एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ४ - विश्लेषण

प्रयोगनिष्पत्ती आणि विश्लेषण

वाक्यांचा वंशवृक्ष
वाक्यांचा वंशवृक्ष पुढील आकृतीमध्ये चितारलेला आहे. दहा पिढ्या एकाखाली एक मांडलेल्या आहेत. वाक्य रंगीत चौकोनांमध्ये लिहिलेली आहेत. चौकोनांचे रंग वाक्याला कौलामध्ये मिळालेली मतांची टक्केवारी दर्शवतात. प्रत्येक पिढीतल्या कौलामध्ये बाद झालेल्या वाक्यांवर "वर्तुळावर तिरकी रेघ" असा शिक्का मारलेला आहे. वाक्यांमधील जनक-संतान नाती बाणांनी दर्शनलेली आहेत. "जुळ्या" वाक्यांभोवती तुटक रेषेचा चौकोन काढलेला आहे.

निरीक्षण १:
पहिल्या पिढीनंतर कौलातली पर्यायी वाक्ये एखाद्या-एखाद्या शब्दाच्याच फरकाची दिसतात. यामुळे कौलात निवड करणे कठिण जात होते, असे एका खेळाडूने सांगितले. असे असूनही बहुतेक पिढ्यांमध्ये निवड झालेली वाक्ये मोठ्या बहुमताने निवडून आली. यावरून असे दिसते की अर्थवत्ता आणि आस्वादसौंदर्याच्या बाबतीत सकृद्दर्शनी संदिग्धता वाटली, तरी काहीतरी सूक्ष्म आवडनिवडीबाबत खेळाडूंचे मत जुळत असावे.

निरीक्षण २:
संततीपैकी एक तरी वाक्य "काहीच बदल नाही" असे असते. अशी अभेद-रूपात वाक्ये किती पिढ्या तगली?
२६ वाक्ये केवळ एक पिढी तगली
५ वाक्ये दोन पिढ्यांपर्यंत तगली
१ वाक्य तीन पिढ्या तगले : फूल उडते आस्ते वेडे मोहरून मेला शहाणा राजा.
१ वाक्य ४ पिढ्या तगले : फूल उडते आस्ते वेडे मोहरून झोपला लाघवी राजा.
१ वाक्य ९ पिढ्या तगले : फूल उडते आस्ते वेडे मोहरून झोपला शहाणा राजा.

निरीक्षण ३:
त्यातही "लाघवी" हा शब्द वेगवेगळ्या अन्य बदलांबरोबर ७ पिढ्या तगला. त्यातील पुढील उपजाती एक-एकदा तरी कौलात जिंकली.
- फूल उडते आस्ते वेडे मोहरून झोपला लाघवी राजा.
- फूल उडते आस्ते वेडे मोहरून मेला लाघवी राजा.
- फूल उडते आस्ते वेडे चिडून मेला लाघवी राजा.

निरीक्षण ४:
सातव्या-आठव्या पिढीत "लाघवी" वाक्याला "शहाणा" वाक्यापेक्षा अधिक किंवा समान मते मिळाली. मात्र नावव्या पिढीत "लाघवी" शब्द असलेली वाक्ये नि:शेष झाली. त्यावरून असे दिसते, की मागल्या पिढ्यांमधील साफल्यामुळे पुढल्या पिढीतल्या साफल्याची काहीच शाश्वती नाही.

(क्रमशः)
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे
लेखाच्या भागांची अनुक्रमणिका दुव्यांसह खालील एका प्रतिसादात देणार आहे.

Comments

भारी

/मागल्या पिढ्यांमधील साफल्यामुळे पुढल्या पिढीतल्या साफल्याची काहीच शाश्वती नाही./

हे भारी निरेक्षन आहे.
म्हनून आमदाराचा पोरगा मारऊन मुटकुन सभापती झाला तरी परत आमदार होइलच् आस नाही.
आसाच खेळ राजकारनी घराण्यांवर् खेळायला पायजे
आन् ते बरोबर निवडनुकीच्या आधी पेप्रात नाही तर् टिव्हिवर यायला पायेजे.
मग मतदार राज्या बरोबर् मत् देतो नै ते पाहा.
पन् तरी लोकाच्या मनातले राजाचे राजेपन कसे बदलते हे, सोदनारा पन खेल खेळाला पाहिजे .

आपला
अण्णा

एक शंका

हा कौल छुपा होता का? अनेकांनी टक्केवारी बघून जिधर-दम-उधर-हम अशी निवड केली असल्यास बहुधा फरक पडत नसावा. ते बहुधा गृहीत धरले असावे. असो. एकच कल्पना संतपरंपरेतल्या वेगवेगळ्या कवींनी कशी राबविली व त्यात कशी उत्क्रांती होत गेली, हे बघावेसे वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर