लव जिहाद
'लव जिहाद' हा शब्द आपल्याला ठाऊक आहे?
साधारणपणे गेल्या वर्षभरात केव्हातरी, भारतात काही ठिकाणी, विशेषतः केरळ राज्यात 'लव जिहाद'चे प्रकार वाढत आहेत अशा अर्थाच्या बातम्या वाचल्याचं आठवतं. त्यात मुसलमान तरुण उच्चवर्गातील हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नासाठी धर्मांतर करायला भाग पाडतात असं म्हंटलं होतं. त्याबद्दल केरळ सरकारतर्फे चौकशीही चालू होती म्हणे. त्याचं पुढे काय झालं ते कळलं नाही.
आत्ता काही दिवसांपूर्वी माधुरी गुप्ता या पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातल्या अधिकारीपदावर काम करणार्या महिलेला भारत सरकारनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडलं. त्यावरून 'लव जिहाद' प्रकरणाची आठवण झाली. यात माधुरी गुप्ताचे प्रेमसंबंध होते किंवा काय याबाबत अजूनतरी काही कळलं नाही. पण सहा वर्षांपूर्वी तिनी इस्लाम धर्म स्वीकारला होता असं दोन-तीन दिवसापूर्वीच्या लोकसत्ता त छापून आलं होतं.
'लव जिहाद' मधे अडकणार्या हिंदू तरुणींचाही असाच देशविघातक कारवायांसाठी उपयोग करून घेण्याची एखाद्या संघटनेची योजना तर नसावी?
आपल्याला काय वाटतं? आपण काय करू शकतो?
Comments
कोणते साधे गणित ?
जननदरातल्या फरकाने हिंदू अल्पसंख्य होऊ शकत नाहीत हे साध्या गणितातून लोकांच्या लक्षात आल्यावर आता नवा मुद्दा म्हणून हे पिलू सोडलेले दिसते.
ज्या साध्या गणिताचा आपण उल्लेख केला आहे ते माझ्या लक्षात येत नाही व माझ्या कधी वाचनातही आलं नाही. पण आपल्याला ठाऊक असेलच. ते गणित त्याच्या गृहीतकांसह मांडून दाखवलंत तर बरं होईल. उपक्रमींपैकी आणखी कोणास ठाऊक असेल त्यांनीही ते सांगावं.
गणित
हे गणित ८० च्या दशकात पॉप्युलर होते. म्हणजे गणित काही नव्हते. तर मुस्लिमांचा ग्रोथ रेट हिंदूंच्या ग्रोथ रेट पेक्षा काहीसा जास्त आहे. त्यामुळे 'लवकरच' हिंदू अल्पसंख्य होणार असे सांगितले जात होते. पण तेवढाच ग्रोथ रेट डिफरंस राहिला तरी मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त व्हायला तीनशे वर्षे तरी लागतील असे साधे चक्रवाढीचे गणित कोणीतरी करून दाखवले. (मी स्वतः ही ते करून पाहिले होते). पन आता मला त्या गणितातले आकडे आठवत नाहीत.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
कदाचीत
या संदर्भात हा (तिसरा परीच्छेद) लेख आणि ही बातमी वाचनीय आहे.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
परत तीच दिशाभूल
कॉनराड एल्स्ट् चा दुवा १९८१च्या सेन्सस वर आधारलेला आहे.
टाईम्स ची बातमी सप्टेंबर ७, २००४ ची आहे त्यावेळी मीडियात आलेल्या बातम्या जनगणाना आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या माहितीवर आधारल्या होत्या. आयुक्तांनी पूर्ण चित्र स्पष्ट केले नाही म्हणून नंतर चर्चा झाली होती. आणि हा अचानक वाढलेला आकडा काश्मीरची लोकसंख्या ऍड झाल्यामुळे दिसत असल्याचे स्पष्ट झाले होते. (१९९१ च्या जनगणनेत काश्मीर सहभागी नव्हता, २००१ च्या गणनेत काश्मीरची लोकसंख्या धरलेली आहे).
संबंधित दुवा ऑक्टोबर २००४ चा.
(ही गोष्ट विकास यांना माहिती नव्हती याचे आश्चर्य वाटले).
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
एक शंका
लोकांनी सरळ सरळ दिसणारे राज्यकर्त्यांना गैरसोयीचे ठरणारे निष्कर्ष काढू नयेत म्हणून शासनातर्फे दरवेळी नवीन साच्यात माहिती देऊन काही गोंधळ मुद्दाम निर्माण करण्यात येत असावेत अशी शंका येते.
आधी चर्चा झाली आहे.
या विषयावर ही चर्चा झाल्याचे धुंडाळल्यावर लक्षात आले.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)