दोन बातम्या
३ जुलैच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या पहिल्याच पानावर शेजारीशेजारी दोन बातम्या आल्या आहेत. त्या अशा :
१) महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नितिन राऊत यांनी सी.आय्.डी.ला हिंदू मुली व मुस्लिम मुलगे यांतील ज्या प्रेमप्रकरणांची विवाहांत परिणती झाली आहे त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला कारण म्हणजे भाजप आमदार एकनाथ खडसे व देवेंद्र फडणीस यांनी, ग्रामीण भागांतील मुस्लिम तरुण हिंदू तरुणींना जाळ्यांत ओढून लग्न करायला लावतात आणि हा एक मुस्लिमांची संख्या वाढवण्याच्या कटाचा भाग आहे असा आरोप केला आहे. त्यांतील काही मुलींना आखाती देशांत पाठवले गेले आहे असेही त्यांत पुढे म्हंटले आहे.
२) लोणावळ्यांत पोलीसांनी २९ तरुणतरुणींना मद्य पिऊन धिंगाणा घातल्याबद्दल अटक केली. त्या २९ जणांत १९ तरुण व १० तरुणी आहेत. ३ जुलैच्या मराठी वृत्तपत्रांतही ही बातमी आली आहे. त्यांपैकी "सकाळ" ने छापलेल्या बातमीत अटक केलेल्या सर्वांची नावे दिली आहेत. नावांवरून १९ तरुणांत ५ मुस्लिम आहेत पण १० तरूणींमध्ये एकही मुस्लिम तरुणी नाही असे दिसते.
वरील दोन्ही बातम्यांबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत?
Comments
प्रतिक्रिया
यातला पहिला मुद्दा न पटण्यासारखा आहे. अशी आंतरधर्मीय लग्ने होण्याचे प्रमाण फार कमी आहे. (मी आतापर्यंत ओळखीच्या माणसांमध्ये प्रत्यक्षात अशी फक्त दोन आंतरधर्मीय लग्ने पाहिली आहेत. बाकीची फक्त सिनेमात किंवा नटनट्यांमध्येच ऐकली आहेत.) मात्र आखाती देशांमध्ये मुलींना फसवणूक करुन पाठवले जात असेल तर त्याची चौकशी होणे योग्य आहे.
मुस्लिम तरुणींवर हिंदू तरुणींपेक्षा चांगले संस्कार असतात असे यातून सूचित होते का?
तुमचे स्वतःचे मत काय आहे हे सांगितले तर चर्चा करणे थोडे सुकर होईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मला वाटतं ......
मुस्लिम तरुणींवर हिंदू तरुणींपेक्षा चांगले संस्कार असतात असे यातून सूचित होते का?
तुमचे स्वतःचे मत काय आहे हे सांगितले तर चर्चा करणे थोडे सुकर होईल.
मला वाटतं, मुस्लिम तरुणी अधिक सावधानतेनी वागतात ते संस्कारांपेक्षाही मुस्लिमांतील कट्टरांच्या दडपणामुळे. त्यांच्या मानानी हिंदू तरुणींना अधिक मोकळीक आहे. पण स्वातंत्र्याची नशा चढली की वास्तवाचं/मर्यादांचं भान राहात नाही तसं काहीसं मोहाला व प्रेमाच्या नाटकाला बळी पडणार्या तरुणींचं होत असावं. हिंदू तरुणींनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग अधिक जागरुकपणे करावा. त्याचबरोबर हिंदू तरुणांनीही - खरं तर सर्व हिंदू समाजानी - आपण कुठे कमी पडतो, आपलं काय चुकतंय, (ज्यामुळे बातमी क्र. १ सारख्या घटना घडताहेत) याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.
दडपणाबाबत
सहमत
बातमी १
जुनाच प्रकार.
मी मुस्लिम बहुल स्थानी अनेक वर्षे वास्तव्य केले आहे.
क्र१ सारखे प्रकार सर्रास चालतात (विक्री सोडून)
त्या मुलांना त्यांच्यात मान अन् पैसे (बक्षिस म्हणुन) ही मिळतात. याबद्दल कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी पोलिस तक्रार ही केलेल्या आहेत (पुढच्या निवडनुका कधी आहेत?)
सहसा मुलींचे पालक पोलिसात जात नाहीत. (लज्जेस्तव)
आपल्यापैकी कुणास अश्या फसवणुकीच्या घटनांबद्दल शंका असल्यास व्य नि ने मुलींचे
माहेर चे नाव पत्ते मागवावेत. मी माझ्याच बाजुच्या बिल्डिंग मधल्या दोन केसेस
सांगतो. मी जातियवादी नाही. पन दुसर्या जातीने योजनाबद्ध रितीने असे काही केले तर
मी आवाज उठवू नये असे नाही. (उपरोल्लेखित दोन केसेस् मधल्या पहिल्या मुलीच्या पालकांनी अळी मिळी गुप चिळी चे धोरण स्वीकारले नसते तर निदान इतर मुली / पालक सावध झाले असते. )
"सेक्युलर" वृत्तपत्रांनी
जातिय तणाव वाढू नये म्हणुन नेहेमी सारखीच मिळमिळीत, अर्धवट बातमी छापली. notice: आखाती देशांत पाठवले गेले आहे असेही त्यांत पुढे म्हंटले आहे. काय सहलीला पाठवले की काय? विकले लिहायला लाज वाटते का?
"सेक्युलर" वृत्तपत्रांनी बातमी छापावी असे मी म्हणत नाहीये, पण ही 'बातमी' तयार करणार्या घटना
मुद्दामुन घडवुन आणणार्यांना कायद्याचे संरक्षण देणे चुक. (आनि हे नेहमीच सगळीकडेच
घडते. कुठे कुठे अपवाद म्हणुन घडले नसेल)
तथाकथित सेक्युलर पक्ष वोटस् साठी .....
सदरहू प्रकार जळगांव, धुळे, नंदुरबार, बीड, नांदेड, औरंगाबाद वगेरे ठिकाणी योजना बद्ध रितीने घडला.
मोडस ओपरेंडी:
हिंदु युवतींना टारगेट करणे. (अर्थात मुस्लिमांनी)
जाळ्यात अडकवणे
शक्य तर शारिरीक संबंधांचे चित्रण करुन त्या आधारे ब्लैक मेल करणे
तिच्या मैत्रिणींचे आपल्या मित्राशी सूत जुळवुन देण्यास भाग पाडणे
या मुलींना कधी घरच्या पैश्यांसकट कधी पैश्यांविना पळवुन नेणे
त्यांना मुसलिम बनविणे.
परत नवीन 'प्रकारास' सुरवात करणे
आता आता विकन्याचा ट्रेंड चालु झाला आहे.
यात पुष्कळ पैसा व प्रोत्साहन असल्याने आता प्रमाण वाढू लागले आहे.
'शिवाय राजी-खुशीचा मामला' आहे असे दाखवणे शक्य आहे.
सदर 'योजना' व 'बक्षीस' हा प्रकार उघडकीस आला असुन,
ही 'अफवा आहे' असे भासवण्यात कुणाचा काय फायदा आहे हे कळणे अवघड नाही.
'सेक्युलर' सरकारनेही चौकशीचा आदेश दिला आहे. ते मायनॉरिटी कम्युनिटीवर सहसा
असा अत्याचार होवु देत नाहीत.
--------------------------------------------
जातीय तणाव वाढू नये अशी माझी ही इच्छा आहे. सदर प्रकार हा कुणीही (म्हणजे
हिंदु, माझे सगे, मी स्वत: वगेरे) केला तरीही तो इतकाच निंदनीय असेल. या केस मधे
मुस्लिमांनी असे केले म्हणुन 'त्यांनी केले' असे म्हणतोय. त्यांनी काही केलेच नाही तर
मी काही म्हणायचा प्रसंग येणार नाही. अन माझ्या लिखाणामुळे जातीय तणाव
पसरण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
पन त्यांनी तसे करणे चालुच ठेवावे अन मी ही काही बोलुच नये असा पवित्रा असेल तर
आपणास नमस्कार. ----
साष्टांग.
----------
"केवळ गुन्हा दाखल झाला आहे, सिद्ध नाही" असा पोकळ पण कायदेशीर प्रतिवाद
करणार्यास १०० उदाहरणे दाखवु शकतो जिथे गुन्हेगार (आरोपी नव्हे) मुक्त झाला आहे.
शिवाय संविधान ही १०० दोषी सुटले तरी चालेल पण १ निर्दोषाला सजा झाली नाही
पाहिजे असे म्हणते असे वाटते. कुणी वकिलाने स्पष्ट केल्यास उपकार होतील.
---------------
awantar:
democracy in a country of fool's majority
is not good.
चाणक्य विद्रोह वेळीच चेचुन काढला नाही तर घातक ठरतो असे म्हणतो.
दुवा द्या
दुवे देवुत
चर्चेच्या प्रस्तावाचा उद्देश स्पष्ट करावा.
पहिल्या बातमीची चौकशी व्हायला काहीच हरकत नाही. त्याने जर काही फ्लेश ट्रॅड चालला असेल तर तो उघडकीस येईल.
परंतु ही आंतरधर्मीय लग्ने मुसलमानांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने केली जातात हा आरोप बालिश आहे. म्हणजे त्या उद्देशाने जर लग्ने केली असतील तर तसे 'कारस्थान' रचणार्याला गणित विषयाचे प्राथमिक ज्ञान नाही असे म्हणावे लागेल. एक तर अशी लग्ने फारच फुटकळ प्रमाणात घडत असतात. तशी जरी बरीच घडू लागली तरी त्याने संख्येत काही बदल होत नाही. आंतरधर्मीय लग्ने सोडली तरी आंतरजातीय लग्ने हिंदू समाजात आंतरधर्मीय लग्नांपेक्षा जास्त प्रमाणात आणि अधिक काळापासून चालू आहेत. अशा लग्नांनी आपल्या समाजात जातीजातींचे प्रमाण बदलले गेल्याचे दिसत नाही.
बाहेरदेशातही अनेक ट्रान्सकल्चरल लग्ने होत असतात. त्यांनीही डेमोग्राफी बदलली गेल्याचे ऐकलेले नाही.
आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे माझ्याही ओळखीत अशी लग्ने नाहीत.
दुसर्या बातमीच्या अनुषंगाने बहुधा हे सुचवायचे असावे की हिंदू तरुणी कशा सापळ्यात सापडत आहेत ते पहा. (किंवा पहा, मुस्लीम लोक आपल्या मुली अशा गोष्टीकडे वळणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत आहेत. हिंदूंना मात्र काहीच पडलेली नाही).
गेली ५०-६० वर्षे आपल्या देशातील राष्ट्रवाद्यांना मुसलमान बहुसंख्य होणे हा आवडीचा विषय राहिला आहे. त्यामुळे ते असा प्रचार एकसारखा करीत असतात. नुकताच जनगणनेच्या आकड्यांचा विपर्यास करून 'पहा, मुसलमानांची संख्या केवढ्या गतीने वाढत आहे' असा कांगावा केला गेला होता. नंतर तो कांगावा फोल आहे असे आढळून आले होते.
अर्थातच!
फ्लेश ट्रेड (कुणाचाही का असेना) वाइटच
उदा. बांग्लादेशी मुस्लिम युवतींना इथे आणुन विकणे. या प्रकाराला वाइट नाहीतर काय म्हणनार? मग तो हिंदुने केला असो किंवा मुस्लिमाने. जातीचा प्रश्न नाही.
परंतु ही आंतरधर्मीय लग्ने मुसलमानांची संख्या वाढवण्याचा उद्देशाने केली जातात हा आरोप बालिश आहे
ऑफ कोर्स बालिश आहे.
अशी लग्ने फारच फुटकळ प्रमाणात घडत असतात. (एकुण लग्नांच्या प्रमाणात)
याने डेमोग्राफी बदलली जाणार नाही.
पण अशी लग्ने मुख्यत: प्रेम विवाह म्हणुन होत असतात.
बक्षिसाच्या आशेने, किंवा धार्मिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, किंवा आपल्या धर्मात मान मिळण्यासाठी, किंवा विकण्यासाठी, किंवा फसवण्यासाठी (ऑर एनि कॉंबिनेशन ऑफ अबाव्ह) म्हणुन विशिष्ट जातीला टारगेट केले असेल तर तो आक्षेपाचा मुद्दा होतो.
भले त्याने डेमोग्राफिक फरक पडो वा ना पडो.
प्रेम आनि लैंगिक सुख हे जात पात मानत नाही, काही संपर्काने २२-२४ वर्षाचे एक तरुण आणि एक तरुणी (कुठल्याही जातीधर्माचे) हे एकमेकांकडे आर्कषित होउ शकतात.
याच वयात, एखाद्या मुलाने 'भुलवणे' हे सहज शक्य असते. त्याचा गैरफायदा घेतला जात असेल तर ते चुकिचे आहे.
हे कुठल्याही जातीविषयी खरे आहे. मी मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही.
सारे योजनाबद्ध रितीने होत असेल तर केवळ गणित विषयाचे प्राथमिक ज्ञान नाही यापेक्षा जास्त काहीतरी वाटेल असे मला प्रामाणिक पणे वाटते.
गेली ५०-६० वर्षे आपल्या देशातील राष्ट्रवाद्यांना मुसलमान बहुसंख्य होणे हा आवडीचा विषय राहिला आहे.
हो, हा मुद्दा नेहमीच
ऐकला आहे.
'पहा, मुसलमानांची संख्या केवढ्या गतीने वाढत आहे' असा कांगावा केला गेला होता. नंतर तो कांगावा फोल आहे असे आढळून आले होते.
दुवा मिळेल का?
लाइफ एक्सपेक्टंसी कमी असणे, गरीबी आनि स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग जरा खालचे असणे या गोष्टी जिथे जिथे आहेत तिथे पालकांना जास्त मुले असल्याचा अर्थ तज्ञांचा अनुभव. इथे जात वगेरेने फारसा फरक पडत नाही. शिवाय त्या विशिष्ट धर्मात ही 'अल्लाह की देन है' अशी श्रद्धा ही आहे. त्याचा परिणाम म्हणुन एकाच कुटुंबात जास्त मुले दिसतात.
(कोणत्याही जातीचा)साधारण मध्यम वर्गीय एक दोन , फार तर तीन मुलांनंतर यांच्या शिक्षऩाचे किंवा तत्सम गोष्टींचे कसे होणार असा विचार करुन पुढे थांबवतो. हा स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग रिलेटेड इश्यू आहे.
गरिबांमधे हा सिंड्रोम जास्त दिसुन येत नाही
-----------
इथे कोणत्याही जातीला, गरिब, स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग खालच्या दर्जाचे असणे वगेरे हिणवायचे नसुन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यात कोणताही राजकिय, सामाजिक, जातिय उद्देश नाही.
'अल्लाह की देन है' वगेरे धार्मिक श्रद्धेचा मला उपहास किंवा विरोध करायचा नाहिये. त्यांच्या धार्मिक दृष्टिने हे कसे आहे, त्यांची या संदर्भात मानसिकता काय आहे केवळ एव्हढेच म्हणने आहे.
कांगावा
>>'पहा, मुसलमानांची संख्या केवढ्या गतीने वाढत आहे' असा कांगावा केला गेला होता. नंतर तो कांगावा फोल आहे असे आढळून आले होते.
दुवा मिळेल का?
आत्ता माझ्याकडे दुवा नाही पण बातम्यांमधून कळलेली माहिती अशी होती.
१९९१ च्या जनगणनेच्या वेळी काश्मीरमध्ये जनगणना झाली नव्हती. २००१ च्या जनगणनेत काश्मीरमध्येही जनगणना झाली. त्यामुळे २००१ च्या मुस्लीम लोकसंख्येत काश्मीरमधील मुसलमान् ऍड झाले होते.
१९९१ मुसलमानांची संख्या १० कोटी
२००१ मुसलमानांची संख्या ११ कोटी + काश्मीरमधील २ कोटी = १३ कोटी म्हणून् १० वर्षांत ३० टक्के वाढ असा निष्कर्ष काढला होता.
(वरचे आकडे काल्पनिक पण साधारण बरोबर असे आहेत्)
>>त्या विशिष्ट धर्मात ही 'अल्लाह की देन है' अशी श्रद्धा ही आहे
हिंदूंमध्येही मुले ही देवाघरची फुले असे मानण्याची आणि जन्माला घातले म्हणजे देव खायची व्यवस्थाही करीलच अशा समजुती आहेतच.
लेकुरे उदंड नसण्याची परिस्थिती हिंदूंमध्येही थोड्या प्रमाणातच आणि गेल्या ४०-५० वर्षांतच निर्माण झाली आहे. लाइफ एक्सपेक्टंसी कमी असणे, गरीबी आनि स्टॅंडर्ड ऑफ लिव्हींग जरा खालचे असणे या गोष्टी जिथे जिथे आहेत तिथे पालकांना जास्त मुले असल्याचा अर्थ तज्ञांचा अनुभव. इथे जात वगेरेने फारसा फरक पडत नाही हे तुमचे म्हणणे योग्यच आहे.
दोन अनुभव
१) आमच्या व्यवसायात एक मुलगी नोकरीस होती. एक दिवस एक हिरो हिरालाल तिला भेटायला आला. मुलगी चांगल्या घरातील असल्याने माझ्या वडिलांनी अधिक चौकशी केली. तेव्हा हा मुलगा टपोरीगिरी करणारा मुसलमान आहे असे कळले. तसेच सदर मुलीशी लग्न करणार असून लग्नापूर्वी तिचे धर्मांतर होणार असल्याचे कळले. प्रेम असेल तर ह्या धर्मांतराची आवश्यकताच नव्हती ना? बाँबे चित्रपट आठवा. असो. तिच्या आई-वडिलांशी बोलल्यावर त्यांना (विशेषत: मुलीच्या वडिलांना व्यसनासाठी) भरपूर पैसे मिळाल्याचे कळले. मग माझ्या वडिलांनी दादरमधील १-२ वाणी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क करून एक शेट्ये आडनावाची अशी अशी मुलगी मुसलमान होणार आहे., आपण जातपंचायती मार्फत / ज्ञातीबांधवांमार्फत तिच्या वडिलांचे मन वळवावे असे वारंवार सुचविले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र आमचे हे प्रयत्न पाहून ती मुलगी नोकरी सोडून गेली.
२) आमच्या शेजारच्या इमारतीतील एका सज्जन पण पारंपरिक जैन कुटुंबातील *ना शाह ह्या मुलीने १८ वा वाढदिवस होताक्षणी, दुसर्याच दिवशी एका मुसलमान बार वेटर बरोबर पळून जाऊन लग्न केले. हा बार वेटर अशिक्षित होता. मात्र दिवसभर तिच्या प्रिमियर गुजराती शाळेसमोर पडिक असायचा. आता तिचे नाव ****बी असल्याचे कळते.
मात्र ह्या सार्या प्रकारात तिच्या आई वडिलांनी हाय खाल्ली आणि ते कुटुंब मुंबईबाहेर राहायला निघून गेले. असो.
हे केवळ अनुभव आहेत. ही कोणतीही टीका वा टिपण्णी नाही. कळावें.
--------------------------X--X-------------------------------
फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरूनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा ।
त्यांतहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी,
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचें पाणी ।।