लव जिहाद
'लव जिहाद' हा शब्द आपल्याला ठाऊक आहे?
साधारणपणे गेल्या वर्षभरात केव्हातरी, भारतात काही ठिकाणी, विशेषतः केरळ राज्यात 'लव जिहाद'चे प्रकार वाढत आहेत अशा अर्थाच्या बातम्या वाचल्याचं आठवतं. त्यात मुसलमान तरुण उच्चवर्गातील हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नासाठी धर्मांतर करायला भाग पाडतात असं म्हंटलं होतं. त्याबद्दल केरळ सरकारतर्फे चौकशीही चालू होती म्हणे. त्याचं पुढे काय झालं ते कळलं नाही.
आत्ता काही दिवसांपूर्वी माधुरी गुप्ता या पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातल्या अधिकारीपदावर काम करणार्या महिलेला भारत सरकारनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडलं. त्यावरून 'लव जिहाद' प्रकरणाची आठवण झाली. यात माधुरी गुप्ताचे प्रेमसंबंध होते किंवा काय याबाबत अजूनतरी काही कळलं नाही. पण सहा वर्षांपूर्वी तिनी इस्लाम धर्म स्वीकारला होता असं दोन-तीन दिवसापूर्वीच्या लोकसत्ता त छापून आलं होतं.
'लव जिहाद' मधे अडकणार्या हिंदू तरुणींचाही असाच देशविघातक कारवायांसाठी उपयोग करून घेण्याची एखाद्या संघटनेची योजना तर नसावी?
आपल्याला काय वाटतं? आपण काय करू शकतो?
Comments
काळजी करण्यासारखे
हे काळजी करण्यासारखेच आहे.
मालेगाव येथे हिंदु मुलीसोबत नुसते प्रेमप्रकरण केले तरी ५०० रुपये बक्षिस दिले जाते,
असे एका मुस्लीम माणसाकडूनच कळले.
मला वाटते की हिंदु जनजागृती हा एक उपाय आहे. कारण हे एक प्रकारचे कारस्थानच आहे.
आपला
गुंडोपंत
काळजी करण्यासारखेच
>>मालेगाव येथे हिंदु मुलीसोबत नुसते प्रेमप्रकरण केले तरी ५०० रुपये बक्षिस दिले जाते,
औरंगाबादेत हा रेट दोनशे रुपयांचा होता.
>>मला वाटते की हिंदु जनजागृती हा एक उपाय आहे.
हिंदु पोरीबरोबर कोणी मुस्लीम पोरगं दिसलं की हिंदु पोरांनी त्याला धु धु धुवायचं असा त्यावर उपाय शोधला होता. अशा बातम्या पेपरातही [सामना] येत होत्या.
-दिलीप बिरुटे
चेहर्यावरून धर्म ओळखणे?
गोल टोपी आणि लांब, मळकट झब्बा घालून मुलीसोबत फिरायला गेल्यास त्याला मुलगीच धुवून काढेल ना?
की 'इतर' काही खुणा तपासण्याचा मार्गही हिंदू पोरांनी अवलंबिला?
आयड्या नै राव
>>'इतर' काही खुणा तपासण्याचा मार्गही हिंदू पोरांनी अवलंबिला?
मुस्लीम पोरांचा तपास चेहर्यावरुन किंवा अन्य कोणत्या मार्गाने करत होते त्याची काय आयड्या नै राव...! पण, काही कळले तर नक्की कळवीन.
बाकी, गोल टोपी, लांब मळकट झब्बा, वगैरे असे ध्यान असलेल्या पोरावर कोणी हिंदु पोरगी फिदा-बिदा होत असेल असे वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
[अंदाजपंचे]
बिनबुडाचे
हे उपक्रम आहे की हिंदूजागृती?
काही नावे, पत्ते, संदर्भ द्यायची पद्धत नाही का?
मजकूर संपादित.
अपराधी
अपराधी कोणीही असो कसाही असो त्याला कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे.
मुसलमान तरुणांशी लग्न करून कोणी धर्मांतर करत असेल तर भारतीय कायदा त्या गोष्टीला आडकाठी करू शकत नाही. धर्मांतर केले याचा अर्थ देशविघातक कारवाया सुरु असा होत नाही. माधुरी गुप्ताची मानसिक स्थिती बरी नव्हती असेही म्हटले जाते म्हणजे मनाने खचलेले सर्व, देशद्रोही कारवाया करू लागतील असा निष्कर्ष काढणे हास्यास्पद आहे.
वास्तव
"लव जिहाद" हा शब्द मी प्रथमच ऐकला. मला देखील आधी एचजेएस चा प्रकार वाटला. पण थोडे गुगलले तर खालील संदर्भ मिळाले:
Kerala HC wants probe into 'love jihad' (इंडीयन एस्कप्रेस)
India lost in 'love jihad' (एशिया टाईम्स)
आयबीएन लाईव्हच्या बातमीची व्हिडीओ क्लीप
यावरून प्रत्येक धर्मांतर अथवा धर्मांतरीत म्हणजे देशविघातक कारवाई ठरवणे अयोग्य होईल. मात्र हे देखील माझ्या (मुसलमान मित्रांकडूनच मिळालेल्या) मर्यादीत माहीतीवरील वास्तव आहे की आंतरधर्मीय विवाहात मुस्लीम समाजात एकवेळ ख्रिस्ती, ज्यू तसाच राहीला तर चालतो कारण मूळ एकच असे असेल, पण हिंदू मात्र मुसलमान होणे "मस्ट" आहे. हे मुलगी मुसलमान आणि मुलगा हिंदू असला तरी लागू होते.
वरील वाक्रप्रयोग नाही पण प्रकार (हिंदू मुलींची मुसलमान मुलांशी लग्ने), मी अमेरिका-ब्रिटनमधे पण विशेष करून ऐकलेला आहे...मला एक राहून राहून वाटते की हिंदू मुलींना नक्की मुसलमान मुलांमधे काय आवडते? बाकी धर्म-भाषा-प्रांत-राष्ट्र सीमा वगैरे बाजूला ठेवून केवळ सामाजीक म्हणून असा देखील विचार करायला हरकत नाही की हिंदू मुले (मुलगे) मुलींना आकर्षित करायला त्यांच्या वागण्या-बोलण्यामधे, मुसलमान मुलांच्या तुलनेत कमी पडतात का?
या संदर्भात अजून एक १२-१५ वर्षांपूर्वीची स्थानीक व्यक्तींकडून ऐकीव माहीती होती की आसाम आणि जवळपासच्या ट्रायबल भागात आदीवासी/वनवासी यांच्या जमिनी इतर कोणी घेऊ शकत नाही, तो राखीव भाग आहे. तसेच या सर्वच(पूर्वांचल) राखीव भागात धर्मांतरे करता येत नाहीत. त्यावर पळवाटा म्हणजे, तिथल्या मुलींशी लग्न करणे आणि मग धर्मांतरे आणि जागा मिळवणे असे काहीसे... अर्थात तेंव्हा इतके गंभीर वाटले नाही... मात्र बांग्लादेशी मुसलमानांच्या विरुद्ध तेथे आता बरेच काही चालू आहे हे या आणि रॉयटरच्या व्हिडीओ क्लिप्स वरून कळते.
बाळासाहेब ठाकर्यांनी युतीच्या राज्यात बांग्लादेशी बेकायदेशीर जनतेविरुद्ध आवाज केला तेंव्हा तमाम राजकारणी आणि माध्यमांनी गळे काढले. नंतर विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांना देखील त्याच पद्धतीची विधाने करावी लागली. तेंव्हा डाव्या विचारसरणीच्या आऊटलूकला देखील "विलासराव ठाकरे" म्हणत लेख लिहावा लागला पण त्यात देखील हा प्रश्न आहे हे मान्य करावे लागले होते...
थोडक्यात सध्या जगभर आणि भारतात देखील दहशतवादाचे प्रचंड गंभीर प्रकार चालले आहेत (आज देखील दिल्लीसाठी अमेरिकेने गंभिर इशारे दिले आहेत की कॅनॉट प्लेस, कैलाश आणि चांदणी चौक या भागात नजिकच्या काळात दहशतवादी हल्ले होऊ शकतात म्हणून). याचा विचार करताना सुरक्षा म्हणून सर्वच विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यात धर्माचे नाव आले म्हणजे त्या धर्मातील सर्वाच्याच विरुद्ध होणे जसे गैर आहे तसेच असे करू नये म्हणून गळे काढत व्यापक वास्तवाकडे दुर्लक्ष करणे देखिल गैरच आहे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ऐकीव माहीती
मर्यादीत माहितीतून व्यापक वास्तव समजले?
सिलेक्टीव्ह
माझ्या प्रतिसादात पाच परीच्छेद आहेत आणि त्या आधी वर तीन ज्यांना मेनस्ट्रीम म्हणता येतील अशा माध्यमातील संदर्भ दुवे आहेत. अर्थात आधी आपणच आता संपादीत केलेली इंग्रजी अक्षरे वापरत संदर्भ मागितला होता. तरी तो दिल्या नंतर काही टिपण्णी केलेली दिसली नाहीत. आता लव्हजिहाद बद्दल ते संदर्भ पाहील्यावर काय वाटले ते समजून घेयला देखील आवडेल.
आपण मात्र, फक्त सुरवातीच्या परीच्छेदातील, एकच वाक्य सिलेक्टीव्हली काढून त्याचा संदर्भ संपुर्ण प्रतिसादाच्या गोषवार्यात मी वापरलेल्या "व्यापक वास्तवाशी लावलेला दिसतोय", असो.
सर्वप्रथम, मला जे काही लिहायचे असते आणि मी जे काही लिहीतो ते लिहीताना, न कळत देखील दिशाभूल (बाजूने अथवा विरुद्ध) होऊ नये म्हणून काळजी घेतो. सिलेक्टीव्ह लिहीत नाही...केवळ त्याच अर्थाने, आणि त्यावेळेस जे जवळून वास्तव म्हणून पाहीले (कारण त्या त्या वेळच्या वायफळ चर्चा नव्हत्या...) तसेच ज्यां मुसलमान मित्रांकडून हे सांगितले गेले ते काही "रॅडीकल" वगैरे नव्हते... असो. तरी देखील माझ्या मर्यादीत माहीतीस काही अर्थ आहे का हे आत्ता पाहीले तर विकीऍन्सरच्या दुव्यावर खालील माहीती मिळाली:
त्या पुढे असे देखील सांगितले आहे:
याचा अर्थ प्रत्येक मुसलमान व्यक्ती ही इतरांशी लग्न करताना २/२२१ चा संदर्भ वापरत बाटवायला निघते असे मी कुठेच म्हणलेले नाही. अशा विवाहांच्या विरोधात देखील मी नाही (किंबहूना मी मदत देखील केली आहे...). मात्र ज्यांना त्याचा गैरवापर करायचा आहे, ते नक्कीच करू शकतात हे देखील वास्तवच आहे. जसे जिहाद शब्दाबद्दल आहे: जिहादी जगभर काय करत आहेत हे सांगायला नको. तरी देखील बुद्धीवादी आणि जिहादी हिंसेच्या विरोधातील मुस्लीम धर्मीय मात्र जिहाद हा स्वतःतील दुर्गुणांशी असतो वगैरे देखील अर्थ घेत त्याचा व्यक्तिगत उन्नतीसाठी सदुपयोग करण्याचा प्रयत्न करतात.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
गैर?
500 रु बक्षिसाविषयी संदर्भ हवा आहे.
प्रिय व्यक्तीने नरकात जाऊ नये यासाठी विनंती करण्यात गैर काय? जिला धर्मांतर गैर वाटते तिने त्याच्याशी लग्न करू नये.
तुम्ही कुराणातील जो २/२२१ संदर्भ दिला आहे त्यात अल्ला या शब्दाऐवजी येहोवा लिहिले तर तसाच आदेश जुन्या करारातही आहे. पण इस्त्रायल 'तुम्हाला' प्रिय असेल ना?
संदर्भ
५०० रू बक्षिस म्हणजे काय म्हणायचे ते समजले नाही. कृपया स्पष्ट करावे...बाकी सुरवातीस माध्यमातील संदर्भ दिले आहेत त्याबद्दल काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायला देखील आवडेल.
कुराणातील संदर्भ दिला कारण सध्या कुराणाचा संदर्भ घेत "लव्ह जिहाद" होत आहे हा ह्या चर्चेचा विषय आहे. जुन्या करारात काय आहे आणि इस्त्रायल काय करते हा नाही. तुम्ही त्यावर वेगळी चर्चा चालू करा आणि मग बोलूयात. प्रतिसादातील मूळ मुद्यावर लिहीता आले नाही म्हणून उगाच विषयांतर नको.
प्रिय व्यक्तीने नरकात जाऊ नये यासाठी विनंती करण्यात गैर काय? जिला धर्मांतर गैर वाटते तिने त्याच्याशी लग्न करू नये.
२/२२१ मधे जे म्हणले आहे ते ती व्यक्ती तुम्हाला (म्हणजे जन्माने मुसलमान असलेल्याला) नरकात घेऊन जाईल मात्र अल्ला तुम्हाला स्वर्गात नेईल असे म्हणले आहे. त्या व्यक्तीला स्वर्गात नेण्यासाठीची विनंती त्यात नाही आहे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
धर्मांतर
५०० रु
तुमचे संदर्भ माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून नव्हते. कोणत्या कायद्याच्या भंगाविषयी कोर्ट चिंतित आहे ते बातमीतून स्पष्ट झाले नाही. राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात येते ते स्पष्ट नाही.
हा हा
हिंदू मुलींना नक्की मुसलमान मुलांमधे काय आवडते?
विनोदी वाक्य. मी हिंदू मुलगी नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. पण प्रेमात पडताना असे काही बघून मग पडत नाहीत असे ऐकून आहे!
हिंदू मुले (मुलगे) मुलींना आकर्षित करायला त्यांच्या वागण्या-बोलण्यामधे, मुसलमान मुलांच्या तुलनेत कमी पडतात का?
या बाबतीत गंभीर विचार होणे आवश्यक आहे. तसे जर असले तर 'मुलींना आकर्षित करणे' हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुलासांठी ताबडातोब खास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे वाटते.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
प्रेम आणि विचारशक्ति
पण प्रेमात पडताना असे काही बघून मग पडत नाहीत असे ऐकून आहे!
तसे असेलही! पण प्रेमात पडताना आणि पडल्यावरही विचारशक्ति शाबूत ठेवता यायला हवी. अगदीच Harmone Driven असू नये.
प्रेमप्रशिक्षण शिबिरे
या बाबतीत गंभीर विचार होणे आवश्यक आहे. तसे जर असले तर 'मुलींना आकर्षित करणे' हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुलासांठी ताबडातोब खास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे आवश्यक आहे असे वाटते.
सहमत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रेमप्रशिक्षण शिबिरे घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून हाफ चड्ड्या सोडून त्यांनी आता जीनप्यांट, टीशर्ट घालायला हवी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दिव्य प्रेमाची प्रचिती
बहुधा, प्रेमाच्या गावा जावे या वसंत कानेटकरांच्या नाटकात "दिव्य प्रेमाची प्रचिती" वगैरे असे भयंकर संवाद आहेत. :-) तसेच काहीसे या मुलींचे होत असावे. विनोद बाजूला ठेवून साधे उत्तर "त्यांना यात थ्रिल वाटत असावे." आपले प्रेम उदात्त आहे, प्रेमासाठी वाट्टेल ते वगैरे वाटणार्या पोरींना असे विवाह करण्यात इंटरेष्ट असावा. हे अनुभवलेले आहे. त्यातून हिंदु धर्म सध्या तेवढासा कर्मठ न राहील्याने जिवाची भीती वगैरे वाटत नाही. सफल प्रेमाची ग्यारंटी वगैरे मिळते. ;-)
सहमत आणि अधिक
विनोद बाजूला ठेवून साधे उत्तर "त्यांना यात थ्रिल वाटत असावे." आपले प्रेम उदात्त आहे, प्रेमासाठी वाट्टेल ते वगैरे वाटणार्या पोरींना असे विवाह करण्यात इंटरेष्ट असावा.
ह्याच्याशी सहमत. अशी उदाहरणे माहीत आहेत - ज्यात आंतर्धर्मीय, आंतर्जातिय, एकाच जातीमधे मात्र वेगळ्या सामाजीक स्तरातील - असे सर्वच येतात. आणि तुम्ही म्हणता तसे यात थ्रिल असते. तुम्ही दिलेल्या दुव्यावरील तुमची अनुभवात्मक कथा वाचली. मात्र खाली काही पटकन आठवणार्या (पाहीलेल्या) घटना लिहीत आहे:
एका "स्टाईलीश" पाकीस्तानी मुलाच्या प्रेमात पडलेली (अमेरिकतीलच) मराठी मुलगी पाहीली आहे. पुढे काय झाले ते झाले...
एका "स्टाईलीश" हिंदू मुलाच्या प्रेमात पडलेली मुसलमान मुलगी पाहीली आहे जी वर्षे उलटली तरी देखील प्रेमभंगातच आहे...
भारतातून उठून एका पॅलेस्टीनी विद्यार्थ्याबरोबर पळून गेलेली मुलगी देखील जवळून पाहीलेली आहे...आता गाझा पट्टीत काय करत असेल कोण जाणे.
आणि हो, नुसतेच वाचलेले अजून एक उदाहरण म्हणजे लालकृष्ण अडवाणींच्या भाचीचे का पुतणीचे त्यांच्या उपस्थितीत आणि आशिर्वादाने झालेले मुसलमान मुलाशी लग्न ;) अर्थात त्याचे अधिक डिटेल्स माहीत नाहीत :(
एका अर्थी एकमेकांना शोभतील असे असलेले दोन खूप शिकलेले प्रोफेशनल्स - मुलगा हिंदू आणि मुलगी भारतीय ख्रिश्चन. मुलीच्या घरातील विरोधामुळे दोघांनी प्रचंड गोंधळ घातला आणि शेवट सगळेच बिघडण्यात झाला.
या सर्वांमधे कोणीही (कदाचीत अमेरिकन मराठी मुलीचे उदाहरण सोडल्यास) थ्रील म्हणून करण्यापेक्षा वयात येत असताना ज्या काही कल्पना असतात त्यातून आकर्षण जास्त वाटले. शेवटच्या उदाहरणात अर्थातच (विशेष करून) मुलीच्या वडलांना कसे समजावायचे या वरून गोंधळ होवून गडबड झाली.
माझा स्वतः शिकत असल्यापासून ते आजतागायत सतत येथील विद्यापिठांतील अनेक मुला-मुलींशी संपर्क झालेला आहे, होतो. सर्वांना पाहीले आहे - हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन्स/ज्यूज् (विशेष करून अभारतीय, अमेरिकन्स) वगैरे..त्यातील भारतीय उपखंडातील मुसलमान मुलांचे (आणि मुलींचे देखील) वागणे हे बर्याचदा (कायम नव्हे) हे जास्त आदबशीर असते, तसेच स्टाईलीश पण असते. जे त्या वयात इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्वाचे वाटते. ;) अशा वागण्यामधे भारतीय आणि त्यात विशेष करून हिंदू (पंजाबी सोडून) कमी पडतात असे निरीक्षणावरून वाटते.
अर्थात हे अमेरिकेपुरते आणि काही अंशी (माहीतीवर आधारीत) ब्रिटनपुरते मर्यादीत आहे असे म्हणावे लागेल... त्या अर्थाने हा अमेरिकेतील थोडाफार सामाजीक प्रश्न आहे. त्यात भारतात काय होते हा प्रश्न नाही. तसे कुणाचे निरीक्षण असल्यास समजून घेयला आवडेल.
मात्र लग्नानंतर मुलीला मिळणारे स्वातंत्र्य ह्यात अर्थातच तफावत येते. कारण तेथे अगदी "सनातनी" भारतीय/हिंदू जितके स्वातंत्र्य देईल तितके देखील मिळायची मारामार होऊ शकते. बर्याचदा, एका जातीतून दुसर्या जातीत लग्न करून आलेल्या मुलीस सासरची मंडळी "बाहेरचीच" समजतात. तर येथे काय धर्मांतर आहे. त्याचे परीणाम झालेले देखील पाहीलेले आहेत.
अर्थात तरी देखील अशी लग्ने, डेटींग, लिव्ह-इन, जे काही असेल ते, इतक्या (अलार्मिंग) प्रमाणात आंतर्धर्मीय होते असे देखील वाटत नाही...पण माझ्याकडे त्याचा विदा नाही ;)
माझ्या मूळ प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे "लव्ह जिहाद" हा शब्दप्रयोग मी प्रथमच ऐकला. बातम्यांमधील दुव्यामुळे त्यात काही अर्थ आहे, प्रकरण गंभीर होऊ शकते, हे देखील समजले. आंतर्धर्मीय लग्ने होणे याला काही माझा विरोध नाही मात्र प्रेम आंधळे होऊन जर त्यातून वैयक्तीक तसेच सामाजीक प्रश्न निर्माण होणार असतील तर त्याचा विचार करणे यात देखील काही गैर वाटत नाही. तो पण एक समाजाशास्त्राच्या दृष्टीने संशोधनाचा विषय होऊ शकतो.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
अरेंज्ड
दरवेळी थ्रील म्हणूनच असेल असे वाटत नाहि. मी तर ऐकून आहे हल्ली काहि जण अरेंज्ड मॅरेजसुद्धा आंतरजातीय करतात :प
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
दरवेळेस नाही
दरवेळी थ्रील म्हणूनच असेल असे वाटत नाहि.
दर वेळेस तसे असते असे कुठल्याच लग्नासंबंधात म्हणायचे नव्हते. (उलट, असेही काही जण लग्नच केवळ थ्रील म्हणून करत असतील.. कोण जाणे! ;) )
मी तर ऐकून आहे हल्ली काहि जण अरेंज्ड मॅरेजसुद्धा आंतरजातीय करतात
अगदी खरे आहे आणि ती नक्कीच चांगली गोष्ट आहे. मात्र तसे होताना सामाजीक स्तरावर मिळतेजुळते स्थळ बघणे हा उद्देश असतो. म्हणजे मुला-मुलीचे शिक्षण, राहणीमान, कुटूंबे वगैरे...
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
छे!
खाप पंचायतींविषयी वाचले आहे का?
हो तर!
खाप पंचायतीच्या शाखा मुंबईतील सर्व उपनगरांत आणि पुण्यातील गल्लोगल्ल्यात, हैद्राबादेच्या प्रत्येक नाक्यावर, कोलकत्याच्या प्रत्येक महामार्गावर आहेतच. महाराष्ट्रात वीज पोहचत नसेल पण खाप पंचायती भरवल्या जातात. इतकेच नव्हे तर न्यूयॉर्क-लंडन-प्यारिसमध्येही भरवल्या जातात असे कळते.
हे काय आहे?
खाप पंचायत हे काय प्रकरण आहे? नव्यानेच ऐकत आहे...
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
खाप पंचायत
खाप पंचायतीचा सर्वात जुना संदर्भ रामायणातील वगैरे दिला जातो पण मला त्यात तथ्य वाटत नाही. अर्थातच, असे सामाजिक प्रशासन त्याकाळी असायला हरकत नाही.
खाप पंचायत म्हणजे गावातील बडी धेंडे आपला स्वार्थ आणि व्यवस्था राखून ठेवण्यासाठी जाती, परंपरा, धर्म, भाषा यांचे बडगे दाखवत सोयरिकी वगैरे विरुद्ध शिक्षा देतात. अजूनही उत्तरेकडील काही राज्यांत (नावे सांगायची गरज नसावी) ही पद्धत आहे.
परंतु, आपण खाप पंचायत म्हणजे काय हा प्रश्न विचारलात त्यातच बरेचसे उत्तर आले.
धन्यवाद...
मला हे माहीत नव्हते...त्यांच्यावर अनेक प्रसार माध्यमातील बातम्या आहेत हे गुगलून कळले...
तसेच हिंदी विकीमधील संदर्भपण (आता काय प्रकार आहे, हे समजल्यावर) मनोरंजनात्मक वाटला...
वगैरे वगैरे... :-)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
संदर्भ
१
२
दाद
वरील प्रतिसादातील "दुवा" "संदर्भ" या गोष्टींबद्दलच्या विनोदबुद्धीस दाद देतो. ओनियन डॉट् कॉम च्या जातीचे संकेतस्थळ दिसते.
+१
वरील प्रतिसादातील "दुवा" "संदर्भ" या गोष्टींबद्दलच्या विनोदबुद्धीस दाद देतो. ओनियन डॉट् कॉम च्या जातीचे संकेतस्थळ दिसते.
या असल्या स्थळाच्या बातम्या म्हणजे संदर्भ देणे जर अशांच्या वैचारीक विरोधातील लोकांनी केले तर थयथयाट होईल...
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
प्रश्न
ह्यातून तुम्हाला काय सुचवायचे आहे? हिंदू मुली कशाला ह्या फंदात पडतात असेच का? अन्यथा हा प्रश्न भंपक आहे.
(कुठल्याही) मुलींना नक्की मुलांमधे काय आवडते, हे कुणाला जर समजले असते तर तर आज हजारो सिनेमे/पुस्तके इ.इ. मोडित निघाले असते.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मुसलमान हा धर्मच अतिरेक्यांचा वाटतो
प्रत्येक दहशतवादात मुसलमानच का असतात ? माझ्या मते त्यांची विचारसरणीच तशी आहे...मग ते कुठल्याही देशात असोत...मुसलमानाबरोबर संबंध ठेवायची गरजच काय? आणि तो धर्म हा खुनाखुनितूनच जन्माला आला...असे म्हणतात कि पैगंबराने जू लोकांची गावेच्या गावे कापून काढली...त्यांनी धर्मांतर केले नाही म्हणून..तेंव्हापासूनच ज्यू विरुद्ध मुसलमान हा संघर्ष चालू झाला..आपल्या लोकांना खासकरून तरुण मुला मुलीना याबद्दल सांगणे आवश्यक आहे...हे मुसलमान त्यांच्या पोरांना जर आपल्याविरुद्ध शिकवत असतील तर आपण नको का जागरूक राहायला?आपण सारखे सर्व धर्म सारखे म्हणायचे आणि त्यांनी मात्र वेगवेगळ्या जिहादच्या पद्धती चालू करायच्या?
ता. क. आपल्या मुसाल्मान्धार्जीन्या मताची पिंक येथे तेथे टाकू नये..त्यांना जर वरील विषयाचे महत्व कळत नसेल तर एखाद्या जागरूक व्यक्तीकडून समजून घ्यावे आणि हिंदुजागृती करण्यात काय वाईट आहे हो? इतकेच जर वाटत असेल तर करा धर्मांतर... :-(
काही अनावश्यक मजकूर संपादित.
ब्राह्मण नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा
संपादनापूर्वी वरील प्रतिसाद मला उद्देशून होता. त्याचे संपादन करून माझे नाव वगळण्याची गरज नव्हती.
एवढी तोंडची वाफ दवडण्यापेक्षा संख्याशास्त्रीय अभ्यास प्रसिद्ध करा. सांगोवांगीची गरळ ओकण्याऐवजी तुम्हीच जागरूक व्यक्तीकडून समजून घ्या.
मी मुळात हिंदू असेन असे गृहीत धरू नका.
सहमत आहे
प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. मुसलमान हा धर्मच अतिरेक्यांचा आहे. मी तर हल्ली दाढी दिसली की त्याच्या हातातली एके ४७ शोधायला लागतो. पैगंबराने गावेच्या गावे कापून काढली असे म्हणतात. हे म्हणणारे कोण आहेत अणि या म्हणण्याला काय आधार आहे हे शोधण्याची मला तरी सध्या गरज वाटत नाही. म्हणतात तर म्हणतात. मुसलमान पोरांपासून खरेच जपून राहिले पाहिजे. सानिया मिर्झाने पाकिस्तानी नवरा शोधला तेंव्हा मनोहर जोशी म्हणाले की भारतात तिला चांगला मुलगा सापडला नसता का? वाटल्यास मी शोधून देतो. जोशीसर आता कोहिनूर वधू वर सूचक मंडळ काढणार का ठाऊक नाही, पण सनातन प्रभात, रास्वसं, बद, विहिंप यांनी हिंदू मुली मुसलमानांनी पळवू नयेत यासाठी अशी सोय करावी.
हा विषय गंभीरपणे घ्यावा. वर उल्लेख केलेल्या प्रतिसादातील जागरुक व्यक्ती म्हणजे स्वतः प्रतिसाददाता हीच आहे या गर्भितार्थाकडे दुर्लक्ष करु नये.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
फाटे
सानिया मिर्झा मुळातच मुस्लिम होती. राष्ट्रीयत्व बदलणे हा चर्चेचा विषय नाही.
"असे म्हणतात..." वाक्य जागरूकतेचे द्योतक नाही.
पॉइंट
यू आर मिसिंग दी पॉइंट ऍन्ड हेन्स यू आर मिसिंग दी फन....
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का
माय बॅड
औपरोधिक असल्याचे समजले नव्हते :P
लिन्क
हा विषय गंभीरपणे घ्यावा. वर उल्लेख केलेल्या प्रतिसादातील जागरुक व्यक्ती म्हणजे स्वतः प्रतिसाददाता हीच आहे या गर्भितार्थाकडे दुर्लक्ष करु नये.
पहिल्या वाक्यशि सहमत पण आम्ही गर्भित वगैरे अर्थ असलेले नाही तर सपष्ट बोलतो...म्हणणे फक्त एवढे कि (वाटले तर ) इतरत्र वाचून, बोलून विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. जर मुसलमान परत हिंदुना बटावायला लागले तर आपण संख्यात्मक दृष्ट्या कमी होऊन आपल्याच देशात परके होऊ कारण राजकारणी मतांसाठी मुसलमानाचे पाय चाटत आपल्याला चाट देणार. दुसरा प्रश्न आपल्या हिंदू संस्कृतीचा...जर हिंदूच नाही राहिले तर हिंदू संस्कृती कुठून टिकणार?
राहिला प्रश्न " असे म्हणतात " चा तर http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/anti-semitism/Jews_in_Arab_l... वाचा..इतरही लिंक वेळ मिळाला कि टाकू..तूर्तास इतकेच.
फुस्स
'गावेच्या गावे कापून काढली' वगैरे तेथे काही नाही. ६०० ते ९०० पुरुष युद्धबंद्यांचे शिरकाण केले.
या वरून आठवले...
'गावेच्या गावे कापून काढली' वगैरे तेथे काही नाही. ६०० ते ९०० पुरुष युद्धबंद्यांचे शिरकाण केले.
केवळ वरील वाक्याशी मर्यादीत हा प्रतिसाद आहे. कारण ६०० ते ९०० म्हणजे काहीच नाही असा यात समज करून दिला आहे. त्याच न्यायाने गोध्रामधे (विकी संदर्भ) केवळ ७९० च मुसलमान गेलेत आणि २५४च हिंदू गेलेत असे म्हणायचे का? (दोन्ही आकडे ९०० पेक्षा कमीच आहेत) हिंसा ही हिंसा आहे आणि केवळ स्वतःचे मत खरे ठरवण्यासाठी एका हिंसेचे समर्थन करणे हे चुकीचे आहे. मग ती कोणीही केलेली असोत. जर कुठलाच धर्म हिंसा सांगत नसेल तर हिंसाखोरांकडे बघताना त्यांच्या धर्माच्या नजरेतून पाहू नये. आणि तसेही लोकशाही राष्ट्रात केवळ कायद्यानेच पहायला हवे. मात्र माध्यमातील आणि राजकीय विचारवंतांनी समाजात केवळ निवडक गोष्टींवर टिका आणि इतरत्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करत बुद्धीभेद करायचे धोरण आखल्याने आजचे प्रश्न तयार झालेत...
शिवाय खाली शिल्पांनी म्हणल्या प्रमाणे युद्ध आणि दंगल ह्यातील फरक आहे तो वेगळाच.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
गाव?
विकीपेडिआ दुवा पहा. त्याने गावेच्या गावे कापली नाहीत. युद्धबंद्यांपैकी पुरुषांना मारले. ६०० ते ९०० युद्धकैदी मारणे क्षुल्लक आहे.
आणि ते लोकशाही राष्ट्र नव्हतेच मुळी.
मी कोणत्या हिंसेचे समर्थन केले?
नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असताना हिंसाचाराला प्रोत्साहन दिले असल्याचा मोदीवर आरोप आहे.
हिंदूच जर नष्ट झाले तर संस्कृतीचं काय होणार?
हा प्रश्न फारच गंभीर आहे. तीस वर्षांपूर्वी 'हे मुस्लीम लोकं खूप लग्न करतात, त्यामुळे खूप पोरं काढतात - एक दिवस हिंदूच मायनॉरिटी होणार या देशात' असलं काहीसं ऐकलं होतं. तो प्लान हिंदूंनीदेखील खूप लग्न न करता तितकीच पोरं काढून मोडून काढल्यावर यांची नवी थेरं सुरू झालेली दिसतात....सगळेच्या सगळे ८५,००,००,००० हिंदू मरेपर्यंत वाट बघायची? पन्नासेक हिंदू तरुणींनी मुसलमानांशी लग्न केल्याबरोबर ताबडतोब कृती केली पाहिजे. सन्जोप राव, कुठे मिळतात हो त्या एके४७? आपणही ताबडतोब हेट जिहाद सुरू केला पैजे नै?
हिंदू संस्कृती, जी थोरच आहे, ती टिकून राहावी, याविषयी वाद नसावाच!
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हिंदू संस्कृती
हिंदू संस्कृती, जी थोरच आहे, ती टिकून राहावी, याविषयी वाद नसावाच!
सहमत. एके ४७ मिळाल्या की कळवतो.
सन्जोप राव
मालिक ने हर इन्सान को इन्सान बनाया
हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया
कुदरत ने तो बक्षी थी हमें एक ही धरती
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया
वा वा
सहमत. एके ४७ मिळाल्या की कळवतो.
केशवसुत म्हणूनच गेलेत :
"द्या एक एके ४७ मज आणुनि
फुंकिन जी मी स्वप्राणाने "
कोलटकरसुद्धा म्हणूनच गेलेत :
"चलाव गोली **"
:)
युद्धाबंदी?
इथेच काय कुठेही यांचा युद्धबंदी म्हणून उल्लेख नाही...युद्धबंदी होण्यासाठी युद्ध व्हावे लागते. युद्ध झाल्याचा उल्लेख नाही...आणि एक मात्र बरोबर आहे फक्त ६०० ते ९०० लोकांना मारून टाकले...काही विशेष नाही हि संख्या...खासकरून त्या काळात...एखाद्या समूहाने दुसरा समूह बेसावध असताना त्यांचे खून पडणे म्हणजे युद्ध नाही...युद्ध दोन देशात असते दोन समूहात होते ती दंगल.
उल्लेख
विकीपेडिआ दुवा पहा. त्याने गावेच्या गावे कापली नाहीत. युद्धबंद्यांपैकी पुरुषांना मारले.
केवळ् हिंदु नाही
लव जिहाद ही आता एक सिद्ध झालेली बाब आहे. तिच्या विरोधात केवळ हिंदु संघटना नाहीत. हे पहा. युरोप-अमेरिकेत यादृष्टीने विचार सुरू झाला आहे. त्याला तिथे संरक्षणात्मक विचाराची बाजू आहे. आपल्याकडे हा प्रकार पूर्णतः धार्मिक आहे.
यासंदर्भात उजव्या विचाराच्या एका संकेतस्थळावरील लेख चांगला आहे.
यासंदर्भात संसदेवरील हल्याच्या खटल्यात, शौकत गुरुच्या शीख बायकोने, अफसाना गुरू (नवज्योत संधू) त्याने आपल्याला फसविल्याचा व विनाकारण खटल्यात गोवल्या गेल्याचा भर कोर्टात केलेला आरोप आठवला.
ह्म्म्म् आता पटेल सगळ्यांना
अरे वा डीडी मस्त दुवा!
आता युरोप अमेरिकेत विचार सुरू झाला आहे म्हटल्यावर (की त्यामुळे?) भारतातील विचारवंतांना ह्या प्रश्नावर विचार करण्यास हरकत नसावी :)
अवांतरः डीडी, बरेच दिवसांनी उपक्रमावर दिसलात
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
मी असतोच
मी नेहमीच उपक्रम वाचत असतो. काहीसं निष्क्रिय वाचन. फक्त उपस्थिती दिसत नाही.
अजुन लिन्क्स
http://www.islam-watch.org/articles.html
यातिल ज्यू लोकांना मारण्याचा आदेश देण्याविषयीचा लेख वाचवा. १० % अधिक इंग्रजी असलेली लिंक टाकता येत नाही.
अजून एक म्हणजे...जर कोठे हिंदुविरोधी कारवाया होत असतील तर त्या इथे मांडायला आणि "हिंदुजागृती" करायला काय हरकत आहे...जर आपल्याला कळलेच नाही तर आपल्याविरोधी असणार्यांना विरोध कसा करणार?
आदेश
'परधर्मियांना मारा पण कुमारिका आणि अनाघ्रात मुलगे उपभोगासाठी ठेवा' हा आदेश जुन्या करारात आहे.
कुराण मुळात जुन्या आणि नव्या करारावर आधारित असल्यामुळे तो ज्यू आदेशही उचलला गेला.
आदेश
अतिशय सुंदर आदेश आहे...मी पण convert व्ह्याचा विचार करते..
हिंदू लवकरच अल्पसंख्य....
जननदरातल्या फरकाने हिंदू अल्पसंख्य होऊ शकत नाहीत हे साध्या गणितातून लोकांच्या लक्षात आल्यावर आता नवा मुद्दा म्हणून हे पिलू सोडलेले दिसते.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)