पोलिटिकल करेक्टनेसला फाट्यावर मारायला हवे काय?

गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न भंडावतो आहे. एक काय खरे तर ह्यात अनेक प्रश्न आहेत. वैयक्तिक टिप्पणी म्हणजे काय? माणसाचा अपमान नेमका कोणत्या शब्दांनी होतो?

अनेक शतकांपूर्वी आम्ही एकाला खरडवहीतून 'तू छिनाल नाटके करतोस' असे म्हटले. ह्याचा अर्थ त्या बिचाऱ्याने बहुधा शब्दशः घेतला. मला खरे तर त्याला "अरे मित्रा ! तू शब्दशः 'छिनाल' आहेस रे!"
असे म्हणायचे नव्हते. असो. त्यावरून मग बराच गहजब झाला. त्यातला बराचसा गहजब संधी साधणारा होता. मग असे वाटले की, 'छिनालच्या' ऐवजी 'तू ढोंगीपणा करतोस, फालतू नाटके करतोस?' असे म्हटले असते तर वाक्याची संहती कमी झाली असती का? किंवा होते का? तसेच काहींचे लिखाण अगदी मृदू आणि मुलायम असते. अगदी नवनीत. अशावेळी कोणी त्याला लिखाण बायकी आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ त्याने लिंगबदलाची रीतसर शस्त्रक्रिया करून घेतली आहे असा होतो किंवा त्याच्यात काहीतरी उणीव आहे असा होतो का?

मागे केव्हातरी एका चर्चेत, बहुधा रेषेवरची अक्षरे ह्या दिवाळी अंकावरच्या कुठल्याश्या चर्चेत, 'साहित्यिक रेव पार्ट्या' हा शब्द वापरला होता. हा शब्द काहींना बोचला होता. म्हणजेच काम फत्ते झाले ही गोष्ट वेगळी, पण साहित्यिक रेव पार्ट्या हा शब्द बोचणारा आहे का? साहित्यिक रेव पार्ट्या आणि लैंगिकतेचा काय संबंध आहे? म्हणजे तिथे नंगा नाच होतो, अफू, गांजा, चरस, कोकेन आदी अमली पदार्थांचे सेवन होते काय? तसेही साहित्यिक कोकेन अफोर्ड करू शकतील असे वाटत नाही परंतु कोकेनची नशा देईल असे काही साहित्यिक रेव पार्ट्यांत चघळले जाते का? म्हणींचा-वाक्प्रचारांचा वापर करणे हे समृद्ध भाषिक संस्कृतीचे लक्षण आहे नाही काय?

इंग्रजीत कुणी कुणाला "ही वॉज़ कॉट विथ हिज़ पँट्स डाउन" असे म्हटले तर ह्याचा अर्थ त्याला अर्धनग्नावस्थेत पकडले असा होत नाही. असो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण जाऊ द्या. असो. मला तुम्ही एवढेच सांगा एकंदरच ह्या पोलिटिकल करेक्टनेसला फाट्यावर मारायला हवे काय?

Comments

पोलिटिकली इन्करेक्टनेस चे फायदे

पोलिटिकली इन्करेक्टनेस चे फायदे

अर्वाच्य शब्द वापरून , चारित्र्याचे हनन करून , लैंगिकतेचे सूचन करून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान करून दुसर्‍याला गप्प जरूर बसवता येते. वर (मूळ शब्दांची फिरवाफिरव करून ) परत माझा हेतू अपमान करण्याचा नव्हताच असेही म्हणता येते. हे सर्व चतुर आहे. पोलिटिकल इन्करेक्टनेस् हा प्रस्तुत व्यासपीठावर अगदी पोलिटिकली एक्स्पेडियंट् आहे याबाबत वादच नाही. आणि प्रस्तुत प्रस्तावाच्या गुणवत्तेविषयी तर बोलायलाच नको. जुने वादविवाद उकरून काढून , प्रच्छन्न निंदा तर संभावितपणे साधता येतेच. वर परत तत्वचर्चेचे श्रेयही मिळते. इतके सगळे जणू कमी पडते म्हणून वर परत पोलिटिकल इनकरेक्टनेस् इज् द हिप-थिंग टू. (पहा बिल मार व त्याचा कार्यक्रम : "पोलिटिकली इनकरेक्ट") .

असो. माझे प्रस्तुत उत्तर हे प्रस्तावाबद्दलचे विचार आहेत, मा. प्रस्तावलेखकावरची किंवा या महनीय , नि:स्पृह व्यासपीठावरची टिप्पणी नव्हे हे येथे नमूद करणे - विशेष करून माझे संपूर्ण प्रतिसाद अकाली मृत्यूपासून वाचवण्याच्या दृष्टीने - भाग आहे.

व्यक्तिगत होणार नाही

असो. माझे प्रस्तुत उत्तर हे प्रस्तावाबद्दलचे विचार आहेत, मा. प्रस्तावलेखकावरची किंवा या महनीय , नि:स्पृह व्यासपीठावरची टिप्पणी नव्हे हे येथे नमूद करणे - विशेष करून माझे संपूर्ण प्रतिसाद अकाली मृत्यूपासून वाचवण्याच्या दृष्टीने - भाग आहे.

कुणी डोळा मारला तरी बलात्कार झाला अशी बोंब ठोकणाऱ्या प्रतिसादाला, प्रतिसाद देणार्‍याला नव्हे, कुणी कांगावखोर म्हटल्यास ते व्यक्तिगत होणार नाही. असो.

अवांतर:
तुमचा प्रतिसाद अजूनही जिवंत आहे. ह्यातच सर्व आले. ह्यापूर्वीही तुम्ही माझे प्रतिसाद उडवले जातात म्हणून मी ते खरडीत जतन करतो आहे असे काहीसे कुणाच्या तरी खरडीवहीत लिहिल्याचे वाचले. प्रचंड हसू आले. आता का ते विचारू नका संपादकसाहेब!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

व्यक्तिगत, खरडावह्यांचा संदर्भ इत्यादि

शेवटी व्यक्तिगत छद्मयुक्त निर्देश, इतर संकेतस्थळांबद्दलचे सूचन , वैयक्तिक खरडवह्यांचा उल्लेख आदि गोष्टींवर "तत्वचर्चा" नि "सत्यशोध" येऊन ठेपतात. वरून कीर्तन ... :-) चालायचेच. जे प्रतिसाद राहिलेत ते रहिलेतच. जे उडले त्यांचे काय ? ते सर्व माझ्याकडे जतन करून ठेवलेले आहेत. परंतु काय आहे, डाव खेळताना चारी एक्के आम्हाला कुणी आधीच सर्व्ह् केलेले नाहीत. मग डाव सुरू होतो. एक्के टाकणारे चार काय , आठाठ एक्के टाकतात. मग "जितं जितं" ! स्टेट्-स्पॉन्सर्ड् आहे सगळे काम. त्याची शान काय बोलावी. असो.

चर्चा टाका स्वतंत्र

जे उडले त्यांचे काय ? ते सर्व माझ्याकडे जतन करून ठेवलेले आहेत.

तुमच्या पहिल्या प्रतिसादापासून तुम्ही ह्या चर्चेला अकारण 'व्यक्तिगत' केले आहे, घेतले आहे. एवढेच असेल तरतर सगळे उडवलेले प्रतिसाद लावा ना. तुम्हाला कोणी रोखले आहे. वाटल्यास चर्चा टाका स्वतंत्र. 'स्टेट्-स्पॉन्सर्ड् आहे सगळे काम' असे म्हणत उगाच रडत बसू नका. शहीद बनू नका.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"व्यक्तिगत" अजेंडा : काही नमुने.

तुमच्या पहिल्या प्रतिसादापासून तुम्ही ह्या चर्चेला अकारण 'व्यक्तिगत' केले आहे, घेतले आहे.

१. अनेक शतकांपूर्वी आम्ही एकाला खरडवहीतून 'तू छिनाल नाटके करतोस' असे म्हटले. ....
२. तुमचा प्रतिसाद अजूनही जिवंत आहे. ........संपादकसाहेब.
३. एवढेच असेल तरतर सगळे उडवलेले प्रतिसाद लावा ना. तुम्हाला कोणी रोखले आहे.

इत्यादि.इत्यादि.इत्यादि.इत्यादि.इत्यादि.

अनेक प्रश्न आहेत

एक नसून अनेक प्रश्न आहेत - हे खरे आहे.
(१) पोलिटिकल करेक्टनेस, (२) वैयक्तिक अपमान टाळणे, आणि (३) लिंगनिर्देश आणि संभोगक्रियेच्या उपमांमधून अर्थग्रहण
हे तीन्ही वेगवेगळे मुद्दे असावेत.

- - -
"पोलिटिकल करेक्टनेस" शब्दप्रयोगाबद्दल दोनतरी विसंवादी व्याख्या दिसतात.
(१) ज्या वक्तव्यांनी किंवा कृतींनी समाजातील दुर्बल किंवा अत्याचारित घटकांना बहिष्कृत, क्षुद्रीकृत, किंवा अपमानित केले जाते, तशी वक्तव्ये व कृती टाळणे.
या व्याख्येमध्ये असे दिसते, की मुळात बोलणार्‍याला कोणाचा अपमान करायचा नाही, पण बोलण्यातून अपमानाचा आभास होतो. तो टाळावा. जो अर्थ मनातच नाही, तो वाईट सवयीमुळे किंवा दुर्लक्षामुळे भाषेत आणि कृतीत येऊ नये, हे बोलणार्‍याच्याच फायद्याचे आहे.

(२) आपण आपल्या वक्तव्यांना (मते न बदलता) कुठल्याशा राजकारणी सिद्धांताप्रमाणे आकार द्यावा, ही संकल्पना.
येथे बोलणार्‍याचे जे खरे मत आहे, ते स्पष्ट व्यक्त करण्यापासून तो परावृत्त होत आहे.

हा फरक अगदी टोकाचा आहे :
पहिल्या व्याख्येत असमर्पक शब्द-कृती टाळल्यामुळे खरे मत व्यक्त होत आहे.
दुसर्‍या व्याख्येत समर्पक शब्दांवर बंदी असल्यामुळे खरे मत दाबून टाकले जात आहे.

चर्चाप्रस्तावकाला पोलिटिकल करेक्टनेसबद्दल काय म्हणायचे आहे, ते समजण्यापूर्वी त्यांची व्याख्या समजून घ्यावी लागेल.

- - -

स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्षेत्रामुळे काही लिंगनिर्देशक उपमा वापरलेल्या दिसतात, उदाहरणार्थ :
१. "झाशीची राणी लक्ष्मीबाई ही बंडवाल्यांपैकी एकमेव पुरुष होती" असे एक ब्रिटिश सैन्याधिकारी म्हणाला.
२. "मृदु-मुलायम लिहिणार्‍यांचे लेखन बायकी असते" असे उदाहरण चर्चाप्रस्तावक देतात.

"पुरुष शूर योद्धे असतात, आणि बायका शूर योद्ध्या नसतात ->पण-> लक्ष्मीबाई अनपेक्षितपणे शूर होती + अन्य बंडवाले अपेक्षेपेक्षा भित्रे होते" असा काही अर्थ घेऊनच मला त्या ब्रिटिश अधिकार्‍याची उपमा समजते. दुसर्‍या कोणाला ही उपमा वेगळ्या प्रकारे समजते आहे का? "पुरुषाने स्त्रीसारखे असू नये, ते निंद्य आहे. अपवादात्मक स्त्रीने पुरुषासारखे असणे वंद्य आहे," अशी त्या ब्रिटिश अधिकार्‍याची गृहीतभावना मानल्याशिवाय उपमेला ठसका येत नाही. ब्रिटिश अधिकार्‍याच्या उपमेत भावनिक निंद्य-वंद्यता सांगितलेली नाही, किंवा ती समजण्यासाठी वेगळा कुठला पाया आहे, असे कोणी मला समजावून सांगू शकेल काय?

"बायकी लेखना"बद्दल उपमा वरच्यासारखी असेल तर मी समजू शकतो. (बायका मुलयम लिहितात, पुरुष जोरकस लिहितात. पुरुषाने मुलायम लिहिले, तर ते बाईच्या लेखनासारखे भासते, आणि पुरुषाने बाईसारखे भासणे निंद्य आहे.)

पण चर्चाप्रस्तावकाच्या मते या उपमेचा "बाई" या लिंगविशेषाशी, विशेषतः पुरुष->स्त्री या लिंगविचलनाशी, फारसा संबंध नाही. अर्थातच मला उपमा समजलेली नाही. त्यामुळे त्या उपमेचा अर्थ कोणी मला समजावून सांगावा.

- - -
'पँट्स डाऊन" ~= "अर्धनग्न स्थितीत सापडावा अशा लाजिरवाण्या परिस्थितीत" ही उपमा सामान्य वापरात आहे. उपमांमध्ये प्रत्यक्षाचे वर्णन करताना अप्रत्यक्ष पण ओळखीच्या दृष्टांताचा आधार घेतात. उपमेच्या प्रसंगात समोर साक्षात अप्रत्यक्ष नसते, हे तर स्पष्टच आहे. तरी उपमा प्रभावी केव्हा असते? दृष्टांत म्हणून अप्रत्यक्ष सुसंदर्भ असते, असे बोलणार्‍याचे मत असते.

हे सगळे विवेचन प्राचीन काळापासून बोलणार्‍या-ऐकणार्‍यांना माहीत आहे. पोलिटिकल करेक्टनेस आणि लिंगनिर्देशक उपमांच्या संदर्भात नवीन असा काय प्रश्न आहे?
लिंगनिर्देशक उपमा वापरली तर लिंगनिर्दिष्ट वस्तू अप्रत्यक्ष असली, तरी बोलणार्‍याच्या मते सुसंदर्भ दृष्टांत असतो. नाहीतर ती उपमा अर्थवाही कशी? हे विश्लेषण चर्चेच्या बाबतीत प्रासंगिक आहे काय?

कळले नाही.

उपमांमध्ये प्रत्यक्षाचे वर्णन करताना अप्रत्यक्ष पण ओळखीच्या दृष्टांताचा आधार घेतात. उपमेच्या प्रसंगात समोर साक्षात अप्रत्यक्ष नसते, हे तर स्पष्टच आहे. तरी उपमा प्रभावी केव्हा असते? दृष्टांत म्हणून अप्रत्यक्ष सुसंदर्भ असते, असे बोलणार्‍याचे मत असते.

धनंजय मला वरचे विवेचन समजले नाही. थोडे अधिक विशद करता येईल काय ?

वरील आणि नवीन उदाहरण

वर दिलेले उदाहरण सर ह्यू रोझ या ब्रिटिश अधिकार्‍याने वापरलेल्या उपमेचे आहे. ब्रिटिश अधिकारी मृत राणीबद्दल म्हणाला :
"Here lay the woman who was the only man among the rebels."
- येथे दिवंगत राणी ही "प्रत्यक्ष" आहे
- "पुरुष" अप्रत्यक्ष आहे
- कुठल्याही अप्रत्यक्ष पुरुषाचे जसे शौर्य, तसे या विशिष्ट प्रत्यक्ष स्त्रीचे शौर्य

(शिवाय आणखी एक उपमा आहे : बाकीचे बंडवाले = प्रत्यक्ष; पुरुष नसलेले व्यक्ती = अप्रत्यक्ष; शौर्याचा अभाव या गुणाचा दृष्टांत)

"शौर्य" हा गुण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षात समसमान आहे, असे ब्रिटिश अधिकार्‍याचे मत आहे, म्हणून प्रत्यक्ष स्त्रीसाठी अप्रत्यक्ष पुरुषाचा दृष्टांत त्याने दिलेला आहे. जर शौर्यासंदर्भात पुरुषत्व हे दृष्टांत म्हणून या वाक्यात ह्यू रोझच गैरलागू मानता, तर त्याचे वाक्य त्याच्या तोंडी निरर्थक होते.

दुसरे उदाहरण :
"चंद्रासारखा [उजळ] चेहरा" ही उपमा वापरताना
प्रत्यक्ष समोर असतो - चेहरा
अप्रत्यक्ष दृष्टांत - चंद्र
दृष्टांत सुसंदर्भ कुठल्या बाबतीत - उजळपणाच्या बाबतीत

दृष्टांत ओळखीचा घेतला तर उपमा अधिक प्रभावी असते. चेहरा नवीन माहिती सांगण्यालायक असतो, त्याची ओळख नवीन असते. म्हणून दृष्टांतासाठी घेतलेला चंद्र हा जुन्या ओळखीचा असलेलाच बरा.
"ग्रीनलँडसारखा उजळ चेहरा" असे कोणी म्हटल्यास काय होईल? ऐकणार्‍याला ग्रीनलँडची पूर्वीपासून ओळख नसेल, ग्रीनलँड उजळ आहे की नाही, याबद्दल स्पष्ट मत नसेल, तर उपमा निष्प्रभ होते.

म्हणूनच कोणी "चंद्रासारखा उजळ चेहरा" म्हणताना आपण ऐकले, तर आपल्याला समजते की "चंद्र उजळ आहे" असे बोलणार्‍याचे मत आहे, आणि ऐकणार्‍याचेही असे मत आहे अशी बोलणार्‍याची अपेक्षा आहे.

- - -

त्याच प्रमाणे "पुरुष शूर असतात" असे ह्यू रोझ याचे मत होते, आणि ऐकणार्‍याचेही असे मत असल्याचे ह्यू रोझला वाटत होते - असा कयास आपण करू शकतो. उपमेबरोबर विरोधाभास असल्यामुळे "स्त्रिया शूर नसतात, शौर्यामुळे राणी लक्ष्मीबाई स्त्रीत्वाला अपवाद आहे, आणि शौर्याच्या अभावामुळे बाकीचे बंडवाले पुरुषत्वाला अपवाद आहेत" असा ह्यू रोझच्या मनातला अर्थ सांगितला जातो.

ह्यू रोझ याची ही सर्व गृहीतके नसती, हा दृष्टांत त्यालाच सुसंदर्भ वाटत नसता, तर मग राणीला पुरुषाची उपमा देऊन आणि बाकीच्या बंडवाल्यांना बिगर-पुरुषांची उपमा देऊन त्याचा कुठलाही अर्थ साधत नाही.

अर्थात ऐकणार्‍याची गृहीतके ह्यू रोझसारखी नसली तर उपमा त्या ऐकणार्‍यासाठी कुचकामी ठरते. कोड्यात पडल्यामुळे ऐकणारा विचार करतो - ह्यू रोझची गृहीतके, त्याच्या काळातल्या ऐकणार्‍याची गृहीतके काय होती? त्याबद्दल कयास करूनच मग हल्लीच्या ऐकणार्‍याला ह्यू रोझच्या वाक्याचा काहीतरी अर्थ जुळवून लावता येतो.

धन्यवाद.

स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे,

नेमके

वर दिलेले उदाहरण सर ह्यू रोझ या ब्रिटिश अधिकार्‍याने वापरलेल्या उपमेचे आहे. ब्रिटिश अधिकारी मृत राणीबद्दल म्हणाला :
"Here lay the woman who was the only man among the rebels."
- येथे दिवंगत राणी ही "प्रत्यक्ष" आहे
- "पुरुष" अप्रत्यक्ष आहे
- कुठल्याही अप्रत्यक्ष पुरुषाचे जसे शौर्य, तसे या विशिष्ट प्रत्यक्ष स्त्रीचे शौर्य

हे बरोबरच आहे. त्यावेळचे पुरुष शेळपट, वीर्यहीन होते, असा अर्थही कुणी काढू शकतो.


अर्थात ऐकणार्‍याची गृहीतके ह्यू रोझसारखी नसली तर उपमा त्या ऐकणार्‍यासाठी कुचकामी ठरते.

नेमके मांडले आहे. वाचकाची गृहीतके लेखकाच्या गृहीतकांसारखी असतीलच असे नाही.

कॉलेजात असताना मी एका मित्राला, "प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस असतो आज तुझा आहे. ऐश कर" असे म्हटल्यावर बिचारा फार नाराज झाला होता.
दोन कारण असावीत.
१) मी "एवरी डॉग हॅज हिज डे" चे मी मराठीत भाषांतर केले होते. ते मराठीत फारसे रुचकर नसावे.
२) ऐकणाऱ्याची सामाजिक पार्श्वभूमी.

अर्थात त्याला शब्दकोश दाखवल्यावर तो शांत झाला. आणि नंतर स्वतः ती म्हण वापरू लागला.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

माणसाचा अपमान

माणसाचा अपमान नेमका कोणत्या शब्दांनी होतो?

माणसाचा अपमान शब्दांनी होतोच पण शब्दांशिवायही होतो. :-) एखाद्याकडे दुर्लक्ष करणे हा एक उत्तम अपमान आहे.

'छिनालच्या' ऐवजी 'तू ढोंगीपणा करतोस, फालतू नाटके करतोस?' असे म्हटले असते तर वाक्याची संहती कमी झाली असती का? किंवा होते का?

होत असावी. एकाच चुकीसाठी किंवा अपमानाचा बदला म्हणून छडीने सट्टदिशी रपाटा देणे आणि एक हलकीशी चापटी मारणे यांत आहे तसा फरक असावा. आता हलकीशी चापटी मारणारा पोलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असेल तर कल्पना नाही.

साहित्यिक रेव पार्ट्या हा शब्द बोचणारा आहे का? साहित्यिक रेव पार्ट्या आणि लैंगिकतेचा काय संबंध आहे?

माहित नाही. संकेतस्थळांचे कट्टे वगैरे होतात. तेथे साहित्यविषयक चर्चा वगैरे चालत असतील तर त्यांना विचारुन बघा. ;-)

आदर्श

पोलिटिकल करेक्टनेसच्या बाबतीत आमचे आदर्श सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत. :)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुलंना मिळाल्यावर ते आजारी असतानाही आले. त्यावर ठाकरे म्हणाले, "सरकारच्या विरोधात बोलायचं होतं तर घेतली कशाला पदवी?—- या साहित्यिकांना काय कळतंय? उपयोग काय यांचा समाजाला?..या मोडक्या ‘पुला’कडून कोण ऐकणार उपदेश?"

इथे पुलंचा अपमान झाला असे भले सगळ्या महाराष्ट्राला वाटो, सन्माननीय बाळासाहेबांचा तसा हेतू नव्हता याची आम्हाला खात्री आहे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुलंना मिळाल्यावर ?

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुलंना मिळाल्यावर ?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुलंना दिल्यावर.... तेव्हा शिवसेनेची सत्ता होती.आपण पुरस्कार दिला ह्या अधिकाराने पु.ल.सारख्यांवर असे कोणी बोलु शकते.

शैलु.

शब्दशः

अलंकारीत भाषा ही शब्दश: घेणे हा मूर्खपणा आहे. शब्दश: हा शब्दच अस्तित्वात कशामुळे आहे? एखादा वाळूत डोके खूपसुन बसला आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ तो काय खरंच वाळूत शिर्षाशन करुन उभा असतो का?

असो. 'साहित्यिक रेव पार्ट्या' हा शब्दप्रयोग मला तरी खूप आवडला. त्यात बिथरण्या सारखे काय आहे? तो कुठल्या संदर्भात वापरला होता ह्याची मला कल्पना नाही. पण आजकाल जेवताना, रस्त्यावर चालताना, शौचकुपात, आंघोळ करताना पुस्तक वाचणे किंवा भेळेचा कागद, फुटाण्याची सुरनळी, साखरेचं पोतं अश्या कुठल्याही ठिकाणी अक्षरे दिसली की 'एक्साईट' होणे आणि त्याची रसभरीत वर्णने पान पान भरून लिहिणे म्हणजे मला साहित्यिक रेव पार्ट्या वाटतात.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

वाळूत डोके खुपसणे आणि शीर्षासन

एखादा वाळूत डोके खूपसुन बसला आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ तो काय खरंच वाळूत शिर्षाशन करुन उभा असतो का?

नसतो.

कारण वाळूत डोके खुपसणे म्हणजे शीर्षासनच हा तुम्ही काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे.

संकटकाळी शहामृग वाळूत डोके खुपसतो हा एक गैरसमज आहे. यावरुन तयार झालेल्या इंग्रजी शब्दाचे वाळूत डोके खुपसणे हे मराठीकरण आहे.

शहामृगाची शरीरयष्टी पाहता वाळूत डोके खरेच खुपसल्यानंतर तसेही शीर्षासन करणे त्याला अवघड जाईल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

"अलंकारिक"

एखाद्याच्या दृष्टीने जे "अलंकारिक" असते ते दुसर्‍याच्या दृष्टीने हीन अभिरुचीचे , अपमानव्यंजक असते. हे जर का समजणे फार फार अवघड वाटत असेल तर "डू अन्टू अदर्स ऍज यू वुड् हॅव देम डू अंटू यू" या शालेय वचनाची आठवण करून घ्यावी. एखाद्याच्या अंगभूत सभ्यपणाचा आणि त्याने उपरोक्त मूलभूत तत्वाच्या आधारे अपेक्षिलेल्या सभ्यतेचा उल्लेख "मूर्खपणा" असे करणे म्हणजे कशाचे लक्षण आहे हे सहज सांगता येईल. परंतु मग परत सभ्यता आड येते. सज्जनांनी नोंदवलेला साधा निषेधसुद्धा म्हणूनच गुळमुळीत, नेमस्त आणि पौरुषाचा अभाव असणारा - आणि म्हणून विनोदाचा विषय आहे असे दाखविले जाते.

अर्थात, मी वर उल्लेखल्याप्रमाणे , जिथे मुळी लिहिण्याचा उद्देशच पाणउतारा करणे असा असतो, "सरशी" करून घेणे असा असतो तिकडे असल्या असल्या विधिनिषेधाचा नि कॉमन कर्टसीज चा कसला आलाय पाड :-)

अवांतर : सभ्यतेचे वर्तन म्हणजे शब्दकलेचा अभाव नव्हे. "साहित्यिक रेव्ह पार्ट्या" ही संज्ञा म्हणजे भातुकलीचा खेळ वाटेल अशा प्रकारच्या लैंगिक, मानहानीकरक , आणि घृणास्पद संज्ञा व्यवहारात आणणे सहज शक्य आहे. परंतु असे करणे म्हणजे त्याच पातळीला जाऊन बसण्यासारखे आहे , इतकेच.

पोलिटिकल करेक्टनेस

माझी व्याख्या : प्रचलित असलेल्या शब्दप्रयोगांतून कुठल्याही एका वर्गाचा उपमर्द, अजाणता का होईना, होत असेल तर तो शब्दप्रयोग बदलून नवीन, काहीसा उदासीन शब्दप्रयोग प्रस्थापित करण्याचा प्रयत्न वा विचारसरणी.

या बाबतीत मी काहीसा उदासीन आहे - हेतू उदात्त पण उपयुक्तता कमी. ठरवलं तर हरीजन किंवा नवबौद्ध हे शब्द वापरून तितकंच हिणवता येतं असं वाटतं. मुळात आपल्याला कोणी हिणावतो आहे की नाही हे शब्दांपलिकडे ठरतं. संभाषणात आपण वाक्यांतले शब्द, देहबोली, स्वर या सर्वांवरून हिणावण्याची इच्छा आहे की नाही हे ठरवतो. लिखित वाङमयात हे आणखीनच कठीण होतं. एकच ओळ कोणाला हिणवणारी वाटेल तर कोर्टात ती जशीच्या तशी वाचून ती व्यक्ती निर्दोष ठरेल. याउलट ठरवलंच तर सम्यक अर्थ न लक्षात घेता काही शब्दांवरून मर्ढेकरांना कोर्टात खेचलं तसं खेचता येतं. लेखकाने इतर काय लिहिलं आहे यावरून उद्देश हिणवण्याचा आहे की नाही हे ठरवलं जात असावं.

मूळ लेखात दिलेली उदाहरणं प्रचलित शब्दांची नसून काहीशा अनवट उपमांच्या वापरांची आहेत. ती पोलिटिकल करेक्टनेसच्या अखत्यारीत येत नाहीत असं वाटतं. मात्र वैयक्तिक म्हणजे काय? हा रास्त प्रश्न आहे. हा काहीसा 'देव म्हणजे काय' सारखा प्रश्न वाटतो. सर्वसाधारण प्रतिमा सारखी असली तरी ती व्यक्तिसापेक्ष कल्पना आहे. मात्र इच्छा असेल तर लेखकाला आपलं विधान वैयक्तिक वाटू नये अशी काळजी घेता येते असं वाटतं.

पोलिटिकल करेक्टनेस फाट्यावर मारणे म्हणजे सर्वांनीच आपल्या जाणिवा थोड्या बोथट ठेवणे असं वाटतं. पण किती जाड कातडी ही पुरेशी जाड आहे? केस, काड्या, टाचण्या, सुऱ्या, बंदुकीच्या गोळ्या, बॉंबचे छर्रे... कशापासून जखमा होता कामा नयेत, व कशाने व्हाव्यात? की हे चुकून लागलं वा कोणीतरी मुद्दामून मारण्याचा प्रयत्न केला हे पाहावं?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

पोलिटिकल करेक्टनेस फाट्यावर मारणे म्हणजे सर्वांनीच आपल्या जाणिवा थोड्या बोथट ठेवणे असं वाटतं. पण किती जाड कातडी ही पुरेशी जाड आहे? केस, काड्या, टाचण्या, सुऱ्या, बंदुकीच्या गोळ्या, बॉंबचे छर्रे... कशापासून जखमा होता कामा नयेत, व कशाने व्हाव्यात? की हे चुकून लागलं वा कोणीतरी मुद्दामून मारण्याचा प्रयत्न केला हे पाहावं?

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

जाणिवा प्रगल्भ करणे असे म्हणा

या बाबतीत मी काहीसा उदासीन आहे - हेतू उदात्त पण उपयुक्तता कमी. ठरवलं तर हरीजन किंवा नवबौद्ध हे शब्द वापरून तितकंच हिणवता येतं असं वाटतं. मुळात आपल्याला कोणी हिणावतो आहे की नाही हे शब्दांपलिकडे ठरतं. संभाषणात आपण वाक्यांतले शब्द, देहबोली, स्वर या सर्वांवरून हिणावण्याची इच्छा आहे की नाही हे ठरवतो.

हे तर आहेच. हेतू महत्त्वाचा आहे. म्हणूनच मित्राने रांडेच्या म्हटले किंवा कधी कधी अगदी मात्रागमनी शिवीही दिली तरी आपल्याला काही वाटत नाही. (आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच नाही. काही जण फार सेंटी असतात.)

पोलिटिकल करेक्टनेस फाट्यावर मारणे म्हणजे सर्वांनीच आपल्या जाणिवा थोड्या बोथट ठेवणे असं वाटतं.
असा नकारात्मक विचार का बरे करता. किंबहुना जाणिवा प्रगल्भ करणे असे म्हणा. उदा. कुणी एखाद्याने खरडवहीतून "शब्दांना घाई झाली आहे..." असे काहीसे म्हटले तर त्याने "ह्या माणसाच्या डोक्यात सुलभ शौचालय (खरे तर संडास) भरला आहे" असा कांगावा करू नये.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सापेक्ष प्रगल्भता

हेतू महत्त्वाचा आहे. म्हणूनच मित्राने रांडेच्या म्हटले किंवा कधी कधी अगदी मात्रागमनी शिवीही दिली तरी आपल्याला काही वाटत नाही.

हे तुमचं १००% पटलं. मनुष्यस्वभाव असा आहे की प्रगल्भता मित्रांना वेगळी व अमित्रांना वेगळी होते. मित्र की अमित्र हे इतिहासातून व वर्तनातून ठरतं. दुर्दैवाने लिखित वाङमयात हा इतिहास व वर्तन हे संभाषणातून निश्चित होतं. हे संभाषण देहबोली वा स्वरविरहित येत असल्यामुळे त्यातून गैर अर्थ काढले जाणं सहज शक्य असतं. त्यामुळे एखादं लेखन वैयक्तिक वाटू नये यासाठी सुरूवातीपासून काळजी घेतली तर बरं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फाट्यावर मारणे

'दहा हजार वर्षे' या शब्दप्रयोगावर आचार्य अत्र्यांचा जसा प्रताधिकार होता त्याचप्रमाणे 'फाट्यावर मारणे' यावरही कुणाचातरी अधिकार आहे, असे ऐकून आहे. तसे असल्यास या चर्चेचा प्रस्ताव मांडणे हे पोलिटिकली करेक्ट् आहे का?
आपल्या प्रश्नांची धुणी दुसर्‍या कट्ट्यांवर जाऊन धुणे पोलिटिकली करेक्ट् आहे का?
माझा एक मित्र सारखी अमेरिकेची कौतुकं सांगणार्‍यांना 'तुम्ही भारतात राहून सारखं 'अमेरिका, अमेरिका' असं हस्तमैथुन करत असता' असं म्हणतो. आता हा शब्दप्रयोग बर्‍याच जणांना बोचणारा वाटेल. पण या शब्दाला इथे लैंगिक संदर्भातून बाहेर काढून बघता येईल का? 'कल्पनेवर आधारित पण तरीही करायची म्हणून केलेली एक स्वप्नाळू यांत्रिक निरर्थक क्रिया' असा या शब्दप्रयोगाचा या संदर्भात कुणी अर्थ काढला तर या शब्दप्रयोगाचा असा वापर पोलिटिकली करेक्ट् नाही का?
सन्जोप राव
मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया
हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

धुणी

उपक्रमावरील लेखांचे दुवे देणे मला वाटते उपक्रमपंतांनी कधी चालणार नाही असे म्हटलेले नाही. :)
त्या "धुण्या"पुढे काढलेली स्मायली पाहिली तर त्या दुव्यात धुणी न दिसता स्वतःवर केलेली लाईट-हार्टॅड टिपणी दिसली असती. पण ज्याअर्थी
माझ्या प्रश्नांची धुणी तुम्हाला दिसली, त्याअर्थी ती स्मायली तुम्ही पाहिली नसावी. शिवाय मी मिसळपावावर दिलेला संपूर्ण प्रतिसाद हा माझ्या वैयक्तिक आनंदाच्या गोष्टीवरून आहे, ते आपल्या लक्षात आले असावे आणि तरीही, मी तिथे धुणी धुवायला गेले असा अर्थ आपण काढलात.
तेव्हा इथे अजून काही लिहीणे नक्की अवांतर होईल, म्हणून गप्प बसते. प्रश्न असल्यास खरडीतून किंवा व्यक्तिगत निरोपातून विचारू शकता.

धन्यवाद.

संदर्भ बाहेर काढून बघणे

माझा एक मित्र सारखी अमेरिकेची कौतुकं सांगणार्‍यांना 'तुम्ही भारतात राहून सारखं 'अमेरिका, अमेरिका' असं हस्तमैथुन करत असता' असं म्हणतो. आता हा शब्दप्रयोग बर्‍याच जणांना बोचणारा वाटेल. पण या शब्दाला इथे लैंगिक संदर्भातून बाहेर काढून बघता येईल का? 'कल्पनेवर आधारित पण तरीही करायची म्हणून केलेली एक स्वप्नाळू यांत्रिक निरर्थक क्रिया' असा या शब्दप्रयोगाचा या संदर्भात कुणी अर्थ काढला तर या शब्दप्रयोगाचा असा वापर पोलिटिकली करेक्ट् नाही का?

नक्कीच पोलिटिकली करेक्ट वाटते. आणि चांगला शब्दप्रयोग आहे.

माझ्या एका उपद्व्यापी मित्राला त्याच्या वडलांनी चिडून "तू आजवर रोज हगण्याशिवाय कुठले प्रॉडक्टिव काम केले आहे ते सांग बरे!" असे म्हटले होते. आता हा शब्दप्रयोगही काहींना शिसारी आणणारा वाटू शकतो. पण इथे निव्वळ 'वैष्ठिक' संदर्भच बघायचा का? पण प्रत्येकाकडे संदर्भ बाहेर काढून बघण्याची इच्छा किंवा कुवत असेलच असे नाही.

असो.

अवांतर:

'दहा हजार वर्षे' या शब्दप्रयोगावर आचार्य अत्र्यांचा जसा प्रताधिकार होता त्याचप्रमाणे 'फाट्यावर मारणे' यावरही कुणाचातरी अधिकार आहे, असे ऐकून आहे. तसे असल्यास या चर्चेचा प्रस्ताव मांडणे हे पोलिटिकली करेक्ट् आहे का?

आम्ही कुणाच्या तरी अधिकारांनाही फाट्यावर मारतो आहोत असे समजावे. बाय द वे, चर्चेला फाटे चांगले फोडले आहेत.

धुणीवाली चर्चा वाचली. काय एकापेक्षा एक भयंकर, वरचढ पुस्तक-प्रेमी आहेत. गहिवरलो. आता मराठी साहित्याचा उत्कर्षकाल दूर नाही असेच वाटले. किंबहुना आलाच आहे. फक्त मला आंधळ्याला ती पहाट काही दिसत नाही आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आंधळेपण

फक्त मला आंधळ्याला ती पहाट काही दिसत नाही आहे.
आता इतके फाटे फुटलेच आहेत तर हेही लिहून टाकतो ( फाटे फुटणे म्हणजे एका अर्थाने वाढच. गुलाबाला फाटे फुटले, म्हणजे ती गुलाबाची वाढच नाही का? त्यामुळे फाट्यांचे एवढे काही मनावर घेऊ नये)
आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हे आंधळेपणाच्या उल्लेखवरुन आठवले.

सन्जोप राव
मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया
हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

फाटे

त्यामुळे फाट्यांचे एवढे काही मनावर घेऊ नये.

उलट फाटे फुटले की आम्हाला आनंद होतो. फोडा अजून.

आंधळेपणावरून आम्हाला अडाणीपण आठवले आणि मग हे मुक्तक:

हमको लाखों बुरे भलों में मिले
और हजारों भले बुरों में मिले
जाहिलों में नहीं मिले इतने
जितने जाहिल पढ़े लिखों में मिले

धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मनोगताची धुणी

अहो संजोपकाका, तुम्ही मनोगताची धुणी इथे आणून धुता आणि धुवायला या म्हणून बाकीच्यांना आमंत्रण देता तर चित्राताईंनी काय चुकीचं केलं? तुमच्याकडूनच शिकल्या असाव्यात.

-राजीव.

आनंद आहे

मनोगताची धुणी उपक्रमवर, उपक्रमाची मिसळपावर, मिसळपावची आणखी कुठेतरी असा सतत स्थळसंकर होत राहो. चित्राताईंना आमच्याकडून शिकण्यासारखे हे इतकेच मिळाले हा तर्क रोचक आहे.
सन्जोप राव
मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया
हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया

मीपण धुण्याचा प्रयत्न करून घेतो

माझा मुद्दा पोलिटिकल करेक्टनेसविषयी नसून असभ्य लेखनाच्या सापत्न संपादनाविषयी आहे.
मायला हा शब्द WTF आणि JFGI या शब्दांपेक्षा कमी असभ्य असल्याचे संपादकांचे मत दिसते.

व्वा...!

फाटे फोडणा-या प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो. :)

साकिया आज गुलिस्तां में घटा अच्छी है
जाम दे दे, कि जगह खू़ब , हवा अच्छी है.

नाज़ अच्छा, नज़र अच्छी है, अदा अच्छी है
तुझेमें जो बात है, व नामे- खुदा अच्छी है.

बात जो तुझको लगी मेरी बुरी, क्या बायस
वरना वह जिसने सुनी, उसने कहा अच्छी है. - ज़फर

बाकी, चर्चा प्रतिसाद अतिशय उच्च...!
सामान्य उपक्रमींचे काही खरं नाही. :)

-दिलीप बिरुटे

 
^ वर