उपक्रम सदस्य सर्वेक्षण

फल ज्योतिष्य/ होमिओपॅथी ह्यांच्या उपयुक्तते विषयी ही चर्चा नाही, उपक्रमींचा कल ह्या दोन गोष्टींमधे कुठे आहे जाणून घ्यायचे कुतुहल ह्या हेतूने विरंगुळा म्हणून हा धागा सुरू करत आहे.
कृपया खालीलपैकी एक पर्याय निवडून प्रतिसाद द्या.

१) फल-ज्योतिष्य

१. स्वानुभव असल्याने विश्वास ठेवण्यासाठी चिकित्सेची गरज वाटत नाही
२. विश्वासही नाही व चिकित्सेची पण गरज नाही
३. चिकित्सा/ अभ्यास होण्याची गरज आहे
३. अ चिकित्सा होईपर्यंत नाकारणार नाही
३.ब चिकित्सा होईपर्यंत स्विकारणार नाही
४. इतर

२) होमिऑपथी

१. स्वानुभव असल्याने विश्वास ठेवण्यासाठी चिकित्सेची गरज वाटत नाही
२. विश्वासही नाही व चिकित्सेची पण गरज नाही
३. चिकित्सा/ अभ्यास होण्याची गरज आहे
३. अ चिकित्सा होईपर्यंत नाकारणार नाही
३.ब चिकित्सा होईपर्यंत स्विकारणार नाही
४. इतर

Comments

काही सूचना

- पाचपैकी तीन पर्याय चिकित्सेची गरज आहे असं सुचवतात. म्हणजे आंधळेपणाने पर्याय निवडले तरी एक विशिष्ट निष्कर्ष निघू शकतो.
- पहिल्या पर्यायात विश्वास आहे हे धरलेलं आहे. तसाच विश्वास नाही पण चिकित्सची गरज नाही असा पर्याय असावा असं वाटतं. (ज्योतिषाऐवजी "पथ्वी सपाट आहे" हे विधान घालून पहा...)
- चिकित्सा मधून जोतिष शास्त्रातल्या बाहेरच्यांवर ही जबाबदारी असल्याचं भासतं. सिद्धता हा शब्द वापरला तर? मला जोतिषांनी हे सिद्ध करावं असं वाटलं, पण इतर विचारवंतांनी तसलं काही करण्याची गरज नाही असं वाटलं तर माझी या सर्वेक्षणात पंचाईत होते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान सूचना

पर्याय पाच नसून तीनच आहेत.
पर्यायांची मांडणी करताना माझ्याकडून थोडी गडबड झालेली आहे. १. २.अ २.ब ३ असे तीनच पर्याय आहेत. पर्याय दोन हे फक्त विधान आहे, त्याच्याशी सहमत असल्यास, योग्य पर्याय 'अ' किंवा 'ब' निवडायचा आहे.

'विश्वास नाही पण चिकित्सची गरज नाही' हा पर्याय आवडला, त्याचा समावेश करण्याची उपक्रम व्यवस्थापनाला विनंती करत आहे.

चिकित्सा करुनच सिद्धता मांडता येते त्यामुळे सिद्धतेसाठी आधी चिकित्सा करणे (ज्योतिषांनी/बाहेरच्यांनी) जरुरीचे आहे असे मला वाटते.
चिकित्सा/सिद्धता अशी शब्दरचना केल्यास तुमच्या सारख्यांची पंचाईत होणार नाही असे वाटते. तसेच इतर शक्यतांसाठी, 'इतर' हा पर्याय आहेच.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

स्तुत्य प्रयत्न

मी असं गृहित धरतो की जोतिष वा होमिओपाथी हे शास्त्र आहे की नाही यावर तुमचा विश्वास आहे का, व ते तसे नसले तरी तुमचा विश्वास आहे का? यावर उपक्रमींची मते काय आहेत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. माझा याला पूर्णपणे पाठिंबा आहे. सर्वेक्षण करणं हा सत्य जाणण्याचा खूप कठीण मार्ग आहे. त्यात खूप खड्डे असतात. फक्त हो/नाही उत्तरांच्या काही मर्यादा असतात. म्हणून मी खालील बदल सुचवतो. विश्वास हा सर्वसाधारण शब्द वापरला तर या दोनमध्ये गफलत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक मूलगामी प्रश्न सोयीचे होतील. उदाहरणार्थ,

जोतिष
- दोन जोतिषांनी केलेले निदान सर्वसाधारणपणे सारखे येईल (१. मुळीच मान्य नाही २. बहुतांशी मान्य नाही ३. सांगता येत नाही ४. बहुतांशी मान्य ५. पूर्णपणे मान्य)
- एका जोतिष्याने केलेले निदान अचूक असते. (१. मुळीच मान्य नाही २. बहुतांशी मान्य नाही ३. सांगता येत नाही ४. बहुतांशी मान्य ५. पूर्णपणे मान्य)
- ज्योतिषशास्त्र हे उपयुक्त आहे. (१. मुळीच मान्य नाही २. बहुतांशी मान्य नाही ३. सांगता येत नाही ४. बहुतांशी मान्य ५. पूर्णपणे मान्य)
- ज्योतिषशास्त्र सिद्ध होण्याची / त्याची चिकित्सा होण्याची गरज आहे. (१. मुळीच मान्य नाही २. बहुतांशी मान्य नाही ३. सांगता येत नाही ४. बहुतांशी मान्य ५. पूर्णपणे मान्य)

यात पहिले दोन प्रश्न जोतिष हे शास्त्र आहे का यावर तुमचा विश्वास आहे का याची नोंद घेतात, तर पुढचे दोन प्रश्व ते शास्त्र असो वा नसो, तुम्हाला ते उपयुक्त वाटते का व त्याची चिकित्सा होण्याची गरज आहे का यावर भर देतात. हे तुमच्या मूळ उद्देशाशी सुसंगत वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

किंचीत असहमत

यात पहिले दोन प्रश्न जोतिष हे शास्त्र आहे का यावर तुमचा विश्वास आहे का याची नोंद घेतात

ह्याच्याशी असहमत आहे. पहिला प्रश्न, "दोन जोतिषांनी केलेले निदान सर्वसाधारणपणे सारखे येईल" ह्याचे उत्तर मी "सांगता येत नाही" असे देईन. त्यावरुन तुम्ही माझा ज्योतिष्यावर विश्वास आहे की नाही ह्यावर काय निष्कर्ष काढाल?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विश्वासाचे पोटभेद

माझ्या मूळच्या प्रतिसादात मी मुद्दाम पोटभेद केले होते ते एका प्रश्नाच्या उत्तरावरून "माझा ज्योतिष्यावर विश्वास आहे की नाही ह्यावर... निष्कर्ष" काढावा लागू नये यासाठीच. तुम्ही चारही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर त्या पोटभेदांविषयी एक प्रश्न विचारून मिळते त्यापेक्षा जास्त अचूक माहिती मिळेल असा दावा होता. तुमच्या वरील उत्तरावरून कुठच्याही शास्त्रासाठी आंतर्गत सुसंगतीचा जो निकष असतो तो ज्योतिषाला लागू पडतो की नाही हे तुम्हाला सांगता येत नाही एवढंच म्हणता येतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रतिसाद

होमियोपथी व फलज्योतिष

विश्वासही नाही व चिकित्सेची पण गरज नाही.

+१

होमियोपथी व फलज्योतिष

विश्वासही नाही व चिकित्सेची पण गरज नाही. (पुरेशी चिकित्सा झालेली आहे!)

चिकित्सेची गरज

'चिकित्सेची गरजही दोन्ही व्यवसायांपासून आर्थिक मोबदला मिळणार्‍या व्यक्तिंस वाटली तर विश्वासाबाबत ठरवता येईल '

हा पर्याय देण्यात यावा. फलज्योतिष आणि होमिऑपथी दोघांबाबत माझे उत्तर हेच आहे.

आर्थिक मोबदला वगैरे अवांतर नको

आर्थिक मोबदला असो वा नसो, ह्या दोन्ही विषयांवर व्यक्तिगत पातळीवर तुमचे मत काय आहे हे जाणून घ्यायचे आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चिकित्सा होईपर्यंत स्विकारणार नाही

दोन्ही ठिकाणी.

माझी मते

फलज्योतिष: काडीमात्र विश्वास नाही
होमिओपाथी : चिकित्सा होईपर्यंत नाकारणारही नाही आणि स्वीकारणारही नाही. बाजूला राहून पाहणी करेन.

बाजूला राहून पाहणी करेन

बाजूला राहून पाहणी करेन

म्हणजेच चिकित्सा होईपर्यंत तुम्ही ते नाकारलेले आहेत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

स्वीकार/नकार

म्हणजेच चिकित्सा होईपर्यंत तुम्ही ते नाकारलेले आहेत.

इथे स्वीकार अथवा नकार हे डिजिटल ० किंवा १ अशा द्विमितीत नसावे. आनंद घार्‍यांना तो अर्थ अभिप्रेत नसावा असा माझा कयास आहे.
प्रकाश घाटपांडे

नकार आणि स्वीकार

स्वीकारलेले नाही याचा अर्थ आजारी पडल्यावर मी होमिओपाथकडे धावत नाही
नाकारलेले नाही याचा अर्थ घरातील दुसर्‍या कोणाला जावेसे वाटले तर त्याला जाऊ नको असे सांगत नाही.

व्याख्या

माझी नकाराची व्याख्या ही स्वतःपुरती मर्यादित आहे. चिकित्सा होईपर्यंत तुम्ही होमिऑपथीकडे जाणार नाही म्हणजे त्याला नाकारले आहे असे मी मानतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मत

१) फल-ज्योतिष्य
३. इतर: स्वानुभव असल्याने विश्वास ठेवण्यासाठी चिकित्सेची गरज वाटत नाही

२) होमिऑपथी

२. चिकित्सा अभ्यास होण्याची गरज आहे: २.अ चिकित्सा होईपर्यंत नाकारणार नाही

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

कौल

फलज्योतिष या विषयावर आपले मत काय? हे सर्वेक्षण आम्ही मिपावर घेतले होते. उपक्रमावर कौलाची सुविधा नाही. अगोदर वाटले कि हा सदस्यांचे 'सदस्य' म्हणुन सर्वेक्षण आहे.
राजेश घासकडवी यांनी दिलेले पर्याय हे अधिक व्यापक आहेत. एखाद्याचे या सर्वेक्षणावर पुर्वीचे मत व आताचे मत वेगळे असु शकते. आयुष्यात घडणार्‍या अनाकलनीय घटनांनी माणसांची मते बदलु शकतात.
राजेश घासकडवी म्हणतात-

यात पहिले दोन प्रश्न जोतिष हे शास्त्र आहे का यावर तुमचा विश्वास आहे का याची नोंद घेतात, तर पुढचे दोन प्रश्व ते शास्त्र असो वा नसो, तुम्हाला ते उपयुक्त वाटते का व त्याची चिकित्सा होण्याची गरज आहे का यावर भर देतात. हे तुमच्या मूळ उद्देशाशी सुसंगत वाटतं.

आम्ही हेच म्हणतो. थोडी अधिक वा वेगळी माहिती या ज्योतिषाच काय करायच?
बर्‍याचदा ज्योतिषाचा उपयोग आपल्या मनाच्या कौलाला आधार असावा म्हणुन असतो. अशा वेळी ज्योतिषी जातकाला काय सांगणे अभिप्रेत आहे याचा अंदाज बांधुन वक्तव्य करतो. बहुतांशी उपक्रमींनी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचले असेलच.
(ज्यांनी फक्त चाळले असेल किंवा वाचले नसेल त्यांनी वाचावे असा सुप्त इशारा यात आहे हे उपक्रमींनी ओळखले असेलच.)
प्रकाश घाटपांडे

विनंती

बहुतांशी उपक्रमींनी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद वाचले असेलच.

हो वाचले आहे. वाटल्यास एक प्रत बाजारातुन विकत घेउनही वाचू. पण क्षणभर हे पुस्तक बाजूला ठेवून ह्या सर्वेक्षणातील पर्याय निवडायची तसदी घ्याल का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

माझे मत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१.फलज्योतिषः *मुळीच विश्वास नाही.
*चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही. फलज्योतिषाची चिकित्सा करणे म्हणजे कालापव्यय होय.
२.होमिओपथी: *सध्या विश्वास नाही.चिकित्सेअंती उपयुक्तता सिद्ध झाली तर ती मानीन.

यनावालांप्रमाणेच

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

माझ्या पथ्यावर पडत असेल तर

माझ्या पथ्यावर पडत असेल तर दोन्हींवर विश्वास ठेवेन. तोपर्यंत नाही परंतु दोन्ही विषयांवरील संदिग्धता लक्षात घेता त्यांचा पुरस्कार करणार नाही. माझे विश्वास माझ्यापाशी. :-)

थोडा प्रॉब्लेम.

मला जे उत्तर द्यायचे आहे ते पर्यायांमध्ये नाही.

ज्योतिष हे पुरेसे असिद्ध झाले आहे असे मी मानतो. त्यामुळे चिकित्सा झाली असल्याने मानणार नाही असे माझे उत्तर आहे. ते प्र्यायांत नाही. या उत्तराऐवजी "इतर" असे लिहिणे योग्य नाही.

होमिओपॅथी ही तत्त्वतःच भुसभुशीत पायावर उभी आहे. त्यामुळे त्याचेही उत्तर तेच द्यावे लागेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पर्याय २

प्रस्ताव बदलला आहे.नविन सर्वेक्षणानुसार तुम्ही दोन्ही प्रश्नांना 'पर्याय दोन' निवडणार असे धरुन चालू का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अजून सुधारणा हवी

विश्वास नाही आणि चिकित्सेची गरज नाही यातही चिकित्सा झालेली आहे म्हणून विश्वास नाही असा टोन न येता. चिकित्सा वर्ज्य असल्याचा टोन येत आहे. :(

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

थत्त्यांप्रमाणेच

ज्योतिष हे पुरेसे असिद्ध झाले आहे असे मी मानतो. त्यामुळे चिकित्सा झाली असल्याने मानणार नाही असे माझे उत्तर आहे. ते प्र्यायांत नाही. या उत्तराऐवजी "इतर" असे लिहिणे योग्य नाही.
होमिओपॅथी ही तत्त्वतःच भुसभुशीत पायावर उभी आहे. त्यामुळे त्याचेही उत्तर तेच द्यावे लागेल.

माझे मत थत्त्यांप्रमाणेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आभार!

माझ्या विनंतीनुसार प्रस्तावात बदल केल्याबद्दल उपक्रम व्यवस्थापनाचे आभार!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

फलज्योतिष

चिकित्सा होईपर्यंत नाकारणार नाही.

sha'ILU'

होमिऑपथी वर विश्वास

फल-ज्योतिष्य = विश्वास नाही.
होमिऑपथी = चिकित्सा होईपर्यंत नाकारणार नाही

-दिलीप बिरुटे

इतर

आपल्या बंदिस्त चौकटींच्या पर्यायांचा विचार करता
दोन्ही कल इतर सदरात
प्रकाश घाटपांडे

इतर

दोन्ही कल इतर सदरात

बंदिस्त चौकटीतून बाहेर पडून 'इतर' म्हणजे नक्की काय ह्यावर कृपया थोडा प्रकाश पाडाल का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

इतर

इतर या मताचा फापटपसारा मांडण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. ची निर्मिती झाली. मनोगत व दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने यात काही उहापोह आहेच. मतभेद असु शकतात. आपले मत हेच विवेकी /पुरोगामी/ प्रमाण व आपल्या मताशी सहमत नसणारा प्रतिगामी, अंधश्रद्ध, अविवेकी असे मत आमचे नाही.
आपला हा कौल असल्याने आम्हाला इतर सदरात टाकण्यासाठी मत दिले.
प्रकाश घाटपांडे

एवढी भूतदया कशासाठी?

आपले मत हेच विवेकी /पुरोगामी/ प्रमाण व आपल्या मताशी सहमत नसणारा प्रतिगामी, अंधश्रद्ध, अविवेकी असे मत आमचे नाही.
प्रकाशराव, ज्योतिषविद्या थोतांड आहे असे माझे मत आहे. होमिऑपथीवर माझा विश्वास नाही. आणि माझ्या मताशी सहमत नसणारा प्रतिगामी, अंधश्रद्ध वगैरे वगैरे असायलाच हवा असे माझे मत नाही. पण दुसरा काही पर्याय आहे का? एवढी भूतदया कशासाठी? लोकप्रियतेची स्पर्धा जिंकण्यासाठी अशी वक्तव्ये उत्तम.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मउ कोपरा

पण दुसरा काही पर्याय आहे का?

आम्हाला प्रबोधन हा कासवी पर्याय वाटतो/ पटतो

एवढी भूतदया कशासाठी?

मउ कोपर्‍यामुळे.

लोकप्रियतेची स्पर्धा जिंकण्यासाठी अशी वक्तव्ये उत्तम.

सहमत आहे

प्रकाश घाटपांडे

आपले मत हेच विवेकी

आपले मत हेच विवेकी /पुरोगामी/ प्रमाण व आपल्या मताशी सहमत नसणारा प्रतिगामी, अंधश्रद्ध, अविवेकी असे मत आमचे नाही.

हे मला उद्देशून आहे का? ह्या वाक्याचे इथे प्रयोजन समजले नाही.

आपला हा कौल असल्याने आम्हाला इतर सदरात टाकण्यासाठी मत दिले.

धन्यवाद. वरती काही सदस्यांनी पर्यांयांबाहेर जाऊन इतर निवडताना त्याचे संक्षीप्त स्पष्टीकरण दिलेले आहे. तसे तुमच्याकडून आले असते तर आवडले असते. असो. ते झाले ज्योतिष्याविषयी. होमिऑपथीवर तुमचे मत काय? त्यावरही पुस्तक लिहिले आहेत की काय? ह.घ्या. :)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

स्वगत

यातला उपरोक्त भाग हा स्वगत आहे. संक्षिप्तिकरणाच्या प्रयत्नात आशय/अर्थहानी वा अर्थाशी अभिप्रेत नसलेली छटा वाचकांपर्यत पोहोचण्याचा धोका असतो. काही प्रतिभावंतांकडे तो धोका नसण्याची क्षमता आहे. पण (दुर्देवाने) ती आमच्यात नाही. असो
होमिओपथी बद्द्ल लहानपणी नेट्रम मूर हे विंचु दंशासाठी वडिलांनी अनेकांना दिलेले होते.(वडिल डॉक्टर् नव्हते) प्रभावी पणे विंचु उतरतो. वडिलांच्या अनुपस्थित मी देखील द्यायचो. खेड्यात विचुदंशाचे प्रकार सातत्याने घडायचे. आम्ही होमीपदीच्या वाट्याला आता जात नाही.
होमीपदीवर चांगला लेख एका माजी होमिओपॅथचा डॉ शंतनु अभ्यंकर वाचा
http://www.eanubhav.com/Dr%20Shantanu%20Abhyankar.htm
प्रकाश घाटपांडे

अप्रतिम लेख

अप्रतिम लेख. एका सुंदर लेखाची ओळख करुन दिल्या बद्दल आभारी आहे.

+१

अप्रतिम लेख!

+२

लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

कुंपणावरून

हा लेख वाचून मी आता कुंपणावरून होमिओपाथीच्या विरुध्द बाजूला उतरलो आहे. अप्रतिम सुसंबध्द लेख

कोर्स आणि रेकग्निशन

हा लेख पूर्वी वाचला होता असे स्मरते.

माझे एक स्नेही आयुर्वेदिक डॉक्टर (बी ए एम् एस्) आहेत. त्यांचेही आयुर्वेदाबद्दल (म्हणजे आयुर्वेदाच्या शिक्षणाबद्दल) असेच काहीसे मत आहे.

त्यांना (परदेशात सोडाच) भारतातही (महाराष्ट्राबाहेर) नोकरी मिळू शकत नाही. त्या डिग्रीला रेकग्निशन नाही अशी धक्कादायक माहिती त्यांचेकडून कळली.

होमिओपाथिक डॉक्टर असलेली एक बाई अमेरिकेत जाऊन नर्सचे शिक्षण घेऊन नर्स म्हणून नोकरी करते असे ऐकले. तिच्या होमिओपाथीच्या डिग्रीला काही किंमत नाही. तिने बारावी पास या पात्रतेच्या आधारे नर्सिंगला प्रवेश मिळवला. :(

एकूणात एम् बी बी एस ला प्रवेश मिळाला नाही तर आयुर्वेद/होमिओपाथीचे शिक्षण या गोष्टी ध्यानात ठेवून घ्यावे हे उत्तम.

मूळ लेखाशी हे सारे अवांतर होते आहे का?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सर्वांचा आभारी आहे

सर्वप्रथम सर्वेक्षणात भाग घेणार्‍या सर्वांचे आभार. सर्वसाधारण कल हा ज्योतिष्य आणि होमीऑपथी दोन्हीवर विश्वास न ठेवणारा वाटला. त्यातल्या त्यात होमीऑपथी विषयी थोडा कमी अविश्वास दिसून आला. ज्योतिष्य हा विषय जालावर भरपूर चर्चिला गेल्याने असे झाले असावे. किंबहुना त्यामुळेच एक वेगळा विषय म्हणून होमिऑपथीचा समावेश केला.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स ह्यांचा 'एनीमीज ऑफ रिझन' हा माहितीपट बघून ह्या सर्वेक्षणाची कल्पना आली, त्यातील दोन चित्रफिती इथे देत आहे. पुन्हा एकदा सर्व प्रतिसदकांचे आभार!

होमीऑपथी

राशीभविष्य

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अवांतर

ही पहा होमिओपथी वरील विनोदी चित्रफीत:

छान

चित्रफीत मस्त आहे.

बाय द वे

कसले सर्वेक्षण करता ? माहितीची देवाण-घेवाण करा.
स्वगत : छ्या, सध्या उपक्रम मूळ उद्देशापासून भरकटल्यासारखे वाटते.

-दिलीप बिरुटे

चालायचेच

अहो लोकशाही असणाऱ्या भारतासारख्या देशां मध्येही आणीबाणी आणि शिवसेना व तत्सम संघटनांची हुकूमशाही चालतेच की. ते कसे खपवून घेतो आपण.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

??

कसले सर्वेक्षण करता ? माहितीची देवाण-घेवाण करा.

सर्वेक्षण म्हणजेच माहितीची देवाण घेवाण.

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

शिरगणती ही घेट्टोंची पूर्वतयारी?

आमच्या मताशी सहमत नसणारा, आणि आम्ही, यांपैकी एकजण प्रतिगामी, अंधश्रद्ध, अविवेकी असे आमचे मत आहे.

दोन्ही प्रश्नांना सामायिक उत्तरः स्वतः जुजबी चिकित्सा केलेली असल्यामुळे विश्वास नाही. इतरांनी चिकित्सेचे कष्ट घेऊन यश मिळविल्यास विश्वास ठेवण्यास तयार आहे.

मत

फल-ज्योतिष्य

१. स्वानुभव आला असल्याने विश्वास ठेवण्याकडे कल आहे. मात्र पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी चिकित्सा व्हावीशी वाटते.

होमिओपथी

१. जवळच्या नातेवाईकांना चांगला अनुभव आला आहे असे ते सांगतात मात्र मला स्वतःला तसा आलेला नसल्याने चिकित्सा झाल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर