सामान्य समज (कॉमनसेन्स)

सामान्य समज (कॉमन सेन्स)
आम्ही सात मित्र सायंकाळी बागेत भेटतो.तिथे गप्पाष्टक (सप्‍तक?) चालते. परवा एकाने सर्वांना प्रश्न केला:
"चमत्कार वाटावा असा तुम्ही अनुभवलेला सर्वांत आश्चर्यकारक प्रसंग कोणता?"
विचार करता मला"गणपती दूध पितो." या अफवेची घटना आठवली.भारतभर सर्व गणेश मंदिरांत हजारो लोकांनी दुधाने भरलेली भांडी हातात घेऊन गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावल्या आहेत अशी दृश्ये दू.चि.वा.वर पाहिली.विविध क्षेत्रांतील आणि विविध स्तरांतील लक्षावधी लोक स्वयंबुद्धीने जरासुद्धा विचार न करता अशा अशक्यप्राय गोष्टीवर चुटकीसरशी विश्वास ठेवतात याचे मला महदाश्चर्य वाटले.
नंतर "गणपती आपल्या सोंडेने दूध पिताना मी प्रत्यक्ष पाहिले.तेव्हा अंधविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही"असे त्यावेळचे मा.मु.मं. मनोहर जोशी यांचे वक्तव्य ऐकले आणि ही घटना म्हणजे केवळ आश्चर्यच नव्हे तर हा चमत्कार आहे असे मला त्यावेळी वाटले.
या घटनेवर आमच्या मोलकरणीची प्रतिक्रिया होती,"या लोकांना एव्हढे समजत कसे नाही? निर्जीव मूर्ती कधी दूध पिईल का?"
म्हणजे जे काय दिसते त्याचे त्या बाईने सजीव प्राणी आणि निर्जीव वस्तू असे वर्गीकरण केले होते.(हे शब्द तिला ठाऊक नसतील). निर्जीव वस्तूंच्या बाबतीत हालचाल करणे,खाणे, पिणे या क्रिया संभवत नाहीत,हे तिला निरीक्षणांवरून कळले होते.निर्जीव गणेशमूर्ती दूध पिते हे तिच्या अनुभव विश्वात बसत नव्हते.
याला मी सामान्य समज(कॉमन सेन्स) म्हणतो.ही मानवी मेंदूची विशिष्ट क्षमता आहे. त्यासाठी सखोल ज्ञानाची,व्यासंगाची आवश्यकता नसते.
मग जी सहस्रावधी माणसे निर्जीव बाहुलीला दूध पाजायला धावली त्यांना सामान्य समज नव्हती काय? असल्यास ती तेव्हा कुठे गेली? याचे उत्तर डार्विनीय सिद्धान्तानुसार देता यावे. मला वाटते ते असे:
माणूस शेती करीत एका जागी स्थिरावला त्याला आता दहा बारा हजार वर्षे झाली. तत्पूर्वी वीस पंचवीस लाख वर्षे माणूस शिकारी, फळे कंदमुळे शोधणारा आणि भटक्या होता. त्याकाळीं टोळ्या होत्या.टोळीचा एक म्होरक्या असे.टोळीतील इतर चार माणसे जे करतात तेच आपण करावे अशी बहुतेकांची मनोवृत्ती असे. इतरांहून वेगळे काही केले तर टोळीपासून अलग पडण्याची भीती असे. स्वसंरक्षण आणि शिकार या गोष्टी एकट्या दुकट्याने करणे अशक्य होते. त्यामुळे टोळी प्रमुखाचे ऐकणे आणि इतर चार चौघे करतात तसेच करणे ही मनोवृत्ती निर्माण झाली,वाढली.आणि ती आनुवंशिकतेने पुढच्या पिढ्यांत संक्रमित झाली.या मानिसतेला गतानुगतिकता अथवा मेषधर्म(एक मेंढरू गेले की त्याच वाटेने इतर सर्व मेंढरे जाणे.) असे म्हणतात.
पण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.आजही समाजात तसेच दिसते.
पुढे माणूस शेती करून स्थिरावत गेला. विवाहपद्धती आली. कुटुंबे बनली. शिकारीवरचे अवलंबन कमी झाले.संरक्षणाची साधने प्रगत झाली. एकट्या दुकट्य़ा माणसालासुद्धा आपला उदरनिर्वाह आणि संरक्षण करणे शक्य झाले. तरी लाखो वर्षांची गतानुगतिकवृत्ती अल्पकाळात बदलणे शक्य नसते. त्यामुळे अजूनही ती दिसून येते. गणपती दूध पितो या अफवेने ती त्यावेळी प्रकर्षाने दिसून आली एवढेच. एरव्ही ती नित्यश: दिसतच असते.
पण आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. आणि काही शतकांतच माणूस पूर्णत्वाने विवेकवादी होईल. त्याची प्रसादचिह्ने जागतिक स्तरावर आजच दिसत आहे.
आज बहुसंख्य माणसे आस्तिक आहेत हे खरे. पण त्यांच्या या भूमिकेमागे कोणताही विचार नसतो. असते ती पारंपरिक गतानुगतिकता आणि श्रद्धा. एकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.
.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वप्नील

स्वप्नील, ललित लेखनाच्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन!
पुलेशु!

आपला
गुंडोपंत

आशावाद

गुंडोपंतांना +१ म्हणताना दु:ख होत आहे.
अंधश्रद्धांच्या निर्मितीविषयी मूळ लेखकाशी सहमत असलो तरी समाज भविष्यात अंधश्रद्धांपासून मुक्त होईल हे मत भाबडे आणि निराधार आहे.

का बॉ?

आवांतर -

दु:ख का बॉ?
जर विचार जुळत असतील तर तर दु:ख का?
उलट आनंद व्हायला हवा, की आपल्या विचारात या विषयापुरती तरी दरी नाही.
अहो आपली मत -मतांतरे आणि वाद विवाद असतील तर त्या त्या चर्चा - विषयापुरतीच नाही का?
आपले काही वैयक्तीक भांडण थोडेच आहे?

म्हणजे तसे काही माझ्या कडून तरी भांडण नाहीये!

आपला
गुंडोपंत

दु:ख होण्यास कारण की

'मानव समाजाचे भवितव्य फारसे उज्ज्वल नाही' हे मान्य करताना दु:ख होते.

हाहाहा!!!!

एकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.

बापरे! अबब! अधोरेखित वाक्य तर भयंकर विनोदी आहे. रोलँड एम्मेरिक(च्) किंवा जॉर्ज लुकासला वरील संकल्पनेवर उत्तम चित्रपट काढता येईल.

गॉड ब्लेस यनावाला. ;-)

भयंकर विनोदी वाटले नाही

काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.
अधोरेखित वाक्य तर भयंकर विनोदी आहे.
मला अधोरेखित वाक्य अजिबात भयंकर, विनोदी किंवा भयंकर विनोदी वाटले नाही. अत्यंत आशावादी वाटले. कारण हे जग होमजिनिटीकडे प्रवास करते आहे, ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. तशीही माणुसकीची भाषा, माणुसकीची जात, माणुसकीचा धर्म एकच आहे, नाही का?

सगळ्यांचे भले होवो !

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लव जिहाद

हे जग होमजिनिटीकडे प्रवास करते आहे, ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे.

नवी राज्ये हवीत. नवे देश हवेत असे देशादेशांत वाद चालत असता हा अत्यंत आशावादच मला विनोदी वाटला. उद्या माझा शेजारी म्हणाला - तुझी जागा ती माझी जागा आणि माझी जागा ती तुझी जागा तर मला चालणार नाही. उगीच त्याचं गवत मला कापावं लागेल आणि त्याला माझं. ;-)तिथे देवा,धर्मा आणि श्रद्धा अंधश्रद्धेचा काही संबंधच नाही. असो.

सोविएत रशियाचे किती तुकडे झाले हे सांगताना मला आजही विचार करून बोटे मोजावी लागतात ही वस्तुस्थिती आहे.

तशीही माणुसकीची भाषा, माणुसकीची जात, माणुसकीचा धर्म एकच आहे, नाही का?

हे बाकी खरे आहे. :-) पण त्या "लव जिहादचं" काय? संस्कृत काढून टाका असे सांगितल्यावर यनावालांना झालेला क्लेश विसरलात का? :-( देव, धर्म आणि भाषा हे ज्यांचे शस्त्र आहे ते इतरांना त्यातून बाहेर येऊ देणार नाही हा हजारो वर्षांचा इतिहास सांगतो त्यामुळे काही शतकांत बदलाचे वारे वाहणे भाबडे वाटते.

भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्ता गाजवायचा मोह, खुर्चीचे मोह, आपल्या तुंबड्या भरताना इतरांवर अन्याय करण्याची, लुबाडण्याची प्रवृत्ती वगैरे वगैरेंचा देवधर्माशी प्रत्यक्ष संबंध आहे असे वाटत नाही परंतु देव, धर्म, भाषा ज्या राजकारण्यांच्या हातातील फासे आहेत तो पर्यंत बदलाचे वारे वाहणे वगैरे अवास्तव आहे.

असो. चर्चा भलतीकडे जात आहे असे वाटल्याने येथे पुन्हा उपप्रतिसाद देणार नाही.

प्रश्न

नवी राज्ये हवीत. नवे देश हवेत असे देशादेशांत वाद चालत असता हा अत्यंत आशावादच मला विनोदी वाटला. उद्या माझा शेजारी म्हणाला - तुझी जागा ती माझी जागा आणि माझी जागा ती तुझी जागा तर मला चालणार नाही.

मूळ प्रश्न हाच आहे. माझ्या नाकाचा शेंडा म्हणजे जगाचे टोक हा हट्ट सोडल्याशिवाय यनावालांची भूमिका कळणे अशक्य आहे.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

देव

माझ्या नाकाचा शेंडा म्हणजे जगाचे टोक हा हट्ट सोडल्याशिवाय यनावालांची भूमिका कळणे अशक्य आहे.

यनावाला हे आपले देव असतील माझे नाहीत. त्यामुळे त्यांची ही विनोदी भूमिका न कळणे आलेच. :-) श्रद्धावंतांचे हे असेच असते. आपल्या दैवताचा शब्द बाबा वाक्य प्रमाणम् म्हणून सांगत फिरायचे.

एकंदरीत खालील प्रतिसादातील "मला वाटते तेच खरे" हा भाव आस्तिक आणि नास्तिक या दोघांतही सारखाच असल्याने माझ्या नाकाचा शेंडा, तुमच्या नाकाचा शेंडा, यनांच्या नाकाचा शेंडा आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्या नाकाचा शेंडा यांत फरक नाही आणि देवा-धर्माशी त्याचा कोणताही संबंध नाही.

असामान्य गैरसमज :-)

काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.

अंधश्रद्धा नसावी, नष्ट व्हावी या मताशी पूर्ण सहमती आहे. तरी तसे होईल आणि त्यामुळे लेखातील वरचे विचार हे वास्तव होईल आणि जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल असे वाटणे म्हणजे असमान्य गैरसमज आहे असे म्हणावेसे वाटते.

मला वाटते, कम्युनिस्ट रशियात यातील बहुतांशी गोष्टी केल्या होत्या. तरी देखील शीतयुद्ध त्याच काळात जोमात होते. या उलट अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच. सगळे एकाच वेळेस सुखी, समाधानी नसतात आणि शांती ही पण कालानुरूप बदलू शकते. त्यामुळे ते या काळात नक्की कसे होते, हा संशोधनात्मक विषय होईल.

तेंव्हा कदाचीत "मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहमत आहे.

कदाचीत "मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.

