उपक्रमाला पारितोषिक
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.
Comments
उपक्रमाला दुसरे पारितोषिक विभागून
उपक्रमाला दुसरे पारितोषिक विभागून मिळाल्याचे कळते. उपक्रमींचे अभिनंदन!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हार्दिक अभिनंदन!
उपक्रम पारितोषिक मिळवण्याच्या योग्यतेचे आहेच परंतु ते सिद्ध झाल्याने विशेष आनंद वाटला.
हेच म्हणतो
आनंद झाला.
(हसरा) बेसनलाडू
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
+२
अभिनंदन , सर्व उपक्रमींचे आणि विशेष करुन व्यवस्थापकांचे !!
--------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
विशेष आनंद
पारितोषिकाबरोबरच खालील गोष्टींचा विशेष आनंद झाला.
१) उपक्रम प्रशासनाने ह्या स्पर्धेविषयी उदासिनता न दाखवता प्रवेश अर्ज भरला.
२) निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला.
३) शासकीय असूनही निकाल वेळेत घोषित झाले आणि नि:पक्षपाती सुद्धा वाटतायत.
उपक्रमावरील मजकूराचा दर्जा उत्तम आहेच पण तरीसुद्धा थोडे आत्म-परीक्षण् ह्या निमित्ताने व्हायला हरकत नसावी. संकेतस्थळाचे 'बाह्यांग' हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मल खटकणार्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे अ) मुखपृष्ठावर नविन काही न दिसणे ब) 'गमभन' ची जुनीच आवृत्ती ज्यात एक अधिक 'अ' टंकावा लागणे.
उपक्रम प्रशासन आणि उपक्रमींचे पुन्हा एकदा अभिनंदन...
असेच म्हणतो
उपक्रम संकेतस्थळाचे हार्दिक अभिनंदन.
वाचक यांची आत्मपरीक्षणात्मक टिप्पणीसुद्धा योग्यच.
अतिशय आनंदाची बाब
ही अतिशय आनंदाची बाब आहे. सर्वांचे अभिनंदन. मुख्य म्हणजे कुठलेही विशेष प्रयत्न न करताही उपक्रमाला दुसरे पारितोषिक मिळाले.
उपक्रम अद्यापही ड्रूपल ५ वरच आहे. ते ड्रूपल ६ वर आणणे गरजेचे आहे. उपक्रमाची सध्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) ही बदलणेही आवश्यक झाले आहे. ह्याबाबत हवी ती मदत करण्यास अनेक उपक्रमी उत्सुक आहेत.
ड्रुपल ६
ड्रुपल ६ म्हणजे नवीन निरोप आल्याचे न दिसणे, पाठवलेले निरोप वाचले गेले आहेत का याचा छडा न लागणे वगैरे वगैरे बग्ज का? तसे असेल तर ड्रुपल ५ परवडले. :-(
वरील अडचणी दूर झाल्या आहेत
ड्रुपल ६ म्हणजे नवीन निरोप आल्याचे न दिसणे, पाठवलेले निरोप वाचले गेले आहेत का याचा छडा न लागणे वगैरे वगैरे बग्ज का? तसे असेल तर ड्रुपल ५ परवडले. :-(
वरील अडचणी, समस्या आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे ड्रूपल ६ कडे वळायला हवे.
+१
अभिनंदन! ही बातमी वाचून आनंद झाला.
बाकी वाचक यांच्या वरील मुद्यांशी सहमत. विशेष करून पहीले तीन मुद्दे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आनंद
आनंददायी बातमी. हार्दिक अभिनंदन.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अभिनंदन....!
आनंद देणारी बातमी.
-दिलीप बिरुटे
फारच छान बातमी!
उपक्रमाचे अभिनंदन. उपक्रम मालक,चालक वगैरे मंडळींनी ह्या निमित्ताने उपक्रमात काही बदल घडवून आणले तर दुधात साखर पडेल. (विशेषतः मुखपृष्ठ अद्ययावत करणे)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
असेच
म्हणतो. हार्दिक अभिनंदन.
---
सम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा
कॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा
+१
हेच म्हणतो.
सहमत
उपक्रमाचे वेगळेपण मला पहिल्या दिवसापासून भावले. उपक्रमाच्या "मालकां"बरोबरच सर्व उपक्रमींचे अभिनंदन
आनंददायी वृत्त
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे पारितोषिक"
हे वृत्त आनंददायी आहे. मात्र ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे वाचनात आले नाही.
उपक्रमला हे यश अल्प कालावधीत मिळाले आहे.इथल्या वैचारिक लेखनाचा स्तर तसा उच्च आहेच. पण आपली सदस्यसंख्या अगदी कमी वाटते. सदस्यत्व मिळविण्याची पद्धत आहे त्याहून सोपी असायला हवी का? ती अधिक सुलभ करता येईल का? सदस्यसंख्या वाढण्यासाठी उपक्रमींनी कांही सांघिक प्रयत्न करायला हवेत का? या विषयी कोणी पुढाकार घेतल्यास सर्व सदस्य सहकार्य करतीलच.
उदा. फेसबुकवर उपक्रमाचे पान
आयड्या चांगली आहे. उदा. फेसबुकवर उपक्रमाचे पान बनवायला हवे. तिथून सदस्यता मोहीम राबवता येईल. आणखी काही सुचत असल्यास सांगावे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भुतावळ
अचानक सदस्यसंख्या वाढली तर उपक्रमाच्या दर्जात फरक पडेल असे वाटते का? दर्जा उतरेल असे वाटल्यास तसे होऊ नये पण सदस्य येत राहावेत म्हणून काय करता येईल?
नविन सदस्य +दर्जा = शक्य आहे
काटेकोर संपादन :)
विश्वास
उपक्रमाची आघाडीची फळी नविन सदस्यास 'वठणीवर' आणेल(च) असा विश्वास वाटतो! ;-)
बाईंचे अनुकरण
भटकंती करताना एखाद्या संस्थळावर कुणी बरा लेखक आढळलाच, तर त्याला उपक्रमाचा पत्ता देऊन आमंत्रित करावे. प्रियालीबाईंनी तसे केले नसते, तर मला कदाचित, उपक्रमाचा शोध लागलाच नसता. --वाचक्नवी
चांगले लेखक हेरावे
सहमत. वाचक्नवींसारखे उत्तम लेखक (बरे नव्हे) हेरून उपक्रमावर आमंत्रित करावे. हुप्प हुप्प करत ह्या घराच्या गच्चीवरून त्या घराच्या गच्चीवर उड्या मारत
फिरणारी ही कंपूबाज माकडे उपक्रमावर येऊ नयेत, असे मनापासून वाटते.
(बाउन्सर) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सदस्यसंख्या
उपक्रमाची (आणि मनोगताचीही) सदस्यसंख्या वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न नकोत. संकेतस्थळाचे यश त्याच्या सदस्यांच्या संख्येवर अवलंबून नाही. आपल्या इष्टमित्रांना या संकेतस्थळांचे आमंत्रण देणे इतपर्यंत ठीक, पण यापलिकडे सांघिक प्रयत्नांची वगैरे गरज नाही. उपक्रमाच्या तथाकथित अतिवैचारिकपणामुळे इथे आल्यावर कंटाळा येणारे सदस्य सोडून गेलेलेच बरे. त्या दृष्टीने उपक्रमाचा रुक्षपणा (आणि मनोगताचा प्रशासकीय बडगा) या इष्टापत्तीच मानाव्या लागतील. केवळ वेळ घालवण्याचे साधन या उद्देशाची पूर्ती करणारी बरीच संकेतस्थळे उपलब्द्ध आहेत. तसला कल्लोळ इथे नसलेलाच बरा.
सन्जोप राव
उफक पर खडी है सहर
अंधेरा है दिलमें इधर
वही रोज का सिलसिला
अभिनंदन
अभिनंदन.
उपक्रमाची अशीच प्रगती होवो ही सदिच्छा.
*तेवढं ते ऍ चं काहीतरी करा हो.*
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
........
असो खुपच ऊशिरा आठवण आली राव्.... ;)
आम्ही आमचे अभिष्ठ चिंतन येथे केले आहे... !
सकाळीच.. खुप उपक्रमवासी तिकडे आले व गेले पण कोणालाच येथे लिहावे असे वाटले नाही हे पाहून् नवल वाटले होते व त्यामुळेच लॉगईन केले होते व माझी कामना नव्हती की तोच लेख मी येथे पण् टाकू.. असो.
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
अभिनंदन
उपक्रमी लेखक व चालकांचे अभिनंदन
अन्य बक्षीस विजेत्यांची नावे कळतील काय?
नैधृव कश्यप
अभिनंदन
उपक्रमावरचं लेखन, प्रतिसाद, चर्चा वाचतानाच हे काही वेगळंच पाणी आहे हे दिसून येतं. प्रगल्भ व रसरशीत वैचारिक लेखन ही उपक्रमाची खूण आहे. याची सरकारी परीक्षकांनी दखल घेतली हे वाचून आनंद झाला.
उपक्रमांच्या चालकांचं, लेखकांचं, वाचकांचं, प्रतिसाद देणाऱ्यांचं व परीक्षकांचंही अभिनंदन.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
+१
असेच म्हणतो. उपक्रमाच्या चालकांचे व वाचकांचे अभिनंदन.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
आनंद झाला
उपक्रमाचे, उपक्रमचालकांचे आणि उपक्रमींचे अभिनंदन!
वा
खूप अभिनंदन्!! आनंद झाला.
(बाकी काही नाही, निदान् अ ची कटकट् मिटावी, बाकी सगळं मस्त्! )
आनंद
बातमी वाचून आनंद झाला. उपक्रमाचे अभिनंदन.
उपक्रमावर वाचणे, लिहिणे यामुळे मला मोठा आनंद मिळाला आहे. उपक्रमाच्या प्रशासकीय कोरडेपणाबाबत, रटाळपणाबाबत आणि बाह्य रुपाबाबत बरेच लिहिले गेले आहे. अर्थात प्रशासकीय कोरडेपणा हा एकच निष्कर्ष धरला तर उपक्रमाला पहिले पारितोषिक मिळण्याची सुतराम शक्यता नाही! पण ते असो. उपक्रमाची भूमिका ही नेहमी तटस्थ राहिली आहे, आणि या बाबतीत उपक्रमाचे मालक, चालक आणि संपादक यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. कोणताही आवेश घेऊन 'तू, तुझा बाप' असली भूमिका उपक्रमाने कधीही घेतली नाही. मराठी संकेतस्थळ म्हणून मला उपक्रमाचे हे विशेष वाटते.
सन्जोप राव
उफक पर खडी है सहर
अंधेरा है दिलमें इधर
वही रोज का सिलसिला
सहमत
प्रथम उपक्रमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन..
सन्जोपरावांच्या भूमिकेशी सहमत..
उपक्रमाची काही वाखाणण्यासारखी वैशिष्ट्ये:
विविध चर्चा मुख्य विषयापासून न ढळणे
काही उपद्रवी लेख व चर्चा अनुल्लेखाने मारणे
धोरणे आणि उद्दिष्टांमध्ये तडजोड न करणे (उपक्रमाचे बाह्यस्वरूप हाही एक धोरणाचा भाग असावा. ;-))
उपक्रमींचे माहितीपर लेखांना प्रोत्साहन देणे
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
अभिनंदन आणि सहमत
संजोपराव आणि अभिजीत यांच्याशी सहमत.
उपक्रमाने आपले वेगळेपण चांगल्या प्रकारे जपले आहे. आगदी दिवाळी अंका बाबत सुद्धा. तसेच चित्तरंजन यांच्या सुचना सुद्धा योग्य आहेत.
अभिनंदन <इ ओ एम>
हा प्रतिसाद उघडण्याचे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून शीर्षकातच eom लिहिले होते.
अरे वा!
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! त्रिवार अभिनंदन! इतकी आनंददायक बातमी क्वचितच मिळते. उपक्रमाचा सदस्य असल्याने मला तर माझाच दुसरा नंबर आल्यासारखे वाटत आहे.
बाकी आहे असे उपक्रम आपल्याला आवडते. काही सूचना वर सदस्यांनी सांगितलेल्या आहेतच पण त्यामुळे उपक्रमावरचे प्रेम कमी होत नाही.
थीम बदलताना आम्हाला सांगा. आमच्या प्रिय उपक्रमाचे आधीच स्क्रीन शॉट घेऊन ठेवतो.
==================
+
हार्दिक अभिनंदन
सहमत आहे.
एक उपक्रमी म्हणून स्वतःचे व इतर सगळ्या संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.
परिक्षकांचेही अभिनंदन.
मला हे स्थळ आहे तसेच आवडते.. मात्र काहि बाबी बदलल्यास हरकतही नाहि
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
अभिनंदन व अनेकानेक आभार
माझ्यासारख्या वाचकाला उपक्रम म्हणजे ज्ञानाचे भांडार मिळाल्यासारखेच झाले.
मागील काही महीन्यांपासून उपक्रम हे माझ्यासाठी, अभ्यासाचे मुख्य स्त्रोत राहीले आहे.
धन्यवाद, उपक्रम.
उपक्रमाचे अभिनंदन
उपक्रमाचे अभिनंदन,
हे जसे आहे तसेच मला आवडते!
आपला
गुंडोपंत
लेखकांचे अभिनंदन
निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला. हे वाचक यांचे मत अगदी खरे आहे. दर्जेदार मजकूर हीच उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. म्हणूनच खरंतरं हे अभिनंदन जसे उपक्रमचालकांचे आहे तसेच इथे व्यासंगी लेखन करणार्या सदस्यांचे सुद्धा आहे.
बाकी 'स्थितप्रज्ञ' मुखपृष्ठाच्या समस्येशी सहमत आहे. सदस्यांच्या विनंतीचा विचार करुन त्यावर उपाय करण्यास हरकत नसावी.
जयेश
सहमत
सहमत.
माझे आवडते उपक्रमी लेखक व प्रतिसादक:
धनंजय, प्रियाली, यनावाला, प्रकाश घाटपांडे, चित्रा, चंद्रशेखर, शरद, . ऊर्फ राधिका, वाचक्नवी, नितीन थत्ते, राजेश घासकडवी, यनावाला, प्रकाश घाटपांडे, अक्षय, बाबासाहेब जगताप, प्रभाकर नानावटी, प्रमोद सहस्रबुद्धे, भालचंद्र, विसुनाना, वसंत सुधाकर लिमये, कोलबेर, सन्जोप राव, विनायक, गौरी दाभोळकर, गुंडोपंत, नाइल, हैय्यो हय्ययो.
(नावे आठवली तशी आणि तेवढी. भर घालता येईल.)
तुम्हाला कुठले लेखक किंवा प्रतिसादक आवडतात बरे?
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अभिनंदन
पारितोषिक मिळाले म्हणून संस्थळ आहे तसेच ठेवायचे असे शक्यतो होऊ नये ही प्रशासनाकडून अपेक्षा. उपक्रमाचा सुंदर वैचारिक गाभा सोडला तर इतर काही गोष्टींत बदल केल्यास ते निश्चितच स्वागतार्ह ठरतील असे वाटते. विशेषतः उपक्रमाचे बाह्य रंगरूप आणि टंकनप्रणाली यांत बदल झाल्यास उत्तम. दुसर्या एका धाग्यावर राज जैन यांनी केलेल्या सूचना या संदर्भात योग्य वाटतात.
-- येडा बांटू
अभिनंदन
माहितीचे आदानप्रदान मराठीतून करण्यासाठी निर्माण झालेले संकेतस्थळ नावारूपाला येत असल्याचे पाहून आनंद झाला.
सर्व संबंधितांचे अभिनंदन.
अभिनंदन
पारितोषिकाबद्दल उपक्रमचे अनेक अभिनंदन!!
'निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला.'
या मताशी सहमत. उपक्रमाला मी माझ्या ज्ञानाच्या महत्त्वाच्या स्त्रोतांपैकी एक मानते. खरं तर येते वाचण्यासारखं एवढं असतं की 'बाह्यांग' कधी फारसे खटकलेच नाही. परंतु त्यात सुधारणा झालीच तर दुधात साखर! :-)
इम्प्लिमेन्टेशनचा अभाव
चांगल्या प्रसंगी कान खेचण्याची प्रथा आहेच. उपक्रमावरील एक जुनी सदस्या या नात्याने मी उपक्रमपंतांचेच कान खेचते.
वर लोकांनी उपक्रमामध्ये सुधारणा आणावी असे आवाहन केलेले आहे. अशी आवाहने आतापर्यंत खूप झाली. बर्याच सदस्यांनी उपक्रम साधेसुधे असावे त्यात खूप सुधारणांचा भरणा करून संकेतस्थळ हळू किंवा भडक करू नये असेच सांगितले परंतु काही बेसिक अडचणी सोडवणे शक्य आहे असे वाटते. उपक्रमपंत दर चर्चेत हजर होऊन अशा सुधारणा करण्याची आश्वासनेही देतात परंतु पुढे काहीच होत नाही.
प्रत्येक माणसाला आपले खाजगी आयुष्य आहे आणि उपक्रमपंत कामांत गुंतलेले असतील हे खरेच. त्यांनी दर दिवशी किंवा दर आठवड्याला मुखपृष्ठ बदलावे, रंगसंगती बदलावी वगैरे अपेक्षा येथे कोणी ठेवत असेल असे वाटत नाही. परंतु आता दोन-तीन वर्षांनी जर त्यांना स्वतःला शक्य नसेल तर त्यांनी काही मोजक्या सदस्यांवर विश्वास टाकून त्यांच्या हाती थोडीफार सूत्रे देण्यास हरकत नसावी. अशा सुधारणा करून देण्यात रस असलेल्या सदस्यांची एखादी समिती स्थापन करता येईल आणि संकेतस्थळ अधिक आकर्षक करता येईल असे वाटते.
कृपया, विचार व्हावा आणि इम्प्लिमेंटेशनही.
सहमत आहे
निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा महत्त्वाचा मानला हेच मला महत्वाचे वाटते. बाह्यांग रंगसंगती ही उपक्रमाच्या प्रकृतीस साजेशीच आहे. त्यात बदल केला नाही तरी चालेल परंतू सोयी सुविधांच्या दृष्टीने काही बदल झालेले नक्कीच आवडेल. (सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुखपृष्ठ बदल.)
इथे येणार्या मजकुरामधे उपक्रमाने राखलेले सातत्य आणि दर्जा हे मात्र वखाणण्याजोगेच आहे. सर्व उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
अभिनंदन , सर्व उपक्रमींचे आणि विशेष करुन व्यवस्थापकांचे ,एक उपक्रमी म्हणून स्वतःचे व इतर सगळ्या संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.अशीच प्रगती होवो ही सदिच्छा.
परिक्षकांचेही अभिनंदन.
शैलु...
मुखपृष्ठ
येथे अनेकजण मुखपृष्ठा बद्दल लिहित आहेत. ते कसे असावे याची चर्चा व्हावी असे वाटते. जेणे करुन पंतांना थोडी तयार माहिती मिळेल. :)
उपक्रमाचे अभिनंदन
उपक्रमाचे, उपक्रमींचे, मालकांचे, चालकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
-राजीव.