
गुंडोपंत वाचक

डोळे सताड उघडा

अहो गुंडोपंत, ह्या नाडीवाल्यांना, ज्योतिष्यवाल्यांना उत्तर देण्यासाठी, अंधश्रद्ध लोकांना शहाणे करण्यासाठी यनावाला सर कशाला हवेत. तुमच्यासारख्या 'अतिसामान्य आणि अज्ञ वाचकाने' थोडेसे डोळस बनण्याची गरज आहे. आधी डोळे सताड उघडा बघू. भरपूर साहित्य आंतरजालावर उपलब्ध आहे. ते डोळसपणे नीट वाचा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कुठे आहे?

मी मराठीमध्ये शोधले तर नाही मिळाले.

गॅलिलिओ, प्लॅटो, पायथागोरस या महनिय व्यक्तीमत्वांची,
इतकेच काय येथले विज्ञान श्रद्धाळू लोक ज्या डॉकिन्स महोदयांचा जप चालवतात
त्यांचीही आंतरजालावर मराठीत काहीच माहिती मिळत नाही.
मराठीत असेल तर द्या, मी आनंदाने डोळसपणे वाचेन.

माझी मते चुकीची असतील तर ती बदलेनही.

आपला
गुंडोपंत

लेखमाला

गुंडोपंत, ज्यांना त्यांना हे लिहा ते लिहा असा सल्ला देत फिरण्या पेक्षा तुम्हीच वाचन वाढवा. 'अतिसामान्य आणि अज्ञ वाचक' ही विशेषणे काही भूषणे नाहीत.
शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल.
सुरुवातीस जड जात असेल तर इथून सुरुवात केलीत तरी हरकत नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अच्छा?

गुंडोपंत, ज्यांना त्यांना हे लिहा ते लिहा असा सल्ला देत फिरण्या पेक्षा तुम्हीच वाचन वाढवा.

सल्ल्याबद्दल धन्यवाद! प्रयत्न सुरु आहे. यासाठीच तर येथेही ही चर्चा मांडली होती. पण तेथे काही योगदान देऊ शकला नाही तुम्ही?

'अतिसामान्य आणि अज्ञ वाचक' ही विशेषणे काही भूषणे नाहीत.
पण माझी ज्ञान स्थिती दाखवणारी विशेषणे नक्की आहेत.

शोध निबंध वाचायला अनेक सायंटिफिक जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यातले कुठलेही मान्यता प्राप्त जर्नल वाचून पाहा. संशोधन, प्रयोग वगैरे कसे करतात याची चिक्कार माहिती मिळेल.

काय सांगता?
अहो कुठे आहेत?
मी डोळे फुटेस्तोवर शोधले, काहीही मिळाले नाही.
जे आहे ते सगळे काही इंग्रजी भाषेत आहे.
मराठीत काहीच मिळाले नाही.

फक्त धनंजय किंवा राजेंद्र यांच्यासारखे सदस्य मनापासून प्रयत्न करून महत्त्वाचे विचार मराठीत आणतात.
वाचा --
- सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? (फाइनमन यांचे लिखाण)
- फ्लोजिस्टॉन सिद्धांत (विज्ञानाच्या विचारसरणीबाबत एक बोधप्रद इतिहास)
- एक्झिस्टेंशिअलिझ्म किंवा अस्तित्ववाद.

ते वाचून थोडे फार काही तरी समजते.

पण त्याव्यतिरिक्त इतर काही सदस्य
फालतू श्रद्धा प्रतिसादरुपी कंदीलाचे कागदावर चित्र काढून देतात आणि म्हणातात,
'घ्या आता पडेल प्रकाश!'.

तुम्ही वर सांगितलेला दुवा पाहिला -
परत तेच सांगतो!! तो मराठीत नसून इंग्रजीत आहे. ते मला कसे जमायचे?

मराठीत भाषांतर, अनुवाद करून द्या - आनंदाने वाचेन.

तुमचे नुसते कोरडे सल्ले काय कामाचे?

विज्ञानासाठी खरोखर काही करायचे असेल तर, मराठी भाषीक लहानांसाठी,
शालेय मुलांसाठी एक विज्ञान आणि गणित समजावून सांगणारे मराठी स्थळ काढा.
- तेथे मुलांना आपले वाटावे म्हणून मराठी शाळा शाळांना त्यांचे पान द्या.
- तसे त्या शाळांना कळवा
- वृत्तपत्रातून प्रसिद्धी द्या
- शालेय मुलांना मराठीमध्ये, सहजतेने एकमेकांना जोडू शकतील असे वैज्ञानिक प्रकल्प तेथे राबवा.
- मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात या त्यांना मराठीतही गोष्टी मिळतात याची जाणीव करून द्या.
- मराठीचा संगणकावर योग्य वापर कसा करावा यावर प्रयोगासहीत व्याख्याने द्या.
- देण्यासाठी संगणकीय मराठी कशी वापरावी याची पत्रके छापून घ्या ती शाळा शाळांना द्या.
- मराठी माध्यमाच्या शाळातील संगणक विभागांशी संपर्कात येउन मराठीतून शैक्षणिकरित्या देता येतील अशी संगणकाची एखादी शिक्षण पद्धती विकसित करून द्या
- मराठी माध्यमाच्या शाळात आंतरजालिय जोडण्या देण्यासाठी साधने आणि पैसे उभे करा.

बरं हे ही जाऊ द्या!

तुम्ही फक्त विज्ञानातले कोणतेही महत्त्वाचे जर्नल सलग १२ किंवा २४ खंडांसाठी भाषांतरीत करून देण्याची जबाबदारी घ्या तशी हमी द्या,
मी स्वखर्चाने छापण्याची जबाबदारी घेतो.
इतकेच काय मी काही शाळांच्या वाचनालयांनाही ते वितरीत करण्याची जबाबदारी घेतो.
बोला करताय?

काहीही विधायक मराठी मध्ये करत असाल तर मी मदतीला तयार आहे!

आपला
गुंडोपंत

आव्हान

हे सगळे मराठीत देऊन त्याचा तुम्हाला काय फायदा? तुम्हाला मराठीही फारसे समजत नाही असे ह्याच चर्चेतल्या प्रतिसादावरून कळले.

तरीही समजा उद्या केले एखादे जर्नल तुमच्यासाठी मराठीत रुपांतरीत तर त्यावर तुमचाच पहिला प्रतिसाद येईल, " मला कळेल अश्या मराठीत लिहून दाखवा!! घेताय आव्हान?"

त्यापेक्षा तुम्हीच इंग्रजी शिकून घ्या. कारण ज्ञान मिळवणे महत्वाचे भाषा हे निव्वळ साधन. आणि हो, इंग्रजी शिकवण्यासाठी पुन्हा विज्ञानवादी लोकांना वेठीस धरू नका. त्यासाठी महागुरू आहेत त्यांची शिकवणी लावा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

तात्त्विक आकस?

गुंडोपंतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)

अशा प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत दुसर्‍या एका संकेतस्थळावर आहे. सगळीकडचे चांगले ते घेण्याची आमची रीत आहे. म्हणून ही पद्धत इकडेही सुरू करावी असे म्हणतो.

आता खरा प्रतिसाद.
माझे वडिल एकदा रत्नागिरीहून गणपतीपुळ्याला जात असताना गाडीला अपघात झाला. अपघात किरकोळ होता. सर्वांचे मुक्या मारावर भागले. तेव्हा परिचयातील काहींनी "गणपती दर्शनाला जात असल्याने थोडक्यात निभावले हो !" असे मत व्यक्त केले. त्यावेळी "गणपती दर्शनाला जात असताना अपघात झालाच कसा?" अशी शंका मी व्यक्त केली पण ती उडवून लावण्यात आली. :) श्रद्धाळूंना तर्काने समजावता येत नाही हेच खरे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अरे?

क्षमा करा समजले नाही.
---
थत्तेसाहेबांनी माझ्या खव मध्ये सांगितले की एखाद्याचे म्हण्णे आवडले नाही तर असे म्हणतात.

मला कळत नाहीये,
की यनावालांनी असे काय संशोधन केले आहे, ज्या विषयी थत्ते साहेबांना इतका आकस आहे?
जे त्यांचे संशोधन आहे ते त्यांनाच प्रसिद्ध करण्यासाठी मी विनंती केली आहे.

मग त्यात नावडण्यासारखे काय आहे?
एखाद्या व्यक्तीचे शास्त्रीय संशोधन प्रकाशित व्हायला,
खरे तर तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे.
की यात काही वेगळी गोम आहे जी मला समजत नाहीये?

उलट आता मी म्हणेन की यनावालासाहेब, तुम्ही तुमचे संशोधन आता प्रकाशित कराच!
पाहू कोण काय करते ते.

आपला
गुंडोपंत

मराठी

>>की यनावालांनी असे काय संशोधन केले आहे, ज्या विषयी थत्ते साहेबांना इतका आकस आहे?

एकूण लक्षात आले की गुंडोपंतांना मराठी वाचता येत नाही/समजत नाही.

मी वाढदिवसाच्या शुभेच्छा गुंडोपंताना दिल्या होत्या यनावालंना नाही. मग मला यनावालांच्या संशोधनाविषयी आकस आहे हा निष्कर्ष कसा काढला?

गुंडोपंतांनी मला समजणार्‍या मराठी अर्थानेच वरील प्रतिसाद लिहिला आहे हे येथे गृहीत धरले आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

स्पष्ट आहे.

एकूण लक्षात आले की गुंडोपंतांना मराठी वाचता येत नाही/समजत नाही.
हो मी अजूनही मराठी भाषेचा विद्यार्थीच आहे, हे खरे आहे. भाषा समजून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हळू हळू जमेल, ही आशाही आहे. या साठी मला प्रा. डॉ. दिलिप बिरुटे यांनी लिहिलेल्या मराठी भाषा : इतिहास आणि विकास लेखाची मदतही झाली आहे. हे नमूद करणे आवश्यक समजतो.

मी वाढदिवसाच्या शुभेच्छा गुंडोपंताना दिल्या होत्या यनावालंना नाही. मग मला यनावालांच्या संशोधनाविषयी आकस आहे हा निष्कर्ष कसा काढला?

मी वरती, त्यांनी त्यांच्या संशोधनाविषयी लिहावे -असा प्रस्ताव मांडला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्पष्टीकरण म्हणून, माझ्या ख.व. तील आपल्या म्हणण्यानुसार, "मिपावर एखाद्याचे म्हणणे अगदीच आवडले नाही तर असे लिहिण्याची प्रथा आहे. "
याचा अर्थ स्पष्ट आहे, की आपल्याला माझे म्हणणे आवडले नाही.
याचा अर्थ यनावालांना त्यांचे संशोधन प्रसिद्ध करू द्यावे, असे तुम्हाला वाटत नाही, हे स्पष्ट आहे.
शिवाय आकस हा शब्द तुम्हीच त्या प्रतिसादात वापरला आहे, मी नाही.

वरील एकुण सर्व विवरण पाहता तुम्हाला यनावाला यांच्या संशोधनाबद्दल आकस आहे, असे प्रथम दर्शनी दिसून येते आहे.

मला मात्र प्रामाणिकपणे त्यांनी केलेल्या संशोधना विषयी जाणून घेण्यात रस आहे.
इतके मोठे विवेकवादी प्राध्यापक, त्यांचे संशोधनही तसेच असणार. मग ते झाकून राहण्यात काय हशील?
उलट मराठीत आले, तर अजून माझ्यासारख्यांचे ज्ञान वाढेल.

शिवाय, ध्येयवादी लोकांबद्दल जाणून घेतले की आपल्यालाही काही तरी करावेसे वाटू लागते,
ज्योतीने ज्योत पेटते आणि माझ्या सारख्याची निराशा पळून जाते.
(नाही तर मी उगाच म्हणत बसणार - "काय करणार शनि चा प्रभाव!" तर ते ही तुम्हाला चालणार नाही. )

मी त्यांना प्रामाणिकपणे आणि विनयशीलतेने तशी विनंती केली आहेच.

आशा आहे की लवकरच ते माझ्या विनंतीला मनावर घेतील.
त्याच्या सध्याच्या संशोधनातून काही वेळ बाजूला काढून
आपले संशोधन आणि त्यासाठी वापरलेले संदर्भ,
तसेच प्रसिद्ध करण्यासाठी वापरलेली प्रकाशने यांची माहिती देतील.

आपला
गुंडोपंत

उपरोध

मी वरती, त्यांनी त्यांच्या संशोधनाविषयी लिहावे -असा प्रस्ताव मांडला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्पष्टीकरण म्हणून, माझ्या ख.व. तील आपल्या म्हणण्यानुसार, "मिपावर एखाद्याचे म्हणणे अगदीच आवडले नाही तर असे लिहिण्याची प्रथा आहे. "
याचा अर्थ स्पष्ट आहे, की आपल्याला माझे म्हणणे आवडले नाही.
याचा अर्थ यनावालांना त्यांचे संशोधन प्रसिद्ध करू द्यावे, असे तुम्हाला वाटत नाही, हे स्पष्ट आहे.

चूक.
त्याचा अर्थ असा की यनावालांनी संशोधन केले असे तुम्हाला वाटत नाही. तुमच्या लेखनातील उपरोध थत्ते यांना आवडला नसावा.

???

चुक???
कुठे अणि काय?
त्याचा अर्थ असा की यनावालांनी संशोधन केले असे तुम्हाला वाटत नाही.
तुम्ही ते अघोर साधक अतिंद्रीय शक्तीवाले बाबा आहात का हो?
तुम्हाला कसे काय कळले मला काय 'वाटते' ते?

माझ्या मनोविकास तज्ञानालाही ते कळत नाही कधी कधी! ;))

तुमच्या लेखनातील उपरोध थत्ते यांना आवडला नसावा.

अहो कुठे आहे उपरोध?
मी वर म्हंटले आहे की, प्रामाणिक विनंती आहे. मग?

आपला
गुंडोपंत

अहो पंत जाऊ द्या....!

पंत, आपला उद्देश स्पष्ट आहे की, समजा यनासरांचे एखाद्या विषयावर काही संशोधन असेल आणि त्या संशोधनासाठी त्यांनी वापरलेली पुस्तके, संदर्भ, गृहितके, निष्कर्ष, जर वाचकांना अभ्यासासाठी, चाळण्यासाठी का होईना मिळत असतील तर ती माहिती उपक्रमवर आली तर काय हरकत आहे, असा साधा प्रश्न आपण विचारला आहे असे वाटते. अर्थात ते द्यायचे की नाही ते यनासर ठरवतील. पण,त्यासाठी उपक्रमींचे 'शुभेच्छा' आणि 'वाचन वाढवा' असे सल्ला देण्याची काय गरज आहे, ते मात्र कळले नाही. असो, पंत वरील चर्चा विषय 'काथ्याकूटाला' सोडून द्या...!

-दिलीप बिरुटे

हेच तर

एखाद्या विषयावर काही संशोधन असेल आणि त्या संशोधनासाठी त्यांनी वापरलेली पुस्तके, संदर्भ, गृहितके, निष्कर्ष, जर वाचकांना अभ्यासासाठी, चाळण्यासाठी का होईना मिळत असतील तर ती माहिती उपक्रमवर आली तर काय हरकत आहे, असा साधा प्रश्न आपण विचारला आहे असे वाटते.
अगदी बरोबर सर! तुम्ही किती चांगले मांडले आहे.

हेच म्हणत होतो तर या तर्कट *र्कटांनी त्याला फाटे फोडले!

ठीक सोडून देणेच चांगले. काही हाती लागेल असे दिसत नाहीच...
:(

आपला
गुंडोपंत

या आणि अशा प्रकारच्या

अधिक चमत्कारांसाठी सकाळमध्ये सोमवारी प्रसिद्ध होणारे मुक्तपीठ वाचावे. नेमके असेच दळण अनेकांनी दळून पीठाचे मुक्त वाटप केलेले असते. आमच्यावर अमका प्रसंग आला, तेव्हा समर्थांनीच तारले, दत्तगुरूनींच मार्ग दाखवला, ही महाराजांचीच कृपा नव्हे काय?, त्यांनीच त्याला पाठवले नसेल कशावरून? वगैरे वगैरे...
असे आजपर्यंत शेकडो लेख वाचले असतील. या लोकांची अक्षरशः दया येते.

==================

+

स्वैरपीठ

मुक्तपीठ पुरवणी वाचायला लागल्यापासून दोनच आठवड्यात समजले की या पुरवणीचा उपयोग मुख्य पेपर वाचताना फरशीवर डाग पडू नये म्हणून चहाचा कप ठेवण्यासाठी करायचा आहे.

पुण्यातील दैववादी अंधश्रद्ध आत्ममग्न लोकांना आपली गार्‍हाणी सांगण्यासाठी हक्क्काचं व्यासपीठ आहे मुक्तपीठ. आपण वाचण्यासाठी नव्हे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

कंटाळा

श्रद्धा ही लोकांच्या मानसिकतेशी निगडीत आहे आणि मानसिकता हा गुंतागुंतीचा विषय आहे. श्रद्धेला जनमानसातून नाहिशी करणे ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. मग ते अमेरिकन डॉलरवरील इन गॉड वी ट्रस्ट असो किंवा आपल्या कोर्टातील गीतेवर हात ठेवून शपथ घेणे असो. याखेरीज सर्व देशांमध्ये पाळली जाणारी कापडाच्या तुकड्याला वंदन करण्याची प्रथा ही देखील श्रद्धाच आहे.

असे लेख, त्यानंतर त्यावर काही बाजूने, काही विरोधात प्रतिसाद हे आता नेहेमीचे झाले आहे. याने कुणाचीही मते बदलणे शक्य नाही. तसेही मराठी सायटींवर चर्चेमुळे मत बदलण्याची घटना कंकणाकृती सूर्यग्रहणाइतकी विरळा असते. त्यामुळेच अशा प्रकारच्या लेखांचा आणि त्यावरील ठराविक प्रतिसादांचा थोडा कंटाळा यायला लागला आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत आहे

श्रद्धा आणि अंधश्रद्धा, जपजाप्य, कर्मकांडे, बुवा, बाबा ,माई, भाई ,साधूसंत वगैरे विषयांवर आता बोलू लिहू नये असे वाटते.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

सहमत आहे

आरागॉर्न यांच्याशी सहमत आहे -

आपला
गुंडोपंत

सहमत आहे

आरागॉर्न, सन्जोपराव व गुंडोपंत यांच्याशी सहमत आहे.

आनंदाच्या उकळ्या?

'श्रद्धा जाणार नाही' हे वाक्य बहुतेकदा सखेद म्हटले जात नाही असे डॉकिन्सचे निरीक्षण आहे.

+१

अन्य संस्थळावरील शब्द वापरण्यास सुरुवात झालीच आहे तर आरागॉर्न यांच्या प्रतिसादाला बाडिस असे म्हणतो :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

कंटाळ्याशी सहमत

अशा प्रकारच्या लेखांचा आणि त्यावरील ठराविक प्रतिसादांचा थोडा कंटाळा यायला लागला आहे.

अगदी अगदी! नाडीग्रंथ, साडेसाती वगैरे प्रचारकांना का हसा. हे देखील त्यांच्या तोडीचेच कंटाळे आणतात.

असहमत

असे लेख, त्यानंतर त्यावर काही बाजूने, काही विरोधात प्रतिसाद हे आता नेहेमीचे झाले आहे. याने कुणाचीही मते बदलणे शक्य नाही.

असहमत. अश्या चर्चांमधून मत बदलल्याची उदाहरणे मी पाहिलेली आहेत. उदा. इथे पाहा
तसेच सगळेच जण असे उघडपणे सांगतीलच असे नाही. उपक्रमाला खूप मोठा वाचकवर्गही आहे. आणि दरवेळी मत बदलेच पाहिजे असेही नाही. बर्‍याचदा अश्या चर्चांमधून एखादे अपरिपक्व मत आणखी बळकट व्हायलाही मदत होते.

तेव्हा लिखाणाचा कंटाळा आला असल्यास नामस्मरण करा, ध्यान करा पण तो कंटाळा असा ट्रान्स्मिट करू नका ही विनंती.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मला

तेव्हा लिखाणाचा कंटाळा आला असल्यास नामस्मरण करा, ध्यान करा पण तो कंटाळा असा ट्रान्स्मिट करू नका ही विनंती.

मला कंटाळा आला तो मी बोलून दाखवला. तेव्हा इतर काही लोकांनाही आल्याचे कळले. यात ट्रान्समिशन कुठे आले कळले नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

ट्रान्समिशन कुठे आले

मला कंटाळा आला तो मी बोलून दाखवला.

ठळक केलेल्या ठश्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

का?

तो कंटाळा असा ट्रान्स्मिट करू नका ही विनंती.

लोकशाहीत मत व्यक्त करायला बंदी आहे का?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

लोकशाही?

'विनंती ' हा शब्द दिसला नाही का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

दिसला

पण विनंती ही की तुमचे मत व्यक्त करू नका. असे का? मत व्यक्त केल्याने काय बिघडते?

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

काहीच बिघडत नाही

मत व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यासाठीच कंटाळा ट्रान्स्मीट करु नका (मते मांडू द्या) अशी विनंती होती.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मत

कंटाळा आला आहे हेच मत होते. आणि मला एकट्यालाच नाही इतरांनाही आला आहे.
अशी मते व्यक्त केली नाहीत आणि सरसकट लेखांची स्तुती केली तर तो लेखकावर अन्याय आहे असे मला वाटते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

वयक्तिक अनुभव

मागे कुठल्याशा चर्चेत वयक्तिक अनुभव जमेस धरायचे नाही असे म्हटले होते तर मग इथे प्राध्यापकांचा वयक्तिक अनुभव चघळु नये.

अतर्क्य अनुभव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विषयः अतर्क्य अनुभव
संदर्भ: श्री.गुंडोपंत यांचा प्रतिसाद.
*प्रतिसादाप्रीत्यर्थ मन:पूर्वक धन्यवाद.श्री.गुंडोपंत यांचा प्रतिसाद लेखनासंबंधीचा उत्साह प्रशंसनीय आहे.

*या विषयावर मी यथाआकलनशक्ती वाचन केले आहे.
*या विषयावर यथामती विचार केला आहे.
*वाचकांच्या पत्रव्यवहारात फुटकळ वृत्तपत्री लेखन केले आहे.ते शंभर लोकांनी वाचून त्यावर दोन चार जणांनी विचार केला असला तरी"तेव्हढे यश मला रगड ,माझ्या मना बन दगड."
*कुठल्याही नियतकालिकात या विषयावर लेख लिहिला नाही.
* या अथवा कुठल्याही विषयावर शोधनिबंध लिहिण्याची क्षमता माझ्यात नाही. तसेच माझी पात्रताही नाही.मी शोधनिबंध लिहितो असा श्री.गुंडोपंत यांचा समज का झाला नकळे.
* या विषयावरील चर्चासत्रे,कार्यशाळा, इत्यादीत घेतलेला भाग नगण्य आहे.
*विज्ञान विषयक लेखनाची गुणवत्ता,सत्यासत्यता, युक्तायुक्तता,उपयुक्तता अनुपयुक्तता, या गोष्टी व्यक्तिनिरपेक्ष असतात.
*अशा लेखनाचे मूल्यमापन करताना लेखकाचे नाव, शैक्षणिक पात्रता, शोधनिबंधप्रकाशन इ.गोष्टींचा संबंध नसावा असे मला वाटते..
* विज्ञानात कोणाचीही अधिकारवाणी मानली जात नाही.
* या विषयावर मी कोणतेही काहीही संशोधन केलेले नाही.
अवांतर:
प्रतिसादलेखन संदर्भात श्री. गुंडोपंत यांची विस्तारनिर्भयता वाखाणण्याजोगी आहे.

माझी पोस्ट

प्रीय मित्र शन्तनु,
माझ्या पोस्ट ची चीर फाड मला ईथे पहायला मिळाली . तेही माझ्या चुकीने . झाले काय की मी सर्च बार मधे पता चुक टाईप केला, ईथे पोहोंचलो . माझं नाव दिसलं . पहातो तर काय? माझ्या पोस्टची चीर फाड चालु आहे.
१) जर कमेंट लिहायची असती तर माझ्याच पोस्ट खाली लिहायची असती .मला कळलं तरी असतं प्रतीक्रिया काय आहे.
२) साईबाबाला देव मानुन मी देवावर श्रध्दा दाखवली आणि माझ्या लायकीने व नशीबाने उशीरा का होईना पन मिळालेल्या फार थोड्याशा यशाला मी क्रेडीट देवाला म्हणजे साईबाबाला दिले. त्याची एव्हढी बोम्बाबोम्ब . मी हिन्दु आहे . आस्तीक आहे . साईबाबाला देव मानुन त्यांना क्रेडीट दिले ह्यात माझे काही चुकले नाही.
३) काही तरी लिहावे जे सगळे वाचु शकतील म्हणुन लिहिले . त्याच्यावर कुठे चर्चा होईल अशी अपेक्शाच नव्हती.
४) तुमचं म्हणनं काय आहे ? मी देवच मानु नये? चमत्कार हा शब्द मी मागे घेतो . ह्याला मी ही मनापासुन चमक्तार म्हनत ही नाही. पुन्हा सांगतो की माझ्या सगळ्या पोस्ट्स कुनालाही आक्शेप घेता येनार नाहीत आणि त्या माझ्यावर च रहातील अशी काळजी घेवुन लिहिल्या तरी ईथे चर्चा झाली. लगे पुढचा प्यारेग्राफ ही लिहिला. जर स्वधर्मीय च असे लिहु लागले ज्यांना आपले म्हनावे तेच असे लिहु लागले तर ईतरांकडुन काय अपेक्शा करावी मी ? लोकशाही आहे. आपन बहुसंख्य आहोत. तर हे हाल. मग पाकिस्तानात २५% हिन्दू होते ते १% झाले ह्याची चर्चा करावी वाटत नाही? म्हनजे धर्म आणि संसकृती बुडवायची आधीच तयारी चालु आहे दिसते. असु द्या. आलीया भोगाशी असावे तयार.
५) हवेतुन सोन्याची अंगठी काढने , भस्म काढने, रोग बरे करने , मेलेल्याला जिवंत करने असे चमत्कार कुनी केलेही असतील ह्याच्यावर माझा ही विश्वास नाही. पन त्यावर विश्वास ठेवनारे ही आहेत . कुनाकुनाला जावुन कुनी काय सांगावे?
६) आकडे एन्सायक्लोपेडीया मधे उपलब्ध आहेत की जगात किती लोक आस्तीक आहेत किती नास्तीक आहेत. काम धाम सोडुन. त्यांच्या काय कोनी मागे लागते काय् ? ज्याला जे वाटते ते करीत आहेत लिहित आहेत.
७) मी मागे ही ब्लाग लिहित होतो. मला वाटले हे काही तरी न करन्यासारखे मी करीत आहे . बंद केले. पर्सनल गोष्ट म्हनुन , गम्मत मजा नवीन काही तरी कुनालाही आक्शेपार्ह नाही असं लिहीलं. तरी ही आक्शेप आलाच . ठीक आहे. मी विरोध झाला तर पोस्ट काढुन टाकु शकतो . त्यात काय डीलीट वर क्लिक केलं की गेलं. बरं वाटलं असतं की तुम्ही तीथेच कमेन्ट केली असती तर. रिकामा वेळ मिळाला म्हनुन लिहिलं. त्याचं अनुसरन करा म्हनुन नाही.
८) अशा किती तरी विषया वर भरभरुन लिखान मी ही वाचलेले आहे . जगात कितीतरी धिन्गाना अशा एकेका गोश्टीवरुन होताना मी ही कळु लागल्या पासुन पहात आहे . कुठेतरी श्रधदा वाटली , बरे वाटले , लिहिले तर तो चर्चेचा विषय होईल असे वाटले नाही. चला तेव्हढी का होईना तुम्ही दाद तर दिली. माझ्या पोस्टस ह्या पुर्न पने पर्सनल आहेत. मला वाटले लिहीले. मी कुनालाही साईबाबा ला माना अथवा ना माना असं म्हनालो नाही. साईबाबा नी स्वता: च्या आयुष्यात खुप त्रास झेलला आहे. त्यांना संत ,देव मानुस म्हनु शकतो मी. मुळात माझा ब्लाग कुनी वाचेलच असे मला वाटले नाही. मी काय हो ? साईबाबांचं प्रस्त किती आणि कुठे कुठे वाढतं आहे ते तुम्ही साईबाबा हे नाव सर्च ईन्जीन मधे लिहुन पहा मग तुम्हाला कळेल. अब्जाधीश, विद्वान , देशोदेशी जावुन यशस्वी झालेले सगळे त्यांना मानत आहेत.
९) राहीला सवाल हा की मी ही भस्म काढने, अंगठ्या काढने , रोग बरा करने ह्या चमत्कारांना मानत नाही. मी एक साधा मानुस आहे. साधं जगत आहे. साधे विचार आहेत.
१०) मी शाकाहारी आहे . अझरबैजान मधे असताना ईतर भारतीय मांसाहार करायचे पन गाईचे मांस खात नाही म्हनायचे. मी जरा गोरा, शहाणा वाटुन एका तीथल्या मानसाने मला विचारले की तुम्ही गाईचे दुध् पीता , ते चालते? मग गाय का खात नाहीत? बोला? काय उत्तर देनार? मी म्हने बाबा मी जन्मजात शाकाहारी आहे . मी कोनतेच मांस खात नाही. मग एक जन म्हने त्याने वाचले आहे की भारतात ८०% लोक शाकाहारी आहेत.आता शाकाहारी की मांसाहारी ह्यावर चर्चा करायची झाली तर तोन्डात जिवानु की विशानु असतात. ते पोटात जातात. मग मी शाकाहारी की मांसाहारी? दही जिवानु की विशानु म्हनजे डोळ्याला न दिसनार्या किड्यांपासुनच तयार होते. आता बोला? तर अशेही शाकाहारी अमेरीकेत तयार होत आहेत की जे दुध दही पन खात नाहीत.लोक विचारतात तुमचे किती देव आहेत? दगडाला , गाईला देव कसे म्हनता? त्याचे उत्तर शोधुन आपली संस्कृती टिकवायचे बघता की त्यांची साथ देवुन आहे नाही ते बुडवुन बसता? ब्राह्मन म्हनुन जेवायला जवळ बसु दिले तर ताट गच्च मांसाहारी अन्नाने भरलेले बघुन रीकाम्या टेबला वर एकटा बसुन जेवने करुन ४ वर्ष काढलेत. ते बघु पन शकत नाही मी. त्यांना खावु नका म्हनत बसलो काय्? नाही. माझा पर्सनल मामला आहे झाले. माझे कितीतरी नातेवाईक पट्टीचे खानारे झालेत ब्राह्मन असुन. मी नाते तोडले. संपले. जर आपलेच आपल्य्यचे पाय ओढीत असेल तर काय होनार? तुम्हीच बघा. तुम्ही सगळे ईथे विद्वान दिसता आहात. मला आता ईथे रोज चक्कर मारावी लागनार आहे.
११) दसरा, दिवाळी,पोळा, शिमगा,जत्रा,यात्रा,धर्म,अर्थ,काम,मोक्श, धोतर, पटका, काष्टा घोळ साडी, कुंकु लावने शाकाहार ही संस्क्रती होती . ती आपनहोवुन बुडवली. आता बघु काय होते पुढे ते. आता बीयर , गुटका, आपल्याच लोकांना आपनच वेडे म्हनने ही नवी संस्कृती तर ती सही. काय म्हणता बरोबर?तुमचं म्हननं तरी काय कळु द्या मग बघु. हो का नाही? जिकडे जास्त लोक तीकडे आपन. हा आपला फार्मुला आहे बघा. जास्त विचार करत नाही आपन .

ओके बाय.

 
^ वर