सहमत आहे. इतरत्र नाही तरी कदाचित उपक्रमावर नक्कीच सुख-शांती-समाधान लाभेल असे वाटते, अर्थातच कदाचित हा डिस्क्लेमर लावूनच.. ;-)

सहमत

सहमत आहे. पण असे मराठी सायटींवर कधी काळी होऊ शकेल असे मानणे हा ही भाबडा आशावाद आहे असे वाटते. :)

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

इथे

मला वाटते, कम्युनिस्ट रशियात यातील बहुतांशी गोष्टी केल्या होत्या. तरी देखील शीतयुद्ध त्याच काळात जोमात होते. या उलट अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच. सगळे एकाच वेळेस सुखी, समाधानी नसतात आणि शांती ही पण कालानुरूप बदलू शकते. त्यामुळे ते या काळात नक्की कसे होते, हा संशोधनात्मक विषय होईल.

इथे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आठवले.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

रशियातील साम्यवादाचा पाडाव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या संदर्भात "अंडरस्टँडिंग रॅशनॅलिझम्" या पुस्तकात डॉ.डी.डी.बंदिष्टे लिहितात,"रशियातील साम्यवाद हा विवेकवाद नव्हता.त्यात व्यक्ती, व्यक्तिस्वातंत्र्य अणि व्यक्तिप्रतिष्ठा यांची अवहेलना होत होती.साम्यवादींच्या मते या गोष्टी म्हणजे मध्यम वर्गाच्या चैनी होत्या.या साम्यवादात अभिव्यक्तीचे,संघटना बांधण्याचे, भिन्न मत बाळगण्याचे, आपल्या जीवननियोजनाचे वेगळे पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य नव्हते.संपूर्ण रशिया एक तुरुंग बनला होता.त्या काळी सेना, पोलीस, गुप्तचर, अतिउत्साही साम्यवादी तरुण यांनी जनसामान्यांवर जरब बसवली होती.या दोषांमुळे तिथे साम्यवादाचा पराभव अटळ होता.असल्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची धडपड लोक साहजिकपणे करणारच."
रशियातील साम्यवादाचा पराभव म्हणजे विवेकवादाचा पराभव नव्हे.विवेकवादात व्यक्तिस्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान असते.

आमचेही भविष्यकथन

रशिया, १९८४ किंवा ब्रेव्ह न्यू वर्ल्ड सारखे जगच भविष्यात शक्य आहे. माध्यमांचे सामर्थ्य वाढले की तसेच होईल. गटेनबर्ग असो किंवा इंटरनेट, कोणतेही तंत्रज्ञान शेवटी सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी उपयोगी पडते. त्यातून प्रत्येक व्यक्तीचा फायदा होतोच परंतु व्यक्ती आणि शासनकर्ते यांतील दरीही वाढत जाते.

तसेच

इथे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आठवले.

थोडे अवांतर अथवा विरंगुळा हा उद्देश ठेवत पण थोडाफार हा मतितार्थ येणारे काही चित्रपट...

तसेच टाईम मशीन नावाचा जुना चित्रपट आठवला, (नवीन मी पाहीलेला नाही) ज्यात एक शास्त्रज्ञ भविष्यात जातो आणि माणसाचेच कसे यंत्र झाले आहे हे त्याच्या लक्षात येते. वगैरे.

अजून एक विनोदी चित्रपट म्हणजे, "डिमॉलीशन मॅन" आणि त्यातील सँड्रा बुलक आणि सिल्व्हेस्टर सॅलोनचे प्रेम प्रसंग :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

एकम् सत्

अंधश्रद्धा नसावी, नष्ट व्हावी या मताशी पूर्ण सहमती आहे. तरी तसे होईल आणि त्यामुळे लेखातील वरचे विचार हे वास्तव होईल आणि जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल असे वाटणे म्हणजे असमान्य गैरसमज आहे असे म्हणावेसे वाटते.

+१

अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच.

बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे? जातीव्यवस्थेतील अत्याचार ही हिंसा नाही का?

तेंव्हा कदाचीत "मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.

मला वाटते तसे न वागणार्‍यांनी माझे मत चूक ठरविण्याची तसदी घेतली पाहिजे; मी माझे मत पटविण्याचे कष्ट घेतो. आदराविषयी बिल माहर ने म्हटले आहे, "You can have my tolerance, you can't have my respect.". लहान मूल गादी ओली करते तेव्हा पालक 'सहन' करतात. तद्वत् मी खुळचटपणाचा आदर करीत नाही.

कुठे कुठे

बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे? जातीव्यवस्थेतील अत्याचार ही हिंसा नाही का?

बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधीच रक्तपात केले नाही. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध भिख्खूंची मुंडकी आणणाऱ्यांना बक्षीसांची घोषणा केली नाही. शैव-वैष्णवांत कधी दंगली झाल्या नाही. दलितांवर किंवा खालच्या जातींवर कधी अत्याचार झाले नाही. हा इतिहास आहे. पण इतिहास वाचण्याची तसदी कोणी घेईल काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ऐतिहासिक सत्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रिकामटेकडा आपल्या प्रतिसादात लिहितातः"बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे? "
»
" जगातील प्रत्येक धर्म हिंसक आहे" असे विधान मूळ लेखात नाही. तसेच असा निष्कर्ष निघावा असेही काही लेखात नाही. पण खालील गोष्टी सत्य आहेतः
*धर्माच्या नावे माणसाने माणसाचे अनन्वित छळ केले आहेत.ते धार्मिक कृत्य मानून आनंदाने केले आहेत.
*अनेक युद्धे,लढाया,कत्तली, रक्तपात धर्माच्या नावे झाले आहेत.जगातील सर्वाधिक मनुष्यहत्या धर्मामुळेच झाल्या आहेत.
*अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चाललेली ख्रिश्चनांची धर्मयुद्धे (क्रुसेड्स्) प्रसिद्ध आहेत. पहिल्या धर्मयुद्धात (१०९५)र्‍हाईन प्रदेशातील ज्यूंची भयानक कत्तल हे ख्रिश्चन धर्मीयांचे पहिले मोठे धर्मकृत्य म्हणतात.
* "इस्लाम खतरेमे" असा नारा दिला की नंग्या तलवारी घेऊन जीवावर उदार झालेले मुसलमान काफिरांना मारायला रस्त्यावर उतरलेच म्हणून समजा.
*"खर्‍या हिंदूमायेचे पूत असाल तर उठा.पाचशे वर्षांपूर्वी आपल्या धर्माला लागलेला हा कलंक पुसून टाका."असे आवाहन केले की "जय भवानी. हर हर महादेव"अशा गर्जना करीत ,"देव, देश अन् धर्मापायी" शीर तळहातावर घेऊन धार्मिक त्वरेने निघतात.
... धर्माच्या नावे भावनिक आवाहन केले की श्रद्धाळू धार्मिकांचा सारासार विचार लुप्त होतो. अशी झुंड अत्यंत धोकादायक ठरू शकते.हा धर्मांचा इतिहास आहे.
वर्तमानातही धर्माच्या कारणाने हिंसा चालूच आहे.

तुम्हाला नाही

श्री.रिकामटेकडा आपल्या प्रतिसादात लिहितातः"बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे? "
»
" जगातील प्रत्येक धर्म हिंसक आहे" असे विधान मूळ लेखात नाही. तसेच असा निष्कर्ष निघावा असेही काही लेखात नाही.

माझा र्‍हेटॉरिकल प्रश्न 'अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती' या दाव्याला होता.

पद्धतशीर सांघिक प्रयत्न

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखात म्हटले आहे:"आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. "

आज प्रसारमाध्यमे इतकी प्रभावशाली आहेत(भविष्यकाळात हा प्रभाव आणखी वाढेल) की सर्व देशांतील/धर्मांतील विचारवंत एकत्र येऊन सर्वांना मान्य होतील असे धोरणात्मक निर्णय घेतले तर तदनुसार योग्य ते विचार जगाच्या कोनाकोपर्‍यात पोहोचविता येतील. विचारमंथन होईल. अनेक क्षेत्रांत मानवी प्रगतीचा आलेख आश्चर्यकारकरीत्या चढता आहे. तेव्हा लेखात म्हटल्याप्रमाणे काही शतकांत अपेक्षित परिवर्तन होऊ शकेल असा माझा आशावाद आहे. पाच सहाशे वर्षे म्हणजे काही कमी कालावधी नव्हे.

संघशक्ती...

"...पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. "

"पुर्वीच्या काळात कदाचीत इश्वरी अवतारांनी ह्या जगात परीत्राणाय साधुनाम् केले असेलही, मात्र आजच्या काळात संघटनच महत्वाचे, अर्थात संघशक्ती कलीयुगे" हा रा.स्व. संघाचा दृष्टीकोन या वरून आठवला. ;)

आज प्रसारमाध्यमे इतकी प्रभावशाली आहेत...
प्रभाव असणे याचा अर्थ कोत्या स्वार्थाचा अभाव नसंणे असा थोडाच असतो. मराठी वृत्तपत्रांपासून ते इंग्रजी वृत्तपत्रांपर्यंत, वाहीन्यांपर्यंत सर्व बघा... त्या शिवाय कधीकाळी मंडालेहून सुटून आल्यावर टिळकांनी काळकर्ते परांजपे आणि नाटककार श्री.कृ.कोल्हटकर यांची केलेली कान उघडणी आठवली. नुसतेच लिहून आणि प्रसिद्धीने काही होत नाही तर सक्रीय कार्य करावे लागते (गीतारहस्यातील कर्मयोग) असे त्यांचे म्हणणे होते.

असो.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बापरे

पण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.

जनुकांवर स्वयंप्रज्ञ असणे अवलंबून असते का? स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का? म्हणजे माझी आई बंडखोर, म्हणून मी बंडखोर, म्हणून माझी मुलगी बंडखोर असे काही?


एकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.

जनुकांवरच्या अपरिमित श्रद्धेला काय म्हणावे? ही जनुकांवरील श्रद्धा आणि सध्या जन्मानुसार जाती ठरवणे यात कितपत फरक आहे?

होय

जनुकांवर स्वयंप्रज्ञ असणे अवलंबून असते का? स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का? म्हणजे माझी आई बंडखोर, म्हणून मी बंडखोर, म्हणून माझी मुलगी बंडखोर असे काही?
अगदी शंभर टक्के नसले तरी बर्‍याच प्रमाणात होय. एखाद्या व्यक्तीचा बंडखोर स्वभाव, किंवा कोणताही स्वभाव, ती व्यक्ती कोणत्या वातावरणात वाढली, तिच्यावर कुणाचे संस्कार झाले, कुणाचा प्रभाव पडला यावरही ठरत असतो. पण जनुकांचा यात निश्चित असा वाटा असतो हे नक्की.
या बाबतीत एक उदाहरण देतो. मारकुट्या गाईची कालवड ही मारकुटी असण्याची शक्यता अधिक असते. गाईचा मारकुटेपणा हा माणसाच्या दृष्टीने दोष असला तरी तो गाईच्या दृष्टीने (आक्रमकता या अर्थी) गुणच आहे.
यनावालांचा आशावाद भाबडा वाटत नाही. प्रतिसाद देणार्‍यांनी 'हे सगळे आपल्या जीवनकाळात घडेल का?' हा संदर्भ सोडून विचार करावा. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षे ओलांडल्याशिवाय!

सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

कसे?

जनुकांचा यात निश्चित असा वाटा असतो हे नक्की.

जनुकांचा वाटा असा नसावा असे मला वाटते. असले तरी एक दोन पिढ्या टिकत असेल. यनावालांनी जसे म्हटले आहे तसे पिढ्यानपिढ्या जनुकीय ठेवणींमुळे स्वयंप्रज्ञता ट्रान्सफर होत नसावी. एखाद्या घरात सगळे आईनस्टाईन पैदा होत नाहीत, आणि शिवाजीराजेही पैदा होत नाहीत.

आणि जर असे आहे, तर जन्माने जाती ठरवण्यास का विरोध आहे? जर कोणी असे म्हटले की संततीतील चांगले गुण (बुद्धी, शौर्य, सेवावृत्ती, कौशल्य) टिकवून धरण्यासाठी आंतरजातीय विवाह होऊ नयेत, तर काय चुकीचे आहे?

माझा विरोध श्री. यनावाला यांच्या आशावादाला नाही. प्रत्येकाला आशावादी असण्याचा अधिकार आहे असे मी समजते ( तो आशावाद भाबडा असला तरी काय आहे की असे काही होणे शक्य आहे - जरी शक्यता कमी असली तरी).
पण त्यांनी जे जनुकांबद्दल विधान केले आहे ते मला नीट समजून घ्यायचे आहे.
श्री. यनावाला यांचे हे म्हणणे जणू काही अनेक वर्षांपूर्वी अशा स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी प्रजनन न करण्याची घोडचूक केली आणि आता बहुसंख्य मानवजात कमकुवत बुद्धीच्या लोकांची कमकुवत बुद्धीची पैदास आहे अशा पद्धतीचे आहे असा माझा समज झाला.

स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी हा निर्णय का घेतला असेल, का तेव्हाच्या स्त्रिया/पुरूष त्यांच्या स्वयंप्रज्ञतेवर फिदा होऊ शकल्या नाहीत? का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते? त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही? का स्वयंप्रज्ञ लोकांनी संन्यास घेतला?

आणि होय

अजून एक -

नॅचरल सिलेक्शनमध्ये अशा स्वयंप्रज्ञ लोकांची जनुके का बरे टिकू शकली नाहीत?
मोठाच गहन प्रश्न आहे.

ऐकीव माहिती

जनुकांचा वाटा असा नसावा असे मला वाटते. असले तरी एक दोन पिढ्या टिकत असेल

अशा ऐकीव माहितीमुळे मूळ चर्चा बाजूला राहून फाटे फुटत जातात.
आणि जर असे आहे, तर जन्माने जाती ठरवण्यास का विरोध आहे? जर कोणी असे म्हटले की संततीतील चांगले गुण (बुद्धी, शौर्य, सेवावृत्ती, कौशल्य) टिकवून धरण्यासाठी आंतरजातीय विवाह होऊ नयेत, तर काय चुकीचे आहे?
युजेनिक्स या वेडेपणाच्या प्रयोगात असेच काहीसे केले गेले.
जनुकांत होणारे बदल अत्यंत संथ असतातम्यूटेशनमुळे होणारे अनैसर्गिक बदल सोडले तर जनुके व त्यांच्यामुळे येणारे गुणधर्म हे पिढ्यानपिढ्या टिकून राहातात. एक दोन पिढ्या टिकत असतील हे विधान विनोदी आहे.
आंतरजातीय विवाह होऊ नयेत हे विधान चुकीचे असण्याची किमान दोन कारणे आहेत. जैविक आणि सामाजिक. पण त्यासाठी वेगळा धागा सुरु करावा हे बरे.
( तो आशावाद भाबडा असला तरी काय आहे की असे काही होणे शक्य आहे - जरी शक्यता कमी असली तरी).
हे वाक्य समजले नाही.
स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी हा निर्णय का घेतला असेल, का तेव्हाच्या स्त्रिया/पुरूष त्यांच्या स्वयंप्रज्ञतेवर फिदा होऊ शकल्या नाहीत? का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते? त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही? का स्वयंप्रज्ञ लोकांनी संन्यास घेतला?
अतिरेकी विधाने. समाजात प्रवाहाविरुद्ध पोहणार्‍या लोकांची संख्या नेहमी अल्पच राहिली आहे. आणि स्वयंप्रज्ञता ही काही अशी 'टेलर मेड' होत नसते. 'मी स्वयंप्रज्ञ, तू स्वयंप्रज्ञ, मग चल आपण स्वयंप्रज्ञ मुलांची पैदास करु' असे ते नसते.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

थोडे विषयांतर

युजेनिक्स या वेडेपणाच्या प्रयोगात असेच काहीसे केले गेले.

गेल्या शतकातील युजेनिक्सची गृहीतके चूक होती. मुळात युजेनिक्स वाईट नाही.

म्यूटेशनमुळे होणारे अनैसर्गिक बदल सोडले तर जनुके व त्यांच्यामुळे येणारे गुणधर्म हे पिढ्यानपिढ्या टिकून राहातात.

म्यूटेशनही आली की पिढ्यानपिढ्या टिकतात.

असेच काही नाही

म्यूटेशनही आली की पिढ्यानपिढ्या टिकतात.
असेच काही नाही. अपघाताने येणारी बहुतेक म्यूटेशन्स रिव्हर्सिबल असतात.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

अविश्वास

कृपया संदर्भ द्या. माझ्या ज्ञानात मोठी भर पडेल.
माझ्या माहितीप्रमाणे सारीच म्यूटेशन अपघाताने येतात.

जीन्स

बेंजामिन लेविनचे जीन्सहे पुस्तक वाचावे. (मी वाचलेले आहे)
माझ्या माहितीप्रमाणे सारीच म्यूटेशन अपघाताने येतात.
असे नाही.इथे बघा किंवा गुगलून बघा. मी स्वतः काही जीवाणूंमध्ये इन्डूसड् म्यूटेशन्स घडवून आणली आहेत. आमच्या प्रात्यक्षिकांचा तो एक भागच होता.

सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

एका मुद्यावर सहमत

इन्डूसड् म्यूटेशन्स हवी तशी घडविता येतात हे मला मान्य आहे.

रिव्हर्सिबल म्यूटेशनविषयी मी गूगल स्कॉलरवर शोध घेतला, काही सापडले नाही. एखादा तांत्रिक शब्द सांगितलात तर मला शोधायला सोपे जाईल. म्यूटेशन्स रिव्हर्स कशी होऊ शकतात त्याचा मार्ग सांगितलात तर संदर्भाचीही गरज नाही.

प्रकृती(नेचर) की संस्कृती(नर्चर) ?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपल्या प्रतिसादात चित्रा लिहितात;"जनुकांवरच्या अपरिमित श्रद्धेला काय म्हणावे? .."

ही जनुकांवरील अपरिमित श्रद्धा नव्हे. यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे.डॉ.थॉमस बाऊचर्ड यांनी केलेला अभ्यास "मिनेसोटा स्टडी ऑफ ट्विन्स रिअर्ड अपार्ट" या नावाने ओळखला जातो.त्यात आठ हजारांहून अधिक अशा मोनोझायगोटिक जुळ्यांच्या जीवनाचा अभ्यास आहे.
अशी जुळी एकाच वातावरणात वाढली काय किंवा सर्वस्वी भिन्न वातावरणांत वाढली काय त्यांच्या व्यक्तिमत्वात ७०% साधर्म्य आढळते. म्हणजे सत्तर टक्के व्यक्तिमत्व जनुकदत्त असते तर तीस टक्के संस्काराधारित असते.
"लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते." असे म्हणतात ते सत्य नव्हे. संस्कारांचा उपयोग मर्यादित आहे.

एकदोन पिढ्या

विधान विनोदी आहे हे ठीक. ते विधान बुद्धिमान आई-बापांची मुले हुषार निघतात - हे आपण काही पिढ्या घडते ते पाहतो, तेवढ्याच संदर्भात होता. पण ते विधान मागे घेते. पण स्वयंप्रज्ञतेची जनुके वेगळी काढली आहेत का ते माहिती करून घ्यायला आवडेल.

माझ्या ज्या विधानांना आपण अतिरेकी म्हणत आहात, त्यापेक्षा मोठा अतिरेक इथे जनुकीय घडणीमुळे लोकांची योग्य-अयोग्यता, बुद्धी, 'स्वयंप्रज्ञता' ठरवण्यास होतो आहे. ही माझ्या मते नवीन जातीयवादाची निर्मिती आहे आणि जीवशास्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जाण्याची शक्यता तयार होते आहे असे माझेही मत आहे. यावरून सामाजिक अनेक प्रश्न तयार होतात पण ते तुम्ही म्हणत आहात म्हणून इथे काढत नाही.

स्वयंप्रज्ञता ही काही अशी 'टेलर मेड' होत नसते. 'मी स्वयंप्रज्ञ, तू स्वयंप्रज्ञ, मग चल आपण स्वयंप्रज्ञ मुलांची पैदास करु' असे ते नसते.

थँक यू. आय रेस्ट माय केस.

फरक

जातींमध्येही जनुकीय फरक असतातच. मात्र सरमिसळ, व्यामिश्रता, म्यूटेशन, यांमुळे हे फरक ब्लॅक ऍन्ड व्हाईट प्रकारचे नसतात.
श्रद्धेची व्याख्या या विषयावर येथे आधीही काही वादंग झाला नाही का? अर्थात तो विषय या धाग्यात बसविणे हे विषयांतर होणार नाहीच.
आणि हो, सर्वच गुण जनुकांवर अवलंबून असतात. त्यांना परिस्थितीची साथ लागते हेही तितकेच खरे आहे.

बरोबर आहे

गुण जनुकांवर अवलंबून असतात - पण स्वयंप्रज्ञेची जनुके कशी असतात?
जनुके माणसाने कसे वागायचे, विवेकी निर्णय कसे घ्यायचे, हे ठरवत नाहीत असे वाटते.

मुद्दा लक्षात आला असे वाटते

जनुके म्हणजे नियम आणि स्वयंप्रज्ञा म्हणजे फ्री विल या विरोधाभासाविषयी आपला युक्तिवाद आहे का?
स्वयंप्रज्ञा या शब्दाचा मूळ लेखकाला अभिप्रेत अर्थ 'स्वतःच्या मनाला योग्य वाटेल (जे मन परिस्थिती आणि जनुके यांनी घातलेल्या नियमांनी विचार करते) तसे, इतरांचा आदेश झुगारून वागणे' असा होता असे वाटते.
माणसाने कसे वागायचे आणि बाईने कसे, तेही आदिम जनुके सांगतात. नवीन जनुकांमुळे प्राप्त स्वयंप्रज्ञा त्याला विरोध करते.

नाही.

मी वादासाठी वाद घालत बसले आहे असे मला वाटत नाही.
माझा विरोध कशाबद्दल आहे ते मी बर्‍यापैकी स्पष्ट केले आहे, असे मला वाटते. तरी लिहीते -

प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.

इथे स्वयंप्रज्ञता (बंडखोरी) ही जीन्समधून येते असे सुचवले आहे. याचा अर्थ सध्याची बहुसंख्य मानवजात ही स्वयंप्रज्ञ नाही.
याचा अर्थ स्वतःच्या बुद्धीने चालण्याची जनुके सध्याच्या बहुसंख्य मानवांना नाहीत. म्हणजे बहुसंख्य माणसे दुसर्‍याच्या बुद्धीने चालणारी (मेंढरे) आहेत. मला तर आजूबाजूला पाहताना असे दिसत नाही. मला तर बहुसंख्य लोक बर्‍याच अंशी बुद्धिमान दिसतात, कधी स्वतःच्या योग्य मताने वागणारे, कधी दुसर्‍याच्या अयोग्य मताने वागणारे, कधी योग्य वागूनही चुका झालेले, तर कधी त्या निस्तरणारे दिसतात. जनुकीय पातळीवर जाऊन ते अमूक प्रसंगात असा निर्णय घेऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्या जनुकांवर घसरणे पटले नाही. इतर ९०% प्रसंगांत आपली बुद्धी योग्य पद्धतीने जगात प्रगती करून घेण्यासाठी वापरणार्‍या लोकांना केवळ स्वतःला पटतील (आणि श्री. यनावाला यांना महत्त्वाचे वाटतात) ते १०% विचार आचरणात आणत नाहीत, म्हणून त्यांच्या जनुकांमध्येच खोट आहे असा निष्कर्ष काढणे पटले नाही.

श्री. यनावाला यांचे हे म्हणणे जणू काही अनेक वर्षांपूर्वी अशा स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी प्रजनन न करण्याची घोडचूक केली आणि आता बहुसंख्य मानवजात कमकुवत बुद्धीच्या लोकांची कमकुवत बुद्धीची पैदास आहे अशा पद्धतीचे आहे असा माझा समज झाला.

माझे हे म्हणणे यनावाला यांनी खोडून काढलेले नाही. त्यांना वेळ झाला नसेल हे एक कारण जसे आहे तसे दुसरे कारण असेही असू शकेल की त्यांना ह्यात चूक काही वाटत नसावी.

हे काय आहे बुवा?

इथे स्वयंप्रज्ञता (बंडखोरी) ही जीन्समधून येते असे सुचवले आहे. याचा अर्थ सध्याची बहुसंख्य मानवजात ही स्वयंप्रज्ञ नाही.

हे 'याचा अर्थ' कनेक्शन समजले नाही.

:)

वाक्याची जागा चुकली. धन्यवाद. अर्थ कळला ना? मग चु.भू. समजून घ्यावे.

भाबड्या समजुती

लेख काही भाबड्या समजुतींवर आधारलेला आहे असे वाटते. त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. विज्ञानाचे महत्व, त्यामुळे माणसांचे आयुष्ञ सोपे झाले याबद्दल कुणाचेच दुमत नाही/नसावे. पण माणसाच्या सर्व समस्यांना विज्ञान हे एकमेव उत्तर आहे असे मानणे बरोबर नाही. समृद्ध आयुष्याचा विज्ञान एक अपरिहार्य भाग आहे पण विज्ञान म्हणजे समृद्ध आयुष्य नव्हे.

भाबडी समजूत १. विज्ञानाची प्रगती झाली की माणूस आपोआप विवेकी होईल.
लॉस अलमॉस १९४५. जगातील सर्वश्रेष्ट शास्त्रज्ञ अणुबॉम्ब बनवण्यात गुंतले होते. आपण कोणता भस्मासूर निर्माण केला आहे याची जाणीव त्यांना नंतर झाली. अणुचाचणी पाहून ओपनहायमरना गीतेतील विश्वरूपदर्शन आठवले. युद्ध संपल्यावर हिरोशिमा-नागासाकीत जे झाले त्यामुळे फिनमन बरेच दिवस डिप्रेशनमध्ये होते. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे शेवटी याचा वापर माणसावरच अवलंबून असतो. माणूस मुळात विवेकी असेल तर वापर कल्याणासाठी होतो.

भाबडी समजूत २. धर्म, देव इ. गेले की सुख-समृद्धी आलीच म्हणून समजा.
आजच्या आपल्या परिस्थितीकडे डोळसपणे पाहिल्यास किती प्रश्न धर्म, देव यांच्याशी निगडीत आहेत? भ्रष्टाचाराने बरबटलेले नेते, पर्यावरणाचा र्‍हास, कुणालाही न जुमानता ओरबाडून घेण्याची माणसाची वृत्ती. धर्म नसला तरी हे तसेच राहतील. मग सुख-शांती कुठून येणार?

श्रद्धेला समाजातून हद्दपार करणे तितके सोपे नाही कारण याच्याशी लोकांची मानसिकता जोडलेली आहे. असे नसते तर नाताळाच्या काळात सायन्स, नेचरपासून अमेरिकन फिजिकल सोसयटीपर्यंत सर्वांनी सुट्ट्या दिल्याच नसत्या. मागच्या वर्षीतर नेचरने खास नाताळ सवलत म्हणून काही अंक विनामूल्य उपलब्ध केले होते.

माणसाची मानसिकता आणि नेचर-नर्चर यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. एका परिच्छेदात याचे उत्तर देणे बरोबर नाही.

विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवे प्रश्नही उभे रहात आहेत जे ५०० वर्षांपूर्वी नव्हते.
क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर? इच्छामरणाचे काय? गर्भपात? स्टेम सेल रिसर्च? चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा?
या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार?

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

वैदिक अणुउर्जा?

विश्वरूपदर्शन संहाराशी संबंधित होते का? विश्वरूपदर्शनाची आठवण झाली त्यातून भस्मासुराची जाणीव झाल्याचा निष्कर्ष कसा निघतो?
माझ्या आठवणीनुसार, फाइनमनने लिहिले आहे की भांडण झाल्यामुळे डॉक्टरने त्याच्या मानसिक आरोग्याविषयी वाईट रिपोर्ट दिला. शिवाय त्याच्या पत्नीचेही तेव्हा निधन झाले होते.

नाताळसारखे (दिवाळी, इ.) सण आज सांस्कृतिक (लोकांना भेटणे, भेटी पाठविणे, खर्च, चैन, दाखवेगिरी, इ.) उरले आहेत. सांताक्लॉज खेळणी टाकेल असे कोणाला वाटत नाही.

परंतु धर्म किंवा अंधश्रद्धा नष्ट होण्याची मला आशा नाही.

क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर? इच्छामरणाचे काय? गर्भपात? स्टेम सेल रिसर्च? चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा?
या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार?

त्यासाठी गेम थिअरी आहे.

.

विश्वरूपदर्शन संहाराशी संबंधित होते का? विश्वरूपदर्शनाची आठवण झाली त्यातून भस्मासुराची जाणीव झाल्याचा निष्कर्ष कसा निघतो?
चाचणी बघताना उर्जा किती प्रचंड आहे तसेच ती किती विनाशकारक ठरू शकेल याची जाणीव झाली. त्यांनी गीता वाचली होती म्हणून त्यांना ते आठवले.

माझ्या आठवणीनुसार, फाइनमनने लिहिले आहे की भांडण झाल्यामुळे डॉक्टरने त्याच्या मानसिक आरोग्याविषयी वाईट रिपोर्ट दिला. शिवाय त्याच्या पत्नीचेही तेव्हा निधन झाले होते.
ते वेगळे. युद्ध संपल्यानंतर फिनमन बरेच दिवस कामावर येत नव्हते. एकदा त्यांनी एक ब्रिज बांधणारे लोक पाहिले तर त्यांच्या मनात आले की हे सर्व कशासाठी? सगळे नष्ट होणार आहे.

नाताळसारखे (दिवाळी, इ.) सण आज सांस्कृतिक (लोकांना भेटणे, भेटी पाठविणे, खर्च, चैन, दाखवेगिरी, इ.) उरले आहेत. सांताक्लॉज खेळणी टाकेल असे कोणाला वाटत नाही.
मुळात नेचरने नाताळची सुट्टी द्यावी हा विरोधाभास आहे. ट्विटरवर नाताळची सवलत जाहीर केल्यावर एका नेचरच्याच एडीटरने नेचरचे एमॅक्युलेट कनसेप्शनबद्दल काय मत आहे असा खवचट प्रश्न विचारला होता.

परंतु धर्म किंवा अंधश्रद्धा नष्ट होण्याची मला आशा नाही.

क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर? इच्छामरणाचे काय? गर्भपात? स्टेम सेल रिसर्च? चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा?
या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार?

त्यासाठी गेम थिअरी आहे.

गेम थिअरीकडे सर्व उत्तरे आहेत? कृपया संदर्भ द्यावेत.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पुन्हा विचारतो

विनाश आणि विश्वरूपदर्शनाचा संबंध काय?
उर्जा किती निघेल ते अनेक वर्षे माहिती होते.

गेम थिअरीकडे सर्व उत्तरे आहेत? कृपया संदर्भ द्यावेत.

गेम थिअरीकडे उत्तरे नसतात. गेम थिअरी वापरून उत्तरे सापडतात.

अनावश्यक मजकूर संपादित. उपक्रमावर प्रतिसाद लिहिताना इतर सदस्यांचा अपमान होईल असे शब्दप्रयोग कृपया करू नयेत.

पुन्हा

काहीतरी करून फाटे फोडण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. उर्जा निघेल हे माहित असणे वेगळे आणि प्रत्यक्ष चाचणी बघताना त्याची जाणीव होणे वेगळे. इथे फक्त त्यांना हे आठवले इतकेच सांगितले आहे यात संबंध काय? त्यात वैदिक अणूउर्जा वगैरे कशाला?

गेम थिअरीकडे उत्तरे नसतात. गेम थिअरी वापरून उत्तरे सापडतात.
सापडतात ना? मग द्याना उत्तरे. किंवा कुणी शोधली त्याचे संदर्भ द्या. नुसती गेम थिअरी म्हणून काय होणार?
हे प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत याची उत्तरे तुमच्याकडे असल्यास मानवजातीवर तुमचे फार मोठे उपकार होतील.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

पुन्हा पुन्हा

काहीतरी करून फाटे फोडण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

आरोप अमान्य.

उर्जा निघेल हे माहित असणे वेगळे आणि प्रत्यक्ष चाचणी बघताना त्याची जाणीव होणे वेगळे. इथे फक्त त्यांना हे आठवले इतकेच सांगितले आहे यात संबंध काय?

'उर्जा आठविली' हा मूळ दावा नव्हता. 'भस्मासुर आठविला' हा अर्थ तेथे ध्वनित होतो आहे.

सापडतात ना? मग द्याना उत्तरे. किंवा कुणी शोधली त्याचे संदर्भ द्या. नुसती गेम थिअरी म्हणून काय होणार?
हे प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत याची उत्तरे तुमच्याकडे असल्यास मानवजातीवर तुमचे फार मोठे उपकार होतील.

कोणत्याही परिस्थितीनुसार उद्दिष्ट साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधण्याचे गणित म्हणजे गेम थिअरी होय. असा मार्ग म्हणजे विवेकी मूल्य होय.
क्लोनिंग, इच्छामरण, गर्भपात, स्टेम सेल रिसर्च, चंद्रावरील वसाहतीचा हक्क, हे सारेच नीतिमत्तेचे प्रश्न आहेत. त्यांविषयीचे धोरण परिस्थितीनुसार बदलत रहावे लागते. म्हणूनच कोणतेही मूल्य अपरिवर्तनीय नसते. आज लागू असलेली उत्तरे हवी असतील सोपे आहे. do unto others as you would have them do unto you हे तत्त्व बहुतेक परिस्थितींत लागू असते. म्हणून मानवहत्त्या निषिद्ध असते. मानव असण्याची किमान व्याख्या उपचार तंत्रज्ञानानुसार बदलते. त्या व्याख्येत न बसणार्‍यांची हत्त्या मान्य असते.
चंद्राविषयी हा दुवा पहा.

संपादन

"अपमान होऊ नये म्हणून *** असे उत्तर देत नाही" या वाक्यात अपमान कसा होतो?

अनावश्यक मजकूर संपादित. कृपया, उपक्रमावर सभ्यतेला धरून वाक्यप्रयोग करावे.

विधाने

विधाने तुम्ही केली त्यामुळे संदर्भ देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमची सगळी विधाने गुगलून संदर्भ शोधण्याची मला आवश्यकता/गरज वाटत नाही.
याच न्यायाने तुम्ही संजोप रावांना संदर्भ विचारण्याऐवजी गुगलून का बघत नाही?

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

म्हणूनच

त्यामुळेच मी सभ्य उत्तर दिले.
अख्खी गेम थिअरी मी इथे शिकवावी अशी आपली अपेक्षा दिसते. संजोप राव यांना मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे. त्यांना संदर्भ द्यायचा नसेल तर मी काउंटरसंदर्भ देईन. तुम्ही गेम थिअरीच्या निरुपयोगितेचे काउंटरसंदर्भ द्याल का?

तुमची

मोडस ऑपरेंडी नेहेमीप्रमाणे चालू आहे.

आधी विधाने करायची, संदर्भ मागितले की गूगलून पहा म्हणायचे. आख्खी गेम थिअरी कशाला, गेम थिअरी वापरून एखाद्याने क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर हे शोधून काढले असेल तर त्याचा संदर्भ द्या. तुम्ही ही विधाने करायची आणि ती चूक असल्याचे संदर्भ मी शोधायचे यापेक्षा मला माझा वेळ सत्कारणी लावायचे बरेच मार्ग आहेत.
मुळात विधाने करतानाच संदर्भ दिले तर हा सगळा प्रताप करायची गरज नाही. मागेही कझिन्स खोटे बोलतो असे विधान तुम्ही केले, संदर्भ मागितल्यावर तोच प्रकार. शेवटी एक विकीचा संदर्भ दिला त्यात काही सापडले नाही.

असो. यापुढे तुमच्याशी चर्चा करण्यात मला स्वरस्य नाही.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर